Skip to main content

मनातले छोटे मोठे विचार आणि प्रश्न - भाग २

Part 1

ही धागामालिका आपल्या मनात येणारे, नेहमी नेहमी डोकावणारे विचार मांडण्यासाठी आहे. कधी कधी आशय फार मोठा नसतो. फार खोल विचार केलेला नसतो. तो विचार/ कल्पना/ प्रश्न/ गंमत डोक्यात येते, जाते. कधी कधी आपण विसरतो, कधी कधी ती ती पुन्हा पुन्हा येत असल्याने आपण विसरू शकत नाही.

यापूर्वीच्या धाग्यावरचे प्रतिसाद १०० च्या आसपास आहेत म्हणून हा दुसरा धागा.

------------------------------------------------------------------------------------------------------------
--------------------------------------------------------------------------------------------------------------
आता या धाग्यात काल माझ्या डोक्यात जो चावट विचार आला तो लिहितो. तो विचार असा होता -"एका टिपीकल दिवशी एका शहरात किती संभोग होत असतील?"

१. हा प्रश्न संस्थळाच्या दृष्टीने जरा जास्त अश्लिल आहे का? नसावा अशी अपेक्षा आहे. हा आकडा मोजणे रोचक ठरावे. नसेल तर कळवणे.

२. अगोदर प्रश्न स्पेसिफिक करायला हवा. त्यासाठी काही प्रश्न हाती घ्यावे लागतील.
अ. दिवस विकांत असावा/नसावा?
ब. दिवसावर मोसमाचा परिणाम नसावा. (माणसांचा सीजन नसावा)
क. शहर सर्वांना परिचयाचे, भारतीय असावे. पुणे?
ड. शहराचा डाटा उपलब्ध असावा
इ. संभोग म्हणजे पूर्ण ऑर्गॅझम झालेलाच, असे धरायचे का?
फ. विषमलिंगांमधलाच असे धरायचे का?
ग. नॉर्मल संभोग

३. शहर म्हणजे जिल्हा नव्हे
अ. केवळ दिलेल्या वेळेची दिलेली जिऑग्राफी.
ब. जागा हनिमून स्पॉट नाही.

४. लोकसंख्या-
अ. बाजूची गावे आणि महानगरपालिका धरायच्या नाहीत.
ब शहराचे रजिस्टर्ड लोकसंख्या काय?
क. एका वेळी किती स्थानिक शहराबाहेर असतात?
ड. किती बाहेरचे लोक आत येतात?

५. लोकसंख्येची रचना
अ. वयोगट कसे निवडावेत?
ब. विवाहित /अविवाहित हा डाटा
क. त्यांचे ४ मधील सर्व लोकांमधे प्रमाण तेच असेल का?
ड. सेक्स रेशो

६. काही अ‍ॅडीशन्स आणि टर्न ऑन्स
अ. लफडी
ब. वेश्याव्यवसाय
क. बलात्कार
ड. खास प्रसंग

७. काही वजाबाक्या
अ. ब्रह्मचारी पुरुष , स्त्रीया
ब. व्रत, वैकल्ये
क. मासिक पाळी
ड. गरोदरपणा
इ. षंढता
फ. जवळच्या माणसाचा मृत्यू, दु:खात असणे
ग. नवराबायकोंची भांडणे
ह. सेक्स्यूअल ब्लॅकमेल
ई. जागा नसणे
ज. पाहुणे इ आल्याने एकांत जाणे
क. इतर थकवा
ल. संतती प्रबंधक जवळ नसणे.

८. फायनल मोजणी (सगळे अनूकूल असताना)
अ. प्रत्येक वयोगटात असलेली वारंवारिता
ब. विवाहित असण्या नसण्याचा परिणाम
क. नविन लग्नाचा परिणाम
ड. मुले मोठी असल्याचा परिणाम
इ. मूड मॅच-मिसमॅचचा परिणाम

............सा… Mon, 25/11/2013 - 22:24

दॅट रिंग्स अनदर बेल - सम+भोग हा शब्द- एकत्र एकच पक्वान्न खाणे, एकत्र एकच गाणे ऐकणे, एकच दृष्य अनुभवणे, एकाच मऊसूत शालीचा स्पर्श अनुभवणे आदि बाबींनाही लागू होतो का?
या प्रशनाचे उत्तर, शब्दब्रम्हसमुद्र-व्युत्पत्तीगुरु बॅट्या ;) अथव अन्य कोणाला माहीत आहे का?

अजो१२३ Mon, 25/11/2013 - 22:27

In reply to by ............सा…

सम नव्हे सं. सं म्हणजे एकत्र. इथे हा शब्द फार विशिष्ट अर्थाने आहे. तो काय हे कळण्यासाठी लेखाची पार्श्वभूमी पुरेशी आहे.

'न'वी बाजू Mon, 25/11/2013 - 22:52

In reply to by 'न'वी बाजू

फॉर द्याट म्याटर, तमाम संशयितांबद्दलसुद्धा.

अजो१२३ Mon, 25/11/2013 - 22:47

In reply to by मन

असंही नाही हो.
१. हा डाटा कंडोम कंपन्यांच्या कामाचा असू शकतो.
२. सामाजिक /कौटुंबिक संस्था कोठे जात आहेत याची स्टॅटिस्टिकल कोरिलेशन्स काढता येतील.

राजेश घासकडवी Mon, 25/11/2013 - 23:26

सर्वसाधारणपणे लग्न झालेली जोडपी आठवड्यातून २ ते ३ वेळा संभोग करतात अशी आकडेवारी आहे. गणित अगदी सोपं करण्यासाठी आपण
वय ० ते २० : नगण्य
वय २० ते ४५ : आठवड्याला ३ वेळा
वय ४५ ते पुढे : नगण्य

३ वेळा हा वरचा आकडा घेतलेला आहे, कारण इतर दोन्ही कॅटेगऱ्यांसाठी शून्य मानलेलं आहे.
गणित सोपं करण्यासाठी २० ते ४५ मध्ये १/३ लोकसंख्या आहे असं गृहित धरू.
१/३ लोकसंख्या आठवड्याला ३ वेळा म्हणजे संपूर्ण लोकसंख्येच्या आकड्याला आठवड्यातून १ वेळा असं गुणावं लागेल. म्हणजे दिवसाला लोकसंख्या गुणिले १/७
मात्र प्रत्येक संभोगात २ लोक असतात त्यामुळे त्याला २ ने भागायचं.

थोडक्यात शहराची लोकसंख्या घ्या, तिला १४ ने भागा. तितके संभोग सरासरी दररोज होतात. तुम्ही दिलेल्या वेगवेगळ्या घटकांमुळे किंचित कमीजास्त होत असेल. हे येणारं उत्तर सुमारे २०-२५ टक्के अचूक असावं असा माझा प्राथमिक अंदाज आहे. यापलिकडे अजून किती अचूकता हवी ते सांगा.

नितिन थत्ते Tue, 26/11/2013 - 11:12

पी एस पी ओ म्हणजे काय?

अवांतरः पंखे बनवणार्‍या दोन कंपन्यांत काम करूनही कळलेले नाही.

नितिन थत्ते Tue, 26/11/2013 - 13:18

In reply to by सहज

ते तर ठाऊक आहे. ते चार शब्द ओळीत लिहिले आहेत त्यांचा एकूण अर्थ काय होतो. पंख्याचा कोणता प्यारामीटर आहे हा?

नितिन थत्ते Tue, 26/11/2013 - 15:40

In reply to by मी

PSPO is a measuring unit as per this.

But they do not claim that Orient Fans have "higher" or "better" PSPO (that is more air delivered for less electricity consumed). They simply claim that Orient fans "have" PSPO. Which any fan will have. Either X or X+ or X-.

मी Tue, 26/11/2013 - 16:19

In reply to by नितिन थत्ते

ते बहुतेक सर्व गाड्या आमचं इंजिन कसं भारी आहे हे सांगतात तसं असावं, तोच मसाला फक्त मिर्ची कुटुन/तुकडे/पेस्ट/आख्खी वगैरे प्रकार.

फॅनच्या युनिक रचनेमुळे पिएसपिओ अचिव्ह करता आलं असं ते म्हणतात.

हे शोधताना सापडलेला एक रोचक प्रबंध(?)

बॅटमॅन Tue, 26/11/2013 - 20:06

समजा मनातल्या कल्पना केली तर आवाज ऐकू येतात, प्रतिमाही दिसतात- उदा. एखादे मनात रुतून बसलेले गाणे आपोआप विशेष प्रयत्न न करताही ऐकू येते, पण कानावर हात ठेवले तर त्याची तीव्रता कमीजास्त होत नाही. शिवाय प्रतिमाही दिसतात. असे होण्यासाठी मेंदूतली नक्की कुठली सर्किट्री अन कशी काम करते? प्रतिमा दिसण्याची तर अजूनच वेगळी मजा आहे. रूढार्थाने त्या दिसतही नाहीत, म्हणजे मी समजा कशाचीतरी कल्पना केली तर मला सभोवतालच्या कुठल्याही ठिकाणी ते दृश्य दिसत नाही, पण तरी ते "दिसते". त्यालाच अंतश्चक्षू वैग्रे म्हटले जाते- नॉनपारमार्थिकली सुद्धा. नक्की याची संगती लावायची कशी? बरं हा आजिबातच अलौकिक पारमार्थिक वैग्रे अनुभव नाही, साधा सरळ पंचेंद्रियांनी येणारा अनुभव आहे.

म्हणजे एकदा नोंदवलेले अनुभव पुन्हा रिट्राईव्ह करताना त्या अवयवांची गरजच नाही!!! कान-डोळे असताना घ्यायचे ते अनुभव घेतले तर पुढे आंधळे-बहिरे झालो तरी त्या स्मृतींच्या बळावर आतला शो कायमच राहतो.

ही नक्की काय भानगड आहे? असे उरलेल्या पंचेंद्रियांबद्दल होते का? निव्वळ कल्पनेने वास, चव आणि स्पर्श यांचा तितकाच परिपूर्ण अनुभव येणे अवघड. असे का असावे आणि याच दोन संवेदना अशा का असाव्यात?

अवांतरः लोकांना एकाच ठिकाणी जखडून ठेवून नुस्ते सॉफ्टवेअरने संवेदनांचा आभास निर्माण करणे हे द मॅट्रिक्स नामक पिच्चरमधले दृश्य अगदीच कैच्याकै नसावे असे आपले वाटते त्यामुळे.

चिंतातुर जंतू Wed, 27/11/2013 - 15:58

In reply to by अजो१२३

>> आज ऐसी ऑफिसार बॅन झालं. काही उपाय आहे का?

कोणी फॉर्टीगार्ड म्हणून सॉफ्टवेअर आहे, त्याने केले.

