आजचे दिनवैशिष्टय - ५
व्यवस्थापक: 'आजचे दिनवैशिष्टय' ह्या सदरात दिसणाऱ्या नावे आणि घटनांवरून वेगवेगळे धागे सुरू करण्याऐवजी एकाच सलग धाग्यात वेळोवेळी ही माहिती नोंदत गेल्यास तिला अधिक सुबकपणा येईल असे वाटून श्री. कोल्हटकर यांनी असा पहिला धागा सुरू केला होता. आधीच्या धाग्यावर १००+ प्रतिसाद झाल्याने वाचकांच्या सोयीसाठी नवा भाग काढत आहोत.
---
"५३७ : इस्तंबूल येथील हाजिया सोफिया या प्रख्यात धर्मस्थळाचे बांधकाम पूर्ण."
ह्या नावाच मूळ ग्रीक उच्चार 'हागिया सोफिया' (संत सोफिया) आहे असे वाटते. ऑटोमनांच्या ताब्यामध्ये कॉन्स्टँटिनोपल मे १४५३ मध्ये पडल्यावर शहराचे नाव बदलून इस्तन्बूल असे करण्याते आले. हागिया सोफिया ह्या चर्चची 'आया सोफ्या' नावाची मशीद झाली आणि त्याच नावाने ती आता ओळखली जाते. अतातुर्कच्या काळात ह्या मशिदीचे स्वरूप पुनः बदलून ती एक निधर्मी इमारत झाली. तिचा आकार, इतिहास आणि ऑटोमनपूर्वकालीन चित्रे आणि अन्य अवशेष/वस्तु इत्यादींमुळे ती इस्तन्बूलमधील एक प्रमुख प्रवासी आकर्षण आहे.
आभार
आभार. दुरुस्ती केली आहे.
- चिंतातुर जंतू
"ही जीवांची इतकी गरदी जगात आहे का रास्त |
भरती मूर्खांचीच होत ना?" "एक तूच होसी ज्यास्त" ||
मॉडर्न ग्रीकमधील गॅमा या
मॉडर्न ग्रीकमधील गॅमा या अक्षराचा उच्चार हा इंग्लिशमधील जी या अक्षरासारखा नसून वाय सदृश असतो. मूळचे प्राचीन ग्रीक स्पेलिंग आहे Ἁγία Σοφία. त्यात Ἁ पाहिले तर A च्या अगोदर एक अपॉस्ट्रॉफीसारखे चिन्ह आहे त्याचा अर्थ आहे रफ ब्रीदिंग, अर्थात अभिजात ग्रीक भाषेच्या अॅटिक बोलीत ह-सदृश स्वराचे अस्तित्व. अन्य बोलींत हा प्रकार दरवेळी असेच असे नाही. त्यामुळे प्राचीन अॅटिक व अॅटिकवर आधारित अलेक्झांडरोत्तर काळातील कोईन ग्रीकप्रमाणे पाहिले तर हागिआ सोफिआ हा उच्चार योग्य आहे खरा. परंतु नंतर ग्रीकमध्ये झालेल्या उच्चारबदलांना अनुसरून आया सोफिया हा उच्चारच योग्य आहे. (आधुनिक ग्रीक गॅमाचा उच्चार ग होत नाही.) अजून बारीकपणे बघावयाचे झाले तर आया सोफ़िया हा उच्चार आहे. संस्कृतातील उदात्त-अनुदात्त-स्वरित सारखी ग्रीकमध्ये असलेली अॅक्यूट-ग्रेव्ह-सर्कमफ्लेक्स ही त्रिस्तरीय पॉलिटोनिक सिस्टिम १९८२ साली बदलून त्याजागी एकच एक मोनोटोनिक सिस्टिम बनवण्यात आली. उच्चार अर्थातच त्याच्या बर्याच अगोदर बदलले होते.
तेव्हा प्राचीन उच्चारांप्रमाणे पाहिल्यास हागिआ सोफिआ आणि आधुनिक उच्चारांप्रमाणे पाहिल्यास आया सोफ़िआ हे योग्य आहे.
माहिष्मती साम्राज्यं अस्माकं अजेयं
एका डाकुमेंट्रीत आया सोफिया
एका डाकुमेंट्रीत आया सोफिया असाच उच्चार ऐकला आहे.
आधी रोटी खाएंगे, इंदिरा को जिताएंगे !
(अवांतर - फक्त स्वाक्षरीशी संबंधित, मूळ प्रतिसादाशी असंबद्ध)
This comment has been moved here.
२९ डिसेंबर - गावसकर
१९८३ - २८ डिसेंबरला ३० वे शतक मारून ब्रॅडमनचा विक्रम मोडलेल्या गावसकर ने २९ तारखेला द्विशतक पूर्ण केले ("याचे द्विशतक व्हायला पाहिजे" म्हणून टीव्हीसमोर बसलेल्या माझ्या आजोबांनी ते झाल्यावर वाजवलेल्या टाळ्या अजूनही लक्षात आहेत
).
http://www.espncricinfo.com/ci/engine/match/63355.html
रिचर्ड्सने गावसकर ला उद्देशून म्हंटलेले "Man, it don't matter where you come in to bat, the score is still zero!" हे फेमस वाक्य याच कसोटीतील. सलामीऐवजी या मॅच मधे चौथ्या नंबरवर गावसकर आला. पण अंशुमान गायकवाड व वेंगसरकर शून्यावर बाद झाल्याने तो आला तेव्हा स्कोअर ०/२ असाच होता :).
गोव्यातील सार्वमत
थेट लोकांनाच काय पाहिजे ते विचारून त्याप्रमाणे निर्णय घेणे, ही खरी लोकशाही. परंतु, त्यात असंख्य व्यावहारिक अडचणी आहेत. म्हणूनच लोक आपले प्रतिनिधी निवडून विधीमंडळात पाठवतात आणि ते प्रतिनिधी लोकांच्यातर्फे निर्णय घेतात.
तरीही, काही ठराविक प्रसंगी थेट लोकांनाच निर्णय घेण्याचे अधिकार बहाल केले होते, हे नुकत्याच स्कॉटलंडमध्ये झालेल्या मतदानाने आपण पाहिले आहे.
स्वतंत्र भारतात असे किमान ३ प्रसंग घडलेले आठवतात -
एक, जुनागडातील लोकांना भारतात सामील व्हायचे की पाकिस्तानात, हे विचारले गेले. निकाल भारताच्या बाजूने लागला.
दोन, अगदी असेच सिक्किमातही घडले आणि सिक्किम भारतात विलीन झाले.
तीन, १६ जानेवारी १९६७ रोजी, गोव्यात सार्वमत घेतले गेले. पर्याय होते महाराष्ट्रात सामील व्ह्यायचे की नाही? सुमारे ३४००० मतांच्या फरकाने, गोवेकरांनी महाराष्ट्रात सामील व्ह्यायला नकार दिला.
गोव्यात जे झाले ते (गोव्यासाठी आणि महाराष्ट्रासाठीही) योग्य की अयोग्य ह्याची चर्चा होत राहील. पण दिवस, अगदी दिनवैशिष्ठ्यात येण्याएवढा नसला, तरी महत्वाचाच!
आभार! माहिती १६ तारखेच्या
आभार! माहिती १६ तारखेच्या दिनवैशिष्ट्यात समाविष्ट केली आहे
- ऋ
-------
लव्ह अॅड लेट लव्ह!
जे झाले ते बरेच झाले. गोवा
जे झाले ते बरेच झाले. गोवा महाराष्ट्रात राहिला असता तर केवळ दारु प्यायला गोव्याला जाणार्या अनेक पियक्कड लोकांना इतक्या स्वस्तात दारु मिळाली नसती.
फील्ड मार्शल करिअप्पा
"१९४९ : स्वातंत्र्यानंतर फिल्डमार्शल के.एम. करिअप्पा यांनी पहिले लष्करप्रमुख म्हणून सूत्रे स्वीकारली. हा दिवस लष्करदिन म्हणून ओळखला जातो."
