जर्मनविंग्ज 4U 9525.. लॉक्ड इन ?!

जर्मनविंग्ज फ्लाईट नंबर फोर-यू-नाईनर फाय टू फाय या उड्डाणाच्या आल्प्समधे झालेल्या क्रॅशला फॉलो करण्यासाठी ही जागा आहे. अपडेट्स वेगाने येताहेत. काही ऑब्सोलीट होताहेत आणि काही वेगळ्याच दिशेला नेताहेत. संकलनाचा हेतू आहे.

लुफ्तांझा कंपनीची चाईल्ड कंपनी असलेली जर्मनविंग्ज १९९७ मधे सुरु झाली होती. आजरोजी कंपनीकडे जवळजवळ ऐंशी विमानं आहेत. त्यापैकी निम्मी एअरबस ए ३१९-१०० सीरीजची आहेत. उर्वरितांमधे निम्मी एअरबस ३२०-२०० सीरीज आणि निम्मी बंबार्डियर जातीची विमानं आहेत.

अपघातग्रस्त विमानाची जात: एअरबस ३२०-२११. रजिस्ट्रेशन नंबर D- A I P X (डेल्टा - अल्फा इंडिया पापा एक्सरे)

क्षमता: १७४-१७५ लोक

इंजिन टाईप: टर्बोफॅन

विमानाचं वयः चोवीस वर्षे पूर्ण, साडेअठ्ठावन्नहजार तास उड्डाण.

मार्गः बार्सेलोना ते डुसलडॉर्फ

टाईमलाईनः

तारीखः २४ मार्च २०१५

टेकऑफची ठरलेली वेळ: स्थानिक वेळेनुसार सकाळी नऊ पस्तीस. (दुपारी दोन वाजून पाच मिनिटे भारतीय वेळेप्रमाणे)
प्रत्यक्ष टेकऑफः सकाळी दहा वाजून एक मिनिट (अर्धा तास उशिराने)

ठरवून दिलेली उंची: फ्लाईट लेव्हल ३८० (अडतीस हजार फूट)

क्रूझिंग स्पीडः आठशे किलोमीटर्स पर अवर (०.६५ माक, आवाजाच्या वेगाच्या ०.६५ पट)

विमान दहा वाजून एक मिनिटाने स्पेनमधल्या बार्सेलोना एअरपोर्टच्या रनवे ०७ वरुन(सत्तर डिग्री= उत्तरपूर्व दिशेत तोंड असलेल्या) उडलं.

दहा वाजून सत्तावीस मिनिटांनी त्याने आपली ठरलेली क्रूझिंग फ्लाईट लेव्हल ३८० गाठली. त्याचा वेग ८०० किलोमीटर प्रतितास होता.

दहा वाजून तीस मिनिटांनी शेवटचा प्रतिसाद विमानाच्या रेडिओवरुन आला. तो नॉर्मल होता. त्याचवेळी विमानाचा वेग वाढायला लागला आणि साडेनऊशे किलोमीटर प्रतितास झाला.

दहा वाजून एकतीस मिनिटांनी विमानाने फ्रेंच बॉर्डर ओलांडली आणि लगेचच आपली क्रूझ लेव्हल सोडून झपाझप खाली उतरायला सुरुवात केली. सेकंडरी रडारयंत्रणा उपलब्ध असल्याने जमिनीवरच्या कंट्रोल सेंटरला विमानाचा वेग, उंची, खाली येण्याचा रेट हे सर्व आकडेरुपात दिसत होतं.

विमान सरळ रेषेत झपाट्याने खाली उतरत होतं. ३५०० (पस्तीसशे) फूट प्रतिमिनिट असा हा खाली येण्याचा धडकी भरवणारा रेट होता. अर्थात हा फ्री फॉल नव्हता हे नोंद घेण्यासारखं आहे. हा अतिशय फास्ट पण कंट्रोल्ड उतरणीचा प्रकार होता. हे पाहून एअर ट्रॅफिक कंट्रोलने भयग्रस्त होऊन पुन्हापुन्हा रेडिओवर या विमानाला पुकारायला सुरुवात केली. विमानाकडून काहीही उत्तर आलं नाही. प्रत्यक्ष किंवा अप्रत्यक्ष पद्धतीने कोणताही डिस्ट्रेस सिग्नल किंवा प्रत्युत्तर आलंच नाही.

हेलिओस सारखा प्रकार असेल असं समजून फ्रेंच एअरफोर्सचं फायटर जेट लगेच उडवण्यात आलं. या विमानाच्या शेजारी उडून थेट नजरेने काही दिसतंय का ते पाहण्यासाठी. पण ते पोहोचण्याआधीच जर्मनविंग्ज ९५२५ जमिनीपर्यंत पोहोचलं होतं. आल्प्स पर्वतांमधे पाच हजार फूट उंचीवर ते जमिनीवर कोसळलं.

सर्व दीडशे लोक ठार झाले. विमानाचा चुरा झाला. सर्वात मोठा तुकडा छोट्या कारइतक्या आकाराचा आहे असं सांगण्यात आलं. कॉकपिट व्हॉईस रेकॉर्डर सापडला आहे आणि काही आवाज नोंदवले गेले आहेत. रडारनोंदी आहेतच.

यामधे खालील काही नोंदी अत्यंत महत्वाच्या आहेत. त्या बदलत राहतील. पण सध्यातरी वेगवेगळ्या शक्यता दिसतात.

१. विमानाचा डाईव्ह करण्याचा वेग नियंत्रित होता. विमानाचे इंजिन सुखरुप राहील इतकीच या वेगाची रेंज होती. आपणहोऊन कोसळणारं विमान गुरुत्वाकर्षणाने एखाद्या दगडासारखं खाली येतं आणि त्याचा वेग इतका जास्त असतो की ते हवेतच डिसइंटिग्रेट होतं.

२. विमानाचा खाली येण्याचा रेट (डिसेंट रेट) कोसळण्यापूर्वी शेवटच्या क्षणांत कमी झाला.

३. कॉकपिटमधल्या रेकॉर्ड झालेल्या आवाजांवरुन उड्डाणानंतर पायलट आणि कोपायलटमधे अत्यंत सरळ आणि साधं संभाषण चाललेलं होतं. त्यानंतर ऐकू येणार्‍या ऑडिओनुसार एक पायलट कॉकपिट सोडून बाहेर (बहुधा बाथरुममधे) गेला. तो परत आला तेव्हा कॉकपिटचं दार आतून बंद आणि लॉक झालेलं होतं.

४. बाहेर गेलेला पायलट बाहेरुन दार ठोकत राहिला पण आतून कोणतंही उत्तर आलं नाही.

