ही बातमी समजली का? - भाग १४५
अनेक बातम्यांबद्दल आपल्याला चर्चा करावीशी वाटते. खरं तर, ऐसी अक्षरेवर बातम्यांवर चर्चा करण्यासाठी बातमी नावाचा लेखनप्रकारही अस्तित्त्वात आहे. "ताज्या घडामोडी, अर्थकारण, राजकारण इत्यादी प्रकारच्या संस्थळाबाहेरील लिखाणाची चर्चा करण्यासाठी हा विभाग वापरावा. इथे मूळ लेखावरच्या शब्दसंख्येचे बंधन नाही; एखादी बातमी पसरवणे किंवा चर्चा घडवणे यासाठी हा विभाग वापरावा." असं तिथे स्पष्ट म्हटलेलंही आहे. पण, त्याबद्दल विस्तारानं लिहिण्याइतका किंवा एखादा व्यवस्थित चर्चाप्रस्ताव मांडण्याइतका वेळ किंवा माहिती किंवा उत्साह किंवा हे सारंच नसणं वगैरे कारणांमुळे आपण चर्चाप्रस्ताव लिहित नाही. शिवाय बऱ्याचदा "एकोळी" / नुसत्याच लिंका देऊन धागा काढायचंही जीवावर येतं. तेव्हा अशा बातम्यांवर चर्चा करण्यासाठी, एकमेकांना अशा बातम्या लक्षात आणून देण्यासाठी, त्यांचे दुवे देण्यासाठी हा धागा काढत आहे. एखाद्या बातमीवर विस्तारानं चर्चा सुरू झाल्यास त्या संवादाचे वेगळ्या 'बातमी' धाग्यात रुपांतर केलं जाईल.
आधीच्या धाग्यात १००+ प्रतिसाद झाल्यामुळे नवा धागा.
?
तिकडे मोठ्या प्रमाणावर हे प्राणी खाल्ले जातात.
बांग्लादेशात समजू शकतो, पण नेपाळातसुद्धा?
नेपाळात तर साधे रस्त्यात गाडीने गायीला उडवले तरी तो गुन्हा ठरतो, असे ऐकून होतो. आणि अशा या (जगातल्या एकमेव) हिंदुराष्ट्राचा भारतीय हिंदूंना/हिंद्त्ववाद्यांना अभिमान वगैरे असायचा म्हणे ना? मग तिथेसुद्धा गायी खातात??? आणि मोठ्या प्रमाणात??????
(नेपाळात म्हशी मात्र मोठ्या प्रमाणावर खातात, असे ऐकून आहे.)
मांसाहार करणाऱ्यांना घर
मी माझी प्रॉपर्टी कुणाला विकायची हे मी ठरवू शकत नाही ? मला तसे ठरवता येऊ नये ?? का बरं ?? मांसाहाऱ्यांना घर न विकण्याचे ठरवल्यामुळे माझा कस्टमर बेस कमी होत नैय्ये का ?? म्हंजे मी माझ्या प्रॉपर्टी च्या विक्री मधे लॉस घेत नैय्ये का ?? मग मी माझ्या हाताने माझ्याच पायावर कुऱ्हाड मारून घेत असेन तर माझ्यासारख्या लुच्च्या, लबाड, धनलोभी बिल्डरला लॉस झालेला सरकारला व जनतेला का नको आहे ?? माझ्यामुळे घरांच्या किंमती गगनाला भिडलेले आहेत नैका ?? मग मला लॉस होऊ नये म्हणून सरकारचा जीव कासावीस का होत आहे ??
Let go of your arrogance, ego
Let go of your arrogance, ego for good of country: Former AAP colleague to Arvind Kejriwal
आत्ता दिल्ली महापालिकेच्या निवडणूकांमधे आप ला जोरदार बहुमत मिळाले असते तर हाच आरडाओरडा कमी झाला असता. नै ?
(मनोबा मोड ऑन्)
गब्बर हा छुपा आप समर्थक असो वा नसो ... त्याला आप प्रति सहानूभूति नक्कीच वाटते.
[आणि व्यनि मधून्.]
किती खेचशील ?
(मनोबा मोड ऑफ्फ्)
http://www.loksatta.com/desh
http://www.loksatta.com/desh-videsh-news/delhi-highcourt-hospital-patie…
बिल न भरल्यास पेशंटला रुग्णालयात डांबून ठेवू शकत नाही: हायकोर्ट
काय चाललय :-( पुढे हॉटेल मधे खाऊन पण बिल न भरता बाहेर जाऊ दिले पाहिजे असा निर्णय येणार्.