करिअप्पा जेव्हा स्वतन्त्र भारताच्या सैन्याचे प्रमुख म्हणून नेमले गेले तेव्हा त्यांचा हुद्दा 'जनरल' असा होता. फील्ड मार्शल हा हुद्दा त्यांना सन्मानाचे प्रतीक म्हणून त्यांच्या ८७व्या वाढदिवसाला १९८६ मध्ये देण्यात आला. (माणेकशा हे दुसरे फील्ड मार्शल - त्यांना हा हुद्दा १९७१ च्या युद्धानंतर - आणि करिअप्पांच्या बराच आधी - १९७२ मध्ये देण्यात आला.
फील्ड मार्शल (तसेच अॅडमिरल ऑफ द फ्लीट आणि मार्शल ऑफ द एअर फोर्स) हे हुद्दे बढतीच्या सार्वत्रिक ओळीत येत नाहीत. सर्वोच्च सेनाप्रमुखाला जनरल असा हुद्दा असतो. फील्ड मार्शल हा हुद्दा विशेष मान म्हणून काही निवडक अधिकार्यांना मिळतो.
एक अन्य छोटी दुरुस्ती. 'हेलसिंकीमधे अॉलिंपिक कांत्स्यपदक मिळवणारे खाशाबा जाधव (१९२६)'. 'कांत्स्य' नाही, कांस्य.
करिअप्पा मूळचे उदगीरचे होते
करिअप्पा मूळचे उदगीरचे होते असे उदगीरवासी मानतात. त्यांचा उदगीरशी मोठी ऋणानुंबंध होता हे मात्र खरे. मी ज्या लिंगायत मठात अभ्यास करी त्यातले वृद्ध लोक त्यांच्या आठवणी सांगत.
http://www.thehindu.com/2001/06/21/stories/10211045.htm
असाच एक ऋणानुबंध.
सही: पुरोगाम्यांना लॉजिक माफ असतं.
करिअप्पा कूर्ग (कर्नाटक)
करिअप्पा कूर्ग (कर्नाटक) येथील होते असे विकीपिडिया म्हणतो. माडिकेरी - कूर्ग येथे त्यांचा पुतळा आहे.
--------------------------------------------
ऐसीवरील गमभन इतरांपेक्षा वेगळे आहे.
प्रमाणित करण्यात येते की हा आयडी एमसीपी आहे.
त्यांचे खानदान वैगेरे उदगीरचे
त्यांचे खानदान वैगेरे उदगीरचे असावे.
सही: पुरोगाम्यांना लॉजिक माफ असतं.
कोडावा-कूर्गी
कोडावा अथवा कूर्गी लोक हे ब्रिटिशांनी तयार केलेल्या लढाऊ आणि बिनलढाऊ वर्गीकरणात लढाऊ असे गणले जात आणि त्यामुळे ब्रिटिश-हिंदुस्तानी सैन्यामध्ये त्यांची मोठी संख्या होती. वरच्या अधिकारी वर्गामध्येहि ते मोठया प्रमाणात असत. करिअप्पा आणि थिमय्या हे दोघेहि सेनाप्रमुख कूर्गी होते. करिअप्पांचे चिरंजीव के.सी.करिअप्पा हे हवाई दलात अधिकारी होते आणि निवृत्तीच्या वेळी त्यांचा हुद्दा एअर-मार्शलचा होता. (१९६५ च्या युद्धामध्ये के.सी. युद्धकैदी म्हणून पाकिस्तानच्या ताब्यात होते. हे अयूबखानांना कळले तेव्हा जुन्या ब्रिटिश सैन्यातील संबंधामुळे त्यांनी थोरल्या करिअप्पांकडे निरोप पाठवून मुलाला सोडून देण्याची तयारी दर्शविली होती पण 'माझा मुलगा प्रथम हवाई अधिकारी आहे आणि मगच माझा मुलगा आहे. अन्य युद्धकैदी सुटतील तेव्हाच तो सुटेल' असा उलट जबाब करिअप्पांनी पाठविला होता हे तेव्हा वाचल्याचे आठवते.
१९७१च्या निवडणुकांमध्ये स्वतन्त्र पक्षाचे उमेदवार म्हणून करिअप्पांनी मुंबईमधून लोकसभेची निवडणूकहि लढविली होती पण त्यामध्ये त्यांना यश आले नाही.
(त्यांच्या उदगीर संबंधाचा उल्लेख मात्र कोठे जाणवलेला नाही.)
वान्सी कॉन्फरन्स
'१९४२ : वान्सी परिषदेत नाझींनी ज्यूंच्या प्रश्नावरचा अखेरचा उपाय म्हणजे शिरकाण करण्याचा (फायनल सोल्यूशन) निर्णय घेतला.'
ह्याच विषयावर 'Conspiracy' नावाचा एचबीओ-निर्मित चित्रपट यूटयूबवर येथे उपलब्ध आहे.
आजच्या दिनवैशिष्ट्यात कवी
आजच्या दिनवैशिष्ट्यात कवी चांगदेव १२९६ अशी एंट्री दिसत आहे. हे चांगदेव कोण? ज्ञानेश्वरांना सीनियर (१४०० वर्षे फेम) असले तर ते १२९६ मध्ये जन्मणे शक्य नाही, कारण स्वतः ज्ञानेश्वरांचाच जन्म १२७५ सालचा आहे, रैट्ट? तर हे कोण आहेत याबद्दल माहिती हवी आहे.
माहिष्मती साम्राज्यं अस्माकं अजेयं
दुरुस्ती
१२९७मधल्या मृत्यूऐवजी १२९६मधला जन्म दिनवैशिष्ट्यात पडला होता. आता दुरुस्ती केली आहे.
- चिंतातुर जंतू
"ही जीवांची इतकी गरदी जगात आहे का रास्त |
भरती मूर्खांचीच होत ना?" "एक तूच होसी ज्यास्त" ||
धन्यवाद.
धन्यवाद.
माहिष्मती साम्राज्यं अस्माकं अजेयं
१९३५...
..........
'ब्रिटिश इंडिया अॅक्ट' की 'गव्हर्मेंट ऑफ इंडिया अॅक्ट'?
('अॅक्ट'न्वये की 'अॅक्ट'अन्वये की 'अॅक्टा'न्वये की 'अॅक्टा'अन्वये वगैरे किरकोळ खुसपटे तूर्तास सोडून देऊ.)
म्हणजे नेमके काय घडले?
(भारताला की हिंदुस्थानला हे किरकोळ खुसपट तूर्तास सोडून देऊ.)
माफक विकी/गूगलपांडित्यावरून असा ग्रह होतो, की केवळ 'पुढेमागे जमेल तसे कधीतरी (ब्रिटिश हिंदुस्थान आणि हिंदुस्थानातील विविध संस्थाने यांचे) एक संघराज्य (फेडरेशन) स्थापण्याच्या उद्दिष्टा'पुरती (आणि 'ते उद्दिष्ट साध्य करण्याच्या दृष्टीने प्रयत्नरत राहण्या'पुरती) त्या अॅक्टात तरतूद होती, इतकाच काय तो त्या अॅक्टाचा नि 'संघराज्या'चा संबंध असावा, नि हे 'संघराज्य' (संस्थानिकांच्या हटवादीपणामुळे म्हणा आणि/किंवा इतर राजकीय कारणांमुळे म्हणा आणि/किंवा तदनंतर सुरू झालेल्या दुसर्या महायुद्धामुळे म्हणा) प्रत्यक्षात (निदान स्वातंत्र्यपूर्व काळात नि या अॅक्टाखाली तरी) कधीही अस्तित्वात आले नसावे. (चूभूद्याघ्या.)
कोणी (गूगलविक्येतरपंडित (की गूगलविकिपंडितेतर? चूभूद्याघ्या.)) यावर प्रकाश पाडू शकेल काय? आगाऊ धन्यवाद.
"ब्रिटिश संघराज्यातल्या एका
"ब्रिटिश संघराज्यातल्या एका घटकाचा दर्जा मिळाला" असं असावं.
म्हणजे वेल्स, स्कॉटलंड इ. च्या बरोबरीचा दर्जा असावा. सगळा कारभार केंद्रशासित पद्धतीने न होता काही प्रमाणात स्वायत्तता या प्रांतांना आहे - तशी भारतालाही मिळाली.
हा अर्थातच अंदाज आहे. जाणकारांच्या प्रतिसादाच्या प्रतीक्षेत.
********
It is better to have questions which don't have answers, than having answers which cannot be questioned.
...
