इंजिनिअरिंग क्षेत्र - शिक्षण व्यवस्था

अस्वल यांच्या ललित धाग्यावर सिरिअस चर्चा सुरू झाली आहे ती टाळण्यासाठी इथे चर्चा सुरू करू.
त्यासाठी माझाच मिसळपाववरचा जुना लेख इथे पेस्टवत आहे. (काही जणांनी तिथे अगोदरच प्रतिसाद दिले आहेत. पण तिथे नसलेल्यांना इथे चर्चा करता येईल).
----------------------------------------------------------------------------------
इंजिनिअरिंग हे क्षेत्र डॉक्टरी, अकाउंटन्सी, वकिली यांसारखेच व्यावसायिक क्षेत्र समजले जाते. परंतु या इतर व्यवसायांमध्ये आणि इंजिनिअरिंगच्या व्यवसायामध्ये मुख्य फरक हा की या इतर व्यावसायिकांची एक अ‍ॅपेक्स संघटना असते. आणि ती त्या त्या व्यावसायिकांचे आणि व्यवसायांचे नियंत्रण करते. इंजिनिअरांची अशी संघटना नाही. इन्स्टिट्यूशन ऑफ इंजिनिअर्स ही संस्था आहे पण ती इंजिनिअरांचे नियंत्रण करीत नाही. डॉक्टर, सीए, सीडब्लूए यांची व्यावसायिक नीतिमत्तेची नियमावली असते. तशी इंजिनिअरांची नसते.

इंजिनिअरिंग व इतर क्षेत्रांतल्या शिक्षणातला एक महत्त्वाचा फरक म्हणजे त्या कोर्सेस मध्ये फील्डवर्क चे प्रमाण खूप जास्त असते. डॉक्टरांना दुसर्‍या वर्षापासून प्रत्यक्ष वॉर्डांमध्ये रुग्ण तपासणी वगैरे करावी लागते. सीएंना ३ वर्षे आर्टिकलशिप करावी लागते. शिवाय डॉक्टरांना एक वर्षाची इंटर्नशिप केल्यावरच प्रॅक्टिस करता येते. सीएंना पास झाल्यावर ३-४ वर्षे दुसर्‍या सीएच्या हाताखाली काम केल्यावरच सर्टिफिकेट ऑफ प्रॅक्टिस मिळते. वकीलालाही असेच काहीसे असते.

इंजिनिअरिंगच्या शिक्षणात हे फिल्डवर्क फार फार कमी असते. कॉलेजमधील लॅबमधील आणि वर्कशॉपमधील काम हे काही फील्डवर्क म्हणता येणार नाही. अगदी शेवटच्या वर्षीचे प्रॉजेक्ट हे सुद्धा फील्डवर्क म्हणायला मी धजावणार नाही. येऊनजाऊन तिसर्‍या वर्षाच्या उन्हाळी सुट्टीत महिनाभर एखाद्या कंपनीत काम केले तर तेवढेच. पण ते सुद्धा कंपल्सरी नसते. (जे लोक सॅण्डविच कोर्स करतात ते अपवाद).

त्यामुळे इतर व्यवसायाचे शिक्षण घेतलेला विद्यार्थी जेव्हा बाहेर पडतो तेव्हा तो 'मार्केट रेडी' असतो. इंजिनिअर तसा नसतो. त्याला वर्षभराचे कंपनी ट्रेनिंग करायला लागते. ते तो पहिला जॉब ज्या कंपनीत करतो तिथेच मिळते. म्हणजे त्याचे फील्डवर्कचे क्षेत्र एकदम लिमिटेड होते.

शिक्षणातला दुसरा मोठा फरक म्हणजे शिकवणारे शिक्षक. डॉक्टरांना शिकवणारे शिक्षक प्रॅक्टिसिंग डॉक्टर असतात. ते दररोज रुग्णोपचार आणि शस्त्रक्रिया करीत असतात. सीएंना शिकवणारे प्रॅक्टिसिंग अकाउंटंट असतात. वकीलांना शिकवणारे प्रॅक्टिसिंग वकील असतात (चूभूदेघे). पण इंजिनिअरिंग कॉलेजात शिकवणारे शिक्षक मात्र प्रॅक्टिसिंग इंजिनिअर नसतात. ते केवळ प्राध्यापक असतात. क्वचित प्रसंगी काही व्हिजिटिंग प्राध्यापक इंडस्ट्रीमधून येतात. मी सीओईपीला होतो तेव्हा अनेक प्राध्यापक तिथूनच इंजिनिअरिंग शिकलेले आणि इंजिनिअर होताच एकीकडे एम् ई करीत प्राध्यापक म्हणून लागलेले होते. म्हणजे त्यांनी इंडस्ट्रीचे तोंडही कधी पाहिले नव्हते. Sad
[काही हुन्नरी प्राध्यापक बाहेर इंडस्ट्रीशी कोलॅबोरेशन करीत असत आणि इंडस्ट्रीचा अनुभव मिळवीत + स्वतःचा काही फायदा करून घेत असावेत Smile . कारण इतर प्राध्यापकांमध्ये ते 'वरकमाई' करीत असल्याची चर्चा असे Wink ]. दुसर्‍या शब्दात इंजिनिअरिंग कॉलेजेस ही व्यावसायिकांची कॉलेज असल्यासारखी न चालवली जाता ती आर्टस किंवा कॉमर्स कॉलेजासारखीच चालवली जातात.

अशा वातावरणामुळे परीक्षार्थीपणा वाढीस लागून क्रिएटिव्हिटी आणि व्यावसायिकता कमी होत असावी का?

*टीप : बरीचशी माहिती मी ३० वर्षांपूर्वी अनुभवलेल्या मेकॅनिकल इंजिनिअरिंग शिक्षणावर आधारली आहे. सीओईपीच नव्हे तर व्हीजेटीआय आणि सरदार पटेल कॉलेजात सुद्धा अशीच परिस्थिती होती. पण यात आजही फार फरक झाला असेल असे वाटत नाही. तसेच आय आय टी मधल्या शिक्षणप्रणालीविषयी माहिती नाही. कदाचित परकीय देशांच्या सहकार्याने उभारलेल्या असल्यामुळे सिस्टिम वेगळीही असू शकेल.

इथे सदस्य असलेल्या आणि हल्ली किंवा पूर्वी इंजिनिअर झालेल्यांकडून भर घातली जावी अशी अपेक्षा.

field_vote: 
4
Your rating: None Average: 4 (2 votes)

इतर व्यवसायाचे शिक्षण घेतलेला विद्यार्थी जेव्हा बाहेर पडतो तेव्हा तो 'मार्केट रेडी' असतो.

