बागकामप्रेमी ऐसीकर : २
व्यवस्थापकः या धाग्यावर सुरू झालेली ही माहितीपूर्ण चर्चा वाचन व व्यवस्थापन या दोन्ही दृष्टीने सोपी जावी म्हणून एका प्रतिसादाचे रुपांतर नव्या धाग्यात करत आहोत. घरगुती बागकामासंबंधित प्रश्न, शंका, विचार, माहिती, फोटो, योजना, कार्यक्रम, अपडेट्स इत्यादी गोष्टी या धाग्यात लिहिता येतील.
======
बियांपासून सुरूवात करताना..
गेले काही वर्ष इतर व्यवधानांमुळे बागकामाकडे थोडं दुर्लक्ष झालं आहे खरं, पण दरवर्षी किमान टोमॅटो आणि अळू नक्कीच लावले जातात/येतात. काकडी, कलिंगड, भोपळा अशांसारख्या वेली आता परत लावणार नाही असं ठरवलं आहे, कारण त्याचा पसारा फार होतो, आणि नीट नियोजन केलं नाही, तर इतर रोपांच्या मूलभूत हक्कांवर गदा येते. याशिवाय पूर्वी ओवा, गाजर, बीट, कांद्याची पात, लसणीची पात, चवळी, लाल माठ, अंबाडी, मका, भेंडी, फरसबी, मोहरी, मटार, कोबी, फ्लॉवर, स्ट्रॉबेरी, ब्लुबेरी अशी रोपं लावली आहेत. कढीपत्ता, (भारतीय) तुळस, मोगरा ही रोपंही एकेकाळी लावली होती. पण बदलते हवामान आणि माझाकडून झालेली आबाळ यात त्यांचा बळी गेला. असो.
रोपांपासून सुरूवात करणे तुलनेने सोपे असते. पण बियांपासून सुरूवात करायची असेल, तर मी असे करते. मी बायोडिग्रेडेबल, छोटे खण असलेल्या कुंड्या मिळतात त्या वापरते. त्यात माती भरून साधारण ३-४ बिया एका खणात घालते. परत वरून थोडीशी माती घालते. एका प्लॅस्टीकच्या/वापरून फेकायच्या ताटलीत ती कुंडी ठेवते आणि त्या ताटलीवर/कुंडीवर ते रोप कसलं आहे आणि कधी लावलं त्याची नोंद करते. ताटलीत पाणी ओतते (त्यामुळे माती व बीया यांना धक्का लागत नाही पण कुंडीला असलेल्या छिद्रांमधून माती पाणी शोषून घेते.). मग एका पारदर्शक कागदाने/पिशवीने ती कुंडी पूर्णपणे सैलसर झाकून सूर्यप्रकाशात ठेवते. दररोज पाणी ताटलीत घालायचे. पारदर्शक आवरणातून आलेले मोड/रुजलेले अंकूर दिसतात. वाढलेलं रोपटं ऊन, वारा आणि पावसाशी सामना देण्याइतकं सक्षम झालं आहे, असा अंदाज आल्यावर ते मोठ्या कुंडीत अथवा जमिनीत लावते. कुंडी झाकून ठेवल्याने सुरुवातीच्या काळातला इच्छित रोपाऐवजी तणच अंकुरण्याचा धोकाही टळतो.
दुर्दैवाने आता माझ्याकडे फारशी चित्रं नाहीत. सापडली तर डकवेन.
सानिया यांनी जमिनीतच झाडं
सानिया यांनी जमिनीतच झाडं लावण्याआधी, थोडा भाग माती घालून उंच केलेला दिसतोय. त्यालाही वाफाच म्हणता येईल. मोल्सवर्थकाका सांगतात, त्यातला पहिला अर्थ पहा -
वाफा (p. 748) [ vāphā ] m (वाप or वप्र ) A bed or plat of a garden or plantation. 2 The pit which receives the boiled juice of the sugarcane (for it to harden into mass or ढेप).
(हा दुसरा अर्थ मलाही माहित नव्हता, या निमित्ताने समजला.)
वाफा.
होय. पहिल्या अर्थानेच मला वाफा असे म्हणायचे होते.
एकतर जमीन खणून, त्या खड्ड्यात सुपीक माती घालून झाडे लावता येतात किंवा जर जमीन खणायला त्रासदायक असेल तर, जमिनीवर मातीची भर घालून त्याला कुंपण घालून त्यात रोपे लावता येतात. मी दुसरा पर्याय निवडला होता. अगोदर स्वस्त व साध्या प्रतीच्या मातीने चौकट भरून त्यावर मी चांगल्या प्रतीच्या मातीची भर घातली होती. सर्वात वर आदल्या वर्षी बनवलेल्या कंपोस्टाचा थर घातला होता. नंतर पूर्ण चौकट बारीक जाळीदार कापडाने झाकून (वीड प्रोटेक्टर) टाकली होती. रोपे लावायच्या वेळी, त्या कापडावर कात्रीने X च्या आकारात कापले आणि त्या भेगेतून रोप आत लावले. बिया लावताना कापड ताणून बसवायच्या अगोदर बिया पेरल्या आणि छोटी रोपे दिसायला लागल्यावर त्यांच्या डोक्यावर कापड फाडले. क्वचित प्रसंगी वाकड्या चालीच्या रोपाला सरळ करावे लागले.
रोपांपासून सुरूवात करणे
रोपांपासून सुरूवात करणे तुलनेने सोपे असते. पण बियांपासून सुरूवात करायची असेल, तर मी असे करते. मी बायोडिग्रेडेबल, छोटे खण असलेल्या कुंड्या मिळतात त्या वापरते. त्यात माती भरून साधारण ३-४ बिया एका खणात घालते. परत वरून थोडीशी माती घालते.
