मनातले छोटे मोठे विचार आणि प्रश्न - भाग ४
ही धागामालिका आपल्या मनात येणारे, नेहमी नेहमी डोकावणारे विचार मांडण्यासाठी आहे. कधी कधी आशय फार मोठा नसतो. फार खोल विचार केलेला नसतो. तो विचार/ कल्पना/ प्रश्न/ गंमत डोक्यात येते, जाते. कधी कधी आपण विसरतो, कधी कधी ती ती पुन्हा पुन्हा येत असल्याने आपण विसरू शकत नाही.
यापूर्वीच्या धाग्यावरचे प्रतिसाद १०० च्या वर गेले आहेत म्हणून हा पुढचा धागा.
=================================
ज्या लोकांना मराठी संकेतस्थळांवर टाईप करायला बराच वेळ मिळतो ते लोक आपल्या ऑफिसमधे थोडेसे निकम्मे असतात का?
निकम्मा
निकम्मा असणे ही तात्कालिक स्थिती आहे की त्या व्यक्तीची प्रवृत्ती म्हणून गणली गेलिये?
--मनोबा
.
संगति जयाच्या खेळलो मी सदाहि | हाकेस तो आता ओ देत नाही
.
memories....often the marks people leave are scars
काही कसे असतील, काही कसे.
काही कसे असतील, काही कसे.
सही: पुरोगाम्यांना लॉजिक माफ असतं.
मलाही हाच प्रश्न पडतो. मी
मलाही हाच प्रश्न पडतो. मी फक्त मोजके लेख वाचते आणि कधीतरी प्रतिसाद देते तरी मला वाटते मी ऐसीवर फार वेळ घालवते आणि २०१४ मध्ये तो निम्म्यावर आणायचा निश्चय केलाय(अर्थात तो ऑफिसचा वेळ असतो.. घरी गेल्यावर फॅमिली,घर,वाचन, टिव्ही - नो आंतरजाल)
बाकी तुम्ही हल्ली बरेच लेख पाडता.. प्रतिसाद पण बरेच देता!
-सविता
----------------------------
|| स्वतः मेल्याशिवाय स्वर्ग दिसत नाही ||
निकम्मा
मी हल्ली निकम्माच आहे. पण काहीजण माझ्यापेक्षा जास्त सक्रीय आहेत.
सही: पुरोगाम्यांना लॉजिक माफ असतं.
माझ्यापुरते सांगायचे, तर जो
माझ्यापुरते सांगायचे, तर जो वेळ निकम्मा असतो त्यात इथे येऊन कामी लावतो. हाफीसात एका टॅबमध्ये ऐसी उघडेच असल्याने कितीही काम असलं तरी प्रतिसादांपुरता वेळ पिळून काढता येतोच!
तसेही हाफिसातील काम वेळेत पुर्ण करायचे टार्गेट असते. वेळेआधी नाही! वर्क एक्सपान्ड्स/काँट्रॅक्टस टु फिल द टाईम फुल्ली
- ऋ
-------
लव्ह अॅड लेट लव्ह!
:)
--मनोबा
.
संगति जयाच्या खेळलो मी सदाहि | हाकेस तो आता ओ देत नाही
.
memories....often the marks people leave are scars
खरी नावं
तुम्ही मंडळी खरी नावं बिंधास्त आय डी म्हणून कशी घेता?
म्हणजे नाव , कीम्वा आडनाव सुद्धा आय डी म्हणून वापरलं तर समजू शकतो.
तुम्ही पहिलं आणि शेवटचं नाव बिंधास्त पब्लिक डोमेन मध्ये आणता.
आपली माहिती चोरीला जाइल असं वाटत नाही का.
उदा:- थत्ते, घासकडवी, मेघु तै, मच्छिंद्र ऐनापुरे आणि not to forget श्री श्री १००८ अरुण जोशी चंद्र रावजी साहेब....
--मनोबा
.
संगति जयाच्या खेळलो मी सदाहि | हाकेस तो आता ओ देत नाही
.
memories....often the marks people leave are scars
आपली माहिती चोरीला जाइल असं
म्हणजे काय? टोपणनाव वापरल्याने नक्की काय चोरीला जाण्यापासून वाचता येते?
- ऋ
-------
लव्ह अॅड लेट लव्ह!
ते
सांगता यायचं नाही. पण सगळ्यांसमोर नाव उघड करणं खूपच ऑड वाटतं.
जरा घसट असेल, ओळख असेल्,भरवसा वाटला तर तसं करण्यात अडचण वाटत नाही.
थोडक्यात, ओळख जाहीर करण्यानं अन्कम्फर्टेबल होत नाही का?
(नुन्सतं पहिलं नावं आय डी म्हणून घेणं वेगळं. आणि पूर्ण नाव घेणं वेगळं.)
--मनोबा
.
संगति जयाच्या खेळलो मी सदाहि | हाकेस तो आता ओ देत नाही
.
memories....often the marks people leave are scars
ह्म्म! नाही वाटत (मी इथे
ह्म्म! नाही वाटत (मी इथे नुसत्या पहिल्या नावाने असलो तरी मनोगतावर पूर्ण नावाने होतो - आहे. दोन्हीचे अनुभव आहेत काहीच वेगळे वाटत नाही.)
माझ्यापुरते खरे सांगायचे तर टोपणनाव घेणे मला आवडत नाही. उगाच लपल्यासारखे -जबाबदारी टाळल्यासारखे - वाटते.
- ऋ
-------
लव्ह अॅड लेट लव्ह!
>>माझ्यापुरते खरे सांगायचे तर
>>माझ्यापुरते खरे सांगायचे तर टोपणनाव घेणे मला आवडत नाही. उगाच लपल्यासारखे -जबाबदारी टाळल्यासारखे - वाटते.<<
मला खर्या नावाने आयडी घेण्यात मोकळेपणा वाटतो. इतरांनाही माझ्या खर्या नावामुळे मोक्ळेपणा वाटावा अशी अपेक्षा असते.पारदर्शी असल्यावर जरा बरं वाटत. जस खरे बोलण्यात एक फायदा असतो कि आपण काय बोललो हे आपल्याला आठवावे लागत नाही.
काहींना टोपण नावाने सुरक्षित वाटत असेल. ते परवडल पण डुआयडींचे काय? आता जे डुआयडी आहेत त्यांना तसे का करावेसे वाटते? हे जाणुन घ्यायला आवडेल.मला तर हा प्रकार स्किझोफ्रेनिक वाटतो. डुआयडी घेउन त्रास देणे ही मानसिक विकृती आहे का? मला त्या मृगरुप घेउन कामेच्छा पुर्ण करण्याचा प्रयत्न करणार्या कोण ते ऋषी त्यांची आठवण येते. हा किंदम ऋषी.ऋषी या प्रतिमेमुळे त्यांना त्यांच्या नैसर्गिक उर्मी व्यक्त करता येत नसाव्यात म्हणुन त्यांना असे मृगरुप घ्यावे लागले. डूआयडींचे तसेच काहीसे असावे.
प्रकाश घाटपांडे
http://faljyotishachikitsa.blogspot.in/
wait wait
डु आय डी हा प्रकार आणि टोपण नाव घेणे दोन्ही पूर्ण वेगळे आहेत.
अर्थात ह्याची तुम्हाला कल्पना आहेच. पण ते प्रतिसादात अध्याहृत धरलेलं आहे. explicit,उघड, स्पष्ट लिहिलेलं नाही.
मला म्हणाल, तर माझा एकही डु आय डी नाही. अगदि सगळ्या सायटींवरही उपक्रम्-मिपा-ऐसी-मिमराठी...
सगळीकडे मी मनोबा ह्याच आयडीने लिहितो.
माझे सरकारी कागदावरचे नाव "मनोबा" नाही. पण तो माझा डु आय डी सुद्धा नाही.
तसेही मी कुठल्याही आय डी नं लिहिलं तरी भाषिक्-लॉजिकल समानतेमुळे किम्वा भाषेच्या/प्रतिसादांच्या वापरातून
तयार झालेल्या अदृश्य पण प्रभावी ओळखीमुळे किंव त्या टेम्प्लेटमुळे मी सहज पकडला/ओळखला जाइन असेच मला वाटते.
--मनोबा
.
संगति जयाच्या खेळलो मी सदाहि | हाकेस तो आता ओ देत नाही
.
memories....often the marks people leave are scars
खूप छान प्रश्न. माझ्या
खूप छान प्रश्न. माझ्या प्रोफाईलवर तर माझी इतर खरी माहिती आहे.
आमचा मानवतेवर विश्वास आहे. म्हणजे दोन गोष्टींवर विश्वास आहे.
१. मला कुणाला मारायचेच असले (दोन अर्थ होतात म्हणून - माझे नुकसान करायचे असले) तर मी जगात कोठेच लपू शकत नाही.
२. मनुष्य हा सभ्य, सम्यक प्राणी आहे. तो कोणाचेही नुकसान करत नाही.
इथे ओळख दिल्याचा एक तोटा आहे केवळ नावावरून काहींच्या मनात काही प्रतिमा बनते, ती निघायला वेळ लागतो.
सही: पुरोगाम्यांना लॉजिक माफ असतं.
मनुष्य हा सभ्य, सम्यक प्राणी आहे. तो कोणाचेही नुकसान करत नाही
२. मनुष्य हा सभ्य, सम्यक प्राणी आहे. तो कोणाचेही नुकसान करत नाही.
हे असं कुणीही म्हटलं की मला काय विचारायचं तेच कळत नाही. परवा वासलेकर पण बोल्ला सकाळ पेप्रात "लोकांवर भरवसा ठेवा " म्हणून.
प्रक्रिया उलट आहे. आधी मी सर्वांवर विश्वास ठेवणारा असतो. मग मी वारंवार ,सतत लुबाडला जातो.
मग मी समोरच्याचे व्हेरिफिकेशन करण्याचे महत्व जाणतो. प्रोसेस उलट आहे.
शिवाय "विश्वास ठेवा" असे जे म्हणतात ते आसपास होणार्या फ्रॉड, घोटाळे, चोरी, थापेबाजी, एखाद्याला गंडवणे,दागिने-संपत्ती लुटली जाणे, चोरी होणे ह्यापासून पूर्णतः अलिप्त असतात काय?
.
.
की फक्त ऐकायला छान वाटते म्हणून बोलायचे?
--मनोबा
.
संगति जयाच्या खेळलो मी सदाहि | हाकेस तो आता ओ देत नाही
.
memories....often the marks people leave are scars
तुमचा जो जगाचा अनुभव आहे,
तुमचा जो जगाचा अनुभव आहे, त्याच्या विपरित अनुभव लोकांचा असू शकतो. म्हणजे मी लोकांना लुटावे असे मला वाटत असताना लोकांनी मला आपणहून मदत केलेली असू शकते. अशा लोकांचा जगाबद्दलचा अनुभव चांगलाच निघणार.
सही: पुरोगाम्यांना लॉजिक माफ असतं.
मग
मग पासवर्ड वगैरे सांभाळून ठेवता का?
का ठेवता?
जगावर भरवसा असणारी वासलेकर सारखी मंडळी मला किम्वा कुनालाही विश्वासावर पाच्-पन्नास लाख देतील का?
देतो मी वर्षभरात दुप्पट करुन.
ठेवता भरोसा?
.
.
अरे पाच पन्नास लाख सोडा. फुक्टात कुणी लंच सुद्धा देणार नाही जवळचे आप्तकुटुंबीय सोडले तर.
