मनातले छोटे मोठे विचार आणि प्रश्न - भाग ६

Part 1 | 2 | 3 | 4 |

ही धागामालिका आपल्या मनात येणारे, नेहमी नेहमी डोकावणारे विचार मांडण्यासाठी आहे. कधी कधी आशय फार मोठा नसतो. फार खोल विचार केलेला नसतो. तो विचार/ कल्पना/ प्रश्न/ गंमत डोक्यात येते, जाते. कधी कधी आपण विसरतो, कधी कधी ती ती पुन्हा पुन्हा येत असल्याने आपण विसरू शकत नाही.

यापूर्वीच्या धाग्यावरचे प्रतिसाद १०० च्या वर गेले आहेत म्हणून हा पुढचा धागा.
=============

ऐसीवर उपस्थित सदस्यांची आणि वाचकांची संख्या नेहमी जवळजवळ समानच असते. याचे दोन अर्थ होतात . एकतर इथे काय लिहिले चालले आहे यात रस असणारे फार कमी लोक जालावर आहेत. अन्यथा इथे येणारा प्रत्येक जण स्थलाच्या प्रेमात पडून इथला सदस्य होतो. यातला दुसरा भाग खरा तेव्हाच असेल जेव्हा ऐसीची एकूण सदस्यसंख्या रेस्पेक्टेबल असेल.

field_vote: 
3
Your rating: None Average: 3 (1 vote)

समजा मी पाच तारखेचा चेक दिला. बँकेत तो सकाळी प्रेझेंट झाला आणि मी दुपारी/संध्याकाळी बॅंकेत पैसे ट्रांसफर केले तर बॅंक सकाळीच चेक बाउन्स झाला म्हणून डीक्लेर करते कि दुसर्‍या दिवशी पर्यंत वाट पाहते? Technically I have given a check dated 5th and I have sufficient balance on the same date but after the time of presentation of the check. Will the check get bounced? Can the decision of the bank to bounce the check be challanged?

सही: पुरोगाम्यांना लॉजिक माफ असतं.

चेक वरची तारीख तो चेक वॅलिड असायचा पहिला दिवस असतो. त्या आधी तो चेक बेंक स्वीकारतच नाही असा अनुभव आहे.

- ऋ
-------
लव्ह अ‍ॅड लेट लव्ह!

मी तारखेबद्दल नाही, वेळेबद्दल बोलतोय.

सही: पुरोगाम्यांना लॉजिक माफ असतं.

आयडीयली, ज्या वेळी तुम्ही व्हॅलिड चेक बँकेत देता त्याक्षणी पुरेसे पैसे त्या अकाऊंटला असले पाहिजेत.
५ मार्चचा चेक म्हणजे तो ५मार्च ००:००:०१ पासून कधीही वठवला जाऊ शकतो असे तुम्ह दिलेले हमीपत्र

- ऋ
-------
लव्ह अ‍ॅड लेट लव्ह!

माझ्यामते आपण जेव्हा चेकवर तारीख टाकतो तेव्हा त्या दिवशी पहाटे ००:०० (मध्यरात्र १२ वाजता) ही वेळ तार्किक दृष्ट्या त्यात अंतर्भूत असते. त्यामुळे अकाउंटला सफिशियंट बॅलन्स पहाटे ००:०० अवर्सच्या आत (म्हणजे आदल्याच दिवशी) शिल्लक असणे आवश्यक आहे.

संध्याकाळपर्यंत थांबून मग चेक बाउन्स करणे अशी पद्धत नसावी.

परिस्थिती आणि रिलेशनशिपनुसार आणि रकमेच्या प्रचंडतेनुसार बॅंक अशावेळी गुडविलने ग्राहकाला फोन करुन असा चेक आल्याचे कळवते. ग्राहकाने त्वरित येऊन आजच्याआज रक्कम भरतो अशी तयारी दाखवली तर चेक होल्ड करुन रक्कम आल्यावर क्लियर केला जातो.

जर तातडीने असे होणार नसेल पण लवकरच रक्कम भरली जाणार असेल / अन्य इनकमिंग चेक क्लियरिंगमधे असेल तर चेक बाउन्स करताना "फंड्स एक्स्पेक्टेड प्रेझेंट अगेन" असा शेरा मारला जातो.

चेक वटल्यावर उरलेली रक्कम किमान रकमेपेक्षा कमी होत असली तरी बँक चेक नाकारू शकत नाही.

उदा. माझ्या खात्यात नियमानुसार किमान १००० रु ठेवावे लागतात. सध्या माझ्या खात्यात ५००० रु आहेत. मी ४८०० रुपयांचा चेक कुणाला दिला. तर हा चेक बँक नाकारू शकत नाही. [इन्सफिशिअंट बॅलन्स असे बँक म्हणू शकत नाही].

--------------------------------------------
ऐसीव‌रील‌ ग‌म‌भ‌न‌ इत‌रांपेक्षा वेग‌ळे आहे.
प्रमाणित करण्यात येते की हा आयडी एमसीपी आहे.

फार तर बॅलन्स कमी ठेवल्याबद्दल नंतर शे-दोनशे रुपये बँक दंड लावेल. पण चेक नाकारणार नाही.
स्वानुभव आहे.
माझी एका बँकेतील पगार खाते असण्याची छत्रछाया कंपनी बदलल्याने निघून गेली.
गहिराती स्वभावामुळे माझे तिकडे लक्ष नव्हते. मी 0 balance account च समजून चाल्लो होतो.
शिल्लक असलेल्या आख्ख्या रकमेचा चेक काही कामासाठी द्यावा लागला.
बँकेने तो वटवलाच. पण नंतर मागाहून येउन दंडाची रक्कम मागू लागले.
पण चेक वटाविण्यात अडचण आली नाही; हे खरे.
अर्थात त्यामुळे पूर्वीपेक्षा अधिक शिस्त लागली.

--मनोबा
.
संगति जयाच्या खेळलो मी सदाहि | हाकेस तो आता ओ देत नाही
.
memories....often the marks people leave are scars

माहितीपूर्ण.

जर तातडीने असे होणार नसेल पण लवकरच रक्कम भरली जाणार असेल / अन्य इनकमिंग चेक क्लियरिंगमधे असेल तर चेक बाउन्स करताना "फंड्स एक्स्पेक्टेड प्रेझेंट अगेन" असा शेरा मारला जातो.

म्हणजे बाउन्सचा चार्ज लागतो. आणि तोच चेक नंतर वठतो, दुसरा द्यावा लागत नाही. बरोबर?

पण ही पूर्णतः बँकेची मर्जी असते का? कारण चेक बाऊन्स होणे हा क्रिमिनल का सिविल (नक्की माहीत नाही) गुन्हा पण असतो म्हणे.

सही: पुरोगाम्यांना लॉजिक माफ असतं.

चेक बाऊंन्स होणे हा क्रिमिनल गुन्हा आहे.

पूर्वी हा नॉन-कॉग्निझायेबल ऑफेन्स होता, अर्थात कोर्टाने आदेश दिल्याशिवाय त्यावर FIR दाखल करता येत नसे.
२००६च्या कायदा दुरुस्ती नुसार, तो नॉन कॉग्निझायेबल राहिलेला नाही. ज्याला पैसे मिळायचे आहेत तो चेक बाउन्स झाल्यापासून ३० दिवसांत नोटीस पाठवू शकतो व त्यानंटर १५ दिवसांत पैसे दिले नाहित तर क्रिमिनल केस कोर्टात उभी राहु शकते.

- ऋ
-------
लव्ह अ‍ॅड लेट लव्ह!

हो.
परंतु काही अटी असतात....
चेक देणार्‍या व्यक्तीची व्हॅलिड लाएबिलिटी पाहिजे. देणगी म्हणून दिलेला चेक बाउन्स झाला तर गुन्हा दाखल होत नाही.

तसेच समजा चेक बाउन्स झाला तर लगेच नोटीस द्यायला हवी. सहसा आपण चेक देणार्‍याला फोन करतो. मग तो म्हणतो "तुम्ही चेक परत भरा, मी पैसे अ‍ॅरेंज करतो". असा पुन्हा भरलेला चेक बाउन्स झाला तरी नोटीस देण्याची एक महिन्याची मुदत पहिल्या बाउन्सपासून सुरू होते.

अधिक माहिती
.

--------------------------------------------
ऐसीव‌रील‌ ग‌म‌भ‌न‌ इत‌रांपेक्षा वेग‌ळे आहे.
प्रमाणित करण्यात येते की हा आयडी एमसीपी आहे.

सही जुळत नसल्याने चेक परत गेल्यास त्याला बाउन्स होणेच म्हणतात का ?
मला एकदा सही केल्यावर तशीच सही पुन्हा कधीच आजवर अक्रता आलेली नाही; दरवेळी चेक आला; की खात्री करुन घ्यायला बँकेतून फोन येतो; "चेक तुम्हीच दिला आहे ना" ह्याची चौकशी करायला.
तसे करणे त्यांना बंधनकरक अर्थातच नाही.
त्यांनी तो चेक तसाच नाकारला तर मी गोत्यात येण्याची शक्यता आहे का ?
माझी सही खूपच लांब असल्याने व त्यात विविध स्ट्रोक्सचा गुंता असल्याने असे होते असे मला बँकवाले वगैरे सांगतात.
मी म्हटलं सही निवडताना शालेय जीवनात माणूस इतका विचार करतो का ?

--मनोबा
.
संगति जयाच्या खेळलो मी सदाहि | हाकेस तो आता ओ देत नाही
.
memories....often the marks people leave are scars

बहुदा तो क्रिमिनल गुन्हा नाही. नक्की कल्पना नाही.
मात्र एक नक्की, बँकेतील सही बदलता येते.

- ऋ
-------
लव्ह अ‍ॅड लेट लव्ह!

सही जुळत नसेल तर चेकवर खोटी सही केली आहे असे समजले जाऊ शकते. म्हणूनच तुम्ही चेक दिला आहे का याची चौकशी बँक फोनवरून करते.

त्याला बहुधा बाउन्स चेक म्हणत नसावेत. बँकेने तुम्हाला विचारले आणि तुम्ही हो म्हणालात तर बँक (खात्यात पुरेशी रक्कम असल्यास) चेक पासच करील. खात्यात पैसे नसतील तर बँक चेक रिजेक्ट करील आणि ती 'इनसफिशिअंट फंड'चीच केस असेल.

सही चुकीची असेल आणि चेक तुम्ही दिला असेल (सोबत पेमेंट व्हाउचर वगैरेसह) तर कदाचित समोरचा तुमच्यावर 'इंटेन्शन टु चीट'ची केस लावू शकेल.

दोन्ही एकच आहेत असे मी दिलेल्या दुव्यावर म्हटले आहे. त्यात सापडू नये म्हणून चेक तुम्ही दिला नाही असा दावा तुम्हाला करून तो सिद्ध करावा लागेल.

Signature Not Matching
Signature on cheque not matching with the signature in the record of the bank is
treated as no different from “insufficient funds”. The following extract from Laxmi
Dyechem vs. State of Gujarat (MANU/SC/1030/2012) makes the position clear:
We find ourselves in respectful agreement with the decision in NEPC Micon Ltd.
(supra) that the expression "amount of money .... is insufficient" appearing in
Section 138 of the Act is a genus and dishonour for reasons such "as account
closed", "payment stopped", "referred to the drawer" are only species of that
genus. Just as dishonour of a cheque on the ground that the account has been
closed is a dishonour falling in the first contingency referred to in Section 138, so
also dishonour on the ground that the "signatures do not match" or that the
"image is not found", which too implies that the specimen signatures do not
match the signatures on the cheque would constitute a dishonour within the
meaning of Section 138 of the Act.
So, even if the cheque is returned with comments “Signature not matching”, action
can be initiated under section 138.

