बागकामप्रेमी ऐसीकर
या मोसमात बागेत कुठली रोपं लावली आहेत? घरगुती बागकामावर माहिती-चर्चा करण्यासाठी, छोटे-मोठे प्रश्न, शंका विचारण्यासाठी, अनुभव शेअर करण्यासाठी, आणि उगवलेल्या पिकांच्या व त्यांतून तयार झालेल्या डिशेसच्या फोटूंसाठी हा धागा. (म्हणून हा धागा खाद्यसंस्कृतीत घातला).
(व्यवस्थापन : 'बागकाम' ह्या स्वतंत्र विभागात धागा आता हलवला आहे.)
मी अत्यंत उत्साही पण बर्यापैकी असफल माळी आहे. अर्ध्याहून जास्त रोपं वाढत नाहीत, ना ना किडे लागतात, फुलझाडांवर फुलं बेताची. फळभाज्यांचं तर विचारूच नका, गेल्या मोसमात चार चार काकडीची रोपं चक्क एक ही फूल न उमलता कोमेजून गेली. पण नीम, हळद, लसूण चे स्प्रे, खताचे सात प्रकार, आणि असंख्य कुंड्या गोळा करून माझा उत्साह मात्र दांडगा.
मला फुलझाडं आवडतात, पण बाल्कनीतले ऊन पालेभाज्या आणि फळभाज्यांनीच बळकावलेले असते. जमेल तितकं नैसर्गिक उपाय, आणि घरच्या ओल्या कचर्याच्या खताचा वापर करून भाज्या उगवण्याचा प्रयत्न आहे. कमितकमी जागेत, कुंड्यांमधे भाज्यांचे यशस्वी बागकाम कसे करावे हे शिकण्याची इच्छा. (पण हा धागा फक्त फळ-भाज्याच नाही, तर फुलं आणि इतर शोभेच्या झाडांबद्दल ही चर्चा होईल असे अपेक्षित आहे).
तर या मोसमात पुईं शाक (malabar spinach), कोलमी शाक (इथली देशी पालेभाजी), छोटं कारलं, टॉक ढँरोश (roselle/आंबाडीचा प्रकार?), शीम (hyacinth bean /पावटा?), आणि ओव्याची लागवड चालू आहे. दोडका आणि दुधी देखील यादीत होते, पण तूर्तास जागेअभावी स्थगित. इतरांच्या मोसमी प्रकल्पांबद्दल ऐकण्यास उत्सुक.
ओल्या कचर्यापासून खत
ओल्या कचर्यापासून खत बनवण्याचा यशस्वी प्रयोग कोणी केलाय का? यशस्वी म्हणजे आळ्या किडे इत्यादी न होऊ देता.
आधी रोटी खाएंगे, इंदिरा को जिताएंगे !
मी प्रयोग केलाय. पण यशस्वी
मी प्रयोग केलाय. पण यशस्वी नाही. अळ्या झाल्यावर त्यावर मिसळणातली हळद-तिखट घालून संपवली आणि शिव्या खाल्या. पण खत होईस्तोवर थांबता आलं नाही. मधेच घराचं काम चालू झालं आणि ते प्रकरण उचलून टाकून द्यावं लागलं. पण मला हे करून मात्र पाहायचं आहे पुन्हा. डेलीडम्पडॉटऑर्ग नामक प्रकार तुम्हांला माहीत असेलच.
-मेघना भुस्कुटे
***********
तुन्द हैं शोले, सुर्ख है आहन
हो, हळद कुंकू जनरली अवॉइड.
हो, हळद कुंकू जनरली अवॉइड. हळद तिखटाचे प्रमाण खतात जास्त झाले तर आळ्याच काय, उपकारी जंतूंचा देखील नाश होतो.
बायोकल्चर
गेल्या काही वर्षांपासून माझ्या घरातला ओला कचरा घरातच जिरतो. पुण्यात एका ठिकाणी 'बायोकल्चर' मिळतं. थोडक्यात, कचराखाऊ जिवाणू ज्यात मिसळलेले आहेत असं मातीचं मिश्रण. त्यासोबत पुणेरी तपशीलात सूचना मिळतात. सूचना व्यवस्थित पाळून ते केलं तर उत्तम चालतं. अळ्या होत नाहीत. टाकलेल्या ताज्या पदार्थावर चिलटं येणं किंवा चिमण्या-कावळे येणं वगैरे अर्थात होतं. कचरा जिरला की मऊसूत माती तयार होते.
- चिंतातुर जंतू
"ही जीवांची इतकी गरदी जगात आहे का रास्त |
भरती मूर्खांचीच होत ना?" "एक तूच होसी ज्यास्त" ||
पुण्यात कुठशी आलं ते
पुण्यात कुठशी आलं ते दुकान?
डेली डम्पही विंटरेश्टिंग दिस्तय.
आधी रोटी खाएंगे, इंदिरा को जिताएंगे !
थोड्या प्रमाणात मॅगट्स होणे
थोड्या प्रमाणात मॅगट्स होणे हे खतासाठी उपकारक असतं. पण खूप वाढले तर खताच्या डब्यातनं बाहेर पडून घरात शिरायची शक्यता असते. शिरले तरी काही त्रास नाही; डेली डंप वाल्यांचा लेख पहा.
जंतू सारखंच मी देखील कचरा जिरवण्यासाठी एक जैविक सत्व वापरतेय. डेली डंपवाल्यांकडूनच मागवले. (त्यांचे पुण्यातही नळस्टॉपला दुकान आहे वाटतं.) पण खरंतर या सत्वाची गरज नाही. मुख्य म्हणजे ओल्या (नाइट्रोजेन युक्त) कचर्याचे आणि सुक्या (कार्बनयुक्त) कचर्याचे सुखद मिश्रण साधले, आणि ओल्याला सुक्याने बरोबर झाकून ठेवले, की चिलट्यांचा त्रास ही कमी होतो. याचा किती ही फार्म्युला दिला तरी हे अनुभवानेच कळते; एकदा तरी "मुन्सीपाल्टीची ट्रक घरात आलीय का!!!!!" असे विचारण्याची पाळी येतेच! ओला कचरा जास्त आणि सुका कमी झाला की कुजलेला वास येतो - त्यामुळे सुकी पानं, फाडलेल्या खोक्यांचे तुकडे, वगैरे त्यात नियमित मिसळले, आणि हवेसाठी ७-८ दिवसांतनं एकदा त्याला चांगलं ढवळलं, की वास कमी होतो, आणि जिरण्याचा वेगही वाढतो. मोठया आंब्याच्या कोई वगैरे टाळाव्यात; कवरा बारीक चिरून घातला तरी वेग वाढतो. वापरलेल्या डब्यात कुठून तरी बारीक हवा येतेय याची काळजी घ्यायची, पण उघडा नाही ठेवायचा. अगदी हवंच तर नीम पावडर देऊन चिलटं कमी करता येतात.
मी डब्याचे खूप प्रयोग केले. मातीची बारीक भोकं असलेली मडकी खतासाठी उपयुक्त ठरतात, कारण जिरताना प्रथम त्यात तयार होत असलेल्या उष्णतेला माती शोषून घेते. पण इथे एक ही कुंभार चांगले मातीचे मडके करून देणारा भेटला नाही. शेवटी मोठ्या डालडाच्या प्लास्टिक डब्यांना भोकं पाडून तेच वापरते.
तुम्ही नक्की करून पहा - एकदा प्रोसेस बसली की खूप सोपं आहे.
माझा अनुभव
मॅगट्स - माझ्या कुंडीत होत नाहीत.
सुका/ओला कचरा - बाहेरून उडत येतील तेवढी किरकोळ पानं सोडली तर मी फक्त स्वयंपाकघरातला ओला कचराच घालतो. (बाल्कनीत असल्यामुळे की काय) कुजलेला वास घरात कधीच आला नाही.
आंब्याच्या कोयी वगैरेसुद्धा घालतो. खरं तर सध्या आंब्याच्या साली आणि कोयींचा माराच आहे. कोयींचा कचरा व्हायला वेळ लागतो एवढंच. कलिंगडाची सालं वगैरे असतील तर छोट्या फोडी करून टाकतो.
डबा/कुंडी निवडताना पृष्ठभाग (सरफेस एरिआ) मोठा मिळेल हे पाहावं. दिवसातून थोडा वेळ ऊन आलेलं चांगलं.
पुण्यात हवा कोरडी असते. दमट हवेमुळे काय फरक पडेल माहीत नाही.
शतशः सहमत.
- चिंतातुर जंतू
"ही जीवांची इतकी गरदी जगात आहे का रास्त |
भरती मूर्खांचीच होत ना?" "एक तूच होसी ज्यास्त" ||
जंतू, रोचना धन्यवाद.
जंतू, रोचना धन्यवाद.
आधी रोटी खाएंगे, इंदिरा को जिताएंगे !
कोरड्या हवेचा तरी परिणाम,
कोरड्या हवेचा तरी परिणाम, नाहीतर तुझे जैविक सत्व चांगलेच कडक असावे. साधारण कचरा-सत्वाचे प्रमाण काय असते?