बादवे, मी ज्या केसेस सांगितल्यात त्या कुनाच्या वाचण्यात येत नाहित ,आसपास घडत नाहित का?
मी पृथ्वी नावाच्या सूर्यमालेतील अजून एका वेगळ्याच ग्रहावर राहतोय का?
हा प्रश्न गब्बरलाही आहे.
"विश्वासाधारित व्यवस्था" नामक युतोपिअन व्यवस्था त्यालाही खूप आवडते असं दिसतं.
.
.
तसं म्हटलं तर हा प्रतिसाद, मागचे एक दोन प्रतिसाद ह्याचा आणि आयडीच्या शंकेचा काहिच संबंध नाहिये.
पण त्या निमित्तानं अवांतर आठवलं.
--मनोबा
.
संगति जयाच्या खेळलो मी सदाहि | हाकेस तो आता ओ देत नाही
.
memories....often the marks people leave are scars
कुणावरही विश्वास नाही हो.
कुणावरही विश्वास नाही हो. माणसं आम्हाला ओळखता येतात असा आमचा एक समज असतो.
युरोप/जपान पुढे असण्याचे हेच कारण आहे. तिथले लोक जास्त विश्वासार्ह आहेत. आणि जास्त विश्वास ठेवतात देखिल.
पासवर्ड जपून ठेवतो. पण बॅंकेवर विश्वास ठेवतोच कि!
सही: पुरोगाम्यांना लॉजिक माफ असतं.
विश्वास
विश्वासार्ह वर्तन वाढले की माणूस आपोआप विश्वास ठेवणयस उद्युक्त होतो. त्यासाथी सर्वत्र त्याला डिपेंडेबल्,आश्वस्त करणारं वातावरण दिसायला हवं.
एकावर विश्वास ठेवला, म्हणून त्याने विश्वासाला योग्य असेच काम केले असे होत नाही. उलट होते.
.
.
आधी विश्वास ठेवावा असे वर्त्न घदू लागते. आपोआप विश्वास ठेवला जातो.
.
.
उगा उठून "विश्वास ठेवायला शिका" असे सांगण्याची काय गरज ?
आसपास तसं वातावरण दिसलं तर आपोआप विश्वास ठेवला जाण्याचं प्रमाण वाढू शकतं.
म्हणून "विश्वास ठेवा दुसर्यांवर" असा उपदेश करण्यापेक्षा
"दुसरयनी टाकलेल्या विश्वासाला पात्र ठरा. चुकूनही विश्वास उदॅल असं काही करु नका." हा उपदेश करण्याची अधिक गरज आहे.
.
.
बाद्वे, "माणूस ओळखता येतो" म्हणजे तुम्ही मनोमन का असेना व्हेरिफिकेशन करताच की.
हेच कुणी स्प्ष्ट्,थेट, उघड केलं तर नक्की काय बिघडलं.
उलत "माणूस ओळखता येणे" ही आर्थिक व्यवहारात अत्यंत व्हेग टर्म आहे.
.
.
--मनोबा
.
संगति जयाच्या खेळलो मी सदाहि | हाकेस तो आता ओ देत नाही
.
memories....often the marks people leave are scars
आपल्याला जे म्हणायचं आहे, तेच
आपल्याला जे म्हणायचं आहे, तेच मला देखिल अभिप्रेत आहे.
सही: पुरोगाम्यांना लॉजिक माफ असतं.
अंमळ दुरुस्ती
अजूनेक श्री मिसिंग आहे आणि "अरुणचंद्र[पंत/राव]जी जोशीसाहेब" असे पाहिजे.
माहिष्मती साम्राज्यं अस्माकं अजेयं
आपलं नाव लोकांना ठाऊक होत
आपलं नाव लोकांना ठाऊक होत नाही, एवढं सोडून - खोटं नाव न घेतल्यानं नक्की काय फायदा होतो? नि नाव म्हणजे काही माहिती थोडीच आहे? नाव तर लोकांना सांगण्याकरताच असतं ना? टोपणनावात काहीच चूक नाही हे मला तर्कदृष्ट्या पटतं. पण माझं खरं नाव जाहीर करून मतं मांडताना मी अधिक जबाबदारपणे वावरते, असा माझा एक समज आहे. म्हणून - नि अजून तरी माझं काही नुकसान नाही बॉ झालेलं त्यामुळे. किंवा झालं असल्यास मला कळलेलं तरी नाही. हां... साधारण ५-६ वर्षांपूर्वीपर्यंत निदान मराठी आंजावर तरी बिनधास्त काहीही म्हणून प्रत्यक्ष आयुष्यात आपण नाही बॉ त्या गावचे अशा थाटात राहता यायचं. कारण लोक मुळातच जालावर इतके फिरकत नसावेत. हल्ली मात्र तसं होत नाही. कुणीही च्यायला 'तू परवा तिकडे ते असं म्हणलीवतीस...' तोंडावर फेकतं. मग पंचाईत होते. पण हे ठीकच. जालीय आयुष्य आणि प्रत्यक्ष आयुष्य यांच्यात वर्तुळांचा फार फरक उरला नसल्याचं लक्षण. ते मला थोडं गैरसोईचं होतं, पण नाव बदलून काही म्हणावं इतकं धोकादायक वाटत नाही.
-मेघना भुस्कुटे
***********
तुन्द हैं शोले, सुर्ख है आहन
.
.
--मनोबा
.
संगति जयाच्या खेळलो मी सदाहि | हाकेस तो आता ओ देत नाही
.
memories....often the marks people leave are scars
आपल्या जवळच्या सर्कलमधील किती
आपल्या जवळच्या सर्कलमधील किती लोक मआञ्जावर आहेत यावरही ते धोकादायक वाटणं न वाटणं अवलंबून आहे. जवळच्या सर्कलमधील फार कमी लोक मआञ्जावर असल्यास टेन्शन नै. आणि नसल्यासही क्याही उखाड़ लेङ्गे म्हणा.
माहिष्मती साम्राज्यं अस्माकं अजेयं
जवळचे
जवळचे लोक असल्यास हरकत नाही.
भामटे लोक आय्डेंटिटी थेफ्ट करतील ही भीती आहे.
जवळच्या सर्कलमधील कुणीही इथे काहीही वाचलं तरी प्रॉब्लेम काहिच असू नये.
--मनोबा
.
संगति जयाच्या खेळलो मी सदाहि | हाकेस तो आता ओ देत नाही
.
memories....often the marks people leave are scars
मला एक विचारायचंय. मध्यंतरी
मला एक विचारायचंय. मध्यंतरी कुठल्याशा संस्थळावर धुम ३ बद्दल वाचताना अमिर खानचा लुक अगदी "गे" वाटतो असा कमेंट वाचला. धुम जाउदे. पण असा "गे" म्हणुन काही लूक असतो हे माहित नव्हते. असा लुक असतो काय?
संवाद
राजहंसाचे चालणे | भूतळी जालिया शाहाणें | आणिकें काय कोणें | चालावेचिना?
प्रत्यक्षात असा ठराविक लुक
प्रत्यक्षात असा ठराविक लुक नसतो - नसावा.
पण प्रत्येक प्रकारच्या व्यक्तीमागे लोकांच्या मनात एक प्रतिमा तयार झाली असते, काही समाजांत अनेकांच्या मनातील प्रतिमा सारख्याच असल्याने तो सामाजिक संकेतही होतो (उदा गुलाबी कपडे). त्या व्यक्तीच्या मनातील "गे पुरूषाच्या" प्रतिमेच्या जवळ आमिरचे पात्र असल्याने त्याला तसे वाटले असावे इतकेच!
- ऋ
-------
लव्ह अॅड लेट लव्ह!
एक अत्यंत भंपक
एक अत्यंत भंपक प्रश्नः
देशपांडे, घाटपांडे, वर्हाडपांडे असतात तसे कोकणपांडे आणि मराठवाडापांडे का नसतात? पांडेगिरीला या प्रांतात काही वेगळं म्हणतात का?
********
It is better to have questions which don't have answers, than having answers which cannot be questioned.
कल्पना नाही. कोकणात काय
कल्पना नाही. कोकणात काय म्हणतात ते पाहिले पाहिजे.
पण मराठवाडा हा 'देशा'त येतो, सबब तिथले पांडे हे देशपांडेच.
माहिष्मती साम्राज्यं अस्माकं अजेयं
कोकण देशाबाहेर आहे का?
कोकण देशाबाहेर आहे का?
सही: पुरोगाम्यांना लॉजिक माफ असतं.
'देश' बोले तो...
...डेक्कन प्लॅटो. बोले तो, दक्खनचे पठार. (चूभूद्याघ्या.)
अंमळ दुरुस्ती
गोदावरी ते कृष्णा यांमधील पट्ट्यास आणि त्याच्या आसपासच्या काही भागास देश म्हणतात असे वाटते.
माहिष्मती साम्राज्यं अस्माकं अजेयं
देश आणि कोकण असे
देश आणि कोकण असे महाराष्ट्राचे जुन्या काळी विभाग केले जात हे आपणास ठाऊक नाही काय??? देशस्थ & कोकणस्थ ब्राह्मण इ.इ.???
माहिष्मती साम्राज्यं अस्माकं अजेयं
पुण्यात आल्यावर हे
पुण्यात आल्यावर हे क्लासिफिकेशन ऐकले होते. पण पटत नाही.
सही: पुरोगाम्यांना लॉजिक माफ असतं.
आहे हे असे आहे. पटो वा ना
आहे हे असे आहे. पटो वा ना पटो.
माहिष्मती साम्राज्यं अस्माकं अजेयं
मी पहिल्यांदा कोकणस्थ
मी पहिल्यांदा कोकणस्थ ब्राह्मण आणि देशस्थ ब्राह्मण शब्द पुण्यात आल्यावर ऐकले. माझे या शब्दांविषयी जे अनुभव आहेत त्यातून एक ललित उतरू शकते.
सही: पुरोगाम्यांना लॉजिक माफ असतं.
काही का असेना! असे
काही का असेना! असे क्लासिफिकेशन कुठे ऐकले त्यावर त्याचे अस्तित्व ठरते थोडीच???
आणि ललित असेल तर कृपया लौकर लिहिणेचे करावे ही विनंती.
माहिष्मती साम्राज्यं अस्माकं अजेयं
ललित असेल तर कृपया लौकर
+१
********
It is better to have questions which don't have answers, than having answers which cannot be questioned.
पश्चिम महाराष्ट्र आणि कोकण
नुकतेच इथे कुठल्याशा धाग्यावर लिहिले होते - "पश्चिम महाराष्ट्र" या व्याख्येत कोकण बसत नाही, जरी ते त्याच्याही पश्चिमेला असले तरी. त्याची कारणे ऐतिहासिक आहेत.
indians are not indians
indians are not indians असं वाचलं होतं मागे.
एक अमेरिकेत स्थायिक झालेली स्त्री i am an indian असं सांगे तेव्हा समोरची गोरी माणसं तिला oh, which tribe असं विचारत.
indian = red indian हे बाय डिफॉल्ट त्यांच्या दोक्यात होतं.
काही काही संकेत असेच रूढ होउन जातात. नंतरही डोक्यात राहतात.
--मनोबा
.
संगति जयाच्या खेळलो मी सदाहि | हाकेस तो आता ओ देत नाही
.
memories....often the marks people leave are scars
अर्थव्यवस्था , कर्ज आणि देश
जागतिक अर्थव्यवस्था कशी चालते?