ऑफिस कितपत लोकशाही तत्त्वावर चालतं त्यावर पुढचं पाऊल अवलंबून आहे. जर तुमच्या मते हे बॅन होणं गैर असेल, तर ऑफिसात तशी तक्रार करता येते का? ते बॅन होणं का गैर आहे ह्यावर तुमचं मत जाणून घेऊन ही कारवाई उलटता येईल का?

अन्यथा, त्या सॉफ्टवेअरमध्ये 'ऐसी'चं वर्गीकरण काय झालं आहे ते पाहावं लागेल. ते वर्गीकरण गैर आहे असं त्या सॉफ्टवेअर निर्मात्याला पटवण्याचा प्रयत्न 'ऐसी'तर्फे करता येईल.

दोन्ही उपाय यशस्वी झाले असल्याचा वेगळ्या ठिकाणचा अनुभव ऐकलेला आहे.

Nile Wed, 27/11/2013 - 20:18

In reply to by चिंतातुर जंतू

ऑफिस कितपत लोकशाही तत्त्वावर चालतं त्यावर पुढचं पाऊल अवलंबून आहे.

हे म्हणजे कोणता कम्युनिस्ट देश सर्वात चांगला असं विचारण्यासारखं आहे. ;-)

त्या सॉफ्टवेअरमध्ये 'ऐसी'चं वर्गीकरण काय झालं आहे ते पाहावं लागेल.

आमच्या हाफिसात ऐसीला अ‍ॅडल्ट म्हणून ब्लॉक केली आहे. आता बोला! (हे आधुनिकोत्तर लोकांनी टाकलेल्या 'कलात्मक' कंटेंट मुळे असावं काय? ;-) )

ॲमी Wed, 27/11/2013 - 10:11

In reply to by मन

मी चाइल्ड युथनेशिया बद्दल बोलतेय. माझ्या ओळखीतल्या दोन केसेस आहेत. एकात काही महीन्यांनी बाळाची वाढ होणे पुर्ण थांबलेल. हे बाळ ५वर्ष तरी जगलेल, पुढे काय झाल माहीत नाही. दुसर्या केसमधे जन्मतः शरीराचा पोटाखालाचा भाग आणि काही अवयव निकामी होते. डॉक ने सुचवलेल की काही मेडीकेशन करु नका, जाइल ते काही दिवसांनी. पण आईने सेँटीमेँटल होउन जगवायचा निर्णय घेतला. आता तो मुलगा ३०वर्षाँचा आहे.

अजो१२३ Wed, 27/11/2013 - 12:07

एका माणसाची सही दुसरा माणूस खरोखरच करू शकत नाही का? इतकं काही ते अवघड नसावं. चित्रकार लोक इतकी अवघड चित्रे काढतात तर सह्यांची नक्कल करू शकत नसावीत का?

मग जमीनीची, प्रॉपर्टीची कागदपत्रे, चेकबूक चोरून पैसे काढणे (बहुतेक अकाउंट नंबर माहित असेल तर साध्या विथड्रावल स्लीपनेच पैसे काढता येतात, चेक लागत नाही), इ इ सोपे असावे.

सहीला इतकं अवास्तव महत्त्व का आहे?

आणि ही सही मी केलीच नव्हती असं ठामपणे म्हणता येत नाही का? म्हणजे माझ्यासोबत तुम्ही एक करार केला आणि नंतर त्यावरची सही माझी नाहीच म्हणू लागलात, तर?

अजून माझ्याकडे एक पत्र आले, क्ष संस्थेतल्या य पदावरच्या म माणसाचे. आता माझ्याकडे काही सह्यांची डेटाबँक नाही ती सही चेक करून पाहायला. मी कसा विश्वास ठेवायचा कि त्या माणसाची सही तशीच आहे? मी कागदाच्या आधारावर मी एखादी कृती केली आणि संथेने/ व्यक्तिने विश्वामित्री पावित्रा घेतला तर?

ऋषिकेश Wed, 27/11/2013 - 12:27

In reply to by अजो१२३

हे प्रश्न वॅलिडच नव्हेत तर तसे होतच असते - होत असे.
हल्ली कराराच्या रजिस्ट्रेशनच्यावेळी बोटाचे ठसे, वेबकॅमने फोटोही काढला जातो, त्यामुळे हा प्रश्न करारांपुरता निकालात निघाला आसेल

१. चेकबुकवर करायची सही मी अन्यत्र कुठेही करत नाही. बेंकेसाठी वेगळी सही ठेवली आहे.
२. मी मुळातच चेकने व्यवहार अगदीच अपवादात्मक परिस्थितीत करतो
त्यामुळे तो प्रश्न माझ्यापुरता कमी प्रोपॅबिलीटी / रिस्कचा आहे :)

अजो१२३ Wed, 27/11/2013 - 12:24

पृथ्वीचा पृष्ठभाग थंड आहे. टेक्टॉनिक प्लेट्स ५० ते २०० किमी खोल असतात.

समजा चेंडूच्या आकाराचा एक तवा आहे. त्यावर एक पोकळ (आतून पोकळ) घनगोलाकार पोळी आहे. ती चेपून बसवली आहे. ती पोळी चेंडूवर एकसंघ फिरते असे समजा - हे ठिक वाटते.

पण आता या पोळीचे तुकडे करा. या तख्तबशा. आता यातल्या काही बशा एकमेकांवर चढू लागल्या तर दुसर्‍या बाजूला तवा उघडा पडेल. म्हणजे साऊथ आशियाची प्लेट युरेशियाच्या प्लेटवर दरवर्शी १०० मिलिमीटर चढली तर जगात कुठेतरी ५० ते १०० किमी खोल आणि १०० मिलिमीटर रुंद आणि १०००-२००० किमी लांब असा खड्डा पडला पाहिजे. वास्तविक पट्टांची/बश्यांची एकूण संख्या पाहता चिकार खड्डे पडले पाहिजेत. पण असे होत नाही. का?

मन Wed, 27/11/2013 - 13:24

In reply to by बॅटमॅन

वेगळी आणि विचित्र.
(विचित्र हा शब्द नकारात्मक अर्थच्छटेने, -ve connotation मध्ये घेउ नये.)

............सा… Wed, 27/11/2013 - 10:38

अरे हो मला एक मस्त प्रश्न सुचला होता -

पक्षांना कसे कळते की ते स्वतः "कावळा" आहेत किंवा "चिमणी" आहेत ते? आरसा तर नसतो मग ते कसे ओळखतात? आपल्याच थव्यात कसे उडतात?

Instinct????

अजो१२३ Wed, 27/11/2013 - 10:41

In reply to by ............सा…

लहान पक्ष्यांना काय पावडर लावायची असते का? ते चेहरा नाही तर पाय, पंख तरी पाहू शकतात ना!

बाय द वे, आपण स्वतः भाऊबंदांसोबत आरसा पाहूनच चालायला चालू केले होते कि काय?

अजो१२३ Wed, 27/11/2013 - 10:41

In reply to by ............सा…

लहान पक्ष्यांना काय पावडर लावायची असते का? ते चेहरा नाही तर पाय, पंख तरी पाहू शकतात ना!

बाय द वे, आपण स्वतः भाऊबंदांसोबत आरसा पाहूनच चालायला चालू केले होते कि काय?

मन Wed, 27/11/2013 - 12:03

In reply to by ............सा…

पक्षी नेणीवेत असतात. नेणीवेत समजत नाही.
जिवंत राहण्यासाथी, अन्न मिलवण्यासाठी ते समजायची गरजही नाही.
जस्ट जे आसपास आहे, त्यानुसारच आपण बनत असतो.
म्हणजे त्यांची शरीरे ही आपल्या मनोव्यापराचा भाग असतात.
एक मोठे सामूहिक मन कार्यरत असते.
भूक लागली की नैसर्गिक प्रेरणेने ते काहीतरी खातात, मिलवतात.
"आपण कावळा आहोत" ही जाणीव तेथे नसते.
.
.
पक्ष्यांची भाषा वगैरे कितीही कल्पना केल्या तरी ती एक फक्त सांकेतिक पातळीवरच आहे.
त्यातून एकमेकांबद्दलच्या "भावना" पोचतात. (राग्,द्वेष, मत्सर, प्रेम, आपुलकी,भीती अशा स्वर भावना पोचवतात. व्यंजने अर्थ देतात.)
"ई ई ई" असे करुन बाळ ओरडला तर तो चिडलाय हे आईला कळते. पण ते "का" चिडले हे त्याने सरळ शब्दांत न सांगितल्यास कळणे कठीण आहे.
"विचार" किम्वा "घटना" हे जीव एकमेकांस वर्णन करुन स्पष्ट सांगू शकत नाहित.
अगदि कुत्रा, मांजर हे माणसाळवलेले जीवही आणि वन्यजीवही.

अजो१२३ Wed, 27/11/2013 - 15:14

In reply to by मन

नेणीवसाठी इंग्रजी शब्द काय? जाणिव व नेणिव यांच्यात तेच उदाहरण देऊन काय फरक आहे ते सांगता का मनोबा?

'थोडा सुधारशील, योगशास्त्रावरचे पुस्तक वाच' असा मला आमच्या एका आप्ताने दिला होता. त्यात 'जाणिवेच्या पलिकडे' ही शब्दच्छलिका उदंड प्रमाणात वापरली होती. लेखन जाणिवेच्या सीमेवर असतानाच माझे डोके फ्यूज व्हायचे, पलिकडे म्हटले कि कंप्लिट फ्रीज. शेवटी पुस्तक ठेऊन दिले.

मन Wed, 27/11/2013 - 15:37

In reply to by अजो१२३

सांगता येत नाही.
सब कॉन्शस हा सुद्धा पर्फेक्ट शब्द नाही.
.
.
काही गोष्टी समजू शकतात.
पण समजावून सांगता येत नाहित.
हे त्यापैकीच आहे.

अजो१२३ Wed, 27/11/2013 - 15:26

शिवनारायण चंद्रपाल हा वेस्ट इंडीजचा क्रिकेटर भारतीय वंशाचा आहे का? मग इतका जास्त काळा कसा? मिश्रवर्णी? बाय द वे, भारतीय लोक जसे जगभर पसरले आहेत, तसे प्रत्येकच देशाचे (कमित कमी बिन गोर्‍या देशाचे तरी) लोक त्या त्या लोकसंख्येच्या प्रमाणात पसरले आहेत का? आणि जवळ पसरण्याऐवजी इतके दूर (कायमचे) पसरण्यामागचे लॉजिक काय असावे?

