तुम्ही कुणाला घ्याल?

व्याप्तिनिर्देशः या धाग्याचा मुख्य उद्देश थोडी मजा करणे हा आहे. काही गंभीर चर्चा नि वादंग केलेत तरी आपली काही हरकत नाही. पण तो या धाग्याचा मुख्य उद्धेश नाही याची नोंद घ्यावी. अवांतर ज्ञान पाजळणे, दंगा करणे, फाटे फोडणे, धागा हायज्याक करणे या सगळ्याला खुल्या दिलानं आमंत्रण. गेले दोन दिवस जाम दमायला झालं आहे.

अमुक एक गोष्ट (कथा / कादंबरी) घ्यायची आणि तिच्यावर सिनेमा किंवा सिर्‍यल बनवायची आहे अशी कल्पना करून त्यात आपल्याला आवडतील अशा अभिनेत्यांची योजना करायची हा माझा आवडता टाइमपास आहे.

कुठले अभिनेते आपल्याला कित्तीही आवडत असले, तरी ते आता तितकेसे तरुण उरलेले नाहीत; कोणाची रुपडं सुटेबल असलं, तरी अभिनयाची बोंब आहे; कोण एकाच टाइपच्या कामांमधे अडकलं आहे; नवीन उल्लेखनीय कोण आहे... असे बरेच साक्षात्कार होतात.

सुरुवातीला मी 'एम टी आयवा मारू' ही सामंतांची कादंबरी घेते. (तिच्यात कुणालाच रस नाही, असं शक्य आहे. कारण सामंत आउटडेटेड अहेत. तसं झाल्यास, तुम्हीच दुसरी लेटेस्ट इंट्रेष्टिंग कथा / कादंबरी सुचवावी.)

(पूर्वी ही कादंबरी जाम म्हणजे जामच आवडत असे. कालांतरानं तिच्यातल्या गडबडी दिसायला लागल्या. आता सामंतही फारसे आवडत नाहीत म्हणा. पण जाम चित्रदर्शी, स्टायलिश नि मराठीत कमी सापडणार्‍या खलाशी ब्याकग्राउण्डवरची गोष्ट आहे, यात दुमत नसावं. हिच्यावर सिनेमा बनवायचे हक्क म्हणे नाना पाटेकरनं विकत घेऊन ठेवलेत. हा तपशील कळल्यावर या कादंबरीच्या ग्ल्यामरमधे भरच पडली होती. पण ते असो. धाग्यावर अवांतर चालेल म्हटलं, म्हणून इथेच फाटे फोडावेत असं काही नाही. :प)

उज्ज्वला: सई ताम्हणकर
दीपकः सुबोध भावे
अनंतः ???
कॅप्टन रॉसः मोहन आगाशे

... पुरे. पाहा, आता काय करता ते.

field_vote: 
4
Your rating: None Average: 4 (1 vote)

प्रतिक्रिया

'एम टी आयवा मारू' ह्याबद्दल तशी काहीही माहिती नाही.
अनंत च्या भूमिकेसाठी कुणी ऐसीकर गावला तर बघा.
जगभरातील विविध नमुने इथे उपलब्ध आहेत.
करुन टाका कास्टिंग इथच.
.
कट्ट्यावरील भाषेच्या कलाने पाहिल्यास शीर्षक अंमळ चावट आहे.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

--मनोबा
.
संगति जयाच्या खेळलो मी सदाहि | हाकेस तो आता ओ देत नाही
.
memories....often the marks people leave are scars

देसी फिफ्टी शेडस् मधे कोण पायजे सांगा पटापटा Blum 3

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

छ्या, ते काय पुस्तक आहे? म्हणजे ठीके... असावीत धीट वर्णनं. पण थोडी चवीपुरती गोष्ट तरी घालाल की नाही? सारखं आपलं सकाळ-दुपार-संध्याकाळ तेच? शिवाय त्याची देशी आवृत्ती काढायची म्हणजे दोन-पाच बंद्या, एखादा निषेध, एखादा मोर्चा... याला तयारी हवी. नाहीतर घासकडवींच्या शुद्धिचिकित्सकासारखं काहीतरी उपकरण लावून सोवळी आवृत्ती तरी काढायला लागेल.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

-मेघना भुस्कुटे
***********
तुन्द हैं शोले, सुर्ख है आहन

+१ चित्रपट कितीही धार्मिक असला व कितीही 'पुजेची पथ्ये' पाळत असलात तरी त्याचा अतिरेक नकोसा वाट्टो

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

- ऋ
-------
लव्ह अ‍ॅड लेट लव्ह!

पूर्ण सहमत. बाकी सगळं सोडून फक्त पॉर्न म्हणून वाचायचं ठरवलं तरीही ते इतकं खास नाही. कथा आणि पॉर्न या दोन्ही निकषांवर सरस ठरणारी त्याच जॉनरमधील लै पुस्तके सांगता येतील.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

माहिष्मती साम्राज्यं अस्माकं अजेयं

सांग की मग. आमंत्रणाची वाट का पाहतोहेस?

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

-मेघना भुस्कुटे
***********
तुन्द हैं शोले, सुर्ख है आहन

हे पुस्तक पाहणे. फालतूचा मेलोड्रामा टाळून तेच म्याटर उत्तमपणे हाताळले आहे.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

माहिष्मती साम्राज्यं अस्माकं अजेयं

अणेकाणेक हाबार्स!