नक्की कोन कुणाला किती लोन देतं?
भारत भरपूर कर्ज वागवतो आहे असे ऐकले.
अमेरिका व पाश्चात्य जगतही वागवते, पण त्यांची गोष्ट वेगळी.
लोन सोडूनही भारताला भरपूर मदत विविध मार्गातून मिळते. लंडनचे रॉयल हाउस का काहीतरी मानवीय पातळीवर इथल्या गोरगरिबांना मदत वगैरे करतात.
मागे ती बंद करण्याची बातमी आली होती. मुळात दुसर्अय देशातल्या लोकांना हे मदत करतात कशाला ?
शिवाय ही रक्कम म्हणजे धर्मादाय्/चॅरिटी स्टाइल असते. ते कर्ज नाही. फुकटात पैसे वाटतात,सवलती देतात.
ते स्वतः आर्थिक संकटात वगैरे आहेत ना? किंवा नसले, तरी त्यांच्याकडील सर्व समस्या सुटल्यात का?
दुसर्या देशातल्या लोकांना हे पैसे कसे वाटताहेत?
युरोप आर्थिक गर्तेत वगैरे असतान दोन्-चार वर्षाखाली युरोपला rescue करण्यासाठी एक फंड जागतिक पातळीवर उघडला गेला.
त्यात भारतानं २बिलियन का काहीतरी रक्कम टाकली. (एकूण संकटाच्या मानानं नगण्य असली तरी दिली हे महत्वाचं.)
आपण भिकारी/गरजवंत असून ते आपल्याला पैसे देणारे आहेत. (इथे चॅरिटी वगैरे करताहेत.)
तर आपण उलट त्यांनाच पैसे कसे काय देतो?
माझ्या घरासमोरच्या रस्त्यावर खड्डे बुजवायला प्रशासनाकडे पैसे नाहित, विविध थिकाणी शाळा किम्वा इतर मूलभूत सुविधा निधी अभावी झोपल्याचे ऐकतो,
इतके असून अफगाणिस्तानला कैक मोठी रक्कम व इतर सुविधा भारत देतो.
प्रकरण काय आहे?
.
.
अमुक अमुक कोटी "निधी परत गेला" असे कित्येकदा ऐकतो. निधी मिळवणे हे एक च्यालेंज आहे, तो सहजा सहजी अप्रूव होत नाही हे समजू शकते.
निधी खर्च करायला नक्की काय प्रॉब्लेम आहे? कसा असू शकतो?
(मला पाच्-सातशे कोटी द्या . यूं खर्च करून दाखवतो. है क्या च्यामारी.)
आपलं इन्फ्रास्ट्रक्चर व इतर गोष्टी जिथे सुविधा खराब* आहेत तिथे नक्की घोडं अडलय कुठं?
निधी नाही ही समस्या आहे, की निधी बक्कळ आहे पण परत गेला-वापरला नाही, ही समस्या आहे?
.
.
.
*भारतात सर्वकाही आलबेल आहे, आपण महासत्ता वगैरे आहोत. किम्वा अमुक अमुक गोष्ट (बँकिंग रेग्युलेशन , isro,drdo वगैरे वगैरे) लै भारी आहे हे इथे सांगू नका प्लीझ.
काही गोष्टी चांगल्या आहेत हे मान्य. तरी अजूनही काही क्षेत्रात सुधारणेस प्रचंड वाव आहे, हे मान्य व्हावं.
--मनोबा
.
संगति जयाच्या खेळलो मी सदाहि | हाकेस तो आता ओ देत नाही
.
memories....often the marks people leave are scars
मागे ती बंद करण्याची बातमी
मुळात देशाचा अर्थव्यवहार हा गरज तिथे खर्च असा साधा सरळ नसतो. कित्येक ठिकाणी गुंतवणूक करावी लागते, कित्येक ठिकाणची गुंतवणूक वायाही जाते. दुसर्या देशांतील लोकांना मदत हे अशाच एका गुंतवणूकीचं माध्यम आहे. आपले सगळे प्रश्न संपले नसतानाही मंगळयान जसं महत्त्वाचं आहे अगदी त्याच कारणाने नाही पण अशी मदत करत राहणं गरजेचं आहे. भारतही अफगानिस्तानापासून कित्येक आफ्रिकन देशांना अशी मदत करत असतो.
उत्तर वर आलंच आहे. याची परतफेड भारताला अशा मार्गाने होते हे बघणे अधिक रोचक ठरावे.
.
अफगाणिस्तानला भारत सरकार पैसे देते. खड्डे बुजवायचे काम म्युनिसिपाल्टी, जि.प. वगैरेंचे आहे काय संबंध? शिवाय प्रशासन या कामांना पैसे देतच नाही व ते पैसे अफगाणिस्तानला वळवते असे आहे काय? नसावे. मग तक्रार कसली/का?
निधी हा निरूद्देश उपलब्ध करून दिला जात नाही आणि कितीही काळासाठीही तो नसतो. त्यापाठी एक उद्देश असतो आणि तो टाईमबाऊंड असतो.
समजा मी तुम्हाला पाचशे कोटी दिले की तितक्या किंमतीचे कंत्राट तुम्ही कोणालाही देऊ शकत नाही. त्यासाठी निविदा मागवणे, चाळणी, इतर अनेक अप्रुवल्स तर लागतातच, शिवाय पर्यावरण, मत्सव्यवसाय, इतर मंत्रालये यांनाही ती योजना मंजूर असावी असेही काही केसेसमध्ये असु शकते. या सगळ्यातून पार होऊन प्रोजेक्ट सुरू होणे, ठरलेल्या वेगात पुढे जाणे व करारानुसार डिलिव्हरी होऊन माईलस्टोन अचिव्ह होणे तितकेसे सोपे नसावे. असे झाल्यास त्या बजेटमधून पेमेंट होते.
बाकी जे नेहमीचे खर्च आहेत जसे पगार, पेंशन, ऑफिस सप्लाईजची खरेदी, एम्प्लॉई एक्सपेंन्स वगैरेच नाही तर संशोधन व निर्माण, उत्खनन वगैरेचा निधी अनेकदा अपुरा पडतानाही ऐकू येतेच की
- ऋ
-------
लव्ह अॅड लेट लव्ह!
शिवाय पर्यावरण, मत्सव्यवसाय,
ऋषिकेश समुद्राच्या फार जवळ मोठा झाला असावा.
सही: पुरोगाम्यांना लॉजिक माफ असतं.
मुंबईची प्रत्येक व्यक्ती
मुंबईची प्रत्येक व्यक्ती समुद्राच्या खूप जवळच असते
- ऋ
-------
लव्ह अॅड लेट लव्ह!
व्यायामशाळा -- जिम
व्यायामशाळेस सोपा,रुळलेला शब्द म्हणून " जिम " हा शब्द वापरत आहे.
.
मी व्यायाम अगदि अल्प करत असलो, तरी नियमित करतो.
जिममधल्या ट्रेनरनं पुन्हा आहारा व्यवस्थापनाकडं (डाएट) लक्ष आहे ना ते विचारुन घेतलं.
त्याच्या प्लॅनमध्ये whey protein नामक एक प्रकार आहे.
मी तो घेत नाही. मी तो प्रकार खरेदी करावा अशी त्याची एकूण इच्छा दिसली.
ही प्रोटिन पावडर किंवा काहीतरी कृत्रिम का घ्यायचं तेच कळत नाही.
नियमित तुमचं जेवणखाण व्यवस्थित असणं पुरेसं असायला हवं.
चविष्ट असलेले पण तब्येतीची बँड वाजवू शकणारे पदार्थ कमीतकमी/अत्यल्प प्रमाणात असणं ; आणि त्यासोबतच तब्य्तीस उपकारक - पोषक असे पदार्थ भरपूर खाण्यात असले तर बाहेरील अशा "protein supplements" गरज पडू नये असं मला वाटतं.
माझे उद्दिष्ट माचो मॅन होणे, अंडारट्कर्-हुल्क हॉगन, ब्रॉक शॉन मायकल्स ह्या दांडग्यांना एका हातात उचलणे असे काहीही नाही.
आपली तब्येत बरी ठेवावी, फिट रहावं इतका माफक उद्देश आहे.
तोसुद्धा प्रोटिन सप्लीमेंट्स शिवाय पूर्ण होणे अवघड आहे की काय ?
.
.
अजून एक गोष्ट म्हणजे पूर्वी मी तळवलकर ला व्यायामासाठी जात असे. तळवलकर ही महराष्ट्रातच नव्हे तर देशभरात नावाजलेली हेल्थ क्लब चेन आहे.
नावाजलेला ब्रँड म्ह्णून प्रसिद्ध आहे.बहुतेक भारतीतील सर्वाधिक संख्येने असलेले ती जिम चेन असावी. तर सांगायचं म्हणजे तिथे तर "प्रोटिन सप्लिमेंट्स
अजिब्बात वापरु नका" हे सांगितले जाई. अगदि तिथल्या ट्रेनर्सनाही हे पदार्थ असं सदस्यांना सुचवण्यास सक्त मनाई होती.
नक्की कारण ठाउक नाही. पण इतक्या प्रतिष्ठित ठिकाणी प्रोटिन पूर्णतः वर्ज्य आहे म्हणजे त्याचे काही ना काही साइड इफेक्ट नक्कीच असावेत.
अजून एक व्यावहारिक अडचण म्हणजे व्यायाम करणे हा तुमच्या दैनंदिन आयुष्याचा कित्येक वर्षं, कित्येक दशकं भाग राहू शकतो.
पण ही सल्पीमेंट्स जन्मभर घेत राहणं शक्य नसावं. जिम्मेदार्अय वाधतील, दगदग वाढेल, कधी ऑफिस लोड असेल तेव्हा इकडे दुर्लक्ष होइलच.
मग त्या गोष्टीला आपल्या दिनचर्येचा आणि आहाराचा भाग कशाला बनवायचा असाही एक विचार डोक्यात आहे.
.
.
त्या पावडरीचे दुष्परिणाम नक्की ठाउक नाहित, पण फिट राहण्यासाठी तिची आवश्यकता नाही, असे वाटते.
नाहीतर इतक्या वेळा कंपनीच्या पैशावर मेडिकल चेकपला गेलोय.
एकातरी डॉक्टरानं मला ते रेकमंड्/प्रिस्क्राइब केलच असतं.
.
.
तस्मात, भरपूर डाळी, मोड आलेली कडधान्ये आणि उकडलेली अंडी ह्यांचा माझा जो रतीब सुरु असतो, तो तसाच मी ठेवणार आहे.
--मनोबा
.
संगति जयाच्या खेळलो मी सदाहि | हाकेस तो आता ओ देत नाही
.
memories....often the marks people leave are scars
तस्मात, भरपूर डाळी, मोड आलेली
हे उत्तम. प्रोटिन पावडरमध्ये बराच भाग दुधाच्या पावडरचा असतो असा माझा समज आहे. ते घेण्याऐवजी संतुलित प्रमाणात विविध अन्न खाल्लं तर निश्चितच फायदा होईल. वरील यादीत मी दूध, दही, शेंगदाणे (इतरही कवचफळं किंवा नट्स - काजू, बदाम वगैरे) मांस (खात असाल तर) यांची भर घालेन.
