Skip to main content

ही बातमी समजली का - भाग १७७

अनेक बातम्यांबद्दल आपल्याला चर्चा करावीशी वाटते. खरं तर, 'ऐसी अक्षरे'वर बातम्यांवर चर्चा करण्यासाठी 'बातमी' नावाचा लेखनप्रकारही अस्तित्त्वात आहे. "ताज्या घडामोडी, अर्थकारण, राजकारण इत्यादी प्रकारच्या संस्थळाबाहेरील लिखाणाची चर्चा करण्यासाठी हा विभाग वापरावा. इथे मूळ लेखावरच्या शब्दसंख्येचे बंधन नाही; एखादी बातमी पसरवणे किंवा चर्चा घडवणे यासाठी हा विभाग वापरावा." असं तिथे स्पष्ट म्हटलेलंही आहे. पण, त्याबद्दल विस्तारानं लिहिण्याइतका किंवा एखादा व्यवस्थित चर्चाप्रस्ताव मांडण्याइतका वेळ किंवा माहिती किंवा उत्साह किंवा हे सारंच नसणं वगैरे कारणांमुळे आपण चर्चाप्रस्ताव लिहित नाही. शिवाय बऱ्याचदा "एकोळी" / नुसत्याच लिंका देऊन धागा काढायचंही जीवावर येतं. तेव्हा अशा बातम्यांवर चर्चा करण्यासाठी, एकमेकांना अशा बातम्या लक्षात आणून देण्यासाठी, त्यांचे दुवे देण्यासाठी हा धागा काढत आहे. एखाद्या बातमीवर विस्तारानं चर्चा सुरू झाल्यास त्या संवादाचे वेगळ्या 'बातमी' धाग्यात रुपांतर केलं जाईल.

आधीच्या धाग्यात ~१०० प्रतिसाद झाल्यामुळे नवा धागा.

---

नितिन थत्ते Mon, 18/06/2018 - 12:39

मोदींमुळे जगभरात भारताची पत ज्याम वाढली आहे.

प्रत्येक गोष्टीला मोदींना जबाबदार धरू नये तसेच नसत्या गोष्टींचं क्रेडिटही मोदींना देऊ नये.

गब्बर सिंग Mon, 18/06/2018 - 12:58

In reply to by नितिन थत्ते

मोदींमुळे जगभरात भारताची पत ज्याम वाढली आहे.

.
थत्तेचाचा, आपको क्या हो गया ?
.
ते बिलिमोरिया म्हणतात की हा भारताचा अवमान आहे. पण भारतीय विद्यार्थ्यांना अधिक कठोर चिकित्सेस तोंड द्यायला लागणे हा भारताचा अपमान कसा ?
.
काही गटांसाठी प्रवेशाची स्टँडर्ड्स घटवणे/कमी करणे म्हंजे त्या गटांना - तुम्ही कमी कॉम्पिटिटिव्ह आहात, तुम्ही मागास आहात, तुमच्याकडून कमी परफॉर्मन्स ची अपेक्षा आहे - असं सांगणे नाही का ? आता त्या गटांत अमेरिका व कॅनडा आहेत. पण ........
.
.

On a list already covering countries like the US, Canada and New Zealand, the Home Office has added on the likes of China, Bahrain and Serbia as countries from where students would face reduced checks on educational, financial and English language skill requirements to study at British universities.

.
.
------
.
आणि एफटीए ची च जर चर्चा असेल तर ही Tier 4 visa ची खेळी त्या संभाव्य निगोशिएशन्स् मधे लिव्हरेज प्वाईंट मिळावा म्हणूनच (ब्रिटन सरकारने) केलेली नसेल कशावरून ? हे मोदींच्या पथ्यावरच पडेल नैका ? की त्या निगोशिएशन्स मधे मोदींनी दुसरा कुठला तरी मुद्दा कन्सीड करायचा व या Tier 4 visa च्या मुद्द्यावर ब्रिटन ला राजी करायचं - आणि इकडे येऊन भारतात "जितं मया" चा आरडाओरडा करायचा.
.
.

नितिन थत्ते Mon, 18/06/2018 - 15:54

>>काही गटांसाठी प्रवेशाची स्टँडर्ड्स घटवणे/कमी करणे म्हंजे त्या गटांना - तुम्ही कमी कॉम्पिटिटिव्ह आहात,

गुड ट्विस्ट. पण प्रवेशाची स्टॅण्डर्ड्स कमी करणे हे "तुम्ही आमचे लाडके आहात" असे सांगणेही असते. आणि आधी कमी असलेली स्टॅण्डर्ड वाढवणे म्हणजे "आता तुम्ही नकोसे आहात" असे सांगणे.

बाय द वे मागासवर्गीयांना आरक्षण असणे म्हणजे "तुम्ही लै भारी आहात असं अनारक्षित गटातल्यांना सांगणे" हे जरा ओपन कॅटेगरीतल्यांना सांगून पहा.

पुंबा Mon, 18/06/2018 - 17:44

In reply to by नितिन थत्ते

बाय द वे मागासवर्गीयांना आरक्षण असणे म्हणजे "तुम्ही लै भारी आहात असं अनारक्षित गटातल्यांना सांगणे" हे जरा ओपन कॅटेगरीतल्यांना सांगून पहा.

असा प्रचार आरक्षणविरोधी सध्याही करतात की. मागासवर्गिय लोकांना सरकारचे जावई म्हटले जातेच.

गब्बर सिंग Tue, 19/06/2018 - 00:48

In reply to by नितिन थत्ते

मागासवर्गीयांना नाही सांगायचं उच्चवर्गीयांना सांगायचं की तुम्ही लै भारी.

.
कॉलेज मधे असताना मला अनेकदा (चर्चेदरम्यान) ॲक्च्युअली असं सांगण्यात आलं होतं की तुम्ही सिद्ध करा की तुम्ही विकसीत आहात.
.

गब्बर सिंग Mon, 18/06/2018 - 20:22

In reply to by नितिन थत्ते

गुड ट्विस्ट. पण प्रवेशाची स्टॅण्डर्ड्स कमी करणे हे "तुम्ही आमचे लाडके आहात" असे सांगणेही असते. आणि आधी कमी असलेली स्टॅण्डर्ड वाढवणे म्हणजे "आता तुम्ही नकोसे आहात" असे सांगणे.

