अलीकडे काय पाहिलंत? -७
अलीकडे काय पाहिलंत? याच्या पाचव्या भागात १०० हून अधिक प्रतिसाद झाल्याने हा नवीन भाग सुरु करत आहे.
याआधीचे भाग:१ | २ | ३ | ४ | ५ | ६
ग्रॅव्हिटी हा ३-डी चित्रपट पाहिला. 'अवतार'नंतर बर्याच काळाने या तंत्राचा प्रभावी वापर केलेला चित्रपट पहायला मिळाला. (नैतर दरम्यानचे चित्रपट नावालाच ३-डी होते.) कथा/पटकथा ठिकठाक, तांत्रिक रिसर्च/गृहपाठ तर काही प्रसंगी कच्चा, मात्र तरीही दिड तास केवळ त्रिमितीय चित्रीकरण, प्रकाश आणि ध्वनी यांच्या जोरावर खिळवून ठेवतो. सुरवातीची काही मिनिटे वगळता केवळ दोन आणि काही वेळाने एका पात्राबरोबर आपणही थरारक प्रवास करत असतो. थरार किंवा थ्रिल या भावनेशी दिग्दर्शक इतक्यावेळा आणि इतक्या वेगवेगळ्या पातळीवर खेळतो - आपल्याला खेळायला लावतो - की त्या थराराची / भीषणतेची आपल्याला एकाच वेळी सवयही होते आणि काहीशी अटॅचमेंटही तयार होते.
बघितला नसेल तर चित्रपटगृहातून उतरायच्या आत एकदा पहा असे सुचवेन
मलाही 'ग्रॅव्हिटी' लैच आवडला.
मलाही 'ग्रॅव्हिटी' लैच आवडला. ऋषिकेशशी संपूर्ण सहमत.
इथे 'बीफोर मिडनाईट' पाहिला काय कुणी?
-मेघना भुस्कुटे
***********
तुन्द हैं शोले, सुर्ख है आहन
इनिंग्ज
विराट कोहली आणि रोहित शर्माच्या भन्नाट , विक्रमी इनिंग्ज पाहिल्या ऑसींविरुद्ध.
च्यामारी, मागच्या कित्येक वर्षापासून क्रिकेट पाहणं सोडलं होतं.
टीममध्ये इतके बदल झालेत ह्याची कल्पनाच नव्हती.
झहीर , हरभजन, सेहवाग, गंभीर चक्क टीमबाहेर?
आश्चर्य आहे.
--मनोबा
.
संगति जयाच्या खेळलो मी सदाहि | हाकेस तो आता ओ देत नाही
.
memories....often the marks people leave are scars
डॅनी बोएलचा Trance हा
डॅनी बोएलचा Trance हा सायकोलॉजिकल थरारपट बघितला, डॅनीच्या नावाखाली अब्बास-मस्तानने काढलेला चित्रपट वाटतो.
त्याचबरोबर Audrey Tautouचा 'De vrais mensonges' हा फ्रेंच चित्रपट पाहिला. थोडीफार कॉमेडी ऑफ एरर्स किंवा हलकी-फुलकी विनोदी प्रेमकहाणी असं माफक शब्दात वर्णन करता येईल. Audrey आजुनही अमेलीच्या भुमिकेतुन बाहेर पडायला तयार नाही, हे काय कमी म्हणून तीचं नावही 'Emilie' असं आहे. 'हलका-फुलका' फ्रेंच चित्रपट म्हणून बघायला हरकत नाही. मला फ्रेंच येत नाही, त्यामुळे फ्रेंच भाषेतले काही पंचेस मी अनुभवले नसावेत पण त्यानी चित्रपटाच्या आस्वादात कमीपणा येत नाही हे सांगु इच्छितो. Audreyचे दर्शन सुखावह आणि क्युटवगैरे ते काय म्हणतात ते आहे.
रेडिफ च्या राजा सेन चे रिव्यु
रेडिफ च्या राजा सेन चे रिव्यु मला बर्याचदा झेपत नाहीत, पण हा रामलीला चा रिव्यु आवडला
http://rediff.com/movies/review/review-goliyon-ki-rasleela-ram-leela-is-...
चित्रपट पाहिला का कोणी?
गेल्या काही दिवसांत मी रब ने बना दि जोडी (काय रे देवा), जब तक है जान (आहाहा कत्रिना काय दिसते), बादशाह (मला अब्बास मस्तान चित्रपट आवडतात) आणि दम मारो दम (अजुन चांगला होउ शकला असता, पण आहे तोही बराच इंटरेस्टिँग) पाहिले.
शतरंक के खिलाडी आणि शांतता कोर्ट चालू आहे
"शतरंक के खिलाडी " आणि "शांतता कोर्ट चालू आहे"
पाहिले. आवडलेही.
पण मला नक्की नीट समजले आहेत की नाहित ह्याबद्दल साशंक आहे.
कुणी त्याचं इंटारप्रिटेशन साम्गितलं ह्या दोन्ही बद्दल तर बरं होइल.
.
खास लोककलाप्रकार म्हणून वारकरी संगीत संमेलन भरलं होतं इथे भारुड पहाण्यास गेलो.
पण जी काय गर्दी होती त्यामुळे पुढे सरकताच येइन . शिवाय अजून काही कामेही शिल्लक होती वीकांताची.
म्हणून भारुड न पाहताच परत आलो
--मनोबा
.
संगति जयाच्या खेळलो मी सदाहि | हाकेस तो आता ओ देत नाही
.
memories....often the marks people leave are scars
मनोबाला 'विकांताची कामे' मिळू
मनोबाला 'विकांताची कामे' मिळू लागली तर!
- ऋ
-------
लव्ह अॅड लेट लव्ह!
मिर्च
काल मिर्च पाहिला. मस्त पिक्चर आहे. पंचतंत्र टायपाच्या गोष्टी तर फारच गोड. अवश्य पाहावा.
बायका फार चालू असतात, आपली वासनापूर्ती करून घेण्यासाठी मस्त नाटके रचतात, शेवटपर्यंत पतीला आपण पतीव्रता आहोत असे भासवतात (रंगेहात पकडल्यावरही (हे सिनेमाचे यश आहे)), पती शकी असतात (खास करून आवाक्याबाहेरच्या बायका करून घेतलेले), इ इ थीम्स मस्त आल्या आहेत.
खाली सीन्स कळस आहेत-
१. श्रेयस तळपदे डोक्यावर हात मारून घेतो (तिथे त्याचा रोल संपतो)
२. बाजेखाली रणवीर यादवचे भजे झालेले असते तेव्हा त्याच्या बायकोचा प्रियकर जसा बाजेवर हसत असतो
आणि चित्रपटात मिरची संतुलित प्रमाणात आहे.
सही: पुरोगाम्यांना लॉजिक माफ असतं.
कहर
चित्रपट अखर आहे. जबराट धमाल आहे.
मी थेट्रात पाहिला होता.
ती झाडावर राजा(प्रेम चोप्रा) चडह्तो ती गोष्ट प्रचलित ज्योक म्हणून ठाउक होती; पण मांडलीच इतकी झकास आहे की आवडून गेली.
क्लास....
मस्ट वॉच आहे.
--मनोबा
.
संगति जयाच्या खेळलो मी सदाहि | हाकेस तो आता ओ देत नाही
.
memories....often the marks people leave are scars
शकी हा शब्द काळजाला
शकी हा शब्द काळजाला भिडला.
चेष्टा नव्हे, मजा वाटली खरेच.
माहिष्मती साम्राज्यं अस्माकं अजेयं
एका मित्राने त्याच्या मुलाचा
एका मित्राने त्याच्या मुलाचा वाढदिवस अनाथालयात साजरा केला, तिथे वाढदिवस साजरा केल्याने मुलाला गरिबीची जाणिव होणं, अनाथ मुलांना घटकाभर आनंदात सामावुन घेणं, आपल्या मनात 'हि मंडळी अशी असताना आपण मात्र चैन करतो आहोत' असा गिल्ट हलका करणे वगैरे कारणे मुख्यत्वे ह्या प्रकारामागे असतात. अनाथ मुलांची मदत करणे हा हेतु अप्रत्यक्षरित्या साधला जाऊ शकतो, प्रत्यक्ष सेलिब्रेशन करुन एक दिवसाचा आनंद मिळण्यापेक्षा आपल्याला इतरवेळेस काय मिळत नाही हे त्या मुलांना जाणवण्याची शक्यता अधिक आहे, त्यामुळे असले प्रकार अनाथ मुलांसाठी त्रासदायक असु शकतात असे अनुमान आहे.
इथल्या मंडळींचं ह्यावर काय मत आहे हे जाणून घ्यायला आवडेल.
हा ट्विट्विटर टाईप मुद्दा लेख म्हणून टाकवत नाही, त्यापेक्षा असे मुद्दे टाकायला "ऐसीला विचारा" असा एक प्रकार इथे हवा असेही वाटते.
मला काय वाटतं...
"मला काय वआटातं" किंवा
"विचारतरंग" किंवा
"पिकदाणी"
अशी धागामालिका "अलिकडे काय पाहिलत" स्टाइल सुरु करावी अशी ऐसी वाल्यांना विनंती.
--मनोबा
.
संगति जयाच्या खेळलो मी सदाहि | हाकेस तो आता ओ देत नाही
.
memories....often the marks people leave are scars
प्रत्येक धाग्याखालचे प्रतिसाद
प्रत्येक धाग्याखालचे प्रतिसाद हे त्यातच जमा होणार नाहीत काय?
माहिष्मती साम्राज्यं अस्माकं अजेयं
लहान असेल तर?
आवाका/विषय लहान असेल तर?
जे लहान असतील तेच फक्त तुम्हाला ह्या पिकदाणीत पचकन टाक्ता येतील.
इतर धाग्यांवर करत बसा लंबाचवडा रवंथ.
--मनोबा
.
संगति जयाच्या खेळलो मी सदाहि | हाकेस तो आता ओ देत नाही
.
memories....often the marks people leave are scars
कण्षेप्ट
स्पष्ट होत नाहीये. एखाद्या धाग्याचा जसा विषय अन आवाका, तदनुसार प्रतिसाद येतातच की.
