आजचे दिनवैशिष्टय - ६
व्यवस्थापक: 'आजचे दिनवैशिष्टय' ह्या सदरात दिसणाऱ्या नावे आणि घटनांवरून वेगवेगळे धागे सुरू करण्याऐवजी एकाच सलग धाग्यात वेळोवेळी ही माहिती नोंदत गेल्यास तिला अधिक सुबकपणा येईल असे वाटून श्री. कोल्हटकर यांनी असा पहिला धागा सुरू केला होता. आधीच्या धाग्यावर १००+ प्रतिसाद झाल्याने वाचकांच्या सोयीसाठी नवा भाग काढत आहोत.
आजच्या (१२ जून) दिनवैशिष्टयातील नोंदीनुसार आर्यभट पहिला ह्या गणितज्ञाचा जन्म १२ जून ४७६ ह्या दिवशी झाला. ह्यातील १२ जूनच्या उल्लेखामागे काय आधार आहे हे जाणून घ्यायची उत्सुकता आहे.
आर्यभटाने आपल्या आर्यभटीयाच्या कालक्रियापाद ह्या भागाच्या १०व्या श्लोकामध्ये आपल्या जन्मवर्षाचा उल्लेख असा केला आहे:
त्र्यधिका विंशतिरब्दास्तदेह मम जन्मनोऽतीता:॥
अर्थ - तीन युगपाद आणि साठदा साठ इतकी वर्षे गेली तेव्हा माझ्या जन्मापासून तेवीस वर्षे झाली होती.
ह्याचा अर्थ असा की कलियुगातील ३६०० वर्षे संपली तेव्हा आर्यभट २३ वर्षांचा होता. कलियुगाची गतवर्षे ३६०० म्हणजे इ.स. ४९९. त्यातून २३ कमी केले म्हणजे आर्यभटाचे जन्मवर्ष ४७६ इसवी असे निघते. येथपर्यंत बहुतेक अभ्यासकांचे एकमत दिसते.
आर्यभटाने ह्यापुढे आपला जन्मदिवस अधिक स्पष्टपणे लिहून ठेवलेला नाही आणि अन्य कोणत्या पुराव्यानेहि त्याची काही सूचना मिळत नाही. कलियुगातील ३६०० वर्षे संपली तेव्हा आर्यभट पूर्ण २३ वर्षांचा होता आणि त्याचे २४वे वर्ष प्रारम्भ झाले नव्हते असे शब्दशः मानून त्याचा जन्मदिनांक मार्च २१, ४७६ ह्या दिवशी पडतो असे खालील उतार्यावरून दिसते:
(स्रोत - Introduction - p.xx, Aryabhatiya of Aryabhata ed. Kripa Shankar Shukla, published for The National Commission for the Compilation of History of Sciences in India.)
तेव्हा प्रश्न असा की १२ जून ह्या दिनांकामागे कशी गणना आहे?
(२१ मार्च हा त्याचा जन्मदिनांक हे ठरविण्यामागेही आर्यभटाच्या विधानामध्ये कसलाहि मोघमपणा नाही आणि ते शब्दशः मानले गेले पाहिजे हे गृहीतकृत्य आहेच.)
विश्वासार्ह स्रोत नाही
ह्याबाबत काही कल्पना नाही, परंतु हे मात्र माहीत आहे, की ऐसीवरचं दिनवैशिष्ट्य संकलित करताना सुरुवातीला काही पुरेसे विश्वसनीय नसलेले स्रोत संदर्भ म्हणून वापरले गेले होते. आता ही माहिती नक्की कुठून आली तेदेखील सांगता येत नाही. विश्वासार्ह नसल्यामुळे हा तपशील काढून टाकत आहे.
- चिंतातुर जंतू
"ही जीवांची इतकी गरदी जगात आहे का रास्त |
भरती मूर्खांचीच होत ना?" "एक तूच होसी ज्यास्त" ||
मॅग्ना कार्टा
'शासकसत्ता ही देखील कायद्याने बांधलेली असते, तिचे अधिकार अमर्याद नसतात' हे आजच्या सर्व प्रगत कायदापद्धतींच्या मुळाशी असलेले तत्त्व प्रथम लिखित स्वरूपात उल्लेखिणार्या मॅग्ना कार्टा ह्या जॉन ऑफ इंग्लंड आणि त्याचे उमराव ह्यांच्यामधील करारावर १५ जून १२१५ ह्या दिवशी उभय पक्षांनी सह्या केल्या. त्या घटनेचा आज ८००वा वाढदिवस. ह्या महत्त्वाच्या घटनेचा आजच्या दिनवैशिष्टयामध्ये अवश्य उल्लेख व्हावयास हवा.
अधिक माहिती येथे पहा.
मॅग्ना कार्टाचा उल्लेख
मॅग्ना कार्टाचा उल्लेख करणार्यांकडून त्याचे मूळ संदर्भ कसे दुर्लक्षिले जातात याबद्दल काही रोचक लेख वाचनात आले. हुच्चभ्रूंच्या दोन गटांतील संघर्ष इतकेच त्याचे मूळ स्वरूप आहे. सतराव्या शतकापासून त्याला एक रॅलीइंग क्राय म्हणून पाहणे जास्त सुरू झाले. मूळ लॅटिन वाचायची तसदी कुणी फारशी घेत नसल्याने तेही चालून गेले. शिवाञ सध्याची हस्तलिखित प्रत म्हणून दाखवतात ती मूळ प्रतही नव्हेच- सध्याची प्रत आहे १२९७ ची. अन ती सध्या न सापडलेली/नष्ट झालेली मूळ प्रतही पहिली नव्हेच. जगाच्या बर्याच मोठ्या भागावर इंग्लंडची सत्ता बसल्याने याचा उदोउदो जास्त झाला, इतकेच.
http://www.nytimes.com/2015/06/15/opinion/stop-revering-magna-carta.html
माहिष्मती साम्राज्यं अस्माकं अजेयं
मूळ प्रत कोठली?
माझ्या वरच्या प्रतिसादामध्ये मी कोणती प्रत मूळची आणि कोणती नंतरची ह्यावर काहीहि लिहिलेले नाही. न्यू यॉर्क टाइम्सने उल्लेखिलेली १२९७ ची प्रत ही वॉशिंग्टन डीसी येथील नॅशनल आर्काईजमध्ये आहे आणि मी ती आपल्या डोळ्यांनी पाहिलेली आहे. अशीच एक प्रत कॅनबेरास्थित ऑस्ट्रेलिअन आर्काइ़जमध्ये आहे आणि तीहि मी पाहिलेली आहे. मूळची मॅग्ना कार्टाची प्रत/प्रती ह्याविषयी विस्तृत माहिती जालावर उपलब्ध आहे. ह्या विकिपानावरून दिसते की अगदी मूळच्या, म्हणजे १२१५ सालाच्या चार प्रती इंग्लंडमध्ये आहेत आणि त्यांपैकी केवळ एकीवर (लिंकन कॅथीड्रलमधील) किंग जॉनचे सील आहे.
आम्हा बहुसंख्य अज्ञ जनांना लॅटिन येत नाही हे खरे आहे पण मूळ लॅटिनमध्ये आजच्या संदर्भात आम जनतेवर अन्याय करणारी वाटतील अशी काहीहि कलमे असली तरी' राजाने (शासनसंस्थेने) स्वहस्ते आपल्या अधिकारांचे सीमालेखन करणे ही बाब जगाच्या इतिहासात मॅग्ना कार्टाच्या रूपाने पहिल्यांदा घडली हीहि सर्वमान्य वस्तुस्थिति आहे आणि ह्यामुळेच मी तितकाच उल्लेख आपलया प्रतिसादामध्ये केलेला आहे.
आम्हा बहुसंख्य अज्ञ जनांना
मीही त्यातलाच.
त्याआधीही असे काही घडल्याचा उल्लेख वाचलेला आहे. नीट पाहून सांगतो. वाचलेल्या काही लेखांत मुख्य मुद्दा हाच होता.
माहिष्मती साम्राज्यं अस्माकं अजेयं
सूचनेबद्दल धन्यवाद. ते
सूचनेबद्दल धन्यवाद. ते घालायचं होतं पण वेळेअभावी राहून गेलं आहे.
