Skip to main content

.

.

अतिशहाणा Thu, 02/04/2015 - 17:55

ही तर मिसकॅरिजची केस दिसते. बाकी बाळ गर्भ असेपर्यंत गर्भपाताचा हक्क आईवडिलांकडे असावा. (फक्त आईकडे तो अनकंडिशनल नसावा) असे माझे मत आहे.

ॲमी Thu, 02/04/2015 - 18:11

In reply to by अतिशहाणा

बाकी बाळ गर्भ असेपर्यंत गर्भपाताचा हक्क आईवडिलांकडे असावा. (फक्त आईकडे तो अनकंडिशनल नसावा) असे माझे मत आहे. >>
माझे मत: गर्भपाताचा हक्क फक्त आईकडेच असावा. पण तिने गर्भपात न करता बाळाला जन्म द्यायचे ठरवले आणि वडिलांनामात्र बाळ नको आहे तर त्याच्या खर्चाची जबाबदारी उचलण्यास नकार देण्याचा हक्क वडिलांना हवा.

बॅटमॅन Fri, 03/04/2015 - 00:06

In reply to by गब्बर सिंग

बापाने पुरवलेल्या स्पर्मशिवाय जर बाळ तयार होऊ शकत नसेल तर हे मोनॉपॉली अ‍ॅसेट कसे काय?

गब्बर सिंग Fri, 03/04/2015 - 01:03

In reply to by बॅटमॅन

बापाने पुरवलेल्या स्पर्मशिवाय जर बाळ तयार होऊ शकत नसेल तर हे मोनॉपॉली अ‍ॅसेट कसे काय?

प्रजनन प्रक्रियेचे दोन भागात पृथक्करण करा.

१) फर्टिलायझेशन
२) इन्क्युबेशन

फर्टिलायझेशन मधे दोघे ५०% भागीदार. स्पर्म + एग्ग.

इन्क्युबेशन मधे ???

------

संभाव्य आक्षेप - तुम्हाला हवे तेव्हा व तुम्हाला सोयिस्कर पणे प्रक्रियेचे विभाजन्/पृथक्करण तुम्ही करणार असाल तर कसं व्हायचं, गब्बर !!!

शुचि. Fri, 03/04/2015 - 01:09

In reply to by गब्बर सिंग

संभाव्य आक्षेप - तुम्हाला हवे तेव्हा व तुम्हाला सोयिस्कर पणे प्रक्रियेचे विभाजन्/पृथक्करण तुम्ही करणार असाल तर कसं व्हायचं, गब्बर !!!

:)

बॅटमॅन Fri, 03/04/2015 - 01:14

In reply to by गब्बर सिंग

फर्टिलायझेशन ऐवजी इन्क्युबेशन होऊ शकत नाही. त्यामुळे फर्टिलायझेशनमध्ये स्टेक्स असणार्‍याला पुढे स्टेक्स का नकोत?

गब्बर सिंग Fri, 03/04/2015 - 01:23

In reply to by बॅटमॅन

फर्टिलायझेशन ऐवजी इन्क्युबेशन होऊ शकत नाही. त्यामुळे फर्टिलायझेशनमध्ये स्टेक्स असणार्‍याला पुढे स्टेक्स का नकोत?

स्टेक्स असावेत ना. अवश्य असावेत.

पण इन्क्युबेशन प्रक्रियेत ज्याच्याकडे रिसोर्सेस व बार्गेनिंग पॉवर जास्त त्याला जास्त स्टेक्स असतात व असावेत. इन्क्युबेशन मधे स्त्री कडे मोनोपोली अ‍ॅसेट आहे. व पुरुषाकडे तो नाही. म्हणून स्त्री ला खूप जास्त अधिकार असावेत व तिने ते आपली बार्गेनिंग पॉवर प्रदर्शित करून (Credible signaling etc.) मिळवावेत. पण स्त्री ची स्वतःची बार्गेनिंग पॉवर प्रदर्शित करण्याची (Credible signaling etc.) कपॅसीटी व मुख्य म्हंजे इच्छा मारून टाकली जाते. व मारून टाकण्यासाठी काय काय केले जाते ते लिहित बसलो तर .... जाऊ दे.

आदूबाळ Fri, 03/04/2015 - 18:22

In reply to by गब्बर सिंग

दंडवत!

Shapley value सारखी याची "गब्बर value" बनवलीत तर

१. घटस्फोटाच्या खटल्यातले कस्टडीचे प्रश्न आपोआप मिटतील
२. एखादं नोबेल तर कुठेच जाणार नाही.

गब्बर सिंग Sat, 04/04/2015 - 06:37

In reply to by आदूबाळ

Shapley value सारखी याची

सॉल्लिड. मार्मिक, रोचक, साक्षेपी, अभ्यासपूर्ण, मुद्द्यास धरून व ज्ञानवर्धक. सिरियसली.

(आमचं गणित कच्चं असल्याने आमचा पहिल्या बॉल ला त्रिफळा उडतो. शुचिम्याडमकडे गणिताची शिकवणी लावावी म्हणतो.)

शुचि. Tue, 07/04/2015 - 01:23

In reply to by ॲमी

या सर्व वादावादीत पहील्यांदा हेच विधान पटलं होतं आत्ताही हेच विधान पटतय -

गर्भपाताचा हक्क फक्त आईकडेच असावा. पण तिने गर्भपात न करता बाळाला जन्म द्यायचे ठरवले आणि वडिलांनामात्र बाळ नको आहे तर त्याच्या खर्चाची जबाबदारी उचलण्यास नकार देण्याचा हक्क वडिलांना हवा.

+१

अजो१२३ Thu, 02/04/2015 - 18:03

जोपर्यंत बाळ आईच्या शरीरात वाढणारे बांडगुळ असते तोपर्यंत ते तिथे ठेवायचे की नाही हे ठरवण्याचा हक्क पुर्णपणे आईचा असावा.

बाकी असो पण बांडगूळ?

आणि त्याहीपुढे जाऊन माझे वैयक्तीक मत ४-५ वर्ष वयापर्यंतच्या लहानग्यांच्या जगण्याच्या हक्काचे रक्षण करायच्या भानगडीत सरकारने पडू नये.

म्हणजे आईने मारून टाकले तर मारू द्यावे?

अदितीतैचं वारं टिंकूतैच्या अंगावर गेलं.
बाय द वे, माझा तुमच्या विचारांना विरोध नाही. मी फक्त क्लॅरिफाय करून घेतोय.

गवि Thu, 02/04/2015 - 18:24

In reply to by अजो१२३

बांडगूळ या शब्दाने खूप वाईट वाटलं. "शारिरीकदृष्ट्या पूर्णपणे अवलंबून" अशी शब्दरचना शुद्ध तर्काने त्याच अर्थाची असली तरी मुळात त्यात ती निगेटिव्हिटी नाही.

एका ऑफिस ट्रेनिंगमधे एका कम्युनिकेशन की काहीतरीबाबत दिलेल्या परिस्थितीच्या संदर्भात मुलीने प्रेग्नंट असणे याला कलॅमिटी असा शब्द सहज जाताजाता वापरला होता. ट्रेनरही मिनिटभर गप्प झाला होता.

शेवटी पुरुषांना ते सोसायचं नसतं त्यामुळे त्यांना त्याविषयी टिप्पणी करण्याचा हक्क नाही हे म्हटलं जाण्याची शक्यता असतेच.

४-५ वर्ष वयापर्यंतच्या लहानग्यांच्या जगण्याच्या हक्काचे रक्षण करायच्या भानगडीत सरकारने पडू नये.

स्पीचलेस.

अतिशहाणा Thu, 02/04/2015 - 18:28

In reply to by गवि

४-५ वर्ष वयापर्यंतच्या लहानग्यांच्या जगण्याच्या हक्काचे रक्षण करायच्या भानगडीत सरकारने पडू नये.

स्पीचलेस.

+१ ('स्पीचलेस'ला +१ आहे).

शहराजाद Thu, 02/04/2015 - 20:48

In reply to by अतिशहाणा

+१
किती वयापासून ( आणि कदाचित किती वयापर्यंत) सरकारने नागरिकांच्या जगण्याच्या हक्कचे संरक्षण करण्याच्या भानगडीत पडावे हे कसे ठरते?

नगरीनिरंजन Mon, 06/04/2015 - 10:39

In reply to by शहराजाद

ज्यांना जगण्याच्या अधिकाराच्या एन्फोर्समेंटसाठी दमड्या मोजता येत असतील त्यांचेच रक्षण केले जावे. एन्फोर्स करण्याची क्षमता हीच एक आणि एकमेव पात्रता आहे अधिकार असण्याची. जो पर्यंत नागरिक "पे" करत नाही तोवर सरकारने ढुंकूनही पाहू नये.

- (खोड)रब्बरसिंग

गब्बर सिंग Mon, 06/04/2015 - 22:19

In reply to by नगरीनिरंजन

एक व एकमेव नाही. पण If you look at the nature of the contract involved in the definition of rights and responsibilities - अधिकारांच्या रियलायझेशन ला मूर्त रूप येण्यामागे एन्फोर्स करणार्‍याचे अस्तित्व व व त्याच्या एन्फोर्समेंट करण्याच्या इच्छाशक्तीची व क्षमतेची कसोटी (व क्रेडिबिलिटी) हे महत्वाचे असतात. कॉन्स्टिट्युशनल लॉ चा क्लास घेतलात तर जाणवेल तुम्हास.

1) A living being exists
2) A living being has a right to live

या दोन मधे जो फरक आहे त्याबद्दल बोलतोय मी. right to live मधे ज्या बाबी अंतर्भूत आहेत त्यांत - अ) accept the right to live of others (which means - agree to not initiate violence against others), ब) व एन्फोर्समेंट मधे योगदान - ह्या बाबी येतात.

बॅटमॅन Thu, 02/04/2015 - 18:48

In reply to by गवि

शेवटी पुरुषांना ते सोसायचं नसतं त्यामुळे त्यांना त्याविषयी टिप्पणी करण्याचा हक्क नाही हे म्हटलं जाण्याची शक्यता असतेच.

प्रत्यक्षानुभवाचीच कसोटी लावायची तर कैक स्त्रियाही यातून बाद होतीलच की. की पोटेन्शिअल अनुभव हा अ‍ॅक्चुअल अनुभवाइतकाच ग्राह्य धरला जातो?

शहराजाद Thu, 02/04/2015 - 20:52

In reply to by अजो१२३

४-५ वर्ष वयापर्यंतच्या लहानग्यांच्या जगण्याच्या हक्काचे रक्षण करायच्या भानगडीत सरकारने पडू नये.

म्हणजे आईने मारून टाकले तर मारू द्यावे
अदितीतैचं वारं टिंकूतैच्या अंगावर गेलं.

असे अदितीताईंनी कधी म्हटले?

३_१४ विक्षिप्त अदिती Thu, 02/04/2015 - 22:18

In reply to by शुचि.

सदर बातमीनुसार पूर्वी पटेल कोणत्याही कमिटेड नात्यात असल्याचं दिसत नाही. त्यामुळे या बाबतीत गर्भपात करायचा असल्यास निर्णय तिचा एकटीचा असेल हे सहज समजण्यासारखं आहे. पूर्वीच्या बाबतीत गर्भपात केला किंवा झाला असेल, जे काही असेल, त्याबद्दल तिला गुन्हेगार ठरवणं आणि शिक्षा करणं हे मात्र तिथल्या कॅथलिक बहुसंख्येच्या धार्मिक भावनांना वारा घालणारंच दिसतंय. शिवाय असा निर्णय कॅथलिकांच्या पवित्र आठवड्यात येणं म्हणजे धार्मिकतेचा कळसच. सर्वोच्च न्यायालयाततरी तिला न्याय मिळेल अशी आशा आहे.

(या विषयावर मतप्रदर्शन करण्याची माझी फार इच्छा नव्हती. वर झालेली आकलनरहीत, निरर्थक चिखलफेकही नवीन नाही; नेहेमीप्रमाणे "चालू द्या" न म्हणता एक प्रतिसाद वाढवण्याबद्दल क्षमायाचना.)

अतिशहाणा Thu, 02/04/2015 - 22:46

In reply to by ३_१४ विक्षिप्त अदिती

ही बातमी एकदोन आणखी संकेतस्थळांवर वाचली. भृणहत्या (गर्भातील मृत्यू) आणि वैद्यकीय दुर्लक्षामुळे 'बाळा'चा मृत्यू असे दोन्ही गुन्हे सिद्ध झाले आहेत. गर्भ आणि बाळ या दोन्ही अवस्था असणे कसे शक्य आहे?

३_१४ विक्षिप्त अदिती Thu, 02/04/2015 - 22:49

In reply to by अतिशहाणा

वर टिंकूने जी बातमी डकवली आहे त्यानुसार जन्मानंतर काही मिनीटांतच 'बाळ' दगावलं. त्यालाही बहुदा 'स्टिलबॉर्न' म्हणत असावेत. या बातमीचं वार्तांकन वाचून हे सगळं असंच्या असं खरं मानण्यात अर्थ नाही असं माझं मत झालंय. बऱ्याच गोष्टी ग्राह्याग्राह्य कारणांमुळे जाहीर झालेल्या नसाव्यात.

अतिशहाणा Thu, 02/04/2015 - 23:16

In reply to by ३_१४ विक्षिप्त अदिती

जन्म झाल्यावर गर्भाचे अस्तित्व संपते. त्यामुळे भृणहत्येचा मुद्दा सिद्ध कसा झाला हे कळत नाही. जनतेला गर्भपाताच्या मुद्द्यावर घाबरवून सोडण्यासाठी ज्युरी मंडळींनी जमतील तितके गुन्हे दाखवायचे ठरवलेले दिसते.

३_१४ विक्षिप्त अदिती Fri, 03/04/2015 - 23:02

In reply to by अतिशहाणा

होय. ती 'तालिबानची आठवण येणारी बातमी' ऐकल्यामुळे यावर विश्वास बसतोय.