एमबीबीएस बद्दल हे वाक्य असल्यास, असहमत. आजच्या घडीला (गेली २ दशके तरी) अ‍ॅक्चुअल हँड्स ऑन शिक्षण पीजी करायला सुरुवात केल्याशिवाय सुरू होत नाही. इंटर्नशिप पूर्ण केलेला एमबीबीएस विद्यार्थी हा पुढच्या १-२ वर्षांसाठी 'लायब्ररी डॉक्टर' म्हणून काम करतो. अर्थात, लायब्ररीत बसून पीजी एन्ट्रन्सचा अभ्यास करतो. घरात कुणाला आलेला ताप हा कसला आहे, अन त्यासाठी काय उपचार करावेत, अशी, किंवा एकादे इंजेक्शन द्यायची वेळ आली तर याची बहुतेकदा संपूर्ण पंचाइत होते.

तात्पर्य, थियरी पक्की, पण मार्केट रेडी? नो. नॉट आफ्टर (ओन्ली) ग्रॅज्युएशन.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

-: आमचे येथे नट्स क्रॅक करून मिळतील :-

आत्ता सुद्धा अशीच परिस्थिती आहे. बरेच शिक्षक उपकराच असतात. पण पोरांना काहीही पाट्या टाकल्या तरी नोकरी मिळून जाते. कारण परत कंपनी ट्रेनिंग देत असतेच. त्यामुळे शिक्षकांनी काही शिकवलं नाही तरी चालतं. हे दुष्टचक्र सुरु होतं.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

आधी रोटी खाएंगे, इंदिरा को जिताएंगे !

बहुतेक परिस्थिती अशीच आहे सध्या. परंतु 'वायर ब्रँचेस' अर्थात आयटी, इलेक्ट्रॉनिक्स, इ. मध्ये तुलनेने इंडस्ट्री रेडीनेस असण्याचे प्रमाण जास्त आहे.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

माहिष्मती साम्राज्यं अस्माकं अजेयं

नुकताच कोल्हापुरच्या टाँंमेटो एफएम या वाहिनीवरील एका जाहिरातपर कार्यक्रमात जयन्त पाटिल नामक एका शिक्षणसंस्था चालकाने सांगितले की गेल्यावर्षी इन्जिनियन्ग च्या ४४००० जागा महाराष्ट्रात रिकाम्या राहिल्या . याचा अर्थ काय?
नवीन संयुक्त प्रवेशपरीक्षा अवघड आहे ,हे एक कारण, परन्तु तसेच आयटी व्यतिरिक्त इतर ट्रेड साठी विद्यार्थी उत्सुक नाहीत का?
तसे असेल तर कठीण परिस्थिती आहे. कारण कॉम्प्युटर व आयटी व्यतिरिक्त सिव्हिल , मेकॅनिकल , ईन्स्ट्रुमेन्टेशन ,इलेक्ट्रिकल ह्या ट्रेडच्या स्किल्ड इन्जिनियर्स ची देखील देश-परदेशात प्रचंड मागणीच नव्हे तर तुटवडा असताना या ट्रेडकडे जाण्यास विद्यार्थी नापसन्ती दाखवत असतील तर हे भयावह आणि दुर्दैवी असेल

आयटी क्षेत्राला लाभलेले अनावश्यक ग्लॅमर कमी झाले पाहिजे असे मनापासुन वाटते

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

वीतराग बनो......वीतद्वेष बनो !

अत्त दीप भव !

नुकताच कोल्हापुरच्या टाँंमेटो एफएम या वाहिनीवरील एका जाहिरातपर कार्यक्रमात जयन्त पाटिल नामक एका शिक्षणसंस्था चालकाने सांगितले की गेल्यावर्षी इन्जिनियन्ग च्या ४४००० जागा महाराष्ट्रात रिकाम्या राहिल्या. याचा अर्थ काय?

तुम्ही टि.व्ही. बघत नाही का? आजचे तरूण आणि तरूणी शिक्षणसंस्थेतून नाही तर आय. आय. एन. मधून पदवी घेत आहेत!

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

-अनामिक

हा लेख आधी वाचण्यात आलेला नव्हता, तेव्हा इथे डकवल्याबद्दल धन्यवाद. काही मुद्दे...

१. इंजिनियर व इतर व्यावसायिक (डॉक्टर, सीए वगैरे) यात मला काही महत्त्वाचे फरक जाणवतात. डॉक्टरांचं उदाहरण घेऊन सांगतो, पण सीएंसाठीही हा मुद्दा लागू व्हावा. ज्या मूलभूत गोष्टींवर डॉक्टर काम करतात ती - म्हणजे शरीर - बदलत नाही. त्यामुळे हातातली उपकरणं थोडीफार बदलली तरी उपचारपद्धती बदलत नाहीत. त्यामुळे अशा बाबतीत एक अपेक्स बॉडी करून डॉक्टरांच्या वागणुकीचं नियंत्रण करणं शक्य होतं. इंजिनियर हे तंत्रज्ञान या सतत बदलत्या गोष्टीवर काम करतात. त्यामुळे मुळातच स्टॅंडर्डायझेशन काही नाही. तेव्हा त्यांना सर्वसाधारण ज्ञान देऊन मग कंपनीत नोकरीच्या वेळी विशिष्ट सिस्टिमची माहिती द्यावी लागते. त्यांच्या स्किलसेटमध्ये नॉलेज ऑफ अ पर्टिक्युलर सिस्टिम नसून नॉलेज ऑफ जनरल सिस्टिम्स असतं.

२. मार्केट रेडी विषयी हाच युक्तिवाद बऱ्यापैकी लागू होतो. बाजारात असलेल्या सर्व विशिष्ट नोकऱ्यांसाठी त्या त्या नोकरीचं ज्ञान असलेला इंजिनियरांचा समुदाय तयार करणं हे अशक्य काम आहे. त्यामुळे मार्केट रेडीची व्याख्या थोडी बदलते. त्या नोकऱ्यांसाठी आवश्यक असलेलं काही मूलभूत तांत्रिक ज्ञान पुरवून वर्षाभरात जॉब रेडी होईपर्यंत पोचवणं हेच उद्दिष्ट ठरतं.

३. आयायटीमध्येही पूर्णपणे पुस्तकी ज्ञानावरच भर होता. त्यात एक-दोन महिने कुठच्यातरी कंपनीत टिवल्याबावल्या करणं, आणि बीटेक प्रोजेक्टमध्ये किंचित काही स्वतःच्या जबाबदारीवर करणं यापलिकडे काहीच नव्हतं.

