बाहुली आणि गाडी
परवाच उस्ताद हॉटेल नावाचा मळ्यानम चित्रपट पाहण्यात आला. त्यात एका मुलगा हवा असलेल्या बापाला चार मुलीनंतर मुलगा होतो. व त्याचवेळी त्याची बायको मरते. पुढे भावाचं सर्व काही बहिणीच करतात व बहिणीसोबत राहून तो उत्कृष्ट जेवण बनवणे शिकतो. परंतु त्याच्या बापाला हे पसंद नसते.(तथाकथित बायकी काम).बापाला फसवून तो शेफ बनतो. पुढे मुलाचं लग्न मोडते कारण होणार्या पत्नीलाही ते बायकी काम वाटत होत. इत्यादी इत्यादी.
प्रश्न हा आहे कि आपल्या समाजात अक्कल यायच्या आधीच कामाची बायकी आणि पुरुषी विभागणी करतो का?
मुलाच्या वाढदिवसाला गाडी-बंदूक अन मुलीच्या वाढदिवसाला बाहुली,छोटी भांडी या भेटवस्तू का?
तुमच्या आजूबाजूला वरील चित्रपटप्रमाणे scene घडला का?
.
.
ता. क. जर नवरा बायको दोघेही कमवत असतील तर बायको ची कमाई हि तिची(च) असते. कारण कुटुंब चालवणं हे पुरुषी काम आहे.हा अन्याय का??
/मुलाच्या वाढदिवसाला गाडी
/मुलाच्या वाढदिवसाला गाडी-बंदूक अन मुलीच्या वाढदिवसाला बाहुली,छोटी भांडी या भेटवस्तू का?/
तसं कोणी ठरवून करत नाही. लहान मुलांसमोर भाराभर खेळणी ठेवून पाहा. मुलगे आणि मुली वेगवेगळ्या प्रकारच्या खेळण्यात रमतात. तीच आवड लक्षात घेऊन खेळणी दिली जातात. तसा काही प्रकार लादला जातो असं म्हणायचं आहे का?
तसं कोणी ठरवून करत नाही. लहान
तसं कोणी ठरवून करत नाही. लहान मुलांसमोर भाराभर खेळणी ठेवून पाहा. मुलगे आणि मुली वेगवेगळ्या प्रकारच्या खेळण्यात रमतात. तीच आवड लक्षात घेऊन खेळणी दिली जातात. तसा काही प्रकार लादला जातो असं म्हणायचं आहे का?
तुम्हाला एक पार्टी.
जाताजाता - इक्वल पे फॉर इक्वल वर्क चा बकवास पण याच धर्तीवर असतो.
====
Rule # 1 : Feminists are substantially (but not fully) चक्रम.
Rule # 2 : Whenever you are in doubt ... refer to rule # 1.
"इक्वल पे फॉर इक्वल वर्क चा
"इक्वल पे फॉर इक्वल वर्क चा बकवास पण याच धर्तीवर असतो."
उत्तर/विषय इथे थोडे अवांतर आहे पण--
- कामाप्रमाणे पे करता येण्यासाठी अ) मालकाचे /म्यानेजरचे नातेवाइक ,त्यांची खासगी कामे करणाय्रांचे लाड करणे बंद करता आले पाहिजेत. हे भारतात शक्य नाही.
ब) पगार गुप्त ठेवता आला पाहिजे. चांगले काम करणाय्रास अधिक भत्ता देता आला पाहिजे.
मला वाटतं हे बहुतेक जपानमध्ये आहे.
वस्तुनिष्ठता वाढली पाहिजे. सिनिअर /ज्युनिअर हेसुद्धा बकवास आहे.
विषय बदललेला नाही. कोणी
विषय बदललेला नाही. कोणी कोणते काम करावे व करू नये याच्या संकल्पनां (ज्या काही आहेत त्या) बद्दल चर्चा चालू आहे. स्त्रीबीज व पूंबीज याच्या एकत्रीकरणातून् फर्टिलायझेशन होते व त्यानंतर भ्रूण तयार होतो असे माझे गृहितक आहे. व भ्रूणाला जन्मास येण्यापूर्वी इन्क्युबेशन ची गरज असते. ते स्त्री ने च का करायचे व पुरुषाने का नाही ? पुरुषाकडे युटरस नसतो तेव्हा टेस्ट ट्युब मधे करावे ? पण या सगळ्याचा निर्णय कोणी करायचा ? पर्सनल (म्हंजे स्त्रीचा) चॉईस आहे का ? का नवराबायको दोघांचा ?
अवांतर
काही दिवसांपुर्वीच बातमी वाचली,
अधुनिक शास्त्रांच्या मदतीने एका वडिलांनी त्यांच्या मुलीला जन्म दिला.
