ग्रामीण भागाचे लेखनातील चित्रण आणि वास्तव
लेख आवडला!
शिवाय ननि म्हणतात तसही वाटतच.
एकूण विसाव्या शतकातलं परिचित साहित्य वगैरे असू दे नैतर मागील वीसेक वर्षात अमेरिकेत गेलेल्या पब्लिकचे विविध ब्लॉग.
"रम्य" वगैरे आटह्वणी. "संथ" , "निवांत" आणि "प्रसन्न" हे फक्त गावच असतं.
हे गाव कोकण किंवा गोव्यातच असतं.(फार्फार तर पुणे -कोल्हापूर मधला समृद्ध कृषी असलेला, हरित पश्चिम महाराष्ट्र)
ह्यांच्या गावतही लोकं अगदि उपाशी वगैरे नसतात.
.
.
.
च्यामारी, आम्ही गावाकडे पाहतो तेव्हा कमालीचं दारिद्र्य आणि १९८० च्या दशकात विलास रकटे असलेले दोन चित्रपट "निखारे" आणि "प्रतिकार" ह्याच्यात दाखवलय तसलच गाव दिसतं राव.
व्यवस्थापकः या ठिकाणी दिलेल्या प्रतिसादावर सुरू झालेली ही उपचर्चा मुळ धाग्यावर अवांतर/समांतर असल्याने वेगळी काढत आहोत. इथे यावर अधिक विस्ताराने चर्चा करता येईल
Taxonomy upgrade extras
कोंकणस्थ ब्राह्मणांना काही
कोंकणस्थ ब्राह्मणांना काही म्हणा.. काही फरक पडत नाही.
पण आमच्या कोंकणास काही म्हणू नका हो.
नायतर आम्हाला मुंबई ठाणेसकट कोंकण वेगळा काढून द्या. आमचे आम्ही पाहतो. तुम्ही जा तिकडे घाटावर.
द्ळिद्र कोंकणातही आहे.. पण सुखही आहे. तेच अन्यत्र सापडत नाही लोकांना. ती कोंकणाची खासियत.
एकदम व्हॅलीड मत
एकदम व्हॅलीड मत आहे.
-------------------
जेते इतिहास आपल्यासारखा लिहितात असे मानले तरी तो काय साराच टाकाऊ नसतो. कोकणस्थांनी प्रामाणिकपणे आपल्या गावांचे वर्णन केले नसते तर कोकणस्थ वाचकांनीच त्यांना पहिले हाड थू केले असते.
---------------
इतके झिडकारण्याची वृत्ती असेल वेगळे कोण राज्य समर्थनीय आहे.
कोंकणस्थ ब्राह्मणांना काही
कोंकणस्थ ब्राह्मणांना काही म्हणा.. काही फरक पडत नाही.
होलियर दॅन दाऊ वृत्तीचा आहे म्हणून सोंग आणतोय म्हणून आपल्यावर टिका होईल म्हणून शाकाहारी जसा मांसाहार्याना "समान" म्हणू देतो तसलं हे अल्ट्रा डिफेन्सीव विधान आहे. कोणी कितीही काहीही कशीही टिका करा, आम्ही शांतपणे ऐकून घेऊ. धन्य.
काहीही म्हणा? का? कै फरक पडत नै?
-----------------------------------
अर्थातच इथे फक्त "ते महत्त्वाचं नाही" एवढंच म्हणायचं होतं हे कळतंय. पण तरीही.
कोकणात सुख आहे आणि अन्यत्र
कोकणात सुख आहे आणि अन्यत्र नाही म्हणणं म्हणजे हॅ हॅ हॅ.
कोकणची स्वतःची वैशिष्ट्ये आहेत हे अमान्य कोणीच करत नाहीये. पण अन्यत्र सुख नसेल तर कोकण सोडून पेशवे घाटावर आलेच नसते, नै ;)
कोकणाला स्वतःचे लेखक, कवी, इ. लै भेटले अन्य प्रदेशांच्या तुलनेत. दुसरं काही कारण नाहीये.
तसं नाही. मराठवाड्यावर मी
तसं नाही. मराठवाड्यावर मी ठामपणे कॉमेंट करु शकत नाही, पण कोंकणात आणि कोंकणाबाहेर एकसमान आणि दीर्घकाळ राहण्यामुळे इतकं नक्की सांगतो की कोंकणात एक सरासरी समाधान आहे लोकांमधे ते अन्यत्र दिसलं नाही. परसाच्या आसपास येईल तेवढा लाल भात आणि नाचणीवर ढेकर देऊन, बनियन पोटाच्यावर सरकवून वाडीत शांत आरामखुर्चीत बसणे अन आहे त्यात समाधानी असणे ही संकुचित वृत्ती असेलही, पण कोंकणात अतिश्रीमंत जसे नव्हते तसेच भिकारीही नव्हते. एका तपाहून जास्त काळ तिथे काढला आणि नंतर तितकाच देशावर.
