तुम्ही कुणाला घ्याल?

व्याप्तिनिर्देशः या धाग्याचा मुख्य उद्देश थोडी मजा करणे हा आहे. काही गंभीर चर्चा नि वादंग केलेत तरी आपली काही हरकत नाही. पण तो या धाग्याचा मुख्य उद्धेश नाही याची नोंद घ्यावी. अवांतर ज्ञान पाजळणे, दंगा करणे, फाटे फोडणे, धागा हायज्याक करणे या सगळ्याला खुल्या दिलानं आमंत्रण. गेले दोन दिवस जाम दमायला झालं आहे.

अमुक एक गोष्ट (कथा / कादंबरी) घ्यायची आणि तिच्यावर सिनेमा किंवा सिर्‍यल बनवायची आहे अशी कल्पना करून त्यात आपल्याला आवडतील अशा अभिनेत्यांची योजना करायची हा माझा आवडता टाइमपास आहे.

कुठले अभिनेते आपल्याला कित्तीही आवडत असले, तरी ते आता तितकेसे तरुण उरलेले नाहीत; कोणाची रुपडं सुटेबल असलं, तरी अभिनयाची बोंब आहे; कोण एकाच टाइपच्या कामांमधे अडकलं आहे; नवीन उल्लेखनीय कोण आहे... असे बरेच साक्षात्कार होतात.

सुरुवातीला मी 'एम टी आयवा मारू' ही सामंतांची कादंबरी घेते. (तिच्यात कुणालाच रस नाही, असं शक्य आहे. कारण सामंत आउटडेटेड अहेत. तसं झाल्यास, तुम्हीच दुसरी लेटेस्ट इंट्रेष्टिंग कथा / कादंबरी सुचवावी.)

(पूर्वी ही कादंबरी जाम म्हणजे जामच आवडत असे. कालांतरानं तिच्यातल्या गडबडी दिसायला लागल्या. आता सामंतही फारसे आवडत नाहीत म्हणा. पण जाम चित्रदर्शी, स्टायलिश नि मराठीत कमी सापडणार्‍या खलाशी ब्याकग्राउण्डवरची गोष्ट आहे, यात दुमत नसावं. हिच्यावर सिनेमा बनवायचे हक्क म्हणे नाना पाटेकरनं विकत घेऊन ठेवलेत. हा तपशील कळल्यावर या कादंबरीच्या ग्ल्यामरमधे भरच पडली होती. पण ते असो. धाग्यावर अवांतर चालेल म्हटलं, म्हणून इथेच फाटे फोडावेत असं काही नाही. :प)

उज्ज्वला: सई ताम्हणकर
दीपकः सुबोध भावे
अनंतः ???
कॅप्टन रॉसः मोहन आगाशे

... पुरे. पाहा, आता काय करता ते.

field_vote: 
4
Your rating: None Average: 4 (1 vote)

प्रतिक्रिया

विचित्र?

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

--मनोबा
.
संगति जयाच्या खेळलो मी सदाहि | हाकेस तो आता ओ देत नाही
.
memories....often the marks people leave are scars

मी शेरलॉकबद्दल काही बोलायला भिते हल्ली. लोक विचित्र नजरेनं पाहतात.

मला वाटायचं की हे फक्त माझ्याबरोबरच होतं.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

- ऋ
-------
लव्ह अ‍ॅड लेट लव्ह!

असल्या फ्याशनच्या भानगडीत नै पडत तेच बरंय च्यायला.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

माहिष्मती साम्राज्यं अस्माकं अजेयं

फ्याशन काये त्यात?

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

-मेघना भुस्कुटे
***********
तुन्द हैं शोले, सुर्ख है आहन

फ्याशन अ‍ॅज इन "तुलनेने नव्या गोष्टी". त्यात जजमेंट पासिंग जास्त असतं, जुन्या गोष्टींबद्दलही असतं पण इतकं इंटेन्स नसतं ते काही वेळेस बरं वाटतं.

(असे म्हणून मीही एक जजमेंट पासवले आहेच, पण ते एक असो. Biggrin )

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

माहिष्मती साम्राज्यं अस्माकं अजेयं

काहीही कळले नाही.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

-मेघना भुस्कुटे
***********
तुन्द हैं शोले, सुर्ख है आहन

असो, विशेष कै नव्हतं.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

माहिष्मती साम्राज्यं अस्माकं अजेयं

सायलेँस ऑफ द लँबज् च्या देसी अवतारात कोण?