--------------------------------------------
ऐसीव‌रील‌ ग‌म‌भ‌न‌ इत‌रांपेक्षा वेग‌ळे आहे.
प्रमाणित करण्यात येते की हा आयडी एमसीपी आहे.

आपल्या महान एस बी आय मधे मी खाते उघडले. माझे दोन चेक बाउन्स झाले म्हणून ज्यांना दिले होते त्यांचे फोन आले. चौकशी केल्यावर सही जुळत नाही असे बँकेने सांगीतले शिवाय ४०० रु काटले. मी मला त्या न जुळणार्‍या सह्या दाखवा म्हटले. तर एकीकडे माझी सही आणि दुसरीकडे कोरी चिपाटी! त्यांनी माझी सही सेंट्रल सिस्टीम मधे अपलोड केली नव्हती!! मी म्हणालो ही तुमची चूक आहे, ज्या दिवशी चेकबूक दिले त्यादिवशी हे अप्लोड असायला पहिजे किंवा मला कल्पना द्यायला पाहिजे. पण त्यांनी मानले नाही. आणि त्यांना साधी खंतही नव्हती.

सही: पुरोगाम्यांना लॉजिक माफ असतं.

तुमच्यावर केस केली तर तुम्ही बँकेला तुमच्याबरोबर सहआरोपी करून घेऊ शकता.

सिग्नेचर नॉट मॅचिंग हे बँकेला कोर्टात सिद्ध करावे लागेल.

--------------------------------------------
ऐसीव‌रील‌ ग‌म‌भ‌न‌ इत‌रांपेक्षा वेग‌ळे आहे.
प्रमाणित करण्यात येते की हा आयडी एमसीपी आहे.

शिवाय तुम्ही इथे तक्रारही करू शकता. तुमचे पैसे परत मिळाले पाहिजेत असे वाटते.
शिवाय कन्युमर कोर्टातही जाऊ शकालसे वाटते.

- ऋ
-------
लव्ह अ‍ॅड लेट लव्ह!

तक्रार करण्याची फोन्/पेट्रोल्/वेळ इ इ कॉस्ट ४०० रु पेक्षा जास्त असावी. मी दुसरे चेक दिले. बाय द वे, चेक बाउअन्स झाला ही बँकेची तक्रार होती, मी ज्यांना चेक दिले त्यांनी केवळ 'असे झाले आहे' इतकेच सांगीतले.

सही: पुरोगाम्यांना लॉजिक माफ असतं.

तक्रार ऑनलाईन फुकटात करता येते. दुवा दिला आहेच

- ऋ
-------
लव्ह अ‍ॅड लेट लव्ह!

चेक वरची तारीख तो चेक वॅलिड असायचा पहिला दिवस असतो.

भारतात (भारतीय ब्यांकिंग नियमांप्रमाणे - आजतागायत बदलले नसल्यास) हे खरे आहे, याबाबत कल्पना आहे. इथे अमेरिकेत थोडा वेगळा प्रकार आहे. इथे 'पोष्ट-डेटेड चेक'ची संकल्पना नाही / ग्राह्य धरली जात नाही. ब्यांकेत प्रेझेंट करण्याच्या दिवशी - प्रेझेंट कधीही केला तरी - चेक ग्राह्यच धरला जातो. (अर्थात, जोपर्यंत चेक लिहिणार्‍याने त्यावर ष्टॉप पेमेंट ऑर्डर जारी केलेली नाही, तोवर.)

म्हणजे समजा, तुम्ही मला पुढच्या महिन्याची तारीख घालून चेक दिलात. मी समजा तो तुमच्या ब्यांकेला (थेट किंवा माझ्या ब्यांकेद्वारे, कसाही) आजच प्रेझेंट केला. तुमची ब्यांक तो चेक आजच ऑनर करेल. (नक्की खात्री नाही, पण तुमच्या ब्यांकेला बहुधा तो ऑन प्रेझेंटेशन ऑनर करावाच लागत असावा. इन एनी केस, इन प्र्याक्टिस, हमखास ऑनर केला जातो.) चेकची रक्कम क्लियर करायला आजमितीस तुमच्या खात्यात पुरेशी रक्कम नसल्यास ती तुमची डोकेदुखी अधिक मर्तिक आहे - त्या परिस्थितीत तुमचा चेक बाउन्स होईल, आणि त्याच्या परिणामांना तुम्हाला सामोरे जावे लागेल.

याची दुसरी बाजू म्हणजे, 'चेक व्हॅलिडिटी पीरियड'चीही संकल्पना नाही - किमानपक्षी वैयक्तिक चेक्सच्या बाबतीत तरी. म्हणजे, चेकच्या तारखेपासून इतक्याइतक्या दिवसांत चेक प्रेझेंट न केल्यास तो ऑपॉप गैरलागू होण्याचा प्रकार नाही - तो व्हॅलिडच राहतो. (नववर्षाच्या आरंभी अनेकजणांकडून जुन्या सवयीने चुकून चेकवर तारीख घालताना जुनेच वर्ष पडते - पक्षी, चेकच्या तारखेप्रमाणेच जायचे झाले, तर चेक लिहिताक्षणीच तत्त्वतः 'एक वर्ष जुना' व्हावयास हवा. परंतु त्यामुळे अशा चेकच्या ग्राह्यतेवर काहीही फरक पडत नाही.)

>>नववर्षाच्या आरंभी अनेकजणांकडून जुन्या सवयीने चुकून चेकवर तारीख घालताना जुनेच वर्ष पडते - पक्षी, चेकच्या तारखेप्रमाणेच जायचे झाले, तर चेक लिहिताक्षणीच तत्त्वतः 'एक वर्ष जुना' व्हावयास हवा. परंतु त्यामुळे अशा चेकच्या ग्राह्यतेवर काहीही फरक पडत नाही.

हे तर सर्वत्रच होते. फॅक्टरीतल्या उत्पादनांवर मॅन्युफॅक्चरिंग डेट म्हणून मागच्या वर्षीची पडते (कधीकधी एम्बॉस्ड स्वरूपात). अत्यंत ताजे प्रॉडक्ट एक वर्ष जुने असल्याचे भासते. बहुतेक वेळा रीपॅकिंग करावे लागते.

--------------------------------------------
ऐसीव‌रील‌ ग‌म‌भ‌न‌ इत‌रांपेक्षा वेग‌ळे आहे.
प्रमाणित करण्यात येते की हा आयडी एमसीपी आहे.

प्रतिसाद काढला आहे.

सही: पुरोगाम्यांना लॉजिक माफ असतं.

हा प्रतिसाद अरुण जोशी यांनी संपादित करून काढून टाकावा अशी विनंती.

--------------------------------------------
ऐसीव‌रील‌ ग‌म‌भ‌न‌ इत‌रांपेक्षा वेग‌ळे आहे.
प्रमाणित करण्यात येते की हा आयडी एमसीपी आहे.

प्रतिसाद काढून टाकायची अजिबात गरज नव्हती.
स्वतः व्यक्तीने जाहिर केलेली माहिती अरुणरावांनी इथे लिहिली तर काय चुकले ?
उदा :-
मनोबांनी विविध वेळी होम लोन साठी ब्यांकांकडे अर्ज केला आहे.
मनोबा सॉफ्टवेअर मध्ये आहेत. मनोबा कॉग्निझंट मध्ये होते.
इतकी सगळी माहिती मनोबांनीच विविध धाग्यातून व प्रतिसादातून लिहिली आहे.
मग हीच कुणी एकत्रित लिहिली तर काय चुकले ?
किंवा आक्षेप असेल त्याने जाहिर माहिती लिहावीच कशाला ?
श्विआय प्रतिसाद वस्तुनिष्ठ होता.
त्या काहीही दोषारोप वगैरे नव्हते.
का म्हणून काढायचा असा सरळ साधा प्रतिसाद ?

--मनोबा
.
संगति जयाच्या खेळलो मी सदाहि | हाकेस तो आता ओ देत नाही
.
memories....often the marks people leave are scars

प्रतिसाद काढायला माझी काही हरकत नाही.

त्यांची तितकी माहिती ऐसीकरांना आहे याची त्यांना कल्पना असावीच. पण कंपाइल केल्याने माझ्या मनात त्यांची जी प्रतिमा निर्माण होते तिचा त्यांचे प्रतिसाद वाचताना परिणाम होतो का असा विषय सुरु कालांतराने करायचा होता.

सही: पुरोगाम्यांना लॉजिक माफ असतं.

त्याऐवजी गेम मधला object बदलू.
तुम्ही अजून कुणाची माहिती कंपाइल करुन देउ शकता का ?
मझी दिलीत तर माझी काही हरकत असणार नाही.
(दोनेक दिवसात संपादकांना ती माहिती उडवायला सांगेन; पण दोनेक दिवस चर्चा होइअपर्यंत असू देत तशीच.)

--मनोबा
.
संगति जयाच्या खेळलो मी सदाहि | हाकेस तो आता ओ देत नाही
.
memories....often the marks people leave are scars

मी तुमच्याशी फोनवरही बोलतो कधीकधी. म्हणून तुमची जनरल आणि वैचारिक इमेज फार पक्की आहे मनात. तुमचं उदाहरण इतकं सयुक्तिक होणार नाही. प्रत्येकाची जी माहिती झाली आहे त्याने कोण काय लिहिणार आहे हे अगोदरपासूनच थोडे माहित झाल्यासारखे होत आहे. त्यामुळे वातावरण निरस होऊ शकते का असा विचार मनात आला. स्वतःची ओळख गुप्त राहावी असे वाटणार्‍या प्रत्येकास आपली कोणती कोणती माहीत सर्वज्ञात झालेले चालते असे वाटले. या दोहोंत काहीतरी लिंक असावी पण काय ती कळेना म्हणून खडा टाकून पाहिला.

सही: पुरोगाम्यांना लॉजिक माफ असतं.

ह्या प्रकाराला वेब स्टॉकर म्हणता यावे काय?

आज, ६ मार्च रोजी जगप्रसिद्ध हार्वर्ड विद्यापीटहची स्थापना झाली.
guam ह्या बेटाचा ऑस्ट्रेलियाच्या उत्तरेकडे शोध लागला; द्वितीय महायुद्धात इथे अमेरिका- जपान जोरदार लढाई झाली.
१८३४ मध्ये यॉर्क नावाच्या कॅनडियन शहराचे टोरांटो असे नामकरण झाले. न्यूयॉर्क सोबत घोळ होउ नये म्हणून असे केले गेले.
१९४४... बर्लिनवर दुसर्‍या महायुद्धात प्रथमच तुफान बॉम्बवर्षाव सुरु झाला.
१९४६ ... हो चि मिन्ह ह्या लोकप्रिय लढवय्या कम्युनिस्ट नेत्याच्या व्हिएतनाममधील सत्तेला फ्रान्सने मान्यता दिली.
ह्यानंतर हो चि मिन्ह ह्यांची लडहई प्रामुख्याने अमेरिकेशी सुरु होणार होती.
१९५७ घाना स्वतंत्र झाला.
१९६०...अमेरिकेने व्हिएतनाममध्ये सैनिक पाटह्वणार असल्याची घोषणा केली.
१९९०... रशियात पुन्हा खाजगी मालमत्तेचा अधिकार अस्तित्वात आला.

आता थकलो. नाहीतर भारतीय दिनविशेषही टंकले असते.

--मनोबा
.
संगति जयाच्या खेळलो मी सदाहि | हाकेस तो आता ओ देत नाही
.
memories....often the marks people leave are scars

वरील सुचवणीपैकी फक्त घानाच्या स्वातंत्र्यदिनाचा समावेश आजच्या दिनविशेषात केला गेला.
उरलेल्या घटनांचा का केला जात नाही ?