सरकारी रेल्वे मधे मात्र, तिकीट नसताना पकडले की बाहेर जाऊन देत नाहीत्. आता माननिय न्यायालयानी ती पण मुभा द्यावी.
Vinod Khanna, actor and MP,
Vinod Khanna, actor and MP, dies at 70
दौलत इतनी दौलतमंद नहीं जो सच्चा प्यार खरीद सके.
--
बोंबला !!!
----
96% of Hindus in the US have at least a college degree or its equivalent.
त्यात एका माणसाचा कॉमेंट मस्त आहे -
Does that count degrees earned in past lives?
---
Indian woman 'sold' in Saudi Arabia rescued after Sushma Swaraj's intervention
(अंधभक्त मोड ऑन्)
सुषमाबाईंचा विजय असो.
(अंधभक्त मोड ऑफ्फ)
तुलती है कहीं दीनारों में, बिकती है कहीं बाज़ारों में ....
२१ ऑगस्ट - सूर्यग्रहण्
https://www.nytimes.com/2017/04/27/travel/where-to-celebrate-the-solar-…
बाय द वे खग्रास आहे की खंडग्रास की कंकणाकृती आहे?
__________
https://www.nytimes.com/2017/04/26/well/diet-sodas-tied-to-dementia-and…
बाप रे सॅकरिन टाळायला हवे :( मी कॉफीत घालते क्वचित्.
___________
https://www.nytimes.com/2017/04/24/well/eat/sugary-drinks-brain-aging.h…
साखर खाल्याने मेंदूवर परीणाम होतो दुष्परीणाम!
दे दान सुटे गिराण
अमेरिकेच्या ठरावीक भागांत खग्रास ग्रहण आहे. वेळात वेळ काढून खग्रास ग्रहण बघायला जाणे अशी सर्व उत्तर अमेरिकावासियांना विनंती.
---
सॅकरीन आणि स्टिव्हियाचा आणखी दुष्परिणाम असतो. (हे तिर्री मांजरीच्या डॉक्टरांनी सांगितलं. माणसांसाठीही लागू पडतं, असं वाचनात आलं आहे.) गोड चव तोंडात लागली की मेंदूकडून आज्ञा येते आणि इन्सुलिन तयार होतं. पण त्या इन्सुलिनला पचवण्यासाठी साखर खाल्लेलीच नसते. त्यामुळे रक्तातली साखरेची पातळी नेहमीपेक्षा झपाट्यानं कमी होऊन चक्कर येण्यासारखे प्रकार घडू शकतात.
दुसरं माणसांच्याच बाबतीत वाचलेलं. ज्यांना वजन कमी केलेलं चालणार आहे, अशा लोकांनी एक वेळ साखर खाल्लेली चालेल; कारण वर दिलेलं. पण त्याखेरीज, शरीराला ऊर्जा पुरवण्यासाठी शरीरातल्या कीटोन बॉडीज वापरल्या गेल्या तर वजन कमी करण्यात मदत होते. शरीरात इन्सुलिन मोठ्या प्रमाणावर असतं तेव्हा रक्तातली साखर वापरून ऊर्जा मिळते, पण साठवल्या गेलेल्या मेदाचं चयापचय होत नाही, कीटोन बॉडीज तयार होत नाहीत.
(हे सगळं अर्धवट आठवणीतून लिहिलेलं आहे. यात तपशिलातल्या चुका असतील; त्या जाणकारांनी दुरुस्त कराव्यात. पण) मथितार्थ असा की साखरेच्या जागी बदली पदार्थ खाणं एरवीही फार बरं नाहीच.
बरोबरे साखरेचं.
बरोबरे साखरेचं.
केवळ सवय आहे आणि सोपं पडतं म्हणून दिली जाणारी बिस्किटं कुत्र्यामांजरांना त्रासदायकच ठरतात. मैदा वाइट. कुत्र्यांना भाकरी चालते. मांजरांना सुके मासे योग्य.
# रक्तात साखर असूनही ती पेशिंना घेतायेत नाही तेव्हा मेद वापरतात. त्यातून कीटोन्स, असिटोन होतो तो बाहेर टाकला जातो. असिटोन बाहेर पडणे ही साखर ट्रान्सफर न होण्याची खूण असते.
शहरी जनतेला खूश ठेवण्यासाठी
शहरी जनतेला खूश ठेवण्यासाठी शेतमालाचे दर पाडणे योग्य नव्हे इति पृथ्वीराज चव्हाण्.
मामामुजी, ग्रामीण जनतेला खूश ठेवण्यासाठी शेतीमालाचे दर वाढवणे योग्य असेल तर् ते कोणत्या आधारावर ??