मी वापरते ते दोन-तीन चमचेच घालावे लागते, आणि सुकी पानं लागतातच. ओल्या-सुक्या कचर्याचा या दमट हवेत तरी चांगला १:४ रेशियो असावा लागतो, नाहीतर दुसर्या दिवशीच जिरण्याऐवजी कुजण्याची प्रक्रिया सुरू होते.
अंदाजपंचे...
सुरुवातीला मी त्या मातीबरोबर आलेल्या पत्रकानुसार ते केलं होतं. तेव्हा नारळाच्या शेंड्या वगैरे सुका कचरा घालायला त्यांनी सांगितला होता. पण एकदा तो सुरुवातीचा काळ संपला की नंतरही सुका कचरा घालत राहण्याविषयी त्या पत्रकात काही नव्हतं. अधून मधून मी कचरा उपसून खालची माती काढतो - नाही तर कुंडी भरून जाते. त्या वेळी मी अंदाजे ती माती पुन्हा थोडी भुरभुरतो आणि तेवढा एक दिवस कचरा घालत नाही. पण एवढंच.
- चिंतातुर जंतू
"ही जीवांची इतकी गरदी जगात आहे का रास्त |
भरती मूर्खांचीच होत ना?" "एक तूच होसी ज्यास्त" ||
मिरजेत असतो तर बागेत केले
मिरजेत असतो तर बागेत केले असते काहीबाही प्रयोग. इथे पुण्यात जागा मिळायची मारामार. कुंडीत लागवड करायला आवडत नाही म्हणताना पास.
माहिष्मती साम्राज्यं अस्माकं अजेयं
ओव्याच्या पानांची भजी मस्त
ओव्याच्या पानांची भजी मस्त होते म्हणून मागे कुंडीत वाढवले होते ते झाड.
बाकी मी या पंथातला नै. जंगलात आपॉप वाढलेली झाडे, फुले, पक्षी वगैरे बघायला मात्र लै आवडते.
तरी या धाग्यानंटर रुची तैंच्या पाव-प्रयोगासारखे नवे खूळ डोक्यात शिरले तर तुम्ही सर्वस्वी जबाबदार बरे!
- ऋ
-------
लव्ह अॅड लेट लव्ह!
तुझी पोस्ट मी ( स्वतः घरी
तुझी पोस्ट मी ( स्वतः घरी केलेल्या) सावरडो पावचा स्लाइस खात खात वाचतेय. खूळ हा शब्द अगदी बरोब्बर!
माझी बाग
आत्तापर्यंत फुलझाडांबद्दलचा उत्साह आहे, त्यात नेहमीची मोगरा, तगर, जास्वंद, सोनटक्का, ब्रह्मकमळ(खरे/खोटे), अनंत, गुलाब, लिली, कोरफड आणि चाफा येऊ घातला आहे, तशी वेटिंग लिस्ट मोठी आहे. जास्वंदाला मावा(कीड) पडली आहे त्यामुळे त्यावर औषध फवारणी बाकी आहे, एका जास्वंदीला आणि लिलिला पुरेसे उन मिळत नसल्याने फुलांचा मौसम नाही, पण सोनट्क्क्याचे कोंब मस्त फुटले आहेत आणि वेलि-मोगर्यला पण यंदा बरीचे फुले आली, गुलाब उत्तम आहे पण एक गुलाबाची फुले दिवसेंदिवस छोटी-छोटी होत चालली आहेत, खतपाणी करायला वेळ काढणे गरजेचे झाले आहे. पुढच्या उन्हाळ्यापर्यंत बोगनवेलीच्या २-३ वेलींचे लँडस्केप करायचे मनात आहे.
आता आलं, मिरची आणि टोमॅटोचे प्रयोग करायचे मनात आहे पण फळभाज्यांना काळी माती लागते आणि फुलांना लाल माती त्यामुळे लॉजिस्टिकची थोडी गडबड आहे, करायचे ठरवले तर आहे.
खत म्हणून प्रामुख्याने शेणखतच वापरत आहे, पण पाल्याच्या कचर्यापासून खत करण्यासाठी २-३ मोठ्या कुंड्या वापरत आहे,तो प्रयोग अजुन यशस्वी झालेला नाही.
ह्याबद्दल शुभेच्छा.
अन् ते नारळ बिरळ? पाडणार
अन् ते नारळ बिरळ?
पाडणार होतात ना मागे! विसरलात ना त्यांना!? बिच्चारे!
- ऋ
-------
लव्ह अॅड लेट लव्ह!
अरं खरेच की, नारळाचे झाड आहे,
अरं खरेच की, नारळाचे झाड आहे, नारळं काढली मात्र.
आहा, मस्त! माझ्या
आहा, मस्त! माझ्या फुलझाडांनाही किड्यांचा फार त्रास होतो - जास्वंदाला मावा (म्हणजे मीलीबग्स?) लागला होता तो स्पिरिट-पाणी प्रत्येक पानाला लावून लावून काढला. सध्या ठीक आहे पण खूप लक्ष द्यावं लागतं. मोगर्याला सारखे स्पाइडरमाइट्स (मराठी?) लागतात, त्यांच्यावर नीम स्प्रे देऊन, वेचून दमले. तरी यंदा पुष्कळ फुलं झाली.
बागेचे फोटो टाका की!
जास्वंदाला मावा (म्हणजे
हो मीलीबग्सच, स्पिरिट नसल्याने इन्सेक्ट स्प्रे वापरत आहे.
जरा बरी दिसायला लागली की लगेच टाकतो तुम्ही टाका.
मी
मागील वर्षे काही फुलझाडे लावली होती. छोटा गुलाब, सदाफुली, झेंडू, तुळस. बर्फ पडेपर्यंत चांगली टिकली. नंतर टाकून दिली.
या वर्षी वेगवेगळ्या प्रकारचे ३ झेंडू, झिनिया, अॅस्टर, पुदिना, मिरच्या, स्वीट बेझिल आणि रोझमेरी लावली आहे. रोझमेरीचे तयार रोप आणले. बाकीचे सर्व बियांपासून उगवले आहेत. झिनिया आणि झेंडूला छान फुलेही आली होती. लॅवेंडरचेही तयार रोप आणले होते. मात्र बरीच काळजी घेऊनही तीनचार आठवड्यातच सुकले. आता त्या कुंडीत सदाफुली लावायचा विचार आहे. तुळशीच्या बिया तीन महिन्यापूर्वी लावूनही रोप आले नाही. धणेही पेरले होते पण कोथिंबीरीच्या दोनतीन काड्याच आल्या व वाढ काही दिसेना. काल झालेल्या जोरदार वाऱ्याचा व पावसाचा तडाखा बसल्याने झिनियाची एक फांदी तुटली आहे.
थंड हवा असताना कुंड्या आधी घरात ठेवल्या होत्या. सुर्याच्या दिशेने खिडकीत ठेवायचे काम करावे लागे. मात्र लॅवेंडरचे रोप आणले तेव्हा नीट न पाहता आणले आणि त्याच्या मातीच्या आत चिलटांचा प्रादुर्भाव झाला होता. त्या संसर्गाने घरात असंख्य चिलटे झाली. आता सर्व झाडे गॅलरीतील कुंड्यांमध्ये. पुढील काही महिन्यात आमच्याकडे स्टिंक बग्जचा जोरदार त्रास होतो तेव्हा ही झाडे टाकूनच द्यावी लागतात.
या किड्यांबाबत विशेषतः अमेरिकेतील कोणाला काही जालीम खात्रीलायक उपाय माहीत असतील तर बरे होईल.
हे सगळं कुंडीतच का? आता हा
हे सगळं कुंडीतच का? आता हा धागा वाचून माझ्याही डोक्यात 'खूळ' शिरतंय.
---
सांगोवांगीच्या गोष्टी म्हणजे विदा नव्हे.
येस कुंडी
हो सगळं कुंडीतच लावलंय. डॉलर शॉपमध्ये गेल्यास एक डॉलरला एक कुंडी मिळते. एक डझन कुंड्या आणून ठेवल्या आहेत. माती वालमार्टातून. सहा महिने खत घालावे लागत नाही. तशीही ही झाडे आमच्याकडे सहा महिन्याच्यावर टिकत नाहीत. बिया आल्डी/क्रोगर वा तत्सम दुकानांमधून बर्पी कंपनीच्या चांगल्या प्रतीच्या घेतल्या आहेत. त्यांचे उगवलेले अंकुरही मिळतात.
अतिअवांतर
या स्टिंकबगला मिरजेत 'पादरा किडा' नामक अगदी यथार्थ नाव असे. काडेस्पेटीत(होय, हाच उच्चार होता) हा किडा घालून मित्रांस लहानपणी सप्रेम भेट देत असू त्याची आठवण झाली.
माहिष्मती साम्राज्यं अस्माकं अजेयं
हा भारतात आहे काय?
हा किडा भारतात आहे काय? मी कधीही पाहिला नव्हता. एकदा चुकून हाताने चिरडला गेला होता. दोनतीन दिवस हाताचा वास गेला नाही. त्याच्या पाठीवरील ढालीसदृश आवरणामुळे वेगवेगळ्या स्प्रेलाही तो दाद देत नाही. साबणाचे पाणी वगैरेंमुळे भिंतीवरुन घसरुन पडतो. पण परत येतोच.
