इवल्या इवल्या बाळाचे
इवले इवले ताट
चिऊ काऊ हम्माचे
अवती भवती पाट
पहिला घास चिऊचा
चिव चिव अंगणीचा
मेणाच्या घरातल्या
चिव चिव चिमणीचा
दुसरा घास काऊचा
काव काव फांदीवरचा
शेणाच्या घरातल्या
काव काव कावळ्याचा
तिसरा घास हम्माचा
हम्मा हम्मा कपिलाचा
गवताच्या गोठ्यातल्या
हम्मा हम्मा गाईचा
बाळाची अंगतपंगत
पक्षीप्राण्यांची संगत
हातवारे बाळाचे
वाढत आहे रंगत
गोड घास आईचा
मम्म मम्म करण्याचा
चांदोबाला बोलावत
गात निन्नी करण्याचा !
क्यूट!
क्यूट!
:)
हे हे हे.. मस्तंय! :)
आता ऐसीवर 'छोट्यांसाठी' हा विभाग सुरु करावा असे (पुन्हा एकदा) सुचवतो.
मच्च
छान.
छान. मात्र आधुनिकोत्तर बाळांसाठी काही आधुनिकोत्तर कविता यायला हव्या.
स्मॉल क्यूट बेबीचे
टायनी टायनी प्लेट
टॉम जेरी मिकीमाउसही
टेबलचेअरवर सेट
यापुढचं कोणी लिहील का? :)
गोग्गोलगोग्गोलगोग्गोल....
गोग्गोल
गोग्गोल
गोग्गोल.... अतिशय क्युट कविता लिहिल्याबद्दल- :D>
सो क्यूट
सो क्यूट
बालकवी, बालकवी!
बालकवी, बालकवी!
मजा आली. मस्त आहे बब्बलगीत.
मजा आली. मस्त आहे बब्बलगीत.
गोडुले गीत
गोडुले गीत
मस्तच आहे...
मस्तच आहे...