मिरची आणि टोमॅटोचे बियाणे लावले आहे, अंकुर दिसत आहेत, काही दिवसांनी वेगळ्या कुंडीत किंवा मातीत ते रोप हलवावे लागणार आहे. खाली चित्र दिले आहे, त्यावरुन काही सुचना करू शकाल काय?
१. मिरची
२. टोमॅटो
अजून वेळ आहे.
रोपं अजून मोठी व्हायला हवी आहेत. सुनील यांंच्या म्हणण्याप्रमाणे टोमॅटॉला गोलसर आधार मिळाला, तर ते चहूबाजूंनी नीट वाढेल. रोपांमधे अंतरही जास्त हवं साधारण २-३ फूटांचं अंतर असावं असं म्हणतात. तेवढं शक्य नसेल, तर पुढच्या वेळी कमी (आणि अंतर राखून) बिया लावता येतील. रोपं या कुंडीतून काढण्याआधी पाणी घालून माती ओली करा, मग कुंडी सर्व बाजूंनी व खालून ह़ळूहळू थोपटा. माती कडेने सैल होईल. मग कुंडीवर हात झाकून ती तिरकी/उलटी करा. माती आणि रोपांचा ठिसूळ केक हातात येईल. अलगद हाताने रोपं मोकळी करून मोठ्या कुंडीतल्या मातीत लावा.
ट्रान्सप्लॅंटिंग
ट्रान्सप्लॅंटिग करताना मला असा अनुभव आलाय की मूळ जागेतील रोप हे अधिक जोमाने वाढते व ट्रान्सप्लॅंट केलेले रोप खुरटते. एकाच बियांपासून सुरु केलेल्या व एकाच प्रकारच्या मातीत लावलेल्या रोपांची अशी स्थिती का होत असावी.
१. मिरची
मूळ रोप |
ट्रान्सप्लँट |
मूळ रोप |
ट्रान्सप्लँट |
पुदीना |
झेंडू |
रोचक अनुभव.
मला ट्रान्स्प्लांटिंग करताना असा अनुभव कधी आलेला नाही. रोप हलवताना काही मुळं तुटतातच, पण जसे वाढीकरता काही फांद्यांची छाटणी गरजेची असते, तसेच काही मुळं तुटल्याने वाढ न खुंटता रोप जोमाने वाढते. जोपर्यंत पांढरी रसरशीत मुळं झाडांशी निगडीत आहेत, तोपर्यंत काळजीचे कारण नाही.
मूळ आणि स्थलांतरीत झाडाची माती सारखी असली, तरी स्थलांतरणाच्या कृतीत रोपाचे काही नुकसान झाले असण्याची शक्यता आहे असे वाटते. उदा. रोप हलवताना ते साधारण एखाद्या शांत (वारा व पाऊस नसताना) सकाळी वा संध्याकाळी हलवावे. रोप कुंडीतून बाहेर काढायच्या अगोदर माती ओली करून घ्यावी. असं म्हणतात की पाणी भरलेल्या बादलीत ती कुंडी हवेचे बुडबुडे यायचे थांबेपर्यंत बुडवून ठेवावी. मग २० मिनीटे बाहेर काढून ठेवावी मगच रोप हलवावे. रोप जोरात ओढून न काढता पूर्वी म्हटल्याप्रमाणे अलगद माती सोडवून घ्यावी. मुळांभोवती जुन्या कुंडीतली काही माती तशीच ठेवावी. नवीन कुंडीतली माती शक्यतो उबदार व सैलसर असावी. फार ठासून भरलेली असेल, तर मुळांना पसरायला वाव मिळत नाही. ट्रान्सप्लांटिंग नंतर हवेतली आर्द्रता राखण्याकरता मल्च पसरावे असे म्हणतात. पण मल्चमुळे माती जास्त थंड होण्याचा धोकाही असतो.
धन्यवाद.
मी बाझिलची रोपं अगदीच बाळ असताना हलवली. तेव्हा हे काही केलं नव्हतं. प्लास्टीकचा चमचा कुंडीत खुपसून रोपाच्या उंचीच्या निदान दीडपट खोल नेऊन आजूबाजूच्या मातीसकट रोप मुळासकट उचललं आणि नवीन कुंड्यांमध्ये लावलं. हे आत्ता काढलेले फोटो -
शुक्रवारी पहाटे आमच्याकडे वादळी पाऊस, वारा वगैरे झालं. कुंड्यांमध्ये पूर आला होता. ही पानं थोडी मुडपलेली किंवा तुकडा पडलेला दिसतो आहे ते त्या वादळामुळेच. पण आता सगळं ठीकठाक दिसतं आहे. रोचनाने वेळेतच धागा सुरु करून, योग्य वेळीच खूळ भरवून दिलं म्हणावं लागेल. लहान रोपं असती तर कदाचित जगली नसती.
(अवांतर - बाझीलच्या पानांची पहिली जोडी पाहून म्यूटंट बाझील जन्माला आलं असं आधी वाटलं होतं. वरच्या फोटोत तिन्ही रोपांना ते गोलसर पान दिसतंय.)
बदलती गरज.
गरज तुमचे रोप किती वाढणार आहे, मूळांना पसरायला पुरेसा वाव आहे का? तुम्हाला एका रोपापासून अनेक रोपं बनवायची आहेत का यावर अवलंबून आहे. उदा. चवळी मी न हलवता पाने खुडणार किंवा मूळांसकट खुडणार आहे, तेव्हा तिला हलवण्याची गरज नाही. मिरचीचे रोप लहान कुंडीत पुरेसे वाढले होते, तेव्हा त्याला जागा अपूरी पडत होती, म्हणून हलवावे लागले. अनेकदा जर झाडाला काही रोग झाला, तर निरोगी फांदी कापून दुसरीकडे हलवावी लागते.