.
चला असं समजा की हा ट्विस्ट आहे.
.
पण हे जे घडलं ते - मोदींमुळे जगभरात भारताची पत ज्याम घटली आहे याचे उदाहरण कसे ?
.
दुसरं अत्यंत साधं कारण हे सुद्धा असू शकतं की ब्रिटन मधे भारतीय विद्यार्थ्यांचं प्रस्थ आहे व ब्रिटन सरकारला इतर देशातल्या विद्यार्थ्यांनी सुद्धा यावं असं वाटत असेल. व म्हणून इतर देशांना प्राधान्य द्यायचा निर्णय त्यांनी दिला. इन्क्लुझिव्ह पॉलिसीज.
.

गब्बर सिंग Tue, 19/06/2018 - 00:49

In reply to by नितिन थत्ते

मी पत वाढल्याचाच दावा केला

.
तो तुम्ही खवचटपणे केला होता असा माझा (अनवॉरंटेड म्हणा हवंतर) समज.
.

नितिन थत्ते Tue, 19/06/2018 - 09:43

In reply to by गब्बर सिंग

खवचटपणे केला होता हे खरं पण तो "पत उतरली" म्हणून नव्हे तर "पत कै विशेष वाढली नै" अशी टाचणी लावण्यासाठी.

३_१४ विक्षिप्त अदिती Tue, 19/06/2018 - 19:46

In reply to by नितिन थत्ते

खवचटपणा आणि विनोद स्पष्ट करावे लागण्यासारखं दुःख नाही. त्याबद्दल थत्तेचाचांना सहानुभूती.

चिंतातुर जंतू Mon, 18/06/2018 - 15:08

एके काळचा मोदी समर्थक आणि निवडणूक प्रचारक भाजपमधून बाहेर पडताना सरकारचं मूल्यमापन करतो आहे -
Why I am resigning from the BJP: A Narendra Modi supporter and party campaign analyst explains

गब्बर सिंग Mon, 18/06/2018 - 20:48

In reply to by चिंतातुर जंतू

मूल्यमापन ???
.
The Ugly मधले मुद्दे -

(अ) १, ३, ६ हे एकमेकांच्या अत्यंत जवळचे, शेजारचे आहेत.
(ब) ४, ५, ७ हे सुद्धा जवळचे व शेजारचे आहेत.
(क) A list should be at least ME if not CE. MECE is the most desirable.
.
.
४, ५ बद्दल - युपीए सरकारने सेक्युलर वि. कम्युनल चे लेबलिंग चालवले होते. मोदी सरकारने फक्त त्याचा डायगोनल बदलला. लेबलींग तर सोनिया गांधींच्या विदेशी जन्माबद्दल सुद्धा केले गेले होते. व ते भाजपाने सुद्धा केले व राष्ट्रवादीने सुद्धा केले.
.
.
The Bad मधल्या मुद्द्यांचा समाचार नंतर घेतो.
.

अजो१२३ Wed, 27/06/2018 - 11:33

In reply to by चिंतातुर जंतू

कधी काळी तुम्हाला कबीर कला मंच बद्दल फार माया आली होती. त्यांनी मोदींना मारायचा कट करताना तुम्ही होतात का? वा त्या कटाबद्दल सहानुभूती आहे का?

नितिन थत्ते Wed, 27/06/2018 - 11:39

In reply to by अजो१२३

मोदींना मारायचा कट?

१९८४ च्या अनुभवानंतर तरी कोणी विरोधक सत्ताधारी पक्षाच्या नेत्याचा खून करण्याचा विचार करणार नाही.
[सुरक्षा यंत्रणांनी तर "मंत्रीसुद्धा मोदींना सहज भेटू शकणार नाहीत" असा फतवा काढला आहे. त्यांना धोका कबीर किंवा कुठल्या कलामंचापेक्षा पक्षातूनच आहे असं सुरक्षा यंत्रणांना वाटत असावं].

गब्बर सिंग Tue, 19/06/2018 - 03:30

लोकसंख्येचा विस्फोट हे पुस्तक प्रकाशित झाल्याला ५० वर्षे लोटली..... - त्याच पुस्तकाचे लेखक (पर्यावरणवादी) इकॉलॉजिस्ट पॉल एहर्लिच म्हणतात - की - येत्या काही दशकांत मानवी संस्कृत्या लोप पावतील, कोलमडून पडतील.
.

The world’s optimum population is less than two billion people – 5.6 billion fewer than on the planet today, he argues, and there is an increasing toxification of the entire planet by synthetic chemicals that may be more dangerous to people and wildlife than climate change. Ehrlich also says an unprecedented redistribution of wealth is needed to end the over-consumption of resources, but “the rich who now run the global system – that hold the annual ‘world destroyer’ meetings in Davos – are unlikely to let it happen”. The Population Bomb, written with his wife Anne Ehrlich in 1968, predicted “hundreds of millions of people are going to starve to death” in the 1970s – a fate that was avoided by the green revolution in intensive agriculture.

.
संदर्भ - ऐसीवरचा हा प्रतिसाद
.
.

गब्बर सिंग Tue, 19/06/2018 - 06:40

ट्रंप यांनी नवीन अंतरिक्ष कमांड निर्मीती चे आदेश दिले
.
फालतू गरिबांचे कल्याण करण्यासाठी पैसे खर्चण्यापेक्षा हे बरं.
.

गब्बर सिंग Tue, 19/06/2018 - 07:31

मोदी हे नवीदिल्लीमधल्या अराजकाकडे काणाडोळा करत आहेत. ____ राहुल गांधी
.
ऑ ?
.
आता अरविंदरावांचे हे धरणा आंदोलन घडवून आणण्यामागे मोदींचा हात आहे असा युक्तीवाद का होत नैय्ये ? मोदी काणाडोळा करत आहेत असा आरोप का ?
.
अरविंद या शब्दाचा अर्थ कमळ आहे म्हणून ?
.

चिंतातुर जंतू Tue, 19/06/2018 - 11:15

गेला काही काळ दिल्लीत काही घटनात्मक पेच उपस्थित होत आहेत असं दिसतं. त्यात सहभागी केजरीवाल किंवा इतर लोकांविषयी मला प्रेम नाही, पण काही तरी विचित्रपणा चालू आहे असं वाटतंय. त्याविषयी प्रताप भानू मेहता.