--मनोबा
.
संगति जयाच्या खेळलो मी सदाहि | हाकेस तो आता ओ देत नाही
.
memories....often the marks people leave are scars

भारतात पर्यटनासाठी आलेले विदेशी पर्यटक, भेटकर्ते पाहताना किंवा पाश्चिमात्य देशांतील बातम्या, पर्यटने इ पाहताना पाश्चात्य लोक मोठ मोठया सॅक्स घेऊन जाताना दिसतात. इतक्या मोठ्या बॅग्ज लादून जाण्याची भारतीयांची मानसिकता दिसत नाही.
पाश्चात्य स्त्रीया मोठ्या पिशव्या सहजी उचलून कितीतरी चालतात (किमान नॅट जिओवर). त्यामानाने भारतीय उच्चभ्रू स्त्रीयांना ओझ्याचे पूर्णतः वावडे दिसते.

सही: पुरोगाम्यांना लॉजिक माफ असतं.

काय म्हणता?

मग "पाऊल थकले, माथ्यावरती जड झाले ओझे..." हे गाणे कोणी लिहिले वो?

Wink

त्यांना शहरी स्त्रिया(!) म्हणायचे असावे, ग्रामीण भागात स्त्रिया कडेवर मुल आणि डोक्यावर हंडा/हंडे घेऊन सहज(!) वावरताना दिसतात. अर्थात शहरी स्त्रिया वजन उचलायला लागल्यास आपल्याकडच्या स्त्रिया कशा नाजूक नसतात वगैरे तक्रार येऊ शकतेच.

पुरुष असो वा स्त्रीया, भारतीय सुखवस्तु लोकांना जाडजाड पिशव्या उचलून मैलोनमैल चालणे आवडत नसावे. किल्ले तुडवणारे हौशी लोक फार जुजबी सामान घेऊन फिरायला जातात. तेच वेस्टर्न लोक खूप जास्त सामान घेऊन जातात. दिल्लीच्या रेल्वे स्टेशनवर आग्र्याला जाणार्‍या गोर्‍या लोकांकडे इतक्या मोठ्या बॅगा असतात याचे नवल नाही पण त्या नेहमी ते आरामात पाठीवर लादून चालतात. त्यांना ओझे कधी एकदा अंगावरून काढू अशी भारतीय भावना होत नसावी काय असे वाटते. असे प्रचंड ओझे लादून आरामात चालणारी भारतीय स्त्री पाहणे तर विरळेच.

सही: पुरोगाम्यांना लॉजिक माफ असतं.

प्रथम दर्शनी ते वेगळे वाटते खरे, पण माझ्यामते संस्कृतीप्रमाणे प्रवास-सवयी बदलतात आणि आपल्याकडे दिसणारे 'हे' पाश्चात्य लोकं त्यांच्या एकूण लोकसंख्येच्या काहिच टक्के आहेत, उर्वरीत पाश्चात्य लोक त्यांच्या देशात किराणाचे सामान शेल्फ-ट्रॉली-कार-शेल्फ ह्याप्रकारातच उचलतात.

त्याउप्पर ओझे न उचलण्याचा पर्याय असल्यास उचलण्याचे कष्ट का करावेत हे कळत नाही.

ते उच्चभ्रू स्त्रियांबद्दल म्हणतायत.....

--------------------------------------------
ऐसीव‌रील‌ ग‌म‌भ‌न‌ इत‌रांपेक्षा वेग‌ळे आहे.
प्रमाणित करण्यात येते की हा आयडी एमसीपी आहे.

अच्छा. त्याचं काय असावं की आपल्याकडे मनुष्यबळ स्वस्त असल्यामुळे, स्टेशनात उतरले की बाहेरील टॅक्सी स्टॅन्डपर्यंत जायला कुली मिळतो. खेरीज, बिल्डिंगपासून वर घरी सामान नेण्यासाठी नवरा असतोच!

मग हुच्च्भ्रू बायांनी फक्त आपली पर्स तेवढी सांभाळावी. कसे? Wink

मला वाटलं होतं कि गोर्‍या लोकांची (साधारणतः) अंगकाठी भारतीयांपेक्षा मजबूत असते.

सही: पुरोगाम्यांना लॉजिक माफ असतं.

'द हिंदू' या वर्तमानपत्रात गेले काही दिवस स्वयंपाकघरातील बदलांबाबत छान लेख आले होते. उदा. www.thehindu.com/features/homes-and-gardens/copper-iron-and-more/article...

असो. घरी बिडाचा (कास्ट आयर्न) तवा आणि कढई घेतली आहे. हे प्रकार प्री-सीझन्ड असल्याचा दावा कंपनीचा आहे. (टेफ्लॉन वगैरे विषारी आवरण नाही). या भांड्यांवर फरसबी, बटाटे, पोहे, टोमॅटो न घालता परतून केलेल्या भाज्या वगैरे बनवून पाहिले. छान झाले. चवीत जाणवण्याइतका फरक वाटतो. साध्या (अॅल्युमिनियमच्या) तव्यापेक्षा पदार्थ चवदार वाटतात. ही भांडी थोडे दिवस वापरल्यानंतर सीझनिंगची खात्री झाल्यावर सांबार, टॉमॅटो वगैरे आम्लयुक्त पदार्थ करण्याचा विचार आहे. एकदोनदा पोळ्या/भाकऱ्या भाजण्याचा प्रयत्न केला मात्र पहिली पोळी/भाकरी नेहमी चिकटते आणि दुसरी करपते असा अनुभव आला आहे. या तव्यांबाबत कोणाचे बरेवाईट अनुभव/सूचना असल्यास वाचायला आवडतील.

कास्ट आयर्न वर हमखास चांगल्या होणाऱ्या काही भारतीय पाककृती आहेत काय?

कास्ट आयर्न वर हमखास चांगल्या होणाऱ्या काही भारतीय पाककृती आहेत काय?
..........डोसा, उत्तप्पा.

पोहे न चिकटल्याने आता पुढचे पाऊल उचलून या आठवड्यात फ्राईड राईस व उत्तप्पा करण्याचा विचार आहे. (आमचे डोसे नॉनस्टिक तव्यावरही चिकटतात त्यामुळे अद्याप धीर झाला नव्हता)

डोसासाठी उकडा तांदुळ वापरताय की इडली रवा? तांदुळ:उडीद दाळ प्रमाण २:१ घ्या आणि अर्धी वाटी शिळा भात किँवा पोहे घाला. जर ते नको असेल तर प्रमाण जास्तीजास्त २.५:१ घ्या. त्यापेक्षा कमीजास्त नको. आणि पीठ एकदम स्मुथ वाटा. बोटांना रवाळ नाही वाटायला पाहिजे. गअॅस मिडीअम फ्लेमवर ठेवा, लो नाही.
@अदिती, करडा रंग दिसतोय म्हणजे माझ्या मते त्याच सिझनिँग निघुन गेलय.
@संपादक, हे तव्याबद्दलचे सर्व प्रतिसाद मनोबाच्या घरगुती प्रश्न धाग्यावर हलवता येतील का?

डोश्यासाठी मी गिट्झ डोसा पीठ (फक्त पाणी मिसळा) किंवा दुकानात तयार मिळणारे ब्याटर वापरत आहे. Biggrin

Smile जमत असेल तर एकदा हे ट्राय करुन पहा: सकाळी ९-१० वाजता तांदुळ २ वाटी आणि आणि उडीद दाळ १ वाटी वेगवेगळे तीनदा धुऊन भिजवायचे. संध्याकाळी ७-८ ला पाणी काढुन मिक्सरमधे सेपरेट स्मुथ पेस्ट होइपर्यँत वाटायचे. उडीद दाळीच पाणी टाकायच नाही. वाटताना गरज पडली तर ते चमचा चमचा टाकत रहायच. मग एकत्र करुन त्यात अर्धी वाटी शिळा भात किँवा भिजवलेले पोहे घालुन परत स्मुथ वाटायच. आणि उबदार जागी अंबायला ठेउन द्यायच. सकाळी पीठ फुगुन दुप्पट झाले असेल. त्यात चवीपुरत मीठ घालुन डोसे बनवायचे. डोसे तव्याला चिकटायला लागले तर उत्तपे बनवायचे Wink

उबदार जागेची अडचण आहे. मटकी किंवा मुगाला मोड आणण्यासाठी मी १०-१० सेकंद मायक्रोवेव्ह लावून उबदारपणा निर्माण करतो. (चांगले इंचभर लांब मोड येतात). मात्र ती युक्ती येथे चालणार नाही.

घरी भट्टी (ज्यात पाव, केक भाजतो) असेल तर ती मिनिटभर गरम करून त्यात भांडं ठेवायचं. किंवा भट्टीत दिवा असेल तर तो लावून पीठाचं भांडं आत ठेवायचं. (दुसऱ्या पद्धतीत, वेळेत दिवा बंद केला नाही तर पीठ उतू जातं. नंतर भट्टी साफ करण्याचे कष्ट वाढतात. त्यामुळे लक्ष ठेवा. शिवाय त्यात लेटन्सी असते, दिवा बंद केल्यावर एखाद तासानंतरही फुगणं सुरू राहतं. त्यामुळे मी पहिली पद्धत वापरते.) आणखी कुठे हे भांडं गरम पाण्यात ठेवायचं असंही वाचलं होतं, पण मी असा प्रयोग कधी केलेला नाही. काही लोकांनी लोकरीत गुंडाळून ठेवायचा सल्लाही दिला आहे. गॅसशेगडीच्या अगदी शेजारी पातेलं ठेवलं तर इतर अन्न शिजवताना फायदा होईल. मी हे कडधान्यांना मोड आणण्यासाठी बरेचदा करते. परिणाम किती होतो माहित नाही, पण मनाचं समाधान निश्चित होतं, मोड दिसतात.

अस्मि - मी पोळ्या करताना सीझनिंगची पर्वा करतच नाही. तेव्हा तवा कोरडाच असतो. तव्याचा जो भाग करडा झालाय, त्यावर हाताने तेल पसरवलं तर हाताला तो भाग सगळ्यात जास्त गुळगुळीत लागतो.
खरखरीत बोळ्याने बिडाची भांडी घासू नये असं म्हणतात. पण कडेला चिकटलेलं तेल आणि अन्न लागलं तर काढायचा आणखी पर्याय नसतो. म्हणून मी ते करते. पोटाच्या तक्रारी होत नाहीत. स्वच्छतेमुळे आणखी त्रास होईलसं वाटत नाही.

(वजनाबद्दल - तवा आम्ही दोघं कधीमधी मुद्गलासारखा फिरवतो, स्वतःचीच करमणूक होते. कढईचं वजन बहुदा पेलवेल. चिकट, ओशट भांडी घासायची मला किळस वाटत नाही, म्हणून अशी भांडी मलाच घासावी लागतात. "हौसे"ला मोल नसतं.)

---

सांगोवांगीच्या गोष्टी म्हणजे विदा नव्हे.

सकाळी ९-१० वाजता तांदुळ २ वाटी आणि आणि उडीद दाळ १ वाटी वेगवेगळे तीनदा धुऊन भिजवायचे. संध्याकाळी ७-८ ला पाणी काढुन मिक्सरमधे सेपरेट स्मुथ पेस्ट होइपर्यँत वाटायचे. उडीद दाळीच पाणी टाकायच नाही. वाटताना गरज पडली तर ते चमचा चमचा टाकत रहायच.

(१) तांदूळ आणि उडीदडाळ वेगवेगळे धुण्यावाटण्यामागील प्रयोजन काय?

(२) दहा तास भिजवत ठेवण्यामागील प्रयोजन काय?

(३) मोजून तीनदा धुणे, उडीद डाळीचे पाणी न टाकणे... ते होम्योपदीची औषधे मिसळताना एका विशिष्ट पद्धतीने हलविली नाहीत, तर गुण येत नाही म्हणतात, तशातला काही प्रकार आहे काय?

आणि उबदार जागी अंबायला ठेउन द्यायच. सकाळी पीठ फुगुन दुप्पट झाले असेल.