---

पूर्वी पटेलसंदर्भात 'स्क्रोल'मध्ये आलेला लेख, इंडियानामध्ये नुकत्या पारीत झालेल्या कायद्यापलिकडेही चर्चा करतो -
The Indiana foeticide case: why Purvi Patel's Indianness matters

अजो१२३ Mon, 06/04/2015 - 11:58

In reply to by ३_१४ विक्षिप्त अदिती

वर झालेली आकलनरहीत, निरर्थक चिखलफेकही नवीन नाही; नेहेमीप्रमाणे "चालू द्या" न म्हणता एक प्रतिसाद वाढवण्याबद्दल क्षमायाचना.

वर झालेला (माझा) संवाद आकलनरहिन व निरर्थक असू शकतो पण चिखलफेक वैगेरे नाही. अतिशय पॉझिटिव टोनमधे "वारं गेलं" म्हणण्याचा उद्देश होता. कोणा दोन लोकांचे विचार जुळू लागले कि हा शब्दप्रयोग करणे (आमच्या मराठीत) सामान्य आहे.

स्त्रीयांप्रती अत्याचारी पुरुष, दुष्ट पुरुष, पुरुषप्रधान पुरुष, सामान्य पुरुष, स्त्रीपुरुषसमतावादी पुरुष, स्त्रीवादी पुरुष, लिबरल पुरुष, आणि अतिशय लिबरल स्त्रीवादी पुरुष असे पुरुषांचे साधारणतः प्रकार करता येतील. त्यातल्या शेवटच्या प्रकारच्या पुरुषांनाही अस्वस्थ करतील असे काही विचार काही स्त्रीवादी स्त्रीया मांडतात. तिथून तुमचा प्रांत चालू होतो*. म्हणून मी जनरल विधान केलं होतं.
======================================================
*कृपया याला खवचटपणा समजू नका. काँप्लिमेंट आहे ती.

३_१४ विक्षिप्त अदिती Mon, 06/04/2015 - 18:32

In reply to by अजो१२३

... अतिशय लिबरल स्त्रीवादी पुरुष, हे प्रकार एकतर पुरेसे नाहीत. यात पुरोगामी, उदारमतवादी असा एक रकाना वाढवावा लागेल.

मी ज्यांना पुरोगामी आणि उदारमतवादी समजते अशा काही पुरुषांनी, वेळोवेळी, स्त्रीवादासंदर्भात मी पुरेशी पुरोगामी आणि/किंवा उदारमतवादी नाही असं मला दाखवून दिलेलं आहे. पुन्हा हे घडणार नाही याची काही खात्री नाही. त्यामुळे जे माझ्या विचारांमुळे अस्वस्थ होतात अशा पुरुषांना (आणि स्त्रियांनाही) स्त्रीवादासंदर्भात पुरेसं पुरोगामी आणि उदारमतवादी म्हणता येणार नाही, हे माझ्यासाठी उघड आहे. भारतात बहुदा १९६०-७० च्या दशकात माझ्यासारखे विचार मूलगामी वगैरे म्हटले गेले असते, पण मी सध्या २०१५ सालात राहते.

शिवाय सदर चर्चाविषय सध्यातरी, फक्त स्त्रीवाद या छत्राखाली आणता येणार नाही.

स्त्रीवादी विचारांमुळे पुरुषच का, स्त्रियाही अस्वस्थ होतात. होय, होय. या जगात स्त्रियासुद्धा राहतात, त्यांनाही बुद्धी असते, त्याही विचार करतात, इ. इ.

शुचि. Thu, 02/04/2015 - 18:52

माझे वैयक्तीक मत ४-५ वर्ष वयापर्यंतच्या लहानग्यांच्या जगण्याच्या हक्काचे रक्षण करायच्या भानगडीत सरकारने पडू नये. ती पुर्णपणे पालकांची जबाबदारी असावी.

६ व्या वर्षी असा काय फरक पडतो जो ४-५ वयापर्यंत नसतो? प्लीज सांगशील का?

ॲमी Sat, 04/04/2015 - 00:39

साधारण लाइन ऑफ अर्ग्युमेंट एकच असल्याने एकत्रीत उत्तर:

* जर पाच महिन्यांचा गर्भ आईच्या शरीराबाहेर जगू शकत असेल तर "त्याने माझ्या शरीराबाहेर जगावे. माझ्या शरीरात मला तो नको आहे." असे म्हणायचा हक्क आईला असावा की नसावा?

* www.aisiakshare.com/node/3316 या धाग्यावर चाइल्ड युथनेशियाबद्दल थोडी चर्चा झालेली आहे. माझा प्रश्न:
मुल मतिमंद निघालं किंवा इतर काही सिव्हीअर शारिरीक प्रॉब्लेम ज्यामुळे ते मुल इतर नॉर्मल मुलांसारखं वाढणार नाही, इंडिपेंडंट होणार नाही याची खात्री असेल. आणि अशा मुलांवर पैसा, श्रम, वेळ, एनर्जी वगैरे घालवायची पालकांची इच्छा नसेल तर ऑप्ट आऊट करायचा पर्याय त्यांना उबलब्ध असावा की नसावा?

ॲमी Sat, 04/04/2015 - 11:31

जन्म झाल्यावर गर्भाचे अस्तित्व संपते. त्यामुळे भृणहत्येचा मुद्दा सिद्ध कसा झाला हे कळत नाही. जनतेला गर्भपाताच्या मुद्द्यावर घाबरवून सोडण्यासाठी ज्युरी मंडळींनी जमतील तितके गुन्हे दाखवायचे ठरवलेले दिसते. >> मी वाचलेल्या बातमीनुसार "इंड्युस्ड काँट्रेक्शन/डिलीवरीसाठी लागणारी औषधं ऑनलाइन खरेदी करत आहे." असा मेसेज तिने मैत्रिणीला केला होता. तोदेखील पुरावा म्हणून वापरण्यात आला; शरीरात त्या औषधाच्या ट्रेसेस सापडल्या नाहीत तरी...:-x

अदितीने लिंकवलेले अश्विनी तांबेंचे आर्टिकल आवडले. आभार.

पूर्वीने ते बाळ/गोळा/गर्भ कचरापेटीत टाकला याला बहुसंख्यांचा विरोध दिसला. ते तिने घाबरलेल्या अवस्थेत केले असण्याची शक्यता आहे. >> घाबरून गेल्याने, काय करावे न सुचल्याने, घरच्यांची &/समाजाची सो कॉल्ड नैतिकता, त्या स्टेटमधले कायदे, बरीच कारणे असू शकतात. 'त्या'ची विल्हेवाट लावणे हा वेगळा मुद्दा झाला; मुळात 'ते' शरीराबाहेर काढण्याचा हक्क तिला असावा की नाही हा जास्त महत्वाचा मुद्दा आहे.

१. मला वाटत होते की गर्भपाताचे परमिटेड वय हे गर्भपात झाल्यास आईच्या जिवाला असलेल्या धोक्यावर अवलंबून असते. आय मीन मोठ्या वयाच्या गर्भाचा गर्भपात होणे आईसाठी धोक्याचे असते. >> मोठ्या वयाचा गर्भाचा गर्भपात करणे/होणे हे पुर्ण वयाच्या गर्भाची नॉर्मल डिलीवरी करण्या'इतकेच' धोकादायक असते.
२. पाच महिन्याचा गर्भ जन्मल्यास (विथ ऑल द टेक्नॉलॉजी तो जगवला गेल्यास) त्याच्या आयुष्याची एकून पत कशी असते? जर ती प्रत क्वालिटी ऑफ लाइफ चांगली नसेल आणि तरी त्याला जगवण्याचा अट्टाहास असेल तर वृद्धांना दयामरण देणे एकदमच गैरलागू होऊन जाते. >> www.en.wikipedia.org/wiki/Preterm_birth वरून साभार The chance of survival at less than 23 weeks is close to zero, while at 23 weeks it is 15%, 24 weeks 55% and 25 weeks about 80%. The chances of survival without long term difficulties is less.

मुळात इथे बर्याचजणांनी म्हणलेलं ५ महिने हे भारतातलं कायदेशीर गर्भपाताच लिमीट आहे आणि त्यामागे स्त्रिभृणहत्या हे कारण आहे आता परत यात सामाजीक भान नैतिकता आणायचा विचार करणार्यांना आगाऊच फाट्यावर मारण्यात येत आहे वर दिलेल्या विकीवरूनच As NICU care has improved over the last 40 years, viability has reduced to approximately 24 weeks, although rare survivors have been documented as early as 21 weeks.

गब्बर सिंग Sat, 04/04/2015 - 12:25

In reply to by ॲमी

आता परत यात सामाजीक भान नैतिकता आणायचा विचार करणार्यांना आगाऊच फाट्यावर मारण्यात येत आहे

सॉल्लेड

सामाजिक भान बाळगा असा आरडाओरडा करणे हा सर्वसाधारणपणे "Forceful cost transfer" चा प्रोग्राम असतो.

नितिन थत्ते Sat, 04/04/2015 - 13:27

In reply to by गब्बर सिंग

मुळात समाज असणे हेच कॉस्ट अ‍ॅण्ड बेनिफिट ट्रान्स्फर करण्यासाठी केले जाते. ज्यांना कॉस्ट ट्रान्सफर मान्य नसेल त्यांनी समाजाबाहेर राहून जीवन व्यतीत करावे. [इन अ वे स्वतःहून वाळीत पडावे आणि कुठल्याही कॉस्ट ट्रान्सफर न घेता जगावे].

गब्बर सिंग Sat, 04/04/2015 - 14:28

In reply to by नितिन थत्ते

मुळात समाज असणे हेच कॉस्ट अ‍ॅण्ड बेनिफिट ट्रान्स्फर करण्यासाठी केले जाते.

अ ... हं

समाज असणे हे कॉस्ट अ‍ॅण्ड बेनिफिट मधले फोर्सफुल ट्रान्स्फर कमीकमी करत जाण्यासाठीच केले जाते. खरंतर "इन्टरनलायझिंग द एक्सटरनॅलिटीज" व कॉस्ट व बेनिफिट्स मधील मॅचिंग या प्रोसेस मधूनच प्रगती होत जाते. दॅट इज इन्डीड प्रोग्रेस्स.

विशद करणे कठिण आहे. एक दिवस बसू ... एखादी बाटली व चखणा घेऊन. फिर मजा आएगा.

पैचान कौन Tue, 07/04/2015 - 02:46

In reply to by ॲमी

पूर्वी पटेल यांचे वय १८ वर्षाच्या वर आहे, म्हणजे त्या सज्ञान आहेत. त्यांनी त्यांच्या कलिगबरोबर लैंगिक संबंध ठेवले होते तेव्हा संतती होऊ नयेत याची सोय उपलब्ध असूनही ती त्यांनी वापरली नाही. गर्भवती राहिल्यावर २३-२४ आठवडे इंडियानात किंवा इतरत्र गर्भपात करणे शक्य होते, ती सोय त्यांनी वापरली नाही.

As more time passes since the biggest abortion case, Roe v. Wade, was decided, abortion laws continue to change. That landmark case made abortion in the United States legal, and since then women have had a Constitutional right to choose whether to have an abortion during the early stages of her pregnancy. States, however, can regulate certain aspects of abortion after the first trimester, and are permitted to impose counseling, waiting periods, and other requirements. After the second trimester there's little or no legal way to have an abortion (unless a patient’s life is in danger). संदर्भः

पूर्वी पटेल यांनी प्रेग्नन्सी त्यांच्या घरातील लोकांपासून लपवली होती (had concealed her pregnancy from her parents) इतकेच न्हवे तर हॉस्पिटलमध्ये त्या प्रेग्नंट आहेत याला नकार दिला होता. (She initially denied a pregnancy).

Patel maintained that the foetus was stillborn. अशी परिस्थिती असेल तर त्यांनी ९११ करून पोलिसांना का बोलावले नाही?

सगळ्यात महत्वाचे म्हणजे ते अर्भक कचर्‍याच्या पेटीत टाकून दिले. जन्म न झालेले मूल हे सुद्धा १ व्यक्ती म्हणून गृहित धरले जाते. (स्कॉट पिटरसन/लेसी पिटरसन केस). त्यानुसार स्कॉट पिटरसन आज "डेथ-रो"वर आहे. अजून उदाहरण म्हणजे टेक्सासमध्ये Deadly force to protect property नुसार कुणी तुमच्या प्रॉपर्टीवर आला तर तुम्ही त्याला जिवानिशी मारू शकता. पण याचा अर्थ असा नाही की एखाद्याला ठार मारून तुम्ही त्याच्या मृतदेहाची विल्हेवाट लाऊ शकता.

Women’s rights activists have condemned her conviction and the subsequent sentence. They say the law is being used to prosecute women who miscarry, have stillbirths or try to terminate their own pregnancies. >> याच नियमानुसार पूर्वी पटेल यांनी गर्भवती आहे ही बाब सर्वांपासून लपवून ठेवून, स्टेट लॉ जाणून न घेता (Ignorantia juris non excusa), गर्भ टाळण्याची पुरेशी संधी असूनही तिचा वापर न करता आणि महत्वाचे म्हणजे मृत अर्भकाला कचर्‍याच्या पेटीत टाकून पुरावा नष्ट करण्याचा प्रयत्न केला. यावरून क्रिमिनल इंटेंशन (neither negligence nor recklessness) पुरेसे सिद्ध होते. मी ज्युरी मध्ये असतो तर निर्णय सोपा होता: Verdict is Guilty.

अनु राव Wed, 08/04/2015 - 11:50

In reply to by पैचान कौन

संतती होऊ नयेत याची सोय उपलब्ध असूनही ती त्यांनी वापरली नाही. गर्भवती राहिल्यावर २३-२४ आठवडे इंडियानात किंवा इतरत्र गर्भपात करणे शक्य होते, ती सोय त्यांनी वापरली नाही.

हे दोन्हीही मुद्दे लक्षात घेतले तर हा गुन्हा म्हणुन गणला गेला पाहीजे आणी शिक्षा झाली हे बरोबरच झाले.

मी ज्युरी मध्ये असतो तर निर्णय सोपा होता: Verdict is Guilty.

मी सुद्धा.

