फूड सेंटर का कोचिंग क्लासेस
नमस्कार मंडळी!
गेली पाच-सहा वर्षे नौकरी केल्यानंतर आता स्वतःचा व्यवसाय सुरु करावा असा विचार चालू आहे.
मला पूर्वी कुठल्याही व्यवसायाचा अनुभव नाही पण लागतील ते कष्ट करायची तयारी आहे.
तर ह्या विषयी काही शंका आहेत.
हा माझा पहिलाच अनुभव असल्यामुळे स्वताहून सगळ मुळापासून करण्यापेक्षा एखाद्या यशस्वी ब्रांडची फ्र्यान्च्याय्झी घ्यावी असा विचार आहे.
माझी गुंतवणुकीची मर्यादा ६-७ लाखापर्यंत आहे.
फूड सेंटर सुरु करणे जास्त चांगलं असेल की कोचिंग क्लास्सेस (IIT, CET इत्यादी)?
ह्या मध्ये कुठल्या समस्या येऊ शकतात आणी काही सूचना असतील तर इथे कोणी अनुभवी असतील त्यांनी कृपया मदत करावी.
तेच लिहित होतो, अन बूच मारलं तुम्ही.
नशीब कॉपी केलं होतं. हे घ्या:
>>>>
घेऊ नका. :)
अरे हो, कारण द्यायचे राहिले.
सुरुवातीला आपण प्रचण्ड कष्ट करून "आपला" व्यवसाय एस्टॅब्लिश करतो. यासाठी जी काही जीवतोड मेहनत करीत असतो, ती करून आपण फक्त आपल्या खर्चाने व कष्टाने ब्रँडवाल्याच्या घराला सोन्याची कौले घालत आहोत, हे कळेपर्यंत किमान ४-५ वर्षे निघून जातात.
तोपर्यंत, आपण आपला समजून वाढवलेला वेल नसून तो साप आहे, अन तो साप त्या ब्रँडवाल्याचा आहे हे आपल्याला समजते. ज्या दिवशी आपण एस्टॅब्लिश्ड ब्रँडवाल्याशी बोलणी करायला जातो, उदा. चितळे. की बाबा, हे बघ तुझा सेल झीरो पासून सुरू करून आमच्या गावात आता अठवड्याला ६ ट्रक माल खपतो आहे. त्या मोबदल्यात तू जो पैसा मला देतो आहेस तो अगदीच फाल्तू आहे. त्यावेळी तो कंपनीवाला तुम्हाला अतीशय सभ्य शब्दांत हाऽड करतो. मालक तर तुमच्याशी बोलतही नाही, कुणी तरी असिस्टंट म्यानेजर वगैरे तुमहाला सांगतो, की आता हला. आमची फ्रँचायजि घ्यायला अनेक लोक तयार आहेत. अॅक्चुअली तुम्हीच दिलेलं डिपॉझिट कमी आहे, ते वाढवून द्या नैतर तुमच्याऐवजी त्या तमुक यांना आम्ही कन्सिडर करत आहोत.
या प्वाइंटपर्यंत तुमची तिसरी उडी घ्यायची (उडी१=नोकरी, उडी२=एस्टॅब्लिश्ड ब्र्यांडची फ्रँचायझि) उमेद मेलेली असते. अन मग रडत खडत प्रवास सुरू रहातो...
इथपर्यंत वाचल्यावर हे लक्षात येईल, की एस्टॅब्लिश्ड ब्रँड्सची फ्रँचायझी घेण्यासाठी बेसिकली तो ब्र्यांड उदा. पुण्यात एस्टॅब्लिश्ड आहे, अन मल्कापूरला नाही, हे गृहित धरावे लागते. आधीच मल्कापूरला एस्टॅब्लिश्ड असेल, तर ती फ्रँचायझी घेण्यासाठी तुम्ही लै जास्त एस्टॅब्लिश्ड असावे लागता.
असो.
दोन चॉईसेसपैकी कोणता सिलेक्ट करावा याबद्दलचे काउन्सेलिंग थोड्यावेळाने.
प्रतिसादाबद्दल धन्यवाद. वर
प्रतिसादाबद्दल धन्यवाद.
वर केल्याप्रमाणे जो ब्र्यांड आधीच एस्तब्लिश झालेला आहे त्याची फ्र्यान्च्याझी घेण्याचा विचार आहे. तेंव्हा कष्ट करून दुसर्याचा नाव मोठा करण्याचा प्रश्न नाहि.
आणी जी फ्र्यान्च्याझी मी घेण्याचा विचार करतोय त्याच्यामध्ये कमिशन सोडला तर बाकीचा नफा माझाच असेल.
कृपया दोन चॉईसेसपैकी कोणता सिलेक्ट करावा याबद्दलचे काउन्सेलिंग करावे
तेच लिहित होतो, अन बूच मारलं
तेच लिहित होतो, अन बूच मारलं तुम्ही.
