साहिर
कवि माझा मित्र होता.
मित्राच्या शब्दावर जीव टांगून ठेवायची आपली नेहेमीच तयारी होती.
तो म्हणाला
" मेरी वफ़ा का शौक़ से तू इम्तहान ले "*
मी माझ्या प्रार्थनेत ही ओळ उधार घेतली
आणि विधात्याने पण मान्य केली.
आता झालेल्या परवडीची दाद मागायला मित्र पण हाताशी नाही.
कविची आणि बावीची खोली न मापता जे त्यांना जवळ करतात ,
त्यांना बुडून मरणे ह्या खेरीज शिक्षेचे वेगळे कलम लावण्याची काय गरज आहे. ?
* साहिरच्या कविता आणि गाणी या संबंधी या निमीत्ते काही चर्चा व्हावी .
*संजोपरावांचे आभार.
जाने क्या तूने कही
'तुम न जाने किस जहाँ में खो गये' हे माझेही अत्यंत आवडते गाणे आहे. माझ्यासाठी साहिरच्या लेखनातले आवडत नाही असे जवळपास काही नाहीच आहे. 'सिर जो तेरा चकराए, या दिल डूबा जाए' हे 'तेलमालिश' गाणेदेखील साहिरचेच. :)
तुम्ही अनेक उदाहरणे दिलीच आहेत. पण माझ्यासाठी 'प्यासा'मध्ये 'जाने क्या तूने कहीं, जाने क्या मैंने सुनी' हे गाणे एक विशेष आहे.
एक फाटका कवी त्रस्त होऊन रात्री एकटाच बाकड्यावर बसला आहे. अचानक एका मंजुळ आवाजात त्याला त्याच्याच लिहिलेल्या ओळी ऐकू येतात. तो चमकून पाहतो तर एक पाठमोरी स्त्री ते गात असते. तो तिला त्याबद्दल विचारणार एवढ्यात ती त्याच्या 'सुनिये' या शब्दाला पकडून 'जाने क्या तूने कहीं, जाने क्या मैने सुनी, बात कुछ बनही गयी' हे गाणे सुरू करते. तो जणु खेचला गेल्यागत तिच्यापाठी जातो. ती गाणे गात, लुभावत त्याला आपल्या खोलीपर्यंत नेते. ती एक वेश्या असते हे गाण्यानंतरच्या प्रसंगात कळते. हे कळल्यावर 'जाने क्या तूने कही' या गाण्यातल्या ओळींतल्या अनेक छटा, 'सूचक' अर्थ अचानक उलगडतात !
...
त्यांचं माझं सर्वात नावडतं गाणं म्हंजे - जो वादा किया वो निभाना पडेगा.
म्हणजे ते 'ताजमहल'मधलेच ना?
(बादवे, याच साहिरने पुढेमागे कधीतरी
"एक शहेनशाह ने बनवा के हँसी ताजमहल
हम ग़रीबों की मुहब्बत का उड़ाया है मज़ाक"
असेही काहीतरी लिहिले होते ना?)
(माझ्यापुरते) नावडते नाही म्हणणार मी (बर्यापैकी आवडते), पण साहिरची याहून कित्येक पटीने चांगली गाणी आहेत, एवढेच म्हणेन.
बाकी, तुमच्यासारखे पोएटिक भाषेत (कारण कवितातैंचे आणि आमचे सदैव फाटलेले म्हणून), उर्दू टर्म्स फेकून (कारण उर्दू येत नाही म्हणून) आणि तपशीलवार (कारण फिल्मी बाबतीत फारसे तपशिलात कधीच माहीत नसते, म्हणून) लिहू शकणार नाही, पण 'मुहब्बत तर्क़ की मैं ने' या साहिरच्या आमच्या आजमितीस सर्वात आवडत्या ('फ्लेवर ऑफ द डे' म्हणू या का?) गाण्याचा ज़िक्र उगीचच करावासा वाटला. (बहुधा इतर कोणी अद्याप केला नाही म्हणून. नाहीतर, आमच्या थत्तेचाचांच्या आवडत्या भाषेत सांगायचे झाले, तर 'गप्प बसायचे ठरवले होते'. किंवा, त्याहीपेक्षा मिताक्षरांत सांगायचे, तर '.')