एक तर (माझ्या मर्यादित माहिती नि आकलनानुसार) ब्रिटन हे 'संघराज्य' नाही. (व्हॉटेवर द्याट मे मीन.) पण त्यापेक्षासुद्धा...
...बोले तो, ऑस्ट्रेलिया, कॅनडा यांना जे भाग्य लाभले नाही, ते महत्भाग्य हिंदुस्थानास लाभले? हे बरोबर वाटत नाही.
स्कॉटलंड, वेल्स या ब्रिटनच्या वसाहती/अंकित प्रदेश नव्हते. हिंदुस्थान ही वसाहत होती. स्वतःच्या प्रशासनात असलाच, तर अतिमर्यादित से असलेली. उलटपक्षी, ऑस्ट्रेलिया, कॅनडा ही ब्रिटिश डॉमिनियने होती / अजूनही आहेत. (बोले तो, नॉमिनली अंकित, परंतु बहुतांशी स्वायत्त.)
(हिंदुस्थानला - रादर, ब्रिटिश हिंदुस्थानची सक्सेसर स्टेट्स भारत आणि पाकिस्तान यांना - अधिकृत डॉमिनियन स्टेटस माझ्या अंदाजाने ऑगस्ट १९४७मध्ये स्वातंत्र्याबरोबरच मिळाले; चूभूद्याघ्या.)
१९३५च्या अॅक्टान्वये ब्रिटिश हिंदुस्थानाच्या प्रांतांतील जनतेस आपापली प्रांतीय सरकारे निवडण्याचा मर्यादित अधिकार मिळाला, हे मानू शकतो. (पुन्हा, माझ्या मर्यादित माहिती नि आकलनानुसार; चूभूद्याघ्या.) (बादवे, नेहरू पंतप्रधान कधीपासून नि कोणत्या अॅक्टाखाली झाले? स्वातंत्र्याच्या बर्याच अगोदर अशी कल्पना आहे, परंतु १९३५मध्ये बहुधा नसावेत; येट्टनदर चूभूद्याघ्या.) परंतु फेडरेशन होण्याबद्दल समजले नाही. (त्यामुळे, जाणकारांच्या प्रतीक्षेत आहेच.) असो.
कॅनडा
कॅनडा डॉमिनियन आहे असा माझाही समज होता. पण हापिसातील कॅनेडियन कलीग ठामपणाने नाही म्हणतो ("आधी होतो, आता नाही"). त्याला घटना, लोकशाही, ब्रिटिश साम्राज्य ई बद्दल बर्यापैकी माहिती आहे, त्यामुळे अगदीच ठोकून दिलेले विधान वाटत नाही. कदाचित डॉमिनियन ची आणखी डायल्यूटेड अवस्था असावी ऑस्ट्रेलिया वगैरेंपेक्षा. त्याच्या ध्वजातही युनियन जॅक नाही.
येथे पहा
ह्या कल्पना समजून घेण्यासाठी येथे पहा.
धन्यवाद
धन्यवाद. ते वाचले व ही आणखी एक लिन्क पाहिली
http://en.wikipedia.org/wiki/Flags_of_the_British_Empire
१९६५ पर्यंत कॅनडाच्या झेंड्यावर युनियन जॅकही होता असे दिसते. सध्याच्या झेंड्यावर नाही. ६५ मधे काहीतरी बदल झालेला असावा.
मलाहि असेच वाटते
'न'वी बाजू ह्यांच्यासारखेच माझे मत आहे.
ह्या कायद्याचे अधि़कृत नाव the Government of India Act, 1935 असे होते. भारतीय संविधान पुष्कळ बाबतीत ह्याच्यावरच बेतले आहे. ह्या कायद्यामागची मूळ प्रेरणा एक केन्द्र आणि अनेक प्रान्त ह्यांवर आधारलेले संघराज्य - federation - निर्माण करण्याची होती. कायद्यातील खालील हेतु पहा:
दोन्ही पातळीवर सभागृहे आणि त्यांना जबाबदार मन्त्रिमंडळे, दोन्ही पातळीवर अंमलबजावणीचे वेगवेगळे विषय, दोन्ही पातळीवरचे प्रमुख - केन्द्रामध्ये गवर्नर जनरल आणि प्रान्तांमध्ये गवर्नर - ह्यांनी त्यांच्यासाठी राखीव विषय वगळता अन्य विष्यांमध्ये मन्त्रिमंडळांच्या सल्ल्याने चालणे अशा तरतुदी ह्या कायद्यामध्ये होत्या आणि भारताचे संविधान त्याच पायावर रचलेले आहे.
ह्या कायद्यानुसार प्रान्तांमध्ये १९३७ मध्ये निवडणुका होऊन लोकनियुक्त सरकारेहि अस्तित्वात आली. मुंबईमध्ये बा.गं.खेर मुख्यमन्त्री झाले पण केन्द्रामध्ये निर्माण व्हावयाचे फेडरेशन काही अटी पूर्ण न झाल्याने अस्तित्वात येऊ शकले नाही. १९३९ साली गवर्नर जनरलने हिंदुस्तानी जनतेला विश्वासात न घेता हिंदुस्तानला दोस्त बाजूला दाखल केले ह्या मुद्द्यावरून अशा सरकारांनी राजीनामे दिले आणि हा सर्व प्रयोग निद्रित अवस्थेमध्ये गेला.
आभार
सविस्तर माहितीकरिता धन्यवाद.
मुंबई
>>मुंबईमध्ये बा.गं.खेर मुख्यमन्त्री झाले
स्वा. सावरकरांची ब्रिटिशांनी अंदमानातून सशर्त मुक्तता केली होती. रत्नागिरी जिल्हा सोडायचा नाही. राजकारणात भाग घ्यायचा नाही इत्यादि अटी घातलेल्या होत्या. निवडून आलेल्या नव्या सरकारने स्वा. सावरकर यांची स्थानबद्धतेतून संपूर्ण बिनशर्त मुक्तता* केली. त्याला ब्रिटिश सरकारने आक्षेप घेतला नाही.
*(अवांतर: सो मच फॉर काँग्रेस-सावरकर-आकस एटसेटरा)
--------------------------------------------
ऐसीवरील गमभन इतरांपेक्षा वेगळे आहे.
प्रमाणित करण्यात येते की हा आयडी एमसीपी आहे.
पृथ्वीचा नैसर्गिक उपग्रह - ९ फेब्रु. १९१३
<१९१३ - पृथ्वीचा एक नैसर्गिक उपग्रह उल्कारूपात नष्ट.>
पृथ्वीला चंद्राशिवाय अजून एक वा अधिक नैसर्गिक उपग्रह आहेत असे ह्यापूर्वी कधी वाचनात आले नव्हते म्हणून कुतूहलातून जालावर अधिक शोध घेतला. ९ फेब्रुवारी १९१३ ह्या दिवशी कॅनडा आणि पूर्वोत्तर अमेरिकेच्या आकाशात अनेक उल्का उत्तर-पश्चिम दिशेकडून दक्षिण-पूर्वेकडे गेलेल्या अनेक लोकांनी पाहिल्या. ह्या दुर्मिळ घटनेचा अर्थ लावण्याचा प्रयत्न अजून चालू आहे आणि त्यावर बरेच साहित्य जालावर उपलब्ध आहे. उदाहरणार्थ येथे पहा.
रा.रा.बाळाजीपंत जनार्दन भानू
रा.रा.बाळाजीपंत जनार्दन भानू यांचे वाढदिवसाबद्दल अभिनंदन.
नानांत नाना, फडणीस नाना
इतर नाना, करिती तनाना
माहिष्मती साम्राज्यं अस्माकं अजेयं
बेट्टी फ्रीडनचं 'फेमिनीन
या पुस्तकाबद्दल ऐकले आहे. एखाद उतारा अन्य पुस्तकात वाचलेला आहे.
उमगले स्वप्नांचे मर्म मला, ना हा परका ना अपुला
कोणी मृत्युलोकीचा योगी, अशीच लहर म्हणून आला
असाच पळभरासाठी टेकला, शेकत गर्भाची धुनी...
