मार, एक खाणे

आपल्याकडे मुलांना शिक्षा म्हणून मारणे हे सह्सा सामान्य (normal) समजतात. नुकत्याच वाचलेल्या काही अनुभवांनुसार काहीजणांना याचे काही वाटत नाही तर काहीजणांवर याचे खोलवर दुष्परिणाम झालेले दिसतात. तुमच्यापैकी कोणी अशा घरात वाढले आहात का जिथे कधीच मुलांना मार बसला नाही, आणि त्याचे पुढे काही फायदे/तोटे झाले असे वाटते का?

किंवा तुम्ही स्वत तुमच्या मुलांना कधीच मारत नसाल तर त्याचा परिणाम काय दिसून येतो?

field_vote: 
0
No votes yet

असे घ्रर माझ्या पाहण्यात नाही त्यामुळे पास. मी स्वतः लहानपणी हात, पाय, झाडू, छडी, काठी, चूल फुंकायची फुंकणी, उलथणे, दरवाज्याला लावायचे कुलुप, डोके भिंतीवर आपटणे या सर्व प्रकारचा मार खाल्ला आहे पण त्याचे काही विशेष वाटत नाही. (तेव्हाही फार काही वाईट वाटले नव्हते.)
असे घर मिळण्यासाठी तुम्हाल कदाचित तुम्हाला अधिक तरुण / नवतरुण पिढीचा विदा गोळा करावा लागेल.
बाय द वे, आजकाल मुलांना मारले नाही तरी मुले आईबाबाला मारतात त्यामुळे अगदीच 'मार' अनुभवलेले कुटुंब तरी सापडणार नाही असे वाटते.

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

आजकाल मुलांना मारले नाही तरी मुले आईबाबाला मारतात

हाहा .. पण कुठून शिकत असतील अशी मुले हे?

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

कोणतीही भावना व्यक्त करणे हे सर्वच प्राणिमात्रांत नैसर्गिकरित्याच असते. त्यासाठी कुठे शिकावे लागत नाही. मात्र आपल्या भावना व्यक्त करण्याच्या पद्धतीत होणारे बदल हे आजुबाजूच्या व्यक्तींच्या अनुकरणाने होऊ शकतो.
तुमचे लग्न झाले नसेल तर कधी आजूबाजूची मुले खेळतांना एकमेकांशी कशी वागतात, कसे मारतात यावरुन त्यांनी नुकताच कोणता चित्रपट बघितला असावा याचा अंदाज येऊ शकतो.

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

बाकीचे सारे सोडून देऊ, पण...

तुमचे लग्न झाले नसेल तर कधी आजूबाजूची मुले खेळतांना एकमेकांशी कशी वागतात, कसे मारतात यावरुन त्यांनी नुकताच कोणता चित्रपट बघितला असावा याचा अंदाज येऊ शकतो.

निरीक्षकाच्या वैवाहिक स्थितीचा निष्कर्षाप्रत येण्याच्या क्षमतेशी नक्की संबंध काय?

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

सहसा लग्न झाल्यावर असले प्रश्न पडत नाहित. पडले तरी उत्तरे मिळविण्याच्या भानगडीत पडत नाहि.

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

सहसा लग्न झाल्यावर असले प्रश्न पडत नाहित. पडले तरी उत्तरे मिळविण्याच्या भानगडीत पडत नाहि.

याबद्दल किंचित साशंक आहे.

सॉक्रेटिसइतका 'चिंता करितो विश्वाची'-टैप्स तत्त्ववेत्ता दुसरा बहुधा नसावा. 'हिच्यासारखी बायको मिळाली, तर माणूस एक तर ठार वेडा तरी होईल, नाही तर तत्त्ववेत्ता तरी बनेल', असे उद्गार त्याने आपली सुविद्य पत्नी झांटिपी (काय पण नावआहे!) हिजबद्दल काढले होते, अशी आख्यायिका आहे.

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

झांटिपी (काय पण नावआहे!)

झांटिपी म्हणजे Ξανθίππη या नावाच्या इंग्रजी रूपाचे मराठीकरण आहे. मूळ ग्रीक उच्चार क्सांथिपी असा आहे. त्याचा इंग्लिश उच्चार ज़ांटिपी असा दिसतो.

http://en.wikipedia.org/wiki/Xanthippe

यातले ट म्हणजे इंग्लिश टी असून मराठी ट नव्हे हेवेसांनल.

नावाचा अर्थः

Xanthippe means "yellow horse", from the Greek ξανθός xanthos (blonde) and ἵππος hippos (horse)

त्यामुळे सॉक्रेटिसाच्या तोंडचे हे उद्गार "ज्याला चांगला घोडेस्वार व्हायचे असते तो नाठाळ घोड्यावरच मांड ठोकतो" हे लिटरली देखील खरे असावेत.

वरील उद्गार म्हणजे त्याला एकाने "तुम्ही अशा कजाग बाईशी कसे काय लग्न केलेत?" या प्रश्नाला दिलेले उत्तर आहे असे म्हणतात.

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

माहिष्मती साम्राज्यं अस्माकं अजेयं

रोचक माहितीबद्दल धन्यवाद.

मूळ ग्रीक उच्चार खांथिपी असा आहे.

द 'काय पण नाव आहे!' कमेंट ष्ट्याण्ड्ज़. नॉट जष्ट ष्ट्याण्ड्ज़, बट, इन लाइट ऑफ धिस न्यू इन्फर्मेशन, ष्ट्याण्ड्ज़ टॉलर.

त्यामुळे सॉक्रेटिसाच्या तोंडचे हे उद्गार "ज्याला चांगला घोडेस्वार व्हायचे असते तो नाठाळ घोड्यावरच मांड ठोकतो" हे लिटरली देखील खरे असावेत.

१. घोड्यावर, की घोडीवर? नाही म्हणजे, प्राचीन ग्रीकांबद्दल काहीबाही ऐकले होते, म्हणून विचारले.

२. घोडेस्वार, मांड ठोकणे वगैरे बॉर्डरलाइन अश्लील वाटते. सॉक्रेटिस महाचावट होता, असा निष्कर्ष यातून काढता यावा काय?

असो.

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

द 'काय पण नाव आहे!' कमेंट ष्ट्याण्ड्ज़. नॉट जष्ट ष्ट्याण्ड्ज़, बट, इन लाइट ऑफ धिस न्यू इन्फर्मेशन, ष्ट्याण्ड्ज़ टॉलर.

बाकी आमची अंमळ चूक झाली, क्स च्या जागी ख लिहिले. आयदर वे, द कमेंट स्टँड्स टॉल. ग्रीक नावे तशी विचित्र वाटतातच म्हणा, पण ते 'आपल्या'ला भाषिकदृष्ट्या जास्त क्लोज़ आहेत. फारसीनंतर ग्रीक अन स्लाव्हिक या गटातील भाषा संस्कृतला सर्वांत जास्ती जवळ. हे लॅटिन, जर्मानिक, इ. लै लांब, पण एका जर्मानिक फ्यामिलीतली भाषा बोलणार्‍यांनी भारतावर राज्य केल्याने उलट तीच नावे जवळ वाटतात झालं.