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

-मेघना भुस्कुटे
***********
तुन्द हैं शोले, सुर्ख है आहन

कादंबरी ('एम टी आयवा मारू') "बालपणात" (आता वय झालं! Smile ) वाचल्याचे पुसटसे आठवते आहे Wink
त्यामुळे त्यावर चित्रपटच बनवणार नै.

मला चित्रपट कशावर बनवावासा वाटला होता तर तो धारपांच्या 'साठे फायक' वर!
लैच जबरा पुस्तक आहे. त्यावर बोलायचं आसंल तर बोला.

बाकी मेघनाकडून चक्क द्व्यर्थी शीर्षक!

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

- ऋ
-------
लव्ह अ‍ॅड लेट लव्ह!

हात्तेरेकी! बोला की. काहीही प्रॉब्लेम नाही!

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

-मेघना भुस्कुटे
***********
तुन्द हैं शोले, सुर्ख है आहन

साठे फायकसमध्ये एक आणि एकच पात्र मुख्य आहे श्री.साठे यांचं
पुस्तक वाचताना जे व्यक्तीमत्त्व समोर आलं होतं त्याच्या जवळ संतोष जुवेकर जातो खरा पण तरी ते काम 'नाना पाटेकर' किंवा 'स्पप्नील बर्वे'ने पेलावं असं वाट्टं.

बाकी झाडांचं/जंगलाचं काम काय कंप्युटर अ‍ॅनिमेशन करेलच

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

- ऋ
-------
लव्ह अ‍ॅड लेट लव्ह!

स्पप्नील बर्वे?
स्वप्नील जोशी??
सुनील बर्वे???

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

--मनोबा
.
संगति जयाच्या खेळलो मी सदाहि | हाकेस तो आता ओ देत नाही
.
memories....often the marks people leave are scars

खिक्
स्वारी!
सुनील बर्वे

जोशांच्या स्वप्नीलला चित्रपटातच काय जाहिरातीतही पाहिले तरी अजीर्ण झाल्यासारखे वाटू लागले आहे

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

- ऋ
-------
लव्ह अ‍ॅड लेट लव्ह!

पण पण पण.. स्वप्नील जोशी (किंवा फॉर द्याट म्याटर सुनील बर्वे) आणि नाना पाटेकर यांच्यात ते दोघे पुरुष आहेत यापलीकडे काय साम्य आहे ? की ज्यामुळे दोघांपैकी कोणीतरी एकाने करावी असे डोळ्यापुढे यावे? असा प्रश्न पडल्यास हरकत असू नये.

-'ग'वी बाजू.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

अजिबातच साम्य नाही म्हणूनच दोघांपैकी एक निवडणं शक्य होत नाहिये.
नानाचं टायमिंग, भुमिका कॅरी करणं यामुळे हे मराठीसाठी नव्या पद्धतीचं आव्हान तोच पेलु शकेलसं वाटतं आणि सुनील बर्वेचं तरूण दिसणं, "चकचकीत"(जसा साठे आहे) असूनही अनेकदा अभिनयही चांगला असणं यामुळे त्याचा विचार केला. साठेचा रोल तरूण ते वयस्कर इतक्या लांबीचा आहे त्यामुळे सुनील अधिक शोभून दिसेल पण तो ही भुमिका कॅरी कितपत करेल अंदाज येत नाहिये

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

- ऋ
-------
लव्ह अ‍ॅड लेट लव्ह!

>>बाकी मेघनाकडून चक्क द्व्यर्थी शीर्षक!

अश्लीलता ही पाहणार्‍याच्या डोळ्यात असते. - ह. भ. प. दादामहाराज (कोंडके)

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

--------------------------------------------
ऐसीव‌रील‌ ग‌म‌भ‌न‌ इत‌रांपेक्षा वेग‌ळे आहे.
प्रमाणित करण्यात येते की हा आयडी एमसीपी आहे.

छे छे! माझ्या डोळ्यांकडे बघुन आजतागायत कोणी अश्लील अश्लील म्हणून ओरडलं नैये! अगदी डोळ्यात डोळे घालून पाहणारा आमचा डोळ्यांचा डॉक्टरही नाही

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

- ऋ
-------
लव्ह अ‍ॅड लेट लव्ह!

थत्तेचाचा, तुम्हीच हो माझे खरे हितचिंतक!

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

-मेघना भुस्कुटे
***********
तुन्द हैं शोले, सुर्ख है आहन

हेच लिहायला आलेलो,
संपादकांनी उडवायच्या आत पट्कन वाचला पाहीजे, जमल्यास बॅकप घ्यायला पायजे वगैरे काय काय ... कुठे पोहोचलो अन् श्या .........
मन मे लड्डु फुटावाली स्मायली इमॅजीन करावी Smile Biggrin ROFL

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

यात काये हो अश्लील?

- (निरागस) मेघना

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

-मेघना भुस्कुटे
***********
तुन्द हैं शोले, सुर्ख है आहन

या प्रश्नाचे उत्तर "दारू हे एक मादक पेय आस्ते" च्या चालीवर काय बरे द्यावे? Wink

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

- ऋ
-------
लव्ह अ‍ॅड लेट लव्ह!

