जर्मनविंग्ज 4U 9525.. लॉक्ड इन ?!

जर्मनविंग्ज फ्लाईट नंबर फोर-यू-नाईनर फाय टू फाय या उड्डाणाच्या आल्प्समधे झालेल्या क्रॅशला फॉलो करण्यासाठी ही जागा आहे. अपडेट्स वेगाने येताहेत. काही ऑब्सोलीट होताहेत आणि काही वेगळ्याच दिशेला नेताहेत. संकलनाचा हेतू आहे.

लुफ्तांझा कंपनीची चाईल्ड कंपनी असलेली जर्मनविंग्ज १९९७ मधे सुरु झाली होती. आजरोजी कंपनीकडे जवळजवळ ऐंशी विमानं आहेत. त्यापैकी निम्मी एअरबस ए ३१९-१०० सीरीजची आहेत. उर्वरितांमधे निम्मी एअरबस ३२०-२०० सीरीज आणि निम्मी बंबार्डियर जातीची विमानं आहेत.

अपघातग्रस्त विमानाची जात: एअरबस ३२०-२११. रजिस्ट्रेशन नंबर D- A I P X (डेल्टा - अल्फा इंडिया पापा एक्सरे)

क्षमता: १७४-१७५ लोक

इंजिन टाईप: टर्बोफॅन

विमानाचं वयः चोवीस वर्षे पूर्ण, साडेअठ्ठावन्नहजार तास उड्डाण.

मार्गः बार्सेलोना ते डुसलडॉर्फ

टाईमलाईनः

तारीखः २४ मार्च २०१५

टेकऑफची ठरलेली वेळ: स्थानिक वेळेनुसार सकाळी नऊ पस्तीस. (दुपारी दोन वाजून पाच मिनिटे भारतीय वेळेप्रमाणे)
प्रत्यक्ष टेकऑफः सकाळी दहा वाजून एक मिनिट (अर्धा तास उशिराने)

ठरवून दिलेली उंची: फ्लाईट लेव्हल ३८० (अडतीस हजार फूट)

क्रूझिंग स्पीडः आठशे किलोमीटर्स पर अवर (०.६५ माक, आवाजाच्या वेगाच्या ०.६५ पट)

विमान दहा वाजून एक मिनिटाने स्पेनमधल्या बार्सेलोना एअरपोर्टच्या रनवे ०७ वरुन(सत्तर डिग्री= उत्तरपूर्व दिशेत तोंड असलेल्या) उडलं.

दहा वाजून सत्तावीस मिनिटांनी त्याने आपली ठरलेली क्रूझिंग फ्लाईट लेव्हल ३८० गाठली. त्याचा वेग ८०० किलोमीटर प्रतितास होता.

दहा वाजून तीस मिनिटांनी शेवटचा प्रतिसाद विमानाच्या रेडिओवरुन आला. तो नॉर्मल होता. त्याचवेळी विमानाचा वेग वाढायला लागला आणि साडेनऊशे किलोमीटर प्रतितास झाला.

दहा वाजून एकतीस मिनिटांनी विमानाने फ्रेंच बॉर्डर ओलांडली आणि लगेचच आपली क्रूझ लेव्हल सोडून झपाझप खाली उतरायला सुरुवात केली. सेकंडरी रडारयंत्रणा उपलब्ध असल्याने जमिनीवरच्या कंट्रोल सेंटरला विमानाचा वेग, उंची, खाली येण्याचा रेट हे सर्व आकडेरुपात दिसत होतं.

विमान सरळ रेषेत झपाट्याने खाली उतरत होतं. ३५०० (पस्तीसशे) फूट प्रतिमिनिट असा हा खाली येण्याचा धडकी भरवणारा रेट होता. अर्थात हा फ्री फॉल नव्हता हे नोंद घेण्यासारखं आहे. हा अतिशय फास्ट पण कंट्रोल्ड उतरणीचा प्रकार होता. हे पाहून एअर ट्रॅफिक कंट्रोलने भयग्रस्त होऊन पुन्हापुन्हा रेडिओवर या विमानाला पुकारायला सुरुवात केली. विमानाकडून काहीही उत्तर आलं नाही. प्रत्यक्ष किंवा अप्रत्यक्ष पद्धतीने कोणताही डिस्ट्रेस सिग्नल किंवा प्रत्युत्तर आलंच नाही.