टिन Thu, 02/04/2015 - 22:56

पूर्वीने ते बाळ/गोळा/गर्भ कचरापेटीत टाकला याला बहुसंख्यांचा विरोध दिसला. ते तिने घाबरलेल्या अवस्थेत केले असण्याची शक्यता आहे. पण वकील आणि इतर बरेच याला इमिग्रेशन इश्यू बनवतायत ते मला काही समजलं/पटलं नाहिये.

बाकी वरची ४-५ वर्षांपर्यंतच्या मुलांबद्दलची कॉमेंटही अनाकलनीय वाटली. काय बेसीसवर हा कट-ऑफ असावा?

आईच्या पोटात मुलं 'टेक्निकली' बांडगुळं असतात हे खरंच आहे, पण एका विशिष्ट टप्प्यानंतर ती बाहेर जगू शकतात. त्या वेळेनंतर गर्भपात करणे योग्य का अयोग्य?

शहराजाद Fri, 03/04/2015 - 00:12

In reply to by टिन

मागे एका गर्भपात करणार्‍या डॉक्टरवर खटला झाला होता. ( पांढऱ्या रंगातील पुढील वर्णन गर्भपाताचे असून ते सर्वांना रुचेलच असे नाही.) गर्भाची वाढ थोडी जास्त झालेली असताना गर्भपात करणं सोपे जावे यासाठी गर्भायशयातल्या बालकाचा मेंदू पंपाने शोषून बाहेर काढू टाकण्याची एक पद्धत असते. यामुळे डोके आक्रसून गर्भ चटकन बाहेर येतो. या डॉक्टरने जवळपास पूर्ण वाढलेल्या गर्भांचाही ही पद्धत वापरून गर्भपात केले. म्हणजे जर पुरेसा काळ ते आईच्या पोटात असेल तर काही दिवसांतच ते अर्भक बाहेर आल्यावर त्याला मारणे हा खून ठरू शकेल. काही तास, काही मिनिटे आधी पोटातच गर्भपात केल्यास तो गुन्हा असेल हे आपल्याला समजू शकते. तसेच ते अंड-बीज स्वरूपात असताच्या क्षणाला त्यात जीव नाही हेही आपल्याला समजते. पण नक्की किती काळ आधी म्हणजे पुरेसा काळ हे ठरवणे फारच कठीण आहे.

बर्‍याच वर्षांपूर्वी एका भारतीय स्र्तीरोग- प्रसूती तज्ञांकडून माहिती मिळाली होती ती अशी: काही वयानंतर गर्भ जन्माला आला तरी बाह्य मदतीने जगू शकतो. त्यामुळे या अवस्थेनंतर केलेला गर्भपात ही हत्या ठरते. पूर्वी गर्भाचे हे वर आठ महिने होते. वैद्यकीय क्षेत्रातील प्रगतीने नंतर ते सात महिने झाले. त्याच्वेळी प्रगत देशांत ते वय पाच महिने होते. त्यामुळे त्यावेळी भारतात सात आणि प्रगत देशांत पाच महिने ही गर्भपातासाठीची मर्यादा होती. आता भारतातही (बहुतेक) पाच महिन्यांचा गर्भ जन्माला आल्यास जगवण्यावे तंत्रज्ञान असल्याने त्यापुढे गर्भपात करता येत नाही.
माझ्या मते, आपण गरोदर आहोत का, आपल्याला हा गर्भ वाढवायचा आहे का हे कळण्यासाठी हा काळ अगदी भरपूर मोठा आहे. स्त्रीला गर्भ नको असेल तर वैद्यकीय करणांखेरीज ही मर्यादा संपेपर्यंत वाट बघण्याची गरज भासू नये.

नितिन थत्ते Fri, 03/04/2015 - 05:22

In reply to by शहराजाद

१. मला वाटत होते की गर्भपाताचे परमिटेड वय हे गर्भपात झाल्यास आईच्या जिवाला असलेल्या धोक्यावर अवलंबून असते. आय मीन मोठ्या वयाच्या गर्भाचा गर्भपात होणे आईसाठी धोक्याचे असते.
२. पाच महिन्याचा गर्भ जन्मल्यास (विथ ऑल द टेक्नॉलॉजी तो जगवला गेल्यास) त्याच्या आयुष्याची एकून पत कशी असते?

गवि Fri, 03/04/2015 - 11:33

In reply to by नितिन थत्ते

पाच महिन्याचा गर्भ जन्मल्यास (विथ ऑल द टेक्नॉलॉजी तो जगवला गेल्यास) त्याच्या आयुष्याची एकून पत कशी असते?

जास्त बोलत नाही, पण "त्या" आईसोबत पूर्ण दिवसांचा जन्माला येऊन तिच्या "केअर"खाली जगला असता तर जितकी क्वालिटी ऑफ लाईफ असती, त्याहून नक्कीच चांगली असावी.

गवि Fri, 03/04/2015 - 11:41

In reply to by गवि

तातडीने खोडसाळ.. :) धन्यवाद..!!! हे जर खोडसाळ तर मग याहून जास्त काय बोलावे.. बरंच झालं पूर्ण प्रतिसाद लिहीला नाही ते.

अर्थात याठिकाणी आईच्या जिवाला धोका अथवा प्रेग्नन्सीतील कॉम्प्लिकेशन्समुळे असा निर्णय घेणार्‍यांबाबत विधान नाहीये हे स्पष्ट करु इच्छितो.. बाकी आपापलं मत.

नितिन थत्ते Fri, 03/04/2015 - 12:24

In reply to by गवि

मी हा प्रश्न वेगळ्या कंटेक्स्टमध्ये विचारला होता.

जर ती प्रत (आधीच्या प्रतिसादात पत असं टंकलं गेलं) क्वालिटी ऑफ लाइफ चांगली नसेल आणि तरी त्याला जगवण्याचा अट्टाहास असेल तर वृद्धांना दयामरण देणे एकदमच गैरलागू होऊन जाते.

गवि Fri, 03/04/2015 - 12:39

In reply to by नितिन थत्ते

पाचव्या महिन्यात आईला नको म्हणून बाहेर काढून यंत्राद्वारे जगवणं असा उद्देश नसून तो एक "स्टेजिंग"चा तांत्रिक मुद्दा आहे. "जर" आणि "जरी" या स्टेजला गर्भाला सेपरेट केलं "तर" आणि "तरी" तो बाह्य उपायांनी "थिअरिटिकली" जगू शकतो अशा अर्थाने. मला वाटतं रिपोर्ट्समधे "व्हायेबल फीट्स" असं लिहिलं जातं या स्टेजनंतर. ही स्टेज केवळ "जिवाचं स्वतंत्र अस्तित्व" या शक्यतेपुरती मानलेली असून त्यावरुन त्या स्टेजला निर्णायक स्टेज मानलं जाण्याचं लॉजिक सांगितलं जातं. याचा अर्थ आता तात्विकदृष्ट्या आईशिवाय जगू शकण्याचं "पोटेन्शियल" त्या जिवात आहे. अशावेळी त्याला मारणं हे निखळ स्वतंत्र मनुष्यजिवाला मारण्यासारखं आहे असा घेतला जातो.

आता प्रश्न दया/इच्छामरणाशी तुलनेचा.. वृद्ध हे आपल्या आयुष्याचा निर्णय घेण्याच्या अवस्थेत असतानाच हा अधिकार / विचार करावा (करुन ठेवावा). ते त्या स्थितीतच नसताना परस्पर इतरांनी ते मरण त्यांना देणं हे अतिशय चुकीचं आहे.

गर्भाच्या अन लहान मुलांचा बाबतीत त्यांना निर्णयक्षमता नसताना, त्यांच्या आयुष्याचा निर्णय केवळ आपण त्यांचे मालक असल्याच्या थाटात अथवा त्यांना "पॅरासाईट" मानून घेणे हे अत्यंत दुरित वाटतं. ते पेशीला पेशी जोडून केवळ अन केवळ "जीवना"कडे सरकत असताना त्यांचे जीवन संपवण्याचा निर्णय घेणारे आपण कोण ? केवळ आपल्या पेशीतून ते जन्माला आले म्हणून ? अरे त्यापेक्षा जन्म देऊन मग सोडून द्या कुठेतरी. त्याच्या नशिबावर जगेल, किंवा समाजाच्या उरल्यासुरल्या भलाईवर जगेल.. तुम्ही स्वतःच्या परिस्थितीच्या नादात त्यांचे निर्णय घेऊ नका.

३_१४ विक्षिप्त अदिती Fri, 03/04/2015 - 18:04

In reply to by नितिन थत्ते

सुरुवातीचे काही महिने बराच खर्च, देखभाल करायची पालक किंवा सरकारची तयारी असेल तर फार फरक पडत नाही. गेल्या वर्षी 'टाईम'मध्ये यावर रिपोर्टिंग झालं होतं. अमेरिकेत दुय्यम शहरांमध्ये पुरेशा सोयी नाहीत त्यामुळे तिथल्या मुलांना-मातांना मोठ्या शहरांमध्ये आणावं लागतं अशा अर्थाचा लेख होता.

ऋषिकेश Mon, 06/04/2015 - 09:48

माझे या विषयीचे मत आता बर्‍यापैकी क्रिस्टलाईज झाले आहे.

अर्भक जेव्हा आईच्या गर्भात असते तेव्हा काही महिने ते आईच्या मदतीशिवाय जगू शकत नाही तो काळ ते अर्भक आईच्या शरीराचाच एक भाग / अवयव असल्यासारखेच असते. त्यामुळे तितका काळ त्या भागावर पूर्णतः आईचाच अधिकार हवा.

त्यानंतर (ज्या वेळे नंतर तो जीव आईच्या मदतीशिवाय बायोलॉजिकली जिवंत राहू शकत असेल) त्या जीवाच्या जीवावर कोणाचाही अधिकार असु नये. त्यानंतर जोवर ते बाळ जीवीत आहे आई व वडिलांचा समान अधिकार एक 'पालक' म्हणून असावा. मात्र त्या अर्भकाच्या जीवावर त्यांचा हक्क असु नये.

अशा वेळेनंतर (जेव्हा बाळ आईशिवाय बायोलॉजिकली जिवंत राहु शकत असेल) गर्भपात करवल्यास त्यास "कल्पेबल होमिसाईड" (सदोष मनुष्यवध) समजले जावे व फक्त आईलाच त्याची सजा व्हावी.

जन्मानंतर त्या बाळाचा खून केल्यास आई, वडील व खूनात सहभागी असलेले इतर कुटूंबीय यांना त्यांच्या भुमिकांना अनुसरून ('सदोष मनुष्यवध' / 'कट करणे' / 'खुनास प्रोत्साहित करणे' इत्यादी) योग्य ती शिक्षा दिली जावी.

ॲमी Mon, 06/04/2015 - 10:20

In reply to by ऋषिकेश

अशा वेळेनंतर (जेव्हा बाळ आईशिवाय बायोलॉजिकली जिवंत राहु शकत असेल) गर्भपात करवल्यास त्यास "कल्पेबल होमिसाईड" (सदोष मनुष्यवध) समजले जावे व फक्त आईलाच त्याची सजा व्हावी. >>
'अशी वेळ' म्हणजे किती आठवडे?
त्यावेळेनंतर गर्भपात न करता सिझर करून किंवा इंड्युस्ड डिलीवरी करून बाळाला बाहेर काढा आणि जगवा असे सांगायचा हक्क आईला असावा की नाही?

ऋषिकेश Mon, 06/04/2015 - 10:26

In reply to by ॲमी

बहुदा अशी वेळ ६-७ महिन्यांदरम्यान येते (७व्या महिन्यात झालेल्या डिलिव्हरीजना हल्ली जगवता येते असे ऐकले आहे).

त्यावेळेनंतर गर्भपात न करता सिझर करून किंवा इंड्युस्ड डिलीवरी करून बाळाला बाहेर काढा आणि जगवा असे सांगायचा हक्क आईला असावा की नाही?

होय. जर आईशिवाय जगण्याची हमी असेल (कोणी देत असेल) तर बाहेर काढा असे सांगायचा हक्क असावा व त्या मतात वडिलांचीही सहमती हवी; ती यासाठी की एकदा जन्म झाला की त्या जीवाचे "पालक" दोघेही असणार आहेत, तेव्हा असा निर्णय दोघांच्याही एकमताने घेणे गरजेचे आहे.

ॲमी Mon, 06/04/2015 - 10:45

In reply to by ऋषिकेश

बहुदा अशी वेळ ६-७ महिन्यांदरम्यान येते (७व्या महिन्यात झालेल्या डिलिव्हरीजना हल्ली जगवता येते असे ऐकले आहे). >> :-) आभार. मत योग्य दिशेने बदलल्याबद्दल.

त्या मतात वडिलांचीही सहमती हवी; ती यासाठी की एकदा जन्म झाला की त्या जीवाचे "पालक" दोघेही असणार आहेत, तेव्हा असा निर्णय दोघांच्याही एकमताने घेणे गरजेचे आहे. >> असहमत. जोपर्यंत ते तिच्या शरीरात आहे तोपर्यंत ते तिथे ठेवायचे की बाहेर काढायचे हा निर्णय फक्त तिचा असावा.

ऋषिकेश Mon, 06/04/2015 - 10:50

In reply to by ॲमी

पहिल्या काही महिन्यात जेव्हा ते अर्भक त्या स्त्रीचे अंगच असल्यासारखे आहे, तेव्हा तिच्या एकट्याचा अधिकार हवा.
जेव्हा अर्भकाचे रुपांतर आईशिवाय जगु शकेल अश्या स्थितीला पोचते तेव्हा त्याचा जन्म झाल्यावर त्याचे उत्तरदायित्त्व असणार्‍या दोघांकडे त्याच्या 'पालकत्त्वा' संबंधीचे अधिकार हवेत (नी जबाबदारीही!). त्या सुरुवातीच्या काळानंतर त्याचा खून/वध करायचे अधिकार तर आई, वडिल, डॉक्टर कोणालाही असु नयेत.