माहिष्मती साम्राज्यं अस्माकं अजेयं
चर्चेचं मूल्य संस्थळावर
चर्चेचं मूल्य संस्थळावर चर्चिल्या जाणार्या इतर विषयांच्या तुलनेत कमी असल्याने(शक्यता अधिक)(भुमिकेला साजेसं नसल्याने) त्यासाठी धागा काढुन स्पॅम वाढवावे अशी इच्छा होत नाही. तसेच /.वर 'ask slashdot' नामक प्रकार आहे त्याचधर्तीवर एक प्रकार हवा.
हम्म हे लेजिट आहे.
हम्म हे लेजिट आहे.
माहिष्मती साम्राज्यं अस्माकं अजेयं
जबाबदारी पडली की
"जबाबदारी पडली की सुधरेल पोरगं असं वाटलं गं" हा अत्यंत हिट्ट डायलॉग माझ्या शेजारील स्त्रीला तिच्या सासूने ऐकवलाय.
च्यामारी म्हणजे पोट्टं हाताबाहेर गेलय हे तुम्हाला ठाउक असूनही तुम्ही लग्न लावलत?
हैट आहे! अरे दुसर्या कुणाचं तरी आयुष्य तुम्ही गुंतवताय ना अशानं!
" गळ्यात जिम्मेदारी पडली की सुधारेल" हे लॉजिक काहीच्या काही आहे.
बरं भरीला भर पोरीच्या घरचेही पुरेशी चौकशी न करताच आपली कन्या घाईघाईने दुसर्याच्या दावणीला कसे काय बांधतात तेच कळत नाही.
.
शिवाय पोरगा पट्टीचा व्यसनी आहे हे लग्न होइ पर्यंत कळलच नाही असं कसं शक्य आहे??
--मनोबा
.
संगति जयाच्या खेळलो मी सदाहि | हाकेस तो आता ओ देत नाही
.
memories....often the marks people leave are scars
हा प्रतिसाद लोकसंवाद धाग्यावर
हा प्रतिसाद लोकसंवाद धाग्यावर हवा होता का?
--------------------------------------------
ऐसीवरील गमभन इतरांपेक्षा वेगळे आहे.
प्रमाणित करण्यात येते की हा आयडी एमसीपी आहे.
मूर्ख लोक असतात. तरी इथे एक
मूर्ख लोक असतात. तरी इथे एक वयस्क व्यक्तीतरी इन्वॉल्व आहे. जबाबदारी पडली तर सुधारेल म्हणुन किँवा मुलगा झाला तर सबकुछ ठीक होइल असं समजुन एकापेक्षा जास्त मुलं जन्माला घालणारी हैयट लोक पाहिलीयत. नंतर त्यांच्याच डोक्यापाशी किरकिर करत बसतात जसे कै पोरंच मागे लागलेली आम्हाला जन्माला घाला म्हणुन :-(.
प्रत्यक्ष सेलिब्रेशन करुन एक
अनाथालयातील मुले कोणत्या वयाची आहेत त्यावर हे ठरावे. जर ठराविक वय उलटलेली व परिस्थिती स्वीकारलेल्या वयाची मुले असल्यास त्रासदायक ठरू नये. मात्र अनाथालयातील अडनिड्या वयाच्या मुलांना हे त्रासदायक वाटत असेल असे मलाही वाटते
- ऋ
-------
लव्ह अॅड लेट लव्ह!
ब्रेकिंग "ब्याद " चे ऋतू ……
वैधानिक इशारा : सिरियल बघायची असल्यास हे वाचू नये .
गिनीज वर्ल्ड रेकॉर्ड केलेली , काही शोभेच्या बाहुल्या मिळालेली ,मोस्ट वॉचड आणि क्रिटिकली अक्लेम्ड अशी अमेरिकन सिरियल " ब्रेकिंग ब्याड "चे दोन ऋतू भानामती झाल्यागत एका आठवड्यात बघितले . पुढचे ऋतू डाऊनलोडवून घेतले नसल्याने मतिला भानावर आणून आणखी ब्याद टाळणे शक्य झाले . तहेदिलतक विचित्र उदासी आणणारे तरंग उमटवत ब्रेकिंग ब्याडची सिग्नेचर ट्यून सुरु होते . रसायनशास्त्रातली शब्दावली अधोरेखित करत श्रेयनामावली उलगडते . केमेस्ट्रीच्या बुद्धिमान शिक्षकाची कथा सिंदबादच्या म्हाताऱ्यासारखी आपल्या मानगुटीवर बसते . या ब्याड चक्रव्यूहातून सुटल्यावर , तापातून उठल्यासारखी कडवट आणि गलितगात्र मनःस्थिती झाली आहे .
वोल्टला कॅन्सर झाल्याचे कुटुंबापासून लपवून ठेवतानाच त्याला , आता आपले केमेस्ट्रीचे ज्ञान वापरून ड्रग तयार केल्याशिवाय गत्यंतर नाही असा साक्षात्कार होतो . त्याला जेसी पिंकमन नावाच बावळट ध्यान पार्टनर म्हणून लाभत . त्या दोघांना कायम प्राणघातक संकटात सापडण आणि त्यातून कशिबशी सुटका करून घेण याचं जबर व्यसन लागत . रहस्यमय वर्तनाबद्दल बायको स्कायलरच्या २१ अपेक्षित प्रश्नासंचाला ,"कॅन्सर " हे एकच जमालगोटा उत्तर देऊन तो गुणवत्ता यादीत अमर होतो . स्कायलर कौटुंबिक गोलमेज परिषद घेऊन वोल्टचा कॅन्सरवर उपचार न करण्याचा निर्णय हाणून पाडते . सामान्य रुग्ण बावळटासारखी विश्रांती वगैरे घेत असताना हा केमो झाल्यावर लगेच ड्रग तयार करणे , विकून पैसे लपवणे , खून प्रकरणे निस्तरणे वगैरे कार्ये लीलया उरकत असतो . मधूनच आठवण आली की , आयला मला कॅन्सर वैग्रे झालाय नै का ? मग थोडाफार खॉकखुक करून दाखवतो , लोकहो लंग कॅन्सर मध्ये असे खॉकखुकावे लागते बर्का . वोल्टचा साडूच (स्कायलरच्या बहिणीचा नवरा ) पोलिसात ड्रग विभागाचा प्रमुख असल्याने त्याचा निगर्गट्टपणा उत्तरोत्तर शून्य मंडळ भेदु लागतो . स्कायलरवर संकटांची मालिका कोसळत रहावी म्हणून तिला १६ वर्षांचा अपंग मुलगा असतो , वोल्टच्या कॅन्सरसोबत बोनस म्हणून तिला उतारवयात प्रेग्नन्सी , तिच्या डॉक्टर बहिणीने चोऱ्या करणे अशी लयलूट सुरु रहाते . वोल्ट आणि जेसी सतत शिव्यांचे मंत्रोच्चार करत ,परोपकारार्थ एकमेकांच्या कबरी खणणे आणि बुजवणे यात दंग असतात . रुचिपालट म्हणुन कंटाळवाणे सेक्स सीन्स येतात . आयशपथ , यापेक्षा त्यांच्या कबरी खणणे जास्त मनोरंजक आहे . सोने पे सुहागा असे नवव्या महिन्यात स्कायलरचे लफडे सुरु होते. लफड्याचे दुख्ख नाही पण लाडिक तपशील सोकावताना पाहून भयाण थरकाप झाला . तिथेच मालिकेतला रस निघून गेला . त्यांच्यासोबत रसातळाला न जाताही विषाद कमी होत नाहीये याचं काय कराव ?
मला तर ब्वॉ लय आवडली सिरियल.
मला तर ब्वॉ लय आवडली सिरियल.
आधी रोटी खाएंगे, इंदिरा को जिताएंगे !
जोगवा
काल यु-ट्यूब वर "जोगवा" नावाचा मराठी सिनेमा पाहीला. अतिशय इन्टेन्स अभिनय आणि कथा तर अंगावरच येते. शेवट सकारात्मक असल्याने झोप तरी लागली तरी त्रास झालाच. जोग्त्या/जोगतिणींची फाटकी, नायिकेच्या भाषेत "शेणकाला" झालेली आयुष्ये फार विदीर्ण करतात. कथासूत्र, दिग्दर्शक, एडिटर व अर्थात अभिनेत्यांनी समर्थपणे पेलले आहे.
गाणी किती श्राव्य आहेत. ग्रामीण बाज गाण्यात जाणवतो.
एक वेगळाच अनुभव!
+१ चित्रपटाचा केवळ कथाविषय
+१
चित्रपटाचा केवळ कथाविषय वेगळा म्हणून नव्हे किंवा नुसत्या अभिनयामुळे नव्हे तर एकूणच सर्वार्थाने चांगला अभुभव देणारा हा चित्रपट आहे.
- ऋ
-------
लव्ह अॅड लेट लव्ह!
फ्लाईटप्लान
काल सर्फिंग करताना टी.व्ही.वर एचबीओ चॅनेल आला. नेमका त्याचवेळी, ज्युडी फॉस्टरचा 'द फ्लाईटप्लान' सुरु होत होता. बघायला सुरवात केली आणि सोडवेना. संपूर्ण पाहिला. २००५ चा हा चित्रपट आहे, दिग्दर्शक एक जर्मन आहे. प्लॉट, ज्युडी चा अभिनय आणि एका जंबो विमानात घडणारी कथा खिळवून ठेवते. नुकताच अपघाताने मेलेला नवरा, त्याची बॉडी बर्लिनहून अमेरिकेत नेण्याच्या प्रवासात ज्युडी, तिच्याबरोबर तिची लहान मुलगी, विमानात आलेल्या संकटाचा ज्युडीने धीराने आणि डोक्याने केलेला सामना, एक वेगळाच अनुभव!
व्हाइट लिली नाइट रायडर
पूर्वी रसिका आणि मिलिंद करायचे तो प्रयोग अर्थातच पाह्यला होता.
काल पृथ्वीला सोनाली आणि मिलिंदचा प्रयोग पाह्यला.
