ही बातमी समजली का? - १३७
अनेक बातम्यांबद्दल आपल्याला चर्चा करावीशी वाटते. खरं तर, ऐसी अक्षरेवर बातम्यांवर चर्चा करण्यासाठी बातमी नावाचा लेखनप्रकारही अस्तित्त्वात आहे. "ताज्या घडामोडी, अर्थकारण, राजकारण इत्यादी प्रकारच्या संस्थळाबाहेरील लिखाणाची चर्चा करण्यासाठी हा विभाग वापरावा. इथे मूळ लेखावरच्या शब्दसंख्येचे बंधन नाही; एखादी बातमी पसरवणे किंवा चर्चा घडवणे यासाठी हा विभाग वापरावा." असं तिथे स्पष्ट म्हटलेलंही आहे. पण, त्याबद्दल विस्तारानं लिहिण्याइतका किंवा एखादा व्यवस्थित चर्चाप्रस्ताव मांडण्याइतका वेळ किंवा माहिती किंवा उत्साह किंवा हे सारंच नसणं वगैरे कारणांमुळे आपण चर्चाप्रस्ताव लिहित नाही. शिवाय बऱ्याचदा "एकोळी" / नुसत्याच लिंका देऊन धागा काढायचंही जीवावर येतं.
तेव्हा अशा बातम्यांवर चर्चा करण्यासाठी, एकमेकांना अशा बातम्या लक्षात आणून देण्यासाठी, त्यांचे दुवे देण्यासाठी हा धागा काढत आहे. एखाद्या बातमीवर विस्तारानं चर्चा सुरू झाल्यास त्या संवादाचे वेगळ्या 'बातमी' धाग्यात रुपांतर केलं जाईल.
आधीच्या धाग्यात १००+ प्रतिसाद झाल्यामुळे नवा धागा.
---
काही मूलनिवासी जमीनधारकांच्या विरोधामुळे गौतम अडाणींच्या ऑस्ट्रेलियातल्या खाणप्रकल्पाला आणखी एक धक्का -
Adani mine leases and national parks in doubt after native title court decision
हान्स रॉसलिंग
दोन दिवसांपूर्वी, ऑनलाईन व्हिडिओत पायथन शिकत असताना, आलेख कसे काढायचे हा व्हिडिओ बघत होते. त्यात हान्स रॉसलिंगनं वापरलेला विदा आणि त्याच्यासारखाच आलेख काढायला शिकवत, पायथनचा धडा सुरू होता. त्या आलेखाचा उल्लेखही 'हान्स रॉसलिंग प्लॉट' असा केला आहे. स्वीडीश प्राध्यापक आणि आंतरराष्ट्रीय आरोग्य या विषयावर संशोधन करणाऱ्या हान्स रॉसलिंगला आदरांजली.
द गार्डियनमधला आदरांजलीचा दुवा.

'अमेरिका फर्स्ट', हू इज द सेकंड?
ट्रंपच्या 'अमेरिका फर्स्ट', 'बिल्ड द वॉल', 'ग्रॅब देम बाय द पुसी' वगैरे मीम्सची युरोपीय टिंगल. बरेच व्हिडिओज आहेत; चवीचवीनं पाहा, चवीचवीनं हसा -
European Countries Are Trolling Trump With Hilarious “America First” Spoof Videos
India got Trump in the form
India got Trump in the form of Modi two-and-a-half years ago: Rahul Gandhi
आता मोदींनी कुणाचे काय ग्रॅब करावे ?
ही मुलाखत वाचली. रोचक आहे.
ही मुलाखत वाचली. रोचक आहे. वैदिक अश्वमेध आणि तसंच सिंधू संस्कृतीमधलं रिचुअल याचा संबंध जोडलेला रोचक आहे. सिंधू संस्कृती आणि वैदिक संस्कृती यांच्यातले ओव्हरलॅप रोचक आहेत.
https://swarajyamag.com/ideas/the-indus-jigsaw-can-it-be-pieced-togethe…
वरील मुलाखतीवरची टीका.
https://swarajyamag.com/culture/study-of-hindu-culture-the-misplaced-th…
नवा इतिहास
राणा प्रतापानं हळ्दीघाटाची लढाई जिंकली ... राजस्थानच्या मंत्रीमंडळाच्या बैठकीत!