GST to push Indian growth to
GST to push Indian growth to over 8%: IMF
हो ... पण जीडीपी च्या आकडेवारी ची विश्वासार्हता कितपत आहे ते मात्र समजत नाही.
-----
Pakistan man flies in, tells Delhi airport officials he is from ISI
पण "हे खरं कशावरून ?" असा प्रश्न कोणीच कसा विचारलेला नाहि ? व पाक ने "हा आमचा माणूस नाहीच्" असा दावा कसा केलेला नाहि ?
-----
कॉंट्रोव्हर्सी ही अनेकदा इष्ट (डिझायरेबल्) असते. ह्या नवीन वादाला तोंड फोडणे इष्ट आहे. देबरॉय यांचे अनेक आभार.
-----
Tax the rich farmer, don’t club him with the poor, says Arvind Subramanian
Do we need more evidence that Govts, whether of left parties or right, are hostile to rich ?
.
.
बाहुबली सिनेमातल्या
बाहुबली सिनेमातल्या आदिवासींच्या भाषेच्या जन्माबद्द्ल आणि जनकाबद्दलचा हा लेख.
https://swarajyamag.com/culture/kilikki-and-madhan-karky-breathing-life…
लेखाच्या शेवटी या भाषेतलल्या गाण्याचा व्हिडो आहे.
ढेरे सरकार ,
ढेरे सरकार ,
भारीये भाषा लेखाची .. उदा : "who has penned the dialogues and songs for the Bahubali series is to Kilikki what Panini was to Sanskrit "दिलखेचक वाक्य आहे हे . अर्थात स्वराज्यमाग आहेच भारी .
एक अवांतर खोडसाळ प्रश्न मनात आहे पण विचारत नाही .
Wikipedia blocked in Turkey,
Wikipedia blocked in Turkey, complete with approved court order.
सर्वात वाइट्ट वेबसाइटच ती.
( http://www.thehindu.com/todays-paper/tp-national/recep-tayyip-erdogan-i… )
Trump’s Tax Plan: A Move in
Trump’s Tax Plan: A Move in the Right Direction
Trump also calls for eliminating the estate tax. There are obvious interests that will push back on this, calling it a tax break for the rich, but the fact is that income tax has already been paid on the money that people leave in their estates, and the estate tax amounts to a double tax. Of course, some will argue that the rich should be double-taxed, and I’m guessing this recommendation will meet with substantial resistance as the debate does ahead.
शुभ लाभ !!!
----
Prime Minister Narendra Modi today coined a new acronym, "EPI" - "Every Person is Important"
मोदीजी याची इम्प्लिकेशन्स तरी सांगा !!!
विस्कॉन्सिन, मिनेसोटा, मेन
विस्कॉन्सिन, मिनेसोटा, मेन,व्हरमॉन्ट,मॅसॅच्युसेट, मिशिगन , न्यु हॅम्प्शायर - एकंदर उत्तर अमेरिकेत ३०.००० गोड्या पाण्याची तळी आहेत.
हिवाळ्यात स्त्यावर पखरण केल्या जाणाऱ्या मीठामुळे, या तळ्यात अतोनात मीठ साचत चालले आहे. :(
https://www.usnews.com/news/best-states/articles/2017-04-17/road-salt-r…
__________
https://www.usnews.com/opinion/articles/2016-06-06/socialism-is-devasta…
Socialism deprives individual choice and crushes ambition in pursuit of a uniform, unfulfilling and arbitrary definition of "equality." And it does all of this in the name of "the greater good."
.
Life isn't perfect anywhere in the world. It's full of scarcity and trade-offs and uncertainty. But I know that to facing those challenges, a life of choice and dignity like we have enjoyed in the United States is by far the preferable option to socialism and its inevitable human suffering. No one should have to live the images we're seeing on television – and certainly not because of a wrongheaded political ideology.
___________
अभिव्यक्तीस्वातंत्र्य आणि अर्थव्यवस्था कशा निगडीत आहेत हे - https://www.usnews.com/opinion/articles/2016-05-23/free-speech-is-good-…
ठीकठाक वाटला.विशेष आवडला नाही. बळच ...
Erdogan accused the West of
Erdogan accused the West of being “aggressive” towards Muslims.
Ahead of arriving in Delhi on Sunday for a two-day visit, Turkey President Recep Tayyip Erdogan advocated “multilateral dialogue” to settle the Kashmir question — a stand which flies in the face of New Delhi’s position that the dispute should be resolved bilaterally.
घ्या.
वेस्ट तेवढं मुसलमानांचं स्टिरिओटायपिंग् करते. पण मुसलमान मात्र वस्तुनिष्ठ असतात्.