गोलसर आधार म्हणजे एकापेक्षा
गोलसर आधार म्हणजे एकापेक्षा जास्त आधारच्या काड्या लावायच्या का? (सध्या आमचा टोमॅटो माडाशी स्पर्धा लावल्यासारखा उंच वाढत चालला आहे. शिवाय सात फुलं आहेत. चारेक कळ्या दिसत आहेत. पण "निसर्गाने आपले काम चोख बजावले होते", असं म्हणायची वेळ अजूनतरी आलेली नाही.)
टोमॅटोला आधार
मी असे केले होते -
रोप थोडे मोठे झाले की त्याच्या बाजूला एक जाडसर काठी रोवायची आणि मग रोपाची वाढ त्या काठीच्या बाजूने होईल ते पहायचे (ते तसे ऑपॉप होतेच फक्त काही चुकार फांद्या छाटायच्या)
आणि हे काही टोंमॅटो -
दोन्ही फोटो डिसेंबर २०१३
व्यवस्थापक: width="" height="" टाळावे. आता येथून काढले आहे
तयार आधार विकत मिळतात.
टोमॅटॉसाठी गोलसर/त्रिकोनी/चौकोनी/षटकोनी आधार विकत मिळतात. जागा आणि टोमॅटोची वाढ लक्षात घेऊन योग्य तो वापरावा. मी रोप लहान असतानाच त्याभोवती असा आधार वापरते.
पण केवळ तेवढाच आधार पुरत नाही, बाजूने थोडं अंतर ठेऊन असा आधारही रोप मोठं झाल्यावर लावते.
दोन रोपं शेजारी लावली असतील, तर दोन त्रिकोनी आधार एकमेकांमधे अडकवून (या आधारांची टोकं उघडून ते सरळ करता येतात.) त्यांचा मोठा आयत करते.
संपादकः height="" काढले आहे
अरे वा, हि माहिती तर अधिक
अरे वा, हि माहिती तर अधिक उत्तम. सानिया आणि सुनील आभार. हे वरचे आधार शोधले पाहिजेत.
पण काही शंका
१. टोमॅटोच्या रोपाला सुर्यप्रकाश कितपत लागतो, जास्त चालतो किंवा थोडाच लागतो, त्याप्रमाणे रोप हलवताना जमिनीची निवड करता येईल.
२. शेणखत/कंपोस्टपेक्षा वेगळे खत वापरण्याची गरज पडेल काय?
पाणी आणि सुर्यप्रकाश.
टोमॅटोला कमी पाणी आणि सुर्यप्रकाश चालत नाही. मातीतली आर्द्रता आणि ऊब सातत्याने टिकवली पाहीजे. असंही वाचलय की रोपं लहान कुंडीतून मोठ्या कुंडीत हलवण्यापूर्वी मोठी कुंडी माती घालून काळ्या प्लॅस्टीक/कापडाने २ दिवस झाकून ठेवावी. ऊबदार मातीत रोप पटकन रूजतं.
रोपांवर मी ऑरगॅनीक फर्टीलायजरचा फवारा मारते. कसा आणि कितीवेळा फवारा मारायचा ते लेबलवरच्या सुचना वाचूनच ठरवते. याखेरीच प्राण्यांपासून या रोपांचा बचाव करण्यासाठी मला अॅनीमल रिपेलंट फवाराही मारावा लागतो. प्राण्यांनी कुंपणातून आत तोंड घालून माझी काही रोपे मुळापासून उखडली आहेत. या फवार्यांना तिखट वास असतो, त्याने प्राण्यांच्या नाकपुडीत जळजळ होते, व प्राणी जवळ येत नाहीत. दुकानदाराच्या मते, लाल तिखटाची पूडही हे काम करू शकेल, पण मी तो प्रयोग केला नाही.
टोमॅटो
टोमॅटोची दुष्काळाला पुरून उरणारी जात महिन्याभरापूर्वी आणली आहे. झाडाची वाढ दणक्यात सुरू आहे. बरीच फुलं येऊन कोमेजून गेली तरी कुठेच फळ धरताना दिसत नाहीये. म्हणून 'गूगलं शरणं व्रज' केलं असता समजलं की फार जास्त गरम असेल तर (>९०० फॅ किंवा ३२० से) असेल तर फळ धरत नाही. त्याच लेखात सुचवलं होतं की दुपारी तापमान सगळ्यात जास्त असतं तेव्हा झाडावर सावली असेल याची व्यवस्था करा. सुदैवाने आमच्याकडे दुपारी दीड-दोन नंतर बाल्कनीत सूर्यप्रकाश येतच नाही.
सध्या आमच्याकडे अशीच हवा आहे, अजून महिनाभर तरी हे असंच असेल. म्हणून माझा प्रश्न असा आहे की ज्या ताज्या कळ्या येताना दिसत आहेत त्या तशाच ठेवू का खुडून टाकू का? यामागचा माझा विचार असा की फुलं फुलवण्यात झाडाची शक्ती गेली नाही तर निदान वाढ तरी पुरेशी होईल. आणि मग सप्टेंबरच्या सुमारास तापमान कमी व्हायला लागेल तेव्हा कदाचित फळं धरतील. इथल्या विशेषज्ञांचा सल्ला काय?
---
किंवा कदाचित बेसिकमध्येच लोचा असू शकतो. टोमॅटोचं परागीकरण झालं नाही तर फळ धरणार कसं? याबद्दल कोणाला काही माहिती आहे का?
पहिला मिरचीचा प्रयोग अयशस्वी!
पहिला मिरचीचा प्रयोग अयशस्वी! :(
मिरचीला लाल मातीच लागते असे काही असते का? त्या प्लास्टिकच्या पिशवीतले रोप काढून कुंडीत लावले. पुण्यात लाल माती शोधायचा कंटाळा करून सहज मिळाली ती काळी माती वापरली. झाड मलुल होत गेल्यावर लाल माती शोधून वापरली खरी पण झाड गेलेच :(
माझी शेजारिण म्हणाली की नर्सरीतील झाडे एवढीच जगतात. माती बितीचा काही प्रॉब्लेम नाही. खरं काय?
