कॉकटेल लाउंज : ब्लु मंडे
आज शुक्रवार सप्ताहअखेर, एक कॉकटेल का हक तो बनता है|
‘कॉकटेल लाउंज’ मालिकेतील आजचे कॉकटेल आहे “ब्लु मंडे”
पार्श्वभूमी:
ब्लु कुरासो (blue curacao, pronounced as "blue cure-a-sow") हे निळ्या रंगाचे एक मस्त ऑरेंज बेस्ड लिक्युअर आहे, माझ्या आवडीचे. अतिशय भन्नाट चव असते ह्या लिक्युअरची. ब्लु कुरासो च्या भन्नाट चवीमुळे अतिशय मस्त कॉकटेल्स बनतात. ह्याचा नॉन अल्कोहोलिक सिरपही मिळतो जो मॉकटेल्स बनवण्यासाठी वापरला जातो.
प्रकार: वोडका आणि ब्लु कुरासो बेस्ड कॉकटेल
साहित्य:
| वोडका (ऑरेंज फ्लेवर्ड असल्यास उत्तम) | 1.5 औस (45 मिली) |
| क्वांत्रो (दुसरा पर्याय – ट्रिपल सेक) | 0.5 औस (15 मिली) |
| ब्लु कुरासो | 0.5 औस (15 मिली) |
| लिंबाचा काप सजावटीसाठी | |
| बर्फ | |
| कॉकटेल शेकर | |
ग्लास: – कॉकटेल

कृती:
सर्वप्रथम कॉकटेल ग्लासमधे बर्फ आणि पाणी टाकून ग्लास फ्रॉस्टी होण्यासाठी फ्रीझमधे ठेवा. शेकर मध्ये बर्फ टाकून त्यात अनुक्रमे वोडका, क्वांत्रो (pronounced as "qwan-tro") आणि ब्लु कुरासो ओतून घ्या. शेकर व्यवस्थित शेक करून घ्या. शेकर खालच्या फोटोप्रमाणे दिसला पाहिजे.

लिंबाचा काप ग्लासच्या कडेला सजावटीसाठी लावा.

आकर्षक ब्लु मंडे तयार आहे. :)


