राँग नंबर
.
खिक्!
खिक्!
मी हल्ली कॉलसेन्टरवाल्यांना राँग नबर सांगु लागलो आहे.. म्हणजे माझ्या नावाने फोन आला तरी राँग नम्बर म्हणतो मग ते अतिशय गडबडतात कारण त्यांच्या स्क्रीनवर तर माझे नाव दिसत असते.. मग ते ऑफर वगैरे न सांगताच गडबडीत फोन ठेवतात ;)
बादवे: ऐसीअक्षरे वर स्वागत!
छान लिहलय. DND मुळे कॉल
:-D छान लिहलय.
DND मुळे कॉल सेँटरवाले बंद झाले पण या राँग नंबर वाल्यांच काय करणार...
मला आजकाल मुळे सर का किँवा कोणतीतरी कंप्युटर इंस्टिट्युट का म्हणुन फोन येतायत. नेहमी वेगवेगळे कॉलर असतात त्यामुळे चिडता पण येत नाही :-(
काही वर्षाँपुर्वी एका मित्राला पाकिस्तानहुन राँग नंबर चे फोन येत होते. घाबरलेला तो...
अवांतर....
मर्फी हा सर्व तत्वज्ञ आणि वैज्ञानिकांचा पप्पा शोभतो. एकवेळ न्यूटनच्या नियमाबाहेर गोष्टी घडतील; पण मर्फीच्या नाही.
तुम्ही एकदा अंगभर साबण लावलं की लगेच तुमचा फोन वाजायला लागेल./
\
severity of itch is directly proportional to possibility of reach.
The queu in which you are standing will always move slowest.
If anything can gowrong,it will!
हे आणि अशी शेकडो सत्यवचनं त्या महात्माच्या नावावर आहेत.
त्या सार्वकालिक दिग्गज व्यक्तिमत्वास आमचा सलाम.
कुरकुरीत लेखन. फार दिवसांनी
कुरकुरीत लेखन. फार दिवसांनी असं खुसखुशीत काही वाचायला मिळालं.
आणखी एक किस्स आठवला राँग नंबरचा.
एकत्र कुटूंब. फोन वाजला.
'हॅलो..'
'हॅलो, अण्णा आहेत ?'
'बाहेर गेलेत.'
'दादा ?'
झोपले आहेत.'
'मग नाना ?'
'टुरवर गेलेत.'
'मग गणेशकाकांना द्या...'
'कोण गणेशकाका ? राँग नंबर...!'
राँग नंबर .... ट्रिंग
राँग नंबर ....
ट्रिंग ट्रिंग.
मी: "हॅलो"
पलीकडून: "हॅलो, रुपा...
मी: ''मी रुपा नाही..."
पलीकडून: "बस काय आता.. एव्हढा राग आलाय...?"
मी: "अहो... मी रुपा नाही... हा तुम्ही राँग नंबर लावलाय"
पलीकडून: "आयला, होय काय...!!! सॉरी सॉरी.."
फोन ठेवला जातो...
पुन्हा दोन मिनीटांनी....
ट्रिंग ट्रिंग.
मी: "हॅलो"
पलीकडून: "हॅलो, रुपा..."
मी: "सॉरी.. राँग नंबर .."
पलीकडून: " मला माहीतीय तू रुपाच आहेस... मुद्दाम नाही म्हणतेयस...!"
मी: "अहो... मी रुपा नाही... हा तुम्ही पुन्हा राँग नंबर लावलाय"
पलीकडून: "चायला.. मग उचलला कशाला?"
....
:~
होल्ड ऑन...
मलाही [लॅण्डलाईनवर] "तुमच्या शेजारील संभाजी जाधवांना द्या हो" ("द्याल का ?" अशी विनंती नाही, थेट हुकूमच) असा फोन येत असे. एकदा नव्हे तर तीनचारदा रॉन्ग नंबर कॉल आले होते. मी त्या व्यक्तीला 'आमच्या शेजारीच काय पण पूर्ण इमारतीत संभाजी जाधव नावाची कुणी व्यक्ती राहात नाही...' असे सांगूनही फोनचेन बंद होईना. त्यामुळे एका मित्राचा सल्ला घेतला व त्यानुसार पाचव्यांदा ज्यावेळी असा फोन आला त्यावेळी, "होल्ड ऑन प्लीज....दोन मिनिटात बोलावितो." असे सांगून रीसिव्हर क्रेडलवरून बाजूला ठेवला. आठदहा मिनिटांनी फोन डिसकनेक्ट झाल्याचे ऐकले....असे दोनतीनदा झाले....आणि मग एकदाची ती कटकट मिटली. [मात्र मोबाईलच्या जमान्यात असा काही वैतागाचा अनुभव अजूनतरी आलेला नाही, हेही सांगावे लागेल.]
हा हा हा!
आमच्या घरी फोन आला तेव्हा नुकतेच ओळखीत, नात्यात अनेकांकडे फोन आले होते. फोन हा प्रकार नवाच असल्यामुळे फोन मॅनर्स सगळ्यांनाच होते असं नाही, आमच्या वडीलबंधूंनाही नव्हते! ;-) (वाचतोस का रे इथे?) एकदा एक राईट नंबरच आला, पलिकडे मावशी होती. तिचं बाबांकडे काहीतरी काम होतं. भावाने फोन उचलला.
भाऊ: हॅलो.
मावशी: हं, हॅलो. जोशी ना?
भाऊ: हो.
मावशी: ... तिच्या कामाचं बराच वेळ काहीतरी समजावून सांगत होती. आणि शेवटी काहीतरी प्रश्न विचारला.
भाऊ: मावशी, एक मिनीट हं, बाबांना फोन देतो.
(त्याच्या मागे उभं राहून मी हे सगळं ऐकून शेवटी हसायला मोकळी झाले.)
भावाने आत जाऊन बाबांना बोलावलं. "बाबा, विजूमावशीचा फोन आहे. ती थोडी वैतागली असेल. पण "मी जोशी नाही" हे तिला कसं सांगू? तुम्ही मला इस्टेटीवरून बेदखल कराल." मावशीनेही हे सगळं फार मनावर घेतलं नाही म्हणून अजूनही दोघांनाही तिच्याकडे चांगलंचुंगलं खायला मिळतं.
मी: हेलो मध्यमवयीन स्त्रि
मी: हेलो
मध्यमवयीन स्त्रि (धक्का+आश्चर्य): कोऽऽण बोलतय?
मी: तुम्हाला कोणाशी बोलायचय?
स्त्रि (धक्का+आश्चर्य+भीती): कौशिक आहे का?
मी: कोण कौशिक? सॉरी राँग नंबर...
स्त्रि (रिलिफ+आनंद+हसु): अच्छा अच्छा! राँग नंबर होय!
बहुतेक बिचार्या काकू घाबरलेल्या, परगावी शिकायला/नोकरीसाठी राहणार्या शिँगल मुलाचा फोन कोणा मुलीने उचलला म्हणुन :-D
हा हा....
मस्तच.
राँग नम्बर हा नेहमीचाच फॉर्म्युला; पण छान वापरलेला. गुड वन.
फुरसतीत अधिक किस्से छापतो. ढकलपत्रातले एकदोन तर कहर आहेत किस्से.