खिक्क :ड
खाली विमे ने लिहिल्याप्रमाणे तुमचा कल लै जास्त महत्वाचा, तुम्हाला काय चांगलं जमतं ते आधी पहा.
व्यवसाय एस्टॅब्लिश करणं हे लै महत्वाचं आहे. फिल्ड वर्क मुळे एकंदर कॅश फ्लो समजतील आणि एस्टॅब्लिश मॉडेल असल्यामुळे तोट्यात जाण्याची शक्यता कमी. भांडवल जपणं आणि वाढवणं महत्वाचं.
एस्टॅब्लिश करायचा अनुभव असलेले लोकं जनरली बिझनेस बदलत रहातात. कमी पैशात घेऊन महागात विकायचे. एकंदर बघताना बर्याच गोष्टी पाहील्या पाहीजेत. आणि मुख्य म्हणजे डोमेन एक्सपर्टशी बोललं पाहिजे. इथे तोंड वर करुन सल्ला द्यायला माझं नोकरीवाल्याचं काय जातंय, पैसे तुमचे लागणार आहेत. त्या त्या विषयातील अनुभवी व्यक्तीशी बोला. आणि सर्वात मुख्य तुमचा कल पहा.
आता इथे किस पाडायचा म्हणून सहा लाखात हॉटेल/ फूड सेंटरचे मॉडेल करुन पाहू. मुख्य भांडी, टेबल खुर्च्या हेच पाचेक लाखा पर्यंत जाईल. किमान तीन महिन्याचे पगार आणि जागा भाडे (अकरा महिन्याचे?) वगैरे लागेल. नुसते डीलीव्हरी देणारे म्हणले तर जास्तीचे चार लोकं( त्यांच्याच गाड्या) टेबलं खुर्च्याची)कॉस्ट वाचेल. ठीक ठाक एरिया म्हणला तरी महीन्याचे भाडे लाखभर रुपये लागेल.
कस्टमर म्हणून मला नवीन ठिकाणी खाऊन पहायला प्रॉब्लेम नसतो. पण नवीन क्लास मी जॉईन शक्यतो करणार नाही.
मराठवाड्यातील
मूळच्या मराठवाड्यातील व नंतर संपूर्ण महाराष्ट्रात पसरलेल्या एका प्रथितयश दहावी-बारावी स्पेशल क्लासचालकांनी इतर क्लासचालकांना दटावणी, धमक्या वगैरे दिल्याच्या वावड्या ऐकल्या होत्या. सदर क्लासचालक मुंडे-महाजन-ठाकरे यांच्याशी अतिशय घनिष्ट संबंध ठेवून होते.
कोचिंग क्लासात पैसे जास्त
कोचिंग क्लासात पैसे जास्त मिळतील आणि तेही अॅडव्हान्समध्ये. पोर नापास झालं तर ते त्याच्या कर्माने, आणि पास झालं तर आमच्या पुण्याईने. ;)
पण...
कोचिंग क्लास हा "नावा"चा धंदा आहे. चांगलं नाव असेल तरच चालतो. (आणि याचा संबंध जाहिरातींशी नाही.) त्यामुळे त्यात जम बसवायला वेळ लागतो. (अपवादः कॅप्टिव्ह मार्केट. लहान शहरात जपानीच्या शिकवण्या चालवून मोप पैसे कमावणारी व्यक्ती जवळच्या नात्यात आहे. मोठ्या शहरात तिला कुत्रं विचारणार नाही.)
(अतिअवांतर)
(अपवादः कॅप्टिव्ह मार्केट. लहान शहरात जपानीच्या शिकवण्या चालवून मोप पैसे कमावणारी व्यक्ती जवळच्या नात्यात आहे. मोठ्या शहरात तिला कुत्रं विचारणार नाही.)
मुळात 'मोठ्या शहरां'त जपानी शिकण्याबद्दल - आणि तेही खाजगी शिकवणीतून - चौकशी करावयास कितीशी श्वानपथके येतील, याबद्दल साशंक आहे. (भूभू - आपले, चूभू - द्याघ्या.)
नबाशेठ, जपानी शिकवण्या हे
नबाशेठ, जपानी शिकवण्या हे मोठ्ठं मार्केट आहे. दिल्ली - मुंबै इंडष्टरियल कॉरिडॉरमध्ये मोप जपानी कंपन्या येऊ घातल्यात. जपानी - इंग्लिश - जपानी भाषांतर (लिखित आणि वाचिक) हा मोठा धंदा आहे.
त्यामुळे जपानी शिकल्यावर आपल्याला बरेच भूभू विचारतील असं पब्लिकचं मत आहे.
जपान्यांना एकंदरीतच विंग्रजी
जपान्यांना एकंदरीतच विंग्रजी शिकण्याचा कंटाळा असावा. कारणापरत्वे शिकायला लागलंच तर समर्थांच्या कुबडीप्रमाणे एक लांबट इलेक्ट्रॉनिक भाषांतरकार१ नेहेमी जवळ बाळगतात.