----------------------------------------------------------------------------------
बादवे, तुम्हाला माहीत आहे का? (नव्हे, तुम्हाला माहीत असेलच.) फाळणीच्या सुमारास तुमचा(आमचा) साहिर खरे तर लाहौरमध्ये स्थायिक झाला होता. (फाळणीनंतरसुद्धा चांगला दीडदोन वर्षे की कायसेसे तिथे राहिला होता म्हणे.) पण, कम्युनिष्ट विचारसरणीकडे त्याचा जोरदार कल असल्याकारणाने (आणि तदनुषंगाने तथाकथित 'भडकाऊ' लिखाणाच्या संदर्भात) पाकिस्तान सरकार त्याच्या मागावर होते, आणि त्याच्या नावाचे वॉरंटसुद्धा (पाकिस्तान सरकारने) काढलेले होते. म्हणून मग राजश्री भारतात पळून आले, नि स्थायिक झाले.
नाही म्हणजे, द्याट इज़ नॉट सपोज़्ड टू प्रूव एनीथिंग व्हॉटसोएवर, नॉर शुड इट प्रेक्लूड एनीथिंग, पण या पार्श्वभूमीवर साहिर तुम्हाला आवडतो, ही बाब रोचक वाटली, इतकेच.
----------------------------------------------------------------------------------
(अवांतर:
"तुम अगर मुझे भूल भी जाओ तो" सारखी अतिरेकी आदर्शवादी गाणी पण लिहिली.
हे नेमके कोणते गाणे हो? ते एक "मेरी बात और है, मैं ने तो मुहब्बत की है"वाले गाणे ठाऊक आहे, पण त्यात "अगर" असण्याबद्दल साशंक आहे.
नाही म्हणजे, आपण एकाच गाण्याबद्दल बोलत आहोत काय?)
साहिर व कम्युनिस्ट
कम्युनिष्ट विचारसरणीकडे त्याचा जोरदार कल असल्याकारणाने
पण या पार्श्वभूमीवर साहिर तुम्हाला आवडतो, ही बाब रोचक वाटली, इतकेच.
आमचे मित्र रमताराम यांच्याकडून एक गोष्ट शिकत आहे व ती म्हंजे - प्रत्येक बाबतीत आपली "आवडती" विचारसरणी मधे आणायची नाही. शिकत आहे म्हंजे नेमके हेच की - प्रत्येक वेळी जमतेच असे नाही पण कोशिश जारी है.
आता साहिर कम्युनिस्ट असूनही कसे काय आवडतात ? त्याच धर्तीवर हफीज जालंधरी (ज्यांनी पाकिस्तान चे राष्ट्रगीत लिहिले) त्यांची शायरी (उदा. अभी तो मै जवान हूं) का आवडते असा ही प्रश्न निर्माण होऊ शकतो ? पाकिस्तान भारताचा दुष्मन असूनही ? खरंतर कम्युनिस्ट विचारसरणीचा प्रभाव अनेक शायर लोकांवर होता. फैज अहमद फैज (गुलों मे रंग भरे), कैफी आझमी (शबाना मॅडम चे पिताश्री), साहिर, जान निसार अख्तर (जावेदभाईंचे पिताश्री) असे अनेक. त्यातल्या अनेकांचे मी काहीही वाचलेले नाही. गाणी मात्र अनेकांची ऐकलियेत.
दुसर्या बाजूला इगोर शाफरेविच (रशियन गणिती) ज्यांनी "सोशॅलिझम इज डेथ विश ऑन पार्ट ऑफ सोसायटी" असा मुद्दा ज्या पुस्तकात मांडला ते "अंडर द रुबल" हे ही वाचलेले नाही. अलेक्झांडर सोल्झेनित्सिन यांचे "गुलग आर्चिपेलागो" पण वाचलेले नाही. अलेक्झांडर ड्युमा हे कॅपिटलिस्ट होते असा युक्तिवाद आमच्या एका मास्तरांनी केला असून ही (२०१० मधे) त्यांचे काहीही वाचलेले नाही. आयन रँड चे एक ही पुस्तक धड वाचलेले नाही. तिच्या दोन तीन पुस्तकांची पाने चाळलीत फक्त. आर्थर कोस्लर चे "द गॉड दॅट फेल्ड" वाचलेले नाही. थॉमस सॉवेल हे सुद्धा तरुणपणी मार्क्सवादाने प्रभावित झालेले होते. नंतर ते कॅपिटलिस्ट बनले. पण त्यांचीही दोन च पुस्तके वाचलीत (२०+ पैकी.).