हेलिओस सारखा प्रकार असेल असं समजून फ्रेंच एअरफोर्सचं फायटर जेट लगेच उडवण्यात आलं. या विमानाच्या शेजारी उडून थेट नजरेने काही दिसतंय का ते पाहण्यासाठी. पण ते पोहोचण्याआधीच जर्मनविंग्ज ९५२५ जमिनीपर्यंत पोहोचलं होतं. आल्प्स पर्वतांमधे पाच हजार फूट उंचीवर ते जमिनीवर कोसळलं.

सर्व दीडशे लोक ठार झाले. विमानाचा चुरा झाला. सर्वात मोठा तुकडा छोट्या कारइतक्या आकाराचा आहे असं सांगण्यात आलं. कॉकपिट व्हॉईस रेकॉर्डर सापडला आहे आणि काही आवाज नोंदवले गेले आहेत. रडारनोंदी आहेतच.

यामधे खालील काही नोंदी अत्यंत महत्वाच्या आहेत. त्या बदलत राहतील. पण सध्यातरी वेगवेगळ्या शक्यता दिसतात.

१. विमानाचा डाईव्ह करण्याचा वेग नियंत्रित होता. विमानाचे इंजिन सुखरुप राहील इतकीच या वेगाची रेंज होती. आपणहोऊन कोसळणारं विमान गुरुत्वाकर्षणाने एखाद्या दगडासारखं खाली येतं आणि त्याचा वेग इतका जास्त असतो की ते हवेतच डिसइंटिग्रेट होतं.

२. विमानाचा खाली येण्याचा रेट (डिसेंट रेट) कोसळण्यापूर्वी शेवटच्या क्षणांत कमी झाला.

३. कॉकपिटमधल्या रेकॉर्ड झालेल्या आवाजांवरुन उड्डाणानंतर पायलट आणि कोपायलटमधे अत्यंत सरळ आणि साधं संभाषण चाललेलं होतं. त्यानंतर ऐकू येणार्‍या ऑडिओनुसार एक पायलट कॉकपिट सोडून बाहेर (बहुधा बाथरुममधे) गेला. तो परत आला तेव्हा कॉकपिटचं दार आतून बंद आणि लॉक झालेलं होतं.

४. बाहेर गेलेला पायलट बाहेरुन दार ठोकत राहिला पण आतून कोणतंही उत्तर आलं नाही.

५. बाहेरुन दरवाजा बडवण्याचा आवाज वाढत राहिला आणि शेवटी दरवाजा तोडण्याचा प्रयत्न आवाजातून ऐकू आला. पण विमान कोसळेपर्यंत आतून कोणतंही उत्तर किंवा दरवाजा उघडणं झालं नाही. आपोआप कोसळणार्‍या विमानाचा वेग सतत वाढतच राहतो, अगदी जमिनीवर आदळेपर्यंत.

याचा अर्थः

हेलिओसप्रमाणे अचानक केबिन डी-प्रेशराईज होऊन सर्वजण बेशुद्ध होणं असा प्रकार वाटत नाही.
बाहेरुन दरवाजा सतत वाजवला जात होता, म्हणजे बाहेरचा पायलट शुद्धीवर होता. अर्थात ऑक्सिजन अचानक नाहीसा होण्याची थियरी पटत नाही.

विमान कोसळण्याच्या क्षणी एक पायलट आत लॉक्ड आणि एक पायलट कॉकपिटबाहेर पॅसेंजर साईडला लॉक्ड अशी स्थिती होती.

पूर्वी एका केसमधे अस्वस्थ, नाराज कोपायलटने जाणूनबुजून मुख्य पायलट स्वच्छतागृहात गेलेला असताना ईश्वराचं नाव घेत विमान डाईव्हमधे टाकून क्रॅश केलं होतं. त्यावेळी पायलट शेवटी कॉकपिटमधे घुसलाही होता पण कोपायलटने सर्व शक्तीनिशी कंट्रोल खाली दाबून ठेवला होता आणि क्रॅश होईस्तो सोडला नाही. कोपायलट ईश्वरस्मरणाखेरीज कोणताही रिस्पॉन्स देत नव्हता.