जेव्हा इमिग्रश्नचे नियम इतके कडक नव्हते तेव्हा लोकांनी युरोप, पूर्वीचा रशिया, पूर्व आशिया जास्त पसंद करायला हवा. पण भारतीय लोक कुठे कुठे आहेत याचा आणि अंतराचा (किंवा कूठल्याच घटकाचा) संबंध दिसत नाही.

मन Wed, 27/11/2013 - 15:47

In reply to by अजो१२३

वसाहतवादामुळे सर्वाधिक ह्या धर्तीवरची (आणि ह्या "धरती"वरची)स्थलांतरे झाली.
आफ्रिकेत , फिजी ह्या चिमुकल्या देशात, न्यूझीलंड, ऑस्ट्रेलिया आणि वेस्ट इंडिज मध्ये भारतीय गेले ते सर्वाधिक ब्रिटिश राजयखालीच.
.
.
साम्राज्यवादामुळेच ब्रिटनमध्ये, अमेरिकेमध्ये मजूर व गुलाम म्हणून आफ्रिकन कृष्णवंशीय आणले गेले.
म्हणजे इथपर्यंतची संगती अगदि व्यवस्थित लागते. वसाहतवादाच्या लॉजिकने.
.
.
पण मग एक मोठ्ठे कन्फ्युजनः-
आफ्रिकन व भारतीयांना नेले कुणी? ब्रिटिशांनी(किंवा युरोपीयनांनी)! म्हणून अमेरिकेत ब्रिटिश(युरोपीय) आहेत; सोबतीला आफ्रिकन व भारतीयही आहेत.
दक्षिण आफ्रिका आणि अगदि झिम्बाब्वे मध्ये अलिकडे हाकलले जाईपर्यंत ब्रिटिश्/युरोपीय (गोरे) होते.
.
.
पण साला मग वेस्ट इंडिज् मधील बेटातच युरोपीय मंडळी नाहित, हे कसें?
ज्यांना आणले ते काळे आहेत; पण त्यांचे तत्कालीन मालक गोरे; हे मात्र त्या भूमीवर नाहित.
ही काय भानगड आहे?
.
.
भरीला भर म्हणजे वेस्ट इंदिज असा कुठलाही देश नाही. कुठेच त्यास राजकिय अस्तित्व नाही.
विविध देशांचा तो एक समूह "वेस्ट इंडिज" ह्या अम्ब्रेला खाली खेळतो.
क्लाइव्ह लॉइड का कोणता तरी वेस्ट इंदिज्प चा क्रिकेट कप्तान हा त्याच्या खर्‍या देशाकडून ऑलिम्पिकमध्ये फूटबॉलवगैरेही खेळलाय.
(युवराजसिम्ग ज्युनिअर टीम कडून हॉकी खेळलाय तसेच.)

सुनील Wed, 27/11/2013 - 16:04

In reply to by मन

वेस्ट इंडिज ह्या नावाचा कोणताही देश नाही, हे खरेच!

बार्बाडोस, जमैका इ. कॅरेबेरियन बेटे हे स्वतंत्र देश आहेत. पण फक्त क्रिकेटपुरते हे देश एकत्र येतात आणि एक टीम बनवतात.

येथे गोरे नाहीतच असे नाही. पण खूप कमी आहेत.

अवांतर - कॅरेबियन बेटांना जवळ असलेल्या अमेरिकेतील फ्लोरिडा राज्यात दोन प्रकारचे काळे आढळतात - एक थेट अमेरिकेत आणले गेलेले आणि दुसरे म्हणजे हे कॅरेबियन बेटांमधून अमेरिकेत स्थलांतरीत झालेले.

मन Wed, 27/11/2013 - 16:34

In reply to by सुनील

क्रिकेट टीम मध्ये किम्वा इतरत्रही कॅरेबियनांचा उल्लेख होतो तेव्हा अपवादानेही हे आढळत नाहित म्हणून विचारले.
झिम्बाब्वे,आफ्रिका येथेही गोरे अल्पसंख्य आहेत. पण टीम मध्ये आहेतच.
.
.
काळे कुरळे केस, ब्राउन जाडसर निब्बर त्वचा असणारा हॅन्सी क्रोन्जे/क्रोनिए हा खरेतर आशियाई किंवा मिश्रवंशीय असायला हवा.
पण तो पडला गौरवर्णीय.
हर्षल गिब्ज कडे हा म्हणे आफ्रिकेचा पहिला कृष्णवर्णीय खेळाडू आहे.
क्लुस्नर हा सुद्धा झुलु जमातीतला म्हणतात.
पण कुठल्याच अँगलने तो स्थानिक आफ्रिकन लोकांच्या प्रतिमेजवळ जात नाही. (मोठे ओठ, जाड काळी त्वचा वगैरे.)

३_१४ विक्षिप्त अदिती Tue, 03/12/2013 - 23:24

In reply to by मन

क्लुस्नर हा सुद्धा झुलु जमातीतला म्हणतात.

नाही. त्याला झुलू भाषा येते म्हणून त्यांचं टोपणनाव झुलू.

Apartheid या दक्षिण आफ्रिकन कायद्याने गोरे-काळे असा सरळ भेद सुरू केला. (आता तो कायदा रद्दबादल झाला आहे.) पण त्यात त्यांच्या वेगवेगळ्या कसोट्या होत्यात त्यानुसार मनुष्य काळा का गोरा हे ठरवत असत. दक्षिण आफ्रिकेतले 'गोरे' कोणीच शुद्ध गोरे नाहीत असं समजलं जातं. (खरंतर आपण सगळेच आफ्रिकन आहोत. :ड)

'न'वी बाजू Wed, 27/11/2013 - 17:59

In reply to by मन

भरीला भर म्हणजे वेस्ट इंदिज असा कुठलाही देश नाही.

अधिक माहितीकरिता: ब्रिटिश वेस्ट इंडीज (पहिले दोन परिच्छेद), वेस्ट इंडीज फेडरेशन.

मन Wed, 27/11/2013 - 16:40

डावखुरे - उजवेखुरे समजू शकतो. पण हातसफाईतही मिश्र प्रकार पाहतो तेव्हा अश्चर्य वाटते.
हे मिश्र लोक म्हणजेच ambidextrous किम्वा अर्जुनासारखे सव्यसाचि काय?
.
.
माझा उपक्रमवरील जुना प्रतिसादः-
.
.
डावर्‍यातही प्रकार असावेत, काही जण सगळिच कामं उलटी करतात्.
तर काही जण काही विशिष्ट कामांसाठिच हातांची अदलाबदल करतात (अर्धवट डावरे)
उदा:- खालिल् प्रसिद्ध व्यक्तिमत्वे बघा:-
१.सौरव गांगुली :- डाव्यानं ब्याटिंग उजव्यानं गोलंदाजी
२.आपला सचिन ब्याटिंग बोलिंग उजव्यानं, पण इतरत्र डावरं व्यक्तिमत्व(लेखन्,भोजन्,टाळी देतानाही त्याचा डावा हात उत्स्फुर्तपणे वर जाताना पाहिलाय् म्याचमध्ये. वगैरे.)
३.झहीर खानः- अगदि सौरव च्या उलट.
४.झिंबाब्वे चा १९९९ विश्वचषकाचा स्टार नील जॉन्सन सौरव प्रमाणेच.
५.आशिष नेहरा, कर्टली आंब्रोस, अर्जुना रणतुंगाही शेम टु शेम
६.आफ्रिकेचा लान्स क्लुजनर सौरव सारखाच.
७.महाभारत ह्या ग्रंथातील श्री अर्जुन पांडु कुरुवंशी (भगवान श्रीकृष्णाचा आते भाउ) हा दोन्ही हातांनी बाण मारण्यास सक्षम् होता म्हणे.(सव्यसाची)
८.महाभारत सिरियल मध्ये दुर्योधन आणि कर्ण डावरे दाखवलेत.

काही डावरे सर्वत्र डावा हातच प्राधान्यानं वापरतात (फुल फ्लेज्ड डावरे)
१.सनथ जयसुर्या
२.वासिम अक्रम
३.युवराज सिंग(की सिंघ??)
४.विनोद कांबळी,ब्रायन लारा
५.वन-डे स्पेशालिस्ट मायकल बेव्हन

अजुन एक केसः-
सुनील गावसकर जशी नेहमी उजव्या हातानं अप्रतिम फलंदाजी करायचे, जवळ जवळ तशीच त्यांनी डाव्या हातानही रणजीमध्ये वगैरे केल्याचं ऐकलय.(ह्यालाच सव्यसाचि म्हणतात काय् ? )

क्रिकेट मधले डावरे शैलीदार वाटतात, हे खरच.

अभिनेत्यांपैकी केवळ दोन जण माहित् आहेत् डावरे:-
बच्चन् पिता -पुत्र.

मन Wed, 27/11/2013 - 20:10

उर्दू जबान्/जुबान हा शब्द जीभ म्हणून वापरतात. " जुबान खींच लेम्गे तेरी" ह्या वाक्यात आहे तशी.
किंवा "भाषा" ह्या अर्थानेही वापरतात.
"गोरे लोग पता नही किस जुबान से बात कर रहे थे" ह्या वाक्यासारख.
किंवा "तोंड" ह्या अर्थानेही वापरतात.
"किस जबान से जाउ मालिक के पास हारने के बाद" ह्या वाक्यासारखं.
.
.
travel,journey,tour जवलच्या अर्थच्छटा असणारे शब्द.
पण "हॅपी जर्नी" ह्या वाक्यात टूर किम्वा ट्रॅवल वापरता येत नाही.
.
टूरिस्ट आणि ट्रॅवलर ह्यातही फरक आहेच. प्रवास दोघेही करतात, पण एकाचा सुख सोयी युक्त असतो.
.
.
"गुलाम" असणं ही वाईट गोष्टय ना? मग "गुलाम अली खां" वगैरे वगैरे नावं सर्रास वापरात कशी?
स्वतःच्या मुलाचं नाव कुणी गुलाम कशाला ठेवेल?
शिवाय गुलामी इस्लामला मंजूर नाही असे ऐकले होते.
मग मुस्लिमांमध्येच गुलाम हे नाव इतके प्रचलित कसे?
.
.
भारतावर कित्येकदा बॉम्बस्फोट वगैरे वगैरे केले गेले पाकिस्तान्यांकडून.
"आमच्या नागरिकांनी केले असतील ; पण सरकारचा त्यात हात नाही" वगैरे वगैरे तिथले सरकार बोलते ते सरळ हेच मान्य करते ना की पाकिस्तानी भारतावर हल्ले करतात म्हणून ?
मग "most favored nation" हा दर्जा भारताने पाकला का दिला? आपण त्यांना देउनही त्यांनी
ती कृती रेसिप्रोकेट केलेली नाही. आपण त्यांना तो दर्जा देण्यामागे काय उद्दिष्ट होते/आहे? ह्या दर्जाअंतर्गत नक्की काय काय येते?

