क्षमा परमो धर्म: - राजा कुशनाभच्या मुलींची कथा


क्षमा दानं क्षमा सत्यं क्षमा यज्ञाश्च पुत्रिकाः I
क्षमा यशः क्षमा धर्मः क्षमया विष्ठितं जगत्II

(वाल्मीकि रामायण बाल कांड ३३/८)

क्षमा दान आहे, क्षमा सत्य आहे, क्षमा यज्ञ आहे, क्षमा यश आहे, क्षमा धर्म आहे. क्षमेवरच हे सर्व जगत् टिकून आहे."

रामधारी सिंह यांनी आपल्या कवितेत लिहिले आहे:


क्षमा शोभती उस भुजंग को
जिसके पास गरल हो
उसको क्या जो दंतहीन
विषरहित, विनीत, सरल हो।

क्षमा हे माणसाचे भूषण आहे. दुर्बल माणूस अन्याय सहन करतो, तो क्षमा करू शकत नाही. किंवा त्यांनी केलेल्या क्षमेला कोणी महत्व ही देत नाही. शक्तिशाली माणसाने दुर्बलांना क्षमा करावी हीच अपेक्षा. कारण क्रोधाग्नित कधी-कधी सर्वच नष्ट होते. जगाच्या कल्याणासाठी क्षमा करणे आवश्यक असते. म्हणूनच क्षमा धर्माच्या १० लक्षणां पैकी एक लक्षण आहे.

धर्मात्मा राजा कुशनाभच्या कन्या धर्मानुसार आचरण करणाऱ्या आणि तपोबलानी युक्त होत्या. तरी ही त्यांनी आपल्यावर अन्याय करणाऱ्या वायुदेवाला क्षमा केली. कारण त्यांनी वायुदेवाला श्राप दिला असता तर जगाचे संतुलन बिघडले असते. धर्मात्मा मुलींचे क्षमाशील आचरण पाहून महर्षि वाल्मीकिनी रामायणात राजा कुशनाभच्या मुलींचे गुणगान केले आहे.

सोन नदीच्या तीरावर असलेल्या महोदय या नगरात धर्मात्मा राजर्षि कुशनाभ राज्य करत होता. घृताची अप्सरे पासून त्याला १०० कन्यारत्न प्राप्त झाले. त्या मुली आपल्या पिता प्रमाणेच धर्म आणि सत्य मार्गावर चालणार्या होत्या. वयात आल्यावर त्या अप्सरे समान सुंदर दिसू लागल्या.

एकदा वायुदेवाने त्यांना पहिले. कामांध झालेल्या वायुदेवाने त्यांना म्हंटले, मुलीनो तुम्ही सर्व माझ्यासंगे स्वर्गात चला, माझ्या भार्या बना. स्वर्गात स्वर्गीय सुख भोगायला मिळेल. शिवाय तुमचे यौवन ही अक्षत राहिल. त्या मुलींने वायुदेवाला नम्रतापूर्वक म्हंटले, आम्ही राजा कुशनाभच्या कन्या आहोत. आमचे पिता जिवंत आहेत आणि आम्ही त्यांच्या आज्ञेत आहोत. अत: उचित हेच आहे, तुम्ही आमच्या पित्या जवळ जाऊन आमचा हात मागा, जर आमच्या पित्याने आमचा हात तुमच्या हातात दिला तर आम्ही तुमच्या होऊ.

कामांध माणसाची विवेक बुद्धी नष्ट झालेली असते. त्याला धर्म-अधर्म, उचित-अनुचित काहीच कळत नाही. या तुच्छ मानवीय मुलींची माझ्या इच्छेचा अनादर करण्याची हिम्मत झाली कशी झाली? वायुदेवाला वाटले त्यांच्या इच्छेचा अनादर करून मुलींनी त्यांचा अपमान केला आहे. वायुदेव क्रोधीत झाले. त्यांनी सर्व मुलीनां कुब्जा होण्याचा श्राप दिला.