यीस्ट घातले, तर तोच इफेक्ट मोजून एका तासात आणता येतो.

============================================================================================================================

आमची 'नास्तिकाच्या ब्याटर'ची पुरुषी शॉर्टकट मेथड येणेंप्रमाणे:

(१) दोन वाट्या तांदूळ (घरात शक्यतो बासमती पडलेला असतो; अन्यथा अमेरिकेबाहेर कोणाच्या काकाने शुद्ध बासमतीचे इडली/डोसापीठ बनवले नसेल.) + एक वाटी उडीदडाळ एका मोठ्या बोल(बी-ओ-डब्ल्यू-एल)मध्ये काढून मिसळायचे.
(२) बोलमध्येच स्वच्छ वाटेपर्यंत पाण्याने धुवून घ्यायचे.
(३) चमच्याचमच्याने मिश्रण (पाण्याव्यतिरिक्त) मिक्सरात टाकायचे.
(४) मिक्सर चालवल्यावर ब्याटर फार पातळ होणार नाही, अशा अंदाजाने जेमतेम मिक्सरभांड्यातल्या मिश्रणाला 'मूव्हर' म्हणून काम करेल इतपत किंचित कोमट पाणी + चिमूटभर मीठ मिक्सरात टाकायचे.
(५) छान पेष्ट (बर्‍यापैकी स्मूथ पण अति स्मूथ नाही - किंचित ग्रेनीपणा राहील इतपत) बनवायची.
(६) ही पेष्ट एका बोलात (पुन्हा बी-ओ-डब्ल्यू-एल) काढून त्यात एक पाकीटभर बेकर्स यीष्ट घालून एकजीव होईपर्यंत चमच्याने ढवळायचे. (वाटल्यास यीष्ट टाकण्यापूर्वी चव घेऊन मिठाचे प्रमाण अ‍ॅडजष्ट करायचे.)
(७) पेष्टवाला बोल (स्पेलिंग अगोदर दिल्याप्रमाणे.) तासभर तसाच ठेवून लेट नेचर टेक इट्स कोर्स.

पीठ छान फुगून येते. इडल्या अप्रतिम बनतात. बाकी, डोसे बनविण्यातले आमचे स्किल यथायथाच असल्यामुळे (आमच्या सहधर्मचारिणीचे यातील स्किल आमच्या मानाने किंचित बरे आहे.) आमचे डोसे तरीही अधूनमधून चिकटतातच; पण बाजारच्या ब्याटरपेक्षा (आणि त्याहूनही गिट्सच्या ब्याटरपेक्षा) दर्जात जाणवण्याइतपत पॉझिटिव फरक दिसून येतो.

---------------------------------------------------------------------------------------------------------------------------------

आमचे लग्न नवेनवे होते तेव्हा एकदा घरातले दाणे संपले तर आमच्या धर्मपत्नीने घरातल्या कोठल्याशा बरणीत सापडलेल्या बदामांचे कूट करून भरल्या वांग्यांत घातले होते. तेव्हा क्लिंटनमामाचे राज्य होते; अमेरिकेत सुबत्ता होती. आजकाल परवडत नाही. (त्या काळी जॉर्जियात ८०-९० सेंटला ग्यालनभर पेट्रोल मिळे. आज सव्वातीन डॉलर भाव आहे, नि त्याला आम्ही 'स्वस्त' म्हणतो.)

तुमची 'झटपट नास्तिक डोसे' रेसिपी छानच आहे Smile
भारतात तांदुळ डाळ मधे बोरीक पावडर असते. त्यामुळे (कमीतकमी) तीनदा धुवायला सांगितले.
स्वच्छ दिसेपर्यँत धुवायचे प्रमाण तांदुळ आणि डाळीसाठी वेगवेगळे असू शकते. त्यामुळे वेगवेगळे धुवायला सांगितले.
आणि डाळ तांदुळ त्यांचते भिजत-फर्मेँट होत पडलेले असतात गपचुप. काय आपल्या मागेमागे भुणभुण करत फिरत नाहीत. त्यामुळे नेहमी झटपट रेसिपीच करावी असं काही नाही. मी फक्त पारंपारीक पद्धत सांगितली.

भारतात तांदुळ डाळ मधे बोरीक पावडर असते. त्यामुळे (कमीतकमी) तीनदा धुवायला सांगितले.

अमेरिकेत येणारा (देशी ग्रोसरी स्टोर्समध्ये मिळणारा, चांगल्या दर्जाचा) बासमती तांदूळ हा बहुतांशी भारतातूनच येतो. (भारतातून नाही आला तर पाकिस्तानातून येतो. तेच ते.) आणि उडीद डाळसुद्धा (कोठल्याही ब्र्याण्डची असली तरी) अंतिमतः भारतातूनच येत असावी, असे वाटते.

(बाकी, अमेरिकन - बोले तो नॉन-देशी - ग्रोसरी स्टोर्समधून क्यालिफोर्निया बासमती, टेक्समती वगैरे स्थानिक नॉव्हेल्टी उत्पादने वाटेल त्या किमतीला मिळतात, त्यांच्याकडे आम्ही ढुंकूनही बघत नाही. कोणता/तीही दक्षिणाशियोद्भव इन हिज़ ऑर हर राइट सेन्सेस बहुधा हेच करत असावा/वी.)

सांगण्याचा मतलब, आमचे येथील डाळ-तांदळांससुद्धा बोरिक पावडर लावलेली बहुधा सापडावीच, अशी शंका आहे. (तसेही, किडामुंगीचा संसर्ग न होण्याकरिता बोरिक पावडर - अथवा अन्य काही - लावणे हा प्रकार क्विन्टेसेन्शियली भारतीय नसावा, नाही का?)

स्वच्छ दिसेपर्यँत धुवायचे प्रमाण तांदुळ आणि डाळीसाठी वेगवेगळे असू शकते. त्यामुळे वेगवेगळे धुवायला सांगितले.

त्यातले सर्वाधिक प्रमाण दोन्हींना चालणार नाही काय? (इन एनी केस, आम्ही 'आपला अंदाज जगन्नाथ' मेथडॉलॉजी अवलंबतो.)

आणि डाळ तांदुळ त्यांचते भिजत-फर्मेँट होत पडलेले असतात गपचुप. काय आपल्या मागेमागे भुणभुण करत फिरत नाहीत. त्यामुळे नेहमी झटपट रेसिपीच करावी असं काही नाही. मी फक्त पारंपारीक पद्धत सांगितली.

त्याचे काय आहे, आमचे येथे तहान/आग लागल्यावर विहीर खोदावयास घेणे-संस्कृती नांदते अधिक (ऋद्धी-सिद्धींसारखी) पाणी भरते. त्यामुळे, शनिवारी सकाळी दहा वाजता इडली / डोसा खावासा वाटत आहे, हे आम्हांस (चुकून कधी शनिवारी सकाळी तितक्या लवकर उठलोच, तर) त्याच शनिवारी सकाळी आठाच्या आसपास सुचते. बरे, आमचे येथील कोठलेही देशी/दाक्षिणात्य उपाहारगृह तितक्या लवकर उघडत नाही. त्यामुळे दुसरा पर्याय नाही.

तसेही, ऐन वेळी मनुष्याच्या उपयोगास येणार नसतील, तर परंपरा काय कामाच्या?

==================================================================================================================================

त्याव्यतिरिक्त, 'महात्मा' या ब्र्याण्डखाली विकला जाणारा एक अतिशय घाणेरड्या दर्जाचा स्थानिकोद्भव तांदूळ मिळतो. तो माणसाने खाण्याच्या लायकीचा आहे, असे ज्याने कोणी ठरवले, त्या प्राण्यास शोधून काढून ही शुड बी टेकन औट अ‍ॅण्ड शॉट.

हे पाणी खोदावयास घेतलेल्या विहिरीचे किंवा अन्य कसले, हा मुद्दा येथे गौण आहे.

तांदुळाची पिशवी वाचून पहा. कदाचित त्यावर जादाचं अ आणि ड जीवनसत्त्व फवारलेलं असेल, त्याच्या दमड्या मोजतो तर ते फुकट घालवू नका.

साबुदाणे दोन तासांत भिजवायची काही "नास्तिक" टिप आहे काय?

---

सांगोवांगीच्या गोष्टी म्हणजे विदा नव्हे.

तांदुळाची पिशवी वाचून पहा. कदाचित त्यावर जादाचं अ आणि ड जीवनसत्त्व फवारलेलं असेल, त्याच्या दमड्या मोजतो तर ते फुकट घालवू नका.

माफ करा, पण अवांतर वाचनाची सवय आम्हांस नाही. ('...फक्त अवांतर लेखनाची आहे', असा एक खोडसाळ लोकप्रवाद आमच्या कानांवर आलेला आहे, परंतु त्यास आम्ही महत्त्व देत नाही.) सबब, क्षमस्व.

साबुदाणे दोन तासांत भिजवायची काही "नास्तिक" टिप आहे काय?

आमचे येथील साबूदाणा डिपार्टमेंट आम्ही (शक्यतो) हाताळत नाही. सबब, पुनरेकवार क्षमस्व.

साबुदाणा डिपार्टमेंटला पत्र पाठवून विचारणा करावी. पोष्टेजचा खर्च (वाटल्यास) आमच्याकडून मागून घ्यावा.

--------------------------------------------
ऐसीव‌रील‌ ग‌म‌भ‌न‌ इत‌रांपेक्षा वेग‌ळे आहे.
प्रमाणित करण्यात येते की हा आयडी एमसीपी आहे.

साबुदाणा लवकर न भिजण्याच्या काही कारणांपैकी (नवा/जुना साबुदाणा, हवेतली आर्द्रता इ.) एक म्हणजे पाणी सगळ्या साबुदाण्याला मिळत नाही. त्यासाठी मी एक करतो - साबुदाणा धुवून झाला की तो एकाच स्तरात पसरवितो. म्हणजे एखादे सपाट आणि मोठ्या क्षेत्रफळाचे भांडे (उदा. परात) घेऊन त्यात साबुदाणा सारखा पसरवितो. एकाच स्तरात असल्याने तो पूर्ण बुडेल/भिजेल इतकेच पाणी टाकणे सहज शक्य होते. यामुळे सगळे दाणे भिजतात. साहजिकच सगळे दाणे मऊ व्हायला लागणारा वेळही कमी होतो. काही काळाने दाणे कोरडे झाले असे वाटले, की एखादा पाण्याचा हबका मारायचा.

आता हे आस्तिक की नास्तिक ते तुम्ही जाणोत. Smile

पोहे आणि साबुदाणे भिजवण्यासाठी मला दगा न देणारी युक्ती म्हणजे पोहे एकदा व साबुदाणे दोनतीनदा धुवून घ्यावेत. धुवून झाल्यानंतर ज्या भांड्यात ते भिजायला ठेवले आहेत ते भांडे थोडेसे तिरके करुन पाहिल्यास किंचित पाणी दिसले पाहिजे. (पोहे चांगल्या दर्जाचे असल्याची खात्री असल्यास ते चाळणीसदृश भांड्यांमधेही भिजवलेले चालतात.) मात्र अनेकदा वातड पोहे नशीबी आल्याने ते मऊ करण्यासाठी वरील युक्ती चांगली आहे.

हम्म Smile
तसेही, ऐन वेळी मनुष्याच्या उपयोगास येणार नसतील, तर परंपरा काय कामाच्या? >> खरंय.
बादवे ते ऋद्धी आहे हे नविनच समजल. मी आतापर्यँत रिद्धी समजत होते.

'आपला अंदाज जगन्नाथ'

वाक्प्रचार लाइक करण्यात आलेला आहे. त्याचे इतर काही पाठ ऐकण्यात आले आहेत, पण तो विषय निराळा.