नगरीनिरंजन Mon, 06/04/2015 - 10:51

In reply to by ऋषिकेश

बाळ आईशिवाय जिवंत राहू शकत असल्यास आणि आईला ते नको असल्यास तरीही त्याला जन्म द्यावा आणि आईला त्याचे पालन-पोषण करण्याची सक्ती करावी असे म्हणायचे आहे काय? नसल्यास अशा मुलांच्या संगोपनाची जबाबदारी कोण घेणार?
बाळ सव्यंग जन्मल्यास आणि पुढे त्याला आणि विशेषतः अव्यंग आई-वडिलांना त्याचा आयुष्यभर त्रास होणार आहे हे दिसत असताना बाळाचे जीवन संपवण्याचा अधिकार आईला (आणि अव्यंग असतं तर पालनाची जबाबदारी घेण्याची तयारी असेल तर वडिलांना) का असू नये? असं मूल जगवल्यावर आणि कळतं झाल्यावर "आई तू मला असं वाईट आयुष्य का दिलंस?" असं म्हणून आईला दोष देऊ लागल्यास काय उत्तर द्यावे?

ऋषिकेश Mon, 06/04/2015 - 11:01

In reply to by नगरीनिरंजन

बाळ आईशिवाय जिवंत राहू शकत असल्यास आणि आईला ते नको असल्यास तरीही त्याला जन्म द्यावा आणि आईला त्याचे पालन-पोषण करण्याची सक्ती करावी असे म्हणायचे आहे काय? नसल्यास अशा मुलांच्या संगोपनाची जबाबदारी कोण घेणार?

जबाबदारी हवी आहे की नाही यावर विचार करायला पहिले काही महिने आहेत.
जन्मानंतर किंवा शेवटाल्या २-३ महिन्यांत उपरती झाली तर पालक या नात्याने त्याची योग्य सोय करून देण्याची जबाबदारी पालकांची असेल/असावी (उदा. कोणी दत्तक घेतेय का पाहणे, कोणाकडे सांभाळ करण्यासाठी ठेवणे, एखादी संस्था शोधणे इत्यादी). जोवर तसे कोणी मिळत नाही तोवर मुल सज्ञान होईपर्यंत पालकांवर त्या अर्भकाच्या पालनाची सक्ती असावी. (अशा विचारांचे अनेक पालक झाले, तर बहुमताचा सरकारवर दबाव वाढवून सरकारतर्फे अशा केअर टेकर गृहांची निर्मिती होऊ ही शकते. मात्र ते सरकारचे कर्तव्य नाही.)

बाळ सव्यंग जन्मल्यास आणि पुढे त्याला आणि विशेषतः अव्यंग आई-वडिलांना त्याचा आयुष्यभर त्रास होणार आहे हे दिसत असताना बाळाचे जीवन संपवण्याचा अधिकार आईला (आणि अव्यंग असतं तर पालनाची जबाबदारी घेण्याची तयारी असेल तर वडिलांना) का असू नये?

बाळातील बहुतेक व्यंग पहिल्या पाच ते सहा महिन्यात समजतात. तरीही ते नाही समजले व सव्यंग मूल जन्माला आले तरी त्याची जबाबदारी पालकांनीच घेणे सक्तीचे असावे. (अर्थात जोवर अन्य सोय पालक करू शकत नाहीत तोवर). लग्न करण्याप्रमाणे मूल जन्माला घालणे ही कंट्रोल्ड क्रिया आहे. त्याचे फायदे आहेत तशा रिस्कही आहेतच. हे धोके व फायदे दोन्ही लक्षात घेऊनच मुल जन्माला घालायचे की नाही याचे आपल्यापुरते गणित मांडणे योग्य.

असं मूल जगवल्यावर आणि कळतं झाल्यावर "आई तू मला असं वाईट आयुष्य का दिलंस?" असं म्हणून आईला दोष देऊ लागल्यास काय उत्तर द्यावे?

आपल्या पाल्याशी कसा संवाद ठेवावा हा ज्या त्या पालकांचा प्रश्न आहे. त्याचे एक असे उत्तर असु शकत नाही.

=====

याच बरोबर सज्ञान व्यक्तीचा आपल्या जीवावर पूर्ण अधिकार असावा असेही माझे मत आहे. वरील केसमध्ये मुल १८ वर्षाचे झाल्यावर त्याने "आई तू मला असं वाईट आयुष्य का दिलंस?" किंवा "बाबा तू मला असं वाईट आयुष्य का दिलंस?" असा प्रश्न विचारल्यास १८ वर्षानंतर हे आयुष्य जगायचं की नाही हे तुला तुझं ठरवायचं आहे" हे उत्तर देता आले पाहिजे

नगरीनिरंजन Mon, 06/04/2015 - 11:11

In reply to by ऋषिकेश

यात आई-वडिलांच्या आयुष्याचा शून्य विचार आहे. पहिल्या चार महिन्यात निर्णय घ्यायची सक्ती ठीक आहे पण सव्यंग जन्मले तरी ते वाढवण्याची सक्ती समजत नाही.

आपल्या पाल्याशी कसा संवाद ठेवावा हा ज्या त्या पालकांचा प्रश्न आहे. त्याचे एक असे उत्तर असु शकत नाही.

:-) बाकी सर्व बाबतीत मात्र एक असे उत्तर आहे. याबाबतीत मात्र पालकांचा प्रश्न, यामागे काय लॉजिक आहे?

ऋषिकेश Mon, 06/04/2015 - 11:55

In reply to by नगरीनिरंजन

जर वाढवण्याची इच्छा नसेल तर पालकांनी इतर योग्य ती सोय करावी.
त्याचा जीवाचा खून का करावा?

ॲमी Mon, 06/04/2015 - 15:03

In reply to by ऋषिकेश

जेव्हा अर्भकाचे रुपांतर आईशिवाय जगु शकेल अश्या स्थितीला पोचते तेव्हा त्याचा जन्म झाल्यावर त्याचे उत्तरदायित्त्व असणार्या दोघांकडे त्याच्या 'पालकत्त्वा' संबंधीचे अधिकार हवेत (नी जबाबदारीही!). >> याच्याशीच असहमती दर्शवली आहे. परतपरत तेच सांगणं होतय पण तरी सांगते. गर्भ आईशिवाय जगू शकेल अशा वयाचा झाला की लगेच त्याच्यावर वडिलांचादेखील हक्क निर्माण होतो हे अमान्य आहे. जोपर्यंत तो आईच्या शरीरात आहे तोपर्यंत फक्त आईचा हक्क.

बाळातील बहुतेक व्यंग पहिल्या पाच ते सहा महिन्यात समजतात. >> नक्की का? ऑटीझम लक्षात यायला २-२.५वर्ष लागतात ना?

तरीही ते नाही समजले व सव्यंग मूल जन्माला आले तरी त्याची जबाबदारी पालकांनीच घेणे सक्तीचे असावे. >> यातून समाजातील काहीजणांच्या नैतिकतेला कुरवाळण्याशिवाय नक्की काय पॉझिटीव अचिव्ह होणार आहे? सव्यंग मुल जन्मणे हा नशिबाचा भाग झाला. अव्यंग आईवडिल, असलेच तर भावंड असे पुर्ण कुटुंब त्या एका सव्यंग व्यक्तीला सांभाळण्यात वेठीला धरून काय होणार आहे? तेपण त्यांची इच्छा नसताना.. त्याऐवजी दयामरण देऊन दुसर्या अव्यंग व्यक्तीवर वैयक्तीक, सरकारी, समाजाचे रिसोर्सेस सत्कारणी लावता येतील असे वाटत नाही का?

लग्न करण्याप्रमाणे मूल जन्माला घालणे ही कंट्रोल्ड क्रिया आहे. त्याचे फायदे आहेत तशा रिस्कही आहेतच. >> घटस्फोटाची सोय कशासाठी केली आहे?

अजो१२३ Mon, 06/04/2015 - 15:11

In reply to by ॲमी

जोपर्यंत तो आईच्या शरीरात आहे तोपर्यंत फक्त आईचा हक्क.

Physical location and physical relation in themselves should not constitute sufficient and complete reasons to assign all rights to object in consideration.
उदाहरणार्थ, मी तुम्हाला माझा मोबाईल तुमच्या फ्लॅटमधे चार्ज करायला दिला तर तो तुमच्या ताब्यात असेपर्यंत तुम्ही त्याचे काहीही करणार का?

ॲमी Mon, 06/04/2015 - 18:22

In reply to by अजो१२३

मोबाईल चार्जींगच माझ्या घरातलं बटन बंद करून तुमचा मोबाईल तुमच्या घरी नेऊन चार्ज करा म्हणू शकते ना?

तुमच्या घरात माझ्या १.५ वर्षाच्या आत्तेभावाला ठेवून घ्या, त्याला खायला प्यायला द्या आणि त्याचं वजन २५ किलो झाल्याशिवाय घराबाहेर काढू नका म्हणलं तर चालेल का?

अनुप ढेरे Mon, 06/04/2015 - 18:28

In reply to by ॲमी

आत्तेभावाला घरात घेताना विचार करायचा असतो. एकदा घरात घेऊन नंतर मी याला मारून टाकते असं म्हणणं कितपत लॉजिकल?

गवि Mon, 06/04/2015 - 19:09

In reply to by ॲमी

..पुरुषाच्या बीजापासून स्त्रीच्या पोटात आलेला जीव म्हणजे उदाहरणादाखल पुरुषाचा मोबाईल..किंवा त्याचा आतेभाऊ?
..स्त्रीलाही तो सांभाळायला दिलेला पुरुषाचा आतेभाऊ इतका परका वाटतो असं असेल तर तिचा कोण तो?

..पुरुषाला हक्क नको हे मान्यच मुळातून. पण स्त्रीलाही नको..जीव आहे तर तो कोणीच घेऊ नये.

अजो१२३ Mon, 06/04/2015 - 20:16

In reply to by ॲमी

तुम्ही काहीही बार्गेन करू शकता. पण भौतिक स्थान व भौतिक नाते इतकेच १००% अधिकार प्रस्थापित करायला पुरेसे नाहीत इतका सिमित मुद्द्दा मांडायचा होता.

ऋषिकेश Mon, 06/04/2015 - 15:44

In reply to by ॲमी

याच्याशीच असहमती दर्शवली आहे. परतपरत तेच सांगणं होतय पण तरी सांगते. गर्भ आईशिवाय जगू शकेल अशा वयाचा झाला की लगेच त्याच्यावर वडिलांचादेखील हक्क निर्माण होतो हे अमान्य आहे. जोपर्यंत तो आईच्या शरीरात आहे तोपर्यंत फक्त आईचा हक्क.

यात दोन टप्पे आहेत

जेव्हा अर्भक आईच्या पोटात आहे आणि बाहेर आल्यास तिच्या शिवाय जगू शकते (मात्र सध्या आत आहे) तेव्हा माझ्या मते त्या अर्भकाच्या जीवावर कोणाचाही अधिकार नाही. (आईचाही नाही) अर्थात त्याला मारण्याचे एकटी आई (किंवा कोणीच) ठरवू शकत नाही.

जेव्हा अर्भक आईच्या पोटात आहे आणि बाहेर आल्यास तिच्या शिवाय जगू शकते नी त्या अर्भकाला "वेळेआधी" सिझर वगैरे करून बाहेर आणून बाहेर जगवायचे ठरवायचे आहे तर वडीलांची परवानगी आवश्यक आहे कारण बाहेर जगवण्याची जबाबदारी एकट्या आईची नाही व म्हणूनच त्याबद्दलचा निर्णय घेण्याचा हक्कही

यात नक्की असहमती कुठे आहे?

बाळातील बहुतेक व्यंग पहिल्या पाच ते सहा महिन्यात समजतात. >> नक्की का? ऑटीझम लक्षात यायला २-२.५वर्ष लागतात ना?

बहुतेक म्हटले आहे. शिवाय ऑटिझम असलेल्या बालकालाही पालकांनी मारू नये असे वाटते.
आर्थिकदृष्ट्या शक्य नसेल तर मदत करणारी एखादी संस्था शोधावी किंवा काही संस्था अश्या बालकांना सांभाळतात तसे करावे.

बाकी सव्यंग मुलाबद्दलचे मतांतर समजू शकतो. त्याबद्दल माझे मत दोलायमान होत असते. यावर माझे मत क्रिस्टलाईज व्हायला अधिक चर्चेची आवश्यकता आहे हे पुन्हा एकवार जाणवले. (आभार ननि, टिंकू)

गवि Mon, 06/04/2015 - 16:09

In reply to by ऋषिकेश

जेव्हा अर्भक आईच्या पोटात आहे आणि बाहेर आल्यास तिच्या शिवाय जगू शकते नी त्या अर्भकाला "वेळेआधी" सिझर वगैरे करून बाहेर आणून बाहेर जगवायचे ठरवायचे

हा निर्णय आईच्या "निव्वळ इच्छे"नुसार घेणं चुकीचं आहे. त्यासाठी वैद्यकीय कारण पाहिजे. आईला मूल नकोय म्हणून पाचव्यासहाव्या महिन्यात ते घाईने बाहेर काढून इतरत्र इन्क्युबेटरमधे ठेवून जगवायचं, का तर आईला केवळ "नकोय" (गर्भधारणा चुकून झाली, इच्छेविरुद्ध झाली, प्लॅन चुकल्याने झाली, साधनाच्या फेल्युअरने झाली, आर्थिक परिस्थिती नाही, प्रोजेक्ट/ करियर असाईनमेंट्स यासाठी स्वातंत्र्य हवं आहे किंवा अन्य काहीही कारणाने- पण हेल्दी मूल नकोय) या कारणाने ? असं अर्ध्या वाटेत बाहेर काढून यंत्रावर त्याला वाढवण्याने ज्या अनेक हेल्थ रिस्क आणि कमतरता राहतात त्या "इजा" त्या लहान बाळाला कशापाई? आई म्हणजे जिवाची मालक हा समज याच्या मुळाशी आहे. इतर कोणाचाच जीव आपल्या कोणाच्याच मालकीचा नसतो. गर्भधारणा झाली आहे तर किमान पूर्ण महिन्यांचे मूल जन्माला घालणे हे कर्तव्य म्हणा किंवा जबाबदारी म्हणा, ही आवश्यकच आहे. अन्यथा अपुर्‍या वाढीचं मूल सोयीसाठी आगोदर बाहेर काढणं आणि त्यामुळे पुढे बाळाच्या आरोग्यावर, वाढीवर होणारे परिणाम ही अन्य जिवाला पोहोचवलेली गंभीर इजाच ठरेल.