त्या मुली तपोनिष्ठ होत्या, मनात आणले असते तर त्यांनी वायुदेवाला श्राप दिला असता. पण त्यांना वायुदेवावर क्रोध आला नाही. त्यांनी वायुदेवाला क्षमा केले. घरी जाऊन त्यांनी घडलेले सर्व प्रकार आपल्या पित्याला सांगितला. कुब्ज्या झालेल्या आपल्या मुलींना पाहून धर्मात्मा राजा कुशनाभला अत्यंत दुख झाले. तरी तो आपल्या मुलींना म्हणाला, क्षमाच मानवाचे आभूषण आहे, देवतांना ही दुष्कर अशी क्षमा तुम्ही, वायुदेवाला केली. असे करून तुम्ही कुळाच्या मर्यादेची रक्षा केली आहे.

पुढे त्या सर्व मुलींचे लग्न काम्पिल्या नगरीच्या महातेजस्वी राजा राजर्षि ब्रह्मदत्त सोबत झाले. लग्नाच्या वेळी राजाचा हात हातात घेताच त्या मुलीं पहिल्या सारख्या निरोगी आणि सुंदर झाल्या. इति.

field_vote: 
2.5
Your rating: None Average: 2.5 (2 votes)

प्रतिक्रिया

सुंदर!!
रामधारी सिंह यांची प्रतिभा तर तेजस्वी आहेच.
कथाही आवडली.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

उमगले स्वप्नांचे मर्म मला, ना हा परका ना अपुला
कोणी मृत्युलोकीचा योगी, अशीच लहर म्हणून आला
असाच पळभरासाठी टेकला, शेकत गर्भाची धुनी...

अशा शापित मुली ओळखायचा काही फंडा असतो काय ?

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

actions not reactions..!...!

अत: उचित हेच आहे, तुम्ही आमच्या पित्या जवळ जाऊन आमचा हात मागा, जर आमच्या पित्याने आमचा हात तुमच्या हातात दिला तर आम्ही तुमच्या होऊ.

संपूर्ण कथेत हे एकच विधान नॉर्मल, शास्त्रीय आहे. आणि हे देखिल आधुनिक सामाजिक संकेतांच्या निकषांवर त्याज्य आहे.
------------------------
पण क्षमा या मूल्याचे महत्त्व सांगणारे ललित म्हणून गोष्ट मस्त आहे.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

सही: पुरोगाम्यांना लॉजिक माफ असतं.

त्यात काय त्याज्य आहे? तत्कालीन समाजाच्या रूढीप्रमाणे तेच योग्य आहे. फार लांब कशाला जा, ग्रीक महाकाव्य ओडिसीमध्येही ओडिसिअसच्या बायकोशी (ओडिसिअसची ट्रोजन युद्धानंतरची घरवापसी न झाल्यामुळे) लग्न करायचे तर तिच्या बापाकडे जा असे ओडिसिअसचा मुलगाच दावेदारांना सांगत असतो. हेही जर विशेष वाटत नसेल तर समतेच्या नावाने कंठशोष करणार्‍या अथेन्समध्ये बायकांना शष्प अधिकार नव्हते आणि असमानता जोपासणार्‍या स्पार्टामध्ये बायकांना तुलनेने बरेच अधिकार होते.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

माहिष्मती साम्राज्यं अस्माकं अजेयं

स्पार्टामधे बायकांना काय काय अधिकार होते जे अथेन्स मधे न्हवते हे जाणून घ्यायचे आहे.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

actions not reactions..!...!

ही तुलना अथेन्सचा टॉप क्लास विरुद्ध स्पार्टाचा टॉप क्लास इतपतच मर्यादित आहे. त्या क्लासच्या खाली गेल्यास सगळीकडे घाणच घाण आहे. याच्यापुढे प्रतिसादातले प्रत्येक वाक्य त्या त्या शहरातील टॉप क्लासलाच लागू पडते. टॉप क्लास म्हणजे फक्त उच्चभ्रू नव्हे तर सिटिझन म्हणून मानण्यात आलेला सगळाच वर्ग होय.

स्पार्टामध्ये बायकांनी रांधावाढाउष्टीकाढा छाप कामे करणे अपेक्षित नव्हते. (कारण ती कामे करणारे नोकर होते) त्यांना लिखापढीचे शिक्षणही दिले जायचे. त्यांची ब्यूटी काँटेस्टही होत असे, शिवाय त्यांचे महिला ऑलिंपिक्सही होत असत. अथेन्समध्ये मात्र बायकांनी घरातच राहिले पाहिजे, बाईच्या जातीला काय करायचंय शिक्षण, इ.इ. प्रकार होता.

