इच्छामरण
आत्ताच टीव्हीवर बातमी बघितली की ब्रिटनी मेनार्ड ही १ नोव्हेंबरला इच्छामरण स्वीकारणार आहे. ती २९ वर्षांची आहे आणि तिला असाध्य असा मेंदूचा कॅन्सर झाला आहे.
यावरून पूर्वी बघितलेला फ्रंटलाइनवरील हा कार्यक्रम आठवला. (हा व्हिडिओ काही जणांना त्रासदायक वाटू शकतो, त्यामुळे मनाने खंबीर लोकांनीच बघावा असे मी सुचवीन).
याच विषयाच्या संदर्भात डॉ. अतुल गवांडे यांचे एक पुस्तक (Being Mortal) आजच प्रसिद्ध झाले आहे.
यावरून इच्छामरणाबद्दल चर्चा करायला आवडेल आणि त्याचे फायदे/तोटे वगैरेबद्दल इतरांची मते जाणून घेण्यासाठी हा धागा काढत आहे.
याबद्दल काय मत?
याबद्दल काय मत? www.wikipedia.org/wiki/Child_euthanasia
Bioethicists Alberto Giubilini and Francesca Minerva argue that killing a newborn "should be permissible in all the cases where abortion is, including cases where the newborn is not disabled".
!! अर्धसत्य
याबद्दल काय मत? www.wikipedia.org/wiki/Child_euthanasia
कोर्टाकडे अर्ज करण्याची सोय हवी.
Bioethicists Alberto Giubilini and Francesca Minerva argue that killing a newborn "should be permissible in all the cases where abortion is, including cases where the newborn is not disabled
.
अधोरेखीत भागाचे समर्थन कसे करणार हे लक्षात आले नाही? निरोगी बालकाचा जगण्याचा हक्क हिरावून घेण्याचे प्रयोजन समजत नाही.
कोर्टात जाऊन फक्त पेपरवर्क
कोर्टात जाऊन फक्त पेपरवर्क वाढणार आणि तारीख पे तारीख चालू राहणार...
जगण्याचा हक्क आणि त्या हक्कांचे सरकारकडून संरक्षण कधी चालू व्हावे?
* कंसिव केल्याकेल्या लगेच
* हृद्याचे ठोके चालू झाल्यावर
* जन्मल्यावर
* सायकोलॉजीकली सेन्स बर्यापैकी डेवलप झाल्यावर (हे शब्द टेकनीकली बरोबर आहेत की नाही माहीत नाही. पण मला साधारण वय ५ वर्ष म्हणायचे आहे.)
माझे मत शेवटच्या पर्यायाला आहे.
का?
जगण्याचा हक्क आणि त्या हक्कांचे सरकारकडून संरक्षण कधी चालू व्हावे?
* कंसिव केल्याकेल्या लगेच
* हृद्याचे ठोके चालू झाल्यावर
* जन्मल्यावर
* सायकोलॉजीकली सेन्स बर्यापैकी डेवलप झाल्यावर (हे शब्द टेकनीकली बरोबर आहेत की नाही माहीत नाही. पण मला साधारण वय ५ वर्ष म्हणायचे आहे.)
कधी पेक्षा 'का' हा प्रश्न अधिक महत्त्वाचा वाटतो, निरोगी बालकाला 'का' मारायचे ह्याचे उत्तर काय आहे?
वयमर्यादा
गर्भपात कोणत्या कारणासाठी करायचा असतो ?
त्याच कारणासाठी नवजात बालकास का मारायचे नाही ?
नक्कीच, पण हेच तत्त्व किती वयापर्यंत लागु करायचं? असाही प्रश्न विचारता येईल, गर्भार रहाण्यावर नियंत्रण मिळवणे अवघड असल्याने "होणार्या अपत्याची पुरेशी काळजी न घेता येणे(ज्यामुळे अपत्य दगावू शकते वगैरे)" हे कारण पुरेसे ठरु शकते, पण हा निर्णय न घेता निरोगी बालकाचा जन्म होण्याची वाट बघण्याचे कारण (का?) काय आहे?