इथे नेमकं काय झालं असावं हे सांगणं याक्षणी खूप कठीण आहे.

हायजॅक करण्याचे आणि पायलट्सना गनपॉईंटवर घेण्याचे प्रकार वाढले तेव्हा त्यातून धडा म्हणून कॉकपिट डोअर लॉक करणे अन फक्त पायलट्सनाच दरवाजा आतून उघडण्याचे हक्क अशी पद्धत केली गेली. इथे त्याचाच फटका उलटा पडलेला दिसतो.

जशीजशी माहिती येईल तसंतसं चित्र स्पष्ट होईल. प्रत्येक अपघात हा पुढचे त्या प्रकारचे अपघात कमी करतो. याही बाबतीत ही प्रचंड किंमत देऊन काहीतरी मौल्यवान धडा मिळावा.

Airbus320

एअरबस ३२०-२०० सीरीज विमानः Wikimedia कडून साभार.

धाग्याचा प्रकार निवडा: : 
माहितीमधल्या टर्म्स: 
field_vote: 
4.333335
Your rating: None Average: 4.3 (3 votes)

प्रतिक्रिया

सहमत. ते राहून गेलं लिहायचं.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

माहिष्मती साम्राज्यं अस्माकं अजेयं

थोडे 'आऊट ऑफ बॉक्स' विचार वाटतील, पण एक शंका. पायलट,कोपायलट साठी कॉकपिटमधेच टॉयलेटची व्यवस्था करता येईल का ? की टेक्निकली काही अडचण येऊ शकेल ?

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

एखादी पायलटसारखी व्यक्ती स्वतःचा जीव देण्यास तयार असेल तर ती काहीही करु शकते. बाकी हे सुचवलेले 'उपाय' फक्त इतरांना सुरक्षिततेचा भास निर्माण करण्यासाठी आहेत.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

मलाही तेच वाटते. नियम एक, पळवाटा अनेक.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

Every time, every time it rains, it's gonna rain pennies from heaven
Don't you know every cloud contains lots of pennies from heaven
You'll find your fortune's fallin', baby, all over the town
Be sure, be sure that your umbrella is upside down

विषयानुरुप झालेली चर्चा वाचण्यासारखी आहे.
बाकीचे प्रतिसाद वाचून आडकित्तांनी सुचवल्याप्रमाणे आयडी ब्यान करणे चालू करावे असे वाटायला लागले आहे.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

विषयानुरुप झालेली चर्चा वाचण्यासारखी आहे.

+१.

बाकीचे प्रतिसाद वाचून आडकित्तांनी सुचवल्याप्रमाणे आयडी ब्यान करणे चालू करावे असे वाटायला लागले आहे.

सहमत आहे.

सुरुवात आमच्या आयडीपासून करावी, असे नम्रपणे सुचवितो. आय व्हॉलण्टियर.

- (द्विसप्ततिकुमारीमीलनोत्सुक हौतात्म्याकांक्षी मुमुक्षुमुजाहिदोत्तम आयडी-ए-आझम) 'न'वी बाजू.

..........

सोप्या मराठीत: 'ओव्हर माय डेड बॉडी.'

बोले तो, एक आयडी बंद केल्यावर 'संभवामि युगे युगे' म्हणत लगेच दहा मिनिटांनी दुसरा आयडी काढून 'दत्त'२अ म्हणून उभा ठाकण्यात इण्ट्रेष्ट नाही, याची हमी देतो.

२अ ही (किंवा तत्सम तदार्थी 'दिगंबर', 'दत्तात्रेय' आदि) नवीन आयडीकरिता कल्पना अथवा सुचवण नव्हे, याची सर्व संबंधितांनी कृपया नोंद घ्यावी. धन्यवाद.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

तुमच्या आजवरच्या मराठीसंस्थळवाटचालीत मला झुमाक्ष हा आयडी प्रचंड आवडलेला होता. मुमुक्षुमुळे त्याची आठवण झाली.