आता स्पार्टात असे असायचे कारण म्हणजे त्यांचे पुरुष कायम लढाईच्या तयारीतच असायचे. तोच त्यांचा फुलटाईम धंदा होता. त्यामुळे बायकांचे कार्यक्षेत्र आपसूकच विस्तारले अन प्रतिष्ठाही तेवढीच मिळाली.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

माहिष्मती साम्राज्यं अस्माकं अजेयं

ओके म्हणजे अथेनियन स्त्रियांना गृहकृत्य दक्ष होणे एवडेच टारगेट होते तर... त्यांना खलीसी बनायची परवानगी नसायची... हम्म.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

actions not reactions..!...!

खलीसी म्हणजे काय?

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

माहिष्मती साम्राज्यं अस्माकं अजेयं

जाउद्या मी फटकन टाइप करुन गेलो प्रकाशीत केले अन आता बुचही बसले... खलीसी एक एक स्त्रिपात्र आहे Games of Thrones टीवी शो मधले. तिच्याकडे सुपरनॅचर पावर असतात तरी तीचे बालपण अतिशय हालाखीत जाते. आग तिला जाळु शकत नाही ती ड्रेगॉन ची माता असते आणी बिफोर आय स्टार्ट साउंडीग चाय्ल्डीश लेत मी स्टॉप हीर.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

actions not reactions..!...!

खालेसी ही पदवी आहे. त्या पात्राचं नाव नाय. 'खाल'ची बायडी खालीसी

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

आधी रोटी खाएंगे, इंदिरा को जिताएंगे !

ती खलीसी ऑफ डोथ्राकी आहे हे मी वलारीन मधेही सामजावले असते पण प्रश्न इतरांना काय स्पष्टीकरण द्यायचे यामुळे आणी मुद्दा स्त्रियांना खलीसी बनायचा हक्क नसणे असा वाटला म्हणून पात्राचे नाव खलीसी म्हटले आहे... Smile खलीसीच्या जागी डायनेरीस टार्गेरिअन संबोधले असते तर अजुनच गोंधळ उडाला असता.. असो पीपल क्नो हु आलरेडी क्नो हर दॅट शी इज थे खलीसी फर्स्ट... कारण ती गुलाम बाइ बनुन रहायला नाकारते आणी कबिल्याची मालकी ताब्यात घेते. होप यु गॉट द काँटेक्स्ट.

टेक द खलीसी अ‍ॅस्ज सिम्बल ऑफ विमन एंपावर्मेंट समवन हु रिफ्युस टु बेंड अगेन्स्ट धी ट्रडीशन... म्हणून खलीसी हे एक पात्र आहे.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

actions not reactions..!...!

ओह अच्छा धन्यवाद!

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

माहिष्मती साम्राज्यं अस्माकं अजेयं

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

actions not reactions..!...!

ओह अच्छा ओके ओके. धन्यवाद जॅकी चॅन अन ढेरेशास्त्रीही.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

