Skip to main content

मनातले छोटे मोठे विचार आणि प्रश्न - भाग ८

Part | | | | | |

ही धागामालिका आपल्या मनात येणारे, नेहमी नेहमी डोकावणारे विचार मांडण्यासाठी आहे. कधी कधी आशय फार मोठा नसतो. फार खोल विचार केलेला नसतो. तो विचार/ कल्पना/ प्रश्न/ गंमत डोक्यात येते, जाते. कधी कधी आपण विसरतो, कधी कधी ती ती पुन्हा पुन्हा येत असल्याने आपण विसरू शकत नाही.

यापूर्वीच्या धाग्यावरचे प्रतिसाद १०० च्या वर गेले आहेत म्हणून हा पुढचा धागा.
===========

अवांतर शंका.
मतदान कधी करावं ?
सकाळी ७ ला मी तसाही जागाच असतो.
मला स्वतःला सकाळी ७ ला करणं सोयीचं वाटतं; दिवसभरात मग तुम्ही हापिसला टैम देउ शकता एकसलग;
निघायची घाई रहात नाही.
तुम्ही लोक काय करता ?

मन Wed, 02/04/2014 - 16:29

In reply to by अजो१२३

खाजगी कंपन्या सुरु असतात.
तोंडदेखलं जाहीर करतात "२ तास कामातून सुटी मिळेल मतदानाच्या दिवशी"असं.
मागील निवडणूकांपासून पहातोय.

अतिशहाणा Wed, 02/04/2014 - 19:09

In reply to by मन

माझ्या यापूर्वीच्या २ 'खाजगी' कंपन्यांनी आजपर्यंत झालेल्या (महापालिकेसकट विधानसभा व लोकसभा) निवडणुकांना पूर्णवेळ सुटी देऊन नंतर एखादा शनिवार कामाचा करुन वाया गेलेला दिवस भरुन काढला होता असे आठवते. माझ्या माहितीनुसार खाजगी कंपन्यांना सुटी देणे आवश्यक आहे. जिल्हाधिकाऱ्यांमार्फत असे आवाहन केले जाते व ते कंपन्यांना बंधनकारक असते.

मी Wed, 02/04/2014 - 19:39

In reply to by मन

Declaration of holiday on polling days

2. The day of poll, if it does not fall on a Sunday or other holiday, will be generally declared as a holiday for all Government offices and public sector undertakings within the constituency. All private, commercial and industrial establishments and factories within the constituency will also be asked by the appropriate authorities of the State Government to observe the day of poll as a closed holiday in lieu of the usual weekly holidays or at least to grant leave of absence for sufficient period to enable workers to cast their votes.

सलील Wed, 02/04/2014 - 16:41

मुळात मतदानाच्या दिवशी सुटी कशाला हवी असा मला प्रश्न पडतो. बाहेरील देशात असले लाड नसतात. उलट कंपनीचा सिएओच थोडा वेळ बाहेर जावून मतदान करा असा इमेल पाठवतो. आपल्याकडे सुटीचा उपयोग लोक मजा मारण्यासाठीच जास्त करतात त्यामुळे हे बंदच करावे.

अजो१२३ Wed, 02/04/2014 - 17:35

In reply to by सलील

मतदानाच्या दिवशी अधिकृत सुट्टी नाही दिली तर ५-१०% तरी मतदारयादीतले लोक मतदान करतील का/ करू शकतील का याविषयी शंका आहे.

भारतातल्या गरीब लोकांची राहायची जागा ते मतदान केंद्र ते कामाची जागा असा प्रकार केला तरी सगळे मतदान सकाळ नि संध्याकाळ याच वेळात करावे लागेल. त्यात जर कुटुंबीयांना सोबत घेऊन जाणे, परत सोडणे प्रकार असेल तर अजून अवघड. वृद्ध असतील तर अजूनच. केंद्र केच्या कै दूर असले तर धन्यच. राहता दिल्लीत, मतदान गुरगाव (आणि वेगवेगळ्या तारखांना) असेल तर अजूनच मजा. केंद्र कुठे आहे ती जागा नेहमीच बदलते, तो पत्ता शोधण्याची, तिथे कोणता पब्लिक ट्रान्स्पोर्ट आहे ते पाहण्याची मजा वेगळीच.

बॉस खडूस नसेल, ७ वाजता मोठी रांग नसेल, केंद्र घराजवळ असेल वा कामाच्या जागेजवळ असेल, कामाला उशिरा गेलेले चालत असेल वा लवकर परत आलेले चालत असेल, चटकन जाऊन यायला बुडाखाली गाडी असेल, तर मात्र सुट्टी हा लाड आहे.

मन Wed, 02/04/2014 - 17:40

In reply to by अजो१२३

बुडाखाली बाइक आहे.
पोट भरायला जॉब आहे.
मतदारयादीत नाव आहे.
तीन्हींचा मेळ माझा बसतो आहे.
बाकी "सुटी" हा प्रकार संघटित कामगारांअन आणि कार्यालयीन कर्मचार्‍यांना लागू व्हावा.
हे फार थोदे आहेत; त्यातही मतदान करण्यास उत्सुक असलेले अजूनच कमी.
फार फार मोटह वर्ग असंघटित कामांत आहे व नॉन - ऑफिस सदृश बाबींत दिवसाचा वेळ घालवतो.
(कॉलेज युवक + गृहिणी + self employed लोक + मोलकरीण वगैरे कश्टकरी + दुकानदार व त्याच्याकडे काम करणारे)

सलील Wed, 02/04/2014 - 17:57

In reply to by अजो१२३

तसेही किती संघटीत लोक मतदान करतात? उद्देश चांगला आहे पण वृत्तीत खोट आहे त्यामुळे सुटी देणे बंद करून उलट उशिरा किंवा लवकर कंपनी सोडली तरी चालण्या सारखे आहे

नितिन थत्ते Wed, 02/04/2014 - 17:59

In reply to by अजो१२३

>>राहता दिल्लीत, मतदान गुरगाव (आणि वेगवेगळ्या तारखांना)

मला आजवर मतदान करायला २०० ते ३००मीटरहून जास्त अंतर जावे लागलेले नाही. (अर्थात परमनंट घरे असलेल्यांनाच हे शक्य असेल).

ऋषिकेश Wed, 02/04/2014 - 16:47

मी यावर्षी आदल्या दिवशी मुंबईला जाणार आहे (तेथील मतदार यादीत नाव आहे)
सकाळी ७ला मतदान करून तेथूनच थेट हाफिसात!

मन Wed, 02/04/2014 - 17:33

ह्यावेळच्या मुक्तपीठाची टिंगल टवाळी करावी, खिल्ली उडवावी असे वाटले नाही.

काकूंनी खरोखर सेन्सिबल , छोटेखानी मनोगत लिहिलय.
त्यातला साधेपणा व सरळपणा आवडला.
मुक्तीपीठात काही चेष्टणीय मजकूर आला की लोक हिरीरीने जालमिडियावर वाभाडे काढतात.
तसेच जर काही व्यवस्थित आले; तर तेही सांगावे असे वाटते.
मुक्तपीठाच्या ह्या भागास चांगले म्हटल्याने कुणाच्या ब्याडबुकात किंवा मतिमंदयादीत माझा समावेश केला
जाणार असेल तर खुशाल करु देत.
.
इथे डकवतो आहे.
.
.
*********************मुक्तपीठ सुरु**********************
...मी माणसात आले (मुक्तपीठ)
वय 73. घरातून फारसा आधार नाही. पती व कन्येच्या निधनाच्या आघातातून सावरायचं कसं, असा प्रश्‍न होता; पण मनाचा हिय्या करून सहा महिन्यांसाठी अमेरिकेला जायला निघाले.
- प्रमिला गाडगीळ

आयुष्यामध्ये प्रत्येकाची काही स्वप्नं असतात, तशीच माझीही काही स्वप्नं होती. ती पूर्ण झाल्यावर तो दिवस प्रत्येकासाठीच अविस्मरणीय ठरतो. माझ्यासाठी तो दिवस म्हणजे 8 फेब्रुवारी 2007 - अमेरिका भेट. खरं तर अमेरिकेला काही नोकरी किंवा शिक्षणाच्या निमित्तानं जातात. काही लग्न झाल्यावर जातात. पण माझं कारण वेगळं होतं. माझे पती 2002 मध्ये एकाएकी आजारी पडले. अर्धांगवायू झाला. 3 वर्षे अंथरुणाला खिळून होते. प्रयत्नांची पराकाष्ठा केली, पाण्यासारखा पैसा खर्च झाला; पण परमेश्‍वराची इच्छा!! डिसेंबर 2005 मध्ये त्यांना देवाज्ञा झाली. त्यापूर्वी एक वर्ष माझी मुलगी अपघातात आम्हा सर्वांना सोडून गेली. हे दोन्ही मानसिक धक्के न पचणारे होते. त्या दुःखातून लांब जाण्याचा मार्ग शोधत होते. जगणं नकोसं झालं होतं.

एक दिवस नातेवाईकांनी मला विचारलं, अमेरिकेमध्ये मराठी कुटुंब आहे. त्यांना बेबी सिटरची गरज आहे, तर तुम्ही जाल का? परमेश्‍वर माझ्या पाठीशी आहे, असं समजून मी क्षणाचाही विलंब न लावता, "हो जाईन' असं कळवलं. सातासमुद्रापलीकडं गेल्यावर तरी या सगळ्या गोष्टींचा विसर पडेल, असा विचार केला. कोणतीही अडचण न येता व्हिसा मिळाला. 7 फेब्रुवारी 2007 रोजी मी वॉशिंग्टनला गोगटे या सुविद्य कुटुंबाकडं जायला निघाले. जावई अनिल देवधर यांनी मला मुंबई विमानतळावर सोडलं. वय 73. पहिल्यांदाच परदेशवारी आणि तीसुद्धा सहा महिन्यांसाठी. मनात भीती होती. ते कुटुंब कसं असेल? आपल्याला काम जमेल का? इंग्रजीची अडचण तर येणार नाही ना? पण माझा रामराया बरोबर होता. त्यानंच मला अमेरिकेला जाण्याची प्रेरणा दिली होती. 8 फेब्रुवारी 2007 रोजी वॉशिंग्टनला पोहोचले. सौ. किरण गोगटे मला घेण्यासाठी आल्या होत्या. हवेत खूप गारवा होता. किरकोळ हिमवृष्टीनं काही ठिकाणी बर्फ साठला होता. घरी पोहोचले. मला गोगटे कुटुंबातील तिघांनीही वाकून नमस्कार केला. घर दाखवलं. मोठमोठ्या 14 खोल्या होत्या. नंतर माझ्या बेडरूममध्ये बॅगा ठेवल्या. बाहेर गारठा होता, तरी हिटरमुळं घरात काहीच थंडी जाणवत नव्हती.