कोंकणात एक सरासरी समाधान आहे
कोंकणात एक सरासरी समाधान आहे लोकांमधे ते अन्यत्र दिसलं नाही
अर्थातच हे तुमच्यासोबत झालं आहे. मी ती वाक्यरचना बदलतो.
कोंकणात एक सरासरी समाधान आहे लोकांमधे ते अन्यत्र नाही
असहमत.
भातशेती आणि मासे, इ, इ ला कमी कष्ट लागतात का म्हणून ते लोक जास्त निवांत "आणि म्हणून समाधानी" वाटतात का हे मला माहित नाही पण सो फार मी जितकी ग्रामीण, सेमी-ग्रामिण एरीया पाहिला आहे, कोकणच्या लोकांत विशेष समाधान निदर्शक काही दिसले नाही. उलट उलटेच दिसले. पण माझी इंटरअॅक्शन खूपच लिमिटेड होती. पण मनात प्रतिमा तशी नाही हे नोंदवावेसे वाटले.
पेशवे या शब्दाला विरूद्ध शब्द
पेशवे या शब्दाला विरूद्ध शब्द म्हणून गैरपेशवे शब्द वापरतो. आज किती मराठी गैरपेशवे कोकणात (ममईला) जातात? उगाच नको ती तुलना नको. माणूस कुठेही जावो, त्याला आपला प्रांत, जात, धर्म, वेशभूषा, अन्न, निसर्ग, भाषा, इ इ हजारो गोष्टींबद्दल खूप ओलावा असतो. त्याची खिल्ली उडवणं चूक आहे. उकडीचे मोदक आणि १५०,००० यू एस डी ची नोकरी यांच्यात कैतरी एक निवड आणि नंतर दुसर्याला मिस करू नको हे काय विचित अपेक्षिणे आहे? आणि जास्त कोकणस्थ लेखक झाले यात त्या लेखकांचा, लोकांचा आणि तिथले निसर्ग सौंदय गायले जायचा संबंध काय?
-------------------
बाय द वे, तिथले लोक आणि निसर्गाला मिळणारी तुलनात्मक अनावश्यक जास्त प्रसिद्धी या अंगाने जात तुला कोकणस्थ लोक खडूस असतात आणि म्हणून त्यांना सुंदर निसर्ग मिळायला नै पाहिजे होता, किंवा आपलाच निसर्ग सुंदर म्हणतात (असं दुरान्वयेही सुचित करणारं तू काही लिहिलेलं नाहीस, उगाच गैरसमज नको) अशा काही भावना असतील तर जरूर लिही. त्यात जो काही युक्तिवाद आहे तो मी शक्य तितक्या सिंपथीने वाचेन.
कोकण आणि कोकणस्थ या
कोकण आणि कोकणस्थ या दोहोंबद्दलही माझा आकस नाही. माझी आत्या रत्नागिरीस कैक वर्षे होती आणि तिथे मी अनेकवेळेस राहिलेलो आहे.
माझा मुद्दा फक्त इतकाच होता की कोकण अन्य महाराष्ट्रापेक्षा समहाउ जास्त युनिक आहे अशी प्रतिमा आज महाराष्ट्रापुढे आहे ती ऑब्जेक्टिव्हलि खरी नाही. प्रत्येक प्रदेश युनिकच असतो. पण कोकणातून कैक कोकणस्थ पुण्यात आले. पेशवाई आणि त्यानंतरही महाराष्ट्रात ते अग्रेसर झाले. त्यामुळे त्यांच्या जाणिवांना समाजात जास्त अग्रक्रम मिळाला. हे साहजिकच आहे, त्यात चूक काहीच नाही.
त्यामुळे झालं असं की बाकीच्या प्रदेशांना त्यांचा 'ड्यू' मिळाला नाही. याला उपाय म्हणजे आत्ताच्या लिट्रेचरवर टीका नव्हे, तर अन्य प्रदेशांनी अजून जास्त लेखन करणे हा आहे. सो दॅट महाराष्ट्राबद्दलची प्रतिमा अजून व्यापक होईल.
