मनातले छोटेमोठे प्रश्न किंवा विचार - भाग ८२
ही धागामालिका आपल्या मनात येणारे, नेहमी नेहमी डोकावणारे विचार मांडण्यासाठी आहे. कधी कधी आशय फार मोठा नसतो. फार खोल विचार केलेला नसतो. तो विचार/ कल्पना/ प्रश्न/ गंमत डोक्यात येते, जाते. कधी कधी आपण विसरतो, कधी कधी ती ती पुन्हा पुन्हा येत असल्याने आपण विसरू शकत नाही.
.
यापूर्वीच्या धाग्यावरचे प्रतिसाद १०० पेक्षा अधिक झाले आहेत म्हणून हा पुढचा धागा.
----
हरित क्रांती यशस्वी झाली
हरित क्रांती यशस्वी झाली नाही असं भारतातल्या कोणाचं म्हणणं आहे/होतं का ? आयमिन भारतातल्या कोणी तसा दावा कोणी केलेला होता का ? दावा म्हंजे - उदा. हरित क्रांति ची उद्दीष्टेच चूक होती, मिस्प्लेस्ड प्रायोरिटिज होत्या, अमकं झालं नाही, तमकं व्हायला हवं होतं ... वगैरे वगैरे.
--
गब्बर हा प्रश्न (आणि आत्ताच्) का विचारतोय ? - हा प्रश्न अवैध आहे.
मी ऐकलेले आक्षेप
>>हरित क्रांती यशस्वी झाली नाही असं भारतातल्या कोणाचं म्हणणं आहे/होतं का ? आयमिन भारतातल्या कोणी तसा दावा कोणी केलेला होता का ? दावा म्हंजे - उदा. हरित क्रांति ची उद्दीष्टेच चूक होती, मिस्प्लेस्ड प्रायोरिटिज होत्या, अमकं झालं नाही, तमकं व्हायला हवं होतं ... वगैरे वगैरे.<<
यशापयश म्हणायचं तर भारताचा अन्नतुटवडा कमी झाला ह्यात काहीच संशय नाही. रेशनवर मिळालेल्या निकृष्ट लाल (मिलो?) गव्हाच्या पोळ्या वगैरे प्रकार पुढच्या पिढीला अनुभवायला लागले नाहीत. हरित क्रांतीविषयी मी ऐकलेले आक्षेप हे मुख्यत: दोन प्रकारचे होते -
- अनेक भारतीय प्रजाती त्यामुळे मिळेनाशा झाल्या. पूर्वी भारतात प्रचंड प्रमाणात बीजविविधता होती आणि त्यासोबत रुचिवैविध्य होतं. पण नवी संकरित वाणं जितकं पीक देत असत तितकं पीक देऊ शकत नसल्यामुळे ती मागे पडली.
- अधिक पीक येण्यासाठी अधिकाधिक रासायनिक खतांचा वापर वाढला. त्यामुळे अर्थात आपल्या आणि पाळीव जनावरांच्या पोटात अधिक रसायनं जाऊ लागली. शिवाय, जमिनीचा कस कमी होऊ लागला, वगैरे.
(१) इतर रंग कोणते ?
(१) इतर रंग कोणते ?
(२) शाश्वताची कामना अध्यात्मवादी करतात. आम्हाला अध्यात्माचे वावडे आहे. (म्हंजे अध्यात्म चूक, वाईट आहे असे नाही ... फक्त आमचं व अध्यात्माचं जमत नाही.). अध्यात्मवाद्यांच्या मते नश्वर असलेल्या बाबींची आम्हाला कामना आहे.
सस्टेनेबल शब्द वापर
सस्टेनेबल शब्द वापरणारांना अध्यात्मिक म्हटल्याबद्दल आभार.
सस्टेनेबल या शब्दाचं सुद्धा आम्हाला वावडं आहे.