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

अक्षय आणि प्रिती झिंटा आहेत ऑलरेडी

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

अरे हो विसरलेच की. भयानक होता तो चित्रपट.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

धागा लेखिकेने तुम्ही कुणाकूणाला घ्याल असा शीर्षकात बदल करावा. ज्यांच्या आशा, आकांक्षा मोठ्या आहेत त्यांच्यावर अन्याय नको.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

सही: पुरोगाम्यांना लॉजिक माफ असतं.

देसी हेरी पॉटर, ट्वायलाइट, हंगर गेम्स चा तर विचार पण करु शकत नाही Sad
बर व्हँपायर म्हणुन कोण चांगल दिसेल हिँदीत?
डोरीयन ग्रे चा गे नात्यावर बनवता येइल का? त्यात कोणाला घ्याल?

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

थोर दिग्दर्शक करण जोहर व नटाश्रेष्ठ शाहरुख हे गे व्यक्तीची भूमिका उत्तम करु शकतील असे वाटते.
शिवाय दर चित्रपटात किमान एक गे पात्र दाखवण्यासाठी आसुसलेल्या मधुर भांडारकरांनी अशा कास्टिंगचा आधीच विचार केला असावा.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

--मनोबा
.
संगति जयाच्या खेळलो मी सदाहि | हाकेस तो आता ओ देत नाही
.
memories....often the marks people leave are scars

मधुर भांडारकरनं एक 'चांदनी बार' तेवढा बरा काढला होता. सुवर्णकमळबिमळ विजेता 'पेज थ्री' मी पाहिला नाहीये. नंतर एकच तर सिनेमा काढलाय त्यानं, परत परत.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

-मेघना भुस्कुटे
***********
तुन्द हैं शोले, सुर्ख है आहन

नै. तो हुमा कुरेशीचा भाऊ साकिब सलीम चांगलाय डोरीयन म्हणुन.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

काय लावलंय बे देसी क्ष, देसी य, आँ?

परदेशी महाभारतात कुणाला घ्यायचं ते बोला. कृष्णाच्या भूमिकेसाठी जॉनी डेप पर्फेक्ट वाटतो.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

माहिष्मती साम्राज्यं अस्माकं अजेयं

याचं जॉनी डेपप्रेम संपेना बॉ. मला नितीश भारद्वाज हा कृष्ण म्हणून एकदाच पर्फेक्ट कायमचा आवडून गेलेला आहे.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

-मेघना भुस्कुटे
***********
तुन्द हैं शोले, सुर्ख है आहन

तोही अर्थातच उत्तम आहे. पण अजून रॉ व्हर्जनसाठी जॉनी डेपला पर्याय नै. अन अर्जुन म्हणून कोण? रसेल क्रो?

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

माहिष्मती साम्राज्यं अस्माकं अजेयं

पण पुन्हा विचार करता: फरहान अख्तर चालेल. Tongue
बाकीचं कास्टिंग करायला मजा येईल. अमिताभ भीष्म. माही गिल द्रौपदी. मोहनीश बहल युधिष्ठिर...

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

-मेघना भुस्कुटे
***********
तुन्द हैं शोले, सुर्ख है आहन

अर्जुन म्हणून कुणीतरी नाजूक (म्हणजे स्त्रैण नाही), केसांचा फुगा इस्कटला तर बिथरेल अशा प्रकारचा देखणा माणूस हवा. देवानंद म्हटलं असतं मी, पण तो गेला बिचारा एकदाचा.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

-मेघना भुस्कुटे
***********
तुन्द हैं शोले, सुर्ख है आहन

पर्देशी कलाकार पायजेत ओ. नैतर न्हेमीच्या म्हाभार्ताचीच दुस्री एडिशन नै होणार कं?

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

माहिष्मती साम्राज्यं अस्माकं अजेयं

द्रौपदी म्हणुन अँजेलीना तैच पायजे बाकी कोण नै चालणार सांगुन ठेवतेय..

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

आयला जब्रीच!!!! हे बुंगाट आहे एकदम!!!! अन भीम कोण अन युधिष्ठिर कोण? युधिष्ठिरासाठी ह्यू ग्रांट कसा वाट्टो Wink

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

माहिष्मती साम्राज्यं अस्माकं अजेयं

मेघनाने वर्णन केलय त्यानुसार ह्यु ग्रांट अर्जुन म्हणुन जास्त चांगला वाटतोय. भीम म्हणुन ब्रअॅडली कुपर किँवा तो परवा आलेला हातोडावाला शिन्माचा हिरो?