गब्बर सिंग Tue, 19/06/2018 - 22:24

In reply to by चिंतातुर जंतू

लेख दोनदा वाचला.
.
मला केजरीवाल व आआप दोघेही आवडतात कारण ते किमान या दोन पक्षांच्या (काँग्रेस व भाजपा) ड्युओपोलीसमोर उभे राहतात. India seriously needs it. बहुपक्षीय लोकशाहीचे तेच मर्म आहे. विविध पक्षांमधील स्पर्धा इष्ट (डिझायरेबल) आहे.
थत्तेंचं आर्ग्युमेंट - की - केजरी ही कमळाची बी टीम आहे - आयम नॉट कन्व्हिन्स्ड.
काँग्रेस सध्या देशभरात प्रभावी नाही असं दिसतंय पण केजरी हे काँग्र्सला धोबीपछाड देऊन निवडून आलेले आहेत हे विसरता येत नाही.
.
पण कोणत्याही परिस्थितीत, अटीतटीच्या वेळी सुद्धा मोदीविरोधकांना Absolve करायचं हा नियम प्रताप भानू मेहतांनी सुद्धा पाळलेला आहे.
.
.
एका दृष्टिने - केजरीं हे प्रचंड कॉर्नर केले गेलेले आहेत. आधी (नुकतीच) गडकरींची व जेटलींची क्षमा मागायला लागली, नंतर सनदी अधिकाऱ्यांकरवी दबाव आणला. जोडीला उच्च न्यायालयाची चापटी मिळाली. आणि जनतेसमोर केजरी हे किमान काही प्रमाणावर तरी ड्रामेबाज आहेत असं काहीसं चित्र उभं झालं.
.
प्रॉजेक्ट मॅनेजमेंट मधे एकाच वेळी दोन+ रिस्क्स मटेरियलाईझ होणे हे समस्याजनक मानले जाते ते एवढ्यासाठीच.
.

अबापट Wed, 27/06/2018 - 12:04

In reply to by अजो१२३

म्हणजे तुमचे मत तसे असेल ते ठीक..पण मोदी, राहुल गांधी यांच्याबद्दल प्रेम वाटणे ठीक आणि केजरीवाल यांच्याबद्दल नसायलाच पाहिजे असे तुमचे मत का झाले ? किंवा इतरांनाही प्रेम वाटू नये इतपत त्यांच्यात वेगळेपणा (वरच्या दोन नेत्यांपेक्षा) काय आहे ?

अजो१२३ Wed, 27/06/2018 - 12:24

In reply to by अबापट

चिंजं आपल्या काहीही अनभ्यस्त टिंग्या टाकत असतात. चिंजंना केजरीवाल बद्दल प्रेम असायला हरकत नाही, पण नसतानाही मोदीला बडवता येतंय म्हणून अशी वाक्यरचना.
--------------------------------
कोर्टाना राज्यपालांचं घर सोड म्हटलं, विषय संपला.
===========================
कमिंग टू योर पॉइंट - राहुल मोदी इ सामान्य राजकारणी आहेत. सामान्य माणसे आहेत. केजरीवाल महादादरदोच आहे. मी प्रत्यक्ष त्याच्या हाताखाली काम केलं आहे. शीला दिxइत ही दिल्लीची सर्वोत्तम राजकारणी आहे. माझ्या अति आवडत्या भाजपमधे तितका चांगला उमेदवार नाही, नि विधानसभेत शीलाला मतदान करे आणि लोकांना करायला सांगे. थोडक्यात - मी इतरांची असेसमेंट करण्यात वा अगदी त्यांना चरित्राच्या आधारे मत देण्यात (एक्सप्ट लोक सभा) चिंधीगीरी करत नाही. तरी मी केजरीवालला जाहीर फोरमवर महादादरदोच म्हणत आहे तेव्हा माझे/माझ्यांचे त्याच्यासोबतचे काय अनुभव असावेत ते समजून घ्या.

चिंतातुर जंतू Wed, 27/06/2018 - 12:32

In reply to by अजो१२३

चिंजंना केजरीवाल बद्दल प्रेम असायला हरकत नाही, पण नसतानाही मोदीला बडवता येतंय म्हणून अशी वाक्यरचना.

मला त्यांच्याविषयी प्रेम नाही हे मी सांगतोय. प्रेम तुम्हालाही नाही हे तुम्ही सांगताय. म्हणजे आपली केजूबद्दल सहमती आहे. इस बात पे तो गले मिलो यार :-)

अबापट Wed, 27/06/2018 - 13:04

In reply to by अजो१२३

माझ्या अण्णा परिवारातल्या मित्रांची मतं काही फार चांगली नाहीयेत . माझा प्रश्न केजरीवाल महादादर का असा नसून , फक्त एकट्या केजरीवाल लाच तुम्ही महाददर का म्हणताय असा आहे .( बाकी हा महादादरदोच हा शब्द आवडला ) जरा केजरीवाल च्या महादादर पणाचे काही किस्से सांगू शकाल ? ( शंका म्हणून नाही , गॉसिप म्हणून ...- ;)

चिंतातुर जंतू Wed, 27/06/2018 - 14:12

In reply to by अबापट

केजरीवाल च्या महादादर पणाचे काही किस्से सांगू शकाल ?

+१. ह्याविषयी कुतूहल असण्यामागचं माझं कारण - माझ्या परिसरात किती तरी उदारमतवादी आहेत. त्यांपैकी अनेक केजरीवालबद्दल आशावादी होते, पण यथावकाश काहींचा भ्रमनिरास झाला. काहींचं मात्र अजूनही बाथरूम सिंगरसारखं छुप्यानं केजूगुणगान चालू असतं. त्यांच्या तोंडावर फेकायला काही किस्से मला आवडतील.

अजो१२३ Thu, 28/06/2018 - 16:52

In reply to by चिंतातुर जंतू

माझ्या कंपनीचे एम डी केजरीवाल सरकारचे गृहसचिव होते. त्यामुळे इथे कथा लिहू शकत नाही.
=====================
दिक्षितबाईंना लोकांनी का हरवलं देव जाणो. त्या खूप चांगल्या व्यक्ति नि मुख्यमंत्री होत्या.

गवि Thu, 28/06/2018 - 18:23

In reply to by अबापट

अजो बसणाऱ्यापैकी असतील असं वाटत नाही.

बसणारे (उदा गब्बर, मी इ.) इतके उत्तेजित होत नाही जनरली. आमचे प्रोस्टेट दारू पिऊन पिऊन सुकलेले असतात. आम्ही फक्त जागतिक चर्चा करतो.

(गब्बर पुन्हा कधी येणार? मी अजूनही गरीब नाही हो.. मला अभय असो.. अभयाची ग्यारंटी मिळाल्यानंतर स'लि'लसोबत बसूच. )

नितिन थत्ते Fri, 29/06/2018 - 07:53

In reply to by गवि

>>(गब्बर पुन्हा कधी येणार? मी अजूनही गरीब नाही हो.. मला अभय असो.. अभयाची ग्यारंटी मिळाल्यानंतर स'लि'लसोबत बसूच. )

यू सी. यू गॉट इट राँग. (गब्बरच्या युटोपियन जगात) प्रत्येक गरीब हा पोटेन्शिअल श्रीमंत असतो. त्यामुळे गरीबांवर गब्बरचा डूख नाही. फडतूस ही वेगळी क्याट्यागरी आहे. म्हणजे श्रीमंत होण्याचं कुठलंच पोटेन्शिअल नसलेली क्याट्यागरी. त्यांना चिरडून टाकायचं अशी गब्बरची इच्छा आहे.