का बियाच आणाव्यात?
खरंय.
माझी मिरचीही (साधी आणि भोपळीही) काळ्या मातीतलीच आहे.
बागकामाची सुरूवात मोहरी, चवळी यासारख्या बियांनी केली असता हमखास उत्साहवर्धक चित्रं दिसते.
आठवड्यापूर्वी मी चवळी (कडधान्य) पेरले होते. ही पालेभाजी असल्याने फार वाढणार नाही, आणि मुळासकट उपटली जाईल्, म्हणून बिया किंचीत दाटीवाटीने पेरल्या. ओल्या मातीत बिया पेरून वरून एक मातीचा पातळ थर दिला. कुंडीच्या खालचा थाळीवजा भाग वेगळा होतो, त्यात पाणी भरून, त्यावर कुंडी ठेऊन, प्लॅस्टीकच्या पिशवीने सैलसर झाकले. पिशवी पुर्ण न उघडता सुकेल तसे खालच्या थाळीत पाणी भरत राहीले. चार दिवसातच सर्व बिया अंकुरीत झाल्या होत्या. आज खालची रोपं वरच्या आवरणाला खालून ढकलत असल्याचे लक्षात आल्यावर वरचे प्लॅस्टीक पुर्ण उघडले आहे. ही चित्रं.
कुंडी झाकून ठेवली होती.
रोपं वाढली आहेत.
आवरण काढले आहे. खालची थाळी चित्रापुरती वेगळी केली आहे. आता यापुढे आवरणाची गरज नाही.
आवरणाचा प्रयोग केला नाही, तर रोपं एवढी वाढायला अधिक वेळ लागेल.
व्यवस्थापकः height="" टाळा, प्लीज
मस्त! सगळ्याच पालेभाज्या अशा
मस्त! सगळ्याच पालेभाज्या अशा पेरता येतात का? अशी पेरणी प्रथमच पाहिली. प्लास्टिक्चं कवर द्यायचं कारण काय? मी परवाच अशा लांबसर कुंडीत लालमाठ पेरला, आणि छोटे अंकुर फुटले आहेत. कवर घालून खाली ताटलीत पाणी घातल्याने सुरुवातीची वाढ लवकर होते का?
चवळीचा पाला स्वयपाकात कसा वापरता? ४-५ चवळीच्या वेली सध्या बाल्कनीवर वाढताहेत. साधारणतः शेंगा फुटायला किती महिने लागतात?
(सॉरी तुमच्यावर प्रश्नांचा भडिमार करत आहे, पण या धाग्यात मार्गदर्शन करत राहावे ही विनंती, खूप काही शिकायला, पहायला मिळतंय.)
पालेभाज्या.
सगळ्याच पालेभाज्या अशा पेरता येतात का?
मी मोहरी, मेथीचे दाणे, कोथिंबीर (धने) व चवळी अशी पेरली आहे. बाकी लाल माठाच्या बिया पेरल्या आहेत. अंबाडीच्या बिया व निवडलेल्या पालेभाजीच्या काड्या पेरल्या आहेत.
प्लास्टिक्चं कवर द्यायचं कारण काय? मी परवाच अशा लांबसर कुंडीत लालमाठ पेरला, आणि छोटे अंकुर फुटले आहेत. कवर घालून खाली ताटलीत पाणी घातल्याने सुरुवातीची वाढ लवकर होते का?
होय. मातीतली आर्दता, ऊब कायम राहते. अंकुरण लवकर होते व तणवाढीला आळा बसतो. शिवाय अनेकदा पक्षी पेरलेले काही दाणे खाऊन टाकतात ते टळते.
चवळीचा पाला स्वयपाकात कसा वापरता?
कांदा, लसूण घालून परतून केलेली चवळीची भाजी मला अत्यंत प्रिय आहे. मी राहते तिथे ही भा़जी विकत मिळत नाही, म्हणून हा खाटाटोप.
४-५ चवळीच्या वेली सध्या बाल्कनीवर वाढताहेत. साधारणतः शेंगा फुटायला किती महिने लागतात?
कल्पना नाही, या अवस्थेला यायच्या आधीच ही भाजी मी शिजवून टाकते.
थोडेसे अवांतरः
अंबाडीची भाजी वठल्यावर त्याला फूलं लागून त्यात बी धरते. हे बी परत मातीत पडून अनेकदा नवीन रोपं उगवतात. अंबाडीचा पाला फार जून व्हायच्या आधीच खुडला तर देठांसकट पाला चिरता येतो. यातला आंबटपणा कमी करण्यासाठी भाजीत डाळीबरोबर कण्यांच्या जागी चक्क तांदूळ मिक्सरमधे भरडून टाकते व थोडा पालकही टाकते. यामुळे गूळ कमी वापरावा लागतो.
या धाग्यात मार्गदर्शन करत राहावे ही विनंती, खूप काही शिकायला, पहायला मिळतंय.
भलतंच! अहो, लाजवून जीव घ्याल हो!
सध्या माझं रात्र थोडी नी सोंग फार झालं आहे. बागकामाकरता थोडाच अवधी निसर्गाने बहाल केलेला आहे, पण त्याच वेळात इतर भानगडी मागे लावून घेतल्या आहेत त्यामुळे हातून कृती घडत नाही. तुम्ही सगळे इतक्या उत्साहाने या प्रकल्पात सामील महोत आहात हे पाहून खूप बरं वाटलं. पुढच्या वर्षी केवळ न लिहीता जास्त बागकाम करण्याचा प्रयत्न करेन.