यंदा जोरदार थंडी पडल्याने त्याचे निर्मूलन झाले असेल असे वाटले होते. पण मागच्याच महिन्यात २ किडे दिसले. त्यामुळे येणाऱ्या कालावधीत यांची सेना आक्रमण करणार ही नक्कीच. (विंटर इज कमिंग!)
होय. अगदी घाण वास आणि एकूण
होय. अगदी घाण वास आणि एकूण आकार इ. फटूप्रमाणेच. फक्त मी पाहिलेली व्हर्जन जरा अंमळ जास्त काळपट होती असे वाटते. त्या घाणघाण काळ्याढुस्स पाली असतात अंमळ त्यांच्यागत कलर. बागेतल्या रामफळाच्या झाडाच्या बेचक्यात हा किडा पकडल्याचे आठवते.
माहिष्मती साम्राज्यं अस्माकं अजेयं
असेल
भारतात त्यांना वर्षभर बाहेर राहणे शक्य असल्याने घरात त्यांचा उपद्रव कमी आहे असे वाटते. आमच्याकडे थंडीत टिकाव धरण्यासाठी त्यांना घरात घुसावे लागते. अगदी नखाएवढ्या अरुंद फटीतूनही हे किडे घरात घुसतात. त्यांना अगदी बेसावध असतानाच पकडून मारावे लागते अन्यथा वास मारून ते त्यांच्या इतर मित्रांना बोलावतात.
त्यांचीही कंपूबाजी? असो. हे
त्यांचीही कंपूबाजी?
असो. हे किडे घरात घुसत असतील तर वेळेत किडेनाशक औषधं घरात फवारून घ्या. अमेरिकेतल्या घरांमध्ये लाकूड बरंच असतं, वाळवी किंवा तत्सम किडे लागले तर बराच मनस्ताप होईल. हे किडे टिकतात म्हणजे वाळवी टिकेलच असं नाही, पण तरीही राहवलं नाही म्हणून.
---
सांगोवांगीच्या गोष्टी म्हणजे विदा नव्हे.
इतर किडे नाहीत
हे किडे कीटकनाशकांना दाद देत नाहीत. हे कासवासारखे असल्याने एक तर यांच्या अगदी अंगावर कीटकनाशक पडलं तरी यांना काही फरक पडत नाही. त्यांना खालून मऊ जागी लागणारं कीटकनाशक हवं. हे झाडांच्या पानांचा रस पिऊन टाकतात पण त्यांचा वास सोडला तर माणसांना तसा काही त्रास नाही. मात्र मला पाल किंवा असे किडे दिसले तर अंगावर काटा येतो त्यामुळे त्रास आहे.
एकदा स्वतःहून पैशे देेऊनही कीटकनाशक फवारून घेतलंय. घर भाड्याचं आहे. आणि किड्यांची कल्पना अपार्टमेंटवाल्यांनाही दिली आहे. त्यांनीही या किड्यांसमोर हात टेकले आहेत. आमच्या जवळपास सर्वांनाच हा त्रास आहे.
मला कीडे आवडतात पण रामा!!!!
मला कीडे आवडतात पण रामा!!!! पाल हा एक महाभयंकर प्राणी आहे. काय ती तिची नजर ..... आई ग!!! काटा येतो अंगावर.
...
पालीसारखा हार्मलेस प्राणी नसावा. (क्यूट असतात.)
- (पालींसोबत वाढलेला) 'न'वी बाजू.
हार्मलेस कसल्या नवी बाजू, अहो
हार्मलेस कसल्या नवी बाजू, अहो झेप घेतात अंगावर ..... म्हणजे असं ऐकून आहे.
?
आयुष्याची गेला बाजार सतराअठरा वर्षे पालींबरोबर वाढलोनांदलो. आजतागायत एकाही पालीने अंगावर झेप घेतलेली नाही.१
पालींची बदनमी थांबवा!!!!!!
(घरात पाली येऊ नयेत / घरातून पाली निघून जाव्यात म्हणून अंड्यांची टरफले घरात उलटी टांगून ठेवणार्यांची टरफले त्यांच्याच घरात उलटी टांगली पाहिजेत.)
---------------------------------------------------------------------------------------------------------------------
१ डिस्क्लेमर: पाली सामान्यतः किड्यांच्या अंगावर झेप घेतात, असे निरीक्षण आहे. त्यामुळे, (पालींनी अंगावर उडी घेण्या-न घेण्यासंबंधीचा) इतरांचा अनुभव माझ्यापेक्षा विपरीत असू शकतो.
(घरात पाली येऊ नयेत / घरातून
(घरात पाली येऊ नयेत / घरातून पाली निघून जाव्यात म्हणून अंड्यांची टरफले घरात उलटी टांगून ठेवणार्यांची टरफले त्यांच्याच घरात उलटी टांगली पाहिजेत.)
पाली त्या अंड्याच्या टरफलांना हिंग लावूनही विचारत नाहीत असे माझा मित्र कालच म्हणत होता.
का विचारावे?
पालींन अक्कल नसते, असा समज प्रचलित आहे काय?
पालींची बदनामी थांबवा!!!!!!
नारायण
मित्र नारायण पेठेतला होता, त्यामुळे पालही तिथलीच असावी असा कयास असल्याने 'अक्कल' काढण्याच्या फंदात पडलो नाही.
सावरडो!
कुठून, कुठे, कसं काय सापडेल याचा नेम नाही.
मला सावरडो पावाच्या विरजणाची पाककृती हवी होती म्हणून गूगल केलं तेव्हा या धाग्याचा दुवा सापडला. हाच तो धागा ज्यामुळे मला बागकामाचं खूळ लागलं, म्हणून प्रतिसाद वाचत होते तर न.बां.च्या पालप्रेमाचा ओरिगिनल प्रतिसाद सापडला.
---
सांगोवांगीच्या गोष्टी म्हणजे विदा नव्हे.
पाली सामान्यतः किड्यांच्या
हाहाहा अहो माराल एखाद्याला हसवून.
पण एक आहे हां पालींना आपल्या डोळ्यातील भित्रट झाक कळते अन त्या अधिक खुनशीपणे नजरेला नजर देतात
देखो, मगर प्यार से
एकदा न घाबरता, प्रेमाने नजरेला नजर देऊन पाहा. (पालीच्या.) फरक जाणवेल.
किंबहुना, पालीसारखा 'जगा आणि जगू द्या१'वादी प्राणी जगात दुसरा असण्याबद्दल साशंक आहे.
---------------------------------------------------------------------------------
१ तेवढे किडे वगळल्यास.
पालीसारखा 'जगा आणि जगू
वाघासारखाही जगा-जगू द्या वादी प्राणी मिळण्याबद्दल साशंक आहे- तेवढी ती हरणे, रेडे अन झेब्रे इ. वगळता.
माहिष्मती साम्राज्यं अस्माकं अजेयं
हाहाहा मस्त!
हाहाहा मस्त!
उमेरिकेत भारतात असतात अशा
उमेरिकेत भारतात असतात अशा घरगुती पाली असतात का?
आधी रोटी खाएंगे, इंदिरा को जिताएंगे !
५-६ स्टेटमध्ये राहीले आहे. पण
५-६ स्टेटमध्ये राहीले आहे. पण नाही पाहील्या बुवा.
पालींच्या मोठ्या भावाचं बरंच
पालींच्या मोठ्या भावाचं बरंच खूळ आहे अमेरिकेत. पोराटोरांना आवडतातच हे जीव, मोठेही त्यामागे खुळे होतात. त्यांच्या पायाचे पंजे दिसले तरी लोक उड्या मारतात. डायनासूर का कायसंसं नाव आहे. राक्षसी आकाराचे होते म्हणून बहुतेक असुर म्हणतात. त्यांच्यातल्या माद्यांना डायन का म्हणतात माहित नाही. दुसरा एक मोठा भाऊ असतो पालींचा, त्यांना घाबरतात. तरी पहायलाही जातात. त्यांचं नाव अळीघेटर असं काहीतरी आहे. ते अळ्या खात असावेत, धाकट्या बहिणींसारखे.
---
सांगोवांगीच्या गोष्टी म्हणजे विदा नव्हे.
हाहाहा अळी घे तर
हाहाहा अळी घे तर
?
मोठा भाऊ??????
'छिपकली के नाना हैं' असे कायसेसे ऐकले होते ब्वॉ!
('नाना'. 'दादा' नव्हे. बोले तो, त्या खात्यावरही गैरसमजास जागा नाही.)
कुटुंबसंस्था आणि त्यातली नात्यागोत्यांची भानगड
कुटुंबसंस्था आणि त्यातली नात्यागोत्यांची भानगड मला कधीच झेपत नाही त्याचा हा पुरावा मानावा. उद्या मी महाभारत ऐकून परिक्षित विचित्रवीर्याचा धाकटा भाऊ असंसुद्धा म्हणू शकते. त्यामुळे तुम्ही म्हणता तसं.
आणि हो, अमेरिकेत पालींच्या कोणत्याशा नातलगाच्या नावाने विमासुद्धा विकतात. एकेकाळीसुद्धा सारीकाताईंसारखे, पालींना नाकारणारे लोक सायबाच्या देशात होते. त्यांना पालींबद्दल आपुलकी निर्माण व्हावी, त्यांनीही पालींच्या पाठीवरून प्रेमाने हात फिरवावा म्हणून त्यांना किनऱ्या आवाजात 'घे गो' म्हणायचे. त्याचा अपभ्रंश होऊन 'गेको' झालं. पुढे काही साहेब अमेरिकेत आले. अमेरिकेत कोणत्याही नावाचा उच्चार बदलू शकतो (बॉंब आणि बंदुकी आहेत हो त्यांच्याकडे!), तसं गेकोचं गायको झालं.