सांगण्याचा मुद्दा हा की मी स्वतःला कॅपिटलिस्ट म्हणवत होतो (किंवा कम्युनिस्ट विरोधक मानतो) हे कितपत खरे आहे ? की हा निव्वळ अभिनिवेश आहे ? यावर विचार करणे आवश्यक आहे. कारण कॅपिटलिझम वर टीका झाली की मी लगेच हिरीरीने प्रतिवाद करायला सगळी आयुधं शमी च्या वृक्षावरून काढून घेऊन येतो पण कॅपिटलिझम बद्दल अनेक साहित्य असे आहे की जे मी वाचलेले नाही.
दुसरा मुद्दा हा की - एकाच विचारसरणीच्या भिंंगातून जर प्रत्येक बाबीकडे पाहिले तर वैविध्यास बाधा पोहोचू शकते -
चमन मे इख्तलाते हुए रंग-ओ-बू से बात बनती है
हम ही हम है तो क्या हम है
तुम ही तुम हो तो क्या तुम हो
हाच शेर फामा सायबांनी वेगळ्या शब्दात मांडलाय -
I'm an extreme libertarian, but I realize we're in a democracy, and in a democracy, people can have views of all stripes, and there's no reason to argue about it.
- Eugene Fama
---
आपण एकाच गाण्याबद्दल बोलत आहोत काय?
होहो तेच ते.
"अगर" हा शब्द नाहिये त्यात. हमसे भूल हो गई. हमका माफी दैदो.
... (पूर्णतः अवांतर)
आता साहिर कम्युनिस्ट असूनही कसे काय आवडतात ? त्याच धर्तीवर हफीज जालंधरी (ज्यांनी पाकिस्तान चे राष्ट्रगीत लिहिले) त्यांची शायरी (उदा. अभी तो मै जवान हूं) का आवडते असा ही प्रश्न निर्माण होऊ शकतो ?
नाही, साहिर कम्युनिष्ट असूनही (एका स्वघोषित क्यापिटालिष्टास / कम्युनिष्टविरोधकास) आवडावयास आक्षेप काहीही नाही; असे होणे अशक्यप्राय आहे असाही दावा नाही (मुहम्मद अली जीनांसारखा सॉसेजप्रेमी, स्कॉचप्रेमी, आंग्लीकृत, अधार्मिक प्रवृत्तीचा सद्गृहस्थ जर पाकिस्तान चळवळीचा अध्वर्यु असू शकतो - किंवा व्हाइसे वर्सा - तर यात कोणती मोठी बाब आहे?); फक्त, द्याट मेक्स अॅन इण्टरेष्टिंग काँबिनेशन, असे निरीक्षण नोंदविले, इतकेच.
(अतिअवांतर:
त्याच धर्तीवर हफीज जालंधरी (ज्यांनी पाकिस्तान चे राष्ट्रगीत लिहिले)...
केवळ पाकिस्तानचेच नव्हे. तथाकथित 'आझाद कश्मीर'चेसुद्धा.
असो. या धाग्यावर अधिक अतिअवांतर करू इच्छीत नाही.)
कारण कॅपिटलिझम वर टीका झाली की मी लगेच हिरीरीने प्रतिवाद करायला सगळी आयुधं शमी च्या वृक्षावरून काढून घेऊन येतो पण कॅपिटलिझम बद्दल अनेक साहित्य असे आहे की जे मी वाचलेले नाही.
गरज नसावी. माणसाच्या (तात्कालिक किंवा दीर्घकालीन - कालपरत्वे आणि परिस्थितीनुरूप पिंडही बदलणे अशक्य नसावे.) पिंडास त्यातल्या त्यात मिळतीजुळती जी विचारसरणी असेल, ती स्वीकारण्याकडे माणसाचा कल असावा. तशी ती स्वीकारताना ती अगोदर अंतर्बाह्य समजून घेणे आवश्यक नसावे (नि त्या विचारसरणीचा प्रत्येक पैलूही स्वीकारणे आवश्यक नसावे).
शेवटी विचारसरणी माणसासाठी, की माणूस विचारसरणीसाठी, हा प्रश्न आहे.
सांगण्याचा मुद्दा हा की मी स्वतःला कॅपिटलिस्ट म्हणवत होतो (किंवा कम्युनिस्ट विरोधक मानतो) हे कितपत खरे आहे ? की हा निव्वळ अभिनिवेश आहे ?