एम्बीए करताना एक वैकल्पिक सब्जेक्ट होता "सस्टेनेबल फायनान्स्" नावाचा. त्याचे शिक्षक्/प्राध्यापक हे समाजवादाने कलुषित झालेले मन असलेले होते. त्या सब्जेक्ट चा पहिला तास मी अटेंड केला होता ... कुतुहलापोटी. विषयाची भूमिका मांडताना त्यांनी नेहमीप्रमाणे "आम्ही शिकागो स्कूल ऑफ इकॉनॉमिक्स् टाईप नाही, आम्ही सामाजिक बांधिलकी पाळतो" वगैरे ट्याट्याट्या सुरु केलं. मी मागच्या दाराने सभात्याग केला. तो विषय वैकल्पिक असल्यामुळे घेतला नाही.
Permalink Submitted by
Permalink Submitted by Reflect-Contemplate on शनिवार, 29/04/2017 - 01:28.
मी मागच्या दाराने सभात्याग केला.
ROFL
म्हणजे गब्बर तुम्ही कॉलेजात जाऊन कॅपिटॅलिस्ट झाला नाहित तर पाळण्यात असल्यापासूनच होतात तर्.
When I reflect and contemplate .... बायकोला (माझ्याच, एकुलत्या) भेटल्यानंतर कॅपिटलिस्ट झालो.
पण आता मी कुठे कॅपिटलिस्ट उरलोय ? आता मी फक्त श्रीमंत धनदांडग्यांचा समर्थक आहे.
When I reflect and
When I reflect and contemplate . =)) =)) हाहाहा
.
When I reflect and contemplate .... बायकोला (माझ्याच, एकुलत्या) भेटल्यानंतर कॅपिटलिस्ट झालो.
ऐसी रंग दे, के रंग नहीं छुटे ।
धोभिया धोये चाहे सारी उमरिया ॥
वा! असा रंग चढला तुम्हाला की रंग नाहि छुटे तर ;)
रेखांशावर चालल्यानं
रेखांशावर चालल्यानं परिवलनाच्या अक्सायापासून अंतर कमी जास्त होतं. force, distance, energy, mass etc la parallel torque, radious, energy, moment of inertia असे म्हणायचे होते. फायनली ३० किमी मध्ये ऊर्जा किती असते ते पाहायकचं आहे. ती कुठोन येतं हे सर्वात जास्त कुतूहल.
=========================
गंडलेलं काही नाही . काळजी नसावी .
पोटेंशिअल आहे.
अंतर कमी जास्त कसं होतं याचा विचार करा म्हणजे कळेल.
माझं कसं काही गंडलेलं असतं हे कंक्लूड करायची तुम्हाला जी घाईची लागलेली असते ती जरा कंट्रोल करत चला.
घाई? अहो 2009 साली तुम्हीच न्युटनचे नियम गंडलेत म्हणून दुसरं एक संस्थळ डोक्यावर घेतलं होतंत ना? असं विसरू नका ब्वॉ!
बाकी, एका प्रतिसादाला किती उपप्रदिसात द्यायचे यावर काही तुमचं मत असल्यास ते ही द्या.
न्यूटनचे नियम नियम
न्यूटनचे नियम नियम नाहीतच, आजही सांगतो. पहिल्या नियमात फोर्स शब्द वापरायचा, दुसऱ्यात त्याची व्याख्या करायची हा प्रकार नियम नाही, गृहितक आहे. आजही तो धागा आहे नि आज ही दुर्दैवानं तुमच्या डोक्यावरूनच गेलेला आहे. त्याला माझ्याकडे उपाय नाही.
घ्या!
न्यूटनचे नियम नियम नाहीतच, आजही सांगतो.
नियम फक्त अरूणजोशींचे!
आजही तो धागा आहे नि आज ही दुर्दैवानं तुमच्या डोक्यावरूनच गेलेला आहे. त्याला माझ्याकडे उपाय नाही.
बरोबर. काय करणार, अजो काय लिहतात हे सगळ्यांच्याच डोक्यावरून जातं. त्या धाग्याचा दुवा द्या बरं जरा, म्हणजे लोकांना पण जरा तुमच्या डोक्यातून काय काय जातं हे पुन: एकदा अनुभवता येईल.