==========
देशातील मुस्लिम समाजाला लक्ष्य केले जात आहे, अशी चिंता राष्ट्रीय अल्पसंख्याक आयोगाने व्यक्त केले
हास्यास्पद बडबडतात लोक !!!
आमचा कृष्ण आणि तुमचा
जयदेवाच्या 'गीत गोविंदा'मधल्या पंक्तींना अनुसरून काढलेलं अठराव्या शतकातलं एक लघुचित्र सोशल मीडियावर टाकलं म्ह्णून गुन्हा दाखल.
SAN FRANCISCO: India-based IT
टाइम्स बातमी: SAN FRANCISCO: India-based IT services firm Infosys Ltd said late on Monday that it plans to hire 10,000 American workers in the next two years and open four technology centres in the United States, starting with a centre this August in Indiana
पाकी वंशाच्या अमेरिकन एअरलाईन्स च्या कर्मचाऱ्याला म्हणे द
Uttar Pradesh: Ambulance service launched exclusively for cows
गायींसाठी अॅंब्युलन्स सर्व्हिस ? संविधान हे माणसांसाठी आहे. गायीसाठी नाही.
हास्यास्पद निर्णय आहे.
---
पाकी वंशाच्या अमेरिकन एअरलाईन्स च्या कर्मचाऱ्याला म्हणे दहशतवादी संबोधून छळ केला
सच्चाई छुप नही सकती .... बनावट के उसूलोंसे ??
===
बीटल्स च्या चाहत्यांसाठी.
============
FDI inflows into India jump 18% to a record $46.4 bn in 2016 despite global fall
सरकार म्हणतं -
Foreign direct investment (FDI) inflows into India in 2016 calendar year jumped 18% to a record $46.4 billion, at a time global FDI inflows fell.
UNCTAD म्हणतं -
UNCTAD said FDI inflows into India fell 5% to $42 billion in 2016, yet India stood as the 10th most attractive destination in the world for FDIs.
=========
जुनं ते सोनं ??
#WorldPressFreedomDay
काल जागतिक पत्रकारिता स्वातंत्र्य दिवस होता. Reporters Without Borders ही संस्था त्या निमित्तानं जगातल्या पत्रकारितेचा आढावा घेते. त्यांनी गेल्या आठवड्यात प्रकाशित केलेल्या अहवालात भारताचं स्थान गेल्या वेळेपेक्षा तीन क्रमांक खाली घसरून १३६वर आलेलं आहे. (अधिक माहिती इथे त्यांच्या पद्धतीविषयी माहिती इथे) अहवालातून एक उद्धृत -
self-censorship is growing in the mainstream media.
पुढे खरी गंमत सुरू होते. 'टाइम्स ऑफ इंडिया' आणि 'इकॉनॉमिक टाइम्स'नं ह्याविषयी बातमी दिली होती. पण नंतर ती गायब झाली. गूगल कॅशेमधून -
टाइम्स ऑफ इंडियातली बातमी
इकॉनॉमिक टाइम्समधली बातमी
भारतातली मुख्य प्रवाहातली माध्यमं सेल्फ सेन्सॉरशिप करतात असं म्हणणारा अहवाल सेल्फ-सेन्सॉरशिपची शिकार झाला असं म्हणावं का? #मेराभारतमहान #मेरीप्रेसस्वतंत्र
बातमीतून संदर्भ वगळले आहेत म्हणून तर काढली नसेल्?
अशा बातम्यांमधे परिस्थितीत नक्की काय बदल झाला आहे ते लिहीणे महत्त्वाचे असते. तेच या मूळ बातमीतून वगळले आहे. हे १३६ रॅंकिंग २०१४ पासून तसेच आहे. आणि त्याहीपेक्षा महत्त्वाची माहिती, जी यात असायला हवी होती, ती म्हणजे २०१३ साली हे १४० वर होते. जुनी आर्काइव्ह्ज पाहिली तर २००२ सालच्या पहिल्या लिस्ट पासून ते साधारण घसरतच आले आहे. मधली दहा वर्षे मोदी सरकार नसतानाही. पण या बातमीवाल्यांनी त्यांचा ग्राफ आधीच काढून नंतर त्यावर पॉइण्ट्स जमवले आहेत असे दिसते. त्यामुळेच अशी अर्धवट माहिती देणारी व बायस्ड निष्कर्ष काढणारी बातमी काढली तर नसेल्?
https://rsf.org/en/world-press-freedom-index-2013
यात सध्या मीडिया घाबरून असेल वगैरे बद्दल अजिबात वाद नाही. फक्त ते हायलाइट करायला ओढूनताणून या बातमी मोदी सरकारला ओढले आहे.