मला आवडला. तुलना मला करता येणार नाही.
काही गोष्टी सोनाली खूप जास्त छान करते. काही गोष्टी रसिकाला जास्त चांगल्या जमायच्या.
आधीच्या प्रयोगाची मोजपट्टी घेऊन हा प्रयोग बघायला जाऊ नये कारण दोन्ही प्रयोगांमधे बराच फरक आहे.
- नी
अडचण
प्रयोगाबाबत अडचण हीच की कायम घरापासून दूरवरच्या ठिकाणीच असतो. (किमान पंचवीस तीस किमी)
त्यामुळे बघू बघू म्हणत राहून गेले आहे.
आणि तोसुद्धा रात्री साडे नऊ नंतर प्रयोग सुरु होतो.(रविवार रात्र म्हणजे कै च्या कैच वाटतं राव तेही तीस किलोमीटर दूर जाउन पहायला.)
व्हाइट लिली वाल्यांना रात्री साडे नऊ शिवायची वेळ मिळत नाही का.किंवा उशीरा प्रयोग करायचा असेल तर बालगंधर्व आणि यशव्म्तराव चव्हाण शिवाय इतर थेटरे मिळत नाहित का.
भानगड काय आहे?
--मनोबा
.
संगति जयाच्या खेळलो मी सदाहि | हाकेस तो आता ओ देत नाही
.
memories....often the marks people leave are scars
भानगड मला माहित नाही
भानगड मला माहित नाही हो.
शप्पथ सांगते मला खर्रंच माहित नाही.
- नी
ग्रँड मस्ती पाहिला. अशा
ग्रँड मस्ती पाहिला. अशा चित्रपटांबद्दल नक्की काय मत बनवावे समजत नाही. समिक्षक वाईट आहे म्हणतात. स्त्रीवादी लोक टिका करतात. पण गल्ला १००+ कोटी जमा होतो. ओळखीतल्या दोघांकडुन दोन टोकाच्या प्रतिक्रिया ऐकल्या. मुलगा म्हणाला 'फार वाईट, चीप आहे. थिएटरमधली मुली, कुटुंब मधेच उठुन, तोँड लपवून जात होती.' मुलगी म्हणाली 'असं काही अजीबात नव्हत. कित्येक मुली, कुटुंब आलेली आणि लै हसत होती.' मला ठीक वाटला. चेन्नई एक्सप्रेस पेक्षा खुप जास्त वेळा हसु आलं
आता मस्ती पाहतेय. ग्रँडच्या मानाने फारच सोबर आहे.
वय
"ग्रँड मस्ती " चित्रपट पाहिला नाही. स्वतःहून पाहीन असे वाटत नाही.फक्त त्याच्याबद्दल ऐकून जी काही प्रतिमा आहे , त्याबद्दल बोलतोय.
"मस्ती " थोडाफार पाहिलाय, तुकड्या तुकड्यात.
.
.
मागे कोणत्या तरी धाग्यात धनंजय ने मस्त उदाहरण दिले होते.
चावट ज्योक ऐकून- ऐकवून गुदगुल्या करुन घ्यायचं एक वय असतं. त्यानंतरही ते तसं होत राहिलं तर ते विचित्र ठरतं.
मग वागण्याबोलण्यात ग्रेस, संयम असावा तेव्हा "देठ की हो हिरवा " अशी अवस्था होते.
शिशुवर्ग किम्वा प्राथमिक शाळेतली दुसरी-तिसरीची मुलं कशी हागल्या-पादल्याचे, शेंबूड वगैरेचे ज्योक मारत हसतात, तसेच.
त्याच ज्योकवर त्याच पोरांना मोठं झाल्यावर हसायला येइलच असं नाही.
खरं तर असं काही ऐकायला कुणी आसुसलं असणं फारच केविलवाणं वाटतं.
एखाद्या प्रौढाचा लालसेने झालेला "ययाती" पाहताना राहून राहून पुरुपेक्षाही अधिक त्या ययातीचीच अधिक कीव येते.
--मनोबा
.
संगति जयाच्या खेळलो मी सदाहि | हाकेस तो आता ओ देत नाही
.
memories....often the marks people leave are scars
ग्रँड मस्ती पिच्चरबद्दल एक
ग्रँड मस्ती पिच्चरबद्दल एक कमेंट अशी होती की स्पेलिंगमध्ये आर सायलेंट आहे. ती यथार्थ आहे असेच पिच्चर पाहिलेले कैकजण म्हणाले, तस्मात नै पाहिला.
माहिष्मती साम्राज्यं अस्माकं अजेयं
ग्रँड मस्ती पाहिला नाहीये पण
ग्रँड मस्ती पाहिला नाहीये पण मस्ती पाहिलाय. त्याच धर्तीवर असलेला "क्या कूल है हम" नामक चित्रपट शेवटचा पेपर दिल्यावर रिलॅक्स होण्यासाठी थेटरात पाहिला होता आणि आई शप्पत पैसा वसूल होता. खुर्चीवरून पडून पडून हसलो होतो. अभ्यास आणि एकूणच त्याच्याशी संबंधित सगळे साफ विसरून जायला ही मात्रा मस्त कामी आली.
बाकी कोणी काही का म्हणेनात - पण डोकं बाकीच्या गोष्टीतून पुर्ण रिकामे करण्यासाठी असले सिनेमे बरे असतात. अर्थात मोठा (समवयस्क्/समविचारी) ग्रुप हवा - तिथल्या एका कोटीवर अजून कोट्या करायला! एक्ट्याने/ फॅमिली बरोबर थेटर किंवा घरी पाहण्यात मजा नाही.
-सविता
----------------------------
|| स्वतः मेल्याशिवाय स्वर्ग दिसत नाही ||
सहमत!
आमचे तीर्थरूप त्यामुळेच गोविंदा अन कादर खान या द्वयीचे पिच्चर लै आवडीने पाहतात. जितका पिच्चर बिनडोक तितका डोक्शाला त्रास कमी. सौथ पिच्चरही त्यांना अलीकडे आवडू लागलेत ते त्याचमुळे. त्यांच्याच शब्दांत सांगायचे तर डोकं लावायला अजून लै गोष्टी आहेत. इकडे कशाला लावा?
माहिष्मती साम्राज्यं अस्माकं अजेयं
खरंय क्या कुल है हम पाहिला
खरंय
क्या कुल है हम पाहिला नाही पण ग्रँड मस्ती नक्कीच त्या लाइनीतला आहे. मस्ती खूप खूप सोबर आहे त्यामानाने. सेक्स कॉमेडी म्हणण्यासारखं काहीच नाही त्यात. फक्त एक सीन सोडुन (आफताब आणि रितेशचा)... अर्थात असे आता ९ वर्षाँनी वाटतय. ०४मधे मस्ती आला तेव्हा बराच बोल्ड वाटला असेल हे मान्य.
क्या कुल/सुपरकुल बघणार आहे लवकरच.
"क्या कूल है हम" नामक चित्रपट
+१ आम्ही पण!!!!
आपण एकाच युनिव्हर्सिटीच्या एकाच बॅचचे की काय?
- ऋ
-------
लव्ह अॅड लेट लव्ह!
पुणे युनिवर्सिटी - २००० साली
पुणे युनिवर्सिटी - २००० साली ग्रज्वेट झालो आम्ही.. तुम्ही?
-सविता
----------------------------
|| स्वतः मेल्याशिवाय स्वर्ग दिसत नाही ||
छ्या! दोन्ही वेगळे!.. मात्र
छ्या! दोन्ही वेगळे!.. मात्र आम्हीही शेवटचा पेपर झाल्यावरच हा चित्रपट पाहिला होता.
- ऋ
-------
लव्ह अॅड लेट लव्ह!
परवाच
पितृऋण हा चित्रपट बघितला. आवडला. एकदा बघण्यासारखा आहे. कथा सांगितली तर मजा निघून जाईल. सचिन खेडेकर, सुहास जोशी, तनुजा अशा सर्वांचीच कामे चांगली झाली आहेत. कथा मनाची पकड घेते. कौशल इनामदारांचे संगीत श्रवणीय आहे पण गाण्यांचे चित्रिकरण आवडलं नाही.
तनुजाचे म्हातारे रुप पाहून मानसिक धक्का बसला. 'रात अकेली है' मधे दोन्ही हातात कोकाकोलाचे ग्लास घेऊन नाचणारी ती सुंदर तनुजा हीच का, असा प्रश्न पडला.
राजन ताम्हाणे
काश उस पिच्चर मे राजन ताम्हाणे होते | हमे आपसे एक और भारी आर्टिकल पढ़ने मिलता |
--मनोबा
.
संगति जयाच्या खेळलो मी सदाहि | हाकेस तो आता ओ देत नाही
.
memories....often the marks people leave are scars
चार चित्रपट
साईड इफेक्ट्स आणि कोलंबस सर्कल हे दोन चित्रपट अलीकडे पाहिले. मनोरुग्णांच्या विश्वाभोवती घडणाऱ्या या थरारक रहस्यकथा आहेत. या दोन्हींपैकी साईड इफेक्ट्स हा चित्रपट जास्त आवडला. ज्यूड लॉ आणि विशेषतः रुनी मारा यांनी फारच छान अभिनय केला आहे. वैद्यकीय व्यवसाय आणि औषधकंपन्यांमधील व्यवहारामधील बारकावेही छान टिपले आहेत. कोलंबस सर्कल ठीकठाक वाटला. चित्रपटातील रहस्य फारच प्रेडिक्टेबल आहे... मात्र प्रमुख पात्र फारच छान साकारले आहे.
या सोबत फार्गो हा बऱ्याच दिवसांपासून पाहण्याच्या यादीतील अप्रतिम चित्रपट पाहिला. या वर्षी पाहिलेल्या चित्रपटातील नक्कीच सर्वोत्तम चित्रपट. इतके दिवस या चित्रपटाबाबत कुठे ऐकले किंवा पाहिले नव्हते जाणवून आश्चर्य वाटले. द ऑफिस या आवडत्या मालिकेतील द फायर या एका भागात या चित्रपटाचे नाव पॅमच्या तोंडी ऐकण्यात आले आणि टीवीवर काही बघण्यासारखे नसताना सहजच हा चित्रपट मिळाला आणि फारच आवडला. क्राईम थ्रिलर स्वरुपाचे चित्रपट आवडणाऱ्यांनी चुकवू नये असा चित्रपट.