- चिंतातुर जंतू
"ही जीवांची इतकी गरदी जगात आहे का रास्त |
भरती मूर्खांचीच होत ना?" "एक तूच होसी ज्यास्त" ||
प्रभुजी
मिथुनदांच्या वाढदिवसानिमित्त या गाण्याचा लुत्फ घ्या
आधी रोटी खाएंगे, इंदिरा को जिताएंगे !
प्रभुजी नमस्कार _/\_ बाकी
प्रभुजी नमस्कार _/\_
बाकी कुंतीचा तो कौंतेय तसे मिथुनचे ते मैथुन म्हणावे काय? या हिशेबाने मिथुनचे चाहते नेहमीच मैथुनोत्सुक म्हटले पाहिजेत.
माहिष्मती साम्राज्यं अस्माकं अजेयं
आषाढस्य प्रथमदिवसे/ संस्कृत दिन
काल (१७ जूनला) आषाढाचा पहिला दिवस होता. अधिक मास असला म्हणून काय झालं, आषाढ चालू झालाय! मनातल्या मनात दोन कडवी म्हणून (आणि कालच छत्री हरवल्यामुळे उरलेला दिवस पावसात भिजून) कालचा दिवस साजरा केला मी.
शाळेत पाठ केलेला मंदाक्रांता वृत्ताचा श्लोकः
आणि शांताबाईंच्या आवडत्या भाषांतरातले हे श्लोक:
तो मंदाक्रांतेतला श्लोक
तो मंदाक्रांतेतला श्लोक कुणाच्या भाषांतरातला आहे? शीडी देशमुखांच्या तर नव्हे? कारण त्यांनी समवृत्त भाषांतर केल्याचे माहितीये.
माहिष्मती साम्राज्यं अस्माकं अजेयं
तो माधव ज्यूलियनांचा आहे.
तो माधव ज्यूलियनांचा आहे.
धन्यवाद!
धन्यवाद!
माहिष्मती साम्राज्यं अस्माकं अजेयं
तो श्लोक मेघदूतातील नाही
...आणि तो मेघदूतातीलहि नाही कारण त्याच्याशी समानार्थी एकहि श्लोक मेघदूतामध्ये नाही. तसेहि पाहता 'मंदाक्रांता सरस कविता कालिदासी विलासी' असे कालिदासाने स्वतःच लिहिणे हे संस्कृत कवींच्या स्वतःविषयी लिहिण्याच्या ज्ञात पद्धतींना धरून नाही.
येस, नेमका तशा अर्थाचा श्लोक
येस, नेमका तशा अर्थाचा श्लोक नाही.
माहिष्मती साम्राज्यं अस्माकं अजेयं
ज्यूलियनांचा हा श्लोक
ज्यूलियनांचा हा श्लोक शांताबाईंच्या भाषांतराच्या सुरुवातीला दिलेला आहे (नमनासारखा!). छंदोरचना' या ज्यूलियनांच्या पुस्तकात मंदाक्रांता वृत्ताचा उदाहरण श्लोक म्हणून तो आहे, पण पाठभेदाने (निदान माझ्याकडच्या आवृत्तीत तरी). शांताबाईंनी तो दुसर्या कुठल्या आवृत्तीतून घेतलाय की काय, किंवा स्मरणातून लिहिल्यामुळे फरक पडला असावा. आमच्या शाळेतल्या बाईंनी तो शांताबाईंच्या पुस्तकातूनच घेतलेला दिसतोय.
यंदा गटारी अमावास्या दोनदा
यंदा गटारी अमावास्या दोनदा साजरी करायची का? असे अनेक भाविक विचारत आहेत. जाणकारांनी मार्गदर्शन करावे.
--------------------------------------------
ऐसीवरील गमभन इतरांपेक्षा वेगळे आहे.
प्रमाणित करण्यात येते की हा आयडी एमसीपी आहे.
दोनदा कसली आलिये. दारूवर
दोनदा कसली आलिये. दारूवर ट्याक्स वाढवल्यावर एकदा गटारी करायला परवडणार नाही.
आधी रोटी खाएंगे, इंदिरा को जिताएंगे !
मॅग्ना कार्टा
मॅग्ना कार्टाची आठशे वर्ष व शिवसेनेची पन्नास वर्ष लागोपाठचय एक-दोन दिवसात साजरी होताहेत.
.
.
.
बादवे, भारतातली १९३५ची निवडणूक "सार्वत्रिक" निवडाणूक कशी काय म्हणता येइल ?
त्यात काही सगळ्या भरतीयांना मतदानाचा अधिअकर थोडाच होता ?
फक्त दहा हजार की वीस हजार रुपयांहून अधिक स्थावर-जंगम मालमत्ता असलेल्यांनाच मतदानचा अधिकार होता ना म्हणे ? (त्या काळात सोने ह्या मूल्यवान धातूअचा भाव तोळ्याला जेमतेम वीस तीस रुपये होता. म्हणजे मग तेव्हाचे दहा हजार म्हणजे आजचे किती ते मोजून पहा.)
.
.
गब्बर त्या काळात असता तर आनंदानं नाचला असता
.
.
बुडाले फडतूस पापी तुच्छ संहार जाहला |
उदंड झाली मते , निवडणूक घ्यावया ||
गब्बर त्या काळात असता तर
काहीही हं मनोबा!
गब्बर कशाला नाचेल? तो बसंतीला नाही का नाचवणार?
प्राचार्य पांडुरंग चिमणाजी पाटील
आजच्या दिनवैशिष्टयामध्ये 'कृषितज्ञ, पुणे कृषी महाविद्यालयाचे पहिले भारतीय प्राचार्य पांडुरंग चिमणाजी पाटील (१८७७)' अशी जन्मदिवस सदरामध्ये नोंद आहे. ह्यांच्याबद्दल थोडी माहिती.
१८७७ साली कोल्हापूर संस्थानामध्ये शेतकरी कुटुंबात जन्मलेले पांडुरंग चिमणाजी पाटील पुढे पदवीपर्यंतचे शिक्षण घेऊन मुंबई प्रान्ताच्या शेतीखात्यात नोकरीस लागले. तेथेचे त्यांना शेतीविषयक उच्च शिक्षण घेण्यासाठी इंग्लंडला जाण्याची संधि मिळाली. तेथून परतल्यावर शेतीखात्यात त्यांनी अनेक जबाबदारीच्या जागा सांभाळल्या, त्यामध्ये पुण्याच्या शेत़़की महाविद्यालयाचे प्राचार्यपदहि होते. २०व्या शतकाच्या सुरवातीला मराठा समाजातील जे लोक उच्चशिक्षित होते त्यांपैकी ते एक.
भारताईल सैन्यामधून लेफ्टनंट जनरच्या पदावरून निवृत्त झालेले ले.ज.शंकर पांडुरंग पाटील-थोरात हे ह्यांचेच चिरंजीव. १९६२च्या चिनी आक्रमाणाच्या शक्यतेची कल्पना त्यंनी वेळीच जवाहरलाल नेहरूंना दिली होती पण कृष्ण मेनन ह्यांच्या आडमुठया स्वभावामुळे तिच्याकडे दुर्लक्श करण्यात आले असे त्याकाळी वाचल्याचे स्मरते.
प्राचार्यांनी लिहिलेले मराठी भाषेतील आत्मवृत्त डीएलआयवर 99999990319709 ह्या बारकोडवर उपलब्ध आहे. कसलीहि कटुता न बाळगता लिहिलेल्या ह्या पुस्तकात १९व्या शतकाची अखेर आणि २०व्याची सुरुवात अशा काळातील कोल्हापूर संस्थानाचे वातावरण उत्तम रीतीने चित्रित करण्यात आले आहे.
रोचक माहिती
रोचक माहिती.
माझे आजोबा आणि मामा पुण्याच्या शेतकी महाविद्यालयाचे पदवीधर. आत्मचरित्र वाचायला आवडेल. डी एल आय म्हणजे काय?
+१
रोचक माहिती. डी.एल.आ आय. म्हणजे काय?
डी.एल.आय.