बादवे, यावरून आठवले. माझा एक मित्र जर्मनीत गेला. हौसेनं बिचारा जर्मनच्या वर्गालाही जाऊन बसला. शिकवणार्‍या बाईनं नाव विचारलं. यानं सांगितलं. ती कावरीबावरी होऊन पाहत राहिली. 'क्लासनंतर थांब' म्हणाली. हाही कावराबावरा झाला असणार. फायनली तिनं 'फक्त नाव सांगू नको. आयम अमुक अमुक असं सांग' असं म्हणत उलगडा करून सांगितल्यावर एकदाचा सस्पेन्स संपला. त्याचं नाव निमिष. जर्मनमधे 'nimm mich' (निम् मिश्) म्हणजे अक्षरश: आणि अर्थानंही 'टेक मी'.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

-मेघना भुस्कुटे
***********
तुन्द हैं शोले, सुर्ख है आहन

आयला जबर्‍याच प्रकार आहे!!!!!!

खरे तर धाग्याचे शीर्षक पाहून असे कैतरी वाचायला मिळेल अशी अपेक्षा होती, पण छ्या:!!!!! Blum 3

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

माहिष्मती साम्राज्यं अस्माकं अजेयं

Smile
अहो हे तरी जर्मनीतलं प्रकरण झालं, इथं भारतातलं एक प्रकरण ऐकलय.
हल्ली ऑफबेअ‍ॅट नावं ठेवायची फ्याशन आलिये. ऋग्वेद्,रेयान्,आर्यन्,विवान ही नावं तीनेक दर्शकापूर्वी इतकी कॉमन नव्हती; जितकी आता झालियेत.
अगदिच ऑफबीट करायला म्हणून एका जोडप्यानं पोराचं नाव कसं भारदस्त ठेवलं एकदमः- वृत्तान्त!
.
.
दुसरा मुलगा झाल्यावर त्याचं नावः- कृतान्त!!
.
.
.
अजून कुणीतरी राधा-कृष्ण श्टोरीमधील राधापती "अनय" हे नाव ठेवलं मुलाला, थोरल्या "विनय" शी यामक जुळावं म्हणून.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

--मनोबा
.
संगति जयाच्या खेळलो मी सदाहि | हाकेस तो आता ओ देत नाही
.
memories....often the marks people leave are scars

वृत्तान्त नि कृतान्त... धन्य आहेत. पण 'अनय'? मला आवडतं बॉ हे नाव.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

-मेघना भुस्कुटे
***********
तुन्द हैं शोले, सुर्ख है आहन

अवघड आहे. मग ते तिसरा मुलगा झाला तर त्याचं नाव अनुनय ठेवतील अशी भीती वाटते.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

--मनोबा
.
संगति जयाच्या खेळलो मी सदाहि | हाकेस तो आता ओ देत नाही
.
memories....often the marks people leave are scars

ठेवेनात का! आपल्या तीर्थरूपांचे काय नुकसाने त्यात! नावांवरून आठवले: मागे एकदा असल्या विचित्र नावांवरून कुणीसा एक हिट्ट धागा काढला होता. बहुधा सन्जोप राव. तो हुडकून डकवा की कुणाला सापडल्यास.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

-मेघना भुस्कुटे
***********
तुन्द हैं शोले, सुर्ख है आहन

कृतान्त??????????? ROFL ROFL ROFL

नाव कसे ठेवावे आणि इतरांनी अमुक एका नावाबद्दल त्यांस नावे ठेवावीत की कसे हा तत्त्वतः ज्याच्यात्याच्या अखत्यारीतला प्रश्न आहे हे पूर्वदत्त मान्य करूनही असली नावे मूर्खागमनी वाटतात.
बाकी वृत्तांताच्या बायकोचे नाव काय बातमी? ROFL

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

माहिष्मती साम्राज्यं अस्माकं अजेयं

चुकलास तू बॅट्या. बातमी काय बातमी? वार्ता. काही अलंकाराचे ज्ञान आहे की नाही तूस?

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

-मेघना भुस्कुटे
***********
तुन्द हैं शोले, सुर्ख है आहन

मस "मस" ज्ञान असों, तयाचा येथ मायना काये? मुद्दा ऐसा की वृत्तांताची बाईल वार्तेपरीस बातमी आसेल तर्‍ही यावनी अन हिंदू संस्कृतींचा सङ्गमु होईल. हालीं हें खूळ वाढतच चालले असोन याचा पुरस्कार करणे उदितभास्करनमनन्यायास अनुसरोन आहे.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

माहिष्मती साम्राज्यं अस्माकं अजेयं

होय रे बाबा होय. दिवस बरीक वाईट आले आहेत हे खरेच. एके काळी मुकाट्याने उंबर्‍याआत खालमानेने सुखात दिवस कंठणार्‍या स्त्रिया शिकू-बोलू तर लागल्या आहेतच, निर्लज्जपणे पुरुषासारख्या पुरुषांशी भांडूतंडू लागल्या आहेत, नाही ना नाही त्या शीर्षकाखाली लिहू लागल्या आहेत आणि वर या देशचे राज्यशासनही कागदोपत्री त्यांचे संरक्षण करते. कसे व्हायचे कुणास ठाऊक. गेले ते रामराज्याचे दिवस... गेले! Sad

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

-मेघना भुस्कुटे
***********
तुन्द हैं शोले, सुर्ख है आहन

बळंच? हालीचे फ्ञाड म्हणजे नावांचे, पुर्षांसवे बोलण्याचे अभिप्रेत न्हौते कै...औघड ए बॉ.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