अमेरिका जगातील सर्वांत श्रीमंत आणि प्रगल्भ देश आहे. सर्व सुखसोयींनी परिपूर्ण आहे. पण तिथं असणाऱ्या गृहिणींना मात्र सर्व कामं स्वतःच करावी लागतात. कारण नोकरवर्ग मिळण्याचं प्रमाण फारच कमी. मला तिथं एक वेळ स्वयंपाक करण्याचं काम होतं. कपडे आणि भांड्यांसाठी मशिनच होतं. मी केलेला स्वयंपाक त्यांना खूपच आवडत असे. माझा जरा कोकणस्थी गोडसर स्वयंपाक असे. माझ्या लक्षात आलं, की या लोकांना पार्टीबद्दल फारच अप्रूप. कारण त्यांच्या घरी सारख्याच काही ना काही कारणानं पार्टी असायची. मग त्या पार्टीची तयार करण्याची सर्व जबाबदारी माझ्यावरच. मग नवीन कपडे घालून गेस्ट आले की त्यांना "हॅलो' म्हणून बळंच हसण्याचं कामही माझ्याकडेच होतं. एकूणच मला खूप मजा येत होती.

मार्चमध्ये थंडी कमी झाली. मग त्यांच्याबरोबर मी शनिवार, रविवार फिरायला जाऊ लागले. प्रत्येकाच्याच घराबाहेर बाग आणि सुंदर फुलं असतात. ते पाहिल्यावर मन एकदम प्रसन्न होऊन जातं. मी न्यूयॉर्क आणि न्यूजर्सी बघितलं. तिथं मी जॉन टाउन युनिव्हर्सिटी आणि वॉशिंग्टन युनिव्हर्सिटी पाहिली. व्हाइट हाउस पाहिलं. न्यूजर्सी सिटीमधून न्यूयॉर्कपर्यंत रेल्वेनं गेलो. सर्वच भव्यदिव्य होतं. खेळण्यांची आणि पुस्तकांची मोठमोठी दुकानं पाहिली. न्यूयॉर्क आणि न्यूजर्सीला जोडणारी रेल्वे पाण्याखालून जाते. हा बोगदा 80 वर्षांपूर्वीचा आहे, हे समजल्यावर मी थक्कच झाले. गोगटे कुटुंबासमवेत वेळ छान जात होता. दुसरीकडे आले आहे याची जाणीवसुद्धा त्यांनी मला कधी होऊ दिली नाही. सौ. किरण व डॉ. गोगटे यांचा मुलगा साहिल तेव्हा 10 वर्षांचा होता. खूप लाघवी होता. ते त्यांच्याबरोबर रोज मला जेवायला बसवायचे आणि आम्ही मोकळेपणानं एकमेकांशी गप्पा मारायचो.

एक नक्की, की आपण प्रयत्न केला आणि आपल्या रोजच्या वातावरणामध्ये थोडा बदल घडवून आणला, तर आपण नकारात्मक विचारांपासून नक्कीच लांब जातो आणि दुःखाचा थोड्या काळासाठी का होईना आपल्याला विसर पडतो. माझ्या बाबतीत डॉ. गोगटे यांच्या कुटुंबामुळंच हे शक्‍य झालं. माझं मानसिक आणि शारीरिक संतुलन एकदम पूर्ववत झालं. ज्ञानेश्‍वरी वाचनानं माझ्यामध्ये दुःख पचविण्याची ताकद निर्माण झाली. अमेरिका बघण्याचं अशक्‍य स्वप्न माझ्या विहीणबाई देवधर आजींमुळं शक्‍य झालं. मी माणसात आले, मला जगण्यात आनंद वाटू लागला.

*******************************मुक्तपीठ समाप्त*************************

आदूबाळ Wed, 02/04/2014 - 17:49

In reply to by मन

भावनेने ओथंबून वगैरे न जाता -

१० वर्षांच्या बेब्याला ७३ वर्षांच्या आज्जी सिटर?? मग देवयानी खोब्रागडेंचं काय चुकलं?

मन Wed, 02/04/2014 - 18:48

In reply to by आदूबाळ

हीच शंका माझ्याही डोक्यात आली; पण टायपिंगमध्ये गडबड झाली असावी अशी स्वतःची समजूत घालून घेतली; इतका बाकीचा लेख बरा वाटला. किम्वा मुलगा स्पेशल चाइल्ड असू शकेल; त्याला त्याची जरुरी असेल.
आणि नाव घेउन असे ते जाहीर पेप्रात सांगणे काकूंना उचित वाटले नसेल; असा तर्क अक्रुन पाहिला.

३_१४ विक्षिप्त अदिती Wed, 02/04/2014 - 18:54

In reply to by मन

(बहुदा) १२ वर्षांपर्यंतच्या मुलांना घरात एकटं सोडता येत नाही, घरात कोणीतरी वयस्क व्यक्ती असाव्या लागतात. त्यामुळे १० वर्षांचा मुलगा (किंवा मुलगीही) कितीही हुशार, चंट, चटपटीत असले तरीही कायद्यानुसार त्यांना घरात एकटं सोडता येणार नाही.

आजींचं कौतुक वाटलं. खास मुक्तपीठी शैली (माझ्यावर किती दुःख कोसळलं किंवा आम्ही अमेरिका पाहून आलो याची जाहिरात) वगळून लिहीलेलं आहे. नव्या माणसाच्या नजरेतून त्याच गोष्टी पुन्हा पाहताना रंजक वाटतात, तसं काही लेखात नाही म्हणून मुक्तपीठापलिकडे (किंवा संस्थळांपलिकडे) असं लेखन पोहोचणार नाही.

अजो१२३ Wed, 02/04/2014 - 18:07

In reply to by मन

मुक्तपीठ काय प्रकार आहे? तू खिल्ली उडवतोस म्हणजे नक्कीच काहीतरी सज्जनपणाचा प्रकार असावा?

जाता जाता-
मनोबा, मी मतदान करत नाही. अगदी "कोणीही नाही" हे ऑप्शन देखिल नाही. पण भारतात जर कोण्या पक्षाने "भौतिक स्वच्छता प्लॅन" आपल्या जाहिरनाम्यात घातला आणि जीडीपीचे १०% त्यावर वाहतो म्हणाला तर त्या शिवाजीसाठी मी बाजीप्रभू बनायला तयार आहे. स्वतःचे मत आणि इतर किमान १००-२०० मते मोठ्या कष्टाने त्याला मिळवून देईन. मला विकास नको, सर्वधर्मसमभाव वा ममधर्मप्रभाव नको, नोकरी नको, भ्रष्टाचार प्रचंड बोकाळला तरी चालेल, आपण युद्धात हरलो तरी चालेल, भूकेने अर्धे लोक मेले तरी चालेल, हलकेफुलके प्रदूषण चालेल (ज्याला घाण म्हणता येणार नाही असे), गरीबी चालेल, अगदी देश तुटला तरी चालेल, संस्कृती बुडली तरी चालेल पण त्या घाणीचं बघा राव. म्हंजे इतकी घाण (म्हणजे फक्त अक्षरक्षः घाणीबद्दलच बोलतोय) बघितली कि लोकांना हा देश आपला आहे हे सांगायची प्रचंड लाज वाटते. माझा एक अंदाज आहे कि बाहेर गेलेले कितीतरी* लोक ते देश केवळ स्वच्छ आहेत या एकाच निकषावर तिथे राहत असावेत. म्हणजे निकष जास्त असतील पण परत यायचा विचार करताना "इतक्या घाणीत?" असा पहिला विचार येत असावा. भारतात राहायला माझ्याकडे फार मोठं समर्थन आहे पण इथली घाण पाहिली कि त्याची मार्जिन फार थिन होऊन जाते.

मला संपूर्ण खात्री आहे कि या बाइंची तिथली स्वच्छता पाहूनच अर्धी उदासिनता गेली असणार.

* कितीतरी म्हणजे जास्तीत जास्त असेच होते असे नाही.

सलील Wed, 02/04/2014 - 18:38

In reply to by अजो१२३

तुम्ही फारच योग्य लिहिले आहे. यूके मध्ये जे मला दिसले त्यात दोन गोष्टी प्रकर्षाने जाणवल्या एक म्हणजे सरकारने प्रचंड काम आणि सोयी उपलब्ध करून दिल्या आहेत. प्रत्येक घरात वा इमारतीत २ तरी मोठे डम्पिंग बोक्षेस आहेत. एक साधा तर एक रेसाय्क्लेबल गोष्टींसाठी. दर ठराविक दिवसांनी मुन्सिपाल्टी येवून घेवून जाते. इथे मोठा फरक जाणवला आमच्या पुण्याच्या घराजवळ एक कचराकुंडी होती. लोकांनी त्याच्या बाजूला मोठी इमारत बांधली आणि कचऱ्याचा त्रास होतो म्हणून १० वर्ष खटपट करून ती काढली आता कधी १० दिवसांनी कचरा न्यायला गाडी येते ती पण त्याच्या मर्जी वर लांब कुठेतरी उभी राहणार मग सगळे पळापळ करणार. काय म्हणजे डोकी का खोकी कळत नाही. कुठलीही गोष्ट लोकांना सोयीची करावी असे आपल्याकडे फारसे कोणाला वाटत नाही. नुसते सरकार नाही तर सर्वसाधारण सुशिक्षित लोकांना करायला आवडत नाही. साधा ओला कचरा वेगळा करा असे सांगून फार फरक पडत नाही. खूप कमी लोकच अजूनही करताना दिसतात.

