Skip to main content

बागकामप्रेमी ऐसीकर : ४

आधीच्या धाग्यात ९०+ प्रतिसाद झाल्यामुळे नवा धागा. घरगुती बागकामासंबंधित प्रश्न, शंका, विचार, माहिती, फोटो, योजना, कार्यक्रम, अपडेट्स इत्यादी गोष्टी या धाग्यात लिहिता येतील.
या आधीचे धागे: | |

========

मिरचीच्या झाडाला आता फुले येऊ लागली आहेत, पण कसलीशी अंडी (चहाच्या दाण्यासारखी व इतकी) पानाच्या मागल्या बाजुला दिसू लागली आहेत - ती रोज धुवून काढतोय शिवाय कडुलिंबाची फवारणी चालु आहे.

फुले छान फुलून गळून जाताहेत पण त्या जागी मिरच्या काही येत नाहियेत.

पुण्यातील वाढलेल्या थंडीमुळे होत असावे का हे?

Taxonomy upgrade extras

चिमणराव Mon, 01/12/2014 - 12:05

(मिरची)आता काही उपयोग नाही.पुढच्या वेळेस शेणखताचा अर्धा किलोचा गोळा पाचसहा इंच पुरून त्यावर एक बांबूची काडी टोचून तीन तीन रोपे वरती (चारपाच इंचाची) लावा. भरपूर मिरच्या येतील. वर मच्छरदाणीटाइप जाळी टाकल्यास कीड नाही पडत.

ऋषिकेश Mon, 01/12/2014 - 14:20

In reply to by चिमणराव

(मिरची)आता काही उपयोग नाही

अरेरे :(
काहीच नाही करता येणार?
काहीच करता येणे शक्य नसेल तर रोपे काढून टाकतो. उगाच रोजची ८-१० मिनिटे जाताहेत एकेक पान धुवून काढण्यात

आता पुढल्यावेळी म्हणजे पुढला उन्हाळा संपताना! राईट?
का आता थंडीत लावले तर काही उपेग?

रोचना Mon, 01/12/2014 - 14:38

In reply to by ऋषिकेश

मला मिर्च्यांचं काहीच कळत नाही. काही लोक म्हणतात अहो प्रत्येक मोसमात उगवतात. पाणी घातलं की झालं. कोणी म्हणतं उन्हाळात, कोणी हिवाळ्यात, कोणी काळी माती, कोणी लाल, कोणी शेणखत आणि बांबू. मी तीन ठिकाणाहून बिया आणून लावल्या, घरच्या सुक्या मिरच्या फोडून त्या बिया पेरल्या, पण एक ही मेलं रोप आलं नाही. वर जिथे जाते तिथे लोकांच्या बाल्कन्यांमधे, बागेत भरपूर मिरच्या लागलेल्या दिसतात.

मला वाटतं ते चहाच्या दाण्यासारखे किडे अ‍ॅफिड्स ची अंडी असतील. निंबाच्या तेलाचा फवारा सतत करावा लागेल, पण फुलं येत असली तर अजून थोडी वाट बघायला हरकत नाही. पुण्यात अगदीच मिर्च्या न येण्याइतकी थंडी पडली नसावी. झाडाला ऊन किती तास मिळतंय सध्या?

ऋषिकेश Mon, 01/12/2014 - 15:04

In reply to by रोचना

झाडाला ऊन सकाळी सूर्योदयापासून साधारण १० वाजायच्या आसपासपर्यंत मिळते. पूर्वेकडे बाल्कनी आहे.

कडुलिंबाचा फवारा चालु ठेऊन बघतो.
मी मागे नाद सोडलाच होता. मग अचानक कळ्या दिसायला लावल्यावर पुन्हा उत्साह येतो न येतो तो थंडीही सुरू झाली नी ही अंडीही दिसू लागली. :(

अजून १-२ आठवडे वाट बघेनच

मला वाटतं ते चहाच्या दाण्यासारखे किडे अ‍ॅफिड्स ची अंडी असतील.

आभार. यापानावर जसे पानामागे अंडी दिसू लागतील म्हटले आहे तसेच झालेय. एकुण ५-७ रोपे आहेत. दोन रोपांची पाने पिवळी पडू लागली आहेत :(
एका रोपाची मीच सगळी खुडून टाकली त्याला मात्र नवी पालवी फुटली आहे. अजून १-२ आठवडे नक्कीच वाट बघेन

अ‍ॅफिड्स साठी सर्वत्र यल्लो स्टिकी ट्रॅप नावाचा उपाय सांगितलाय. तो काय आहे? हाफिसातून संबंधित दुवे बॅन आहेत.