५. बाहेरुन दरवाजा बडवण्याचा आवाज वाढत राहिला आणि शेवटी दरवाजा तोडण्याचा प्रयत्न आवाजातून ऐकू आला. पण विमान कोसळेपर्यंत आतून कोणतंही उत्तर किंवा दरवाजा उघडणं झालं नाही. आपोआप कोसळणार्‍या विमानाचा वेग सतत वाढतच राहतो, अगदी जमिनीवर आदळेपर्यंत.

याचा अर्थः

हेलिओसप्रमाणे अचानक केबिन डी-प्रेशराईज होऊन सर्वजण बेशुद्ध होणं असा प्रकार वाटत नाही.
बाहेरुन दरवाजा सतत वाजवला जात होता, म्हणजे बाहेरचा पायलट शुद्धीवर होता. अर्थात ऑक्सिजन अचानक नाहीसा होण्याची थियरी पटत नाही.

विमान कोसळण्याच्या क्षणी एक पायलट आत लॉक्ड आणि एक पायलट कॉकपिटबाहेर पॅसेंजर साईडला लॉक्ड अशी स्थिती होती.

पूर्वी एका केसमधे अस्वस्थ, नाराज कोपायलटने जाणूनबुजून मुख्य पायलट स्वच्छतागृहात गेलेला असताना ईश्वराचं नाव घेत विमान डाईव्हमधे टाकून क्रॅश केलं होतं. त्यावेळी पायलट शेवटी कॉकपिटमधे घुसलाही होता पण कोपायलटने सर्व शक्तीनिशी कंट्रोल खाली दाबून ठेवला होता आणि क्रॅश होईस्तो सोडला नाही. कोपायलट ईश्वरस्मरणाखेरीज कोणताही रिस्पॉन्स देत नव्हता.

इथे नेमकं काय झालं असावं हे सांगणं याक्षणी खूप कठीण आहे.

हायजॅक करण्याचे आणि पायलट्सना गनपॉईंटवर घेण्याचे प्रकार वाढले तेव्हा त्यातून धडा म्हणून कॉकपिट डोअर लॉक करणे अन फक्त पायलट्सनाच दरवाजा आतून उघडण्याचे हक्क अशी पद्धत केली गेली. इथे त्याचाच फटका उलटा पडलेला दिसतो.

जशीजशी माहिती येईल तसंतसं चित्र स्पष्ट होईल. प्रत्येक अपघात हा पुढचे त्या प्रकारचे अपघात कमी करतो. याही बाबतीत ही प्रचंड किंमत देऊन काहीतरी मौल्यवान धडा मिळावा.

Airbus320

एअरबस ३२०-२०० सीरीज विमानः Wikimedia कडून साभार.

धाग्याचा प्रकार निवडा: : 
माहितीमधल्या टर्म्स: 
field_vote: 
4.333335
Your rating: None Average: 4.3 (3 votes)

प्रतिक्रिया

अरेरे!
असा अपघात दुर्मिळ असेल नाही?

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

- ऋ
-------
लव्ह अ‍ॅड लेट लव्ह!

ह्या धाग्याची वाटच बघत होते. गेल्या काळातील कुठल्याच अपघाताचे नीट स्पष्टीकरण मिळत नाहीये हे फार चिंताजनक आहे.

ह्या पुढे, एक पायलट टॉयलेट ला गेला तर केबिन क्रु मधल्या एकाला कॉकपिट मधे आणुन बसवायण्याची नविन प्रोसेस सुरु करावी लागेल असे वाटते. कमीतकमी तो दार तरी उघडेल.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

२००१च्या ९/११ हल्ल्यानंतर निघालेल्या नियमांनुसार एअरबस कंपनीने सर्व ए३२० विमानांमधे केलेल्या बदलानुसार कॉकपिट डोअर आतून उघडता येते आणि पायलट ते उघडून बाहेर गेला की ते आपोआप आतून लॉक होते. बाहेरुन आत येण्याची विनंती आल्यावर आतील पायलटला दिलेले एक स्विच त्याने "अनलॉक" पोझिशनला फिरवले तरच कॉकपिट दरवाजा खुलतो. आतला पायलट / आतले दोन्ही पायलट बेशुद्ध झाले तर काय करायचे, ही केस लक्षात घेऊन इमर्जन्सी एंट्री प्रोसीजर ठेवलेली आहे. बाहेरच्या कीपॅडवर सीक्रेट अनलॉक कोड डायल केला की तीस सेकंदांनंतर दरवाजा अनलॉक होऊन बाहेरची व्यक्ती (इन धिस केस, बाहेरचा पायलट) आत जाऊ शकतो. मधले तीस सेकंद बहुधा आतल्या पायलटला आपला नकाराधिकार बजावण्याच्या संधीसाठी असावेत. अधिक तपशील पहावा लागेल. या केसमधे असा कोड टाकून उघडण्याचा प्रयत्न झाला किंवा नाही हे आवाजावरुन कळले नसावे किंवा जाहीर केले गेले नसावे. बाहेरुन कोड टाकलेला असूनही आतला पायलट जर तो रद्द करत असेल तर मात्र आतला पायलट शुद्धीवर होता असं म्हणावं लागेल. अधिक माहितीनेच काय ते कळेल.

एक पायलट बाहेर गेला असताना आत एक आणखी क्रू बसवला तरी त्या क्रूला दार आतून उघडण्याचे हक्क द्यावे लागतील.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

..आता तर एअरलाईननेच स्पष्ट केलंय की कोपायलट आतून दार उघडत नाही म्हणून बाहेरुन कॅप्टनने सिक्युरिटी कोड पंच केला पण आतून कोपायलटने पाच मिनिटांचा ओव्हरराईड ऑप्शन घेऊन कॅप्टनला बाहेर अडकवत ठेवले.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

कोपाइलटची आत्महत्त्या इतर १५०घेऊन?

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

यावरून पॅसेंजरना काही गडबड झालीये हे कळले असावे का? / सांगितले गेले असेल का?
काही मुलांनी मेसेज केलेत की घरी पोचण्याची अजून वाट नाही बघु शकत, स्पेनहून काही गिफ्ट्स आणलीयेत वगैरे.
आता हे क्रॅशपूर्वी काही मिनिटे पाठवलेले मेसेजेस शेवटचे वगैरे वाटत नाहीत.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

- ऋ
-------
लव्ह अ‍ॅड लेट लव्ह!

दु:खद घटना.
===================================
बसेस, ट्रक्स, रेल्वेज च्या अपघातांचा असा अनालिसिस करतात का?