स्वरा Wed, 02/04/2014 - 19:45

In reply to by अजो१२३

आय कन्फेस...पहिल्यांदा मला तुम्ही लिहिलेलं पुर्ण पटलं. आणि तिथेच राहणारा माणसाला पण (तुम्ही भारतातच आहात, हे गृहीत धरलय्) हे तितक्याच तिव्रतेने जाणवतय हे तर आश्चर्याचच वाटलं. माझा अनुभव खुप वेगळा आहे हो. मी कधी चुकूनही या विषयावर तोंड उघडलं तर कस;

१. तुम्ही बाहेर गेलेलेच लोक ईथे परत येउन घाण करता.
२. रस्त्यावर शिस्त पाळत नाही, थुंकता, कचरा तुम्हिच टाकता.
३. तिकडे बर टाईट करुन ठेवलय तुम्हाला .
४. तिकडे ते लोक पाळत असतिल मनापासुन शिस्त पण तुम्हि तिकडे घाबरुनच शिस्त पाळता कि नाही. कारण दंड होईल ना भरभक्कम. (आईशप्पथ्थ...हे एक आर्ग्युमेंट मला कधिच कळत नाहि. )

ईतकं आणि बरच काहि ऐकायला मिळालय. असं वाटतं कि बाहेरच राहुया बाबा, कश्याला ईथे येउन ईथल्या शिस्तबद्ध जिवनात प्रॉब्लेम करायचा. :(

स्वरा Wed, 02/04/2014 - 19:53

In reply to by स्वरा

अर्थात भारतात असताना कचर्‍याच , घाणीच काहि वाटत नव्हत आणि तिकडे गेल्यावरच साक्षात्कार झाला असहि नाहिये. माझ्या आठवणीत मी कधिच रस्त्यांवर थुंकलेले किंवा कचरा टाकलेला नाहिये.

बॅटमॅन Wed, 02/04/2014 - 19:53

In reply to by स्वरा

भारतात राहणारे भारतीय तसेही भिकारचोटच असतात असे मानू. (नै म्हंजे...असतातच हो!)

पण आत्ताचे (बाहेर जन्मलेले नव्हेत, फर्स्ट जण्रेषण मायग्रंट्स) अनिवासी भारतीय हे बाहेर जाण्यागोदरही शिस्तीचे पुतळे होते काय? वैयक्तिकरीत्या कदाचित वरील आक्षेप खोटे असतीलही, पण कलेक्टिव्हलि ते कितपत चूक आहे किंवा कसे याबद्दल विदा पहावयास आवडेल.

स्वरा Wed, 02/04/2014 - 19:56

In reply to by बॅटमॅन

माझ्यापुरती साम्गु शकते हो. माझे तिकडेच असलेले कुटुंबियही डोंबिबलीतहि असे वागत नाहियेत. मुद्दा हा आहे कि तिकडे राहणारेच लोक परत येउन घाण करतात हे भारतात ईन जनरल असणार्‍या घाणिचे समर्थन होउ शकेल का?

बॅटमॅन Wed, 02/04/2014 - 20:05

In reply to by स्वरा

मुद्दा हा आहे कि तिकडे राहणारेच लोक परत येउन घाण करतात हे भारतात ईन जनरल असणार्‍या घाणिचे समर्थन होउ शकेल का?

आजिबातच नै.

मी Wed, 02/04/2014 - 20:04

In reply to by स्वरा

१. क्लिन हॉउस इज वेस्टड एफर्ट च्या धर्तीवर - क्लीन कंट्री इज जायगॅन्टीक वेस्ट ऑफ एफर्ट
२. गिव्हन अ चॉइस एव्हरी पर्सन विल ब्रेक रुल्स अ‍ॅन्ड अ‍ॅक्ट कन्व्हेनिअंटली, अतीशय स्वच्छ अशा युरोपिअन शहरात स्वच्छता कामगारांनी संप पुकारला आणि शहराचे वाटोळे व्हायला तेवढे पुरेसे होते.
३. मनुष्यप्राणी आणि सुविधा ह्यांचे प्रमाण जेवढे व्यस्त तेवढी स्वच्छता कमी.

स्वरा Wed, 02/04/2014 - 20:17

In reply to by मी

>>२. गिव्हन अ चॉइस एव्हरी पर्सन विल ब्रेक रुल्स अ‍ॅन्ड अ‍ॅक्ट कन्व्हेनिअंटली, >>

कॅनडा मधे याच्या उलट अनुभव आला. कमी लोकसंख्या आणि एवढ्या मोठ्या देशाच्या क्षेत्रफळाच्या मानानी नगण्य वर्कफोर्स. आठवड्यातुन एकदाच कचर्‍याची घंटागाडी येते, पण काय बिशाद आहे एकहि कपटा रस्त्यावर दिसेल..! जॅस्परहुन लेक लुईसला जाताना एकदा आमचा गाईड रस्त्यावरुन सरसर खाली उतरुन एका घळित गेला आणि परत सरसर वर चढुन आला तेंव्हा त्याच्या हातात एक बिअर चा पिळलेला कॅन होता. म्हणाला,"ईथला निसर्ग स्वछ ठेवणे हे आम्ही आपलेच कर्तव्य समजतो. सरकार तरि कुठे कुठे पाहिल ना..? हे आता मी रिसायकल बिन मधे टाकिन."

भिकारचोट लोक..स्वता कचरा करतच नाहित आणि दुसरा करु पाहतोय तर त्यालाहि तितकी मज्जा मिळु देत नाहित...

मी Wed, 02/04/2014 - 20:44

In reply to by स्वरा

कॅनडा मधे याच्या उलट अनुभव आला. कमी लोकसंख्या आणि एवढ्या मोठ्या देशाच्या क्षेत्रफळाच्या मानानी नगण्य वर्कफोर्स. >>

नक्की? इथल्या माहितीप्रमाणे हॅमिल्टन शहराचे कचरा व्यवस्थापन बजेट १४.४ मिलिअन डॉलर्स(८४ करोड रुपये?) एवढे आहे, लोकसंख्या 519,949 एवढी आहे, पुण्याची लोकसंख्या 6,049,968 एवढी आहे, पुण्याचे कचरा व्यवस्थापन बजेट आहे ५० करोड रुपये.

काय म्हणता?

>>जॅस्परहुन लेक लुईसला जाताना एकदा आमचा गाईड रस्त्यावरुन सरसर खाली उतरुन एका घळित गेला आणि परत सरसर वर चढुन आला तेंव्हा त्याच्या हातात एक बिअर चा पिळलेला कॅन होता.

कॅन भारतीयाने तिथे टाकला असावा काय?

स्वरा Wed, 02/04/2014 - 21:16

In reply to by मी

बजेट चा संबध नसावा बहुतेक. काम करु शकणारे मनुष्यबळ अत्यंत कमी आहे. ते बजेट त्यांनी जास्तितजास्त पायाभुत सुविधा पुरवण्यासाठी वापरले असावे, जे सहज्च कळत होत. उदा. स्पष्ट कलरकोड असलेले जनरल वेस्ट, पेपर, कॅन ई. विभागणार्‍या, आणि अक्शरशः पावलोपावली असणार्‍या कचरापेट्या, ईफेक्टिव कचरा व्यवस्थापन ई.ई. आम्ही गेलो होतो त्या भागात ग्रीझली अस्वलांचा संचार असतो. तीथे पण त्या अस्वलांना उघडता येउ नयेत अश्या कल्पक कचरापेट्या होत्या.

>>>कॅन भारतीयाने तिथे टाकला असावा काय?>>> टाकलाही असावा, काही कल्पना नाहि ब्वॉ. आणि भारतियाने टाकला नसेल याची पण खात्री नाही... ;;) ;;)

मी Wed, 02/04/2014 - 22:14

In reply to by स्वरा

ते बजेट त्यांनी जास्तितजास्त पायाभुत सुविधा पुरवण्यासाठी वापरले असावे, जे सहज्च कळत होत. उदा. स्पष्ट कलरकोड असलेले जनरल वेस्ट, पेपर, कॅन ई. विभागणार्‍या, आणि अक्शरशः पावलोपावली असणार्‍या कचरापेट्या, ईफेक्टिव कचरा व्यवस्थापन ई.ई.

हेच भारतात होत नाही(इतक्यात शक्य नाही) हे सुचवायचे होते.

>>>कॅन भारतीयाने तिथे टाकला असावा काय?>>> टाकलाही असावा, काही कल्पना नाहि ब्वॉ. आणि भारतियाने टाकला नसेल याची पण खात्री नाही... (सरोज खरे) (सरोज खरे)

म्हणजे टाकला असल्यास इथले तिथे जाऊनही घाण करतात म्हणायचे ;)

स्वरा Wed, 02/04/2014 - 23:16

In reply to by मी

तिथे जाउन राहणारे नंतर सुधारतही असतिल कदाचित, नव्हे सुधारतातच. पण पर्यटक म्हणुन जाणारे कधी कधी त्या स्वच्छतेवरुन सुडबुद्धीनेही वागताना पाहिलेत (सरसकटिकरण नाहिये...). सिंगापुर ला भेटलेले एक विद्वान म्हणत होते की मला एकदा तरि ईथे थुंकून पाहायचेय, पकडुन दाखवाच म्हणा, आपले चॅलेंज!!

तुम्हाला बाकी सगळ कळतय पण ईतक वाचुन मि कॅनडा, सिंगापुर ई ई गेलेय याची जाहिरात दिसत नाहिये का?...

बॅटमॅन Thu, 03/04/2014 - 12:21

In reply to by स्वरा

तुम्हाला बाकी सगळ कळतय पण ईतक वाचुन मि कॅनडा, सिंगापुर ई ई गेलेय याची जाहिरात दिसत नाहिये का?...

अहो इथली निम्म्याहून अधिक जन्ता बाहेर राहणारी. अन भारतात राहणार्‍यांपैकीही कैकांनी बाहेरच्या वार्‍या केल्यात. त्यांना ते सांगलीकोल्लापूरच वाटणार नै तर काय ;)

अजो१२३ Thu, 03/04/2014 - 12:33

In reply to by बॅटमॅन

शिवाय भारताबाहेर राहणारे भारतीय लोक किंवा असे परदेशवार्‍या करणारे लोक, आपल्यापेक्षा श्रेष्ठ असतात, कोणत्याही विषयावर - मग तो भारताबद्दलचा असो वा आंतरराष्ट्रीय असो - त्यांचे असलेले मत आपल्यापेक्षा जास्त योग्य असते, असा एक मूर्खपणाचा न्यूनगंड भारतात राहणार्‍या आणि परदेशवार्‍या न करणार्‍या लोकांत पाहायला मिळतो.

आणि मराठी आंतरजालाचे तर विचारूच नका. मी लातूर जिल्ह्यात १८ वर्षे काढली असताना देखिल लोक त्याच्याबद्दल बोलताना मी काय म्हणतो ते न ऐकता तिथे कधीच न गेलेला एन आर आय काय म्हणतो ते पाहतात. म्हणजे असे होताना मी एका संस्थळावर माझ्याच बाबतीत पाहिले आहे. विचार करा, मी जर स्पॅनिश/पोर्तुगीज कुटुंबांबद्दल एक मत मांडले तर काय हंगामा होईल.

