इंडोनेशियाजवळ समुद्रात ८.९ रिश्टर स्केल तीव्रतेचा भूकंप
थोड्या वेळापूर्वीच इंडोनेशियाजवळ समुद्रात ८.९ रिश्टर स्केल तीव्रतेचा भूकंप झाला आहे. (सीएनएन ८.६ सांगते आहे, तर बीबीसी ८.९)
या भूकंपाचे परिणाम नक्की काय होतील हे आत्ता तरी सांगणे अवघड आहे. पण सुरक्षिततेचा उपाय म्हणून त्सुनामीची तीव्र शक्यता जाहीर केली गेली आहे.
पुढील नकाशात भूकंपाचे केंद्र दाखवले आहे. त्याकडे नजर टाकताच ही त्सुनामी भारताच्या पूर्व किनार्यांना तडाखा देऊ शकेल असे वाटते आहे. कारण ८.९ तीव्रतेचा भूकंप समुद्रात नक्कीच मोठी खळबळ माजवणार आहे. बंगळुरात थोडी थरथर जाणवली. पण किंचितच. फारसे काही जाणवले नाही.
तरी येणारी त्सुनामी सुमात्रा, जावा (जाकार्ता) या बेटांना मोठा तडाखा देण्याची शक्यता आहे.

येथे आणि येथे ही बातमी सविस्तर वाचायला मिळेल
यापूर्वी २६ डिसेंबर २००४ रोजी झालेल्या ९.१ रिश्टर क्षमतेच्या भूकंपानंतर आलेल्या त्सुनामीमुळे भारतीय महासागर परिक्षेत्रातील २ लाख ३० हजारहून अधिक नागरिक मृत्यूमुखी पडले होते. त्या पार्श्वभूमीवर केवळ ०.२ एवढाच फरक असलेल्या या भूकंपाचे परिणाम कळण्यासाठी आपल्याला थोडी वाटच पहावी लागेल असे दिसते आहे.
त्सुनामीची शक्यता खोटी ठरो ही
त्सुनामीची शक्यता खोटी ठरो ही प्रार्थना