रोचना Mon, 01/12/2014 - 15:21

In reply to by ऋषिकेश

एका एक्सपर्ट माळ्याला विचारून घ्या, पण फळ न लागण्याची वेगवेगळी कारणं असू शकतात:
१) ऊन कदाचित कमी पडत असावं. फळभाज्यांना किमान ५-६ तास तरी सलग ऊन लागतं. नाहीतर फुलं येतात, पण तशीच कोमेजून जातात.
२) स्व-पोलिनेशन होत नसावं. एका रोपाच्या फुलाने दुसर्‍या रोपाच्या फुलाला हातानी हिंदी चित्रपटात करतात तसं मारून, किंवा जॉन्सन्स बड्स ची एक काडी घेऊन एका फुलाचे पोलेन दुसर्‍याला चोळून, रोपांची थोडी मदत करून पहावी :-)
३) अ‍ॅफिड्स ला खरंतर फक्त एकच उपाय - धीर. पाण्याचा, आणि निंबाच्या तेलाचा फवारा. कुणाच्या बागेतून लेडीबग्स मिळाले तर ती रोपांवर सोडा. अ‍ॅफिड्स त्या किड्यांचं मेन खाद्य असतं. जवळ एखादं झेंडूचं झाड ठेवलं तरी त्याच्या वासाने अ‍ॅफिड्स निघून जातात असं ऐकलंय, पण प्रत्यक्ष अनुभव नाही.

या झाडाला गेल्या वर्षात किमान तीनदा अ‍ॅफिड्स लागले. तू करतोयस तसेच नियमित पानांना धूणे, फवारा इत्यादी. शेवटी कंटाळून अर्धी पानं कापून टाकली. उपटायचंच राहिलं होतं, गावाला गेले म्हणून राहिलं. परतले तर मस्त कळ्यांनी भरलेलं. त्यामुळे निंबाच्या फवार्‍यावर विश्वास वाढलाय!

रोचना Thu, 04/12/2014 - 14:14

In reply to by चिमणराव

हा प्रयोग नवीनच ऐकला. एखादा फोटो आहे का?

ट्यूब्लैट पेटली. बांबूच्या खोल काडीत रोप लावायला सांगताहात असं आधी चुकून वाचलं...

चिमणराव Mon, 01/12/2014 - 16:07

मिरची: पुढच्या वेळेस म्हणजे या रोपांचा नाद सोडा आणि दुसरी कोणतीही लहान रोपे घेऊन दिलेल्या गोष्टी करा की झाले हीच पध्दत टोमेटोसाठीही करा.

चिमणराव Mon, 01/12/2014 - 20:03

हो आधारासाठी:
बर्फाच्या गोळ्यात कसे एक टोक मोडून काडी वापरतात तशी (अथवा जुना टुथब्रश खाली प्लास्टीक दोरीने आडवा बांधावा)अडीच फुटाची घट्ट काटकी अगोदरच रोवून ठेवायची झाड वाढल्यावर करू गेल्यास जमत नाही. आणि टोमेटोसाठी खास महत्त्वाची एकाच वेळी वीस टोमेटोने झाड पडते. वजन पेलत नाही.शेणखत नंतर टाकून फळ येत नाही अगोदरच खाली असले पाहिजे
हीच पध्दत कैप्सिकम /भोंगी मिरची, वांगी आणि झेंडूसाठी वापरा.

पिवळा डांबिस Thu, 04/12/2014 - 01:08

नर्सरीतून रोपं आणून लावली तर सहाजिकच भरभरून मिरच्या देतात....
पण बिया पेरल्या (अगदी भारतातून आणलेल्या लाल मिरच्या उलगडून मिळवलेल्या बिया देखील) तर घंटा काही उगवून येत नाही!!! :(
बहुदा जीएम मिरच्या असाव्यात!!!

ऋषिकेश Thu, 04/12/2014 - 09:30

In reply to by पिवळा डांबिस

मीही घरीच लावलीत. नुसती रोपं उगवलीयेत, त्याला फुलंही आलीयेत.
जरा अंड्यांचा प्रादुर्भाव गेल्या दोन दिवसांत कमी झाल्याचा भास होतोय मला. बहुया काय होते. मी ही त्या अफिड्स इतकच चिवटपणा करायचे ठरवलेय ;)

जीएमची नसली तरी बीटीची शक्यता आहेच.