मराठीसंस्थळांवर अजून बाल्यावस्थेत असणार्‍यांच्या संदर्भासाठी - झुरळ मारणारा क्षत्रिय

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

-मस्त कलंदर
उदरभरण नोहे

Smile

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

सुरुवात आमच्या आयडीपासून करावी, असे नम्रपणे सुचवितो. आय व्हॉलण्टियर.१

पाठोपाठ आमच्याही आयडीचा विचार केला जावा.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

माहिष्मती साम्राज्यं अस्माकं अजेयं

उड्डाणाच्या आदल्या दिवशी कोपायलटचा ब्रेकअप झाला होता अशी बातमी आली आहे.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

तो डोळ्यांच्या गंभीर विकारामुळे अनफिट टु फ्लाय बनला होता आणि कोणत्याही क्षणी कंपनीत हे पकडले जाईल या भीतीखाली होता असंही पुढे आलंय. त्याची करियर हेल्थ इश्यूमुळे (कोणता ते स्पष्ट नाही) संपणारच होती असं रिपोर्ट्सवरुन वाटतंय. तो बहुधा अंध बनत चालला होता. वैमानिक न राहणे अन आंधळे जीवन या कल्पना असह्य झाल्याने आयुष्य संपवले असावे. सुसाईड विषयक वेबसाईट्सही त्याच्या कम्प्युटरवरुन त्याने पाहिल्या होत्या.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

आता हे काय नवीनच? त्या विमानाच्या पायलटाने सहा महीन्यांपुर्वी इस्लाम स्वीकारला होता म्हणे-
http://goo.gl/kXul5j

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

पूर्ण निराधार बातमी आहे. मूळ सोर्स हाच मुळात वृत्तसंस्थेचा नाही. त्यातून त्या एका सोर्सचे अनेकांनी घेतलेले दाखले नवीन सोर्स म्हणून समजले जाताहेत.
"या दिशेने तपास सुरु आहे".. किंवा "काही माध्यमांनी असे वृत्त प्रसारित केले" असं मोघम आहे सगळीकडे.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

बर मग मूळ सोर्स कोणता?

वृत्तसंस्थांनी कदाचित ते डीटेल्स दडवलेही असू शकतात- तेवढ्यावरनं लोकं अजून खवळायला नकोत म्हणून.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

माहिष्मती साम्राज्यं अस्माकं अजेयं

आपल्या ऐसी / मराठीब्लॉग्ज.नेट वगैरे फोरमच्या टाईपचाच पॉलिटिकली इनकरेक्ट , पीआय-न्यूज .नेट या साईटवर एका धागाकर्त्याने / ब्लॉगरने लिहिलेल्या एका धाग्याचा संदर्भ मुळात दिला जातोय. ही वृत्तसंस्था नव्हे. न्यूज असा शब्द फक्त त्या नावात आहे. त्याच डिस्कशनमधे अनेक प्रतिसादकर्त्यांनी (आपल्या ऐसीवर चर्चा होते त्यानुसार) या मताला खोडूनही काढलं आहे. ज्या गावात मोठी मशीद आहे त्याच गावात उड्डाणप्रशिक्षण घेणे म्हणजे कन्व्हर्ट होणे हा अंदाज कोणत्याही आधाराशिवाय आहे. आणि या अंदाजाचा संदर्भ जणूकाही वृत्त असल्याप्रमाणे सर्वत्र दिला जातोय.. असा संदर्भ देणार्‍या ठिकाणांना नवे संदर्भ समजून "मीडियात" चर्चा असा अ‍ॅंगल तयार झाला आहे.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

विवेचन पटलं ! तसही तो कोपायलट लोकांना हव्या असलेल्या धर्माचा असता तर खुद्द सरकारने ही गोष्ट पहिल्या दिवशीच जाहिर केली असती. अशा गोष्टी लपविण्यात निदान सरकारला तरी काही इंटरेस्ट नसावा.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

अच्छा, धन्यवाद. हे पटणीय आहे खास.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

