ब्रेड अँड बटर - भाग ६ 'आयरिश सोडा ब्रेड'

Irish Bread-1
आयरिश खाद्यसंस्कृतीबद्दल एक वाक्य ऐकले होते, " जोपर्यंत आयरिश पदार्थ पेल्यातून येतो तोपर्यंत त्याच्या उत्तम चवीबद्दल निर्धास्त राहावे". अर्थातच 'गिनीस' आणि 'बेलीजच्या' या प्रांतात खाद्यसंस्कृतीपेक्षा पेय-संस्कृतीच अधिक विकसित आहे पण जी काही आहे ती खाद्यसंस्कृती इथल्या रांगडेपणाला शोभेशी आहे. मुळातच गरीबीचा इतिहास असल्याने इथल्या पाककृती, साधेसोपे स्थानिक जिन्नस एकत्र करून ते साधेपणाने शिजविण्यावर बेतलेल्या आहेत आणि या साधेपणातच त्यांचे वैशिष्ट दडलेले आहे. शेतावरच भाजलेल्या ताज्या भाकरीबरोबर थोडी चटणी आणि तिथलेच भाजलेले वांगे खाण्यातही स्वर्गीय सुख असते, तसेच सुख मला आयरिश स्ट्यू आणि ताजा सोडा ब्रेड खाताना मिळते. हा ब्रेड आयर्लंडमधल्या पहिल्या सुटीवर असताना पहिल्यांदा खाल्ला होता; जिथेजिथे राहिलो तिथे सकाळी-सकाळी बनविलेला ताजा सोडा ब्रेड न्याहारीला मिळायचा, एके ठिकाणी तिथल्या मालकीणबाईंकडून त्याची पाककृतीही मिळाली. त्यानंतर जेंव्हा जेंव्हा हा ब्रेड बनविला तेंव्हा त्या प्रेमळ बाईंची आठवण काढत या साधेपणातल्या परिपूर्ण पाककृतीला दाद दिली गेली.
कणिक मळायचा, पीठ फुगण्याची वाट पहाण्याचा कंटाळा असेल आणि तरीही घरी बनवलेला ताजा ब्रेड खायची इच्छा असेल तर ही पाककृती तुमच्यासाठी!

होलव्हीट फ्लार ४५० ग्रॅम
रोल्ड ओट्स(पॉरीजसाठी वापरतो ते) ५० ग्रॅम
मीठ १ टीस्पून
खायचा सोडा १ टीस्पून
ट्रिकल्/मोलॅसिस्/काकवी १ टेबलस्पून
मध १ टेबलस्पून
दाट ताक ४५० मिली
चमचाभर लोणी (वरून घालण्यासाठी)

१. मी घरी दळलेले संपूर्ण गव्हाचे पीठ वापरले होते. बाजारात मिळणारे संपूर्ण गव्हाचे पीठ वापरल्यास ४०० ग्रॅम होलव्हीट+३ टेबल्स्पून व्हीट जर्म+१टेबलस्पून व्हीट ब्रान असे मिळून एकत्रित ४५० ग्रॅम भरेल इतके मिश्रण वापरल्यास ब्रेड अधिक चविष्ट आणि प्रकृतीस अधिक लाभदायक बनेल.
मी कणिक वापरून हा ब्रेड बनविलेला नाही पण थोडी कणिक, मैदा, गव्हाचा कोंडा वगैरे एकत्र करून प्रयत्न करून पहायला हरकत नाही.
२. मोलॅसिस अथवा काकवी वगैरे उपलब्ध नसल्यास त्याऐवजी अजून एक टेबल्स्पून मध वापरावा.
३. ताक आणि बटरमिल्क यांच्या घनतेत बराच फरक असतो, बटरमिल्क बरेच घट्ट असल्याने साधारण निम्मे दही घेऊन त्यात तेवढेच पाणी मिसळल्यास हव्या त्या घनतेचे ताक बनते. लोणी काढून उरलेले ताक वापरू नये कारण त्याचा स्निग्धांश बराच कमी होतो.