माहिष्मती साम्राज्यं अस्माकं अजेयं

मस्करी चाल्लीय बॅट्या. उगाच सिर्यस मोडमधे जाऊ नकोस तू. कालपरवाच्या दोन दिवसांचा ह्यांगओव्हर उतरवायचाय मला.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

-मेघना भुस्कुटे
***********
तुन्द हैं शोले, सुर्ख है आहन

ऐया फक्त दोन दिवसांचा ह्यांगओव्हर? हात्तेरेकी, मस वाटलें अजून कैक दिवसाञ्चा असेल.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

माहिष्मती साम्राज्यं अस्माकं अजेयं

वार्ता नकोच.
वार्ता म्हटलं की बालाजी तांब्यांच्या लेखासारखं "वात सारला की आवाज होतो" असं वचल्यासारखं वाटतं.
त्यापेक्षा बातमी, न्यूज,खबर असं काहीही चालेल.
तसंही खबर सिंग हे नाव पंजाब्यात असणं अवघड नाहिच.
सन्नी सिंग, मॉन्टी सिंग, डॉली सिंग, लकडी सिंग अशी विचित्र नावं तिथं असतातच.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

--मनोबा
.
संगति जयाच्या खेळलो मी सदाहि | हाकेस तो आता ओ देत नाही
.
memories....often the marks people leave are scars

यात काये हो अश्लील?

- (निरागस) मेघना

मेघनातैंना जर्मन आणि इंग्रजी भाषांमधले जे कळते ते मायमराठीत कळत नसेल?

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

अवांतर:
नारायण धारपांचे "साठे फायकस" हे एकदम जबरा प्रकरण आहे.
मी असंख्य वेळा वाचले आहे.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

याबद्दल इतक्यांदा ऐकलंय पण एकदाही वाचलं नाही. धारपच नै वाचले म्हटलं तरी चालेल. वाचायला लागतंय आता.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

माहिष्मती साम्राज्यं अस्माकं अजेयं

बर मग देसी/विदेसी स्कारलेट ओ हारा, अॅना करनीना, मिस मार्पल कोण छान दिसतील?

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

स्कारलेट ओ हारा: तरूणपणीची रेखा
अॅना करनीना: कोंकणा सेन-शर्मा (जरा रंगात तडजोड चालणार असेल तर)
मिस मार्पलः मेकप केलेली करिश्मा कपूर? Wink

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

- ऋ
-------
लव्ह अ‍ॅड लेट लव्ह!

हम्म रेखा छान वाटेल स्कारलेट म्हणुन.
मिस मार्पेल विद्या बालन किँवा वाहिदा रेहमान?

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

विद्या बालन इतकीही म्हातारी दिसत नै हो! Wink
करिश्माचं तसं नाही.. त्वचा टवटवीत तरी चेहरा म्हातारा होच चाल्लाय ना.. म्हणून तिचं नाव घेतलं

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

- ऋ
-------
लव्ह अ‍ॅड लेट लव्ह!

@अस्मि
तुला आख्खा 'र्‍हेट बटलर' नाही विचारता आला? बायाच घेऊन बसलीस ती?!

मी र्‍हेट बटलरचं काम फक्त आणि फक्त बेनेडिक्टलाच देईन.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

-मेघना भुस्कुटे
***********
तुन्द हैं शोले, सुर्ख है आहन

र्‍हेट बटलर आमचा जानराव डेप्प मस्त साकारू शकेल.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

माहिष्मती साम्राज्यं अस्माकं अजेयं

जान्याच्या तोंडावरची माशी र्‍हेट च्या भूमिकेत हलेल का? तो शरीरप्रदर्शनापुरता उपयोगी.

र्‍हेटच्या क्यारेक्टरच्या सर्व छ्टा दाखवू शकणारा माझ्या मते एकच- तरुणपणीचा प्राण

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

+++++++++1

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

-मेघना भुस्कुटे
***********
तुन्द हैं शोले, सुर्ख है आहन

क्क्क्क्क्क्क्क्क्क्क्क्क्क्काय??????????????????????? जॉनी डेप शरीरप्रदर्शनापुर्ता उपयोगी???????????????????????????????????????????????????

आपा, तुमच्याकडून ही अपेक्षा न्हौती. जानराव इब्राहिमसायबांबद्दल बोलत असाल तर ठीक पण जानराव डेपूजींचा नाद नै करायचा. अहो कप्तान ज्याक स्पॅरो कसा विसरलात?

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

माहिष्मती साम्राज्यं अस्माकं अजेयं

स्वारी, तुम्हाला डेपूजी अभिप्रेत हे लक्षात आले नाही. आम्ही जानराव इब्राहिमसायबांबद्दल लिहिले होते.

डेपूजी आम्हालाही परमप्रिय आहेत. तरीही, र्‍हेटचा अतिउच्चवर्गीय अहंमन्य रुबाब प्राणसाहेबांना डेपूजीपेक्षा खूपच जास्त शोभतो.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

Wink र्हेट पाचव्या प्रकरणात जास्त येतो ग. तोपर्यँत कै काम नै त्याला फारसं. आता रेखा आणि बेनेडीक्ट कसे दिसतील एकत्र Blum 3 त्यापेक्षा आपला देसी जॉन चालेल का?