स्वरा Thu, 03/04/2014 - 15:24

In reply to by अजो१२३

>>>> "असा एक मूर्खपणाचा न्यूनगंड भारतात राहणार्‍या आणि परदेशवार्‍या न करणार्‍या लोकांत पाहायला मिळतो." >>>>

प्रत्येक आर्ग्युमेंट्ची जशी माझी बाजु, तुमची बाजु आणि सत्य असं असत, तत्त्वतच ही तुमची बाजु आहे. माझी बाजु अशी कि ज्याक्षणी तुम्ही भारताबाहेर पाउल टाकता, तुमचा भारताच्या कसल्याही बाबतित बोलायचा अधिकार संपतो. विचारा झक्कीकाकांना!! काय ऐकवल जात माहितिये..? "एवढी खाज असेल तर या ना परत आणि दाखवा सुधरुन भारत." च्या मायला त्यांच्या...अरे अर्ध आयुष्य भारतात गेलय आमच, हे हि सोयिस्कररीत्या विसरता! आणि नो ओफेन्स, पण अशी भोचक, काड्यासारु माणस मराठिच जास्त असतात दुर्दैवाने..!!

ताडफाड लिहावसं वाटतं पण त्या सरसकटिकरण प्रकर्णामुळे मूड जातो. गम्मत काय आहे कि तुम्ही (तुम्ही नाय हो...) बोललात कि ते नेमक आणि मुद्देसुद आणि आम्ही बोललो (म्हणजे मी नाय हो...भावनाओंको समझो यार!) कि ते थलथकतिकलन!!

मी Thu, 03/04/2014 - 12:44

In reply to by स्वरा

>>तुम्हाला बाकी सगळ कळतय पण ईतक वाचुन मि कॅनडा, सिंगापुर ई ई गेलेय याची जाहिरात दिसत नाहिये का?...

मज्जाए ब्वा तुमची!! चक्क कॅनडा आणि सिंगापुर वगैरे!! अबबब!! :)

ऋषिकेश Thu, 03/04/2014 - 17:32

In reply to by स्वरा

जॅस्परहुन लेक लुईसला जाताना एकदा आमचा गाईड रस्त्यावरुन सरसर खाली उतरुन एका घळित गेला आणि परत सरसर वर चढुन आला तेंव्हा त्याच्या हातात एक बिअर चा पिळलेला कॅन होता.

आम्हाला तर इथे "मी शेंगा खाल्ल्या नाहित, मी टरफले उचलणार नाही" हे म्हणणे बाणेदारपणा असतो व "चांगला" गुण असतो असे शिकवण्यात येते ;)

अनामिक Thu, 03/04/2014 - 17:39

In reply to by ऋषिकेश

शिवाय ह्या गुणामुळे आपण खाल्लेल्या शेंगांची टरफले दुसर्‍याच्या नावावर खपवून कुल पॉईंट्स मिळवता येतात!

३_१४ विक्षिप्त अदिती Wed, 02/04/2014 - 21:43

In reply to by स्वरा

पाश्चात्य देशातले लोक शिस्तबद्धच असतात, त्यांना शाळेतूनच असं शिकवलं जातं हे मलाही वाटत असे. जे काही प्रमाणात खरंसुद्धा आहे. ब्रिटनमधे असताना सहा-आठ वर्षांचा मुलगा साठीच्या पाव्हण्याला "इकडेतिकडे कचरा टाकू नकोस" अशी तंबी देतो, असा प्रसंगही पाहिलेला आहे. पण नंतर मी टेक्सासात आले. इथले लोक काय आगाऊ असतात असं विमानतळावरून घरी जाताना पहिलं मत झालं. कारण रस्त्यावर, जागोजागी दिसणारी ही पाटी -

मग कधीतरी या पाटीच्या मागचा इतिहास विकीपीडीयावर वाचला. हा क्षीण विनोद करण्याचं कारण होतं, लोक रस्त्यावर कचरा टाकायचे. त्यांना २००० डॉलर्सपर्यंत दंड होण्याचा बडगा दिसल्यावर, चार वर्षांत, रस्त्यावरचा कचरा ७२% कमी झाला. अजूनही रस्ते तसे स्वच्छ असतात, पण कचरा दिसतच नाही असं नाही. शिवाय चौकात गाडी उभी केली की थुंकणारे लोकही इथे पाहिले आहेत. सध्या हवा बरी आहे, फार गरम नाही, फार थंड नाही, काचा उघडण्याची सोय आहे तर हे प्रकार जास्त असावेत असा माझा अंदाज. थंडी, उन्हाळ्यात काय करतात कोण जाणे. रस्त्याच्या कडेला गवत आहे म्हणून तिथे बसावं किंवा लोळावं, किंवा तिथे चालावं अशीही सोय नाही. कधी 'केक कापला' जाईल हे समजत नाही. (काही वेळा बूट 'भरल्या'मुळे अनुभवाचे बोल.) मोजक्या लोकांनी कुत्र्यांमागून साफ केलं नाही की पुरतं. किंवा बहुतेक लोकांनी एखाद दिवसच कंटाळा केला तरीही पुरतं.

ही सगळी घाण भारतापेक्षा कमी असते हे मान्यच. पण लोकांना कितपत दोष देणार आणि तो कोणी द्यायचा? पाश्चात्य देशात जागोजागी कचराकुंड्या असतात, त्या वेळोवेळी स्वच्छ केल्या जातात. ग्रँड कॅन्यन किंवा यलोस्टोन पार्कसारख्या जंगलांंमधेही प्रसाधनगृहांची सोय चांगली असते. भारतात?

आणि दुसरं "आपली" सगळा कचरा पाण्यात लोटून देण्याची परंपरा, धर्म, संस्कृती किंवा काही. ठाणे-डोंबिवली प्रवास करताना, मुंब्र्याच्या खाडीत निर्माल्य लोटून दिलेलं, ते ही प्लास्टीकच्या पिशवीत, किती वेळा पाहिलेलं आहे. मुंब्र्यात घाण लोटल्याचा मला व्यक्तिगत त्रास काहीही झालेला नाही, (झाला असेल तर समजलं नाही). पण या धर्म, संस्कृती, परंपरांनी डोकी नासवल्येत आणि त्यातून कचरा पाण्यात लोटून देण्याची लोकांना सवय लागली आहे आणि ती घाण माझ्या डोळ्यांना तापदायक वाटते त्याचं काय?

मी Wed, 02/04/2014 - 22:16

In reply to by ३_१४ विक्षिप्त अदिती

आणि दुसरं "आपली" सगळा कचरा पाण्यात लोटून देण्याची परंपरा, धर्म, संस्कृती किंवा काही. ठाणे-डोंबिवली प्रवास करताना, मुंब्र्याच्या खाडीत निर्माल्य लोटून दिलेलं, ते ही प्लास्टीकच्या पिशवीत, किती वेळा पाहिलेलं आहे. मुंब्र्यात घाण लोटल्याचा मला व्यक्तिगत त्रास काहीही झालेला नाही, (झाला असेल तर समजलं नाही). पण या धर्म, संस्कृती, परंपरांनी डोकी नासवल्येत आणि त्यातून कचरा पाण्यात लोटून देण्याची लोकांना सवय लागली आहे आणि ती घाण माझ्या डोळ्यांना तापदायक वाटते त्याचं काय?

हेच कॅनडा किंवा काही पाश्चात्य देश त्यांचा कचरा इतर देशात किंवा पॅसेफिक समुद्रात टाकतात, त्यांचा धर्म भांडवलशाहीचा असतो पण ते तापदायक आहे ह्याशी सहमत आहे.

३_१४ विक्षिप्त अदिती Wed, 02/04/2014 - 23:26

In reply to by मी

हेच कॅनडा किंवा काही पाश्चात्य देश त्यांचा कचरा इतर देशात किंवा पॅसेफिक समुद्रात टाकतात, त्यांचा धर्म भांडवलशाहीचा असतो पण ते तापदायक आहे ह्याशी सहमत आहे.

मान्य आहे. हे असं बदलायला पाहिजे म्हटल्यावर "आमच्या धार्मिक (सामाजिक, वैज्ञानिक इ.) भावना दुखावतात म्हणून तुम्ही असं काही बोलायचंच नाही" असं उत्तर येणार नाही तोपर्यंत सुधारणेची शक्यता असते.

कान्होजी पार्थसारथी Thu, 03/04/2014 - 00:32

In reply to by ३_१४ विक्षिप्त अदिती

आत्ताच गंगा ही बीबीसी माहितीपट पाहत असता, पाण्यात निर्माल्य, अस्थी, मढी फेकणार्‍यांचा संताप येऊन चरफड झाली.
अलीकडे कुठ्ल्याही सोम्यागोम्या देवळाचे ऑईलपेंटी जीर्णोद्धार करून जत्रा भरवणार्‍यांचे तरुण, 'मंडळी' फॅड वाढत चालले आहे. त्यात बोळाला, वस्तीला किंवा जवळच्या गावाला महाप्रसाद घालण्याचे महामूर्ख प्रकारसुद्धा असतात. पूर्वी छान वासाच्या पळसाच्या, वाळलेल्या पानांचे द्रोण आणि पत्रावळ्या युज अँड थ्रो म्हणून वापरल्या जायच्या. त्या पत्रावळी सहजी बायोडिग्रेडेबल होत्याच पण त्यांत, पानांच्या फटीतून, पत्रावळीच्या काठावरून निसटून जाणार्‍या पातळ आमटीला, मटारीचे दाणे घातलेल्या, दालचिनी आणि तमालपत्रे या दोघांच्या स्वतंत्र स्पष्ट वासांच्या मसाले-भातात प्रत्येक घासासरशी शिताफीने ढकलत जेवणे हा एक अनुभव असायचा. आता त्या पत्रावळी हद्दपार झाल्या आहेत आणि त्यांच्या जागी स्वस्त पातळ प्लॅस्टीकच्या, आणि कुठल्यातरी उत्पादनाच्या वेष्ट्नासाठी वापरले न गेलेले कारखान्यातले वेस्ट कागदी पुठ्ठे किंवा प्लॅस्टीक यांच्या अजब मिश्रणाच्या पत्रावळ्या आल्या आहेत. ह्या पत्रावळी महाप्रसाद किंवा समारंभाची जेवणे अशात वापरली जातात म्हणून ती आपोआप निर्माल्य ठरतात. गेले नदीच्या पाण्यात नाहीतरी विहिरीत. च्यायला ह्या समारंभांच्या.

धनंजय Thu, 03/04/2014 - 00:50

In reply to by ३_१४ विक्षिप्त अदिती

पूर्ण प्रक्रिया शुद्धीकरण केलेले सांडपाणी नदीत सोडले, तर त्याचा प्रवाह नदीच्या प्रवाहाच्या १/३०पेक्षा कमी असले पाहिजे असे काहीतरी वैद्यकीय पाठ्यपुस्तकात वाचल्याचे अंधुकसे आठवते. हा अर्थातच नैसर्गिक कायदा नाही, पण ढोबळ धोरण.