फक्त २०१६ च्या तुलनेत धरले आहे म्हणून
२०१६ मधे (मोदी सरकार असूनही) १३३ होते. पण २०१५ मधे १३६ च होते. २०१३ मधे तर (मोदी सरकार नसताना) १४० होते. त्याआधीपासूनच ते घसरत आहे. त्यामुळे मोदी सरकार ने केलेल्या गोष्टींमुळे हे रॅंकिंग घसरले हा दावाच - या पॅटर्नवरून्- पटत नाही. मीडियावर दबाव नसेल असे मला अजिबात म्हणायचे नाही. पण ते अनुमान इथे कसे काढले ते अगम्य आहे. केवळ २०१६ ते २०१७ मधलाच बदल धरल्याने हे दहा वर्षातील बदल न बघता केवळ सोयीचा एक बदल चेरी पिक केलेला आहे असे दिसते.
कारणं वाचली तर आणखी त्यातला गोंधळ दिसतो. दोन मुद्दे:
१. ती सगळी कारणे जमेस धरायची, तर इन्डेक्स आणखी घसरायला हवा. २०१३ चा १४० चा नंबर मग २०१७ मधे १३६ वर कसा? म्हणजे त्यांना कन्सर्न आहे पण ती त्यांचीच शास्त्रीय ई. पद्धत "पकडू" शकली नाही. त्यामुळे नुसतेच वर्णन दिले आहे.
२. मूळ बातमीत गोंधळ असेल, तर पत्रकाराची जबाबदारी आहे की त्याचे विश्लेषण करून ते आपल्यापुढे आणायला पाहिजे, यांनी तो गोंधळ तसाच "इन्टर्नलाइज्" केला आहे.
लेझी जर्नालिजम तरी आहे किंवा आधी म्ह्ण्टल्यासारखे निष्कर्ष आधीच काढून मग नंबर्स निवडले आहेत्.
पुन्हा एकदा खुलासा - सध्या पत्रकार लोकांना मोकळेपणा वाटत नसेल हे सर्वसाधारणपणे मान्य आहे, पण हे नंबर्स ते दाखवत नाहीत्. "अॅनेलिसीस्" डेटा/टूल्स मधे अचूकता नाही.
संहिताच सख्या या, तर्क कसा शोधावा...
>>पुन्हा एकदा खुलासा - सध्या पत्रकार लोकांना मोकळेपणा वाटत नसेल हे सर्वसाधारणपणे मान्य आहे, पण हे नंबर्स ते दाखवत नाहीत्. "अॅनेलिसीस्" डेटा/टूल्स मधे अचूकता नाही.<<
आणि पुन्हा एकदा खुलासा - मूळ डेटा, अॅनालिसिस चुकीचा असेल, तर तसं स्पष्ट म्हणण्याऐवजी काहीच न सांगता बातमीच काढून घेण्यानं विश्वासार्हता गेलीच तर ती मूळ डेटा / अॅनालिसिसची नाही.
बाहुबली फिनॉमिनन किती जब
बाहुबली फिनॉमिनन किती जबऱ्या आहे त्याचे अजूनेक उदाहरण.
बांग्लादेशमधील ३८ फॅन्स खास चार्टर्ड विमानाने कोलकात्यात आले, फक्त बाहुबली बघायला.
भारताची चिंता करण्यास भार
भारताची चिंता करण्यास भारतीय समर्थ आहेत, तुम्ही युकेची चिंता करा.
भारताची चिंता करायला भारतीय समर्थ आहेत हे वाक्य न पटण्याजोगे आहे. पाकी सूकेब आत येऊन घुसुन आपल्या लोकांना मारतात आणि आपण काहीही करत नाही. हे अनेकदा झालेले आहे. तरीही आपण .....
Strengthen military, look for
Strengthen military, look for new allies to tackle Pakistan, China: Army chief
General Rawat said India must have close ties with countries like Iran, Iraq and Afghanistan.
प्रथम साध्या गोष्टी करूया. जसं : पाकी सूकेब चे धाडस नाही होता कामा आपल्या हद्दीत शिरायचं.
-
शांतिखोरांनो,
परमजित सिंग प्रकरणी मौन बाळगताय हे ठीक आहे पण मोदींवर "वॉर हिस्टेरिया" तयार करण्याचा आरोप कसाकाय केला नाहीत अजून ?
अडाणींना सणसणीत दंड?
ग्रेट बॅरिअर रीफच्या जवळच्या भागात दूषित पाणी सोडल्याबद्दल अडाणींना सणसणीत दंड होणार?
Adani faces possible multi-million-dollar fine over Abbot Point sediment water discharge
"There are serious penalties for corporations whose non-compliance with their environmental authorities or temporary emissions licences causes environmental harm, including fines of up to $3.8 million if the non-compliance was wilful, or $2.7 million if the non-compliance was unintentional," Mr Reeves said.