तसेही, ऐन वेळी मनुष्याच्या उपयोगास येणार नसतील, तर परंपरा काय कामाच्या?

तुमचं- आमचं जमलं!

जाता जाता, फ्रीझरमध्ये फ्रोझन इडल्या- सांबार ठेवणे अशा वेळी कामी येऊ शकत्ते.

>>भारतात तांदुळ डाळ मधे बोरीक पावडर असते. त्यामुळे (कमीतकमी) तीनदा धुवायला सांगितले.

भारतात फर्निचरसाठी प्लायवूड विकत घेतले की बोअरर मोफत पॅकेज म्हणून मिळतो तशी तांदुळाला बोरिक पावडर लावून मिळते असे वाटत नाही. उलट पोरकिडे मोफत मिळतात. Smile आम्ही घरी तांदूळ आणला की बोरिक पावडर लावतो.

--------------------------------------------
ऐसीव‌रील‌ ग‌म‌भ‌न‌ इत‌रांपेक्षा वेग‌ळे आहे.
प्रमाणित करण्यात येते की हा आयडी एमसीपी आहे.

(चुकून 'माहितीपूर्ण'ऐवजी 'मार्मिक' श्रेणी पडली. भावनांना समजून गोड मानून घ्यावी. असो.)

भारतात फर्निचरसाठी प्लायवूड विकत घेतले की बोअरर मोफत पॅकेज म्हणून मिळतो तशी तांदुळाला बोरिक पावडर लावून मिळते असे वाटत नाही. उलट पोरकिडे मोफत मिळतात. (स्माईल) आम्ही घरी तांदूळ आणला की बोरिक पावडर लावतो.

ओह!

पण मग, इन द्याट केस, आपण तांदळाला बोरिक पावडर लावलीच नाही (पोरकिडे नॉटविथष्ट्याण्डिंग), तर मग (एक्सेप्ट फॉर द सेक ऑफ पोरकिडे) तांदूळ धुवावेच लागू नयेत, नाही?

नाही म्हणजे, मी घरात आणलेल्या तांदळांना बोरिक पावडर लावत नाही. आणि माझ्या घरी येणार्‍या तांदळांत बाय डीफॉल्ट, ऑपॉप पोरकिडे येत नाहीत. (ते घरात आल्यावर नंतर कधीतरी, काही महिन्यांनी वगैरे कधीकधी होऊ शकतच नाहीत, असे म्हणणार नाही. पण घरात तांदळाची पिशवी आल्याआल्या (किंवा नंतरपर्यंतसुद्धा) पाहिलेले तरी नाहीत.

म्हणजे मग मी तांदूळ धुण्याची गरज नाही म्हणता? (पिशवीवर अवांतर वाचन करून पाहावयास हवे.)

'गिट्स' सगळ्यात हॉरिबल प्रकार. दुकानात तयार मिळणारे ब्याटर त्यामानाने खूपच बरे. पण घरगुती ब्याटरसारखे (तांदूळ + उडीद [२:१] + यीस्ट [बेकर्स] + पाणी [शक्यतो किंचित कोमट] + किंचित मीठ + मिक्सर/ग्राइंडर + एक तास [यीस्टला काम करू देण्यासाठी]) दुसरे बहुधा काहीही नसावे. (आम्ही तेच ब्याटर इडली आणि दोसा दोन्हींकरिता खपवतो.)

यीस्ट वापरण्याची युक्ती चांगली आहे. मुगाचे किंवा रव्याचे वगैरे डोसे घरचेच बनवतो. मात्र फर्मेंटेशन आवश्यक असणारे प्रकार घरी करण्याकडे अजून वळलो नाही

  

  यीस्टची युक्ती छान यशस्वी झाली. नाचणीचे जाळीदार डोसे (कमी तेलात) बनवता आले. एकही डोसा चिकटला नाही. डोश्याचे पीठ आणखी पातळ करुन योग्य प्रकारे सोडल्यास कुरकुरीत पेपर डोसा करण्यास अद्यापि वाव आहे असे मात्र दिसते.

पीठ फार फुगलं नसेल तर डोसे चांगले होतात. टेक्सन (किंवा भारतात नागपुरी) उन्हाळा असेल तर पीठ भसाभस फुगतं. कॉफी करायला ठेवताना पीठ चांगलं दिसतं आणि कॉफीचा कप सिंकमधे टाकायला जावं तर पीठ उतू जाताना दिसतं. अशा उतू जाणाऱ्या पीठाचे डोसे विचित्र होतात (किंवा मला करता येत नाहीत). पण त्यांच्या इडल्या मस्त होतात. ज्यांना सांबारात इडली बुडवून खायला आवडते, त्यांना आवडेलशा होतील इडल्या.

उडीद डाळीचं भिजवलेलं पाणी टाकू नये, कारण त्यात जीवनसत्त्व (ब आणि क) विरघळेली असतात.

मिक्सरची घरघर किंचित जास्त वेळ चालणार असेल तर सगळे डाळ-तांदूळ धुवायचे आणि मिक्सरमधेच भिजवून टाकायचे. -- अदितीआजीचा घरगुती सल्ला.

---

सांगोवांगीच्या गोष्टी म्हणजे विदा नव्हे.

@संपादक, हे तव्याबद्दलचे सर्व प्रतिसाद मनोबाच्या घरगुती प्रश्न धाग्यावर हलवता येतील का?

का? पुरेसे 'वैचारिक' वाटत नाही काय?

Smile घरगुती प्रश्न 'वैचारीक' नसतात असं मला अजीबात वाटत नाही. ती विनंती माझ्या आधीच्या विचारसरणीला अनुसरुनच होती. नंतर शोधायला सोपं पडेल म्हणुन, वैज्ञानिक प्रश्न, घरगुती प्रश्न आणि जनरल प्रश्न असे 'ऐसीला विचारा' प्रश्नांचे वेगवेगळे तीन धागे हवेत.

फ्राईड राईस ऊर्फ परतलेला भात करुन पाहिला. छान झाला होता. सुरुवातीची आले-लसणाची फोडणी थोडीशी चिकटल्यासारखी वाटत होती मात्र नंतर भात मिसळल्यावर ती फोडणी भाताला चिकटली व तवा लखलखीत दिसू लागला. Wink

अतिअवांतर: दुर्गभ्रमणगाथेतला एक किस्सा आठवला.

महादेवशास्त्री अन सुधाताई जोशी, गोनीदा, तसेच अजून एक गृहस्थ सोबत होते-त्यांचं नाव विसरलो Sad

कोण्या एका गडावर गेले, नाव विसरलेले गृहस्थ चूल पेटवू लागले ते काय होईना. मग सुधातै जोशी म्हणाल्या की मोडी कागदपत्रांतून कायबाय शोधणं निराळं अन चूल पेटवणं निराळं. मग पुढं त्यांनी यथाशक्ती चूल पेटवली अन भात बनवला. भात खाताना द-वन-हूज-नेम-आय-फर्गॉट म्हणाले की

"वैनीसायबांच्या हातचा हा बहुत बरवा भात भक्षून मला आमच्या लक्षुंबाईंच्या हातच्या भाताची सय येत्ये आहे."

आम्ही ओरडलों, "कथमेतत्?"

नाना(भौतेक कोड नेम नानाच असावं) शांतपणे म्हणाले,

"अहो लक्षुंबाई, बहुत तुमचा भात बरवा
मधीं राहे कच्चा, तळिंच जळला तोंडि हिरवा!"

हशाच्या खकाण्यांत पुढचा उत्तरार्ध बुडून गेला!!

इ.इ.

माहिष्मती साम्राज्यं अस्माकं अजेयं

हा एक जुना विनोद आठवला

अगागागागागा ROFL

पुढच्या होष्यमाणाचा अंदाज येऊ लागला आहे Wink ROFL

माहिष्मती साम्राज्यं अस्माकं अजेयं

आमच्या मातोश्री आणि पप्पूसुद्धा चांगला स्वयंपाक करत, असं आता अंधुकपणे आठवतं. लोकं आठवणी काढतात तेव्हा अशाच प्रकारच्या असतात. कोणाच्या मागे वाईट का बोला असं नाही, आठवणी निघतात तेव्हा मुद्दाम स्वयंपाकाचा विषय काढतात. माझ्या हातचं खाणाऱ्या बहुतेकशा लोकांनी आमच्या मातोश्री आणि पप्पू काळे का गोरे हे सुद्धा पाहिलेलं नसतं. त्यामुळे "हे सगळं गुणसूत्रांमधून आणि बालसंगोपनामधून असंच आलेलं आहे" असंच ठोकून देताना माझं काहीही बिघडत नाही. मी माझ्या मातापितरांची सबब यथेच्छ वापरून घेते. Wink

---

हे कार्टून निश्चित अमेरिकन असणार. मराठी लोकांचं स्मरणरंजन "आमची आई कशी उत्तम स्वयंपाक करायची", असं असतं. त्यात स्त्रियांच्या लेखनात "तस्संच सगळं केलं तरीही आम्हाला नाही जमत आईसारखं" अशी भर असते. => भारतीय संस्कृती फार्फार थोर आहे आणि अमेरिकन कसे तामसी अन्न खाऊन तामसी विचार करतात.

---

सांगोवांगीच्या गोष्टी म्हणजे विदा नव्हे.

आंबोळ्या छान होतात. लुसलुशीत.

-मेघना भुस्कुटे
***********
तुन्द हैं शोले, सुर्ख है आहन

अनुभव सांगितला ते छान.

फार काळजी घ्यावी लागते, यंत्र किंवा खरखरीत वस्तू वापरून धूता येत नाही, म्हणून आळसावून मी बीडाचा तवा वापरायचे बंद केले. आणि तवा नीट तापला नसेल, तर धिरडे/दोसा चिकटतातच - स्वयपाक्याच्या सगळ्या चुका माफ करणारे अवजार अजून उपलब्ध नाही!

चुरचुरीत फोडणी - विशेषतः लसणाची - लोखंडाच्या/बीडाच्या छोट्या कढईत केली तर चवीला छान लागते. ही लहानपणची आठवण... माझ्यापाशी लोखंडाची छोटी कढई नाही.

ह्या तव्यावर सुमारे ६-७ वेगवेगळे पदार्थ बनवूनही मी फक्त एकदाच साबण न लावता धुतला आहे. जालावर काही ठिकाणी वाचले कोणतीही वस्तू निर्जंतुक होण्यासाठी २०० फॅरनहाईट तापमान पुरेसे आहे. आणि तवा गरम असताना त्याचे तापमान ३००-४०० फॅरनहाईट तापमानापर्यंत जाते त्यामुळे स्वच्छतेच्या कारणासाठी धुण्याची गरज नाही. आधी चिकटलेले पदार्थ जळून नव्या पदार्थाचा स्वाद बिघडू नये इतपत स्वच्छता ठेवल्यास भागते. (पोट बिघडल्याशिवाय या दाव्याची अ-सत्यता पडताळता येणार नाही.) Wink

मी गेली दोनेक वर्ष बिडाचा तवा वापरते आहे. त्या कंपनीचाही दावा होता की भांडी प्री-सीझन्ड आहेत, आणि मी त्यावर आधी विश्वास ठेवला. त्यामुळे पोळ्या चिकटणे, डोसे चिकटणे वगैरे प्रकार झाले.