डिजिटल लायब्ररी ऑफ इंडिया
नव्या संस्थळाचा दुवा.
हे ते पुस्तक.
- चिंतातुर जंतू
"ही जीवांची इतकी गरदी जगात आहे का रास्त |
भरती मूर्खांचीच होत ना?" "एक तूच होसी ज्यास्त" ||
आयला थोरातांचे वडील काय हे?
आयला थोरातांचे वडील काय हे? मग तर वाचायलाच पाहिजे. बहुत धन्यवाद!
माहिष्मती साम्राज्यं अस्माकं अजेयं
उत्तरगोलार्धातील सर्वात मोठा दिवस - विष्टंभ
'उत्तरगोलार्धातील सर्वात मोठा दिवस - विष्टंभ' आज २१ जानेवारीला असल्याचा उल्लेख दिनवैशिष्टयामध्ये वाचला. त्यातील 'विष्टंभ' ह्या शब्दामुळे कुतूहल चाळवले.
'विष्टम्भ' म्हणजे स्थिर स्थिति आणि अडथळा असे दोन प्रकारचे अर्थ कोशकारांनी दाखविले आहेत. आयुर्वेदामध्ये मलमूत्रविसर्जन अडकणे ह्यासाठी हा शब्द वापरला जातो. सूर्योदयाचा बिन्दु विषुववृत्तापासून उत्तरकडे सरकत अखेर सर्वात उत्तर बिन्दूशी पोहोचून ह्यापुढे तो दक्षिणेकडे सरकू लागतो अशा अर्थाने आजच्या दिवसाचे वर्णन म्हणूनहि तो योग्य आहे. लॅटिनवरून निर्माण झालेला त्याचाच समानार्थी solstice हा शब्दहि हाच अर्थ दर्शवितो. (The word solstice is derived from the Latin sol (sun) and sistere (to stand still), because at the solstices, the Sun stands still in declination; that is, the seasonal movement of the Sun's path (as seen from Earth) comes to a stop before reversing direction. Wikipedia.)
कुतूहल इतकेच की हा शब्द कोठून घेतला आहे? शं.बा. दीक्षितांच्या 'भारतीय ज्योतिषशास्त्राचा इतिहास' ह्या ग्रंथात हा शब्द कोठेच भेटलेला नाही,
आयुर्वेदातला शब्द अवष्टंभ असा
आयुर्वेदातला शब्द अवष्टंभ असा आहे ना? मलावष्टंभ असा शब्द वाचल्याचे आठवते.
माहिष्मती साम्राज्यं अस्माकं अजेयं
कॅनडा दिन
'राष्ट्रीय दिन / स्वातंत्र्यदिन : घाना, सोमालिया (१९६०), रवांडा, बुरुंडी (१९६२)'
आजच कॅनडाचाहि राष्ट्रीय दिवस आहे. त्याविषयक 'कॅनडा दिन' असा लेख मी आत्ताच येथे लिहिला आहे.
धन्यवाद
धन्यवाद. दुरुस्ती केली आहे.
- चिंतातुर जंतू
"ही जीवांची इतकी गरदी जगात आहे का रास्त |
भरती मूर्खांचीच होत ना?" "एक तूच होसी ज्यास्त" ||
यष्टी
आजच्या बहुतांशी बसेस तांबडया-पिवळ्या असतात. पहिली अनेक वर्षे त्या निळ्या रंगाच्या आणि दोन्ही बाजूंना पिवळा वळणदार पट्टा असलेल्या आणि त्या पट्टयामध्ये एस.टी.चा लोगो असलेल्या अशा असत. त्यांपैकी एकीचे चित्र बाजूस दिले आहे. अशीच अन्य चित्रे आणि माहिती येथे पहावी.
मुंबई शेअर बाजार
<१८७३ : मुंबई शेअर बाजार एका वडाच्या झाडाखाली सुरू झाला.> (०९ जुलै २०१५)
मुंबई शेअर बाजार अमुक दिवशी सुरू झाला असे निश्चितपणे सांगता येणार नाही असे वाटते पण १८७३ साल मात्र बरेच उशीराचे आहे. '१८६४ चा शेअर मॅनिया, बँक ऑफ बाँबे आणि प्रेमचंद रायचंद' अशा शीर्षकाचा माझा लेख २०१३च्या ऐसीच्या दिवाळी अंकामध्ये आहे. १८६४ च्या 'शेअर मॅनिया'मध्ये तत्कालीन शेअर बाजार आणि शेअर दलाल ह्यांच्याबद्दल काही माहिती आहे. तसेच कमिशनर क्रॉफर्ड ह्यांच्या उद्धृत आठवणीवरून शेअर व्यवहारांचीहि कल्पना येते. हा शेअर बाजार तत्कालीन 'बाँबे ग्रीन'वर (टाऊन हॉलसमोरचे तेव्हाचे मोकळे मैदान) चालत असे असे दिसते.
मुंबई शेअर बाजाराच्या स्वतःच्या वेबसाइटवरहि साधारण अशीच माहिती आहे.
९ जुलै १८७५
इथे आणि इथे १८७५ साल दिलेलं आहे.
- चिंतातुर जंतू
"ही जीवांची इतकी गरदी जगात आहे का रास्त |
भरती मूर्खांचीच होत ना?" "एक तूच होसी ज्यास्त" ||
जे आर डी टाटा यांचा जन्मदिवस
जे आर डी टाटा यांचा जन्मदिवस २९ जुलै आहे, १३ नाही.
आभार. दुरुस्ती केली आहे.
आभार. दुरुस्ती केली आहे.
- चिंतातुर जंतू
"ही जीवांची इतकी गरदी जगात आहे का रास्त |
भरती मूर्खांचीच होत ना?" "एक तूच होसी ज्यास्त" ||
पहिले मराठी वृत्तपत्र
'दर्पण' हे पहिले मराठी वृत्तपत्र आहे असे आजवर ऐकले होते.
स्रोत
माहितीचा स्रोत : मराठी विश्वकोश
- चिंतातुर जंतू
"ही जीवांची इतकी गरदी जगात आहे का रास्त |
भरती मूर्खांचीच होत ना?" "एक तूच होसी ज्यास्त" ||
आजचे दिनवैशिष्ट्य
आषाढी एकादशी.
सर फ्रेडरिक बँटिंग
आजच्या दिनवैशिष्टयामध्ये इन्सुलिनचे एक संशोधक फ्रेडरिक बॅंटिंग ह्यांच्या जन्मदिनाचा उल्लेख आहे. त्या संदर्भात पुढील दोन चित्रे:
पहिल्या चित्रामध्ये टोरांटोमधील युनिवर्सिटी अवेन्यु ह्या रस्त्यावर असलेला त्यांच्या कार्याचा स्मृतिफलक दिसत आहे. ह्याच जागी त्यांनी संशोधनकार्य केले ती प्रयोगशाळा होती. दुसरे चित्र त्यांना १९२३चे नोबेल पारितोषिक जाहीर झाल्याच्या संदर्भातील ’टाइम’ चे मुखचित्र आहे.
बँटींगगुरुजींच्या स्मृतीस
बँटींगगुरुजींच्या स्मृतीस नम्र अभिवादन. बरेच उपकार आहेत त्यांचे.
बालकवी
आज बालकवींची जन्मतिथी आहे दिसलं. त्यानिमित्त हे.
त्यांच्या 'औदुंबर' या कवितेला एका मित्राने चाल लावली आहे.
हा व्हिडो युट्युबवर कोणी टाकला ते माहिती नाही.
आधी रोटी खाएंगे, इंदिरा को जिताएंगे !
वा छान चाल लावली आहे.
वा छान चाल लावली आहे. चालीत शांत-गंभीर रस/राग आहे. कोणी गायली आहे? फार सुंदर गायली आहे.
मंदार फाटक म्हणून आहे एक.
मंदार फाटक म्हणून आहे एक.
आधी रोटी खाएंगे, इंदिरा को जिताएंगे !
परवा ९ ऑगस्टला
परवा ९ ऑगस्टला राष्ट्रभक्तांनी व्हॉट्सअॅप मेसेज पाठवला.