माहिष्मती साम्राज्यं अस्माकं अजेयं

१. विमानप्रवासाचे आरंभी पायलट आपले नाव सांगतात. ही नावे मुसलमानी निघाली तर प्रवाशांस अस्वस्थ न वाटो.
२. पायलट मुसलमान निघाला तर आम्ही प्रवास करणार नाही अशी मागणी प्रवासी न करोत.
३. पायलट माणूस मुसलमान आहे म्हणून त्याला रिक्रूटच करायचे नाही असा प्रकार विमान कंपन्या न करोत.
४. जिथे जिथे जिवितास धोका आहे तिथे तिथे रडर मुसलमानांना द्यायचे नाहीत असा प्रकार न घडो.
५. युरोपीय लोक शिकलेले, श्रीमंत, कॉस्मो इ इ आहेत तेव्हा ते पोर्वात्य लोकांपेक्षा जास्त जातीयवादी न निघोत.
६. विमान अपघात वरचे वर सुरक्षित होत जाताहेत अशी जाणिव लोकांत वाढो.
७. केवळ विमानाच्याच प्रवाश्यांच्या प्राणांचे मोल जास्त असते अशी* सरकारांची व माध्यमांची भावना नष्ट होवो.
==============================
ईश्वरास हा शब्द प्लेसहोल्डर आहे. किंबहुना प्रार्थना हा शब्द देखिल प्लेसहोल्डर आहे.

* सबकाँशस

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

सही: पुरोगाम्यांना लॉजिक माफ असतं.

+१
(५ बद्दल सुक्ष्म असहमती पण ती असो)

===

आजवर आंतरराष्ट्रीय विमान प्रवासात (विशेषतः अमेरिकेला जाणार्‍या/अमेरिकेहून येणार्‍या) काही प्रवाशांची नावे घेऊन त्यांना एम्बार्केशन झाल्यावर पुन्हा बाहेर बोलावले जाताना बघितले आहे. ते कशाला बोलावतात नक्की माहित नाही पण बहुदा पुनर्तपासणी असेल असे वाटते. आजवर अशा लोकांपैकी जवळजवळ सगळे भारतीय होते + बहुतांश नावे मुसलमान होती. (माझा अमेरिकेचा प्रवास बुशीय काळातला आहे. त्यानंतर परिस्थितीत बदल झाले असावेत)

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

- ऋ
-------
लव्ह अ‍ॅड लेट लव्ह!

मनोविकाराबाबत रोचक लेख.

http://www.inc.com/dana-severson/don-t-let-the-germanwings-crash-stigmat...

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

खाली त्यासारखीच दुसरी लिंक दिली आहे.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

कोणाला कशाचं तर कोणाला कशाचं:

Role of Illness in Germanwings Crash Raises Worry About Stigma

मुद्दा अर्थातच वैध असू शकेलच.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

नक्की काय मुद्दा आहे हे कळलेले नाही. फारच मोठा लेख आहे. आज वाचलेल्या एका बातमीनुसार सहासात वर्षापूर्वी सदर पायलट severe drepression ने आजारी होता. मनोविकाराचा इतिहास असलेल्या व्यक्तीला पायलटसारख्या पदावर ठेवू नये असे माझे मत आहे.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

मनोविकाराचा इतिहास असलेल्या व्यक्तीला पायलटसारख्या पदावर ठेवू नये असे माझे मत आहे.

ब्रेस युवरसेल्फ फॉर सम डायट्राईब ऑन दि हक्क'स ऑफ मनोविकारग्रस्ताज़.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

माहिष्मती साम्राज्यं अस्माकं अजेयं

एपिलेप्सीसारख्या आजारांबाबत एअरलाईन कंपन्यांचे धोरण काय असते? साधारण तसेच धोरण असावे. अर्थात मनोविकार शोधणे अत्यंत अवघड असल्याने अशा प्रकारच्या कायद्यांच्या अंमलबजावणीबाबत साशंक आहे.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

मनोविकार जर काबूत असेल, अन औषधे जर लागू पडत असतील तर व्यक्ती अतिशय संतुलित असते किंबहुना अक्षरक्षः इतरांपेक्षा अधिक (केमिकल इन्ड्युसड) संतुलन अनुभवते. तेव्हा जे लोक उपचार घेत आहेत, समस्येच्या बाहेर आले आहेत त्यांच्यावर हा अन्याय आहे.
_________
आता १० लोकांवर अन्याय केल्याने जर २०,००० लोक वाचत असतील तर अन्याय करावा का?
तर मला वाटतं - होय करावा.
__________

मात्र एक शंका आहे- सामान्य व्यक्ती आयुष्यात कधीच मनोविकार अनुभवत नाही असे होते का? की प्रत्येकजण कधीना कधी मनोविकाराचा शिकार होतो?