सुरूवातीला काही गोष्टी फार काळजीपूर्वक कराव्या लागल्या, ज्या अजूनही तशा लक्षात ठेवाव्या लागतात.
१. तवा चिक्कार तापेपर्यंत काहीही तव्यावर टाकायचं नाही. विशेषतः पोळी. पहिली पोळी कदाचित किंचित विचित्र भाजली जाते, पण पुढच्या नीट होतात. (हे आठवणीतून. कारण रुचीने पूर्ण गव्हाच्या पावाची पाकृ दिल्यापासून घरी पोळ्या करत नाही.) पण तवा नीट तापला असेल तर पोळ्या टाकल्या टाकल्या तव्यावरून सरकतानाही दिसतात, अगदी नॉन-स्टिकवर दिसतात तशाच. कदाचित हे दोनेक महिने वापरून वापरून झालं असेल.
२. डोेसे, उतप्पे, घावन घालताना सुरुवातीला तेल घालायचं. (स्वयंपाकी लोक पाणी मारून तव्याचं तापमान कमी करतात, ते बहुदा डोसा जास्त पसरता यावा म्हणून. मी मुळातच कमी पीठ घेते त्यामुळे डोसे आकाराने लहान झाले तरी चिकटत नाहीत. आणि तवा चांगला तापला असेल तर दोन-चार थेंब तेलही पुरतं.)

तव्यावर काही जळलं नाही किंवा अन्न चिकटलं नाही तर आठवड्यातून एकदाच तवा घासून धुते. घासायला बरेचदा स्टीलचा स्पंज वापरते. घासल्यावर तवा गरम करून ठेवते. म्हणजे गंजत नाही. तरीही खालच्या बाजूने गंज दिसतो, तो काही केल्या निघत नाही. वरची बाजू स्वच्छ आहे. स्वच्छ बाजू वापरून, पुन्हा वापरण्याआधी ही अशी दिसते. तो तवा तसाच झाकून ठेवून देते.

हल्ली पोळ्या होत नाहीत त्यामुळे तेल/तूप वापरलं तरी चालतं. डोसे, थालिपीठं, घावन वगैरे कुरकुरीतच होतात. एकदा काही थेंब तेल घातलं की दोन-चार डोशांना ते पुरतं; घावनांचंही तेच. थालिपीठात तसंही मला तूप आवडतं ते शिजवताना घालतेच.

तव्यावर जो करडा भाग दिसतो आहे, तो रंग वापरून-वापरून आला आहे. कडेचा भाग सगळ्यात कमी वापरला जातो, तो अजून चकचकीत आहे.

तुमचा अनुभव वाचून कढई घेण्याची लहर आली आहे कहर केला पाहिजे.

---

सांगोवांगीच्या गोष्टी म्हणजे विदा नव्हे.

चांगली माहिती. गंज घालवण्यासाठी व्हिनेगार + मीठ यांचा उपयोग होऊ शकतो असे ऑनलाईन काही ठिकाणी वाचले. मात्र पुन्हा सीझनिंग करण्यासाठी तेलाचे पॉलिमरायझेशन वगैरे प्रकिया चांगल्या प्रकारे होणे आवश्यक आहे असे एका विश्वासार्ह वाटणाऱ्या दुव्यावर दिसले. http://sherylcanter.com/wordpress/2010/01/a-science-based-technique-for-...

याच ब्लॉगवर काही विशिष्ट प्रकारचा 'गंज' हा तुमच्या भांड्याला संरक्षक व नॉनस्टिक प्रकृती देऊ शकतो असे दिसले. http://sherylcanter.com/wordpress/2010/02/black-rust-and-cast-iron-seaso...

सध्या तवा + कढई नवीन असल्याने त्याला प्रेमाने तेलाचा हात फिरवला जात आहे. मात्र हे कितपत करता येईल याचीही शंकाच वाटते. मला स्वतःला तव्यापेक्षा कढई जास्त आवडली. लसूण+खोबरे किंवा पोहे हे आमच्या जुन्या झालेल्या टेफ्लॉन कढईला हमखास चिकटत असत व पोह्याचा छान खरपूस पापुद्रा निघत असे (खरवड). मात्र बीडाच्या कढईला अगदी हलके चिकटले होते.

मला हे वाटतं का खरंच असं होतं माहित नाही. पण नॉनस्टिक पातेल्यापेक्षा अॅनोडाईज्ड कढईतले पोहे, उपमा चांगले लागतात. मलाही किंचित खरवड आलेली, आणि त्याचा वास आवडतात. बहुदा या कढईत तेल/तूप किंचित जास्त वापरावे लागतात. पण दोघांची वजनं वाढत नाहीयेत तोपर्यंत हरकत नाही.

बिडाच्या कढईत भाज्या वगैरे करता का? करून काढून ठेवाव्या लागतील, पण लगेच खायचं असेल तर हरकत नसावी. पण कढई धुवायलाही लागेल.

आणि तव्याबद्दल आणखी एक. हँडल चांगलं नसेल तर अव्हनचा ग्लव्ह किंवा मोठा नॅपकीन वापरणं विसरू नये. चुकून हातात गरम हँडल पकडलं तर चार-सहा दिवस सगळी बोंबाबोंब होते.

---

सांगोवांगीच्या गोष्टी म्हणजे विदा नव्हे.

नॉनस्टिक पातेल्यापेक्षा या कढईमधील पदार्थ निश्चितच चांगले लागतात. काही भाज्यांचा रंग बदलतो. (दोडक्याची रस्साभाजी केली होती त्याला किंचित काळसर रंग आला होता). मात्र बटाटे छान खऱपूस भाजले गेले. लसणाच्या फोडणीचा स्वाद यात अधिक खुलतो असे वाटते. भाज्या केल्यावर लगेचच खाल्या जात असल्याने काढून ठेवाव्या लागल्या नाहीत. रस्साभाजी वगळता इतर वेळी फक्त कढई पुसून ठेवून दिली.

गरम हँडलचा अनुभव कालच आला. शिवाय हा प्रकार बराच जड असल्याने मलाच हाताळावा लागतो Sad

१. टेफ्लॉन विषारी असतं या समजाला काही आधार आहे का?

२. पाट्यावर वाटलेल्या चटणीसारखं टेक्स्चर मिक्सरमधल्या चटणीला येत नाही असं म्हणतात.

३. चुलीवर केलेला भात सुद्धा जास्त चवदार लागतो. त्यातही चुलीतूनला धूर डोळ्यात गेला तर भाताची चव आणखी सुधारते असा अंदाज आहे.

४. असो.....

आमच्या नॉनष्टिक तव्यावर डोसे चिकटत नाहीत. तसेच सुमारे ३५ वर्षे नॉनष्टिक भांडी वापरण्याचा इतिहास आहे. अजून विषबाधा* झालेली नाही असे वाटते.

*आमच्या डोक्यावर झालेला परिणाम हा विषारी टेफ्लॉनमुळे नसावा असा अंदाज आहे.

--------------------------------------------
ऐसीव‌रील‌ ग‌म‌भ‌न‌ इत‌रांपेक्षा वेग‌ळे आहे.
प्रमाणित करण्यात येते की हा आयडी एमसीपी आहे.

१. टेफ्लॉन विषारी असतं या समजाला काही आधार आहे का?
नाही. जालावर वाचलेल्या वावड्या वगळता इतर शास्त्रीय आधार नाही. मात्र लोखंडी भांड्यांमध्ये शिजवलेले पदार्थ खाल्यास शरीरातील लोह (व पर्यायाने हिमोग्लोबिनचे) प्रमाण सुधारण्यास मदत होते. शरीरात शोषल्या जाणाऱ्या अॅल्युमिनियमचे तोटे अजून माहिती नसले तरी लोहाचे फायदे निश्चितच माहिती आहेल.

२. पाट्यावर वाटलेल्या चटणीसारखं टेक्स्चर मिक्सरमधल्या चटणीला येत नाही असं म्हणतात.

हे खरंच आहे. स्वयंपाकघरातील विज्ञान या डॉ. वर्षा जोशी यांच्या पुस्तकात स्वयंपाकघरामधील वेगवेगळ्या कृतींमागील रासायनिक प्रक्रिया सोप्या शब्दात समजावून सांगितल्या आहेत. ह्या पुस्तकाची मी नियमित उजळणी करतो. -> गूगल कॅशचा दुवा

पुस्तकातील परिच्छेदः

वाटणं या प्रक्रियेत पाटा-वरवंटा वापरणं, खलबत्ता वापरणं किंवा मिक्सर वापरणं असे पर्याय असतात. पहिल्या दोन्ही प्रकारांमध्ये पदार्थाच्या कणांवर जोराचा दाब देऊन त्याचे बारीक कण केलेले असतात. त्यामुळे त्यातील स्वाद चांगल्या प्रकारे बाहेर येतो. मिक्सरमध्ये कापण्याची क्रिया होऊन बारीक कण होतात. त्यामुळे स्वाद कमी प्रमाणात बाहेर येतो.

३. चुलीवर केलेला भात सुद्धा जास्त चवदार लागतो. त्यातही चुलीतूनला धूर डोळ्यात गेला तर भाताची चव आणखी सुधारते असा अंदाज आहे.

चुलीवर केलेला भात खाल्याचे आठवत नाही. मात्र वांगे निश्चितच चांगले लागते. धुरामुळे काही पदार्थांची चव खुलते. या कारणामुळे ह्या पदार्थांच्या स्मोक्ड फ्लेवर्ड आवृत्याही बाजारात विकत मिळतात.

४. असो.....

असोच. Wink

*आमच्या डोक्यावर झालेला परिणाम हा विषारी टेफ्लॉनमुळे नसावा असा अंदाज आहे.
**never attribute to malice that which is adequately explained by stupidity Wink Wink

१. टेफ्लॉन विषारी असतं या समजाला काही आधार आहे का?
नाही. जालावर वाचलेल्या वावड्या वगळता इतर शास्त्रीय आधार नाही. मात्र लोखंडी भांड्यांमध्ये शिजवलेले पदार्थ खाल्यास शरीरातील लोह (व पर्यायाने हिमोग्लोबिनचे) प्रमाण सुधारण्यास मदत होते. शरीरात शोषल्या जाणाऱ्या अॅल्युमिनियमचे तोटे अजून माहिती नसले तरी लोहाचे फायदे निश्चितच माहिती आहेल.
<<
यातील "मात्र"नंतरचा भाग मूळ 'नाही' पासून दिशाभूल करतो Smile
हे म्हणजे,
वाळ्याचे सरबत पिऊन माणूस झिंगतो याला आधार नाही, मात्र, वाईन प्याल्यावर शरिरातील लोह वाढते, ज्यातील लोहाचे फायदे ठाऊक आहेत. आजकाल प्लॅस्टिकच्या बाटलीत वाईन मिळते, त्यातल्या प्लॅस्टिकचे तोटॅ माहीत नसले तरी लोहाचे फायदे निशचितत माहिती आहेत... इ.

-: आमचे येथे नट्स क्रॅक करून मिळतील :-

हा वरचा प्रकार माझा यडपटपणा आहे. आता भोंदू डॉक्टर मंडळी लोखंड वाईट आहे असं म्हणत आहेत.

शेवटी अजो यांचे सगळे मुद्दे खरे ठरतील असा एक अंदाज आहे.

-: आमचे येथे नट्स क्रॅक करून मिळतील :-

डॉक्टर, वैज्ञानिक वगैरे भोंदू मंडळींवर (स्वतः खात्री केल्याशिवाय) विश्वास ठेवू नये हे आता पूर्णपणे पटले आहे.

एकदम आंखो देखी? नाही, म्हणजे तुम्हाला काही वाईट अनुभव आले असतील, पण एकदम सगळ्यांना सरसकट भोंदू म्हटलं नाहीत तर बरं होईल. निदान न्यूटन आइन्स्टाईन वगैरे मंडळींना तरी बिनभोंदू क्याटेगरीत टाका. बघा जमतंय का...

अगदीच भोन्दू नाही पण त्यांच्याबाबत थोडं शंकेखोर असायला काय हरकत आहे. न्यूटन किंवा आईनस्टाईन यांची मतं कधीच खोटी ठरणार नाहीत - किंवा निव्वळ ती न्यूटन अथवा आईनस्टाईन यांची असल्यानं कायमस्वरुपी खरीच असावीत - असा आत्मविश्वास आपल्याला नाही ब्वाॅ.

