भाग १ | २ | ३ | ४ | ५ | ६ | ७| ८ | ९ | १० | ११ | १२ | १३ | १४ | १५
अनेक बातम्यांबद्दल आपल्याला चर्चा करावीशी वाटते. खरं तर, ऐसी अक्षरेवर बातम्यांवर चर्चा करण्यासाठी बातमी नावाचा लेखनप्रकारही अस्तित्त्वात आहे. "ताज्या घडामोडी, अर्थकारण, राजकारण इत्यादी प्रकारच्या संस्थळाबाहेरील लिखाणाची चर्चा करण्यासाठी हा विभाग वापरावा. इथे मूळ लेखावरच्या शब्दसंख्येचे बंधन नाही; एखादी बातमी पसरवणे किंवा चर्चा घडवणे यासाठी हा विभाग वापरावा." असं तिथे स्पष्ट म्हटलेलंही आहे. पण, त्याबद्दल विस्तारानं लिहिण्याइतका किंवा एखादा व्यवस्थित चर्चाप्रस्ताव मांडण्याइतका वेळ किंवा माहिती किंवा उत्साह किंवा हे सारंच नसणं वगैरे कारणांमुळे आपण चर्चाप्रस्ताव लिहित नाही. शिवाय बऱ्याचदा "एकोळी" / नुसत्याच लिंका देऊन धागा काढायचंही जीवावर येतं.
तेव्हा अशा बातम्यांवर चर्चा करण्यासाठी, एकमेकांना अशा बातम्या लक्षात आणून देण्यासाठी, त्यांचे दुवे देण्यासाठी हा धागा काढत आहे. एखाद्या बातमीवर विस्तारानं चर्चा सुरू झाल्यास त्या संवादाचे वेगळ्या 'बातमी' धाग्यात रुपांतर केलं जाईल.
आधीच्या धाग्यात १५०+ प्रतिसाद झाल्यामुळे नवा धागा.
========
छोट्यांसाठी कॅलक्युलस
अटलांटिकचा हा लेख छोट्यांसाठी गणित शिकवण्याच्या अभिनव पद्धतीबद्दल रोचकपणे सांगतो, साधारणपणे लहान मुलांसाठी अवघड समजले जाणारे गणिताचे भाग सोप्या पद्धतिने लहानपणीच(५व्या वर्षीच) सांगितल्यास गणित शिकणे अनेकांसाठी एक रोचक क्रिया होउ शकेल. गणितक्षेत्रात मुलभूत काम करणार्या मारिआ ड्रुजकोव्हा(Maria Droujkova) म्हणजे पारंपारिक पद्धतिने लहानपणी गणित शिकणे(पाढे, बेरीज, वजाबाकी इ.) म्हणजे आर्मीमधे चमच्याने खंदक खणायला सांगतात त्याप्रमाणे आहे, त्यापेक्षा किचकट गणिती क्रिया सोप्या पद्धतिने(लेगो पद्धतिने घर बनविणे, ओरिगामी इ.) मुलांना समजावून सांगितल्यास गणिताचा पाया तयार होण्यास उत्तम मदत होउ शकेल. ह्याप्रकारे शिकवण्यासाठी मारिआ कॅलक्युलसची निवड करते आहे, कलॅक्युलसच का ह्यावर तीची टिप्पणी रोचक आहे -
It’s not the subject of calculus as formally taught in college,” Droujkova notes. “But before we get there, we want to have hands-on, grounded, metaphoric play. At the free play level, you are learning in a very fundamental way—you really own your concept, mentally, physically, emotionally, culturally.” This approach “gives you deep roots, so the canopy of the high abstraction does not wither. What is learned without play is qualitatively different. It helps with test taking and mundane exercises, but it does nothing for logical thinking and problem solving. These things are separate, and you can’t get here from there.”
गणित शिकण्याचे अनेक प्रकार उपलब्ध असले पाहिजेत असेहि ती म्हणते, त्या संदर्भातले हे रोचक विधान -
...No single piece of mathematics is right for everyone. People are different, and people need to approach mathematics differently.
For example, in a group learning about the properties of rhombuses, an artistically inclined person might prefer to draw a rhombus, a programmer might code one, a philosopher might discuss the essence of rhombi, and an origami master might fold a paper rhombus.
पालकांनीहि रोजच्या आयुष्यातल्या घटनांची सांगड गणिताशी घालून मुलांचा गणिती पाया पक्का केला पाहिजे हेहि मारिआ सांगते आहे.
एकंदर मारिआचा हा उपक्रम आणि लेख रोचक वाटला आणि पटला, इथल्या शिक्षण क्षेत्राशी संबंधीत लोकांच्या ह्यावरच्या प्रतिक्रीया वाचायला आवडतील.