नास्तिक आणि अर्थव्यवस्था
Atheism has nothing to do with existence or non-existence of God. An atheist would have believed God, had God existed. There is nothing real about God. But the exactly same way there is nothing real about the economic system, a social construct!!! There no technical equivalence between two different goods denominated in same way, the concept of ownership is a falsity, the concept of monetary value is a falsity, the concept of currency is a social construct just like religion and the concept of law is redundant in the presence of the laws of physics running the universe. Thus the economic system is based on a chain of falsities. If you are opting out of religion and God for the sake of truth and reality, you have no business to do with economic system.
भलते सलते आरोप नकोत!
नेहमी इतरांच्या कमरेखाली लक्ष. जरा स्वत:ची चड्डी देखील सावरणे आवश्यक माना.
काकूंच्या चड्डी अथवा कमरेबाबत मी काहीही बोललेलो नाही. कृपया भलते सलते आरोप करू नका. आणि जरा पीजी 13 भाषा वापरा, पोरीबाळी येतात मराठी संस्थळांवर (असे एक जुने मालक नेहमी म्हणत असत).
काहितरी नियमांना चिकटून राहणे
काहितरी नियमांना चिकटून राहणे म्हणजे आस्तिक। तसे काही न करता वस्तुनिष्ठता ठेवणे म्हणजे नास्तिक।
कधीकधी आप्तांस बरे वाटावे,त्यांची इच्छा म्हणूनही नास्तिक काही कृती करत असला तरी तो आतून ठार नास्तिकच राहतो.
गुरू ग्रहाकडे परंपरेला चिकटून राहाण्याचे कार्य आहे त्याचा प्रभाव नसला तर नास्तिक होतो. हे थोडक्यात.
पाहिले अर्धे लॉजिक ( म्हणजे
पाहिले अर्धे लॉजिक ( म्हणजे देव आणि इकॉनॉमिक्स या दोन्ही ' मायावी गोष्टी असून ... वगैरे ) एकवेळ मान्य केले तर तुम्ही रिव्हर्स लॉजिक मान्य करायला लावताय का ? म्हणजे इकॉनॉमक्स हे मायावी असल्याने त्यावर विश्वास ठेवणाऱ्या सगळ्यांना मायावी देवावर विश्वास ठेवणे mandatory आहे ? असं आहे अजो , वैचारिक स्वातंत्र्य आहे .तुमच्या शब्दात अनरियल इकॉनॉमिक्स वर श्रध्दा ठेवून देवावर न ठेवण्याचे स्वातंत्र्य आम्ही उपभोगतोय . ( आणि तुम्ही सुद्धा ) हं , उद्या सरकारने जर कायदा केला की सेल्स वर 13.5 % vat भरायचा अधीक रकमेच्या 0.001 टक्क्यांच्या किमतीच्या कोंबड्या कापायच्या , नारळ फोडायचे तर तेही करू .पण त्याने आम्ही आस्तिक होणार नाही . मी इकॉनॉमिक्स अवैचारिक/ नाईलाज या सदरात टाकतो . हा ज्याचा त्याचा प्रश्न असावा . जोपर्यंत दुसऱ्याला काही बळजबरी करत नाहीतो पर्यंत विश्वास ठेवणे किंवा न ठेवणे याने कोणी च्युतया किंवा शहाणा होत नाही असे वैयक्तिक मत.. आणि एक .. देवाच्या अस्तित्वाचे प्रूफ वगैरे मागत नाहीये मी . ( जसे अर्थव्यवस्थेचे मागत नाही तसेच ) समजा असलाच देव वगैरे , तर असू दे बाबा . त्याचा देव त्याचे भले करो . त्याच्या घरी तो सुखी राहो . आपल्याला काय ?धर्म या गोष्टीकडे ( देवाप्रमाणेच ) सांस्कृतिक दृष्टीने बघतो .
चर्चा नास्तिकपणा, त्याचे
चर्चा नास्तिकपणा, त्याचे मूलतत्त्व, अर्थव्यवस्था, तिचे मूलतत्त्व आणि धर्म आणि त्याचे मूलतत्त्व - आणि त्यांतील समांतर धागे असे आहे. देव नाही हे नास्तिक असावयाचे कारण असेल, धर्म पाळायचा नसेल, तर अगदि याच कारणांनी याच लोकांनी अर्थ / वित्त संस्थांतून बाहेर पडले पाहिजे. अन्यथा नास्तिकता म्हणजे सिलेक्टिवपणा, दांभिकता, खोटारडेपणा, ठार मूर्खपणा किंवा असलेच काय ते.
... चर्चा नास्तिकपणा,
... चर्चा नास्तिकपणा, त्याचे मूलतत्त्व...
नास्तिकपणाला मुलतत्वे नाहीत हो . ( निदान माझ्या तरी ) देव धर्म या संकल्पना माणसांना गरजेच्या वाटल्या असतील . त्या त्या काळात त्या लोकांना पटावे म्हणून त्याची काही मुलतत्वे वगैरे केली असतील ( बहुधा ) .
एक लक्षात घ्या , देवाला कि मी देवाला नाकारत वगैरे सुद्धा नाहीये !!! नाकारायच्या हि पलीकडची काही गोष्ट असू शकत असेल तर ती आहे . ( याचा अर्थ कृपया स्वीकारतोय असा धरू नये )
.... अगदि याच कारणांनी याच लोकांनी अर्थ / वित्त संस्थांतून बाहेर पडले पाहिजे...
हे तुमचे मत असू शकते . पण इतरांनी यातून बाहेर पडावे हा हट्ट का ? आणि समजा तुम्ही म्हणता म्हणून या व्यवस्थेमधून बाहेर पडलो तर आमच्या पॉट पाण्याचे काय ? ;) ;)
इथर बद्दल तुमचे काय मत आहे जोशीबोवा?
अधिक माहिती इथे पहा: https://en.wikipedia.org/wiki/Aether_(classical_element)
तुमचा जर इथर वर विश्वास नसेल तर what is your business with the economic system?
जर तुमचा विश्वास असेल तर अजून चर्चा करण्यात काय अर्थ आहे?
धर्मव्यवस्था आणि अर्थव्य
धर्मव्यवस्था आणि अर्थव्यस्था या दोन्ही समान प्रकारच्या गृहितकांवर आधारित आहेत . कोणास जर सत्यवादाचा भारी कंड आला असेल नि म्हणून तो धर्मत्याग करत असेल नि नास्तिक बनत असेल तर अगदी त्याच उत्साहाने त्याने अर्थकारणावर लाथ मारली पाहिजे. तर ते कंसिस्टंट होईल . मात्र ईश्वर "मानणारे" लोक सत्य सिद्ध करत नाहित, सत्य आहे असे मानतात्. म्हणून त्यांनी आर्थिक गृहितके "मानणे" कंसिस्टंट ठरते. ईश्वर हे एक सिद्ध सत्य आहे असे प्रतिपादन करणारे अस्तिक देखिल अर्थकारण वापरू शकत नाहीत्.

ऐकते आहे.
ऐकते आहे. सुस्पष्ट् आहे. आवडतो आहे.