ऑगस्ट क्रांतीदिनानिमित्त सर्व क्रांतीकारकांना वंदन अशा अर्थाचा मेसेज आणि त्या खाली भगतसिंग, राजगुरू पासून कान्हेरे, चंद्रशेखर आझादपर्यंत सर्व "क्रांतीकारकां"चे एकत्र चित्र होते.
.... त्या चित्रातल्या कोणाचाच "ऑगस्ट क्रांती"शी दूरान्वयाने संबंध नव्हता.
--------------------------------------------
ऐसीवरील गमभन इतरांपेक्षा वेगळे आहे.
प्रमाणित करण्यात येते की हा आयडी एमसीपी आहे.
न्यू ऑर्लिन्स: स्थापना आणि कत्रिना
१. तोंडओळखः
अमेरिकेतल्या बव्हंशी मोठ्या शहरांचा एक चेहरामोहरा ठरून गेलेला असतो. त्याला मोजके अपवाद आहेत; ज्यांची स्वतःची अशी निराळी सांस्कृतिक ओळख आहे. ती चार शहरं म्हणजे: बॉस्टन, न्यू यॉर्क, सॅन फ्रान्सिस्को आणि न्यू ऑर्लिन्स. (या विधानाचा स्रोत आता आठवत/सापडत नाही, पण बव्हंशी सहमत आहे.) या चार शहरांतही न्यू ऑर्लिन्सचं वेगळेपण अधिक उठून दिसतं ते त्या शहरावरच्या फ्रेंच आणि क्रिओल प्रभावामुळे, जॅझ संगीत आणि वैशिष्ट्यपूर्ण खाद्यसंस्कृतीमुळे. (गोव्याचा सुशेगातपणा आणि नोलाकरांचं "Laissez les bons temps rouler!" हे सारखंच.); शिवाय टेक्सस-अर्कान्सा-मिसिसिपी अशा रेसिस्ट-बाप्टिस्ट शेजार्यांमुळे. अशा ह्या कलंदर शहराचा २५ ऑगस्ट हा स्थापनादिवसः
२. जुना इतिहासः
या दुव्यावरून१
On this date in 1718, French immigrants founded the city of New Orleans. Jean-Baptiste Le Moyne de Bienville named the new settlement for Philippe II, the Duke of Orléans. The duke was the regent of France, ruling in place of King Louis XV, who was only a boy. The French had claimed the Louisiana Territory in 1682, and the location of New Orleans — at the mouth of the Mississippi and Missouri Rivers — meant that it was prime real estate for anyone who wanted to control America’s large interior waterway. Though the city never lost its French character, it was blended with elements of Native American, African, and Spanish cultures.
To get things started, France sent a starter population of prisoners, slaves, and bonded servants. They arrived in New Orleans to find a mosquito-ridden swamp that was surrounded by hostile Native Americans, and prone to hurricanes. The new settlers threatened to revolt, so the French government sent 90 female convicts straight from the Paris jails. These ladies of questionable repute were chaperoned by a group of Ursuline nuns until they could be married off to the men who awaited them.
Two engineers laid out plans for a the original walled village, which later came to be known as the French Quarter or the Vieux Carré — the Old City. Though it’s called the French Quarter, the architecture of the area is mostly Spanish in influence, since fire destroyed most of the original buildings in the 18th century. By that time, the city was under the control of the Spanish, who rebuilt the quarter. New Orleans became an American city in 1803, when Napoleon sold Louisiana to the United States government.
३. अलीकडचा इतिहासः
नेमक्या याच सुमारास दहा वर्षांपूर्वी कत्रिना वादळ न्यू ऑर्लिन्सवर येऊन आदळलं. १८००हून अधिक लोकांनी आपले प्राण गमावले. नैसर्गिक कारणांसोबतच बुश प्रशासनाचा ढिसाळ कारभारही याला कारणीभूत होता. युरोपियन देशांनी देऊ केलेली आर्थिक तसंच आवश्यक वस्तू आणि मनुष्यबळाच्या स्वरूपातली मदत (कॅरिबियन बेटांवरील त्यांच्या तळांवरून) प्रथम मानभावीपणे नाकारून ("United States could fend for itself"- इति जॉर्ज डब्ल्यू. बुश) मग परिस्थिती हाताबाहेर चालली असल्याचं पाहून, काही दिवसांनी ती स्वीकारणे इत्यादी घोळ घातले गेले. परिणामी हाऊस ऑफ रिप्रेझेन्टेटिव्हच्या समितीने (अमेरिकन संसदेचे कनिष्ठ सभागृह) आपल्याच पक्षाच्या अध्यक्षाची कानउघडणी करणारा रिपोर्ट जाहीर केला.
४. समाजशास्त्राच्या दृष्टिकोनातूनः
या घटनेला दहा वर्षं झाली, त्या निमित्ताने अनेक वृत्तपत्रांनी न्यू ऑर्लिन्सच्या पुनर्बांधणीचा अलीकडेच आढावा घेतला. त्यातून असं दिसतं की, न्यू ऑर्लिन्सची लोकसंख्या जरी जवळजवळ पूर्वपदावर आली असली तरी तिचे स्वरूप वेगळे आहे. नवीन लोकसंख्येत उच्च मध्यमवर्गीयांचे प्रमाण अधिक आहे. (Gentrification या संज्ञेने हा बदल ओळखला जातो. थोडक्यात, परळ-लालबागचे अपर वर्ली होण्याची प्रक्रिया. ब्रूकलिन, वॉशिंग्टन डीसी, पोर्टलंड या शहरांत या बदलांचा वेग लक्षणीय आहे.) त्यातही पूर्वीच्या कृष्णवर्णीय मध्यमवर्गाची जागा आता बहुसंख्य श्वेतवर्णीय उच्च/मध्यमवर्गाने घेतली आहे.
काही पॅरिशेसनी (फ्रेंच प्रभावामुळे ल्युसियाना राज्यात counties ऐवजी parishes आहेत) कृष्णवर्णीय लोक आमच्या भागात नकोत (मग भले त्यांची ऐपत असो), या हेतूने घरं विकण्यावर/भाड्याने देण्यावर निर्बंध आणले. (मुंबईतल्या कट्टर शाकाहारी सोसायट्यांची या संदर्भात आठवण येते.) असं करणं हे 'फेअर हाऊसिंग अॅक्ट'चे उल्लंघन असल्याने, कोर्टकचेर्या होऊन अखेर सेंट बर्नार्ड पॅरिशला अडीच मिलियन डॉलर्सचा दंड भरावा लागला.
या बदलांच्या/मानसिकतेच्या मागची कारणं, त्यांची इष्टता-अनिष्टता-ननैतिकता-अपरिहार्यता हा मोठा विषय झाला. त्यातलाच एक छोटा भाग म्हणजे: आपण ज्या परिसरात राहतो, त्याचा आपल्यावर पडणारा प्रभाव आणि त्याचे मोजमाप. 'कत्रिना'च्या निमित्ताने झालेलं स्थलांतर, ही या सामाजिक विषयाच्या अभ्यासाच्या दृष्टीने एक निराळी संधी होती. 'What social scientists learned from Katrina' या लेखातूनः
अशा अचानक उद्भवलेल्या स्थलांतराचे परिणाम वाईटच असतात, असा आपला सर्वसाधारण ग्रह असतो. मात्र काही बाबतींत, हे वरदानही ठरू शकतं. विशेषतः पिढ्यानपिढ्या एकाच परिसरात राहिलेल्या आणि गरिबीत खितपत पडलेल्यांच्या दृष्टीने.
...