"Even with a licence to pollute in its back pocket, Adani has still managed to exceed the permitted discharge of contaminants by 800 per cent," the Mackay Conservation Group's Peter MacCallum said.
पण फार्फार मोठी लोकं* त्यांचे
पण फार्फार मोठी लोकं* त्यांचे फॉलोअर आहेत हे विसरलात का ?
...... तर जंतूंनी फॉलो केलं तर काय हरकत आहे .
अण्णा आपले जंतु मोठे नाहीत असे सुचवायचे आहे का तुम्हाला? ;)
संभाव्य प्रतिसाद - ओ तुम्हाला जे काही बोलायचं ते डायरेक्ट बोला माझ्या खांद्यावरुन बाण कशाला...
अविश्वसनीय, परंतु...
>>जंतू फार डेडिकेटेडली अदानींना फॉलो करतायत दिसतय. अदानीं/कोळसा खाणीच्या केवढ्या बातम्या शेअर करतायत!<<
इथे कुणी विश्वास ठेवणार नाहीत कदाचित, पण कधी तरी कोणत्या तरी बातम्या वाचल्या की फेसबुक/गूगल/अॅपल टाइपच्या अल्गोरिदम्सना वाटू लागतं की तुम्हाला अमक्याढमक्यात इंटरेस्ट आहे. मग ते त्या विषयीच्या अधिक बातम्या सुचवू लागतात. मात्र, त्या बातम्या पाहू लागलं की आपली प्रसारमाध्यमं किती विकलेली / बावळट आहेत ते दर वेळी लक्षात येऊ लागतं, कारण ह्या बातम्या परदेशी माध्यमांत जितक्या येतात त्या मानानं आपल्याकडे कमी दिसतात. म्हणजे उदा. कुबेरांनी ही बातमी द्यायला हरकत नाही, पण ते देत नाहीत.
बंदे मे है दम, वंदे...
>>फाईन चिल्लर आहे .<<
>>हे मला तरी फार महत्वाचं वाटलं नाही.<<
ज्यातून २२ बिलियन डॉलर्स ऑस्ट्रेलियन सरकारला मिळणार आहेत असा दावा केला जात आहे त्या प्रकल्पासाठी ही रक्कम चिल्लर आहे असं मानायला जागा आहे. म्हणजे फार खळखळ न करता भरून टाकावी इतकी चिल्लर. पण मग अडाणी बहुधा पुणेकरांसारखे ज्यात त्यात तत्त्वाचे वगैरे प्रश्न आणणारे आडमुठे असावेत का?
Last month, a spokesman for Adani said the company believed it had acted, "within the requirements of the temporary emissions licence", a position backed at the time by the department.
सकृतदर्शनी पुराव्यानुसार
>>मुकाट्यानी दंड भरला तर १. चुक मान्य आहे असा अर्थ होतो २. चांगला बकरा मिळालाय म्हणुन अजुन दंड ठोकतील्.<<
सकृतदर्शनी पुराव्यानुसार महिन्याभरापूर्वीच्या वरच्या वक्तव्यानंतर आता गुन्हा कबूल केलेला आहे :
The Environment Department confirmed Adani advised it of a "non-compliant release" of site water.
काय फेकता
अशी खळखळ केली नाही तर "काळ सोकवतो".
काहीही फेकत जाऊ नका हो.
माईनिंग प्रोजेक्ट्स संबंधित अनेक नॉर्मस असतात. रेग्युलेटरी कंपन्या रेटिंग्स देतात. अशा गोष्टीमुळे जर रेंटिँग खाली गेले तर इंश्युरंस कॉस्ट वाढते. अनेकवेळा परमिट्स वगैरे मिळण्यात अडचण येते वगैरे. पुढे इन्व्हेस्टर्स मिळण्यास त्रास होतो वगैरे वगैरे.
भारताची दक्षिण आशियातल्या
भारताची दक्षिण आशियातल्या देशांना देणगी - उपग्रह
सबका साथ सबका विकास ??
-----
An Indian barber is using fire to cut people's hair – and nobody's complained so far
यात त्याचा व्हीडीओ आहे. अग्नि वापरून केस कापतानाचा व्हीडिओ.
संघाचे गर्भसंस्कार
बघताय काय रागानं ४५० बाळं बनवली संघानं...
RSS wing has prescription for fair, tall ‘customised’ babies
“The parents may have lower IQ, with a poor educational background, but their baby can be extremely bright. If the proper procedure is followed, babies of dark-skinned parents with lesser height can have fair complexion and grow taller,” said Dr Hitesh Jani, national convener, Arogya Bharati.
