लेख आवडला!
शिवाय ननि म्हणतात तसही वाटतच.
एकूण विसाव्या शतकातलं परिचित साहित्य वगैरे असू दे नैतर मागील वीसेक वर्षात अमेरिकेत गेलेल्या पब्लिकचे विविध ब्लॉग.
"रम्य" वगैरे आटह्वणी. "संथ" , "निवांत" आणि "प्रसन्न" हे फक्त गावच असतं.
हे गाव कोकण किंवा गोव्यातच असतं.(फार्फार तर पुणे -कोल्हापूर मधला समृद्ध कृषी असलेला, हरित पश्चिम महाराष्ट्र)
ह्यांच्या गावतही लोकं अगदि उपाशी वगैरे नसतात.
.
.
.
च्यामारी, आम्ही गावाकडे पाहतो तेव्हा कमालीचं दारिद्र्य आणि १९८० च्या दशकात विलास रकटे असलेले दोन चित्रपट "निखारे" आणि "प्रतिकार" ह्याच्यात दाखवलय तसलच गाव दिसतं राव.
व्यवस्थापकः या ठिकाणी दिलेल्या प्रतिसादावर सुरू झालेली ही उपचर्चा मुळ धाग्यावर अवांतर/समांतर असल्याने वेगळी काढत आहोत. इथे यावर अधिक विस्ताराने चर्चा करता येईल