माहिष्मती साम्राज्यं अस्माकं अजेयं

धर्मात्मा राजा कुशनाभच्या कन्या धर्मानुसार आचरण करणाऱ्या आणि तपोबलानी युक्त होत्या. तरी ही त्यांनी आपल्यावर अन्याय करणाऱ्या वायुदेवाला क्षमा केली.
वायूला पश्चात्ताप झाला; किंवा त्याने माफी मागितली असा काही उल्लेख दिसला नाही.
उल्लेख राहून गेलाय की वायूने माफी मागितल्याचा मूळ कथेत उल्लेख नाहिये.
.
.
उद्या जर बॅट्याने मला माझ्या घरी दरोडा टाकला. घरात जे जे पैसा अडका वगैरे सापडते आहे ते लुटले;
वर जरा "मजा वाटते असं करायला " असं म्हणून माझे डोके फोडले;निव्वळ मनोरंजन म्हणून आणि मला लाथाडून तो जात असेल
तर पडल्या पडल्या मी म्हणालो "जा बॅट्या जा. केला मी तुला क्षमा." तर कसं वाटेल ?
.
.
मला वाटतं क्षमा नामक प्रकार लागू झालाच तर पुढील केस मध्ये लागू होउ शकतो :-
बॅट्याचे हे उद्योग सुरु असतानाच त्याला मी किंवा इतर कुणी खाडकन् ताब्यात घेतलं; हात पाय बांधले; आणि चांगला दम दिला.
त्यावेळी त्याला जर "जे केलय ते चूक केलय" ह्याची जाणीव झालेली आहे; असं मला वाटलं; त्यानं माफी मागितलीच(किम्वा
मागितली नाही तरीसुद्धा त्याला आपल्या उद्योगाचा पश्चात्तप झालाय आणि तो स्वतःहून शिक्षा भोगायला तयार आहे अशा वेळी)
तर मी फार तर माफी देइन; तेही माझं डिस्क्रिशन असेल. मी पुरेसा कन्विन्स झालो नसेन तर जमेल ती योग्य शिक्षा त्याला मिळावी अशी खबरदारी घेइन.
.
.
कारण त्यांनी वायुदेवाला श्राप दिला असता तर जगाचे संतुलन बिघडले असते.
पुरेशा लोकांना वेठिला धरल्यास आपल्या खूप काही सजा रद्द होउ शकतात; पापे धुतली जातात असा अर्थ होतो.
२००८ नंतरच्या आर्थिक मंदित काही कंपन्यांना अमेरिकन सरकारनं अस्सच बेल्-आउट प्याकेज दिलं "they are too big to fail" असं म्हणत.
त्या कंपन्या अपयशी ठरल्यास इतरही अनेकजण गोत्यात येतील असा विचार अमेरिकन सर्कारनं केला म्हणे.
थोडक्यात लोकांचे आपल्यात पुरेसे हितसंबंध गुंतवत गेलो; तर मोक्काट बनायचं लायसन मिळतं.
खूपशा राजकारणी आणि कित्येक उद्योगपतींना हे चांगलच समजतं.
(उदा :-
अरे अरे. त्या उद्योगसमूहाच्या मालकाला अटक झाली; तर शेअर्स कवडीमोल होतील; लाखो लोक बुडतील. त्यांचा काय गुन्हा आहे ?
त्यांना कशाला उगाच शिक्षा. त्यापेक्षा उद्योगपती जे करतोय ते त्याला बिनबोभात करु द्या. काय फार तर दोन चार निष्पाप लोकांना ठेचून/चिरडून मारेल.
पण आपल्या सगळ्यांच्या मालमत्तेहून दोन्-चार निष्पापांचा जीव मोठा लागून गेलाय का ?
आपण हजारो लाखो आहोत; म्हणून तर आपण जगण्यास योग्य आहोत.
आपल्यासाठी त्यांना विनाकारण मरावं लागलं तर हरकत काय आहे ?
"एकूणात" जास्त भलं होइल किनै समाजाचं ?
)
.
.
राजकारणी आणि उद्योगपती ही ठळक दिसू शकणारी उदाहरण्म म्हणून घेतलित.
इतरांमध्येही डामरत लोक असतीलच; ह्याची कल्पना आहे.
.
.
अवांतर :-
"डिस्क्रिशन " , "कन्विन्स " असे शब्द मराठी लिखाणात वापरण्याबद्दल खेद होतो. पण शुचि ऊर्फ अपुलीगपुली तैंचे प्रतिसाद वाचल्यानं असं होतं.
आधीच आमचं इंग्रजी कच्चं. ते प्रतिसाद वाचून मराठीही कच्चं व्हायला लागतं.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

--मनोबा
.
संगति जयाच्या खेळलो मी सदाहि | हाकेस तो आता ओ देत नाही
.
memories....often the marks people leave are scars

जर बॅटमॅननं डोकं फोडलं तर माफ करण्यासाठी मनोबा जिवंत तरी राहील का?

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

माहिष्मती साम्राज्यं अस्माकं अजेयं

अरे फक्त डोक्याचा, कपचा निघाला अन भळाभळा रक्त आलं अगदी मेंदू लोंबत कवटी फुटली नाही
आहाहा असं बोलायला काय मजा येते = ))

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

उमगले स्वप्नांचे मर्म मला, ना हा परका ना अपुला
कोणी मृत्युलोकीचा योगी, अशीच लहर म्हणून आला
असाच पळभरासाठी टेकला, शेकत गर्भाची धुनी...