Irish Bread-2
Irish Bread-3
Irish Bread-4

प्रथम ओव्हन २०० डीग्री सेल्सियसला तापवून घ्यावा.
ताक, मोलॅसिस व मध एकत्र मिसळून घ्यावेत.
पीठात ओट्स, मीठ व सोडा घालून एकत्र मिसळावे.
पीठात हळूहळू ताकाचे मिश्रण ओतत त्याचा गोळा करून घ्यावा, साधारण चिकट मऊसर हाताने थापता येईल असा गोळा झाला पाहिजे.
एका ताटलीत बेकिंग शीट टाकून त्यावर पीठाचा गोळा थापावा आणि वरून थोडे ओट्स भुरभुरावे.
लगेच गरम ओव्हनच्या मधल्या फळीवर टाकून ४०-५० मिनिटे भाजावा.
वरून टिचकी मारल्यास आतून पोकळ असल्यासारखा आवाज आला की भाजून झाला असे समजावे.
हा ब्रेड फार टिकत नाही आणि शिळा झाल्यावर चांगलाही लागत नाही त्यामुळे गरम असतानाच त्यावर लोणी टाकून खा आणि संपवून टाका.

Irish Bread-5

field_vote: 
5
Your rating: None Average: 5 (2 votes)

प्रतिक्रिया

मस्त! _/\_
शेवटच्या फोटोत ब्रेडसोबत आयरिश स्ट्यु आहे का?

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

तो पारंपारीक आयरीश स्ट्यू आहे, मटन वापरून केलेला. हिवाळ्यात, ओव्हनमध्ये दोन तास सावकाशपणे शिजवलेला हा रस्सा मस्त वाटतो.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

लगोलग त्याचीही पाककृती येऊ द्यात !

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

+१

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

पाकृ आवडली.

>>> पण जी काही आहे ती खाद्यसंस्कृती इथल्या रांगडेपणाला शोभेशी आहे. मुळातच गरीबीचा इतिहास असल्याने इथल्या पाककृती, साधेसोपे स्थानिक जिन्नस एकत्र करून ते साधेपणाने शिजविण्यावर बेतलेल्या आहेत आणि या साधेपणातच त्यांचे वैशिष्ट दडलेले आहे.
--- नेमकं. अमेरिकेच्या दक्षिण भागातल्या 'सोल फूड'लाही हे वर्णन लागू पडावे बहुधा.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

पाककृतीसाठी धन्यवाद.
'जोपर्यंत आयरिश पदार्थ पेल्यातून येतो तोपर्यंत त्याच्या उत्तम चवीबद्दल निर्धास्त राहावे', हे वाक्य मस्तच आहे !

हा पाव बनवायला जमेल असे वाटत आहे. दिलेल्या प्रमाणात हा आकाराने साधारण किती मोठा होतो ? (शिळा चांगला लागत नाही असे तुम्ही म्हटल्याने, एका वेळी किती माणसांना पुरेल याचा अंदाज घेत आहे.)

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

मी वर लिहायचे राहून गेले की फोटोत दाखविलेला पाव अर्ध्या प्रमाणाचा केला आहे, तो साधारण आठ इंच व्यासाच्या आकाराचा झाला. एवढा पाव दोघा जणांत सहज संपू शकेल.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

दिसायला ब्रान ब्रेड सारखाच आहे. ओट्सची फार आवड नसल्याने चवी बद्दल जरा साशंक आहे, तरी एकदा करून बघायचा इचार हाये!

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

- ऋ
-------
लव्ह अ‍ॅड लेट लव्ह!

ओट्समुळे कमी घनतेचे (=वाईट) कोलेस्टेरॉल कमी व्हायला मदत होते. घरी कोणाला कोलेस्टेरॉल असेल किंवा ही वंशपरंपरागत इस्टेट येण्याची भीती असेल तर ओट्स वेळेत आवडून घे. Wink

आमच्याकडे उन्हाळा सुरू व्हायच्या आत ही पाककृती आली हे बरं. एकदा उन्हाळा सुरू झाला की भट्टी लावणं जीवावर येतं.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

---

सांगोवांगीच्या गोष्टी म्हणजे विदा नव्हे.