Breaking history: Maharana Pratap won Battle of Haldighati
मला काय आठवले तेवढे मी
मला काय आठवले तेवढे मी सांगितले.
"आपण समजतो तसं नाहीये" ही एक सोयीची पॉप्युलर कथनशैली आहे.
६९% मते विरोधात पडून मोदी निवडणूक हरले.
भारत १९४७ साली स्वतन्त्र झाला नाही. ४७ साली फक्त वसाहतीअंतर्गत स्वायत्तता मिळाली.
अशी विधाने टेक्निकली करेक्ट असतात. वास्तवाशी त्यांचा संबंध नसतो. पण विविध गटांमध्ये असे विचार प्रसृत होतच असतात.
Most Europeans want
Most Europeans want immigration ban from Muslim-majority countries, poll reveals
A majority of Europeans want a ban on immigration from Muslim-majority countries, a poll has revealed. An average of 55 per cent of people across the 10 European countries surveyed wanted to stop all future immigration from mainly Muslim countries. The Chatham House study, conducted before US President Donald Trump signed an executive order banning immigration to the US from seven predominantly Muslim countries, found majorities in all but two of the ten states opposed immigration from mainly Muslim countries. Only 20 per cent disagreed, while 25 per cent said they did not know.
A ban was supported by 71 per cent of people in Poland, 65 per cent in Austria, 53 per cent in Germany and 51 per cent in Italy. In the UK, 47 per cent supported a ban. In no country did more than 32 per cent disagree with a ban.
खरा तो एकची धर्म ...
How one GOP congressman tamed
How one GOP congressman tamed pro-Obamacare protesters
जस्टिनभाई एकदम शांतपणे बोलले असं ऐकतो. एकदम शांतपणे त्यांनी त्यांचा ओबामाकेअर ला असलेला विरोध पुन्हा एकदा ठामपणे नोंदवला. मी त्या दिवसाची वाट पाहतोय की जेव्हा प्रतिनिधी या "तथाकथित" उपेक्षितांना, वंचितांना ठणकावतील की - तुम्ही गरीब आहात त्याला आम्ही काय करू ?? आरत्या ओवाळू ???
----------
व्हॅलेंटाइन्स डे नको, 'मातृ-पितृ पूजन' दिन करा!
जिल्हाधिकाऱ्यानी काढलेल्या आदेशात लिहिले आहे की लहान मुले आणि युवा वर्गाला माता-पित्यांप्रति पूज्य भाव दर्शवण्याची गरज आहे. त्यामुळे १४ फेब्रुवारी जिल्ह्यात 'मातृ-पितृ पूजन' दिवस म्हणून साजरा केला जावा. जिल्ह्यातल्या सर्व शैक्षणिक आणि सामाजिक संस्थांमध्ये हा कार्यक्रम विशेष रुपात साजरा करावा. घरात, कुटुंबात, गल्लीत, गावात, शहरात या प्रकारचे कार्यक्रम आयोजित करून या संकल्पनेला वृद्धिंगत करावे.
----------
Promise Day 2017: A look at what PM Narendra Modi offered India in 2014
नमोंनी किती खोटे वायदे केले त्याबद्दल ... तपशीलवार.
-------
“Before he himself joined the government, economist Bibek Debroy did an analysis for India Today in 2013 on useless ministries. He suggested that 31 ministries out of 55 ministries at the time, ranging from Animal Husbandry to Tourism, be scrapped. And the remaining be restructured into 12 ministries of commerce, trade and industry, consumer affairs, infrastructure, defence, law and corporate affairs, external affairs, home, finance, social sectors, energy and natural resources and science and technology. He calculated that this would effect an overall saving of Rs 1,50,000 crore.”