गब्बर सिंग Fri, 29/06/2018 - 08:01

In reply to by नितिन थत्ते

यू सी. यू गॉट इट राँग. (गब्बरच्या युटोपियन जगात) प्रत्येक गरीब हा पोटेन्शिअल श्रीमंत असतो. त्यामुळे गरीबांवर गब्बरचा डूख नाही. फडतूस ही वेगळी क्याट्यागरी आहे. म्हणजे श्रीमंत होण्याचं कुठलंच पोटेन्शिअल नसलेली क्याट्यागरी. त्यांना चिरडून टाकायचं अशी गब्बरची इच्छा आहे.

.
नाय.
.

अबापट Fri, 29/06/2018 - 10:17

In reply to by गवि

गवि शेठ, अजो बसू शकतात एवढेच लिहितो.( म्हणजे बसणे ही प्री रिक्विझिट नसावी त्यांची. पण त्यांना ती संकल्पना चालू शकते) थोडीशी हिरवळ, उत्तेजक चर्चा ( जी ते असले की सर्वसाधारणपणे होतेच :) असली की ते येऊ शकतात अशी माहिती.
( आणि माझ्या समोर त्यांनी एकदा मनोबाच्या सर्व प्रश्नांची मनोबा गप्प होई पर्यंतसुद्धा उत्तरं दिली आहेत . बघा म्हणजे चर्चेची उंची किती असू शकते...)

अजो१२३ Fri, 29/06/2018 - 11:07

In reply to by गवि

अजो बसणाऱ्यापैकी असतील असं वाटत नाही.

का बाबा?
माझी अशी प्रतिमा का?
स्वत: एक लहान पेग घेत मैफिलींना रात्रभर दारू, चकणा, अन्न पुरवण्याची सेवा मी कितीतरी वर्षे केलेली आहे. जास्त चढणारांची कितीतरी बाळंतपणं केलेली आहेत. एकदा दोनदा अमर्याद पिऊन मला पी पी म्हणणारांना पश्चात्ताप घडवला आहे. मला चकणा भयंकर आवडतो. मुंबईत असताना सलग दोन वर्षे मी रोज फळांच्या ज्यूसमधे एक पेग पित आलो आहे. पिताना मी प्रचंड सिगारेट ओढतो जे पिवय्यांचं एक उत्तम लक्षण आहे. आजपर्यंत एकदाही पिण्याच्या मैफिलीला नकार दिलेला नाही. दिल्लीत अपरात्री कोणति शटरं बडवली कि दारू मिळते हे मला माहित आहे.
इतकं सगळं असून असून माझ्यावर सोवळेपणाचा आरोप?
=====================================
आणि ऑनेस्टली -
अर्थात मला पिण्याचा अजिबात शौक नाही. मी दारूपेक्षा फळाचा ज्यूस पिणे अधिक पसंद करतो. वर्तनावरील परिणामामुळे दारू पिणे अयोग्य आहे असं मानतो. विदेशी अतिमहागडी दारू पिणे मूर्खपणा आहे असं मानतो. मला दारूमधलं काही कळत नाही, समोरचा फर्माईश करेल ते पितो. दारू आरोग्यास घातक आहे असेही मानतो. दारूवर खर्च करणे नि विशेषत: इतरांना बार मधे दारू पाजवण्यात (एरवी बाटली फार स्वस्त असते म्हणून) मला मूर्खपणा वाटतो. अनेक दारूंची
चव मला अजिबात आवडत नाही. (होय, चवीसाठी पिणारांइतका मी मूर्ख आहे.)
==================
पण मला दारू पिऊन प्रामाणिकपणे बोलायला चालू करणारी मंडळी प्रचंड आवडतात, म्हणून मला अशा मैफिली आवडतात. सहसा मला दारूनं काही होत नाही, पण दारूबाजांच्या मैफिलीचा जो आनंद आहे त्यास तोड नाही. मेफिलितली माणसं देवानं बनवलेली नैसर्गिक माणसं असतात, अन्यत्र भेटणारी माणसं कोणत्यातरी "कोड ऑफ कंडक्ट" खाली नियामित केलेले अधिकारी असतात.

गब्बर सिंग Fri, 29/06/2018 - 11:45

In reply to by अजो१२३

इतकं सगळं असून असून माझ्यावर सोवळेपणाचा आरोप?

.
ह्यातरकायचनाय.
.
मनोबानं कालच मला सज्जन ही शिवी दिली होती.
.
------
.

मैफिलीं, रात्रभर दारू, चकणा, अन्न

.
.
मय से नहलाना मेरी मय्यत को
दफ्न करना मुझे मयखाने में
.
---
.
बायदवे अजो, कबाब और शराब की बात हो रही है तो शबाब की बात भी शुरु करो.
रम, रमी अन रमा तिघेही पाहिजेत की.
.

अजो१२३ Fri, 29/06/2018 - 10:40

In reply to by चिंतातुर जंतू

हा मेसेज मी आत्ता वाचला. आज संध्याकाळी बसायला मी तयार आहे.
=======================
बाय द वे, मी श्रद्धाभक्तीने ३० मिलीचा एक पेग (वारंवार डायल्यूट करून) मैफिलभर पित असतो, मला पूर्णत: वर्ज्य असं काहीच नाही.
======================================

गब्बर सिंग Tue, 19/06/2018 - 21:57

भेदभावावरचे सरकारी तोडगे किती समस्याजनक असू शकतात त्याबद्दल
.
हार्वर्ड विद्यापीठातल्या प्रवेशप्रक्रियेतील भेदभावाच्या समस्यांबद्दल.
.

गब्बर सिंग Wed, 20/06/2018 - 03:47

भाजपा व पीडीपी ची संधिसाधु आघाडी.
.

The Congress President's reaction, which was reported hours after the news of the end of the alliance was announced, also contained sharp accusations for the BJP. "Incompetence, arrogance and hatred always fail," Rahul Gandhi said.

.
.
राहूल गांधी म्हणतात : अकार्यक्षमतेचा परिणाम असफलतेमधे होतो.
.
.
मोदीविरोधकांनी तांबड्या शब्दांबद्दल टिप्पणी अवश्य करावी. वाट पहात आहे.
.
(आता फक्त - गब्बरने नकळत मोदींची तुलना रागाशी केल्ये - वगैरे बाळबोध डायलॉग्स मारू नयेत.)
.