बाकी

१. घोड्यावर असेच वाचल्याचे आठवते. ग्रीक समाजात दोन्हीपैकी कुठलाच पर्याय विशेष अविश्वसनीय नाही.
२. ते लिटरली खरे इ. त्याचमुळे तर आहे.

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

माहिष्मती साम्राज्यं अस्माकं अजेयं

ग्रीक नावे तशी विचित्र वाटतातच म्हणा, पण ते 'आपल्या'ला भाषिकदृष्ट्या जास्त क्लोज़ आहेत. फारसीनंतर ग्रीक अन स्लाव्हिक या गटातील भाषा संस्कृतला सर्वांत जास्ती जवळ. हे लॅटिन, जर्मानिक, इ. लै लांब, पण एका जर्मानिक फ्यामिलीतली भाषा बोलणार्‍यांनी भारतावर राज्य केल्याने उलट तीच नावे जवळ वाटतात झालं.

खरे आहे. 'धृष्टद्युम्न' वगैरे नावे असलेल्या संस्कृतीचा वारसा सांगणार्‍या 'आपल्या'ला 'झांटिपी'सारख्या नावांचे काही वाटायला नाही पाहिजे.

असो.

.........

खरेच?

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

हाहा, खरेच. विशेषतः बंगाली नावे पहा. वारसाच काय, नामदृष्ट्या ते अजूनही त्याच युगात आहेतसे दिसते.

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

माहिष्मती साम्राज्यं अस्माकं अजेयं

हाहाहा ROFL
यावरुन एक नॉनव्हेज जोक आठवला-
सम टिप्स टू हॅव्ह great डॉगी सेक्स-
While at it, tell your wife that you slept with her sister Wink
अर्थात बायको पिसाळेल अन ..... etc etc

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

ठ्ठो ROFL

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

माहिष्मती साम्राज्यं अस्माकं अजेयं

xanthophyl म्हणजे पिवळे रंगद्रव्य

असो. कोणास ठाउक सॉक्रेटिस स्वतच्या मुलांना मारत होता कि सॉक्रेटिक पद्दधत वापरायचा ...

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

सहीच!

प्रश्न बाकी रोचक आहे. त्याला तसा वेळ तरी होता की नै कोण जाणे? लोकांची डोकी खाण्यातनं वेळ मिळाला तर घराकडं लक्ष जाणार ना....वैसेभी घरातलं सगळं तर बायकोच बघायची, त्यामुळे आरडाओरड्याचे कंत्राट तिचेच असणार.

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

माहिष्मती साम्राज्यं अस्माकं अजेयं

मी वाढले आहे अशा घरात. पण त्याचे फायदेतोटे काय आहेत ते कसं सांगणार? माझ्याकडे तुलनेला काही विदाबिंदूच नाही. माझा स्वतःच्या आयुष्यातला शक्य नाही. लोकांच्याही आयुष्यातला नाही. मी बुचकळ्यात पडले आहे.

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

-मेघना भुस्कुटे
***********
तुन्द हैं शोले, सुर्ख है आहन

अजि म्या ब्रह्म पाहिले Smile

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

पण ट्रॅडिशनली पाहता, मुलींना तसेही मारणे कमीच आहे ना.

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

माहिष्मती साम्राज्यं अस्माकं अजेयं

असंपण असतं का? :-S
मला सख्खा भाऊ नाही. त्यामुळे त्याबद्दल थेट अनुभव नाही.

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

-मेघना भुस्कुटे
***********
तुन्द हैं शोले, सुर्ख है आहन

असंपण असतं का?

ठाणे नक्की महाराष्ट्रातच, आय मीन पृथ्वीवरच होते/आहे ना?

वडील लोक तर मुलींना शक्यतो हात लावतच नसत. लहान असताना कडेवर घेणं वगैरे तरी होतं, वयात आल्यावर तर स्पर्श टाळण्याकडेच कल.
आया तरी अधूनमधून मारायच्या वगैरे, पण ते तेवढंच. मुलांना जितका मार पडायचा त्या तुलनेत मुलींना काहीच पडत नसे.

तरी हे सगळं 'आमच्या लहानपणचं' सांगतोय. मोठ्या शहरांत हुच्चभ्रू आणि वॉनाबी हुच्चभ्रूंमध्ये आता तर पोरापोरींना मारणेच बंद झालेय असे दिसते. (ते मला आवडत नाही.) लहान शहरांत आणि खेड्यांत मात्र अजूनही मारसंस्कृती टिकून आहेसे दिसते. शहरांतही बिगरहुच्चभ्रूंमध्ये ही संस्कृती टिकून असावी बहुधा.

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

माहिष्मती साम्राज्यं अस्माकं अजेयं

वडील लोक तर मुलींना शक्यतो हात लावतच नसत. लहान असताना कडेवर घेणं वगैरे तरी होतं, वयात आल्यावर तर स्पर्श टाळण्याकडेच कल.

यावरून पालकनीतीचा जानेवारी २०१५चा अंक आठवला. याच्या मुखपृष्ठाविषयी या भागात बॅट्या म्हणतोय त्याच्याशी समांतरच लिहिलंय.

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

- ऋ
-------
लव्ह अ‍ॅड लेट लव्ह!

धन्यवाद.

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

माहिष्मती साम्राज्यं अस्माकं अजेयं

मी लहानपणी धपाटे, कानफडात खाल्लेल्या आहेत वडिलांकडून. आईकडूनही. खराट्याची काडी किंवा तत्सम काहीतरी प्रकरण जे काय सप्पकन बसायचे पायावर आणि पायावर बसायच्या आधी जो काय आवाज यायचा तोच ड्यांजर असे.
सातवी आठवीत असताना आजोबांच्या हातची मावसभावाच्या वाट्याची कानफडात पण खाल्ली आहे. आम्ही दोघे काहीतरी टूळपणा करत होतो आणि मी नेहमीप्रमाणेच बावळट ठरल्याने आजोबा वैतागून फटका देण्याच्या आवेशात येतायत हे कळेपर्यंत मावसभावाने धूम ठोकली होती आणि समोर मी असल्याने माझ्या कानाखाली खणखणीत वाजली होती.
आमच्या काकाश्रींकडून चापट्या खाण्याची पण एक आठवण आहे.
सुट्टीत काकाकडे रहायल्या गेल्यावर संध्याकाळचे मी आणि चुलतभाऊ परवचा, पाढे, निमक्या, पावक्या वगैरे म्हणायला बसवले जाऊ. मधे काका आणि दोन बाजूंना दोन भुतं. म्हणायला चुकलं की फटकन मांडीवर चापट बसलीच पाहिजे. त्यात आपला मुलगा, भावाची मुलगी, मुलगा मुलगी कसलाही भेदभाव नसायचा. हे चौथी-पाचवी पर्यंत चाललं होतं बहुतेक.
तिसरीत एक वर्गशिक्षिका होत्या. जाम मारकुट्या होत्या. फाडफाड कानाखाली वाजवायच्या. तिसरीतल्या मुलींना किती जोरात कानफडात मारावी याला काहीतरी लिमिट असायला हवी ना. वर्गात एक मुलगी नव्हती जिने त्यांचे फटके खाल्ले नाहीत. डोळ्यापुढे काजवे चमकणे याचा प्रत्यय आला चांगलाच.