जाता जाता अजून एक - माझं कसं
जाता जाता अजून एक - माझं कसं काही गंडलेलं असतं हे कंक्लूड करायची तुम्हाला जी घाईची लागलेली असते ती जरा कंट्रोल करत चला. चूक होणं वेगळं, गंडलेलं असणं वेगळं. ज्या संद्न्या मी २० वर्ष्ह्हांपूर्वी शिकलो आहे त्या चूकतात, पण ते गौण असतं. मला गंडलेलं पाहायची ऐपत यायला तुम्हाला बराच अवकाश असावा.
ज्या संद्न्या मी २० व
ज्या संद्न्या मी २० वर्ष्ह्हांपूर्वी शिकलो आहे त्या चूकतात, पण ते गौण असतं.
तुमचं आकलन चुकतं, पण ते गौण असतं.
सांगोवांगी अन वडाला वांगी, पण ते गौण असतं.
नास्तिक गांडू हे सांगायला घाईची लागलेली असते, पण ते गौण असतं.
शास्त्र व गणित कसे चुकले हे सांगायचे (त्यातलं काही कळत नसूनही) आणि त्यात हजार चुका करायच्या, पण ते गौण असतं.
इतरांना ट्रोल अन कायबाय म्हणायचे, पण तेच अस्त्र इतरांनी स्वत:वर उगारल्यास आपण व्हिक्टिम कार्ड प्ले करायचं, पण ते गौण असतं.
और कुछ बाकी रह गया है का गौणेश्वरजी?
आकलन्? आकलन चुकलेलं?
आकलन्? आकलन चुकलेलं?
नास्तिक गांडू असतात? काहीही?
गणित कसे चुकले? शास्त्र कसे चुकले?
मी कोणाला ट्रोल म्हणालो? मी?
===============================
एवढा निर्बुद्ध सदस्य आणि वाचक पाहिला नव्हता. तरुण म्हणून बळेच दिलेली सगळी प्रमाणपत्रे मागे. तुमची खरी जागा खुमखुमीनगर!!!
अगदी मेक समवन युवर
अगदी मेक समवन युवर बिच नसावं.
पूर्वीच्या / जुन्या गुरुशिष्य परंपरेत गुरूला प्रतिप्रश्न विचारणं, त्याच्या योग्यतेवर शंका घेणं वगैरे अलौड नव्हतं. गुरू सांगेल ते काम - मग ते कितीही मानहानिकारक असो - गपगुमान करायचं. (भीमसेन जोशींना सवाई गंधर्वांनी दूरवरून पाणी आणायचं काम करायला लावलं होतं. पुढच्या पिढीत माधव गुडींना भीमसेन जोशींच्या (द्वितीय) पत्नीची लुगडी धुवायला लागली असा उल्लेख एका (कॉण्ट्रोव्हर्शियल) पुस्तकात आहे.)
म्हणजे एकदा गंडाबंद शिष्य झालं की गुरूवर पूर्ण विश्वास टाकायचा. मग प्रसंगी गुरू लोक्स गैरफायदा घेत असत. त्यामुळे "गुरूपदी पोचून एखाद्याचा पूर्ण विश्वास संपादन करणे, आणि त्याचा गैरफायदा घेणे" याचं सांकेतिक रूप 'गंडा घालणे' असावं.
आता कसा जाणवणार हरित
आता कसा जाणवणार हरित क्रांतीचा परिणाम? लोकसंख्या १२ टक्के चक्रवाढीने वाढतेय पण एकरी धान्योत्पादन तसेच कसे वाढेल? ते एकदा रासायनिक खते+ नवीन सुधारित वांझोटे वाण+ पीक संरक्षणाचे रासायनिक फवारे यातून साध्य झालं होतं.
बाकी एरंडाचे गुह्राळ चालू ठेवायचे का?
लोकसंख्यावाढ बारा टक्के?