अजो१२३ Wed, 27/06/2018 - 11:53

In reply to by चिंतातुर जंतू

लेखाखालील काही उपयुक्त कमेंट्स:
१.The situation of whistle blowers in our country is remain very bad always. People don't care for such person. But I think Niranjan sir is very strong man. Salute to his journalism ✌
•Reply•Share ›
Salute from one leftist jihadi to another.
२. I am sorry to rudely correct a wrong impression you have. It seems you mistakenly think that NL offers or is supposed to offer journalism. NL is a Leftist Jihadi propaganda medium funded by Leftist Jihadi donors.
3 NL (मंजे न्यूजलाँड्री, आमच्या चिंजंचा मिडिया) started out pretty well but then became AAP mouthpiece and then aligned with NDTV. Now just like AAP and NDTV, NL is peddling Congressi propaganda.
४. हे एकदम कूल आहे: LOL this clown makes a fake story and gets exposed before the whole country and now NL morons whine that he is unemployed

३_१४ विक्षिप्त अदिती Wed, 20/06/2018 - 20:10

जून महिना अमेरिकेत गे (LGBT) प्राईड महिना समजला जातो. ठिकठिकाणी प्राईड परेड्स निघतात.

काल अचानक बिटबकेटवर कोड डकवताना हे दिसलं -
बिटबकेट बिट बकेट प्राईड मंथ

गब्बर सिंग Thu, 21/06/2018 - 23:55

अरविंद सुब्रमण्यम यांचा राजीनामा
.
Addendum : राजीनाम्याला प्रतिसाद म्हणून ट्विटर वर लोकांनी काही सूचक, व रोचक प्रश्न विचारलेले आहेत.
.
उदा.
(१) राजीनामा पियुष गोयल यांच्याकडे का दिला नाही (जेटलींकडे का दिला) ?
(२) नोटबंदीचं श्रेय का घेतलं नाहीत ?
(३) सुब्बू स्वामीं.... ?
.

गब्बर सिंग Sat, 23/06/2018 - 01:26

लिबरल वि. काँझर्व्हेटिव्ह या अक्षावर तुम्ही कुठे आहात हे शोधून काढायचे असेल तर तुमच्या शॉपिंग करतानाचा कल/ओढा तपासा.
.

In our research, conservatives tended to differentiate themselves through products that show that they are better than others – for example, by choosing products from high-status luxury brands. In contrast, liberals tended to differentiate themselves through products that show that they are unique from others – for example, by choosing products with unconventional designs or colors. These distinct preferences emerged across multiple studies in which U.S. participants (university students who completed surveys in the lab, adults who took surveys online, and members of a research panel) indicated their political ideology and made real or hypothetical choices between products.

गब्बर सिंग Sun, 24/06/2018 - 07:03

मोदींना अप्रत्यक्षपणे मदत करणारे नेमके कोण आहेत ?

उत्तर : The holier-than-cow Indian liberal elite
.

This argument, though, isn’t about any of these great faiths. I’m addressing the latest religion to emerge in the history of humankind (see, I didn’t say mankind): The Order of Liberalism. It’s new, so it is yet to develop a diversity of strains. It won’t tolerate any deviation from its own Holy Book. No Shia/Sunni, no Catholic/Protestant, no Vaishnavite/Shaivite. If you belong to my Peeth (or order), you have to conform fully. There are no exceptions here, no exemptions, no straying, not even a weekend’s furlough. You are either with us, or against us. Now, we’ve heard that line before, from George Bush Jr., and he was no liberal. I might ask though how can you be liberal and yet have a vacuum-packed book of rules, behaviour and speech?

Nevertheless, let me first try summing up the minimum code of conduct you set for the rest. The first is, be secular on my terms, so dump your religiosity and gods. Second, accept free-market, globalisation and deregulation are toxic, neo-liberal abominations. Accept the state as your holiest deity and just help us make it perfect. Say that all corporates are thieves and don’t ask me who, if not corporates and robber barons, funds the holiest foundations, Ford, Rockefeller, Bill & Melinda Gates, MacArthur, Inlaks, Tata that sensibly funds me in turn. None of your neo-liberal business.

.

गब्बर सिंग Mon, 25/06/2018 - 00:54

पर्यावरणवाद्यांचे तळवे चाटण्याचे दुष्परिणाम.
.

The state-wide plastic ban, including carry-bags and thermocol by the Devendra Fadanvis government, will result in loss of up to Rs 15,000 crore and nearly 3 lakh jobs, says the plastic manufacturing industry.

.

"The ban imposed by Maharashtra from Saturday has hit the industry very hard and the plastic industry is staring at a loss of Rs 15,000 crore, leaving nearly 3 lakh people jobless overnight," Plastic Bags Manufacturers Association of India general secretary Neemit Punamiya told PTI on Sunday. Nearly 2,500 members of the association have left with the no option but to shut shop following the ban, he added and termed the ban as "discriminatory".

.
मोदी व फडणवीस हे एकाच पक्षात आहेत ना ? महाराष्ट्रात भाजपाच सत्तेत (मुख्य भागीदार) आहे ना ?
मग मोदींच्या इतके जॉब्स निर्माण करू अन तितके जॉब निर्माण करू - च्या आश्वासनांचं काय झालं ?
राजीवप्रताप रूडींना का काढलंत ते सुद्धा सांगू नका आणि नवीन जॉब्स निर्माण करायचं सोडा. आहेत ते जॉब्स नष्ट का करताय ??
.

चिंतातुर जंतू Mon, 25/06/2018 - 15:43

जीएसटीला वर्षपूर्ती झाल्याच्या निमित्ताने विविध मतप्रदर्शन होत आहे. HSBCच्या अहवालानुसार अद्यापही अर्थकारणात इन्फॉर्मल सेक्टरचा मोठा भाग आहे.

"Any semblance of increased formalisation of the economy following demonetisation, if at all, has for now, reverted to pre-demonetisation levels,"

आणि बाजारातलं रोखीचं प्रमाण वाढूनही अर्थस्थिती वाईट आहे, असं अहवाल म्हणतो -

"As much as 70 per cent of rural India, whose main source of income is wages, may not be doing too well at present. As such, growing of cash in circulation should be tempered. But, instead, the cash-to-GDP ratio has shot up since mid-FY18,"

निष्कर्ष : HSBC देशविघातक आहे. परकीय हातापासून आपण सावध राहिलं पाहिजे.

