मला ऐसीअक्षरे का आवडते?

सुरुवातीला मी जेव्हा आंतरजाल वापरू लागलो (१९९६) तेव्हा सभ्य, सर्वसमावेशक तरिही नाविन्यपूर्ण अशी कोणती संकेतस्थळं आहेत ते शोधत असायचो. ज्या आंतरराष्ट्रीय इंग्रजी स्थळांवर मी वावरायचो तिथे माझ्या अस्तित्वाला काहीच अर्थ नव्हता. ३-४ वर्षाखाली मी चाचपत असताना मराठीब्लॉग्जडॉटनेट वर आलो, तिथे सर्व ब्लॉग्जचे अपडेट्स येत. काही ब्लॉग्ज उत्कृष्ट वाटले. मग त्यांवरून 'गप्पा मारायच्या संकेतस्थंळांची' माहिती मिळाली. मी तिथे रजिस्टर केले. मी फक्त वाचायचो, प्रतिसाद द्यायला थोडसं दडपण यायचं. जे म्हणायचं आहे ते लिहून उतरलं आहे असं व्हायचंच नाही. शिवाय भाषा, वेळ आणि टायपिंगची मारामार. आत्मविश्वासू ज्ञानी लोक कुठेही लगेच घुसू शकतात पण सामान्य मर्त्य लोकांना थोडा दम धरावा लागतो. (अजूनही नेमका संवाद साधायची कला जमलेली नाही, पण असो.)

अलिकडे युपीए -२ च्या कृपेने मला चक्क नेटवर आपला जम बसवायला प्रचंड वेळ मिळाला. माझ्या असे लक्षात आले कि मी ऐसीवर पडिक असतो. थोडे खोलात जाऊन पाहिल्यावर कळले की या जागेच्या आपण जाम प्रेमात आहोत. मग असं का आहे असा विचार केला. त्यातले काही मुद्दे.

१. ऐसीची साईट कधी बंद पडत नाही. मी इथे काही महिन्यांपासूनच लिहितोय, पण १-२ वर्षांत ते अभद्र जालीय पान (आम्ही आलोच, अजून क्ष तास, य मिनिटे, प सेकंद वाट पाहा) ऐसीवर कधी दिसले नाही.
२. ऐसी फार पटकन लोड होते. नेट स्लो असले तरी व्यवस्थित चालते.
३. ऐसी टिपिकल मराठी संकेतस्थळ नाही. (टिपिकल म्हणजे टिपिकल पुणेरी मुलगी गणपतीभक्त असतेच तसे.) हे मला आवडते.
४. ऐसीवर श्रेणी पद्धत आहे. मी लगेच माझे खाते- श्रेण्या इथे जाऊन आपला महत्त्वाचा संवाद कुठे चालला आहे ते पटकन उघडतो. मी तरी चांगल्या श्रेण्या मिळाल्या कि खूष होतो. प्रतिसाद द्यायला जाताना (छान, इ असा) मूळचे नविन प्रतिसाद (छान पोस्ट केल्यावर) नविन म्हणून दिसत नाहीत आणि त्यांचा ट्रॅक सुटतो. श्रेणी देऊन मानसिक समाधान मिळते, वाचनात खंड पडत नाही.
५. ऐसी अमेरिकन कंपनी आहे. त्यामुळे कुणी प्रति-भारतीय इ इ स्टँड घेतला तर त्याला उत्तर द्यायला डोक्याचे भजे होते. चालते व्हा म्हणता येत नाही.(असे उत्तर द्यावे लागल्याने बुद्धिमत्ता शीघ्र होते असा माझा समज आहे.)
६. ऐसीवर फार जास्त लोक नास्तीक, विज्ञानवादी, विवेकवादी, फेमिनिस्ट, रॅडिकल, इ इ आहेत. म्हणून मला विरोध करायला खूप मटेरियल मिळते. माझेही विचार त्याने बरेच लिबरल होऊ शकतात. चांगल्या सर्कलच्या टचमधे राहायचे असेल तर फार कमी पुण्याईवर स्वर्गप्रवेशाची सोय आहे.
७. ऐसीचे वातावरण ऐसीचे सर्वात मोठे धन आहे. जालावर व्यक्तिचा विरोध करू नये हे मी इथेच शिकलो आहे असे म्हटले तर वावगे ठरणार नाही. मी कितीही विपरित भूमिका घेतली तरी विरोधकांनी आपली बाजू इथे अतिशय संयमाने मांडली गेली आहे. 'फक्त भूमिकेला विरोध' (घासकडवींनी आणि अदितीने याचे पेटंट घ्यावे) इथे सुंदर रित्या केला जातो. याला एक दोन आयडी आणि इतर प्रत्येक आयडीची एखादी प्रतिक्रिया अपवाद असू शकते पण एकूण जालीय परिमाणाने तोलता ऐसी खूप सुरक्षित आणि सभ्य जागा आहे.
८. इथे शाळेत अभ्यास्पूर्ण असे धडे असायचे तसे लेखन करणारे कोल्हटकरांसारखे लोक आहेत. त्यांचे लेखन आणि प्रतिसाद फार हाय क्वालिटी असतात.
९. इथे कंपू आहेत कि नाहीत मला माहित नाही, पण आहेतच असे म्हणावे असे काहीही उघड दिसत नाही. कोणतेही लेखन, त्याच्यावरचे प्रतिसाद हे लॉजिकल असतात, केवळ एका माणसाला समर्थायचे वा झोडपायचे म्हणून लोक धरसोड निती बाळगत नाहीत. कंपू असले तरी वैचारिक आधारांवर आहेत. उदाहरणार्थ मी परंपरावादी कंपूत आहे. परंतु असे आहे म्हणून आधुनिक कंपूकडून माझ्यावर निष्कारण झोड उठवल्या जाण्याचा एकही प्रकार झाला नाही.
१०. इथले प्रतिसाद लांबलचक असतात. लिहिण्याचा कंटाळा असणारे आणि गुंडाळणारे लोक इथे टिकू शकत नाहीत.
११. ऐसीची डिझाईन सुंदर आहे, स्थिर आहे. रोज हजार बदल होत नाहीत.
१२. विषयांचे / लेखांचे वर्गीकरण उत्तम आहे.
१३. विषयाला अवांतर फाटे फुटले कि नवा धागा बनवला जातो.
१४. लेखाला आपण रेटिंग देऊ शकता.
१५. ऐसीचे मालक कोण आहेत त्याने आपल्याला काही फरक पडत नाही. ते खरोखरच एक आदर्श कॉर्पोरेट्चे शेअरहोल्डर आहेत. मी मालक आहे असे इ ऐकायला मिळत नाही. त्यांची अलिप्तता पण ऐसीची शोभा आहे.
१६. 'इथे आपल्या (मतांवर्)वर कडवट टिका होऊ शकते असे स्थळाच्या उद्दिष्टांत कुठेतरी लिहिले आहे. इथे मत मांडायला बर्‍यापैकी परिपक्वता लागते शिवाय डिफेन्सची कला पण लागते. इथल्या विरोधात आपण आपली मते प्रामाणिकपणे टिकवून ठेऊ शकलात तर त्यामागे आपण फार विचार केला आहे असा त्याचा अर्थ होती.
१७. दिनवैशिष्ट्य छान असते. ते बनवायला फार कष्ट गेले असणार.
१८. हे सर्व फुकट आहे.
१९. ऐसीचा फाँट/साईज छान आहे. रंग छान आहेत.
२०. संपादक मंडळी सक्रिय आहे.
२१. स्थळाचं आर्किटेक्चर छान आहे.
२२. धागालेखक खूप वेगवेगळे विषय कवर करतात.
२३. श्रवण, लेखन, वाचन, भोजन, इ सिरियला रुचिपूर्ण आहेत.

थोडक्यात तांत्रिक बाबी आणि इथे भेटणारी मंडळी या दोन्ही अंगांनी ऐसी मला सुखद, समृद्ध वाटतं. इथलं वातावरण (इथे दिलेली मुक्तता पाहता) दुषित कसं झालेलं नाही याचं मला बरेचदा कोडं पडतं. असो.