सरकारी/राष्ट्रीय धोरणांपेक्षाही (उदा. मिनिमम वेज, कॉलेजसाठी कर्ज इ.) अशी स्थानिक पातळीवरची मिनी-स्थलांतरं ही मध्यमवर्गात प्रवेश करू पाहण्यास धडपडणार्या कुटुंबाच्या दृष्टीने अधिक महत्त्वाची, परिणामकारक ठरतात; असा या अभ्यासातून निघालेला एक निष्कर्ष. तेव्हा, न्यू ऑर्लिन्समधून विस्थापित झालेले लोक कुठल्या प्रकारच्या शहरांत स्थिरावले, याचा थेट परिणाम त्यांच्या भविष्यातील प्रगतीवर होऊ शकतो. ('अपवर्ड मोबिलिटी'च्या संदर्भात: उत्तम - मध्यम - विपरीत परिणाम :: सॅन होजे/सिअॅटल - ह्युस्टन - फेयेटव्हिल, नॉर्थ कॅरोलायना अनुक्रमे.) शहरातल्या शहरातही, नेहमीच्या परिसरातील शाळा बंद पडल्यामुळे दुसर्या विभागात मुलांना शिकावं लागणं आणि परिणामी 'पब्लिक स्कूल सिस्टिम'ने घेतलेले काही अपारंपरिक निर्णय, यामुळेही न्यू ऑर्लिन्समधल्या विद्यार्थ्यांच्या शालेय कामगिरीत सुधारणा झाली.
अर्थात, व्यापक परिप्रेक्ष्यात पहायचं झालं तर हे घाऊक प्रमाणात घडवून आणणं जवळजवळ अशक्य आहे. एक गरीब कुटुंब जर जरा बर्या वस्तीत रहायला आलं, तर त्यांच्या मुलांना आणि कुटुंबाला त्याचा नक्कीच फायदा होतो; पण सारी वस्तीच जर तिथे यायचा प्रयत्न करू लागली - तर मूळ ठिकाणी राहणारे लोक अन्यत्र जाऊन राहणं पसंत करतात. ('व्हाईट फ्लाईट'मागच्या अनेक कारणांपैकी एक कारण.)
लेखातून निघणारे निष्कर्ष तसं म्हटलं तर फार काही क्रांतिकारक वा तर्कापलीकडचे नाहीत; पण अनेक घटकांच्या व्यामिश्र समीकरणातल्या काही बाबींच्या परिणामांची मोजदाद करता येणं, हेही महत्त्वाचं.
१. विकीपीडियावर न्यू ऑर्लिन्सचा स्थापनादिवस ७ मे दिला आहे.
"पिसाशी खेळणारे कुत्र्याचे पिलू" भावले नाही
"पिसाशी खेळणारे कुत्र्याचे पिलू" भावले नाही.
भाबडेपणातही भद्दे (अति-ठळक), गतिशून्य वाटले. डोळे तसेच निर्जीव असते, तरी पण पिलाने पीस ठीक मधोमध न धरता एका बाजूला धरले असते, तर काहीतरी थोडे रंजक वाटले असते.
आज आंतरराष्ट्रीय संगीत दिवस
आज आंतरराष्ट्रीय संगीत दिवस आहे. माझं अनेक गाण्यांपैकी आवडतं गाणं देते आहे-
you should paint my love
it's the picture of a thousand sunsets
it's the freedom of a thousand doves
Baby you should paint my love
आज सु. श्री आशा पारेख आणि लाल
आज सु. श्री आशा पारेख आणि लाल बहादूर शास्त्री यांचा जन्मदिवस आहे.
--------
आणि मोहनदास गांधी झाडूवाले यांचाही जन्मदिवस आहे
--------------------------------------------
ऐसीवरील गमभन इतरांपेक्षा वेगळे आहे.
प्रमाणित करण्यात येते की हा आयडी एमसीपी आहे.
२ ऑक्टोबर
श्री. बॅट्मॅन यांचा ऐसीसन्यासदिन एक ऑक्टोबर की दोन ऑक्टोबर?
गांधी टोपीला गांधी टोपी का
गांधी टोपीला गांधी टोपी का म्हणतात? कधी पाहिला नाही गांधीजींचा फटू ती टोपी घातलेला.
आधी रोटी खाएंगे, इंदिरा को जिताएंगे !
फावडे घेतलेला माणूस
चित्र छानच आहे. पण कविता जरा मेलोड्रॅमॅटिक वाटली - परंतु शैली त्या काळासाठी ठीक आहे, बहुधा.
फावडे - कविता
चित्र पाहून मला खालील कवितेची आठवण झाली.
एक कबूतर चिठ्ठी लेकर
पहली पहली बार उडा
मौसम एक गुलेल लिए था
पट् से नींचे आन गिरा..
बंजर धरती झुलसे पौधे
बिखरे काँटें तेज़ हवा
हमने घर बैठे बैठेही
सारा मँज़र देख लिया..
चट्टानोंपर खडा हुआ तो
छाप रह गयी पाँवों की
देखो कितना बोझ उठाकर
मैं इन राहों से गुजरा...
ग्रेस यांच्या कुठल्याश्या गद्य लेखसंग्रहात ही कविता होती. संग्रह विसरलो; बहुधा 'मितवा' असावा.
वा! आज आमच्या माला सिन्हाचा
वा! आज आमच्या माला सिन्हाचा वाढदिवस. अतिशय सुंदर अभिनेत्री - केवळ खडीसाखर. तिचे हे गजरा घलून, शुभ्र साडीतले (ब्लाऊज काळेभोर आहे) ठुमके विथ दॅट लकी बास्टर्ड देवानंद ;). गाण्यात चंद्र जास्त तेजाळलेला आहे की माला सिन्हा हे ठरविणे मला तरी शक्य नाही.
https://www.youtube.com/watch?v=DUBkmULoBhA
https://www.youtube.com/watch?v=Tz151xenBoc
गदिमांच्या स्मृतीदिनानिमित्त त्यांची "जोगिया" कविता -
.
.
.
.
https://www.youtube.com/watch?v=Tz151xenBoc
१६ डिसेंबर १९७१
बांगलादेश मुक्ती युद्ध समाप्ती - १६ डिसेंबर १९७१
पाकिस्तानची शरणागती
रामदासकाकांच्या कुठल्यातरी लेखात या फोटोचा उल्लेख आला होता.

आधी रोटी खाएंगे, इंदिरा को जिताएंगे !
फोटोतील व्यक्ति
वरील फोटोमध्ये दिसणरे अधिकारी असे आहेत.
पुढे जन.जगजीत सिंग अरोरा आणि जन. ए.के.के नियाझी. (त्यांच्या पलीकडे हातात मायक्रोफोन धरलेले आकाशवाणीचे ईंग्रजी वृत्तवाचक शूरजित सेन, काही फोटोंमध्ये हेहि दिसतात.)
मागे डावीकडून - पूर्व सागरी कमांडचे सर्वोच्च अधिकारी वाइसअॅडमिरल कृष्णन, पूर्व हवाई कमांडचे सर्वोच्च अधिकारी एअरमार्शल हरि चंद दिवान,बांगलादेश युद्धातील चौथ्या कोअरचे मुख्य अधिकारी ले.ज.सागत सिंग - ह्या ऑपरेशनबद्दल ह्यांना पद्मभूषण मिळाले - आणि मे.ज.जे एफ आर जेकब.
ज जेकब हे भारतीय सैन्यातील मोजक्या ज्यू अधिकार्यांपैकी एक होते ही त्यांच्याविषयीची थोडी वैयक्तिक माहिती. शूरजित सेन, तसेच मेलविल डि'मेलो, ज्योतिका रत्नम ह्या ईंग्रजी वृत्तवाचकांचे आवज अजूनहि आठवत अहेत.
बीथोवन २४५वा जन्मदिन - गूगल डूडल
बीथोवनच्या २४५व्या जन्मदिनानिमित्तचे आजचे गूगल डूडल फारच कल्पक आहे.
http://www.google.com/doodles/celebrating-ludwig-van-beethovens-245th-year
(त्याचा जन्मदिनांक निश्चित नाही. १७ डिसेंबरला त्याला बाप्तिस्मा मिळाला होता म्हणून याच दिनांकास जयंती साजरी होते.)
डूडलचा पूर्ण आनंद घेण्यासाठी बीथोवनचे प्रसिद्ध सांगीतिक तुकडे माहीत असणं अपेक्षित आहे. डूडल 'प्ले' करताच बीथोवन पाचव्या सिम्फनीचे सूर रचताना दिसतो. तो त्याच्या आयुष्याच्या उत्तरार्धात बहिरा झाला होता हेही सूचित केले जाते. मग प्रेक्षकासाठी एक कोडे येते. त्याच्या संगीताचे तुकडे संगतवार लावल्यावरच डूडलचे कथानक पुढे सरकते. ह्यातही डूडलकारांनी कल्पकता दाखवून कोडी उत्तरोत्तर क्लिष्ट केली आहेत. प्रथम '५वी सिम्फनी' मग 'फ्युर एलीस' मग 'मूनलाईट सोनाटा' नि शेवटी कळस गाठला जातो तो त्याच्या '९व्या सिम्फनी'ने. हे तुकडेही फार प्रातिनिधिक निवडले आहेत.