'न'वी बाजू Wed, 27/11/2013 - 23:36

In reply to by मन

शिवाय गुलामी इस्लामला मंजूर नाही असे ऐकले होते.
मग मुस्लिमांमध्येच गुलाम हे नाव इतके प्रचलित कसे?

माझ्या कल्पनेप्रमाणे हा गुलाम अल्लाहचा असावा.

झिया-उल-हक यांच्या कारकीर्दीपूर्वीपर्यंत रात्री साइन-ऑफ करताना 'ख़ुदा हाफ़िज़' म्हणणारे रेडिओ पाकिस्तान, त्यांच्या कारकीर्दीपासून पुढे अचानक 'अल्लाह हाफ़िज़' म्हणू लागले. यामागील 'लॉजिक' असे सांगितलेले वाचलेले आहे, की 'ख़ुदा' या फारशी शब्दाने दर्शविला जाणारा देव हा कोणाचाही देव असू शकतो (जसे, पारशांचा, किंवा अन्य कोणाचाही), मुहम्मदप्रणीत अल्लाहच, असे नव्हे; मात्र, 'अल्लाह' हा केवळ मुहम्मदप्रणीत 'अल्लाह'च असू शकतो; सबब, टू बी मोअर स्पेसिफिक (आणि अल्लाहेतर ईश्वराचा चुकूनही उल्लेख टाळण्याप्रीत्यर्थ) 'अल्लाह'च म्हणणे योग्य; 'ख़ुदा' नव्हे.

यातही खरे तर बहुधा फारसे तथ नसावे. कारण ख्रिस्ती अरबसुद्धा परमेश्वराला 'अल्लाह' म्हणूनच संबोधतात, असे ऐकलेले आहे. (अर्थात, मुसलमानांचा आणि ख्रिस्त्यांचा परमेश्वर एकच, मात्र बिगर-अब्राहमिक धर्मांच्या - जसे, पारशी, हिंदू, बौद्ध वगैरे - ईश्वरसंकल्पनांशी त्याचा काहीही संबंध नाही, असेही काही डायमेन्शन या 'विचारा'मागे असल्यास कल्पना नाही.)

सुनील Thu, 28/11/2013 - 06:37

In reply to by 'न'वी बाजू

कारण ख्रिस्ती अरबसुद्धा परमेश्वराला 'अल्लाह' म्हणूनच संबोधतात

बरोबर.

अल्लाह ह्या अरबी शब्दाचा अर्थ देव. खरे तर ज्यू, ख्रिस्ती आणि मुस्लिम ह्या तिघांचाही "देव" एकच. प्रेषित तेवढे निरनिराळे.

तरीही, अल्लाह हा शब्द फक्त (आणि फक्त) मुस्लिमच वापरू शकतात अन्य कोणीही नाही, असा निर्णय नुकताच मलेशियातील न्यायालयाने दिला होता.

राजेश घासकडवी Thu, 28/11/2013 - 07:05

In reply to by गब्बर सिंग

लेख वाचून 'काहीही!' असाच प्रतिसाद मनात आला. भारतातल्या (रिपोर्टेड) बलात्काराचा दर आहे लाखात १.८, अमेरिकेचा आहे २७. (आणि हेही गेल्या काही वर्षांत ८५% नी कमी झाल्यानंतर आहे) लो कल्लो हिसाब.

कुठच्यातरी जीनचा काहीतरी परिणाम वगैरे लोक फारच सहजपणे म्हणतात. त्यातून होणारे फरक हे सेकंड डेरिव्हेटिव्हचे असतात. अभ्यासातून समजा असं दिसलं की भारतीयांमध्ये कुठल्यातरी क्ष चं प्रमाण लाखात २२ आहे. इतर जगात ते लाखात २० आहे. तर त्याचा निष्कर्ष असा निघतो की 'भारतीयांमध्ये क्ष सापडण्याची शक्यता १० टक्के जास्त आहे!' यावरून मग न्यूज रिपोर्टर्स म्हणतात 'भारतीय हा क्ष ने लडबडलेला आहे' किंवा 'भारतीय माणूस क्ष साठी जेनेटिकली वायर्ड आहे.'

हे असलं काहीतरी पाहण्यापेक्षा बलात्कार रिपोर्ट करण्यावरची बंधनं कमी होतील असं पहावं, म्हणजे मोजमाप योग्य होईल. आणि त्याचबरोबर बलात्कार कमी होण्यासाठी उपाय करावे, आणि ते कमी होतात याची खात्री करावी. जीन्स गेले खड्ड्यात.

मन Thu, 28/11/2013 - 17:52

दृश्य कलेच्या जाणकारीचा क्रॅश कोर्स कुठे उपलब्ध आहे का?
पब्लिक जेव्हा अमुक चित्र अमेझिंग आहे, सालार जंग म्युझिअम मधील रिबेका शिल्प भारी आहे,
असं म्हणते तेव्हा त्यांना मला दिसतय त्यापेक्षा त्यात नक्की काय वेगळं दिसत असावं ?
अगदि ऐसीची मुखपृष्ठावरील चित्रे पाहूनही "वा फारच छान" इतकेच म्हणता येते, त्याशिवाय ज्या काही चर्चा चालतात,
(अमुक रेघोटी ऊर्ध्व जाउन वळणे ही पोलिश कला आहे, जपानी रफाटे झोकदार आहेत वगैरे वगैरे)
.
.
नाही म्हणायला ते काही दिवसापूर्वीचं माकडाचं/वानराचं चित्र भन्नाट वाटलं होतं.
ते क्रुद्ध वानर टुणकन उडी मारुन स्क्रीन्बाहेर येउन बदडेल असं वाटलं.

मी Thu, 28/11/2013 - 18:03

In reply to by मन

हे बघा Veiled Rebecca

व हे वाचा -

What is most striking in the image of Rebecca is her

form which is slender, coupled with qualities of contentment and quietness The healthy,

young and vigorous form and structure of the body, her bashful looks, slender hips,

supple limbs, relaxed muscles, shapely toes, the delicate fingers, folds and wavy lines of

the drapery, all bled in a graceful plasticity. It is all in marble, and yet one hardly ever

fells that the veil is of stone.

तिचा बुरखा हा संगमरवराचाच आहे हे अगदीच ढोबळमानाने लक्षात येण्याजोगं अमेझिंग आहे.

मन Sat, 30/11/2013 - 07:35

In reply to by अजो१२३

गमभन मुळे प्रथमच मराठी/देवनागरी इंटरनेटवर उप्लब्ध झाली. त्याचे प्लग इन बनवणे सोपे पडल्याने, लगोलग सुटेबल ड्रुपल उपलब्ध असल्याने मराठी स्थळांची उपलब्धता आणि सहजता एकदम कैक शे पट वाढली. त्यापूर्वी मनोगत ० मायबोली हीच काय ती मराठी संस्थळे होती.
मनोगतामध्येलिहायचे तर ते बरहा का कोणतेतरी सॉफ्टवेअत उतरवून घ्यावे लागे.
मग स्वतःच्या मशीन्वर संपूर्ण टंकून मग जालावर चढवावे. भलतेच त्रासदायक आणि वैतागवाडी होते.
मला २००५ च्या आसपास "मनोअग्त नावाचे ललित लिखाणाशी संबंधित ,गप्पा-चर्चा मराठीतून होणारे संस्थळ आहे" हे ठाउक होते.
पण कटकटीचे वाटाल्याने तिकडे फिरकलो नाही.
२००६ की २००७ मध्ये ओंकार जोशी ह्यांच्या प्रयत्नाने गमभन हा युनिकोड फॉण्ट तयार झाला.
त्याच वेळी मनोगतासारखाच मराठीचा प्रसार मनोगताबाहेरही करावा ह्या उदात्त हेतूने तात्या(विसोबा खेचर) आणि सोबतची मंडळी
मराठी स्थळाला साधे सोपे रुपडे देण्यासाठी बाहेर पडली, ते मिसळपव बनवूनच थांबली.
त्याचवेळी काहिंचा माहितीपूर्ण, वैचारिक लिखाणाकडे ओढा होता. ते जालवासी , प्रामुख्याने फॉर्मर मनोगती उपक्रम हे वैचारिक,
माहितीपूर्ण संस्थळ काढती झाली.(उपक्रमाशी शशांक जोशी हे नाव जोडलेले दिसते इतरत्र. खुद्द उपक्रमावर उपक्रमपंत हा एक संपादक्-मालक ताइप प्रकर आहे.
चॉकलेट पिच्चर मधील "मुर्तझा अर्झाई" ह्यांच्यासारखे ते अदृश्य आणि सर्वव्यापी आहेत की काय असे वाटते.)
मिमराठी डॉट नेट हे राज जैन ह्यांनी मिपानंतर एक्-दोन वर्षातच बनवलं. त्यापूर्वी "माझे शब्द " का कसल्यातरी नावाची हिट्ट साइट बनवण्याचा
अनुभव त्यांच्याकडे होताच.
माय्बोली अक्ष्क्षरश> पायोनिअर म्हणावी इतकी जुनी साइट असल्याने त्यांचा युजर बेस मोठा,अफाट आहे. त्यांनी युनीकोड स्वीकरल्यावर तिथेही वावर अधिकच वाढला लोकांचा.सुलभीकरण झाले. क्लिष्टता संपुष्टात आली.पण मायमराठीच्या सेवेला इतकी स्थळे पुरेशी नाहित हे जाणून त्या ध्यासाने जणू झपाटलेल्या व्यक्तींनी ऐसीअक्षरे ही साइट सुरु केली.
.
दरम्यान सुरेश भटांच्या गझलेला वाहिलेल्या काही साइट्स सुद्धा जनप्रिय आहेत असे ऐकतो. नाव विसरलो.
"ऐलपैल " आलि आणि गेली. त्यातले काही लेख मला प्रचंड आवडले होते.
.
.
ह्यातला बहुतांश भाग विकीपानाचा गोषवारा आहे.
अधिक तपशील विकीपेडियावर मिळतीलः-
http://mr.wikipedia.org/wiki/%E0%A4%AE%E0%A4%B0%E0%A4%BE%E0%A4%A0%E0%A5…

नितिन थत्ते Sat, 30/11/2013 - 17:07

In reply to by अजो१२३

का कोण जाणे पण मराठी शिकायला सुरुवात करताना पारंपरिक रीत्या ग म भ न ही अक्षरे शिकवली जातात असे मानले जाते.