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

अर्जुन देखणा पाहिजे असला तरी बुळगा नको. ह्यू ग्रांट इज बुळगा टु द बूट. ओरलँडो ब्लूम एखादवेळी चालू शकेल. ट्रॉयमध्ये पॅरिसची भूमिका केली असली तरी लॉर्ड ऑफ द रिंग्जमध्ये लेगोलास झाल्याने आपले मत त्याला.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

माहिष्मती साम्राज्यं अस्माकं अजेयं

हा ओरलँडो पण चालेल चिकणाय. किँवा तो हाउ टु लुज अ गाय इन १०डेज वाला पण चालेल.
बापरे त्या मेथ्युने केवढ वजन कमी केलय चित्रपटासाठी :O .का शरीराचे हाल करुन घेतात ही लोकं Sad कंप्युटरवर करता आल नसत का हेच...

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

मॅथ्यू कशाला, आमच्या क्रिश्चन बेल साह्यबांनी कित्ती पिच्चरसाठी कित्ती वजन कमीजास्त केलंय ते पहा, कळायचं बंद होतं पाहून.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

माहिष्मती साम्राज्यं अस्माकं अजेयं

अवांतरः टॉम हँक्सला डायबेटीस झालाय. विविध भूमिकांसाठी वाढवलेली वजनं हे त्यामागचं एक कारण असेल असं त्याला वाटतय. आता तो असले चाळे कराव्या लागणार्‍या भूमिका करणार नाही असं म्हणालाय.

http://www.bbc.co.uk/news/entertainment-arts-24461214

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

आधी रोटी खाएंगे, इंदिरा को जिताएंगे !

लिओनार्डोला घ्या अर्जुन म्हणून बृहन्नडेचा खर्च वाचेल.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

बृहन्नडा शब्दाला काही अर्थ आहे का? असल्यास व्युत्पत्ती काय?

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

द्रौपदी म्हणुन अँजेलीना तैच पायजे बाकी कोण नै चालणार सांगुन ठेवतेय

शीsssssssss! अन ती काय ओठाचा चंबु करून "अर्जुना, माझ्या लाजेचं रकण कर!" म्हणणार का?

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

-Nile

मध्ये पराने एक "मोस्ट ब्युटीफुल हॅकर" चा फोटो चेपूवर टाकलेला. हा तो फोटो. ही मला बरी वाटते द्रोपदीच्या भूमिकेत. दिसायला दीड शहाणी वाटतेय.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

म्हणजे वास्तवात ही दोन अडिचशे पाऊंडाचा अर्धनग्न पुरुष असणार.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

-Nile

ओ नाईलजोशीकाका कळेलसं बोला ओ. हॅकर स्त्री असू नये का? असली तर ती सुंदर असू नये का? Sad

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

अहो इंटरनेटावरचे वस्ताद लोक 'हॉट पोरगीचं' रुप कायम घेतात, आता तुम्हाला अजून काय सांगू? या आऊटडेटेड पिढिचं काय करावं ब्वॉ! Wink

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

-Nile

हाहाहा माझ्या मुलीला मी नहमी सांगते, तो फोटो कोणीही काहीही लावू देत , पण त्याआड एक वार्टेड चेहर्‍याचा, ढेरपोट्या, म्हातारा , रोगट माणूस आहे हे लक्षात घे अन कदाचित लेप्रसी असलेला ही Wink
ती म्हणते - याईक्स!!! पुरे पुरे!!! पॉइन्ट इस ड्रिव्हन होम.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

+१

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

--मनोबा
.
संगति जयाच्या खेळलो मी सदाहि | हाकेस तो आता ओ देत नाही
.
memories....often the marks people leave are scars

हा हा ही आयड्या भारी परदेशी रामायण, म्हाभारत, शिवपुराण, कालीमा वगैरे बनवुन टाकुयात.
आणि देशी ट्रॉयची हेलन करु.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

'पीटर ब्रूक'कृत महाभारत पाहिले नाही का ?
एकूणच सगळी पात्रनिवड आणि विशेष म्हणजे द्रौपदी म्हणून 'मल्लिका साराभाई'ची निवड जबरदस्त आहे.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

हे कुणी पाह्यलं आहे का ?

http://www.quora.com/Mahabharata/Whom-would-you-cast-if-you-were-to-make...

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

नो आयडियाज् बट इन थिंग्ज.

भारी ए राव!