डूडलचे एक अत्युत्तम उदाहरण! डूडलकारांना धन्यवाद.
(ही नोंद इथे दिनवैशिष्ट्यात उपरी वाटल्यास संपादकांनी कृपया 'सध्या काय पाहिलंत'मध्ये हलवावी.)
खेळ खेळलो. मला आलीडूडलचा
खेळ खेळलो. मला आली
हो खरंय.. मला ते तुकडे माहित नाहीत. त्यामुळे अंदाजपंचे खेळत होतो.. पहिला तुकडा पहिल्या फटक्यात, दुसरा तुकडा एकदा चुकून लगेच जमला. (इथवर ट्रायल अॅण्ड एरर वा इतर गणिती मार्गांचा वापर केला नव्हता) त्यानंतर मात्र निव्वळ गणिती मार्गाने शक्यता कमी करत करत दोन दोन चान्समध्ये जिंगत गेलो.
तुमचे माहितीबद्दल आणि गुगलचे डूडलबद्दल आभार
- ऋ
-------
लव्ह अॅड लेट लव्ह!
गॅलिलेओचे गुरु-उपग्रह
<१६१० : गॅलिलिओने गुरूच्या चार उपग्रहांचा शोध लावला.>
ह्यावरून पुढील मनोरंजक माहिती आठवली.
१५व्या शतकानंतर युरोपीय दर्यावर्दी किनार्याकिनार्यांच्या आश्रयाने प्रवास करणे सोडून पॅसिफिक आणि अटलांटिक महासागरामध्ये जाऊ लागले तेव्हा त्यांच्यापुढील महत्त्वाचा प्रश्न उघडया समुद्रावर आपले स्थान निश्चित करणे हा होता. अक्षांश-रेखांशापैकी अक्षांश निश्चित करणे सोपे असते. माध्याह्नीचा सूर्य आकाशात क्षितिजापासून किती किती उंचीवर आहे ह्यावरून आपले स्थान विषुववृत्ताच्या किती उत्तरेला वा दक्षिणेला आहे हे ठरवता येते. मात्र रेखांश - एका पूर्वनिश्चित स्थानाच्या आपण किती पूर्वेस वा पश्चिमेस आहोत हे सांगण्याचा काहीहि मार्ग उपलब्ध नव्हता. त्यासाठी आवश्यकता होती ती अशा काही ज्ञानाची की ज्यायोगे आपल्या विशिष्ट वेळेस - उदा. माध्याह्न - दुसर्या एका विशिष्ट स्थानी काय वेळ आहे हे माहीत असण्याची. ते माहीत झाले की ४ मिनिटे फरक = १ अंश असे आपल्या स्थानाचे रेखांश ठरविता येतील येथपर्यंत कल्पना होती. अडचण इतकीच होती की तेव्हा माहीत असलेली लंबकाची घडयाळे जहाजाची हालचाल आणि आसपासचे हवामान ह्यामुळे निश्चित वेळ दाखवू शकत नसत. १८व्या शतकाच्या प्रारंभी हॅरिसनचा मरीन क्रोनोमीटर निर्माण होईपर्यंत ह्या प्रश्नाला उत्तर नव्हते.
गुरु ग्रहाच्या चार उपग्रहांना आळीपाळीने ते उपग्रह ग्रहाच्या मागे गेल्यामुळे वारंवार ग्रहणे लागतात. ह्यामध्ये जगभर एकाच वेळी दिसणारे एक घडयाळ दडलेले आहे असे गॅलिलेओच्या ध्यानात आले. एका विशिष्ट जागी दिसणार्या ह्या सर्व ग्रहणांच्या वेळा हिशेबाने आधीच शोधून कोष्टके तयार करायची आणि ती दूरवरच्या प्रवासाला निघालेल्या जहाजाबरोबर पाठवायची. जेव्हा त्यापै़की एखादे ग्रहण लागेल तेव्हाची स्थानिक वेळ सूर्वाचा वा तारकांचा वेध घेऊन ठरवायची. ही स्थानिक वेळ आणि त्या ग्रहणाची पूर्वनिश्चित जागेची कोष्टकातील वेळ ह्यातील फरकावरून रेखांश ठरविता येतील असे गॅलिलेओने सुचविले.
तत्त्व म्हणून हे ठीक होते पंण महासागरावर दिवस असणे, हवामान खराब असल्याने वेध घेता न येणे अशा कारणांनी ह्या तत्त्वाचा फार उपयोग करता आला नाही.
१९६४ : न्यूयॉर्कमध्येवर्ल्ड
चमाय्ला! यांच्यातही भूमीपूजन करतात वाटतं
पर्याय सुचवा.
ग्राउंडब्रेकिंग याचं चांगलं भाषांतर काय करणार?
---
सांगोवांगीच्या गोष्टी म्हणजे विदा नव्हे.
आज विश्व कर्करोग दिन
आज विश्व कर्करोग दिन आहे.
.
(१) असे दिवस कोण ठरवतं?
(२) कोणती समिती असते?
(३) आणि फक्त विश्व कर्करोगच दिन का? विश्व बायपोलर दिन का नाही?
(४) बरं जर काही दिन आऊटडेटेड झाले मासल्यादाखल - विश्व महारोग दिन, विश्व पोलिओ दिन किंवा टीबी दिन - तर त्या दिवसांना फ्री करतात का?
फॅन गॉ/व्हॅन गॉ
व्हॅन गॉच्या जन्मदिवशी बायपोलर दिवस 'साजरा' करतात. World Bipolar Day
---
सांगोवांगीच्या गोष्टी म्हणजे विदा नव्हे.
धन्यवाद.
धन्यवाद.
गूगलं शरणं व्रज...
"World Cancer Day was established by the Paris Charter adopted at the World Summit Against Cancer for the New Millennium in Paris on 4 February 2000." (http://www.worldcancerday.org/ येथे पहा.)
हा दिन UNO, WHO अशा कोठल्या संस्थेने अधिकृत केलेला दिसत नाही. ह्या दिवसाच्या निमित्ताने काही आयोजना करणे हे निरनिराळ्या देशांच्या शासनांवर अवलंबून आहे असे वाटते. ह्यासाठी पहा Annals of Oncology मधील हा संपादकीय लेख.
(सर्व श्रेय “गूगलं शरणं व्रज”
तत्त्वार्थ शास्त्र विज्ञान गणिताची असे रुची।
कवाडा सर्व ज्ञानाच्या “गूगलं शरणं व्रज” ॥ १४ ॥)
धन्यवा द कोल्हटकरजी. मी
धन्यवा द कोल्हटकरजी. मी गुगलायचा कांटाळा केला.
TOMORROW IS NATIONAL WEAR RED
TOMORROW IS NATIONAL WEAR RED DAY! - to prevent heart disease and stroke.
.
Go Red For Women®.
अरे वा! आत्ता लक्षत आलं -
अरे वा! आत्ता लक्षत आलं - मुखपृष्ठावरती, माकडाचे चित्र , "मंकी इयर" चे औचित्य साधून लावले आहे. चित्रही सुंदर आहे.
गौरी देशपांडे (कर्वे)
आजच्या दिनवैशिष्टयामध्ये हा दिवस गौरी देशपांडे ह्यांचा जन्मदिवस असल्याची नोंद आहे.