मंडळी मला इथे काय काय सुधारणा सुचवता येतील (ज्याने एखाद्या हाय फाय साईटीला देखिल लाज वाटेल) असा अजून एक धागा काढायचा आहे. पण तत्पूर्वी मला ऐसीवर आपल्याला सर्वात जास्त काय आवडते त्याचा रँकिंग पोल ठेवायचा आहे. तेव्हा आपल्याला इथे काय काय आवडते तेपण सांगा.

field_vote: 
3.8
Your rating: None Average: 3.8 (5 votes)

प्रतिक्रिया

अठराव्या क्रमाकांचा मुद्दा फारच महत्वाचा आहे. पण उलट बाजूने.
त्याच कारणामुळे मला ही जालिय स्थळे आवडत नाहित.
मला ह्यांच्या संस्थळांवर लिहिल्याबद्दल पैसे द्यायचे सोडून माझ्याकडून फुक्टात लिहून घेतात म्हणजे काय?
.
शिवाय इथल्या कित्येक मंडळींची बडबड मी ऐकून घेतो (पक्षी वाचून त्याला श्रेणी देत बसतो.) ह्याबद्दल खरंतर मानधन मिळायला हवं.
( संदर्भ :- खोगीरभरती "असे आहेत किती टकले? गिरगावात दोन तीन अन् दादरला चार")
इतके करुन मर्‍हाटी भाषेच्या सेवेसाठी आणि पब्लिकवर उपकार करण्यासाठी मी माझा अमूल्य का बहूमूल्य वेळ येथे येउन घालवणे सोडित नाही.
.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

--मनोबा
.
संगति जयाच्या खेळलो मी सदाहि | हाकेस तो आता ओ देत नाही
.
memories....often the marks people leave are scars

धन्यवाद.

ऐसीवर फार जास्त लोक नास्तीक, विज्ञानवादी, विवेकवादी, फेमिनिस्ट, रॅडिकल, इ इ आहेत. म्हणून मला विरोध करायला खूप मटेरियल मिळते.

हे तर भारीच.

लेखांच्या रेटिंगविषयी अजून थोडं. तारका देण्याची सोय देण्यामागचं उद्दिष्ट डबलबॅरल आहे. एक म्हणजे लेखकांना फीडबॅक मिळतो. दुसरं म्हणजे एखाद्या महिन्यातलं सर्वोत्तम लिखाण शोधण्याची सोय वाचकांना आर्काइव्हवर क्लिक करून सहज उपलब्ध होते. हे मूल्यांकन आदर्श नसलं तरी प्राथमिक फिल्टर म्हणून वापरता येतं.

प्रतिसाद द्यायला जाताना (छान, इ असा) मूळचे नविन प्रतिसाद (छान पोस्ट केल्यावर) नविन म्हणून दिसत नाहीत आणि त्यांचा ट्रॅक सुटतो. श्रेणी देऊन मानसिक समाधान मिळते, वाचनात खंड पडत नाही.

श्रेणीसुविधा देण्यामागे तंतोतंत हाच हेतू होता. खोडसाळ प्रतिसादांवर ते का खोडसाळ आहेत याची चर्चा होऊन भांडाभांड्याही कमी होतात. म्हणजे चांगल्या प्रतिसादकांना पॉझिटिव्ह फीडबॅक आणि वाईट प्रतिसादांना निगेटिव्ह फीडबॅक देण्यासाठीची ही सुविधा आहे. ती सर्वसाधारणपणे आपलं काम करते आहे हे दिसतं आहे.

आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे श्रेणी देण्याचे आणि मूल्यांकन करण्याचे अधिकार फक्त मॉडरेटर्सकडे नसून संस्थळावर सकारात्मकरीत्या सक्रिय असणाऱ्या मोठ्या समुहाला आहेत.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

ऐसीचे काही जबरदस्त प्लस पॉइंट्स

तांत्रिकः

क्रोममध्येही कधी गंडत नाही. आजवर दोनचारदा सोडल्यास क्रोममध्येही कधी गंडत नाही. लवकर लोड होते, सर्च सुविधा प्रभावी आहे. बंद पडलेले कधी पाहिले नाही.एकूण व्यवस्थापन अगदी उच्च दर्जाचे आहे.

काही मिसलेनिअस गोष्टी:

दिनविशेष अन सध्याचे चित्र इ.इ. प्रकार फार मस्त आहे. उदा. आजचेच दिनविशेष पहा, सौभद्रापासून विलियम टेलच्या सफरचन्दभेदनापर्यंत सर्व काळचे अन सर्व प्रकारचे इव्हेंट्स कव्हर होतात. त्यामागची मेहनत विशेष जाणवण्यासारखी आहे. चित्र, फटू, इ. सुद्धा फार रोचक प्रकार आहे. त्यात मला फार गती/रुची नसली तरी कधी कधी फार रोचक फटू दिसतात. मुख्य पान दिसायला खूप देखणे आहे.

मुख्य मजकुराची क्वालिटी:

अधिक काय बोलावे? बस नामही काफी है. अनिवाशांचा भरणा जास्त असल्याने देशी समूहापेक्षा काहीएक प्रकारचे वैविध्य जास्त जाणवते. लोकल सोबत ग्लोबल गोष्टींचा कव्हरेज त्यामुळे उत्तम घेतला जातो. विषयवैविध्य खूपच उत्तम आहे, मजा येते. 'सध्या काय केलंत' छाप धागे विशेष रोचक आहेत. छान वेळ जातो ते वाचण्यातही, विशेषतः वाचन अन खादाडी आणि मूजिकचे धागे वाचायला.

प्रतिसाद अन वाद विवादः

लै सदस्यांची 'प्रतिसादीय व्यक्तिमत्त्व' म्हणता येईल इतपत ओळख तयार झालेली आहे. कुणाकडून कशा प्रकारचे प्रतिसाद येतील हे आता सरावाने माहिती झालेले आहे. तरीही अर्ग्युमेंटे फेकण्यात इथले सदस्य लै वाकबगार आहेत. इथे कुणावरही हेत्वारोप करण्याचा हेतू नाही. त्या खणाखणीत बहुतेक वेळा मजा येते. कधी कधी येत नाही, पण बहुतेक वेळेस येते. नवनवीन माहिती तर मिळतच राहते. मिपाच्या तुलनेत इथले वाद जास्त रोचक वाटतात हे बाकी नमूद केलेच पाहिजे.

जण्रल वातावरण, संपादक, इ.:

चर्चेत शक्यतोवर कमरेखाली वार जात नाही हा एक मोठा प्लस पॉइंट आहे. अनकन्व्हेन्शनल सामाजिक मान्यतांसाठीचा संपादकीय टॉलरन्स उत्तम आहे. ट्रोलिंग कमी ठेवण्यात आजवर यश आलेले आहे ते असेच पुढेही मिळत राहो ही सदिच्छा. श्रेणी हा प्रकार त्यासाठी उत्तम आहे. हे इनोव्हेशन विशेष आवडले.

सदस्यः

वेगवेगळ्या क्षेत्रांतले सदस्य आहेत. ऐसीचे एक चांगले वैशिष्ट्य म्हणजे 'स्कॉल' लोकांचा भरणा अन दबदबा मोठा आहे, सबब जण्रल डिस्कशनसुद्धा खूप सेरेब्रल होते. कोट्यानुकोटी संदर्भांचा अमूर्त वापर करून मेम्स/मीम्स तयार कराव्यात तर ऐसीकरांनीच, असे म्हणण्यास अवश्यमेव जागा आहे. व्यनिद्वारे चर्चाही खूप मस्त होते. सदस्य एकेक लै जब्रा असल्याने त्यांच्याशी चर्चा करणे खूप सुखाचे असते.

अशाप्रकारे ऐसी मला खूप आवडते.

(दहापैकी दहा मार्क द्या आता.)