याच्या जोडीला क्लिष्ट कर्बोदकं (कॉम्प्लेक्स कार्बोहायड्रेट्स) वाढवली, थोड्या भाज्या आणि फळं नियमितपणे खाल्ली, आणि साखर, मैदा, साबुदाणा सदृश साध्या कर्बोदकांचं आणि घन स्निग्ध पदार्थांचं प्रमाण कमी केलं की उत्तम आहार होईल. मग तुम्हाला शरीरातच कसली कमतरता असल्याशिवाय काही सप्लिमेंट्स घेण्याची गरज पडणार नाही.
थोडक्यात, व्यवस्थित आणि वेळच्या वेळी खा. वेगवेगळ्या प्रकारचं अन्न खा. प्रथिनांवर भर द्या. खाण्यातून मिळणाऱ्या आनंदाकडे दुर्लक्ष करू नका. आणि कसलाच अतिरेक करू नका. हे जर वर्षानुवर्षं पाळलं तर शरीर आणि मन सुदृढ (सिक्स पॅकी नाही) रहायला मदत होईल.
शेवटची
शेवटच्या वाक्यानं मला नेमकं काय म्हणायचं असतं हे नेमकं पकडलय.
--मनोबा
.
संगति जयाच्या खेळलो मी सदाहि | हाकेस तो आता ओ देत नाही
.
memories....often the marks people leave are scars
प्रोटीन सप्लिमेंटच्या
प्रोटीन सप्लिमेंटच्या नावाखाली अनेक तथाकथित जिम मधून तरुण मुलांना अँड्रोजेनिक स्टिरॉईड्स खाऊ घातली जातात.
ही तिच औषधे आहेत, जी सर्व खेळाडूंना वर्ज्य आहेत. समझे कुछ?
२-३ महिने जिम ला जाऊन तरूण पोरिंशी स्पर्धा करतील अश्या छात्या अन अर्नॉल्ड वाले दंड कसे काय येतात?
लक्षात घ्या, 'प्रोटीन सप्लिमेंट' नामक प्रकार नको म्हटले आहे. प्रोटीन्स नकोत असे नाही.
-: आमचे येथे नट्स क्रॅक करून मिळतील :-
अगदी बरोबर अंदाज
व्हे प्रोटिन म्हणजे दह्याच्या पाण्यातल प्रोटिन. दुधात दोन प्रकारची प्रोटिन्स असतात केसिन आणि व्हे. दुधात केसिन ह्या पप्रोटिन्मध्ये धन आणि ऋण भार संतुलित असतो (आयसोइलेक्ट्रिक पॉइंट) ह्या भारांमध्ये जेन्व्हा इतर बाह्य कारणांमुळे असंतुलन होत तेन्व्हा केसिन आणि त्यात अडकलेले इतर रेणु पाण्यापासुन वेगळे होउन खालि बसतात (दहि/चीझ्/पनीर इ.). व्हे प्रोटिन आणि लॅक्टोज हे कार्बोदक पाण्यात विद्राव्य असल्याने पाण्याबरोबर रहातात.
प्रोटिन्स हे अमिनो आम्लांपासुन बनतात. मानवी शरीरात एकुण २० अमिनो आम्लांपासुन शरीराला हवे ते प्रोटिन्स वेगवेगळ्या पर्म्युटेशन्स आअणि कॉम्बिनेशन्स नी बनतात. ह्यापैकि ११ अमिनो आम्ले शरीर तयार करु शकते पण ९ अमिनो आम्ले हि आहारातुनच मिळवावी लागतात. म्हणुन त्यांना एसेंशियल अमिनो अॅसिड्स अशी संज्ञा आहे. ही ९ च्या ९ अमिनो आम्ले योग्य त्या प्रमाणात प्राणिज स्त्रोतात असतात पण शाकाहारी स्त्रोतांत बहुतेक वेळेला ह्यातील एक किंवा अनेक आम्ले नगण्य प्रमाणात असतात. ह्या शास्त्रीय (अर्ध) सत्याचा आधार घेउन बहुतेक वेळेला अतिशय महागड्या अश्या ह्या प्रोटिन्स स्प्लिमेंट्स ग्राहकांच्या गळ्यात मारल्या जातात. पण त्यांची अजीबात आवश्यकता नसते. दोन किंवा ज्यास्त पुरक शाकाहारी स्त्रोत एकत्र करुन आपण शरीराची प्रोटिन्स ची गरज भागवु शकतो. उदा. गहु तांदूळ आणि ज्वारी ह्यांसारख्या एकदल धान्यात लायसिन ह्या अमिनो आम्लाची कमतरता असते तर डाळिंमध्ये प्रामुख्याने मेथिओनिन हे आम्ल नगण्य प्रमाणात असते. हे दोन स्त्रोत एकत्र केले की जसे आमटी/कडधान्याची उसळ आणि भात (आमटी मध्ये अर्थातच डाळिचे प्रमाण ज्यास्त हवे), पिठल भाकरी कि सगळे अतिआवश्यक अमिनो आम्ले आहारातुन मिळतील. जगभरच्या पारंपारिक खाद्यपदार्थांचा विचार केला तर ह्या जोड्या पुर्वजांनी निरिक्षणांती अचुक बनवल्या आहेत हे लक्षात येइल. डाळ भाताच उदाहरण वर दिलच आहे, आखाती देशातली पारंपारीक पाककृती हमुस हे दुसर उदाहरण.
शिवाय भारतीय शाकाहारात दुग्धजन्य पदार्थांचा समावेश होत असल्याने (हे प्राणिज पदार्थ आहेत आणि त्यामुळे ह्यात ९ आवश्यक अमिनो आम्ले असतात)भारतीय (हेल्दी) लोकांना ह्या प्रोटिन सप्लिमेंटसची आवश्यकता नाहि तर नुकसानच आहे. कारण आवश्यकतेपेक्षा ज्यास्त प्रमाणात खाल्लेली कुठलिहि गोश्ट शरीरात चरबीत रुपांतरीत होउन साठवुन ठेवली जाते, प्रोटिन्स सुध्धा किंवा मग उत्सर्जन प्रक्रियेद्वारे सरळ शरीराबाहेर टाकुन दिली जाते. म्हणजे ह्यात गुंतवलेले सगळे पैसे वायाच जातील असे नाहितर तसे.
शरीराला एकुण किति प्रोटिन्स ची आवश्यकता असते? नॉर्मल हेल्दी अॅडल्ट्स (स्त्री आणि पुरुष दोघेहि)ह्यांच्या किलोग्रॅम मधील वजनाला ०.८ ने गुणुन जो आकडा येइल तेवढे ग्रॅम्स.
छान.
माहितीपूर्ण, उपयुक्त प्रतिसाद.
थ्यांक्स
कामाची माहिती दिसते.
--मनोबा
.
संगति जयाच्या खेळलो मी सदाहि | हाकेस तो आता ओ देत नाही
.
memories....often the marks people leave are scars
अपरिचित चर्चिल
विन्स्टन चर्चिल ह्यांची काही टिपिकल वाक्य आपल्याकडं फेमस आहेत.
१. भारताला स्वातंत्र्य दिलं तर तो देश गुंडांच्या , मवाल्यांच्या ताब्यात जाइल. वगैरे छापाचं काहीतरी.
२.naked fakeer वगैरे.
.
.
पण सर्वात भारी माहिती मदनलाल धिंग्रा ह्या क्रांतीकारकारका*बद्दल वाचताना मिळाली. विकीपानावरही उपलब्ध आहे :-
कर्झन वायली व वंग भंग वगैरेंचा संबंध होता म्हणून मदनलाल धिंग्रानं लंडनमध्ये कर्झन वायलीला गोळी घातली.
त्याबद्दल त्याला फाशीही झाली.
असो, आपल्याकडील काही प्रोग्रेसिव्ह मंडळी मदनलालला माथेफिरु खुनी वगैरे अप्रत्यक्षपणे म्हणत हिणवतात; त्यांनी वाचण्यासारखं आहे.
Dhingra's martyrdom evoked the respect of some members of the Cabinet. This was disclosed later to Blunt by Winston Churchill. Blunt writes (My Diaries, Vol.2, p. 288, entry for 3 October 1909), "Again we sat up late. Among the many memorable things Churchill said was this. Talking of Dhingra, he said that there has been much discussion in the Cabinet about him. Lloyd George had expressed to him his highest admiration of Dhingra's attitude as a patriot, in which he shared…He will be remembered two thousand years hence, as we remember Regulus and Caractacus and Plutarch's heroes and Churchill quoted with admiration Dhingra's last words, as the finest, ever made in the name of patriotism…"
.
.
.
http://en.wikipedia.org/wiki/Madan_Lal_Dhingra
--मनोबा
.
संगति जयाच्या खेळलो मी सदाहि | हाकेस तो आता ओ देत नाही
.
memories....often the marks people leave are scars
रोचक चर्चा आहे. पहिल्यांदाच
रोचक चर्चा आहे. पहिल्यांदाच वाचतोय, शेअर केल्याबद्दल धन्यवाद.
पण अलीकडे क्रांतिकारकांच्या पुनर्मूल्यमापनात बरेच लोक झोडले जातील की काय असेच वाटतेय.
बाकी चाफेकरांबद्दल तर रँडला मारणे सोडून अन्य गोष्टी वाचल्यास दांडगटपणा हे एकच अधोरेखित सूत्र दिसते.
माहिष्मती साम्राज्यं अस्माकं अजेयं
झोडा की
झोडा की.पण विनाकारण झोडू नका म्हणजे झालं.
प्रफुल्लचंद्र चाकी ह्या क्रांतीकारकाला धरणार्या पोलिसाबद्दल किंवा त्या पोलिसाच्या कुटुंबियांबद्दल लोकांना एक विचित्र आकस असतो.
"आमच्या" क्रांतीकारकाला धरतोस काय? असा तो राग.
पण तो पोलिस त्याचं काम करीत होता, त्याच्या हाती फक्त "एक खून झालेला आहे" इतकीच माहिती होती, हे लक्षात घ्यावं.
त्याच्यावर भडकू नये, हे मान्य आहे. तारतम्य हवं हे ही मान्य आहे.
.
.
पण दुसरं टोकही आहे.क्रांतीकारकांची चेष्टा केली जाते. सगळे क्रांतीकारक म्हणजे काय भाडोत्री खुनी नव्हते किंवा हल्ली स्वतःला संतुलित
दाखवण्यासाठी करतात तशी दहशतवाद्यांशी तुलना करण्यासारखं त्यात नक्की काय होतं ? वैधानिक मार्गानं न्याय मिळत नसेल तर
नक्की काय करावं अशी अपेक्षा आहे ते मला अजूनही समजत नाही.
.
.
अवांतर होइल पण बोलतोच.
पांडुरंग सदाशिव खानखोजे हे नाव कमी परिचयाचं इतर काही प्रसिद्ध तत्कालीन नावांपेक्षा. पण "गदर" हा सशस्त्र उठाव प्लॅन करणं, अॅरेंज करणं ह्याचा विचार करणंही मोठी गोष्ट आहे. त्यानं तो त्या काळात अस्तित्वात आणण्याचा प्रयत्न केला. त्या प्रयत्नाचं महत्व किती होतं ?
त्या माणसाला ब्रिटिशांनी पुन्हा भारतात येउ दिलं नाही. त्याचं आगमन हा सत्तेला धोका मानला गेला.
रशियात झारची सत्ता पार उलथवून टाकली गेली, व्हिएतनामला भविष्यात नागड्या उघड्या स्थानिकांचा बलाढ्य सत्तेविरुद्ध जसा संघर्ष उभा राहिला तसा तो इथ्म उभा राहिल अशी धास्ती ब्रिटिशांनी घेतली होती. हे पाम्डुरंग सदाशिव खानखोजे, मेक्सिकोचे कृषी विभागाचे विभागप्रमुख बनले.
