Skip to main content

इवल्या इवल्या बाळाचे

इवल्या इवल्या बाळाचे
इवले इवले ताट
चिऊ काऊ हम्माचे
अवती भवती पाट

पहिला घास चिऊचा
चिव चिव अंगणीचा
मेणाच्या घरातल्या
चिव चिव चिमणीचा

दुसरा घास काऊचा
काव काव फांदीवरचा
शेणाच्या घरातल्या
काव काव कावळ्याचा

तिसरा घास हम्माचा
हम्मा हम्मा कपिलाचा
गवताच्या गोठ्यातल्या
हम्मा हम्मा गाईचा

बाळाची अंगतपंगत
पक्षीप्राण्यांची संगत
हातवारे बाळाचे
वाढत आहे रंगत

गोड घास आईचा
मम्म मम्म करण्याचा
चांदोबाला बोलावत
गात निन्नी करण्याचा !

ऋषिकेश Tue, 13/12/2011 - 10:21

हे हे हे.. मस्तंय! :)

आता ऐसीवर 'छोट्यांसाठी' हा विभाग सुरु करावा असे (पुन्हा एकदा) सुचवतो.

राजेश घासकडवी Tue, 13/12/2011 - 18:12

छान. मात्र आधुनिकोत्तर बाळांसाठी काही आधुनिकोत्तर कविता यायला हव्या.

स्मॉल क्यूट बेबीचे
टायनी टायनी प्लेट
टॉम जेरी मिकीमाउसही
टेबलचेअरवर सेट

यापुढचं कोणी लिहील का? :)