चेतन सुभाष गुगळे Sat, 30/11/2013 - 17:51

In reply to by नितिन थत्ते

ती गाठीची अक्षरे आहेत. शिक्षक त्यामुळे विद्यार्थ्यांकडून ही अक्षरे गिरविण्याचा सराव जास्त प्रमाणात करून घेत. बस्स, यापेक्षा त्यांचे अधिक काही वैशिष्ट्य नाही.

राजेश घासकडवी Sun, 01/12/2013 - 09:47

In reply to by नितिन थत्ते

माझा अंदाज असा आहे की अक्षरं शिकवताना ग पासून म बनतो, म पासून भ बनतो, भ पासून न बनतो यामुळे एकाच वळणआची चार अक्षरं एकदम शिकण्याची सोय होते. कदाचित श स र य अशीही जोडी पुढची असेल.

ऋषिकेश Mon, 02/12/2013 - 09:57

In reply to by नितिन थत्ते

का कोण जाणे पण मराठी शिकायला सुरुवात करताना पारंपरिक रीत्या ग म भ न ही अक्षरे शिकवली जातात असे मानले जाते.

आता हे बदलून दशकाहून अधिक काळ उलटला आहे.
आता 'व ब क ळ' पासून सूरूवात होते.

सुनील Mon, 02/12/2013 - 09:58

In reply to by अजो१२३

पण गमभन शब्दाची उत्पत्ती काय?

बाराखडी शिकताना कंठव्य, मूर्धन्य, तालव्य अशा "शास्त्रोक्त" पद्धतीने वर्गीकरण केलेली मूळाक्षरे शिकण्याऐवजी "गिरवण्यास सोपे" अशा पद्धतीने वर्गीकरण केलेली मूळाक्षरे शिकवावीत, अशा विचारातून "गमभन"ची बाराखडी उद्भवली!

अजो१२३ Mon, 02/12/2013 - 10:37

In reply to by सुनील

गमभन ची पूर्ण सिक्वेंस कोणास माहित आहे का? मी तर अ आ इ ई शिकलो. गमभन नावाचा एक प्रकार आहे मला ३५ वर्षे माहित नव्हते.

नितिन थत्ते Mon, 02/12/2013 - 10:48

In reply to by अजो१२३

मलाही शाळेत ग म भ न शिकल्याचे आठवत नाही. पण मागच्या पिढीतल्या आजोबांनी वगैरे शाळेआधी जे काय शिकवले त्यात ग म भ न र स त ळ असे होते इतके आठवते. पुढचा सिक्वेन्स मुळीच आठवत नाही.

अतिशहाणा Tue, 03/12/2013 - 19:48

In reply to by अजो१२३

'शुद्ध मराठी' यांच्या प्रतिसादातून साभारः http://www.manogat.com/node/12365#comment-206675

ग म भ न
र स त ल ळ
ण प ष फ
व ब ख क
उ ऊ श अ आ अं अः ओ औ
ट ठ द क्ष ढ ड ङ
ह इ ई झ
च घ ध छ
ज ञ ज्ञ य थ
ए ऐ
ऋ ॠ

सुनील Mon, 02/12/2013 - 10:08

In reply to by मन

त्याच वेळी मनोगतासारखाच मराठीचा प्रसार मनोगताबाहेरही करावा ह्या उदात्त हेतूने तात्या(विसोबा खेचर) आणि सोबतची मंडळी
मराठी स्थळाला साधे सोपे रुपडे देण्यासाठी बाहेर पडली, ते मिसळपव बनवूनच थांबली.

डोळे पाणावले! ;)

(हां, मसं पंतोजीच्या शाळेतून थेट कट्ट्यावर आले, हे बाकी खरेय!)

असो, फार्फार वर्षांपूर्वी (जेव्हा मायबोली हे एकमेव मराठी संस्थळ होते) तेव्हा त्यात देवनागरी लिहिण्यासाठी "\dev" असे टंकून मग पुढे रोमन लिपीत मराठी मजकूर टंकावा लागे. गेले ते दिन गेले!!! :)

(मसंवरील तपाचा साक्षीदार) सुनील

अजो१२३ Tue, 03/12/2013 - 17:01

जस्टीस गांगुली यांच्यावर लैंगिक शोषणाच्या आरोपाची बातमी वाचली.
दोन विचार मनात आले.
१. न्यायव्यवस्थेतेने (गांगुली सारख्या लोकांनी, त्यांनी स्वतः नसले तरी) स्त्रीयांच्या रक्षणासाठी एकतर्फी ('आरोप' झाला कि अटक, बेल नाही) कायद्यासाठी प्रयत्न केले, किंवा ते स्वीकारले, किंवा सु मोटो विरोध केला नाही. समतेचं पारडं एका बाजूला झुकवलं. गांगुली सद्गॄहस्थ असतील आणि असे एकतर्की कायदे करणारे इतर लोक त्यांचे सहचर असतील, त्यांना गांगुलींच्या चरित्राबद्दल विश्वास असेल, तर त्यांना काय वाटत असेल?
२. कुठे पाणी मुरत असल्याशिवाय असे आरोप होत नाहीत असे असेल तर गांगुलींचा आसाराम का होत नाहीय्? गांगुलींचा आसाराम केल्याशिवाय एकतर्फी कायदा हा न्याय आहे का अन्याय आहे हा विषय चव्हाट्यावर येणार नाही.

अजो१२३ Tue, 03/12/2013 - 17:14

In reply to by मन

आरोप सिद्ध झाल्यावर निर्भयाचा खूनी तीन महिन्यांत सुटतो हे एकिकडे. नुसता आरोप झाला तेजपालजींची झालेली गत दुसरीकडे. कायदा १८ वर्षे न झालेल्यांच्या बाजूने झुकला आहे. तसाच तो स्त्रीयांच्या बाजूने झुकला आहे. दलितांच्या बाजूनेही झुकला आहे. या झुकण्यामागे कायदा बनवणारांचा सदुद्देश आहे हे निर्विवाद खरे आहे. परंतु याचा गैरफायदा कसा टाळावा हे ही महत्त्वाचे आहे. पण हे राजनैतिक प्राधान्य नाही. जेव्हा मोठे मासेच यात अडकतील (ही दुरिच्छा नाही, पण...) तेव्हा अजून जास्त संतुलित, न्याय्य रचना आणण्याच्या प्रयत्नांना चालना मिळेल.

ऋषिकेश Tue, 03/12/2013 - 17:28

In reply to by अजो१२३

परंतु याचा गैरफायदा कसा टाळावा हे ही महत्त्वाचे आहे.

हे एका मर्यादेपर्यंतच होऊ शकते.
बनवलेल्या चपलांमुळे फक्त काट्यांपासूनच रक्षण करावे मात्र तिचा समोरच्याला थोबडवायला उपयोग होणार नाही हे ही बघावे अशी अपेक्षा फक्त चपला बनवणार्‍यांकडून करणे अवास्तव नाही काय? चपला वापरणार्‍यांकडे याचे काहीच उत्तरदायित्त्व नाही काय?

मन Wed, 04/12/2013 - 16:11

ऐसीवरील कुणाशी भेट झाली नाही कधी.
केवळ बॅट्याला आणि दोन्-चार वेळेस ऋ ना तेवढा भेटलोय मागे.
कधी गाठभेट घ्यायला जमेल का?
जमलेली मंडळी फोनवरून इतरांना भेटीत सामावून घेतीलच.

मन Wed, 04/12/2013 - 16:20

In reply to by नितिन थत्ते

मुंबैत यायला तयार आहे. मुंबैला ट्रेन कनेक्तिव्हिटी बरी आहे इथून. वीकाम्तास येण्यास जमेल.
@सुनीलः-
हो कट्टा म्हणा, अजून काही म्हणा.

मन Thu, 05/12/2013 - 12:30

हे अचानक कुठून आले?
१९९२ पूर्वी हे कुठे होते?
नक्की ग्लोबलायझेशनच्या काळात काय चाललय?
NGO हा शब्द इस २००० पूर्वी इतकय सातत्याने कानावर पडत असे का? हे नंतरच कुठून उपटले. इतके सारे कुठून आले?
गे/होमो लोक , गे विषय चित्रपटात वगैरे कुठे होता? (दोनच अपवाद :- "फायर" व "मित्राची गोष्ट")
मुळात एकाएकी इतकी सारी मंडाळी होमो कशी बनली?
लिव्ह इन असं आहे; लिव्ह इन अमुक आहे. लिव्ह इनचे फायदे-तोटे ह्या गप्पा आताच कशा रंगतात?
एकाएकी ह्या गोष्तीची इतकी "गरज" कशी निर्माण झाली?
लिव्ह इन नव्हतं तेव्हा मंडळी काय करत?
अन्क्की आसपास चाल्लय काय?
संघातील काही मंडळी म्हणतात तसं अमेरिकन संस्कृती हीच जागतिक संस्कृती मानली जाउ लागलिये का?
सांस्कृतिकद्रुष्ट्या उरला सुरला भागही पाश्चात्त्य जिंकून घेताहेत का?
.
.
http://online2.esakal.com/NewsDetails.aspx?NewsId=5045503275072192163&S…ताज्या बातम्या&NewsDate=20131205&Provider=दर्शना कुंटे - सकाळ वृत्तसेवा&NewsTitle=आजी-आजोबांचे

आजी-आजोबांचे "लिव्ह इन...' ते रेशीमगाठी!
पुणे - ती 64 वर्षांची अवखळ "तरुणी' अन्‌ तो 73 वर्षांचा रुबाबदार "तरुण'... दोघांची ओळख झाली एका ट्रीपमध्ये... तेथेच विचार, मनेही जुळली... सहचर गमावलेल्या या दोघांनाही त्याच वेळी आयुष्याच्या सायंकाळी सावलीसारखी पाठराखण करणारा हाच योग्य जोडीदार असल्याची सुखद जाणीव झाली...

गाठीभेटीनंतर लिव्ह- इन- रिलेशनशिपमध्ये राहण्याचा निर्णय झाला... प्रेमाचा हा बंध अतूट असल्याची पक्की खात्री पटल्यानंतर सहा महिन्यांनी दोघांनी विवाहाच्या रेशीमगाठी बांधल्या... 16 डिसेंबरला त्यांच्या विवाहाची वर्षपूर्ती, या अतूट नात्याची साक्ष देणारी! "सेकंड इनिंग'चा एकटेपणा घालवण्यासाठी अशा विवाहांचे प्रमाण अलीकडे वाढले आहे, असे "लिव्ह इन' क्षेत्रात काम करणारे माधव दामले यांनी सांगितले.

लिव्ह- इन- रिलेशनशिप हा गुन्हा नाही किंवा पापही नाही, असे मत व्यक्त करताना या नात्यासाठी नवा कायदा करण्याची सूचना नुकतीच सर्वोच्च न्यायालयाने केली आहे. या पार्श्‍वभूमीवर पुण्यातील सद्यःस्थितीची माहिती घेतला असता, तरुण वयातच नव्हे, तर उतारवयातदेखील "लिव्ह इन' आणि नंतर "लग्नाच्या रेशीमगाठी' बांधल्या जात असल्याचे दिसून आले.