यात परस्पर जबाबदारीची सक्ती केली जातेय वगैरे हे मान्य नाही. कोणत्याही कायद्याविषयी तसं म्हणता येईल.

अर्थात शेवटी महत्वाचं हेच आहे की आरोग्यविषयक (आई आणि नंतर मूल या क्रमाने) धोका असला तर आणि तरच असे अपुर्‍य दिवसांचे मूल बाहेर काढणे (जिवंत अथवा मृत) जस्टिफायेबल होईल. आईचा स्वतःच्या जिवावर इतर कशापेक्षाही जास्त हक्क आहे हे मान्य करुन.

इच्छामरण वगैरे हे सर्व जी व्यक्ती आपापला निर्णय घेण्याइतकी जाणती झाली आहे तिलाच असावा. ते जाणतं होण्याचं वय कसं ठरवायचं हा प्रश्न वेगळा झाला. पण इतर कोणाच्याही जिवाचा फैसला परस्पर कोणीही इतरांनी घेता कामा नये.

ऋषिकेश Mon, 06/04/2015 - 16:16

In reply to by गवि

मला उपप्रतिसाद आहे म्हणून सहमती व्यक्त करतो.

ती (हायपोथेटिकल) सिच्युएशन टिंकूने विचारार्थ मांडली होती.

ॲमी Mon, 06/04/2015 - 17:05

In reply to by ऋषिकेश

यात नक्की असहमती कुठे आहे? >>
टिंकू: ६.५महिन्यापेक्षा कमी वयाच्या गर्भाचा गर्भपात करण्याचा आणि त्यापेक्षा जास्त वयाच्या गर्भाला सिझर करून बाहेर काढायचा याचे निर्णय घेण्याचा हक्क 'फक्त' आईलाच असावा.
ऋ: त्या अर्भकाला "वेळेआधी" सिझर वगैरे करून बाहेर आणून बाहेर जगवायचे ठरवायचे आहे तर वडीलांची परवानगी आवश्यक आहे कारण बाहेर जगवण्याची जबाबदारी एकट्या आईची नाही व म्हणूनच त्याबद्दलचा निर्णय घेण्याचा हक्कही

आला का फरक लक्षात?

बाकी सव्यंग मुलाबद्दलचे मतांतर समजू शकतो. त्याबद्दल माझे मत दोलायमान होत असते. यावर माझे मत क्रिस्टलाईज व्हायला अधिक चर्चेची आवश्यकता आहे हे पुन्हा एकवार जाणवले. (आभार ननि, टिंकू) >> खरंय. अधिक चर्चेची आवश्यकता आहे.

मला उपप्रतिसाद आहे म्हणून सहमती व्यक्त करतो. >> त्या प्रतिसादाला सहमती दर्शवल्याने तू अजूनही दोलायमान अवस्थेतच आहेस असे वाटायला लागले आहे... जबाबदारी घ्यायची की नाही हा आईचा निर्णय आहे; इतर कोणालाही त्याबद्दल बोलायचा हक्क नाही.

ऋषिकेश Wed, 08/04/2015 - 13:10

In reply to by ॲमी

टिंकू: ६.५महिन्यापेक्षा कमी वयाच्या गर्भाचा गर्भपात करण्याचा आणि त्यापेक्षा जास्त वयाच्या गर्भाला सिझर करून बाहेर काढायचा याचे निर्णय घेण्याचा हक्क 'फक्त' आईलाच असावा.
ऋ: त्या अर्भकाला "वेळेआधी" सिझर वगैरे करून बाहेर आणून बाहेर जगवायचे ठरवायचे आहे तर वडीलांची परवानगी आवश्यक आहे कारण बाहेर जगवण्याची जबाबदारी एकट्या आईची नाही व म्हणूनच त्याबद्दलचा निर्णय घेण्याचा हक्कही

हे असे/इतकेच नाहिये. माझे मत असेय
ऋ: ६.५महिन्यापेक्षा (किंवा जे काही सस्टेनेबल) कमी वयाच्या गर्भाचा गर्भपात करण्याचा अधिकार फक्त आईला असावा. - सहमती
ऋ: त्या अर्भकाला ६.५महिन्यांनंतर मात्र "वेळेआधी" (नैसर्गिक मॅच्युरिटीच्याआधी) सिझर वगैरे करून बाहेर आणून बाहेर जगवायचे ठरवायचे आहे तर वडीलांची परवानगी आवश्यक आहे कारण बाहेर जगवण्याची जबाबदारी एकट्या आईची नाही व म्हणूनच त्याबद्दलचा निर्णय घेण्याचा हक्कही.
ऋ: मात्र ६.५ महिन्यांनंतर गर्भपाताचा हक्क कोणालाही नसावा
ऋ: जन्मानंतर मुलाच्या हत्येचा हक्कही कोणालाही नसावा अगदी डॉक्टरलाही
थोडक्यात चार पैकी ३ मतांवर असहमती आहे हे समजले

*वरील पुर्ण मत गर्भ वा जन्मानंतरचे अर्भक अव्यंग आहे असे समजून

सव्यंग अर्भक/मूल असले तरी मारू नये असे अजूनही वाटते पण नक्की काय करावे? याचे नेमक्या शब्दांत उत्तर देणे सध्या जमत नाहीये. तोवर हा घोडा तबेल्यात बांधलाय :)

गवि Wed, 08/04/2015 - 13:28

In reply to by ऋषिकेश

कारण बाहेर जगवण्याची जबाबदारी एकट्या आईची नाही व म्हणूनच त्याबद्दलचा निर्णय घेण्याचा हक्कही.

ऋ.. असे पूर्ण तर्ककर्कशपणे बघायचे असेल आणि तंतू उसवायचे असतील तर मग बहुतांश केसेसमधे (किंवा किमान जिथे अ‍ॅप्लिकेबल असेल तिथे) प्रेग्नन्सीदरम्यान पोटात जगवण्याचे पूर्ण काम स्त्रीचे असे तरी कसे म्हणावे ? जिथे स्त्री पुरुषावर उपजिवीकेसाठी अवलंबून आहे, जिथे तिच्या पोषणाची जबाबदारी कर्ता(!?!) पुरुष घेतो आहे तिथे गर्भातील मूल जिवंत राहणे त्या अन्नपाण्याचा सोयीवर अर्थात त्या पुरुषावरही अवलंबून आहे. मग या तू म्हटलेल्या बेसिसवर गर्भपाताचा पूर्ण एकटीला हक्क मिळवायचा तर प्रेग्नन्सीमधे स्त्रीने स्वतःची उपजीविका स्वतः करावी अशी अपेक्षा ठेवली पाहिजे.

हे सर्वच चुकीचं आहे. असं असावं असं म्हणणं नाही. फक्त विचारांची दिशा चुकतेय.

ऋषिकेश Wed, 08/04/2015 - 13:47

In reply to by गवि

असहमत.
पुरूषाने कमावले नाही तरी आई बाळाला जगवू शकते/स्वत: कमावू शकते पण आईने खाल्ले नाही तर जीव जगणार नाही.
गर्भातील अर्भक जैविकदृष्ट्या बापावर अवलंबून नाही.

बाहेर आल्यावर तर ते जैविकदृष्ट्या कोणावरही अवलंबून नाही म्हणून त्याला मारायचा हक्क कोणालाही नको असेच म्हणणे आहे.

वरील वाक्य हे वेळेआधी (प्रीमॅच्युअर) डिलिव्हरी काही कारण नसताना - किंवा आता फक्त आईला अर्भक पोटात नकोय म्हणून - करण्याबद्दल आहे.

अजो१२३ Wed, 08/04/2015 - 13:51

In reply to by ऋषिकेश

पण आईने खाल्ले नाही तर जीव जगणार नाही.

मुद्दाम खाणारच नाही, कितीही काळ, इतकी इच्छाशक्ती निसर्गाने स्त्रीला दिलीच नसावी.

गवि Wed, 08/04/2015 - 14:04

In reply to by ऋषिकेश

पुरूषाने कमावले नाही तरी आई बाळाला जगवू शकते/स्वत: कमावू शकते पण आईने खाल्ले नाही तर जीव जगणार नाही.
गर्भातील अर्भक जैविकदृष्ट्या बापावर अवलंबून नाही.

किती सोयीस्कर !! मुळात स्पर्ममुळे जीव पूर्ण झाला त्या पॉईंटला मात्र बापावर जीव अवलंबून असूनही पुढे तो पॉईंट विसरुन जायचा. कारण ते क्षणिक. म्हणजे पुरुष बाजूला.

नंतर प्रत्यक्ष वास्तवात बाप उपजीविकेची जबाबदारी घेत असला* तरी "आईही कमवू शकते" अशा तार्किक - शक्यताबेस्ड थियरीवर त्याला दूर करणे. पुरुष बाजूला.

पुरुष हजारो वर्षे अन्याय करत आले असतील. त्यातले बहुसंख्य तिरस्करणीय असतील.. प्रत्यक्षात आजरोजी सारे हक्क पुरुषच बजावत असतील. सर्व ठीक आहे, पण त्यांना अशी लॉजिके वापरुन बाजूला ठेवणं खरंच दुर्दैवी आहे. जाऊ दे.

* जिथे बाप कमावतो आणि स्त्रीला अन्नपाणी पुरवतो अशा काही मर्यादित केसेस असतील त्याबद्दल बोलतोय मी.

ऋषिकेश Wed, 08/04/2015 - 14:15

In reply to by गवि

जाऊ दे आपण कुठेतरी वेगळ्या (की मराठी आंजासाठी त्याच त्या) दिशेला चाल्लोय :)
टंकाळलो. थांबतो.
(मुद्दे न मांडता मध्येच थांबल्याबद्द्ल)सॉरी!

'न'वी बाजू Fri, 10/04/2015 - 07:28

In reply to by ऋषिकेश

पुरूषाने कमावले नाही तरी आई बाळाला जगवू शकते/स्वत: कमावू शकते पण आईने खाल्ले नाही तर जीव जगणार नाही.
गर्भातील अर्भक जैविकदृष्ट्या बापावर अवलंबून नाही.

सर्का १९८४-८५च्या आसपास (चूभूद्याघ्या), केवळ कॉलेजच्या मूव्हीक्लबाचे पैसे भरलेले आहेत त्यांची वसुली झाली पाहिजे या कारणास्तव नाइलाज-कम-जबरदस्तीने अथपासून इतिपर्यंत पाहिलेल्या 'दर्द का रिश्ता' (ष्टारिंग सुनील दत्त, स्मिता पाटील, बेबी खुशबू आणि सुनील दत्तच्या बेबी खुशबूला जन्म देतादेता गचकणार्‍या अल्पजीवी दुसर्‍या बायकोच्या भूमिकेत नक्की ठाऊक नाही, पण रीना रॉय असे विकी म्हणतोय ब्वॉ!) या भयंकर चित्रपटातील 'बाप की जगह, माँ ले सकती है, मॉं की जगह, बाप ले नहीं सकता, लोरी दे नहीं सकता| सो जा, सो जा! सो जा, सो जा!' या भयाण लोरीची आठवण आली, नि अंगावर सर्रकन काटा आला. (त्या मेल्या आईच्यान्, आपण जर त्या बेबी खुशबूच्या जागी असतो, तर आपला बाप ही लोरी पुन्हापुन्हा म्हणेल, या भीतीनेच छातीत धडकी भरून तातडीने झोपी गेलो असतो. कायमचे. असो.)

प्रथमेश नामजोशी Mon, 06/04/2015 - 17:08

In reply to by ॲमी

सहमत आहे, पण पार्शली. मूल होऊ देण्याचा निर्णय त्या जोडप्यानी एकमतानेच घेतलेला असल्यास; एकदा मीटर पडलं, की त्या जन्माला येणाऱ्या/आलेल्या बाळासंदर्भातचे सर्व मोठे निर्णय एकमतानेच हवेत.
बाकी व्यंगाबद्दलचा मुद्दा, प्रॅक्टिकली विचार करता एकदम मान्य. पण ठीके.. नुसत्या मान्य करायला नी पटवून घ्यायला बऱ्याच गोष्टी सोप्याच असतात.

बॅटमॅन Mon, 06/04/2015 - 17:22

In reply to by प्रथमेश नामजोशी

नुसत्या मान्य करायला नी पटवून घ्यायला बऱ्याच गोष्टी सोप्याच असतात.

आणि ज्यांचा त्या स्थितीशी प्रत्यक्ष संबंध येत नाही त्यांना स्वतःला तर्कसंगतपणाची सर्टिफिकिटे लावून घ्यायची आयतीच संधी असते.

पैचान कौन Tue, 07/04/2015 - 01:27

In reply to by ॲमी

एकदम सुरुवातीपासून बघू.