अर्थात नद्यांमध्ये काही थोड्या प्रमाणात विरलन (डायल्यूशन), प्रतलापाशी ऑक्सिजन आणि अतिनील प्रकाशकिरणांनी विघटन/शुद्धीकरण वगैरे प्रक्रिया होऊ शकते. म्हणून काही थोड्या प्रमाणात प्रक्रिया न-केलेले सांडपाणीसुद्धा नदीत खपून जाते - उदाहरणार्थ नदीकाठी/प्रवाहात वन्य जनावरांनी केलेले मलमूत्रविसर्जन, पाण्यात थोड्या प्रमाणात मृत्यू पावलेले, मग सडलेले मासे आणि किडे, वगैरे. परंतु या विना-प्रक्रिया सांडपाण्याचे प्रमाण १/३० पेक्षा खूप म्हणजे खूपच कमी असावे लागेल, असे वाटते.

गंगा नदीचा प्रवाह ~१४४ बिलियन लिटर इतका आहे (विकी दुवा) तर त्यात दररोज सांडपाणी २.९ बिलियन लीटर सोडले जाते. (प्रवाहाच्या ~२%) यापैकी १.१ बिलियन लिटर प्रक्रिया केलेले असते. उर्वरित बिगर-प्रक्रिया केलेले.

ही बाब गंगेसारख्या महाप्रवाही नदीबाबत. मुंब्र्याची खाडी, आणि मुळा, मुठा नद्यांच्या बाबतीत सांडपाण्याची प्रवाहातली टक्केवारी खूपच अधिक असेलसे वाटते.

अजो१२३ Thu, 03/04/2014 - 12:01

In reply to by धनंजय

धनंजय, मला वाटते आपला प्रतिसाद थोडा ऑफ-टॉपिक झाला आहे. एकूण चर्चा प्रदूषणाबद्दल नसून सार्वजनिक घाणीबद्दल आहे. म्हणजे लोक गंगा घाण करतात हे दुर्लक्षित केले तरी किमान ते शहर स्वच्छ दिसावे अशी अपेक्षा होते. पटण्याला गंगा प्रदूषित झालेली चालेल, कारण लोक प्रत्येक गोष्ट नदीत फेकतात, ही वेगळी चर्चा आहे. इथे पटण्यात गंगा घाण तर आहेच पण पटणा शहरही भयंकर घाण आहे. समजा पटणाकरांना घाण करायला, सगळं काही डंप करायला गंगा दिली (जे ते एरवीही करतात.) तर त्यांनी किमान शहर तरी स्वच्छ ठेवावं. नदीही घाण, शहरही घाण हा काय प्रकार आहे?

अजो१२३ Thu, 03/04/2014 - 11:22

In reply to by स्वरा

परदेशी राहणार्‍या लोकांना टोकण्याचं लॉजिक मला कळत नाही.

१. तुम्ही बाहेर गेलेलेच लोक ईथे परत येउन घाण करता.
२. रस्त्यावर शिस्त पाळत नाही, थुंकता, कचरा तुम्हिच टाकता.

असं कोणी म्हणलं नसेल. एखादा मूर्खच असे म्हणू शकेल. भारतात घाण करणारांत एन आर आय इ लोकांचा जवळजवळ शून्य हिस्सा असावा. मुंबईत नेरूळच्या एन आर आय काँप्लेक्स मधे हे विधान, तिथे कोणी घाण केली तर, कदाचित उचित ठरेल.

३. तिकडे बर टाईट करुन ठेवलय तुम्हाला .
४. तिकडे ते लोक पाळत असतिल मनापासुन शिस्त पण तुम्हि तिकडे घाबरुनच शिस्त पाळता कि नाही. कारण दंड होईल ना भरभक्कम. (आईशप्पथ्थ...हे एक आर्ग्युमेंट मला कधिच कळत नाहि. )

या विषयाशी मला देणंघेणं नाही. म्हणजे एन आर आय लोक देशाबाहेर स्वच्छता स्वेच्छ्हेने पाळतात कि घाबरून या विषयाशी. पण तरीही साधारणपणे लोकांना शिस्त पहिल्यांदा कठीण गेली तरी नंतर सवय होते. दुसर्‍या पिढीला तर काहीच त्रास होत नसावा.
भारतातही लोक दंडाच्या भितीने शिस्त पाळतात - सैन्यात, कंपनीत, इ. त्याला घाबरणे म्हणणे अनुचित आहे. अशा दंडांच्या आवश्यक्यतांचे महत्त्व लक्षात आल्यावर जास्त्तीत जास्त लोकांना त्यांबद्दल सन्मान वाटू लागतो.

माझ्या प्रतिसादात मी एन आर आय लोकांचा उल्लेख इतक्याकरताच केला कि परत आलेले एन आर आय मोठमोठे व्यवसाय टाकतात, राजकारण/ समाजकारण करतात, कुटुंबकारण करतात, पण स्वच्छताकारण हे ध्येय कोनाचे दिसले. गुरगावच्या कॉलनीतून तिथल्या तिथे जुन्या दिल्लीत (तितक्याही जुन्या नाही, माझ्या कॉलनीच्या १-२ किमीत भारताचे सगळे टॉप बाबू राहतात. हा परिसर काही चांदनी चौक नाही.) शिफ्ट झाल्यावर मला जो फरक तीव्रतेने जाणवतो तो भारतात परत आलेल्या एन आर आय लोकांना आणि पर्यटन वा कामानिमित्त नेहमी भारताबाहेर जाणार्‍या लोकांना दिसू नये का? स्वच्छता हा भारतात इलेक्शनचा मुद्दा नाही. बरं, किती स्वच्छ असावं यासाठी बाहेरचे देशच बघायची गरज नाही. घाण म्हणजे घाण. ती नसावी इतकी साधी गोष्ट लोकांना कळत नाही. भारताच्या आरोग्य मंत्रालयाच्या लिफ्टमधे थूंकलेले असावे, तिच्यात लघवीचा वास यावा? तो ही तीव्र! अरे काही मर्यादा आहे का?

मला तरी घाबरून किंवा अन्यथा परदेशात शिस्त पाळणारांचे कौतूक आहे. भारतात लोकशाही आहे. इथल्या लोकांना घाण करायला आवडते. म्हणून सरकार ही त्यांना दंड करत नाही. स्वच्छता पाळणारे आणि हवीशी वाटणारे इथे मायनॉरीटी आहेत. म्हणून हा देश घाणच राहणार.

परदेशात दर डोई कचरा भारतापेक्षा प्रचंड जास्त आहे. अर्थातच तिथे यावर फार खर्च होत असणार. पण या मुळे आरोग्यावरचा खर्च नक्कीच कमी होत असणार. The poor productivity of an average Indian can be attributed to absence of hygiene. म्हणून घाण निस्तरण्याचा आर्थिक फायदा खचितच होत असावा.

स्वरा Thu, 03/04/2014 - 15:01

In reply to by अजो१२३

"परदेशी राहणार्‍या लोकांना टोकण्याचं लॉजिक मला कळत नाही"... एक्झॅक्ट्ली, त्यात खर म्हणजे कळण्यासाठी काही लॉजिकच नाहिये.

" ती काही त्यांची स्वयंस्फूर्त शिस्त नसते." हे वाक्य एका संस्थळावरच ऐकवल गेलय मला. त्यावर मी हे उत्तर देउन सारवासारव करण्याचा केविलवाणा प्रयत्न केला होता. (नयी थी मय..)

"हे थोड जनरलय्झेशन होतय का? ज्याप्रमाणे परदेशात शीस्त पाळायला पोषक वातावरण असत, तितक पोषक वातावरण आपल्याकडे स्वयंशीस्त पाळायलाही नसत हे मान्य. पण म्हणुन लोकांमधे स्वयंशीस्त नसतेच आणि ती तिकडे जाऊनच येते असं म्हणण योग्य आहे का?"

बाकि, बाहेर शिस्त पाळतात आणि ईथे येउन परत तसेच वागतात असेहि होते तिथे, पण आता शोधुनहि सापडत नाहिये. बोलणार्‍याविषयी नो ग्रज... पण असं स्विपिंग स्टेटमेंट केलं जातं कधी कधी..

मी Wed, 02/04/2014 - 18:30

In reply to by मन

प्रमिला गाडगीळांचे कौतुक आहे, एरवी त्यांच्या वयाच्या इतर स्त्रिया असले धाडस करु शकल्या असत्या ह्याबद्दल साशंक आहे.

अजो१२३ Thu, 03/04/2014 - 14:49

असा कोणते मराठी/हिंदी शब्द आहेत का ज्यांचे स्पेलिंग आणि उच्चार वेगवेगळे आहेत? म्हणजे लिहायचं एक आणि वाचायचं एक असे शब्द!

मला जर कोणी "षाशी ऋॠ त्वत्त्व" आणि "शाषि ॠऋ त्त्वत्व" हे (लिखितमधे न दाखवता) वाचून दाखवले, तर मी कदाचित चूक/उलटे लिहिन. पण हे सोडले तर अजून काही आहे का जे (सामान्य)लोक चूक उच्चारतात वा ऐकलेले व्यवस्थित लिहू शकत नाहीत.

सुनील Thu, 03/04/2014 - 14:54

In reply to by अजो१२३

असा कोणते मराठी/हिंदी शब्द आहेत का ज्यांचे स्पेलिंग आणि उच्चार वेगवेगळे आहेत? म्हणजे लिहायचं एक आणि वाचायचं एक असे शब्द!

लिहिताना भटजी असे लिहितात परंतु म्हणताना सर्रास भडजी असाच उच्चार केला जातो!

अजो१२३ Thu, 03/04/2014 - 15:05

In reply to by सुनील

एकदम चपलख उदाहरण. एकतर मी हे कधी नोटीस केलं नाही. वर मी आता consciously भटजी म्हणू पाहतोय तर फारच हळू उच्चार केल्याखेरीज ते जमत नाही.

मेघना भुस्कुटे Thu, 03/04/2014 - 15:09

In reply to by अजो१२३

रविवार - रयवार
शनिवार - शनवार
गुरुवार - गुरवार
सुरुवात - सुरवात

या लिखाणापेक्षा वेगळा उच्चार ऐकू येण्याच्या भानगडीला 'श्रुती' असं म्हणतात.