काय की बाबा
काय की बाबा.
मी दोन्ही गोष्टी शक्यतो करुच नयेत ह्या मताचा आहे,.
(अगदि आयरिश* लोकांसारखं स्त्रीच्या जीवावरही उठू नये; पण होता होइल तोवर गर्भपातही टाळावेत असे वाटते.
)
.
.
कट्टर्,अतिधार्मिक कॅथॉलिक आयर्लंडमध्ये गर्भपात करुच देत नैत. अगदि मातेचा जीव वाचवण्यासाठी जरी करायचा असेल तरी करु देत नैत.
तितक्या टोकाचं म्हणत नाहिये मी; पण होता होइल तेवढे हे प्रकार टाळावेत. अगदिच नाइलाज झाला (त्या आयरिश केससदृश) तरच विचार केला जावा.
बरोब्बर
इथे नैसर्गिक मर्यादा येते. म्हणूनच मी काही कट्टर विरोध वगैरे म्हणालेलो नाही.
होता होइल तेवढं लोकांना समजवत रहावं. त्यांना पकाउगिरी वाटलं तरी चालेल.
आपण आपला धीर धरुन शांतपणे सांगत राहायचं. विनवत रहायचं.
बाकी गर्भधारणा टाळण्यासाठी साधनं उपलब्ध आहेतच; ती वापरत राहावीत. त्यास ना नाहीच.
आता विचारा --
असं का करायचं?
"का करायचं" ह्याचं तुम्हाला पटेलसं उत्तर माझ्याकडे नाही.
जालीय चर्चांचा मला तरी फायदा
जालीय चर्चांचा मला तरी फायदा होतोच (म्हणून तर मी त्या करतो)
स्वतःच्या मताला जोखता येते, योग्य वाटल्यास बदलताही येते.
याविषयात आधी माझे मत अगदीच वेडेवाकडे/ओबडधोबड होते. माझ्या या बाबतीतील मताला एक तर्कशुद्ध दिशा देण्याचे तसेच त्यातील आधीचे तार्किक दोष काढण्याचे काम "धनंजय" यांच्यासोबत झालेल्या ऐसी-बाह्य परंतू जालीय चर्चेमुळेच झाले
(यानिमित्ताने आता त्याचेही आभार मानतो)
आईचेच अंग/उपांग समजावे
आईच्या इच्छेला अंतीमेच्छा मानावे.
ह्याला च्यालेंज केलेलं नाहिये.
आईचेच अंग/उपांग समजावे
काही सीमारेषा धूसर/पुसट असतात. तिथे हे स्वतंत्र आणि ते परावलंबी हे इतकं स्वच्छ नसतं.
डेफिनिशन्स बायनरी नसतात. त्या पुसट धूसर सीमारेषांवर मानवी करुणेचा आधार असावा अशी इच्छा आहे.
अर्थात आईच्या इच्छेला अंतीमेच्छा मानावे हे पूर्ण मान्य.
मानवी करूणा, नैतिकता, सामाजिक
मानवी करूणा, नैतिकता, सामाजिक जाण वगैरे वगैरे बोलणार्यासाठी www.aisiakshare.com/node/3316#comment-77655 हे उत्तर आधीच दिलेले आहे.
कधी पेक्षा 'का' हा प्रश्न
कधी पेक्षा 'का' हा प्रश्न अधिक महत्त्वाचा वाटतो, निरोगी बालकाला 'का' मारायचे ह्याचे उत्तर काय आहे?
मुळ जन्मदात्या जोडप्याला त्याला पोसायची इच्छा नसणे / कुवत नसणे हे कारण असावे.