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

सही: पुरोगाम्यांना लॉजिक माफ असतं.

बसेस, ट्रक्स, रेल्वेज च्या अपघातांचा असा अनालिसिस करतात का?

रेल्वेजच्या अपघातांवर थोडे तरी लिहून येते. कसा झाला, चौकशीचे आदेश वैगरे दिले जातात.
बसेस ट्रक्स वगैरेचे नुसते मथळे आनि मृत्यूची संख्या नोंद
माणसाला गाडीने उडवले, नोंदही नाही

वारंवारीतेच्या व्यस्त प्रमाणात हे वार्तांकन नी त्याची चिकित्सा होते.

===

एकाच प्रकारचे अपघात किंवा एकाच जागी अपघात होऊ लागले की मात्र चर्चा होते. जसे एक्सप्रेस हायवेवर अपघातांची संख्या वाढली. या या टर्नला हमखास अपघात होतात वगैरे वगैरे

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

- ऋ
-------
लव्ह अ‍ॅड लेट लव्ह!

एखाद्या स्पॉटला १७ मृत्यू (की १७ फेटल अपघात?) झाले की त्या स्पॉटला अपघाती क्षेत्र म्हणून बोर्ड लावतात असे एका पोलीसाने सांगितले होते.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

--------------------------------------------
ऐसीव‌रील‌ ग‌म‌भ‌न‌ इत‌रांपेक्षा वेग‌ळे आहे.
प्रमाणित करण्यात येते की हा आयडी एमसीपी आहे.

लेखकाला स्कायक्रावलर अशी पदवी देण्यात येत आहे (नाइट क्रावलरच्या धरतीवर)

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

actions not reactions..!...!

ह्या ह्या... चॅन, तुम्ही काय पदवी देताय? त्यांचं नावच गगनविहारी आहे... आणि गवि त्याचाच शॉर्टफॉर्म आहे.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

-अनामिक

मला माहितच न्हवते Biggrin

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

actions not reactions..!...!

ह्या उत्तर-प्रत्युत्तरला चपखल बसणारा श्लोकः

स हि गगनविहारी किल्मिषध्वंसकारी
दशशतकरधारी ज्योतिषां मध्यचारी|
विधुरपि विधियोगाद्ग्रस्यते राहुणासौ
लिखितमपि ललाटे प्रोज्झितुं कः समर्थः||

तो गगनामध्ये विहार करणारा आहे, तो अंधाराचा विनाश करतो, त्याला (किरणरूपी) सहस्र हात आहेत, अन्य तारकांच्या तो मध्यभागी असतो. अशा चंद्राला देखील राहूकडून ग्रहण लागते. खरोखर ललाटी लिहिलेले कोण टाळू शकतो?

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

मराठी श्लोकरुपी भाषांतराचा प्रयत्न :-
गगनी तो विहार करितो | अंधारविनाशी सहस्रभुज तो ||
तारकांमाजी शुभविलासितो | राहू अशाहि चंद्रास ग्रासतो ||

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

पिता रत्नाकरो यस्य, लक्ष्मीर्यस्य सहोदरी।
शङ्खो भिक्षाटनं कुर्यात् फलं भाग्यानुसारतः॥

हा श्लोक माहीत होता पण वरचा श्लोक आजच कळला. छान आहे तो.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

Every time, every time it rains, it's gonna rain pennies from heaven
Don't you know every cloud contains lots of pennies from heaven
You'll find your fortune's fallin', baby, all over the town
Be sure, be sure that your umbrella is upside down

आत्ताच्या नवीन माहितीनुसार मुख्य पायलट (कमांडर) फ्रेंच हद्दीत शिरताक्षणीच सीटमधून उठून बाहेर गेला. जाण्यापूर्वी को-पायलटला तू कंट्रोल सांभाळ असं बोललेलं रेकॉर्डिंगमधे ऐकू येतंय.

नंतर दरवाजा बंद झाल्याचा आवाज.

नंतर को पायलटने बहुधा विमानाची फ्लाईट मॉनिटरिंग सिस्टीम वापरुन डाईव्ह (वेगाने उतरणे) सुरु केले. ही क्रिया आपोआप होणारी नसून मुद्दाम उद्देशपूर्वक निर्णय घेऊन केली जाणारी आहे.

लगेचच बाहेरुन मुख्य पायलटचे दारावर आधी हळू आणि मग जोरात ठोठावणे, सोबत आत घेण्यासाठी मायक्रोफोनवरुन ओरडत सतत विनंती करणे.

आतून दरवाजा उघडला न जाणे. आतून उत्तरही न येणे.

कॉकपिट व्हॉईस रेकॉर्डरमधे कोपायलटच्या माइकमधून श्वासाचे नॉर्मल (अनियमित किंवा पॅनिक नव्हे) आवाज जमिनीवर आदळण्याच्या क्षणापर्यंत नोंदवले गेलेले आहेत. म्हणजे तो कॉकपिटमधे जिवंत अवस्थेत होता.

त्याने डाईव्ह मोड का घेतला आणि काही उत्तर का दिले नाही किंवा दाराचे लॉक का उघडले नाही हे आत्तातरी खूपच भयानक गूढ आहे.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

जर्मनीत चालू असलेल्या पत्रकार परिषदेत माहिती देणार्‍या प्रॉसेक्यूटरला पत्रकार पुन्हापुन्हा विचारताहेत की कोपायलटचे नाव काय होते? आणि ते कळल्यावर त्याची नॅशनलिटी आणि मुख्यतः एथ्निसिटी काय होती?

बोलकी आहे ही गोष्ट खूप. ठराविक प्रश्नच लोकांच्या मनात आधी येतात. दुर्दैवाची गोष्ट आहे.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

दुर्दैवबिर्दैव असेल तर ते त्या पायलटच्या कृतीचे, लोकांच्या प्रश्नाचे नव्हे. हे असे दरवेळेस अमुक काही झाले की खेद व्यक्त करणे आणि दुर्दैव व्यक्त करणे हा तुफान विनोदी प्रकार आहे- विशेषतः अशा गोष्टींच्या संदर्भात. दीडेकशे लोक नाहक प्राणाला मुकले ते बघून दु:ख व्यक्त केले तर ठीक, पायलटबद्दल उसासे कशाला सोडायचे?

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

माहिष्मती साम्राज्यं अस्माकं अजेयं

तसे नव्हे. दुर्दैव कोपायलटविषयी नव्हे तर सर्वसामान्यपणे लोकांच्या मनात एका समूहाबद्दल नावगाव माहीत नसतानाही शंका येणे हे दुर्दैव आहे.