नावं सोयीसाठी घेतली होती, त्यातून 'बाबा वाक्यं प्रमाणं' वगैरेशोधण्याची गरज नाही. मुद्दा असा, की अचानक गुरुत्वाकर्षण नाहीसं होऊन न्यूटनचे नियम बदलावे लागतील असं तुम्हाला वाटतं का? किंवा, इतरांना लागू पडत असेल गुरुत्वाकर्षण, पण माझं मी ठरवेन, असं म्हणत तुम्ही चौथ्या मजल्यावरून उडी नाही ना मारण्याचा विचार करत? न्यूटन व्यक्ती म्हणून जाऊदेत, त्याच्या नियमांत तुम्हाला भोंदू काही सापडलंय का? पुढे सापडेलही, असं खरोखर मनापासून वाटतं का?

मुद्दा असा, की अचानक गुरुत्वाकर्षण नाहीसं होऊन न्यूटनचे नियम बदलावे लागतील असं तुम्हाला वाटतं का?

नाही

किंवा, इतरांना लागू पडत असेल गुरुत्वाकर्षण, पण माझं मी ठरवेन, असं म्हणत तुम्ही चौथ्या मजल्यावरून उडी नाही ना मारण्याचा विचार करत?

नाही

न्यूटन व्यक्ती म्हणून जाऊदेत, त्याच्या नियमांत तुम्हाला भोंदू काही सापडलंय का?

नाही

पुढे सापडेलही, असं खरोखर मनापासून वाटतं का?

हो

गुरुत्वाकर्षण आणि आरोग्य/अन्नपदार्थांशी संबंधीत शास्त्र यात फरक आहे. गुरुत्वाकर्षणाच्या नियम/थेऱ्या/संशोधने यांनी लोक आपल्या आयुष्यातले निर्णय बदलत नाहीत. आरोग्यशात्रातील संशोधनाने लोक आपले विकल्प बदलतात. आईन्स्ताईनने न्युटनचा सिद्धांत सुधारित करत (का खोडत? ) त्याचा गुरुत्वाकर्षणाचा सिद्धांत मांडला/तो सिद्ध झाला याने नॉर्मल लोकांच्या आयुष्यात काहीही बदल झाला नाही. पण अंड्यातलं पिवळं आरोग्याला वाईट/रेड मीट वाईट/सॅचुरेटेड फॅट वाईट/मुसली चांगलं/फ्रुट ज्युस आरोग्यदायी अशा संशोधनाने/दाव्याने फरक पडला. लोकांनी आपले आहार त्याप्रमाणे बदलले.

आधी रोटी खाएंगे, इंदिरा को जिताएंगे !

लोकांनी न्यूटनचे नियम आधीच आपल्या आयुष्यात गृहित धरून त्यांनुसार बदल केलेले आहेत आणि ते उपयुक्त आहेत. आरोग्यशास्त्रातलं संशोधन अर्थातच तितकं अचूक नसल्यामुळे योग्य नियम शोधायला वेळ लागतो. पण म्हणून सरसकट सगळ्याच शास्त्रांना आणि तज्ञांना 'भोंदू' लेबल लावणं योग्य नाही. केवळ फॆनफॊलोइंगच्या जोरावर अशास्त्रीय सल्ले देऊन पैसा कमावणारे भोंदू सगळीकडेच सापडतील. पण म्हणून वैज्ञानिक पद्धतीवर आधारित संशोधन करणारे शास्त्रज्ञ एकजात भोंदू ठरत नाहीत.

वैज्ञानिक पद्धतीवर आधारित संशोधन करून कोलेस्टेरॉल वाईट आहे, किंवा कॉफी चांगली आहे असे (चुकीचे) निष्कर्ष काढणारे शास्त्रज्ञ भोंदू मानावेत का?

सर्वांना एकजात भोंदू मानू नये हे मान्यच आहे. मात्र केवळ डॉ. किंवा तज्ज्ञ अशी पदवी लावल्याने अक्कल येते असा गैरसमज नसावा. किंबहुना अशी पदवी लावणारे लोक हे जास्त झापडबंद असण्याची शक्यता असल्याने त्यांच्याबाबत जास्त शंकेखोर असणे आवश्यक आहे हे किमान आजकाल पदोपदी जाणवते. तिथं स्वतः चे अनुभव कायम पडताळून पहावेत.

सत्य, असत्याशी मन केले ग्वाही, मानियले नाही बहुमता हे तुकोबावचन आहे ते कायम ध्यानात ठेवावे.

"कोलेस्टेरॉल वाईट आहे" हा निष्कर्ष कोणत्या स्वरूपात काढलेला होता हे मला ठाऊक नाही पण ज्या अर्थी डब्लू एच ओ ने त्यावर आपले धोरण बेतले होते त्यामुळे "तशा स्वरूपात" निष्कर्ष काढलेला असावा.

परंतु कॉफी चांगली, वाइन चांगली वगैरे निष्कर्ष जरी अशा स्वरूपात पेपरमध्ये वाचायला मिळाले तरी त्याचा मूळ निष्कर्ष "रिस्क ५ टक्के कमी झाली किंवा वाढलेली दिसली" अशा स्वरूपाचे असतात. ठामपणे चांगली किंवा वाईट असे निष्कर्ष काढणे शक्य आहे असे वाटत नाही. ते पॉप्युलर माध्यमांतून तसे प्रेझेंट केले जातात.

न्यूट्रिशनिस्ट नामक जे व्यावसायिक असतात (दिवेकर टाइप) त्यांची काही रेकग्नाइज्ड फॉर्मल बॉडी ऑफ नॉलेज आहे का? (भारतात किंवा परदेशात?)

--------------------------------------------
ऐसीव‌रील‌ ग‌म‌भ‌न‌ इत‌रांपेक्षा वेग‌ळे आहे.
प्रमाणित करण्यात येते की हा आयडी एमसीपी आहे.

(या धाग्यामुळेच म्हणा) पुन्हा बिडाचे तवे वापरायला काढले. नॉनस्टिकच्या तव्यापेक्षा पोळ्या करणे सोपे गेले.

याचे कारण बहुधा पुढील मुद्द्यांचा मिलाफ
१. तव्याचा निर्लेपपणा तर आहेच (हे वेगळे नाही)
२अ. तव्याचे वजन माझ्याकडील नॉन्स्टिक तव्यापेक्षा पुष्कळ जास्त आहे
२आ. लोखंडाची विशिष्ट उष्णता (स्पेसिफिक हीट) माझ्यकडील नॉन्स्टिक तव्याच्या अ‍ॅल्युमिनियमपेक्षा अधिक आहे.
त्यामुळे तव्याचे तापमान तवाभर् बरेच अमसमान असते, आणि पोळी टाकल्यावर कच्च्या पोळीच्या खाली फारसे बदलतही नाही. असे असल्यामुळे शेकून ज्या थिकाणी पहिले डाग पडतो, त्या ठिकाणी पोळी चिकटत नाही. (माझा नॉनस्टिक तव्यांचा असा अनुभव आहे, की दोन-तीनदा पोळ्या केल्यावर त्यावर पुढच्या खेपांना पोळ्या अधिकाधिक चिकटू लागतात. यात माझी चूक असणारच. पण बीडाच्या तव्याबाबत असे झाले नाही.)

निष्कर्ष : आतापासून मी पोळ्यांकरिता बीडाचा तवा वापरणार आहे.

(आंबोळी-धिरडी वगैरे प्रयोग कधीतरी करेन.)

भाकरीसुद्धा करायला सोपी गेली.

ऑम्लेटे / अंड्याच्या पोळ्या सुद्धा झकास होतात. दणदणीत नाश्ता होतो. Wink

हपीसात काम करताना कोणी आजूबाजूला मोठ्यामोठ्याने बोलत असेल / जवळ प्रिंटर खरखरत असेल तर एकाग्रता होत नाही. हा प्रातिनिधिक अनुभव असावा. त्यावर काय उपाय करता?

कोणी हेडफोनांवर संगीत ऐकतं का? कोणतं?

********
It is better to have questions which don't have answers, than having answers which cannot be questioned.

मी नुस्ताच हेडफोन लाऊन बसतो. थोडा फायदा होतो.

आधी रोटी खाएंगे, इंदिरा को जिताएंगे !

मलापण हापिसात असताना हा त्रास व्हायचा. पण आता लक्षात आलय की इनजनरलच मोठ्या आवाजाचा त्रास इतरांपेक्षा जास्त होतो. मी आजकाल आवाज ट्युनआउट करायचा प्रयत्न करते. try to distract yourself with some other thought.

हा एक प्रकारचा मानसिक आजार आहे (जो माओच्या बायकोला होता) किँवा मी HSP आहे.

www.en.wikipedia.org/wiki/Jiang_Qing वरुन साभार
Staff were assigned to chase away birds and cicadas from her Imperial Fishing Villa. She ordered house servants to cut down on noise by removing their shoes and avoiding clothes rustling.

HSP बद्दल ही एक रोचक लिँक मिळाली www.psychcentral.com/blog/archives/2012/05/13/10-tips-for-highly-sensiti...

उपाय :-
ऑफिस बदला!

--मनोबा
.
संगति जयाच्या खेळलो मी सदाहि | हाकेस तो आता ओ देत नाही
.
memories....often the marks people leave are scars

अगदी अगदी. मी अनूप ढेर्‍यांकडून हा प्रतिसाद अपेक्षिला होता. पण त्यांनी भ्रनि केला. Wink

********
It is better to have questions which don't have answers, than having answers which cannot be questioned.

भ्रनिमनीच्या गोष्टी ROFL

भ्रनि शब्द आवडला.

माहिष्मती साम्राज्यं अस्माकं अजेयं

शिवाय अजून एक उपाय .

आपण जमेल त्या साहित्याने प्रिंटर पेक्षा मोठी खरखर सुरु करायची.
आपल्याला प्रिंटर डिस्टर्ब करतो तसच आपण त्याला डिस्टर्ब करायचं .
किंवा लड , सुतळी बॉम्ब असं काहीतरी नेउन हापिसात फोडायचं.
इतरांच्या गोंधळाला आपण गोंधळानं उत्तर द्यायचं.
लोहा लोहे काटता हय.
किंवा गाडह्वाचं ढँचू ढॅचू रेकॉर्ड करुन कर्कश्श आवाजात ताकतवान स्पीकरच्या साह्यानं ढणाणा बडावायचं.

--मनोबा
.
संगति जयाच्या खेळलो मी सदाहि | हाकेस तो आता ओ देत नाही
.
memories....often the marks people leave are scars

किंवा गाडह्वाचं ढँचू ढॅचू रेकॉर्ड करुन कर्कश्श आवाजात ताकतवान स्पीकरच्या साह्यानं ढणाणा बडावायचं

व्हॉटॅनय्डिय्या!!!

अशा आवाजाचं रिंगटोन बनवयचं आणि ऑफिसातील लॅन्डलाईनीवरून आपल्यालाच फोन करीत बसायचे!

Biggrin
आलं होतं डोक्यात, पण म्हटलं तुम्हाला परत तोच सल्ला काय द्यायचा.

आधी रोटी खाएंगे, इंदिरा को जिताएंगे !

मी डोसे करताना काही अधिकच्या गोष्टी करतो.

१.
अ. एका वाटीत मीठाचं पाणी तयार करतो (अर्धा वाटी पाणी नी थोडं (अर्धाचमचा) मीठ). दुसर्‍या वाटित तेल घेतो.
ब. नारळ फोडताना नारळाच्या शेंडीचा मोठा बहग वेगळी काढलेली असतो, तो धुवून घेतो.