मला वाटते, श्वानपुच्छन्याय (कुत्रा शेपटास हलवत आहे, की शेपूट कुत्र्यास हलवत आहे) या निर्णयनात कामी यावा.
म्हणजे असे, की क्यापिटलिष्ट/कम्युनिष्ट/कम्युनिष्टविरोधक ही शेवटी (विचारसरणीवादी) लेबले आहेत. ते ठीकच आहे; प्रश्न इतकाच आहे, की लेबले माणसास चिकटावीत, की माणूस लेबलास चिकटावा.
लेबल जोपर्यंत माणसास चिकटत आहे, तोपर्यंत त्या प्रक्रियेत (स्वतःशीच) प्रामाणिकपणा आहे, अत एव अभिनिवेश नाही. (शिवाय, एक लेबल स्वतःच काढून टाकून त्या जागी दुसरे लेबल - किंवा एकाहून अधिक लेबले - पुन्हा स्वतःच चिकटवण्याचे स्वातंत्र्य आहे. पण तो वेगळा मुद्दा.) म्हणजे, माणसाची विचारसरणी स्वतःचीच आहे, इट जस्ट हॅपन्स टू कन्फॉर्म, बाय अँड लार्ज, टू अ प्रीडिफाइन्ड लेबल. माणूस लेबलास चिकटला, की मात्र गडबड सुरू व्हावी.
(माझेच घ्या. मी स्वतःस 'लिबरल' समजतो. 'लिबरल' अशा कोठल्या प्रमाणीकृत विचारसरणीची अधिकृत अशी कोणती व्याख्या असल्यास मला कल्पना नाही, आणि तशी काही भानगड अस्तित्वास असल्यास तिच्याशी माझा पिंड, माझे विचार तंतोतंत जुळतीलच, याचीही मी शाश्वती देऊ शकत नाही. [फक्त, अशा व्याख्येत आणि माझ्या पिंडात एखाद्या बाबतीत काही फरक आढळल्यास, केवळ व्याख्येशी मिळतेजुळते घेण्यासाठी मी माझा विचार बदलण्याची शक्यता कमी वाटते; कल्पना नाही.] किंबहुना, माझे सर्वच विचार वा वृत्ती 'लिबरल' या लेबलाशी मिळत्याजुळत्या असतीलच, असेही नाही; काही बाबतींत मी अत्यंत कन्झर्वेटिवही असूही शकेन - फक्त, ईव्हन इन द्याट केस, सो लॉंग अॅज़ आय कन्सीड द पॉसिबिलिटी ऑफ अदर्स ह्याविंग व्ह्यूज़ नॉट नेसेसरिली कम्प्लायिंग विथ माय ओन, आय फील द्याट आय अॅम ष्टिल एण्टैटल्ड टू कॉल मायसेल्फ अ लिबरल. एकंदरीत, 'लिबरल' हे लेबल मला चिकटते, असे मला वाटते; असे मी ठरवलेले आहे.
राहिली गोष्ट तलवारी उपसण्याची. इथे कोणीतरी जेव्हा 'लिबरल' हा शब्द शिवी म्हणून फेकतो, आणि मी त्यावर तलवार उपसतो, तेव्हा आय अॅम नॉट डिफेण्डिङ्ग लिबरल्स अॅट लार्ज - आय कुड गिव टू हूट्स अबाउट लिबरल्स अॅट लार्ज - आय अॅम एसेन्शियली डिफेण्डिङ्ग मायसेल्फ, अॅण्ड नन अदर. अमक्या एका 'लिबरला'बद्दल व्यक्तिश: कोणीतरी 'तो असाच आहे, तो तसाच आहे' म्हणून गरळ ओकले, तर त्याबद्दल मला - एक्सेप्ट ऑन मेरिट्स, आणि तेही केवळ एक वैयक्तिक मत म्हणून - काहीच सोयरसुतक असण्याचे सहसा कारण नसते. पण तेच जर 'हे लिबरल असेच, हे लिबरल तसेच' झाले, तर 'त्या' एकशेपाचांत माझीही गणना झाल्याने त्या बाकीच्या एकशेचारांच्या नाही, तरी निदान माझ्या स्वतःच्या बचावात आणि स्वसन्मानार्थ उभे ठाकणे मला भाग पडते. त्या बाकीच्या एकशेचारांशी एरव्ही माझे पटतही नसेल, पण अशा प्रसंगी त्या बाकीच्या एकशेचारांना सोडा - देअर डिफेन्स इज़ एसेन्शियली देअर हेडेक - पण माझे, मी स्वतः लावून घेतलेले लेबल त्यागणे (मला स्वतःला ते पटल्याशिवाय) योग्य ठरावे काय?
