मनातले छोटे मोठे प्रश्न - भाग १८

व्यवस्थापकः ही धागामालिका आपल्या मनात येणारे, नेहमी नेहमी डोकावणारे विचार मांडण्यासाठी आहे. कधी कधी आशय फार मोठा नसतो. फार खोल विचार केलेला नसतो. तो विचार/ कल्पना/ प्रश्न/ गंमत डोक्यात येते, जाते. कधी कधी आपण विसरतो, कधी कधी ती ती पुन्हा पुन्हा येत असल्याने आपण विसरू शकत नाही.
यापूर्वीच्या धाग्यावरचे प्रतिसाद १०० च्या वर गेले आहेत म्हणून हा पुढचा धागा.

==========

शर्टाच्या किंवा प्यांटच्या खिशात काही ठेवलेलं असेल तर अनकम्फर्टेबल/गैरसोयीचं वाटत नाही का ?
वाटत असेल तर --
तुम्ही त्यासाठी काय करता ?

माझ्यापुरतं उत्तर :-
माझ्याकडे सॅक/ल्याप्टॉप बॅग्/स्कूल बॅग सदृश प्रकार आहे.
मोबाइल, पेन वगैरे मी त्यातच ठेवतो. खिशात फारशा वस्तू ठेवत नाही.
फक्त रक्कम आणि ए टी एम कार्ड इतकच काय ते खिशात.
तुम्ही लोक काय करता?

field_vote: 
0
No votes yet

लुंगी घालतो. त्याला खिशे नसल्याने वस्तूंना आपोआपच दुसऱ्या जागा शोधाव्याच लागतात. आणि त्या सापडतातही.

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

हापिसात वगैरे, घराबाहेर कुठेही वावरताना लुंगीच वापरता काय?

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

--मनोबा
.
संगति जयाच्या खेळलो मी सदाहि | हाकेस तो आता ओ देत नाही
.
memories....often the marks people leave are scars

होना, आणि घरात खिशात काय ठेवावं लागत? Wink

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

मला वाटले घरांतर्गतचा प्रश्न आहे. हो बाहेर असताना मी खिशात जितक्या कमी वस्तू ठेवता येतील तेवढ्याच ठेवतो. थोडे पैसे, ड्रायविंग लायसन आणि काही कार्डे. मोबाईल आजकाल हातातच असतो. खिशात जास्त सामान ठेवावे लागत आहे अशी शंका आली तर जाकीट घालतो. त्याच्या खिशात सामान ठेवल्यास अनकंफर्टेबल वाटत नाही.

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

खिश्यातलं सामान जोपर्यंत खिश्यात रहातं तोपर्यंत समस्या नाही, ते बाहेर यायला लागलं की मीही सॅक वगैरे वापरतो, ती जड व्हायला लागली की गाडीच्या डिकीत ठेवतो, त्याच्या बाहेर येणारं सामान असल्यास मी ते वहात नाही.

पण मोस्टली, शर्ट किंवा पँट घट्ट असल्याने त्यात ठेवलेल्या गोष्टी गैरसोयीच्या वाटतात असे निरीक्षण आहे.

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

माझं मत थोडं वेगळं आहे. मी खिशात ठराविक गोष्टी ठराविक ठिकाणी ठेवतो. म्हणजे रुमाल आणि गाडीची किल्ली पँटच्या पुढच्या डाव्या खिशात, पाकिट पँटच्या पुढच्या उजव्या खिशात, मोबाईल शर्टाच्या खिशात (शर्टाला खिसा नसेल तर पँटच्या मागच्या डाव्या खिशात), घराची किल्ली पँटच्या मागच्या डाव्या खिशात. घरी गेलो की पँट तशीच लटकवून ठेवतो आणि दुसर्‍या दिवशी फक्त पँट-टू-पँट ट्रान्सफर. म्हणजे काहीतरी विसरलो असं होत नाही. नुसते खिसे चाचपले की कळतं की काही राहिले आहे का? अजून एक फायदा म्हणजे अर्ध्या मिनिटात पँट अडकवली की मी बाहेर जायला तयार. Smile

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

बाहेर वावरतानासुद्धा अधिक वस्तू खिशात असल्या तर सोयीस्कर वाटत नाही.
अर्थात "अधिक वस्तू " हे व्यक्तीसापेक्ष असणार.
मला एखादा पेन आणि काही पैसे/डेबिट कार्ड सोडलं तर काहिच जवळ बाळगावसं वाटत नाही.
सोयीस्कर वाटत नाही; खिशातून बाहेर पडत नसलं तरी.

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

--मनोबा
.
संगति जयाच्या खेळलो मी सदाहि | हाकेस तो आता ओ देत नाही
.
memories....often the marks people leave are scars

(शर्टाला खिसा नसेल तर पँटच्या मागच्या डाव्या खिशात), घराची किल्ली पँटच्या मागच्या डाव्या खिशात.

पण मग बसताना हे किल्ली, मोबाईल (शर्ट ला खिसा नसेल तर) टोचत नाही का? की प्रत्येक वेळी बसताना तुम्ही त्याची जागा हलवता? त्यापेक्षा रुमाल आणि पाकीट मागच्या खिशात ठेवणे जास्त सोयीस्कर नाही का?

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

नको नको तिथे लक्ष तुमचं.

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

सही: पुरोगाम्यांना लॉजिक माफ असतं.

हे डिस्क्रिप्टिव्ह आहे की प्रिस्क्रिप्टिव्ह? नै म्ह. त्यानुसार अर्थनिर्णयन करता येईल, म्हणून म्हटलं. ROFL

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

माहिष्मती साम्राज्यं अस्माकं अजेयं

एखादी गोष्ट ढुंगणाला टोचणं ह्यात "नको तिथं" लक्ष असं काय आहे. साधी-सरळ-प्रामाणिक शंका होती माझी - दॅट्स ऑल.
माझ्या मागच्या खिशात मी जे पाकीट ठेवतो पैश्याचं त्यात कधी थोडे सुटे पैसे (नाणे) जास्त झाले तरी टोचायला लागतं, हे तर चावी-मोबाईल ठेवतात मागच्या खिशात म्हणून मी कल्पना केली आणि शंका विचारली.

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

मागच्या खिशात एखादी वस्तू कसेकाय लोक ठेवतात, काय की. मी तर तसे कधीच करत नाही, झेपतच नाही ते. पार्श्वभूमी डिष्टर्ब होते Wink

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

माहिष्मती साम्राज्यं अस्माकं अजेयं

तुमचा अंदाज एकदम बरोबर आहे. गाडीत बसताना मागच्या खिशातली किल्ली पुढच्या डाव्या खिशात ठेवतो. (ती एकतर टोचते किंवा गाडीच्या लेदरवर खाचा करते.) पूर्वी घराची आणि गाडीची किल्ली पुढच्या डाव्या खिशात एकत्र ठेवायचो, पण २ किल्ल्या एकत्र ठेवून खिशाला भोक पडायला लागले, म्हणून त्या वेगळ्या केल्या. मोबाईल काही टोचत नाही आणि गाडीच्या ऑडिओबरोबर लिंक केल्यामुळे hands-free बोलता येते. बर्‍याचदा कंटाळा आला, तर मी फोनच नेत नाही.

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

(ती एकतर टोचते किंवा गाडीच्या लेदरवर खाचा करते.)

यात गाडीच्या (अनुस्वारविरहित) लेदरची चिंता अधिक, की... असो.

अवांतर:

बर्‍याचदा कंटाळा आला, तर मी फोनच नेत नाही.

हे उत्तम! वाजणारा फोन हा (१) उचललाच पाहिजे, आणि (२) घरातल्या कोणी उचलला नाही, तर वेळप्रसंगी घरी आलेल्या पाहुण्याने का होईना, पण काहीही करून उचललाच पाहिजे, असे (अ) भगवद्गीतेत अथवा (ब) मनुस्मृतीत कोठेही लिहिलेले नाही, ही जाण भारतवर्षात ज्या क्षणी रुजेल, त्या नेमक्या क्षणी जगबुडी होईल, असे आमचे भाकीत आहे. (नाहीच झाली, तर आम्ही जातीने बादलीभर पाण्यात पाण्याचा जग बुडवून आमचे भाकीत खरे करू.)

नाहीतर मग व्हॉइसमेल कशासाठी असते?

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

एकदा शिकलेली भाषा अनलर्न करता येते का? विशेषतः मातृभाषा? अन नसेल अनलर्न करता येत तर भाषा शिकताना, मेंदूत कोणते रासायनिक बदल घडतात? कोणती न्युरॉलॉजिकल कनेक्शन्स तयार होतात जी की परत तुटत नाहीत? सायकलिंग अन पोहोणे याविषयीदेखील ऐकले आहे की एकदा शिकले की विसरत नाही. हे २ स्किल्स शिकतानादेखिल नक्की मेंदूत काय बदल घटतात?

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

भाषा वा मातृभाषा असंपादित करायची गरज काय असावी ब्वॉ?

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

सही: पुरोगाम्यांना लॉजिक माफ असतं.

नाही, बहुदा नसावं.
हिंदी किंवा कोणत्याही शिनेमात फुल्ल यादताश खो जाने के बाद भाषा का विसरत नाहीत असा प्रश्न बरेच दिवसांपासून पडलेला आहे. एकदा गेली मेमरी की सगळं फॉर्म्याट व्हायला पायजेल.

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

या प्रश्नाचं उत्तर वाचायला मलाही आवडेल. अर्थात उत्तर माहित असल्यामुळे गोष्टी सहजशक्य होतातच असं नाही. अनेक छोट्यामोठ्या आजार, दुखण्याखुपण्यांबद्दल माहिती असली तरी आजाराचा त्रास व्हायचा तो होतोच.

पण असे काही फोटो मला 'unsee' करता आले तर फार आवडेल. ज्यांना उत्सुकता आहे त्यांनी फेसबुकावर लॉगिन करून हे पहावं.

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

---

सांगोवांगीच्या गोष्टी म्हणजे विदा नव्हे.