अजो१२३ Thu, 03/04/2014 - 15:23

In reply to by मेघना भुस्कुटे

रविवार, शनिवार मी तरी नीट उच्चारतो. रविवारला रव्वार असे कधी कधी म्हणतो. गुरुवार आणि सुरुवात फिट उदाहरणे वाटली. मी सरळ गुर्वारी, सुर्वातीला असे म्हणतो.

हे सगळं पाहिलं तर मराठीतही आपण स्पेलिंगे लक्षात ठेवली आहेत ( जे इंग्रजांना कंपल्सरी करावे लागते) असे म्हणता येईल का? आता हे व्यक्तिगणिक (कोणाला कोणता उच्चार सोपा वाटतो) बदलतं असं आहे का? शिवाय असे कोणते लहानसेच शब्द आहेत का कि ते बोलताना बोलायची गती कमी करावी लागते नाहीतर दुसरेच काही बोलले जाणार.

सर्व शब्दांना बोली भाषेत ऑफिशियल असा एक उच्चार आहे (जो सर्वाना माहित आहे) आणि लिहिताना एक स्पेलिंग आहे असा संकेत मराठीत आहे कि ही केवळ बोलण्याच्या गतीची गंमत आहे यावर कंफ्यूज्ड आहे.

मेघना भुस्कुटे Thu, 03/04/2014 - 15:56

In reply to by अजो१२३

>>शिवाय असे कोणते लहानसेच शब्द आहेत का कि ते बोलताना बोलायची गती कमी करावी लागते नाहीतर दुसरेच काही बोलले जाणार.

भावना (भाव्ना), याचना (याच्ना), रचना (रच्ना), मेघना (मेघ्ना), सुलभा (सुल्भा), इडली (इड्ली), सामग्री (सामुग्री)

गती कमी करावी लागते का ते माहीत नाही. पण कंसातला चुकीचा उच्चार होऊ नये, म्हणून काळजी मात्र घ्यावी लागते.

अजो१२३ Thu, 03/04/2014 - 16:03

In reply to by मेघना भुस्कुटे

जबर्‍या निरीक्षण आहे.

यावरून आठवले-
खेड्यातले लोक जेव्हा शहरातल्या लोकांना त्यांच्या बोलण्याच्या शैलीवरून (त्यांच्या पाठीमागे) चिडवतात तेव्हा असे स्लो उच्चार करतात.

बॅटमॅन Thu, 03/04/2014 - 16:07

In reply to by मेघना भुस्कुटे

याचना, रचना, इ. शब्दांत मधला 'अ'कार दरवेळेस उच्चारला जातोच असे नाही. बर्‍याचदा तो गाळला जातो. हे संस्कृतोद्भव जवळपास सर्वच भाषांचे वैशिष्ट्य असावे. स्पेलिंग मात्र संस्कृतचे ठेवले म्हणून असा घोळ झाला इतकेच. हा शब्द-मध्य अ-कार काळजीपूर्वक उच्चारणारे लोक लैच कमी. माझ्या वैयक्तिक उच्चारातही हा अ-कार कैकदा गाळूनच टाकतो. (साउंड्स ओह-सो-पुणेरी यू सी ;) )

अवांतरः दक्षिण महाराष्ट्रात 'माझे' ह्या शब्दातला झ देखील कैकदा "झूम बराबर झूम" मधल्या झ सारखा उच्चारला जातो. त्यांचे या शब्दातला च देखील चहावाला च कैकदा उच्चारला जातो. कोकणस्थांचे वैशिष्ट्य हे की च़-ज़-झ़ हे त्यांच्या बोलीत जास्त दिसतात. हैट म्ह. इंग्रजी शिकवताना कैकजण "आय ज़े के" असे शिकवतात. मराठी माध्यमातील कैकांचा उच्चार असा असतो, माझाही अलीकडंपर्यंत अस्साच होता, नंतर बदलला. (कन्फेशन पूर्ण-पूर्णं नव्हे.)

अजो१२३ Thu, 03/04/2014 - 16:39

In reply to by बॅटमॅन

दोन च आणो दोन ज आहेत हे मला माहित होते. दोन झ आहेत याची कल्पना नव्हती. पण 'माझे' आणि 'झूम बराबर' म्हणताना मी बरोबर वेगळे उच्चारतो. मला दोन झ आहेत हे माहित नसताना त्यांचे वेगवेगळे उच्चार मी बरोबर करत होतो तर!

बॅटमॅन Thu, 03/04/2014 - 16:43

In reply to by अजो१२३

अर्थातच. च, ज व झ यांचे २ उच्चार मराठीत आहेत. क्वचितप्रसंगी छ चेही २ उच्चार बघावयास मिळतात, उदा. इच्छा हा शब्द. गावाकडे म्हणा किंवा जुन्या काळचा उच्चार म्हणा, छ चा दुसरा उच्चारही घडतो-पण तो अन्य वर्णांच्या तुलनेत फार क्वचित प्रसंगी असतो. तिबेटी भाषेत मात्र हा वर्ण रेग्युलरली वापरला जातो.

http://en.wikipedia.org/wiki/Standard_Tibetan#Consonants

तिथे alveolar या कॉलममध्ये tsh हा वर्ण आहे तोच हा दुसरा छ आहे.

नितिन थत्ते Thu, 03/04/2014 - 16:55

In reply to by बॅटमॅन

>>गावाकडे म्हणा किंवा जुन्या काळचा उच्चार म्हणा, छ चा दुसरा उच्चारही घडतो

अनेक स्त्रिया वल्सला चा उच्चार वत्छला असा करतात. (हा छत्रीतला छ नाही..... चरख्यातल्या च ला h लावलेला उच्चार आहे).

बॅटमॅन Thu, 03/04/2014 - 16:56

In reply to by नितिन थत्ते

उच्चार तुम्ही बरोबर पकडलेला आहे. फक्त वत्सलाचा तसा उच्चार ऐकण्यात कधी आलेला नै.

अनामिक Thu, 03/04/2014 - 17:03

In reply to by बॅटमॅन

नसेल आला, पण असुही शकते. आमच्याकडे एका चुलत आत्त्याचं - अनुसया अक्काचं नाव अंशीअक्का झालेलं आहे.

बॅटमॅन Thu, 03/04/2014 - 17:32

In reply to by अनामिक

अच्छा. असू शकते जरूर, फक्त मी ऐकला नै इतकेच.

बाकी 'अनुसया' हेही खास मराठी रूप. मूळ संस्कृत रूप 'अनसूया' असे आहे.

मन Thu, 03/04/2014 - 14:58

In reply to by अजो१२३

लोक "बैल" लिहितात पण "बइल" असा उच्चार करतात.
"वैशाली" लिहितात पण "वॅशाली" किंवा "वेशाली" असा उच्चार करतात.
लोक "पहिला" असे लिहितात पण म्हणताना "पैला" असा उच्चार करतात.

नितिन थत्ते Thu, 03/04/2014 - 16:50

In reply to by मन

उत्तर भारतात ऐ चा उच्चार अ‍ॅ आणि औ चा उच्चार ऑ करतात. आ बॅल मुझ्हे मार, मेरा नाम गॉरी हॅ.

म्हणून बँक लिहिण्यासाठी बैंक असं लिहिल जातं.

आदूबाळ Thu, 03/04/2014 - 16:05

In reply to by अजो१२३

"धायरी फाटा" या लोकोत्तर ठिकाणी टमटम मधून प्रवासाचं भाग्य तुम्हाला लाभलं असतं तर तुम्ही असं विचारलं नसतं.

(स्थळः स्वारगेट)
टमटमवाला: चला पाठा पाठा पाठा
आपणः आनन्नगर?
टमटमवाला: तींड्रुप्पये
(आपण कोंबून बसतो)

बॅटमॅन Thu, 03/04/2014 - 16:09

In reply to by आदूबाळ

किंवा स्वारगेटला रिक्षावाले "टेशन् टेशन्, टेशनेका टेशन्?" असे विचारतात. झालंच तर "मंडय् , शिवाय्नगर," इ.इ. ही ऐकू येते.

अनामिक Thu, 03/04/2014 - 17:00

In reply to by बॅटमॅन

काहींच्या इंग्रजीच्या अज्ञानामुळे तर काहीवेळा अपभ्रंशामुळे असे होऊ शकते. पण पुण्यात "काय करत आहेस" "कुठे जात आहेस" ऐवजी पेठेतल्या हुच्च्भ्रू लोकांना "काय करतीयेस", "कुठे जातीयेस" असं बोलताना बघितलं आहे. ह्याच लोकांना टिव्हीवरच्या संचालकाचं, किंवा संकेतस्थळावरचं अशुद्ध मराठी हे जेवणात खाताना येणार्‍या खड्यासारखं वाटतं (कोणाला हे थलथकतीकलन वाटत असेल तर वाटू देत!)

स्वरा Thu, 03/04/2014 - 17:06

In reply to by अनामिक

अय्या..मी पण असच बोलते, पण मी स.पेठेतली दुरदुरून पण नाहिये. मी पुण्याचीच नाहिये. "काय करत आहेस" "कुठे जात आहेस" असं अमरावतीच्या लोकांना बोलताना ऐकलय. पण ते लोक सुद्धा 'आहेस' असं पुर्ण नाही म्हणत, 'मी काय म्हणत आहे..' असं म्हणतात.

नितिन थत्ते Thu, 03/04/2014 - 17:07

In reply to by अनामिक

हो
"तुला सांगितलनी होतं ना" असं म्हणणार्‍यांना "रत्नांग्री"करांनापण दुसर्‍यांचं अशुद्ध मराठी खुपतं.

मेघना भुस्कुटे Thu, 03/04/2014 - 17:21

In reply to by नितिन थत्ते

उदाहरण देताना चूक झालीय!

बरोबर वापरः
परवा बर्व्यांनी आमच्या ह्यांना साफ सांगितलनीत, जमणार नाही म्हणून!
तिनेन तिच्या घोवाला सांगितलंन, जमणार नाही..

बॅटमॅन Thu, 03/04/2014 - 17:35

In reply to by अनामिक

पेठेतल्या हुच्च्भ्रू लोकांना

सोडा हो. टीचभर पुण्यातल्या मूठभर लोकांचं इतकं कशाला मनाला लावून घेता ते?
पेठेतले हुच्चभ्रू लोक स्वतःला काहीही समजोत, पण त्यांचं भूत बाकी लोकांनीच जास्त वाढवून ठेवलंय असं मला वाटतं.

अनामिक Thu, 03/04/2014 - 17:42

In reply to by बॅटमॅन

कधीच सोडलंय. सुरूवातीला एक न्युनगंडात्मक भावना मनात यायची, पण खांद्यावर बसवलं की कानात मुततंय की काय अशी शंका यायला लागल्यापासून फिक्कर नॉट!

