ही धागामालिका आपल्या मनात येणारे, नेहमी नेहमी डोकावणारे विचार व प्रश्न मांडण्यासाठी आहे. कधी कधी आशय फार मोठा नसतो. फार खोल विचार केलेला नसतो. तो विचार/ कल्पना/ प्रश्न/ गंमत डोक्यात येते, जाते. कधी कधी आपण विसरतो, कधी कधी ती ती पुन्हा पुन्हा येत असल्याने आपण विसरू शकत नाही.
यापूर्वीच्या धाग्यावरचे प्रतिसाद १००च्या वर गेले आहेत म्हणून हा पुढचा धागा.
===========================================================================================================
वेलकम याच्या विरुद्धार्थी शब्द काय असावा?
अनवेलकम हा शब्द नाही. वेलकम म्हणजे 'येणार्याचं स्वागत' तसं अनवेलकम म्हणजे 'येणार्याचं स्वागत नाही-यायला नकोय' असा अर्थ आहे. मला 'जाणार्याचं स्वागत' अशा अर्थी शब्द हवाय. अनुराग कश्यप जातो म्हणतोय 'तो जातोय ते चांगलंय' अशा अर्थी शब्द काय?