---------
किती हास्यास्पद आहे हे, मोहनराव !!!
Isro to drop off a full load
Isro to drop off a full load of 104 satellites in space in a single mission
भक्तांनी "गेल्या ६७ वर्षांत" ची रडगाणी थांबवावीत हे बरं.
अप्रिय इतिहास
ToI 13.3.2017:
विख्यात येल विद्यापीठाने (त्यांच्या एका college ला दिलेले) Calhoun ह्यांचे नांव बादलण्याचा ऐतिहासिक निर्णय घेतला.
Calhoun हे अमेरीकेचे सात वर्षे (1825-32) उपाध्यक्ष होते, ह्या व्यतिरिक्त येल चे स्नातक सुध्धा होते.
त्यांच्या विरुद्धच्या आंदोलनाचा एकमेव तीव्र मुद्दा म्हणजे त्यांचे गुलामगिरीला असलेले बळकट आणि आयुष्यभराचे वाढते समर्थन हे होय.
प्राथमिक विरोधानंतर, कुलगुरूंनी नामांतराला मान्यता दिली.
महत्वाचा मुद्दा आणि मूलभूत प्रश्न हा आहे कीं - घडलेल्या गोष्टींच्या खुणा 'इतिहास'म्हणून तश्याच ठेवायच्या; कीं त्या खुणा वर्तमान सार्वत्रिक मान्यतांच्या विरोधात आहेत म्हणून काढून टाकायच्या.
ह्या प्रश्नाला अत्यंत संवेदनाशील असे भावनिक कोंदण असते. म्हणूनच संतुलित विचारविनिमय होणे अवघड होते. आपले मत जाणून घेण्यास आवडेल.
मग आता नाव काढुन घेतले तरी
मग आता नाव काढुन घेतले तरी हरकत नाही.
एखाद्या फुकट मिळालेल्या गोष्टीवर कोणी अधिकार सांगु शकत नाही.
----------
देणगी वगैरे देणार्यांनी ह्या पुढे मात्र कायदेशीर बंधन घालावे, दिलेले नाव काढणार असतील तर व्याजासकट पैसे परत मिळाले पाहिजेत देणगीदारांच्या वारसांना.
देणगी वगैरे देणार्यांनी ह्या
देणगी वगैरे देणार्यांनी ह्या पुढे मात्र कायदेशीर बंधन घालावे, दिलेले नाव काढणार असतील तर व्याजासकट पैसे परत मिळाले पाहिजेत देणगीदारांच्या वारसांना.
व्याजदर जरा जास्त लावावा. कारण अनेकांनी त्या शिक्षणाचा फायदा घेऊन स्वतःला दयनीय अवस्थेतून बाहेर काढले. व जे काढू शकले नाहीत त्यांनी स्वतःचा भार समाजकल्याण खात्यावर टाकला (म्हंजे पुन्हा बहुतेक भार धनिकांवरच की जे करदाते होते).
Sasikala convicted by Supreme
Sasikala convicted by Supreme Court in DA case, asked to surrender immediately
Whether Shashikala is a politician or not is a valid question.
But SC has convicted a wannabe (big) politician and ordered her to be sent to prison. This is a welcome development.
DMK might call for fresh elections.
अर्र्र... हे वेगळचं झालं.
अर्र्र... हे वेगळचं झालं.
रच्याकने, या केसची सुरुवात सुब्बु स्वामीने केली होती. वीस वर्ष लढला गडी.
After 20 years I won. Now turn of TDK Buddhu PC BC & Tata to join in jail
— Subramanian Swamy (@Swamy39) February 14, 2017
>>या केसची सुरुवात सुब्बु
>>या केसची सुरुवात सुब्बु स्वामीने केली होती. वीस वर्ष लढला गडी.