बॅटमॅन Thu, 03/04/2014 - 15:59

In reply to by अनामिक

सिंव्हं मधला व्ह वरचा अनुस्वार हा पुणेरी ब्राह्मणी बोलीतच पाहिला आहे, अन्यत्र नाही. शेवटचा अनुस्वार न आणता म्ह. व्ह न लांबवताही पूर्ण जोडाक्षर उच्चारता येते-नव्हे, "Pune-mozhi-nadu" पल्याडचे कैक लोक तसेच उच्चारतात.

स्वरा Thu, 03/04/2014 - 15:53

भारतिय-अभारतिय मरुदेत...काल सिरिया मधल्या कत्लेआम् चा एक व्हिडो पाहिला. डोकं आउट झालय कम्प्लिट. आतापर्यंत बातम्या रोजच वाचत होते,'सिरिया मधे ५ ठार, ईराक्मधे १० ठार, नक्षल्यांच्या हल्ल्यात १७ ठार..ई.ई.' पण कालच्या त्या व्हिडिओ नी जब्याचा दगड्च तोंडावर बसल्यासारखा वाटला..

पुढचे आपापल्या जबाबदारीवर वाचावे;

हे असे ६-७ जण हात बांधुन गुडघ्यांवर बसवलेत रांगेत. त्यांच्यामागे हि गर्दी आणि प्रत्येकाच्या हातात पिस्तुल. कोणितरी एक दोघं तारस्वरात किंचाळुन काहितरि सांगतायेत, पण ते बसवलेले ईन्क्रेडिबली शांत आहेत. बहुतेक त्यांना त्यांच भविष्य कळुन चुकलय. अचानक 'फाट' आणि रांगेतला आपल्याच बाजुकडुन पहिला कोसळतो. शॉक...तरिही बावचळलेल्या विकृत कुतुहलानी मी बघत बसते. 'फाट'.. दुसरा कोसळतो. 'फाट'...तिसरा कोसळत नाही, त्याचं डोक स्लो मोशननी खाली जात..वाचला बहुतेक, पण हे कसले थेंब गळतायेत? परत 'फाट' आणि त्या थेंबाचा नळ झालाय आता. तो अलगद बाजुच्यावर कोसळतो..परत 'फाट', 'फाट', फाट', 'फाट' आणि उरलेलि सगळि रांग अल्लाद स्किटल्स सारखी कोसळते. आणि वेड्यासारखी फाट फाट ची बरसात. धुळ एवढी उडते कि तिमधे ते सगळे देहच अदृष्य होतात. तरिहि मेलेल्यांना मारणं चालुच राहातं.

हा सगळा कत्लेआम करताना एकही गोळी समोरुन झाडली जात नाहि, सगळ्या मागूनच. का??

डोक्याचा भुगा झालाय नुसता....

चला...स्वैपाकाला लागते..

अजो१२३ Thu, 03/04/2014 - 16:32

In reply to by स्वरा

डोक्याचा भुगा करून घ्यायची गरज नाही. एखाद्या विशिष्ट घटनेचे डीटेल्स खोलात पाहिले कि असे होते. http://siteresources.worldbank.org/EXTCPR/Resources/407739-126765155988… या लिंकवर १९९१ ते २००८ मधल्या जगातल्या सर्व संघर्षांचे डिटेल्स आहेत. केव्हा, कोणत्या दोन पक्षात, किती काळ आण किती मनुष्यहानी झाली, इ. (यामधे जे सामान्य (सिविल) खून (सहा ते सात लाख प्रतिवर्ष) होतात त्यांचा समावेश नाही. जीवहत्या न झालेल्या घटनांचा समावेश नाही.) यामधे पान ६४ वर जगातल्या अशा हत्यांचा अगदी १९४६ पासूनचा आलेख आहे. आपण खूप नशीबवान आहोत. अलिकडे असे संघर्ष वा युद्धे संख्येने वाढली असली तरी संवादामुळे मनुष्यहानी फार कमी होत आहे.
ज्या प्रकारे लोकांना आपल्या अधिकारांची जाणिव होत आहे हे पाहता काही काळाने असे संघर्ष अत्यल्प उरतील अशी आशा करायला हरकत नाही.

बॅटमॅन Thu, 03/04/2014 - 16:34

In reply to by अजो१२३

काही काळाने असे संघर्ष अत्यल्प उरतील अशी आशा करायला हरकत नाही.

जुन्या काळापेक्षा नवीन काळात अमुक एक गोष्ट चांगली असूच कशी शकते ;)

मन Thu, 03/04/2014 - 16:44

In reply to by बॅटमॅन

+१
अहो जुन्या काळच्या म्हशी काळ्या असत.
हल्लीच्या ह्या काय खर्‍याखुर्‍या काळ्या आहेत ?
हुडुत ...
फडतूस त्या आजच्या म्हशी

'न'वी बाजू Thu, 03/04/2014 - 17:59

In reply to by मन

याला शिक्षणाचा, साक्षरतेचा प्रसार जबाबदार आहे.

पूर्वीच्या काळी काळे अक्षर हे म्हशीसमान असे. परिणामी, अक्षराचा काळिमा आणि म्हशीचा काळिमा दोन्हीं म्हशीच्याच खात्यावर मांडले जात असत. त्यामुळे म्हैस वाजवीपेक्षा अधिक काळी भासत असे.

पुढे साक्षरतेचा प्रसार वाढल्यावर लोकांना माहिषकृष्णाक्षरविवेक करता येऊ लागल्याने अकौण्टिङ्ग सुधारले, आणि अक्षरांच्या काळिम्याचे क्रेडिट योग्य ठिकाणी नोंदविले जाऊ लागले. साहजिकच हल्लीच्या म्हशी पूर्वीइतक्या काळ्या दिसत नाहीत.

थोडक्यात, म्हशीच्या काळिम्यात फरक पडला नाही, पाहणार्‍याच्या नजरेत पडला. अर्थात, हल्लीच्या म्हशींचा कमी काळिमा लाइज़ प्युअरली इन द आय ऑफ द बिहोल्डर.

किंवा, पूर्वीच्या 'ज़हीलियत'च्या काळात म्हशी अधिक काळ्या दिसत, परमेश्वर त्याच्या आभाळात होता आणि जगाचे सगळे छानछान चालले होते. (निदान, तसे भासे.) थोडक्यात, अज्ञानात आनंद होता. साक्षरता, शिक्षण, चिकित्सा वगैरे नसत्या भानगडी वाढू लागल्यापासून या आनंदास (आणि म्हशीच्या काळिम्यास) मात्र तडा जाऊ लागला.

साक्षरता वैट्ट्ट्ट्ट्ट! वैट्ट्ट्ट्ट्ट!! वैट्ट्ट्ट्ट्ट!!! वैट्ट्ट्ट्ट्ट!!!! वैट्ट्ट्ट्ट्ट!!!!! वैट्ट्ट्ट्ट्ट!!!!!! दुष्ष्ष्ष्ट!!!!!!! आहे. आपण तिचे घर उन्हात बांधू, हं! हात् ग साक्षरता! आमच्या म्हशीचा काळिमा कमी करते म्हणजे काय?

साक्षरतेच्या बैलाला (आणि शिक्षणाच्या आयचा) घो, नानाची टांग, आबाचा ढोल इ.इ. (तज्ज्ञांनी पुढील जागा भराव्यात.)

मी Thu, 03/04/2014 - 16:44

In reply to by स्वरा

पहिली प्रतिक्रीया अशीच होती, त्यापेक्षा भयानक मला 'डॅनिअल पर्लची' चित्रफीत(सो कॉल्ड) पहाताना वाटले होते.

स्वरा Thu, 03/04/2014 - 18:25

हस्की आवाज (husky) सेक्सी का मानला जातो? ती 'दाग अच्छे हैं..' वाली किंवा हल्ली रेड लेबल आणि डव च्या एका जाहिरातित ऐका. मला तर कधी कधी हस्की आवाज भावविरहीत वाटतो. त्यांना बोलायला कष्ट पडताहेत असं वाटतं... :-B :D

बॅटमॅन Thu, 03/04/2014 - 18:27

In reply to by स्वरा

स्त्रीचा हस्की आवाज पुरुषाला सेक्सी वाटू शकतो-कैकदा वाटतोच. स्त्रीलाही तसेच वाटावे हा आग्रह कशाला?

स्वरा Thu, 03/04/2014 - 18:37

In reply to by बॅटमॅन

"स्त्रीलाही तसेच वाटावे हा आग्रह कशाला?" असं वाटतय का पोस्टमधुन? ओक ओके... काहि काही स्त्रियांचा हस्की आवाज काहि काही पुरुषाना सेक्सी का वाटतो?

Nile Fri, 04/04/2014 - 02:50

च्यायला, कट्ट्यावर बसून तंबाखू चघळत लोक गावच्या उचापात्या करतात तसं प्रकरण झालेलं दिसतंय हे धागे म्हणजे. काहीतरी भरीव करा त्यापेक्षा!

बॅटमॅन Fri, 04/04/2014 - 12:15

In reply to by Nile

काहीतरी भरीव करा त्यापेक्षा!

तुमच्यातल्या मध्यमवर्गीयाला पुनरेकवार मारल्याशिवाय वरील वाक्याकडे कोणीही लक्ष देऊ नये असे सुचवतो.

अतिशहाणा Fri, 04/04/2014 - 18:33

In reply to by Nile

मात्र, कट्ट्यावर बसून उचापत्या करण्याव्यतिरिक्त अशा चर्चांचा नक्की काय हेतू असू शकतो हे समजले नाही. आमच्या मते हाच हेतू आहे व तो साध्यही होत आहे. केंद्रीय नियोजन आयोगाने नवीन धोरण ठरवण्यापूर्वी गब्बरसिंग आणि अरुणजोशी यांचे 'ऐसी'वरील मत लक्षात घ्यावे असे काहीसे अपेक्षित आहे काय?

Nile Fri, 04/04/2014 - 20:28

In reply to by अतिशहाणा

समस्त सदाशिव पेठेने इथली मतं ग्राह्य धरून त्यांचे उच्चार बदलावेत वगैरे उद्दात्त अपेक्षा आहेत.

'न'वी बाजू Fri, 04/04/2014 - 21:56

In reply to by Nile

समस्त सदाशिव पेठेने...

नारायण आणि शनवार पेठांनी आपले नेमके काय घोडे मारले, ते कळू शकेल काय?