सांगण्याचा मतलब, आय ष्ट्याण्ड इन डिफेन्स ऑफ मायसेल्फ अलोन, अॅण्ड नन अदर, नॉट इन द लीष्ट टू द लेबल द्याट आय मे ह्याव चोझन टू अफिक्स टू मायसेल्फ [विच, इन्सिडेण्टली, आय असर्ट टू बी एण्टायरली माय प्रेरॉगेटिव]. एर्गो, नो अभिनिवेश.)
दुसरा मुद्दा हा की - एकाच विचारसरणीच्या भिंंगातून जर प्रत्येक बाबीकडे पाहिले तर वैविध्यास बाधा पोहोचू शकते - (इ.इ.)
'वैविध्याचे रक्षण करणे / त्यास बाधा पोहोचू न देणे' कुड हार्डली बी माय कन्सर्न, पण वैविध्याच्या अस्तित्वास मला काही प्रत्यवाय असण्याचे कारण निदान वरकरणी तरी मला दिसत नाही. पण मुद्दा पोहोचला.
असो. अवांतरविस्तारभयास्तव येथेच आवरते घेतो. सांगण्याचा मतलब इतकाच होता, की एखाद्या कट्टर कम्युनिष्टविरोधकास कम्युनिष्ट साहिर आवडण्यात इल्लीगल, इम्मॉरल ऑर फ्याटनिंग असे काहीही नसले, किंवा वरकरणी निसर्गनियमांविरुद्धही जरी नसले, तरी ते कॉम्बिनेशन दृष्टीस रोचक वाटते, इतकेच. इत्यलम्|
पयम्मल कि उम्मत - शंका
'प्यासा' चित्रपटातील प्रसिद्ध 'जिन्हे नाज़ हैं हिंदपर वह कहाँ हैं' या गाण्यात अर्थ कळलेले पण त्यातले ऐतिहासिक संदर्भ अजिबात न कळलेले कडवे आहे (चित्रफितीत ५ मि. पासून पुढे )-
(या कडव्यातले बरेच शब्द/ऐतिहासिक नावे माहीत नसल्याने आणि काही शब्द नीट ऐकू येत नसल्याने पुढील वाक्यरचनेत चुका असू शकतात)
'मदद चाहती है ये हव्वा की बेटी
यशोदा की हमगिन, सिराथा की बेटी
पयम्मल की उम्मत, ज़ुलयख़ाँ की बेटी
जिन्हें नाज़ है हिंद पर वो कहाँ हैं'
यात हव्वा, सिराथा, पयम्मल, ज़ुलयख़ाँ हे कोण ? हमगिन, उम्मत म्हणजे काय ?
... (अवांतर)
(हव्वा ही आदम-हव्वामधील आहे असे वाटले होते पण या जोडप्याला तीन मुलगे होते. मुलीचा उल्लेख गाण्यात असल्याने कदाचित ही हव्वा वेगळी असावी असे वाटले होते.)
'हव्वाला मुलगी कधी झाली?' असा प्रश्न आम्हांसही पडला होता. पण मग असा शब्दशः अर्थ घेत राहिले, तर मग 'डॉटर्स ऑफ द अमेरिकन रेव्होल्यूशन'पासून ते 'दुख़्तरान-इ-मिल्लत'पर्यंत बर्याच गोष्टींना काही भलताच अर्थ प्राप्त होईल, हे लक्षात येऊन त्या प्रश्नाचा माग सोडला. असो.
हव्वा की बेटी
इथे 'हव्वा की बेटी' ही अॅडॅम-इव्हच्या सख्ख्या कुटुंबातली नाही हे कळले. सगळी मानव जात त्या दोघांपासून उत्पन्न झाली असल्याची दंतकथा असल्याने गाण्यात अभिप्रेत तितकेच आहे. पण जेंव्हा हे गाणे प्रथम ऐकले होते व मी अर्थ शोधू पाहायला गेलो होतो त्यावेळी सगळी ऐतिहासिक उदाहरणे असल्याने मला खरोखरच कुणी 'हव्वा' नामक व्यक्तीला मुलगी होती आणि ती संकटात मदत शोधू पाहत होती अश्या एखाद्या घटनेचा संदर्भ असावा असे वाटले होते म्हणून ती शंका होती. :) असो.