४. विशिष्ट शिक्षणसंस्था किंवा एकंदरीत इंजिनियरिंग कॉलेजेसमधल्या प्राध्यापकांची पात्रता वगैरे मुद्दे क्षणभर बाजूला ठेवू. जर चांगले इंजिनियर्स निर्माण करायचे असतील तर आत्ताच्या कोर्सवर्कपैकी काही कमी करावं असं मला वाटत नाही. फारतर असं म्हणता येईल की एक वर्षभर कुठच्यातरी कंपनीत सीनियर इंजिनियर्सच्या हाताखाली ट्रेनी म्हणून काम करण्याची जबाबदारी असावी. पण मग प्रश्न असा येतो की हे जर त्याला/तिला ज्या कंपनीत नोकरी करायची गरज असेल तिथेच, त्या नोकरीचा भाग म्हणून पदव्युत्तर झालं तर काय बिघडलं? उलट असा फक्त वर्षाभरासाठीचा ट्रेनी स्वीकारायला कंपन्या तयार होणार नाहीत - कारण त्यांची त्यामध्ये गुंतवणुक असेल. म्हणून हे 'अपुरं' ट्रेनिंग पुरं करून तीच नोकरी पुढे चालू करणं हाच फायदेशीर पर्याय आहे.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

मुद्दा क्र. १ बद्दल बोलायचे झाले तर डॉक्टरी फील्डमध्येही बरेच बदल होत असतात. पण शास्त्राचे अनुभवसिद्ध ठोकताळे व तत्त्वे क्वचितच बदलताना दिसतात. तेच इंजिनिअरिंगलाही लागू आहे. फ्लुईड डायनॅमिक्स किंवा थिअरी ऑफ मशीन्स वगैरे विषयांतील ज्ञानाची उपयोजनक्षेत्रे बदलली म्हणून तेवढ्याने बेसिक बदलतं असं काही नाही. दोन्हींतील फरक असलाच तर प्रमाणाचा आहे, गुणात्मक नाही असं वाटतं.

मार्केट रेडीबद्दल बोलायचे झाले तर इलेक्ट्रॉनिक्स किंवा आयटी फील्डमध्ये 'स्वतःच्या' जबाबदारीवर तुलनेने कमी त्रासात, कमी भांडवल व कमी जबाबदारीत काहीतरी करण्याची संधी जास्त असते असे वाटते, उदा. एखादे अ‍ॅप्लिकेशन 'लिहिणे', रॅस्पबेरी पाय वगैरे भानगडी वापरून एखादे उपकरण बनवणे, इ. तुलनेने 'कोअर' ब्रँचवाल्यांकडे तसे ऑप्शन्स नसल्यामुळे त्यांचे अभ्यासक्रम आणि परिणामतः ते शिकणारी पोरेही जास्ती बुकिश होतात असे म्हणता यावे काय?

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

माहिष्मती साम्राज्यं अस्माकं अजेयं

इंजिनेरींगात (बी.इ.) मध्ये तरी बेसिक्स पक्के व्हावेत हा उद्देश असावा- त्याचा इंडस्ट्रीशी तितकासा संबंध अपेक्षित नसतो.
उ.दा. मायक्रोप्रोसेसर्स हा विषय बी.इ. मध्ये शिकवतात. त्यात ८०८५/८०८६ हे आद्य प्रोसेसर्स तपशीलवार शिकवले जातात.
आजकाल कुठल्याच कंपनीत ८०८६ वापरून कामं होत नसतील- त्यामुळे त्या ज्ञानाचा प्रत्यक्ष इंडस्ट्रीत काही विषेश उपयोग नाही.

पण- बी.ई.तही काही गोष्टी अपेक्षित आहेत ज्यावर कधीच लक्ष दिलं जात नाही (आय.आय.टी.बद्दल कल्पना नाही)
१. Problem solving - एखादा विषय समजला की नाही ते ठरवण्यासाठी आवश्यक. पण आपल्या बहुतेक परीक्षांमध्ये ठराविक थियरी आणि ठोकळेबाज प्रॉब्लेम्स असतात.
उ.दा. Data Structures हा कंप्यूटर सायन्सचा विषय घ्या. त्यातले टिपिकल प्रश्न असतात -
लिंकलिस्ट काय आहे? एक उदाहरण देऊन स्पष्ट करा.
ह्यामुळे काय साध्य होतं? ज्या पोरांनी लिंकलिस्टबद्दल काही थेरी वाचलीये, ते लोक लिहून मार्क मिळवतात.
पण लिंकलिस्ट कशी बनवतात, त्यातले धोके काय, कुठल्या प्रकारच्या प्रॉब्लेम्ससाठी ती वापरावी, किंवा कशा प्रकारे लिंकलिस्ट प्रगत (evolve) होऊन त्याचेच पुढे वेगवेगळे डेटा स्ट्र्क्चर्स बनतात- ह्या अतिशय महत्त्वाच्या गोष्टींबद्दल परीक्षेत काहीच मूल्यमापन होत नाही. त्यामुळे "लिंकलिस्ट" मला "येते"- असा आत्मविश्वास निर्माण व्हायला परीक्षा, असाइन्मेट पूरक नसतात.
मग हाच प्रश्न असा विचारला तर?
पुढीलपैकी ४ उदाहरणांत कुठली लिंकलिस्ट आहे ते सांगा. आणि उरलेल्या उदाहरणांना लिंकलिस्ट बनवण्यासाठी त्यात काय बदल करावे लागतील?
वगैरे.

.
२. लॅब्स- प्रॅक्टीकल्स "लावलेली" असतात. ती करायची. आधीच ठरलेल्या गोष्टी जर पोरांना करायला लावल्या तर काय Creative करणार ती?आणि उत्तर बरोबर आलं तरच पूर्ण मार्क- मग रीडींग्स कॉपी होणारच.
पर्याय म्हणून ३-४ Free Exploring Labs ठेवू शकतो. ज्यात उपलब्ध उपकरणं वापरून पोरं काही निरीक्षणं नोंदवतील. एखादा प्रोजेक्ट करू शकतील. बरेचदा पोरांना विषयात खरंच रस असतो, पण त्यांच्या मनातले प्रश्न हे सिलॅबसमधे बसत नाहीत- आणि त्यासाठीचं प्रॅक्टिकल अस्तित्त्वात नसतं.
आपल्या लॅब्स बर्‍यापैकी गंडल्या आहेत- हे स्वानुभवावरून वाटतं. निदान आहेत त्या प्रॅक्टीकल्सचं वेगळ्या पद्धतीने मूल्यमापन व्हायला हवं.
.
३. इंटर्नशिप्स - नंतरच्या आयुष्यासाठी शिक्षण आणि नोकरी ह्यांना जोडणारा महत्त्वाचा सांधा. पोरांना जो काही Industry readiness मिळू शकतो, त्यात इंटर्नशिपचा खूप महत्त्वाचा वाटा आहे. सगळ्या ब्रँचेसना इंटर्नशिप मिळू शकते का, ते माहिती नाही, पण Elec(trical/Tronics), IT, Computers, Telecom ह्यांना योग्य ती संधी नक्कीच मिळू शकते.