बाकी, हा धागा मौजमजेत का टाकलाय कोण जाणे.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

माहिष्मती साम्राज्यं अस्माकं अजेयं

वाघूळबाब्याला आपाकडून दहापैकी नऊ मार्क.
( एक मार्क बाइट हस्ताक्षरासाठी कापला. )

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

कळफलकी लिखाणासाठी 'बाइट हस्ताक्षर' ही संज्ञा आवडली आहे.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

बाइट हस्ताक्षर ROFL

शोक्रन एनीवे, आपा Wink

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

माहिष्मती साम्राज्यं अस्माकं अजेयं

मार्मिक धागा.
ऐसीवर फार जास्त लोक नास्तीक, विज्ञानवादी, विवेकवादी, फेमिनिस्ट, रॅडिकल, इ इ आहेत. >> +१
ऐसीचे एक चांगले वैशिष्ट्य म्हणजे 'स्कॉलर' लोकांचा भरणा अन दबदबा मोठा आहे, सबब जण्रल डिस्कशनसुद्धा खूप सेरेब्रल होते. >> +१.
मराठी आंजा वर मी गेल्या १ २ वर्षातच आलेय. त्याआधी मित्रमैत्रीणीत गप्पा मारताना फारच एलियन, आयसोलेटेड वाटायच. प्रत्यक्ष ओळखीतले लोक टिपीकल, घरेलु, साने गुर्जी, दवणीय वगैरे प्रकारातले आहेत (किँवा तसे दाखवतात). त्यामुळे माझे विचार ऐकुन ते फार स्कँडलाइज व्हायचे. इथे ऐसीवर माझ्या विचारांच्याही फार फार पुढे जाउन विचार केलेले आणि ते विचार तगड्या अर्ग्युमेँट करुन टिकवुन ठेवणारे लोक भेटले. त्यामुळे मला ऐसी फार्फार आवडते.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

ऐसीवर फार जास्त लोक नास्तीक, विज्ञानवादी, विवेकवादी, फेमिनिस्ट, रॅडिकल, इ इ आहेत. म्हणून मला विरोध करायला खूप मटेरियल मिळते. माझेही विचार त्याने बरेच लिबरल होऊ शकतात. चांगल्या सर्कलच्या टचमधे राहायचे असेल तर फार कमी पुण्याईवर स्वर्गप्रवेशाची सोय आहे.

लिबरल लोकांना दाखवलेल्या गाजराची दखल घेणेत आली आहे.

ऐसी अमेरिकन कंपनी आहे.

'फक्त भूमिकेला विरोध' (घासकडवींनी आणि अदितीने याचे पेटंट घ्यावे)

म्हणजे आम्ही भुमिकेला घेतलं तर हे पैसे लावणार का आता? च्यायला!!

याला एक दोन आयडी आणि इतर प्रत्येक आयडीची एखादी प्रतिक्रिया अपवाद असू शकते

आम्ही इथं असे खुल्या मैदानात असताना झाडामागूस असा छुपा बाण मारणं शोभतं का तुम्हाला?

परंतु असे आहे म्हणून आधुनिक कंपूकडून माझ्यावर निष्कारण झोड उठवल्या जाण्याचा एकही प्रकार झाला नाही.

आयला!! हे नजरेतुन सुटले व्हयं!!

विषयाला अवांतर फाटे फुटले कि नवा धागा बनवला जातो.

असं आहे होय! मला इतके दिवस वाटत होतं माझे प्रतिसाद अवांतर म्हणून डिलिट होऊन राह्यले का काय!!

ते खरोखरच एक आदर्श कॉर्पोरेट्चे शेअरहोल्डर आहेत.

म्हणजे आमच्या प्रतिसादांनी वाढलेल्या टीआरपींनी यांची खाती भरताहेत तर!

२३. श्रवण, लेखन, वाचन, भोजन...

हे सर्व फुकट आहे.

एक सेकंद वाटलं फुकटात भोजन वगैरे मिळतं काय इथे!! श्रवण फिवण मध्ये काय आपल्याला विंटरेष्ट नाय!!

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

-Nile

आयला!! हे नजरेतुन सुटले व्हयं!!

तेव्हढं कुठे नशीब आमचं? आमचा मराठी आंतरजालावर डेब्यू झाला तो मीमराठीवर ' न्यूटनच्या नियमाला नियम मानणे म्हणजे अंधश्रद्धा आहे' अशा काहीशा वादग्रस्त धाग्याने. तिथे तुम्ही आमचा पावनखिंडीतला बाजीप्रभू केलेला (शेवटी पडले). पण आमचे राजे आम्ही गडावर पोचवले होते हे ही आठवत असेलच.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

सही: पुरोगाम्यांना लॉजिक माफ असतं.

आपलं पोर सगळ्यांनाच क्यूट वाटतं त्यामुळे अरूणजोशींना +१ म्हणण्यात मतलब नाही. मला या संस्थळाबद्दल एक गोष्ट आवडते की इथे लोक डोक्याला (चांगल्या अर्थाने) त्रास देतात; विचार करायला उद्युक्त असं वातावरण लोकांमुळे आहे. तांत्रिक बाबतीत मला काही अडलं असेल तर "मला येत नाही, कोणीतरी मदत करा" असं खुश्शाल जाहीररित्या लिहीता येतं. त्यावर मदत करायला जमलं नाही तरी लोकं गैरसोय खपवून घेतात.

तुमचा कंपू नाही हे वाचून दु:ख झालं. शिवाय हे अजोशी लोकं फार माजले आहेत; त्यांच्या विरोधात आपण अ. जोशी लोकांनी स्वतंत्र कंपूच सुरू केला पाहिजे.

मुद्दा क्र. ५ चा कार्यकारणभाव फार पटलेला नाही. मालक-व्यवस्थापक लोक कुठेही रहात असले आणि संस्थळ कुठेही रजिस्टर्ड असेल तरीही सगळ्यांचं अभिव्यक्तीस्वातंत्र्य जपलं जावं असाच प्रयत्न राहिल.

मला इथे काय काय सुधारणा सुचवता येतील (ज्याने एखाद्या हाय फाय साईटीला देखिल लाज वाटेल) असा अजून एक धागा काढायचा आहे.

याची मात्र जरूर वाट पहाते आहे.
अधूनमधून सेवादाता गंडतो आणि संस्थळ रांगायला लागतं ते फार तापदायक वाटतं. वर सेवादात्याला फोन करून आरडाओरडा करायला जावं तर "बग आहे हे माहित्ये, थोडी कळ काढा. काही तासांत सगळं व्यवस्थित चालेल", असं प्रेमाने सांगतात. मग फार काही करताही येत नाही.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

---

सांगोवांगीच्या गोष्टी म्हणजे विदा नव्हे.

मुद्दा क्र. ५ चा कार्यकारणभाव फार पटलेला नाही.

काश्मिर पाकला द्या असे कोणी म्हणाला तर इथे त्याला केवळ असे म्हणाला म्हणून हाकलता येत नाही. ही साईट भारत आणि पाक मध्ये न्यूट्रल बाजू घेते असा अनुभव आहे.

पाकचं उदाहरण थोडं अति आहे पण अमेरिका, कॅनडा, इ यांच्याशी भारतापेक्षा जास्त प्रेम आणि निष्ठा जास्त दाखवणारांना ते केवळ असं करतात म्हणून ऐसीवर धारेवर धरता येत नाही जे मला आवडलं असतं. इथे सयुक्तिकपणे भारतात काय बरं आहे ते शोधून सांगावं लागतं.

शेजार्‍याच्या मुलाशी झालेल्या भांडणात (लहानपणी) वडीलांनी आमची तक्रार ऐकावी/बाजू घ्यावी (कारण ते आमचे वडिल) अशी इच्छा असताना ते जर न्यायाधीश टाईप भूमिका घेऊ लागले तर एक दूरावा निर्माण व्हायचा. देजा वू.

थोडक्यात राष्ट्रीय वातावरणात मला कम्फर्ट वाटतो तो इथे नाही, पण लोक रिजनेबल आहेत म्हणून आम्ही आमचे राष्ट्रीयत्व टिच्चून सांगू शकतो आणि तसे करण्याचे आमचे कौशल्य दिवसेंदिवस वाढत जाते.

बाकी तुमच्या प्रतिसादाच्या भाषेवरून आपण इथल्या मालकिणबाई आहात (असे आज प्रथमच ) वाटले.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

सही: पुरोगाम्यांना लॉजिक माफ असतं.