लोकसंख्यावाढ बारा टक्के? तुम्हाला बहुतेक दशकाला बारा टक्के म्हणायचं आहे. म्हणजे वर्षाला 1.15%. हरितक्रांतीच्या वेळी ती साधारण 2% ने होत होती. तेव्हापासून अन्नउत्पादन कितीतरी अधिक वेगाने वाढलेलं आहे. लोकसंख्यावाढीचा दर झपाट्याने कमी होतो आहे. तीनेक दशकांत तो शून्यावर येईल.
अजो , हे वाचा !! " http:/
अजो , हे वाचा !! " http://www.thehindu.com/opinion/op-ed/how-bidar-beat-back-the-drought/a…" तुमच्या भागातील आहे . इंटर्स्टिंग वाटते का बघा .
च्यायला हे हायक्लास समज
च्यायला हे हायक्लास समजले जाणारे ब्रॅन्डस उच्चारायला इतके अवघड का असतात्?
गुची का गुक्किं
ज्युसी कुटुर का आण्खी काही
निके का नायके
व्होग या शब्दाने ही माझी एकदा वाईट रीतीने विकेट घेतली होती :(
.
.
ब्रॅन्डच्या नावाच्या अवघडलेपणावरुनच व आपल्याला तो उच्चारता येण्यावरुनच आपली लायकी सिद्ध होते :(
चॉन्ली असा होतो. (सानुनासिक न
चॉन्ली असा होतो. (सानुनासिक न)
फ्रेंच प्रभावामुळे बरेच हुच्चभ्रू / शिकेल लोक लिहिताना शब्दांत अनावश्यक / अनुच्चारित अक्षरं घालू लागले. अगदी ओळखीचं उदाहरण म्हणजे कलरमधला यू. पण हामरिकेटले तो प्रभाव सुरू होण्याआधीच डबक्यापार कटल्याने त्यांच्या कलरात यू नाही.
--------
अवांतर:
A lively young damsel named Menzies
Inquired, "Do you know what this thenzies?"
Her aunt, with a gasp,
Replied, "It's a wasp,
And you're holding the end where the stenzies.
(Menzies = मिंगस हे माहीत नसेल तर काहीही टोटल लागत नाही. मिंगस एक स्कॉटिश आडनाव आहे.)
निके का नायके
निके का नायके
याचा फैसला केशवसुतांनी गेला बाजार शंभराहून अधिक वर्षांपूर्वी करून ठेवलेला आहे. तुम्हाला ठाऊक नाही याचा अर्थ तुमचा मराठीचा अभ्यास तोकडा पडतो, इतकाच होतो.
फोले पाखडिता तुम्ही, निवडितो ते सत्त्व आम्ही निके!
(च्यायला, नायके असायला काय सिंहली आहेॽ)
आणि, फार हाय लेव्हल मराठीबद्दलही बोलत नाहीये मी! तर, शाळेत मराठी पद्याच्या तासाला तुम्ही छान झोपा काढलेल्या आहेत, हे उघड आहे. ती कविता शाळेच्या अभ्यासक्रमात होती!
'अभ्यास वाढवा', एवढाच प्रेमळ सल्ला देऊन खाली बसतो.
My jeev fell in bhande
>>आमच्या आंबेवाल्याने* पेटीएमने पैसे घेण्यास नकार दिला. मी देशभक्त नसल्याने, "भले आंबे नाही मिळाले तरी चालतील पण क्याशलेसच व्यवहार करीन" असा बाणेदारपणा मी केला नाही.
*एरवी तो मोदीभक्त आहे.<<
हां म्हणजे देव आभाळात आहे आणि जगाचं सर्व भलं चाललं आहे.
- वुडहाउस मूडमधला जंतू
केजरीवाल यांच्यावर "होलियर
केजरीवाल यांच्यावर "होलियर दॅन दाऊ", "सेल्फ्-राईचस" असण्याचे आरोप केले जात आहेत्. मला पडलेला प्रश्न हा की - "सेल्फ्-राईचस" असणं हे इतकं वाईट, अनिष्ट का मानलं जावं ? खोटंखोटं/ढोंगी "सेल्फ्-राईचस" असू नये हे मान्य. पण "सेल्फ्-राईचस" असणं चांगलंच नाही का ?? ते इतकं टीकाजनक का ?