नोट: नविन घेतलेल्या कॉकटेल नाइफने काहीतरी प्रयोग करायचा प्रयत्न केला लिंबाच्या कापावर पण तो जरा ग़ंडला, त्यामुळे तो काप जरा 'टाईट' झाल्यासारखा दिसतो आहे. ;)
पुण्यात १. दोराबजी
पुण्यात
१. दोराबजी (कॅम्प)
२. घुले वाइन्स (कॅम्प) ह्या दोन ठिकाणी नक्की मिळतील.
महाग किंवा स्वस्त आहे का हे फार व्यक्तिसापेक्ष आहे. तुम्हाला स्वस्त वाटणार्या वस्तू माझ्यासाठी फार महाग असू शकतील.
मी माझा स्टॉक शक्यतो ड्युटी फ्री शॉप्स मधून घेतलेला असतो. ड्युटी फ्री शॉप्समध्ये किमती खालील रेंज (नक्की किमती आता आठवत नाहीत) प्रमाणे१:
क्वांत्रो : २०-२६ U$D
ब्लु कुरास्सो : १०-१३ U$D
अॅब्सोल्युट वोडका : १४-१८ U$D
भारतात वाइन शॉपमध्ये विकत घेतल्यास ह्या किंमतींवर ८०-१२५२ % इंपोर्ट ड्युटी लागते आणि किंमत त्याप्रमाणात वाढते.
- (साकिया) सोकाजी
-----------------------------------------------------------------------------
१ ह्या किमती वेगवेगळ्या देशात, त्या - त्या ड्युटी फ्री शॉप्सच्या किमतीप्रमाणे बदलू शकतात.
२ माझ्याकडे ह्याबद्दल खात्रीलायक विदा नाही
एक शक्यता
सोकाजीरावांना यापूर्वी चांगला टेबलक्लॉथ वापरण्याची परवानगी असताना कॉकटेलचे नाजूक ग्लास, लॅपटॉप, कॅमेरा वगैरे धडपडीत एखाद्या बाटली किंवा ग्लासने कवायती करुन त्या टेबलक्लॉथची वाट लावली असावी. किंवा ग्लासात कॉकटेल ओतताना त्याचे काही ओघळ टेबलक्लॉथवर गेले असण्याची शक्यताही नाकारता येत नाही. त्यामुळे गृहमंत्रालयाने टेबलक्लॉथ वापराची परवानगी रद्द केली असावी ;)
+
त्यात पुन्हा यांनी (टेबलक्लॉथऐवजी) बाटलीतून/ग्लासातून सांडलेल्या द्रव्याबद्दल हळहळ व्यक्त केली असणार१ - मग का नाही करणार गृहमंत्रालय परवाना रद्द?
आमच्या गृहमंत्रालयानेदेखील हेच केले असते!
- (नवरा२) 'न'वी बाजू.
--------------------------------------------------------------------------------------
१ 'इट्स नो यूस क्राइंग ओव्हर द स्पिल्ट निळे/सोनेरी द्रव्य' हा दृष्टान्त (की सिद्धांत?) पंतांना कोणीतरी समजावून सांगावयास हवा.
२ आमच्या गृहमंत्रालयाचा. आणि टिपिकल३.
३ आमच्या गृहमंत्रालयाकडून सर्टिफाइड.
एक निरीक्षण
कॉकटेल-(किंवा-या-प्रकारच्या-ग्लासास-जे-काही-म्हणत-असतील-ते१)-ग्लासाच्या पावलाखालील किमतीच्या लेबलाचे अवशेष (ग्लास) धुवूनही पुरते गेलेले दिसत नाहीयेत - ग्लास नवा दिसतोय!२
-----------------------------------------------------------------------------------------------
१ कारण शेवटी आम्हीं भटेंच - त्याला काय करणार? - पु. ल.
२ तारीफ अधिक टोमणा. (साभार: पुन्हा पु. ल.)
(अतिअवांतर)
आमच्याकडे अशाच काहीशा डिझाइनचा शर्टही असल्याचे स्मरते. (कोणास ठाऊक, जमल्यास - सवड झाल्यास आणि तितका उत्साह राहिल्यास / कंटाळा न आल्यास पुढेमागे फोटो काढून येथेच डकवूसुद्धा१.)
------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------
१ निव्वळ शर्टाच्या फोटोबद्दल प्रस्तुत विधान केलेले आहे; या विधानातून (१) 'त्या शर्टात आम्ही असू'२, अशा प्रकारचे कोणतेही (एक्स्प्लिसिट किंवा इम्प्लाइड) वचन व्यक्त केलेली नाही अथवा निर्माण होत नाही, आणि (२) मुळात असा फोटो आम्ही निश्चितपणे डकवूच, असेही कोणते वचन दिलेले नाही अथवा अध्याहृत नाही अथवा निर्माण होत नाही, याची सर्व संबंधितांनी कृपया नोंद घ्यावी.
२ 'आदमी है, या पजामा?', अशी एक म्हण (किंवा वाक्प्रचार, जे काही असेल ते) बहुधा सर्वपरिचित असावी. त्याच धर्तीवर, 'आदमी है, या कमीज़? बदतमीज़!' अशी एखादी म्हण आमच्याही पाठी सुरू व्हावी, अशी एक जबरदस्त (परंतु सुप्त) मनीषा आम्ही मनात बाळगून आहोत, याचा गौप्यस्फोट या निमित्ताने येथे करणे बहुधा अस्थानी ठरू नये. (चूभूद्याघ्या.)
हे राम!
च्यामारी,
एखाद्याचा१ बाजार कसा उठवावा ह्याचा वस्तुपाठ ठरावे असे एक से एक प्रतिसाद!
अगदी 'कॉकटेल नको पण पंचा बदल' असा मेसेज देणारे! :D ह्याची सुरवात सविताने केलीय ह्यीची नोंद घेण्यात आली आहे!
मेरे पंचे का मजाक उडाने वालों, शराबी जनता माफ नाही करेगी... अबकी बार मोदी सरकार..... ;)
- ('पंचा'कर्मी) सोकाजी
-----------------------------------------------------------------------
१पक्षी: कोणीही... मनुष्य, वस्तू (सजिव, निर्जीव)
!
मेरे पंचे का मजाक उडाने वालों, शराबी जनता माफ नाही करेगी... अबकी बार मोदी सरकार.....
या दोन वाक्यांतील तिहेरी विरोधाभास आपल्या मद्यधुंद१ नजरेतून सुटला नसावा, अशी आशा व्यक्त करतो.
-----------------------------------------------------------------------
१ टेक इट अॅज़ अ काँप्लिमेंट.
हे घे...
- (साकिया) सोकाजी
अहाहा, तो अस्मानी रंग पाहूनच
अहाहा, तो अस्मानी रंग पाहूनच 'दिल को ठंडक मिल गई' ... नेहमी प्रमाणेच लाजवाब!