निरोगी अर्भक पोटात ६-७ महिन्याचे असल्यापासून (आईच्या शारीर सपोर्ट शिवाय जगण्याची - जिवंत राहु शकण्याची - शक्यता निर्माण झाल्यापासून) ते ते वृद्ध होईपर्यंत कधीही एखाद्याला त्याच्या इच्छेशिवाय मारणे हा 'कल्पेबल होमिसाईड' ठरवला जावा असे माझे मत आहे.
या विषयावर अजून माझं ठाम मत
या विषयावर अजून माझं ठाम मत असं काही नाही.
काही कारणामुळे (आईला जीवघेणा आजार झाला आहे, किंवा आईला मूल नकोय इ. इ.) पोटात ६-७ महिन्याचं असणारं निरोगी अर्भक आईला मुलाची काळजी घेणं शक्य नाही. अशा वेळेस त्या मुलाची काळजी घेण्यासाठी, त्याला/तिला जिवंत ठेवण्यासाठी होणारा खर्च करण्याची मुलाच्या वडलांची पत नाही (किंवा बाप परागंदा, जिवंत नाही, इ.) तेव्हासुद्धा काय करावं? आश्रित, निराधाराचं, फार चांगलं नसणारं आयुष्य जगण्यापेक्षा माझ्या मुलाने मरावं असं आई किंवा बापाला वाटलं तर त्याला कितपत वाईट गुन्हा समजावं?
कोणाचंही आयुष्य त्यांच्या इच्छेशिवाय संपवू नये हे मान्य, पण ६-७ महिन्यांच्या गर्भाला, किंवा ६-७ महिन्यांच्या बाळालाही 'मी'ची इतपत जाणीव असते का?
---
अवांतर - स्त्रियांनी घेण्याची गर्भनिरोधक गोळी आल्यावर स्त्रीवाद्यांनी त्याचं मर्यादित स्वागत केलं होतं. या गोळीमुळे गर्भनियंत्रण, पर्यायाने संभोगातून उत्पन्न होणाऱ्या मुलांची जबाबदारी फक्त स्त्रीवर पडू नये, असा विचार त्यामागे होता. याचा सरळ, थेट संबंध लावता येईल असं नाही पण प्रगत देशांमध्ये गरीब घरांमध्ये, एकल पालक म्हणून दिसणारे लोक बहुतांश स्त्रिया असतात. आणि त्याचा परिणाम त्यांच्या मुलांच्या पालनपोषण, शिक्षण यांच्यावरही होतो.
किंवा ६-७ महिन्यांच्या
किंवा ६-७ महिन्यांच्या बाळालाही 'मी'ची इतपत जाणीव असते का?
इतका निराशावाद का? येणारं बाळ त्याचं नशीब घेऊन येतं. जगू द्या की त्याला. तुम्ही ईश्वर आहात का जन्मलेल्याचा जीव घायला? कशाला ईश्वराचा रोल मिळवण्याचा हट्ट?
_______
माफ करा गोड किंवा प्रेझेंटेबलही बोलता येत नाही. तेवढी वक्तृत्वपटुता नाही. जे मानात येतं ते मांडते. कोणाला दुखावायचा हेतू अजिबात नाही. शिकते आहे.
(माफी मागायची काही गरज नाही.
(माफी मागायची काही गरज नाही. मी पण विचारच करते आहे.)
जीवशास्त्रानुसार एखाद्या जीवाला व्यक्ती कधी म्हणावं, व्यक्ती असण्याची, 'मी'पणाची जाणीव कधी वाटते असा मला पडलेला प्रश्न आहे. याच्या उत्तरानुसारच गर्भपात, बालहत्या यांचे निर्णय करावेत का नाहीत, याबद्दलही माझं काहीही मत (अजूनतरी) नाही. येणारं बाळ नशीब वगैरे घेऊन येत असेल, पण जन्मजात हृदयाला भोक पडलेल्या वगैरे बाळांची नशीबं डॉक्टर आणि वैद्यकीय ज्ञान बदलतात. डॉक्टर, वैद्यकीय ज्ञान हे सुद्धा बाळाच्या नशीबाचा भाग समजायचे तर बाळाचा जीव नको असणारे आई आणि/किंवा वडील हे सुद्धा नशीबाचा भाग का मानायचे नाहीत?