होती.
अॅडम - ईव्ह ह्या जोडप्याला मुली होत्या हे पैजेवर सांगायला तयार आहे.
बायबलच्या जुन्या करारात , जुन्या टेस्टामेंटात आख्खी वंशावळ दिली आहे अॅदम ते - नोहा - अब्राहम - इसहाक - मोझेस ह्यांची. त्यात त्या मुलींचा उल्लेख आहे.
पहिले तीन चार पिढ्या सख्ख्या बहिणीशी विवाह केले गेले.
नंतर मात्र भरपूर संतति होत गेल्यावर सख्ख्यांशी संग परमेश्वराने प्रकट होउन त्याज्य ठरवला.
तर संगायचे म्हणजे ह्या सगळ्या घटनाक्रमात मुलींचा उल्लेख आहे. व्यवस्थित आठवतो आहे.
(नेमकी नावे विसरलो त्या अॅडमच्या मुलींची.)
मिसळपावावर माझ्या धाग्यावर वाहिदाने प्रतिसाद दिला होता.
तिने मुस्लिम परंपरेनुसार मानली जाणारी वंशावळ दिली होती.
त्यातही उल्लेख असावा; आता आठवत नाही. बायबलात आहे हे नक्की.
कोह-ए-तूर
ऐतिहासिक संदर्भांवरून 'ना तो कारवाँ की' मधली "इश्क़ मूसा, इश्क़ कोह-ए-तूर है" ही ओळ आठवली. कोहिनूरची व्युत्पत्ती वाचल्यापासून हे कदाचित कोह-ए-नूर असावं, असं वाटत असे; पण योगायोगाने कोह-ए-तूर म्हणजे माऊंट सायनाय् हे कळल्यावर (मोझेसला जिथे देवाकडून 'टेन कमांडमेन्ट्स' मिळाल्या असं मानलं जातं) या ओळीतला नेमका संदर्भ समजला.
"आठवा अंतू बर्वा"
एखादं वाक्य वाचल्यावर 'आठवा' शब्द अंक म्हणून किंवा क्रियापद म्हणून वापरलाय असा एकच बोध होतो - दोन्ही शक्यता माहित असून सुध्दा. आपला मेंदू काय संदर्भाने एकाच अर्थाचा वापर करतो? की दोन्ही शक्यता पडताळून पहातो आणि योग्य ती वापरतो? पण मग दुसरी शक्यता नाहीये हे जे प्रोसेसिंग केलेलं असतं ते आपल्याला कळत पण नाही! असो.
अशा श्लेषाचं उत्तम उदाहरण (नंदनचंच, आणखी कोण? !) इथे वाचा. (त्या लेखातला शेवटचा परिच्छेद वाचा म्हणजे संदर्भ लागेल.)
साहिर
साहिर या विषयावर अंतिम शब्द म्हणता येईल असे विनायक गोरे यांचे हे लिखाण.
श्रेयअव्हेर: हे लिखाण माझ्या अनुदिनीवर असले तरी ते विनायक गोरे यांनी लिहिलेले आहे. त्यांच्या परवानगीनेच मी ते प्रसिद्ध केले आहे.
रामदास, आभार कसले? 'गिरी है जिसपे कल बिजली, वो मेरा आशियां क्यूं हो' या नावेतले आपण सगळे प्रवासी. तुम्ही, मी आणि साहिरही.
फैली हुई है सपनों की बाहे -
फैली हुई है सपनों की बाहे - हे गाणं आजही मी रोमँटिक गाण्यातलं उच्च मानतो. ऐकल्यावर जीन जॅक रोझिओ सुद्धा लाजून मान खाली घालेल असं. कमल बारोट व सुमन कल्याणपूर यांनी गायलेलं "गरजत बरसत" आठवून पहा. साहिर व रोशन चं नेमकं काय सख्य होतं कोण जाणे पण दोघांनी मिळून धुमाकूळ घातला असं वाटतं. बहु बेगम मधली व ताज महाल आणि बरसात की रात मधली बाकीची गाणी आठवून पहा.
आठवली. सगळीच्या सगळी. एक तासभर कामाचा बट्ट्याबोळ झाला, पण आज दिवस चांगला जाईल. नशीब ऑफिसात यूट्यूब बंद आहे, नाहीतर गाणी गुणगुणायची सोडून बघितली सुद्धा असती!