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

Every time, every time it rains, it's gonna rain pennies from heaven
Don't you know every cloud contains lots of pennies from heaven
You'll find your fortune's fallin', baby, all over the town
Be sure, be sure that your umbrella is upside down

पूर्णपणे सहमत.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

सहमत आहे. मुळात स्टँडर्ड माईंडची व्याख्या काय आहे?

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

अ मांईड दॅट डसनॉट अ‍ॅक्ट डिस्ट्रक्टीव टु सेल्फ अँड सोसायटी बेलोंगींग्स...

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

actions not reactions..!...!

म्हणजे दुसर्‍याला त्रास न देणारे व आत्महत्या न करणारे मानसिकदृष्ट्या निरोगी समजायचे का? व्यायाम न करणारे, विडी-काडी व दारु पिणारे, तासंतास ऑफिसमध्ये बसून काम करणारे मानसिक रोगी की निरोगी?
सेल्फ-डिस्ट्रक्शनचा नॅचरल रेट काय आहे आणि मानसिक रुग्णांचा काय असतो?

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

ती स्टँडर्ड माइंडची व्याख्या आहे. स्वतःला वा समाजिक घटकांना हानी न पोचवणारे मन हे आदर्श अशी पुस्तकी व्याख्या म्हणून शकतो.

म्हणजे दुसर्‍याला त्रास न देणारे व आत्महत्या न करणारे मानसिकदृष्ट्या निरोगी समजायचे का?

मनात कसलीही विषेश खळबळ न होता हे घड्त असेल तर हो. हे मानसिकदृष्ट्या निरोगी. पण ती खळबळ जाणीवपुर्व वा काही कारणाने लपवत असतिल तर रोगीच.

व्यायाम न करणारे, विडी-काडी व दारु पिणारे, तासंतास ऑफिसमध्ये बसून काम करणारे मानसिक रोगी की निरोगी?

वरील कृतीतुन मनावरचा ताण हँडल न करु शकणारे रोगी. बाकीचे निरोगी. फक्त धोकापातळी वेगवेगळी असु शकते. मन संपुर्ण समतोल कधिच रहात नाही फक्त त्याचे असंतुलन नियंत्रणापलिकडे गेले नाही म्हणजे झाले.

सेल्फ-डिस्ट्रक्शनचा नॅचरल रेट काय आहे आणि मानसिक रुग्णांचा काय असतो?

सेल्फ-डिस्ट्रक्शनचा नॅचरल रेट मानसिक रुग्णांचा एव्ह्डाच असतो. इतर कोणी तसे बनत नाही. खरंतर मी डॉक्टर वगैरे नाही पण मानवी स्वभावाचा किन निरीक्षक मात्र आहे.

अजुन एक वाक्य आहे प्रसिध्द हेरी पोटर चेंबर ऑफ सिक्रेट मधले. (हिंदी डंबीग) डंबी म्हणतो इन्साकी असलीयत वो नही होती जिसके वो लायक है, पर वो होती है जो फैसले वो लेता है... आणी इथेच संस्कार मॅटर करतात रिगार्डलेस ऑफ मनाची अवस्था.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

actions not reactions..!...!

>>सामान्य व्यक्ती आयुष्यात कधीच मनोविकार अनुभवत नाही असे होते का? की प्रत्येकजण कधीना कधी मनोविकाराचा शिकार होतो?

मनाने स्ट्राँग असलेले लोक मनोविकाराने ग्रस्त होत नसावेत.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

--------------------------------------------
ऐसीव‌रील‌ ग‌म‌भ‌न‌ इत‌रांपेक्षा वेग‌ळे आहे.
प्रमाणित करण्यात येते की हा आयडी एमसीपी आहे.