पुढच्या वेळेस असंच
पुढच्या वेळेस असंच प्लास्टिकची पिशवी झाकून पालेभाजी लावायला हवी. गेल्या आठवड्यात पेरलेल्या लाल माठाचे सगळे, म्हणजे एकूण एक अंकुर आज पहाटे चिमण्यांनी फस्त केले :-( आता उरलेली देठं तुळशीच्या कुंडीत अडकवलेल्या, जळून गेलेल्या उदबत्त्यांच्या काड्यांसारखी केविलवाणी दिसताहेत). कसली चिडचिड झालीय माझी, किती पानांना संध्याकाळी कडुनिंबाचा स्प्रे वगैरे दिला तरी पहाटे कोवळी पानं खायला पक्षी हजर!
गाजराचे काप नुसते ताटलीतील
गाजराचे काप नुसते ताटलीतील पाण्यात ठेवले (माती शिवाय) तरी त्याला छान कोंब फुटतात व झाड वाढते. लहानपणी शाळेतल्या कसल्याशा प्रकल्पासाठी हे केल्याचे तुमच्या प्रतिसादाच्या निमित्ताने आठवले.
धणे पेरून कोथिंबीर नेहमी घेतोच. सध्या पुण्यात पुचकट मिरच्या मिळताहेत म्हणून चांगल्या गावरान तिखट मिरच्या लावायच्या होत्या.
फळभाजीसाठी काळी माती वापरतात
फळभाजीसाठी काळी माती वापरतात आणि फुलझाडांसाठी लालमाती वापरतात पण लालमातीमुळे रोप मरुन जाईल असे वाटत नाही, त्याला योग्य खत/पाणी/सुर्यप्रकाश मिळाले काय? काळीमाती नर्सरीमधे मिळू शकेल.
समांतरः लाल कोरड्या कुस्करलेल्या मिरचीला तशाच मोठ्या लाल मिरच्या येतील ना! हिरव्या मिरच्यांसाठी ताज्या हिरव्या मिरच्यांमधील बिया नै का चालणार?
यायला हरकत नाही पण चांगले बिज हवे असल्यास नाईक कृषि-उद्योग(स्वारगेट) ह्यांच्याकडे मिळेल.
नर्सरीतील सगळीच रोपं तशी
नर्सरीतील सगळीच रोपं तशी नसावीत - नर्सरीत त्यांचे सांगोपन नेमके कसे होते, आणि घरी आणल्यावर काय बदलते हे पाहायला हवे. मी देखील मिर्चीचं रोप आणलं होतं, आणि त्याला तर भरगोस मिर्च्या होत्या - लहान रोपापेक्षा हेच न्या असा नर्सरीवाल्याने आग्रह धरला. घरी आणल्यावर मी बरेच दिवस कुंडी बदलली नाही, तरी मिर्च्या पुढे आल्या नाहीत. त्याला बरेच "मिरेकेल ग्रो" सारखे खाद्य नर्सरीत मिळत असावे अशी मला शंका आली.
सानिया नीट सांगू शकतील, पण हिरव्या मिरच्यांच्या बिया पेरून मिर्चीचे झाड वाढेल की नाही याबद्दल साशंक आहे. ढब्बू मिर्ची साठी सुद्धा झाडावरच वाळलेल्या मिर्चीच्या बिया साठवून लावाव्या लागतात असे ऐकले आहे. मी बाजारातून आणलेल्या मिर्चीच्या बिया वाळवून लावणार होते, पण मोलकरणीने 'लागणार नाही' असे सांगितले (तिच्या घरी सुंदर परसबाग आहे, त्यामुळे तिचा सल्ला मी सहसा घेत असते).
रोपटे
मी मिरचीचे रोपच आणले होते नर्सरीतून. त्याला भरपूर मिरच्या लागल्या. नातेवाईक, शेजारी, इष्टमित्र इत्यादींना देऊनदेखिल पुष्कळ उरल्या (बरणी भरून लोणचेही झाले!). लाल मातीच आहे माझ्याकडे. त्यात शेणखत आणि कोकोपिट मिसळले होते. सात-आठ महिन्यांनंतर झाड गेले!
आता पुन्हा दुसरे रोप आणले आहे. पांढरी फुले लागलीत. बघुया काय होते पुढे...
माझ्याही रोपाला लाल माती
माझ्याही रोपाला लाल माती होती. पुण्यात (सह्याद्रीच्या पूर्वेला) ती मिळणे कठीण जाते, म्हणून आळशीपणा केला नी सोसायटीच्या माळ्याकडून काळी माती घेतली नी पिशवीतून झाड कुंडीत काळ्या मातीत लावले. पण.. :(
असो. पुन्हा बियांपासून प्रयोग करायचा सीझन निघुन गेलासा वाट्टोय (आता बराच पाऊस चालु आहे इथे पण मिरच्या आधीच गेल्या :( ). त्यापेक्षा कैतरी नवा प्रयोग करेन.
बिया.
होय. पिकलेल्या भाजी/फ्ळांपासून मिळालेल्या बियाच योग्य आहेत. मी सिमला मिर्चीचे रोप लावले आहे. पण साध्या मिरचीच्या बिया पेरल्या आहेत.
मी शक्यतो बाजारात मिळणार्या बिया वापरते कारण त्यांच्यावर प्रक्रिया झालेली असते. त्या धुवून, नीट वाळवून व योग्य वजनाच्या (चांगल्या दर्जाच्या) असतात. काही बियांना गरात आंबवून रोगमुक्त केलेले असते. हे सगळे घरी करता येणार नाही असे नाही, एक-दोनदा हे प्रयोगही केले, पण पुरेसा वेळ न देऊ शकल्याने हे उद्योग बंद केले.
मी रोप विकत आणल्यावर शक्य तेवढ्या लवकर मोठ्या कुंडीत्/जमीनीत हलवते. अनेकदा रोपांची मूळं वाढून कुंडीबाहेर येऊन अधिक जागेची मागणी करत असतात. जर रोप प्लॅस्टीकऐवजी गोणपाटाचा तळ असलेल्या साच्यात असेल, तर मी रोप गोणपाटासकट तसेच नवीन मातीत लावते.