'फेमिनीन मिस्टीक' हे पुस्तक
'फेमिनीन मिस्टीक' हे पुस्तक स्त्रीवादाचा इतिहास, सर्वसामान्य अमेरिकन स्त्रियांचं आयुष्य कसं होतं याचा आढावा म्हणून चांगलं आहे. १९६३ साली ते प्रकाशित झालं तेव्हा त्याचं जितपत महत्त्व होतं तितपत आता आहे असं मला वाटत नाही. तरीही, अजूनही काही स्त्रिया बुद्धीला चालना मिळेल अशी काहीही कामं करत नाहीत, नोकरी-व्यवसायही नाही, त्यांच्या वर्तनाकडे सहानुभूतीपूर्ण नजरेने का पहावं इतपत विचार मला या पुस्तकातून मिळाला. वाचायला सहजसोपं आहे, खासकरून अमेरिकेत सार्वजनिक ग्रंथालयांमध्ये सहज मिळेल.
---
सांगोवांगीच्या गोष्टी म्हणजे विदा नव्हे.
जागतिक मातृभाषा दिन
२१ फेब्रुवारी १९५२ रोजी, बंगाली हीदेखिल (उर्दूच्या जोडीने) पाकिस्तानची राष्ट्रभाषा करावी, ह्या मागणीसाठी केलेल्या निदर्शनात अनेक विद्यार्थ्यांचा पोलीसांनी केलेल्या गोळीबारात मृत्यू झाला.
त्याचे पर्यवसान पुढे स्वतंत्र बांगलादेश होण्यात झाले.
युनेस्कोतर्फे हा दिवस जागतिक मातृभाषा दिन म्हणून साजरा होतो.
वा! उत्तम माहीती.
वा! उत्तम माहीती.
उमगले स्वप्नांचे मर्म मला, ना हा परका ना अपुला
कोणी मृत्युलोकीचा योगी, अशीच लहर म्हणून आला
असाच पळभरासाठी टेकला, शेकत गर्भाची धुनी...
.
.
उमगले स्वप्नांचे मर्म मला, ना हा परका ना अपुला
कोणी मृत्युलोकीचा योगी, अशीच लहर म्हणून आला
असाच पळभरासाठी टेकला, शेकत गर्भाची धुनी...
जनार्दन बाळाजी मोडक
आजच्या १९ एप्रिलच्या दिनवैशिष्टयामध्ये 'पुण्यस्मरणां'मध्ये पुढील नोंद आहे:
<अप्रसिद्ध संस्कृत ग्रंथ प्रकाशित करणाऱ्या 'काव्येतिहाससंग्रह' या मासिकाचे एक संस्थापक-संस्थापक जनार्दन बाळाजी मोडक (१८४८).>
ही नोद पूर्ण चुकलेली आहे असे वाटते. जनार्द्न बाळाजी मोडक ह्यांचा मृत्यु १८९० मध्ये झाला, १८४८ मध्ये नाही. (तारीख १९ एप्रिल का अन्य कोणती ते मला माहीत नाही. १८४८ बहुधा त्यांचे जन्मवर्ष असू शकेल पण त्याचीहि मला माहिती नाही.) 'काव्येतिहाससंग्रह' हया मासिकाशीहि त्यांचा काही संबंध नव्हता. १८८५च्या पुढेमागे निर्णयसागर छापखान्याने 'काव्यमाला' आणि 'काव्यसंग्रह' अशी दोन मासिके छापण्यास सुरुवात केली होती. त्यांपैकी 'काव्यसंग्रहा'चे संपादन जनार्द्न बाळाजी मोडक करीत असत. प्रारंभानंतर थोडयाच वर्षांमध्ये १८९० साली ते वारले. त्यांच्यानंतर वामन दाजी ओक ह्यांच्याकडे 'काव्यसंग्रहा'चे संपादन देण्यात आले.
'काव्येतिहाससंग्रह' ही वेगळीच मालिका आहे. मला निश्चित वर्ष माहीत नाही पण १८८०च्या पुढेमागे विष्णुशास्त्री चिपळूणकरांनी (बहुधा) का.ना. साने ह्यांच्याबरोबर 'काव्येतिहाससंग्रह' मालिका सुरू केली. कालान्तराने दोघांमध्ये मतभेद झाले आणि विष्णुशास्त्र्यांनी 'काव्येतिहाससंग्रह' सोडले. नंतर का.ना.सानेच ती चालवत असत आणि त्यांचेच नावाने आपल्यास तिचा परिचय आहे. (तदनंतर हे 'रावबहादुर' झाले आणि रा.ब.का.ना.साने ह्या नावाने ते अधिक परिचित आहेत.
(स्रोत - चित्रावसंपादित अर्वाचीन चरित्र कोश.)
होय, लिहिताना गडबड झालेली
होय, लिहिताना गडबड झालेली आहे.
मराठी विकीपिडीयावर ही नोंद सापडली.
---
सांगोवांगीच्या गोष्टी म्हणजे विदा नव्हे.
माझीहि गडबड
वरील लिहितांना माझीहि थोडी गडबड झाली असे दिसते. मी माझी माहिती चित्रावसंपादित 'अर्वाचीन चरित्र कोश' ह्याच्या पृ.८७ वर जी माहिती वामन दाजी ओक ह्यांच्याबाबत आहे तीमधून घेतली आहे आणि तेथे मी वर लिहिलेला मजकूर आहे.
चित्रावांची माहिती थोडी दिशाभूल करणारी दिसते. ज.बा.मोडक खरोखरच काही वर्षे 'काव्येतिहास संग्रहा'चे काम करीत होते कारण त्यांच्या संपादकत्वाचा स्पष्ट उल्लेख असलेली आणि का.इ.सं.मधील चार पुस्तके १८८३, १८८६, १८८७ आणि १८८९ मधली मला डीएलआय मध्ये मिळाली आहेत.
अमूर्त गणितज्ञ, सैद्धांतिक
अमूर्त गणितज्ञ याचा अर्थ कळाला नाही. शोध घेतला असता अमूर्त गणित म्हणजे abstract alegebra असं समजलं. गणिताची या नावाची शाखा असते आजच समजलं.
आधी रोटी खाएंगे, इंदिरा को जिताएंगे !
आजचं गूगल डूडल एमीच्या
आजचं गूगल डूडल एमीच्या वाढदिवसानिमित्त बनवलेलं आहे.
---
सांगोवांगीच्या गोष्टी म्हणजे विदा नव्हे.
डूडल दिसलं नाही, म्हणून
डूडल दिसलं नाही, म्हणून शोधल्यावर हे मिळालं. भारतात न दिसण्याचं कारण कळलं नाही. असो.
नॉयथर/नॉइथरचं सैद्धांतिक भौतिकशास्त्रातलं काम फार फार महत्त्वाचं आहे. प्रत्येक सममिती (symmetry) ही कोणत्या तरी अक्षय्यतेच्या नियमाला (conservation law) कारणीभूत असते अशा आशयाचे तिचे प्रमेय फार प्रसिद्ध आहे. उदाहरणार्थ, आपण स्थानमापनाचा सुरुवातबिंदू (origin) कुठे ठरवू ह्यावर भौतिकशास्त्राचे नियम अवलंबून नाहीत, ही गोष्ट रेषीय संवेग अक्षय्यतेच्या (conservation of linear momentum) नियमाला कारणीभूत आहे. तशाच प्रकारे कालमापनाचा सुरुवातबिंदू कुठेही घेतला तरी फरक पडत नाही हे उर्जा अक्षय्यतेच्या नियमाशी निगडित आहे. हे मी अर्थातच फारच ढोबळमानानं लिहिलं आहे.
एमीबद्दल आज व्होक्समध्ये लेख
एमीबद्दल आज व्होक्समध्ये लेख आलाय.
Emmy Noether revolutionized mathematics — and still faced sexism all her life
---
सांगोवांगीच्या गोष्टी म्हणजे विदा नव्हे.
तार आणि १८५७चा उठाव
दि. २४ मार्च १८५५ : आग्रा आणि कलकत्ता यांदरम्यान तारसेवा सुरू झाली.