"मनाने स्ट्राँग" ही कल्पना अत्यंत विसविशीत आहे असं वाटतं. मनाची ताकद अशी काही गोष्ट अस्तित्वात असते का आणि मानसिक आजार हे मानसिक ताकदीनुसार अफेक्ट करतात का हे नीट पहावे लागेल. माझ्यामते हार्मोनल / केमिकल कमतरता अथवा इंबॅलन्स झाला तर काही मनोविकार होऊ शकतात. मनाची ताकद ( बहुधा तुम्हाला म्हणायचंय ते ="खंबीरपणा, न घाबरणे, योग्य वेळी न डगमगता निर्णय घेण्याची क्षमता") या गोष्टीशी याचा संबंध नसावा.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

मनाने स्ट्राँग असलेले लोक मनोविकाराने ग्रस्त होत नसावेत.

तीव्र मनोविकार असलेल्या लोकांना "सुरक्षा" जिथे जिथे बाधित होते असे काम सहसा देऊ नये असे मला वाटते.
मनाची जडणघडण आणि मनोविकार यांचा अर्थाअर्थी संबंध नाही. जीवनातील बरे वाईट प्रसंग मानसिक हाई लो पॉइंट्स घेऊन येतात, पण विकार नाही. पण असे प्रसंग नि सोशल कंडीशनींग मुळे देखिल मनोविकार होतात असे मानसशास्त्राचे काही स्ट्रीम्स मानतात.
===============================================================================================
क्षणभर विज्ञान बाजूला ठेऊन (अर्थातच बॅटमॅनची माफी वैगेरे आलेच), मनाने स्ट्राँग असलेले लोक मनोविकाराने ग्रस्त होत नसावेत असेच कोणी म्हणत असेल तर मी म्हणेन कि मनोविकार न होण्यासाठी एका विशिष्ट प्रमाणात- समाजात होते ते फॉलो करण्याची निर्बुद्धता, गुलामगिरीची मानसिकता, असंवेदनशीलता, समाजाशी तुटकपणा, भावनाहिनता, इ इ आवश्यक आहे.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

सही: पुरोगाम्यांना लॉजिक माफ असतं.

मनोविकार न होण्यासाठी एका विशिष्ट प्रमाणात- समाजात होते ते फॉलो करण्याची निर्बुद्धता, गुलामगिरीची मानसिकता, असंवेदनशीलता, समाजाशी तुटकपणा, भावनाहिनता, इ इ आवश्यक आहे.

ओहो, म्हणजे भारतात कुणालाही मनोविकार होत नाहीत तर. Wink

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

माहिष्मती साम्राज्यं अस्माकं अजेयं

अतिसंवेनशील आणि भावनिक लोकंही मनोरुग्ण होतातच.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

तुम्हीही तेच म्हणताय!

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

- ऋ
-------
लव्ह अ‍ॅड लेट लव्ह!

अरुणजोशींची वाक्यरचना फारच उलटसुलट होती त्यामुळे लक्षात नाही आले. भावनाहीन आणि भावनाप्रधान दोन्ही व्यक्ती मनोरुग्ण होऊ शकतात. उदा. समाजाशी तुटले असल्याने मनोविकार होणार नाही हे अध्याहृत चुकीचे आहे. एकटेपणा हे मनोविकाराचे मोठे कारण आहे.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

मनोविकार खरोखर "परिस्थितीजन्य" असतात का? की ते मुळातच असतात आणि परिस्थितीने चिन्हे जास्त तीव्र होऊन दिसतात?

हा शास्त्रीय अज्ञानातून आलेला प्रश्न आहे. एकटे नसलेले, इतरत्र अत्यंत यशस्वी असलेले, अभावग्रस्त नसलेले असे लोकही तितक्याच प्रमाणात मानसिक आजारांनी त्रस्त असल्याचं पाहिलं आहे. किंबहुना एकटेपणामुळे आजार यापेक्षा उलट दिशेने -- आजारामुळे विचित्र वागणूक अन त्यामुळे हळूहळू एकटे पडणे असा सीक्वेन्स पाहण्यात येतो.