या सोबत थॉर मालिकेतील अलीकडेच आलेला डार्क वर्ल्ड हा भाग दमड्या मोजून थेटरात पाहिला. फारच सपक वाटला. नोलानच्या बॅटमॅनच्या तुलनेत इतर सुपरहीरोंच्या कथा आता बालीश/मिळमिळीत वाटत आहेत. त्यापेक्षा कार्टून पाहिलेले बरे.
फ्लेमिश मास्टरपीसेस अॅट काळा घोडा
सध्या मुंबईच्या छ. शि. म. वास्तू संग्रहालयात (काळा घोडा इथलं पूर्वीचं प्रिन्स ऑफ वेल्स म्यूझियम) फ्लेमिश चित्रांचं प्रदर्शन भरलं आहे. रूबेन्स, याकोब यॉर्डाएन्स, यान ब्रॉयगेल इ. प्रख्यात चित्रकारांचं काम मुंबईत पाहायची संधी दवडू नये. अधिक माहिती इथे मिळेल.
- चिंतातुर जंतू
"ही जीवांची इतकी गरदी जगात आहे का रास्त |
भरती मूर्खांचीच होत ना?" "एक तूच होसी ज्यास्त" ||
कॅप्टन जिमि कार्टर हा
कॅप्टन जिमि कार्टर हा हॉलिवूडपट पाहिला. परग्रह, तिथले जीवन, गुरुत्वाकर्षण , घाणरडे पण पृथ्व्वीवरच्या जीवांना कुरुप म्हणणारे जीव, तिथले सत्यवादी, मानवाच्या प्रेमात पडलेले, अतिबुद्धिमान दुष्ट /भले पण शेवटी पॄथ्वीवरच्या सामान्य हिरोसमोर हरणारे जीव, दोन चंद्र, ... . असो. या अमेरिकन लोकांना लवकर कुणी सामान्य परग्रहवासी मिळो. तसे ते म्हणतही आहेत कि २०४० च्या मिळेल. तेव्हा थोडे दुसर्या प्रकारचे अॅक्शन पट पाहायला मिळातील. परग्रहवासीयांनी आमच्याकडे यावं किंवा आम्ही तिकडे जावं यापेक्षा वेगळी स्कीम नाही का?
सही: पुरोगाम्यांना लॉजिक माफ असतं.
हॉबिट- द डेझोलेशन ऑफ स्मॉग हा
हॉबिट- द डेझोलेशन ऑफ स्मॉग हा पिच्चर पाहिला. मिडल अर्थ उर्फ मध्यदेशातले अजून एक अॅडव्हेञ्चर, बिफोर द ग्रेट वॉर ऑफ द रिंग. अफाट जमलेय. लेगोलास, त्याची फंटी टॉरिएल अन ड्वार्फ किली यांचा प्रेमत्रिकोण, गँडाल्फ अन सॉरॉनचा प्रथमच घडलेला सामना अन त्यात सॉरॉनचे छायापुरुषागत असणे फार खास. बाकी लेगोलास अन टॉरिएल यांची ऑर्कबरोबरची फायटिंग जगातभारी अन एकूणच बाकीची शीनशीनरीसुद्धा. पण सगळ्यात भाव खाल्ला असेल तर त्या स्मॉग नामक ड्रॅगनने. नाद खुळा प्रकार आहे एकूण. एकूण काय तर मष्ट सी!!!!
अलीकडे त्यातला रेसिझम जाणवतो, पण क्षणभरच.
माहिष्मती साम्राज्यं अस्माकं अजेयं
मलापण जाम आवडला हॉबिट. जबराट
मलापण जाम आवडला हॉबिट. जबराट भव्य प्रकरण आहे. लेगोलॉस भारी. बिल्बोही. स्मॉगही खतराच.
पण हॉबिटबद्दलच्या माझ्या प्रेमात बिल्बोचं काम करणार्या मार्टिन फ्रीमनचा आणि स्मॉगला आवाज देणार्या बेनेडिक्टचा भला मोठा वाटा आहे, हे कबूल केले पाहिजे!
बादवे, मी 'हॉबिट' वाचलं नाहीये. पण 'लॉऑदीरिं' वाचलंय. रेसिझम कसला? स्पष्ट करणार काय?
-मेघना भुस्कुटे
***********
तुन्द हैं शोले, सुर्ख है आहन
मार्टिम फ्रीमन तर भारी आहेच.
मार्टिम फ्रीमन तर भारी आहेच. बाकी बेनेडिक्ट प्रकरणाशी परिचय नसल्याने मत नाही
हॉबिट मीही १/३ च वाचलंय अन एलोटीआर पूर्ण वाचलंय. रेसिझम म्हणजे गुड गाईज आर अॅज व्हाईट अॅज स्नो आणि बॅड गाईज आर अग्ली अँड ब्लॅक. अॅरागॉर्नसुद्धा रॅली करताना "मेन ऑफ द वेस्ट" अशीच हाक देतो. शायर, एल्फ किंग्डम हे सर्व पश्चिमेस तर मॉर्डॉर हे पूर्वेला येतं. सॉरॉनचे साथीदार "मेन" देखील "ईस्टरलिंग्स" आणि "मेन फ्रॉम साऊथ" असतात जे वाईट असतात. व्हाईट सुप्रीमसिझमचे अजून एक उदा. म्हणजे एल्फ ही अतिगोरी जमात जगातभारी असून सर्वांत शहाणी आहे असे दाखवणे. एकदम आदर्श वगैरे. सगळ्यांना सगळे त्यांनीच शिकवले इ.इ. बाकी टोल्किननंदेखील एके ठिकाणी कबूल केलेय की शायरचे वर्णन हे ग्रामीण इंग्लंडला सर्वांत जास्त लागू पडते.
बाकी थीम म्हटली तर टोल्किनला औद्योगिकीकरणाचा तिटकारा आहे. सारूमान आणि त्याचा आयसेनगार्ड व एंट टीमकडून त्याचा झालेला नाश हे त्याचे प्रतीक आहे. टोल्किन इंग्लंडमध्ये जिथे वाढला त्या भागाचे औद्योगिकीकरण झालेले त्याला झेपले नसल्याने त्याने ते तसे पोर्ट्रे केले असे वाचलेय.
पण इतके सगळे असूनही त्यात खिळवून ठेवण्याची क्षमता अफाट आहे.
माहिष्मती साम्राज्यं अस्माकं अजेयं
मार्टिन फ्रीमनला 'ऑफीस'मधे
मार्टिन फ्रीमनला 'ऑफीस'मधे पाहिलंयस का? मी 'शेरलॉक' बघून आधी बेनेडिक्टच्या जास्त प्रेमात पडले होते. 'ऑफीस' पाहिल्यानंतर पुन्हा शक्ती का संतुलन! काय चेहरा बोलतो त्याचा! 'हॉबिट'मधे तर त्याच्या बोटांच्या हालचाली, त्याची उभी राहायची पद्धत, त्याच्या चेहर्यावरचे निरागस + बेरकी + मिश्कील + धीरोदात्त भाव... अहाहाहा! मेजवानी. बेनेडिक्टच्या अभिनयाबद्दल तर मी लेखमालिका चालवू शकीन. असो!
एलोटीआरची भाषा मला कंटाळवाणी वाटली. म्हणजे भाषा थोर असेल. पण माझ्याकरता ती जरा बोजड आणि आलंकारिक आणि त्यामुळे कमी चित्रदर्शी झाली. त्यामुळे मला ते पुस्तक नेटानं आणि कष्टानं वाचावं लागलं. गोष्टीच्या अद्भुततेबद्दल, खिळवून ठेवण्याच्या ताकदीबद्दल काही शंकाच नाही. नवनवीन भाषा, जगाचे नकाशे आणि भूगोल, आणि निरनिराळ्या योनी आणि त्यांच्या मर्यादा नि बलस्थानं नि वैशिष्ट्यं लिहिण्याच्याबाबतीत - हा माणूस रोलिंगचा आजा आहे हे तिनंही जाहीरपणे सांगितलेलं आहे म्हणा.
पण तू म्हणतोस तसा रेसिझमचा विचार माझ्या डोक्यात कधी आला नव्हता. ठीक, मान्यच आहे.
-मेघना भुस्कुटे
***********
तुन्द हैं शोले, सुर्ख है आहन
नाही, ऑफिस मध्ये नै पाहिलं.
नाही, ऑफिस मध्ये नै पाहिलं. अॅक्टिंगबद्दल सहमत आहेच, मस्त निभावलाय रोल. फ्रोडोचा काका शोभतो खराच.
एलोटीआरची भाषा अंमळ बोजड आहे हे खरंय, पण काही वर्णने तशाच शैलीत वाचणे मस्त वाटते. ती शैली आणि ते जग असं अमिटपणे परस्परांत मिसळून गेलेलं आहे. शिवकाळविषयक कादंबरीत तत्कालीन भाषा वापरण्यासारखं असल्याने ती शैली अंगावर येऊ द्यावी, त्यात कधी पोहू लागतो ते आपले आपल्यालाच कळत नाही.
त्यातलं इंग्लिश खास मध्ययुगीन वैग्रे आहे. शब्द पाडण्याचं कौशल्य प्रदान करणारी भाषाशैली असल्याने मला फार आवडते, उदा. ट्विन टॉवर्समध्ये ग्रिमा वर्मटंगच्या तोंडचा हा ड्वायलॉक पहा.
"Late is the hour in which this conjurer chooses to appear. Lathspell I name him, ill news is an ill guest."
किंवा फेलोशिप ऑफ द रिंगमध्ये सारूमान गँडाल्फचे स्वागत करताना म्हणतो:
"Smoke rises over the mountain of doom. The hour grows late & Gandalf the grey rides to Isengard, seeking my counsel. For that is why you have come, is it not?"