जोशी साहेब , कमी i q हा
जोशी साहेब , कमी i q हा प्रश्न नाहीये . ते जे काही करणार म्हणत आहेत त्या कमी i q असलेल्या पालकांच्या मुलांचं " if the proper procedure is followed, babies of dark-skinned parents with lesser height can have fair complexion and grow taller वगैरे " हा दावा मेडिकली गमतीशीर आहे . बाकी कोणी काय पतंग उडवावेत हा ज्याचा त्याचा प्रश्न असे असले तरीही . .
... दावा चूकच आहे कशावरून...
... दावा चूकच आहे कशावरून...
दावा चूकच आहे कशावरून हे लिहायच्या आधी कृपया हे लक्षात घ्या कि अश्या पद्धतीचे दावे ऐतिहासिक काळापासून पार आजपर्यंत , ऋषी मुनी ते आजचे बालाजी तांबे यांच्यापर्यंत बरीच मंडळी करत आली आहेत . त्यांचे काय झाले आहे ते तपासणे जरुरी आहे .
आपण इंजिनिअर आहात , उद्या कोणी असा दावा केला कि साबणापासून विमान तयार करणे शक्य आहे , तर आपण असेच म्हणणार का , कि "दावा चूकच आहे कशावरून " ???
... इतका गदारोळ कशाला?...
हा प्रश्न कळाला नाही. हा साधी काही लोकांना विनोदी वाटणारी बातमी दिलेली आहे , त्याबाबतीत आपण एवढे हळवे का होताय ? नक्की कुठल्या बातम्या फक्त द्याव्यात असे आपणास वाटते ? आणि मग इतरांना महत्वाच्या/ उल्लेखनीय वाटणाऱ्या बातम्यांचं काय करावं ?
व्हय व्हय.
म्हणजे बघा ... २०१४ किंवा १५ साल असावं. कुणी तरी भारतीया विमानशात्र नावाचं जवळपास अर्बन लेजेंड असलेल्या पुस्तकाचा उल्लेख करून मग जुह चौपाटीवर उडलेल्या विमानाची वर्णनं केली आणि त्यावरून बराच गदारोळ झाला हुता. पाऱ्यापासून प्राचीन भारतीय विमानं बनवायचे वगैरे टाईप असं.
पण अजोंनी ते तसलं विमान का उडावं, ह्याचं उत्तर काही दिलं नाही. जंग जंग पछाडले पण इल्ला.
+१
शिवाय संघाच्या पदरी असलेल्या सो कॉल्ड शास्त्रज्ञांच्या कपॅसिटीवर तथाकथित विज्ञानवाद्यांचा इतका गाढ विश्वास प्रथमच पाहिला. जसे काही क्लोन आर्मीच् येऊ घातलेली आहे. ज्या लोकांना सिलॅबस चेंज करण्यापलीकडे काही झेपत नाही त्यांना क्लोनिंग वगैरेमधले डॉन समजणं म्हणजे, हॅ हॅ हॅ....
असे म्हटले की म्हणतात, आमचा विरोध इंटेंटला आहे. बर मग त्या इंटेंटमध्ये नक्की काय अन कसे चूक आहे ते सांगा. गोरेपणाची डिमांड समाजात आहे ती ते एक्स्प्लॉईट करत आहेत इतकेच. जर त्यांच्या मार्गे गेल्यास गोरेपणाची डिमांड पूर्ण होत नसेल तर ते आपोआपच मागे पडतील, हाकानाका. इतका जर गोरेपणा सलतोय तर अगोदर फेअरनेस क्रीमवर बंदी घालून दाखवा म्हणावे, आहे का दम? उगा डोक्यावर पडल्यागत काहीही बरळत सुटायचं आणि तरी म्हणे विज्ञानवादी.
ऑब्जेक्शन
>>गर्भसंस्कार या शब्दावर ऑब्जेक्शन आहे का संघाच्या त्याच्या व्हर्जनवर्?<<
माझा आक्षेप असेल हे तुमचं गृहितकच चुकीचं आहे. मी तर उच्च आयक्यू आणि गोऱ्यापान रंगाच्या बाळांचा कधी एकदा जिथेतिथे सुळसुळाट होतोय ह्याची आतुरतेनं वाट पाहतो आहे. म्हणजे घरोघरी सैफ-करीनाचे तैमुर पैदा होतील आणि भारतात क्रांती होईल. माझी सही पाहिलीत तरी ते लक्षात येईल.
इस्राएल आणि भारतातले मानवी हक्क
India Comes in the Line of Fire at UNHRC Over Rights Record, Racism
आपला परम मित्र इस्राएल काय म्हणतो पाहा -
Several western countries, including Canada, Ireland, Norway, Canada, Sweden and Israel – the ruling NDA government’s close ally – called upon India to “de-criminalise” same sex relations by revoking section 377 of the IPC.