ओसीडी, नैराश्य हे विकार अगदी यशस्वी, भरल्या घरातल्या लोकांना झालेले पाहिले आहेत. अगदी पब्लिकली उपलब्ध उदाहरणंही आहेत.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

अगदी अगदी.

मनोविकार खरोखर "परिस्थितीजन्य" असतात का? की ते मुळातच असतात आणि परिस्थितीने चिन्हे जास्त तीव्र होऊन दिसतात?

मला तरी वाटतं की परीस्थितीने ते "अ‍ॅग्रिव्हेट" होतात, पण असतात मूळचेच.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

Every time, every time it rains, it's gonna rain pennies from heaven
Don't you know every cloud contains lots of pennies from heaven
You'll find your fortune's fallin', baby, all over the town
Be sure, be sure that your umbrella is upside down

मनोविकार हा एकच एक रोग नसून त्याचा मोठा स्पेक्ट्रम असल्याने वेगवेगळ्या रोगाचे कारण वेगवेगळे असेल असे वाटते. स्किझोफ्रेनिया किंवा ऑटिझमसारखे रोग जेनेटिक वाटतात. याउलट डिप्रेशन, अँक्झायटी वगैरेसारखे रोग परिस्थितीजन्य (ताणतणावाचे आयुष्य, आयुष्यातील दुर्दैवी घटना) यातून उद्भवत असावेत. अर्थात हे खूपच ढोबळ निकष आहेत.

http://en.wikipedia.org/wiki/Causes_of_mental_disorders

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

मनोविकार असलेल्यांनी डॉक्टरकी करावी का?

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

आधी रोटी खाएंगे, इंदिरा को जिताएंगे !

ROFL ROFL

मनोविकार नावाचा कोणाताही विकार अस्तित्वात नाही हो ROFL

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

actions not reactions..!...!

..एफ डी आर (फ्लाईट डेटा रेकॉर्डर)सापडलाय.आता ऑब्जेक्टिव्ह स्पष्ट काय ते कळेल.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

त्याचा टॅबपण सापडला म्हणे. त्यात त्याने आत्महत्येच्या साधनांसाठी आणि विमानाची कॉकपिटच्या सुरक्षेसंबंधी केलेली सर्च हिस्टरी सापडलीय. थंड डोक्याने केलेला हा खून आहे त्या प्रवाशांचा.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

-मस्त कलंदर
उदरभरण नोहे

एफडीआरचं प्रथम वाचन केल्यावर असं जाहीर केलं गेलंय की कोपायलटने ऑटोपायलट वापरुन विमान उतरणीच्या मोडमधे मुद्दाम घातलं. त्यानंतरही वेळोवेळी ऑटोपायलट सेटिंग्ज बदलत राहून स्पीड वाढवत नेला असं फ्लाईट डेटा रेकॉर्डर सांगतोय.. (हा वाढवलेला वेग बहुधा इम्पॅक्टचा जोर जास्तीतजास्त असावा आणि पूर्ण चिरफळ्या उडाव्यात अशा उद्देशाने असावा)

वेळोवेळी सेटिंग्ज बदलली, म्हणजे तो बेशुद्ध किंवा मेडिकल इमर्जन्सीत नव्हता. चांगलाच शुद्धीवर होता.

म्हणजे आवाजांवरुन काढलेला अंदाज विमानातल्या वस्तुनिष्ठ तांत्रिक नोंदींवरुनही (लॉग्जवरुनही) खरा ठरला. आणखी बरीच माहिती या एफडीआरमधून मिळेल.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

actions not reactions..!...!

Germanwings co-pilot may have 'spiked' captain's coffee before crash

डाययुरेटिक अर्थात जास्त मूत्रनिर्मिती करणारं द्रव्य कोपायलटने पीआयसीच्या (पायलट इन कमांडच्या) कॉफीत घातलं असावं असे पुरावे समोर येताहेत. त्याने इंटरनेटवर युरिन आउटपुट वाढवणार्‍या द्रव्यांची माहिती शोधली होती.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

पाने