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

-मेघना भुस्कुटे
***********
तुन्द हैं शोले, सुर्ख है आहन

तुमच्या दुव्यावरून कालच पाहिलं.
सॉरी टू से, आवडलं नाही.
हॉलीवूड सिनेमे थरार, तंत्रज्ञान वगैरे जाब्रदस्त बनवितात पण माणूस, मानव, भक्ती , आर्तता ह्यातलं काहीतरी त्यांच्याकडे हरवल्यासारखं दिसतं;
विशेषतः पौर्वात्त्य काहीही दाखवायचं तर ते त्याचं काहीतरी चमत्कारिक रुप दाखवतात.
नक्की काय ते सांगू शकत नाही, पण जे आहे ते विचित्र आहे हे नक्की जाणवतं.
हा चित्रपट आर्टफिल्म सदृश वाटला. मागे पार्श्वसंगीत बेतास बात.
एक शुष्क वातावरण (बहुतेक मुद्दाम ) तयार केलेलं. इंग्लिश लोक पुटपुटल्यासारखे , चेहरा शांत, मख्ख ठेवून बोलतात.
शेवटच्या युद्धाच्या प्रसंगात वगैरे दिवस आहे की रात्र ते झाट समजत नाही.
चित्रपट पाहताना एक डोकेदुखी पाहत आहोत असे वाटते. कधी एकदा चित्रपट संपतो असे वाटते.
अगदि द्रौपदी वस्त्रहरणाच्या चमत्काराच्या सीनलाही खूप ग्रेट , भव्य्,दैवी काहिच वाटत नाहते.
सिरियल पुरते बोलायचे तर पीटर ब्रूक ह्याने चोप्रा प्रॉडक्शनकडे शिकवणी लावावी असे वाटते.
शाम बेनेगल कितीही थोर्थोर म्हटले तरी नक्की कशाची नक्कल विविध वेळी करतात ह्याचा अंदाज येउ लागलेला आहे.
(भारत एक खोज मधील गौतम बुद्धाचे भाग फार पूर्वी पाहिले असताना लैच भारी वआतले. मुख्य पात्राचाच, गौतमाचाच
चेहरा न दाखवण्याची क्लृप्ती भारी वाटली. (निर्वाणाप्रत पोचलेल्या व्यक्तीचा ज्याने त्याने स्वकल्पनेने चेहरा समोर आणावा ही शक्कल भारिच.)
पण त्यापूर्वीच महंमदाविसह्यीच्या चित्रपटाची ही कॉपी आहे हे कळले तेव्हा लै वाईट वाटले. भारत एक खोज मधील महाभारतावर ह्या महाभारताचा
प्रभाव वाटला; व स्थानिक समांतर हिंदी रंगमंचाचाही प्रभाव जाणवला.)
.
.
.
पश्चिमेचे पिच्चर लै भारी. छी थू त्या भारतीय कलाकारांच्या (लेखक्,पटकथालेखक ह्यांच्यापासून ते निर्माते दिग्दर्शक सगळेच त्यात आले.) असा जो
एक सूर सतत जागतिक कलांचे एक्स्पोजर असलेली मंडळी धरतात त्यांना खरोखरीच हॉलीवूडी स्टाइल पर्फेक्ट आहे असे वाटते का?
(ही मंडळी ऐसीवर प्रचंड संख्येने आहेत.(आता ऐसीचे जग चिमुकलेच आहे, पण त्यातही ही बरीच आहेत; हे खरेच.))
त्यांना शुष्कपणा , कंटाळवाणेपणा जाणवत नाही का?

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

--मनोबा
.
संगति जयाच्या खेळलो मी सदाहि | हाकेस तो आता ओ देत नाही
.
memories....often the marks people leave are scars

कॉलिंग जंतू.....

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

-मेघना भुस्कुटे
***********
तुन्द हैं शोले, सुर्ख है आहन

पश्चिमेचे पिच्चर लै भारी. छी थू त्या भारतीय कलाकारांच्या (लेखक्,पटकथालेखक ह्यांच्यापासून ते निर्माते दिग्दर्शक सगळेच त्यात आले.) असा जो
एक सूर सतत जागतिक कलांचे एक्स्पोजर असलेली मंडळी धरतात त्यांना खरोखरीच हॉलीवूडी स्टाइल पर्फेक्ट आहे असे वाटते का?