बाकी- तो मोदक अन दीड लाख डॉलरवाला प्रतिसाद माझा नव्हता.
मोदक काय
मोदक काय, गणपती काय.
अरे?
गणपतीचा साक्षात बाप मराठवाड्यात उपस्थित आहे.
बारा ज्योतिर्लिंगांपैकी कितीतरी मराठवाड्यात आहेत.
"मराठी अस्मिता " वगैरे मध्ये जे "जय भवानी..." येतं ना; त्यातली आई भवानी तुळजापुरास आहे.
कोकणात नै.
आमचे देव जास्त पावरफुल आहेत.
कोकणवाले आपल्या देवाला उग्गाच पुढे करुन र्हायलेत.
महाराष्ट्राचं राजकीय केंद्र
महाराष्ट्राचं राजकीय केंद्र गेल्या हजारो वर्षांपासून पश्चिमेला सरकतंय अशी आपली एक लाडकी थेरी आहे.
सर्वांत अगोदरचं केंद्र म्ह. कृष्णाची सासुरवाडी- विदर्भ.
पुढे बुद्धकाळी-मौर्यकाळी अश्मक- ऊर्फ मराठवाडा. हे केंद्र लय वर्षे टिकलं. तेव्हापासून ते शिवकाळापर्यंत.
शिवकाळापासून ब्रिटिशकाळः पश्चिम महाराष्ट्र.
ब्रिटिशकाळ ते पुढे: मुंबै.
नेक्ष्ट इज व्हॉट?
राजकीयच नै सोबत सांस्कृतिक
राजकीयच नै सोबत सांस्कृतिक भाषा वगैरे सगळं कस येतच ओघान ?
कारण राजकीय नेतृत्वच बाकीच्या सगळ्या गोष्टी डिक्टेट करत असतं- तो एलीट क्लास सर्व 'टेस्ट' घडवत असतो. यादव-महानुभाव काळातली साहित्यिक मराठी ही मराठवाड्याकडची होती. पुढे शिवशाही-पेशवाई काळात हे केंद्र प.म. मध्ये शिरले. पेशवाईत पुण्यात शिफ्ट झाले अन ब्रिटिशांनीही तेच कायम ठेवले, आजतागायत तिथेच आहे. साहेब नस्ता तर महाराष्ट्राची राजधानी पुणेच झाली असती.
कोंकण-महाराष्ट्र
खरं म्हणजे, कोंकण हा महाराष्ट्राचा भाग नंतरच झाला. मूळ "महाराष्ट्रा"ची सीमा सह्याद्रीपाशीच संपते आणि घाटमाथ्यानंतर थेट समुद्रापर्यंतची ती अरुंद कोंकणपट्टी.
म्हणूनच तर आजदेखिल "पश्चिम महाराष्ट्र" म्हणताना त्याच्याही पश्चिमेला असलेला कोंकणप्रांत त्यात जमेस धरला जात नाही. पश्चिम महाराष्ट्राची सीमा सह्यादीपाशीच थांबते.
माझ्या अल्प माहितीनुसार, देवगिरीच्या यादवांची एक शाखा महिकावतीस (केळवे-माहिम) येथे राज्य स्थापून राहिली तेव्हापासून कोंकणाचे "महाराष्ट्री"करण सुरू झाले.
आजच्या घडीला उत्तर कोंकण प्रांत (ठाणे-रायगड-रत्नागिरी) हा (भाषिक दृष्ट्या) पूर्णपणे "महाराष्टाळ"लेला आहे. तर तळकोंकण (सिंधुदुर्ग) हा (भाषिक दृष्ट्या) कोंकणीशी इमान राखून आहे.
साफ असहमत.
कोकणचे महाराष्ट्रीकरण इ. म्हणताना त्याची एक वेगळी आयडेंटिटी गृहीत धरण्यात आलेली आहे. एसेम कत्र्यांनी कोकणी ही वेगळी भाषा असल्याचे सिद्ध केले, कोकणी चळवळीही अन्य लोकांनी बर्याच राबवल्या. त्यामुळे ते एक पोलिटिकल स्टेटमेंट आहे. एकदा राजकीय अस्तित्वासाठी लढायचे म्हटले की भाषिक, सांस्कृतिक, सामाजिक हे सर्वच अॅस्पेक्ट्स त्यात वापरले जातात.
कोकणी ही सध्या एक वेगळी भाषा आहे असे लिंग्विस्ट म्हणतात खरे. पण हे एक अर्ग्युमेंट कोकणप्रांताच्या तथाकथित वेगळ्या आयडेंटिटीला सिद्ध करण्यास पुरेसे आहे काय?