---
सांगोवांगीच्या गोष्टी म्हणजे विदा नव्हे.
शंका
यास 'अज्ञानजन्य अपभ्रंश' म्हणावे, किंवा कसे?
(पण कदाचित, 'घे गो' हे संस्कृतात नसल्याकारणाने या अपभ्रंशाचे असे वर्गीकरण होऊ नये.)
(अतिअवांतर: वस्तुतः, कोणताही अपभ्रंश हा मूळ उच्चार (नीटसा) ठाऊक नसण्यातून (पक्षी: मूळ उच्चाराच्या अंशतः किंवा पूर्णतः अज्ञानातून) उद्भवावा. मग संस्कृत उगमाचाच अपभ्रंश हा विशेषत्वाने 'अज्ञानजन्य अपभ्रंश' म्हणून का क्वालिफाय व्हावा ब्वॉ? 'संस्कृतात ज्ञान सामावलेले आहे' असे काही सुप्त गृहीतक यामागे दडलेले आहे काय?)
(अतिअतिअवांतर: कोणी आक्षेप घेण्याअगोदरच, हेच विधान इंग्रजीस (आणि बहुधा हिंदीसही) लागू करण्यास आम्हांस कोणताही प्रत्यवाय नाही, हे स्पष्ट करू इच्छितो. विथ रेफरन्स टू द कॉण्टेक्ष्ट आण्डर कन्सिडरेशन, 'अभिजनांची' म्हणून मान्यताप्राप्त अशी कोणतीही भाषा, असे म्हणू या फार तर.)
फ्लोरिडामधे पालींचा सुळसुळाट
फ्लोरिडामधे पालींचा सुळसुळाट आहे असे ऐकून आहे.
गेक्कोज भरपूर आहेत तिथे. आपण
गेक्कोज भरपूर आहेत तिथे. आपण चालत असताना सारखं लक्ष ठेवावं लागतं इकडुन तिकडे उड्या मारणार्या या सरडा-कम-पालीकडे.
फेरोमोन ट्रॅप्स चा उपयोग
फेरोमोन ट्रॅप्स चा उपयोग झालाय का? किंवा बागेत लेडीबग्स आणणे - त्या हे स्टिंकबग्स आणि अंडी खातात असे वाचले होते.
थंडी संपत चालली की मका किंवा टोमॅटो "बळी" च्या स्वरूपात लावून त्यांना आकर्षित करून मग फेरोमोन ट्रॅपने पकडणे हे कीटनाशकापेक्षा उपयोगी ठरावे. पण प्रत्यक्षात अर्थातच अनुभव नाही. थंड प्रदेशात नेमके कुठे आहात हे विचारलं तर चालेल का?
नाही
फेर्मोन ट्रॅप्स मुद्दाम वापरले नाहीत. या ट्रॅप्समुळे शेजाऱ्यापाजाऱ्यांकडचेही हे किडे आकर्षित होतील आणि समस्या अगदी हाताबाहेर जाईल असे काही ठिकाणी वाचले.हे किडे मुख्यतः overwintering करता घराकडे येतात त्यामुळे थंडी संपू लागली की त्यांचा त्रास नसतो. साधारण फॉल सीझन अर्धा झाला की ते घराबाहेरच्या भिंतींवर दिसू लागतात. दसरा-दिवाळीच्या आसपास घरातही दिसू लागतात. तेव्हा खिडक्या घट्ट बंद करायची काळजी घ्यावी लागते. थंड प्रदेशात मिडवेस्टात आहे. (ओहायो).
हम्म रैट्ट. आम्रविकेत थंडीचा
हम्म रैट्ट. आम्रविकेत थंडीचा प्राब्ळम जास्तीच.
माहिष्मती साम्राज्यं अस्माकं अजेयं
मी सुद्धा बॅसिल चं रोप लावलं.
मी सुद्धा बॅसिल चं रोप लावलं. पेस्टो करायसाठी एक जुडी विकत घेतली आणि तिची किंमत ऐकून चमकलेच. ४० रु! मग त्यातल्या दोन काड्या घेतल्या, पानांखाली कापून चार दिवस पाण्यात ठेवल्या. नवीन मूळ आल्यावर कुंड्यात लावल्या. आता मस्त वाढतायत - ताज्या बॅजिल पानांचा गंध आणि चव मस्तच.
स्टिंकबग्ज
या घाणेरड्या किड्यांबाबत एक जोरदार लेख वाचला.
https://www.newyorker.com/magazine/2018/03/12/when-twenty-six-thousand-s...
तूच रे तूच.
हा लेख वाचताना मला तुझीच आठवण येत होती.
लेखाचा शेवट न्यूयॉर्करच्या तुलनेत जरा दवणीय वाटला, पण तो मुद्दा लेखात साटल्यानं वारंवार मांडला आहे.
---
सांगोवांगीच्या गोष्टी म्हणजे विदा नव्हे.
आवडीचा विषय
रोचक धागा!
गेल्याच आठवड्यात मिरची, पुदिना आणि गवती चहा यांची रोपे आणून लावलीत. बघुया कशी वाढतात ते!
पैकी मिरची दुसर्यांदा लावलीय. आधीची मिरची साताठ महिने टिकली, काही शे मिरच्या दिल्या आणि गेली! टोमॅटोदेखिल लावला होता. चार एक महिने टिकला, साठ-सत्तर टोमॅटो देऊन तोही गेला!
आता ह्या वर्षीची रोपे बघू काय करताहेत!
तशी फुलझाडांपैकी मोगरा, लाल जास्वंद आणि पिवळा जास्वंद आहेतच. खेरीज, दर पावसाळ्यात लावतो त्याप्रमाणे लिलीदेखिल आहेच!
शिवाय हौसेखातीर पारीजात, डबल तगर, सोनचाफा आणि गुलाब आहेतच.
आणि फळझाडांपैकी चिकू आणि पपया. वरचेवर फळे देतच असतात!
वा! तुम्ही टोमॅटो चे कुठले
वा! तुम्ही टोमॅटो चे कुठले प्रकार लावले होते? बिया कंपनीच्या की कोणा शेतकर्याच्या?
मी अतिउत्साहात दोन्ही रोपं चुकीच्या मोसमात लावली. इथे उन्हाळ्यात मिरची नीट वाढत नाही. शेकडो फुलं देऊन गेली पण एकही फळ नाही. या सेप्टेंबरला पुन्हा प्रयत्न करणार आहे.
थालीपीठासाठी पान हवं म्हणून कर्दळी एका कुंडीत आहे - पण धनंजय ने सुचवलं की हळदाच्या पानावर ही थापता येतं; ते ही लावून बघायचं आहे.
छोटी मिरची.
मी फोडणीला आणलेली काश्मीरी मिरची सहज मातीत कुस्करली होती. मागच्याच आठवड्यात एक छोटी मिरची येऊन (वाऱ्याने पडून) गेली.
नर्सरी
टोमॅटोचे रोप नर्सरीतून आणून लावले होते. प्रजाती ठाऊक नाही पण चवीला किंचित गोडसर होते.
मिरची उन्हाळ्यात लावली तर नीट वाढत नाही हे खरे. पावसाळा सुरू होतोय म्हणून आणली खरे पण पावसाचाच पत्ता नाही!
पुदिना
पुदिना जमिनीत असल्यास थोडा काळजीपूर्वक लावावा. फार पसरतो. इतर झाडांना खाऊन टाकतो. शक्यतो कुंडीत लावलेला बरा.
+१
जंगली फताड्या पानांचा माजलेला पूदीना पाहीला आहे.
होय
होय. कायम लक्ष ठेवावे लागणार आहे त्याच्या वाढीवर.
त्यापेक्षा कुंडीतच लावा.
कुंडी फोडली माझ्या पुदिन्याने. भयंकर वाढतो तो.
-: आमचे येथे नट्स क्रॅक करून मिळतील :-
भारतात फ्लॅटमधल्या
भारतात फ्लॅटमधल्या ग्यालर्यांमध्ये हे उद्योगही करतं का कुणी?
आमच्या अवतीभवती घरांच्या ग्यालर्यांत तुळस (ती त्यांना पाणी वाहत पुजा करणार्या बायका-पुरूष), गुलाब, मनी प्लांट नावाची दुष्ष्ट्ट इतरांच्या खिडकीपर्यंत मजल नेणारी वेल आणि क्वचित काही ऑफीस टाईमछाप फुले याहून अधिक काही दिसलेले नाही.
ज्यांची ड्युप्ले घरे आहेत वा स्वतंत्र टेरेस आहेत त्यांना शक्य आहे. मला ग्यालरी प्रयोगाबद्दल उत्सुकता आहे.
वर सुनीलराव म्हणतात तसे एक मिरचीचे झाड काही शे मिरच्या देत असेल, शिवाय टोमॅटोही घरी लावता येत असेल तर करून बघावेसे वाटु लागले आहे.