रोचक प्रश्न.
सायकलिंग अन पोहणे याविषयीदेखील ऐकले आहे की एकदा शिकले की विसरत नाही. > सायकलिंगबद्दल माहीत नाही; पण पोहणे नक्कीच विसरतं. विसरतं म्हणण्याऐवजी बर्याच वर्षांनी केल्यास शरीर, हाडं स्टीफ झाल्याने जमत नाही म्हणणे जास्त योग्य होइल Sad

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

मेमरीज कशा तयार होतात, याच्या अभ्यासानंतर याबद्दल अधिक समज येईल.
भयंकर इंटरेस्टींग आहे.
अन बरंचसं कॉम्प्युटर सारखं.
एकादी स्मृती तयार होते, तेव्हा एक पर्मनंट न्यूरल सर्किट तयार होते. जणू रॉम चिप. ती स्मृती पर्मनंट होण्यासाठी एक्झॅक्ट ट्रिगर कोणता ते नक्की ठाऊक नाही. म्हणजे काही घटना, वाक्ये, गाणी, चेहरे, काहीही अगदी एका दृष्टीक्षेपात पर्मनंट बर्न होतात. अन कित्येक बाबी अजिब्ब्बात लक्षात रहात नाहीत.
घोकून पाठ करताना, त्याच त्या न्यूरल सर्किटमधे इम्पल्स फिरत रहातो. हे अगदी लिटरली इलेक्ट्रिक सर्किट असते. न्यूरॉन्सचे. एका न्यूरॉनमधून दुसर्‍यात तिथून तिसर्‍यात असं करत एक पूर्ण पाथवे बनतो, अन तो पक्का झाला की तिथे स्मृती तयार होते. अक्षरशः करोडो न्यूरॉन्स सेरेब्रल कॉर्टेक्समधे आहेत, अन एकापेक्षा अधिक सर्किट्समधे प्रत्येक न्यूरॉन भाग घेऊ शकतो.
शॉर्ट टर्म, मिडटर्म अन पर्मनंट अश्या मेमर्‍या असतात.
कुठेतरी, बहुतेक मायबोलीवर मी स्वप्नांबद्दलच्या धाग्यावर लिहून ठेवलंय. ती लिंक सापडली तर देतो, किंवा मग वेळ मिळाला तर इथे लिहितो परत.
***
धाग्याची लिंक वरती आहेच. हा तो प्रतिसाद. -->

मेंदूचा अभ्यास अजूनही सुरु आहे अन इतर अवयवांइतके सखोलपणे त्याचे कार्य अजूनही उलगडलेले नाही. पण तरीही मेमरी बद्दल जितका अभ्यास झालेला आहे, त्यातला 'ऑफ हॅण्ड' जितका आठवतो तो असा:

१.अल्ट्रा शॉर्ट टर्म, २.शॉर्ट टर्म अन ३.लाँग टर्म मेमरी असे तीन प्रकार आहेत.

१ मधे अगदीच थोड्या वेळासाठीच्या आठवणी असतात, टास्क रिलेटेड. ते टास्क संपले की ती मेमरी डीस्कार्ड होते. हे थोडे काँप्युटरच्या रॅम सारखे. उदा. गाडी चालवताना बदलण्याचे गियर. मघा मी दुसरा टाकला होता. आता मला थर्ड किंवा परत फर्स्ट टाकायचा आहे, तर आधीचा गियर आठवणीत हवा. गियर बदलून झाला, की ही मेमरी डिस्कार्ड करण्यात येते.

२ अमुक ठिकाणी जाण्यासाठी विचारलेले लॅंडमार्क्स, सरळ जाऊन मारूतीच्या देवळाशी डावीकडे मग २ सिग्नल सोडले की बरोडा बँके समोरची बिल्डींग. हे शॉर्टटर्म. किंवा सकाळी डायबेटीसची गोळी घेतली होती की नव्हती? इ. हे थोडे हार्ड डिस्क वर लिहिलेल्या डेटा सारखे. रीड्/राईट मेमरी.

३ लॉंग टर्म मधे, वर्षानुवर्षे आठवण टिकून रहाते. जणू सीडी वर लिहिलेला डेटा. या प्रकारची मेमरी तयार होण्यासाठी त्याच त्या न्यूरोनल लूप मधून सिग्नल फिरतो, अन न्यूरॉन्स चे पक्के सर्किट्स तयार होतात. त्याच मुळे घोकंपट्टी म्हणा की रियाज म्हणा, पुनः पुन्हा तेच तेच करत रहाणे, हा लाँगटर्म मेमरी तयार करण्याशी संबंधीत भाग आहे, ज्याने ही सर्किट्स पक्की होतात. ही मेंदूच्या 'स्ट्रक्चर'मधे बदल करणारी गोष्ट आहे. सीडी लिहिल्यानंतर तिथे जसे पर्मनंट स्ट्रक्चरल चेंज होते, तसेच. मज्जापेशींची नवी 'इलेक्ट्रॉनिक' सर्किट्स = लाँगटर्म मेमरी

(स्वप्न, किंवा ज्याला REM Sleep म्हणतात, त्यावेळी दिवसभरातील स्मृतींचे फ्लॅशबॅक घेऊन त्यांचे वर्गिकरण, जुन्या आठवणींशी पडताळणी इ. सुरु असते. त्यातून मग सिलेक्टेड मेमरीज साठवणे अन इतर डिस्कार्ड करणे आसे काम होते, असा अंदाज आहे, जो बरोबर असावा असे वाटते. यामुळेच जुन्या पक्क्या आठवणींशी सांगड घालून तयार केलेल्या नव्या आठवणी, लाँगटर्मकडे वर्ग होणे सोपे होते. यातच थोडी जागृतावस्था आली की स्वप्न जाणवते/आठवते, अन्यथा सुमारे दर ९० मिन्टात एकदा १० मिनिटे आपण अशी झोप अनुभवत असतोच. मग स्वप्न पडले असे आठवो, की न आठवो.)

या झाल्या 'अ‍ॅक्वायर्ड' मेमरीज.

याखेरीज असते ती 'रेशियल' मेमरी, उदा माकडांना वाटणारी बिबट्याची/सापांची भिती, किंवा त्याही पेक्षा आदीम आठवण म्हणजे निपल तोंडात धरून चोखणे, दूध ओढून घेणे. हे शिकवावे लागत नाही. ती मेमरी बायोस सेटपप्रमाणे बिल्ट-इन असते. मेंदू विकसित होतानाच त्यात बनविलेली ही काही सर्किट्स असतात. त्यात अगदी श्वास घेणे ऑटोपायलटवरून मॅन्युअलवर अन बॅक टू ऑटोमॅटिक इतपत प्रगत प्रणाली असतात डोळा मारा काही प्रणाली मॅन्युअल ओव्हरराईडच्या पल्याड असतात, उदा. हृदयस्पंदने.

असो.

तर या लेखाचा मुद्दा: स्मरणशक्ती वाढवावी कशी?
यासंदर्भात माझी मते:

१) प्रत्येकासाठी वेगळा मार्ग आहे. एकाला लागू पडेल ते दुसर्‍याला पडेलच असे नाही.
२) काही नेहेमीच्या वापराचे (वा विशेष आवडीचे) मोबाईल नंबर आपोआप लक्षात रहातात. बाकी नं लक्षात ठेवायलाच ते फोनबुक असते.
३) निरुपयोगी गोष्टी सहसा लक्षात रहात नाहीत. डोक्यातून आपोआप कचरा गायब होतो. सबब कोणत्या गोष्टी लक्षात रहायला हव्या त्याचेही तारतम्य असणे गरजेचे आहे. उगाच प्रत्येकानेच हिरोशिमावर बाँब पडला तो किती टनांचा होता अन कोणत्या वारी किती वाजता पडला हे लक्षात कशाला ठेवायला हवे? गूगल आहे त्यासाठी..
४) आवडीची नसलेली गोष्टही सहसा लक्षात रहात नाही. आवड असेल तर बरोब्बर लक्षात रहाते. म्हणूनच नीरसपणे शिकवलेला अभ्यास ४ वेळा रेकॉर्डेड लेक्चर ऐकूनही लक्षात रहात नाही, पण आवडीने पाहिलेल्या सिनेमाचे डायलॉग / गाणी एकाच पहाण्यात/ऐकण्यात पाठ होतात..

धन्यवाद!

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

-: आमचे येथे नट्स क्रॅक करून मिळतील :-

माहितीपूर्ण प्रतिसादाबद्दल थ्यांक्स. माझ्याच नावानं धागा असल्यानं श्रेणी देता येत नाही. मुद्दाम त्यासाठी थ्यांक्स म्हणत आहे.
पण तुम्ही म्हणता त्याशिवायही एक "घोटाळ्याची मेमरी" नावाचा प्रकार आहे का.
किम्वा मेमरी काम करताना बर्‍याच गमतीजमती करते असं ऐकलं.
उदा :- एखादी न घडलेली घटना व्यवस्थित "आठवणे "; घडलेली घटना डिस्टॉर्टेड रुपात " आठवणे" वगैरे.
११ सप्टेंबर २००१ ला अमेरिकेचे ट्विन टॉवर्सवर विमानं धडकली. त्यात दुसर्‍या विमानाच्या आदळण्याची घटना क्यामेर्‍यात चित्रित झाली.पब्लिकनं पाहिली. जॉर्ज बुश धाकटा; ह्याला मात्र पहिले विमान पडताना पाहिल्याचेही "आठवत" होते असे तो म्हणाला.
त्यामुळं कॉन्स्पिरसी थेरीला अजूनच बळ मिळालं -- अमेरिकन सरकारनच विमानं धडकवली. पहिलं विमान धडकलं त्यावेळी एखाद्या गुप्त अशा अड्ड्यावर अमेरिकन अध्यक्ष बुश ह्यानं ते पाहिलं ( "मोहिमे"ची खातरजमा करण्यासाठी).
अन् नंतर चुकून बोलण्याच्या भरात तो बोलून गेला.