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

- नी

खराट्याची काडी किंवा तत्सम काहीतरी प्रकरण जे काय सप्पकन बसायचे पायावर आणि पायावर बसायच्या आधी जो काय आवाज यायचा तोच ड्यांजर असे.

अगदी अगदी. कोंकणात याचा इक्विव्हॅलंट म्हणजे आवळ्याची शिंपटी. वेदना ठीकठाक, पण आधीचा आवाज जास्त डेंजर.

आम्ही दोघे काहीतरी टूळपणा करत होतो आणि मी

टूळपणा शब्द मस्तपैकी आवडला आहे. आता वापरणार. आचरटपणा, फालतूपणा, मोठ्यांच्या दृष्टीने अनावश्यक पण लहानांसाठी महत्वाचा असा काहीतरी कारभार अशा अर्थीच आहे ना साधारण ?

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

वात्रटपणा पण अ‍ॅड करा त्यात.

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

- नी

टूळपणा

किंवा
ट्रोलपणा Smile

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

आमच्या मातोश्री आम्हां भावंडांना अधूनमधून चापट्या द्यायच्या. आम्हाला मारलेलं त्यांनाच लागायला लागलं तेव्हा चिमटे काढायला, कान पिळायला सुरुवात केली. अर्थातच, चिमट्यांवर घसरण्यात भावाचा हातभार बराच जास्त होता. पुढे आम्ही तिच्या चिमट्यांमुळे लांब बसायचो आणि काळवेळ बघून पळून जायला सुरुवात केली. या सगळ्या प्रकारांचं गोष्टीवेल्हाळ वर्णन ती तिच्या वडील-काकांसमोर करायची.
आमचे बापूमात्र उच्च नैतिक भूमिका छापातले होते. एकदा कधीतरी म्हणे त्यांनी भावाला एक फटका मारला म्हणून त्या रात्री जेवले नव्हते. ही गोष्ट आम्हां भावंडांना आठवत नाही. ते सांगायचे तेव्हा त्याच्यासमोर अपराधाची कबुली दिल्यासारखे बोलायचे. "अदितीला मी कधीही मारलं नाही" हे अभिमानाने म्हणायचे. अभिमान स्वतःबद्दल, माझ्या भल्याबुऱ्या वागण्याबद्दल त्यात कॉमेंट नसे.

एकंदरच लहानपणी मी गुणी बाळ होते (खर्रंच), पण सुदैवाने वेळेतच भावाची योग्य संगत लाभली आणि नतद्रष्ट कार्टी बनायला फार उशीर झाला नाही. मोठ्या भावामुळे आईवडलांची कातडी थोडी जाड झाली त्यामुळे मला मार आणि ओरडा कमी पडला असावा असा माझा तर्क आहे.

याचे इष्टानिष्ट परिणाम काय झाले याची कल्पना नाही. आईच्या गप्पांमुळे 'आईवडलांकडून लहानपणी मिळालेला मार ही मोठेपणी गफ्फा हाणण्याची गोष्ट आहे, त्याकडे फार लक्ष देऊ नये' एवढा समज लहानपणी जरूर झाला.

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

---

सांगोवांगीच्या गोष्टी म्हणजे विदा नव्हे.

पण त्यामागे स्त्रीबद्दल उदारवादाची भुमिका नसावी असे वाटते. मुलीला एखादी चापटी मारायची आणि मग स्वतःचं डोकं दु:खेपर्यंत तिचं रडणं ऐकत राहायचं याला बरेच पालक घाबरतात. शिवाय काही बाबतीत स्त्रियांची स्मरणशक्ती जात्याच पुरुषांपेक्षा तीव्र असते. उद्या जर एखाद्या मुलीने तिच्या वयाच्या पंचविसाव्या वर्षी तिच्या बाबाला जाब विचारला की, 'मी दोन वर्षांची असतांना तुम्ही मला मारले होते. तुम्ही किती दुष्ट आहात !' तर काय उत्तर द्यायचे ? Smile

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

मुलगीबद्दल बापाच्या मनात सॉफ्ट कॉर्नर असतोच, शिवाय शाळेतही ते समीकरण असतेच. इनफॅक्ट ते तसे असते अशी कबुली खुद्द आमच्या शाळेतच एका सरांनी दिलेली होती - जेव्हा आम्ही या असमानतेविरुद्ध तक्रारीच्या सुरात बोललो होतो तेव्हा. पण एक सर होते जे शिक्षेत भेदभाव करत नसत. त्यांच्या शिक्षेत फिजिकल मार नसे, त्यामुळे तिथे अभेद चालायचा. पण काय काय बोलायचे ते, पृथ्वी दुभंगून पोटात घेईल तर बरे ROFL

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

माहिष्मती साम्राज्यं अस्माकं अजेयं

पण मग मुलांना मारण्यात आया पुढे का असतात Smile (but seriously भारतात यावर नीट संशोधन झाले पहिजे असे वाटते)

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

लहान म्हणजे किती लहान? ४-५ वर्षांपर्यंत यात लिंगभेद तितका नसेलही, पण पुढे? पुढे तसं नसतं.

शिवाय आया मारण्यात पुढे असतात कारण त्यांचा संपर्क जास्त येतो. वडील तितके संपर्कात असते सतत तर त्यांनीही मारले असते.

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

माहिष्मती साम्राज्यं अस्माकं अजेयं

सेक्सिस्ट!

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

हां, तेही आहे म्हणा, पण मग हा प्रश्न कसा सुटेल ... काय चूक, काय बरोबर ..

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

मारण्यापेक्षा बोलण्याचे फायदे-तोटे अधिक आहेत असंच आजपर्यंत जाणवलं आहे, मारणं विसरलं जातं, बोलणं लक्षात रहातं. कडू आठवणी बहुदा मारण्याच्या नसतातच.

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

+१

बाकी तुमचे username अगदी विषयाला धरुन आहे Smile

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

बाबांचा प्रचंड मार खाऊनही बाबा आवडतात. आईची प्रचंड बोलणी खाल्लेली आहेत ती मात्र अढी आहे Sad
पण याचे कारण डीप-डाऊन , आई हक्काची वाटते हेच्च आणि हेच्च आहे.