Doubtful. 18 Years back Subbu Swami in conjunction with Jaylalita and Sonia, brought Vajpayee Govt down. If he had initiated the case 20 years ago, it is unlikely JJ would ally with him.
अंहं
स्वामीच होता तो. पहिली कंप्लेंट स्वामींनीच केली होती. वाजपेयींना खाली पाडण्यात जयललितांनी त्याच्या संगनमत कसं केलं ते नाही माहिती.
इथून
On June 14, 1996, Subramanian Swamy, then Janata Party leader, filed a complaint before the Principal Sessions Judge in Chennai alleging that Jayalalithaa had assets disproportionate to her known sources of income. Swamy, was then the President of the the Janata Party, which has since merged with BJP.
---
( एखाद्या केसची मूळ फाईट कोणी सुरू केली हेच विसरले यार लोक :( २जी मधली फाईटपण यांनीच सुरू केलेली. स्वामींच्या इतर जोकरपणामुळे तीन मोठ्या भ्रष्टाचाराच्या केसेसमध्ये त्यांचं बरच योगदान आहे हे झाकोळलं जातं.)
jayalalita herself was jailed
jayalalita herself was jailed in Bangalore.
http://www.ndtv.com/south/after-22-days-in-jail-aiadmk-chief-jayalalith…
Liberals on Match.com aren't
Liberals on Match.com aren't in the mood since the election of Donald Trump
लिबरलांना पराभव फारच जिव्हारी लागलेला दिस्तोय.
-----
------
PSLV C37 launch : ‘अबतक १०४’;
PSLV C37 launch : ‘अबतक १०४’; इस्रोने रचला इतिहास!
http://www.loksatta.com/desh-videsh-news/isro-launch-of-pslv-longest-fl…
Conservatives really are
Conservatives really are better looking, research says
अजो, अनु राव, ब्याटू काय म्हंता ??
( मी काँझर्व्हेटिव्ह नाही. )
The study shows correlation, not causation, but the researchers float a simple economic explanation for why this might happen. Numerous studies have shown that good-looking people are likely to earn more, and that people who earn more are typically more opposed to redistributive policies, like the progressive taxes and welfare programs favored by the left.
---
मोदी फारच प्रेडिक्टेबल झालेले आहेत ब्वॉ.
ला कोसा नोस्ट्रा
http://www.thenewsminute.com/article/mannargudi-intrigue-how-sasikalas-…
शशिकला आणि तिचा नवरा केंद्राशी असलेला तमिळनाडुमधला मन्नारगुडी माफिया सरकारमधल्या अनेक गोष्टी कंट्रोल करतो. त्या फॅमिलीबद्दल.
Pakistan most dangerous
Pakistan most dangerous country for world: Former CIA official
"In the end, while Pakistan is not the most dangerous country in the world, it probably is the most dangerous country for the world. There seem few levers to pull in Pakistan today, but if we pursue a strategy of containment or disengagement, things will only get worse,"
अमेरिकेला प्रवास करताना
अमेरिकेत येताना अलीकडे काय काय तपासणी होते याची रोचक बातमी.
फोन, फेसबुक व इतर सोशल मीडिया पासवर्ड्स, कंप्युटरची डिस्क वगैरे
एकंदरीत मजा आहे. इन द ल्यांड ऑफ द फ्री अँड होम ऑफ द ब्रेव
https://arstechnica.com/tech-policy/2017/02/what-could-happen-if-you-re…
लाँग टर्म शॉर्ट टर्म वगैरेचा काहीही संबंध नाही
लाँग टर्म शॉर्ट टर्म वगैरेचा काहीही संबंध नाही. देशात प्रवेश करताना तुमची संपूर्ण तपासणी केली जाईल. आता या तपासणीमध्ये सोशल मीडियाचे पासवर्ड्स, इलेक्ट्रॉनिक डिवाईसेस, फोन, लॅपटॉपवरील डेटा वगैरेचां अंतर्भाव आहे. ही माहिती देण्यास नकार दिला तर १. तुम्ही अमेरिकन नागरिक असल्यास तुम्हाला प्रवेश द्यावाच लागेल मात्र कदाचित काही काळ अटकेत ठेवू शकतील आणि नोकरीची काशी - पर्मनंट पोलीस रेकॉर्ड, किंवा अॅबसेन्स विदाऊट नोटीस करतील. २. अमेरिकन नागरिक नसल्यास परत पाठवतील आणि तिकीटाच्या पैशांची काशी करतील.