बाकी तुमच्या प्रतिसादाच्या भाषेवरून आपण इथल्या मालकिणबाई आहात (असे आज प्रथमच ) वाटले.

अरे देवा! हे का भलतंच करून बसलात अरुणजोशी तुम्ही? अदितीबाईंना या शब्दाचा किती तिटकारा आहे हे ठाऊक नाही का तुम्हाला?

आता भोगा आपल्या कर्माची फळं!

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

आपलं पोर सगळ्यांनाच क्यूट वाटतं त्यामुळे अरूणजोशींना +१ म्हणण्यात मतलब नाही.

या वाक्याचा प्रथम आणि केवळ अर्थ मी आपला पोर आहे असा निघतोय. त्यापुढचं दुसरं वाक्य वाचून अजूनच. तुम्ही संस्थळाला बाळ मानता हे ठीकंय, पण वाक्य सवतं वापरा ना!

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

सही: पुरोगाम्यांना लॉजिक माफ असतं.

असा धागा ऐसीवर यायला तब्बल दोन वर्ष लागली! छ्या! पॉप्युलॅरिटी कमीये म्हणायची Wink
आता सुधारणांचा धागा आल्यावर काय लिहायचं ते प्रतिसाद अनेकांनी केव्हाच लिहून ठेवल्याचं कानावर आल्याचं अदितीला चिंजं सांगत असल्याचं बॅट्याच्या कानावर पडलं असं मुक्तसुनीत मला सांगितल्याची बातमी राजेशने फोडली आहे ती अफवा आहे असे वाटते. Wink

ऑन अ सिरीयस नोटः विविध गोष्टींची सगळे दखल घेताहेत, त्या गोष्टी (इतरांनाही) आवडताहेत हे बघुन (खरंतर उगाच) बरे वाटले. Smile

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

- ऋ
-------
लव्ह अ‍ॅड लेट लव्ह!

'फक्त भूमिकेला विरोध' (घासकडवींनी आणि अदितीने याचे पेटंट घ्यावे)
विक्षिप्त बैंबद्दल मला नाही तसं वाटत. बॅटमन काय विक्षिप्त बै काय ह्यांची सध्या जोरदार वादावादी सुरु असते. असायला हरकत नाही; पण खूपदा त्या दोघांच्याही प्रतिसाद "इतरत्र लिबरल भूमिका घेणार्‍यांनी...." किंवा "इतरत्र सहिष्णू धर्माचे कवतिक करणार्‍यांनी...." अशा "टोन" मधले दिसायला लागलेत.
ह्यामुळे चर्चा तेवढ्या धाग्यापुरतीच न राहता भलतीकडेच जाउ पाहते. एकूणात मग स्कोर सेटलिंग होण्याचा धोका असतो. किंवा स्वतःचे म्हणणे मांडण्यावर भर राहता समोरच्याला चूक दाखवण्याची स्पर्धा दिसते. "त्या दिवशी तू तमुक प्रतिसाद दिल्तास" वगैरे छापाचे ते असतात.
अरे दिला तर दिला. इथे काय त्याचे?
आणि "धागे" ह्या गप्पा न राहता समोरच्याला बोचकारण्याचा प्रयत्न सुरु होतो; स्वतःच्याही नकळत.
समजा "भारतात शेजारच्या देशाने सुरु केलेल्या हिंस्र कारवाया" हा चर्चा विषय असेल ; आणि चर्चा टू द पॉइण्ट असेल तर बरे. त्यात एखाद्याला "...पण तू तर त्या अमक्या धाग्यावर देश अस्तित्वात असू नये असे म्हणालास, एरव्ही विश्वबंधुत्व वगैरेही म्हणतोस. आता इथे काय देशाचा पुळका आला." वगैरे प्रकराने फाल्तू ब्याशिंग, नॉनकन्स्ट्रक्टिव्ह डिस्ट्रक्शन होते.
थर्ड पर्सन म्हणून पाहताना ह्या गोष्टी फारच खटकतात.
अर्थात दोघेही इथले हेवीवेट सदस्य असल्याने माझं म्हणणं तत्काळ इथेच खोडून निघण्याची दाट शक्यता आहे.
थर्ड पर्सन म्हणून सांगितलेल्या गोष्टींचा त्यांनी विचार केला तर बरं राहिल असं वाटतं.
वादावादीच्या* क्षमतेत मी त्यांच्या जवळपासही पोचत नसल्याने मला हरवून फार साध्य होइलसे नाही.
.
मी दोघांच्या लिखाणाचा आणि प्रतिसादांचा पंखा आहे वगैरे वगैरे सत्य आहेच. पण ते वरती न लिहिण्याचं कारण हेच की त्यांच्या खटकणार्‍या गोष्टींबद्दल आख्खा प्रतिसाद लिहून दोघांचा रोष ओढवून घेण्यापेक्षा त्यातल्या त्यात त्यांना एक शर्करावगुंठित पॅसिफायर गोळी द्यायची(कौतुकयुक्त वाक्यांची पेरणी करुन) असा उद्देश त्यात दिसू शकतो. मग "मला त्यांचे प्रतिसाद वाचणं खरच आवडतं" ह्यातला प्रामाणिकपणा जाउन हितसंबंध सांभाळण्याचा प्रयत्न दिसतो. त्यामुळे मी ते इथे लिहिले नाही. (किंवा नाही नाही म्हणत लिहिलेच!)
.
मला उलट न वी बाजूंची ष्टाइल आवडते. ते हात धुवून प्रतिसाद फोडून काढतात. त्यांच्या शैलीत खवचट टोला हाणतात. किम्वा आख्ख्या लेखाची, प्रतिसादाची चिरफाड करतात(कट्त्यावरच्या भाषेत सांगायचे तर लेखाची MBA करतात.).(मी त्यांच्या हिट्लिस्टवर अगदि टॉपवर होतो परवापरवापर्यंत. ) पण ते फारच मार्मिक आणि भन्नाट असते. त्या लिखणापुरते, आणि त्या प्रतिसादाइतकेच असते. ते पुनः पुनः "तमक्या दिवशी अमक्याला तू हा प्रतिसाद दिलास" वगैरे म्हणत मागे पडत नाहित. त्यांच्याकडे समोरच्याला गारद करायला इतर पुरेशी शस्त्रं आहेत; त्यातून ही उदारता आली असावी.
.
*हो. "वाद विवादाच्या क्षमतेत" हे फारच छापील वाटतं. त्यापेक्षा "वादावादी" हाच्च शब्द बोलण्यास, भावना पोचवण्यास सोपासुटसुतित वाटतो. जसं की "वाटते" शब्दाऐवजी "वाटतं" हा शब्द अस्स्ल, जिवंत असल्याचं "वाटतं".

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

--मनोबा
.
संगति जयाच्या खेळलो मी सदाहि | हाकेस तो आता ओ देत नाही
.
memories....often the marks people leave are scars

आख्ख्या प्रतिसादाला +१

बाकी मूळ लेख आवडला. इथे भारी भारी गोष्टी असतातच, शिवाय कचरा बराच कमी असतो त्यामुळे वाचताना फार गाळागाळी करावी लागत नाही हे ही आवडण्याचे कारण आहे. Smile

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

तंतोतंत.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

-मेघना भुस्कुटे
***********
तुन्द हैं शोले, सुर्ख है आहन

विक्षिप्त बैंबद्दल मला नाही तसं वाटत. बॅटमन काय विक्षिप्त बै काय ह्यांची सध्या जोरदार वादावादी सुरु असते. असायला हरकत नाही ....

मी माझा अनुभव सांगतो. अमर्त्य सेन आणि मोदी यांच्या चर्चेत सेनांवर टिका करत असताना मोदीसमर्थक किंवा सेनविरोधी म्हणून माझी एक (निगेटीव) प्रतिमा बनवून माझ्या व्यक्तित्वावर त्यांनी काही भाष्य केलं नाही. फक्त त्यांचे सेनप्रेम व्यक्त केले. प्रदीर्घ चर्चेत विषय नेहमी 'मोदी-सेन' राहिला, 'अरुण - अदिती' झाला नाही.