  • मूल कन्सीव्ह करायचे की नाही, हा अधिकार फक्त स्त्रीला हवा.
  • आज इच्छा नाही म्हणून संभोग नाकारण्याचा अधिकार स्त्री आणि पुरुष दोघांना हवा.
  • पुरुषाने निरोध वगैरे नियोजनाची साधने वापरली नाहीत, तर संभोग नाकारण्याचा अधिकार स्त्रीला हवा.
  • पिल्स वगैरे प्रकाराने संततीनियमन करण्याचा अधिकार स्त्रीला हवा.
  • गर्भवती राहिल्यास अबॉर्शनचा अधिकार फक्त स्त्रीला हवा. (पुरुषाचे मत न विचारता).
  • पुरुषाला मूल नको आहे, पण स्त्रीला ते मूल हवे आहे अशी स्थिती असेल तर मूल होऊ द्यावे, हा अधिकार स्त्रीला हवा. मात्र अशा परिस्थितीत मुलाच्या पालनपोषण करण्याची जबाबदारी मी अजिबात घेणार नाही, हा अधिकार पुरुषाला हवा.
  • मूल जन्माला येईपर्यंत मुलाबाबत निर्णय घेण्याचा अधिकार स्त्रीला हवा. (यात ऑटिझम, मतीमंद मूल वगैरे प्रकार आले).
  • मूल झाल्यावर नाव काय ठेवायचे, हा अधिकार स्त्रीला हवा.
  • गर्भवती असताना आईच्या जिवाला धोका असेल, तर तिचा जीव वाचवावा की बाळाचा जीव वाचवावा, हा अधिकार फक्त स्त्रीला हवा (जर आई निर्णय घेण्यायोग्य असेल तर, उदा. कोमामध्ये नसेल तर). जर आई असा निर्णय घेण्याच्या स्थितीत नसेल आणि जर तिने मेडिकल पॉवर ऑफ अटॉर्नी नवर्‍याच्या/बॉयफ्रेंडच्या नावाने दिली असेल तर असा निर्णय नवर्‍याने/बॉयफ्रेंडने घ्यावा. जर परिस्थिती तशी नसेल (उदा.अपघात) किंवा मेडिकल पॉवर ऑफ अटॉर्नी दिली नसेल तर डॉक्टरने (पर्यायाने सरकारने) त्या बाळाला जन्मास घालण्याचा प्रयत्न करावा.
  • बाळाचा जन्म झाला की आई आणि वडील या दोघांचा समान अधिकार असावा आणि सरकारने त्यात हस्तक्षेप करू नये. अपवादः बाळाच्या जिवाला धोका असेल तर. अश्या वेळी बाळाला १ व्यक्ती (human being) आणि नागरिक म्हणून सरकारने बाळाच्या रक्षणासाठी प्रयत्न करावेत.
  • मूल सज्ञान (१८ वर्षे) झाले, की केवळ त्याला/तिलाच स्वतःविषयी निर्णय घ्यायचा अधिकार असावा. (अपवादः मूल १८ वर्षाचे झाले तरी ते पालकांवर अवलंबून असेल तर तेव्हा आई आणि वडील या दोघांचा समान अधिकार असावा. सरकारने त्यात हस्तक्षेप करू नये.)

हे कधी होइल असे वाटत नाही पण अॅटलीस्ट पहिली अपेक्षातरी डोळे मिटायच्या आत पुर्ण झाली तर आनंद होइल.

डोळे मिटायच्या आत अमेरिकेला आलात तर अपेक्षा पूर्ण होईल.

ॲमी Wed, 08/04/2015 - 03:30

In reply to by पैचान कौन

गर्भवती असताना आईच्या जिवाला धोका असेल, तर तिचा जीव वाचवावा की बाळाचा जीव वाचवावा, हा अधिकार फक्त स्त्रीला हवा (जर आई निर्णय घेण्यायोग्य असेल तर, उदा. कोमामध्ये नसेल तर). जर आई असा निर्णय घेण्याच्या स्थितीत नसेल आणि जर तिने मेडिकल पॉवर ऑफ अटॉर्नी नवर्याच्या/बॉयफ्रेंडच्या नावाने दिली असेल तर असा निर्णय नवर्याने/बॉयफ्रेंडने घ्यावा. जर परिस्थिती तशी नसेल (उदा.अपघात) किंवा मेडिकल पॉवर ऑफ अटॉर्नी दिली नसेल तर डॉक्टरने (पर्यायाने सरकारने) त्या बाळाला जन्मास घालण्याचा प्रयत्न करावा. >> बर्यापैकी असहमत आहे. बांडगुळाच्या जीवापेक्षा आईचा जीव वाचवायला नेहमीच प्राधान्य द्यावे असे वाटते. पुर्ण असहमती यासाठी नाही की कोणाचेही वैयक्तीक निर्णय अमान्य करावेत की नाही याबद्दल शंका आहे.

डोळे मिटायच्या आत अमेरिकेला आलात तर अपेक्षा पूर्ण होईल. >> पुर्विची केस अमेरीकेतलीच आहे ना? तिथेही अबॉर्शन कधीपर्यंत करता येतं यावर लिमीट आहेच ना? त्या लिमीटनंतर कधीही सिझर/ इंड्युस्ड डिलीवरी करायचा हक्क आईला आहे का?

पैचान कौन Wed, 08/04/2015 - 22:28

In reply to by ॲमी

इतक्या काथ्याकूटात ह्या सोप्या गोष्टीवर असहमत? आश्चर्य आहे.

>> बांडगुळाच्या जीवापेक्षा आईचा जीव वाचवायला नेहमीच प्राधान्य द्यावे असे वाटते.
असे कुणाला वाटते? तुम्हाला की गर्भवती आईला? What is your locus standi?

ॲमी Thu, 09/04/2015 - 06:54

In reply to by पैचान कौन

असे कुणाला वाटते? तुम्हाला की गर्भवती आईला? What is your locus standi? >> असे मला वाटते आणि भारतातील मेडिकल गाइडलाइन्स करणार्यांनादेखील वाटते आणि जगभरातदेखील तोच नॉर्म असेल/असावा असा माझा अंदाज आहे. तुम्ही दिलेली लिंक ओपन होत नाहीय. पण मला वाटतं मी 'पुर्ण' असहमती ज्या कारणाने दिली नाही तेच तुम्ही बोलताय. गर्भवती आईचा तिच्या शरीरावर, जीवावर हक्क नक्कीच आहे. पण बालपणापासून संस्कार, कंडिशनींग, आईची कर्तव्य वगैरेचा इतका उदोउदो करून बिंबवलेलं असतं की "डॉक्टरसाब, चाहे मुझे कुछभी हो जाये पर मेरे बच्चे को बचालो प्लीज" असे म्हणणार्या स्त्रिया जास्त असू शकतील. आणि मग ती मेल्यावर समाज येतोच तिची पुजा करायला "कसली महान आई! आपला जीव देऊन बाळाला वाचवलं"...

अजो१२३ Thu, 09/04/2015 - 10:52

In reply to by ॲमी

पण बालपणापासून संस्कार, कंडिशनींग, आईची कर्तव्य वगैरेचा इतका उदोउदो करून बिंबवलेलं असतं की "डॉक्टरसाब, चाहे मुझे कुछभी हो जाये पर मेरे बच्चे को बचालो प्लीज" असे म्हणणार्या स्त्रिया जास्त असू शकतील.

म्हणून सर्वच अधिकार अनकंडिशनली कोणाकडे नकोत.

गवि Thu, 09/04/2015 - 11:23

In reply to by अजो१२३

कोणत्याही परिस्थितीत आईचा जीव प्रथम वाचवणे असं माझं मत आहे. ते या धाग्यावर इतरत्रही सांगितलेलं आहे. आईच्या जिवाला धोका, बाळाच्या जिवाला धोका, बाळात विकृती इत्यादि केसेसमधे मेडिकल रीझन असताना अर्थातच आईला प्राधान्य असणे आवश्यक आहे. आणि दोघांपैकी एक अशी (हिंदी सिनेमांइतकी फ्रीक्वेंटली नसली तरी) वेळ जेव्हा जेव्हा येते तेव्हा, बाय डिफॉल्ट आईला वाचवलं जातं. या कन्व्हेन्शनविषयी वैद्यकशास्त्रातल्या संबंधितांनी कृपया खात्री करावी. हे कन्वेन्शन योग्यच आहे. आईचा जीव देऊन बाळ जगवावं ही अपेक्षा चूकच आहे. त्यासाठी त्या अवस्थेत आईला "चॉईस" विचारणं हादेखील क्रूरपणा आहे.

पण मूळ केस आणि एकूण चर्चेत जेव्हा अनकंडिशनल (रिगार्डलेस ऑफ मेडिकल रीझन्स) बाळ जन्मण्यापूर्वी किंवा जन्मल्यानंतर काही वर्षे त्याच्या जगण्याचा हक्क राखण्यात सरकारने वगैरे हस्तक्षेप करु नये हा मुद्दा आला तेव्हा त्यात खालील घटकही समाविष्ट होते:

-"जबरदस्तीने लादलं गेलेलं मातृत्व"
-"जबरदस्तीने नव्हे पण चुकून झालेली गर्भधारणा"
-"जबाबदारी नकोशी असणं"
-"समाजाची लाज म्हणून विवाहबाह्य अपत्य नको असणं"
-"अमुक लिंगाचं अपत्य नको असणं"(मुलगी जन्मली तर इतरांकडून होणार्‍या त्रासाने किंवा स्वतःच्या मानसिकतेमुळे तिला जन्मताच मारुन टाकणारे बाप असतात तशा आयाही असतात)
-करियर किंवा अन्य कारणांनी / पुढील आर्थिक विवंचनेमुळे जबाबदारी नको असणं.
-मुलांची आवडच नसणं

या सर्वाची जाणीव गर्भधारणेनंतर अथवा प्रसूतीनंतर झाल्याने होणार्‍या भ्रूण अथवा बालकहत्याही येतात. या सर्वांनाही आईवरच सोपवावे हे मेडिकल रीझनसारख्या प्रकारात अजिबात बसत नाही. तरीही हा सप्ष्ट संदर्भ विसरून सोयीस्कर ठिकाणी आईच्या जिवाला धोका, बाळाची विकलांगता, नैतिकता हे मुद्दे पखरण करुन पुन्हापुन्हा अनेकांकडून मांडले गेले.

स्वबीज आणि बांडगूळ या संकल्पनांमधे मुळात असलेला फरक लक्षात घेणं आवश्यक आहे. स्वबीज आपलंच असतं आणि ते आपला रस शोषून मॅच्युअर होऊन दूर होत असतं. आपण खुद्दही ते केलं. आज नाही करत. लहान असताना गरज होती म्हणून केलं. बांडगूळ हे आपलं नसतं. तो वेगळा परकीय जीव असतो आणि तो आपल्यातून उत्पन्न होत नाहे.. तो आयता, आपल्या कोणत्याही कृतीशिवाय येऊन आपल्या बोकांडी बसतो आणि आपला जीवनरस शोषून स्वतःचं आयुष्य त्यावरच अथ ते इति जगतो. बाळाला आईचं बांडगूळ मानणे इथेच एक तीव्र इन्डिफरन्स जाणवतो. पूर्ण परकेपणा, तुटकपणा, ते मूल म्हणजे आपला भाग नव्हे तर निव्वळ एक एलियन शोषक आहे असा भाव.

आधी बांडगूळ हा शब्दप्रयोग चुकीने झाला असावा असं वाटलं पण अनेक ठिकाणी पुनरुच्चार झाल्यावर आता तो गैरसमज होता हे पटलं.

बांडगूळ बचाव वगैरे प्रकार दुर्दैवाने उपयोगाचा नाही कारण कितीही कायदे केले किंवा अन्य काही तांत्रिक उपाय, तरी खुद्द पायलटने मनात आणले तर तो विमानाचा कशाही प्रकारे नाश करु शकतोच..

तसंच खुद्द आईने ठरवले असेल तर कोण माईचा लाल त्या बांडगुळाला वाचवणार? तेव्हा असोच.

केवळ आईबापांनी न मारता कुठेतरी नेऊन सोडून का होईना पण जिवंत सोडल्याने पोरकीच पण इतरांच्या आसर्‍याने वाढलेली जन्मतः अनाथ पोरं पुढे किती चिकाटीने आयुष्य सुंदर बनवतात आणि कुठच्याकुठे पोचतात हे डोळ्यांनी अनेक ठिकाणी पाहिलेलं असल्याने बोलल्याशिवाय राहवले नाही. लेट लाईफ गेट इट्स चान्स.

कमीजास्तबद्दल दिलगिरी अन रजा.

अजो१२३ Thu, 09/04/2015 - 11:31

In reply to by गवि

गविंचा हा प्रतिसाद या धाग्यावरच्या एकूण गदारोळात हरवला जाऊ नये अशी इच्छा आहे. आप्ट. पर्फेक्ट.

पैचान कौन Thu, 09/04/2015 - 20:54

In reply to by ॲमी

locus standi ची लिंक http://definitions.uslegal.com/l/locus-standi/ अशी आहे.

गर्भवती असताना आईच्या जिवाला धोका असेल, तर तिचा जीव वाचवावा की बाळाचा जीव वाचवावा, हा अधिकार फक्त स्त्रीला हवा (जर आई निर्णय घेण्यायोग्य असेल तर, उदा. कोमामध्ये नसेल तर). जर आई असा निर्णय घेण्याच्या स्थितीत नसेल आणि जर तिने मेडिकल पॉवर ऑफ अटॉर्नी नवर्याच्या/बॉयफ्रेंडच्या नावाने दिली असेल तर असा निर्णय नवर्याने/बॉयफ्रेंडने घ्यावा. जर परिस्थिती तशी नसेल (उदा.अपघात) किंवा मेडिकल पॉवर ऑफ अटॉर्नी दिली नसेल तर डॉक्टरने (पर्यायाने सरकारने) त्या बाळाला जन्मास घालण्याचा प्रयत्न करावा.

हा अमेरिकेतील norm आहे आणि मलातरी यात काहीच वावगे दिसत नाही. वर मी लिहिल्याप्रमाणे बहुतेक मुद्द्यांशी तुम्ही सहमत आहात, फक्त या मुद्द्याशी partially असहमत, म्हणून जरा लिहिले. आता तुमचा मूळ प्रश्न "हक्काचा". अमेरिकेत आईच्या बाजूने बरेच कायदे आहेत (वडिलांच्या तुलनेत जास्त) आणि बाळाचा जन्म होईपर्यंत तीच बाळाचे भवितव्य ठरवू शकते. बाळाच्या जन्मानंतर त्याला/तिला १ माणूस (human being) आणि नागरिक म्हणून बघितले जाते. अमेरिकेच्या Declaration of Independence नुसार प्रत्येक नागरिकाला Life, Liberty and the pursuit of Happiness चा अधिकार आहे. पण तरीही, जन्मानंतरपण आईला मूल नको आहे समजा, तर त्यासाठी सेफ हेवन लॉ अस्तित्वात आहे. https://www.childwelfare.gov/topics/systemwide/laws-policies/statutes/s…
त्यानुसार १. हा लॉ सर्व राज्यात उपलब्ध आहे. (वयाची अट वेगळीवेगळी असू शकते). २. आई जवळच्या फायर स्टेशनमध्ये किंवा पोलिस स्टेशनमध्ये बाळाला सोडू शकते. ३. आईला निनावी राहाता येते. (guarantee of anonymity) ४. सर्वात महत्वाचे: आईला immunity from prosecution मिळते.(protection from criminal liability). अधिक माहितीसाठी हे बघा.