-------------------
ह्याला एक सणसणीत अपवाद म्हणजे शेवटलं वर्ष. त्यात २ elective विषय असायचे. ह्या विषयांना फारसे नियम नव्हते, आणि बरेचदा पोरांची संख्याही कमी असायची. त्यामुळे ह्या विषयांचा अभ्यास free flowing असायचा. शिक्षक मोकळेपणाने बर्‍याच आयडिया ऐकून घ्यायचे. प्रॅक्टीकल्स जरी ठरलेली असली, तरी इकडेतिकडे लुडबूड करायला खूप चान्स होता. ही विषयातली "लुडबूड" खूप काही शिकवून गेली- कारण त्या सगळ्या गोष्टी आम्ही "करून बघूया तरी काय होतंय" म्हणून केल्या होत्या.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

इलेक्टीव्ह म्हणून मोठ्या उत्साहाने ऑटोमोबाईल इंजिनिअरिंग घेतला होता. वैताग साला. त्यात काहीही प्रॅक्टिकल नव्हतं. आयसी इंजिन आधीच शिकून झालेलं असलं तरी गाड्यांच्या स्पेसिफिक कितीतरी शिकण्यासारखं आहे. पण विषय नुसता थेरॉटिकल निघाला. काढला मग ४४ वर.
डायनॅमिक्स ऑफ मशिन्स, थर्मोडायनॅमिक्स, फ्लुईड मेकॅनिक्स, अप्लाईड मेकॅनिक्स आणि मशिन डिझाईन अ‍ॅन्ड ड्रॉईंग हे आवडीचे विषय होते आणि मार्क्सही त्यात ६०-७०च्या वर पडायचे पण पुढे इंटर्नशिपला २ दिवस सीएनसीसमोर उभं करुन रोज ३००-३५० जॉब काढायला लावले कायनेटिकमध्ये. सीएनसीचं सेटिंग तिथला ज्यु. सुपरवायझर करुन द्यायचा वहीत बघून. वही अशी धरायचा की आम्हाला वहीत काय लिहीलंय आणि स्क्रीनवर काय उमटतंय ते दोन्ही दिसू नये.
तिसर्‍या दिवशी सीएनसी डिपार्टमेंटला न जाता असेम्ब्ली-लाईन पाहायला गेलो तर सीएनसीचे एचओडी श्री. श्री. श्री. क्षयझ साहेबांचं बोलावणं आलं. "मी कोण आहे माहितीय का तुम्हाला? मला सांगितल्याशिवाय कुठंही जायचं नाही. चला जॉब काढा."
चौथ्या दिवसापासून इंटर्नशिप बंद केली. हे असलं इंजिनिअरिंगचं शिक्षण.
फायनल प्रोजेक्टला एल अ‍ॅन्ड टीला प्रोग्रॅमेबल लॉजिक सर्किट्स वापरुन न्युमॅटिक रिलेस्विचटेस्टर बनवला. तिथेही तेच. राजू नामक तिथल्या हैद्राबाद्याने पीएलसी प्रोग्रॅम केले पण एक अक्षरही दाखवलं नाही. एक्स्टर्नलसमोर प्रोजेक्ट व्हायवाला फाफललो मग. मेकॅनिकल इंजिनिअरिंगच्याच क्षेत्रात राहिलो असतो तर त्या लोकांसारखाच भिकार*ट झालो असतो मी पण. अर्थात नंतर इतर क्षेत्रात भिकार*ट लोक भेटले नाहीत असे नाही पण तिथे माणसांची गरज जरा जास्त होती सुदैवाने.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

इलेक्टिवची गंमत अशी की ३ विषयांपैकी १ विषय इलेक्टिव घेता येईल अशी मूळ संकल्पना असली तरी, कॉलिजात फक्त एकाच विषयाचे शिक्षक आहेत/त्याच विषयाची ल्याब आहे/एचओडींना तो विषय बरा वाटतो या कारणास्तव तोच विषय घ्यावा लागला होता.

सध्या काय परिस्थिती आहे याची कल्पना नाही. पण एचओडींनी आम्हा सर्वांसाठी निवडलेले इलेक्टिव (डिझाईन अँड अनालिसिस ऑफ अल्गोरिदम/ प्रिन्सिपल्स ऑफ युनिक्स प्रोग्रॅमिंग) खरंच चांगले होते. युनिवर्सिटीने चार वर्ष लावलेल्या सिग्नल प्रोसेसिंग, एम-१,२,३ अशा इतर विषयांपेक्षा या दोन विषयांचा पुढे अॅक्चुअल कामात बराच फायदा झाला.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

सीएंच्या बाबतीत "मार्केट रेडीनेस" हेच सर्वोच्च ध्येय आहे. सिलॅबस ठरवणे, परीक्षा घेणे, पेपर तपासणे ही सर्व कामं सीएच (इन्स्टिट्यूटमार्फत) करतात. बाह्य जगात जे असेल त्याप्रमाणे सिलॅबस वारंवार बदलला जातो. परीक्षेची काठिण्यपातळी कमीजास्त होत रहाते. तीन वर्षाची आर्टिकलशिप प्रॅक्टिसिंग सीएच्या हाताखाली करायला लागते. अक्षरशः भांडं ठोकावं तसं आर्टिकलशिपच्या काळात ठोकून घेतलं जातं.

(एवढं करून शिक्षणाची किंमत अतिशय कमी आहे - तीन्ही परीक्षा मिळून उणेपुरे पंधराएक हजार रुपये**.)

म्हणूनच - घासकडवींच्या मुद्दा क्र. १ शी असहमत आहे. बदल होतात, आणि गेल्या काही वर्षांत तर अमूलाग्र बदल झालेले आहेत. उदा. भारतीय अकाउंटिंग स्टँडर्ड्स जाऊन (आंतरराष्ट्रीय) आय एफ आर एस येणं, गावभरचे अप्रत्यक्ष कर जाऊन येऊ घातलेला जी एस टी, चोपड्यांमधल्या अकाऊंट्सपासून क्लाऊड बेस्ड ई आर पी सिस्टिम्स, ऑडिटिंगमध्ये व्हाऊचरवर हिरव्या टिका मारणं जाऊन/कमी होऊन आलेलं सिस्टिम्स ऑडिट, वगैरे.

फरक एवढाच आहे, की आपण जगाबरोबर राहिलं नाही तर जग आपल्याला पोत्यात घालून सोडून देईल हे सीएंना पुरेपूर कळलेलं आहे, आणि त्यासाठी ते संस्थात्मक पातळीवर प्रयत्न करतात.

सीए कोर्समध्येही "नॉलेज ऑफ जनरल सिस्टिम्स" दिलं जातं. सीए फायनलला आठ विषय आहेत. पास होणारा मनुक्ष एक किंवा जास्तीत जास्त दोन विषयांत पुढे स्पेशलायजेशन (पक्षी: करियर) करतो. याचा अपेक्स बॉडी निर्माण करण्याशी संबंध नसावा.

___________________
** विद्यार्थ्याने आपल्या पसंतीने लावलेले क्लासेस वगळता. २००६चे आकडे, आता बदलले असतील कदाचित.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

********
It is better to have questions which don't have answers, than having answers which cannot be questioned.

तीन वर्षाची आर्टिकलशिप प्रॅक्टिसिंग सीएच्या हाताखाली करायला लागते. अक्षरशः भांडं ठोकावं तसं आर्टिकलशिपच्या काळात ठोकून घेतलं जातं.