हे असले धागे टाकण्याची खरे तर बंदी केली पाहिजे. जळवतात मेले :/

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

माहिष्मती साम्राज्यं अस्माकं अजेयं

इथिओपियन जेवणातला 'इंजेरा' हा जाळीदार आंबोळ्यांसारखा ब्रेड बहुधा हाटिलात मिळतो, त्यामुळे काहींना परिचित असेल. पण मायबोलीवर Ambasha नावाच्या इथिओपियन ब्रेडची रेसिपी प्रथमच पाहिली. त्या निमित्ताने या मालिकेचे अंमळ उत्खनन.

Ambasha from Ethiopia , इथिओपियाचा मसालेदार पाव - http://www.maayboli.com/node/53865

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

आईग्गं, कसली आठवण काढलीस!!
आता पुढील भेटीत पुन्हा त्या हॉटेलाला भेट देणे आले!!!
Smile

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

स्ट्यु छान दिसतो आहे. ब्रेडचा फोटोही आवडला.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

छान आहे. वेगवेगळे ब्रेड पाहून बरीच माहिती मिलते आहे.

सोड्याप्रमाणेच सोडे घालून ब्रेड बनवत नाहीत का ? असा उग्गीचच अवांतर विचार मनात आला Wink

मासा आणि ब्रेड यांचे एकत्रीकरण कधी ऐकले नाहीये अजूनतरी.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

ही पाककृती वर आल्यामुळे आणि फलटणची खमंग काकवी घरात असल्यामुळे आज पुन्हा एकदा सोडा ब्रेड केला. पटकन होतो म्हणून सकाळी कामावर निघतानाही करता येतो म्हणून मला हा आवडतो. मी त्यात भरड दळलेलं गव्हाचं पीठ वापरतो. साध्या कणकेपेक्षा त्याचा खरबरीत पोत ह्या ब्रेडला अधिक चांगला पडतो. जवळच्या मिठाईवाल्याकडे मिळणारं भरपूर सायीचं दही थोडं पाणी घालून त्यात वापरलं. त्यामुळे पीठ खूप चिकट आणि मऊ होतं. मग पीठ अजिबात न मळता आणि अजिबात न थापता त्याचा ओबडधोबड खरबरीत पोताचा ब्रेड भाजला. उन्हाळ्यात गरम स्ट्यू नकोसा वाटतो, पण काकवीमुळे येणारा किंचित गोडवा आणि विरोधासाठी त्यावर थोडं ब्ल्यू किंवा तत्सम शार्प चीज लावून खायलाही मला हा ब्रेड आवडतो. एका मैत्रिणीकडून मिळालेलं स्टिल्टन चीज सध्या घरात आहे. संध्याकाळच्या जेवणात एक सॅलड करून त्यासोबत सोडा ब्रेड आणि स्टिल्टन खायचा मनसुबा आहे.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

- चिंतातुर जंतू Worried
"ही जीवांची इतकी गरदी जगात आहे का रास्त |
भरती मूर्खांचीच होत ना?" "एक तूच होसी ज्यास्त" ||

तुमच्या रस्टिक ब्रेडचेही फोटो टाका की! सोडा ब्रेडबरोबर चीज खाल्लं नाही कधी पण आयडिया चांगली आहे.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

लोकाग्रहास्तव एक स्ट्यूसुद्धा करावा लागला आणि त्यामुळे काल रात्री ब्रेड संपूनही गेला!

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

- चिंतातुर जंतू Worried
"ही जीवांची इतकी गरदी जगात आहे का रास्त |
भरती मूर्खांचीच होत ना?" "एक तूच होसी ज्यास्त" ||

POIDH अशी म्हण आहे...

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

जंतू फोटो द्यायला कायम इतके का लाजतात?

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

ये दिल मांगे फोटो.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

---

सांगोवांगीच्या गोष्टी म्हणजे विदा नव्हे.