शिवाय केळवे-माहीम इ. ठिकाणचा राजा यादव घराण्यातला नव्हता. मराठीतला इ.स. १०१२ सालचा महाराष्ट्रात सापडलेला सर्वांत जुना शिलालेखही कोकणात रायगड जिल्ह्यात सापडला, दिवेआगरचा इ.स. १००० सालच्या आसपासचा ताम्रपटही मराठीतच आहे. त्यामुळे यादवांनी याचे महाराष्ट्रीकरण केले इ.इ. म्हणण्यात काही अर्थ नाही. असला लिंग्विस्टिक इंपीरियलिझम जुन्या काळात भारतात कधीच नव्हता. ती युरोपियन विचारांची देणगी आहे. यादवांचे 'महाराष्ट्रा'तले शिलालेख मराठीत, तर 'कर्नाटका'तले कन्नडमध्ये असत. रोमन साम्राज्यागत ऑस्कन, उम्ब्रियन, इ. भाषांना पूर्णपणे गिळंकृत करून लॅटिन एके लॅटिन असा प्रकार भारतात कधीच नव्हता. याबद्दल शेल्डन पोलॉकचे विचार मुळातूनच वाचण्यासारखे आहेत.
अन तळकोकण भाग हा कोकणीशी इमान राखून आहे हे कोकणीची गोवाकेंद्रित व्याख्या केल्यावर (भौगोलिक सान्निध्यामुळे इ.इ.) स्वयंस्पष्टच होत नाही काय? ते एक असो. परंतु या भागाचे महाराष्ट्राशी, मराठी स्फीअर ऑफ इन्फ्ल्युअन्सशी काहीच नाते नाही/इन्सिग्निफिकंट नाते आहे हा टोन तर्कदुष्ट आहे.
कोकणचे महाराष्ट्रीकरण ही संज्ञा सद्यकालीन चष्म्यातून जुन्या वस्तुस्थितीकडे पाहिल्यामुळे निर्माण झालेली आहे. अनेक सरसकट गॄहीतके लावल्याने त्या संज्ञेला माझा आक्षेप आहे. असो.
तरी आजकाल
तरी आजकाल अनास्पुरे, रितेश देशमुख वगैरे मंडळींमुळे मराठवाडा थोडा तरी दिसतो. तमाशाबिमाशाच्या चित्रपटात कोल्हापूर, सातारा, सांगलीशिवाय पान हालत नाही. मात्र आमचे दादा कोंडके गेल्यापास्नं पश्चिम महाराष्ट्राचा (ग्रामीण पुणे, अहमदनगर वगैरे) अनुशेष वाढला आहे. एखादा टिंग्या वगैरे चित्रपट येतो तो पण रडका, कलात्मक वगैरे.
सहमत. विदिन महाराष्ट्र सुद्धा
सहमत. विदिन महाराष्ट्र सुद्धा स्टेरिओटैप फिक्स पडलेले आहेत. त्यात मराठवाड-विदर्भ आत्ता आत्ता धड दिसू लागलेत नीट. त्यांचा पुरेसा परिचय होणार, मग एखादा स्टेरिओटैप पडणार अन मग कोणीतरी तो भंगणार..मुळात स्टेरिओटैप असणं हेच परिचयाचं मापन आहे. परिचय नै तर स्टेरिओटैप येणार तरी कुठून?
निसर्गसौंदर्याच्या बाबतीत
निसर्गसौंदर्याच्या बाबतीत कोकण यूनिकच आहे. टोटली यूनिक आहे.
--------------
पेशवे किंवा अजून कोणी कुठे आल्याने कोकणाचं काही मार्केटींग नै झालं. तिथली लँडस्केप भिन्न आहे अन्य महाराष्ट्रापेक्षा. आणि सुंदर पण आहे. समुद्र, उंच डोंगरांच्या रांगा, वेगळा आहार, पिके, इ इ इ . बाकी सारे महाराष्ट्राचे परिसर समान आहेत.
नैतर काय
"खूप वर्ष झाली ; मॉल्स पाहिले; भौतिक सुखं मिळाली पण पुन्हा उकडीचे मोदक मिळाले नैत " असलं कैतरी अमेरिकन पी आय ओ च्या ब्लॉगवर पाहतो नेहमीच.
जीव तळमळतो वगैरे.
ढेकणीच्या आम्ही इथेच असूनही खाल्ले नाहित की.