झालेल्या अपघातापेक्षा हे दुर्दैव मोठं लहान असं काही नाही. पण लोकांच्या नजरा घाऊकरित्या दूषित झाल्या आहेत हे दूषित नसत्या तर असलेल्या परिस्थितीच्या तुलनेत दुर्दैवी आहे असा अर्थ घ्यावा.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

ठराविक प्रश्नच लोकांच्या मनात आधी येतात. दुर्दैवाची गोष्ट आहे.

काहीतरी कारण असेलच ना गवि हे प्रश्न लोकांच्या मनात यायला. का लोकांना वेड लागले आहे?
काही विशिष्ठ पॅटर्न दिसला असेल लोकांना. आता त्या बद्दल लोकांनाच दोषी ठरवले जाईल ऐसी वर ती गोष्ट वेगळी.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

लोकांच्या मनात येतात हे चूक / बरोबर असणे आणि दुर्दैवी असणे यात फरक आहे. गावात कुठेही चोरी झाली की ठराविक कम्युनिटीला पकडणे यामागे तर्क, अनुभव किंवा अन्य काहीही असेलही, पण तसं होणं दुर्दैवी आहेच ना? एखाद्याने मुद्दामहून विमान पाडलं असं म्हणताच पहिल्यांदा त्याच्या एथ्निसिटीची चौकशी करावीशी वाटते, पत्रकारांनाच कशाला? अगदी तुम्हालाआम्हालाही.. हे गढूळ वातावरणाचं लक्षण आहेच ना? ते सत्य असलं तरी दुर्दैवी आहेच ना?

"तसं नसतं तर चांगलं असतं" असं ज्याबद्दल वाटतं ते दुर्दैवी.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

सत्य असलं तरी दुर्दैवी आहेच ना?

दुर्दैवी कसे? उलट लोकांमधे जाण निर्माण झाली आहे असे म्हणेन मी.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

मग आता तो कोपायलट (मुसलमानबिसलमान किंवा 'ए'रबबिरब नसून) चांगला आर्यवंशीय जर्मन(च) होता, हे समजल्यावर प्रश्नकर्त्या 'जाण'कार लोकांनी सुटकेचे नि:श्वास / समाधानाचे सुस्कारे सोडले असतील, की 'अरेरे! / हात्त्याच्या! मुसलमान/'ए'रब नव्हताच स्साला! हा तर लेकाचा 'आपल्या'तलाच निघाला. हाउ बोअरिंग!' असे म्हणून निराशा व्यक्त केली असेल?

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

Andreas Lubitz is named as co-pilot

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

तेच. नाव आणि नॅशनलिटी (जर्मन) ऐकूनही एथ्निसिटी, मूळचा कोण असे प्रश्न येत होते.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

नाव वाचून अपेक्षाभंग झाला.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

हम्म्म.... यापुढे सगळ्या पायलट व को-पायलट फक्त महिलाच असाव्यात काय ? पुरुश शिंचे काय अपघात करतात ना ?

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

actions not reactions..!...!

एक जरी महिला प्यासेंजर असेल तर पायलट व कोपायलट महिलाच असाव्यात आणि सगळी विमाने गुलाबी रंगाने रंगवल्या जावीत.

खरे तर पृथ्वीवर तरी पुरुषांचे अस्तित्व का असावे, नै का? किंवा महिलांचेही? पुरुषांना मंगळावर आणि महिलांना शुक्रावर पाठवावं तरच काय ते बरं होईल पृथ्वीचं.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

माहिष्मती साम्राज्यं अस्माकं अजेयं

म्हणजे शेवटी पृथ्वी फक्त तृतीयपंथीयांचीच Wink

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

actions not reactions..!...!

इंडीड!

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

माहिष्मती साम्राज्यं अस्माकं अजेयं

वरचा संवाद वाचुन महात्मा गांधीजींच्या खूनानंतर दंगली उसळु नयेत "मारेकरी हिंदू होता" हे कोणीतरी (बहुधा पटेलांनी) घाईने जाहिर केले होते ते आठवले.

गवि, ते प्रश्न दुर्दैवी आहेत याबद्दल पूर्ण सहमत!

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

- ऋ
-------
लव्ह अ‍ॅड लेट लव्ह!

वरचा संवाद वाचुन महात्मा गांधीजींच्या खूनानंतर दंगली उसळु नयेत "मारेकरी हिंदू होता" हे कोणीतरी (बहुधा पटेलांनी) घाईने जाहिर केले होते ते आठवले.

भारतातील मुसलमानांचे ग्रह तेव्हा खरोखर उच्चीचे असावेत. चुकूनमाकून जर मारेकरी मुसलमान असता तर काय झाले असते त्याची कल्पना करवत नाही.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

माहिष्मती साम्राज्यं अस्माकं अजेयं

+१
जे तत्कालीन महाराष्ट्रीय ब्राह्मणांचे झाले तेच Sad

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

- ऋ
-------
लव्ह अ‍ॅड लेट लव्ह!

याला मात्र जोरदार असहमती आहे.

गांधीवधोत्तर जी जाळपोळ झाली ती किती ठिकाणी झाली? जिथे झाली तिथे किती तीव्रतेने झाली? याचा अदमास घेतला तर असे विधान करावेसे वाटणार नाही. गांधीहत्येच्या वेळी फाळणीचे दंगे अजून पुरतेपणी शमले नव्हते. मुसलमानविरोधी भावनाही तीव्र होती. हिंदूमुसलमान दंगेही दणक्यात झाले होते, प्रचंड कापाकापी अन बलात्कार वगैरे सर्व सुरू होते. अशा परिस्थितीत जर एका मुसलमानाने गांधीजींना ठार मारले असते तर भारतातल्या मुसलमानांचे अजूनेक हत्याकांड झाले असते. मराठी ब्राह्मणांना जे सहन करावे लागले त्यापेक्षा अनेक पटींनी भोगावे लागले असते.

ब्राह्मणांची घरे जाळली इ.इ. खरेच आहे, पण हे झाले ते फक्त पश्चिम महाराष्ट्रात. त्यातही दक्षिण महाराष्ट्रात तीव्रता बरीच जास्त होती असे वाटते. याबद्दल अधिक विदा असेल तर द्यावा. माझ्या मते मराठी ब्राह्मणांवरती तुलनेने खूपच कमी अत्याचार झालेले आहेत.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

माहिष्मती साम्राज्यं अस्माकं अजेयं

ओह! अजूनही अनेकांमध्ये असलेला कडवटपणा बघुन माझा समज झाला होता बर्‍याच ब्राह्मणांनाही मारलं वगैरे होतं. माहितीबद्दल आभार!