अजो१२३ Wed, 27/06/2018 - 12:06

In reply to by चिंतातुर जंतू

मोठा मंजे किती? मागे किती होता?
How the semblance came in place? And why did it go back to original level?
=================================
What is "since Mid-18?" Are we in Dec 18? What is the date of study and date of release of report?
What is the relation between first and second line of the second quotation?
============================
Conclusion: Jantu doesn't understand anything about economics. He is so stupid in the subject he doesn't understand what is observation of an economic parameter, what are correlations between and whether a statement is in nature of policy criticism.

गब्बर सिंग Tue, 26/06/2018 - 21:56

भाजपाने सर्व भारतीय स्त्रियांचा अवमान केलेला आहे : इति अशोक गेहलोत
.
इंदिरा गांधींची तुलना हिटलरशी करून भाजपाने सर्व भारतीय स्त्रियांचा अवमान केलेला आहे : इति अशोक गेहलोत.
.

चिंतातुर जंतू Tue, 26/06/2018 - 23:11

लॉस अँजेलिसमधल्या ह्या म्युरलचं दर्शन घेण्याचं भाग्य केवळ सोशल मीडियावर पुरेसा प्रभाव पाडणाऱ्या लोकांनाच लाभू शकेल.
EXCLUSIVE LA MURAL AVAILABLE TO POPULAR SOCIAL MEDIA INFLUENCERS

गब्बर सिंग Wed, 27/06/2018 - 00:07

अर्थशास्त्र (बेसिक्स) शिकायचं (अन तेही मोफत) असल्यास
.
(१) प्राध्यापक John B. Taylor हे दिग्गज अर्थशास्त्री आहेत.
(२) क्लासेस मोफत आहेत व ऑनलाईन आहेत.
(३) स्टॅनफर्ड विद्यापीठातर्फे.
(४) त्यांनी नमूद केल्याप्रमाणे सुमारे साडेसहा तासाचा वेळ द्यावा लागेल.
(५) क्लासेस नुकतेच सुरु झाले. रेकॉर्डिंग्स उपलब्ध आहेत.
(६) Monday June 25 ते August 24.
.

गब्बर सिंग Wed, 27/06/2018 - 00:27

तृणमूल काँग्रेस चे नेते डेरेक ओब्रायन म्हणतात.....की देशात सुपर-आणीबाणी सदृश परिस्थिती आहे.
.
ही फेक न्युज असूच शकत नाही.
आणि - देशात सुपर-आणीबाणी सदृश परिस्थिती आहे - हे सत्य असणारच. कारण तृणमूल काँग्रेस ही - कमिनिष्ठ, काँग्रेस व भाजपा तिघांचीही बी टीम आहे.
.

अबापट Wed, 27/06/2018 - 11:53

In reply to by गब्बर सिंग

1991 साली काही काळ हरयाणात बऱ्या हॉटेल मध्ये वास्तव्य असे. त्यावेळी फावल्या वेळात हॉटेलातील वेटर्स "रेप सीन्स इन हिंदी सिनेमा १,२ 3...." वगैरे व्हिडिओ चवी चवी ने दररोज बघत असत. महाराष्ट्रातून गेलेल्या आम्हा तिघा चौघांना अशी काही खास केलेली व्हिडिओ कॅसेट असते आणि ती इतक्या चवीने लोकं दररोज बघत बसू शकतात याचा प्रचंड धक्का बसलेला आठवतो. (महाराष्ट्रातील त्या लेव्हल च्या हॉटेलांमध्ये असे काही नसे, त्या काळी तरी)

चिंतातुर जंतू Wed, 27/06/2018 - 12:07

In reply to by अबापट

अशी काही खास केलेली व्हिडिओ कॅसेट असते आणि ती इतक्या चवीने लोकं दररोज बघत बसू शकतात याचा प्रचंड धक्का बसलेला आठवतो.

इंटरनेट काय, व्हिडिओ कॅसेटी पण नव्हत्या त्या काळातला किस्सा : सेन्सॉर बोर्डानं फिल्ममधून कापलेल्या तुकड्यांची रिळं फिल्म इन्स्टिट्यूटमधल्या एका प्रोफेसरांना मिळत असत. मग काही विद्यार्थी त्यातले काही रसाळ तुकडे जोडून 'लेट नाइट शो' घडवत. आणि अर्थात इतर विद्यार्थी आणि काही प्रोफेसर ते चवीनं बघत.

१४टॅन Thu, 28/06/2018 - 11:32

In reply to by अबापट

दररोज लोकलमध्ये(!) पुरुष हेच प्रकार पाहत असतात. (मुद्दामून पहायला गेलो नाही, पण फार खुलेआम सुरु असतं.) वयाचा अडसर नाही. ३० ते ७०, सगळेच.

गब्बर सिंग Thu, 28/06/2018 - 00:22

In reply to by गवि

हा असाच रिपोर्ट २०११ मधे आला होता .... व त्यात भारत चौथ्या क्रमांकावर होता. तेव्हा भाजपाच्या लोकांनी युपीए वर हल्ला चढवला होता.
.
आता भाजपाच्या लोकांची तोंडं बंद आहेत. कदाचित - जीन्स घाल्ण्यामुळे हे असं होतं वगैरेंच्या धर्तीवरची आणखी "इन्नोव्हेटिव्ह" व "क्रिएटिव्ह" कारणे शोधत असावेत. चिंतन बैठक वगैरे.
.
बायदवे हरयाणा मधे भाजपाचंच सरकार आहे. व ते सुद्द्धा ऑक्टोबर २०१४ मधे निवडणूका झाल्यानंतरचे. नैम्हंजे - लॉ अँड ऑर्डर साठी राज्यसरकार हे केंद्रसरकार पेक्षा प्रचंड जास्त जबाबदार असतं असतं - म्हणून म्हंटलं.
.

नितिन थत्ते Thu, 28/06/2018 - 09:33

In reply to by गब्बर सिंग

चौथ्या लंबरावरून पहिल्या* लंबरावर आणलं त्याबद्दल अभिनंदन.

*या नंबरांच्या काढण्याविषयी मला शंका आहे. म्हणजे तेव्हा चौथ्या नंबरावर होता तो आता पहिल्या नंबरावर येण्यासारखं विशेष वाईट काही झालं आहे असं वाटत नाही.

गवि Thu, 28/06/2018 - 10:05

In reply to by नितिन थत्ते

बाकी काही असो पण सीरियापेक्षा वाईट? सोमालियापेक्षा वाईट? अफगाणिस्तानपेक्षा वाईट?