प्रथम लिव्ह इनमध्ये राहिल्यामुळे दोघांनाही एकमेकांना ओळखण्यास पुरेसा कालावधी मिळाला आणि विवाहाचा निर्णय घेण्यास अडथळे आले नाहीत, असे विवाहाचा पहिला वाढदिवस लवकरच साजरा करणाऱ्या या जोडप्याने प्रांजळपणे कबूल केले. आपल्या नात्याविषयी बोलताना हर्षदा (नाव बदलले आहे) म्हणाल्या, ""मला दोन मुलगे, सुना, नातवंडेही आहेत. त्यांच्या साथीने माझे आयुष्य मी मजेत व्यतीत करत होते; मात्र आयुष्याच्या या वळणावर एकाकीपणाची जाणीव प्रकर्षाने होत होती. माझे सुख-दुःख सामावून घेणारा सोबती असावा असे वाटत होते. माझ्या मनीची ही सल मुलांनाही जाणवत होती. मात्र, काळजीपोटी अशा कोणत्याही बंधनात अडकण्यास त्यांची मनाई होती. सुभाष (नाव बदलले आहे) माझ्या आयुष्यात आल्यानंतर आमची वेवलेंथ जुळत असल्याचे जाणवले. हे नाते त्यापुढे नेण्यास हरकत नसल्याची खात्री झाल्यावर एकत्र राहण्याचा प्रस्ताव दोघांनीही एकमेकांच्या मुलांसमोर मांडला. दरम्यान, दोघांच्या कुटुंबांचा एकमेकांशी परिचय झालेला असल्याने त्यांनीही संमती दर्शविली. या नात्याला बंधनात अडकविण्यापेक्षा काही महिने "लिव्ह-इन'मध्ये राहण्याचा पर्याय आम्ही निवडला. नाते दृढ असल्याचे संकेत मिळाल्यानंतर सहा महिन्यांनी आम्ही बोहल्यावर चढलो. आता मी माझ्या सासरी सुखात आहे. सहजीवनाची वर्षपूर्ती साजरी करताना आम्हाला अत्यानंद होत आहे.''

अशीच कथा आहे मीना लांबे आणि अरुण देव (नावे बदलली आहेत.) यांची. मीना पंचावन्न वर्षांच्या, तर अरुण यांनी पासष्टीत प्रवेश केलेला. दोघांची मुले स्थिरस्थावर झालेली... मात्र, जिवाभावाचा साथी गमावलेल्या या दोघांचेही दुःख याहून वेगळे नव्हते. एका मेळाव्यात दोघांची गाठ-भेट झाली. मनाच्या तारा छेडल्या गेल्या आणि लिव्ह-इन रिलेशनशिपमध्ये राहण्याचा निर्णय निश्‍चित झाला. अर्थात, मुलांची संमती होतीच. एका वर्षानंतर म्हणजेच 31 डिसेंबरला दोघे रेशीमगाठी बांधणार आहेत.

या नात्याविषयी दोघे म्हणतात, 'एकमेकांचा सहवास आणि त्याचबरोबर काळजीपोटी आम्ही एकत्र यायचा निर्णय घेतला. मात्र, थेट विवाहबंधनात अडकताना अनेक अडचणी समोर उभ्या ठाकल्या. यासाठी प्रथम लिव्ह-इन रिलेशनशिपमध्ये राहण्यास संमती दर्शविली. लवकरच आम्ही या नात्याला समाजमान्यता देणार आहोत.''

लिव्ह-इन-रिलेशनशिप ही वृद्धांसाठी काळाची गरज आहे. या वयात ज्येष्ठ मनाने हळवे झालेले असतात. त्यात सहचर गमावण्याचे दुःख पचवणे दोघांसाठीही जिकिरीचे असते. मुलांशी न पटणे, मालमत्तेतील वाट्यावरून होणारे वाद यामुळे या व्यक्ती डिप्रेशनमध्ये जाण्याची शक्‍यता जास्त असते. या हळव्या मनःस्थितीत मनातील गूज जाणून घेणारा सहचर मिळाल्यास दुःख हलकं होतं. माझ्या समुपदेशन केंद्रात आलेल्या अशा ज्येष्ठांचे नऊ संसार मी गेल्या दोन वर्षांत यशस्वीरीत्या थाटण्यास मदत केली.
- माधव दामले, अध्यक्ष, ज्येष्ठ नागरिक लिव्ह-इन-रिलेशनशिप मंडळ

अजो१२३ Thu, 05/12/2013 - 13:09

In reply to by मन

प्रतिगामी लोक, किमान व्वयस्कर लोकांच्या बाबतीत, लिव-इन ला विवाहापेक्षा जास्त विरोध करत असतील असे वाटते. दुसरीकडे जोडीदार चाचपून घेण्याची त्यांची गरज आणि हा विरोध हे मिश्रण रोचक आहे.

मन Thu, 05/12/2013 - 13:13

In reply to by अजो१२३

हे विषय आताच पटलावर आले कसे?
कुठलं तरी साय्लेंट सामाजिक स्थित्यंतर घडत किंवा घडून गेलय, असं काही आहे का?
चारशे वर्षानंतर आपण ह्या काळाकडे सामाजिक आघाडीवर अधिक हॅप्निंग काळ म्हणून पाहू का?

मन Thu, 05/12/2013 - 14:42

In reply to by अजो१२३

हे ही खरच.
आपापल्या पाहण्यातील बदल ज्यालात्याला मोथेच वाटतात.
पण जेव्हा खरोखरीच असे बदल होत असतील तेव्हाही हरेकजण हे इतर बदलांसारखेच बदल समजून गल्लत करेल, त्याचे काय?
( "लांडगा आला रे आला" कथेसारखे. "लाम्डगा येतोय" असे म्हटल्यावर तो काही दरवेळीच येत नाही ह्या वर्तनाची लोकांना सावय झालेली असते. पण जेव्हा खरोखरीच तो येतो, तेव्हा त्याला लोक फॉल्स अलार्म म्हणून दुर्लक्षित करतात.)

ऋषिकेश Thu, 05/12/2013 - 13:45

In reply to by मन

NGO हा शब्द इस २००० पूर्वी इतकय सातत्याने कानावर पडत असे का? हे नंतरच कुठून उपटले. इतके सारे कुठून आले?

NGO हा श्ब्द हल्ली ऐकू येतो आहे. गैरसरकारी सामाजिक संस्था आधीही होत्या.

गे/होमो लोक , गे विषय चित्रपटात वगैरे कुठे होता? (दोनच अपवाद :- "फायर" व "मित्राची गोष्ट")

कॉलिंग जंतू

मुळात एकाएकी इतकी सारी मंडाळी होमो कशी बनली?

हा प्रश्नच मजेशीर आहे. किमान कोणार्क शिल्पांपासून आजतागायत भारतात होमो होते हे तर स्पष्टच आहे. ही काही एकाएकी तयार झालेली ब्रीड नव्हे ती होती- तशीच - तितकीच. फारतर 'क्लोजेट गे'ज चे रुपांतर 'जाहिर गे' असण्यात झालेले दिसते हाच काय तो फरक

लिव्ह इन असं आहे; लिव्ह इन अमुक आहे. लिव्ह इनचे फायदे-तोटे ह्या गप्पा आताच कशा रंगतात?
एकाएकी ह्या गोष्तीची इतकी "गरज" कशी निर्माण झाली?
लिव्ह इन नव्हतं तेव्हा मंडळी काय करत?

लिव्ह आधीही असावंच. अंगवस्त्रे हा एक प्रकार झाला - व काही केसेसमध्ये राहणे अंगवस्त्रासोबतच असे - त्याव्यतिरिक्त काही प्रकार असावेत.

संघातील काही मंडळी म्हणतात तसं अमेरिकन संस्कृती हीच जागतिक संस्कृती मानली जाउ लागलिये का?
सांस्कृतिकद्रुष्ट्या उरला सुरला भागही पाश्चात्त्य जिंकून घेताहेत का?
हे अचानक कुठून आले?
१९९२ पूर्वी हे कुठे होते?
नक्की ग्लोबलायझेशनच्या काळात काय चाललय?

याचा ग्लोबलायझेशनशी संबंध आहेच आहे असे वाटते पण तो कसा?
यातील अनेक गोष्टी बाहेरून भारतात आल्या असे नसून त्या इथे होत्याच पण समजात त्याला स्वतःची अशी ओळख नव्हती. असे प्रकार बाहेरही आहेत, तिथे त्यांना ओळखच नाही तर स्वतःचे असे हक्क आहेत ही माहिती --> ज्ञान --> जाणीव भारतीय समाजाला होऊ लागली. आपले गे/लेस्बो असणे, लग्नाशिवाय बाई ठेवणे, NGO ही एक बिझनेस ऑर्गनायझेशन असल्याप्रमाणे चालवणे वगैरे गोष्टी लप(व)ण्यासारख्या नाहीत किंवा त्यात गैर/पाप नाहीत किंवा आपल्यालाही हक्क आहेत वगैरे जाणीव ग्लोबलायझेशनमुळे आली जे सामाजिक आरोग्यासाठी पोषक आहे.

मात्र याचा अर्थ गे/लिव्ह-इन/सामाजिक संस्था आधी नव्हत्या असं नाही.
आणि या व्यक्ती त्या म्हान/पुरातन/प्राचीन वगैरे भारतीय संस्कृतीच्याच भाग होत्या ग्लोबलायझेशनने दिले ती त्यांच्या "स्वत्त्वाची" किंवा त्यांच्या रास्त हक्कांची जाणीव.

तुम्ही म्हणताय हेच आणि अस्सेच स्त्री चळवळींबद्दल/दलित चळवळींबद्दलही म्हणता यावे पण त्यांना हक्कांची जाणीव ग्लोबलायझेशन फॉर दॅट मॅटर स्वातंत्र्याच्याही आधी इंग्रजांकरवी झाली होती, त्यामुळे (तरी) त्याचे खापर आम्रिकनांच्या/पाश्चात्यांच्या/ग्लोबलायझेशनच्या/ख्रिश्चॅनिटीच्या माथी फोडलेले सहसा दिसत नाही

मेघना भुस्कुटे Thu, 05/12/2013 - 17:55

In reply to by मन

एकाएकी एवढे होमो लोक कुठून आले हा प्रश्न साधारणपणे 'एकाएकी बायकांना मतं कशी फुटली', 'एकाएकी इतके घटस्फोट का होऊ लागले', 'एकाएकी बालसंगोपनात मुलांची मनं जपण्याचं फ्याड कुठून आलं?'... अशा प्रश्नांच्या कॅटेगरीत जाऊन पडतो. बाकी समलैंगिकता कायमच होती, ते योग्य की अयोग्य, मग लग्नसंस्थेचं नि मुलं जन्माला घालण्याचं काय, अशा अनेक प्रश्नांवर जालावर लैच चर्चा घडलेली आहे, तिच्याशी मनोबा परिचित असतीलच.