ही सेवा ब्रिटिशांच्या दृष्टीने अगदी योग्य वेळी सुरू झाली असे म्हणता येईल. हिच्यामुळे १० मे १८५७ ला उठाव झाल्याझाल्या त्याची वार्ता तारेने दूरदूरपोहोचू शकली आणि शिपायांच्या विरोधात तयारी करण्यास ब्रिटिशांना पुरेसा वेळ मिळाला. ११ मे रोजी शिपाई दार ठोठावीपर्यंत तारवाले तारावर तारा पाठवीत होते. ही सोय नसती तर कदाचित पारडे शिपायांच्या बाजूने झुकू शकले असते. कृतज्ञ ब्रिटिशांनी त्यांचे हे योगदान मानले आणि त्यांच्या नावे जुन्या दिल्लीत ओबेलिस्क उभारला त्याचे हे छायचित्रः
तार ऑफिसने बजावलेल्या ह्या कामगिरीचे वर्णन येथे वाचा
आज महादेवी वर्मा यांची जयंती
मधुर मधुर मेरे दीपक जल!
युग युग प्रतिदिन प्रतिक्षण प्रतिपल;
प्रियतम का पथ आलोकित कर!
.
सौरभ फैला विपुल धूप बन;
मृदुल मोम-सा घुल रे मृदु तन;
दे प्रकाश का सिंधु अपरिमित,
तेरे जीवन का अणु गल-गल!
पुलक-पुलक मेरे दीपक जल!
.
सारे शीतल कोमल नूतन,
माँग रहे तुझको ज्वाला-कण;
विश्वशलभ सिर धुन कहता 'मैं
हाय न जल पाया तुझमें मिल'!
सिहर-सिहर मेरे दीपक जल!
.
जलते नभ में देख असंख्यक;
स्नेहहीन नित कितने दीपक;
जलमय सागर का उर जलता;
विद्युत ले घिरता है बादल!
विहंस-विहंस मेरे दीपक जल!
.
द्रुम के अंग हरित कोमलतम,
ज्वाला को करते हृदयंगम;
वसुधा के जड़ अंतर में भी,
बन्दी नहीं है तापों की हलचल!
बिखर-बिखर मेरे दीपक जल!
.
मेरे निश्वासों से द्रुततर,
सुभग न तू बुझने का भय कर;
मैं अंचल की ओट किये हूँ,
अपनी मृदु पलकों से चंचल!
सहज-सहज मेरे दीपक जल!
.
सीमा ही लघुता का बन्धन,
है अनादि तू मत घड़ियाँ गिन;
मैं दृग के अक्षय कोशों से -
तुझमें भरती हूँ आँसू-जल!
सजल-सजल मेरे दीपक जल!
.
तम असीम तेरा प्रकाश चिर;
खेलेंगे नव खेल निरन्तर;
तम के अणु-अणु में विद्युत सा -
अमिट चित्र अंकित करता चल!
सरल-सरल मेरे दीपक जल!
.
तू जल जल होता जितना क्षय;
वह समीप आता छलनामय;
मधुर मिलन में मिट जाना तू -
उसकी उज्जवल स्मित में घुल-खिल!
मदिर-मदिर मेरे दीपक जल!
.
प्रियतम का पथ आलोकित कर!
- महादेवी वर्मा
Every time, every time it rains, it's gonna rain pennies from heaven
Don't you know every cloud contains lots of pennies from heaven
You'll find your fortune's fallin', baby, all over the town
Be sure, be sure that your umbrella is upside down
जागतिक मोदी दिन
१ एप्रिलनिमित्त आज जागतिक मोदी दिन साजरा होत असल्याचे कुठेकुठे वाचले. त्याचा उल्लेख अाजच्या दिनवैशिष्ट्यांमध्ये का नाही?
भारतात आयकराची सुरुवात
१९२२ : भारतात इन्कम टॅक्स कार्यान्वित.
आजच्या दिनवैशिष्टयातील ह्या नोंदीविषयी अजून काही.
आयकर विभागाच्या ह्या संस्थळावर जो इतिहास दिला आहे तो चाणक्यापासून सुरू होतो आणि मधलेअधले सर्व टप्पे वगळून १९२२ पासून पुनः दिसू लागतो.
INCOME TAX ACT, 1922 (11 of 1922) हा १ एप्रिल १९२२ ह्या दिवसापासून अमलामध्ये आला पण तत्पूर्वी सुमारे ६० वर्षे काही ना प्रकारची आधुनिक आयकरवसूली होतच होती. ह्या संदर्भात मी एका अन्य संस्थळावर २०१० म्॑ध्ये लिहिलेली टीप उतरवत आहे. संपूर्ण टिपेचे भाषान्तर करण्याचा त्रास न घेता ती मुळातूनच देत आहे.
The creator of that Act, James Wilson, who was the Finance Member of the Viceroy's Council, was sent to India for this express purpose. He came to India in 1859 and was dead within 8 months of arrival but left behind, as his creation, Act XXXII of 1860. The following extract about him is taken from the Wikipedia entry on James Wilson at http://en.wikipedia.org/wiki/James_Wilson_(UK_politician)
"In August 1859 Wilson resigned these offices and his seat in parliament to sit as the financial member of the Council of India. He was sent to India to establish the tax structure, a new paper currency and remodel the finance system of India after the revolt of 1857. However, he was in office only a year before he died. In 1860 he refused to leave the stifling summer heat of Calcutta, contracted dysentery and died in August of that year, aged 55.
Strangely enough, even though he contributed greatly to the financial set-up of the British empire in India, he lay buried unknown at a cemetery at Mullick Bazar in Kolkata. His grave was discovered in 2007 by CP Bhatia, an assistant commissioner of Income Tax, while he was researching a book on India's tax history. Due to the efforts of CP Bhatia the tombstone was restored by the Christian Burial Board, thus restoring some dignity to a man that was, in a way, one of the forefathers of the Indian Tax structure."
More information on James Wilson, including a photo of his gravestone, may be seen at http://www.telegraphindia.com/1090811/jsp/calcutta/story_11343895.jsp. His other significant contribution is that he founded in 1843 and edited for its first 16 years the journal 'Economist', which continues to be published till date and is one of the influential journals of the modern times. For this, please see http://en.wikipedia.org/wiki/The_Economist >
(ह्यातील संदर्भांपैकी क्र. २ आता 'मृत' आहे.)
१९२२ चा कायदा १९६१ पर्यंत टिकला. त्यावर्षी १९६१ चा नवा आयकर कायदा अस्तित्वात आला आणि तो आजतागायत चालू आहे. तोहि अनेक दुरुस्त्यांमुळे गुंतागुंतीचा झाला असून नव्या युगासाठी नव्या कायद्याची आवश्यकता जाणवत आहे. नवा कायदा नुसता आयकरासाठी मर्यादित नसून सर्वच 'प्रत्यक्ष कर' (आय, संपत्ति आणि देणगी) एकत्र असलेला Direct Taxes Code अशा स्वरूपाचा असेल अशी अपेक्षा आहे. २०१०पासून ह्याची चर्चा चालू आहे आणि काही खर्डाहि तयार आहे असे कळते. मात्र नवा कायदा येईल का आणि काय स्वरूपात येईल ह्याबद्दल सध्या सर्वच तर्क आहेत.
१८६०-१९२२?
पण मग १८६०-१९२२ दरम्यानचे आयकरवसुलीचे काही तपशील उपलब्ध आहेत का? अलीकडे गाजलेल्या 'कॅपिटल इन द ट्वेन्टिफर्स्ट सेंचुरी' ह्या पुस्तकाचा लेखक तोमा पिकेती ह्यानं भारतासाठी संदर्भ म्हणून वापरलेला डेटा १९२२पासूनचाच आहे. तो इथे पाहता येईल. त्यातलं उद्धृत :
- चिंतातुर जंतू
"ही जीवांची इतकी गरदी जगात आहे का रास्त |
भरती मूर्खांचीच होत ना?" "एक तूच होसी ज्यास्त" ||
सी. एल. जेन्किन्स या
सी. एल. जेन्किन्स या न्यूझिलंडच्या अभ्यासकाने विल्सनच्या या १८६०च्या आयकरावर ब्रिटिश टॅक्स रिव्ह्यूच्या २०१२च्या अंकामध्ये एक अतिशय सुंदर लेख लिहिला आहे. तो इथे सापडेल.
********
It is better to have questions which don't have answers, than having answers which cannot be questioned.
धन्यवाद
धन्यवाद आदूबाळ. निबंध उतरवून घेतला आहे. सवडीने वाचतो.