चिमणराव Thu, 04/12/2014 - 10:45

अॅफिडसकरता आणि तुडतुडे ,खवले इ॰ करता सोपा उपाय {चार पाच झाडांपुरता शक्य आणि बिनविषारी}आहे. मैद्याची पातळ खळ(कांजी) करून ब्रशने लावा दोन तीन तासांनी खळ सुकली की सर्व कीटक आखडतात :-)काम सोपे करण्यासाठी फवारा वापरलात तर तोपण आखडेल :-(

ऋषिकेश Thu, 04/12/2014 - 12:17

In reply to by चिमणराव

खळीचा उपाय इंटरेस्टिंग आहे (सारखं काय 'रोचक' म्हणायचं? ;) ) पण मग ती सुकलेली खळ काढायची कशी हे एक.
माझ्याकडे सध्या नुसताच अंड्यांचा हल्ला होतोय. ती फळयच्या आत मी रोज धुतोय. सकाळी नवी अंडी दिसताहेत. निर्माता (विष्णूने किड्यांचा अवतार घेतलाय) नी विनाशक (नी शंकराने माझा?!! :O ) यांच्या या लधाईत कोण आधी थकतंय याची स्पर्धा चालु आहे ;)

मेघना भुस्कुटे Thu, 04/12/2014 - 14:08

In reply to by ऋषिकेश

सारखं काय 'रोचक' म्हणायचं?

'दिलचस्प' हा अजून एक पर्याय. 'मजेशीर' आणि 'गंमत(ती)शीर' मात्र गंमत सोडून खवचटपणाच्या अंगणात गेलेले आहेत. :(

रोचना Thu, 04/12/2014 - 14:12

In reply to by ऋषिकेश

माझ्या एका मैत्रिणीचा ताजा सल्ला, ईमेलमधून कॉपे:

White oil recipe - will control aphids, scale, mealy bug and citrus leaf miner as well as caterpillars:

• Use two cups of vegetable oil and half a cup of washing up liquid.

• Put those into a jar. Put the lid on and give it a good shake and you have got concentrated white oil.

• Label it and store this in a cool, dry place and it should last about three months. Remember to also label it with the dilution rate - two dessert spoons per litre of water.

Decant and dilute into a spray bottle - The best spraying action is to cover both sides of the leaves and the bark and it’s best to spray in the cool of the morning. Just remember you have to reapply anytime there is rain.

ऋषिकेश Thu, 04/12/2014 - 14:16

In reply to by रोचना

ग्रेट हे करून बघेन. या स्प्रेनंतर / किंवा वर खळीनंतर, पानांची रंध्रे बुजत नाहित ना?
नैतर आधी एका झाडावर मारून बघतो

चिमणराव Thu, 04/12/2014 - 14:26

खळ :दोन तीन दिवसांनी साधा पाण्याचा फवारा माराल तेव्हा खळ धुतली जाते. शिवाय तयाचा खर्च आणि बिनधोकपणा पाहता याला पर्याय नाही.
आणखी एक या खळीचा अफलातून उपयोग आहे त्याला 'रोचक' म्हणायचे धाडस करणार नाही =ढेकणांचा नायनाट तीन दिवसांत होतो !विषांतर विषयांतर होतेय

रोचना Sat, 06/12/2014 - 14:29

मुंबईतील अर्बन लीव्स संस्थेच्या प्रकल्पांबद्दल एक छोटासा माहितीपट:
(यात खास कुंड्यांमधे वापरण्यासाठी मातीबद्दल चांगली माहिती आहे)

रोचना Tue, 30/12/2014 - 11:50

पावटा, "बनमाला"वांगी (छोटी, हिरवी गोलसर), "चालता" टोमॅटो, मोहरी, मुळा, आंबेहळद आणि हळद सद्या जोरात आहेत! पालकाची कोवळी पानं चिमण्यांनी खूप खाल्ली, म्हणून आता जुन्या मच्छरदाणीखाली झाकून ठेवलाय. बटाटे सुद्धा हाताला लागतायत, पण अजून खूप लहान असल्यामुळे काढले नाहीत.

गेल्या आठवड्यात काढलेले काही फोटो:


http://www.facebook-proxyserver.com/browse.php?u=a3kgOV5A%2BMCQgfClUWYM…
http://www.facebook-proxyserver.com/browse.php?u=a3kgOV5A%2BMCQgfClUWYM…
http://www.facebook-proxyserver.com/browse.php?u=a3kgOV5A%2BMCQgfClUWYM…

रोचना Tue, 30/12/2014 - 21:44

In reply to by चिमणराव

तसा दुवा का येतोय माहित नाही - मी फेसबुकवर टाकलेले इथे जोडले होते, पहिल्या पोस्ट मधे इमेज बॉक्स मधे टाकायचे विसरले म्हणून दुवा तसा दिसतोय, नाहीतर चित्रच दिसलं असतं.

चिमणराव Wed, 31/12/2014 - 05:27

नवीन साईट postimg dot org मध्ये फोटो टाकून 'direct link' इमिज बॉक्सात टाका.