लिव्हइनबद्दल मी गोंधळलेली आहे.

संभोगासाठी परस्परसंमती नसली तरीही संभोगाचा हक्क देणारं लग्नातलं कलम वगळलं, तर माझी त्याबद्दल काही तक्रार नाही. मोडायचं झालं तर ते कधीही मोडता येतंच. असा करार केला काय नि न केला काय, ज्या माणसासोबत तो करायचा त्या माणसात (आणि त्या माणसाची आपल्यात) पुरेशी गुंतणूक असली की बाकी काही अडचणी येत नसाव्यात. मग लग्न नामक एक बर्‍यापैकी वापरून रुळलेला करार सोडून अजून एक नवा करार घडवायची काय गरज, मुळात लग्नात असं काय नाही जे लिव्हइनमधे आहे, तेच मला कळत नाही.

मी Thu, 05/12/2013 - 18:09

In reply to by मेघना भुस्कुटे

बहुदा (विकि)-

'Live-in relationship’ is a walk-in and walk-out relationship. There are no strings attached to this relationship, neither this relationship creates any legal bond between the parties. It is a contract of living together which is renewed every day by the parties and can be terminated by either of the parties without consent of the other party and one party can walk out at will at any time.

मेघना भुस्कुटे Thu, 05/12/2013 - 18:10

In reply to by मी

मग लिव्हइनमधे स्त्रीला (शोषण झाल्यास) शोषणाविरुद्ध संरक्षण द्यावं असा जो विचार आहे, तो अमलात कसा आणणार?

अजो१२३ Thu, 05/12/2013 - 18:26

In reply to by मी

चांगलं ते सगळं पाहिजे आणि वाईट ते काहीच नको हे ढोबळमानानं शक्य आहे. अगदी अचूकपणे असं करणं मंजे कायदाकारांच्या डोक्याचे दही असेल असेल.

ऋषिकेश Thu, 05/12/2013 - 18:37

In reply to by मेघना भुस्कुटे

मुळात लग्नात असं काय नाही जे लिव्हइनमधे आहे, तेच मला कळत नाही.

लिव्ह इन हे पुरूषांपेक्षा स्त्रीयांसाठी अधिक फायद्याचं आहे.
वरील प्रश्नाचे थोडक्यात उत्तर द्यायचं तर लिव्ह इनमध्ये स्त्रीला सन्मान व स्वातंत्र्य मिळतं. (जे पुरूषांना लग्न करूनही मिळत असल्याने त्यांना फार फरक जाणवू नये). "तडजोड" या नावाखाली स्त्रीला अनेकदा अनेक गोष्टी बदलाव्या लागतात ते लीव्ह-इन मध्ये सहज टाळता येतं आणि स्त्री आत्मसन्मानाने जगु शकते

(हे योग्य जोडिदार मिळाल्यास लग्न करूनही शक्य आहे पण सद्य स्थितीत तसा जोडिदार किती योग्य आहे हे कळणे कठीण आहे. त्यापेक्षा नंतर पश्चातापापेक्षा जो/जी आवडला/ली आहे तो/ती आहे का हे आधी बघणं योग्य असाही विचार यामागे आहे. पण ते शॉर्ट टर्म लिव्ह इन बद्दल झालं)

बराच काळ - कित्येक वर्षे - लिव्ह इन राहिल्या नंतर लग्न केलेले जोडपे व न केलेल्या जोडप्यात फार फरक मानु नये या कोर्टाच्या मताशी मी सहमत आहे.

नितिन थत्ते Thu, 05/12/2013 - 18:45

In reply to by ऋषिकेश

>>वरील प्रश्नाचे थोडक्यात उत्तर द्यायचं तर लिव्ह इनमध्ये स्त्रीला सन्मान व स्वातंत्र्य मिळतं.

म्हणजे तुम्ही दुसरी बाई म्हणून लिव्ह इन करणार्‍यांविषयी बोलत नाही आहात असं दिसतं.

असे नसलेल्या लिव्ह इन मध्ये अनेक वर्षं राहिलेल्यांना (पक्षी दोघा जोडीदारांचे व्यवस्थित जुळत असताना) लग्न का केलं नाही असं विचारून लग्न-सदृश (लग्न झालेले असल्यास मिळणारे) कोणतेही हक्क नाकारले पाहिजेत.

अजो१२३ Thu, 05/12/2013 - 18:48

In reply to by ऋषिकेश

(हे योग्य जोडिदार मिळाल्यास लग्न करूनही शक्य आहे पण सद्य स्थितीत तसा जोडिदार किती योग्य आहे हे कळणे कठीण आहे. त्यापेक्षा नंतर पश्चातापापेक्षा जो/जी आवडला/ली आहे तो/ती आहे का हे आधी बघणं योग्य असाही विचार यामागे आहे)

प्रत्येकच पुरुष लग्नानंतर बदलतो हो. कितीही चेक केलं तरी काही फायदा नाही. ;)
आणि (नवर्‍यानं) केसानं गळा कापला म्हणण्याचा आपला अधिकार स्त्रीया गमावतील त्याचं काय? तो तोटा छोटा नाही. ;)

ॲमी Fri, 06/12/2013 - 06:57

In reply to by ऋषिकेश

मुळात लग्नात असं काय नाही जे लिव्हइनमधे आहे, तेच मला कळत नाही. >> कमी काळाच्या लिव्ह इन मधे नातेवाइकांपासुन इम्युनिटी मिळायची शक्यता जास्त आहे लग्नापेक्षा, हे एक कारण असू शकेल?? परत मोनोगमीचापण जाच वाटु शकेल काही जणांना. पण त्यासाठी ओपन लग्न पर्याय आहे.

बराच काळ (३/५ वर्ष चालेल का?) लिव्ह इन असेल तर लग्न केलेले जोडपे व न केलेल्या जोडप्यात फरक मानु नये या कोर्टाच्या मताशी मीदेखील सहमत आहे. यात मी पॉलीगमी/अँड्री नात्यांनादेखील पकडतेय. उलट यापेक्षा कमी काळच्या लग्नासाठी सध्या कायद्यात असलेले मालमत्तेतील हक्कदेखील काढुन घ्यावेत अस मला वाटत.

असे नसलेल्या लिव्ह इन मध्ये अनेक वर्षं राहिलेल्यांना (पक्षी दोघा जोडीदारांचे व्यवस्थित जुळत असताना) लग्न का केलं नाही असं विचारून लग्न-सदृश (लग्न झालेले असल्यास मिळणारे) कोणतेही हक्क नाकारले पाहिजेत. >> का?

बेसीकली माझ मत: लग्न, ओपन लग्न, काँट्रेक्ट लग्न, लिव्ह इन, पॉलीगमी, पॉलीअँड्री, इतर काही प्रकार असतील तर ते, काय करायच ते करु द्याव. कायद्याने फक्त नात्याचा कालावधी पाहुन निर्णय द्यावेत.

गवि Fri, 06/12/2013 - 09:31

In reply to by ॲमी

ते, काय करायच ते करु द्याव. कायद्याने फक्त नात्याचा कालावधी पाहुन निर्णय द्यावेत.

या वाक्याच्या निमित्ताने मनात असलेली एक शंका विचारुन घेतो. नेहमीच कोर्टाच्या निर्णयात म्हणा किंवा अशा प्रकरणात उल्लेख होतो तो "नात्याचा कालावधी" असा.

म्हणजे विवाह हा फॉर्मल विधी बाजूला सारला असला तरी "नातं" आहे हे स्पष्टच आहे. शिवाय लिव्ह इन "रिलेशनशिप" यातही नातं जुळवलं जातंय हे मान्यच केलेलं आहे. नातं म्हणजे बंधन हे सर्वांनाच मान्य व्हावं. म्हणजे बांधिलकी ही सोशल डॉक्युमेंटेशन करणार्‍या लग्न विधीसहित किंवा लीगल डॉक्युमेंटेशन करणार्‍या रजिस्ट्रेशनसहित बनवली की यापैकी एकही फॉर्मॅलिटी न करता बनवली याचाच काय तो फरक लग्न आणि लिव्ह इन मधे आहे.

तर प्रश्न असा की लिव्ह इन अर्थात इन्फॉर्मल पद्धतीने एकत्र राहण्याचा "कालावधी" कशा मार्गाने काढला जातो? पुरावा म्हणून ग्राह्य धरण्यासाठी रजिस्ट्रेशन वगैरे नसताना किंवा लग्न अटेंड केलेले लोक / भटजी इ इ नसताना..

शिवाय लिव्ह इन कधीही ब्रेक अप - पॅच अप होऊ शकत असताना.. (माहीत असलेल्या लिव्ह इन्स मधे एक जोडीदार महिनो महिने खुशाल एकटा अन्यत्र जाऊन राहून पुन्हा आठवण आली की परत येणे वगैरे हे प्रकार कॉमन आहेत.. कारण बंधन नाही अशी समजूत.)

मग अशा रिलेशनशिपचा सलग कालावधी काढताना शेजार्‍यापाजार्‍यांची साक्ष काढतात का? की घराच्या लीज अ‍ॅग्रीमेंटवर दोघांची नावं एकत्र किती काळ आहेत ते पाहतात?(तशी असल्यास) की आसपासच्या भोचक दुकानदार , घरकामवाल्या/ले , दूधवाला इत्यादिंना विचारतात की बाबा, हे नेमके कधीपासून एकत्र राहतात?

ॲमी Fri, 06/12/2013 - 12:36

In reply to by गवि

एकत्र राहण्याचा "कालावधी" कशा मार्गाने काढला जातो? >> कल्पना नाही. पण मला वाटत काहीतरी लेखी पुरावा लागतोच. घटस्फोट घेताना नात्याची सुरुवात माहित असली तरी, ६महिन्यात माहेरी गेली, नंतर २वर्ष तिकडेच होती, मग परत आली, परत ३महिन्यात माहेरी गेली वगैरे कसं साबीत करतात? :-D

तुम्ही दिलेल्या उदा. ला मी ऑन ऑफ नातं म्हणेन लिव्ह इन नाही.

मन Fri, 06/12/2013 - 12:44

In reply to by ॲमी

तरी, ६महिन्यात माहेरी गेली, नंतर २वर्ष तिकडेच होती, मग परत आली, परत ३महिन्यात माहेरी गेली वगैरे कसं साबीत करतात?