मनोबानी बदलापुर बघितल्यापासुन ते स्वतः बदलले आहेत असं आता नमुद करतो... Wink त्यांचा प्रतिसाद बदलापुरची झलक साफ करतो.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

actions not reactions..!...!

हम्म, तुमच्या बोलण्यात बिंदू आहे खरा. डोकं फोडलं इतकं खरं, किती फुटलं हे या वाक्यरचनेवरून स्पष्ट होत नाही.

पण बॅटमॅननं डोकं फोडलं तर ते पूर्णच फुटणार ना. त्याचमुळे अंडरलाईन केलंय. साला आम्हीच आमचे कौशल्य अंडरसेल करतो.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

माहिष्मती साम्राज्यं अस्माकं अजेयं

पण शुचि ऊर्फ अपुलीगपुली तैंचे प्रतिसाद वाचल्यानं असं होतं.
आधीच आमचं इंग्रजी कच्चं. ते प्रतिसाद वाचून मराठीही कच्चं व्हायला लागतं.

= )) अरे आपण मारे भरात आलेलो असतो अन डोक्यात इंग्रजी शब्द आला की त्याचा समानार्थी मराठी शब्द शोधण्यातच तो भर ओसरतो. बरं परत तो प्रतिसाद वाचून मर्‍हाटीकरण करायचं म्हटलं तर क्वचित वाक्याचा सांगाडाच बदलावा लागतो.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

उमगले स्वप्नांचे मर्म मला, ना हा परका ना अपुला
कोणी मृत्युलोकीचा योगी, अशीच लहर म्हणून आला
असाच पळभरासाठी टेकला, शेकत गर्भाची धुनी...

रामधारी सिंह यांचा आपण उल्लेख केला आहेत, त्या अनुषंगाने -

जालावर भटकत असताना अतिशय गेय अशी एक कविता माझ्या वाचनात आली. वीररसाने ओथम्बलेली ही रचना हिंदीतील नामवंत कवी "रामधारी सिंह दिनकर" यांची असून खाली उधृत केलेली आहे.

अनाम ,नामवंत, अमर, लहान, थोर अशा स्वातंत्र्यवीरांना ही कविता अर्पण केलेली आहे.

पहीले कडवे चटका लावणारे आहे आणि ते वाचत असताना भगतसिंग, राजगुरु, चाफेकर बंधूंची आठवण झाल्याखेरीज रहात नाही.
"जो चढ़ गये पुण्यवेदी पर
लिए बिना गर्दन का मोल।" हे वाचतानाच काळजात चर्र होते.

दुसर्‍या कडव्यातील रुपक अप्रतिमच आहे. स्वातंत्र्यलढ्यातील सैनिक हे जणू प्रचंड वादळातदेखील आत्मबळावर जळत राहीलेले, प्रकाश देत राहीलेले असंख्य लहान लहान दीपच आहेत असे रूपक कवीने वापरले आहे. एका शब्दाचीही परतफेडीची अपेक्षा न ठेवता कर्तव्यपूर्ती करता करता, वादळाचा सामना करत जे विझून गेले आज त्यांचा जयजयकार करू यात अशा आशयाची ही कविता आहे.


कलम, आज उनकी जय बोल - रामधारी सिंह दिनकर


जली अस्थियां बारी-बारी
चिटकाई जिनमें चिंगारी,
जो चढ़ गये पुण्यवेदी पर
लिए बिना गर्दन का मोल।
कलम, आज उनकी जय बोल
.
जो अगणित लघु दीप हमारे
तूफानों में एक किनारे,
जल-जलाकर बुझ गए किसी दिन
मांगा नहीं स्नेह मुंह खोल।
कलम, आज उनकी जय बोल
.
पीकर जिनकी लाल शिखाएं
उगल रही सौ लपट दिशाएं,
जिनके सिंहनाद से सहमी
धरती रही अभी तक डोल।
कलम, आज उनकी जय बोल
.
अंधा चकाचौंध का मारा
क्या जाने इतिहास बेचारा,
साखी हैं उनकी महिमा के
सूर्य चन्द्र भूगोल खगोल।
कलम, आज उनकी जय बोल
  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

उमगले स्वप्नांचे मर्म मला, ना हा परका ना अपुला
कोणी मृत्युलोकीचा योगी, अशीच लहर म्हणून आला
असाच पळभरासाठी टेकला, शेकत गर्भाची धुनी...