योगायोगाने, ही म्हण पाककृतींप्रमाणेच अमेरिकन न्यायव्यवस्थेलाही लागू पडते, असे जाणवू लागले आहे.

(अर्थात, चित्रे असूनही काही फायदा होईलच, याचीही शाश्वती नाहीच म्हणा.)

..............................................................................................................

The best justice system that money can buy.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

जागा चुकीची असेल तर संपादकांनी कृपया योग्य जागी हलवावे.
***

भारतात - मुंबईत - सकाळी पाववाले पाव घेऊन फिरतात. त्यांच्याकडे एक कडक पाव नामक पावविशेष मिळतो. बाहेरचं कवच कडक-कुरकुरीत, मधला भाग काहीसा चामट-चिवट, आतला गाभ्याचा भाग मऊ - असा तो पाव असतो. मला तो नुसता / मस्क्यासह / चिवट होण्याआधी वा नंतरही चावून खायला अतिशय आवडतो. त्याची पाककृती कुणाकडून मिळेल का?

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

-मेघना भुस्कुटे
***********
तुन्द हैं शोले, सुर्ख है आहन

ह्या पावाला 'ब्रुनो' म्हणतात का?

सॉरी फार अती-अवांतर पणः
ब्रुनो बद्दल मला कमालीची उत्सुकता आहे, त्याबद्दल अधिक जाणून घ्यायला आवडेल (मेघनाने धागा वर काढलाच आहे तर वाहत्या गंगेत मी ही हात धुवून घ्यावे म्हणतो Wink )
बर्‍याचदा संध्याकाळी मी बेकरीत गेलो की तिथे किमान एक-दोन जण ब्रूनो घ्यायला येणारे असतातच. बेकरीत इतर बाकी काहीही न पहाता २-३ नग ब्रुनो ची ऑर्डर देऊन मिळालेला ब्रुनो लगेच पिशवीत घालून चालते होतात. काही लोक रोज ब्रुनो घेत असल्याचं आढळलं अगदी ऑफिसहून घरी येतानाचं हे नित्याचं काम असल्यासारखं किंवा रोजच्या जेवणातला अविभाज्य घटक असल्यासारखे खात असावे. हे ब्रुनो कशाशी खातात? असा पावाचा प्रकार लोक रोज खातात? काही विशिष्ट समूहातले लोक ब्रुनो खातात का (मुस्लीम, पारशी, बोहरी ई.)?

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

समजा लुसलुशीत बनपाव कडक उन्हात वाळवत ठेवला की यथावकाश त्याचा बटरसदृश फेकून मारण्याचा गोटा होईल की नाही?

याच्या बरोब्बर मधली स्टेज (दोनेक दिवस वाळवल्यावरची) ही ब्रूनसारखी होईल साधारणत:

खरखर आवाज करत चिरून आत बटर लावून चहात बुडवून खाण्यासारखी कन्सिस्टन्सी असलेला हा पाव अनेकांना आवडतो.

त्यापेक्षा ताजा फ्रेंच बगेत / बागेत हा अगदी अश्याच प्रॉपर्टीज असलेला (बाहेरुन किंचित कडक-कुरकुरीत मधे किंचित चिवट पण गाभ्यात टेस्टी लुसलुशीत) असतो. पण चवीला फारच जास्त चांगला लागतो.

सामान्य इराणी हॉटेलातही बनमस्का ऐवजी ब्रूनमस्का मागितला तर हा सहज मिळतो. ओव्हरहाईप्ड आहे .. क्रेझ आहे.. असं व्यक्तिगत मत.

१. हे ब्रूनचं वर्णन आहे, ब्रून बनवण्याची कृती नव्हे / नसावी.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

धन्यवाद गवि. आणि खरा उच्चार 'ब्रून' असा आहे तर, मी ब्रूनो असा ऐकत आलो आहे किंवा मी चुकीचं ऐकत असेन.
चहा बरोबर रोज ब्रून खातात लोक हे पाहून/ऐकून आश्चर्य वाटले (म्हणजे मला जे लोक बेकरीत नियमितपणे हा ब्रेड घेताना दिसतात त्यांच्याबद्दल आश्चर्य).