पूर्ण सहमत. परिचयातली दोन उदाहरणं पाहतोय. लै पिदवतात बिचार्‍या पोरांना.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

माहिष्मती साम्राज्यं अस्माकं अजेयं

पण ते नॉलेज बेस्ड काम असल्याने ज्ञान न देता उगंच पिदवलं असं होऊ शकत नाही. तसं इंजिनिअरला ज्ञान न देता पिदवलं जाऊ शकतं. आयटीतही असे अनेक पिदवले गेलेले लोक असतात.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

तेही आहेच म्हणा.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

माहिष्मती साम्राज्यं अस्माकं अजेयं

(प्रतिसाद under modification आहे. बूच मारू नये.)

मार्केट रेडिनेस चा मुद्दा अनेकांनी मांडलेला आहे. याच्यावर थोडीशी पि़क टाकतो.

"तुमच्या कॉलेजात जे शिकवलं जातं ना त्याचा प्रत्यक्ष जगात काहीही उपयोग नसतो. शेवटी प्रॅ़क्टिकल ज्ञानच महत्वाचे." असा डायलॉग माझ्या ओळखीच्या चौथी पास असलेल्या एका व्यक्तीने मोठ्या फुशारकीने मारला होता. असा डायलॉग मारण्यामागे तिचे कर्तृत्व फक्त एवढेच की की त्या व्यक्तीचा मुलगा एंजिनियर झाला होता व त्या व्यक्तीच्या गोतावळ्यात/नातेवाईकांत इंजिनियरिंग कुणीही केलेले नव्हते. व त्यावेळी इंजिनियर असणे म्हंजे सॉलिड प्रतिष्ठेचे होते. १९९० च्या आसपास ची गोष्ट आहे.

माझ्या परिचयातील आणखी एक व्यक्ती की जी स्वतः १००% अंगठेछाप आहे (म्हंजे स्वतःची सही करता येत नाही.) पण स्वकर्तृत्वावर व्यापारी झालेली आहे व अत्यंत यशस्वी व्यापारी (म्हंजे कोट्याधीश) झालेली आहे त्या व्यक्तीने सुद्धा "एवढं शिकताय तुम्ही लोक पण त्याचा काय उपयोग आहे ?" असा प्रश्न विचारला होता. व माझ्या समोर दुसर्‍या व्यक्तीने तिथेच त्यांना "तुम्ही शिकलेले असतात तर असं बोलला नसतात" असा डायलॉग मारून गप्प बसवले होते.

ब्रायन कप्लान (माझे आवडते लेखकांपैकी एक) हे "Case against education" हे पुस्तक लिहित आहेत. शिक्षणाच्या बद्दल जेव्हा पॉलिसी च्या दृष्टीने विश्लेषण केले जाते तेव्हा त्यात सिग्नलिंग मॉडेल चा वापर केला जातो. १९८१ मधे मायकेल स्पेन्स यांनी लिहिलेला सिग्नलिंग चा सुप्रसिद्ध पेपर. त्या पेपरमुळे अनेक घडामोडींमागची कारणमीमांसा सुस्पष्ट करण्याच्या दृष्टीने महत्वाचे पाऊल पुढे टाकले गेले. ब्रायन कप्लान यांच्या पुस्तकाचा प्लॉट हा या मॉडेल चा आधार घेऊन पुढे जातो -

The book's basic plot:

  1. The labor market heavily rewards educational credentials even though academic curriculum is seriously disconnected from the jobs people actually do. The best explanation for this strange fact is that education is a strong signal of pre-existing worker productivity. (chapter 1)
  2. While the return to education is often overstated, it remains high after making various statistical adjustments. Degrees in useless subjects really do substantially raise wages. (chapter 2)
  3. Education signals a package of desirable employee traits: intelligence of course, but also conscientiousness and conformity. Many people dismiss the signaling model on a priori grounds, but educational signaling is at least as plausible as many widely accepted forms of of statistical discrimination. (chapter 3)
  4. Empirically distinguishing signaling from human capital is notoriously difficult. But literatures on the sheepskin effect, employer learning, and the international return to education confirm that signaling is moderately to highly important. (chapter 4)
  5. How much education should you get? The human capital-signaling distinction isn't important at the individual level, but the policy implications are enormous. (chapter 5)
  6. The non-pecuniary benefits of education are over-rated, and the non-pecuniary costs (especially boredom) are under-rated. There's a massive selection bias because the kind of people who hate school rarely publicize their complaints. (chapter 6)
  7. The most important implication of the signaling model is that we spend way too much money on education. Education spending at all levels should be drastically reduced, and people should enter the labor force at much younger ages. (chapter 7)
  8. The education we offer should be more vocational. Especially for weaker students, vocational education has a higher private and social return than traditional academic education. (chapter 8 )

हे सगळे सांगायचा उद्देश हा की सर्वसामान्यपणे तुमच्यामाझ्या माहीतीतल्या प्रत्येकाच्या घरात, नातेवाईकांत शिक्षणाबद्दल असे बोलले जाते - की शिक्षण तुम्हाला मार्केट रेडी करीत नाही. कॉलेजात जे शिकता ते फारसे प्रत्यक्ष काम करताना उपयोगी पडत नाही. देअर इज अ गॅप बिट्वीन थियरी अँड प्रँक्टीस वगैरे. पण सामान्य पणे असं म्हणारी व्यक्ती ही आपल्या मुलांना व्होकेशनल मधे घालतेच असे नाही. व त्यामागची कारणे ही सिग्नलिंग शी निगडीत असतात. By undergoing that expensive education (instead of vocational training) the student sends a signal in the market that the student has the intelligence, perseverance, staying power, willingness to confirm, commitment, etc etc. यातले काही ट्रेट्स एकदुसर्‍यासारखे च आहेत.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

सिग्नलबद्दलचे विश्लेषण बरोबर आहे, पण मला वाटते गब्बर हॅज मिस्ड द पॉइंट.

अ‍ॅक्चुअली शिक्षण मुळातच निरुपयोगी आहे का? असा प्रश्न नाहिये धाग्यात. प्रश्न हा आहे, की डिग्री घेईपर्यंतचे 'प्रोफेशनल' शिक्षण हे त्यानंतर ताबडतोब त्या व्यक्तीकडून अपेक्षित असलेल्या 'प्रोफेशन'ची जबाबदारी एकट्याने स्वतंत्रपणे झेलण्याइतपत तयारी करवून देते की नाही? जर नाही, तर सध्याच्या शिक्षणपद्धतीत कोणते बदल अपेक्षित आहेत?

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

-: आमचे येथे नट्स क्रॅक करून मिळतील :-

जर नाही, तर सध्याच्या शिक्षणपद्धतीत कोणते बदल अपेक्षित आहेत?