शिवाय घरी मश्रुम शेतीही करतात म्हणे. कुणी केलीये का इथे?
(सध्या घरी निर्माल्यातून आपोआप उगवलेला झेंडु आणि रोजच्या वापरासाठी कढीपत्ता तेवढा आहे ग्यालरीतील एका कोपर्यात)
- ऋ
-------
लव्ह अॅड लेट लव्ह!
माझी गॅलरीच आहे - म्हणजे फक्त
माझी गॅलरीच आहे - म्हणजे फक्त कुंड्या, जमीन नाहीच. गॅलरीत मुख्य ऊन किती तास व कोवळे की कडक दुपारचे हे लक्षात घेऊन रोपं निवडावी. पूर्वेकडची गॅलरी असल्यास उत्तम, किंवा थंडीच्या दिवसात दक्षिणेकडची ही चालते. सकाळचे किमान ४-५ तास ऊन तरी भाज्यांना लागतंच (शेंगा, काकडी वगैरेंना तर चांगले ६-७ तास तरी) नाहीतर व्यवस्थित वाढ होणं कठीण आहे. कोथिंबीर, पुदिना, कडीपत्ता, काही पालेभाज्या इ. ना ३-४ तास मिळाले तरी चालतं.
ओह! म्हंजे फक्त
ओह! म्हंजे फक्त कुंड्यांमध्येच हे सगळं जमतं तर!
आता मिरची लावायची फार इच्छा होतेय. इथे पुण्यात 'नेमकी' मिरची मिळत नाही. एकतर अतितिखट नैतर नुसती पुचाट सालकट
माझी ग्यालरी पूर्वेलाच आहे. सकाळी सूर्य उगवल्यापासून १०-११ वाजेपर्यंत व्यवस्थित उन असतं.
(माझ्या अपेक्षेप्रमाणे चार लोकांना हे करताना बघुन मलाही उत्साह येऊ लागेल ही अटकळ होतीच. आता कुंड्यांचे दुकान शोधण्यापासून तयारी सुरू करतो या विकांताला.)
- ऋ
-------
लव्ह अॅड लेट लव्ह!
कुंभारवाडा जिंदाबाद.
कुंभारवाडा जिंदाबाद. सर्वसाधारणपणे पालेभाज्यांना किमान ६-९ " खोलीची, आणि फळभाज्यांना १०-१२ " खोलीची कुंडी लागते. "स्क्वेअरफुट गार्डनिंग" प्रकाराबद्दल थोडं गुगलून-वाचून एकाच कुंडीत किती रोपं चांगली वाढतील याची कल्पना येईल.
मात्र कुंड्यांसाठी साधी माती न वापरता कोकोपीट (नारळाच्या सालाचा चुरा) आणि चांगले गांडूळ खत मिसळून घातले, म्हणजे कुंड्या हलक्या राहतात, पाणी पुरवठा नियमित होतो, आणि छोट्या जागेत मातीमुळे किड्यांचा उपद्रव होत नाही.
या साइटने बरेच चांगले फंडे दिले. पुण्यातले बरेच हौशी माळी त्यांच्या संवादस्थळावर एकेकाळी होते. पुणे खरंतर "शहरी शेती" च्या चळवळीत आघाडीवर आहे, शहरात गच्चीवरच्या बागकामाला प्रोत्साहन देण्यात, आणि रासायनिक शेतीहून घरगुती, नैसर्गिक बागकाम/शेतीच्या प्रसारात पुणेकरांचे बरेच नाव आहे.
छान साईट आहे. आभार. भारतात
छान साईट आहे. आभार.
भारतात कोणते रोप कोणत्या मोसमात लावावे? कोणती माती लागते? कोणते खत किती प्रमाणात? वगैरे माहिती देणारे काही आहे का?
मिरची वगैरेचे बियाणे कुठे मिळते? का घरातीलच मिरचीचे बी पेरायचे?
वेगवेगळ्या प्रकारची माती वगैरे नॉर्मल रोपवाटिकेत मिळावी असा अंदाज आहे (बियाणेही तिथेच?). ही माहिती त्यांच्याकडून मिळवता येईलच पण ती त्यांच्या धंद्याला अधिक फायदा देणारी उत्तरे देतील असे वाटते.
(अगदीच बाळबोध प्रश्न आहेत पण शक्य तितके जालावर शोधायचा कंटाळा करतोय)
- ऋ
-------
लव्ह अॅड लेट लव्ह!
त्या साइटवर कधी काय लावावं
त्या साइटवर कधी काय लावावं याचं एक कालनिर्णय आहे. निविध झाडांच्या पेरणी ते हंगामापर्यंत सगळ्या तारखा आहेत. फक्त पुणे हे "उत्तर" की "दक्षिण" भारतात बसते याचा निकाल लावला की झालं (म्हणजे तो चार्ट थोडा सरसकट आहे, त्यांची माहिती एखाद्या स्थानिक माळीच्या माहितीशी ताडून पहावी लागेल).
एरवी रोपवाटिकेतून कंपन्यांचे बी-बियाणे विकत घेता येतातच. सगळेच पॅकेज तेथे मिळते - बिया, खत, कीटनाशक, आणि पुढच्या वर्षी पुन्हा बिया. मला वाटतं हात लागे पर्यंत हेच करण्यात काहीच गैर नाही. रोपांची चांगली ओळख त्या मार्गे होते.
पण विचारलेले प्रश्न बाळबोध अजिबात नाहीत, हे खरंतर कळीचे प्रश्न आहेत, नैसर्गिक शेतीचा गाभाच आहेत. या क्षणाला हे थोडं अवांतर आहे कदाचित, पण...
आपण कुठल्या प्रजातींचा प्रसार करत आहोत, हायब्रिड, की देशी, की जनुकीय पातळीवर संस्कार केलेल्या प्रजाती, या सर्वांचा विचार करावा. देशी प्रजातींना टिकवणे, आणि स्थानिक देशी प्रजातींच्या विविधतेला टिकवणे हे घरगुती, नैसर्गिक बागकाम/शेती मागचा मुख्य हेतू आहे. देशी, स्थानिक प्रजाती योग्य मोसमात लावल्या तर किड्यांचा उपद्रव कमी होतो, चव अधिक चांगली असते, आणि त्यांचे फार सोपोस्कार करावे लागत नाहीत. पण स्वतः बिया टिकवणं ही देखील एक शिकलेली कला आहे, पारंपारिक शेतीतले महत्त्वाचे ज्ञानशास्त्र आहे - त्यामुळे बरेच जण बिया जाणकार नैसर्गिक शेतकर्यांकडून आणून लावतात. बंगलोर मधलेच "सहज सीड्स" ही संस्था अशा बियांचा वाटप करते. पुण्यात एम्प्रेस गार्डन मधे वरचेवर असेच मेळावे होत असतात, तेथे चांगली स्थानिक माहिती मिळेल.
या धाग्याबद्दल आभार मानावे
या धाग्याबद्दल आभार मानावे तितके थोडेच आहेत.
य क्षेत्रात इतके होत असेल याची कल्पनाच नव्हती. शेती हा शेतकर्यांनी करायची गोष्ट आहे असे समजून दूर गेलेल्यांना या साईटवर बरेच काही रोचक वाचायला मिळेल
तुम्ही म्हणालात ती यादी मिळाली. पुणे दक्षिण भारतात धरता यावे असे वाटते. (राजकीय कंट्युनिईटी सोडली तर सातपुडा, विंध्यच्या खाली बरंच काही वेगळं आहे. जमिन, माती, प्राणी, पक्षी).
मलाही चवीसाठीच तर हा अट्टाहास करायचा आहे. नैसर्गिक बियाणे शोधतो आता.
पुनश्च आभार!
===
@ सुनीलः त्या चार्ट नुसार तुमचे टोमॅटोचे टायमिंग बर्यापैकी अचुक दिसतेय. यंदा फळणार तर!
- ऋ
-------
लव्ह अॅड लेट लव्ह!
हा माझा जिव्हाळ्याचा विषय -
हा माझा जिव्हाळ्याचा विषय - अलिकडेच महाराष्ट्रात नैसर्गिक, पारंपारिक शेतीपद्धतींना, शेतकयांच्या पारंपारिक ज्ञानाला टिकवण्यात जे प्रयत्न झाले आहेत त्या बद्दल थोडी ओळख झाली, आणि अधिक जाणून घ्यायची खूप इच्छा आहे. खासकरून श्रीपाद दाभोळकरांच्या "प्रयोग परिवार" बद्दल, आणि मुंबईतील "अर्बन लीव्स" प्रकल्पांबद्दल वाचले, अत्यंत स्फूर्तीदायक आहे.
अवांतर
हे श्रीपाद दाभोळकर म्ह. नरेंद्र दाभोळकरांच्या नात्यातले काय? असल्यास त्यांच्या पुढच्या पिढीतले आतिश दाभोळकर, अविनाश दाभोळकर, इ. नावे घरच्यांमुळे ऐकून माहितीयेत. कोल्हापूर जिल्ह्यात गारगोटी येथे एक कृषितज्ञ दाभोळकर कैक वर्षे (१९६०-८० च्या आसपास) होते अन विविध प्रयोग करत असत ते हेच काय?
माहिष्मती साम्राज्यं अस्माकं अजेयं
तेच ते. नरेंद्र दाभोळकर
तेच ते. नरेंद्र दाभोळकर त्यांचे धाकटे भाऊ होते असं वाटतं.