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

वडलांच्या हातचा मार खाल्ला आहे. बरीच बोलणी देखील खाल्ली आहेत. वर "मी" म्हण्टलं आहे त्यात तथ्य आहे. कटु शब्दांच्या आठवणी आहेत. मार खाल्ला त्याबद्दल हसून बोलता येतं. कटु शब्दांबद्दल तसं करणं कठीण जातं.

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

नो आयडियाज् बट इन थिंग्ज.

मार खाल्ला त्याबद्दल हसून बोलता येतं. कटु शब्दांबद्दल तसं करणं कठीण जातं.

+१
-सहानुभवी

( खाली निळूभाऊंनी म्हटले आहे तशापैकी 'खरा' मार न खाल्ल्यामुळे कदाचित, पण त्याबद्दल फारशा आठवणीच नाहीत. कटु शब्दांबद्दल मुसुरावांशी सहमत.)

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

मार खाऊन विसरलेल्या लोकांनी खरा मार खाल्लेलाच नाही असे एक निरीक्षण नोंदवून आपली रजा घेतो.
-निगरगट्ट

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

मार खाऊन विसरलेल्या लोकांनी खरा मार खाल्लेलाच नाही >> +१. मी स्वतः फारसा मार खाल्लेला नाही. पण प्रचंड चाइल्ड अब्युज जवळून पाहिला आहे. And it leaves scars for a lifetime, not only on the receiver, but also on the viewer. असो. मुलींना/स्त्रियांना मारत नाहीत वाचून परत एकदा किती भिन्न विश्व असतं मराठी आंजावरच्यांच आणि इतर समाजाच वाटलं. तेपणएक असोच.

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

बेसकलि इट्स कॉंंप्लिकेटेड.

का मारलं, कसं मारलं, कोणी मारलं, किती वेळा मारलं (frequency), मारतांना काय बोललं गेलं, मारल्यानंतर काय केलं .. बरेच variables आहेत असं वाटतं.

आणि आपल्याला मार आठवत जरी नस़ला तरी subconsciously काही परिणाम होतंच असणार असं वाटतं ..

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

हो बरेच व्हेरीएबल्स असतात. आणि सबकाँशसली परीणाम होतच असतो. रादर इथे कोडगा, निगरगट्ट, तेव्हापण काही वाटलं नाही आतादेखील काही वाटत नाही इ लिहीणारे जे आहेत तेदेखील एकप्रकारचा परीणामच रिव्हील करतायत. Its a defence mechanism to avoid downfall. किंवा खरोखरच 'खरा' मार खाल्ला नसेल. एनीवे...

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

मजबूत मार खाल्लेला आहे आईच्या हातचा. पण मला अढी वगैरे काय ती नाही बसली बॉ कोणाबद्दल. अर्थात मार खाल्ला तो भावासोबत मारामार्‍या करण्याबद्दलच खाल्लेला आहे ते एक असो. काय ते दिवस होते, हाताला सापडेल त्या गोष्टीने मारामारी केली जायची.

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

शाळेत सरांकडून वेगवेगळ्या प्रकारे मार खाल्ला आहे. सर्वच्या सर्व तांत्रिक आणि त्यावेळी माझ्यामते किरकोळ असलेल्या कारणांवरुन. पेन्सिलीऐवजी पेनाने लिहिणे, अक्षर घाण आहे असं शिक्षकांना वाटणे.

घरी एखादी चापट सोडल्यास काही नाही. पण शेजारच्या घरांमधे पोरापोरींना अ‍ॅब्युसिव्ह पद्धतीने मारताना इतकं पाहिलं आहे की एकूण कोणीही कोणालाही मारणं ही गोष्ट खास मौजमजेची म्हणून सांगावीशी वाटत नाही. शेजारचे काका मुलीच्या अक्षरशः अंगावर बसून चामडी कमरपट्ट्याने फोडून काढायचे. मुलग्यांबाबतही तीच ट्रीटमेंट. मुलं बरीच मोठी झाली तरी अंथरुणात शू करत, आणि त्याचा या सततच्या दहशतीशी संबंध असावा असं मला वाटतं. आमचे पालक अनेकदा तिथे उपस्थित असले तर मधे पडायला जायचे आणि बोलणी खायचे. मला वाटतं पोरांना मारणं हे आईबापांच्या मुळात आयुष्यात अन्यत्र त्रस्त असण्याशी संबंधित आहे.

मुलींबाबत वडील जगभरात इन जनरल किती मारतात ते माहीत नाही, पण नंतर मोठी झाल्यावरच्या आयुष्यात बायकोला प्रचंड मारणारे पुष्कळ लोक असल्याने स्त्रीला पुरुषाइतका मार पडत नाही हे म्हणणं धाडसाचं ठरेल. शिवाय बोलण्याचा मार असतोच. त्यामुळे हा विषय नकोसा वाटतो. स्त्रियांचे अ‍ॅव्हरेज शक्तीचे प्रमाण अ‍ॅव्हरेज पुरुषाच्या तुलनेत काय असेल ते असो, पण मार खाणार्‍या बाईने खरोखर जीव खाऊन उलटा हात उचलावा असं मनापासून वाटतं. मारणारा पुरुष /(असल्यास स्त्रीसुद्धा) नक्की हबकून जाईल. तोच उपाय आहे. त्यासाठी मनाची शक्ती कशी यावी ही खरी समस्या. उलट वार होणार नाही याची खात्री असल्यामुळेच मारणारे बहुसंख्य असतात.

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

शाळेतला मार हा निगडीत विषय आहे (आमच्या शाळेतले एक सर नवनवीन पद्दधतीने मारण्याबद्दल कुप्रसिद्ध होते). पण शिक्षकांशी एवढी attachment नसल्याने त्यांचा फक्त द्वेष करण्यात काही वाटत नाही. घरच्यांची गोष्ट वेगळी.

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

अगदी सेम केस मी पाहिलीय. आणि साधारण अशाच दोन केस अन्य गावातल्या ऐकल्या आहेत. आईबाप मुळात आयुष्यात अन्यत्र त्रस्त असतात किंवा मनोरूग्ण असतात. अशा केसेसमधे शेजार्यांनी सरळ पोलिसांना बोलवायला पाहिजे. किंवा जरी डायरेक्ट कंप्लेंट केली नाही तरी ओळखीतल्या कोणाकरवी ऑथोरीटीने धाक दाखवला/ वॉर्निंग दिली तरी फायदा होतो.

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

@निळ्या: मार खाऊन विसरलेल्या लोकांनी खरा मार खाल्लेलाच नाही असे एक निरीक्षण नोंदवून आपली रजा घेतो.