तो माणूस इथं पुन्हा परत आला, स्वातंत्र्यानंतर तेव्हा त्याला वागणूक काय होती ?
स्वतंत्र भारतात, १९४८ च्या आसपास ते आले तेव्हा त्यांना ब्रिटिशांनी काढलेलं वॉरंट दाखवून भारतात येउ दिलं गेलं नाही. बाहेरच्या बाहेर डिपोर्ट केलं गेलं.
बरं, हे सगळ्म असं आहे, होतय, हे सरळ दिसतय. दिसतं आहे, तर दिसतं आहे म्हणावं.
इतकं सगळं होउनही क्रांतीकारक ह्या शब्दाखाली येणार्या व्यक्तीवर कुत्सित शेरेबाजी दिसते.
तर कुणी उठून दहशतवाद्यांशी तुलना करतो.
काही लोक बाय डिफॉल्ट भारत सरकारची स्वात्म्त्र्यान्म्तच्या दोनेक दशकातली प्रत्येक क्रुती कशी बरोबरच होती हे पुनः पुनः सांगतात.
समोर मुद्दे आले की सरळ दुर्लक्षित करतात किम्वा कुत्सित शेरेबाजी होते; बस्स. इतकच.
काय चाल्लय काय?
--मनोबा
.
संगति जयाच्या खेळलो मी सदाहि | हाकेस तो आता ओ देत नाही
.
memories....often the marks people leave are scars
विनाकारण झोडायला माझा नेहमीच
विनाकारण झोडायला माझा नेहमीच विरोध असतो आणि असेल.
खानखोज्यांना पहिल्यांदा येऊ दिलं नै पण शेवटी ते आलेच की. विकी तर म्हणतो ते नागपुरात वारले १९६७ साली.
बाकी सहमत आहे हेवेसांनल. पण जरा ऑब्जेक्टिव्ह राहण्यात काही नुकसान नसावे-नाहीच.
माहिष्मती साम्राज्यं अस्माकं अजेयं
तेल कसे काढावे?
समजा एक ऑयल वेल आहे. ती १०० मी३ इतक्या आकाराची आहे. तिच्यातल्या तेलाचे प्रेशर ३५० -४०० बार असे आहे (हे जास्तच झाले, पण चला). आता इतक्या प्रेशरने क्रूड ऑयल कितीपट दबते? म्हणजे सामान्य १ बार दाबाला १ मी३ असलेले तेल ३५० बारला असे किती दबेल? (एका विशिष्ट पद्धतीने दाबली तर हवा ३५० पट दाबली जाईल, पण तेल?)
१. मग स्वयंस्फूर्त दाबाने १०० पैकी किती तेल येइल? 100 m3 at 350 bar = how many m3 at 1 bar. say x. x-100 तेल जास्तीच्या दाबाने आपोआप बाहेर येईल. या क्ष चा आणि १०० चा काय रेशो असेल याचा काही अंदाज.
२. आता १०० मी३ विहिर १ बार प्रेशरला आली कि पंप लावायचा. पण पंप लावला तर आणि समजा ५ मी३ तेल काढले तर त्याजागी ५ मी३ काहीतरी भरावे लागेल, से पाणी. (अन्यथा निर्वाततेमुळे पंप चालणार नाही.) पाणी, किंवा असेच काहीतरी कारण तेल काढण्यासाठी तितकेच तेल घालणे लॉजिकल नाही. मग त्यानंतर येणार्या तेलात हे पाणीपण पंप होईल. अर्थातच विहिर जशी जशी रिकामी होईल तसे तसे जास्तीत जास्त पाणी पंप होईल. समजा ८०% पानी झाले तर विहिर बिनकामाची समजली जाईल हा भाग वेगळा. सर्वात पहिल्यांदा ते पाणी दूर करावे लागेल. आमचा हा समज योग्य आहे का?
अध्यात्म, अधिविज्ञान, इ त रस असणार्या लोकांनी विषय advanced recovery techniques कडे नेऊ नये. त्याबद्दल मी बोलतच नाहीय. अगदी साधे प्रश्न विचारतोय.
सही: पुरोगाम्यांना लॉजिक माफ असतं.
भीत भीत दिलेली उत्तरे
प्रश्न १. दाबाखालचे तेल पूर्ण लिक्विड असेल तर काहीही तेल बाहेर येणार नाही (कॉम्प्रेस्ड आणि उघड्या तेलाचा व्हॉल्यूम ऑलमोस्ट सारखाच असल्याने). जर गॅसमिश्रित असेल तर बर्यापैकी तेल बाहेर येऊ शकेल.
प्रश्न २- तुम्ही कॉम्प्रेस्ड एअर / नायट्रोजन वापरू शकता*. म्हणजे दोन बार प्रेशरची एअर वापरून तेल बाहेर काढू शकता. म्हणजे विहीर पाण्याने भरणार नाही.
ही उत्तरे माझ्या न्यूमॅटिक्स/हायड्रॉलिक्सच्या ज्ञानावर आधारित आहेत. तुम्ही आधीच त्या तेल क्षेत्रात असल्याने तुम्हालाच उत्तरे अधिक चांगली ठाऊक असतील.
*बोले तो- पंपाच्या स्टोव्ह मध्ये रॉकेल जसे चढते तसे करता येईल.
--------------------------------------------
ऐसीवरील गमभन इतरांपेक्षा वेगळे आहे.
प्रमाणित करण्यात येते की हा आयडी एमसीपी आहे.
ही उत्तरे माझ्या
एक म्हणजे या तांत्रिक बाबी आहेत. दुसरे म्हणजे I am no more oil/energy consultant.
सही: पुरोगाम्यांना लॉजिक माफ असतं.
सॉरी.
सॉरी.
--------------------------------------------
ऐसीवरील गमभन इतरांपेक्षा वेगळे आहे.
प्रमाणित करण्यात येते की हा आयडी एमसीपी आहे.
स्टोव
आपल्या प्रतिसादामुळे स्टोव्हचे फंक्शन कळले. धन्यवाद.
पण स्टोवमधे फ्लेम कशी बनवतात. म्हणजे केरोसीनची पेटती धार असा सीन असायला हवा. त्याची इतकी सुंदर गोल फ्रेम म्हणजे कसे काय त्याचे evaporation होते आणि कशी वर्तुळात distribution होते, तेही सांगून टाकाच.
सही: पुरोगाम्यांना लॉजिक माफ असतं.
इथे
इथे सापडेल
http://en.wikipedia.org/wiki/Primus_stove#How_it_Works
--------------------------------------------
ऐसीवरील गमभन इतरांपेक्षा वेगळे आहे.
प्रमाणित करण्यात येते की हा आयडी एमसीपी आहे.
इन्काँप्रेसिबल
ऑईल हे ऑल प्रॅक्टिकल प्रेशर रेंजमध्ये इन्काँप्रेसिबल समजले जाते. थोडक्यात आकारमानात (व्हॉल्युम) नगण्य (नेग्लिजिबल) बदल होईल.
तुम्ही ड्रील केलंत आणि जर ऑइलचे प्रेशर ३५०-४०० बार असेल तर ऑईल आपोआवर त्या ड्रिल-होलातून वर येईल. (ड्रील केलेल्या होलाच्या सरफेसपाशी प्रेशर हे अॅटमॉस्फिअरीक प्रेशर असेल.)
-Nile
ऑईल हे ऑल प्रॅक्टिकल प्रेशर
हे खरे आहे पण त्यात काही लाईट गॅसेस डिझोल्व झालेले असतात. जशी फट मिळते तशी हे गॅसेस तेलाला प्रचंड दाबाने वर लोटतात असा प्राथमिक कयास आहे.
वेळ मिळाल्यावर in situ reserves and recoverable reserves मधला फरक चेक करून पाहिन.
सही: पुरोगाम्यांना लॉजिक माफ असतं.
Vacuum चं स्प्लेलिंग बहुतांश
Vacuum चं स्प्लेलिंग बहुतांश पब्लिक Vaccum असे का लिहित असावेत?
काही पुस्तकांमध्ये सुद्धा हे स्प्लेलिंग चुकीच असत.
कारण उच्चार व्हॅक्यूम असा
कारण उच्चार व्हॅक्यूम असा ऐकल्यावर डब्बल सी असावे असे वाटते म्हणून. वरिजिनल स्पेलिंग लॅटिन स्टाईल वाटतंय.
माहिष्मती साम्राज्यं अस्माकं अजेयं
lattin
लॅटिनचे स्पेलिंग lattin असे का नाही?
--मनोबा
.
संगति जयाच्या खेळलो मी सदाहि | हाकेस तो आता ओ देत नाही
.
memories....often the marks people leave are scars
स्पेलिंगपेक्षा जेवण श्रेष्ठ
स्पेलिंगपेक्षा जेवण श्रेष्ठ जेवण जेवता येते स्पेलिंग जेवता येत नाही.
--------------------------------------------
ऐसीवरील गमभन इतरांपेक्षा वेगळे आहे.
प्रमाणित करण्यात येते की हा आयडी एमसीपी आहे.
+१
एक लंबर हो थत्तेचाचा
माहिष्मती साम्राज्यं अस्माकं अजेयं
==))
==))
--मनोबा
.
संगति जयाच्या खेळलो मी सदाहि | हाकेस तो आता ओ देत नाही
.
memories....often the marks people leave are scars
ह्म्म्म.... परत 'c' आणी 'u'
ह्म्म्म.... परत 'c' आणी 'u' जवळ जवळ असल्याने वाचतानांही डोळ्यांची थोडी गडबड होत असावी.
अगदी.
अगदी.
माहिष्मती साम्राज्यं अस्माकं अजेयं
अश्लील अश्लील
अश्लील अश्लील
--मनोबा
.
संगति जयाच्या खेळलो मी सदाहि | हाकेस तो आता ओ देत नाही
.
memories....often the marks people leave are scars
माझा वैयक्तिक उच्चार
माझ्या वैयक्तिक उच्चारणात "vacuum" हे वॅक्युअम् (वॅक्यम्) असे होते. हा उच्चार प्रमाण विकल्पांपैकी एक आहे.
हा उच्चार करता प्रमाण स्पेलिंग हे अधिक सोपे जाते.
तीन स्पेसिज
अध्यात्मिक लोक, सामान्य माणसे आणि वैज्ञानिक लोक हे कदाचित तीन वेगवेगळे स्पेसिज तर नसावेत? त्यांच्या कळण्याच्या एकूण क्षमतेतील अंतर पाहता असे म्हणण्याची उर्मी दाटून येते. आणि दिसण्यावर काय जाता? आपल्या सर्वांचा (मी हे ऐसीकरांना, मिपाकरांना, मराठी आंतरजालकरांना, एकूणच आंतरजालकरांना, इतरांना, झाडांना, बॅक्टेरियांना, व्हायरसांना, इ इ ना एकत्रच आपण म्हणतोय बरे) ४०० कोटी वर्षांपूर्वीचा कॉमन बाप आजच्या बॅक्टेरियाच्या शेजारी ठेवला तर ओळखूही येत नाही म्हणे.
सही: पुरोगाम्यांना लॉजिक माफ असतं.
निसर्ग
निसर्ग कित्ती कित्ती छ्छान. प्लीझ, त्याला ओरबाडू नका.
