Skip to main content

ललित किस्सा ...अगदी तुमचा आमचा......!!!

1 minute

ललित किस्सा ...अगदी तुमचा आमचा

परवा मित्राकडे अचानक गेलो ...त्याने घरभर पसरलेल्या वस्तू रप्पारप आवरल्या ...!!

खुर्चीवरचे पेपर उचलले ...सेटीवरच्या बायकोच्या ओढण्या कुठे कुठे कोंबल्या ..!!
पोरांवर खेकसून त्यांना खेळणी लपवायला सांगितले >>!

मांजराला काखेत मारलं ..!!
आणि म्हणाला हां गं...बोल आता .....बस ..!!

मी म्हंटलं ...काय बोलू ...'परकं' करून टाकलस नं एका मिन्टात :((
आले तेव्हा कसं अगदी माझ्या घरासारखं वातावरण होतं ....

जाऊ दे जातेच मी :((
माझा मुडच ऑफ केला त्याने :(

हे असेच असेच होते बरेचदा ..........असुदे ना जे जसे आहे ते तसेच तिथे .......आम्हालाही जरा वाटू दे घरगुती .

Node read time
1 minute

चेतन सुभाष गुगळे Sun, 22/04/2012 - 16:12

तुमचा लेख वाचून फारच घरगुती वाटलं हो..

'न'वी बाजू Sun, 22/04/2012 - 17:57

सेटीवरच्या बायकोच्या ओढण्या कुठे कुठे कोंबल्या ..!!

ओढण्याच ना... मग ठीकाय.

बाकी चालू द्या.

मी Mon, 23/04/2012 - 18:14

तुम्हाला परकं वाटत नव्हतं तर थोडी मदत करायची ना आवरायला!!, त्याचा पण मूड ऑफ झाला असणार.

Nile Mon, 23/04/2012 - 21:40

तुमच्याकडे आल्यावर तुम्ही त्याला अगदी "घरगुती वाटावं" अश्या वातावरणाची परतफेड कराल अशा भितीने त्याने केलं असावं. ;-)

पाषाणभेद Tue, 24/04/2012 - 03:05

चेष्टा सोडा, मलाही घर कुणी येत असेल तर आहे तसेच घर ठेवणे योग्य वाटते. पण आपण जसा विचार करतो तसाच विचार समोरचा करत नाही ही वस्तूस्थिती लक्षात घेवून (व होममिनीस्टरच्या ऑर्डरने) घर थोडेफारतरी आवरलेले दिसते.