अवांतराबद्दल गविंची माफी मागतो नी थांबतो.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

- ऋ
-------
लव्ह अ‍ॅड लेट लव्ह!

हे विमान/विमान कंपनी इन्शुअर्ड-रीइन्शुअर्ड असणारच हे उघड आहे. परंतु अपघाताला जबाबदार काय - विमानातील दोष, पायलटची चूक, पायलटचे गुन्हेगारी वर्तन, Act of God स्वरूपाचे हवामानातील बदल - अशा सर्व संभाव्य कारणांमुळे बोइंग कंपनी, लुफ्तहान्सा आणि तिची जर्मनविंग्ज ही दुय्यम कंपनी अशांच्या मध्ये उतारूंच्या वारसांना विम्याची रक्कम देण्याच्या संदर्भामध्ये उत्तरदायित्व कसे वाटले जाईल?

अशा अपघातांमध्ये विम्याची रक्कम कोटयवधि डॉलर्समध्ये मोजली जाईल म्हणून हा प्रश्न.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

दुर्दैवी घटना. को-पायलटचा वंश कोणता, हे प्रश्नही दुर्दैवीच.

सकाळी टीव्हीवर बातम्या पाहिल्या. त्यात को-पायलटच्या परिचितांचं त्याच्याबद्दलचं म्हणणं काय हे सांगत होते, डिप्रेशनचा त्रास होत होता पण नोकरी मिळाल्यावर तो खूष झाला होता, इ. पायलट, को-पायलटांच्या मनस्थितीची चौकशी करावी, करत राहावं अशा प्रकारची चर्चाही सुरू होती.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

---

सांगोवांगीच्या गोष्टी म्हणजे विदा नव्हे.

अदिती "पण" म्हणजे नक्की काय कळलं नाही.

डिप्रेशनचा त्रास होत होता पण नोकरी मिळाल्यावर तो खूष झाला होता, इ.

.

खूष झाला = त्याचं डिप्रेशन पळालं ???
की
खूष झाला = नोकरी त्याला आवडत होती?

.
नक्की काय म्हणायचय? कारण जर खूष झाल = डिप्रेशन पळालं असा निष्कर्ष (तू नसशीलही) पण कोणी चर्चेत काढत असेल तर तो चूकीचा आहे. फक्त नोकरी मिळाल्याने मेंदूतील केमिकल लोचा बरा होत नाही.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

Every time, every time it rains, it's gonna rain pennies from heaven
Don't you know every cloud contains lots of pennies from heaven
You'll find your fortune's fallin', baby, all over the town
Be sure, be sure that your umbrella is upside down

डिप्रेशनमुळे कदाचित तो अगदी कोषात गेला असेल, आणि या नोकरीमुळे मूड थोडा सुधारला असेल. विकार पूर्ण बरा झाला नाही तरी काही लक्षणं कमी झाली असतील.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

---

सांगोवांगीच्या गोष्टी म्हणजे विदा नव्हे.

पायलट व को-पायलटची नियमित अंतराने शारीरिक तपासणी करण्याचा नियम असेलच. या लोकांवरील ताण, त्यांचे मानसिक आरोग्य याचीही तपासणी होत असणार. अगदी घाईघाईने निष्कर्ष काढायचा झाला आणि ही को-पायलटने केलेली आत्महत्या आहे असे म्हणायचे ठरवलेच तरी आपल्याबरोबर इतक्या निरपराध लोकांना मरण पत्करायला लावायचे इतके विवेकाचे भान ज्याचे सुटले आहे, तो माणूस 'विमान उडवायला लायक' कसा ठरला? या प्रकारच्या तपासण्या पुरेशा संवेदनशील नाहीत, किंवा त्या तितक्या गंभीरतेने पार पाडल्या जात नाहीत असे म्हणायचे काय?

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

उसके दुष्मन है बहुत, आदमी अच्छा होगा

अपडेट: कोपायलटने ९:३१ वाजता ऑटोपायलट सेटिंग बदलून ३८००० फुटांऐवजी तिथे १०० फूट अशी व्हॅल्यू दिली (१०० फूट ही ऑटोपायलट सिस्टीमची उंची मेंटेन करण्याची किमान अ‍ॅक्सेप्टेबल व्हॅल्यू आहे)

त्यानंतर फ्लाईट मॉनिटरिंग सिस्टीम वापरुन त्याने विमान खालच्या दिशेने (डिसेंडिंग मोड) झुकवून टाकले.

"जमिनीवर आदळण्यापूर्वी विमानाचा उतरण्याचा रेट कमी झाला होता" ही कालची नोंद यामुळे आणखीच पटते. जमिनीजवळ आल्यावर (१०० फुटांनजीक) ऑटोपायलटने हा रेट नियंत्रित करुन आवरत आणला असावा. तरीही ते जमिनीपर्यंत पोहोचलं म्हणजे ते शेवटचं अंतर पूर्णपणे मुद्दामहून कोपायलटतर्फे डाईव्ह करुन पार केलं गेलं.

शिवाय आतून उत्तर येत नसल्याने कॉकपिट दरवाज्याच्या बाहेरुन मुख्य पायलटने इमर्जन्सी कोड पंच केलेला असूनही आतून कोपायलटने ५ मिनिटांचा ओव्हरराईड ऑप्शन घेऊन त्याला बाहेरच कोंडून घातलं हेही आता शोधातून जाहीररित्या बाहेर आलं आहे. म्हणजे कोपायलट बेशुद्ध, मृत नव्हता, व्यवस्थित शुद्धीत होता.

विमानात तांत्रिक बिघाड नसावा. कारण फ्लाईट मॉनिटरिंगचा डिसेंडिंग मोड घेणे आणि ५ मिनिटे ओव्हरराईड ऑप्शन घेणे या दोन्ही गोष्टी आपोआप किंवा तांत्रिक बिघाडाचा भाग म्हणून होणे अशक्य.

पॅसेंजर्सचे किंचाळण्याचे आवाज शेवटच्या काही क्षणांमधेच सुरु झाले. याचा अर्थ डिसेंट रेट जास्त असला तरी पॅसेंजर्सना क्रॅशची शंका येण्याइतका नव्हता. जेव्हा विमान जमिनीच्या जवळ पोचलं तेव्हाच खाली पर्वत पाहून आणि थेट तिकडे रोख असलेला पाहून लोक किंचाळू लागले. मॅन्युअल आणि कंट्रोल्ड डिसेंटच यातून सिद्ध होतो.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

या घटनेनंतर काही विमानकंपन्यांनी कॉकपिटमध्ये किमान दोन व्यक्ती हव्यात असा रूल इम्प्लिमेंट करायला सुरूवात केली आहे

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

- ऋ
-------
लव्ह अ‍ॅड लेट लव्ह!