किंवा त्यातच रिव्हनडेलमधल्या सभेत बोरोमीरचा मॉर्डॉरबद्दलचा वर्ल्डफेमस ड्वायलॉक.
"One does not simply walk into Mordor. It's a barren wasteland, riddled with fire & ash where the very air you breathe is a poisonous fume. Its black gates are guarded by more than just orcs. There is evil there that does not sleep. The one eye, lidless & wreathed in flame. Not with ten thousand men can you do this. It is folly."
अशी भाषा वाचताना/ऐकताना वाक्यावाक्याला ऑरगॅझम येणार नैतर काय
माहिष्मती साम्राज्यं अस्माकं अजेयं
मान्य आहे. पण माझं इंग्रजी
मान्य आहे. पण माझं इंग्रजी अगदीच कामचलाऊ आहे. नि गोष्ट वाचताना भाषेवर मांड नसेल तर अगदीच हरवल्यासारखं वाटतं. सगळ्या शब्दांचे अर्थ कळतात वा कळवून घेता येतात, पण त्यातली मेख काही केल्या कळत नाही. काहीतरी गंमत चाललीय हे कळतं, पण नेमकी काय ते न कळल्यामुळे अगदीच बावळट वाटत राहतं.
शब्द पाडण्याच्या कौशल्यावरून आठवलं - आपल्याकडे फॅण्टॅसीमधे असं काही का नाही लिहिलं जात यार... (लगेच महाभारत आणू नकोस. ते थोर आहे वगैरे ठीकच. पण त्यावर किती काळ मिशा पिळणार?) संस्कृतमधेही हे शब्द पाडण्याचं कौशल्य आहे. कुणी इतकं भव्यदिव्य काही लिहिलं तर काय मजा येईल. अशा प्रकारचं काही जीएंनी लिहिलं असतं तर अशक्य मजा आली असती, असं मला कायम वाटतं.
-मेघना भुस्कुटे
***********
तुन्द हैं शोले, सुर्ख है आहन
आपल्याकडे असं काहीतरी लिहिलं
आपल्याकडे असं काहीतरी लिहिलं जावं याच्याशी १०१००! वेळेला सहमत आहे. शब्दयोजना खास नै पण मस्त छानछान चित्रे असलेलं काही पहायचं असेल तर Ramayan 3392 A.D. हा प्रकार पहा. टॉरेंटवर कॉमिक आहे, डौन्लोडवून पहा. आयॅम शुअर तुला आवडेल.
माहिष्मती साम्राज्यं अस्माकं अजेयं
रामायण 3392 A .D.
रामायण 3392 A .D., हे दीपक चोप्राचं मेंदूमूल असल्यामुळे इतके दिवस कटाक्षाने टाळत होतो, तू सांगतोस म्हटल्यावर वाचतो आता...
अवांतरः दीपक चोप्रांचे क्वोट्स वाचनात आलेत का? इतका निरर्थक बोलतो की त्याच्या "ट्वीटर स्ट्रीम" वरचे कोणतेही शब्द कोणत्याही क्रमाने ठेवले की एक नवीन दीपक चोप्रा छाप वाक्य तयार होतं. हे बघ
कोट्स अधूनमधून वाचले. टाळणेबल
कोट्स अधूनमधून वाचले. टाळणेबल आहेत सर्वार्थाने. पण रामायण वाचणे जरूर.
माहिष्मती साम्राज्यं अस्माकं अजेयं
+१ मराठीत तर दूरदूर पर्यंत
+१
मराठीत तर दूरदूर पर्यंत फँटसी-दारीद्र्य इतकं आहे की आपण त्यात 'गरीब' आहोत असंही म्हणता येत नाही - कंगाल आहोत त्या बाबतीत.
- ऋ
-------
लव्ह अॅड लेट लव्ह!
Shashi Bhagvat - Marmabhed!!!
Shashi Bhagvat - Marmabhed!!! Really great novel. That was fantasy genre right? Can't remember much other.
आणि रत्नप्रतिमा. बरोबर. पण
आणि रत्नप्रतिमा. बरोबर. पण बास. खलास. नि एलोटीआरच्या तुलनेत रत्नप्रतिमा नि मर्मभेद काहीच नाहीत. आपण आपलं समाधान करायचं काहीतरी समांतर शोधून, इतकंच.
-मेघना भुस्कुटे
***********
तुन्द हैं शोले, सुर्ख है आहन
+१
तंतोतंत.
लय आणि अधूनमधून येणारं पद्यही खासच.
ऑफिस
मला स्वतःला ब्रिटिश ऑफिसपेक्षा अमेरिकन ऑफिस जास्त आवडले. विशेषतः स्टीव कॅरेल आणि रेन विल्सन यांचे काम. ब्रिटिश ऑफिस आवडले असल्यास अमेरिकन ऑफिसही अवश्य पाहा.
छान चित्रपट
हॉबिट - १ आणि हॉबिट - २ एकापाठोपाठ एक आयमॅक्समध्ये पाहिले आणि रविवारच्या सुटीचा सदुपयोग झाला. आता तिसऱ्या भागाची वाट पाहणे आले.बाकी स्मॉग ड्रॅगन मात्र फारच आजोबांसारखा प्रेमळ वाटला (एलओटीआरमधील नाझगुलची वाहने असणारे स्टीड किंवा गँडाल्फला मारणारा बलरोग हे ड्रॅगनसदृश प्राणी जास्त क्रूर वाटत होते.)
--अवांतरः लेगोलासची फायटिंग एलओटीआरमध्ये जास्त चांगली जमली होती असे वाटते.
स्मॉग
स्मॉग प्रेमळ>>>>>>>>+१.
नाझगुल आणि त्याचे वाहन हा लै जबराट प्रकार होता. ते प्रकर्ण पाहून लै आवडले होते.
बॅलरॉग ऑफ मॉर्गॉथ आणि गँडाल्फबरोबरची त्याची फाईट हा एक लैच क्लास प्रकार आहे. गँडाल्फच्या आवाजात "यूऽऽऽ शॅल नॉट पाऽऽऽस्स!!!!!!!!!!!!!" हे ऐकताना लै जबराट वाटले होते.
अन लेगोलासच्या फायटीबद्दलही सहमत. ट्विन टॉवर्समध्ये एका ऑर्कच्या ढालीवर उभा राहून स्केटिंग करत वर बाण मारत असतो ती ष्टैल तर नादच खुळा.
तदुपरि टॉरिएल मात्र मस्त आहे
माहिष्मती साम्राज्यं अस्माकं अजेयं
टॉरिएलबाबत सहमत
तदुपरि टॉरिएल मात्र मस्त आहे
अर्थातच!
चीनी नृत्य गायनाचा कार्यक्रम :)
आज युनिव्हरसिटीत चायनीज कौन्सिलेट आणि मुंबई युनिव्हर्सिटीच्या संयुक्त विद्यमाने चीनचा सांस्कृतिक कार्यक्रम आयोजीत केला होता त्याला गेलो होतो. वेताच्या छ्डीसारखी लवणारी अंग आणि लयबद्द हालचाली. अक्षरशः होश उडाले. त्या मुलिंना खरच सलाम. किती हसरे चेहरे आणि किती देखणं व्यक्तीमत्व. आजचा दिवस सार्थकी लागला. बाकी असले कार्यक्रम पाहताना आजुबाजुला श्रोतेही तसेच असायला हवेत याचं महत्त्व पुन्हा पटलं. जरा वैतागच आला होता मागे बसलेल्यांच्या बिनडोक कमेंटसनी.
संवाद
राजहंसाचे चालणे | भूतळी जालिया शाहाणें | आणिकें काय कोणें | चालावेचिना?
कुठल्या प्रकारचे नृत्य होते
कुठल्या प्रकारचे नृत्य होते म्हणे?
Inside Llewyn Davis + 12 Years a Slave
कोएन ब्रदर्सचा नवीन चित्रपट म्हणून Inside Llewyn Davis पाहण्याची उत्सुकता होती. सामान्य माणसांच्या विक्षिप्त वाटतील अशा, पण बव्हंशी निरुपद्रवी लकबींवर गुपचूप उपहासाने बोट ठेवणारे प्रसंग (उदा. 'फार्गो'तली ही ढब) - कथेच्या संदर्भात येणार्या जागांचं अचूक चित्रीकरण - काहीसा लूझर म्हणता येईल असा नायक आणि तुलनेने मजबूत चरित्र अभिनेत्यांची फळी - पारंपरिकदृष्ट्या ठाम शेवट नसणारं कथानक - ही त्यांची वैशिष्ट्यं या सिनेमातही दिसून येतात.
लूविन डेव्हिस हा साठीच्या दशकाच्या सुरुवातीच्या न्यू यॉर्कमध्ये जम बसवण्यासाठी धडपडणारा गायक आहे. बॉब डिलनचा उदय होण्यापूर्वी 'अमेरिकन फोक म्युझिक' क्षेत्रात मर्यादित प्रमाणावर प्रसिद्धी मिळवलेल्या डेव्ह व्हॅन रॉन्कवर हे पात्र बेतलेले आहे. अलम दुनियेशी फटकून वागणे - आपला हक्क समजून जागा मिळेल तिथे रात्रीपुरता मुक्काम ठोकणे - आगामी पितृत्वाची जबाबदारी फारशा गंभीरपणे न घेणे इ. लीळा अतिशय प्रतिभाशाली व्यक्तीचं चित्रण करताना आजवर अनेक चित्रपटांत येऊन गेल्या आहेत. लूविन डेव्हिस उत्तम गायक असला तरी त्या दैवी पातळीपर्यंत पोचत नाही, मात्र जीविका आणि उपजीविका यातला फरक मदत करणार्या आपल्या बहिणीलाच हिणवून सांगण्यापर्यंत त्याची प्रसंगी मजल जाते.
सुखान्त, ट्रॅजेडी किंवा प्रेक्षकांच्या हातावर निष्कर्षाचा शेवटी प्रसाद ठेवणी या भानगडीत न पडता लूविन डेव्हिसच्या आयुष्यातल्या काही दिवसांचं चित्रण या चित्रपटात येतं. योगायोगाने त्याच्या सोबतीला आलेल्या मांजराचं नाव 'युलिसिस' असल्याचं दाखवून त्याच्या ह्या 'ओडिसी'कडे नॉट-सो-सटल् निर्देश केला आहे.