@गवि: घरी एखादी चापट सोडल्यास काही नाही. पण शेजारच्या घरांमधे पोरापोरींना अ‍ॅब्युसिव्ह पद्धतीने मारताना इतकं पाहिलं आहे की एकूण कोणीही कोणालाही मारणं ही गोष्ट खास मौजमजेची म्हणून सांगावीशी वाटत नाही.

१०००००% सहमत. मी एक-दोन चपाट्या काय त्या खाल्ल्या असतील, पण जे मित्र मैत्रिणींकडून ऐकलंय त्याने अंगावर काटा येतो. त्यांच्या बाबतीत तरी ही हसून विसरण्याची गोष्ट अजिबात नाही.

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

लहानपणी बर्‍यापैकी मार खाल्लाय.. जास्तकरून आइकडून. शाळेत काही शिक्षक उभ्या पट्टीने तळहाताच्या मागे मारत.. पण तो मार खाण्याचे फार प्रसंग आले नाहीत..
पण माराचे फायदे तोटे वगैरे फार काही झाले नसावेत आमच्या बाबतीत..

चिरंजीवांना मार देउन अजिबात फायदा होत नाही. म्हणून न मारण्याचे धोरण स्वीकारलय पण चिरंजीव पेशन्सची फार परीक्षा बघतात मग कधीकधी मार द्यावा लागतो.. पण त्यातही प्लान बी म्हणजे मार फक्त मार देण्यासाठी निर्माण केलेल्या जागेवर Smile

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

कधीकधी घोस्ट्स ऑफ द किक्स डोंट लिसन टु टॉक्स हे जाणवतं हे खरंच.. Wink बाप अजिबात मारत नाही याची खात्री झाल्यामुळे / झाली तर पोरं फारच अंत पाहतात अनेकदा. बर्‍याचजणांचं निरिक्षण आहे हे. आवाज चढवायचा मग अशा वेळी. किंवा धमक्या द्यायच्या टीव्ही वगैरे बंद करण्याच्या. तेही फार काळ चालत नाही. धमक्यांचे विषय बदलत ठेवावे लागतात.

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

मार ?
मार म्हणजे ...
ते तसच ना, मरेस्तोवर मारणं. लहान पोरगं ओक्साबोक्शी रडेस्तोवर त्याला थोबाडवणं; लाथाबुक्क्यांनी बदडणं..अंगावर सूज येइपर्यंत ?
आई-बाबांनी फारच मारलं असंही नाही; किंवा "अगदी कध्धी कध्धी म्हणून हात लावला नाही " असंही नाही.
माफक, थोडंफार --नॉमिनल म्हणता येइल; तत्कालिन मध्यमवर्गीय मराठी घरात मारण्याची जी सरासरी होती; त्यामानाने जरा कमीच मारलं. पण शाळेत मात्र.......
.
.
शाळा.
इंग्लिश.
एक कृतघ्न कर्तव्य पराङ्मुख हिंस्त्र जनावर शिक्षक म्हणून होतं आठवी ते दहावीला.
त्याच्यामुळे इंग्लिश अगदिच कमकुवत राहिली. निर्णायक क्षणी खराब इंग्लिशची जी
काही किंमत मोजावी लागली त्याने आजही वेदना जाग्या होतात.
हा इसम थोडंफार काही चुकलं तरी रान्डुकराची शिकार करताना त्याला क्रूर पद्धतीनं मारत नसतील तशा पद्धतीनं मारायचा.
(प्लीझ नोट :- चुका म्हणजे गुन्हे नव्हेत. स्पेलिंग चुकणं, कर्ता-कर्म्-क्रियापद चुकणं ह्याबद्दल हे असलं अमानवी मारायची काहीही गरज नाही.
एखाद्या पोरानं गुन्हा केला असेल; इतर पोरांना मारहाण केली असेल; किंवा मुलींची छेड काढली असेल तर तो गुन्हा ठरु शकतो.
त्याला कडक शिक्षा देणं समजू शकतो. पण स्पेलिंग मिस्टेकसाठी जीव्घेण्या शिक्षा??
फक्त दोन-चार गोष्टी समजायला जास्त वेळ लागतोय; पोराचा स्पीड थोडा कमी आहे शिकायचा ; म्हणून हे असं ?? )
हा इसम काहीही शिक्वत नसे. फक्त येउन चिडचिड करुन निघून जाइ बहुतेकवेळा.
अचानक येउन न शिकवलेल्या धड्यावर प्रश्न विचारी. जमले नाही तर फोडून काढी.

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

तुम्ही विषय काढलाच आहे तरः

-गुन्हा: सुभाषितमाला (डेली) लिहून आणण्यात एक दिवस कसूर करणे
सजा: विद्यार्थ्याचं बोट घट्ट पकडून सुभाषितमालेच्या प्रत्येक शब्दावर ते उभं ताकदीने आपटून आपटून पूर्ण सुभाषितमाला मोठ्याने वाचणे. बोटांची हाडं तुटण्याच्या सीमारेषेवर

-गुन्हा: रंगपेटी विसरणे
सजा: पस्तीस मिनिटे ओणवे, कंबर-पाठ-पाय यांना असह्य रग, त्यासोबत पोटरीवर जाड फोकाने जोरदार वार.. रक्त येणं अत्यंत कॉमन.

-गुन्हा: असाच काहीतरी
हात टेबलावर पालथा ठेवून बोटांच्या सांध्यांवर उभी लाकडी पट्टी जोरात

-गुन्हा: असाच काहीतरी
प्रत्यक्ष मारण्यापूर्वी गुन्ह्याचं जाहीर वाचन आणि ते चालू असताना ज्या जाड छडीने मारणार त्याला स्वतःच्या हाताने कुरवाळणे, पायावर हलकेच फट्फट मारुन टेस्ट केल्यासारखे करणे, छडीवर फुंकर मारणे, एकूण छडीचा प्रीफ्लाईट चेक करुन दाखवणे आणि मग साड साड साड.

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

आणि अशा माराचे रेसिपियंट पोरेच...सो मच फॉर मेल प्रिव्हिलेज.

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

माहिष्मती साम्राज्यं अस्माकं अजेयं

बाप रे! भयंकरच प्रकार होते!

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

********
It is better to have questions which don't have answers, than having answers which cannot be questioned.

तुम्ही राजारामपुरीतल्या श्रीराम विद्या मंदीर मधल्या कांबळे सरां बद्दल बोलताय का?

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

..नाही..तसंही हे कॉमन होत

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

तुम्ही राजारामपुरीतल्या श्रीराम विद्या मंदीर मधल्या कांबळे सरां बद्दल बोलताय का?

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

गम्मत म्हणजे, काहीजण रडणे थांबवावे म्हणून मारतात. काय विरोधाभास आहे!
--
अशा शिक्षकांना त्यांच्याच भाषेत "हेच शिकवलं का B. Ed. मधे?" असं विचारायला पाहिजे. कसला illogical प्रश्न आहे .. म्हणे हेच शिकवलं का घरी.