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

हं, सगळ्यांनाच गॉन विथ दी विंडमधे रस असेल, तर पुन्हा विचार करावा लागेल. पण रेखा बाद. आत्ता उपलब्ध असतील नि शोभून दिसतील असेच लोक हवेत मग. हिंदी / मराठी (भारतीय) कुणीही चालेल.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

-मेघना भुस्कुटे
***********
तुन्द हैं शोले, सुर्ख है आहन

ओके. मग यश राज किँवा कजो ने बनवलेल्या ग्लेमरस गॉन विथ द विँड मधे जॉन आणि नर्गिस फखरी चालतील का?

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

नर्गिस फखरी? नर्गिस फखरी? बरी आहेस ना तू? त्या बयेला समोरून मुस्काटात मारली तरी तिला कळायला १५ मिनिटं लागतील, की आपल्यालाच मारतायत.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

-मेघना भुस्कुटे
***********
तुन्द हैं शोले, सुर्ख है आहन

बर मग तू सांग Biggrin

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

प्रियांका चोप्रा? ती इतकी रूपवान नाही, पण चांगली कुर्रेबाज आहे. नि मग र्‍हेट बटलर इरफान खान? की तो लईच म्हातारा वाटेल? मग नवाजुद्दीन?

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

-मेघना भुस्कुटे
***********
तुन्द हैं शोले, सुर्ख है आहन

प्रियंका चालेल. कोणी कोवळी हिरोइनच नाहीय आजकाल :-(. र्हेट ची चॉइस मात्र नै आवडली. यश राज बनवणार आहेत, अभिनयाची अपेक्षा नाही काहीच Wink

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

मग जॉन चालेल.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

-मेघना भुस्कुटे
***********
तुन्द हैं शोले, सुर्ख है आहन

स्टारकास्ट मराठीच घ्यायची का गो?

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

Escoge un amante que te mire como si quizás fueras magia!

छे छे... असं काही बंधन नाही. तुला हवं त्याला घे. इथं कुणाला सायनिंग अमाउण्टचे चेक ल्याह्यचेत? Tongue

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

-मेघना भुस्कुटे
***********
तुन्द हैं शोले, सुर्ख है आहन

बरं.. मग कॅप्टन रॉस साठी बर्नार्ड हिलशिवाय दुसरं कोण्णीकोण्णी नजरेसमोर आलं नाही. हिल म्हणजे टायटॅनिकमध्ये कॅप्टन एडवर्डचं काम केलेला अतिशय देखणा म्हातारा.
मला जुनी स्टारकास्ट घेता आली असती तर मी उज्ज्वला म्हणून अर्चना जोगळेकरला घेतली असती नाहीतर निकोल किडमन/नताली पोर्टमनला.
उज्ज्वलाचा बाप म्हणून डॉ. आगाशे. बेशक.
दीपक म्हणून समहाऊ मुक्तातला अविनाश नारकरच येतोय; पण, त्याच्या मिशा टोचतात आणि तो गन स्लिंगर म्हणूनही शोभणार नाही.. यावर विचार करायला लागेल.
अनंत म्हणून गिरीश कुलकर्णी..वादच नाही. हॉलिवूडी पर्याय-डेव्हिड डुकोव्हनी (कॅलिफ़ोर्निकेशनवाला)

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

Escoge un amante que te mire como si quizás fueras magia!

बाकी ठीके... पण गिरीश कुलकर्णी? अनंत सामंतांच्या रोलमधे? काय हा अपव्यय... नको गं नको. त्याच्याकरता भारीपैकी रोल लिहू आपण! Biggrin

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

-मेघना भुस्कुटे
***********
तुन्द हैं शोले, सुर्ख है आहन

सध्या 'बरा' असा तोच आहे ना.. सो, उचकी लागल्यासारखा तोच आठवला. तो कॅचर इन द रायमध्ये बरीक शोभून दिसेल.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

Escoge un amante que te mire como si quizás fueras magia!

अविनाश नारकरमध्ये मला अभिनय सोडल्यास फार कै खुपत नै Wink
अ‍ॅक्टिंग/डायलॉग डिलीव्हरी बरी असती चेहरेपट्टीवरून त्यालाच साठे फायकसमधला साठे केला असता Blum 3

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

- ऋ
-------
लव्ह अ‍ॅड लेट लव्ह!

मला नाही आवडत नारकरबोवा. कुणी त्याचे (म्हणजे पाटलांचे) 'रणांगण' पाहिले आहे काय? त्यात तो सदाशिवरावभाऊ होता. स्टेजवरून एका ठिकाणाहून दुसरीकडे जाताना प्रेक्षकांकडे पाठही होऊ नये, दमदार ड्वायलॉकला स्टार्टही मिळावी आणि स्टेजवरचे अंतरही कापले जावे - म्हणून तो जी काही विनोदी कसरत करत असे - की बस! नाटकातले गांभीर्य जाऊन मरणाचे हसायला आलेले आठवते.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

-मेघना भुस्कुटे
***********
तुन्द हैं शोले, सुर्ख है आहन

नार्कर हा तद्दन दारुडा किंवा नार्कोटिक्सग्रस्त वाट्टो. नारकर हे आडनाव त्यावरूनच आले असेल असे वाटते. नै म्हणायला बैको चांगली आहे.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

माहिष्मती साम्राज्यं अस्माकं अजेयं

अविनाश नारकर - ऐश्वर्या नारकर म्हणजे गरीबांचे रमेश देव - सीमा देव आणि मृणाल दुसानीस म्हणजे गरीबांची ऐश्वर्या नारकर असे आम्ही म्हणत असू.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

-मेघना भुस्कुटे
***********
तुन्द हैं शोले, सुर्ख है आहन

जबर्‍या उपमा आहे ROFL

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

माहिष्मती साम्राज्यं अस्माकं अजेयं

ROFL

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

- ऋ
-------
लव्ह अ‍ॅड लेट लव्ह!