तसच :-
tank man हे गाजलेलं चित्र :- http://en.wikipedia.org/wiki/Tank_Man

ह्या चित्रात रणगाड्यासमोर उभा असलेला माणूस आहे. काही मनोवैज्ञानिकांनी एक चाचणी घेतली.
त्यांनी अ‍ॅट रॅण्डम काही लोकांना विचारलं "टँक मॅन चित्र ठाउक आहे का ? व्यवस्थित आठवते आहे का ? " ह्यास होकारार्थी उत्तर देणार्‍यांना मनोवैज्ञानिकांनी टँक मॅनचा एक फोटो दाखवून हा तोच फोटो आहे का हे विचारलं?
त्यांनी फोटो मध्ये एक बदल केला होता, जो ह्या लोकांना त्यांनी सांगितला नव्हता. मूळ फोटोमध्ये फक्त एक माणूस व काही रणगाडे आहेत. बाकी कोणी व्यक्ती त्यात दिसत नाही. पण मनोवैज्ञानिकांनी मात्र ह्या फोटोअमध्ये रस्त्याच्या कडेला गच्च दाटीवाटीने बसलेली चिनी माणसांची गर्दी दाखवली; ऑलिम्पिक किंवा इतर क्रिडास्पर्धांना दाखवतात तशी!
तरीही तो फोटो पाहून ९९% लोकांनी "हो. हाच टँक मॅनचा फोटो " असं मान्य केलं. त्यांनी फोटो पाहून ह्या प्रकारावर आक्षेप घेतला नाही; फोटो वेगळा आहे; असं म्हटलं नाही!!!

नॅशनल जिओग्राफिकवर हा प्रकार पाहणं एक वेगळाच अनुभव होता. मला तो शब्दांत इथे यथार्थ मांडता येणं शक्य नाही.
पण मेमरीच्या अशा विचित्र गमतीजमती होतात खरं.

माझा अंदाज :-लक्षात ठेवलेल्या गोष्टी ज्या संदर्भात लक्षात ठेवल्यात तितकच मेंदू तपासत असावा प्रत्यक्षातली आणि स्मृतीतील प्रतिमा पडताळून पाहताना. तुम्ही म्हटल्यासारखं संदर्भाशी निगडित नसलेली माहिती "बिनकामाची" म्हणून सोडून दिली अजत असावी. अर्थात हा शुद्ध अंदाज आहे. तपशील तुम्हीच सांगू शकाल.
आणि जॉर्ज बुशला न घडलेली घटना "आठवणं" हीसुद्धा हैट आहे.
काहिसा असच दुसर्‍या महायुद्धातले अमेरिकन सेनानी पॅटन ह्यांचाही किस्सा आहे.
सेनानी म्हणून हा इसम तरबेज होता. डावपेच आखणे, चाली रचणे ह्यात त्याची बुद्धीमत्ता तल्लख होती.
पण ह्याला मागील जन्मावर दृढ विश्वास होता. कारण --
आपण प्रत्यक्ष नेपूलियन, ज्युलिअस सिझर ह्यांच्या महत्वाच्या मोहिमांत त्यांच्या शेजारी उभे राहून लढलो आहोत;
आपणच त्यांच्या लढाईच्या योजना आखल्या आहेत; असे त्याला लख्ख "दिसत" असे. "आठवत" असे.
त्याचे एकूण वागणे बोलणे पाहून हा बढाया मारत नसून प्रामाणिकपणे तसेच समज्तो आहे असे जाणवत असे.
मला मुन्नाभाईमधल्या "केमिकल लोच्या"ची आठवण झाली.

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

--मनोबा
.
संगति जयाच्या खेळलो मी सदाहि | हाकेस तो आता ओ देत नाही
.
memories....often the marks people leave are scars

आधुनिक समाजशास्त्र 'मनुष्य समाजशील प्राणी आहे' पासून सुरु होते नि 'वैवाहिक व रक्तसंबंध* असलेल्या लोकांसोबत देखिल राहू नये' इथे संपते. गंमत आहे.

* स्पाउस व मुले सोडून.**
** हे ही असावेत असा नाही असा डिसक्लेमर देत.

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

सही: पुरोगाम्यांना लॉजिक माफ असतं.

आधुनिक समाजशास्त्र अशा प्रकारचे रेकमेंडेशन/प्रिस्क्रिप्शन करते या तुमच्या म्हणण्याला आधार काय आहे? समाजशास्त्राच्या कुठल्या पुस्तकात* तुम्हाला असे आढळले आहे का?

* वर्तमानपत्रांच्या रविवार पुरवण्यांमधून आरोग्यविषयक लिखाण येत असते. अलिकडेच आमच्या पेपरात एका रविवारी 'फळे मुळीच खाऊ नयेत' अशा अर्थाचा एक लेख आला होता. त्यावरून फळे खाऊ नयेत असे वैद्यकशास्त्राचे मत आहे असा निष्कर्ष काढावा का? हा लेख लिहिणार्‍या डॉक्टरीण बैंनी नंतर सायनसचा त्रास असलेल्यांनी सायट्रस फळे खाऊ नयेत असा खुलासा नंतर केला होता.

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

--------------------------------------------
ऐसीव‌रील‌ ग‌म‌भ‌न‌ इत‌रांपेक्षा वेग‌ळे आहे.
प्रमाणित करण्यात येते की हा आयडी एमसीपी आहे.

http://en.wikipedia.org/wiki/Sociology_of_the_family वर अनाधुनिक कुटुंबे कशी होती तो पॅरा खाली देत आहे.
Pre-modern family life and religious discourse

Historically, religious discourses have played a significant role in constituting family members and constructing particular forms of behavior in families, and religion has been particularly important in discourses on female sexuality. An example of the role of religion in this respect was the'witchcraft craze' in Medieval Europe. According to Turner,[2] this was a device to regulate the behavior of women, and the attack on women as witches was principally 'a critique of their sexuality'. 'Women were closely associated with witchcraft, because it was argued that they were particularly susceptible to the sexual advances of the devil. ...Women were seen to be irrational, emotional and lacking in self-restraint; they were especially vulnerable to satanic temptation.'

Turner argues that attempts to regulate female sexuality through religious discourse have, in the case of Western Europe, to be understood in the context of concerns about managing private property and ensuring its continuity. Thus, for the land-owning aristocracy, the point of marriage was to produce a male heir to the property of the household. Since child mortality was common, women had to be more or less continuously pregnant during their marriage to guarantee a living male heir. Furthermore, this heir had to be legitimate, if disputes over inheritance were to be avoided. This legitimacy could only be ensured by the heads of households marrying virgins and ensuring the chastity of their wives for the duration of the marriage. Equally,daughters had to be sexually pure if they were to be eligible for marriage to other property-holding families. Such marriages were prompted solely by the need to produce children and had none of the elements of eroticism and sexual compatibility of contemporary marriages.

In pre-modern Europe, these interests were reflected in the character of marriages. They were private, arranged contracts that could be easily dissolved in the event of child production being compromised by the woman's infertility or infidelity. With the entry of the Church into marriage arrangements, different definitions of marriage emerged. Lifelong marriages were demanded,but with a concern to regulate sexuality, particularly the sexuality of women.

आता यावरून कल्पना यावी.

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

सही: पुरोगाम्यांना लॉजिक माफ असतं.

अलिकडेच आमच्या पेपरात एका रविवारी 'फळे मुळीच खाऊ नयेत' अशा अर्थाचा एक लेख आला होता. >>>

हो हो, लोकसत्ताच्या लोकरंग मधे आलेला हा लेख. पण तुम्ही पुढच्याच रविवारी त्याच जागी एका दुसर्‍या वैद्यांचा लेख वाचलात का? त्यात त्यांनी ह्या डॉक्टरीण बाईंचे सर्व मुद्दे खोडून काढले होते आणि त्यांचे सल्ले हे मुर्खपणाचे आहेत हे अस्पष्टपणे स्पष्टच सांगितलं होतं - छान वाटलं ते वाचून. बाकी एवढं असूनही, अजूनही ह्या बाई त्यांचे फुकटचे सल्ले देत असतातच प्रत्येक रविवारी हे रोचक वाटतं आणि लोकसत्ताचं त्यासाठी विशेष कौतूक Wink

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

कोर्टाबद्दलचा कायदा नेमका काय आहे?
म्हणजे आपण सतत "आदरणीय पंतप्रधान" वगैरे म्हणत नाही; किंवा म्हणालो तरी "आदरणीय न्यायालय" पेक्षा कमी वेळेसच "आदरणीय" हा शब्द पी एम ला लावतो. असे का आहे ?
नुसतेच "न्यायालय" म्हटले तर चालत नाही का ?
कोर्टाची बेअदबी नक्के कशाने होते ?
कोर्टाच्या निर्णयाशी असहमत असलो तर ती बेअदबी ठरते का?
समजा आपल्याला समजलं की एखादा ड्याम्बिस माणूस जज्जच्या खुर्चीत जाउन बसलाय.
तर त्याला ड्याम्बिस म्हटलं तरी कोर्टाचा अवमान ठरवला जाउन जेलची हवा खायला लागू शकते का ?

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

--मनोबा
.
संगति जयाच्या खेळलो मी सदाहि | हाकेस तो आता ओ देत नाही
.
memories....often the marks people leave are scars

कण्टेम्प्ट....

कोर्टाच्या निर्णयाशी असहमती व्यक्त करणे याने अपमान होत नाही. कोर्टाच्या निर्णयामागे अमुक मोटिव्ह आहे असे म्हटले तर अवमान होतो. म्हणजे दुसर्‍या एका धाग्यावर ऋषिकेशने रिक्षांना सीएनजीची सक्ती करण्याविषयीच्या निर्णयावर क्षयझच्या फायद्यासाठी हा निर्णय घेतला अशी टिपण्णी केली तर अवमान होईल.

कोर्टाने समन्स पाठवल्यास योग्य कारणाशिवाय कोर्टात हजर न राहणे हा धडधडीत अवमान आहे.

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

--------------------------------------------
ऐसीव‌रील‌ ग‌म‌भ‌न‌ इत‌रांपेक्षा वेग‌ळे आहे.
प्रमाणित करण्यात येते की हा आयडी एमसीपी आहे.