साहिर रोशन ने मिळून खरोखर धुमाकूळ घातला, आणि तो किती निराळ्या शैलींच्या गीत-संगीतात - एकीकडे बरसात की रात च्या कव्वाल्या, तिकडे चित्रलेखातली रागप्रधान गाणी - ए री जाने न दूंगी आणि मन रे तू काहे न धीर धरे, ताज महलची भावगीत टाइप गोड चाली. मला सगळीच आवडतात, पण कव्वालीत त्यांचं सर्वाच छान जमलं असं वाटतं. सूरत और सीरत मधलं मुकेशचं बहुत दिया देनेवाले ने मुझको हे गाणं मात्र माझ्या सर्वात नावडत्या गाण्यांपैकी एक आहे.
वर "जीन जॅक रोझिओ" हे मी आधी जॉन जॉनी जनार्दन च्या चालीवर वाचलं. मग ट्यूबलाइट पेटली!
साहिरचे "बंबई मेरी जान" आणि कभी कभी मधली गाणी खूप आवडतात. एस्प: मैं पल दो पल का शायर (लेकिन यहाँ भी कमबख्त मुकेश!) आणि कभी कभी मेरे दिल में ची पूर्ण कविता. आणि "प्यार पर बस तो नहीं है मेर लेकिन फिर भी..." आणि जयदेव ने स्वरबद्ध केलेले मुझे जीने दो मधले गीत "रात भी है कुछ भीगी भीगी"... जाऊ दे. अजून खूप आहेत.
साहिरचं नाव घेतल्यावर माझा एक
साहिरचं नाव घेतल्यावर माझा एक पाकिस्तानी मित्र आठवतो. कम्युनिस्ट, लिबरल विचारसरणीचा. त्यानेच मला फैजची ओळख करून दिली. साहिरच्या कवितांवर त्याचं खूप प्रेम होतं. कवितांची पुस्तकं काढून बसून मला तो उर्दू शब्दांच्या नजाकती अर्थांबरोबर समजावून सांगत असे. त्याने वाचून दाखवलेली साहिरची ताजमहल अजून आठवते आहे. जिन्हे नाज है हिंदपर वो कहा है हे लहानपणी छायागीतवर बघतानाही प्रभावित झाल्याचं आठवतं आहे.
साहिरचं काव्य इथे पहायला मिळेल.
हे माझे एक आवडते गाणे. इतके
हे माझे एक आवडते गाणे. इतके डायरेक्ट साहिर च म्हणु शकतो
तुम अगर मुझ को न चाहो तो कोई बात नही
तुम कीसी और को चाहोगी तो मुश्कील होगी
अब अगर मेल नही है, तो जुदाई भी नही
बात तोडी भी नही तुम ने बनाई भी नही
ये सहारा ही बहोत है, मेरे जीने के लिए
तुम अगर मेरी नही हो तो पराई भी नही.
मेरे दिल को ना सराहो तो कोई बात नही
गैर के दिल को सरहो गी तो मुश्कील होगी.
पुढचे टंकायचा कंटाळा आला.
होश मे थोडी बेहोशी है ... बेहोशी मे होश है कम कम
फिर ना किजे मेरी गुस्ताख निगाही का गिला, आज कि रात पिया दिल ना तोडो, तेरी दुनिया मे जीने से तो बेहतर है के मर जाए, चांद मध्धम है आसमां चुप है, यूंहिं दिल ने चाहा था रोना रुलाना, नग्मा ओ शेरों की सौगाध किसे पेश करूं, मै जिंदगी का साथ निभाता चला गया, हम आपकी आखोंमें इस दिल को बसा दे तो, रात भी है कुछ भीगी भीगी चांद भी है कुछ मध्धम मध्धम, चलो एक बार फिर से अजनबी बन जाए हम दोनो, अभी ना जाओ छोड कर, तुम मुझे भूल भी जाओ तो ये हक है तुमको ... अशी एकसेएक गाणी देणारे साहिर यांची आज जयंति आहे. म्हणून धागा वर काढत आहे.
झूला धनक का धीरे धीरे हम झूले
अंबर तो क्या है तारो के भी लब छू ले
मस्ती मे झूमे और सभी गम भूले
देखे न पीछे मुडके निगाहे...