तुम्ही अ‍ॅण्टी नार्कोटिक्स डिपार्टमेंटच्या हेड व्हा.
.
.
.
खरे तर इथे
आण्टी तुम्ही अ‍ॅण्टी नार्कोटिक्स डिपार्टमेंटच्या हेड व्हा.असे म्हणण्याची इच्छा होतेय.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

--मनोबा
.
संगति जयाच्या खेळलो मी सदाहि | हाकेस तो आता ओ देत नाही
.
memories....often the marks people leave are scars

ROFL

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

-मेघना भुस्कुटे
***********
तुन्द हैं शोले, सुर्ख है आहन

बादवे "प्राईड अ‍ॅन्ड प्रेज्युडीस" बद्दलही बोला की. खरंतर याचं बीबीसीने केलेलं कास्टिंग सर्वोत्तम होतं पण तरी...
पात्रे नी सुचवण्या सांगतो:

लिझी: तरूण् माधुरी
जेनः कॅटी
श्री.बेनेटः गिरिश बापट? (छ्या! भारदस्त, विवेकी "दिसणारा" अभिनेता कोणता आणायचा आता Sad )
सौ.बेनेट: सध्या त्या "होणार सून मी" मधली हिरवाईनची आई आहे ना तीच - नाव नै माहित तीचं!
मेरी: ??
किटी: ??
लिडीया: स्पृहा?
बिंगले:
डार्सी: (छे! कॉलीन फर्थने हे काम केलंय आणि त्याच्या इतकं दुसरं कोणीच सुचत नै Sad )
लिझीचा मामा: अतुल चरचुरे
कॉलिन्स: ?
लेडी कॅथरीन डा बर्गः रोहिणी हट्टंगडी? Wink

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

- ऋ
-------
लव्ह अ‍ॅड लेट लव्ह!

काय की. मला हे पुस्तक काही केल्या आवल्डंच नाही. भरीत भर म्हणून तो 'बेंडिटलाइक्बेकहम'वाल्या बाईचा ऐश्वर्या राय अभिनित भिक्कार सिनेमा पाहिला. मन उडलं.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

-मेघना भुस्कुटे
***********
तुन्द हैं शोले, सुर्ख है आहन

पुस्तक मलादेखील अजीबात आवडल नव्हत, पण ती बीबीसी सिरीज खूप आवडली.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

मला पुस्तक, सिरीज सगळंच आवडलं
इतकी रेखीव, घाटदार, "नेमकी" वाक्यरचना - संवाद - अगदी विरळाच!

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

- ऋ
-------
लव्ह अ‍ॅड लेट लव्ह!

'तुंबाडचे खोत'बद्दल काय मत आहे? मला ते पुस्तक भारी आवडतं. काय दणदणीत सिर्‍यल होईल त्यावर. का कुणी करत नाही, कुणास ठाऊक.

दादा खोताचं काम मी शरद पोंक्षेला देईन. पण त्याला थोडी बावडी कमवावी लागेल. गणेशशास्त्री विक्रम गोखले. ताई सीमा देशमुख. बजापा? कोण होऊ शकतं बजापा? छ्या. नाही बा सुचत कुणी. नरसू खोत? जुळे? गंगा?

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

-मेघना भुस्कुटे
***********
तुन्द हैं शोले, सुर्ख है आहन

अगदी हेच म्हणायला आले होते. माझ्या आठवणीत यावर मालिका बनवायचा प्रयत्न झाला होता झी मराठी वर पण कास्ट इतके भिकार होते की थोड्या दिवसात ती बंद पडली( हो मालिकाच, ३ काय १० तासाच्या चित्रपटामध्ये पण बसणार नाही ती कथा.. पेंडसेंनी जवळ जवळ १७०० पानांची कादंबरी लिहिली आहे तिला न्याय द्यायचा तर किमान दिड दोन वर्षे दररोज चालेल इतके खाद्य आहे यात!

दादा खोत - शरद पोंक्षे - परफेक्ट
नरसू खोत- किशोर कदम?
नाना खोत - गिरिश कुलकर्णी
गणेश शास्त्री - विक्रम गोखले फार्फर म्हतारा झाला सो तो कटाप त्यापेक्षा तरूणपणीचे गणेश शास्त्री म्हणून अतुल कुलकर्णी नाहीतर मग सचिन खेडेकर?
ताई - शुभांगी गोखले तशी सीमा देश्मुख पण वाईट नाही
गंगा - उर्मिला कानिटकर किंवा प्रिया बापट
गुलाब - स्मिता तांबे
बजापा - तसा इकडे पण नटरंग इतके शरिर कमावलेला अतुल कुलकर्णी चालेल पण त्याला गणेश शास्त्रीकरता वापरले तर इकडे कोण बरे? ( तसा अंकुश चौधरी येतोय व्यक्तिमत्वासाठी पण त्याचा अभिनय - मला तितका सा नाही आवडत - फार च स्टिरिओटाइप आहे) समीर धर्माधिकारी?
जुळे - जितेंद्र जोशी
ओड्डल - सुबोध भावे?
अनंता - अनिकेत विश्वासराव
तारीचा हिरो कोण? संभाजीच ना? त्यासाठी - संतोष जुवेकर