लोकं उपाशी मेले तर मरु द्या. आपण संतुलन राखुया.
ते नालायक पेट्रोल वगैरे वगैरे .... आग लावा त्याला.
*कात घाला प्रगती.
निसर्ग सांभाळा...
झाडे- पर्वतशिखरं - नद्या -- बर्फाच्छादित शिखरं सांभाळा.
प्राणी सांभाळा हो ssss
नाही तर आम्हाला गोग्गोड फोटो कसे काढता येतील निसर्गप्रेमाचे.
उघड्या आदिवासीम्ची संस्कृती वगैरे जपा, (आमच्यासारखे त्यांचे रक्षक वगैरे सोडून इतरांचा) त्यांचा संपर्क बाहेर येउच देउ नका अधिक.
राहू द्या त्यांना तसेच. काय मज्जा येते नै त्या तसल्या माणसासारख्या आदिवासी नामक प्राण्यासोबत फोटो काढायला.
.
.
.
मला ज्यांचा अत्यंत आदर वाटे काही विविध क्षेत्रातील कामांबद्दल, अशा एका प्रतिष्ठित व परिचित व्यक्तीनं world tour चा आणि मज्जा मज्जा करायचा धडाका लावलाय. त्यांचं ते फोटोग्राफी वगैरे कौशल्य नावाजलेलं आहेच, पण ऑस्ट्रेलिया, आफ्रिका,युरोप, दक्षिण अमेरिका इथे सर्वत्र जाताना सदर इसम विमानाने गेलेला दिसतो.
आणि पुन्हा परत येउन "चंगळवादी साले " म्हणत इतरांना झोडपणार.
स्वतःची पोटं भरल्यावर बरी निसर्गाची आठवण येते.
हे झाक्ल्म विवेकवादी वगैरे वगैरे बडबड करीत पोरांच्या शालेय दिवसाप्पासून हितोपदेश करीत सुटणार्या इसमाबद्दल.
.
.
दुसर्या टोकाला हिंदुत्ववादी वगैरे वगैरे म्हणवणार्या माणसांचा दुटप्पीपणा असाच डोक्यात जातो.
ह्यांच्याकडं गेलं, की मेकॉलेनं देश कसा चुलित घातला, वगैरे बोधाम्रुत सुरु. प्रत्येक समस्या ही ब्रितिशजन्यच कशी आहे, हे सांगणार.
राजिव दीक्षितछाप "हे वापरु नका, ते वापरु नका", अमेरिकेची, अमेरिकन कंपन्यांची वाजवा वगैरे सल्ले सुरु.
ह्या सर्व आघाडीच्या इसमांचे सुपुत्र व सुकन्या अमेरिकेत सेट्ल्ड वगैरे आहेत.
तिथल्या बार मध्ये फोटो काढून नाचताहेत.
शेजारी राहणार्या मुलाला मात्र "देशासाठी जीवन अर्पण करणं" वगैरे वगैरे उपदेशाचे डोस. हरामखोर साले.
काहीही झालं की "आमचे कश्यपजी, " , "आमचे शर्माजी " त्यांचा नियमित नेम, त्यांनी पाच लाख खेड्यांना कसे १००% स्वयंपूओर्ण बनवले वगैरे सुरस कथा.
(हिवरा बाजार , व राळेगण सिद्धी सारखी पाच लाख गावंम कह्रच भारतात असावीत का, ह्याचा विचार करतोय.)
उलटं टांगून मिरचीची धुरी द्यायची आहे.
.
.
.
स्<ंभाव्य आक्षेप :-
दुटप्पी लोक सगळीकडेच आहेत. कम्युनिस्टातही आहेत, काँग्रेसीही आहेत.
असतील. माझ्या वर्तुळात एक तर टिपिकल राजकारणाला वैतागलेले शिव्या घालणारे माझ्यासारखे लोक आहेत.
किम्वा जे राजकारनात लक्ष घालतात ते पप्पू विरुद्ध फेकू भांडनात फेकू कडे आहेत.
पप्पूवाले सापडातील तेव्हा तयंनाही शिव्या घालीन.
--मनोबा
.
संगति जयाच्या खेळलो मी सदाहि | हाकेस तो आता ओ देत नाही
.
memories....often the marks people leave are scars
बाकी सर्व ठिकाय पण ती जी कोणी
बाकी सर्व ठिकाय पण ती जी कोणी आदरणीय व्यक्ती वर्ल्ड टूरवर वगैरे गेली म्हणतोसः
मग या सर्व ठिकाणी आगबोटीने किंवा येष्टीने जावयास हवे होते का??!
त्यांचं म्हणणं
मग या सर्व ठिकाणी आगबोटीने किंवा येष्टीने जावयास हवे होते का??!
हे वाक्य त्या व्यक्तीनं म्हटलं तर मी म्हणे you proved my point.
कारण ह्यातून "विमान वापरणे भाग आहे" कीम्वा निदान "विमान वापरणे पाप नाही" हे तरी अधोरेखित होते.
शिवाय मज्जा मज्जा करायला विमान चालतं, मग "तथाकथित विकास", "तथाकथित प्रगती" असा वाक्योपयोग करत "तथाकथित" शब्द का वापरायचा ?
स्वतः S U V वापरुन पर्यावरणाबद्दल टिपं गाळू नयेत.
(त्यांच्याकडे SUV आहे असं मी म्हणत नाही, पण वृत्ती अधोरेखित करायची आहे.)
--मनोबा
.
संगति जयाच्या खेळलो मी सदाहि | हाकेस तो आता ओ देत नाही
.
memories....often the marks people leave are scars
शेजारी राहणार्या मुलाला
शेजारी राहणार्या मुलाला मात्र "देशासाठी जीवन अर्पण करणं" वगैरे वगैरे उपदेशाचे डोस. हरामखोर साले.
मनोबा, या वाक्याबद्द्ल तुमास्नी माझ्यातर्फे चिकन बिर्याणी. प्लस पिनो न्युआर ची एक बाटली.
स्वामिनाथन अय्यर हे सर्वांनाच मूर्ख समजतात का ?
http://swaminomics.org/aap-can-take-a-leaf-out-of-amartya-sens-book/
AAP can take a leaf out of Amartya Sen’s book
.
ह्यापूर्वी भारत भ्र्ष्ट असला तरी भ्रष्टाचारामुळेच पुढे जायचं त्यात पोटेन्शिअल आहे.
इथे निय्माबाहेर पैसे द्यायला तयार असलेल्या व्यक्तीला वआटेल त्या सिविधा मिळतात.
वेगानं फायली क्लिअर होतात. good governence म्हणतात तो हाच की हो.
ह्या छापाचे लेख चारेक वर्षापूर्वीपर्यंत टाकले होते.
भर्ष्टाचार व एकूणातच उचपदस्थापासून ते जनसामान्यांची गैरवर्तणूक कशी खरंतर एकूणात उपकारक आहे,
लाच हे काम वेगात करण्याच incentive कसं आहे वगैरे छाप तर्क त्यात होते.
भारतीय कारभार व एकूणात HDI हा पार स्कॅन्दिनेवियन देशांचय पुढे पोचलाय ह्याची आम्हास खात्री होउ लागली.
.
.
आत्त एखाद दोन वर्षापूर्वी आर्थिक आघाडीवरच भारताचं चित्र कमालीचं निराशाजनक होतं.CAD अतोनात वाढलेला, जीडीपी कमी कमी होत साडे चार पाच टक्क्यावर येतो का काय अशी स्थिती आलेली.
चलनवाढ होतच होती.stagflation सदृश परिस्थितीकडे वाटचाल वगैरे होती. अण्णा -अcivil society आंदोलन नुकतच होउन गेलं होतं.
तेव्हा दोन चार लेखातून अय्यरभाउनं "विकास गोठला. देशांतरगत पायाभूत सुविधा,infrastructure projects रखडले,थांबले, अर्थव्यवस्था पांगळी झाली. ह्या सर्वास प्रमुख कारण म्हणजे स्वच्छ कारभाराची मागणी करणारा दबावगट." अशी भूमिका घेतली. स्वच्छ कारभार हवा असेल तर आहे तिथे गोठण्याची तयारी करा, असा धमकीवजा सूर त्यात होता.
थोडक्यात, स्वच्छता नको, मग बघा कसा फटाफटा विकास होतो, वगैरे भूमिका त्यात होती.
.
.
.
चला, हे ही मानलं आम्ही. लाच देणे वगैरे थोर, राष्ट्रसेवेची कर्तव्यं आहेत वगैरे मान्य केलं.
.
.
आता पुन्भोपोमिकाभूमिका :-
स्वच्छ कारभार हा market व्यवस्थित सुरु राहण्यास उपकारक व आवश्यक ठरतो. वगैरे वगैरे.
.
.
अरे तुम कुछ तो बी एक बोलो ना भाय.
तुम्हारा समस्या क्या हय, घूंस चालू रेहना की बंद हो जाना ?
--मनोबा
.
संगति जयाच्या खेळलो मी सदाहि | हाकेस तो आता ओ देत नाही
.
memories....often the marks people leave are scars
"विदा"
परवा पासुन ऐकतोय
हे "विदा" म्हणजे काय प्रकरण आहे रे भौ?
हा शब्द मराठीत आहे कि इंग्लिश?
सगळ्या मर्हाटी संस्थळावर या शब्दाचा मुक्त हस्ताने वापर होतो, पण त्याचा अर्थ काय?
वीतराग बनो......वीतद्वेष बनो !
अत्त दीप भव !
विदा म्हणजे डेटा
विद् या धातूपासून बनलेला अस्सल मराठी शब्द आहे आंतरजालावर सर्वत्र वापरला जातो. जेव्हा प्रस्थापित माध्यमांत वापरला जाईल तेव्हा आनंद होईल.
मध्यंतरी आत्त असा शब्द जास्त
मध्यंतरी आत्त असा शब्द जास्त योग्य आहे असे कोणी म्हटल्याचे आठवते.
--------------------------------------------
ऐसीवरील गमभन इतरांपेक्षा वेगळे आहे.
प्रमाणित करण्यात येते की हा आयडी एमसीपी आहे.
विदा आणि आत्त
विदा हा शब्द मनोगताने रूढ केला असावा असे वाटते (उदा. विदागाराला अपघात). आत्त शब्द धनंजय यांनी सुचवलेला आहे, असे वाटते.
मराठी आंजावरतरी "विदा" रुळलेला दिसतो. आंजाबाहेरमात्र Data हाच रूढ शब्द असावा.
मी शक्यतोवर "आत्त" वापरतो
मी शक्यतोवर "आत्त" वापरतो. किंवा संदर्भास धरून असेल, तर साधनसामग्री. मराठी आंतरजालावर म्हणावे, तर शब्द मी शोधून सांगितलेला आहे खरा. परंतु जुन्या-नवीन मराठी शब्दकोशांत सापडतो, त्यामुळे श्रेयअव्हेर.
प्रस्थापित माध्यमे "विदा" हे विचित्र-सामान्यरूप-असलेले नाम वापरू लागल्यास मीसुद्धा वापरेन. जोवर प्रस्थापित होत नाही, तोवर "विदा" शब्द न वापरून मी त्याबद्दल नापसंती व्यक्त करतो आहे.