पुरुष या धाग्यावर आणि इतरत्र बर्‍याच ठिकाणी बॅटमॅन आणि अदिती यांची सरळसरळ युद्धे चालली असताना सुद्धा मी इथे अदिती यांचे नाव मुद्दाम लिहिले आहे. त्यांचा इथे उल्लेख न झाला तर त्या विपरित स्वभावाच्या आहेत असा अर्थ काढला जाईल म्हणून मुद्दाम.

टोकाचा मुद्दा मांडणं, त्यात ज्ञान सांगणं, शिवाय विनोद्/खट्याळपणा घालून रुची निर्माण करणं असा प्रयत्न त्या करत असतात. पण मुद्दाच इतका क्लिष्ट असतो कि दोन्ही पक्ष आपापल्या भूमिकांवर अडून राहतात. 'आपल्या विपरित विचार असणार्‍यांची व्यक्तित्वं चांगली (शब्द चुकला वाटतं) नसतात' असा विचार एका पातळीनंतर बळावतो. इस हिसाब से अदितीजी कि पूरी दूनिया से दुश्मनी होनी चाहिए थी, इतके त्यांचे विचार रॅडिकल (अंतःकरणातून सांगायचं झालं तर अनपटेबल हा शब्द वापरला असता) आहेत. पण अशी दुश्मनी नाहीए.

बॅटमॅनला गध्धेपंचविशीत असल्याने कोणता विरोध त्याला आणि कोणता त्याच्या विधानाला यात गल्लत होत असावी.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

सही: पुरोगाम्यांना लॉजिक माफ असतं.

आम्ही गद्धेपंचविशीपासून (टु द राईट साईड) तीनशेपासष्ट दिवसांनी दूर आहोत.

बाकी, गद्धेपंचविशी हा शब्द पुरुषद्वेष्टा आहे असे आमचे मत झाले आहे. गाढवीणपंचविशी किंवा म्हैसषोडशी असा शब्द येईपर्यंत हा अन्याय दूर होणार नाही.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

माहिष्मती साम्राज्यं अस्माकं अजेयं

गाढवीणपंचविशी किंवा म्हैसषोडशी असा शब्द येईपर्यंत हा अन्याय दूर होणार नाही.

आज पुरुषदिनानिमित्त तर्कतीर्थ हा मुद्दा उचलून धरतील काय?

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

पुरुषदिन आज आहे? आम्हाला तरी सर्वच दिन आपले वाटतात.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

माहिष्मती साम्राज्यं अस्माकं अजेयं

गाढवीणपंचविशी किंवा म्हैसषोडशी

- दोन्ही , विशेषतः दुसरा अतिशय लाइकवण्यात आल्या आहे.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

-सविता
----------------------------
|| स्वतः मेल्याशिवाय स्वर्ग दिसत नाही ||

मी माझा अनुभव सांगतो. अमर्त्य सेन आणि मोदी यांच्या चर्चेत सेनांवर टिका करत असताना मोदीसमर्थक किंवा सेनविरोधी म्हणून माझी एक (निगेटीव) प्रतिमा बनवून माझ्या व्यक्तित्वावर त्यांनी काही भाष्य केलं नाही. फक्त त्यांचे सेनप्रेम व्यक्त केले. प्रदीर्घ चर्चेत विषय नेहमी 'मोदी-सेन' राहिला, 'अरुण - अदिती' झाला नाही.

आता तुम्हाला एकटालाच पेश्शल ट्रीटमेण्ट का मिळाली ते उघडच आहे. त्या अ. जो. आणि तुम्हीही अ. जो.
जोजोकाकूंनी वर स्पष्टच म्हटले आहे,

अजोशी लोकं फार माजले आहेत; त्यांच्या विरोधात आपण अ. जोशी लोकांनी स्वतंत्र कंपूच सुरू केला पाहिजे

एक अ. जो. दुसर्‍या अ. जो. च्या हजामतीसाठी पेश्शल वस्तरा वापरतात म्हणतात!
( एक न्हावी दुसर्या न्हाव्याच्या हजामतीचे पैसे घेत नाही म्हणतात- पु. ल. )

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

बॅटमॅनला गध्धेपंचविशीत असल्याने कोणता विरोध त्याला आणि कोणता त्याच्या विधानाला यात गल्लत होत असावी.

माझ्यात आणि ब्याट्यामध्ये वयाचे फारसे अंतर नाही.(तो वगळता मला इतरांना अरे-तुरे करता येत नाही; अगदि ते सदस्य स्वतः तसाच उल्लेख कर म्हटले, तरी जिभेला वळणच " तुम्ही/तुमचे" असेच पडले आहे.)
अरुण जोशालाही मी तसा यंग ब्रिगेडला मधलाच समजत होतो.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

--मनोबा
.
संगति जयाच्या खेळलो मी सदाहि | हाकेस तो आता ओ देत नाही
.
memories....often the marks people leave are scars

मला ऐसीअक्षरे का आवडते?
माझ्या हपिसातून साली ही एकच साइट ईक्सेस होते. दुर्दैव ह्या सायटीचे.
आवडते का काय ठाउक नै, झक्क मारुन हीच वापरावी लागते कंडशमनार्थ.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

--मनोबा
.
संगति जयाच्या खेळलो मी सदाहि | हाकेस तो आता ओ देत नाही
.
memories....often the marks people leave are scars

आवडते का काय ठाउक नै, झक्क मारुन हीच वापरावी लागते कंडशमनार्थ.

अरेरे, असली काही सोय (?) असावी याची आम्हाला कल्पना देखिल नाही. (आम्ही तो (केवळ लाभर्थ्यांसाठी, स्वतःसाठी नव्हे)२२-२३ वा मुद्दा म्हणून लिहिला असता.)

कि तुम्हाला कंडू म्हणायचे होते?

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

सही: पुरोगाम्यांना लॉजिक माफ असतं.

कंडू आणि कंड एकच. संस्कृत कंडूचा मराठी कंड झाला.

बाकी, मणिकंडन नावाशी या कंडचा संबंध नाही याची नोंद घेणे.

(आयला मग तर ते लैच अश्लील नाव होईल. असो.)

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

माहिष्मती साम्राज्यं अस्माकं अजेयं

का आवडतं?
१. जुन्या (जालीय) ओळखीची, वाद अंगावर न घेता फक्त भूमिकेच्या शिंगावर घेऊन टोलवतील अशी, मित्र म्हणता येतील अशी, अनेक निरनिराळ्या गोष्टींतली बरीच अक्कल असणारी, बरीचशी मंडळी इथे असतात.
२. 'उपक्रमा'वरची चश्मिष्ट, कीसकाढू, 'नियमावर बोट' चर्चा आणि 'मिपा'वरचा ताळतंत्रविरहित धिंगाणा हे दोन्ही कधीकधी अतिरेकामुळे नको होतं. इथे त्या दोहोंच्या बरोबर मधलं वातावरण असतं. ते मानवतं.
३. श्रेणीव्यवस्था आवडते. वर अनेकांनी कारणं नमूद केली आहेतच.
४. दोष दाखवला, तर 'गेलात उडत' असं न म्हणता 'आयला, हो की! चला, आता सगळे मिळून निस्तरू या' असं म्हणतात. हे दिवाळी अंकाच्या वेळी प्रकर्षानं अनुभवलं.
५. चित्रकला, प्रमाणलेखन, भाषा आणि लिपी, राजकारण, अर्थकारण, समीक्षा.. अशा इतर ठिकाणी सापडत नाहीत अशा आणि मला वाचण्यात उत्सुकता असते अशा विषयांवर अधिकारवाणीनं भरपूर लिहिणारे लोक आहेत.
६. संपादक फक्त गमज्या करत न फिरता खरोखर धाग्यांची वर्गवारी करणं, भूमिका स्पष्ट करणं अशा उपयुक्त गोष्टी करताना दिसतात.
७. हापिसातून 'ऐसी' कायम उघडतं.