मूळ चालीला/सादरीकरणाला धक्का न लागू देता नवीन संचात सादर केलेली जुनी, क्लासिक फोक साँग्ज् ('लोकगीतं' हे केवळ भाषांतर झालं) हे चित्रपटाचं अजून एक बलस्थान. उदा. फाय हन्ड्रेड माईल्स (हे गाणं राजेश रोशनच्या ओरिगिनल 'जब कोई बात बिगड जाये'वर बेतलेलं आहे, असा दाट संशय आहे
- मूळ संचातलं आणि चित्रपटातलं.
. . .
'12 Years a Slave' चे कथानक हे सॉलोमन नॉर्दप ह्या कृष्णवर्णीय व्यक्तीच्या आत्मचरित्रावर आधारित आहे. न्यू यॉर्कमधल्या गुलाम नसलेल्या सॉलोमन ह्या मध्यमवर्गीय गृहस्थाला फसवून दक्षिणेत गुलाम म्हणून पाठवण्यात येतं. तिथे यादवी युद्धाच्या आधी १८४१ ते १८५३ अशी बारा वर्षं सोसाव्या लागलेल्या हालअपेष्टा त्याने सुटकेनंतर या पुस्तकामार्फत जाहीररीत्या मांडल्या. कृष्णवर्णीयांवरील अन्यायाला वाचा फोडणारं साहित्य तेव्हा नुकतंच प्रकाशित होऊ लागलं होतं; पण या पुस्तकातल्या प्रथमपुरुषी निवेदनाने त्यांची दाहकता अधिक परिणामकारकपणे लोकांसमोर आली आणि गुलामगिरीच्या चर्चेला निराळं वळण लागलं.
आता एकविसाव्या शतकात निव्वळ कथानकाच्या दृष्टीने पहायचं झालं तर यात काही नावीन्य उरलेलं नाही. 'व्हाईट गिल्ट'ला आवाहन करणं, त्यासाठी एकामागोमाग एक चढत्या श्रेणीने नृशंस अत्याचार दाखवत राहणं अधिक अधूनमधून आशा-निराशेचा खेळ - हा त्यातला सर्वाधिक सरधोपट मार्ग. मूळ मुद्द्याशी सहमती असणारा प्रेक्षकही मग अशा सरधोपट चित्रणामुळे अशा चित्रपटांकडे पाठ फिरवतो.
या साच्यातून बाहेर पडण्याचा प्रयत्न करणं हे '12 Years a Slave' सारख्या आत्मचरित्रावर आधारित चित्रपटांच्या दृष्टीने थोडंफार कॅच-२२ सारखं आहे. मात्र केवळ शारीरिक हाल नव्हेत तर गुलामगिरीत मानसिक पातळीवरही होणारी सुसंस्कृत व्यक्तीची घुसमट दाखवणारा प्रत्ययकारी अभिनय; दक्षिणेतलं निसर्गसौंदर्य आणि त्याच्याच पार्श्वभूमीवर होणारे अनन्वित अत्याचार यांच्यातला विरोधाभास दाखवून देणारं चित्रीकरण आणि मूळच्या कथानकाचा अस्सलपणा यामुळे हा चित्रपट केवळ अशा 'जेडेड'/बधीर आड्यन्सला रडवण्यापुरताच मर्यादित राहत नाही. त्याचा अनुभव घेण्यासाठी हा चित्रपट थेटरात बसून सलग पहावा असाच. फावल्या वेळी तोंडीलावण्यापुरतं 'अयाई गं!' म्हणून पाहण्याजोगी ही बाब नोहे.
the lives of others एक अप्रतिम चित्रपट !
काही दिवसांपुर्वी यु टीव्ही वर्ल्ड मुव्हीज वर द लाइव्ह्ज ऑफ़ ऑदर्स हा अप्रतिम चित्रपट पाहीला. याचे सुंदर परीक्षण संजय भास्कर जोशी यांनी साधने च्या अंकात केलेले अगोदर वाचण्यात आले होते तेव्हापासुन पाळत ठेवली होती आणि मग पाहण्याचा योग आला तर परीक्षणात केलेली चित्रपटाची स्तुती आणि एकंदर परीक्षण कीती अचुक होते याचाच प्रत्यय आला.
एक अप्रतिम अनुभव ! एकदा जरुर बघा. कम्युनिस्ट राजवटीतील मुस्कटदाबी, यातना देण्याच्या पाळत ठेवण्याच्या भयानक पद्दती त्या दडपशाही च्या वातावरणातही काही लोकांच्या मनात जागत असलेली संवेदनशीलता आणि विवेक अस काहीस चित्रपटात आहे. कथा खिळवुन ठेवणारी , आणि अभिनय तर अभुतपुर्व उंची गाठणारा आहे. शेवटचा क्लायमॅक्स डोळे पाणावणारा (हल्ली कमीच झाले असे चित्रपट) यु टीव्ही वर्ल्ड मुव्हीज तुमच्या कडे असेल तर लक्ष ठेवा कधी ना कधी रीपीट होणारच.
www.theparisreview.org
http://all-art.org
www.spring.org.uk
बर्नी - 'ब्लॅक कॉमेडी'
Bernie हा जॅक ब्लॅक अभिनित चित्रपट पाहिला. सर्वांशी अतिप्रेमाने वागणारा, थोड्याश्या कालावधीत संपूर्ण गावात लोकप्रिय झालेला, फ्युनरल होममध्ये काम करणारा चित्रपटाचा नायक, गावातील एका गर्विष्ठ आणि अत्यंत विचित्र स्वभावाच्या श्रीमंत म्हाताऱ्या विधवेच्या संपर्कात येतो आणि दोघे एकमेकांच्या प्रेमात पडतात. तिच्या पझेसिव स्वभावामुळे त्याला सामान्य आयुष्य जगणे अशक्य होते .... उरलेला भाग प्रत्यक्ष चित्रपटातच पाहावा.
डॉक्युमेंटरी - मुलाखतींच्या स्वरुपात साकारलेला हा चित्रपट एक उत्कृष्ट ब्लॅक कॉमेडी आहे. चित्रपट सत्यकथेवर आधारित आहे हे पाहून सत्य हे कल्पिताहून अद्भुत असते या घासून गुळगुळीत झालेल्या ओळीचा प्रत्यय येतो.
प्रभाकर कोलते, किरण नगरकर
आजपासून पुण्याच्या सुदर्शन कलादालनात प्रख्यात चित्रकार व कलाशिक्षक प्रभाकर कोलतेंचं चित्रप्रदर्शन सुरू होत आहे. कोलतेंच्या 'ब्लॅक अँड व्हाइट' मालिकेतल्या चित्रांविषयी जयंत जोशी लिखित 'श्वेतश्यामल चिंतन' ह्या पुस्तकाचं प्रकाशन त्या निमित्तानं होणार आहे. किरण नगरकर ह्या प्रसंगी प्रमुख वक्ते आहेत.
स्थळ - सुदर्शन कलादालन, काकासाहेब गाडगीळ पथ, अहिल्यादेवी शाळेजवळ, शनिवार पेठ
वेळ - प्रकाशन : संध्याकाळी ६:१५; नगरकरांचं भाषण : ६:३० वा.
- चिंतातुर जंतू
"ही जीवांची इतकी गरदी जगात आहे का रास्त |
भरती मूर्खांचीच होत ना?" "एक तूच होसी ज्यास्त" ||
धूम ३ पाहिला/पाहिली वगैरे..
यशराज फिल्मस - आमिर खानचा धूम-३ पाहिला/ली.
हे कथानक जुन्या काळात घडताना दाखवायला हवे होते. ते तसे जुन्याच काळातले कथानक आहे.
सर्कस हे मनोरंजनाचे एक प्रमुख माध्यम राहिलेले नाही,हल्ली बँका लुटल्याने त्या बंद पडत नाहीत वगैरे...
बाकी व्यक्तीमत्त्व संघर्ष उत्तम आहे. आमिर खानचा अभिनय चांगला आहे. आमिर खान म्हातारा दिसू लागला आहे.
खर्च आणि त्यामुळे वापरता येणारे तंत्रज्ञान उत्कृष्ट आहे. चित्रीकरणाची कामगिरी आंतरराष्ट्रीय दर्जाची आहे.
संवाद लेखन सुमार आहे.संगीतही तद्दन फालतू आहे.
अतिशयोक्त भाग प्रेक्षकाला पटावा म्हणून दिग्दर्शकाने फारसे प्रयत्न केलेले नाहीत.
हल्ली चित्रपटांमधल्या सगळ्याच मारामार्या तर 'एकच फाईट - वातावरण टाईट' अशा तमिळतेलुगूड्या झालेल्या आहेत.
अभिषेक बच्चनपेक्षा उदय चोप्राचा अभिनय चांगला झालेला आहे. त्याच्याहीपेक्षा केतरीना कैफनामक बार्बी बाहुलीचा अभिनय चांगला आहे.
तिच्याहीपेक्षा जॅकी श्रॉफच्या दारू पिऊन सुजलेल्या चेहर्यावर जास्त हलचाल होते.आणि जॅकीपेक्षा टॅब्रेट बेथेल नामक अमेरिकन अभिनेत्रीचा हिंदी भाषेतला अभिनय उत्तम झालेला आहे असे म्हणता येईल. या सर्वांपेक्षा वेस्टर्न बेंक ऑफ शिकागो या काल्पनिक बँकेचा अध्यक्ष या भूमिकेतला अँड्र्यू बिकनेल याने उत्तम काम केले आहे.
जुन्या काळात घडणारी (१९३०-५०) एक पाश्चात्य वाईल्ड वेस्ट अथवा झोरो सदृश कथा १९९० ते २०१३ काळात (आणि तेही हिंदीत) घडताना दाखवल्याने फसलेली आहे. बाकी खोलवर विचार करता मूळ कथा उत्तम आहे.