अजून सुचले की अ‍ॅडवते

पण माझी खरेच इच्छा आहे यावर मालिका निघावी.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

-सविता
----------------------------
|| स्वतः मेल्याशिवाय स्वर्ग दिसत नाही ||

अगदी अगदी, माझीही फार इच्छा आहे. इतकी की, कुणी निर्मिती करायची ठरवली, तर मी थोडे शेअर्स विकत घेईन त्यात. Biggrin

नरसू खोत- किशोर कदम.......... किक लैच आवडतो मला. चालेल, चालेल!
नाना खोत - गिरिश कुलकर्णी........फुकट जाईल ग तो. कितीसा रोल आहे तो.
गणेश शास्त्री - विक्रम गोखले फार्फर म्हतारा झाला सो तो कटाप त्यापेक्षा तरूणपणीचे गणेश शास्त्री म्हणून अतुल कुलकर्णी नाहीतर मग सचिन खेडेकर?...... चालेल!
ताई - शुभांगी गोखले तशी सीमा देश्मुखपण वाईट नाही.
गंगा - उर्मिला कानिटकर किंवा प्रिया बापट....... हां, प्रिया बापट. नाहीतर तोवर केतकी माटेगावकरपण मोठी होईल, तीही चालेल!
गुलाब - स्मिता तांबे...................... पर्फेक्ट!
बजापा - तसा इकडे पण नटरंग इतके शरिर कमावलेला अतुल कुलकर्णी चालेल पण त्याला गणेश शास्त्रीकरता वापरले तर इकडे कोण बरे? ( तसा अंकुश चौधरी येतोय व्यक्तिमत्वासाठी पण त्याचा अभिनय - मला तितका सा नाही आवडत - फार च स्टिरिओटाइप आहे) समीर धर्माधिकारी?.......... स्वारी, अजिबात नापास. समीर धर्माधिकारी कसला अळणी आहे! बजापा म्हणून अतुल कुलकर्णीच हवा, नटरंगवाला. नाहीतर मग बावडी कमावलेला गिरीश कुलकर्णी. (त्याला भारीपैकी रोल हवाच होता!)
जुळे - जितेंद्र जोशी........ एक्सलंट फ्याण्टास्टिक डन!
ओड्डल - सुबोध भावे?.... म्हातारा वाटेल आता.
अनंता - अनिकेत विश्वासराव.......... चालेल.
तारीचा हिरो कोण? संभाजीच ना? त्यासाठी - संतोष जुवेकर......... हो, हाही पर्फेक्ट.

हृषीकेश जोशीला कुठला रोल देता येईल. तो एक मला फारच आवडणारा नट आहे.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

-मेघना भुस्कुटे
***********
तुन्द हैं शोले, सुर्ख है आहन

शिवाजीराव बांडे - हृषीकेश जोशी?
तारी, गोदावरी, गंगा - यासाठी केतकी माटेगावकर, उर्मिला कानिटकर, प्रिया बापट - कोणीही कुठेही चालेल.
विश्राम - उमेश कामत चालेल का? मला आवडतो बुवा तो!
जुलाली मिळत नाहीये गं - सुचव जरा कोणी तरी (सई ताम्हणकर नको - ती डोक्यात जाते हल्ली)!

अजून कोणते मुख्य पात्र राहिले?

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

-सविता
----------------------------
|| स्वतः मेल्याशिवाय स्वर्ग दिसत नाही ||

हां, चालेल हृषीकेश जोशी शिवाजीराव म्हणून.
विश्राम म्हणून उमेश कामत जरा मोठा नाही वाटणार? त्याला ओड्डल करायला माझी हरकत नाही. पण त्याला पेलेल की नाही कुणास ठाऊक.
आपा बेडेकरांचं काम मिलिंद फाटक चांगलं करेल. नाही?
विश्राम म्हणून तो 'विहीर'मधला मुलगा चालेल का? तो भारी आहे. त्याचं नाव विसरायला होतं मला कायम.
तारी म्हणून मुक्ती भारी वाटेल.
जुलाली कोण यार? मला 'राऊ'मधली अश्विनी भावे आठवली एकदम. तसं सुंदर नि त्या ताकदीचं कुणी नाहीच का आपल्याकडे? शिवाय ती बाई गिरीश कुलकर्णीसमोर रत्न वाटली पाहिजे एकदम.

शिवाय सोनाली कुलकर्णी, वीणा जामकर, उत्तरा बावकर, लीना भागवत या थोर बायकांना काय कामं देशील?
***

लीना भागवत - भागी
वीणा जामकर - जनापाची कोण असते ते आयटम? हां, मानी
उत्तरा बावकर - गणेशशास्त्रींची बायको
लालन सारंग - नरसूची बायको - थेट म्हातारी चालेल ना? आधी तसाही तिचा काही उल्लेख नाहीच.
सोनाली कुलकर्णी - हिला काही रोल गावेना बा. वाईट वाटतंय मला फारच.
जनापा - 'देऊळ'मधे नाना पाटेकरच भाऊ कोण दाखवलाय तो? तो भारी होईल.

वा वा मजा येतेय!