काय हवं?
१. तेवढं ते खरडवहीच्या नोटिफिकेशनचं पाहा ब्वॉ. फारच गैरसोय होते.
२. यंदाच्या दिवाळी अंकाचा दर्जा लईच भारी होता. पण जालावरच्या दिवाळी अंकांचं आयुष्यमान फार नसतं, असं दिसतं. एक मायबोलीचा सणसणीत अपवाद वगळता. (नि हे सातत्य माबोच्या इतरही बर्‍याच उपक्रमांमधे आहे. बाकी सोडा.) ते सातत्य राखता येणं खरं आव्हानात्मक आहे. तेवढं जमवा.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

-मेघना भुस्कुटे
***********
तुन्द हैं शोले, सुर्ख है आहन

हा (म्हणजे अशा विषयावरचा)धागा इथे (म्हणजे ऐसी अक्षरे या संकेतस्थळावर) कसा काय निघाला बुवा? - असा प्रश्न पडला. Wink

असे धागे निघाले की संकेतस्थळ (तांत्रिक आणि गुणात्मकदृष्ट्या)अधोगतीला जाऊ लागते असा एक (निराशावादी) अनुभव आहे. Sad
शुभ बोल रे नार्‍या.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

प्रत्येक अनुभवाला अपवाद असतात.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

सही: पुरोगाम्यांना लॉजिक माफ असतं.

स्तुत्य उत्तर. Smile

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

एक पॅकेट ऐसीअक्षरे घ्या. ते उघडा. त्यात असलेले कार्ड भरा.. आणि शेवटी "मला ऐसीअक्षरे आवडते कारण".. याचे फक्त दहा शब्दात चटपटीत उत्तर लिहून पोस्ट बॉक्स क्रमांक १०१, .. या पत्त्यावर पाठवा.. सर्वोत्तम घोषवाक्य जिंकेल सिंगापूरची सहल*

.. एकाहून अधिक भाग्यवान विजेते असल्यास लकी ड्रॉने विजेता घोषित केला जाईल.. आयोजकांचा निर्णय बंधनकारक असेल. ऐसीअक्षरे व्यवस्थापन किंवा त्यांचे नातेवाईक यांना या स्पर्धेत भाग घेता येणार नाही.

*Contains no bheja no dimaag. Conditions apply.

अशी आकर्षक स्पर्धा आहे काय असे वाटून धागा उघडला.. Smile

छान आहे.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

काय छान आहे?
ऐसी अक्षरे, धागा, दोन्ही का तिसरेच काही? Wink

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

- ऋ
-------
लव्ह अ‍ॅड लेट लव्ह!

१. मठ्ठ संपादकांचा अभाव
२. आल्बमछाप प्रवासवर्णने, स्वस्त विडंबने, भांड्यांचे प्रदर्शन करणार्‍या पाककृती वगैरेंचे क्वचितपण
३. भूतकाळकुरवाळूउपदेशपरआजोबाछाप लेखन नसणे

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

या मुद्द्यांशी कंप्लीट सहमत.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

संस्थळ दिसायला, वापरायला छान आहे (लेखातील १७ ते २३ नंबरचे मुद्दे) आणि सहसा वाचताना काहितरी नवीन कळते म्हणून आवडते.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

२४. ऐसीवर काही विशिष्ट काळ प्रतिसाद संपादित/एडिट करता येतात. त्यामुळे चुकलेल्या वाक्यरचना, इ पून्हा नीट करून प्रकाशित करता येतात.
२५. लेख देखिल असेच संपादित करता येतात.
२६. ऐसीचा एडिटर बॉक्स (लिहायची जागा) वापरायला सोपी आहे. त्यावरचा टूलबार सोपा, सुलभ आहे.
२७. मी काहीही लिहो, (जगात कुणाला कळो न कळो), घासकडवींना ते बरोबर कळते, अगदी गर्भितार्थासहित! भाषेच्या (दौर्बल्याच्या) धाग्यात त्यांच्यामुळेच आमचे लज्जारक्षण झाले. इथे पण माझा नविन प्रतिसाद व श्रेणी यांच्यावरचा मुद्दा (क्र. ४) पाहा, त्याचे व्याकरण चूक आहे, रचना चूक आहे आणि दरवेळी वाचला तर वेगळाच अर्थ निघतो. सगळ्यांनी तो व्यवस्थित दुर्लक्षिलेला देखिल आहे. पण घासकडवींनी अगदी मला अभिप्रेत असलेलाच अर्थ काढला, शिवाय त्यांच्या प्रतिसादात ते वाक्य कोट केले, ज्याची मला अपेक्षाच नव्हती. पुरोगामीत्वाचा शोध आणि स्वत्वाचा शोध बद्दलही तेच!
२८. हजर दाखवलेले सभासद खरोखरच हजर असतात.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

सही: पुरोगाम्यांना लॉजिक माफ असतं.

>>२४. ऐसीवर काही विशिष्ट काळ प्रतिसाद संपादित/एडिट करता येतात. त्यामुळे चुकलेल्या वाक्यरचना, इ पून्हा नीट करून प्रकाशित करता येतात.

हे "विशिष्ट काला"धारित नसून जोवर प्रतिसादाला प्रतिसाद येत नाही तोवर (सर्व ड्रूपल संस्थळांवर) प्रतिसाद एडिट करता येतो. मिसळपाववर काहीतरी झोल झाल्यामुळे तसे होत नाही. आता मी तुमच्या प्रतिसादाला प्रतिसाद दिला आहे त्यामुळे आता तुम्हाला तो एडिट करता येणार नाही.

>>२५. लेख देखिल असेच संपादित करता येतात.

हा विविध संस्थळावरील मोठा वादाचा मुद्दा आहे. आणि ते संस्थळ मालकांच्या व्यक्तिगत मतानुसार होते. मिसळपाववर* ही सोय फ्लक्चुएटिंग असते.

*अरुणजोशी हे मिसळपाववर आहेत म्हणून मिसळपावचे नाव लिहिले.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

--------------------------------------------
ऐसीव‌रील‌ ग‌म‌भ‌न‌ इत‌रांपेक्षा वेग‌ळे आहे.
प्रमाणित करण्यात येते की हा आयडी एमसीपी आहे.

मायबोली व मिसळपाववर मी सर्वात आधी नोंदणी केली होती. देवनागरी आयडी घेणं म्हणजे मला लै अवघड प्रकार वाटला होता. (वेगवेगळ्या ठिकाणी वेगवेगळ्या चाव्या दाबून तोच शब्द टंकला जात असेल तर आयडी बडवलेल्या चाव्या कि दिसणारा शब्द? उदा. गुगलवर a r u n space ह्या चाव्या. इतरत्र कुठे a r u shift n ह्या चाव्या. अजून कुठे भलत्याच ! मग माझा आयडी नक्की काय? म्हणून आयडी इंग्रजीच ठेवला.त्या घोळात माझे मायबोलीचे सदस्यत्व गेले असाही माझा समज झाला होता. (त्यांची सदस्यत्व द्यायची पद्धत अजूनही गावली नाही. तोच आयडी आणि खूणशब्द टंकूनही ते आम्ही या बाबाला ओळखत नाही म्हणतात.) नंतर मीमराठीवर सगळे मावळे हुरुपाने मराठी आयडी वापरताना पाहून, मराठी ईंग्रजी स्विचिंग सुलभ आहे हे पाहून देवनागरी आयडी घेतला.

*अरुणजोशी हे मिसळपाववर आहेत म्हणून मिसळपावचे नाव लिहिले.

मी मराठी सायटींचा लई जुना सदस्य आहे. मिपावर मी किमान ३-३.५ वर्षांपासून आहे. मीमराठीवर देखिल. मायबोलीवर त्यापूर्वी. आणि ब्लॉगांवर माझे फार फार जुने प्रतिसाद मिळू शकतील. बहुतेक ही सगळी लेकरे जन्मल्या जन्मल्या गोंजारली होती. पण महिन्यातून एक धागा वाचणे इतकाच सहभाग असायचा.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

सही: पुरोगाम्यांना लॉजिक माफ असतं.

खरडी आल्याचे कळण्याची सोय नसून सुद्धा जन्ता इथे खरडसंवाद कसा करते ते एक कोडे आहे. म्हणजे खरडवहीत सारखे डोकावून पाहणे हा एक कंटाळवाणा प्रकार आहे.