मालगुडी डेज मधला scene आठवला. स्वामी मारणार्‍या सरांची छडी तोडून चक्क पळून जातो. बेस्ट!

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

एकदा मित्राच्या पोटरीतून खूपच रक्तस्त्राव झाला तेव्हा आम्ही तीनचारजण तिरिमिरीत त्याला घेऊन रक्त दाखवायला मुख्याध्यापकांकडे गेलो होतो. एकदाच असा तेजस्वी प्रकार केला. मुख्याध्यापकांनी आयोडीन (आयोडीनच ना ते.. पूर्वी शाळेत टीचर्सरूममधे वगैरे कुठेतरी एका उघड्या बाटलीत जांभळ्या शाईसारखं काहीतरी काडी अन कापडी बोळा बुडवून खिळ्याला लटकावलेलं असायचं ते?) लावून वर्गात परत जायला सांगितलं. पूर्ण वाफ फुस्स झाली.

आता शहरी शाळांमधून तरी मार शून्यवत झाला आहे असं दिसतं. गावाकडे माहीत नाही. आम्ही गावाकडचे, त्यामुळे आमच्या लहानपणीही शहरात मारत नसू शकतील. कल्पना नाही.

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

मार खाल्लेल्यांनी आणि न खाल्लेल्यांनी रोवान अ‍ॅटकिंसनचे 'फेटल बीटिंग्ज' हे कॉमेडी स्केच नक्की पहावे.
(यूट्यूबवरची लिंक आत्ता देऊ शकत नाहिये.)

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

माराचं का एवढं कौतिक आहे. जिथे ४-५ वर्षाच्या मुलांना जगण्याचा हक्क आहे का नाही यावर चर्चा झडतात तिथे मार म्हणजे किस झाड की पत्ती!

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

आधी रोटी खाएंगे, इंदिरा को जिताएंगे !

हा हा हा, हे बाकी एकदम नेमकं आहे. फडतूस बांडगुळांवर इतकी चर्चा म्हणजे उदाहरणार्थ रोचक ठरावी.

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

माहिष्मती साम्राज्यं अस्माकं अजेयं

मार्मिक

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

प्र काटा आ

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

जिथे ४-५ वर्षाच्या मुलांना जगण्याचा हक्क आहे का नाही यावर चर्चा झडतात

कुठे!?

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

होती एक मोठी चर्चा. गर्भपातावरून तिथे पोचली होती ती चर्चा. शोधतो थांबा.

सापडली.
http://www.aisiakshare.com/node/3930

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

आधी रोटी खाएंगे, इंदिरा को जिताएंगे !

५ महिन्याच्या बांडगुळाच्या जगायच्या हक्काबद्दल 'एवढी' काळजी असणार्यांनी अनवाँटेड चिल्ड्रन आणि नालायक पालक बघीतले नसतील.
जगायच्या हक्काबद्दल घसा फोडून, शिरा ताणून फार बडबड करता येते. पण त्या जगण्याची क्वालिटी काय आहे त्याचा विचारदेखील करायला नको.

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

असे नालायक पालक आणि हृदयद्रावक परिस्थिती पाहिली आणि कुणीतरी कायमचं कडवट झालं, हे अतिशय दुर्दैवी आहे.

पण म्हणून ते 'कुणाच्याही' जगण्याचा हक्क हिरावून घेण्याचं समर्थन कधीही होऊ शकत नाही. अशी परिस्थिती भोगावी / पाहावी लागणं हे कुणावरही ओढवलेलं संकट आहे. त्याबद्दल सहानुभूती आहे. पण कडवट होऊन सकारात्मक गोष्टींवर फुल्या मारत सुटण्यासाठीचं ते क्वालिफिकेशन नव्हे.

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

-मेघना भुस्कुटे
***********
तुन्द हैं शोले, सुर्ख है आहन

तिथेदेखील मनोबाच्या निरर्थक प्रतिसादाला उत्तर दिलं होतं की मी फक्त मरण्याबद्दल बोलतेय त्यात अब्युजचा हक्क येत नाही. तरी परत परत तेचते आपली डब्बल्ल ढोलकी वाजवत राहायच आणि समजुतदार मार्मिक आदरणीय प्रतिसाद देत राहायच.
जगण्याच्या हक्काच एवढं कौतिक आहे ना तुम्हाला गविंनी दिलेल्या शेजार्यांचा उदाहरणात तुमच्यापैकी कितीजणांना इंटरव्हेन केलं असतं? त्या पालकांना जेलात टाकलं असतं पोलीस कंप्लेंट करून? त्या मुलांना घरी आणून सांभाळलं असतं? उगा जालावर फुकाच्या गप्पा झोडून नैतिकतेचा उदोउदो करायला कोणाच्या बापाचं काय जातय...
----------
"'कुणाच्याही' जगण्याचा हक्क हिरावून घेण्याचं समर्थन कधीही होऊ शकतं की नाही" सांगत फिरणारेच "दुसर्याच्या शरीरावर तिसर्याचा हक्क आहे" हेदेखील तेवढ्याच समजुतदार मार्मिकपणे सांगत फिरत असतात. असो.

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

अगं टिंकू तुला खूप इन्टेन्स भावना आहेत हे जाणवतय मला. पण प्रत्येकाचा एक युनिक लाइफ-पाथ असतो अन त्यातील अनुभवांनुसार व त्या त्या व्यक्तीच्या प्रकृतीनुसार, तिचा कल अन समजूती, ठामपणा, श्रद्धा घडतात. तू चकीची नाहीस अन आम्हीही नाही. पण एखादा कायदा करायला विदा हवा. अशा भयानक केसेस किती आहेत की ज्यामध्ये पालकांनी अपत्याला अमानुष वागणूक दिली Sad
.
जर फार नसतील तर तसा अनुभव आलेली लोकही कमी असतील अन मग कायदा हा मेजॉरिटीवाले पास करतील.

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

मायनॉरीटी होमोसेक्शुएलीटीला गुन्हा ठरवणारे हेटरोसेक्शुअल मेजॉरीटीच असतात.

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

ह्म्म. मुद्दा निर्विवाद आहे.

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

शेजारी पाजारी मारहाण चालली असेल तर गप्प बसण्याऐवजी (मुलांनाच असं नाही तर फॅमिली व्हॉयलन्सचा कोणताही प्रकार) तर 'रिंगिंग द बेल' हा उपाय जगभरात वापरला जातो.

त्याची बेल बजाओ हा उपक्रम ही भारतीय आवृत्ती

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

- ऋ
-------
लव्ह अ‍ॅड लेट लव्ह!

हे बेल बजाओ फक्त "Violence against women" का आहे? पुरुषांवर अत्याचार नाही होऊ शकत का?