आह, रैट्ट. बरोबरे. मग
आह, रैट्ट. बरोबरे.
मग त्यांच्या पत्नी वृंदा दाभोळकर, अन मुले म्ह. अविनाश, आतिश. अजून कोणी मुलगा/मुलगी असेल तर ठाऊक नाही. वडिलांचे बालपण गारगोटीत गेल्याने ही मंडळी त्यांना माहिती आहेत.
माहिष्मती साम्राज्यं अस्माकं अजेयं
कुंभारवाड्यात मातीच्या
कुंभारवाड्यात मातीच्या कुंड्या असतात का? माती, सिमेंट, प्लास्टीक कोणत्या चांगल्या?
माझ्या माहितीप्रमाणे मातीचे
माझ्या माहितीप्रमाणे मातीचे असावेत, निरनिराळ्या आकारांचे पण पाहिलेले आठवते.
प्लास्टिकच्या हलक्या असतात, पण खाली पाणी वाहायला छिद्र आहेत की नाही याची खात्री घ्यावी, आणि कडक उन्हात वितळत नाहीत याची सुद्धा. सिमेंट बद्दल काहीच अनुभव नाही. मातीच्या सर्वोत्तम, पण वजनाचा प्रश्न आहेच, काही प्रमाणात वर दिलेल्या कोकोपिथ-काँपोस्ट मिश्रणाने त्याचे वजन बाल्कनीसाठी कमी करता येते.
कुंभारवाड्यात मातीच्या कुंड्या
कुंभारवाड्यात मातीच्या कुंड्या मिळतीलंच, पण बर्याच ठिकाणी काही (मोस्ट्ली) उत्तर भारतीय लोकांची रस्त्याच्या कडेला रोपं आणि कुंड्या विकणारी दुकानं असतात. फुलझाडांच्या भरपूर व्हरायटी तिथे मिळतात, आणि मोठ्या नर्सरीजपेक्षा स्वस्त सुद्धा! माती आणि प्लॅस्टिक दोन्ही प्रकारच्या कुंड्या तिथे मिळतील. मी बर्याचदा त्यांच्याकडून रोपं आणली आहेत, सोनचाफा माझ्याकडे कुंडीत वाढतोय आणि सीझन असला की पुष्कळ फुलंही देतोय. जास्वंद, जुई, रातराणी इ फुलझाडंही आहेत.
अतिशय उत्तम आणि माहितीपूर्ण
अतिशय उत्तम आणि माहितीपूर्ण धागा, अनेक आभार!
नगरला घरी जमिनीत लावलेली फळाफुलांची पुष्कळ झाडं आहेत, पण पाण्याच्या कमतरतेमुळे बाग व्यवस्थित सांभाळली जात नाही. पुण्यात उत्साहाने सुरुवातीला फुलझाडं बरीच लावली, पण बर्याचदा दुर्लक्ष झाल्याने सुकुन गेली की वाईट वाटायचं म्हणून पुन्हा लावली नाहीत. आत्ता मात्र गॅलरीमधे थोडीच झाडं आहेत आणि लक्षही दिलं जातंय नीट. कुठलंही वेगळं खत न वापरताच मस्त फुलं वगैरे येत आहेत रोपांना म्हणून निवांत आहे. पण ऋ म्हणाला तसं हा धागा वाचून पुन्हा उत्साह येऊ लागलाय, विशेषतः घरी खत तयार करण्यासाठी.
फोटो येऊ द्यात बाय द वे,
फोटो येऊ द्यात
बाय द वे, नवीनच खत करणार्यांसाठी हा एक उपाय आहे. खरंतर हे सगळंच कमी पैशात, साधी घरगुती उपकरणं वापरून करता येतं, पण हा "स्मार्ट ऑप्शन" माझ्या एका मैत्रिणी ने निवडला, तिला खूप आवडला.
बागकाम
बागेत भेंडी, टोमॅटो, वांगी, काकडया, मिरच्या लावण्याचे प्रयोग करून झाले आहेत. घरी लिंबाचे १ झाड आणि केळी पण लावली आहेत. मुख्य म्हणजे चांगले ऊन पाहिजे आणि व्यवस्थित पाणी दिले पाहिजे. स्प्रिंकलर आठवड्यात फक्त २ दा चालतो त्यामुळे फक्त तेव्हडे पाणी पुरत नाही, पाईपने अजून द्यावे लागते. पुढच्या वर्षी ड्रीप इरिगेशन बनवायचा विचार आहे, बघुया जमते का. यंदा बागेत काही लावले नाही, पण आधीची चित्रे:
छान! टोमॅटो एरलूम वरायटी होते
छान! टोमॅटो एरलूम वरायटी होते का? अमेरिकेतल्या एरलूम प्रजातींच्या रंगांची विविधता पाहून मी चाटच पडले होते.
टोमॅटो
हो, तेच होते. ते पिकले की लालचुटुक दिसतात आणि आकार पण छान गोलसर असतो. मुख्य म्हणजे किंचित आंबटपणा पण असतो आणि इतर काही जातींसारखा पिठूळपणा जाणवला नाही. (हे माझे नाही, बायकोचे विचार आहेत. मी इतकी
चिकित्साविचार करत नाही. => हे पण तिचेच मत. )त्या संस्थळाअवर विविध
त्या संस्थळाअवर विविध प्रकारची बियाणे कोणती याबद्दल एक थोडक्यात उपयुक्त माहिती देणारा लेख मिळाला.
मात्र नव्या व्यक्तीने नक्की काय निवडावे हे त्यात स्पष्ट दिलेले नाहि. मात्र माझ्या अंदाजाने थेट ऑर्गॅनिक भाज्यांचा प्रयोग करण्यापेक्षा माझ्यासारख्या पूर्णपणे नवख्या व्यक्तीने 'ओपन पॉलिनेटेड' व 'ट्रीटेड' बिया घेऊन याव्यात का?
त्यानंतर काय करावे? कुंड्यात माती कशी व कोणती भरावी? बी किती खोलवर पेरावे, सुरवातीपासूनच कोणते खत आवश्यका आहे का? कोणते? नंतर कधी व किती खत घालावे वगैरे टप्पेवार माहिती कुठे मिळेल. त्या संस्थळावरील सर्च फिचर बरेच जुजबी आहे. पावसाळा आला आहे हे बघता शोधण्यात वेळ घालवण्यापेक्षा कोणी आयता लेख दिलात किंवा प्रतिसादात माहिती दिलीत तर उत्तम!
आगाऊ आभार!
- ऋ
-------
लव्ह अॅड लेट लव्ह!
मी देखील नवखीच आहे, त्यामुळे
मी देखील नवखीच आहे, त्यामुळे मला अलिकडेच मिळालेले ग्यान मी शेअर करते, एवढेच - हा माझा डिस्क्लेमर!
बियांची निवड थोडंफार वैयक्तिक निर्णय असावा, पण अगदीच सुरुवातीला शेजारच्या नर्सरीतून आणून लावली तर काहीच गैर नाही. बियांच्या वाटप-विक्री चे एकूण आर्थिक-सामाजिक-पर्यावरणीय संदर्भ कोणते हे जाणून घ्यावे एवढेच. पण नर्सरी तरी चांगली पाहिजे - मी इथे काकडी आणि भेंडीच्या बिया विकत आणल्या, पण सगळ्याच फुसक्या निघाल्या. काकडीला तर अस्तित्वातले सगळे किडे लागले. त्यामुळे ट्रीटेड बिया नेमक्या कुठल्या कीटकांविरुद्ध स़क्षम केल्या गेल्या आहेत वगैरे नीट विचारून घ्यावे.
नर्सरीतच "पॉटिंग सॉइल" मिळत असावे - हे खास कुंड्यांतील रोपांसाठी खत घालून केलेले मिळते. कुंड्यांना खाली एक-दोन छिद्र आहेत याची खात्री घ्यावी, आणि त्यात पॉटिंग सॉइल घालताना छिद्रावर मोडक्या कुंडीचा एक तुकडा ठेवावा, म्हणजे त्यातून माती-पाणी निसटत नाही, पण पाणी हळू-हळू वाहून जायला जागा राहते. भाज्यांसाठी कुंड्या बर्यापैकी मोठ्या घ्याव्या - सरासर पालेभाज्यांना ६-९", आणि फळभाज्यांना १०-१२" खोलीची कुंडी असली की मुळांना वाढायला जागा पुरते. बिया दीड-दोन इंच खोल पेराव्या, पाणी घालावे.
या पुढे तुम्ही नेमकी कुठली भाजी लावणार यावर तपशील बदलतील. खासकरून प्रत्येक भाजीला किती व नेमके कोणते खत, पाणि-ऊन... ही माहिती बिया घेताना नर्सरीवाले सहसा देतातच, किंवा गूगल आहेच. जालावर "कंटेनर गार्डनिंग" बद्दल बरीच माहिती आहे, आणि नेमके कसे पेरावे, पालेभाज्यांची कापाकापी, कुठल्या किड्यांपासून सावध रहावे वगैरे. खूप चांगले विडियो देखील आहेत. पण बाकी सगळ्यासारखंच अमेरिका-थंड प्रदेशाच्या बागकामाबद्दलच माहिती जास्त आहे त्यामुळे सर्व माहिती लागू होत नाही. बेष्ट म्हणजे स्थानिक नर्सरीत, किंवा एखादा बोलका जवळचा भाजीवाला/शेतकरी गाठावा आणि त्याला विचारावे. कधी कधी हा प्रयोग फसतो, कारण "द्या रासायनिक खत आणि वाढवा पिक" हेच आजकाल बहुतेक सगळे सांगतात, पण तरी मला आमच्या भाजीवाल्याने खूप मदत केली, इव्हन बिया आणून दिल्या.