खरडीचे ईमेल नोटिफिकेशन हा एक मार्ग असावा.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

--------------------------------------------
ऐसीव‌रील‌ ग‌म‌भ‌न‌ इत‌रांपेक्षा वेग‌ळे आहे.
प्रमाणित करण्यात येते की हा आयडी एमसीपी आहे.

शारिरिक सौष्ठवासाठी जसे 'जिम' आवश्यक तसे बौद्धिक सौष्ठवासाठी 'ऐसी' आवश्यक. त्यानंतर मात्र श्रमपरिहारासाठी, आम्ही जीवनावरच्या मोहित कथा वाचण्यासाठी इतरत्र जातो.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

जुना प्रतिसाद उडाला, की मी प्रकाशित नीट केला नव्हता?
असो. काही जुन्या सदस्यांची आठवण होते इथल्या ह्या "तुझ्या गळा माझ्या गळा " स्टाइल धागे पाहिले की.
सर्किट, प्रियाली, आजानुकर्ण, कोलबेर्,यनावाला,गुंडोपंत हे आणि असेच अनेक जण पूर्वी उपक्रम , मिसळपाववर दिसत.
त्यांचे लेखन्-प्रतिसाद प्रचंड आवडे. अगदि ठणठणपाळ व गांधीवादी ह्या ट्रोलसदृश आयड्यांचेही काही लिखाण आवडे.
चंद्रशेखर पूर्वी लिहित त्यापेक्षा आता त्यांचीही धाग्यांची अन् प्रतिसादांची संख्या कमी झालेली दिसते.
हल्ली ह्यातली मंडळी एकदम गायबलित.सर्किट, आजानुकर्ण ह्याचे मागील एक वर्षात एक्-दोन प्रतिसाद ऐसीवर दिसले; बस्स.
त्याहून अधिक काही नाही.
ही मंडळी लिहित तेव्हा मी बव्हंशी वाचनमात्र असे; त्यामुळे वैयक्तिक परिचय असा कुणाशी फार झालाच नाही.
ह्या मंडळींना पुन्हा लिहितं करुन सध्याच्या हिट्ट आयड्यांशी त्यांची जुगलबंदी झाली, तर लै बहार येइल.
अर्थात, ह्याही जर्-तर च्या गोष्टी झाल्या.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

--मनोबा
.
संगति जयाच्या खेळलो मी सदाहि | हाकेस तो आता ओ देत नाही
.
memories....often the marks people leave are scars

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

- ऋ
-------
लव्ह अ‍ॅड लेट लव्ह!

धाग्यांचा घोळ झाला माझा.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

--मनोबा
.
संगति जयाच्या खेळलो मी सदाहि | हाकेस तो आता ओ देत नाही
.
memories....often the marks people leave are scars

मला एक क्म्प्लेण्ट करायच्ये.
इकडे कसा टॉलरंस आहे आणि लिबरलपणा आहे असं सगळे म्हणतात.
पण इकडे प्राण्यांब्द्दल टॉलरंस नाही.
आता वर बघा की गाढवीणी आणि म्हशींबद्दल कसं बोल्तायत ते.
आणि दिवाळी अंकात एकच कार्टून आहे तर तेपण बैलांबद्दल.
मला वाट्लं जोशांची साइट म्हणजे शाकाहारी असेल, पण...
बाकी ठीकय.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

मी एक काळा मठ्ठ बैल. मला अंधार आवडतो. तेव्हा फार उजेड पाडू नका.

सहिष्णूता आणि उदारमतवादाला आपण (आणि आडकित्ता) अपवाद आहात. त्यामुळे तुम्हाला असली तक्रार करायचा नैतिक अधिकार नाही.
शिवाय -
१. माणूस हा ही प्राणी आहे.
२. मनुष्येतर प्राण्यांचा केवळ उल्लेख इथे होतो. त्याचा अपशब्द आला म्हणून आपण कांगावा करता. गाढवीण २५ वर्शांची होणे, म्हैस १६ ची होणे असे म्हटले तर कोणते दूषण ठेवले त्यांना? याच ब्रह्मांडात आहेत म्हणजे उल्लेख तर येणारच ना.
३. आणि काय शाकाहार शाकाहार? मनुष्यएतर प्राण्यांनी किती मनुष्य मारले त्याचा एक्तरी खटला उभा राहिला आहे का?

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

सही: पुरोगाम्यांना लॉजिक माफ असतं.

'ऐसी अक्षरे रसिके लोळविन' हे ब्रीद वाक्य असल्याने मला आवडते.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

प्रकाश घाटपांडे
http://faljyotishachikitsa.blogspot.in/

अजून एक कारण राहिले- ऐसीवर सदस्याच्या पगाराची चौकशी केली जात नाही.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

माहिष्मती साम्राज्यं अस्माकं अजेयं

इतरत्र कुठे केली जाते का?

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

--मनोबा
.
संगति जयाच्या खेळलो मी सदाहि | हाकेस तो आता ओ देत नाही
.
memories....often the marks people leave are scars

कितपत 'केली जाते' हे माहिती नाही पण केली गेल्याचे किमान एक उदाहरण अगदी ताजे आहे. एका सदस्याला 'तुझं वय किती, पगार किती अन बोलतोस किती' हे प्रश्न सरळ विचारण्यात आले होते आणि विचारणारा निर्लज्जपणे खिदळत होता. एरवी आध्यात्मिक काढे पाजणार्‍या लोकांचा मुखौटा अशावेळेस अगदी उघडा पडतो.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

माहिष्मती साम्राज्यं अस्माकं अजेयं

अवघड आहे.
'तुझा पगार किती अन बोलतोस किती' ही पूर्वी एका सदस्याची स्वाक्षरी होती. पण एकुणात ती मिश्किल आणि स्वगतार्थी, निव्वळ एक स्वगत म्हणून आहे; अशीच मान्यत आहोती इतर सदस्यांत.
.
.
बाकी कुणी असं सिरियसली विचारलं तर सरळ हरामखोराला "तुझे बाप किती? तू बोलतोस किती" हे म्हणण्यास लाजू नये.
.
.
तुम्ही इतरांच्या सोग्याला हात घातलेला नसताना कुनी तुमच्या धोतराला हात घालू नये हा सामान्य संकेत आहे.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

--मनोबा
.
संगति जयाच्या खेळलो मी सदाहि | हाकेस तो आता ओ देत नाही
.
memories....often the marks people leave are scars

सगळे काही होऊन यथास्थित साफसफाईही झालेली आहे, असो.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

माहिष्मती साम्राज्यं अस्माकं अजेयं

बॅटमॅन, संकेस्थळावरच्या सदस्याने असे केले असणार. त्याचा दोष स्थळाला* देऊन कसे चालणार?

* स्थळ हा शब्द दुसर्‍या अर्थाने असेल तर तो प्रश्न योग्यच आहे.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

सही: पुरोगाम्यांना लॉजिक माफ असतं.

थेट दोष जात नाहिच.
पण एकुणात एक त्या स्थळाची संस्कृती, ढाचा मेन्टेन करणं संस्थळवाल्यांकडून अपेक्षित असतं.
पण ह्या अपेक्षा लिखित असत नाहित.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

--मनोबा
.
संगति जयाच्या खेळलो मी सदाहि | हाकेस तो आता ओ देत नाही
.
memories....often the marks people leave are scars

दुसर्‍या अर्थाने स्थळ हा शब्द अभिप्रेत नाही. त्यामुळे प्रश्न योग्य नाही.

राहता राहिला प्रश्न संस्थळसदस्यभेदाचा- इथे असलेल्या कितीक सदस्यांच्या मतांवर मी वाट्टेल तसे ताशेरे ओढले असले आणि त्यांनीही माझ्या मतांवर टीका केलेली असली तरी ही पातळी इथे कधी दिसलेली नाही. बाकी अन्यत्रही असे पहिल्यांदाच पाहिले असले तरी ते जाणवणारच- त्याला इलाज नाही. असो. तुमचा मुद्दा मान्य आहेच.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

माहिष्मती साम्राज्यं अस्माकं अजेयं

ह्यापूर्वी कैकदा गलिच्छ भाषेत चिखलफेक झालिये.
तुला तपशील माहित नाहित तर बरच आहे, तुझं आपलं मन स्वच्छ.
.
.
.
अवांतरः-
ऐसी सुरु होण्याच्या आसपासचा काळ कसा होता ?