Ring The Bell calls on men and boys around the world to take a stand and make a promise to act to end violence against women. From 8th March 2013 to 8th March 2014 we're going to get one million men to make one million promises to ACT to end violence against women

हेच आहे ना (चांगलं) काही डिस्क्रिमिनेशनचा फक्त बायकांना फायदा मिळतोय. जे चूकीचे नाही का? एखाद्या स्त्रीमुक्तीवादी कोणीतरी या प्रश्नाचे उत्तर द्यावे.
____
कदाचित असे असेल की पुरुष ताकदीने गप्प करु पाहतात तर बायका कटकट कटकट करुन मेंटल अ‍ॅब्युझ देतात. अन मेंटल अ‍ॅब्युझ करता कुठली बेल अन कुठलं काय.

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

बेल बजाओ फक्त "Violence against women" का आहे? पुरुषांवर अत्याचार नाही होऊ शकत का?

अं? कै च्या कै!

त्या संस्थेच्या चालकांना ही संस्था त्या कारणासाठी हवी असेल म्हणून.
एकाच उपक्रमाने जगातील प्रत्येक अत्याचारावर काम करावे अशी अपेक्षा का? तत्यांनी पुरुषांवर अत्याचार नाही होऊ शकत असे कुठे म्हटलेय? त्यांना एकुणात कौटुंबिक हिंसाचारावर एक सोपा उपाय द्यायचाय.

ज्यांना पुरूषांवरील अत्याचाराचीही तितकीच तीव्रता नी काळजी वाटते त्यांनी त्यांच्यासाठीही संस्था काढावी.

अत्याचार काय स्त्री, पुरूष, प्राणी, पक्षी, कीटक अनेक जीवांवर होत असतील, याच संस्थेने त्या सगळ्यात लक्ष का घालावे?

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

- ऋ
-------
लव्ह अ‍ॅड लेट लव्ह!

अत्याचार काय स्त्री, पुरूष, प्राणी, पक्षी, कीटक अनेक जीवांवर होत असतील, याच संस्थेने त्या सगळ्यात लक्ष का घालावे?

स्त्रियांवरचेच अत्याचार थांबवणं एव्होल्यूशनला धरून असावं बहुधा, पुरुषांवर अत्याचर तसेही होतच नाहीत.

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

माहिष्मती साम्राज्यं अस्माकं अजेयं

चक्क बरोबर आहे तुमचे बॅटमॅन. तुमच्या या प्रतिसादामुळे माझ्यावर चक्क कसलाही अत्याचार झाला नाही.

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

मी एक बॉट. शाब्दिक कचरा तयार करणं हे माझं काम. Write first, think never.

ऑ: अच्च जालं का?

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

माहिष्मती साम्राज्यं अस्माकं अजेयं

गविंचा नेहमीप्रमाणे उत्तम प्रतिसाद. वडिलांनी फटके दिले पण आठवणीत राहील असे कधी फारसे मारले नाही. एकदा वैतागून मारायला आले तेव्हा मी पुढे पळालो. आणि आमची गल्लीत बराच वेळ पळापळी झाली. अखेरीस मला पकडले तेव्हा 'काय झालं एवढं पळायला' असं म्हणून एक धपाटा दिला होता तो प्रसंग अजून आठवतो. (त्या प्रसंगाी इंटेंसिटी जबरदस्त असल्याने अजूनही लक्षात आहे. योग्य वेळी हालचाल न करता कदाचित लवकर हाती लागलो असतो तर चांगलेच फटके पडले असते). एकदा पैसे चोरल्याचा (व्हॅलिड) संशय आल्याने आईने एकदाच जोरदार (लाटणे वगैरे घेऊन) फटकेबाजी केली होती. मात्र नंतर माझ्याऐवजी तीच रडली होती आणि हाताने जेवण भरवले होते. (टू बी फेअर टू हर, रंगपंचमीच्या पिचकारीसाठी कायदेशीर पैसे मिळत नसल्याने माझ्याकडून पैसे परत करताना एक छोटी अकाऊंटिंग मिस्टेक झाली होती. ती लक्षात येणार नाही असा गैरसमज फटके खाल्यावर अर्थातच दूर झाला).

बाकी आमच्या शेजाऱ्यांमध्ये फारच हिंस्त्र पालक होते. एक शेजारी दारु पिऊन अक्षरशः लाथाबुक्क्यांनी मुलांना तुडवत असत. घरात कमरेत लाथ घातल्यावर त्यांची मुले सिनेमातल्या दृश्यांप्रमाणे घराबाहेर तीनचार फूट लांब ढकलली जात. बायकोलाही पट्टा, चप्पल घेऊन कुत्र्यासारखी मारहाण होत असे. घरात सुरु झालेला ह्या सर्व प्रकाराचा क्लायमॅक्स व बहुतांशी सर्व अॅक्शन सार्वजनिक मनोरंजनासाठी घराबाहेरील अंगणात किंवा रस्त्यावर होत असल्याने आम्हाला पिटात बसून फर्स्ट डे फर्स्ट शो बघायला मिळत असे. काही पालक शाळेत येण्यास नकार देणाऱ्या मुलांना गुरासारखे बडवत गावभर मिरवणूक काढून शाळेपर्यंत आणून सोडत. अर्थात गावात असे प्रकार फारच नियमित असल्याने काही चुकीचे आहे असे कुणाला वाटत नव्हते. मात्र आजकाल गावाकडे मुलांना बरीच चांगली वागणूक दिली जाते असे पाहिले आहे.

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

महात्मा गांधी चावले, की चित्रगुप्त (आयडी नव्हे) आडवा आला?

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

खरंय. एकदम कन्फेशन म्हणतात तसा झालेला दिसतोय प्रतिसाद.

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

तुमच्यापैकी कोणी अशा घरात वाढले आहात का जिथे कधीच मुलांना मार बसला नाही, आणि त्याचे पुढे काही फायदे/तोटे झाले असे वाटते का?