आपल्या नवीन सदस्या प्रियदर्शिनी कर्वे ह्यांची गौरी आत्या असावी असा माझा समज आहे. गौरी आणि मी १९६५च्या सुमारास फर्ग्युसन कॉलेजमध्ये एकत्रच नवे लेक्चरर म्हणून लागलो होतो. गौरीचा विषय इंग्लिश आणि माझा गणित. त्या काळात तिने मराठी लिखाणास सुरुवात केली नव्हते असे वाटते पण तिच्या इंग्लिशला आम्ही दबकून असायचो! (ती नुकतीच वडिलांबरोबर - डीडी कर्वे - अमेरिकेत जाऊन कॅलिफोर्नियामधील कोठल्यातरी विद्यापीठात शिकून आलेली होती त्यामुळे असेल कदाचित.) आम्हा चारपाच ज्यूनियर लेक्चरर्सच्या गटाची ती पुढारी होती आणि बुजुर्गांना न आवडणार्या - उदा. कॉलेजच्या कँटीनमध्ये जाणे आणि इतकेच नाही तर तेथे असलेल्या बंद दाराआड न बसता बाहेर विद्यार्थ्यांमध्येच बसणे - अशा काही गोष्टी तिच्या नेतृत्वाखाली आम्ही करीत असू. आमच्यासारख्या गावाकडून आलेल्यांना चायनीज हॉटेलची दीक्षा तिने दिली. मोजे घालतांना ते पँटच्या रंगाशी जुळणारे असावेत हे ज्ञान तिने मला दिले. अशा अनेक रम्य स्मृति ह्या उल्लेखामुळे समोर आल्या.
नंतर तिने कॉलेज सोडून इलस्ट्रेटेड वीकलीमध्ये खुशवंत सिंघ ह्यांच्याबरोबर कामाला सुरुवात केली तदनंतर संपर्क तुटला.
गंमत वाटली.
गौरी देशपांडेंबद्दल माहिती वाचून गंमत वाटलीच. पण कोल्हटकर स्वतःचा उल्लेख 'गावाकडून आलेले' असा करताना बघून आणखी गंमत वाटली.
---
सांगोवांगीच्या गोष्टी म्हणजे विदा नव्हे.
आज गालिब ची पुण्यतिथी आहे.
आज गालिब ची पुण्यतिथी आहे.
ब्या आणि श्या
>>> २०११ : लिब्यात क्रांतीची सुरुवात.
- अरेबिक आणि अमेरिकन/ब्रिटिश इंग्रजीत याचा उच्चार लिबिया असाच होतो. यूट्यूबवर लिबियाचे भूतपूर्व राष्ट्रीय गीतही ("लिबिया!, लिबिया!!, लिबिया!!!" असे. गडाफीने ते बदलून 'अल्ला हू अकबर' केले होते.) उपलब्ध आहे, त्यातले उच्चार पुरेसे स्पष्ट आहेत. (अरेबिक 'ल'चा उच्चार इंग्रजी/मराठी 'ल'पेक्षा किंचित निराळा आहे, पण ते एक असो.)
याच करेक्टिंग-द-ओव्हरकरेक्शन मोडमध्ये रशियाचा रशियन भाषेत उच्चार 'रसिया' असा होतो (रंगरसियातले रंग उधळले की जे उरते ते?), हेही येथे नोंदवावेसे वाटते. सिरिलिक लिपीत रशिया असे लिहिले जाते: Россия. यात Р म्हणजे 'र' (ग्रीक rho आठवा इलेक्ट्रोमॅग्नेटिझमच्या नियमांतला), शब्दातल्या पहिल्या 'ओ'चा 'अ' असा होणारा उच्चार, c = s, и = इंग्रजी i, я = उच्चारी 'या' - अशी आगगाडी आहे. (याहून सोपा मार्ग म्हणजे यूट्यूबवर "how to pronounce russia in russian?" शोधणे.
CCCP
त्याच प्रकाराने CCCP ही सोवियट दिवसात नेहमी दिसणारी अक्षरे Союз Советских Социалистических Республик (सोवियत समाजवादी प्रजासत्ताकांचा समूह - सयूझ सव्येत्स्किख सत्सालिस्तीचिस्किख रिस्पूब्लिक - ह्या देशाच्या अधिकृत नावाची आद्याक्षरे आहेत.
आणि हो, तसेच रसिया नाही रस्सीया. मूळ रशियन शब्द रूस, त्याचे इंग्रजीपण रशिया - र'शा, त्यातून पुनः रशियनमध्ये रस्सीया
शागीर्द
आय एस जोहर यांच्या वाढदिवसानिमित्त,
इस तन्हाई में ऐ हसीं इतनी दूरी भली नहीं
आया मौसम बहार का रख ले दिल बेकरार का
मेरे हाथों में हाथ डाल ऐ गुल चेहरा परी जमाल
मुद्दत से दिल उदास है तेरे होंठों की प्यास है
ऐ दिलबर मेरे दिल पर कब छलकेगा तेरे लब का जाम!
१८०३ - मुंबईत आग
"१८०३ : मुंबईच्या फोर्ट भागात मोठी आग लागली. या आगीचे थैमान दहा दिवस चालले. या अग्निकांडात ४१७ घरे जळून पूर्ण नष्ट झाली." १७ फेब्रुअरीचे दिनवैशिष्टयः
ह्या आगीचे आग चालू असतांना ले.क.विल्यम्सन नावाच्या अधिकार्याने मलबार हिलवरून काढलेले चित्र खाली दाखवीत आहे. (हे चित्र ब्रिटिश लायब्ररीच्या संग्रहातून मिळाले आहे.)
आग आगीसारखीच दिसत आहे पण आगीच्या लोळाच्या तळाशी दिसणारी तत्कालीन मुंबई, तिच्या किल्ल्याच्या भिंती, किल्ल्यातील इमारती, डाव्या कोपर्यात मरीन लाइन्सच्या जागेवरील सैनिकांच्या राहुटया हे तपशील नोंदण्याजोगे आहेत.
२४ फेब १९३८ : द्युपॉँ कंपनीने
वॉव. मस्त दिनवैशिष्ठ्य आहे.
Rukmini Devi Arundale
कालच्या दिनविशेषात Rukmini Devi Arundale हे नाव होतं का ; की माझ्या नजरेतून निसटलं ?
शिवाय १४ जानेवारीला C. D. Deshmukh ह्यांचे नावही दिसले नव्हते दिनविशेषात.
आभार
सुचवण्यांबद्दल आभार. रुक्मिणी देवींचं नाव आता घातलं आहे. चिंतामणराव देशमुखांचं नाव मात्र आधीपासून होतं.
- चिंतातुर जंतू
"ही जीवांची इतकी गरदी जगात आहे का रास्त |
भरती मूर्खांचीच होत ना?" "एक तूच होसी ज्यास्त" ||
जॉनी कॅश यांच्या ८४ व्या
जॉनी कॅश यांच्या ८४ व्या वाढदिवसानिमित्त, त्यांच्या मुलीने त्यांची आठवण सांगीतलेले गाणे -
https://www.youtube.com/watch?v=vLwocVPaGsE
२९ फेब - चित्रकार बाल्थस
२९ फेब - चित्रकार बाल्थस यांचा जन्मदिवस.
यांची चित्रे नेटवरती (अर्थात) पाहीली आहेत. सेक्शुअली एक्स्प्लिसिट आहेत.
गिटार लेसन .... पहील्यांदा पाहीले तेव्हा मी डिस्टर्ब झाले होते, मिपावरती चिंतांनी या चित्राचे अत्युत्तम विश्लेषण केलेल होते. माझ्या हातून ते डिलिट झालेले आहे. पण फार छान रीतीने विश्लेषण केलेल आठवते.
२ मार्च - बॉन
२ मार्च - बॉन जोव्ही
हालेलुइया ............. फार सुंदर गायले आहे.
१९९५ : गुलामगिरीची प्रथा रद्द
१९९५ मध्ये मतदान झालं पण ते रॅटिफाय २०१३ मध्ये झालं अस वाचलं.
http://www.cbsnews.com/news/after-148-years-mississippi-finally-ratifies...
आधी रोटी खाएंगे, इंदिरा को जिताएंगे !
Battle of Paris
https://en.wikipedia.org/wiki/Battle_of_Paris_(1814) चा उल्लेख नाही दिसला दिनविशेषात.
नेपोलियनला १८१४ ला ताब्यात घेण्यात आलं. तरी पराजित फ्रान्सवर तशा फारशा कठोर वगैरे अटी लादण्यात आल्या नाहित.