ऑटोमॅटिक अनुवादकांचं माहीत नाही, पण इडियम आणि जार्गन अनुवादकाच्या पचनी पडायला टायम लागेल असं माझं वैयक्तिक मत आहे. उदा. "barking up the wrong tree" किंवा "all hands to the pump" किंवा "the best laid plans" वगैरे अर्थच्छटेसह दुसर्या भाषेत नेणं शिंपल नाय.
फ्रेंच लोकांचं इंग्रजी म्हंजे... जाव दे. छान छान कन्यकांकडे बघून सोडून द्यायचं झालं...
--------------
१ते शेवटी यंत्रच असल्याने कमाल विनोद होतात. एका मैत्रिणीने नवीन कुत्रा आणला, आणि त्याला जवळ घेऊन "माया माया" करतानाचा फटु चेपुवर टाकला. त्यावर जपानी मैत्रिणीची कमेंट - "ohh...you look so cute when you are fondling the brute". पब्लिक हसून हसून संपलं!
काका, क्लासची फ्रँचाजझी घ्या
काका, क्लासची फ्रँचाजझी घ्या असं मला म्हणायचं नव्हतं.
क्लास, विशेषतः IIT/CET सारखे क्लास हा स्केलिंग / व्हॉल्यूम बिझनेस आहे. त्यामुळे फ्रँचाजझी घेतलीच तर फ्रँचाजझ फी ठरवण्याबाबत सतर्क रहा.
पर्याय १: ठोक रक्कम (अजिबात देऊ नका)
पर्याय २: ग्रॉस उत्पन्नाची टक्केवारी (अजिबात देऊ नका)
पर्याय ३: नेट प्रॉफिट शेयर (हे बरंय)
मग फूड-सेंटर सुरु करा असा
मग फूड-सेंटर सुरु करा असा सल्ला देईन. पुण्यात खादाडी करणार्यांची कमी नाही आणि फार क्वचित फुड-सेंटर असतात जे अगदीच चालत नाहीत नाहीतर पुण्यात हॉटेल्/उपहार गृहच काय अगदी अमृततुल्य (नावाजलेले) वाले सुद्धा लाखोंनी कमवतात आणि त्याला मरण नाही. अर्थात फुड-सेंटर ची जागा मोक्याच्या ठिकाणी हवी हे महत्त्वाचं.
क्लासच्या बाबतीत म्हणाल तर पुणे हे शिक्षणाचं माहेरघरच आहे त्यामूळे त्यालाही मरण नाही पण क्लास ला कसा एक विशिष्ट ग्राहक असणार (विद्यार्थी म्हणणार होतो पण क्लास कडे बिजनेस म्हणून पहाणार असाल तर ग्राहक हाच शब्द बरा वाटतो) तसे हॉटेल चे नाही, लहानांपासून म्हातार्यांपर्यंत सगळेच येणार. अर्थात क्लास ला लागणारा महिन्याचा मेंटेनन्स हा हॉटेलला लागणार्या महिन्याच्या मेंटेनंन्स ने बराच सोयीचा असेल ह्यात शंका नाही.
आणि हॉटेल एकदा नीट सुरू झालं, नाव झालं त्याचं की मग हॉटेलच्या गल्ल्यावर तुम्हाला बसायची गरज नाही ;)... आणि मग काय, क्लासही सुरु करा :D हाकानाका.
१) नोकरीचा कंटाळा आला
१) नोकरीचा कंटाळा आला म्हणून
२) बक्कळ पैसा कमवावासा वाटतो म्हणून
३) मराठी माणसाने धंदा केला पाहिजे असे वाटते म्हणून
४) नोकरीपेक्षा कमी कष्ट करावे लागतील असे वाटते म्हणून
५) दुसर्याच्या हाताखाली काम करायला आवडत नाही म्हणून
६) आयुष्यात काहीतरी "करुन दाखवले" पाहिजे म्हणून
यापैकी एक कारण असल्यास धंदा करू नये आणि यापैकी कारण नसल्यास कोणता करावा हा प्रश्न पडू नये.
पैसा कमावणे हीच धंद्याचा मूळ प्रेरणा
२) बक्कळ पैसा कमवावासा वाटतो म्हणून... यापैकी एक कारण असल्यास धंदा करू नये...
- हे थोडं विस्तृत करून सांगाल का?
- पैसा कमावणे हीच धंद्याचा मूळ प्रेरणा नाहीय का?
- बक्कळ पैसा कमावण्यासाठी धंदा सोडून इतर कोणकोणते मार्ग आहेत?
१) नोकरीचा कंटाळा आला म्हणून
५) दुसर्याच्या हाताखाली काम करायला आवडत नाही म्हणून
६) आयुष्यात काहीतरी "करुन दाखवले" पाहिजे म्हणून
ही कारणेही माझ्या मते धंदा करण्यास पुरेशी आहेत.
एखाद्या यशस्वी ब्रांडची फ्र्यान्च्याय्झी
घेऊ नका. :)