होय! मी अशाच घरी राहत होते. मी कधीच आई-वडिलांचा मार खाल्ला नाही. मारणे दूरच ते कधी मोठ्या आवाजात रागाऊन, ओरडून माझ्याशी बोललेले मला आठवत नाही.
आई कधी चिडायची, पण तितकाच लवकर तिचा राग शांत होतो.
माझा बीजगणित आणि भूमितीचा अभ्यास घेताना , मी कितीही चूका केल्या तरी बाबा कधी चिडले किंवा ओरडले नाहीत. शांतपणे परत परत ते शिकवत रहायचे.
याचा फायदा तोटा माहीत नाही, पण आम्हाला कधी आमच्या आई-वडिलांची भिती वाटली नाही. कुठलाही निर्णय घेताना त्यांना काय वाटेल? किंवा त्यांना विचारले पहिजे, परवानगी घेतली पाहिजे असे दडपण आले नाही.
पण याचा अर्थं उद्धट्पणा नाही. योग्यं त्या नात्याला, योग्यं तो आदर द्यायलाच हवा.
शाळेत सुद्धा ( आमची मुलींची शाळा असल्याने असेल) शिक्षक कधी मारत वगैरे नसत. जास्तीत जास्तं कठोर शिक्षा म्हणजे वर्गाबाहेर उभे रहायचे( काहीजणींना ती शिक्षा आवडायची Smile )
मी सुद्धा माझ्या मुलाला कधी मारले नाही. खूप चिडले तर "..... हे केलेस तर किंवा केले नाहीस तर फटका मिळेल " असं फक्तं तोंडी धमक्या देते. फटका दिला कधीच नाही. त्यामुळे तो मला अजिबात घाबरत वगैरे नाही. माझ्याशी वाद घालतो. पण म्हणुन तो बिघडला आहे/ हाताबाहेर गेलाय असं वाटत नाही.
मार न देण्याने काही नुकसान होते असे वाटत नाही.
पण अति धाकात ठेवल्याने मुलांच्या निर्णय क्षमतेवर प्रतिकूल परिणाम होतो असे वाटते. प्रत्येक गोष्टं आई वडिलांना सांगून विचारून करायची सवय असेल तर आत्मंविश्वास कमी होत असेल असं मला वाटतं . कारण प्रत्येक बाबतीत कुणाच्या तरी संम्मतीची , किं वा तू जे करतो/ते आहेस ते योग्यं आहे असे कुणीतरी म्हणण्याची गरज भासते. अशी काही उदाहरणे पाहिली आहेत.
(इथे काहींचे शिक्षेचे अनुभव वाचून कसंतरीच वाटलं Sad )

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

*********

टाळ बोले चिपळीला - नाच माझ्या संग ।
देवाजीच्या दारी आज - रंगला अभंग ॥

ही एक 'मस्ट डू' गोष्ट होती. विशेषत: शाळेत. वर घरी तक्रार घेऊन जायची सोय नसायची. कांही मित्रांचे पालक त्याला घेऊन पुन्हा शाळेत यायचे आणि 'माझ्या समोर याला दोन हाणा गुर्जी' म्हणायचे! मुलांना मारल्याशिवाय त्यांचा नीट विकास होणारच नाही असे वाटण्याचे दिवस होते ते! अर्थात याला अपवाद होतेच. माझे शिक्षक असणारे वडील. उभ्या शिक्षकी आयुष्यात त्यांनी कधीच कुणा विद्यार्थ्याला मारले नाही अन घरी कधी आम्हा भावंडांनाही नाही! मात्र एकत्र कुटुंब असल्याने इतरांचा मार खूप खाल्ला आहे. मारण्याच्या बाबतीत 'आपला- भावाचा' असला विचार कुणी करायचे नाही. किंवा माझ्या आई-वडीलांनीही कधी आमची बाजू घेऊन मारणार्‍यांना जाब विचारल्याचे आठवत नाही. याचा परिणाम म्हणजे कांही लोकांविषयी खुन्नस बसली ती निघून जायला बराच पुढे बराच काळ जावा लागला.

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

कबीरा खडा बाजार में, मांगे सबकी खैर|
ना काँहू से दोस्ती, ना काँहू से बैर||

वयाच्या साताठ वर्षांपर्यंत खुप मार खाल्लाय. कारण वडील हट्टी, मी सुद्धा अडेलतट्टू आणि आई घरातल्या जाचाने सदैव कावलेली. खास मला मारायला वडिलांनी दोनचार हीरांची जुडीच ठेवलेली (झाडूचे हीर) आणि आईचे सटकन पाठीवर बसणारे धपाटे बांगड्यांच्या आवाजासकट आठवतात. कधी कधी कारणं अगदी क्षुल्लक असायची.
एकदा जेवणाच्या वेळेस बाबा शेगंदाणे खातायत तर मला पण पाहीजेत हा हट्ट मी धरलेला. पण बाबांचं जेवण झालेलं होतं. तूही जेव मग खा हा शहाणपणा मला ऐकवला जात होता. पण माझा हट्ट. मग खाल्ला मार. आजी सोडवायला यायची अश्या वेळेस. (किती छोटी मागणी!)
पण मारापेक्षा लक्षात राहीलाय तो शिकवताना मिळालेला बाबांचा ओरडा कारण त्यावेळेस येवढंही येत नाहीय म्हणजे आपण अगदी क्षुद्र आहोत असं वाटायचं जे मार खाताना नाही वाटायचं. त्याचा परिणाम मात्र अजून थोडाफार आहे. अमुकएक गोष्ट येत नाही हे सांगताना बापुडवाणं वाटतं.

पण तिसरी चौथी नंतर मार नाही खाल्ला. याचा अर्थ, मी नाही तर बाबा शहाणे झाले. Wink

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

ण तिसरी चौथी नंतर मार नाही खाल्ला. याचा अर्थ, मी नाही तर बाबा शहाणे झाले. (डोळा मारत)

हाहाहा .... बाबाच झाले असती तू तर अजुनही WinkROFL (ह घे गं बाई)

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

अगं अंतरा तेच सांगताहेत
हे बघः
मी नाही, तर - बाबा शहाणे झाले. (डोळा मारत)

ROFL

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

- ऋ
-------
लव्ह अ‍ॅड लेट लव्ह!

लहानपणी मी आईच्या हातचा मार खूप खाल्ला आहे, पण बाबांची विशेष लाडकी असल्याने त्यांनी कधी मारले नाही. तसंही त्यांच्याबाबतीत मारापेक्षा बोलणं/न बोलणंच जास्त लागायचं. त्यातपण एकदा चेष्टा म्हणून नाकावर बोट मारलं होतं तर मला मारलं म्हणून मी खूप आकांडतांडव केला होता, त्यावेळी ते काहीच बोलले नाहीत पण आई समजूत घालायला आली तेव्हा नीटच कळालं त्यांना मी किती दुखावलं ते.

लहानपणी शाळेतुन पळून यायचे तेव्हा आई मारुन, बोलुन, शाळेत परत सोडुन वैतागली. तेव्हा बाबांनी घरामध्ये एक दोर अड्कवला होता आणि परत पळुन आलीस तर उलटं लटकावीन असं सांगितलं होतं, अर्थातच त्यांनी असं काही केलं नाही.

आत्ता आम्ही जिथे राहतो तिथं शेजारी एक कुटुंब आहे ज्यांना २ वर्षाचा एक मुलगा आहे. त्याने जरा नाही ऐकलं की त्याची आई त्याला बदड बदड बदडते. एवढ्याशा पोराला मारावं कसं काय वाटंतं कुणास ठाऊक. पण मग कधी कधी ते बारकं पण तिला चापट्या मारत बसतं. त्याचं मार खाणं थोडसं कमी व्हावं म्हणून मी आईला तिच्या घरी पाठवते आणि त्याला घेऊन यायला सांगते. तेवढाच त्याला कमी मार.

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

manaamanasi.wordpress.com