"सम्राट" राणा प्रताप (१५४०)
आजच्या दिनवविशेषात हे दिसलं --
सम्राट राणा प्रताप (१५४०),
मागील काही दिवसांपासून जाणवत होतच; पण आता अगदि ठळ्ळक म्हणावा असा बदल दिसतो आहे.
ऐसी ह्या वेबसायटीवर पुरोगामी ,सेक्युलर, प्रोग्रेसिव्ह,लिबरल, आधुनिक विचारांचा पगडा असल्याचं पूर्वी समजलं जात होतं.
हल्ली तसं वाटत नाही. नक्की काय झालय ?
ऐसी व्यवस्थापनात बॅट्या, ढेरे किंवा तत्सम असले पापी, ढोंगी, बूर्झ्वा , प्रो-परंपरावादी , भक्त स्टाइलचे लोक जमलेत काय ? की व्यवस्थापन आधीचेच आहे, आणी त्यांची भूमिका, विचारसरणी जराशी बदलत चाल्लिये ? की ह्यातलं काहिच नाहिये, आणि आम्हिच ऐसीला समजून घेण्यात कमी पडलोत?
खरं तर राणा प्रतापाचा जन्मदिनास दिनविशेषात स्थान मिळालं तेच खुपे. तुम्ही तर त्याचा सम्राट वगैरे उल्लेख करताय! अरे काये हे ? कुठे नेउन ठेवलात ऐसी सिकुलरांचा?
आज ह्याला सम्राट म्हणताय, उद्या पहिल्या बाजीरावास पराक्रमी वगैरे म्हण्ण्यास कमी करणार नाहित तुम्ही लोकं.
संबंध काय?
बाकीचं जाऊद्या (विनोदही बरा आहे.)
पण राणा प्रतापाला सम्राट म्हणायचं का सरदार म्हणायचं याचा अन सेक्युलर, पुरोगामी, प्रोग्रेसिव्ह, लिबरल किंवा आधुनिकता याचा नक्की संबंध काय?
फार्फार तर ऐतिहासिक वाद उकरून काढता येऊ शकतो. सम्राट म्हणजे नक्की काय (त्यासाठी अश्वमेध केला होता का) वगैरे वगैर
ऐसीला समजून घेण्यात कमी पडलोत?
ते आम्ही काय सांगणार. पण उगाच काहीतरी डोक्यात किडे येणे (ही एक म्हण आहे म्हणतात) बाबतीत तुम्ही जास्त पडला असावात असे वाटते.
(१) सच्चाई के लिये लडने
(१) सच्चाई के लिये लडने वाले इतने लोग होने के बावजूद सच्चाई बाहर क्यो नही आती ?
(२) मिडियामधे आपल्याला गैरसोयीची बातमी दिसली की लगेच् मिडिया बिकाऊ, संधीसाधु कशी होते ? मिडिया मधे आपल्या आवडतीची बातमी अनेक दिवस दिसली नाही की मिडिया बिकाऊ कसा होतो ??
(३) dog does not eat dog हे तत्व राजकारण्यांना लागू केले तर ते योग्य की अयोग्य ?
(४) आईवडिलांना वृद्धाश्रमात ठेवणाऱ्यांच्या विरुद्ध आरडाओरडा करणारे - या आईवडिलांनी हेच उच्च संस्कार केले होते का की ज्यांचा परिपाक म्हणून त्या "सुसंस्कृत् मुलांनी" त्या आईवडिलांना वृद्धाश्रमात ठेवले ?? हा प्रश्न का विचारत नाहीत ??

१ मिनिटाच्या स्वप्नात आपण दोन
१ मिनिटाच्या स्वप्नात आपण दोन- तीन दिवसाचा एपिसोड कसा काय पाहतो?