खुदा - ए - बरतर
हे गाणं ऐकल्यावर खरं तर अतिरेक्यांचे सुद्धा मतपरिवर्तन व्हायला हवे. पण मेंदू एकदा गुडघ्यांत गेला की तो परत जाग्यावर येणे कठीण असते.
https://www.youtube.com/watch?v=7grmUiNgMe4
साहिरच्या उत्तमोत्तम काव्याचा आस्वाद घेणं आणि ती घनगंभीर काव्ये आपल्याला कळणं, हीच एक अत्यंत आनंददायी गोष्ट आहे.
आणि त्या गाण्यांना रोशन, लता आणि रफी यांनी जे आकर्षक स्वरुप दिले आहे ते अनुभवले की आपण भारतात जन्म घेतला याबद्दल कृतकृत्य वाटते.
कश्मकश-ए-जिंदगी
साहीर हे माझ्या मते १९५० च्या नंतरच्या हिंदी चित्रपट संगीताच्या सुवर्णकालाचे, विशेषतः १९५० च्या व ६० च्या दशकाचे, दिग्गज शायर-शिरोमणी. त्यांची शायरी म्हंजे उर्दू च्या नजाकतीत चिंब भिजलेली फुले च जणू. एक से एक नग्मे ... ज्यातील तसव्वुर की गहराई अशी की उनमे आदमी डूब के मर जाये ... और फिर भी होठो पे एक भी शिकवा न आए.
साहिर यांनी स्वतःच्याच शायरी शी स्पर्धा करणारी गाणी लिहिली असे वाटते. चलो एक बार फिर से - हे त्यांचे माझ्या मते सर्वात शाहकार गाणं. चुकलो चुकलो ... "ना तो कारवा की तलाश है" हे सर्वोत्कृष्ट. किंवा लताजींनी गायलेलं "तुम ना जाने किस जहां मे खो गये". आणि यासगळ्यावर त्यांनी "लागा चुनरी मे दाग" चा गुगली टाकला व आमचे मामाश्री म्हणतात की त्यांची विकेट पडली. लागा चुनरी मे दाग - हे साहिर ने लिहिलेय हे ऐकल्यावर मला जरासा धक्का बसला होता. तसाच थोडासा धक्का - "ठंडी हवाए लहराके आये" हे थोडंसं खट्याळ गाणं साहीर नी लिहिलेय हे ऐकल्यावर बसला होता. "जुल्मे-उल्फत पे हमे लोग" हे गाणं मी १९८९ मधे प्रथम ऐकलं. ऐकल्या ऐकल्या हमारे "लाख जिगर चाक हो गये" थे. धर्मपुत्र मधलं आशाजींनी गायलेलं मै जब भी अकेली होती हुं हे ऐकताना प्रत्येक वेळी अस्वस्थ करून जाणारं गाणं. साहिर यांनी त्यांच्या लेखणीतून मांडलेला दर्द हा एक वेगळ्या लेखाचा विषय होईल. "जाये तो जाये कहा", "ये दुनिया अगर मिल भी जाये तो क्या है", "जाने वोह कैसे लोग थे जिनके", कभी खुद पे कभी हालात पे", "पडे बरखा फुहार", "तेरी दुनिया मे जीने से बेहतर है", "जिसे तू कुबूल कर ले" अशी एक नाही दोन नाही शेकडो दर्दभरी गीतं लिहिली.
फैली हुई है सपनों की बाहे - हे गाणं आजही मी रोमँटिक गाण्यातलं उच्च मानतो. ऐकल्यावर जीन जॅक रोझिओ सुद्धा लाजून मान खाली घालेल असं. कमल बारोट व सुमन कल्याणपूर यांनी गायलेलं "गरजत बरसत" आठवून पहा. साहिर व रोशन चं नेमकं काय सख्य होतं कोण जाणे पण दोघांनी मिळून धुमाकूळ घातला असं वाटतं. बहु बेगम मधली व ताज महाल आणि बरसात की रात मधली बाकीची गाणी आठवून पहा.
त्यांचं माझं सर्वात नावडतं गाणं म्हंजे - जो वादा किया वो निभाना पडेगा. नाही म्हणायला साहिर यांनी "तु हिंदु बनेगा ना मुसलमान बनेगा", "अल्ला तेरो नाम" सारखी मेक बिलिव्ह गाणी व "तुम अगर मुझे भूल भी जाओ तो" सारखी अतिरेकी आदर्शवादी गाणी पण लिहिली. खैर.
वोह अफसाना जिसे अंजाम तक लाना न हो मुम्किन
उसे एक खूबसूरत मोड देकर छोडना अच्छा