ऐसीवर काही लोकांच्या प्रतिसादांमध्ये शेरोशायरी दिसते बर्‍याचदा. उर्दू इन्फेस्टेड. हे लोक उर्दू कसे शिकले?

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

आधी रोटी खाएंगे, इंदिरा को जिताएंगे !

कॉलिङ्ग गब्बरसिङ्ग.

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

माहिष्मती साम्राज्यं अस्माकं अजेयं

मला थोडीशी आवड होतीच. व १९९७ मधे एक मस्त मित्र भेटला. त्याने खतपाणी घातले. नंतर जरीना सानी ( + मिलिंद वाईकर) यांचे पुस्तक घेतले .... नंतर गझलांमधे गुरफटलो. आता एक शेरोशायरी चा एल्के अडवाणी (Permanent future PM) आपके सामने है.

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

इअर प्लग्सच्या कॉर्ड्स कायम गुंतलेल्या का असतात? त्यावर काही उपाय आहे का?

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

माझ्या इअरप्लगच्या कॉर्ड्स नस्तात गुंतलेल्या. मी आत ठेवताना रोज गुंडाळी करून त्याला काळी तारसदृश गोष्ट देतात ना कॉर्ड्स/मोबाईल विकत घेते वेळी ती जपून ठेवली आहे, तीच बांधून ठेवतो.

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

- ऋ
-------
लव्ह अ‍ॅड लेट लव्ह!

कसला व्यवस्थितपणाचा नमुना आहेस तू!

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

-मेघना भुस्कुटे
***********
तुन्द हैं शोले, सुर्ख है आहन

अशी माणसं अत्यंत कंटाळवाणी , बोरिंग ,रिकामटेकडी आणि कल्पनाशून्य असतात

*असं म्हणून मी स्वतःचं समाधान करुन घेतो * Wink

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

--मनोबा
.
संगति जयाच्या खेळलो मी सदाहि | हाकेस तो आता ओ देत नाही
.
memories....often the marks people leave are scars

मीपण असेच करते Biggrin

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

नेमकं काय करतेस..? व्यवस्थित,छ्छान छ्छान राहणार्‍या गोग्गोड माणसांवर झुरळ टाकतेस...? कंफ्युज्ड...

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

"जाने तू या जाने ना" हा पिच्चर पाहिलाय का ?
त्यातला जेनिलिया डिसूझाचा कलाकार भाऊ कसा व्यवस्थित,छ्छान छ्छान राहणार्‍या गोग्गोड इम्रान खानकडे पाहून अंगावर झुरळ पडल्यासारखा चेहरा करतो, तसच अशी व्यवस्थित माणसं सापडली की करावंसं वाटतं.

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

--मनोबा
.
संगति जयाच्या खेळलो मी सदाहि | हाकेस तो आता ओ देत नाही
.
memories....often the marks people leave are scars

हायटेक उपाय - ब्लूटूथ इयरफोन्स वापरणे
लोटेक उपाय - एका पेन्सिलीला इयरफोन्स गुंडाळणे (वेल खांबावर चढते त्यापद्धतीने)
नोटेक उपाय - मोठ्ठ्या आवाजात गाणी वाजवणे. विशेषतः "ससुरा बडा पईसावाला" या चित्रपटातील.

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

********
It is better to have questions which don't have answers, than having answers which cannot be questioned.

Smile शेवटचा "नोटेक उपाय" नसुन "नवटाक उपाय" असावा.

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

नवटाक म्हंजे काय? 'एक नवटाक झोकून तो झिंगतच आला' इ.इ. वर्णने लै वाचलेली आहेत. दारूच्या मापाचे युनिट आहे का? जसे 'खंबा', 'कॉटर' इ.इ. तसे?

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

माहिष्मती साम्राज्यं अस्माकं अजेयं

नवटाक म्हणजे नवसागर(Ammonium chloride) असावे असा माझ ग्रह आहे, अर्थात ते देशी दारुत वापरतात असे दिसते.

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

ओह अच्छा, धन्यवाद. पण देशी दारूत त्याचा रोल इतका महत्त्वाचा असतो का की जेणेकरून दारूला नवटाक असे नाव मिळावे?

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

माहिष्मती साम्राज्यं अस्माकं अजेयं

ह्याउप्पर ज्ञान आम्हास नाही, @सोकाजींना बोलावणेचे करावे.

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

नवटाक हे माप आहे. जसं छटाक म्हणजे शेराचा सहावा भाग तसा नवटाक हा शेराचा नववा भाग. चुभूदेघे.

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

साधारण हाफ-क्वार्टर काय? Wink

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

- ऋ
-------
लव्ह अ‍ॅड लेट लव्ह!

हो बहुतेक. Smile पण हाफ क्वार्टर म्हणजे आधपाव. आधपावलाही थोडं कमी असेल नवटाक. तज्ज्ञ सांगतील अशी आशा.
हाफ क्वार्टरमध्ये झिंगतो अशा माणसाला डिरोगेटरी वापरत असावेत नवटाक(च) मारून येतो आणि इतका धिंगाणा करतो याअर्थी.

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

६० मिलीचा एक लार्ज पेग असतो ना; मग दोन लार्ज १२० मिलीला म्हणत असतील नवटाक.

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

असेच काहीसे असेलशी अटकळ होती. धन्यवाद!!!!

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

माहिष्मती साम्राज्यं अस्माकं अजेयं

दाते कर्वे

नकटें—न. (खा.) अर्ध्या पावशेराचें माप; निपटें; पिटकें; १० तोळ्यांचें वजन; नवटाक; नवटकें.

प्रश्नः तोळ्याचा आणि मिलिलिटरचा काय संबंध?

नवसागर—पु. (रसा.) कल्हई लावण्याच्या कामीं वापरा- वयाचा एक क्षार. अमोनिया व क्लोरीन यांच्या संयोगानें बनलेला

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

********
It is better to have questions which don't have answers, than having answers which cannot be questioned.

म्हाय्तिपुर्न शिरेनी दिल्याली हाये!!! धन्यवाद हो. Smile

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

माहिष्मती साम्राज्यं अस्माकं अजेयं

फॉर सम रीझन नवसागर हे (कुटिरोद्योगातील Wink ) दारुनिर्मितीत काही कारणाने वापरले जाते. एक्झॅक्टली त्याचा रोल काय हे ठाऊक नाही. त्याने विषबाधा घडल्याच्या बातम्या पूर्वी वाचलेल्या आहेत. सोकाजी रावांना किंवा आडकित्ताभौंना कदाचित माहित असावे.

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

--------------------------------------------
ऐसीव‌रील‌ ग‌म‌भ‌न‌ इत‌रांपेक्षा वेग‌ळे आहे.
प्रमाणित करण्यात येते की हा आयडी एमसीपी आहे.

असयं होय, आता एक नवटाक टाकली पाहिजे.

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

नॉन टँगलिंग कॉर्डस मिळतात.

http://www.amazon.com/s?ie=UTF8&page=1&rh=i%3Aaps%2Ck%3Aanti%20tangle%20...

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

धन्यवाद.

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

The Journey Is the Reward...

सेल्फ कंट्रोल अन प्राईड" - हे सर्वोच्च गुण असतात असे विचारांती पटलेले आहे. आपल्या मते कोणते २-४ गुण आपल्याकरता सर्वोच्च कॅटेगरीत येतात?

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

डोक्याला शॉट न करून घेणे

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

********
It is better to have questions which don't have answers, than having answers which cannot be questioned.

Smile

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

किंवा डोक्याला शॉट देणे.

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

आपला शॉटच असा असतो!!!

-गजनारिकेलपातमूषकवचनन्याय.

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

माहिष्मती साम्राज्यं अस्माकं अजेयं

सावरकर , आंबेडकर ह्यांना आपल्याकडे महामानव, महापुरुष अशी संबोधनं वापरतात. ह्यांचं कार्य फार फार मोठं आहेच.
पण ह्यांनी सुरु केलेल्या किंवा हे अग्रभागी असलेल्या संघटित चळवळी तितक्या दृढमूल आज राहिलेल्या दिसत नाहित.
हिंदू महासभा हा प्रकार राजकिय आसमंतात कुठेच नाही; रिपब्लिकन पक्षाचे अस्तित्व ना के बराबर दिसतय.
शिवाय सध्याच्या रिपब्लिकन पक्षाची कैकदा भूमिका "आम्ही दलितांचा(च) पक्ष" अशी दिसते. कैकदा ती "आम्ही(च) दलितांचा पक्ष"
अशीही दिसते. बाबासाहेबांना हे(निदान पहिला मुद्दा) नक्कीच अपेक्षित नसावं.
सावरकरांनीच प्रथम आक्रमकतेनं जनमानसाच्या चर्चेत "हिंदुत्व" हा शब्द आज चांगलाच जोरावर दिसतो.
पण हल्ली चर्चेत असणारे हिंदुत्व आणि सावरकरांचे हिंदुत्व फार म्हणजे फार वेगळेच; अर्थात हे सांगायचीही गरज पडू नये इतका अभ्यास
तुम्हा मंडळींचा दिसतोच.

मला पडणारा प्रश्न हाच की इतका प्रचंड आदर असणार्‍या आणि थोर माणसं अग्रभागी असणार्या ह्या दोन चळवळी अशा का गंडल्या असाव्यात?
तुलनेनं हेडगेवार ह्यांचं अपील फारच मर्यादित.एक विशिष्ट वर्ग त्यांना आदर जरुर देत असेल; पण त्या परिघाबाहेर हेडगेवार - गोळवलकर ह्यांना वजन ते किती ? इतकं असून हेडगेवार - गोळवलकर ह्यांनी स्थापलेली चळवळ बरीच फोफावलेली दिसते. त्याच्या कित्येक प्रत्यक्ष व
अप्रत्यक्ष उपशाखा आहेत. लाखो थेट सदस्य आहेत; कोट्यवधी सहानुभूतीदार आहेत.
हे असं कसं झालं?