Nile Fri, 04/04/2014 - 22:16

In reply to by 'न'वी बाजू

म्हणजे शनवार आणि नारायण पेठांनीसुद्धा त्यांचे उच्चार बदलावेत असे तुमचे मत आहे काय? आता अजून कोणी येऊन म्हणेलच विमाननगरापासून वारजेमाळवाडीसकट सबंध पुणे महानगरानं उच्चार बदलायला हवेत म्हणून.

'न'वी बाजू Fri, 04/04/2014 - 22:55

In reply to by Nile

माझी काहीही अपेक्षा नाही. रादर, मी (किंवा अन्य कोणीही) काय वाट्टेल ती अपेक्षा केली, तरी शनवार आणि नारायण पेठा तशाही त्या अपेक्षेला हिंग लावून विचारणार नाहीत, याची खात्री आहे. (सदाशिवसुद्धा नाहीच विचारणार म्हणा.) तेव्हा तो मुद्दा नाही.

आक्षेप एवढाच आहे, की सदाशिव पेठेचा 'प्रातिनिधिक' नामोल्लेख करताना नारायण आणि शनवार यांना काय म्हणून वगळलेत? पुणे-३०गिरीमध्ये सदाशिवबरोबरच शनवार आणि आमची नारायण या ईक्वल पार्टनर्स नाहीत काय? ४११०३०मधून सदाशिव पेठेस वेगळे काढण्याच्या या नीच, कुटिल कारस्थानाचा तीव्र निषेध! (मला तर जबरदस्त शंका आहे की तुम्ही सदाशिव पेठेचे छुपे हस्तक आहात म्हणून. काही पोलिटिकल दक्षिणाबिक्षिणा मिळते काय? ;-))

मी Fri, 04/04/2014 - 23:06

In reply to by 'न'वी बाजू

आमची नारायण

दाभोळकरही गेले आणि हल्ली नारायणाला(पक्षी:गिरीश बापटांना*) कोणी हिंग लावून विचारत नसल्याने भाव कमी झाला असावा.

*आता त्यांचे हापिस नारायणात की शनवारात ह्या फंदात पडण्यात हशील नाय(पडले तरी शनवरालाही हिंग लावला जात नाहीच, तिकडे फारतर तपकीर काय ती लावतील)

बॅटमॅन Sat, 05/04/2014 - 00:07

In reply to by Nile

समस्त सदाशिव पेठेने इथली मतं ग्राह्य धरून त्यांचे उच्चार बदलावेत वगैरे उद्दात्त अपेक्षा आहेत.

निळ्यानं अगोदर आपलं शुद्धलेखन सुधारावं ही एक 'उद्दात्त' अपेक्षा ;)

Nile Sat, 05/04/2014 - 00:17

In reply to by बॅटमॅन

उद्दाम आणि उदात्त अशा दोन भावना एकत्र व्यक्त केलेल्या आहेत तिथे. उद्दाम मधला उद आणि उदात्त मधला दत्त => उद्दात्त. मेली कल्पनाशक्तीच नाही तुमच्याकडे.

बॅटमॅन Sat, 05/04/2014 - 00:35

In reply to by Nile

मेली कल्पनाशक्तीच नाही तुमच्याकडे.

मेली(मेलेली) कल्पनाशक्ती वापरल्यामुळेच असले लेम संधी तयार होतात. अरे, कुठे गेला तो खौचटशिरोमणी निळोबा? एवढ्यासाठीच का आम्ही स्वातंत्र्यलढ्यात भाग घेतला होता का?? हर हर...

गब्बर सिंग Sat, 05/04/2014 - 11:40

In reply to by अतिशहाणा

केंद्रीय नियोजन आयोगाने नवीन धोरण ठरवण्यापूर्वी गब्बरसिंग आणि अरुणजोशी यांचे 'ऐसी'वरील मत लक्षात घ्यावे असे काहीसे अपेक्षित आहे काय?

नाय नाय. केंद्रीय नियोजन आयोगाने माझे मत विचारात घेऊ नये.

केंद्रीय नियोजन आयोग बरखास्त (अबोलिश) केला जावा. सिरियसली.

आता कोणी म्हणेल की - मग व्हॉट डू यू रिप्लेस इट विथ ?

उत्तरादाखल (सॉवेल यांचा) प्रश्न - व्हेन यू ट्रीट समवन फॉर कॅन्सर ... व्हॉट डू यू रिप्लेस इट विथ ?

मन Sun, 04/05/2014 - 17:38

झीनत - आमिताभ -शत्रुघ्न सिन्हा ह्यांचा १९८०च्या दशकातला "दोस्ताना " हा चित्रपट च्यानल बदलताना लागलेला दिसला.
अमिताभची खास अंडरटोन का काय म्हणतात ती शांतपणे व हल्क्याश्या खर्जात बोलायची स्टाइल लै आवडते.
(दीवार मध्ये तो दार लावून "और मै तुम्हारा यहां इंतजार कर रहा था " असं थंड, खोल व किंचित तुच्छतेच्या छटेत म्हणतो; तसं.
आक्रस्ताळेपणा, आरडाओरडा न करता स्थिर नजर, रोखून पहात बोलणं.
)
तर सांगायचं म्हणजे खालील घटना चित्रपटात आहे.
समुद्र किनार्‍यापासून झीनत अमान जात आहे. तिने काही अंगभर कपडे घातलेले नाहित.
कपड्यातून तिचे उभार स्पष्ट दिसतात. दोन उभारांदरम्यान सुरु होणार्‍या रेषेची सुरुवातही व्यवस्थित दिसते.
थोडक्यात, कोळि ड्रेस म्हणून काही मॉडेलिंग करणार्‍या तरुणी तंग चोळी घालतात; बाकी पोट - पाठ पूर्ण मोकळे सोडतात तसा तिचा वेष आहे upper half मध्ये.
खाली तिने गुडघ्यापर्यंत पिवळ्या रंगाचे स्टायलिश लुंगीसदृश स्कर्ट का कोणते तरी वस्त्र गुंडाळले आहे.

ती जात असताना एक लफंगा (पेण्टल )शिट्टी वाजवून अंगविक्षेपासह "हम तुम एक कमरे मे बंद हो " म्हणतो.
पुढच्या सीनला त्या लफंग्याला पोलिस ठाण्यात आणलेले आहे. ती स्वतः घेउन आली त्याला की एखाद्याची मदत घेउन ह्याची कल्पना नाही.
तो सीन सुटला पहायचा.तर पोलिस ठाण्यात आणल्यावर त्या लफंग्याला - पेण्टलला, लॉकअप मध्ये वगैरे पोलिस टाकतात. fir वगैरे लिहितात.
आभार मानून झीनत निघणार एवढ्यात अमिताभ म्हणतो :-
अमिताभ :- मिस शीतल सहानी, एक बात मै आपसे भी केहना चाहता हूं.
झीनत :- जी कहिये .
अमिताभ :-लडकियों को यू छेडनेवालों को पकडना, या उअनको सबक सिखाना यह फमारा फ़र्ज है. लेकिन कुछ फ़र्ज लडकियों का भी है.
झीनत :- क्या फर्ज ? समझी नहीं.
अमिताभ :- जरा देखिये अपने कपडों को. इस्स तरह के कपडे पहन के अगर आप सडक पे बाहर निकलेंगी तो ?
गुंडों की सिटियां नहीं तो क्या मंदिर की सिटियां बजेंगी?
झीनत (अल्लाद अशा त्वेषाने, ठामपणे) :- what do you mean? क्या ख़राबी है इन कपडों में ?
अमिताभ :- (थंडपणे , पुणेरी स्टाइल ) बहुत कम है ( !)
मिस शीतल, सुना है एक जमानें में लडकियों को कपडों का बहुत शौक हुआ करता था.
आजकल आप लोग कपदों के मामले में इतनी कंजूस की क्यूं होती जा रही हो ?
झीनत :- (ठामपणे ) देखिये ; मै क्या पहनती हूं ये मेरा पर्सनल मामला है.
अमिताभ :- हम्म. ये तो बिलकुल वैसे हुआ जैसे वो लोफर कहे सिटी बजाना मेरा पर्सनल काम है. हर वो काम जिससे दूसरों को परेशानी हो
वो पर्सनल नही हो सकता.
झीनत :- लेकिन मेरे इस लिबा़स से दूसरों को क्या परेशानी हो सकती है ?
अमिताभ :- ये तो उस लोफर से पूछना पडेगा जिसने आपको देखकर सिटी बजायी . बेहरआल, आप एक श़रिफ घराने की शरीफ़ लडकी है.
और अगर थोडेसे शरिफाना कपडे आप पहन लें तो मेरे ख्याल से किसी को कोइ तकलीफ़ नही होगी. (खवचटपणे हताशेचा सूर मिसळत )
बाकी जैसे आपकी मर्जी . (अमिताभ निघून जातो.)
झीनत :- (शेजारच्या पोलिसाला विचारते ) क्या नाम है इनका?
शेजारचा वर्दीतील पोलिस :-- इन्स्पेक्टर विजय वर्मा; स्पेशल ब्रांच CID
.
.
.
संपूर्ण दृश्य इथे पाहता येइल :-
http://www.youtube.com/watch?v=sBL6wZUFgW4

बॉलीवूडमुळे वाह्यातपना वाढतो, समाजातील वाईट गोश्टी करण्यास विशेषत: उत्तानता वाढण्यास बॉलीवूड कारणीभूत आहे असे उगीचच म्हटले जाते.
गेली वीस तीस वर्षे ते इतका चांगला उपदेश समाजास देताहेत. तरी तो समाजाच्या पचनी पडत नसून उलट त्याउलट उत्तानता वाढते आहे.
स्त्रिया अधिकाधिक संख्येने बाहेर पडताहेत; तसेच पारंपरिक कपडेच घालण्याचा पूर्वीचा ट्रेंड आता मागे पडतो आहे.
जग पुन्हा एकदा असंस्कृत अवस्थेकडे जात आहे.

ॲमी Mon, 05/05/2014 - 07:31

In reply to by अनुप ढेरे

नै कै. अशा कपड्यातली झीनत पडद्यावर असूनही मी अमिताभचा अभिनय पाहतो, संवाद लक्ष देउन ऐकतो हे शोऑफ करायसाठी दिलाय तो प्रतिसाद ;-)

अमुक Mon, 05/05/2014 - 07:52

In reply to by मन

हाच १९८०चा अमिताभ त्याच झीनतला पुढे १९८३साली समुद्रात पाहून 'समंदर में नहाके... और भी... नमक़ीन हो गयी हो ' असे शास्त्रीय सत्य सांगतो. ;)