यापेक्षा अजून काय करायला पाहिजे?

बांडगूळ (parasite) या शब्दाला negative connotation आहे, असे मला वाटते. मी तुम्हाला खरडवहीत तसे लिहिले होते, पण तुम्ही म्हणता "शब्द बदलल्याने लक्षण बदलणार आहेत का"" त्यामुळे ठीक. गविंनी पण याबद्दल लिहिले आहेच, त्यामुळे द्विरुक्ती नको.

राहाता राहिला प्रश्न "डॉक्टरसाब, चाहे मुझे कुछभी हो जाये पर मेरे बच्चे को बचालो प्लीज" आणि "मग ती मेल्यावर समाज येतोच तिची पुजा करायला" चा. तुम्ही हिंदी चित्रपट जरा जास्तच बघता असं दिसतय. कारण मूल वाचावं असे प्रयत्न करणार्‍या बर्‍याच आया भारताबाहेर पण राहातात. हे बघा आणि हे बघा. त्यामुळे तुमच्या कॉमेंटमुळे त्यांच्या विचारावर अन्याय होईल असे वाटले म्हणून सांगितलं इतकंच.

ऋषिकेश Thu, 09/04/2015 - 21:03

In reply to by पैचान कौन

१. हा लॉ सर्व राज्यात उपलब्ध आहे. (वयाची अट वेगळीवेगळी असू शकते). २. आई जवळच्या फायर स्टेशनमध्ये किंवा पोलिस स्टेशनमध्ये बाळाला सोडू शकते. ३. आईला निनावी राहाता येते. (guarantee of anonymity) ४. सर्वात महत्वाचे: आईला immunity from prosecution मिळते.(protection from criminal liability).

वाह! अमेरिकेतली ही तरतुद आवडली.
यात बाळाच्या जीवावर कोणाचाही हक्क नाही राहात आणि पालकांना मुल नको असेल तर त्यांच्यावरही सक्ती होत नाही.

मात्र हे फक्त सिंगलमदर्स संबंधी आहे का? का जन्मानंतर काही महिने वडिलांचा तिथे काहीच अधिकार नसतो? हा निर्णय (मुलाला पोलिस स्टेशन वगैरे सोडायचा) एकटी आई घेऊ शकते? तसे असेल तर हे योग्य नाही

ॲमी Sat, 11/04/2015 - 03:36

In reply to by पैचान कौन

असा हक्क मागायची गरजच नाही. डॉक्टर बाळाला वाचवायचा प्रयत्न करेलच, आणि योग्य वेळ आली की बाळ बाहेर येईलच. >> वेगवेगळ्या देशात गर्भपाताचे कायदेशीर लिमीट २० ते २८ आठवडे आहे. बाळ बाहेर यायची योग्य वेळ ३८ आठवडे. मधल्या काळात आईला कोणता हक्क असावा याबद्दल तो प्रश्न आहे.

हा अमेरिकेतील norm आहे आणि मलातरी यात काहीच वावगे दिसत नाही. >> मला यात पुर्ण नाही पण थोडेसे वावगे दिसते. कारण वर लिहीले आहे.

वर मी लिहिल्याप्रमाणे बहुतेक मुद्द्यांशी तुम्ही सहमत आहात, फक्त या मुद्द्याशी partially असहमत, म्हणून जरा लिहिले. >> त्या पार्शली असहमत पर्यंतच्या मुद्द्यांशीच सहमत आहे. त्यापुढच्यांशी नाही.

तुम्ही हिंदी चित्रपट जरा जास्तच बघता असं दिसतय. कारण मूल वाचाव....... त्यामुळे तुमच्या कॉमेंटमुळे त्यांच्या विचारावर अन्याय होईल असे वाटले म्हणून सांगितलं इतकंच. >> वाक्य हिंदीतून लिहीलं म्हणून ते फक्त भारतीय स्त्रिया आणि फक्त इमर्जन्सी सिच्युएशन्ससाठीच आहे असे नाही. बर्याच स्त्रिया इमर्जन्सी नसतानादेखील अशा पद्धतीचा निर्णय लोकस स्टँडी करून ठेवू शकतील. म्हणूनचतर पार्शल असहमती आहे.

३_१४ विक्षिप्त अदिती Sat, 11/04/2015 - 04:11

In reply to by ॲमी

वाक्य हिंदीतून लिहीलं म्हणून ते फक्त भारतीय स्त्रिया आणि फक्त इमर्जन्सी सिच्युएशन्ससाठीच आहे असे नाही.

याबद्दल सहमती.
एरंडासारख्या वाढलेल्या पोरांनी न सांगता बाहेर खाल्लं म्हणून नियमितपणे स्वतः शिळंपाकं खाणाऱ्या, आजारपणातही पोरांच्या आनंदासाठी स्वयंपाकघरात राबणाऱ्या, दहावी-बारावीच्या वेळेस आपलीच परीक्षा आहेत अशा प्रकारे जीवाला त्रास करून घेणाऱ्या भरपूर स्त्रिया आजूबाजूला बघितलेल्या आहेत. जीवावरच आलं तर काय करतील याबद्दल तरीही खात्री देता येत नाही, पण शक्यता नाकारता येत नाही.

पैचान कौन Thu, 09/04/2015 - 19:14

In reply to by ॲमी

त्यावेळेनंतर गर्भपात न करता सिझर करून किंवा इंड्युस्ड डिलीवरी करून बाळाला बाहेर काढा आणि जगवा असे सांगायचा हक्क आईला असावा की नाही?

असा हक्क मागायची गरजच नाही. डॉक्टर बाळाला वाचवायचा प्रयत्न करेलच, आणि योग्य वेळ आली की बाळ बाहेर येईलच.

घनु Tue, 07/04/2015 - 12:24

टिंकू, वर बर्‍याच जणांनी प्रश्न विचाराला आहे तुला, मलाही तोच प्रश्न पडला म्हणून पुन्हा विचारावे वाटते. तू लिहीले आहेस :

माझे वैयक्तीक मत ४-५ वर्ष वयापर्यंतच्या लहानग्यांच्या जगण्याच्या हक्काचे रक्षण करायच्या भानगडीत सरकारने पडू नये.

हे वयाचं गणित कशाच्या आधारावर? शुचि म्हणाल्याप्रामाणे "६ व्या वर्षी असा काय फरक पडतो जो ४-५ वयापर्यंत नसतो? प्लीज सांगशील का?"

नितिन थत्ते Tue, 07/04/2015 - 13:59

In reply to by अजो१२३

तुम्ही अठरा वर्षापेक्षा मोठे आहात या ग्राउंडवर.

दहा वर्षाचे असताना कोणत्या ग्राउंडवर अडवता येईल असं विचारा.

अजो१२३ Tue, 07/04/2015 - 14:12

In reply to by नितिन थत्ते

१८ वैगेरे कायदेशीर आकडा झाला. टिंकूतैला आपल्या मतामागचं "तत्त्व" काय ते विचारायचं आहे. ते कायद्याप्रमाणे असो वा नसो.

नगरीनिरंजन Tue, 07/04/2015 - 17:03

In reply to by अजो१२३

१८ नंतर मतदान करता येतं हे कसं ठरवलं गेलं? साधारण ७ वर्षांचं झाल्यावर मुलांना स्वतःचं स्वतंत्र व्यक्तिमत्त्व येतं असं चाईल्ड सायकॉलॉजिस्ट्स म्हणतात असे ऐकून आहे.

अजो१२३ Tue, 07/04/2015 - 17:13

In reply to by नगरीनिरंजन

गल्ली चूकली आहे का?
----------------
अवांतर - तो ७ वर्षांचा झाल्यावर मी मुलाला काही महिने मिस्टर पर्सनालिटी म्हणत असे असे आठवले.

नगरीनिरंजन Tue, 07/04/2015 - 19:08

In reply to by अजो१२३

मतदानासाठी १८ वर्षे वय आवश्यक असण्याच्या मागचे तत्त्व तुम्ही आधीच विचारुन घेतले असेल असे वाटल्याने मी विचारले. गल्ली चुकली असे तुम्हाला वाटत असल्यास माझा नाईलाज आहे.
लालयेत पंचवर्षाणि, दशवर्षाणि ताडयेत वगैरेमागचे तत्त्व तुम्ही विचारले आहे का की फक्त इथे कोणी मत मांडल्यावर त्याला आडवे घालण्यातच तुम्हाला रस आहे याचे मला औत्स्युक्य आहे. :-)

मुळात निसर्गत: आईला मुलांना किंवा कोणीही कोणाला मारण्यावर बंदी नाही. तुम्ही ४० चे झाल्यावरही तुमच्या आईला अतोनात त्रास देत असाल व स्वतःलाही करुन घेत असाल तर तुम्हाला मारण्यास काहीच हरकत नाही. कायदेशीरपणे त्याला स्वसंरक्षणार्थ वगैरे म्हणता येईल की नाही ही गोष्ट वेगळी.
कोणत्याही त्रासदायक व स्वतंत्रपणे जगण्यास नालायक व्यक्तीला संपवण्याचा प्रयत्न करण्याचा हक्क निसर्गाने दिलेला आहेच; प्रश्न असा आहे की तो हक्क बजावल्यास आणि मारणार्‍या व मेलेल्या व्यक्तीला त्रास होत होता (आणि पुढेही झाला असता) हे सिद्ध झाल्यास मारणार्‍या व्यक्तीला इतरांनी शिक्षा द्यावी की नाही?

मांजरी व इतर अनेक प्राणि आपल्या पिलांपैकी दुर्बळ पिले खाऊन टाकतात म्हणजे सबळ पिलांना व आईला जगण्याची अधिक संधी मिळते व भविष्यात ती चांगली संतती निर्माण करु शकते. (लाईफ रिसायकल होते याची एक अजब जाण प्राण्यांमध्ये असल्यासारखे वाटते ती माणसांना असल्याचे सहसा जाणवत नाही).

अजो१२३ Tue, 07/04/2015 - 19:37

In reply to by नगरीनिरंजन

इथे कोणी मत मांडल्यावर त्याला आडवे घालण्यातच तुम्हाला रस आहे.

असं नाही राव. कोणाचं कोणतं मत रोचक वाटलं तर ते तसं का आहे असं मी विचारतो. काँट्रास्ट क्लिअर व्हावा म्हणून कधीमधी एक्ट्रीम उदाहरण देतो. ४-५ किंवा क्ष य वर्षांपर्यंत बाळ जगावे, मरावे, जगवावे, मारावे इ इ चा अधिकार आईला, बापाला, कोणाला, याला, त्याला असावा, नसावा अशा फॉर्मॅटमधलं मत बनण्याचं कारण काय हा साधा प्रश्न आहे.

नगरीनिरंजन Tue, 07/04/2015 - 19:47

In reply to by अजो१२३

मला तरी ४-५ वर्षे म्हणजे जोवर मूल आईवडिलांवर अगदीच अवलंबून आहे अशा काळासाठीचे ढोबळ मोजमाप वाटले. तो काळ महत्त्वाचा नसून जन्म देणार्‍याला जीव घेण्याचा अधिकार असावा की नाही असा प्रमुख प्रश्न आहे. तो कधीपर्यंत असावा हा दुय्यम प्रश्न आहे.

अजो१२३ Tue, 07/04/2015 - 19:51

In reply to by नगरीनिरंजन

ठिक आहे. टिंकूने वन लायनर मत लिहिले होते म्हणून मला तिला नक्की काय (आणि का) म्हणायचं आहे ते कळलं नव्हतं.

ॲमी Wed, 08/04/2015 - 03:02

In reply to by नगरीनिरंजन

+१ या प्रतिसादाला आणि तुमच्या आतापर्यंतच्या सर्व प्रतिसादांना.

---------------

घनु, अजो आणि आधी उत्तर देउनही परतपरत तोच प्रश्न विचारणारे इतर,

www.aisiakshare.com/node/3930#comment-96616 हा प्रतिसाद वाचला का? त्यात इच्छामरण या धाग्याची लिंक दिली आहे www.aisiakshare.com/node/3316. तो धागा वाचला का? त्यात बालक दयामरणावर चर्चा झाली आहे तिथला माझा प्रतिसाद परत इथे कॉपी पेस्ट करतेय

जगण्याचा हक्क आणि त्या हक्कांचे सरकारकडून संरक्षण कधी चालू व्हावे?
* कंसिव केल्याकेल्या लगेच
* हृद्याचे ठोके चालू झाल्यावर
* जन्मल्यावर
* सायकोलॉजीकली सेन्स बर्यापैकी डेवलप झाल्यावर (हे शब्द टेकनीकली बरोबर आहेत की नाही माहीत नाही. पण मला साधारण वय ५ वर्ष म्हणायचे आहे.)
माझे मत शेवटच्या पर्यायाला आहे.

अजो१२३ Wed, 08/04/2015 - 10:52

In reply to by ॲमी

४ वर्षे ११ महिने वयाच्या बाळाला आईने कोण्या (आणि कोण्याही) कारणास्तव मारून टाकले तर सरकारने, समाजाने वा कुटुंबाने काही म्हणू नये, शिक्षा करू नये असे आपणांस म्हणायचे आहे असे दिसते.
---------------------------------------------------
@ गब्बर, आपले विचार सामान्य आहेत याची खात्री होऊ लागली आहे.

गब्बर सिंग Wed, 08/04/2015 - 11:20

In reply to by अजो१२३

@ गब्बर, आपले विचार सामान्य आहेत याची खात्री होऊ लागली आहे.

म्हंजे काय ?

माझे विचार उच्च वगैरे बिल्कुल नाहीत असा माझा समज आहे. तो खरा आहे असं तुम्हास म्हणायचंय का ?

घनु Wed, 08/04/2015 - 12:02

In reply to by ॲमी

ह्या लिंक मधला प्रतिसाद ओपन होत नाहीये. पण असो.. धन्यवाद प्रतिसादासाठी. आणि पुन्हा पुन्हा तोच तोच प्रश्न ह्या साठी कारण वर लोकांनी प्रश्न विचारला तेव्हा त्यावर तुझं उत्तर त्या प्रतिसादावर कुठेच नव्हतं म्हणून विचारलं.. बाकी काही नाही.
म्हणजे ननी म्हणाले तसं ४-५ वर्ष हा ढोबळ आकडा आहे तर, त्याला विशेष काही बेस नाही... असो मग!