येथे पाहता येईल
ब्रिटिश काळातील हिंदुस्तानचे अर्थकारण ह्या विषयात मी तसा अनभिज्ञ आहे आणि त्यामुळे तुम्हाला अपेक्षित आकडे निश्चित कोठे मिळतील हे मी सांगू शकणार नाही. परंतु archive.org मध्ये Indian Finance असा शोध घेतला तेव्हा काही डझन पुस्तके समोर आली. ही सर्व पुस्तके मुद्राधिकाराबाहेरील असल्यामुळे जुनी (१९व्या शतकाची अखेरीची दशके आणि २०व्याची सुरुवातीची) आहेत. त्यांमध्ये पुरेसा शोध घेतला तर तज्ज्ञ व्यक्तीला निश्चित काही सापडेल. मला स्वतःला पुढील दोन पुस्तके लगेच दिसली. त्यांमध्ये काही आकडे आहेत पण ते कितपत उपयुक्त आहेत मी सांगू शकत नाही.
Causes of Increase or Decrease of Amounts on a Comparison of Revenues and Charges of the Presidency of Bombay for the Year 1856-57 and the Years 1869-70 and 1870-71
Recent Indian Finance by D.E.Wacha
<२ एप्रिल - १७५५ :
<२ एप्रिल - १७५५ : सुवर्णदुर्ग किल्ल्यावर इंग्रजांचा कब्जा.>
सुवर्णदुर्ग जिंकणारा इंग्रज कप्तान विल्यम जेम्स इंग्लंडला परतल्यावर त्यच्या पत्नीने ग्रीनिच येथे 'सेवर्नद्रुग कॅसल' नावाचा इमला उभारला, जो 'संरक्षित वास्तु' म्हणून आजवर उभा आहे. ह्या नावाचा इंग्लंडमधील सेवर्न नदीशी काही संबंध नसून 'सुवर्णदुर्ग'चा तो अपभ्रंश आहे. त्यावर मी 'उपक्रम' मध्ये लिहिलेला लेख येथे आहे.
अभिनंदन?
तुम्ही केलेल्या पाठपुराव्या नंतर ही माहिती तिथे आली आहे काय? गेल्यावेळी वाचल्याचे आठवत नाही. असल्यास अभिनंदन!
इथे आंग्र्यांचा उल्लेख आता चाचे न होता "इन्डिपेन्डन्ट प्रिन्स" म्हणून झालेला दिसतोय
- ऋ
-------
लव्ह अॅड लेट लव्ह!
पुढील पाठपुरावा
आंग्र्यांचा 'चांचे' असा उल्लेख करणे वस्तुस्थितीस धरून नाही अशी एक ईमेल मी सेवर्नद्रुगच्या व्यवस्थापनाला पाठविली होती आणि ह्या सूचनेचा आम्ही पाठपुरावा करू असे उलटे उत्तरहि मला आले होते हे माझ्या मूळ लेखातच लिहिले आहे. आत्ताच सेवर्नद्रुगचे दाखविलेले संस्थळ पाहिले आणि असे दिसले की आंग्रे हे चांचे नव्हते तर त्यांचे स्वतन्त्र नौदल आणि अस्तित्व होते, तत्कालीन ब्रिटिशांना ते चांचे वाटत कारण ते अशा अर्थाचा मजकूर 'Learning Centre' ह्या भागात कान्होजीच्या पुतळ्याच्या चित्रासह आला आहे.
माझ्या ईमेलचा अंशतः तरी परिणाम झाला आहे असे दिसते.
पाठपुरावा केल्याबद्दल
बहुत धन्यवाद.
माहिष्मती साम्राज्यं अस्माकं अजेयं
खूप छान.
खूप छान.
सही: पुरोगाम्यांना लॉजिक माफ असतं.
आजचे चंद्रग्रहण चंद्र उगवला
आजचे चंद्रग्रहण चंद्र उगवला तेव्हा सुटतच आले होते त्याचा निसटता फोटो:-

सुटले ग्रहण ७.२०
(दुर्बिण +मोबाइल)
छान.
छान.
Every time, every time it rains, it's gonna rain pennies from heaven
Don't you know every cloud contains lots of pennies from heaven
You'll find your fortune's fallin', baby, all over the town
Be sure, be sure that your umbrella is upside down
१९९८ : प्रवासी बॅगा बनवणाऱ्या
१९९८ : प्रवासी बॅगा बनवणाऱ्या 'सॅमसोनाईट'च्या पहिल्या भारतीय प्रकल्पाचे उद्घाटन.
ही गोष्ट दिनविशेष म्हणून देण्यासारखी आहे का?
--------------------------------------------
ऐसीवरील गमभन इतरांपेक्षा वेगळे आहे.
प्रमाणित करण्यात येते की हा आयडी एमसीपी आहे.
एल ग्रेको
एप्रिल ७ - पुण्यस्मरण : चित्रकार एल ग्रेको (१६१४)
एल ग्रेकोचे प्रख्यात चित्र 'The Burial of the Count of Orgaz' ऐसीअक्षरेमध्ये येथे पहा
'
अॅप्रिल १६, १८५३ पहिली आगगाडी धावली.
ह्या प्रसंगाचे १८५४ साली छापलेल्या 'लोखंडी रस्त्याचे संक्षिप्त वर्णन', ले. कृष्णशास्त्री भाटवडेकर ह्या पुस्तकातील वर्णन. (त्यातील १६ एप्रिल १८५४ ही तारीख मुद्रणदोषामुळे पडलेली दिसते कारण पुढे दिलेले तिकिटाच्या उत्पन्नाचे आकडे १८ एप्रिल १८५३ पासूनचे आहेत.):
मस्त
मस्त बातमी.
सध्याच्या लोकलचं टाईमटेबल पाहिलं
सध्याच्या लोकलचं टाईमटेबल पाहिलं आत्ताच. हेच अंतर स्लो ट्रेन जवळजवळ तेव्हढ्याच वेळात, ५७ मिनिटात, पार करते. पण अर्थात वाटेत १७ स्टेशनांवर थांबून जाते. (सतरा म्हणजे मोजून सतरा, "सतरा प्रकारच्या प्रतिक्रिया येतात" त्यातलं सतरा नव्हे!). फास्ट ट्रेन ४३ मिनिटं घेते - ७ स्टेशनांवर थांबत जायला.
साधारण ३४ कि.मी. अंतर पार करायला ५५ मिनिटं १८५४ मधे. म्हणजे ३७ कि.मी/तास वेग झाला. आत्ताची फास्ट ट्रेन ७ थांब्यांवर एकूण ११ मिनिटं थांबत असेल (दिड मिनीट / थांबा धरून) तर न थांबता ३२ मिनिटं घेईल. सात वेळा स्लो डाउन / स्पीड अप न करायला लागल्यामुळे अजून एकेक मिनिट वाचलं धरलं तर २५ मिनिटं. म्हणजे १६० वर्षात वेग फक्त दुप्पट झाला??
--------------------------------------------------------------
लिखाण आवडलं तर तारांकीत करायला विसरू नका....
पहिल्या गाडीचाहि थांबा
वरील उतार्यात म्हटल्याप्रमाणे १८५३ची पहिली गाडीहि न थांबता ठाण्यापर्यंत गेली नव्हती. शींवपलीकडे पाणी घेण्यासाठी ती काहीकाळ थांबली होती. तो वेळ वजा केला तर गाडीचा वेग ३७ किमी ताशी ह्याहून थोडा वाढेल.
हो खरं
हो खरं. म्हणजे गाडिला ५५ मिनिटांपेक्षा जरा कमीच वेळ लागला - ५२ धरूया. (मी तुलने करता वेगापेक्षा वेळाचा विचार करतोय). म्हणजे १८५७ ते २०१५ या काळात वेळ ५२ वरनं (माझ्या आधीच्या प्रतिक्रियेत विशद केल्याप्रमाणे) २५ मिनिटांवर आला एव्हढंच? मान्य आहे कि त्या वेळेला जेमतेम ५० लोकं गाडीत असतील आणि आत्ताची गाडी १००० लोकाना नेते. पण म्हणजे गाडीच्या ताकदीत / क्षमतेत खूप फरक पडला, बरोबर? वेगात फक्त ५०% घट झाली.
--------------------------------------------------------------
लिखाण आवडलं तर तारांकीत करायला विसरू नका....
...
इतक्याइतक्या वर्षांत वाहनाचा वेग इतक्याइतक्या पटीने वाढायला पाहिजे, असे काही गणित आहे काय?