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

--मनोबा
.
संगति जयाच्या खेळलो मी सदाहि | हाकेस तो आता ओ देत नाही
.
memories....often the marks people leave are scars

विद्युत क्षेत्रातल्या व्यक्तींसाठी हा प्रश्न.

"वीज वाचवा" असा संदेश अनेक ठिकाणी दिसतो. आपल्यापैकी बरेचजण, माझ्यासहित, लक्षात ठेवून जास्तीचे दिवे / पंखे आदि बंद करत असतो.

मी भौतिकशास्त्राचा पदवीधर आहे, पण त्या अभ्यासक्रमात विजेची थियरीच भरपूर शिकवलेली. विद्युतघट आणि प्रयोगशाळेतल्या तारा, व्होल्टमीटर्स आणि तत्सम तबकड्यांतून वाहणार्‍या DC विद्युत्प्रवाहाशी जास्त संबंध आला. प्रत्यक्ष जलविद्युत किंवा औष्णिक विद्युत प्रकल्पातली वीज वेगवेगळ्या सब स्टेशन्स किंवा ग्रिड्समधून देशभरातल्या घराघरांत कशी फिरवली जाते हे नीटपणे कधी शिकवल्याचं आठवत नाही. किंवा असलं तर आम्ही नेमके त्यावेळी दुपारचा "प्रेसिडेंट्स वाईफ" पिक्चर बघायला कोणत्यातरी शेडी थेटरात बसलेलो असणार.

मुख्य प्रश्न असा की एकीकडे वीजकेंद्रात (उदा पोफळी) टर्बाईन फिरता फिरता वीज तयार होते, आणि ती एका मोठ्ठ्या जाळ्यात वाहात राहते आणि लोक त्यातून कालव्यातून उपसा करावा तशी काही वीज ओढून घेतात अशी माझी समजूत आहे. ती अडाणी अन चुकीचीही असू शकेल पण दीर्घकाळ किंवा हवा तितका वेळ ही वीज साठवून ठेवणार्‍या बॅटरीज विद्युत मंडळ वापरत असेल असे वाटत नाही. तस्मात, वीज हा अन्न, पाणी किंवा पैसा यांसारखा साठा करुन लागेल तेव्हा पुरवता येण्यासारखा "पदार्थ" नसावा. ती केवळ सर्किट पूर्ण झाले तरच अस्तित्वात येणारी इलेक्ट्रॉन्सची धारा आहे ना?

ती एखाद्याने वापरली नाही (बटन ऑन केले नाहीच) तर ती "डिसअपीअर इन थिन एअर" होईल ना?

अशावेळी भसाभस वीज वापरुन चालू पुरवठ्यापेक्षा जास्त मागणी उत्पन्न करणे आणि त्यावर ताण आणणे अशा अर्थाने वीजवापर मर्यादित ठेवणे समजू शकेल. पण वीज ही राष्ट्रीय संपत्ती आहे आणि तिचा जपून वापर करणे म्हणजे ती "वाचवणे" आणि नंतर तुडवड्याच्या काळात एखाद्या पोत्यातून साखर काढावी तशी काढून खर्‍या गरजूंना पुरवणे ही कल्पना शक्य आहे का? नसल्यास मग वीज वापरणे टाळल्याने नेमके काय "वाचते"?

याचा अर्थ विजेचा अमर्याद वापर करण्याला समर्थन आहे असा नसून केवळ त्यातली व्यवस्था समजून घ्यायचा प्रयत्न आहे. प्रश्न अडाणी आहे हे मुळातच मान्य आहे.

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

जेव्हा जनित्र फिरते (टर्बाईनने/इंजिनाने) तेव्हा त्यातल्या कॉइल्स चुंबकीय क्षेत्रात हलत/फिरत असतात. ही कॉईल फिरताना चुंबकीय खेत्राच्या सापेक्ष वेगवेगळ्या ठिकाणी असते म्हणजे तिच्यावर चुंबकीय क्षेत्राचा वेगवेगळा परिणाम होतो. म्हणजे वेटोळ्यावर लागणारे चुंबकीय क्षेत्र बदलते (varying) असते. त्यामुळे फॅरेडेच्या नियमाने त्यात विद्युत प्रवाह निर्माण होतो (Electromagnetic induction). त्यातला काही भाग हा मुळातले चुंबकीय क्षेत्र निर्माण करायला वापरला जातो त्यामुळे वेटोळ्यात सातत्याने काही प्रवाह वहात असतो. या प्रवाहामुळे त्या वेटोळ्यावर चुंबकीय क्षेत्र काही बल अ‍ॅप्लाय करते (Force experienced by a current carrying conductor in a magnetic field).

आता या वेटोळ्यातून मी वीज काढून घेऊ लागतो तेव्हा त्यातला विद्युत प्रवाह वाढतो. त्यामुळे त्या वेटोळ्यावर अधिकचे बल कार्य करू लागते. त्यामुळे जनित्राचा वेग कमी होऊ लागतो. तो स्थिर रहावा म्हणून टर्बाईन/इंजिनाला गव्हर्नर लावलेला असतो. त्या गव्हर्नर मुळे टर्बाईनला होणारा इंधन पुरवठा वाढून जनित्राचा वेग पूर्ववत होतो आणि स्थिर राहतो. म्हणजेच मी जनित्रातून जितक्या प्रमाणात वीज काढून घेईन तितक्या प्रमाणात टर्बाईनला होणारा इंधनाचा पुरवठा वाढतो.

इन सिंपल टर्म्स, जितकी वीज खेचू तितकीच (+लॉस) वीज तयार होते. जितकी वीज खेचू तितके इंधनाचे कंझम्प्शन जास्त.

आणखी शंका असल्यास आणखी स्पष्टीकरण देईन.

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

--------------------------------------------
ऐसीव‌रील‌ ग‌म‌भ‌न‌ इत‌रांपेक्षा वेग‌ळे आहे.
प्रमाणित करण्यात येते की हा आयडी एमसीपी आहे.

आता या वेटोळ्यातून मी वीज काढून घेऊ लागतो तेव्हा त्यातला विद्युत प्रवाह वाढतो. त्यामुळे त्या वेटोळ्यावर अधिकचे बल कार्य करू लागते. त्यामुळे जनित्राचा वेग कमी होऊ लागतो. तो स्थिर रहावा म्हणून टर्बाईन/इंजिनाला गव्हर्नर लावलेला असतो. त्या गव्हर्नर मुळे टर्बाईनला होणारा इंधन पुरवठा वाढून जनित्राचा वेग पूर्ववत होतो आणि स्थिर राहतो. म्हणजेच मी जनित्रातून जितक्या प्रमाणात वीज काढून घेईन तितक्या प्रमाणात टर्बाईनला होणारा इंधनाचा पुरवठा वाढतो.

इन सिंपल टर्म्स, जितकी वीज खेचू तितकीच (+लॉस) वीज तयार होते. जितकी वीज खेचू तितके इंधनाचे कंझम्प्शन जास्त.

आणखी शंका असल्यास आणखी स्पष्टीकरण देईन.

अत्यंत धन्यवाद, उत्तम माहितीसाठी. यापैकी वीज कशी बनते हा पार्ट नक्कीच माहीत होता, पण जास्त वीज खेचल्याने जास्त बनते आणि या प्रक्रियेत जनित्राला इनपुट पॉवर जास्त द्यावी लागते हे नव्याने कळले. रोचक.

आता नेमका प्रश्न विचारायचा तर, वरील तत्व इंधनावर चालणार्‍या जनित्राला योग्य (औष्णिक इ.) पण जलविद्युत तर पाण्याच्या प्रवाहाने फिरणार्‍या जनित्रावर वीज तयार करते ना? मग त्यात इनपुट इंधन कसे वाढवतात? की पाण्याचा फ्लो नियंत्रित केलेला असतो आणि त्याचा वेग वाढवतात.. ज्यामुळे पाणी अधिक लवकर वाहते?

यात नुकसान = गोडे पाणी समुद्रात जाणे.. पण जनित्र अजिबात फिरले नाही तरी ते पाणी कुठून ना कुठून समुद्राला मिळणारच.

की

नुकसान = गोडे पाणी अधिक वेगाने समुद्रात जाणे.

???

गोडे पाणी टर्बाईनवरुन वाहिल्यानंतरही त्याचे समुद्रात जाणे लांबवता येऊ शकेल ना? मग काय नुकसान?

की फक्त औष्णिक प्रकल्पातून तयार होणारी वीजच जपून वापरा असा संदेश द्यायचा??

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

>>यात नुकसान = गोडे पाणी समुद्रात जाणे.. पण जनित्र अजिबात फिरले नाही तरी ते पाणी कुठून ना कुठून समुद्राला मिळणारच.

का बुवा? नळ बंद/बारीक नै का करून ठेवता येणार?

की

नुकसान = गोडे पाणी अधिक वेगाने समुद्रात जाणे.

???

गोडे पाणी टर्बाईनवरुन वाहिल्यानंतरही त्याचे समुद्रात जाणे लांबवता येऊ शकेल ना? मग काय नुकसान?

की फक्त औष्णिक प्रकल्पातून तयार होणारी वीजच जपून वापरा असा संदेश द्यायचा??

जलविद्युतच्या बाबतीत म्हणायचे तर पुरर्भरण वर्षातून एकदाच होते म्हणून वाचवायचे. (असे मला वाटते).

एक दुरुस्ती: जनित्रे सहसा बंद केली जात नाहीत. ती कमी लोडवर का होईना, फिरतच असतात. त्यामुळे काही ना काही पाणी सतत वाहून जातच असते. रात्रीच्यावेळी जेव्हा लोड खूप कमी असते तेव्हा औष्णिक विजेच्या सहाय्याने जलविद्युत केंद्राने वापरलेले पाणी (काही प्रमाणात) पुन्हा पंपाने धरणात भरले जाते.

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

--------------------------------------------
ऐसीव‌रील‌ ग‌म‌भ‌न‌ इत‌रांपेक्षा वेग‌ळे आहे.
प्रमाणित करण्यात येते की हा आयडी एमसीपी आहे.

या जनित्राचा फिरण्याचा वेग साधारण ५०-६० हर्ट्झ असतो का?