विदा-आत्त-आधारमाहिती
'विदा' हा शब्द मी आंतरजालावर येईपर्यंत ऐकला/वाचला नव्हता. जालावर वाचल्यावर शब्दातून काही बोध झाला नाही. कालांतराने संदर्भांतून झाला. 'आत्त' हा मी प्रथमच वाचतो आहे. 'data' साठी मी स्वतः 'आधारमाहिती' असा शब्द वापरत असे, अजूनही वापरतो. मात्र datum साठी अजून सुटसुटीत शब्द सुचलेला नाही.
ही बडबड तुम्ही करताहात यापाठी
ही बडबड तुम्ही करताहात यापाठी काही विदा आहे काय?
<<
यात विदा म्हणजे विशेष दाखला असे असावे असे माझे मत आहे.
विदा म्हणजे डेटा, असा अर्थ नसावा.
-: आमचे येथे नट्स क्रॅक करून मिळतील :-
आता काही दिवस तरी मी निकम्मा
आता काही दिवस तरी मी निकम्मा आहे.
The frequency of Rejection is measured in Hurtz.
आपले मत आपल्या पार्श्वभागात (गांडीत) घालावे स्पेशली जर व्याकरण विषयी असेल तर!
पृथ्वी सूर्याभोवती
पृथ्वी सूर्याभोवती लंबवर्तुळाकार कक्षेत का फिरते?? बदलणाऱ्या त्रिज्येमुळे केंद्रापासून दूर ढकलणाऱ्या बलामुळे (सेंट्रीफ्युगल फोर्समुळे) एकतर ती कक्षा सोडून भरकटली पाहीजे किंवा गुरुत्वबल जास्त ताकदीचे झाल्यास आत आत येऊन सूर्यावर जाऊन धडकली पाहीजे. ( सेंट्रीफ्युगल फोर्स आणि गुरुत्वबल एकमेकांना क्यान्सल करतायत असे मानले तर मग कक्षा वर्तुळाकार हवी.) सूर्याची काही वेगळी हालचाल होत असते का ?
सेंट्रिफ्यूगल फोर्स असं
सेंट्रिफ्यूगल फोर्स असं खरोखरचं बल नसतं. त्यामुळे सूर्याभोवती फिरणाऱ्या ग्रहावर केवळ एकच बल कार्यरत असतं - ते म्हणजे सूर्याच्या केंद्राकडे खेचणारं, अंतराच्या वर्गाच्या व्यस्तानुपाती बल. त्यामुळे ग्रहाचं परिवलन हे दोन बलं एकमेकांइतकी झाली तर बरोब्बर वर्तुळाकृती नाहीतर आतल्या दिशेला किंवा बाहेरच्या दिशेला असं नसतं. सूर्यापासून काही अंतरावरून एखादी वस्तू सूर्याच्या पृष्ठभागाला समांतर फेकली तर ती सूर्यावर पडेल. पण ती जोरात फेकली तर ती पडायच्या आतच पुढे गेलेली असेल आणि कायम सूर्याला समांतर राहील. ही वर्तुळाकार गती. त्याहून किंचित अधिक जोरात फेकली तर ती लंबवर्तुळाकार कक्षेत जाईल.
सेंट्रिफ्यूगल फोर्स मानूनही
सेंट्रिफ्यूगल फोर्स मानूनही* राजेश घासकडवी म्हणतात ते विश्लेषण करता येते.
-------
*सेंट्रिफ्यूगल फोर्स मानावा की न मानावा याकरिता "गणित सोपे होते की कठिण" हा निकष असतो. वर्तुळाकार सोडून कुठल्याही अन्य आकारातल्या मार्गात सेंट्रिफ्यूगल फोर्स मानून गणित क्लिष्ट होते. त्यामुळे राजेश घासकडवी म्हणतात त्याप्रमाणे सेंट्रिफ्यूगल फोर्स न-मानता केलेले गणित समजुतीकरिता वरचढ ठरते.
--------
पृथ्वी लंबवर्तुळाकारात सूर्याच्या जवळ असते, तेव्हा तिचा वेग अधिक असतो, आणि लंबवतुळात सूर्यापासून लांब असते, तेव्हा तिचा वेग जास्त असतो. मधल्या अंतरात मधले वेग. हे का? कॉन्झर्व्हेशन कायदे. (किंवा आवडत असल्यास केप्लरचा "ईक्वल एरिया इन ईक्वल टाईम" कायदा - सर्व एकच गणित सांगायचे वेगवेगळे प्रकार.)
जितका वेग अधिक, तितका सेंट्रिफ्यूगल फोर्स अधिक, केंद्रापासून जितके अंतर कमी, तितका सेंट्रिफ्यूगल फोर्स जास्त - (वेगाच्या वर्गाशी थेट संबंध, अंतराशी व्यस्त संबंध). हे कमी-जास्त जवळजवळ तुल्यबळ असतात. तंतोतंत तुल्यबल नाही, पृथ्वी सूर्याच्या सर्वात जवळ असताना सेंट्रिफ्यूगल फोर्स गुरुत्वाकर्षणापेक्षा थोडा अधिक असतो, म्हणून त्यानंतर पृथ्वी सूर्यापासून दूरदूर जाऊ लागते. पृथ्वी सूर्यापासून सर्वात लांब असते, तेव्हा वेग पुरेसा कमी झालेला असतो, आणि सेंट्रिफ्यूगल फोर्स हा गुरुत्वाकर्षणाच्या बलापेक्षा थोडा कमी असतो. त्यानंतर बलांच्या असमतोलामुळे पृथ्वी सूर्याच्या जवळजवळ येऊ लागते. आणि असेच प्रत्येक परिभ्रमणाच्या वेळी.
ओक्के!!! मी वेगामध्ये फरक
ओक्के!!! मी वेगामध्ये फरक पडेक याचा विचारच केला नव्ह्ता. आता पुरेसं स्पष्ट झालं आहे.
घासकडवींना सेंट्रिफ्यूगल फोर्स नसतो म्हणजे नेमकं काय म्हणायचं आहे हे समजलं नव्हतं. ईनर्शियामुळे बाहेर फेकणारा किंवा वळायला विरोध करणारा फोर्स येईलच.
"मोटो -जी" ची क्रेझ
मोटोरोला या कंपनीचे नुकतेच गुगल कडून लीनोव्हो कडे हस्तांतरण झाले . गेली काही वर्षे samsung आणि apple च्या स्पर्धेत इतर कंपन्यांचा प्राण कंठाशी आला होता . त्यात भारतीय बाजारपेठेत micromax आणि kaarbon / lava सारख्या कंपन्यांनी आपले स्थान निर्माण केलेलं होतं .
अशा परीस्थितीत मोटोरोला चा नवा "मोटो -जी" या मॉडेल कडे game -changer म्हणून पाहिले जात आहे। ५. इंची स्क्रीन ,१ जीबी RAM , १. २ GHz प्रोसेसर आणि android kitkat update सह १६ जीबी इंटर्नल मेमरी , ५ MP कॅमेरा इत्यादी वेधक वैशिष्ट्यांनी सजलेला हा फोन flipkart वरून फक्त १४,०००/- ला घरपोच उपलब्ध असल्याने ग्राहकांच्या उड्या पडल्या नसत्या तरच नवल!
लॉंच केल्यापासून हा फोन overbooked असून out -of -stock आहे, इतका लोकप्रिय ठरला आहे. "मोटो -जी" च्या या क्रेझ बद्दल आणि फोन बद्दल आपली मते जाणून घेणे जरूर आवडेल …
वीतराग बनो......वीतद्वेष बनो !
अत्त दीप भव !
हिंदी चित्रपटसृष्टीमध्ये
हिंदी चित्रपटसृष्टीमध्ये स्त्री संगीत दिग्दर्शिका एवढ्या कमी का आहेत? आवाजी चित्रपटांच्या ७०-७५ वर्षांमध्ये एका हाताच्या बोटांवर मोजण्याइतक्याच असतील. मला फक्तं उषा खन्ना आणि आत्ताची स्नेहा खानवलकर या दोनच बायका आठवतायत. यामागे काय कारण असावं?
आधी रोटी खाएंगे, इंदिरा को जिताएंगे !
या बाबतीत इतर भाषिक चित्रपट
या बाबतीत इतर भाषिक चित्रपट सृष्टीत काय स्थिती आहे हे ही पाहायला आवडेल. (आनंदघन सांगु नका हो). विशेषत: दक्षिणात्य. कर्नाटक संगीतात,वादन क्षेत्रात बऱ्याच नामांकित स्त्रिया आहेत तेव्हा त्यांना ह्या क्षेत्रात मुद्दामहून डावलले जाते असेही वाटत नाही. अधिक माहिती/चर्चा आवडेल.
अजून एक निरीक्षण.
अजून एक निरीक्षण. संगीतकारांसारखच गीतकार म्हैला पण नाय दिसत. फार कमी दिसतात. क्वीनची गाणी एका बाईने लिहिली आहेत. ती सोडून अजून कोणी गीतकार माहीत आहेत का कोणाला? मराठीमध्ये शांता शेळके वगळता अजून आहेत का कोणी?
आधी रोटी खाएंगे, इंदिरा को जिताएंगे !
नाटककारपण मला दोनच माहीत
नाटककारपण मला दोनच माहीत आहेत. मनस्विनी लता रवीन्द्र आणि इरावती कर्णिक. अजून कुणी असल्यास आमचं अज्ञान दूर करा.
-मेघना भुस्कुटे
***********
तुन्द हैं शोले, सुर्ख है आहन
कोल्हटकरांच्या आत्मवृत्तात
कोल्हटकरांच्या आत्मवृत्तात मराठा समाजातल्या एका सुशिक्षित बाईंनी नाटक लिहिल्याचा आणि कोल्हटकरांना ते आवडल्याचा उल्लेख आहे. नक्की बघून सांगतो.
********
It is better to have questions which don't have answers, than having answers which cannot be questioned.
सरिता पदकी, सई परांजपे
सरिता पदकी, सई परांजपे यांनी नाटके लिहिली आहेत.
आणखी गीतकार म्हैला
योगिनी जोगळेकर, वंदना विटणकर, इंदिरा संत
धन्यवाद. आठवणीतील गाणी वर
धन्यवाद. आठवणीतील गाणी वर बघणार होतो. पण हपिसात नाय उघडत ती साइट.
आधी रोटी खाएंगे, इंदिरा को जिताएंगे !
डोळ्यात खडा
डोळ्यात लहानसा खडा/किडा जाणे ही अतिशय साधी पण डोक्याला ताप घटना.
तो पटकन काढण्यासाठी रूढ उपाय :
कुणा व्यक्तीला डोळ्यात जोरात फुंकायला सांगणे,
पापण्या चिमटीत पकडून झाडणे,
बशीत स्वच्छ पाणी घेऊन डोळा पूर्ण बुडवून उघडझाप करणे,
डोळ्यात एखादे औषध घालून पाणी काढणे.
परंतु बऱ्याचदा हे सर्व उपाय निकामी ठरतात. इच्छुकांनी अजून इफेक्टिव उपाय सुचवावेत.
(मला स्वत:ला खूप त्रास होत होता तेव्हा आणि फुंकायला दुसरा कुणी उपलब्ध नव्हता तेव्हा स्वत: फुंकता येण्यासाठी सायकलच्या पुंगळीची स्वतंत्र लांब ट्यूब मोकळ्या पेनला बसवले होते आणि जोराने फुंकून खडा काढला होता.)
तोंडाने फुंकून गरम रुमालाने
तोंडाने फुंकून गरम रुमालाने शेकले की लवकर निघतो किडा
- ऋ
-------
लव्ह अॅड लेट लव्ह!