नासासारख्या संस्थांमध्ये नॉन डिस्क्लोजर किंवा इन्फर्मेशन लीकबद्दल जोरदार अॅग्रीमेंट वगैरे असतात त्यांच्या एका कर्मचाऱ्याला काय त्रास झाला याची मजेशीर गोष्ट.
https://arstechnica.co.uk/tech-policy/2017/02/nasa-scientist-detained-u…
---
गंमत म्हणजे यापूर्वी अशी तपासणी केलेल्यांमध्ये चेलसी मॅनिंगची वकील आणि गांजाच्या कायदेशीरपणासाठी लढा देणारा कार्यकर्ता यांचा 'योगायोगाने' समावेश झालाय.
प्रत्यक्ष अनुभव
आता या तपासणीमध्ये सोशल मीडियाचे पासवर्ड्स, इलेक्ट्रॉनिक डिवाईसेस, फोन, लॅपटॉपवरील डेटा वगैरेचां अंतर्भाव आहे. ही माहिती देण्यास नकार दिला तर १. तुम्ही अमेरिकन नागरिक असल्यास तुम्हाला प्रवेश द्यावाच लागेल मात्र कदाचित काही काळ अटकेत ठेवू शकतील आणि नोकरीची काशी - पर्मनंट पोलीस रेकॉर्ड, किंवा अॅबसेन्स विदाऊट नोटीस करतील.
बरोब्बर सात दिवसांपूर्वी देशात प्रवेश केला. कंप्यूटरवर पासपोर्ट स्कॅन स्वतःच केला, तिथेच इलेक्ट्रॉनिक एन्ट्री फॉर्म भरला. त्याची मशीनमधून रिसीट आली. इमिग्रेशन ऑफिसरच्या समोर जावंसुद्धा लागलं नाही. पुढे बॅगा ताब्यात घेतल्यावर बाहेर पडतांना कस्टम ऑफिसरने ती रीसीट काढून घेतली. झालं.
सगळ्या प्रोसेसला २५ मिनिटे लागली, त्यातली १५ मिनिटे बॅगांसाठी प्रतीक्षा करण्यात गेली...
हे मलाच नाही तर माझ्याबरोबर असलेल्या अन्य नागरीक प्रवाशांच्या बाबतीतही झालेलं दिसलं...
असो.
मुळात तामिळनाडूतल्या
मुळात तामिळनाडूतल्या राजकारणावर उत्तरप्रदेश निवडणूका असूनही हेडलाइन्स याव्यात हेच भाजपाला किती अपमानजनक आहे :प
त्यात युपीच्या बातम्यांतही २०१४च्या तुलनेत सपा-काँग्रेसच्या (भल्या/बुर्या)उल्लेखाशिवाय एकही बातमी दिसू नये यात भाजपाची सोशल मिडीया म्यानेजमेंट कमी पडते आहे याचे हे संकेत आहेत.
मलेरियावरील लस प्रभावी
मलेरियावरील लस प्रभावी ठरल्याचा दावा...
http://maharashtratimes.indiatimes.com/gadget-news/science-technology/n…
रोखठोक बोलणे हा उपयुक्त गुण
रोखठोक बोलणे हा उपयुक्त गुण असतोच असे नाही.
कोणत्याही विशिष्ठ मुद्द्याबाबत बोलायचं असेल तर राजकारणी तिन प्रकारचे असतात -
(१) त्या मुद्द्याबर रोखठोक बोलणारे
(२) त्या मुद्द्याबर मोघम, गुळसूगुळसू बोलणारे
(३) त्या मुद्द्याबर मौन बाळगणारे
आता रोखठोक बोलणारे फारसं काही करून दाखवतातच असं नाही असं तुम्हाला म्हणायचंह आहे असं दिसतं.