सुमार चित्रपट
सदर चित्रपट पाहिला. अभिनयाबाबतच्या टिप्पणीशी सहमत आहे.
एकंदरीत चित्रपट फारच सुमार वाटला. यापूर्वीचे धूम -1/2 चित्रपट माफक मनोरंजन करणारे होते. मात्र उदय चोप्रा स्क्रीनवर दिसल्यावर थोडे उथळ मनोरंजन होऊन सुसह्य वाटावे इतकी वाईट परिस्थिती या चित्रपटाची आहे. बँका कशा लुटल्या आहेत वगैरे महत्त्वाचे प्रसंग दाखवलेच नाहीत. डायरेक्ट बिल्डींगवरुन चालत खाली. बाईकची बोट, बोटीची परत बाईक, हवेत विमानासारखी उडणारी बाईक वगैरे अॅक्शन अविश्वसनीय प्रकारे दाखवली असल्याने अत्यंत थर्ड क्लास वाटली. यापूर्वी चेन्नै एक्सप्रेस या रटाळ चित्रपटाने 300+ कोटी कमावले होते. तो विक्रम हा चित्रपट मोडेल किंवा मोडणार आहे असे ऐकले आहे. एकंदरीत चित्रपट जितका बंडल तितकी त्याच्या यशस्वितेची खात्री असे समीकरण आहे काय?
मिकी वायरस नामक एक चित्रपट पाहिला. त्या चित्रपटाने माफक मनोरंजन केले. धूम ऐवजी तो चित्रपट वेळ घालवण्यासाठी बरा आहे
---/\--
---/\--
ऑल टैम ग्रेट कमेंट
--मनोबा
.
संगति जयाच्या खेळलो मी सदाहि | हाकेस तो आता ओ देत नाही
.
memories....often the marks people leave are scars
कार्टून समीक्षा-
http://mumbaiboss.com/2013/12/24/the-vigil-idiot-dhoom-3/
बीबीसी शेरलॉक
बीबीसी शेरलॉकचा मिनी एपिसोड पाहिला! मिनी एपिसोड ची आइडिया आवडली!
Many Happy Returns!
1 जानेवारी ला पहिला एपिसोड येतोय.
+१
मला नव्हतं माहीत की यु-ट्युब वर पण असेल मिनी एपिसोड...
आधी रोटी खाएंगे, इंदिरा को जिताएंगे !
भारतात?
भारतात पाहायला मिळणार आहे का?
- चिंतातुर जंतू
"ही जीवांची इतकी गरदी जगात आहे का रास्त |
भरती मूर्खांचीच होत ना?" "एक तूच होसी ज्यास्त" ||
हो!
या लिंकनुसार 3 जानेवारीला AXN वर पाहायला मिळेल.
धन्यवाद!
धन्यवाद!
- चिंतातुर जंतू
"ही जीवांची इतकी गरदी जगात आहे का रास्त |
भरती मूर्खांचीच होत ना?" "एक तूच होसी ज्यास्त" ||
१० वाजता
आज रात्री १० वाजता पहिला एपिसोड आहे.
हंगर गेम्स - कॅचिङग फायर
हंगर गेम्स मालिकेतला कॅचिङग फायर हा चित्रपट पाहिला. मालिकेतील पहिला भाग जास्त चांगला होता असे वाटते. सदर दुसरा भागही जेनिफर लॉरेन्स आणि हंगर गेम्सच्या चाहत्यांना आवडेल.
आमच्या लेकरासोबत द बी मूव्ही
आमच्या लेकरासोबत द बी मूव्ही हा कार्टूनपट पाहिला. मजा आली.
बाय द वे, आपल्या पैकी कोणी प्यार का दर्द है मिठा मिठा प्यारा प्यारा हे सास बहू सिरियल पाहते का? बायकोयोगे मला ते रोज पहावे लागते. अलिकडे ते मी आनंदाने पाहायचे ठरवले आहे.
सही: पुरोगाम्यांना लॉजिक माफ असतं.
उडनखटोला
http://www.youtube.com/watch?v=lzvIZDXzNo0
हे गाणं पाहिलं. मंत्रमुग्ध झालो. खासकरून सुरुवातीला कोण्या तंतूवाद्यातून 'दुनिया बडी बेईमान' हे सुर निघतात तेव्हा, 'दिल ना दुखाना' म्हणत निम्मी आह भरते तेव्हा, आणि दुपट्टा अचानक अंगावर पडल्यावर दिलिप कुमार ज्या प्रकारे दचकतो ते पाहून.
जेव्हा हीच समाजरुची होती तो जमाना काय असेल नै!
सही: पुरोगाम्यांना लॉजिक माफ असतं.
लताजींच्या अतिदुर्लक्षित
लताजींच्या अतिदुर्लक्षित गाण्यांपैकी एक.
नेटफलिक्स वर "हेड गेम्स"
नेटफलिक्स वर "हेड गेम्स" नावाची टेड टॉक वरची डॉक्यूमेंट्री पाहिली. "लाय स्पॉटिंग" या विषयावरची ही डॉक्यूमेंट्री खूप आवडली. पामेला मेयर हिने सम्पूर्ण भाषण दिले. तिचे या विषयावरचे पुस्तकही बाजारात उपलब्ध आहे. पामेला च्या मते आपण सारेचजण अनेकदा खोटे बोलतो. .... कळत किंवा नकळत. अनेक असत्य ही समोरच्या माणसाला बरे वाटावे म्हणून बोलली जातात - उदा - तू या पोशाखात जाड दिसत नाहीस, सारखी. पण आपण सारेच जण एकमेकांना अनेक वेळा फसवत असतो.
पुढे बिल क्लिंटन ने मोनिका लेविन्स्की बद्दल बोललेले असत्य कसे होते ते त्याच्या बॉडी laग्वेजवरून स्पष्ट केलेल आहे. एक उदाहरणही दाखविले आहे ज्यात एका आईने मुलांचा खून करुन पोलिसांत रिपोर्ट लिहिलेली आहे पण तिच्या बॉडी laग्वेजवरून पॉलीसानी तिचा गुन्हा शोधला आहे.
लाय स्पॉटिंग ची काही तंत्रे (टेक्निक्स) या भाषणात चर्चिल आहेत.
गेल्या विकांताला राजा केळकर
गेल्या विकांताला राजा केळकर संग्रहालय पाहिलं. जवळ जवळ २० हजार संग्रहित वस्तुंपैकी फक्तं २५०० वस्तु संग्रहालयात ठेवलेल्या आहेत. एकुण ९ दालनात विभागलेलं संग्रहालय बघण्याजोगं आहे. मला वाटलं होतं की भाचरं कंटाळतील, पण त्यांनी अतिशय उत्साहाने एकेक वस्तु बघितली आणि प्रश्न विचारून बेजारही केले.
अवांतर १ - संग्रहालयाबाहेर एक रस्त्यावरचं दुकान आहे. तिथे पितळेच्या वस्तु आणि जुणी नाणी विकायला ठेवली होती. वरवर तांब्यासारखी दिसणारी हिरवट जंग चढलेली ५ नाणी (सुरवातीचा भाव ५० रू.ला १) १०० रूपयांना घेतली. घरी आल्यावर भाचा त्याबरोबर खेळत होता, नाणी एकावर एक वाजवली जात होती. आवाज अगदी दगड्/सागरगोटे एकमेकांवर वाजवल्या सारखा येत होता म्हणून बत्त्याने एक फोडून पाहिले. दगड निघाला. आम्ही फसलो. तुम्ही फसु नका.
अवांतर २ - कुणीतरी इथे मागे म्हणालं होतं की संग्रहलय सकाळीच उघडतात, ते पण आठ-दहा किंवा जास्तं जण बघायला आले तरच! त्यांच्या वेबसाईटवर दिलेल्या फोनवर बोललो असता कळाले की दररोज सकाळी ९.३० ते सांयंकाळी ५.३० पर्यंत ते उघडे असते. मोठ्यांसाठी प्रवेश ३० रू. तर लहानांसाठी १० रू. फोटो काढायचे असतील तरे जादा २०० रू.
अवांतर ३ - खटकलेली गोष्टं म्हणजे, वस्तुंना हात लावू नका लिहिलेले असताना जवळ जवळ सगळेच बर्याच वस्तुंना (ज्या काचेच्या केस मधे नव्हत्या) हात लावून बघत होते. शिवाय, मोठे लोक मोठ्याने बोलत होते. त्यात भर म्हणून एक शाळेतल्या मुलांचा समुह तिथे आला, त्यांचा कलकलाट अवर्णनीय होता. सोबतचे शिक्षकांनी काहिही शिस्तं ठेवायचा प्रयत्न केला नाही.
-अनामिक
+१
विविध भारतीय संग्रहालयात फिरल्यानंतर क्र ३ ची सवय झाली आहे, किंबहुना निर्ढावलेपण आले आहे
हा अनुभव वस्तुसंग्रहालया प्रमाणेच चित्रप्रदर्शनातही अनेकदा येतो. विकांताला मुंबईत काळाघोड्याच्या जहांगीर आर्ट ग्यालरी नामक प्रकारात तर कागदी पुंग्या/भिरभिरे/अव्याहत चाललेली तोंडे सोबत घेऊन बहुदा बाहेरच्या उन्हाच्या काहिलीपासून वाचायच्या उद्देशाने शेकड्याने जनता दालनांमध्ये बागडत असते.
हातातील प्लास्टिक पिशव्यांचे आवाज, फट्यॅक-फट्यॅक 'चपल्या' वाजवत हुंदडणारी मुले यांना घेऊन वाढती महागाई, 'बेशिस्त व चुकार' सरकार (!!!) यांच्यावर चणे/गुटखा वगैरेंनी भरलेल्या तोंडाने यथेच्छ तोंडसूख घेत प्रदर्शने/संग्रहालये यांचा आस्वाद घेणारी जन्ता पाहिली की ज्या द्रष्ट्या व्यक्तींनी इतकी उस्तवार करून ही संग्रह केले/चित्रे काढली/शिल्पे बनवली त्यांचीच कीव येऊ लागते
- ऋ
-------
लव्ह अॅड लेट लव्ह!