२. बिडाचा तवा उत्तम तापावा लागतो. तरीही पहिला डोसा चिकटतोच (कारण कळलेले नाही, पण म्हणून), पहिल्या डोशाच्या नावाने एक लहान चमचा (१ टेस्पु) पीठ टाकून, चिकटु देतो. Smile त्यानंतर जणु पहिला डाव देवाला/भुताला/तव्याला असं करून झालं की पुढिल डोसे अतिशय छान होतात

३. पुढिल डोसे टाकायची कृती: आधी तव्यावरून नारळाच्या शेंडीने/काथ्याने मीठाचे पाणी मारतो व त्यानेच (शेंडीने) आधीचे चिकटलेले डोके उकरून काढतो. मग सुरवातीच्या डोशांना थेंब-दोनथेंब तेल टाकतो. मग डोसा पीठ टाकल्यावर एका वाटीने बर्‍यापैकी अधिक दाब देत जलद वेगात ने पीठ पसरवतो. दाब इतका हवा की त्याच जागी पुन्हा वाटी टेकवावी लागु नये. या पद्धतीने हॉटेलातल्यासारखे पातळ डोसे होतात.

समांतरः त्यावर "मुळात" डोसे इतके पातळ नसतातच मुळी म्हणून नाक उडवले जाते त्याकडे दुर्लक्ष करावे Wink

- ऋ
-------
लव्ह अ‍ॅड लेट लव्ह!

मज्जासंस्थेला 'मज्जा'संस्था का म्हणतात? Smile

तोतरे लोक स्वतःच्या कल्पनेत किंवा स्वप्नात अस्खलित , सरळ साधं - विनाअडथळा बोलू शकत असावेत का ?
की ते स्वतःच्या कल्पनेतही अडाखळत बोलतात ?
(मी माझ्या कल्पनेतही शाकाहारीच आहे. मी पाहिलेल्या स्वप्नातील काही दृश्यात मी खात होतो ते सगळे आयटम आजवर शाकाहारीच होते. म्हणजे मी जसा आहे, तसाच मी माझ्या स्वप्नात असतो का ? )
.
.
काही क्लासमेट्स एका महोत्सवात स्कीट करत असताना लै दंगा झाला होता महाविद्यालयीन जीवनात.
प्रेमात पडलेला तोतरा अशी एक थीम होती. त्यात एक मुलगी, एक तोतरा व तोतर्‍याचा alter ego अशी तीन पात्रे होती.
फरक करता यावा म्हणून तोतर्‍अयचा alter ego; स्वतःच्या कल्पनेतला तोतरा अस्खलित बोलताना दाखवायचा असे घाटत होते. पण दोन्ही साइडनी त्यात बरेच वादंग झाले.
शेवटी बरीच भवती न भवती होउन तोतर्‍याच्या आल्टर इगोचे डायलॉग रद्द केले.
पण ते काम करणार बेनं इतकं भन्नाट होतं; की नुसत्या हावभावावर, मुद्राभिनयावर छाप मारुन गेलं पब्लिकवर.
स्कीटमधले मुख्य हिरो-हिरोइन पडले बाजूलाच.

--मनोबा
.
संगति जयाच्या खेळलो मी सदाहि | हाकेस तो आता ओ देत नाही
.
memories....often the marks people leave are scars

मनात/स्वप्नात ते तोतरे बोलत नाहीत. 'द किंग्ज स्पीच' हा अफलातून चित्रपट पहावा असे सुचवतो

- ऋ
-------
लव्ह अ‍ॅड लेट लव्ह!

तोतरे बोलणे वचनसंस्थेच्या तृटींमुळे असते. माझ्यासमोरचे लोक तोतरे बोलत नसतील, आणि तोतरे न बोलणे, वा नीट बोलणे काय आहे हे मला माहीत असेल तर मनात नीट बोलायला यायला हरकत नसावी.

पण याहून रोचक केस आहे ती दृष्टीची. जन्मतः आंधळ्या लोकांना स्वप्ने दिसतात का यावर याहूवर वेगवेगळी उत्तरे आली आहेत. या लोकांना visual imagery दिसत नाही आणि स्वप्न हे इतर इंद्रियांच्या जाणिवांच्या रुपात दिसते असे काही म्हणतात. इथे हेलेन केलरला दिसलेला कोल्हा, तिने त्याची काढलेली आकृती (हे मी म्हणतोय्)आणि आपल्याला दिसलेला कोल्हा हे सारखे असणे आवश्यक आहे. शिवाय तिने लहानपणी खेळण्यात इ इ कोल्हा कधीच न स्पर्शिलेला हवा (कारण त्याने तिने काय पाहिले हे स्पर्शाधारित अंदाज आहे कि वास्तविक मेंदूत प्रोससली जाते ती प्रतिमा आहे हे कळणार नाही.)
http://answers.yahoo.com/question/index?qid=20070207191145AA4RFwu
या प्रश्नावर संशोधन चालू आहे. पण जन्मजात अंध लोकांना दृष्टीहिन स्वप्न पडते ही सद्य मान्यता आहे.

सही: पुरोगाम्यांना लॉजिक माफ असतं.

२००१ चा २६/११ चा इतिहास अमेरिका शाळेत कसा शिकवत असावी.
१. कोणत्या इयत्तेत या घटनेचा पहिला उल्लेख येतो? कोणत्यात विस्तृत?
२. या धड्याचा मथळा काय असावा?
३. इथे मुस्लिम विश्व कसे रंगवले असावे?
४. मागे कधी तालिबानला अमेरिकेचा पाठिंबा होता हे अप्रत्यक्षरित्या तरी लिहिलेले असते का?
५. शाळेत काय शिकवतात आणि स्थानिकांनी दिलेल्या माहितीवरून जी मते आहेत त्यात तफावत आहे का?

सही: पुरोगाम्यांना लॉजिक माफ असतं.

२६/११ नव्हे, ९/११.

अमेरिकास्थित ऐसीकर, ज्यांची मुले शाळेत जात आहेत, त्यांच्याकडून उत्तरांची अपेक्षा!

(स्वगत - तुम्हाला फारच प्रश्न पडतात बॉ!)

(स्वगत - तुम्हाला फारच प्रश्न पडतात बॉ!)

मला ५० प्रश्न पडले कि एक प्रश्न मी ऐसीवर टाईप करतो.

सही: पुरोगाम्यांना लॉजिक माफ असतं.

इतके प्रश्न कसे पडतात?
पडणं बरोबर आहे का?
पडायला वेळ कसा मिळतो ?
उद्योग धंदा नाही का ?
प्रश्न पडणार्‍यांना आणि ते लिहिणार्यांना रिकामटेकडे समजू नये का ?
प्रश्न पडणे म्हणजेच शंका असणे असे आहे का?
शंका कधी उत्पन्न होते?
ती घटनेतून उद्भवते की विचारातून?
विचार हा अवकाशस्थ असतो की सिस्टेमॅटिक मेथड असते?
ती सिस्टेमॅटिक असेल तर रँडम थॉट्स असे काही असणे शक्य आहे का?
ते सिस्टेमॅटिक नसेल तर आपण सगळे १००% विसंगत आचरण सदैव कसे काय करीत नाही ?
आचरणामुळे विचार प्रभावित होतात की विचारामुळे आचरण?
हे दुष्टचक्र आहे का?
दुष्टचक्र असेल तर सुष्टचक्र कसे असते ?
चक्रे नेमकी कोण फिरवते?
चक्रे पालटावायची असली तर कोनत्या बिंदूपासून पालटावीत?

--मनोबा
.
संगति जयाच्या खेळलो मी सदाहि | हाकेस तो आता ओ देत नाही
.
memories....often the marks people leave are scars

तरीच मनोबा नी अजो 'अक्षावरचे मित्र' आहेत Wink

बाकी अजोंचे प्रश्न आहेत बाकी नेमके. उत्सुकता आहेच

- ऋ
-------
लव्ह अ‍ॅड लेट लव्ह!

योजना आयोग, निर्वाचन आयोग, सुचना आयोग चे ऑडीट कॅग करते अशा लिंका (वा एक लिंक) प्रत्यक्ष वा अप्रत्यक्ष सुचवणारी जालावर नसावी म्हणजे किती वाईट?

सही: पुरोगाम्यांना लॉजिक माफ असतं.

*दोश्यांसाठी तांदुळ भिजत घालतानाच पाव टी स्पून मेथी दाणे घालतात आणि त्या बरोबर वाटुनही घेतात, छान चव येते !
*चावल/ तांदुळ शक्यतो जुनाच आणि हलक्या दर्जाचा वापरावा. तांदुळ जुना झाल्या शिवाय त्यात पोरकिडे होत नाहित त्यामुले पोर किडे असतील तर तो तांदुळ जरुर वापरा (अर्थात स्वच्छ करून).
*दाळ भिजवलेले पाणी,दाळ वाटताना वापरा किंवा चटणी/ साम्बार मधे वापरावे.
*तांदुळ भिजवलेले पाणी सुद्धा वापरावे. काही स्त्री रोगात हे पाणी घरेलु उपाय म्हणुन कामी येते.
* डोसे करताना वरुन बटर किंवा साजुक तूप लावून त्यावर थोड़ी साखर, वेलची पुड पसरा, मुलाना नक्कीच आवडेल !
Smile

मी सहसा -माझे खाते - मिळालेल्या श्रेणी इथे जाऊन कोण्या प्रतिसादार किती लोकांनी श्रेणी दिली आहे ते पाहतो. प्रत्येक वेळी वेगवेगळ्या लोकांनी श्रेणी दिलेली असावी अशी माझी इच्छा असते. त्याच लोकांनी काही वेळा धन आणि काही वेळा ऋण (रुचिप्रमाणे) श्रेणी दिलेली असायला पाहिजे असे वाटते. अन्यथा विशिष्ट २-३ लोकच माझे प्रतिसाद वाचतात आणि लाइक करतात असे नाही का निर्दिष्ट होणार?

सही: पुरोगाम्यांना लॉजिक माफ असतं.

असं दिसतं की ठराविक लोकांनाच प्रतिसाद आवडला का न आवडला हे दाखवण्याची इच्छा आहे. आपल्या मताविरोधात कोणाचं मत असेल तर ते सुधारण्याची इच्छा लोकांना असते का नसते याबद्दल फार काही बोलता येणार नाही. पण म्हणून बाकीचे लोक प्रतिसाद वाचतच नाहीत, हा निष्कर्ष घिसडघाईने काढलेला वाटतो.

---

सांगोवांगीच्या गोष्टी म्हणजे विदा नव्हे.

पण म्हणून बाकीचे लोक प्रतिसाद वाचतच नाहीत,

There is nothing conveying this in my response. I will put it again. When I see that generally there are two or three ratings given to my comments, how would I ascertain that these ratings are not given by the same people?

दोन लोक वाचतात आणि श्रेणी देतात हे विधान -

१. दोनच लोक वाचतात आणि तेच दोन लोक श्रेणी देतात -
२. बरेच लोक वाचतात. बरेच लोक श्रेणी देतात. पण केवळ दोनच लोक वाचणे आणि श्रेणी ही दोन्हीही कामे करतात.

यातल्या अनेक अर्थछटा दाखवू शकते.

बाकी वास्तविक सारा संदर्भ घेतला तर केवळ श्रेणी देणारी सोडली तर इतर कोणी वाचत नाही असे म्हणायचे आहे असे का वाटले कळले नाही.

सही: पुरोगाम्यांना लॉजिक माफ असतं.

अन्यथा विशिष्ट २-३ लोकच माझे प्रतिसाद वाचतात आणि लाइक करतात असे नाही का निर्दिष्ट होणार?

हा पर्याय आहेच, पण शक्यता <१ असेल.

This comment has been moved here.

सही: पुरोगाम्यांना लॉजिक माफ असतं.

This comment has been moved here.

--------------------------------------------
ऐसीव‌रील‌ ग‌म‌भ‌न‌ इत‌रांपेक्षा वेग‌ळे आहे.
प्रमाणित करण्यात येते की हा आयडी एमसीपी आहे.