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

ओव्हरहाईप्ड आहे .. क्रेझ आहे

सहमत. एका काकाजींच्या "अरे, शात्तर साली आम्ही फर्ग्युसनमध्ये होतो, तेव्हा लकीमध्ये..." टैप ष्टोर्‍या ऐकून एकदा ब्रून मागवला आणि दातच बाहेर यायची वेळ आली.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

********
It is better to have questions which don't have answers, than having answers which cannot be questioned.

सध्यातरी ह्या दोन अंतरजालावरच्या रेशिपी मिळाल्या आहेत (ब्रून बद्दल अधिक माहिती शोधताना) :
http://www.tarladalal.com/glossary-brun-bread-1023i
http://annaparabrahma.blogspot.in/2008/06/brun-broon-or-kadak-pao.html

अर्थात रुची ह्यांनी जर ब्रून बनवून त्याची तपशिलवार पाकृ इथे दिली तर मजा येईल. तसेही त्यांच्याकडून बरेच दिवसात ऐसीवर ब्रेड ची नवीन कुठली पाकृ आली नाहीये Smile

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

वा! धन्स. पण रुचीच्या पाकृची प्रतीक्षा आहे हे सांगायला नकोच.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

-मेघना भुस्कुटे
***********
तुन्द हैं शोले, सुर्ख है आहन

सहमत

सहमत म्हणतना पुन्हा ब्रेड पाकृ लिहिण्यासाठी रुचीला (रिंगणाबाहेरून) रुऽऽऽचीऽऽऽ! रुची!! (तीनदा टाळ्या) रुऽऽऽचीऽऽऽ! रुची!! (तीनदा टाळ्या) असे ओरडून प्रोत्साहन देतोय! Wink

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

- ऋ
-------
लव्ह अ‍ॅड लेट लव्ह!

ब्रूनपाव कधी खाल्ला नाही त्यामुळे याबद्दल फार जाणकार नाही हे आधीच नमूद करते पण जालावरच्या मतांनुसार हा पाव 'स्टीमबेक' केल्याने बाहेरून कडक बनतो असे दिसते. असे असेल तर पाकृ. काय असावी याची कल्पना सहज करता येते. मी इथे दिलेल्या पावभाजीच्या पावाची कृती वापरून पहायला हरकत नाही पण भाजताना तो थोड्या कमी तापमानावर (१८० अंश से./३५० अंश फॅ.) पन अधिक वेळ ३० मिनिटे (किंवा हवा तसा बाहेरून कुरकुरीत होण्याइतका वेळ) भाजावा पण हा भाजताना ओव्हनच्या खालच्या कप्प्यात एका ट्रेमधे बरेच बर्फाचे खडे टाकावेत. ब्रेड भाजला जाताना खालून येणार्या वाफेमुळे तो कुरकुरीत होईल.
यशाची पूर्ण हमी नाही त्यामुळे आधी ७५% पीठाचे पाव पावभाजीच्या पावासारखे लुसलुशीत भाजून घेऊन उरलेले पाव, भट्टीचे तापमान थोडे कमी करून, अधिक वेळ वर दिल्याप्रमाणे जर स्टीम बेक करून पहायला हरकत नाही. थोडे प्रयत्न केले तर हवा तसा खरपूसपणा आणता येईल, मूळ पाकृ.त बदल करण्याची आवश्यकता भासणार नाही. मी पुढच्या वेळेस पाव बनवेन तेंव्हा करून पाहीन.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

लवकर प्रयोग करून लिही. (हल्ली मेघना वगैरे लोकं पाककृती लिहायला लागल्यापासून मला धडकीच भरल्ये.)

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

---

सांगोवांगीच्या गोष्टी म्हणजे विदा नव्हे.

Biggrin

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

-मेघना भुस्कुटे
***********
तुन्द हैं शोले, सुर्ख है आहन

अरे ही तर "कुक्स कंट्री/अमेरिकाज टेस्ट किचन" वाल्यांची/(सारखी) रेसिपी दिसतेय.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0