केबिन इन द वुड्स
कसा माहित नाही पण माझ्या हार्ड डिस्क मध्ये 'केबिन इन द वुड्स' नावाचा इंग्रजी चित्रपट दिसू लागला, विकीवर बघितले तर त्याला बरेच अवॉर्ड्स मिळालेले आहेत, नावावरून हॉरर वाटतोय, बरेच दिवसात हॉरर चित्रपट बघितलेला नाही म्हणून कथा न वाचता चित्रपट विकांताला बघितला. (हा हन्त हन्त!!!)
या इतके विनोदी टॉर्चर फारच क्वचित बघायला मिळते.
तुमचा एखादा/अनेक शत्रु असतील त्यांच्यासमोर याच चित्रपटाची वारेमाप स्तुतीकरून त्यांना हा चित्रपट बघायला उद्युक्त करावे असे सुचवेन
- ऋ
-------
लव्ह अॅड लेट लव्ह!
कसा माहित नाही?
कसा माहित नाही>>>? स्वतःहूनच तुझ्या हार्ड डिस्क मधे आला नाही ना? शेवटी हॉरर पिक्चर आहे
नेटफ्लिक्स वर स्ट्रीमिंग वर दिसतोय. बघावा काय?
हा हा! बाकी, अरेच दिवसांत
हा हा!
बाकी, अरेच दिवसांत कोणावर वैतागला नसाल तर नक्की बघा.. (ती हौस पूर्ण होईल)
- ऋ
-------
लव्ह अॅड लेट लव्ह!
'दी कॉन्ज्युरिंग' पाहिला होता
'दी कॉन्ज्युरिंग' पाहिला होता काय? तद्दन फॉर्म्युलापट असून मला रीतसर भीती वाटली होती. फारच मस्त बनवलेला सिनेमा.
-मेघना भुस्कुटे
***********
तुन्द हैं शोले, सुर्ख है आहन
होय काही महिन्यांपूर्वी
होय काही महिन्यांपूर्वी (एकदाचा) पाहिला... रितसर भिती +१
समांतरः हे वाच
- ऋ
-------
लव्ह अॅड लेट लव्ह!
येस्स!! इतर पिच्चरमध्ये भूत
येस्स!! इतर पिच्चरमध्ये भूत कोण आहे हे एकदा दिसले की फारसे काही वाटत नाही. पण इथे भूत दिसले तरी मस्त भीती वाटते. अन शेवटी भूत नक्की जाते कशामुळे हेही अतिशय उद्बोधकरीत्या दाखवले आहे.
माहिष्मती साम्राज्यं अस्माकं अजेयं
हा हा हा, असले अजून कोणते
हा हा हा, असले अजून कोणते शिनेमे आहेत??? बऱ्याच दिवसांनी त्यावेळेला भीती वाटलेली. त्याच दिवशी रात्री भुताखेतांच्या झक्कास गप्पा झाल्या.
इथे कोणाला आहेत काय काही अण्भव???
मुंबईतली प्रदर्शनं
सध्या मुंबईत अनेक प्रदर्शनांची लयलूट आहे. त्यांपैकी अँटवर्पमधून आलेल्या फ्लेमिश चित्रांच्या प्रदर्शनाबद्दल मी ह्याआधी ह्याच धाग्यात लिहिलं होतं. छ. शि. उर्फ प्रिन्स ऑफ वेल्स संग्रहालयातच सध्या आणखी दोन रोचक प्रदर्शनं चालू आहेत. त्यांपैकी एक म्हणजे ब्रिटिश म्यूझिअममधून आलेला सायरस सिलिंडर आणि त्या निमित्तानं चालू असलेलं पर्शिअन संस्कृतीबद्दलचं प्रदर्शन. त्याशिवाय 'प्रोग्रेसिव्ह आर्टिस्ट्स ग्रुप'चा काही काळ भाग असलेले मोहन सामंत ह्यांच्या कामाचं प्रदर्शनदेखील संग्रहालयातल्या जहांगीर निकोलसन दालनात सुरू आहे.
समोर NGMAमध्ये पारशी समाजाविषयीचं एक महत्त्वाचं प्रदर्शन चालू आहे. जहांगीर आर्ट गॅलरीशेजारच्या म्यूझिअम गॅलरीमध्ये (मॅक्सम्युल्लर भवन) भूपेन खक्कर ह्यांच्या स्मृतीत अनेक समकालीन कलाकारांनी निर्माण केलेल्या कलाकृतींचं प्रदर्शन चालू आहे.
नव्यानं उघडलेल्या दिल्ली आर्ट गॅलरीत (रिदम हाऊसच्या शेजारची सिनॅगॉगची गल्ली) 'प्रोग्रेसिव्ह आर्टिस्ट ग्रुप'मधल्या कलावंतांचं प्रदर्शन चालू आहे. हुसेन, रझा, सूझा, आरा, गाडे, बाकरे, तय्यब मेहता, अकबर पदमसी अशा अनेक महत्त्वाच्या कलाकारांचं काम एका ठिकाणी पाहायला मिळणं ही एक अभूतपूर्व पर्वणी आहे. इच्छुकांनी नक्की लाभ घ्यावा. (प्रदर्शन ३१ तारखेपर्यंतच आहे.)
लोअर परळला हाय स्ट्रीत फिनिक्स मॉलच्या शेजारी नव्यानं उघडलेल्या 'परसेप्ट आर्ट गॅलरी'मध्ये प्रभाकर बरवे ह्यांच्या कामाचं प्रदर्शन चालू आहे. 'कोरा कॅनव्हास'चं इंग्रजी भाषांतर शांता गोखल्यांनी केलं आहे. त्याचं प्रकाशनही ह्या प्रदर्शनात नुकतंच झालं. बरव्यांचं काम इतक्या मोठ्या प्रमाणात एकत्र पाहायला मला तरी कधीच मिळालेलं नव्हतं. अजिबात चुकवू नये असं हे प्रदर्शन आहे.
- चिंतातुर जंतू
"ही जीवांची इतकी गरदी जगात आहे का रास्त |
भरती मूर्खांचीच होत ना?" "एक तूच होसी ज्यास्त" ||
ते सायरस सिलिंडर वालं
ते सायरस सिलिंडर वालं प्रदर्शन कधीपर्यंत सुरू असणारे म्हणे? वीकांतापर्यंत असेल तर जाईन म्हणतो.
अपडेटः
इथे पाहिल्यावर कळालं की २५ फेब्रुवारीपर्यंत असणारे प्रदर्शन. सायरस सिलिंडरसोबतच पर्शियन साम्राज्यातील सुमारे ३२ वस्तू आणि सोबत अशोकाचा एक एडिक्टदेखील दाखवणारेत. निव्वळ तोंपासू!!!! हे आता बघणार म्हणजे बघणारच.
माहिष्मती साम्राज्यं अस्माकं अजेयं
अर्रर्र प्रतिसाद उशीरा वाचला
अर्रर्र प्रतिसाद उशीरा वाचला
कालच मुंबईत अतिशय धावती भेट झाली.
- ऋ
-------
लव्ह अॅड लेट लव्ह!
ह्यावर भेट दिलेल्यांनी काही
ह्यावर भेट दिलेल्यांनी काही लिहावं किंवा फोटो डकवावेत हि विनंती.
मुक्काम पोस्ट लंडन हा भरत
मुक्काम पोस्ट लंडन हा भरत जाधव व मोहन जोशी यांचा अतिशय छान चित्रपट पाहीला. खूप आवडला.
राजीव नाईक यांचे व्याख्यान
पुण्यात राजीव नाईक यांचे 'नाटक व चित्र' या विषयावर व्याख्यान होणार आहे.
वेळ : रविवार दि. ५ जानेवारी, सकाळी ११ वा.
स्थळ : सुदर्शन रंगमंच, काकासाहेब गाडगीळ पथ, अहिल्यादेवी शाळेजवळ, शनिवार पेठ.
- चिंतातुर जंतू
"ही जीवांची इतकी गरदी जगात आहे का रास्त |
भरती मूर्खांचीच होत ना?" "एक तूच होसी ज्यास्त" ||
प्रभाकर कोलते यांच्याशी खुली चर्चा
सुदर्शन कलादालनात चालू असलेल्या प्रदर्शनाच्या निमित्ताने चित्रकार प्रभाकर कोलते यांच्याशी खुली चर्चा आयोजित केली आहे.
वेळ : सोमवार दि. ६ जानेवारी संध्याकाळी सात वाजता.
स्थळ : सुदर्शन रंगमंच, काकासाहेब गाडगीळ पथ, अहिल्यादेवी शाळेजवळ, शनिवार पेठ.
- चिंतातुर जंतू
"ही जीवांची इतकी गरदी जगात आहे का रास्त |
भरती मूर्खांचीच होत ना?" "एक तूच होसी ज्यास्त" ||
कोरी अॅण्डरसन
न्यू झीलंडच्या कोरी अॅण्डरसन ने वन डे तील सर्वात कमी चेंडूतील शतकाचे शाहिद आफ्रिदीचे रेकॉर्ड काल मोडले. क्रिकइन्फो वर हायडेफ हायलाईट्स आहेत. जबरी खेळलाय. पॉवरफुल क्लीन हिट्स. हवेत स्विंग ई नसावा, पण तरीही टायमिंग जमले आहे जबरी. याच मॅच मधे जेसी रायडरने ४६ बॉल्स मधे मारले. ते एरव्ही त्याचीच न्यूज झाली असती.
http://www.espncricinfo.com/
एक दोन दिवस फ्रंट पेज वर असेल, नंतर त्या सिरीजच्या पानावर मिळेल (किवी - विंडीज)
क्रिश ३ पाहिला. चकाचक आहे.
क्रिश ३ पाहिला. चकाचक आहे. कंगना आणि विवेक मस्त दिसलेत. प्रियंका आणि ह्रितिक उगाच अधेमधे येऊन बोअर करतात
मुक्ता बर्वेच्या
This comment has been moved here.
-मेघना भुस्कुटे
***********
तुन्द हैं शोले, सुर्ख है आहन