Israel called for implementation of the Transgender Persons (Protection of Rights) Bill
Ukraine has banned American
आदमी अच्छा होगा !!!!
----
अमेरिकन कॉंग्र्स च्या लायब्ररि मधे सर्वात मोठा पॉर्न चा साठा आहे की काय ?
>>सदर घटनेत, सह्याद्री
>>सदर घटनेत, सह्याद्री ट्रेकरचा सहभाग नक्की काय समजायचा??
जनरली असल्या ट्रेकिंग ग्रुप्समध्ये पब्लिक रॅपलिंग वगैरे येणारं आणि त्याचा अनुभव असणारं असतं. जर मृतदेह कड्याखाली अवघड / जिथे सहज जाता येत नाही अशा ठिकाणी पडला असेल तर ही लोकं दोर लावून कडा उतरतात आणि बॉडी वर घेऊन येतात. पोलिस / फायरब्रिगेडच्या लोकांकडे हे स्किल सहसा नसतं, तेव्हा तेच अशा ग्रुप्सला बोलावतात मदतीला.
पण बातमी गंडली आहे हे नक्की.
उंच, गोरे, सुडौल आणि मटा
त्याच्या गँगमध्ये ईराणीवंशाचे तरूण आहेत. सुडौल बांध्याचे आणि ऊंच असल्याने ते पोलीस किंवा सीबीआय अधिकारी वाटायचे. त्याचा गैरफायदा घेत पोलीस असल्याचं भासवत ते लोकांना ठकवायचे. लोकही त्यांना फसायचे, असे पोलिसांनी सांगितले.
दुवा: http://maharashtratimes.indiatimes.com/maharashtra/thane-kokan-news/tha…
http://maharashtratimes
http://maharashtratimes.indiatimes.com/maharashtra/mumbai-news/how-to-c…
'रेसिपी आयुर्वेद' हा बीएएमएसच्या अभ्यासक्रमाचा एक भाग आहे आणि त्यात विद्यार्थ्यांना मुले कशी जन्माला घालावी याचं शिक्षण दिलं जात आहे. अभ्यासक्रमाच्या पुस्तकातील या रेसिपीला चरक संहितेतून घेण्यात आलं आहे. नर भ्रूण तयार करण्याच्या या प्रक्रियेला पूसवान म्हटलं जातं आणि ज्या स्त्रीयांना मुल हवं आहे त्यांनी गर्भधारणेपूर्वी ही प्रक्रिया पूर्ण केली पाहिजे असं या अभ्यासक्रमाच्या पुस्तकात नमूद करण्यात आलं आहे.
या पुस्तकात मुलांना जन्माला घालण्याच्या अनेक प्रक्रिया सांगितल्या गेल्या आहेत. त्यातील एक प्रक्रिया अत्यंत खर्चिक असून या प्रक्रियेत सोने-चांदीचा वापर करण्याचा उपाय सुचविण्यात आला आहे. ज्या स्त्रीयांना मुलगा जन्माला यावा वाटत असेल त्यांनी सोने, चांदी किंवा लोखंडाच्या दोन मूर्ती (पुरूषांच्या) बनवाव्यात. त्यानंतर या दोन्ही मूर्त्या भट्टीत वितळव्याव्यात आणि वितळलेला धातू दूध, दही किंवा पाण्यात मिसळून पुष्प नक्षत्राच्या दिवशी प्राशन करावा, असा सल्ला या पुस्तकात देण्यात आला आहे.
विशेषणीं low-key इये
ज्या स्त्रीयांना मुलगा जन्माला यावा वाटत असेल त्यांनी सोने, चांदी किंवा लोखंडाच्या दोन मूर्ती (पुरूषांच्या) बनवाव्यात. त्यानंतर या दोन्ही मूर्त्या भट्टीत वितळव्याव्यात आणि वितळलेला धातू दूध, दही किंवा पाण्यात मिसळून पुष्प नक्षत्राच्या दिवशी प्राशन करावा, असा सल्ला या पुस्तकात देण्यात आला आहे.
या उपायातून निपजलेल्या संततीला 'धातुसाधित' म्हणता येईल. कर्तरि का कर्मणि ते अर्थातच प्रत्ययावर अवलंबून!

चक्रमपणा
Centre wants UID for all cows with details of horn, tail, breed, age
सर्वोच्च न्यायालयाने कमाल केलेली आहे. अवाक झालो.
--
maverick हा शब्द कसा आला त्याची दंतकथा आठवली.