त्यामुद्द्यावर मोघम, गुळसूगुळसू बोलणारे काही करून दाखवतातच असं नाही. याची अनेक उदाहरणं असतील.
आता उरले - त्या मुद्द्याबर मौन बाळगणारे - त्यांच्या बाबतीत पण असंच म्हंटलं जाऊ शकतं की मौन बा़ळगणारे सुद्धा फारसं काही ठोस करतीलच असं नाही. याची उदाहरणं तर गल्लोगल्ली सापडतील.
मला काय म्हणायचंय ते आणखी स्पष्ट करायलाच हवं का ?
बोलणं (किंवा मौन बाळगणं) याला
बोलणं (किंवा मौन बाळगणं) याला फार काही अर्थ नाही, असं थत्ते चाचा म्हणत आहेत.
मला जे म्हणायचं होतं ते हे की = "क्रियेवीण वाचाळता" असं तर सगळ्याच राजकारण्यांबद्दल म्हणता येऊ शकतं.
--
आमचा गर्भित मुद्दा वेगळाच आहे.
आमचा मुद्दा हा आहे की इस्लाम हा अनिवार्यपणे निर्दोष असतोच व आहेच असं गोबेल्सनीती वापरून ठणाणा करणार्यांना प्रत्युत्तर म्हणून इस्लाम हा दोषी असू शकतो असं गोबेल्स नीती वापरूनच सांगणं गरजेचं आहे. व ते काम ट्रंप, नेतानयाहू हे लोक करत आहेत. लवकरच बाकीचे सामील होतील.
थत्तेचाचा हे फस्ट्रेटेड
थत्तेचाचा हे फस्ट्रेटेड हिंदुत्ववादी आणि संघी आहेत हे सारखे सारखे जाणवते.
काही लोकांनी आणि संघटनांनी रोखठोक बोललेले आचरणात आणले नाही म्हणुन थत्तेचाचा वैतागले आहेत.
---------
मला कधी कधी मालकीणबाई समाजवादी आणि वाळवंटीधार्जीण्या लोकांना आतुन त्रास देण्यासाठी संघाच्या अतिगुप्त मिशनवर असाव्यात अशी शंका येते.
चीनपेक्षा भारत भारी
किमान एका गोष्टीत आता आपण चीनला मागे टाकलंय.
India’s Air Pollution Rivals China’s as World’s Deadliest
संस्कृतीद्वेष्ट्यांना मात्र हे सहन होत नाहीए -
India, on the other hand, had yet to undertake sustained public policy initiatives to reduce pollution, said Gopal Sankaranarayanan, an advocate at the Supreme Court of India who successfully petitioned it to ban licenses to sell fireworks in the New Delhi metropolitan area last year.
सॅमसंगच्या प्रमुखाला अटक
भ्रष्टाचाराच्या आरोपाखाली सॅमसंग कंपनीचे प्रमुख ली यांना अटक
http://www.reuters.com/article/us-southkorea-politics-samsung-group-idU…
PM Modi promised like DDLJ's
PM Modi promised like DDLJ's Shah Rukh Khan, turned out Sholay's Gabbar: Rahul Gandhi
इसी बहाने ही सही ... आपने हमे याद तो किया !!!
नमामि गंगे
स्वच्छ नदी विरुद्ध नोकर्या
http://indianexpress.com/elections/uttar-pradesh-assembly-elections-201…
आय बेग टू डिसग्री
लोकसताने बॅतोबाचे नाव जहिरातीत दिल म्हणजे बॅतोबाच्या नावाला सेलिंग व्हॅल्यु प्राप्त झाली आहे, त्यामुळे डबल अभिनंदन.
आय बेग टू डिसग्री.
