Skip to main content

चीज मश्रुम्स्


राम राम मंडळी, एका छोट्याश्या सुट्टीनंतर पुन्हा एकदा पाककृती विभागात हजेरी लावतोय. काही चुकलं माकलं तर पोटात घ्याल याची खात्री आहे. :)

साहित्य : अळंबी (मश्रुम्स्) ,

सारणासाठी : क्रीम चीज, लहान कांदे / पाती कांदा, २-३ लसुण पाकळ्या, चवी नुसार लाल तिखट, काळीमिरी पुड. (कांद्याची आणि लसणाची पुड मिळाली तर उत्तम.)
आवरणासाठी: मैदा, पावाचा चुरा (ब्रेडक्रम्स्), १ अंडे. चवी नुसार मीठ
(अंड न आवडणार्‍यांना अंड्या ऐवजी कॉर्नस्टार्च पाण्यात मिसळुन ते दाट मिश्रण वापरता येईल.)

तळण्यासाठी तेल.

कृती :

फ्लेवर्ड चीज मिळालं तर उत्तम. पण नाही मिळालं तर मग लहान कांदे आणि लसुण बारीक चिरुन घ्यावे.
चीजमध्ये कांदा, लसुण, लाल तिखटं, काळीमिरी पुड टाकुन एकजीव करुन घ्याव.

अळंबीचे देठ काढुन, स्वच्छ धुवुन आणि पुसुन घ्यावी. पोकळी मध्ये चीजच सारण भरावं.

ब्रेडक्रम्स् , फेटलेलं अंड , मैदा यांच्यात चवी नुसार मीठ घालुन तयार ठेवावं.

सारण भरलेली अळंबी अनुक्रमे मैदा, अंड, ब्रेडक्रम्स्, परत अंड आणि ब्रेडक्रम्समध्ये घोळुन घ्यावी.

तेल तापवुन त्यात आवरणात घोळवलेल्या अळंब्या मंद आचेवर खरपुस तळुन घ्याव्या.

चटणी सॉस सोबत गरमागरमच वाढावं.

आवड/नावड

... Sun, 17/06/2012 - 12:12

सादरीकरण नेहमीप्रमाणे ऊत्तम

मश्रुम आवडत नसल्याने पास

स्वाती दिनेश Sun, 17/06/2012 - 14:11

मस्तच दिसत आहेत रे चीजमशरुम्स गणपा,
स्वाती

राजेश घासकडवी Sun, 17/06/2012 - 19:02

चुकलं माकलं तर पोटात घ्याल

तुमच्या हातचं पोटात घ्यायचा योग कधी येईल हाच विचार चालू असतो. :)

फोटो काढताना पदार्थांची मांडणीही उत्तम व्हावी हा प्रयत्न केलेला दिसून येतो. पहिल्या फोटोत नाव प्लेटच्या कडेवर लिहिणंही भारीच. इतक्या बारकाव्यांकडे काळजीपूर्वक लक्ष देण्यातून स्वयंपाक, पाककृती आणि तिचं सादरीकरण यावरचं प्रेम दिसून येतं.

गणपा Mon, 18/06/2012 - 14:50

In reply to by ऋषिकेश

भारतात कुठे मिळतात हे माहित नाही.
पण माझ्या मामाने मध्यंतरी अळंबी उत्पादनाचा प्रयोग केला होता. तेव्हा त्याने बर्‍यापैकी मोठ्या अळंब्यांच पीक घेतलं होतं.

सन्जोप राव Mon, 18/06/2012 - 18:45

सुरेख पाककृती आणि सादरीकरण. नुसत्या रुपावरुनच मुलगी गुणाची असणार अशी खात्री पटते आहे.

३_१४ विक्षिप्त अदिती Mon, 18/06/2012 - 20:02

झकास दिसत आहेत रे मश्रूम्स. मश्रूम्सच्या देठाचं काय करायचं मग? (फुकट कसं जाऊ द्यायचं?)

ऋषिकेश, मला वाटतं इथे तू नेहेमी मिळणारे पांढरट रंगाचे मश्रूम्स वापरले तरी चालेल. घटोत्कची आकाराचे पोर्टोबेलो वगैरे वापरायची आवश्यकता नसावी.

गणपा Mon, 18/06/2012 - 21:04

In reply to by ३_१४ विक्षिप्त अदिती

मश्रूम्सच्या देठाचं काय करायचं मग? (फुकट कसं जाऊ द्यायचं?)

असे कसे फुकट जातील?
सुपमध्ये किंवा मश्रुम स्टरफ्रायमध्ये वापरता येतील की. :)