स्त्रियांना (विशिष्ट वंश / गटाच्या म्हणून ) बळेच पकडून तथाकथित सैनिकांसाठी शारीरिक स्लेव्ह म्हणून ठेवलं जातं अशा बातम्या येतात.

या देशांत तसेही कोणीही सुरक्षित नाही.

कदाचित एक्सलुझिवली फक्त आणि फक्त स्त्रियाच असुरक्षित असणे यावर नंबर दिले असावेत. पूर्ण समाज बॉंबवर बसलेला असल्यास पुरुषही असुरक्षित ठरून स्त्रीची असुरक्षितता त्या देशांसाठी बॅलन्स होत असावी.

बॅटमॅन Wed, 27/06/2018 - 13:43

In reply to by चिंतातुर जंतू

सुमित गुहा हे सध्याच्या घडीला मराठ्यांशी संबंधित कागदपत्रे अभ्यासणाऱ्यांपैकी एक आघाडीचं नाव. मराठी कागदपत्रे वापरून त्यांनी अनेक विषयांची मांडणी केलेली आहे. पैकी जातीबद्दलचं त्यांचं पूर्ण पुस्तकच आहे. त्यासंबंधी त्यांनी एक लेक्चरही दिलेलं आहे आणि त्याच्या शेवटी ते सरळ सांगतात की मराठी कागदपत्रे अभ्यासल्यामुळे त्यांच्या आकलनात लक्षणीय फरक पडला.

सुनील Thu, 28/06/2018 - 18:14

In reply to by चिंतातुर जंतू

अनागोंदी ह्या शब्दाची व्युत्पत्ती रोचक आहे!

बंगालात बजबज नावाचे एक शहर आहे. त्याचा आणि मराठीतील बजबजपुरीचा काही संबंध आहे का, ते पाहणेदेखिल रोचक ठरावे!

बजबजखेरीज दमदम हेदेखिल प्रसिद्ध आहे. शिवाय, चमचम ह्या नावाचा पदार्थदेखिल आहे.

बंगाल्यांना द्विरुक्तीची हौस दिसते!

बॅटमॅन Wed, 27/06/2018 - 19:43

मराठी भाषेच्या अनेक बोलींमध्ये रस असणाऱ्यांसाठी रोचक बातमी. डेक्कन कॉलेजतर्फे मराठी बोलींचा सर्वे केला जाणार आहे.

http://www.dnaindia.com/mumbai/report-maharashtra-linguists-working-on-…

गब्बर सिंग Thu, 28/06/2018 - 02:35

अमेरिकन काँग्र्स (लोकसभा) साठीच्या निवडणूकाबाबत -- न्यू यॉर्क मधल्या प्रायमरीज मधे ..... - डेमोक्रॅटिक पक्षातून अलेक्झांड्रिया ओकासिओ ओर्टेझ नावाची एक महिला प्रायमरीज जिंकून पुढे आलेली आहे. या बाईंचा अजेंडा -
.
.
(१) सर्वांना, सर्वांसाठी आरोग्यविमा
(२) सर्वांना नोकरीची हमी
(३) घर घेण्याचा अधिकार.
.
वगैरे वगैरे.
.
करा मज्ज्या !!!
.

चिंतातुर जंतू Thu, 28/06/2018 - 17:37

उदारमतवाद्यांना झोडण्याच्या सध्याच्या राष्ट्रीय विरंगुळ्याविषयी प्रताप भानू मेहता -
Blame it on the liberals: Liberal-bashing is fun

"The period was so far like the present period, that some of its noisiest authorities insisted on its being received, for good or for evil, in the superlative degree of comparison only." - डिकन्स

गब्बर सिंग Thu, 28/06/2018 - 20:54

आम्ही तुम्हाला १५ लाख देऊ किंवा आम्हाला १५ लाख हवेत ची आरोळी ठोकणाऱ्यांसाठी.... -- भारतीयांनी स्वीस बँकेत ठेवलेला निधी ५०% नी वाढला.
.
गरीबोंकी सुनो
"वो" तुम्हारी सुनेगा
तुम एक पैसा दे दो
वो दस लाख देगा
.
मग त्याच्याकडुन डायरेक्टली घ्या अन करा मज्ज्या !!!
.
बायदवे "वो दस लाख देगा" आणि मोदींनी आश्वासित केलेले १५ लाख - यांच्या मधले ५ लाख कोणाला मिळणार - हे मात्र विचारू नका.
.

Reversing a downward trend amid government’s clampdown on black money, money stashed by Indians in Swiss banks rose over 50 per cent to CHF 1.01 billion (Rs 7,000 crore) in 2017, according to the official annual data released by Swiss National Bank on Thursday. The data shows that total funds held by all foreign clients of Swiss banks rose about 3 per cent to CHF 1.46 trillion or about Rs 100 lakh crore in 2017.

नितिन थत्ते Fri, 29/06/2018 - 07:49

In reply to by गब्बर सिंग

तुम्ही ते नीट ऐकलेले दिसत नाही.

"दस लाख देगा"मध्ये त्या दस लाखांचं युनिट स्पेसिफाय केलेलं नाही. फर्ष्ट हाफ मध्ये एक पैसा म्हटलेलं असल्याने दहा लाख सुद्धा पैसे असण्याची शक्यता आहे (एटले दहा हजार रुपये).

दहा हजार रुपये जुन्या* हजाराच्या नोटांच्या स्वरूपात दिले तर काय?
*पंधरा लाख कोटी भागिले १२५ कोटी या हिशेबाने मोदी प्रत्येकी १२ हजार रुपये जुन्या नोटांच्या स्वरूपात वाटू शकले असते. पण त्यांनी पैसे बँक खात्यात जमा करण्याचे आश्वासन दिल्याने हा मार्ग त्यांना उपलब्ध नाही.

गब्बर सिंग Thu, 28/06/2018 - 21:04

पाकिस्तानला FATF च्या ग्रे लिस्ट मधे घातले
.
भारतातले फुर्रोगामी धाय मोकलून रडले असतील आज.
.
नैतर काहीतरी खुसपटं काढून - याचा दहशतवादाशी संबंध नाही आणि हा पाकिस्तानाबाबत आकस आहे - असला युक्तीवाद करतील.
.

३_१४ विक्षिप्त अदिती Thu, 28/06/2018 - 21:23

In reply to by गब्बर सिंग

भारतातले फुर्रोगामी धाय मोकलून रडले असतील आज.
नैतर काहीतरी खुसपटं काढून - याचा दहशतवादाशी संबंध नाही आणि हा पाकिस्तानाबाबत आकस आहे - असला युक्तीवाद करतील.