आता हे योग्य का अयोग्य यावर चर्चा होईल कदाचित .
माझ्या मते अयोग्य आहे.
पण तुमचा मुद्दा योग्य आहे. निसर्गाने कुणी काय करावे ठरवले आहे, त्यात जास्त ढवळा ढवळ करू नये.
मूल जन्माला घालणे लिंगभेद
मूल जन्माला घालणे लिंगभेद
माझा टॉपिक लिंगभाव आहे
लिंगभेद व लिंगभाव यात फरक सांगा.
फरकाचा क्रायटेरिया काय आहे ?
असा कोणता क्रायटेतरिया आहे ज्याद्वारे एखादी कृति ही लिंगभेद आहे पण लिंगभाव नाही ते ठरवता येईल ?
किंवा - असा कोणता क्रायटेतरिया आहे ज्याद्वारे एखादी कृति ही लिंगभाव आहे पण लिंगभेद नाही ते ठरवता येईल ?
प्लास्टिक कंपनीत वितळलेले
प्लास्टिक कंपनीत वितळलेले प्लास्टिक डाइमध्ये जाते,आकार देऊन ,थंड करून बादली बाहेर पडते इतके सोपे नाही ठेवले पिलाला जन्म देणे. सगळी हार्मोन्सही आहेत संगोपनाची.
कोल्ह्या कुत्र्यात फरक आहे. नर कोल्हा पिल्लांचा बाप आणि पालनकर्ता होतो तसा कुत्रा होत नाही. बोकाही होत नाही.
इंट्रेश्टिंग प्रश्न आहे
मी काय करेन ते नंतर सांगतो.
आजूबाजूला पाहिलं (निदान उसगावात) तरी कंपन्यांनी -
मुलगी = गुलाबी, जांभळ्या रंगाच्या( बाहुल्या. भातुकली, पलंग, पुस्तकं, कपडे)
मुलगा = निळा रंग. डायनोसॉर. गाड्या, ट्रक. बेसबॉल. बंदूका
अशी विभागणी केलेली दिसते. खेळण्यांच्या दुकानात, कपड्यांच्या दुकानात साधी चक्कर मारली तरी ही रंग-विभागणी सहज कळून येईल.
लहान मुलींसाठी निळया रंगातला एक बेसबॉलचं किंवा फुटबॉलचं चित्र असलेला पोशाख तितकासा कॉमन नाही, आणि मुलासाठी लाल किंवा गुलाबी कपडे तित्केसे दिसत नाहीत.
हा प्रकार भयानक डोक्यात जातोय.
=====================
गुलाबी रंग खरच डोक्यात
गुलाबी रंग खरच डोक्यात जातो. ओठ आणि योनिशी या रंगाची कॉन्शस अथवा अनकॉन्शस सांगड आहे की काय नकळे.
पूर्वी तर त्यामुळे अगदी डोक्यात जायचा.
नंतर कुठेतरी वाचले की निरपेक्ष प्रेमाचा त्या मूडचा रंग गुलाबी आहे. तेव्हा पासून घृणा कमी झाली. आता तर मधेमधे मूडनुसार आवडतो.
अजोन एक म्हणजे हा गुलाबि
अजोन एक म्हणजे हा गुलाबि आता फिक्का होत चाललाय्. आधिचे पॉण्ड्स ऑर फेअरनलव्हली मॅजेन्टा १०० यलो ३० असे निऑन रेड कलरस्किमात असायचे. तो आता फिक्का होत व्हाईटकडे वाटचाल करत आहे. आधि ग्रेडेशन व्हाईट वापरले आता प्योर टिन्ट वापरत व्हाईट होतोय्. पॉन्डस व्हाईट ब्युटि ह्या रेंजवरचे प्रयोग पहा. फेरेनलवली पण व्हाईट बॅक्ग्राउंड वापरत मॅजेन्टा टिन्ट, विन्टर केअरसाठि ब्ल्यु, आयुर्वेदिकसाठि थोडा मडि पिंक आणि मेन्ससाठि ब्लॅक अशि कलरस्किम वापरते.

सेम पॉन्डस पण्. व्हाईटचे जास्त प्रमाण आहे सोबत एक आयडेंटिंटि कलर्. पिंक आहेच पण एवढा नाहि. ढक्कन पुरता.
या विकान्ताला करून बघेन.
या विकान्ताला करून बघेन.
अपडेट - रविवारी करून बघण्याचा प्रयत्न केला. पण सैपाकाची पथ्यं पाळायची का कसं, याबद्दल मार्गदर्शन हवं झालं.