Skip to main content

मराठी भाषक हवेत

एका प्रकल्पांतर्गत मराठी भाषेतील उच्चारांचा अभ्यास केला जाणार आहे. या अभ्यासार्थ, मराठी भाषकांनी उच्चारलेले शब्द आणि वाक्ये ध्वनिमुद्रित केले जातील. यासाठी प्रकल्पातील अभ्यासकांना ५ स्त्री व ५ पुरुष मराठी भाषकांच्या मदतीची आवश्यकता आहे.

भाषकांबद्दलः
वय- २५ ते ३५ वर्षे
शिक्षण- प्राथमिक शिक्षण मराठीतून आणि कोणत्याही क्षेत्रातील पदवी
राहण्याचे ठिकाण- मुंबई

मानधन- आहे.

जर तुम्हाला यात सहभागी व्हायचे असेल, तर अधिक तपशील मिळवण्यासाठी plspeakers@gmail.com या पत्त्यावर लवकरात लवकर संपर्क साधा.

धन्यवाद.
(ही बातमी येथे टाकण्याची परवानगी दिल्याबद्दल 'ऐसी...'च्या प्रशासनाचे खास आभार :-))

नितिन थत्ते Thu, 21/03/2013 - 13:18

In reply to by राधिका

वयोगट २५-३५ आहे हे कळलं. पण त्या गटातले काही सदस्य मुंबई बाहेर आहेत असं म्हणतायत. मी सध्या आहे मुंबईत म्हणून विचार होता. पण जौंद्या. काही विशेष कारण असणार याच वयोगटालल्यांना घेण्याचं.

राधिका Thu, 21/03/2013 - 13:43

In reply to by नितिन थत्ते

मुंबई-पुण्याच्या व्यक्ती चालणार आहेत. परंतु, सर्व सत्रे मुंबईतच होणार असल्याने मुंबईत राहणारे किंव पुण्यात राहूनही मुंबईत येजा करू शकणार्‍या व्यक्तींची मदत हवी आहे.
हा वयोगट सहेतुक योजलेला आहे.

३_१४ विक्षिप्त अदिती Wed, 20/03/2013 - 21:20

(मुंबईबाहेर असल्यामुळे कोरड्या) शुभेच्छा. यथावकाश प्रकल्पाबद्दल अधिक माहिती, निष्कर्ष इत्यादी लिहीता येतील काय?

राधिका Wed, 20/03/2013 - 22:08

In reply to by ३_१४ विक्षिप्त अदिती

प्रकल्पप्रमुखांकडून अनुमती मिळाल्यास जरूर लिहिता येईल. परंतू त्यालाही ८ महिने- वर्षभर लागेल. प्रयत्न नक्की करणार.
:-)

राजेश घासकडवी Wed, 20/03/2013 - 22:26

In reply to by राधिका

जर तुम्ही हा अभ्यास कुठल्या जर्नलमध्ये पब्लिश करणार असाल किंवा प्राथमिक विदा एखाद्या कॉन्फरन्समध्ये मांडणार असाल तर त्यानंतर त्याविषयी लिहिण्यास कोणाचीच अनुमती लागणार नाही. अर्थात ही जर काही राष्ट्रीय सुरक्षेची वगैरे भानगड असेल तर मात्र कदाचित विशिष्ट वर्तुळांपलिकडे कुठेच प्रसिद्ध होणार नाही याची काळजी घ्यावी लागेल. :)

मन Wed, 20/03/2013 - 21:32

पुण्यात कधी येताय?
बादवे, वीकांतास येउन्-जाउन सहभाग घेतला तर चालेल का ?
मानधन किती आहे?
सहभागी व्यक्तीचा किती वेळ खर्ची पडणे अपेक्षित आहे?

राधिका Wed, 20/03/2013 - 21:48

In reply to by मन

पुण्यात कधी येताय?

दुर्दैवाने पुण्यास येता येणार नाही.

बादवे, वीकांतास येउन्-जाउन सहभाग घेतला तर चालेल का ?

होय.

मानधन किती आहे?
सहभागी व्यक्तीचा किती वेळ खर्ची पडणे अपेक्षित आहे?

ही माहिती व्य.नि. तून पाठवते आहे.

ऋता Wed, 20/03/2013 - 22:46

'वधू/वर पाहिजे' या वर्तमानपत्रात येणार्‍या सदराच्या धर्तीवर 'मराठी भाषक हवेत' ही पोस्ट वाटली.
५ स्त्री आणि ५ पुरूष हे वाचून निशाणी डावा अंगठा या चित्रपटातले '...सहा मेल...सहा फीमेल...' हे गाणं आठवलं.

गैरसमज नसावा....तुमच्या उपक्रमाला मनापासून शुभेच्छा.