हे एक प्रकारचे मार्केट फेल्युअर आहे. पण - It has been bridged at least to some extent.

व त्यास तोडगा काही प्रमाणावर तरी आधीच अवलंबण्यात आलेला आहे. उदा. (कॉम्प्युटर) इंजिनियरिंग केल्यानंतर व्यक्ती डायरेक्ट सॉफ्टवेअर प्रोग्रामिंग करण्यासाठी रेडी नसते. व म्हणून NIIT, Aptech, Wintech वगैरे सारख्या संस्था निर्माण झाल्या. अनेक कंपन्यांमधे रुजु झाल्यावर किमान काही महिन्यांचे ट्रेनिंग असते (उदा. टीसीएस). वैद्यकीय व्यवसायात सुद्धा इंटर्नशीप ची तरतूद एवढ्यासाठीच करण्यात आली. चार्टर्ड अकाऊंटंट लोकांना सुद्धा (३ वर्षे??) आर्टिकलशीप करावी लागते ती सुद्धा यासाठीच. (Now, you can say that articalship is a way CA firms get cheap labor.). सर्वसाधारणपणे अनेक MBA प्रोग्राम्स मधे पहिल्या व दुसर्‍या वर्षांच्या मधे एक इंटर्नशीप असते.

हे सगळे (इंटर्नशीप, आर्टिकलशीप) परफेक्टली मार्केट रेडी बनवू शकत नाही. पण गॅप मोठ्याप्रमाणावर ब्रिज केली जाऊ शकते.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

इंजिनिअरांची अशी संघटना नाही.

आहेत. Institute of Engineers, The Institution of Electronics and Telecommunication Engineers (I.E.T.E.) ISA, तसेच परदेशात Professional Engineers अशा अनेक संघटना आहेत. इंजिनिअरवर नियंत्रण करण्यापेक्षा त्यांचा मुख्य उद्देश असतो की त्यांच्या मेंबर्सचा इंटरेस्ट सांभाळणे आणि त्यांचा फायदा बघणे. मग ते स्वतःची स्टॅण्डर्ड काढतात, लॉबिंग करतात वगैरे.

इंजिनिअरिंग व इतर क्षेत्रांतल्या शिक्षणातला एक महत्त्वाचा फरक म्हणजे त्या कोर्सेस मध्ये फील्डवर्क चे प्रमाण खूप जास्त असते. इंजिनिअरिंगच्या शिक्षणात हे फिल्डवर्क फार फार कमी असते.

भारतात मूलभूत संशोधन फार कमी प्रमाणात होते. IIT, COEP, VJTI, BITS वगैरे प्रसिध्द कॉलेजात किती पेपर्स पब्लिश होतात आणि कितीकिती पेटंट्स मिळाली आहेत, हाच एक संशोधनाचा विषय होईल. मुख्य प्रॉब्लेम म्हणजे कॉलेज आणि इंडस्ट्री यांच्यात विचारविनिमय फारसा होत नाही, त्यामुळे इंडस्ट्रीत काय पाहिजे, नवीन शोध काय लागत आहेत आणि ते कसे वापरात येत आहेत, हे लक्षात न घेताच कॉलेजात शिक्षण दिले जाते.

त्यामुळे इतर व्यवसायाचे शिक्षण घेतलेला विद्यार्थी जेव्हा बाहेर पडतो तेव्हा तो 'मार्केट रेडी' असतो. इंजिनिअर तसा नसतो.

इंजिनिअरिंग कॉलेज हे नोकर तयार करण्याचे कारखाने आहेत, हे पटले तर असा प्रश्न पडणार नाही. प्रत्येक कंपनीमध्ये प्रॉडक्ट, प्रोसेस हे वेगवेगळे असतात, त्यामुळे कोणीही नवीन आला तरी त्याला हे शिकावेच लागते. इंजिनिअर घेताना कंपनी त्यांची रिस्क कमी करायला बघते. जर कोणी इंजिनिअर असेल तर त्याला/तिला किमान थियरी तरी माहीत आहे, त्यामुळे तो/ती काम करायला लवकर तयार होईल, असा विचार असतो. To quote Nikola Tesla: “If Edison had a needle to find in a haystack, he would proceed at once with the diligence of the bee to examine straw after straw until he found the object of his search. I was a sorry witness of such doings, knowing that a little theory and calculation would have saved him ninety per cent of his labor.”

शिक्षणातला दुसरा मोठा फरक म्हणजे शिकवणारे शिक्षक

पुन्हा तोच मुद्दा. बहुतेक शिक्षक फक्त शिक्षण क्षेत्रातले असल्याने बाहेरच्या जगात काय चालले आहे, त्याची त्यांना फारशी कल्पना नसते किंवा त्यांना त्याच्याशी काही देणेघेणे नसते. चांगले शिकवायला शिक्षक उदास असतात आणि काहीतरी नवीन शिकावे असा विचार करायला विद्यार्थी उदास असतात. त्यामुळे बहुतेक सगळे पाट्या टाकायचे काम करतात. काही-काही चांगले शिक्षक असतात, नाही असे नाही, पण बहुतेक वेळा ते अपवाद म्हणूनच.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

>>आहेत. Institute of Engineers, The Institution of Electronics and Telecommunication Engineers (I.E.T.E.) ISA,

अशा संस्था आहेत हे मी लेखात म्हटलेच आहे. पण त्या संस्था इंजिनिअरिंग व्यवसायाचे/व्यावसायिकांचे नियंत्रण करत नाहीत. इंजिनिअर म्हणून काम करण्याची पात्रता असल्याचे सर्टिफिकेट देण्याचा एक्स्क्लूझिव्ह अधिकार त्यांच्याकडे नाही. ते ए एम आय ई नामक सर्टिफिकेट देतात पण त्या सर्टिफिकेटला कुणा सोम्या गोम्या कॉलेजच्या बी ई डिग्रीपेक्षा कमी किंमत असते.

मी माझे आयुष्य इन्स्टिट्यूशन ऑफ इंजिनिअर्सच्या कुठल्याही रजिस्ट्रेशनशिवाय घालवले. इंजिनिअरिंग शिक्षणाचे सिलॅबस काय असावे वगैरे ठरवण्याचे अधिकार त्यांच्याकडे नाहीत. ए आय सी टी ई या गोष्टी करते बहुधा. पण त्यांचे इव्हॅल्युएशन पुन्हा शिक्षण संस्थेविषयी असते; त्यातल्या विद्यार्थ्यांविषयी नसते.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

--------------------------------------------
ऐसीव‌रील‌ ग‌म‌भ‌न‌ इत‌रांपेक्षा वेग‌ळे आहे.
प्रमाणित करण्यात येते की हा आयडी एमसीपी आहे.