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

---

सांगोवांगीच्या गोष्टी म्हणजे विदा नव्हे.

चित्राचा दर्जा तितकासा चांगला नाहिये पण वाचता येइल.

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

नाही.

अपरिमेय यांनी दिलेल्या चित्रातल्या फॉर्म्युल्याप्रमाणे N (rpm) = 120f/p

म्हणजे ५० हर्ट्झ फ्रीक्वेन्सी (f=50) हवी असेल तर २ पोल (p=2)असलेल्या जनित्राला ३००० रेव्होल्यूशन पर मिनिट वेगाने फिरवावे लागेल. पोलची संख्या ४ असेल तर १५०० आरपीएम पुरेत.

टीपः कमी रेव्होल्युशन पर मिनिट स्पीडने फिरणारे टर्बाईन/इंजिन बनवणे अवघड/महागडे असावे. त्या ऐवजी पोलची संख्या वाढवून जास्त स्पीडचे टर्बाईन वापरणे बरे.

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

--------------------------------------------
ऐसीव‌रील‌ ग‌म‌भ‌न‌ इत‌रांपेक्षा वेग‌ळे आहे.
प्रमाणित करण्यात येते की हा आयडी एमसीपी आहे.

सो फार अ‍ॅज आय रिमेंबर -

आता क्ष पोल्स जगरेटरच्या केसला लावले आहेत. त्यांच्यात अल्टरनेट उत्तर नि दक्षिण चुंबकीयत्व आहे. म्हणजे क्ष/२ जोड्या. जनरेटरच्या कोणत्याही एका फेजच्या कॉईलने पोल्सची एक जोडी क्रॉस केली कि एक अल्टरनेशन होते. फ्रिक्वेन्सी = number of alternationations in current per second = number of rotations of generator shaft per second * x/2 = rpm/60*x/2 = rpm*x/120

टर्बाईन/इंजिन बनवणे अवघड/महागडे असावे

सर्वात सक्षम असलेले थर्मोडायनामिक कार्नॉ इंजिन फार स्लो चालावे लागते. (बहुतेक त्याचं पिस्टन दुसर्‍या टोकाला कधीच जात नाही वैगेरे) इंजिन कोणत्याही आर पी एम ला चालवता यावे. पावर कोणत्या दराने हवी नि गिअरींग कशी डिझाईन करायची याला मर्यादा असाव्यात. स्लो इंजिने किती रेटने उर्जा हवी त्याची गरज भागवू शकणार नाहीत.

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

सही: पुरोगाम्यांना लॉजिक माफ असतं.

>>स्लो इंजिने किती रेटने उर्जा हवी त्याची गरज भागवू शकणार नाहीत.

हो. म्हणून सेम पॉवर मिळवायला स्लो इंजिन/टर्बाईन आकाराने मोठे हवे.

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

--------------------------------------------
ऐसीव‌रील‌ ग‌म‌भ‌न‌ इत‌रांपेक्षा वेग‌ळे आहे.
प्रमाणित करण्यात येते की हा आयडी एमसीपी आहे.

१. वेग हर्ट्झमधे नसतो.
२. ५० हर्टझ ही कशाच्या रोटेशनची फ्रिक्वेन्सी नसून करंटच्या अल्टरनेशन्ची फ्रिक्वेन्सी आहे.

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

सही: पुरोगाम्यांना लॉजिक माफ असतं.

मी भौतिकशास्त्राचा पदवीधर आहे

आपला हा प्रतिसाद पब्लिक डोमेनमधे आलाच आहे तर कृपया आपण कोणत्या शाळेत पदवी घेतली आहे ते कधीच सांगू नकात. बदनामीही मर्यादित प्रमाणात करायची असते म्हणून.
यातला भौतिकशास्त्राचा शब्द गाळला असता तर असे लिहिले नसते.

आन् आता फटकन त्या अध्यक्षाच्या बायकोचे साग्रसंनितंब वर्णन करा.

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

सही: पुरोगाम्यांना लॉजिक माफ असतं.

शाळेत पदवी कधीपासून द्यायला लागले? आमच्या वेळी तरी ती कॉलेजातनं मिळायची बॉ.

अपि च: आरटीआयचा वापर या केसमध्ये व्यनि थ्रू करावा ही इणंती. Wink

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

माहिष्मती साम्राज्यं अस्माकं अजेयं

आम्हाला* गैरादी ही पदवी शाळेतच मिळाली होती.

* आम्हाला आमच्यासाठी बहुवचनी सर्वनामे वापरताना अवघडते, पण नवीबाजूंमुळे आम्हालाही सवय पडली आहे दिसते.

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

सही: पुरोगाम्यांना लॉजिक माफ असतं.

आमचा एक नार्दिंडियन मित्र असे आदरार्थी सर्वनाम स्वतःकरिता वापरायचा, आणि सांगायचा की 'स्वतःला रिष्पेक्ट देतो'. ते पटल्यामुळे किमान जालवावरात तरी आम्ही तसेच करायचे ठरवले आहे. शिवाय जुन्या काळीही तसेच करीत असत, हेही पाहिले आहेच. तस्मात याला प्रिसीडेंट तर आहेच.

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

माहिष्मती साम्राज्यं अस्माकं अजेयं

'स्वतःला रिष्पेक्ट देतो'

नेमके!

'जो दुसर्‍यावरी विसंबला, तयाचा कार्यभाग बुडाला.'

आपणच जर आपल्याला रिष्पेक्ट दिला नाही, तर दुसरे कोण (नि कशास) देईल?

('स्वतः मेल्याशिवाय स्वर्ग दिसत नाही' ही म्हण या निमित्ताने उगाच आठवून जाते.)

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

आपला हा प्रतिसाद पब्लिक डोमेनमधे आलाच आहे तर कृपया आपण कोणत्या शाळेत पदवी घेतली आहे ते कधीच सांगू नकात. बदनामीही मर्यादित प्रमाणात करायची असते म्हणून.

खिक्क..

पण बघा ना.. धाडस पायजे की नाय असला प्रश्न विचारायला? यातूनच बीएस्सीत जास्तीतजास्त तात्विक भागावरच कसे आटपले जाते आणि अ‍ॅप्लाईडचे क्षेत्र अभियांत्रिकी अभ्यासक्रमासाठीच कसे सोडले जाते हे अधोरेखित व्हावे.

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

विषादात सहभागी आहे.

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

सही: पुरोगाम्यांना लॉजिक माफ असतं.

ओ नाय हो....

इतकी माहिती भौतिकशास्त्राच्या पदवीधरास नसण्याची शक्यता आहे.

उर्जा काढून घेतो म्हणजे तितकी (तरी) ऊर्जा कुठेतरी इनपुट करतो एवढेच ज्ञान अपेक्षित आहे.

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

--------------------------------------------
ऐसीव‌रील‌ ग‌म‌भ‌न‌ इत‌रांपेक्षा वेग‌ळे आहे.
प्रमाणित करण्यात येते की हा आयडी एमसीपी आहे.

ह्यबगा,
१. टर्बाईनमधे तेल घालत गेलं नि त्याच्यावरचा लोड सतत हटत गेला तर अर्थातच टर्बाईन-जनरेटर असेंब्लीची पाती जबरदस्त वेगाने फिरू लागतील. शेवटी अख्खा पावर प्लांटच जनरेटरला (अ‍ॅज इफ इट इज डी-कपलड विथ रेस्ट ऑफ द वर्ल्ड) फिरवण्यासाठी वापरला जातोय असे होईल. त्याचे अंग्युलर स्पीड सतत वाढेल. मग?
२. दुसरा विचार काय असेल? करंट वाढल्याने सर्किटमधल्या सार्‍या रेजिस्टंन्सेसमधे (म्हणजे दुसर्‍यांच्या घरी) जास्त लॉस होईल. म्हणजे बाकीच्या लोकांनी लाईट बंद केली म्हणून ज्यांनी चालू ठेवली त्यांनी बिल (थोडे अधिक) द्यायचे!

१ वा २ वा दोन्ही न होता उर्जा हवेत जाईल इ इ म्हणणे म्हणजे ... (हलक्यानेच घेणे)

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

सही: पुरोगाम्यांना लॉजिक माफ असतं.

ती एखाद्याने वापरली नाही (बटन ऑन केले नाहीच) तर ती "डिसअपीअर इन थिन एअर" होईल ना?

प्रारंभीचा सीन असा आहे समजा. विद्युतकेंद्रात ई उर्जा ४४० किलोव्होल्टेने ए अँपियर इतकी फ फेजगॅपने न फ्रिक्वेंसीने उत्पत्त होत आहे. ट्रान्स्फॉर्मर तिचे व्होल्टेज - करंट काँबो बदलून सगळीकडे पुरवत आहे. (योगायोगाने म्हणा वाटल्यास) सारे लॉसेस, सार्‍या घरांत, कारखान्यांत, इ उपसा केली जाणारी वीज नि विद्युतकेंद्रात बनत असलेली वीज समान आहे. गविंना हे संतुलन पाहवले नाही नि त्यांनी एक फॅन बंद केला. तर अर्थातच फॅनचा रेसिस्टन्स, कॅपॅसिटन्स वा इंडक्टन्स हे सर्किटमधे उरणार नाहीत. आता सर्किट जर पॅरलल मधे काँफिगर केले असले तर करंट वाढेल (नि मग तो हवेत जाईल, नाहीतर कुठे जाणार असे वैगेरे वाटू शकते.). पण फॅन बंद केल्याने इथे विद्युतकेंद्रातला जनरेटर जोरात फिरू लागतो. त्याच्या स्पींडलवरचा रेजिस्टंट टॉर्क कमी होतो म्हणून. मग करंटची फ्रिक्वेंसी वाढते. पण लोचा असा आहे कि विद्युत उपकरणे न केवळ एका व्होल्टेजलाच चालतात परंतु त्यांना ए सी करंटची फ्रिक्वेंसी देखिल तीच लागते. नाहीतर ते फडफड करतात. म्हणून नितिनजींनी म्हटल्याप्रमाणे जनरेटरला उर्जा देणारे जे टर्बाईन आहे तिच्यात पाणी वा इंधन किती ओतायचे हे ठरवणारे गवर्नर नावाचे जे उपकरण आहे ते ती फ्रिक्वेंसी किती असावी हे पहिले मोजते नि मग तितके उघडते. आदर्शत हे सगळे परफेक्ट असले तर जनरेटरसमोरचा माणूस 'भूतां परस्परें जडो' म्हणून हाताची घडी घालून शांतपणे बसू शकतो.