काय सुखद आहे हे प्रकरण.. तो
काय सुखद आहे हे प्रकरण.. तो अगदी ताजा हिरवा, नी पाणी मारून न कुजलेल्या भाजीचा गड्डा बघुन किती दिवस लोटले हे हा फटु बघुन जाणवते.
पुण्यात भाज्या फारशा कुजलेल्या नसतात पण इतक्या ताज्या टावटवीत कधीच नसतात.
अवांतर: वसईला, उत्तनला वगैरे मिळणार्या अगदी ताज्या मासोळ्यांचा सुगंधसुद्धा कित्ती दिवसांत घेतलेला नाही हे ही (उगाचच) जाणवलं. पुण्यास एक दिवस शिळ्या होऊन येतात, नी त्याही बर्फाच्या गाडीतून, बाकी फरक नसला पडत तरी वास बदलतोच :(
पालेभाज्यांमधे चवीचा,
पालेभाज्यांमधे चवीचा, ताजेपणाचा फरक जास्तच जाणवतो, नाही? इथे ताज्या मास्यांना काही तोटा नाही, पण स्थानिक पालेभाज्या पुष्कळ मिळत असल्या तरी बंगलोर कडून वगैरे बाजारात खूप माल येतो. साधा पालक अगदीच गरीब, काळवणलेला दिसतो. हा कोलमी शाक याच मोसमात तुफान वाढतो, त्यामुळे तोच दोन-तीन कुंड्यात लावलाय.
अजून एक छान वाढतोय - पुइं शाक (मायाळू / बसेला आल्बा). याची छान लांबलचक, जाडजूड वेल चढते.
सुंदर! इथे सुद्धा अळू सर्वत्र
सुंदर!
इथे सुद्धा अळू सर्वत्र दिसतोय, आमच्या ऑफिसच्या आसपास रानटी वाढतो. बरेच दिवस म्हणतेय काही पानं घरी नेऊन वड्या कराव्यात म्हणून. अळूच्या पानांची ओल्या शेंगा घालून केलेली आपली पातळ भाजी (अळूचं फदफदं) मला खूप आवडते.
बंगाली लोक अळूला किसून, त्यात भिजवून वाटलेली मोहरी आणि खोबरं घालून अळूची चटणी करतात. जेवण्याचा आरंभी गरम भाताबरोबर खाल्ली जाते. "कोचू बाटा" गुगलून पाहिलंत तर बर्याच कृती मिळतील. धने-जिरे-आलं आणि थोडा आख्खा गरम मसाला घालून अळूच्या पानांची परतून भाजी बंगाली लोकांत करतात, ती देखील छान लागते. तसेच अळू बारीक चिरून प्रॉन करीत (कोचू चिंगरी) घालतात, मस्त लागते.
काल ऑफिसच्या आवारातून अळूची
काल ऑफिसच्या आवारातून अळूची पानं आणली, आणि आज हेच फदफदं केलं होतं. (फक्त कांदा घातला नाही, आणि चवळी वापरली). मस्त, मस्त झालं होतं. या पावसाळ्यात जितका अळू रानटी वाढताना सर्वत्र पाहिला तितका कधीच कुठे पाहिला नव्हता (माझं ही लक्ष गेलं नसणार म्हणा). पुन्हा कधी विकत न आणता असाच शोधून भाजी करणार आहे, कुंडीत लावायचे कष्ट देखील नकोत. पण वडीसाठी लालसर देठाचा फक्त शांतिनिकेतन च्या आसपास गाडीतून येता-जाता दिसला, इथे कुठेही अद्याप दिसला नाही.
कंपोस्ट
कंपोस्ट करण्यासाठी प्लास्टीकच्या (साध्याश्याच) टबात स्वयंपाकघरातला कचरा आणि वर्तमानपत्रांची रद्दी टाकायला महिन्यापूर्वी सुरूवात केली. शिवाय सुरूवातीला हे सगळं धड होईल याची खात्री नव्हती म्हणून जवळच्याच साखळी दुकानातून (होम डीपो) कंपोस्ट स्टार्टर आणून घातलं. टबाच्या खाली आता बऱ्यापैकी मातकट प्रकार दिसायला लागला आहे. (मायक्रोवेव्हेबल लाह्यांचं पाकीटही फार विचार न करता त्यात टाकलं होतं, त्यातला प्लास्टीकचा कागद फक्त दिसला म्हणजे ते बरंच सुरू असावं.)
आता त्यात चिक्कार, पांढऱ्या वळवळणाऱ्या अळ्या दिसत आहेत. बहुपाद नाहीत, गांडुळासारख्याच बिनपायाच्या. पण शरीर मात्र दणदणीत जाड, दंडगोल आहे. (आज फोटो काढूनही दाखवते.) आणि कंपोस्टाच्या आकाराच्या ३०% आकार या अळ्यांचाच असेल इतपत यांची संख्या आहे. कंपोस्टात काय काय असायला पाहिजे याचा गूगलशोध घेतला असता या अळ्यांसारखं काहीही दिसलं नाही, पण कंपोस्ट होतंय म्हणून फार विचार केला नाही.
जेव्हा सगळ्या वस्तूमानाचं कंपोस्ट बनतं तेव्हा या किडे, अळ्यांचं पुढे काय होतं? या जीवजंतूंचा त्रास बिया, नवजात रोपं आणि मुळांना होत नाही का? शेवटी ते पण बायोमासच ना!
कंपोस्ट करताना मला वाटतं
कंपोस्ट करताना मला वाटतं आळ्या कचरा खाऊन गलेलठ्ठ होत जातात आणि त्यांची विष्ठा म्हण्जे आपलं तयार खत असावं (गांडूळ खताप्रमाणेच याची प्रक्रिया असेल तर). आळ्यांची पाखरे होऊन ती उडून जात असतील किंवा आळ्या खाणं संपल्याने मरून जात असतील आणि खतातच सामील होत असतील.