उपयुक्त माहिती आभार. आता
उपयुक्त माहिती
आभार.
आता प्रयोग केला की किंवा दरम्यान अडचणी आल्या की इथे विचारेनच.
- ऋ
-------
लव्ह अॅड लेट लव्ह!
आणखिन एक - नर्सरीवाल्यांना
आणखिन एक - नर्सरीवाल्यांना जुलै महिन्यात नेमकी कुठल्या भाज्या लावाव्यात हे विचारून त्यात तीन-चार निवडा. अनेकदा बियांपासून सुरुवात करण्यापेक्षा अगदी छोट्या कुंड्यांमधे रोपटं मिळतात, ती थोडी वाढली की ती कुंडी फोडून मुळांसकट रोप मोठ्या कुंडीत लावता येतं.
दुधी, कारलं, दोडका, राजगिरा वगैरे आत्ता लावता येतील असं वाटतं.
आज सकाळी आलं, हळद, राजगिरा, मायाळू, ओवा आणि शेपू लावले. गेल्या आठवड्यात चवळी लावली, पण पेरणीला थोडा उशीर झाला वाटतं, किती शेंगा येतील ठाउक नाही.
आज पहिल्यांदाच गांडूळ खत आणि कोकोपिथ चे मिश्रण करून कुंड्यात माती ऐवजी वापरले.
आता बघू काय काय उगवतं आणि टिकतं ते!
वोक्के मिरचीचा सिझन गेला
वोक्के
मिरचीचा सिझन गेला काय? हे या विकांतला एखादा नर्सरीवाला गाठून आधी विचारतो.
पाऊस लांबलाय तर चालून जावेकाय?
- ऋ
-------
लव्ह अॅड लेट लव्ह!
सध्या फकस्त फोटू टाकतो.
आणि हा तो पुदिना. अगदी भर उन्हात तुरे वगैरे वाला.
व्यवस्थापकः इमेजच्या टॅगमधून height="" हटवले आहे
-: आमचे येथे नट्स क्रॅक करून मिळतील :-
मोगरा किती गोड दिसतोय.
मोगरा किती गोड दिसतोय.
पहिला फोटो
पहिला फोटो हळदीचा आहे का? की आले?
पहिली हळद. दुसरे आले
पहिली हळद. दुसरे आले
-: आमचे येथे नट्स क्रॅक करून मिळतील :-
बागकामाची हौस
@रोचना
तुम्ही दिलेल्या दुव्यावरील माहिती बरीच उपयुक्त दिसते आहे.
या हेतूने बागकामाकडे कधी पाहिले नव्हते. मातीत हात बुचकळायची हौस आणि त्या सुविधेची उपलब्धता हीच काय ती आमच्या हौशी बागकामाची प्रेरणा! म्हणूनच एखाद्या चांगल्याशा नर्सरीतून थेट रोपे आणायची आणि त्यांची मशागत करीत त्यांना वाढवायचे, हेच करीत आलो आहे. हां, आता मिरच्या, टोमॅटो, आळू, चिकू, पपया इ. मिळतात, तो केवळ बोनस! हेतू नव्हेच!
@अतिशहाणा आणि आडकित्ता
पुदिन्याबद्दलच्या माहितीशी सहमत. मी नुकताच लावला आहे आणि रोज वाढ पहात आहे.
काही फोटो
नुकतीच लावलेली (आणि पावसाची वाट पहात असलेली) मिरची
ओवरफ्लोच्या पाण्यावर ऑपॉप वाढणारा अळू (शेजारी वॉटर लिली)
चिकू
नैसर्गिक चमत्कार - जास्वंदीचे जुळे!
सर्व फोटो जून २०१४ चे.
व्यवस्थापकः width="" height="" हटवले आहे
चिकूचा फोटो मस्त! (@अडकित्ता
चिकूचा फोटो मस्त! (@अडकित्ता - तो पुदिना भयंकर आहे!)
बरोबर आहे तुमचं म्हणणं, "घरगुती नैसर्गिक बागकामाच्या चळवळीचा मुख्य हेतू आहे" असं म्हणायला हवं होतं. कारण शहरांमधेच छोट्या पातळीवर भाज्यांच्या बागकामाला प्रोत्साहन देऊन शहरी मंडळींना थोडे स्वावलंबी करावं, उपनगरांमधून, लांबच्या ग्रामीण भागांतून पेट्रोल खर्च करून भाजी-फळांचा पुरवठा कमी करणं, ताजं ठेवण्यासाठी ना-ना कीटनाशक-रंग लावणे टाळून भाजीपालांचा खर्च कमी आणि चव जास्त ताजी-चांगली करणं, हा शहरी शेतीच्या चळवळीचा हेतू आहे. पण सगळ्यांनीच या विशिष्ट हेतू साठी केलं पाहिजे वा करतात असे म्हणणे ठीक नाही, खरं ही नाही. चवीसाठी, मजेसाठी, आणि "मातीत हात बुचकळायच्या हौसेसाठी" केलं तरी उत्तमच! शेवटचा मुद्दा मला ही मान्य आहेच, त्यासारखी मजा नाही.
या धाग्यामुळे 'खूळ' डोक्यात
या धाग्यामुळे 'खूळ' डोक्यात शिरून बाझिल, झिनीया यांच्या बिया आणल्या. विचार न करता एका कुंडीत सगळं पाकीट रिकामं केलं. आता दोन्ही कुंड्यांमध्ये कोवळी पानंच पानं आलेली आहेत. शक्यतोवर जास्तीत जास्त रोपं जगवण्याचा बेत आहे. त्यामुळे घरात पडलेली, गेली दोन वर्ष न वापरलेली सगळी भांडीकुंडी बाल्कनीत आलेली आहेत. त्यांना ड्रीलने भोकं पाडून, छंदाफंदाच्या दुकानातून जाडसर तारा आणून टांगायच्या किंवा ते जमलं नाही तर जमिनीवर ठेवायच्या कुंड्या बनवायचा विचार आहे.
शिवाय काल हौसेने चेरी टोमॅटो आणि साधे टोमॅटो यांची रोपं आणली. गेल्या वीस तासांत त्यांनी मान टाकलेली नाही. त्यातलं आता किती जगतं आणि दोन महिन्यांनी खायला कितपत मिळतं, ते बघायचं.
अजून एखाद महिन्यात, उन्हाळा जेव्हा भयंकर होईल तोपर्यंत हे जगलं, तर तेव्हा पुन्हा एकदा खरेदीचा विचार आहे. तोपर्यंत दुकानांमध्ये उरल्यासुरल्या बागकामाच्या गोष्टी, कुंड्या, माती, स्वस्तात मिळेल असा अंदाज आहे. सांगण्यासारखं काही असेल तर याच धाग्यावर तपशील देता येतील.
---
सांगोवांगीच्या गोष्टी म्हणजे विदा नव्हे.
कौतुक आहे तुझं
पण सावलीत ठेव अन फक्त सकाळचं कोवळं ऊन दे. कारण तुमच्याकडे प्रचंड तापमान असतं.
जास्त ऊन हवं म्हटलं तरी
जास्त ऊन हवं म्हटलं तरी तेवढंच ऊन मिळेल. कारण बाल्कनी पूर्वेकडे आहे. आणि बाल्कनीसमोर मोठं झाड आहे, त्यामुळे तापमान बरंच जास्त असलं तरीही थेट ऊन तसं अधूनमधूनच येतं. त्यामुळेच ही झाडं कितपत टिकतात आणि टिकली तर कशी/किती वाढतात याबद्दल थोडी धाकधूक आहे.
आता ही रोपं आणि त्यांच्यामुळे उत्साह टिकला तर बिया पेरायला पाणी पिण्याचे कागदी पेले आणले आहेत. एका पेल्यात एकच बी टाकली की कुंडीभर एकाच प्रकारची इवले इवले कोंब असा प्रकार होणार नाही. आता काय दिवाळीच्या किल्ल्यावर हिरवाई बनवायची नाहीये!
---
सांगोवांगीच्या गोष्टी म्हणजे विदा नव्हे.
अय्या!!!
तुमच्यात पण दिवाळीला किल्ले करतात??? मला वाटले की ही खास पुणेरी पद्धत आहे म्हणून...
फारिन
फारिनला बायडिफॉल्ट सगळीकडे बर्फ वगैरे पडतो म्हणे ना?
ऊन पडणारे फारिन असूच कसे शकते?
--मनोबा
.