इथेच अनु राव आणि इतरांनी हा उपाय सुचवला होता. लॉजिकली बरा वाटतोय उपाय. तो क्रू मेंबर आत बसला तरी तो आतल्या पायलटला (अशी केस झाल्यास) ओव्हरपॉवर करेल आणि डोअर रिलीज करेल इतपत मजबूत असला तरच उपयोग. नाजूक हवाईसुंदरी आत बसवली आणि याने दार लॉक करुन टाकले तर बिचारी तीही अडकायची आतच.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

सहमत त्यापेक्षा कॉपपिटच्या बाहेत काही महत्त्वाची कंट्रोल्स ठेवायला हवीत ज्याचा अ‍ॅक्सेस फक्त पायलट व को-पायलटलाच नी तो ही फक्त बाह्य मदतीनेच असेल (म्हणजे ठराविक पासकोड टाकल्यावर मग कंट्रोल टॉवरने परवानगी दिल्यावर तो अ‍ॅक्टिव्हेट होईल). हा कंट्रोल कॉपकीट सिग्नलला ओव्हरराईड करेल.

दुसरी एक शंका: कॉकपीटच्या बाहेरही कंट्रोल टॉवरशी संपर्काची सुविधा का दिली जात नाही?

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

- ऋ
-------
लव्ह अ‍ॅड लेट लव्ह!

खरोखर जर इमर्जन्सी कोड कोणाकडुनही एंटर केला गेला तर तत्काळ विमानाचे संपुर्ण नियंत्रण आपोआप जवळच्या उपलब्ध असलेल्या नियंत्रण कक्षाकडे गेले पाहिजे, एक्झाक्टली लाइक रिमोट कंट्रोल सिस्टम. पायलट, कोपायलट, प्रवासी, एअर होस्टेस कोणीही तो कोड एंटर करु शकेल अशी व्यवस्था हवी.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

actions not reactions..!...!

पायलटला विमानाचा फिजिकल अ‍ॅक्सेस असतो. कंट्रोल्स रीमोटने टेकओव्हर केले तरी शेवटी एका पायलटने विमानासह आत्मघात करायचा असंच ठरवलं तर तो हजार प्रकारे करु शकतो. या प्रकाराला "तांत्रिक" उपाय फार मर्यादितच असतील.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

हे तर आहेच आणि रीमोट कंट्रोल ताब्यात घेउन कोणी विमान पाडले तर. पुर्ण ऑटोमेशन केले तरी कोणी कोड मधेच बदल केले तर....
हे सर्व अन्-एन्डींग आहे.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

त्यामुळे जुना काळच बरा. विमानांची भानगडच नाही. अर्र पण मग वैदिक विमानांचे काय? त्यांच्यात अपघात कसे टाळत असतील?

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

माहिष्मती साम्राज्यं अस्माकं अजेयं

जमिनीवरचे कंट्रोलर ऋषी लिंगदेहाने, सूक्ष्मदेहाने माथेफिरुग्रस्त विमानात थेट प्रवेश करुन तिथल्या पार्‍याखालची उष्णता कमी करत असत. मग विमान हळूहळू लँड करीत असे.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

हम्म, रोचक शक्यता आहे खरी.

पण मुळात वैदिक विमानात माथेफिरू म्लेच्छ घुसणे अशक्यच असावे अशी रचनाही त्रिकालद्रष्ट्यांनी केलेली असावीच, नै?

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

माहिष्मती साम्राज्यं अस्माकं अजेयं

अजोंना विचारा. ऐसी वर तेच एकमेव आहेत जे वैदिक विमानातुन प्रवास करुन आले आहेत. Blum 3

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

अगदी अगदी. खालपासून वरतक. Wink

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

माहिष्मती साम्राज्यं अस्माकं अजेयं

अजोंना विचारा.

काय संबंध? आम्ही तो पक्ष सोडला म्हटलं ना? सध्याला मी हळूहळू पुरोगामी बनायचा प्रयत्न करत आहे. सहकार्य करा.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

सही: पुरोगाम्यांना लॉजिक माफ असतं.

आयडी बदलून "कानफाट्या" असा आयडी घेऊन पाहा काही फरक पडतो का ते. Wink

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

लिंगदेह हा नेहमी सूक्ष्मच का असतो?

(याची पुढील आवृत्ती म्हणजे मायक्रोसॉफ्टदेह काय?)

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

याची पुढील आवृत्ती म्हणजे मायक्रोसॉफ्टदेह काय?

असेच नाही. सन्देह म्हणूनही असतो की. हिंदीत.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

याची कल्पना बहुधा आफ्रिका वा तत्सम खंडांमध्ये नसल्यामुळे असेल काय?

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

माहिष्मती साम्राज्यं अस्माकं अजेयं

प्रत्येकाच्या हृदयात एक अंगुष्टीमात्र नीळा पुरुष असतो. अन होय लिंगदेह सूक्ष्मच असतो Smile
या नीळ्या पुरषांची कधी कॉन्फरन्स होते का?
त्यांना ट्रेनींग कोण देतं.
त्यांच्या पैकी एखाद्या पुरषाला नीळ्या रंगाचा वैताग आल्याने खाकी झालाय व कोणाच्या तरी हृदयात अंगुष्ठीमात्र खाकी पुरुष आहे असे का होत नाही ? Smile

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

Every time, every time it rains, it's gonna rain pennies from heaven
Don't you know every cloud contains lots of pennies from heaven
You'll find your fortune's fallin', baby, all over the town
Be sure, be sure that your umbrella is upside down

प्रत्येकाच्या हृदयात एक अंगुष्टीमात्र नीळा पुरुष असतो.

हे नव्यानेच ऐकतोय.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

हे मुक्तानंदांच्या चितशक्तीविलास मध्ये दिलेले आहे.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

Every time, every time it rains, it's gonna rain pennies from heaven
Don't you know every cloud contains lots of pennies from heaven
You'll find your fortune's fallin', baby, all over the town
Be sure, be sure that your umbrella is upside down

निळ्या पुरुषा प्रमाणे गुलाबी स्त्री पण असते का प्रत्येकाच्या हृदयात?