नाही म्हणजे, मुंबईची लोकल साधारणतः किती वर्षांनंतर (आइन्ष्टाइनसाहेबाला धाब्यावर बसवून) प्रकाशाहून अधिक वेगाने नाही धावली, तर 'फाउल!' म्हणून बोंबलावे, याचा अंदाज बांधतोय.
(हे ज्यॉमेट्रिक प्रोग्रेशन व्हावे, नाही?)
:-) नाही गणित नाही
बाय द वे, आता २०० मैलाने चारचाकी कोणीतरी वाळवंटात नेउन मिनिटभर चालवली ते उदाहरण नाहि धरतंय मी. सर्वसामान्य माणसाला साठ मैलाने जाणारी चारचाकी घेता येते किंवा जगातल्या बर्याच शहरात विमानाने जाता येते यावरनं म्हणतोय.
तर मी काय सांगत होतो, मुंबईतल्या रेल्वे वाहातुकीचा वेग दिडशे वर्षात फक्त दुपटीनेच वाढला??
--------------------------------------------------------------
लिखाण आवडलं तर तारांकीत करायला विसरू नका....
दुपट्यात असलेली वाहतूक
दुपट्यात असलेली वाहतूक दुपटीच्या वेगाने वाढली हे दिलासा देणारे नाही काय?
बाकी त्या फाउलशी सहमत आहे.
माहिष्मती साम्राज्यं अस्माकं अजेयं
"अहो वेग दुsssप्पट वाढला,
या नीच वृत्तीचा मला देखिल एक अनुभव आहे. वाशीवरून सीएसटीला जाणारी लोकल एकदा पावसाळ्यात तिलकनगर (कि गोवंडी) स्टेशननंतर मधेच कुठेतरी थांबली. अतीव पावसामुळे. पाणी ह्ही वाढलेले. अर्धा तास, एक तास झाला, गाडी हालेना. मग कळले कि गाडी हालणारच नाही. अख्ख्या दिवसासाठी सगळीच सेवा कँसल. मी जाम चिडलेलो. बरेच लोक डूबक्या मारत, पोहत गेले. २-३ तासांनी मी आणि अजून एक माणूस असे दोघेच उरलो. मी शिव्या घालत होतो - या नालायकांना वाशीलाच पूर्वसूचना द्यायला काय झालं होतं? किमान तिलकनगरला सुचना द्यायची, इ इ.
तो दुसरा माणूस लोकलच्या दारात बसलेला. मला सांगू लागला कि मुंबईची लोकल कशी जगातली सर्वात उत्तम सेवा आहे. तिला कशी तोड नाही . याँ. त्यॉं. साल्याला मागून लाथ घालून पाण्यात ढकलून द्यावं वाटलेलं.
सही: पुरोगाम्यांना लॉजिक माफ असतं.
ट्रॅफिक
१८५३ मध्ये एक गाडी गेल्यावर सुमारे २४ तासांनी नंतरची गाडी निघत असावी.
मागे अशीच एक वायफळ तुलना वाचली होती. घोड्यांनी ओढण्याच्या ट्रामला पूर्वी ऑपेरा हाउस (पंप चौक) ते फाऊंटन (हु चौक) चाळीस मिनिटे लागत. आज १२० अश्वशक्तीचे इंजिन असलेल्या बसला त्याच अंतराला साधारण तेवढीच मिनिटे लागतात.
अवांतर : ष्टेषने मोजण्यात काहीतरी गफलत झाली असावी. कारण फाष्ट गाडी ठाण्यापर्यंत सात स्थानकांवर थांबत असल्याचे ऐकिवात नाही. धीमी गाडी सतरा स्थानकांवर थांबते हे मात्र बरोबर आहे.
--------------------------------------------
ऐसीवरील गमभन इतरांपेक्षा वेगळे आहे.
प्रमाणित करण्यात येते की हा आयडी एमसीपी आहे.
फास्ट गाडी सात स्थानकांवर थांबते
फास्ट गाडी सात स्थानकांवर थांबते - वेळापत्रकानुसार. त्यात माटुंग्याचंपण नाव आहे. म्हंटलं असेल सध्या थांबत. <अंतू बर्वा> पण संमजां, सांत स्टेशनें नाही तरीं पांच स्टेशनें पडत असतीलंच? अंतू बर्वा>
--------------------------------------------------------------
लिखाण आवडलं तर तारांकीत करायला विसरू नका....
उद्या २४ तारखेला मानवी
उद्या २४ तारखेला मानवी अंतराळशास्त्रात एक महत्त्वाचा घटक असणार्या हबल टेलिस्कोपला २५ वर्षे होणार आहेत.
त्यानिमित्ताने द हिंदू मधील लेख
- ऋ
-------
लव्ह अॅड लेट लव्ह!
>>पुंजसिद्धांताचा जनक,
>>पुंजसिद्धांताचा जनक, नोबेलविजेता माक्स प्लान्क (१८५८)
मॅक्स प्लँकचा जन्म झाला असण्याची प्रॉबेबिलिटी किती असेल? आज जन्म झाला असल्याची प्रॉबेबिलिटी किती असेल?
--------------------------------------------
ऐसीवरील गमभन इतरांपेक्षा वेगळे आहे.
प्रमाणित करण्यात येते की हा आयडी एमसीपी आहे.
आज जन्म झाला असल्याची
नाव पहा- 'मॅक्स'. आज जन्म होण्याची प्रोबॅबिलिटी मॅक्सिमम होती म्हणून तो आज जन्माला आला.
माहिष्मती साम्राज्यं अस्माकं अजेयं
बॅप्टिस्टा काका
आजचे दिनवैशिष्टय <१९१६: लो. टिळकांनी महाराष्ट्रात होमरूल लीगची स्थापना केली. बॅरिस्टर जोसेफ हे अध्यक्षपदी.> होते.
बॅरिस्टर जोसेफ नाही, बॅरिस्टर जोसेफ बॅप्टिस्टा. ह्यांना बॅप्टिस्टा काका असेहि म्हणत असत.
धन्यवाद
दुरुस्ती केली आहे. धन्यवाद!
- चिंतातुर जंतू
"ही जीवांची इतकी गरदी जगात आहे का रास्त |
भरती मूर्खांचीच होत ना?" "एक तूच होसी ज्यास्त" ||
प्रभादेवी मंदिर
मुंबईच्या प्रभादेवी मंदिराला आज ३०० वर्षे पूर्ण झाली.
http://www.mid-day.com/articles/historic-mumbai-landmark-prabhadevi-mand...
वा! छान बातमी. ते फोटो अतिशय
वा! छान बातमी. ते फोटो अतिशय आवडले.
Every time, every time it rains, it's gonna rain pennies from heaven
Don't you know every cloud contains lots of pennies from heaven
You'll find your fortune's fallin', baby, all over the town
Be sure, be sure that your umbrella is upside down
बाकी काही असो, दिनविशेष
बाकी काही असो, दिनविशेष कॉलमातील आक्सिडेंटलांची नावे तद्भवीकरणाला एकदम फाट्यावर मारून तत्सम पद्धतीने दिल्यामुळे मूळ उच्चार तरी कळतो, त्याबद्दल संबंधितांचे आभार.
माहिष्मती साम्राज्यं अस्माकं अजेयं
>>चित्रकार एदुआर माने
>>चित्रकार एदुआर माने (१८८३)
हा मला आधी धनंजय माने यांचा भाऊबंद वाटला होता. गूगलबाबाला विचारलं तेव्हा कळले की नक्की कोण आहे.
+१
हा शुद्ध हलकटपणा आहे माने...
माहिष्मती साम्राज्यं अस्माकं अजेयं
आजचे दिनवैशिष्ट
आजचे दिनवैशिष्ट बघितले तर पुढील नोंद दिसली.
१८९७ : समलैंगिकतेसाठी कारावास भोगणारा लेखक ऑस्कर वाइल्ड कैदमुक्त.
या महिन्यात आतापर्यंत समलैंगिकतेबाबत पुढील नोंदी सापडल्या.
१९ दिवसात एकाच विषयावर ९ बातम्या हे जरा रोचक वाटले.
एका दृष्टीने हे "धूम्रपान
एका दृष्टीने हे "धूम्रपान अपायकारक आहे" असं सारखं सिनेमात दाखवण्याला इक्विव्हॅलण्ट आहे.