माझ्या खरडवहीत असलेली एक खरड, मला मत पटल्यामुळे इथे टाकते आहे:
जोडी फॉस्टर - हॉलिवूडमध्येच अडकल्यामुळे तिचं नुकसान झालं असं मला वाटतं. युरोपात तिच्यासारख्या अभिनेत्यांसाठी खूप चांगल्या आणि वैविध्यपूर्ण भूमिका लिहिल्या जातात.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

---

सांगोवांगीच्या गोष्टी म्हणजे विदा नव्हे.

युरोपही भारतासाठी पश्चिमच आहे.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

माहिष्मती साम्राज्यं अस्माकं अजेयं

मनोबाने पश्चिमेचे चित्रपट आणि हॉलिवूड असा उल्लेख केला म्हणून. हॉलिवूडचा उल्लेख नसता तर हा प्रतिसाद दिला नसता. पश्चिमेचे चित्रपट म्हणजे फक्त हॉलिवूड नाही; आशयघन आणि समृद्ध करणारे सिनेमे म्हणजे हॉलिवूड निश्चितच नाही. (त्यालाही अपवाद आहेतच, पण अपवाद म्हणावे एवढेच.)

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

---

सांगोवांगीच्या गोष्टी म्हणजे विदा नव्हे.

.
पश्चिमेचे पिच्चर लै भारी. छी थू त्या भारतीय कलाकारांच्या (लेखक्,पटकथालेखक ह्यांच्यापासून ते निर्माते दिग्दर्शक सगळेच त्यात आले.) असा जो
एक सूर सतत जागतिक कलांचे एक्स्पोजर असलेली मंडळी धरतात त्यांना खरोखरीच हॉलीवूडी स्टाइल पर्फेक्ट आहे असे वाटते का?
(ही मंडळी ऐसीवर प्रचंड संख्येने आहेत.(आता ऐसीचे जग चिमुकलेच आहे, पण त्यातही ही बरीच आहेत; हे खरेच.))
त्यांना शुष्कपणा , कंटाळवाणेपणा जाणवत नाही का?

मोठे व्हा, म्हणजे कळेल!

बालीशवयात सलमान अन शाहरूख आवडायचेच. लेट मी गेस, तुमचा फेव्हरीट सायफाय मुव्ही म्हणजे क्रिष, बरोबर?

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

-Nile

क्रिश बालिश आहे. आवडत नाही.
पण चोप्रांची महाभारत सिरियल आवडते.
रामायण अजिब्बात आवडत नाही.
.
जास्त जोशात प्रतिसाद दिलेला दिसतो मी.
पुन्हा नीट मांडणी करतो. मू़ळ मुद्द्यापुरतच बोलतो.
ह्या महाभारतापेक्षा बी आर चोप्रांचं महाभारत अधिक भावलं.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

--मनोबा
.
संगति जयाच्या खेळलो मी सदाहि | हाकेस तो आता ओ देत नाही
.
memories....often the marks people leave are scars

बी आर चोप्रांचं महाभारत अधिक भावलं.

सहमत आहे. casting आणि ड्वायलॉक लिहिण्यातच ते जिंकले होते.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

आधी रोटी खाएंगे, इंदिरा को जिताएंगे !

द्वितिया कि चतुर्थी विभक्तित असे वाक्य स्त्रीया रचतात आणि षष्ठी विभक्तित पुरुष रचतात असा साधारण संकेत आहे.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

सही: पुरोगाम्यांना लॉजिक माफ असतं.

रोचक निरीक्षण Smile

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

इंडीसेंट प्रपोज़ल मध्ये रिचर्ड जेरे ला घ्या बुवा. रॉबर्ट रेडफोर्ड मला खास नाही वाटला. पण जर जेरे असता तर डेमी परत गेलीच नसती तो वेगळा भाग झाला

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

तुम्हा सगळ्या रिकामटेकड्यांना नाटकाच्या स्टेजवरील दगडं, झाडं. टेबलं आणि दारं-खिडक्या म्हणून घेईन, नाटक कोणतं का असेना!

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

-Nile

रोसेश आठवला

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

- ऋ
-------
लव्ह अ‍ॅड लेट लव्ह!

नायल्या, जळलास का बे? इनो घे. Biggrin

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

-मेघना भुस्कुटे
***********
तुन्द हैं शोले, सुर्ख है आहन

इनो घेऊनही जळकेपण जाणार नै Wink नायल्याचं जळकेपण कालपण आजपण उद्यापण ROFL

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

माहिष्मती साम्राज्यं अस्माकं अजेयं

पाने