मानवतावादाखातर का होईना, पुरोगाम्यांनी असं काही लिहावं. नाही लिहिलं तर ट्रोलायला कोणी न राहिल्यामुळे गब्बर धाय मोकलून रडेल. जरा त्या हळूवार, कोमल मनाच्या गब्रूचा विचार करावा आणि त्याची अब्रू राखावी.

गब्बर सिंग Thu, 28/06/2018 - 22:06

In reply to by ३_१४ विक्षिप्त अदिती

तुमच्या ह्या प्रतिसादाला सहृदयता म्हणावं की काळा विनोद म्हणावं की भुसनळा म्हणावं ?
.

गब्बर सिंग Fri, 29/06/2018 - 03:34

जागतिकीकरणाच्या बाजूने .... युक्तीवाद करणारी व्यक्ती असो वा विरोधी. प्रत्येकाला - समाजात नम्रता कमी पडत्ये, ह्युमिलिटी कमी पडत्ये, ॲरोगन्स वाढत चाललाय - असं का वाटत असतं कोण जाणे ? इतरांना ह्युमिलिटीचे लेक्चर झाडणे हाच मुळात ॲरोगन्स कसाकाय नाही/नसतो तेच कळत नाही. ह्युमिलिटी चे पंधरावीस डोस दिल्याने सगळे प्रश्न सुटत असते तर नम्रतेने वागणाऱ्या सगळ्यांना वेतनवाढ व प्रमोशन मिळाले असते नैका ??
.

तिरशिंगराव Sun, 01/07/2018 - 11:36

In reply to by चिंतातुर जंतू

आम्ही मुंबईत असताना, अनेक वर्षे, बीएसइएस कडून वीज घेत होतो. त्यानंतर रिलायन्सने ती कंपनी घेतल्यामुळे , पहिल्या महिन्यापासूनच आमच्या बिलात दुपटीने वाढ झाली. घरातली उपकरणे तीच, एसी नाही, तरीही युनिटस जास्त. याबाबत, सुरवातीला अनेक लोकांनी आवाज उठवण्याचा प्रयत्न केला. पण आधीचे मीटर सदोष असल्याच्या नांवाखाली, रिलायन्सने नवीन मीटर बसवले होते, हे कारण होते. नवीन इलेक्ट्रॉनिक मीटर अचूक असतात, असे आम्हाला सांगण्यात आले. त्यानंतर कैक वर्षांनी आम्ही पुण्यास रहायला आलो. इथेही उपकरणे तेवढीच, एसी नाही. मराविमचे मीटरही इलेक्ट्रॉनिक. तरीही बिल मुंबईच्या निम्मे! हे असे का, याचे समाधानकारक उत्तर मिळाले नाहीये.

अजो१२३ Sun, 01/07/2018 - 18:59

In reply to by तिरशिंगराव

१. क्ष आणि ३क्ष बिलं दाखवता येतील का? आहेत का आपल्याकडे?
२. दिल्लीत पार्किंग कॉर्पोरेशन्कडे होती तेव्हा ५ रु भाडे होते. नंतर ते चौपट करून खासजी कंपनीला दिले. महानगरपालिकेची तूट कमी झाली.
३. भाडी ही टेलिस्कोपिक असतात. उदा. पहिली युनिटे १-२ रु, १०० च्यावर सरळ ८ रु प्रतियुनिट.
४. रिलायन्सला डायरेक्ट नि इनडायरेक्ट टेक्सेस पडतात जे महावितरण इ इ ला पडत नाही.
५. दुसराच महिना वर्षाचा नक्की कोणता महिना होता तेही महत्त्वाचं आहे.

चिंतातुर जंतू Sun, 01/07/2018 - 19:24

In reply to by अजो१२३

रिलायन्सला डायरेक्ट नि इनडायरेक्ट टेक्सेस पडतात जे महावितरण इ इ ला पडत नाही.

माझ्या माहितीनुसार BSES खाजगी कंपनी होती; सरकारी नव्हे. त्यामुळे महावितरणशी तिची या बाबतीत तुलना होणार नाही.

अनुप ढेरे Mon, 02/07/2018 - 12:42

In reply to by तिरशिंगराव

पुण्यात देखील अनेक ठिकाणी फॉल्टि मिटर बसलेले आहेत. दोन वर्षापूर्वी जुने मिटर बदलुन डिगिटल मिटर बसले आमच्या इथे. आमचं बिल एकदम अर्ध/किंवा त्याहुन कमी झालं. आम्ही तक्रार केली की काहितरी गडबड आहे. थोडे महिन्यांनी लोकांनी येऊन परत मिटर बदलले. मग बिल परत पूर्ववत झालं.

चिंतातुर जंतू Fri, 29/06/2018 - 10:14

परराष्ट्रमंत्री सुषमा स्वराज आणि संरक्षणमंत्री निर्मला सीतारामन यांचा पुढील आठवडय़ातील अमेरिका दौरा त्या देशाने रद्द केला. निक्की हेली म्हणतात मोदींना ठाऊक आहे का ते. लोकसत्ताचा अग्रलेख काही अंदाज वर्तवतो.

अनुप ढेरे Sat, 30/06/2018 - 13:12

In reply to by चिंतातुर जंतू

लोकसत्ताचा अग्रलेख छान आहे. मुद्दे बरोबर वाटतात. एस-४०० हा मुद्दा सगळ्यात महत्वाचा वाटतो. अलिकडे कुठेसं वाचलेलं की जर भारताने एस ४०० घेतलं तर भारत अमेरिकेकडुन एफ-२२ विमानं घेऊ शकणार नाही (ते घ्यायच असल्यास एफ-२२ विमानांबद्दलची काही मह्त्वाची माहिती रशियाला द्यावी लागेल जे अमेरिकेला मान्य नसेल.) असं काहिसं.

गब्बर सिंग Sat, 30/06/2018 - 21:02

In reply to by चिंतातुर जंतू

लोकसत्तेच्या अग्रलेखातून -
.

अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या राजकारणाच्या निरीक्षकांना तर जे काही झाले त्यात अनैसर्गिकदेखील काही वाटणार नाही. जो गृहस्थ उत्तर कोरियाचा हुकूमशहा किम जोंग यास सद्गुणाचे शिफारसपत्र देऊन आठवडाही उलटायच्या आत लगेच ‘अमेरिकेसमोरचा सर्वात मोठा धोका म्हणजे उत्तर कोरिया’ असे जाहीर करतो त्याच्यासाठी भारतीय मंत्र्यांचा दौरा रद्द होणे ही क्षुल्लक बाब ठरते.

.
हे असं खरंच घडलं होतं ?
.