प्रत्यक्षात काय करतात माहित नाही पण काय करु शकतात त्याचे अंदाज....
१.मुलगी जॉब करत नसेल तर भांडून माहेरी गेलेल्या बायकोच्या खात्यात नवरा दरमहा
पैसे टाकणार नाही.त्याचे ब्यांक रेकॉर्ड्स.
२.ती ट्रेनने गेली असेल तर हल्ली IRCTC च्या रेकॉर्डवर आरक्षण आहे का ते चेक करता येइल.
३.गावी गेल्यावर आजारी पडलेले असलयस तिथल्या डॉक्टरच्या रेकॉर्डवर असणारे डिटेल्स
फेसबुकवर त्याकाळात अपलोड केलेल्या फोतोमधील लक्षणीय उपस्थिती किम्वा लक्षणीर्य अनुपस्थिती.
४.जॉब करत असल्यास तिच्या ऑफिसच्या कम्युटेशनमध्ये , चाधन्या उतरण्याच्या जागेत झालेला बदल.
५.त्या काळातील लाइअट बिल्, फोन बिल किंवा इतर कुठलेही बिल भरलेले असण्याची पावती तिच्याकडे नसणे, केवळ नवर्‍याकडे असणे.
६.तिने त्याकाळात डेबिट कार्ड वगैरे स्वाइप केले असेल तर कुठ्कुठल्या ठिकाणाहून केले त्यातून काही सूत्र शोधता येते का ते पहायचे.
७. तिचे त्याकाळातील पआतह्वलेल्या इमेल वरील आय पी पत्ते हुडकायचे.
८.मोबाइल कंपन्यांच्या लॉगमधून त्याकाळात तिचा मोबाइल कोणत्या ठिकाणहून अधिक वापरात होता हे काढायचे.
सुचतील तसे टंकत जाइन.

अजो१२३ Fri, 06/12/2013 - 15:41

In reply to by मन

निश्चित पुरावा जमा करण्यासाठी एक समांतर विश्व लागते. आणि त्यात काळात प्रवास करायची सोय नसेल तर अशी अनंत समांतर विश्वे लागतात.

मन Fri, 06/12/2013 - 15:47

In reply to by अजो१२३

हो.
ह्या मर्यादा आहेतच. पण ह्या कुठल्याही गोष्टीच्या investigation ला लागू होतातच.
आहे त्याच मर्यादांत राहून काय काय करता येणे शक्य आहे ह्याचा विचार सिस्टिम चालवणार्‍यांना करणे भाग आहे.
मी त्याच लायनीवर डोके लावून पहात आहे.

मन Fri, 06/12/2013 - 07:55

In reply to by ऋषिकेश

मुळात इथे चर्चा सुरु असताना अगदि इथली विचारी वगैरे मंडळी सुद्धा "एक स्त्री" आणि "एक पुरुष" असाच विचार करताहेत.
नेहमीचा त्याअंचा फेव्हरिट "जोडिदार" हा शब्द गायब होउन "नवरा" व "पत्नी" असे फाल्तु शब्द का वापरले जाताहेत?
पुरुष्-पुरुष, स्त्री -स्त्री ह्या लिव्ह इन बद्दल मोकळ्या विचारांचे लोक अजूनच कसे पोचले नाहित?
शिवाय m इतके पुरुष आणि n इतक्या बायका लिव्ह इन मध्ये राहू शकण्याच्या शक्यतेचा विचारही का केला जात नाही?

चिंतातुर जंतू Thu, 05/12/2013 - 17:03

>> गे/होमो लोक , गे विषय चित्रपटात वगैरे कुठे होता? (दोनच अपवाद :- "फायर" व "मित्राची गोष्ट")

इथे तुम्हाला भारतीय किंवा मराठी कलाकृती अभिप्रेत असणार असं वाटतं. कारण पाश्चात्य जगात हा विषय अनेक वर्षांपासून वेगवेगळ्या प्रकारे हाताळला गेला आहे. आधुनिक भारतात मुळात लैंगिक संबंधांवर गंभीर भाष्य करणाऱ्या, म्हणजे चटपटीत किंवा कामोत्तेजक वाटणार नाहीत अशा, कलाकृतींची वानवा आढळते. लिहिणारे-वाचणारे लोक मध्यमवर्गीय आणि त्यांच्या संकेतांनुसार लैंगिकतेविषयी भाष्य वर्ज्य ह्या कारणानं एका काळापर्यंत ते तसं होतं. आता आता लैंगिकतेविषयी भाष्य करणाऱ्या कलाकृतींना मराठी विश्वात काहीसं स्थान मिळू लागलं आहे. त्यात पुन्हा आपल्याकडे स्वानुभवावर आधारित कलाकृती निर्माण करणारे कलाकारच बरेचसे असतात - म्हणजे बायका स्त्रियांच्या प्रश्नावर लिहितात, सामाजिक चळवळीतले सामाजिक चळवळींवर, दलित दलितांच्या प्रश्नावर, शेतकरी शेतकऱ्यांच्या प्रश्नावर वगैरे. अशात ह्या विषयावर लिहिणारी व्यक्ती आधी स्वतःच्या लैंगिकतेबद्दल मोकळी असायला हवी. तेच जर नसेल तर लिहिणं कुठून येणार? अशी परिस्थिती इंग्लंडमध्ये साठच्या दशकातली लैंगिक क्रांती घडण्याआधी होती. इ. एम. फॉर्स्टरचं उदाहरण इथे रोचक ठरावं. 'हॉवर्ड्स एंड', 'पॅसेज टू इंडिआ', 'रूम विथ अ व्ह्यू'सारख्या त्याच्या साहित्यकृती गाजल्या होत्या. त्याच्या हयातीतच तो इंग्रजीतला एक आघाडीचा लेखक होता. हे लिखाण चालू असताना त्यानं समलिंगी संबंधांविषयी अनेक कथा आणि 'मॉरिस' ही कादंबरी लिहून ठेवली होती. पण आपल्या समलैंगिकतेची उघड वाच्यता त्याला करायची नव्हती (अनेक वर्षं ते बेकायदेशीरही होतं आणि ऑस्कर वाइल्डचं काय झालं ते त्याच्या पिढीच्या डोळ्यांसमोर होतं.). त्यामुळे हे लिखाण त्याच्या मृत्युपश्चात प्रकाशित झालं. आपल्याकडे अजूनही समलैंगिकतेबद्दल सामाजिक अढी आहेत. त्यामुळे चारचौघांसारखं लग्न करून छुपं समलैंगिक आयुष्य जगणारे लोक पुष्कळ आहेत. ते समलैंगिकतेविषयी आत्मचरित्रात्मक निर्मिती करू शकणार नाहीत. आधीच्या पिढीत विजय तेंडुलकरांसारखे आणि आताच्या पिढीत सचिन कुंडलकरसारखे काही सन्माननीय अपवादच सध्या तरी हा नियम सिद्ध करत आहेत असं म्हणता येईल.

मन Thu, 05/12/2013 - 17:28

In reply to by चिंतातुर जंतू

भारतीय वर्तुळाबद्दल (खरं तर त्यातही मराठी मेनस्ट्रीम चष्म्यातून बघून)च बोलतोय.
पण तुम्हीच वरती दिलेल्या माहितीवरून हा विषय बाहेर, इंग्लंडात तरी टॅबूच होता.
म्हणूनच मृत्यूपश्चात प्रकाशनाची वेळ आली.
मग आताच असं नक्की काय घडतय.
नक्की कधीपासून घडातय?
सोविएतपतनापासून जगाची वैचारिक घडी अधिक झपाट्यानं बदलत गेली काय?

अवांतर :-
कुंडलकरांचे काही चांगले प्रयोग सुचवू शकाल काय?
सध्या कुठे सुरु आहेत काय?
किम्वा जालावर कुठे सापडतील का.

मेघना भुस्कुटे Thu, 05/12/2013 - 17:57

In reply to by मन

'छोट्याश्या सुट्टीत' हे त्यांचं नाटक (ते मिळत नाही. मी कशीबशी फोटोकॉपी मिळवली.) आणि 'कोबाल्ट ब्लू' ही कादंबरिका.

शहराजाद Thu, 05/12/2013 - 18:25

In reply to by चिंतातुर जंतू

तेंडुलकरांनी समलैंगिकतेविषयी अत्मचरित्रात्मक लिहिलेले माहित नव्हते. पुस्तकावे नाव किम्वा जालावर उपलब्ध असल्यास दुवा द्याल का?

चिंतातुर जंतू Thu, 05/12/2013 - 19:02

>> तेंडुलकरांनी समलैंगिकतेविषयी अत्मचरित्रात्मक लिहिलेले माहित नव्हते. पुस्तकावे नाव किम्वा जालावर उपलब्ध असल्यास दुवा द्याल का?

माफ करा तसं अभिप्रेत नव्हतं. तेंडुलकरांना (पडलेल्या पायंड्याप्रमाणे) आत्मचरित्रात्मक लिहायची गरज भासली नाही म्हणून ते अपवाद असं म्हणायचं होतं. 'मित्राची गोष्ट' हे त्यांचं नाटक एका समलिंगी स्त्रीभोवती केंद्रित आहे.

>> हा विषय बाहेर, इंग्लंडात तरी टॅबूच होता.
म्हणूनच मृत्यूपश्चात प्रकाशनाची वेळ आली.
मग आताच असं नक्की काय घडतय.
नक्की कधीपासून घडातय?

ती गोष्ट फॉर्स्टरच्या हयातीतली होती. इथे काळाचा महिमा जोरदार आहे. उदा. हे पाहा -
१८७९ - फॉर्स्टरचा जन्म
१८९५ - ऑस्कर वाइल्डचा खटला
१९०० - ऑस्कर वाइल्डचा मृत्यू (अवघ्या ४६व्या वर्षी)
१९६७ - ब्रिटनमध्ये समलिंगी संबंध कायदेशीर
१९७० - फॉर्स्टरचा मृत्यू

हे पाहून तुमच्या लक्षात येईल की ज्या पिढीत फॉर्स्टर जन्मला तिच्यावर 'आपलं असं होऊ शकतं' ह्या भयाचा पगडा जबरदस्त होता. पण त्याच्या हयातीतच ब्रिटनमध्ये वातावरण बदललं. १९६७नंतर एड्स येण्यापूर्वीचा काळ म्हणजे सर्व टॅबू गळून पडण्याचा होता. त्या तुलनेनं आपल्याकडे आजही खूप टॅबू आहेत, पण हळूहळू, म्हणजे भारतीय पद्धतीनं क्रांतीशिवाय ते टॅबू गळताहेत.