थोडक्यात टर्बाइनमधे उगाच एनर्जी घातली, ग्राहकांनाही गरज नसली, शिवाय सर्किट बॅलॅन्स नाही केले , इ इ तर शेवटी सारी अशी उर्जा जनरेटमधली मेकॅनिकल फ्रिक्शनमधे इ इ विद्युतकेंद्रात नि इलेक्ट्रिकल रेजिस्टंसमधे सर्किटात जाईल. जाईल म्हणजे माणसाच्या हातातून जाईल, तशी ती जात नाही हे सर्वांना माहितच आहे.

आता दुसरीकडे जगरेटरचा अक्षदांडा कितीही मजबूत असला तरी लोकांनी एकदमच सारा लोड काढून घेतला तर? एकदाच सगळा लोड लावणे नि एकदाच काढणे असा प्रकार झाला तर बहुतेक जनरेटर तुटून जाईल. म्हणजे फक्त एक केंद्र दिल्लीला पावर देते नि उद्या सगळ्या लोकांनी सारी बटने डॉट ७.०० ए एम ला चालू करायची नि सारीच ७.०० पी एम ला बंद करायची ठरवली तर जनरेटर तुटावा, इ. (तज्ञांनी खुलासा करावा.)

गवर्नरने अगदी ५० म्हणजे ५०च हर्ट्झची फ्रिक्वेंसी देणे फार इष्ट. पण त्यातही लोचा आहे. त्याचे प्रोग्रामिंग कसे करावे? म्हणजे प्रोपोर्शनल कंट्रोल लावला तर साध्य साधत नाही. उदा. दिल्ली व उदगीरमधील* अंतर किती उरले आहे त्या प्रमाणात बसची गती ठेवली तर उदगीरला बस शेवटपर्यंत पोहचत नाही. कारण उदगीर पोहोचते म्हणेपर्यंत बसची गती शून्यवत झाली असेल.

* उदगीरला प्रसिद्धी देणे आमचे आद्यकर्तव्य आहे. उद्या कोणीही ऐसीकर महाराष्ट्राचा नकाशा चाळू लागला, नि कुठे उदगीर दिसले तर जरूर एक मिनिट आपले नेत्रकमल तिथे स्थिरावेल. 'अच्छा, हा डोक्याला शॉट तिथलाच ...?' इ इ

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

सही: पुरोगाम्यांना लॉजिक माफ असतं.

* उदगीरला प्रसिद्धी देणे आमचे आद्यकर्तव्य आहे. उद्या कोणीही ऐसीकर महाराष्ट्राचा नकाशा चाळू लागला, नि कुठे उदगीर दिसले तर जरूर एक मिनिट आपले नेत्रकमल तिथे स्थिरावेल. 'अच्छा, हा डोक्याला शॉट तिथलाच ...?' इ इ

बाकी काही असो पण या मुद्यावर आपली पूर्ण सहमती आहे. उदगीरच्या जागी मिरज घातले की आमचे कर्तव्य दिसते.

जमल्यास तुम्ही 'उदगीर इतिहाससंशोधन मंडळ' काढले तर अजून प्रसिद्धी मिळावी. मिरजेसाठी त्या प्रयत्नात आम्ही आहोतच.

*नाही म्हणायला पानपतास रवाना होण्याअगोदर सदाशिवरावभाऊने निजामाबरोबर घमासान युद्ध करून उदगीरचा किल्ला काबीज केला होता. त्यासाठी उदगीर मराठी इतिहासात फेमसच आहे.

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

माहिष्मती साम्राज्यं अस्माकं अजेयं

सहमतीसाठी धन्यवाद.

जमल्यास तुम्ही 'उदगीर इतिहाससंशोधन मंडळ' काढले तर अजून प्रसिद्धी मिळावी. मिरजेसाठी त्या प्रयत्नात आम्ही आहोतच.

इतिहास संशोधन, पुरातत्व विभाग, प्राचीन धरोहर, इ इ शब्दांची मला फार चीड आहे. उदगीरला १००० नि दिल्लीत तर विचारूच नका इतक्या संख्यने ही अडगळ आहे. अगदी गावाच्या मध्यभागी इतकी जागा व्यापायची म्हणजे डोके भडकावणारा प्रकार आहे. तुम्हाला जे काय शोधायचे ते शोधा, त्याचा जो काय अभ्यास करायचा तो करा, जे काय अर्थ काढायचे ते काढा नि मग त्या जागेला 'डेवलप करा.' ताजमहल काय, लाल किल्ला काय, शनिवारवाडा काय, सगळे पाडून टाकले पाहिजेत. लाखोंनी आहेत हे सगळे. उपयोग काय आहे त्यांचा (भेटणारांना मूर्ख बनवण्याखेरीज?)? प्रचंड जागा मोकळी होईल. जुनं मडं जपत बसायची नवी प्रथा सुरु होत आहे.

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

सही: पुरोगाम्यांना लॉजिक माफ असतं.

ताजमहल काय, लाल किल्ला काय, शनिवारवाडा काय, सगळे पाडून टाकले पाहिजेत. लाखोंनी आहेत हे सगळे. उपयोग काय आहे त्यांचा (भेटणारांना मूर्ख बनवण्याखेरीज?)? प्रचंड जागा मोकळी होईल.

वाढदिवसाच्या शुभेच्छा तर देतोच. पण टूरिझम मार्केट नामक संज्ञेचा परिचय नसावासे दिसते. मढी जपून जर बक्कळ पैसा मिळत असेल तर का न जपावी हे सांगा बघू.

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

माहिष्मती साम्राज्यं अस्माकं अजेयं

कणेकरांच्या कुठल्याशा फुटकळ लेखात (द्विरुक्ती) जॅकी श्रॉफदेखील मूळचा उदगीरचा असा उल्लेख आला होता, तो विनाकारण लक्षात होता. आता यूट्यूबवर हा व्हिडिओ सापडला. 'शहर म्हणजे बिमारी. गाव सोडायाचा नाही' इ. विचार मननीय आहेत Wink

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

उदगीर एक तालुका आहे. लातूर जिल्ह्यात लातूर नंतर सर्वात महत्त्वाचे शहर म्हणावे लागेल आता. माझ्या लहानपणी मी तालुक्यातल्या 'गावाकडच्या' टाइप पार्ट मधे राहायचो नि माझा संपर्क शहरी, प्रोफेसरांची. मास्तरांची, अधिकार्‍यांची पोरे यांच्याशी पण असायचा. 'जॅकी श्रॉफ उदगीरचा आहे' हे गावाकडच्या सगळ्या पोरांचे मानणे असायचे जेव्हा कि शहरी पोरांना मी विचारायचो तेव्हा ते माझी टर उडवत. मग मी नंतर 'उच्च सर्कलांत' तसे विचारणे सोडून दिले.

आज हा व्हिडो पाहून छान वाटले. धन्यवाद.

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

सही: पुरोगाम्यांना लॉजिक माफ असतं.

नसल्यास मग वीज वापरणे टाळल्याने नेमके काय "वाचते"?

आपल्या खिशातील पैसे Wink
मी तरी म्हणूनच वीज आवश्यक तिथे व तितकीच वापरतो.

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

- ऋ
-------
लव्ह अ‍ॅड लेट लव्ह!

अगदी अगदी. प्रश्न विचारतानाच्या समजुतीप्रमाणे स्वतःचे पैसे वाचतात हे तर नक्कीच म्हाईत होते की भाऊ..

फक्त "वीज वाचवा"ची आवाहने कधीही तुमचे स्वतःचे बील वाचवण्यासाठी कमी वीज वापरा अश्या प्रकारची नसून "नासाडी टाळा", "वीज ही संपत्ती आहे", "जपून वापरा", "विजेची बचत करा", "अनावश्यक वापर टाळा", "राज्यात वीजटंचाई असताना विजेची उधळपट्टी","अनेक भागांत लोक लोडशेडिंग सहन करताना आपण मात्र अपव्यय करतोय" अशा आशयाची परमार्थाचे अपील करणारी वाटायची म्हणून तो प्रश्न होता.

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

बाय द वे गविजी, हायड्रोपावर ही प्रेफरेबली बेस लोड पुरवते. म्हणजे कितीही चढउतार झाले तरी स्थिर राहणारी मागणी. याचं मुख्य कारण असं आहे कि पाण्याच्या टर्बाईनसाठी पाणी उंचावर घेऊन येणारे पाईप अजस्र असतात. शिवाय त्यात बेंड असतात. ते जमिनीला घट्ट पकडून राहावेत म्हणून उतारावर त्यांच्यावर अक्षरशः एका मोठ्या खोलीच्या आकाराचे (भार बसावा म्हणून पोकळ नसलेले) बांधकाम केलेले असते. २० मेगावॅटचा टर्बाइन असला तर नि तो थाडकन बंद केला तर इतकी सगळी पावर तो पाईप तोडायच्या कामाला वापरली जाईल नि इथे कोणताही पाईप टिकणार नाही. म्हणून त्याला छेडणे टाळतात. पण जलविद्युतप्रकल्पाची ट्रान्समिशन लाईन स्नॅप झाली तर काय करतात याची कल्पना नाही.

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

सही: पुरोगाम्यांना लॉजिक माफ असतं.