मुलांचे कपडे निळेच हा प्रघात भारतातुनच युरोपात एक्पोर्ट झालेला दिसतोय.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

हाहाहा ROFL

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

Every time, every time it rains, it's gonna rain pennies from heaven
Don't you know every cloud contains lots of pennies from heaven
You'll find your fortune's fallin', baby, all over the town
Be sure, be sure that your umbrella is upside down

चला, म्हणजे चोरट्या युरोपियनांनी हीही प्रथा आपल्याकडूनच चोरली तर...किती चोर असावं माणसानं, खरंच त्याला लिमिट नाही.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

माहिष्मती साम्राज्यं अस्माकं अजेयं

साकातकार आहे . साधनात üतययाला ये णारा नीलüकाश महणजे च परमातमयाचा साकातकार. ü÷ : आ

आतमा ते जोरपाने आहे . िचदाकाशात नील रं गाचया रपात आतमयाचा साकातकार होतो.

का कसा िभनन असतो? उdर : साकातकारात जो नील üकाश असतो, तो अतयंत ते जसवी व चकचकीत अ

या शब्दात काही नोंदी सापडल्या.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

Every time, every time it rains, it's gonna rain pennies from heaven
Don't you know every cloud contains lots of pennies from heaven
You'll find your fortune's fallin', baby, all over the town
Be sure, be sure that your umbrella is upside down

कुठल्या कूट भाषेत काय लिहिले आहे?

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

माहिष्मती साम्राज्यं अस्माकं अजेयं

कुठल्या कूट भाषेत काय लिहिले आहे?

पालीसारखी वाटली ब्वॉ. (तीच ती, बदनामीवाली.)

(अवांतर: फारच ब्वॉ सोज्वळ तुम्ही. मशारनिल्हे प्रश्न आम्ही 'काय, आज सकाळीसकाळीच?' असा विचारला असता.)

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

आयडी बघून प्रश्न विचारतो ओ. रियाबाई म्हणजे छप्पन्न सत्संगांची सात्विकता साठवून बसलेल्या असल्याने त्यांना असे विचारणे बरोबर वाटत नाही.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

माहिष्मती साम्राज्यं अस्माकं अजेयं

थिअरम -सत्संग करणार्‍यांना फक्त सात्विकच बाजू असते
करॉलरी - दारु पिणे सात्विक नाही => सत्संग करणारे दारु पित नाहीत.

केवढी अ‍ॅझम्पशन्स आहेत बॅट्या. मोठे व्हा Wink

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

Every time, every time it rains, it's gonna rain pennies from heaven
Don't you know every cloud contains lots of pennies from heaven
You'll find your fortune's fallin', baby, all over the town
Be sure, be sure that your umbrella is upside down

अहो तुम्ही म्हणजे आलोकनाथची महिला आवृत्ती आहात. दारूही तुम्ही स्पर्ष केल्यावर बिगर अल्कोहोल होत असेल. ROFL

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

माहिष्मती साम्राज्यं अस्माकं अजेयं

शी!!!! आलोक नाथ Wink ROFL
_____
ए बॅट्या थोडक्यात दारुचा के एल पी डी होतो बोल की रे ROFL
देवा ही स्तुती आहे की निंदा Wink
_______
तुझी मुक्ताफळं ऐकून खरच डिप्रेशनचा अ‍ॅटॅकच आलाय. ROFL आज माझ्या शुक्रवारचा पार के एल पीडी झालाय Wink

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

Every time, every time it rains, it's gonna rain pennies from heaven
Don't you know every cloud contains lots of pennies from heaven
You'll find your fortune's fallin', baby, all over the town
Be sure, be sure that your umbrella is upside down

निळ्या पुरुषा प्रमाणे गुलाबी स्त्री पण असते का प्रत्येकाच्या हृदयात?

शक्य नाही!

हृदयात एक जरी गुलाबी स्त्री असेल, तर दुसरीही गुलाबी स्त्रीच असली पाहिजे - निळा (किंवा खाकी, किंवा कोणत्याही रंगाचा, किंवा रंगहीन/वासहीन/चवहीन) पुरुष चालणार नाही (शिवाय हृदयही गुलाबी रंगवले पाहिजे), असा (अल्-)कायदा आहे ना?

----------------------------------------------------------------------------------------------------

'टेस्टलेस'चा अर्थ हवा तसा लावावा.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

प्रत्येकाच्या हृदयात एक अंगुष्टीमात्र नीळा पुरुष असतो. अन होय लिंगदेह सूक्ष्मच असतो

हे मुक्तानंदांच्या चितशक्तीविलास मध्ये दिलेले आहे.

रियाताई.. हे असं बोलणं अगदी ओळखीचं वाटतंय. तुम्ही .. त्याच का ? किंवा त्या, .. किंवा त्या ?

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

तुम्ही असं बोलून त्यांची रया घालवू नका.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

माहिष्मती साम्राज्यं अस्माकं अजेयं

Smile गवि मी आता १० मिनीटात पलोमा नाव घेतेय. कोण रिया? ROFL

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

Every time, every time it rains, it's gonna rain pennies from heaven
Don't you know every cloud contains lots of pennies from heaven
You'll find your fortune's fallin', baby, all over the town
Be sure, be sure that your umbrella is upside down

विविधतेत एकतेचा अनुभव जर कुणाला घ्यायचा असेल तर तुमचे प्रतिसाद वाचावेत असे सुचवेन.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

माहिष्मती साम्राज्यं अस्माकं अजेयं

ROFL हाहाहा Smile मस्त मस्त!!!

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

Every time, every time it rains, it's gonna rain pennies from heaven
Don't you know every cloud contains lots of pennies from heaven
You'll find your fortune's fallin', baby, all over the town
Be sure, be sure that your umbrella is upside down

आणखी अपडेटः

खालील बातमीनुसार कोपायलट डिप्रेशन / मानसिक आजाराच्या ट्रीटमेंटसाठी किंवा त्या कारणाने पूर्वी एकदा दीड वर्षाच्या ब्रेकवर गेला होता. दीड वर्षं मानसिक आजाराची सुटी म्हणजे नगण्य आजार म्हणता येणार नाही. त्याने नंतर शारिरीक आणि मानसिक चाचण्या पास केल्या. पण उड्डाणासाठी लागणार्‍या मानसिक फिटनेसच्या चाचण्या कितपत खोलवर असतात याविषयी मला शंका आहे. शिवाय डिप्रेशन किंवा तत्सम काही आजार हे हरक्षणी हुकमी डिटेक्ट होत असतील का? कधी चांगली तर कधी वाईट अशा फेजेस असू शकतात ना या आजाराच्या? सायकॉलॉजीतली माहिती असलेल्या कोणीतरी स्पष्ट करावे अशी विनंती. शिवाय डिप्रेशन हा आजार विमान कोसळवण्याच्या मनस्थितीकडे घेऊन जाऊ शकतो तात्विक दृष्ट्या? त्यामधे मनुष्य हताश होऊन निष्क्रिय होतो ना?

http://uk.reuters.com/article/2015/03/27/uk-france-crash-co-pilot-idUKKB...