(आज फोटो काढूनही दाखवते.)
कुठे टाकले आहेस का फोटो ? पहायला आवडतील.
सध्या मी खतासाठी जमा करायला लागलेल्या ओल्या कचर्यात चिल्टं/केमरं झाली आहेत.पावसामुळे कोरडी पानंही मिळत नाहीयेत. थोडे पेपर आणि जुने कोरडे खतच यात मिसळले...तरी ही चिल्टं आहेतच.
अवांतरः
मी (जालावर पाहून) अंड्याची टरफले आणि केळीची साले वेगळी ठेवत आहे. उन्हात वाळून कोरडी झाली की त्याची पूड करून (कॅल्शियम-पोटॅशियम युक्त) वेगळं खत करणार आहे. हे आधी एकदा करून चांगली आयडिया वाटली होती म्हणून परत करते आहे.
कंपोस्टबद्दल असा नवीन धागाच
कंपोस्टबद्दल असा नवीन धागाच काढला नंतर.
चिलटांसाठी मी असं वाचलं की वर कागदाचा कोरडा थर ठेवायचा. त्यामुळे चिलटं कमी होतात. मी खालची माती व्हायला लागलेला भाग उचलून वर आणला, ताजी फळं, भाज्यांची देठं खाली ढकलली तरीही चिलटं कमी दिसली. कदाचित उन्हाळा बराच वाढल्यामुळेही कमी झाली असतील.
रोचक आहे, पण कल्पना नीटशी
रोचक आहे, पण कल्पना नीटशी स्पष्ट होत नाहीये
फोटोंमध्ये बाटली उघडी ठेऊन व मातीत खोचून एक झाड लावलेले दिसते (बाटलीला तळ नसावा). ती पद्धत काय आहे? कधी वापरली जाते?
शिवाय या प्रकारचे प्रयोग कोणी केले आहेत का:
For kitchen waste management Augustine has developed a simple mechanism which consists of a bucket with an emission pipe. He suggests that the collected waste which can include egg shells and fine fish bones be sprayed with EM solution (Effective Micro Organisms), a method developed by Japanese scientists that helps convert the mix into compost. The decomposing odours due to fermentation are flushed out through the pipe.
बोन्साय
मी जिथे तिथे वाढताना दिसणार्यातल्या एका पिंपळाचे रोप बोन्साय करायला घेतले आहे. सध्या त्याला एका छोटया (मोठ्या कॉफी मग एवढ्या) पिशवीतच वाढत ठेवले आहे. उंची जास्त न वाढू देता फांद्या वाढविण्याच्या दृष्टीने थोडी काटछाट करत आहे. मुळे न कापता फक्त फांद्यांची काट छाट करत बोन्साय होऊ शकते का ?
चांगली कल्पना
एका कुंडीत एकाहून जास्त झाडे ही कल्पना माहित होती. पण नेमकी कोणती कॉम्बिनेश्न्स चांगली हे नेहमी कळतेच असे नाही- अर्थात चुका करत शिकण्यात मजा आहेच. पालक माझ्या आईने तिच्याकडच्या सगळ्याच कुंड्यात खोचून (बाजारातून आणलेल्याची मुळे) ठेवला होता म्हणजे मग एका वेळी दोन माणसांची भाजी होवू शकेल इतका मिळत असे.
पालक - कोथिंबीर ही जोडी या व्हिडियोतून कळली. अशा आणखीन जोड्या माहित करून घ्याव्याशा वाटत आहेत.
धन्यवाद रोचना.
माहितीपूर्ण प्रतिसाद.
मला वाटते, कुठल्याही मोठ्या-लांब मुळं वाढणार्या उंच झाडाबरोबर (उदा. टोमॅटो) लहान मुळं असलेली बुटकी झाडं (उदा. पालेभाज्या) गुण्या-गोविंद्याने वाढत असावीत. काल भाजीकरता चवळी खुडली, तर फुटभर वाढलेल्या चवळीची मुळं रुपयापेक्षाही कमी जागेत पसरली होती.
सानियाचा प्रतिसाद वाचून चवळी
सानियाचा प्रतिसाद वाचून चवळी लावण्याचा उत्साह आला. त्यात अमेरिकन आकाराचा एक केक घरी आला होता, त्याचा डबाही पुरेल असं वाटलं. म्हणून १२ ऑगस्टला चवळी पेरली. पाच दिवसांत, १६ ऑगस्टला काढलेले फोटो -
डबा पारदर्शक असल्यामुळे मुळंसुद्धा दिसत आहेत. ही मुळं कालच डब्याच्या तळाशी पोहोचून उलट वर आलेली दिसत होती.
या कुंडीत उजव्या बाजूला वर जूनच्या शेवटी पेरलेलं बाझिल, त्याखाली जुलैच्या पहिल्या आठवड्यात पेरलेलं वांग्याचं बी आणि डाव्या बाजूला १२ ऑगस्टला पेरलेली चवळी दिसत आहे. या वेगाने चवळी वाढणार असेल तर निश्चितच उत्साहवर्धक आहे. दोन आठवड्यांत भाजी करण्याइतपत होईलसं दिसतंय.
अरे वा!
मस्त!
मी लाल चवळी पेरली होती. ही चवळी किंचित उग्र असते, त्यामुळे पालेभाजीची चवही तीव्र व पानेही जरा गडद रंगाची व लहान आहेत. तुम्ही पांढरी चवळी पेरली होतीत काय?
माझ्या चवळीचा वेल नाही, तुमच्याही नसावा. जर रोचना यांच्या चवळीचा वेल असेल, तर ती वेगळी जात असेल का अशी शंका येते आहे. मी दोन वेगवेगळ्या पाकिटातल्या फरसबीच्या (ग्रीन बीन्स) बिया पेरल्या असता, एका पाकिटातल्या बियांचे गडद रंगाचे नाजुक रोप, तर दुसर्या पाकिटातल्या बियांचे फिकट/पोपटी रंगाचे वेल आले. दुसरी जात, ज्याला स्ट्रिंग बीन्स असेही म्हणतात ती असावी. पण पाकिटावर असे काही लिहीले नव्हते.