संगति जयाच्या खेळलो मी सदाहि | हाकेस तो आता ओ देत नाही
.
memories....often the marks people leave are scars
बॅजिल कुठल्या प्रजातीचा
बॅजिल कुठल्या प्रजातीचा आणलायस माहित नाही, पण उंच, लांब काडीसारखा वाढत असला तर दोन-तीन पानांचे लेवल सोडून नवीन पानांखाली फांदी कापली, तर नवीन फांद्या फुटत जातात, आणि जास्त पानं होतात. पेस्तो साठी पानं साठवायला फांद्या अशाच कापत राहा, फुलं होऊ देऊ नकोस. फुलं-बिया आली की सहसा पानांची चव थोडी कडवट होऊ लागते. सीझन संपता संपता पानं पुरेशी झाली की मग फुलू द्यायचा आणि बिया ठेवायच्या. पण पुढच्या सीझनला बिया कशा उगवतील हे या बिया कुठल्या प्रजातीच्या आहेत यावर अवलंबून आहे (हायब्रिड असल्या तर पहिला जेनरेशन तुफान वाढतं, पण सेकंड जेनरेशन फारच कमकुवत असतं).
मातीत हात.
हा धागा कोणीतरी सुरू करेल याची वाटच पहात होते. इतरांनी उल्लेख केलेले जवळजवळ सर्व प्रकल्प केलेले आहेत आणि जवळजवळ सर्व प्रकल्पांना माफक यश आणि अपयशही आलेले आहे, विशेषतः ओल्या कचर्याच्या प्रयोगाला. सध्या जिथे रहाते तिथे आठ महिने हिवाळा असतो त्यामुळे त्यात हा प्रयोग अयशस्वी होण्याचीच शक्यता जास्त, पण मग कम्युनिटी गार्डनचे जे इतर सदस्य आहेत ते हिवाळ्यातही प्रकल्प चालू ठेवतात असे कळले. त्यांच्याकडून समजलेल्या माहितीप्रमाणे ओल्या सुक्याचे योग्य मिश्रण, कचरा सारखा हलविणे, गांडूळे घालणे वगैरेमुळे सध्या उन्हाळ्यात तरी झपाट्याने माती बनतेय आणि मोकळ्या हवेत असल्याने वासही येत नाहीय.
बागेत यावर्षी सर्व प्रकारचे हर्ब्ज (रोजमेरी, टॅरगॉन, थाईम, चाईव्ह़, ओरेगानो, चित्रविचित्र नावांचे आणि प्रकारांचे पुदिने) लावले आहेत. एका जुडीला दोन-तीन डॉलर मोजायची गरज नाही आणि हवी तेवढीच पाने खुडता येतात. त्याशिवाय बीट, गाजरे, केल, सॅलड, बटरनट स्क्वॉश, भोपळा, बटाटे, काकड्या इत्यादी भाज्या लावल्या आहेत ज्या उगवून आल्या आहेत. थंडी सुरू व्हायच्या आधी जमीनीत लसूण घालणार आहे. नवर्याला,नेहमीप्रमाणे वार्षिक 'टोमॅटोची' लागण झाल्याने त्याने डझनभर एअर्लूम प्रजातींची रोपे बीयांपासून तयार केली आहेत. महिनाभर "अजून त्यांना बाहेर काढायला नको..आज रात्री थंडी पडणार आहे" वगैरे झाल्यावर रोपे अखेर घराबाहेर आली आहेत (मुलगी मोठी झाली की काय होणार याची रंगीत तालीम आणि इथे पुन्हा थंडी पडायला लागण्याआधी काही टोमॅटो तरी पिकतील अशी आशा करायला जागा आहे.
पालेभाज्यांपैकी मेथीला मागल्या वर्षी भरपूर यश आल्याने यावर्षीही लावणार आहे शिवाय सोरेल (आंबट चुका) आणि मोहरीही लावली आहे.
ज्या वनस्पती दर वर्षी उगवून येतात त्यावर याववेळेस भर आहे. र्हुबार्ब जमीनीत गेला आहे, टॅरेगॉन अजून कुंडीत आहे पण नंतर जमीनीत लावेन, वेगवेगळ्या बेरीजची रोपे लावणार आहे. असो. सध्या इतकेच, फोटो नंतर.
मुलगी मोठी झाली की काय होणार
ठ्ठो!
बाकी प्रतिसाद चकीत होऊन वाचत आहे. इतके सगळे जर मी स्वकष्टाने उगवले तर कोणी विचारल्यास स्वतःचा व्यवसाय 'शेतकरी' म्हणून सांगू लागेन बहुदा!
स ला म! __/\__
- ऋ
-------
लव्ह अॅड लेट लव्ह!
मी वाटच बघत होते तुझी!! फोटो
मी वाटच बघत होते तुझी!! फोटो पाहण्यास उत्सुक. पोस्ट वाचताना गंमत वाटली, की आपला कॅलेंडर एकदम उलट आहे. इथे ८ महिने उन्हाळा (दमट उकाडा) असल्याने, तू जे आत्ता लावलंयस ते सगळं मला सप्टेंबर ते फेब्रुअरी, आणि उन्हाला सुरू व्हायच्या आत उरकायला लागेल. मला माझ्या बहिणीने कुठून तरी टॅरगॉन, लेमन बाम, गार्लिक चाइव्स, थाइम आणि रोजमेरीच्या भारी हायब्रिड बिया आणून दिल्यात. या हिवाळ्यात प्रथम लावून पाहणार आहे. फेनल देखील आहे, कॅलिफोर्नियात असताना खूप वापर व्हायचा, पण इथे चांगला मिळत नाही. छान उगवला तर काही प्रिय पाककृतींना पुनर्भेट द्यायची इच्छा आहे.
हाहा!
पाऊस इथे चांगलाच लागलाय. शुक्रवारी लावलेले राजगिरा, माठ वगैरे डोकवायला लागले आहेत, कॅमेराची मेली कॉर्ड सापडली की फोटो लावीन.
ऋषिकेश, हे पहा, आत्ताच फेसबुक
ऋषिकेश, हे पहा, आत्ताच फेसबुक वर कोणीतरी टाकले:
व्यवस्थापकः कृपया width="" height="" हे ट्याग्ज टाळावे
धन्यवाद.
धन्यवाद.
धन्यवाद.
प्रकाटाआ
अॅग्रीकल्चर कॉलेज (अजून माहिती)
पुण्यात शिवाजीनगर स्टेशनजवळ अॅग्रीकल्चर कॉलेज आहे, तिथेसुद्धा काही माहिती मिळू शकेल ना. कदाचित ते पण काही क्लास वगैरे आयोजित करत असतील. कुणी चौकशी केली आहे का तिथे?
हाफिसातून दिसत नाहिये हे काल
हाफिसातून दिसत नाहिये हे काल लक्षात आले होते. काल घरून बघायला विसरलो. आज संध्याकाळी बघतोआभार.
यावेळी जमणे कठीण आहे. पण पुढिल कार्यक्रमावर लक्ष ठेवेन.
- ऋ
-------
लव्ह अॅड लेट लव्ह!
आवडीचा विषय. 'गीक गार्डनर'
आवडीचा विषय. 'गीक गार्डनर' असे शोधल्यास एक ब्लॉग मिळेल. बरीच माहिती आहे त्यावर. इथे दिलाही असेल हा दुवा कोणीतरी (प्रतिसाद वाचून व्हायचे आहेत).
गेल्या वर्षी 'अर्बन लीव्हज' यांच्या पुण्यातील एका गेट टुगेदरला जाणे झाले होते...बरीच उत्साही मंडळी भेटली होती. नंतर संपर्क नाही पण उत्साह टिकून आहे आणि प्रयोग चालू आहेत.
काही फोटो
कडीपत्ता, चालकुम्डो (याला मराठीत काय म्हणतात माहित नाही, दुधीचाच एक प्रकार), भोपळा-लिंबू-चवळी-चमेली, चाया (एक प्रकारची पालेभाजी), आलं, आलं-राजगिरा-खताची कुंडी, शेपू, पुइंशाक (मलबार स्पिनेच), कर्दळी, बॅजिल, जास्वंद.
सुंदर आहेत तुम्ही लावलेली
सुंदर आहेत तुम्ही लावलेली झाडे.
थँक्स!
थँक्स!
माझं भाजीकाम
गंगाफळ :
कारलं :
नुकतंच रुजलेलं दोडकं :
अन ही मिरची :
सगळे फोटो आजचेच.
-: आमचे येथे नट्स क्रॅक करून मिळतील :-
छान आहेत रोपे. गंगाफळ म्हणजे
छान आहेत रोपे. गंगाफळ म्हणजे काय?
बाग
बागेचे फोटो.
नावे - ब्रह्मकमळ, वेली-मोगरा, तुळस, आळु, अनंत, जास्वंद, गुलाब, गुलाब, ऑर्किड, सोनटक्का, गवती चहा, कोरफड, सोनचाफा, लिलि.
या कोलाजमुळे खरंच बागेत
या कोलाजमुळे खरंच बागेत आल्यासारखा फील येतोय.
- ऋ
-------
लव्ह अॅड लेट लव्ह!
पुस्तक
श्यामसुंदर पुरोहित नामक कोण्या एका लेखकाचे किचन गार्डन नामक एक माहितीपर पुस्तक गुगल बुक्स वर सापडले, हिंदीत आहे पण माहिती बर्यापैकी आहे असे मत आहे.
बियांपासून सुरूवात करताना..
This comment has been moved here.
खांब-शेती
This comment has been moved here.