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

--मनोबा
.
संगति जयाच्या खेळलो मी सदाहि | हाकेस तो आता ओ देत नाही
.
memories....often the marks people leave are scars

असेलही. किमान त्या अंगाने झाली नसेल तरी बरेच आहे.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

माहिष्मती साम्राज्यं अस्माकं अजेयं

या धाग्यावर ऐसी अक्षरेची स्तुती आलेली आहे ते पाहून बरं वाटतं. ऐसी का आवडतं हे सांगण्याच्या भरात 'इथे अमुकतमुक वाईट प्रकार चालत नाहीत' या प्रकारचीही कारणं आलेली आहेत. काही प्रमाणात ते होणं साहजिकच आहे. पण तसं करताना आपण इतर संस्थळांवर अकारण आगपाखड करत तर नाही ना याची काळजी प्रत्येकाने घ्यावी ही विनंती. ही रेषा कशी आखून घ्यायची हे प्रत्येकानेच आपापल्यासाठी ठरवायचं आहे. पण विशिष्ट संस्थळ, विशिष्ट सदस्य यांवर उघडउघड टीका शक्यतो येऊ देऊ नये. कारण त्यातून ऐसीची आवड कितपत आणि इतरांचा राग किती हा प्रश्न पडतो.

जर इतर संस्थळांबद्दल किंवा सदस्यांबद्दल तक्रारी असतील तर त्या नकारात्मक गोष्टींनी भरण्याची ही जागा नव्हे. थोडक्यात, जिथली धुणी तिथे तिथे धुवावीत.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

मान्य. सॉरी.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

माहिष्मती साम्राज्यं अस्माकं अजेयं

+१
"कुतूहलकंडी केली धागिया तक्रारमंडी" अशी अवस्था झाली कुतूहलप्रश्नाने.
ते आवरावयास होते, इथे ते अप्रस्तुत आहे, हे मान्य.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

--मनोबा
.
संगति जयाच्या खेळलो मी सदाहि | हाकेस तो आता ओ देत नाही
.
memories....often the marks people leave are scars

अगदी सुरुवातीला "ऐसी कसे वाटते?" असा प्रश्न चालकांनी विचारला तेव्हा अजून खास वेगळेपण जाणवलेले नाही असे उत्तर दिले होते.

आता बर्‍यापैकी वेगळेपण जाणवते.
श्रेणी देण्याची सिस्टिम बर्‍यापैकी रुळलेली आहे आणि सदस्य श्रेणीदानाचा बराच वापर करतात असे दिसते. [खात्यात 'मिळालेल्या श्रेणी' या टॅबवर जे दिसते त्याचा अर्थ अजून उमगलेला नाही].

ट्रोलिंग चांगल्या प्रकारे नियंत्रित झालेले आहे.

स्कोअर सेटलिंग खूपच कमी आहे.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

--------------------------------------------
ऐसीव‌रील‌ ग‌म‌भ‌न‌ इत‌रांपेक्षा वेग‌ळे आहे.
प्रमाणित करण्यात येते की हा आयडी एमसीपी आहे.

>> खात्यात 'मिळालेल्या श्रेणी' या टॅबवर जे दिसते त्याचा अर्थ अजून उमगलेला नाही <<

कोणत्याही सदस्याच्या क्रमांकानुसार त्या सदस्यासाठी दिसणारा हा दुवा तुम्हाला अभिप्रेत असावा. ह्याद्वारे कोणत्याही सदस्याच्या प्रतिसादांना ज्या श्रेणी मिळाल्या आहेत त्यांविषयी थोडे तपशील कळतात. एक ओळ एका प्रतिसादासाठीचा तपशील दाखवते.
श्रेणीसंख्या - दिलेल्या प्रतिसादाला किती श्रेणी मिळाल्या आहेत?
श्रेणी - (बहुधा) बहुतांश मिळालेली श्रेणी
Score - शेवटची श्रेणी मिळाली त्याआधी प्रतिसादाचं मूल्य काय होतं? (हे मूल्य बहुधा तुमचं कर्म आणि आधी मिळालेल्या श्रेणींवरून ठरतं.)
श्रेणीनंतरचा स्कोर - शेवटची श्रेणी मिळाल्यानंतर प्रतिसादाचं मूल्य काय झालं?
प्रतिसाद देतेवेळचे कर्ममूल्य - प्रतिसाद देताना प्रतिसादकाचं कर्म किती होतं?
Last rated - शेवटची श्रेणी किती वेळापूर्वी मिळाली?

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

- चिंतातुर जंतू Worried
"ही जीवांची इतकी गरदी जगात आहे का रास्त |
भरती मूर्खांचीच होत ना?" "एक तूच होसी ज्यास्त" ||

शब्दार्थ बरोबर आहेत. पण बहुतांशी केसेस मध्ये हे तीन कॉलम न, न+१ आणि न+२ असे का येतात ते कळत नाही.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

--------------------------------------------
ऐसीव‌रील‌ ग‌म‌भ‌न‌ इत‌रांपेक्षा वेग‌ळे आहे.
प्रमाणित करण्यात येते की हा आयडी एमसीपी आहे.

श्रेणीसंख्या एक असली आणि श्रेणी + असली तर श्रेणीसंख्या + Score = श्रेणीनंतरचा स्कोर
पण श्रेणी देणारा पुरेसा पुण्यवान असेल, तर एका श्रेणीनं प्रतिसादाचं मूल्य बहुधा २नं वाढतं.
शिवाय, जेव्हा श्रेणीसंख्या एकहून अधिक असते तेव्हा त्यामुळे प्रतिसादाचं मूल्य वाढण्याला थोडी मर्यादा आहे, कारण कोणत्याही प्रतिसादाला ५हून जास्त मूल्य मिळत नाही. उदा. तुमच्या ह्या प्रतिसादाला ३ श्रेणी मिळाल्या आहेत, पण प्रतिसादाचं मूल्य ५ आहे.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

- चिंतातुर जंतू Worried
"ही जीवांची इतकी गरदी जगात आहे का रास्त |
भरती मूर्खांचीच होत ना?" "एक तूच होसी ज्यास्त" ||

n, n+1, n+2 तेव्हाच होतं जेव्हा सगळ्यानी धन च किँवा ऋण च श्रेणी दिली असेल. जर दोन्ही मिळाल्या असतील तर बेरीज वजा होत राहते. उदा तुमच्याच एका प्रतिसादाला 5 मार्मिक 4 5 2 2 आठवडे 2 दिवस असं दिसतय. म्हणजे ५ जणांनी श्रेणी देउनही शेवटी स्कोअर ५ च आहे. सर्वाँनी धन च दिली असती तर ३ (किँवा प्रथम श्रेणी देणार्याच कर्ममुल्य/पुण्य १ असेल तर ४) जणांतच ५ स्कोअर झाला असता. म्हणजे त्या प्रतिसादाला एक -ve श्रेणीही मिळालीय.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

२९. ऐसीवर १० ते २००० पैकी कितीही प्रतिसाद एकाच पानावर पाहता येता. त्यामुळे नवे प्रतिसाद सर्वत्र विखुरलेले असले तरी सर्वत्र नवे म्हणून दिसतात. नेट स्लो असेल तर कमी आकडा निवडावा.
३०. घाईत फक्त सर्वोत्तम प्रतिसाद वाचून काढता येतात (अर्थातच सर्वोत्तम म्हणजे इतर वाचकांच्या मते)
३१. प्रतिसाद पहायची सेटींग सेव करता येते.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

सही: पुरोगाम्यांना लॉजिक माफ असतं.

छान लिहीलय अरुण जोशी सर.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

http://naukarshahi.in/archives/10577
------------------------------------------
देवयानी प्रकरण वाचा ब्लॉगवर.
http://bahishkrutbharat.blogspot.in/