मला देखील या चवळीने गोंधळात
मला देखील या चवळीने गोंधळात टाकले. साधी बाजारातून वाण्याकडून आणलेली चवळी (पांढरट, अदितीच्या चित्रात दिसते तशी) दोन-तीन दिवस मोड आल्यावर लावली. आसपासची मंडळी या बियांना "बॉरबोटी" म्हणताना ऐकले, पण एका स्थानिक शेतकर्याकडून बॉरबोटी बिया मिळाल्या, त्या लालसर, थोड्या चपट्या आणि किंचित पांढरा "डोळा" युक्त होत्या. (सुट्या विकत घेतल्या होत्या, म्हणजे पाकिटावर प्रजातीच्या नावाची वगैरे भानगड नाही)
दोन्हींना वेल चढला, आणि पानं सारखीच दिसताहेत. पण थोडे गुगलून पाहता, बॉरबोटी ही Vigna unguiculata sesquipedalis आणि चवळी vigna unguiculata catjang आहे, आणि Catjang प्रजातीत झाडी आणि वेल दोन्ही प्रकार असतात हे कळले.
चिक्कार पानं येऊनही एकही फूल अद्याप नाही हे पाहून थोडी निराशा होतीये. फार उष्णता, ऊन असले तर फुलं येणार नाहीत असे कोणीतरी सांगितले, पण इथे तर चवळी खरिप मोसमात लावतात, मग कसले आले गारवा आणि सावली? असो. बघू येत्या दोन आठवड्यात काय होतं ते.
रोप आणि वेल.
ब्लॅक आईड बिन्सना माझी एक मध्यप्रदेशात वाढलेली मैत्रिण 'बरबट्टी' असे म्हणते ते आठवलं.
खालच्या फोटोत, गडद रंगाचे रोप आहे, त्याला फुलं, शेंगा आल्या आहेत. शेजारीच जी पोपटी वेल आहे, ती तुमच्या म्हणण्याप्रमाणेच ताडमाड वाढलेली (जवळपास तुमच्याच वेलीच्या वयाची) असून तिला एकही फूल येण्याचे चिन्ह नाही.
अवांतरः
काल आमच्याकडे या पाहुण्या आल्या होत्या.
कॅटरपिलर ही 'हंग्री' असते म्हणून तिला दुधीची सालं खायला दिली. पण काल तिचा बहुतेक दुसरा रविवार असावा. तिने वास घेऊन तोंड फिरवले. आजुबाजूची पानं खाण्यातही तिला रस नव्हता. रात्री उशीरापर्यंत ती कुंडीत होती, आज दिसत नाहीये.
माझ्या टोमॅटोच्या दोन फांद्यांमधे हे कोळीबुवा घर करून भक्ष्याची वाट पाहत बसले आहेत.
चित्र मोबाईल वापरून काढल्यामुळे स्पष्ट आली नाहीयेत.
:)
सानिया, होय. मी पांढरी चवळी पेरली होती.
(आणि एकूणच चवळीवरून 'न'वी बाजू आठवले. त्यांनी कुठेतरी चवळी पेरलेलं डुक्कर किंवा डुक्कर पेरलेली चवळी या पाकृबद्दल लिहीलं होतं.)
---
आणि एक प्रश्न आहे. शाळेत शिकवलं होतं की कडधान्यांच्या मुळांना गाठी असतात त्यातून ही झाडं जमिनीतला नायट्रोजन वाढवतात. हे असं चवळीचा पाला वाढवल्यामुळे होईल काय? मुळं किती वाढतात याचा फार विचार न करता इतर झाडांच्या, मोठ्या कुंड्यांतही चवळी पेरली आहे. त्याचा "एक्स्ट्रॉ" फायदा होईल काय?
...
(आणि एकूणच चवळीवरून 'न'वी बाजू आठवले. त्यांनी कुठेतरी चवळी पेरलेलं डुक्कर किंवा डुक्कर पेरलेली चवळी या पाकृबद्दल लिहीलं होतं.)
चवळीची डुक्करपेरून उसळ. अर्थात 'दाक्षिणात्य' ब्लॅक-आइड पीज़.
(नाही म्हणायला, 'आमच्या दक्षिणे'त काय नाही नाही ते डुक्करपेरून करतात, पण ते असो.)
बाकी चालू द्या.
फोटोत चवळीच्या बिया बघून मला
फोटोत चवळीच्या बिया बघून मला आधी वाटलं पाच दिवसातच शेंगा फुटून बिया सुद्धा दिसायला लागल्या... मग ट्यूब पेटली. छानच दिसताहेत पानं. माझ्या चवळीच्या वेली उंच सहा फुटी झाल्या आहेत, आता दीड महिना झाला, फुलं यायची चिन्हं दिसताहेत, पण अजून एकही नीट आलं नाही. दुसर्या कुंडीत इथल्या स्थानिक "बॉरबोटी" (चवळीच्या शेंगांसारखीच, पण थोड्या बारीक, लांबट शेंगा असलेली) तेवढी उंच झाली नाही, पण एक फूल येऊन एकमेव शेंग सध्या रोपावर आहे - वेरी एक्साइटिंग!
दुसर्या धाग्यावरही विचारलं - भारतात "बकव्हीट" हे धान्य उगवलं जातं का? जात असलं, तर त्याला मराठीत काय म्हणतात?
रोपांपासून सुरूवात करणे
ही आयडिया आवडली. एखादा फोटो मिळालाच तर जरूर डकवा. सप्टेंबर मधे टोमॅटोच्या बियांसाठी प्रयोग करून पाहायला आवडेल.