प्रतिसाद पूर्ण होण्यापूर्वीच बूच बसले.
इंजिनियर होणे हे सी.ए. किंवा डॉक्टर होण्यापेक्षा खूप सोपे आहे. (वैयक्तिक मत). इंजिनियरींगला अ‍ॅडमिशन मिळणे कठीण आहे, पण एकदा कॉलेजात शिरलात की जर above-average असाल तर कोणीही पास होऊ शकतो. डिस्टिंक्शन मिळवणे अजिबात कठीण नाही, हे स्वानुभवावरून सांगू शकतो. किमान फर्स्टक्लास तरी आरामात मिळू शकतो, त्यामुळे कोणी एटीकेटी किंवा जयकर रुलचे उदाहरण दिले की आश्चर्य वाटते. (मलातरी).

शिक्षकांबद्दल लिहितालिहिता बूच बसले, पण एका सरांबद्दल लिहिल्याशिवाय राहावत नाही. मी तोंडी परीक्षा द्यायला गेलो तेव्हा संवाद काहीसा असा झाला.
"या, अभ्यास झाला का?"
"केलाय सर जमेल तेव्हडा" (मनातः मास्तर, आता तुम्ही माझी बिनपाण्याने करणार, मग मानभावीपणा कशाला करताय?)
"तुझ्या घरी फ्रीज आहे का?" (काय येडझवा मास्तर आहे हा. हा काय प्रश्न आहे?)
"आहे सर".
"फ्रीजच्या मागे डोकावून बघितलेस का कधी? त्याच्यात काय-काय पार्ट असतात?"
"सर, मागे जाळी असते आणि काँप्रेसरपण असतो."
"बरं, मला सांग काँप्रेसर कुठल्या रंगाचा असतो?" (आयला, मास्तर काय येडा आहे की काय? असलं काय विचारतोय?)
"काळा सर" (कोणी xतिया पण सांगेल).
"काळाच का?"
"कारण काळा रंग स्वस्त असतो म्हणून सर" (कसा पकडला या मास्तरला. हाहा!!)
"बरोबर आहे, पण विषयाला धरून नाही. मला अपेक्षित उत्तर वेगळे आहे. काळाच का? जांभळा, पिवळा, लाल का नाही?"
"सर, जरा विचार करून सांगतो".
"ठीक आहे."
(१ मिनिटानी)
"सर, नक्की माहीत नाही, पण प्रयत्न करतो. काँप्रेसरमध्ये काँप्रेशन होते, त्यामुळे हीट निर्माण होते. आता ही उष्णता बाहेर टाकायची तर ब्लॅकबॉडी सर्वोत्तम. म्हणून त्याला काळा रंग देतात म्हणजे जास्तीत-जास्त हीट लवकर बाहेर टाकली जाईल".
"बरोबर, आता सांग, बोर्डॉन ट्यूब (Bourdon tube) कुठे वापरतात?"
"माहीत नाही सर."
"अरे, विचार कर."
"नाही माहीत सर."
"तू स्कूटरमध्ये कधी हवा भरली आहेस का?"
"नाही सर, माझ्याकडे स्कूटर नाही, सायकल आहे"
"अरे, पण पेट्रोल पंपावर गेला असशील ना? तिथे जो प्रेशर दाखवायचा काटा असतो ना, त्याच्या आत बोर्डॉन ट्यूब असते. एकीकडे प्रेशर दिले की काटा फिरतो, तो त्याच्यामुळे."
"बरं, आता सांग, सोडियम व्हेपरचे पिवळे दिवे चांगले की मर्क्युरी व्हेपरचे पांढरे?"
"सर, पांढरे चांगले वाटतात डोळ्यांना, म्हणून ते चांगले" (आता जास्ती काही विचारू नकोस ना....)
"बरं, आता सांग बजाजच्या फॅक्टरीत गेलास का कधी फिरायला कोणाबरोबर"
"नाही सर"
"बर, एखादी फॅक्टरी बघितली का ज्याच्यात फिरती मशीन्स असतात?"
"हो, बघितली आहे"
"त्याच्यात पिवळे दिवे असतात की पांढरे?"
"बहुतेकदा पिवळे असतात, सर"
"का? तू तर आत्ताच म्हणालास ना की पांढरे चांगले वाटतात डोळ्यांना. मग?"
"सर, फिरत्या मशीनमुळे आणि प्रकाशाच्या वेव्हलेंथ जुळली तर स्ट्रोबोस्कोपिक एफेक्टने मशीन फिरत असून पण स्थिर वाटेल. त्यामुळे अपघात होण्याची शक्यता आहे".
"आता सांग, घरी ट्यूबलाईट वापरणे चांगले की बल्ब?"
"सर, ट्यूबलाईट"
"का"
"ट्यूबलाईट २६ वॉटची असते आणि बल्ब ६० वॉटचा"
"चूक. मी पाहिजे तर २५ वॉटचा दिवा लावीन. शिवाय ट्यूबच्या चोकमध्ये पण एनर्जी लॉस होतो ना?"
"कारण ट्यूबलाईटमध्ये सावली पडत नाही आणि बल्बने पडते. त्याने कटकट वाटते डोळ्यांना" (मी फेक मारली.)
"पुन्हा चूक" (इथे सरांनी पेन टेबलच्या अगदी जवळ पकडून पडणारी अंधूक सावली दाखवली.)
"सर, बल्बमध्ये खूप एनर्जी हीटमध्ये वाया जाते. त्यामुळे ल्युमेन्स पर वॉट ट्यूबलाईटला चांगले असते. म्हणजे ती जास्त एफिशियण्ट आहे."
"बरोबर."
"बरं, तुझी परीक्षा झाली. जा आता तू. पण बाहेर जाऊन मित्रांना सांगू नकोस प्रश्न आणि उत्तरे. मला इतरांना पण विचारायचे आहेत".

आज या गोष्टीला कित्येक वर्ष झाली, पण अजूनही तो प्रसंग डोळ्यासमोर जसाच्या तसा उभा आहे. त्या सरांनी अजून शिकवावे, असे वाटले होते, पण दुर्दैवाने त्यांनी एकच विषय शिकवला आणि संपूर्ण इंजिनियरिंगमध्ये मलातरी तसे सर पुन्हा कधीच भेटले नाहीत. आपल्या शिक्षणपध्दतीची ही खरी व्यथा आहे.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

इंजिनिअरिंग कॉलेज हे नोकर तयार करण्याचे कारखाने आहेत, हे पटले तर असा प्रश्न पडणार नाही

हे कळीचं वाक्य आहे. मुळात रिझनिंग करणारा, स्टेटस क्वोला चॅलेंज करणारा, भलभलते प्रयोग करुन पाहणारा इंजिनिअर कोणाला हवा आहे?
मार्केटमध्ये चाललंय तेच योग्य असा मार्केट भक्तांचा दावा असल्यावर आणि शिक्षणाचा उद्देश पैसे कमावणे हा आहे असे ठाम मत असल्यावर "इंजिनिअर मार्केटरेडी का नाही?" असा प्रश्न पडतो. खरं म्हणजे "इंजिनिअरने मार्केट रेडी का असावे?" असा प्रश्न पडला पाहिजे.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

