मेदिनी
सर्व वाचकांना चवदा मार्चच्या, अर्थात 'पाय' दिनाच्या शुभेच्छा. एक कविता:
व्रण हा रक्तवर्णी ज्या दक्षिणस्तनी
कृष्णमिलिंदकेंद्रबिंदू तिथे
विलसलसतो धवलासनी
पुष्कळे पुष्टरमणी चिंबनितंबवलये
अचपळमनमोहन गहनगंधप्रिये
अंगांगदंगसंभोगिनी मेदिनी
❊
३ व्रण १४१५९.....
मेदिनी =३
व्रण = . (बिंदू = पाईंट)
हा = १
रक्तवर्णी= ४
ज्या = १
दक्षिणस्तनी =५
.
.
.
इत्यादी. म्हणजे 'पाय' ची किंमत लक्षात ठेवण्याचे सूत्र. 'पाय' दिवशी कविला पयोधर आठवलेले दिसतात. बराच रसिक आहे. :)
ही रेग्यांची (रेगे म्हणजे पुशि... मेपु नव्हे)'पुष्कळा'. यावरून श्रीदेवी (बहरीच्या काळातली, आत्ताची नव्हे) आठवावी.
पण हा (दाताने चावल्याचा?) व्रण बिंदुवत कसा ते काही समजले नाही. की तिथे डास चावला होता? ;)
हा श्लोक तर नव्हे?
आपण म्हणताय तो श्लोक हा तर नव्हे?
गोपीभाग्यमधुव्रात-श्रुंगिशोदधिसंधिग |
खलजीवितखाताव गलहालारसंधर ||
[ मी संस्कृतचा अभ्यासक नाही त्यामुळे वरील टंकनात जर कुठे काही चूक झाली असल्यास विद्वानांनी ध्यानात आणून द्यावी ही नम्र विनंती. (टंकन केल्यानंतर जालावर थोडासा शोध घेतला असतां ह्याच श्लोकाच्या २-३ आवृत्ती (व्हर्जन्स??) दिसल्या.) ]
गणित आणि संस्कृतचा प्रसार.
नितंब हा शब्द मला नेहेमी अश्लील वाटतो, या वेळेस वाटला नाही.>>>
का बरे? मला तर एरवी सभ्य वाटतील असे 'वलये' 'गहनगंधप्रिये' वगैरे शब्दही अश्लील वाटले.. :p
बाकी अश्या रचनांचा अधिकाधिक प्रसार ़केला तर विद्यार्थ्यांना गणित आणि संस्कॄत दोन्ही विषयांत(नो पन) गोडी निर्माण व्हायला मदत होईल असे वाटते!
उलट...
बाकी अश्या रचनांचा अधिकाधिक प्रसार ़केला तर विद्यार्थ्यांना गणित आणि संस्कॄत दोन्ही विषयांत(नो पन) गोडी निर्माण व्हायला मदत होईल असे वाटते!
विषयांतर होईल कदाचित, परंतु तरीही, अशा मार्गांतून, पक्षी भलत्या विषयाची भलत्या विषयाशी सांगड घालण्यातून, याच्या नेमके उलट होण्याची, पक्षी विषयावरील१ वासना२ उडून जाऊन विषयाविषयी३ अनास्था निर्माण होण्याचीच शक्यता अधिक वाटते, असे मत नमूद करावेसे वाटते.
======
तळटीपा:
१, ३ कोणत्याही.
२ असल्यास. मुळात विषयासक्ती नसल्यास असे होण्याचा संभव उद्भवू नये.
धड ना पॉर्न, धड ना "पॉर्नेतर"
धड ना पॉर्न, धड ना "पॉर्नेतर" अशा चाळवू पहाणार्या वाङ्मयात हा शब्द वापरल्याचं पाहिल्यामुळे हा शब्द अश्लील वाटतो. एखाद्याला/एखादीला त्यात बुडाचं सौंदर्यही दिसू शकेल. कदाचित अलिकडेच 'कपलिंग' मालिका आणि त्यात स्त्री-पुरुषांची पार्श्वभागाकडे बघण्याची निरनिराळी दृष्टी समजल्यानंतर शरीराचा हा भाग फार रोचक वाटेनासा झाला आहे.
'कपलिंग'मधली सॅली सतत आपलं बूड फार वाढतं आहे अशी तक्रार करत असते. आपलं बूड आपल्या'मागे' सतत चरत असतं अशीही तिची एक थिअरी असते.
व्रण
मी मला हवं तसं लिहिलं, आता वाचणाऱ्याने त्याला हवं तसं वाचावं. पण तरीही एक गोष्ट नमूद करावीशी वाटते. कित्येक देशांत (फ्रान्स, इटली इत्यादि) दशांशचिन्हासाठी बिंदू न वापरता स्वल्पविराम वापरतात. उदाहरणार्थ, पाच युरो चाळीस सेंट ही किंमत € 5,40 अशी लिहितात. ज्यांनी मिलान किंवा पॅरिसच्या विमानतळावर (विंडो)शॉपिंग केलेलं आहे, त्यांना हे परिचयाचं असावं. व्रणाविषयीच्या शक्यता विनाकारण मर्यादित होऊ नयेत हा हेतू.
पाय दिनाच्या
पाय दिनाच्या शुभेच्छा!
अदितीला खास शुभेच्छा!
अवांतर: सर्व कवी लोकांनी कवितेसोबत त्यामागची कल्पना टाकली तर बरं होइल.. थोडक्यात रसग्रहण.. किँवा जे काही म्हणतात ते..