डोळ्याची रचना निसर्गतःच अशी
डोळ्याची रचना निसर्गतःच अशी असते की डोळ्यात लहान कचरा शिरला की अश्रुपाताने तो धुतला जाऊन कडेने बाहेर टाकला जातो. अशा वेळी हे कार्य घडू न देता डोळा गच्च बंद करुन घेणे, दाबणे, चोळणे अशामुळे तो एरवी ऑपॉप निघणारा पदार्थ डोळ्याच्या मऊ टिश्यूत घुसतो आणि मग जास्त भाग इरिटेट होतो.
एकुणात असा बारीक कण / किडा डोळ्यात गेल्यावर कितीही झोंबले तरी चालेल, पण डोळा सताड उघडा ठेवावा. चोळण्याची इच्छा प्रयत्नपूर्वक दाबून ठेवावी. डोळा उघडा राहात नसेल तर पापण्या बोटांनी धरुन तो उघडा ठेवावा. या कृतीने आणखी घळाघळा पाणी येण्यास मदत होईल. बाकी काम डोळ्याची नैसर्गिक रचनाच सांभाळेल. दोनतीन मिनिटांत नाकाजवळच्या किंवा कानाच्या दिशेतल्या कोपर्यात हा कण वाहून आलेला दिसेल. तो सहज काढता येईल.
फुंकर मारण्याची क्रिया ही याच घळाघळा अश्रू आणणे या इफेक्टसाठी असते.. थेट फुंकरीने वस्तू बाहेर येत नाही. फुंकर मारायला कोणी नसेल तर वरील उपाय बेस्ट. शिवाय कोणी फुंकर मारणारे असलेच तरी कोणतीही फुंकर ही काहीप्रमाणात थुंकरही असतेच. त्यासोबत समोरच्या व्यक्तीच्या थुंकीतून काही अनिष्ट जंतू / बुरशी आपल्या डोळ्यात जाऊ शकते. वगैरे.. तेव्हा ते टाळावे.
वरील कृती करताना ज्यांना काही आरोग्यविषयक कारणांनी डोळ्यांत अतिरिक्त कोरडेपणा आहे आणि पाणी येऊ शकत नाही त्यांनी हे करणे योग्य ठरेल की नाही याबद्दल मी साशंक आहे.
शिवाय डोळ्यात गेलेली वस्तू काचेचा तुकडा किंवा अन्य धारदार प्रकारची असेल तर ती ऊतींमधे घुसून राहू शकते आणि वरील उपायाने निघणे कठीण वाटते. अशा वेळी डोडॉ कडे जाणे योग्य.
पर्फेक्ट
म्हणूनच आम्ही गविकाकाचा सल्ला हे सदर सुरु केल्तं.
बादवे, थुंकर हा शब्द वापरायची कल्पना आवडली.
आंग्ल भाषेत असे सामासिक लै शब्द आहेत मेकॅट्रोनिक्स, रिइंजिनीरिंग वगैरे वगैरे.
तोच प्रकार मराठीत पाहून आनंद वाटला. मस्तच.
--मनोबा
.
संगति जयाच्या खेळलो मी सदाहि | हाकेस तो आता ओ देत नाही
.
memories....often the marks people leave are scars
व्होट्सअॅप फेसबुक मर्जर होऊ
व्होट्सअॅप फेसबुक मर्जर होऊ घातले आहे. ते पूर्ण झाल्यासः
१. फेसबुक व्हॉट्सअॅपवर जाहिराती टाकणार का?
२. फेसबुकवर सदस्य जसे नावाने शोधता येतात तसे व्हॉट्सआप अकाउंटधारकांना नावाने शोधता येणार का?
३. व्हॉट्सअॅपसोबत फोन नंबर संलग्न असल्याने तोही पब्लिकली दृश्य होणार का?
४. अशा रितीने फोन जगजाहीर झाल्यावर येणार्या स्पॅम कॉल्सची जबाबदारी फेसबुक घेणार का ? (हा प्रश्न उगाचच.. उत्तर नाही असेच आहे हे माहीत आहे.. )
शिवाय
वरील शंकांव्यतिरिक्त वविचारण्यात येणार गोष्ट मम्हणजे
I'm more worried about privacy intrusion than advertisementस
--मनोबा
.
संगति जयाच्या खेळलो मी सदाहि | हाकेस तो आता ओ देत नाही
.
memories....often the marks people leave are scars
फेसबुक व्हॉट्सअॅपवर जाहिराती
फेसबुक व्हॉट्सअॅपवर जाहिराती टाकणार का?
मला नाही वाटत ते जाहिराती टाकतील.
पण बिग डेटा आहे ना. त्याच्यावर अॅनॅलिटिक्स रन करून रग्गड कमाई होई शकते. ४५० मिलियन युजर्स साठी $१९ बिलियन मोजलेनीत. प्रत्येक युजर ची व्ह्यॅल्यु $४२.
मला वाटतं फेबु ने मेजर माती
मला वाटतं फेबु ने मेजर माती खाल्ली आहे. व्हॉटसअॅप कंपनीच्या कशासाठी पैसे मोजावे (व्हॅल्यूएशन)? तर (१) तंत्रज्ञान आणि (२) वापरकर्ते - म्हणजे यूजर बेस. त्यातलं तंत्रज्ञान भारी नसावं१. यूजर बेस आणि गब्बर यांनी म्हटल्याप्रमाणे "बिग डेटा" नि:संशय आहे२, पण आजच्या घटकेला. अशा धंद्यासाठी यूजर बेस हे अळवावरच्या पाण्यासारखा असतो३. यूजर्सना व्हॉटसअॅपला रामराम ठोकून लाईन, टेलिग्राफ, वीचॅट वगैरे मंडळींकडे जाण्यासाठी काही अडचण आहे का (एक्झिट बॅरियर)? अज्याबात नाही. उलट फेबुची ढिसाळ सिक्युरिटीबद्दल बरीच कुप्रसिद्धी झाली आहे. व्हॉटसअॅप पण एन्क्रिप्टेड नाही म्हणतात. त्यामुळे यूजर्स कल्टी मारण्याची शक्यता दाट आहे. व्हॉटसअॅप आणि फेबु इंटिग्रेट करता येईल, पण त्यासाठी फेबुला अजून खर्च करावा लागेल.
अशा स्थितीत फेबुने आपल्या २०१३च्या उत्पन्नाच्या (आठ बिलियन डॉलर) दुपटीपेक्षा जास्त किमतीला व्हॉटसअॅप विकत घेणं धाडसाचं आहे.
-----------
१मला त्यातलं विशेष कळतं असं नाही, पण व्हॉटसअॅपचे स्पर्धक चिक्कार आहेत. लाईन, टेलिग्राफ, वीचॅट वगैरे. वायबरसारख्या जास्त सुविधा देणारी अॅप्स पण आहेत. म्हणजे तंत्रज्ञान लय भारी नसावं
२याबद्दलपण मी साशंक आहे - व्हॉट्स अॅप वापरणारे बहुतांश लोक फेबु खातं असणारेच असतात. त्यामुळे फेबुला वेगळ्या प्रकारचा डेटा मिळेल कदाचित, पण नवीन यूजर बेस नाही मिळणार.
३आठवा - ऑर्कूट, त्यावर गूगलने मिळवलेला ताबा आणि फेबु-उदय.
********
It is better to have questions which don't have answers, than having answers which cannot be questioned.
घाशीराम कोतवालाच्या दंतकथा /
घाशीराम कोतवालाच्या दंतकथा / चुटके असलेलं एक पुस्तक होतं. तेंडुलकरांनी त्याचाच आधार घेऊन नाटक रचलं म्हणतात. गोनीदांनी "रुमाली रहस्य" नावाची एक ऐतिहासिक रहस्यकथा याच पुस्तकाचा आधार घेऊन रचली आहे असं प्रस्तावनेत वाचल्याचं आठवतं आहे.
ते मूळ पुस्तक कोणाकडे आहे का? मला वाचायची फार इच्छा आहे.
प्रमोद सहस्रबुद्धे यांनी हे पुस्तक २०१० साली वाचल्याचा उल्लेख इथे आहे. याचा अर्थ पुस्तक अजून अस्तित्त्वात आहे. उपक्रम बंद असल्याने आणि मी सभासद नसल्याने सहस्रबुद्धे यांच्याशी थेट संपर्क साधू शकत नाहीये.
********
It is better to have questions which don't have answers, than having answers which cannot be questioned.
माझं कुरुप whatsapp
माझं कुरुप whatsapp.
थट्टा म्हणून लोक विविध ग्रुप्सवर फोटो फॉरवर्ड करीत असतात.
त्यात शारिरिक व्यंग असणार्यांची थट्टा असते, तशीच कुट्ट काळ्या लोकांची थट्टा असते.
आफ्रिकन काळे व भारतीय काळे ह्यांचीही प्रचंड संख्या.
कधे दात पुढे असलेले लोक असतात; कधी जाड्या मुली असतात.
कधी रेड लाइट एरियातल्या बटबटित मेकप केलेल्या बायका असतात.
i want to kiss group admin अशी त्यांच्या फोटोखाली त्याखाली ओळ असते.
लोकांची विनोदाची पातळी इतकी गलिच्छ कशी असू शकते ?
"देवा त्यांना माफ कर " म्हणण्यापलीकडे दरवेळी फार काही करता येत नाही.
(किंवा फार तर अगदिच वैतागून "ज्याची हे थट्टा करताहेत ते ह्यांच्या वाट्याला येउ दे " असं म्हणतो मनातल्या मनात.)
(एका भुक्कड माणसामुळं आख्खा ग्रुप सोडून जाणं योग्य ठरत नाही.
अर्थात ग्रुपमधील एरव्ही संयमी किंवा मॅच्युअर्ड वाटणार्या सदस्यांचीही कधी कधी मूक संमती दिसतेच.)
--मनोबा
.
संगति जयाच्या खेळलो मी सदाहि | हाकेस तो आता ओ देत नाही
.
memories....often the marks people leave are scars
आज आमच्या कॉलेजमध्ये एक मजा
आज आमच्या कॉलेजमध्ये एक मजा झाली. आगामी वर्षात करावयाच्या प्रकल्पासंबंधी माहिती देण्यासाठी आमच्या बॅचची एक मिटिंग आयोजित करण्यात आली होती. ह्या मिटिंगमध्ये एक कागद देऊन त्यावर प्रत्येकाने आपले नाव हिंदीमध्ये लिहा असे सांगण्यात आले (आमच्या प्रमाणपत्रावर हिंदीही असते). त्यानंतर गोंधळच गोंधळच सुरू झाला. कित्येकांना आपले नाव लिहिता येत नव्हते. कित्येक जण लिहून खाडाखोड करून पुन्हा लिहीत होते. 'व' कसे लिहायचे, 'श्र' कसे लिहायचे, पाय कसा मोडायचा (हलंत कसे दाखवायचे) वगैरे शंका बर्याच जणांना पडल्या होत्या.
ह्यातले अगदी हार्डकोअर तमिळे सोडा, उरलेले बहुतेक जण शाळेत हिंदी शिकले होते. अनेक कन्नड, तेलुगु, मलयाळी मुलांना पाचवी ते दहावीपर्यंत हिंदी विषय होता आणि ते हिंदीत उत्तरे लिहीत होते! इतके शिकलेल्याला आपले नाव त्या भाषेत लिहायला, तेही स्वत:चे नाव, इतकी अडचण कशी काय येऊ शकते हा प्रश्न पडलाय! :-S