काल एका मनुफॅक्चरींग इंजिनीअर शी गप्पा मारल्या. किती किती वेगळ्या दृष्टीकोनातून हे लोक वस्तू बघतात. एखादी "fine line" सुद्धा चुकत नाही त्यांच्या नजरेतून. मला हे सर्व शिकावेसे वाटले. गणितात त्रिमीती शेप डोक्यात (कल्पनेत) फिरवण्यास जे "spatial cognitive skill" लागते ते शिकण्यास खूप अवघड जात असे. तेच स्किल इथे आवश्यक आहे. पण फार आकर्षक ब्रॅन्च वाटली.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

Every time, every time it rains, it's gonna rain pennies from heaven
Don't you know every cloud contains lots of pennies from heaven
You'll find your fortune's fallin', baby, all over the town
Be sure, be sure that your umbrella is upside down

एखाद्या व्यक्तीला जग कसं दिसतं यात तिच्या व्यवसायाचा खूप मोठा वाटा असतो. हे माझं अगदी लाडकं विधान (कॉन्जंक्चर या अर्थी) आहे.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

********
It is better to have questions which don't have answers, than having answers which cannot be questioned.

वा! बहोत खूब!

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

Every time, every time it rains, it's gonna rain pennies from heaven
Don't you know every cloud contains lots of pennies from heaven
You'll find your fortune's fallin', baby, all over the town
Be sure, be sure that your umbrella is upside down

रोचक! इकॉनॉमिस्ट लोकांचे अनेक लेख वाचल्याने सहमतही आहे. (मी इकॉनॉमिस्ट नाही.)
या निमित्ताने कोणत्या व्यावसायिकाला जग कसे दिसते ते सांगितले गेल्यास मजा येईल.
उदा. डेंटिस्ट लोकांना भेटलेल्या माणसाचे आधी दात दिसतात (म्हणजे तिकडे लक्ष जातं) का? फायनॅन्शियल अ‍ॅनालिस्टला जग कसे दिसते? वगैरे.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

if all you have is a hammer, everything looks like a nail ... Smile

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

Every time, every time it rains, it's gonna rain pennies from heaven
Don't you know every cloud contains lots of pennies from heaven
You'll find your fortune's fallin', baby, all over the town
Be sure, be sure that your umbrella is upside down

आमच्याच घरातलं उदाहरणः पूर्वी मी काही टीनेजसुलभ उद्योग केले, की:
बाबा विचारे - "हे घडलंच कसं?" (कॉज-इफेक्ट, कारण तो फिजिसिस्ट आहे) आणि
आई विचारे - "असं किती वेळा घडलं?" (टेस्ट ऑफ सिग्निफिकन्स, कारण ती स्टॅटिस्टिशियन आहे)

विनोद सोडा, पण Joel Waldfogel या लेखकाचा द डेडवेट लॉस ऑफ क्रिसमस हा पेपर प्रसिद्ध आहे. भेटवस्तू देण्यापेक्षा नगद रक्कम देणं एफिशियंट आहे असं ते बाबाजी म्हणतात.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

********
It is better to have questions which don't have answers, than having answers which cannot be questioned.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

इतर संघटित व्यावसायिक क्षेत्राप्रमाणे (असंघटित असूनसुद्धा!) इंजिनिअरिंग क्षेत्रही तितक्याच प्रमाणात बदनाम झालेले आहे, हे नाकारता येत नाही. बांधकाम वा सिंचन घोटाळ्यातील लाचखोरीच्या प्रकरणात अडकलेल्या अधिकाऱ्यामध्ये इंजिनीअर्सची संख्या कदाचित जास्त असेल. त्यामुळे धागाकर्त्यांना अभिप्रेत असलेल्या इंजिनीअर्स संघटनेतून काहीही साध्य होणार नाही, असे मला वाटते. कारण डॉक्टर्सची IMA ही संघटना, चार्टर्ड अंकौंटंट्सची संघटना वा इतर व्यावसायिकांची संघटना एखाद्या ट्रेड युनियनप्रमाणे आपल्या सभासदांच्या पदरी काय पडते याचाच विचार करण्यात मश्गूल असतात व मग इतरांचे काहीही झाले तरी त्याचे त्यांना पर्वा नसते.
यातून मार्ग काढण्यासाठी इंजिनियरिंग डिग्रीच्या पहिल्या वर्षापासूनच त्यांच्यावरील सामाजिक जबाबदारीची, उत्तरदायित्वाची कल्पना देणे उचित ठरेल. इंजिनिअर्ससाठी असलेली (व आता धूळ खात पडलेली) आचारसंहितेचा (code of conduct) परिचय करून दिल्यास सामाजिक भान असलेले इंजिनिअर्स भविष्यकाळात तयार होतील.

अभियांत्रिकी हे विज्ञान-तंत्रज्ञान व समाज यांना जोडणारे एक महत्वाचे क्षेत्र आहे. इंजिनीअरची कळत न कळत केलेली एखादी क्षुल्लक चूकसुद्धा फार महागात पडते. त्यातून वित्तहानी, जीवीत हानी होऊ शकते. व संपूर्ण व्यवसाय बदनामीच्या फेऱ्यात अडकतो.

अभियांत्रिकी व समाज यातील दुवा शोधताना साहजिकच खालील काही प्रश्नांचा विचार करावा लागेलः

  • समाजाच्या उन्नतीसाठी अभियांत्रिकीचे योगदान काय असू शकेल?
  • एखाद्या विशिष्ट समस्येवर तातडीचे उपाय शोधण्यासाठी इंजिनिअर्स कशाप्रकारे मदत करू शकतील?
  • समस्यावर उपाय सुचविताना जुने तंत्रज्ञान व नवीन तंत्रज्ञान यांचा तौलनिक अभ्यास करून नेमकी माहिती पुरविणे शक्य होईल का?
  • इंजिनिअरिंगच्या आवाक्यात न आलेल्या समस्या कोणत्या आहेत?

ही यादी अशीच वाढविता येईल. हे प्रश्न केवळ इंजिनिअरिंग विषयक ध्येय – धोरणांशी संबंधित असून त्याच्याशी आपला संबंध नाही, ही पळवाट योग्य नाही. याचप्रमाणे इंजिनिअरिंगची गुणवत्ता कशी राखता येईल हा विचार कायमचे मनात घोळत असल्यास इंजिनिअर्स या समाजासाठी भरपूर काही करू शकतील असे मला वाटते.

या देशाच्या मातीशी बाधिलकी असणाऱ्यांनी मात्र पुन्हा एकदा आपण नेमके काय करत आहोत, काय करायला हवे होते, व काय केल्यास या समाजाचे ऋण फेडता येईल याचा विचार करून योग्य कृती केल्यास आपलाही समाज उन्नत स्थितीला नक्कीच पोचू शकेल.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0