पण जलविद्युतप्रकल्पाची ट्रान्समिशन लाईन स्नॅप झाली तर काय करतात याची कल्पना नाही.

resistive banks वगैर असतील

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

>>आता दुसरीकडे जगरेटरचा अक्षदांडा कितीही मजबूत असला तरी लोकांनी एकदमच सारा लोड काढून घेतला तर? एकदाच सगळा लोड लावणे नि एकदाच काढणे असा प्रकार झाला तर बहुतेक जनरेटर तुटून जाईल. म्हणजे फक्त एक केंद्र दिल्लीला पावर देते नि उद्या सगळ्या लोकांनी सारी बटने डॉट ७.०० ए एम ला चालू करायची नि सारीच ७.०० पी एम ला बंद करायची ठरवली तर जनरेटर तुटावा, इ. (तज्ञांनी खुलासा करावा.)

जनरेटर चा कुठला मेकॅनिकल पार्ट तुटेलसे वाटत नाही. आय मीन १०० किलोवॅटचा जनरेटर असेल आणि त्यावर एका क्षणी शून्यावरून १०० किलोवॅट लोड लावले तर तो फारतर स्टॉल होईल किंवा स्पीड खूप कमी होऊन पुन्हा पूर्ववत होईल (मोटारीचा क्लच जास्त पटकन सोडला तर होते तसे). [दांडा न तुटण्याचे आणखी एक कारण इंडक्टिव्ह सर्किटमधला करंट वाढण्यातला डीले सुद्धा असावा असे वाटते].

>>पण फॅन बंद केल्याने इथे विद्युतकेंद्रातला जनरेटर जोरात फिरू लागतो. त्याच्या स्पींडलवरचा रेजिस्टंट टॉर्क कमी होतो म्हणून.

इंजिनिअरींग शिकण्यापूर्वी हे कसे होते हे कळत नसे. पक्षी फील्ड कॉईल आणि आर्मेचर एकमेकांना जोडलेले नसतात तरी हे कसे होईल असे वाटे. मग हे मॅग्नेटिक कपलिंग कळले.

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

--------------------------------------------
ऐसीव‌रील‌ ग‌म‌भ‌न‌ इत‌रांपेक्षा वेग‌ळे आहे.
प्रमाणित करण्यात येते की हा आयडी एमसीपी आहे.

अरुणकाका आणि थत्तेचाचांचे अनेकानेकोत्तम आभार मुद्देसूद उत्तरांसाठी.

म्हणजे फक्त एक केंद्र दिल्लीला पावर देते नि उद्या सगळ्या लोकांनी सारी बटने डॉट ७.०० ए एम ला चालू करायची नि सारीच ७.०० पी एम ला बंद करायची ठरवली तर जनरेटर तुटावा, इ.

"अर्थ अवर" की काय ते ठराविक वेळेला सर्वांनी एकदम लाईटी घालवून बसणे वगैरे गोष्टी फार जास्त लोक सीरियसली घेत नाहीत ते बरंच आहे म्हणायचं.. Smile

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

काका म्हणायला माणूस आपल्यापेक्षा किमान किती वर्षांनी मोठा पाहिजे?

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

सही: पुरोगाम्यांना लॉजिक माफ असतं.

अरुणकाका अहो रागावू नका.

-ग'वी राजू.

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

माहिष्मती साम्राज्यं अस्माकं अजेयं

इतरांनी विचारला तर प्रश्न, अरुणने प्रश्न विचारला तर राग! माझे म्ह्णणे नक्की काय असते हे तुम्ही असे विचित्रपणे कसे ठरवू शकता? आकड्यात उत्तर द्यआ

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

सही: पुरोगाम्यांना लॉजिक माफ असतं.

वोह नया हय!!! छोड दो उसे Wink

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

१०.०.१२७.५३ = ४२.

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

माहिष्मती साम्राज्यं अस्माकं अजेयं

गेले वर्षभर टोस्ट्मास्टर क्लबची मेंबर होते. बरीच (९-१०) स्पीचेस दिली, दर आठवड्याला क्लब्मधील कोणीतरी स्पीच द्यायचं असा नियम असतो. ३ ट्रॉफीज मिळवल्या. पण मग क्लब सोडला. हा क्लब अत्यंत लाऊड, प्रिटेन्शिअस अन दिखाऊ वाटला. सर्व लोक फक्त टाळ्या मिळवण्याच्या मागे न प्रसिद्धीलोलुप वाटली. एकाने ५०० लोकांसमोर भर स्पर्धेत मैत्रिणीला मागणी घातली. अर्थात आपल्या प्रेमाचा इजहार (प्रकटन) किती प्रायव्हेट ठेवावा हा ज्याचा त्याचा प्रश्न असेलही पण मला फार उथळ अन अतिशय कॅरीड अवे असा प्रकार वाटला.

प्रत्येक स्पीचनंतर लोक टाळ्या वाजवत. नावाचा पुकारा झाला की टाळ्या, जरा कोणी काही उभं राहून २ शब्द बोलले की टाळ्या, अक्षरक्षः सूज आल्यासारखा तो टाळ्या प्रकार वाटलेला.

मी अंतर्मुखतेकडे कडे झुकते पण पूर्ण अंतर्मुख नाही. (११-इन्ट्रो, ९-एक्स्ट्रो) त्यामुळे असेल कदाचित पण तो टोस्ट्मास्टर प्रकार महाभयंकर वाटला. Sad
आपल्यापैकी कोणी टोस्टमास्टर आहे का? आपला काय अनुभव?

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

टोस्ट्मास्टर क्लब हा लोकांना भाषणे देण्याची सवय होण्यासाठीच असतो ना? मग टाळ्या वाजवणे हा positive encouragement चा प्रकार वाटतो. बाकी ५०० लोकांसमोर मागणी घालणे वगैरे हे वैयक्तीक आवडीनिवडीवर अवलंबून असावे (मी कधीच केले नसते). युट्युबवर असे ढीगाने व्हिडिओ पडलेत.

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

होय पॉझिटीव्ह एनकरेजमेन्ट्चाच प्रकार आहे. बरोबर आहे तुमचं. माझी का असल्य ढोंगी बळजबरीवर का चीड्चीड होते कोणास ठाऊक Sad

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

मी अंतर्मुखतेकडे कडे झुकते पण पूर्ण अंतर्मुख नाही. (११-इन्ट्रो, ९-एक्स्ट्रो)

कैसा शोधनेका ये?

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

एक फेमस(प्रसिद्ध) टेस्ट आहे. २ वेळा पाहीली सेम टेस्ट. एकदा मासिकात एकदा नेट्वर.

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

असली मसिके वाचू नका.

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

आजकाल (की आधीपासूनच?) जातीच्या जागी समाज असा उल्लेख का केला जातो? ब्राम्हण समाज, चांभार समाज, मराठा समाज असे अनेकदा वाचण्यात येते. हे वाचून माझ्या मनात तर जाती वेगवेगळ्या राहतात आणि त्यांच्यात सगळेच वेगळे असते अशा प्रकारचे काहीसे चित्र उभे राहते. हा शब्द अशा प्रकारे फार पूर्वीपासून वापरला जातो का? अशा प्रकारे वापरण्याचे नक्की कारण काय असावे?

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

जात म्हटले की जातीयवाद चिकटतो म्हणून तो एक पोलिटिकली करेक्ट शब्द आहे, जसे मुसलमान न म्हणता अल्पसंख्याक/विशिष्ट धर्म असे बातम्यांत कैकदा वापरले जाते.

अवांतरः मुसलमान ऐवजी लोक अलीकडे मुस्लिम हा शब्द जास्ती वापरू पाहताहेत असे निरीक्षण आहे. मुसलमान म्हटलं की गावंढळ आणि मुस्लिम म्हटलं की सोफिस्टिकेटेड असं वाटतं की काय कुणास ठाऊक.

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

माहिष्मती साम्राज्यं अस्माकं अजेयं

असे ट्रेंड्स असतातच की. "अवांतरास फाट्यावर मारले जाईल" ही पष्ट सूचना देण्याऐवजी "व्याप्तिनिर्देश" म्हटलं की कसं भारदस्त भारदस्त वाटतं.

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

********
It is better to have questions which don't have answers, than having answers which cannot be questioned.

अगदी अगदी...

अतिअवांतरः भारदस्त म्ह. जडकोष्ठ असे तर नव्हे Wink

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

माहिष्मती साम्राज्यं अस्माकं अजेयं

ROFL

दस्तऐवज या शब्दालाही निराळाच अर्थ प्राप्त होईल!

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

********
It is better to have questions which don't have answers, than having answers which cannot be questioned.

मग 'भारतात दस्तऐवजीकरण नीट होत नाही' हे विधान निगेटिव्ह न होता पॉझिटिव्ह होईल WinkROFL

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

माहिष्मती साम्राज्यं अस्माकं अजेयं

जबरदस्त प्रतिसाद!

अवांतर: अश्रू 'ढाळण्या'चा 'ढाळा'शी काही संबंध असावा काय? (काहीसे 'ऑक्युलर डायरिया'सारखे?)

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

धन्यवाद!

ऑक्युलर डायरिया वगैरे माहिती नाही. परंतु ढाळण्याचा संबंध 'ढाळा' शी असावा हे सयुक्तिक वाटते.

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

माहिष्मती साम्राज्यं अस्माकं अजेयं

ऑक्युलर डायरिया वगैरे माहिती नाही.

कसा माहीत असेल? आम्ही आत्ताच शोध लावला म्हटल्यावर...

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

गुरुमाऊलीऽऽऽऽऽ, काय हा चमत्कार!!!!!!!!!! _/\_

म्यांव म्यांव

फुन-कून पी!!!!

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

माहिष्मती साम्राज्यं अस्माकं अजेयं

जातीशी जे संबंधित तो "जातीवाद".
तो गाडून टाकायचा आहे.
समाजाशी संबंधित तो "समाजवाद ".
तो वैट वैट्ट आहे गब्बर सोडून कुणीच म्हणत नाही; म्हणूनच तो इष्ट आहे.
समाजवाद चांगला म्हणूनच; समाज हा शब्दही चांगला.

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

--मनोबा
.
संगति जयाच्या खेळलो मी सदाहि | हाकेस तो आता ओ देत नाही
.
memories....often the marks people leave are scars

This comment has been moved here.

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

This comment has been moved here.

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

सही: पुरोगाम्यांना लॉजिक माफ असतं.