जेव्हा एखादे विद्यापीठ (आपले अलम्नस नसणाऱ्या, परंतु) एखाद्या क्षेत्रात काही कामगिरी वगैरे केलेल्या एखाद्या व्यक्तीस काही ऑनररी पदवी वगैरे बहाल करते, तेव्हा तो त्या व्यक्तीचा बहुमान करण्याचा प्रयत्न वगैरे नसून, त्या व्यक्तीशी अापले नाव जोडून विद्यापीठ स्वत:चा सन्मान करून घेत असते.
तद्वत, लोकसत्तेने तसे करून लोकसत्तेच्या नावाला सेलिंग व्ह्याल्यू प्राप्त करून दिली आहे, एवढेच नम्रपणे नमूद करून मी आपली रजा घेतो.
पहिला भारतीय aviator - मोहन सिंग 1912 साली अरिकेत......
केवळ अद्भुत म्हणावा असा इतिहास:
The oily hindu flyer in the world (ca 1912) - http://www.airspacemag.com/daily-planet/mohan-singh-aviator-of-mystery-…
बॅटमन
बॅटमन यांचा लेख छानच आहे. हा लेख साधनांची तोंडओळख आणि तिथल्या पुराभिलेखागारातल्या सुविधा यावर असला तरी २००० पानांचा मजकूर शोधणे,नकलून घेणे हेच आधी चिवट कष्टमय काम आहे. बहुभाषाकोविदता असल्याने,निवडलेल्या विषयाचा अनेक आणि विविध बाजूंनी वेध घेता येणे ही इतरांकडे नसलेली ताकद त्यांच्याकडे आहे. त्यामुळे नक्कीच त्यांच्या संशोधनात एकांगीपणा न येता आतापर्यंत एकाच बाजूने दिसलेले सत्य अनेक बाजूंनी पडताळण्याची शक्यता आणि संधी त्यांना आहे. एव्हढ्या लहान वयात अशी चिकाटी दाखवून नवीन साधने शोधून काढणे आणि इतिहासासारख्या प्रदीर्घ काळ चालणार्या संशोधनात डोके खुपसून बसणे हे महान आहे.
अभिनंदन..... केवळ थक्क करणारे संशोधन...
ऐसीचे 'जाने माने सदस्य बॅटमॅन' यांचा लोकसत्तेतील लेख (19 फेब्रु) वाचून आनंद तर झालाच, पण (अधिक ज्ञानाची) भूक पण चाळविली गेली.
लेखागारातील सुविधा आणि उत्तम रीत्या ठेवलेल 300 वर्षे जुनेे रेकॉर्डस् ह्याचे वर्णन रोचक होते. 5परंतू जुन्या डच records वरून जे नवनीत मिळण्याची आस होती, ती फक्त थोडीशीच पूर्ण झाली. अर्थात, लेखकाने सांगितल्याप्रमाणे - 'हे काम किचकट आणि वेळखाऊ आहे'- ह्याची पूर्ण जाणीव आहे.
त्यामुळे सध्या पुढील अजूनही जास्त निष्कर्षपूर्ण लेखाची वाट बघतो आहे. पुलेशु.
अवांतर: अश्या एखाद्या विषयासाठीं (जो आपला दैनंदिन कामाचा, जीवनाचा भाग नाही, त्याकरिता) इतके झपाटून काम करणे, त्याचा इतका सखोल मागोवा घेणे - हे केवळ थक्क करणारे आहे. ह्याकरीता जितके अभिनंदन करावे तितके कमीच.

http://www.loksatta.com/desh-
http://www.loksatta.com/desh-videsh-news/saudi-arabia-deports-39000-pak…
पाकिस्तानी ‘गो बॅक’!; सौदीने चार महिन्यांत ३९ हजार नागरिकांना हाकलले
काय हा अन्याय. बिचार्या वाळवंटी लोकांना कुवेत आणि सौदी हे दुसरे वाळवंटी लोक पण घेत नाहीत.