इतिहासातली ठळक घटना वाटते. की तुम्ही उल्लेख केला होतात आणि माझ्या नजरेतून निसटला ?
१९३६ : पंडित नेहरूंनी
१२ एप्रिल ला हे दिसले.
गब्बु - आपण १२ एप्रिल हा दिवस काळा दिवस म्हणुन पाळायचा का?
(अवांतर)
भगतसिंग, झालेच तर सुभाषबाबू, ही मंडळीसुद्धा समाजवादाच्या पुरस्कर्त्यांपैकी (किंवा गेला बाजार समाजवादाचा पुरस्कार करणाऱ्या पक्षांच्या उद्गातामंडळींपैकी) होती.
एक म्हातारा जन्मत:च मेला??????
दिनवैशिष्ट्य
२१ एप्रिल
जन्मदिवस : कवी अल्लामा इकबाल (१९३८)
मृत्युदिवस : "सारे जहां से अच्छा"चा कवी मुहंमद इक्बाल (१९३८)
हं?????? सगळे ठीक आहे ना?
धन्यवाद. दुरुस्ती केली आहे.
धन्यवाद. दुरुस्ती केली आहे.
- चिंतातुर जंतू
"ही जीवांची इतकी गरदी जगात आहे का रास्त |
भरती मूर्खांचीच होत ना?" "एक तूच होसी ज्यास्त" ||
७५३ : रोमन सम्राट रॉम्युलसने
२१ एप्रिल साठी - हे इसविसन पूर्व ७५३ पाहिजे ना.
आभार. डन.
आभार. डन.
- चिंतातुर जंतू
"ही जीवांची इतकी गरदी जगात आहे का रास्त |
भरती मूर्खांचीच होत ना?" "एक तूच होसी ज्यास्त" ||
इक़्बाल बानो
इक़्बाल बानो यांचे गाणे मुखपृष्ठावर दिल्याबद्दल आभार.
मला एक आवडणारी गालिबची 'मुद्दत हुई हैं यार को मेहमाँ किये हुए' ही ग़ज़ल त्या पुढील चित्रफितीत गायल्या आहेत. गंमत म्हणजे श्रोत्यांत 'नय्यारा नूर'सहित इतर अनेक नावाजलेल्या व्यक्ती दिसत आहेत.
कॅव्हॅफी
आज ज्यांची जयंती आहे, त्या कॅव्हॅफी कविची ही सुंदर कविता -
ही कविता ज्या लेखात उधृत केलेली आहे त्या लेखाची झैरात - http://www.aisiakshare.com/node/2370
९ मे दिनविशेष जन्मदिवस :
दादोबा पांडुरंगांना 'मराठी भाषेचे पाणिनि' म्हणत. त्यांनी 'महाराष्ट्र भाषेचे व्याकरण' लिहिले. मराठीच्या आद्य व्याकरणकारांपैकी ते एक होते, आणि मराठीच्या केसातील गुंता व्याकरणरूपी फणीने सोडवण्याचे कार्य त्यांनी केले.
ते इंग्रजीचे व्याकरणकार होते असे मला तरी आठवत नाही.
आपण तर्खडकरी इंग्लिश म्हणतो, ते बहुधा भाषांतरपाठमाला लिहिणार्या राघोबा द्वारकानाथ तर्खडकरांच्या संदर्भात.
आपण तर्खडकरी इंग्लिश म्हणतो,
अगदी अगदी. त्यांच्या त्या भाषांतरपाठमालेतील कॉफीकरिता 'बुंद, कवा', पिशवी ऊर्फ सॅचल याकरिता 'जुगदान' असे शब्द वाचून जे भारी वाटत असे (यत्ता ४-५.) त्याची तुलना फक्त मनाच्या श्लोकांच्या तळटीपा वाचून जे भारी वाटत असे त्याच्याशीच होऊ शकते. (तळटीपा कशा वाचायच्या असतात-ससंदर्भ वगैरे- याचे तेव्हा ज्ञान नव्हते त्यामुळे फक्त तळटीपाच वाचल्या जायच्या.) 'त्याला चार गाई आहेत' असे वाक्य 'हिम हॅज़ ४ काऊज़' असे भाषांतरित केले जायचे. गेले ते दिवस.....
माहिष्मती साम्राज्यं अस्माकं अजेयं
आभार
दुरुस्ती केली आहे. आभार!
- चिंतातुर जंतू
"ही जीवांची इतकी गरदी जगात आहे का रास्त |
भरती मूर्खांचीच होत ना?" "एक तूच होसी ज्यास्त" ||
कर्मवीर अण्णा यांचा आज स्मृतीदिन
रयत शिक्षण संस्था नावाचा वटवृक्ष उभा करुन शिक्षण घेण्याची संधी खेडोपाड्यातील मुलांच्या आवाक्यात आणणा-या कर्मवीर भाउराव पाटील यांचा आज स्मृतीदिन.
बदलत्या प्रवाहात सामील होण्याचं बळ अण्णांच्या या शिक्षण संस्थेनं माझ्यासारख्या किती एकांच्या वडिलांना, भावांना, मुलांना पुरविलं.
उतराई होणं कदापिही अशक्य असंच अण्णांचं हे आमच्या पिढ्यानपिढ्यांवरचं ऋण.
१८ मे १९७४ : पोखरण येथे
आणि बुद्ध हसला!
...
एष: मम हस्त:|
'आजचे दिनवैशिष्टय' कोठे आहे?
आज २२ तारीख आहे. दिनवैशिष्टय मात्र १८ तारखेचेच आहे. मधले चार दिवस सदर आले नाही. कारण काय असावे हे जाणण्याची उत्सुकता आहे.
एक शक्यता
बहुधा (आजवरच्या इतिहासात) गेल्या चार दिवसांत काही विशेष घडले नसावे.
(शंका: असे घडण्याची संभाव्यता काय असावी?)
जन्मदिवसः अभिनेता मिथुन
"दिखने मे बेवडा,
भागने मे घोडा
और मारने मे हथोडा
कोई शक? "
प्रभुजींना वाढदिवसाच्या शुभेच्छा!
आधी रोटी खाएंगे, इंदिरा को जिताएंगे !
+१११११११११११११११११
मेरा नाम शंकर. गरीबों का दोस्त, दुश्मनों को ज्वाला!
-गुंडापुराण.
माहिष्मती साम्राज्यं अस्माकं अजेयं
गरीबांचा अमिताभ, आपला
गरीबांचा अमिताभ, आपला सुपरस्टार हो.
तुम पुकार लो
त्या गरीबांचा अमिताभच्या नादात, हेमंत कुमार यांचा वाढदिवसच विसरलो. त्यांचे हे अजरामर गाणे - तुम पुकार लो
https://www.youtube.com/watch?v=Oo3bE64YJig
.
ये नयन डरे डरे देखील फार सुंदर
ये रात हसीं ये चांद हसी
तू सबसे हसी मेरे दिलबर
और तुझसे हसीं तेरा प्यार...
https://www.youtube.com/watch?v=2gMhbWeo30o&list=RDOo3bE64YJig&index=3
मृत्युदिवस : कादंबरीकार
ही प्रतिक्रिया इथे हलवली आहे.
********
It is better to have questions which don't have answers, than having answers which cannot be questioned.
शुचीमामींचा आजचा आयडी हे अॅड
ही प्रतिक्रिया इथे हलवली आहे.
आधी रोटी खाएंगे, इंदिरा को जिताएंगे !
३ ऑगस्ट - मैथिलीशरण गुप्त या
ही प्रतिक्रिया इथे हलवली आहे.
.
.
आधी रोटी खाएंगे, इंदिरा को जिताएंगे !
आंतरराष्ट्रीय कॉफी
आंतरराष्ट्रीय कॉफी दिनानिमित्त -



.
.
.
.
दिनविषेश २-ऑक्टोबरलाच आडकला
ही प्रतिक्रिया इथे हलवली आहे.
व्हरमीर
ही प्रतिक्रिया इथे हलवली आहे.
दुकाटाआ
दुकाटाआ
माला सिन्हा
ही प्रतिक्रिया इथे हलवली आहे.