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

-मेघना भुस्कुटे
***********
तुन्द हैं शोले, सुर्ख है आहन

दमामिंच्या कथेतील , भोकवाडी बुद्रुकमधील पात्रे कोण होणार?
किद्मिदित किरकिरे गणा मास्तर, चतुर/इरसाल नाना चेंगट, बाबू पैलवान, धेरपोट्या हवालदार नि पोलिस पाटील....
भांडकुदळ बायको...
कोण कोण चांगली कामं करतील ग्रामीण बाजाच्या भूमिकेत?
.
.
.
डर्टी पिच्चर मराठीमध्ये काढला तर काय स्टारकास्ट कराल?
डी डी एल जे साथी आणि जो जिता...सआठी काय स्टार कास्ट असेल?
जो जीता मध्ये महागुरु प्रमुख भूमिकेत अर्थातच असतील.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

--मनोबा
.
संगति जयाच्या खेळलो मी सदाहि | हाकेस तो आता ओ देत नाही
.
memories....often the marks people leave are scars

विशाल भारद्वाजने जे शेक्सपिअरच पुर्ण देसीकरण केलय, तस अजुन कोणत्या इंग्रजी क्लासिकच होउ शकेल वाट न लावता?

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

कॉमेडी ऑफ एरर्स.

तिच्यायला आपण खरच वाचलय की नै ते कुणाला कळतय इथं. द्या ठोकून.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

--मनोबा
.
संगति जयाच्या खेळलो मी सदाहि | हाकेस तो आता ओ देत नाही
.
memories....often the marks people leave are scars

याचं ऑलरेडी भन्नाट देशीकरण "अंगूर"च्या रुपात झालं आहे

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

- ऋ
-------
लव्ह अ‍ॅड लेट लव्ह!

अम्गूर पाहिला नाही Sad
ज्युलिअस सीझर आणि हॅम्लेट ह्या दोन्हींची रुपांतरणं शक्य असावीत.
.
शिवाय वुडहाउस, शॉ वगैरेंबद्दल ज्यांना आयदिया आहे, ते त्यांच्याबद्दल सांगू शकतील.
सगळ्या रहास्यकथा ह्या खरे तर शेरलॉक होम्सचीच नक्कल होत.
.
अ‍ॅगाथा ख्रिस्तीचे एक नाटक रुपांतरित होउन मरआथीत आले आहे,. विक्रम गोखले त्यात आहेत. नाव विसरलो.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

--मनोबा
.
संगति जयाच्या खेळलो मी सदाहि | हाकेस तो आता ओ देत नाही
.
memories....often the marks people leave are scars

अंगुर मस्त आहे.
ख्रिस्टी च्या अँड देन देअर वेअर नन चा देसी अवतार गुमनाम, बरा होता.
वुडहाउस देसीकरण मला अशक्य वाटतय.
बाकीबद्दल कल्पना नै.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

चुथडा केलाय चांगल्या संकल्प्नेचा.
हिरो-हिरोइन, दुष्ट व्हिलन, एक कॉमेडिअन असं सगळं बॉलीवूडीकरण केलय.
मूळ कथेत दुष्ट व्हिलन नाहिये. कॉमेदिअनही नाही,नाचगाणेही नाहित.
हिरो वगैरे थर्डक्लास पणा तर कुठेच नाही.
मनोजकुमार कधी तावडित गावलाच तर खोपच्यात घेउन त्याला घिब घिब करुन गुद्दे हाणायचे आहेत.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

--मनोबा
.
संगति जयाच्या खेळलो मी सदाहि | हाकेस तो आता ओ देत नाही
.
memories....often the marks people leave are scars

ROFL एवढा का चिडलाय बे.
मी खूप पुर्वी पाहिलाय. तेव्हा पुस्तक वाचलदेखील नव्हत. परत पाहुन सांगते.
बादवे मनोजकुमार छान दिसतो Blum 3 खरंच सांगतेय. फक्त चेहरा बघ. ब्लेक अँड व्हाइट मधला. वो कौन थी वगैरे.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

वुडहाउस देसीकरण मला अशक्य वाटतय

+१
वुडहाऊस काय, पुलं काय सगळे शब्दांचे व पात्रांचे जादूगार.. त्यांची मजा वाचन/श्रवणातच यावी.
शिवाय त्यांची पात्रे इतकी ताकदीची आहेत की तस्सेच्या तस्से कास्टिंग अशक्य ठरावे.. कास्टिंग चुकले आणि बाकी मजा शब्दांची - भाषेची - मग चित्रपटात बघण्याजोगे उरतेच काय?

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

- ऋ
-------
लव्ह अ‍ॅड लेट लव्ह!

पु लं च्या म्हैस वगैरेवर चित्रपट काढून झाला.
व्यक्तीवल्ली तर अनुभवी नि यशस्वी व्यावसायिक दिगदर्शकाने अशोक सराफ वगैरे तगडी स्टारकास्ट घेउन सिरियल रुपात छोट्या पडद्यावर आणली.
दोन्ही वेळेस "बात कुछ जमी नही" हेच वाटले.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

--मनोबा
.
संगति जयाच्या खेळलो मी सदाहि | हाकेस तो आता ओ देत नाही
.
memories....often the marks people leave are scars

जीवज सिरीज पाहिलीय का कोणी?

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

शेरलॉकचं होऊ शकेल. पण त्याला क्लासिक म्हणायची पद्धत नाहीय. शिवाय मी शेरलॉकबद्दल काही बोलायला भिते हल्ली. लोक विचित्र नजरेनं पाहतात. Sad

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

-मेघना भुस्कुटे
***********
तुन्द हैं शोले, सुर्ख है आहन

पाने