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

डीप्रेशन असलेल्या माणसानी आत्महत्या करणे समजू शकते पण आपल्या बरोबर १५० लोकांना मारण्याचा प्रकार म्हणजे विकृतीच आहे आणि पुन्हा त्यात थंड डोक्यानी केलेले प्लॅनिंग असावे असे वाटते. ह्यात बाकीच्या जगाबद्दल असलेला राग, किंवा कुठल्या तरी कल्ट चा प्रभाव असली काहीतरी कारणे असावीत.
असे काहीतरी मुद्दामच करायचा जर काही उद्देश मनात असेल तर मानसिक चाचण्या ठरवुन क्रॅक करणे विषेश नाही.

अश्या गोष्टींवर प्रोसिजर अजुन कडक करुन कींवा बदलुन कीती नियंत्रण आणता येइल हे सांगणे अवघड आहे.
रेल्वे ड्रायव्हर नी मुद्दाम सिग्नल तोडले, बस चालवणार्‍यानी बस मुद्दामच दरीत लोटली तर काय करणार?

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

संतोष माने, स्वारगेट , पुणे.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

ह्या धाग्याशी डायरेक्ट संबंध नाही. पण गविंनी डीप्रेशन बद्दल लिहीले होते म्हणुन.

पुर्वीच एक लेख कम थियरी वाचली होती. त्यानुसार जी लोक थोड्याफार प्रमाणात डीप्रेसस्ड असतात ती कठीण समयी उत्तुंग नेतृत्व आणि कर्तृत्व दाखवतात. ह्या उलट जी माणसे फार पॉझीटीव्ह विचार करणारी आणि छोट्या गोष्टीत लीडरशीप स्कील्स दाखवणारी असतात ती अत्यंत अवघड प्रसंगी कच खातात.

आता आठवत नाही पण एका अभ्यासानुसार शाळा कॉलेज मधे थोडीफार प्रसिद्ध, शिक्षकांची आवडती, सर्वांशी मिळुन मिसळुन असणारी, कुठल्यातरी खेळाच्या टीमची कॅप्टन वगैरे असणारी मुले ही पुढील आयुष्यात अवघड प्रसंग आला तर एकदम घाबरुन जातात आणि काढता पाय घेतात. ह्या उलट शाळेत कमी प्रसिद्ध, कमी मिसळणारी वगैरे मुले वेळ पडली तर सर्वांना बरोबर घेउन अश्यक्यप्राय घटना घडवतात.

http://www.wsj.com/articles/SB10001424053111904800304576474451102761640
http://www.salon.com/2011/08/02/first_rate_madness_interview/

ऐसीवर काही लिहायचे तर आधी जालावरुन लिंक वगैरे शोधुन द्यायला लागतात नाहीतर ऐसीकरांना ही बाई फेकतीय असेच वाटते Sad

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

शिवाय डिप्रेस्ड लोकांना वास्तवाची जास्त चांगली जाण असते; किंबहुना वास्तवाची चांगली जाण असलेले लोक डिप्रेस्ड असण्याची शक्यता जास्त असते असे म्हणता येईल.
बहुतेक फेल्ड आदर्शवादी डिप्रेस्ड असतात; पण म्हणून निव्वळ डिप्रेस्ड असलेला माणूस असे करेल असे वाटत नाही. असे करायचे ठरवणे, संधीची वाट पाहणे, ती मिळाल्यावर चटकन व आत्मविश्वासाने त्वेषविरहीत हालचाल करणे इत्यादी गोष्टी तीव्र डिप्रेशनवाला माणूस करु शकत नाही. माईल्ड डिप्रेशनवाले इतकी टोकाची कृती करण्यासाठी एकतर तात्कालिक कारण पाहिजे किंवा आणखी काही मानसिक आजार.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

इतक्या गंभीर अपघाताच्या धाग्यावर पांचट बोलणे टाळावे. संपादकांनी ते सर्व इतरत्र हलवावे.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

सही: पुरोगाम्यांना लॉजिक माफ असतं.

सहमत आहे.

सतत तेच-ते लेखन होत आहेच; पण दीडशे लोकांच्या मृत्युबद्दल जिथे चर्चा होत्ये तिथेच असला पांचटपणा बघून संवेदनशीलतेबद्दल शंका येते.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

---

सांगोवांगीच्या गोष्टी म्हणजे विदा नव्हे.

सॉरी.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

Every time, every time it rains, it's gonna rain pennies from heaven
Don't you know every cloud contains lots of pennies from heaven
You'll find your fortune's fallin', baby, all over the town
Be sure, be sure that your umbrella is upside down

+१

..सॉरी..

..तेच तेच लिहिण्याच्या मुद्द्यावरः मान्य..एअर क्रॅश फॉलोअप धागे फार झाले बहुधा ऐसीवर माझ्याकडून. आता नाही काढत.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

तेच तेच = असंवेदनशील म्हणायचय अदितीला. तुमच्याबद्दल नाही गवि.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

Every time, every time it rains, it's gonna rain pennies from heaven
Don't you know every cloud contains lots of pennies from heaven
You'll find your fortune's fallin', baby, all over the town
Be sure, be sure that your umbrella is upside down

एअर क्रॅश फॉलोअप धागे काढत रहा, गवि. माध्यमांमध्ये ज्या चर्चा होतात त्या सगळ्या पूर्णपणे समजतातच असं नाही.

तेच-ते (आणि कंटाळवाणं) बोलणं म्हणजे जे खरडवह्यांमध्ये केलं असतं तर बरं, असं वाटावंसं बोलणं.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

---

सांगोवांगीच्या गोष्टी म्हणजे विदा नव्हे.

प्रतिसादक आणि प्रतिसादाचा टोन पाहून हिंसोत्तर हजयात्रेचा प्रत्यय येतोय. बहुत रोचक.

बाकी प्रतिसादाला मायनस ४ श्रेणी मिळाल्याचे पाहून लै आनंद झाला. एकतर इतकी निगेटिव्ह श्रेणी पाहिली नाय आजवर आणि शिवाय शमूदेत कंड सारे ROFL

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

माहिष्मती साम्राज्यं अस्माकं अजेयं

>>हिंसोत्तर हजयात्रेचा

शतमूषकभक्षणोत्तर असं हवं

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

--------------------------------------------
ऐसीव‌रील‌ ग‌म‌भ‌न‌ इत‌रांपेक्षा वेग‌ळे आहे.
प्रमाणित करण्यात येते की हा आयडी एमसीपी आहे.

पाने