वीजबील कमी करण्याचा एक जालीम उपाय!
वीजबील कमी करण्याचा एक जालीम उपाय!
दर महिन्याला आलेल्या बिलाच्या दुप्पट रकमेचा भरणा करावा. पुढच्या बिलामध्ये ॲडजस्टमेण्ट होते तेव्हा बील एकदम कमी झालेले दिसते. त्याने मनावरचा ताण हलका होतो. परत आलेले बील दुप्पटच भरावे. पुढच्या बिलामध्ये ॲडजस्टमेण्ट होते तेव्हा बील एकदम कमी झालेले दिसते.
ही साखळी अशीच चालू ठेवल्यास बीज बिल कमी झाल्याचे चिरस्थायी समाधान लाभते...
गेले वर्षभर माझे बिल अचानक कमी, अधूनमधून "शून्य" येत असल्याने मी खूप आनंदात होतो. शोध घेतल्यावर लक्षात आले की मी दरवेळेला दोनदा बिल भरत होतो.
जनहितार्थ प्रसारित
--राजीव उपाध्ये
लोल
माझं क्रेडिट रेटिंग असं अचानक वाढलं होतं. हाॅस्पिटलानं मला एकदम मोठी रक्कम परत केली. तेव्हा मला समजलं की महिन्याच्या महिन्याला पैसे भरण्याजागी पाच-पन्नास खर्च झाल्यावर लगेच पैसे भरायचे म्हणजे क्रेडिट रेटिंग फार वाढून आपल्याला खूप श्रीमंत असल्यासारखं वाटतं.
जालीम समाधान
आपल्याच हातात.