या विषयावरील या पुर्वीची
या विषयावरील या पुर्वीची उपक्रमावरील चर्चा आपल्याला वाचता येईल
http://www.mr.upakram.org/node/1386
http://www.mr.upakram.org/node/2168
http://www.mr.upakram.org/node/2491
http://www.mr.upakram.org/node/2506
http://www.mr.upakram.org/node/2074
समांतर/अवांतर
जरा पटकन सहज लक्षात येणार्या मृत्यूच्या प्रकाराची ढोबळ यादी करावी म्हटले:
मृत्यूचे प्रकार
१. अनप्लान्ड मृत्यू
१.१ शारीक व्याधींनी मृत्यू
१.१अ. हार्ट अॅटॅक वगैरेमुळे त्वरीत आलेला मृत्यू
१.१ब. कॅन्सर्स सारख्या उशीरा कळणार्या व्याधींनी बराच त्रास होऊन आलेला मृत्यू
१.२ अपघाती मृत्यू
१.२अ. शारीर धक्क्यामुळे/इजेमुळे/तत्कालिन घटनेत अपघाताने झालेला मृत्यू
१.२ब. नैसर्गिक आपत्तीत झालेला मृत्यू
१.२क. मानसिक आजारांमुळे स्वतःला करून घेतलेल्या हानीतून झालेला मृत्यू
१.२ड. घातक परिस्थितीत काम केल्याने येणारे मृत्यू (जसे खाणीत अडकणे, सीमेवरील सैनिक, फॅक्टरीत स्फोट, सिलेंडरचा स्फोट वगैरे)
२. प्लान्ड मृत्यू
२.१ स्वेच्छामरण
२.१अ. समाधी
२.१ब. प्रायोपवेशन
२.१क. आत्महत्या/हाराकिरी वगैरे
२.१ड. युथनेशिया (मराठी?)
२.२ दयामरण
२.३ समोरच्याची इच्छा नसताना दुसर्याने जीव घेणे
२.३अ. खून/हत्या
२.३ब. वध
२.३क. फाशी
२.३ड. गर्भपात
अजुन काही आठवताहेत?
दया
इच्छामरण
दुरुस्ती :-
इच्छामरण की स्वेच्छामरण ?(कुणाच्या इच्छेने कुणाला मरण?)
.
.
जालावर व जगभर अतिचर्चिला गेलेला विषय.
.
.
मूळ धाग्याबद्दल संभाव्य मुद्दे/keywords/बुलेट पॉइण्ट्स :-
१.बाकी व्यक्तीस्वातंत्र्य, जीवितावर हक्क तसाच मृत्यूवरही हे ही नेहमीचेच मुद्दे.
२.दयामरण हा ही थोडाफार ह्याच्यसारखाच चर्चेचा विषय.
.
.
३.प्रायोपवेशन वगैरे पारंपरिक मान्यता/पद्धती.
४.सामाजिक गरज वगैरे.
५.वैयक्तिक प्राधान्य/हक्क वगैरेही
६.स्वतःच्या खुनाची सुपारी देणे वगैरे.
७.मरण्यासाठी वैद्यकिय मदत.
८.मानाने मरण्याचा अधिकार
९.मूळ मानवी मनाची कार्ये व प्रेरणा
१०.सध्या उपलब्ध नसलेले पण नंतर एखादे आजारावरचे उपचार उपलब्ध क्झाले तर काय करणार.
मृत्यू ही irreversible गोष्ट असणे.
.
बाकी एकूणात मौन.