--------------------------------------------
ऐसीवरील गमभन इतरांपेक्षा वेगळे आहे.
प्रमाणित करण्यात येते की हा आयडी एमसीपी आहे.
अपायकारक असे काही वाटले नाही,
अपायकारक असे काही वाटले नाही, पण ऐसीअक्षरेवरील समलैंगिकांबद्दलचा जास्तच जिव्हाळा दिसून आला. समलैंगिकांसाठी काम करणार्या संघटनांना पैशाचे बरेच पाठबळ असते आणि त्याचा वापर करून जनमत अनुकूल व्हावे, असे प्रयत्न मिडियामध्ये जोरात चालू असतात असे बर्याचदा जाणवले आहे. पण ऐसीअक्षरेसारखे संकेतस्थळसुद्धा समलैंगिकांचे मुखपत्र आहे की काय? असे वाटले.
+९९९९९९९९९९९९९
+९९९९९९९९९९९९९
ऐसी अक्षरे हे समलैंगिकांबद्दल
ऐसी अक्षरे हे समलैंगिकांबद्दल सहानुभूती बाळगणारे संस्थळ आहे.
कोणी समलैंगिकतेचा तिरस्कार करू नये आणि समलैंगिक लोकांची आणि त्या विषयाची सवय व्हावी म्हणून परत परत त्यांच्याशी संबंधित बातम्या/दिनविशेष सांगितले जात असावेत.
समलैंगिकता अपायकारक आहे असे म्हटले जात नाहीये.
सिमिलॅरिटी ही सातत्याने एखादी गोष्ट सांगण्याविषयी आहे.
--------------------------------------------
ऐसीवरील गमभन इतरांपेक्षा वेगळे आहे.
प्रमाणित करण्यात येते की हा आयडी एमसीपी आहे.
ऐसी अक्षरे हे समलैंगिकांबद्दल
कशामुळे?
आणि कशामुळे असे वाटले?
सही: पुरोगाम्यांना लॉजिक माफ असतं.
?
बरे मग?
समलैंगिकता एक हार्मोनल
समलैंगिकता एक हार्मोनल इंबॅलँस आहे हा शोध कधी लागला , मांडला गेला , इ इ कधी येणार का त्यांत?
सही: पुरोगाम्यांना लॉजिक माफ असतं.
मुखपृष्ठावर साउंड क्लाउडची एक
मुखपृष्ठावर साउंड क्लाउडची एक प्लेलिस्ट आहे. त्यात 'काळ्या गं मातीचं' नावाच एक गाणं आहे. त्याचे पूर्ण शब्द माहीती आहेत का कोणाला? आठवणीतली गाणी मध्ये नाही मिळालं.
आधी रोटी खाएंगे, इंदिरा को जिताएंगे !
काळ्या गंऽ मातीऽ चं
काळ्या गंऽ मातीऽ चं
कापूसबोंडाऽचंऽऽ
किती गं मोल् , कितीसं मोल ?
कातरवेळेचं डोळ्यांचं डोळ्यांचं
काजळ झाडून जीवाशी बोल्
काळ्या गं रातीचं
काळ्याचं मातीचं पाणीच खोल
फुगीर पंखांची हुंगावी ओल् !
काळ्या गं रातीचा
काळीजभीतीचा
येईल पाहुणा पापण्या खोल्
काळ्या गंऽ प्रीतीचं कितीसं मोल्
- (कवितासंग्रहः दिवेलागण, मौज प्रकाशन)
धन्यवाद!
धन्यवाद!
आधी रोटी खाएंगे, इंदिरा को जिताएंगे !
फुगीर पंखांची हुंगावी ओल् !
>> फुगीर पंखांची हुंगावी ओल् ! <<
आरती प्रभू!
- चिंतातुर जंतू
"ही जीवांची इतकी गरदी जगात आहे का रास्त |
भरती मूर्खांचीच होत ना?" "एक तूच होसी ज्यास्त" ||
ह्म्म्म ४ जून हा "हग योर कॅट
ह्म्म्म ४ जून हा "हग योर कॅट डे" आहे काय. आम्हाला तर मांजरांचे लाड करायला विशिष्ठ दिवस लागतच नाही. मांजर = लाड हेच समीकरण जीन्स मध्ये कोडेड आहे.
पण ४ जून च्या मिमित्ताने, खालचे विनोदी व्यंगचित्र -
६ जून- आजच्या दिवशी १६७४ साली
६ जून- आजच्या दिवशी १६७४ साली सकाळी ८ वाजायच्या सुमारास श्रीशिवराज्याभिषेक झाला. त्या प्रसंगीचे ऑक्झेंडेनच्या डायरीतले वर्णन मुळातूनच वाचावे असे आहे. प्रत्यक्षदर्शी व डीटेल्ड असल्याने अतिशय रोचक झालेले आहे.
माहिष्मती साम्राज्यं अस्माकं अजेयं
इथे द्या.
इथे द्या.
--------------------------------------------
ऐसीवरील गमभन इतरांपेक्षा वेगळे आहे.
प्रमाणित करण्यात येते की हा आयडी एमसीपी आहे.
जालावर सापडले तर पाहतो.
जालावर सापडले तर पाहतो. नपेक्षा ती पाने डकवतो. त्याची डायरी शेप्रेट नाही बहुधा, पण त्यातले रिलेव्हंट उल्लेख वाचलेले आहेत शिवचरित्रांमध्ये.
माहिष्मती साम्राज्यं अस्माकं अजेयं
येथे पहा
१८८३ साली छापलेल्या Gazetteer of the Bombay Presidency Vol XI, Colaba and Janjira ह्याच्या पाने ३६५ ते ३६९ मध्ये ह्या वकिलातीच्या रायगडमधल्या वृत्तान्ताचे वर्णन आहे. अन्य अनेक ठिकाणी थोडयाबहुत फरकाने हेच वर्णन पाहायला मिळते.
महाराष्ट्र शासनाच्या गझेटीअरमध्येहि हे सर्व वर्णन, तसेच रायगडचे अनेक तपशील उत्तम प्रकारे दिलेले आहेत.
धन्यवाद.
धन्यवाद.
माहिष्मती साम्राज्यं अस्माकं अजेयं
अॅलेक्सान्द्र पुश्किन चं नाव
अॅलेक्सान्द्र पुश्किन चं नाव उजवीकडे दिनवैशिट्याच्या यादीत पाहिले आणि त्यांची ही कविता आठवली:
I loved you, and I probably still do,
And for a while the feeling may remain...
But let my love no longer trouble you,
I do not wish to cause you any pain.
I loved you; and the hopelessness I knew,
The jealousy, the shyness - though in vain -
Made up a love so tender and so true
As may God grant you to be loved again.
या सुप्रसिद्ध कवितेचे बरेच इंग्रजी अनुवाद आहेत. एक; दोन; इथे बरेच पर्याय आहेत.
कसे आभार मानू? फारच आवडली.
कसे आभार मानू? फारच आवडली. मनापासून आभार. कवितेचा अनुवाद ही फारच अवघड, जिवावरची गोष्ट. पण मी प्रयत्न करीन तिला मराठी करायचा. फक्त ती आवडल्याबद्दल पुरेशी दाद देता यावी म्हणून.
-मेघना भुस्कुटे
***********
तुन्द हैं शोले, सुर्ख है आहन
मलाही खूप आवडते. आमच्या एका
मलाही खूप आवडते. आमच्या एका काकांनी ती मूळ रशियन मधे एकदा वाचून दाखवली होती.
गंमत म्हणजे, मी स्वत: कशाचा अनुवाद करायला घेतला, तर मूळ संहितेत असेल ते सगळे काही आणायचा प्रयत्न करते. अगदी शब्दशः नाही, पण सुरसते साठी मजकूर टाळणे शक्यतो टाळते. पण या कवितेचे अनुवाद वाचले तर मूळ कवितेच्या जवळ जाणारे अनुवाद थोडे क्लिष्ट वाटले; त्यातल्यात्यात हा स्वैर अनुवाद अधिक भावला.
तुझ्या मराठी अनुवादाच्या प्रतीक्षेत!
प्रभुजी
ही प्रतिक्रिया इथे हलवली आहे.
आधी रोटी खाएंगे, इंदिरा को जिताएंगे !