नितिन थत्ते Wed, 08/04/2015 - 11:03

स्त्री भ्रूण हत्येचा अधिकार कुटुंबाला नसावा असे म्हटल्यावर आईला वाटले म्हणून गर्भपात करण्याचा हक्क असावा हे म्हणणे उदाहरणार्थ रोचक आहे.

मुलगी आहे म्हणून (नवर्‍याला/कुटुंबाला) गर्भपात करायचा आहे- अमान्य
आईला आता (कोणत्याही वेळी) वाटते म्हणून गर्भपात करायचा आहे - मान्य.

हे कसे जमायचे?

अजो१२३ Wed, 08/04/2015 - 11:36

In reply to by मेघना भुस्कुटे

टिंकूच्या (not known for feminism at all) धाग्यावर नितिनजींच्या (not a feminist by any standards) प्रतिसादाला मेघनाने (sturdy vehement feminist) सहमती देणे मंजे ख्रिश्चन पक्षाध्यक्ष मुस्लिम राष्ट्राध्यक्ष शीख माणसाला हिंदूबहुल देशाचा पंतप्रधान बनवतात त्यातला प्रकार झाला.

गवि Wed, 08/04/2015 - 11:46

In reply to by नितिन थत्ते

थत्तेचाचा, असं कसं म्हणता? तुम्ही पुरुष आणि स्त्रीला एकच करुन टाकलं की.

मातृत्व हे स्त्रीकडे असतं. थेंबभर विरजण पुरवले की पुरुषाचा त्याच्याशी काय संबंध? स्त्रीच्या शरीरात ते बांडगूळ टाकलं की पुरुष नामानिराळा. स्त्रीच त्याला निर्माण करते, पोटात वाढवते आणि जन्म देते. यात खरोखर खूप शारिरीक ताण आणि वेदना आहेत. स्वतःला काडीचं सुख नसताना हे सर्व सोसून तरीही समाजाच्या भल्यासाठी अन मानवी वंश वाढावा म्हणून स्त्री हे सहन करते. इनफॅक्ट त्यासाठी स्त्रिया आपल्या आयुष्यात येणार्‍या पुरुषांनाही सहन करतात. या सर्वामुळे त्यांचा प्रथम आणि पूर्ण हक्क आहेच याबाबत निर्णय घेण्याचा. एखादीला नकोसं वाटलं तर नको म्हणून ते नष्ट करता आलं पाहिजेच की. वात्सल्य वगैरेंची सक्ती कशाला कोणावर?

पुरुषाला यात स्टँडिंग आहेच कुठे? त्याचा कसला हक्क किंवा निर्णय? आणि मुलं जन्माला आली काय किंवा नाही काय, पुरुषाला काय फरक पडतो? त्याला थोडंच पोटच्या गोळ्याविषयी माया, वात्सल्य वगैरे असतं? फिजिकली त्याच्या पोटात थोडाच असतो तो गोळा? आणि तसाही त्याला जास्तीत जास्त ठिकाणी विरजण लावण्यात रस फक्त.

द्या आता खवचट, भडकाऊ वगैरे.

मेघना भुस्कुटे Wed, 08/04/2015 - 11:48

In reply to by गवि

खवचट श्रेणी दिली आहे. (पण बादवे, खवचट ही ऐसीवरची सकारात्मक श्रेणी आहे. खवचटपणा मस्त असतो.)

गब्बर सिंग Wed, 08/04/2015 - 11:50

In reply to by गवि

विरजण - जय हो. क्या लब्ज इस्तेमाल किया है.

-

इनफॅक्ट त्यासाठी स्त्रिया आपल्या आयुष्यात येणार्‍या पुरुषांनाही सहन करतात. --- हे लई आवडलं हो. मनःपूर्वक.

.

एकूणच हा प्रतिसाद वाचून एक शेर आठवला --

लब्जोअलफाज ही काफी नही किसी गझल के लिये
जिगर का खून भी तो चाहिये सही असर के लिये

अनु राव Wed, 08/04/2015 - 11:56

In reply to by गब्बर सिंग

मी हा शेर असा ऐकला होता

गझल मे बंदीश्-ओ-अल्फाज ही नही काफी
जिगर का खून भी चाहीये कुछ असर के लिये.

अवांतर :
भारत सोडुन दुसर्‍या संस्क्रूतीत ( मध्यपूर्व आणि युरोप ) मधे जिगर ला का महत्व?

अनु राव Wed, 08/04/2015 - 12:30

In reply to by नितिन थत्ते

हा शेर भारतातलाच आहे हे नक्की. पण मी वेगळेच विचारले होते. जिगर ( लिव्हर ) ला महत्व हे मध्यपूर्व ( आणि युरोप )आणि त्यानिमित्तानी उर्दू मधे आले आहे.
पण हृदया सारखा धडधड जाणवुन देणारा अवयव सोडुन लिव्हर ला महत्व का यावे असा हा प्रश्न होता.

गवि Wed, 08/04/2015 - 12:40

In reply to by अनु राव

लिव्हर हा सर्वात जास्त काम करणारा, सर्वात जास्त प्रकारची निरनिराळी कामं करणारा आणि मुख्य म्हणजे गपचीप, बिनबोभाट, शांतपणे आणि अगदी शेवटच्या क्षणापर्यंत* कोणताही त्रास न देता काम करणारा, आणि कितीही अब्युस केला तरी शांतता दिली तर पुन्हा सेल्फ रिपेअर करणारा अत्यंत वेगळा अवयव आहे. म्हणून महत्व असावे. हृदयाचा आवाज जाणवतो म्हणून ते सतत काम करतंय असं कळतं. पण त्याला जरासं अ‍ॅब्युस केलं की लगेच हार्ट अ‍ॅटॅक वगैरे करुन नखरे दाखवतं. लिव्हरचा सोशीकपणा नाही. ;)

* बहुतांश टक्के भाग निकामी-नष्ट होईपर्यंत.

मेघना भुस्कुटे Wed, 08/04/2015 - 12:53

In reply to by मिहिर

हो ना. हिंदी सिनेमात तर जिगर या शब्दाचे संदर्भ देताना हीरो सरळसरळ छातीवर हात ठेवताना अनेक वेळा दाखवतात. (देवा! 'उस के लिए जो जिगर चाहिये ना, वो बाजार में नही बिकता. मर्द उसे लेकर पैदा होता है...' असं म्हणत पोटावर हात ठेवणारा 'दामिनी'मधला सनी देओल डोळ्यासमोर येऊन शहारले!) ते कसं काय मग? की तेपण ठार चुकीचं आहे?

अनु राव Wed, 08/04/2015 - 13:32

In reply to by मेघना भुस्कुटे

कसं काय मग? की तेपण ठार चुकीचं आहे?

म्हणुन तर मला प्रश्न पडला आहे.

धाडसी वगैरे माणसाला जिगरबाज ( आणि इंग्लिश मधे गट्सी वगैरे ) म्हणले जाते. पण यकृताचा आणि ह्या धाडसी पणाचा काय संबंध आहे कोणास ठाऊक.

गवि Wed, 08/04/2015 - 13:34

In reply to by मेघना भुस्कुटे

असं म्हणत पोटावर हात ठेवणारा 'दामिनी'मधला सनी देओल डोळ्यासमोर येऊन शहारले

दामिनी सिनेमात तो जितका बेदम पितो ते पाहता त्याचं मर्द जिगर स्पेशल ऑर्डर देऊन बनवलेलंच असलं पाहिजे.

अजो१२३ Wed, 08/04/2015 - 11:52

In reply to by गवि

Just extending the Tinkiy logic a little further, जर तिच्या शरीरात असल्यामुळे बाळ पूर्णपणे नष्ट करण्याचा अधिकार स्त्रीला असणे योग्य तर त्याच्या घरात असल्यामुळे (असल्यास) ती स्त्रीच पूर्णपणे नष्ट करण्याचा अधिकार पुरुषास असावा काय?
---------------------------
गर्भाशय आणि घर माझ्यामते फंक्शनली फार मॅच होतात.

ॲमी Wed, 08/04/2015 - 11:47

In reply to by नितिन थत्ते

स्त्री भ्रूण हत्येचा अधिकार कुटुंबाला नसावा असे म्हटल्यावर >> असे मी कुठे म्हणाले आहे? 'त्या'धाग्यावरदेखील अतिशहाणा, गब्बर, राजेश यांनाच माझा सपोर्ट होता. आणि त्यानंतर मी अनेकदा टोमणे मारलेत त्यातही 'स्त्रि/भृणहत्येला विरोध करणारे सामाजीक भान, नैतिकता असलेले लोकं' असाच उल्लेख केला आहे.

नितिन थत्ते Wed, 08/04/2015 - 11:59

In reply to by ॲमी

तुम्ही नाही हो म्हटले ......

प्रतिसाद तुमच्यासाठी नाही. अशा प्रकारचे आर्ग्युमेंट करणार्‍यांसाठी प्री-एम्प्टिव्ह आहे.

अनुप ढेरे Wed, 08/04/2015 - 12:01

In reply to by नितिन थत्ते

अशा प्रकारचे आर्ग्युमेंट करणार्‍यांसाठी प्री-एम्प्टिव्ह आहे.

थत्तेंशेजारी बांधला गब्बर, वाण नाही पण...

गब्बर सिंग Wed, 08/04/2015 - 12:41

In reply to by अनुप ढेरे

थत्तेंशेजारी बांधला गब्बर, वाण नाही पण...

अधोरेखित शब्दास आक्षेप.

लिबर्टेरियन असा क्लेम करणार्‍यांना उद्देशून तरी "बांधला" हा शब्द नका हो वापरू. (तो क्लेम खरा खोटा देव जाणे....)

गब्बर सिंग Wed, 08/04/2015 - 12:52

In reply to by गवि

"सोडला" मधे सुद्धा कुणीतरी त्याचे स्वातंत्र्य प्रतिबंधीत केलेले होते असा वास येतो. बांधलेला होता तो सोडला वगैरे.

त्यापेक्षा थत्तेंशेजारी "अवतीर्ण" झाला गब्बर असे म्हणणे जास्त संयुक्तिक ठरेल.

गवि Wed, 08/04/2015 - 12:56

In reply to by गब्बर सिंग

त्यापेक्षा थत्तेंशेजारी "अवतीर्ण" झाला गब्बर असे म्हणणे जास्त संयुक्तिक ठरेल.

नको. त्यात अवतीर्ण झाला म्हणजे "प्रकट झाला", अवतार घेतला असे अंधश्रद्धासूचक संकेत भासतात.

थत्तेंशेजारी "बसला" गब्बर.. हे मला वाटतं वास्तवदर्शी असावं.

adam Wed, 08/04/2015 - 14:15

ते आईचा पूर्णत: हक्क असलाच पाहिजे; बाळाला जन्मानंतरही मारुन टाकता आलच पाहिजे; वगैरे बोलणं सुरु दिसतय.
बादवे, त्या मारलेल्या बाळाला(म्हणजे बाळाचे कलेवर/प्रेत) चवीचवीनं खायचा अधिकारही मातेला असायला हवा का ?
आणि फक्त मातेनच खावं इतपत अधिकार असेल का ?
की त्या प्रेताची रीतसर खरेदी-विक्री वगैरे झालेली चालेल ?
" शरीराच्या भागाची पूर्णतः मालकी " हे प्रकरण समजून घ्यायचा प्रयत्न करतोय.

गवि Wed, 08/04/2015 - 14:18

In reply to by adam

आधीच ती मतं वाचून त्रास होतोय. जालीय मतांचा एरवी करुन घ्यायचा नसतो हे माहीत असूनही.

त्यात तू हे असं लिहून आणखी त्रास देऊ नको.

अंतराआनंद Wed, 08/04/2015 - 15:00

In reply to by मेघना भुस्कुटे

गोष्ट मी ही वाचलीय पण ही चर्चा जास्तच त्रासदायक होतेय. (अगदी मी भाग घेत नसले तरी)
बाय द वे, गप्प बस हा प्रतिसाद मनोबाला होता. अजोंना नाही. तो त्यांच्या प्रतिसादापुढे आलाय म्हणून स्पष्ट केलं

adam Wed, 08/04/2015 - 15:39

In reply to by मेघना भुस्कुटे

हा प्रतिसाद माझ्या शंकेला बायपास करणारा वाटला.
बाळाला मारायचा अधिकार हवा, तर मग मेलेल्या/मारलेल्या बाळाला खायचा अधिकार का नको ?
किंबहुना, मारण्यासआठीच, विक्रीसाठीच बाळं जन्माला घालणं का नको ?
मोअर स्पेसिफिकली, पालकांपैकी एखाद्याला त्या बाळाला मारुन टाकून मग खाण्यापेक्षा जिवंतपणीच लचके तोडत तोडत लुसलुशीत मांस खायचं असल्यास हरकत काय आहे ?

मेघना भुस्कुटे Wed, 08/04/2015 - 15:41

In reply to by adam

छे, माझी नाय बा हरकत. चालू द्या. (बादवे, एक आपली शंका - झुरळांना नि उंदरांना मारायचा हक्क हवा. मग त्यांना खायचाही हक्क हवा असेल तुला? हवा असेल, तर घे हो. माझी नाहीय काहीसुद्धा हरकत! खाण्यासाठी उंदीर पाळायलासुद्धा नाहीय.)

बॅटमॅन Wed, 08/04/2015 - 15:43

In reply to by मेघना भुस्कुटे

मूसाहारा नामक मूषकभक्षी जमात आजही भारतात आहे.

आफ्रिकेत बाजारात झुरळे खाण्यासाठी विकलेली एका डिस्कव्हरी प्रोग्रॅममध्ये पाहिलेली आहेत.

सबब, या दोन प्राण्यांना खाण्याचा हक्क इतका अश्रुतपूर्व का वाटावा हे समजलं नाही.

बॅटमॅन Wed, 08/04/2015 - 15:41

In reply to by adam

एका प्रामाणिक शंकेला बायपास करणारांचा निषेध. (जळजळीत?)