काही जीव वगैरे तळमळायची गरज नै.
फार तलमळ मळमळ असेल तर ये इकडं आणि गीळ हवे तेवढे; नैतर घे उकडून स्वतःला.
आणि तसेही खान्देशी झणझणीत किम्वा इतर काही चवी असतात हे ह्या कोकणस्थी ढोल ताश्यात ऐकूच जात नै.
"वा. वा.
काय तो आमचा कोकण.
वावा. काय ते आमचं जंगल.
कित्ती छान ते.
आम्ही डोंगरावर कसे राहयचो.
माकडासारखे झाडाला लटकत सहकुटुंब कसे टेक्डीच्या वरपर्यंत कसे जायचो.
काय लाइफ होती राव ती .
हाड थू ह्या लाइफच्या.
सालं वरच्या मजल्यांवर जायला लिफ्ट वापरतो. पण साली मजाच नै.
( माकडासारखा लटकून पाहिलच आहेस, आता जरा पालीसारखा सरपटात वगैरे जाण्याचा प्रयत्न कर की लेका.)
माझा कोकण काय छान.
अमेरिका किती घाण.
"
हे सगळं अम्रिकेत धा धा वर्ष बसून.
हे बरय साला.
अरे बाबा.. त्यात मोदक मिळत
अरे बाबा.. त्यात मोदक मिळत नाहीत हा पॉईन्ट नसतोच मुख्य हायलाईट.. भौतिक सुखे मिळाली हा मुख्य हायलाईट असतो.. (बहुतांशी तिकडे मोदक मिळत नाहीत हेही सत्य नसतं.. फक्त ते गणपतीपुळ्याच्या भटजींच्या घरी शेणाने सारवलेल्या जमिनीवर इ इ इ नसतात हे दु:ख म्हणायचे.)
आता हल्लीच्या आपल्या यशस्वी आयुष्याचे वर्णन करताना स्टारबक्स किंवा तत्सम कॉफीस्थाने, पिझ्झा आदिची तारांकित ठिकाणे, उंची शँपेन यांचे उल्लेख करुन त्या तुलनेत कॉलेजच्या बाहेरची कटिंग चहा, ट्रेकवरचा झुणका अन (शिळी) भाकरी, कोकम सरबत आदिची महती सांगायची इतकेच. (खरे म्हणजे उलटे ;-) )
आणि तेव्हाची सायकल सफर आणि
आणि तेव्हाची सायकल सफर आणि अत्ताची जीम मधे जाऊन करावी लागणारी 'सायकलींग' .... हे ही!
(च्यायला अडवलं कोणी आहे ... जा ना सायकलवर आजही, कर सायकल सफरी ... कशाला नसती रडरड... असले नी अश्या रडरडीचे ढीगानी फॉरवर्ड्स येतात तेव्हा चिडचीड होते - पण दुर्लक्ष करायला शिकल्यापासून आनंद आहे)
नक्को नक्को गवी (थालपीठ
नक्को नक्को गवी ;)
(थालपीठ हरवून बसलोय म्हणायचं आणि पुढच्या क्षणाला त्या ५ स्टार हाटेलतल्या डायनिंग टेबलाचे नी त्यावरच्या काँटीनेंटल डिशेसचे फोटो फेसबूक वर शेअर करायचे..नाहितर ते फायस्टार हॉटेल्च्या सांडसा पर्यंत जाणारे गुगल मॅप शेअर करायचे ..शेवटी मी कसं 'ळॅवीश' लाइफ जगतोय ह्याचं प्रदर्शन करायचं - हिप्पोकार्टे साले)
वेल, असं म्हणणं दुर्दैवी
वेल, असं म्हणणं दुर्दैवी वाटलं. याचं कारण -
१. अगदी काही क्लालिटेटिव निकष काढले तरी कोकण इतर महाराष्ट्रापेक्षा खूप जास्त निसर्ग सौंदर्य असलेला निघण्याची प्रचंड संभावना आहे. (मला आहे असेच म्हणायचे आहे पण त्या वरचढ ब्राह्मणांनी केलेल्या इमेज मेकिंगचा बळी नाही आणि आय वान्ट टू बी फेअर म्हणून संभावना वैगेरे).
२. कोकणस्थ ब्राह्मण कितीही वरचढ असेल तरी घाणेरडा निसर्ग सुंदर म्हणून सेल करू शकत नाहीत.
३. माझ्या निरीक्षणाप्रमाणे ते स्वतः सोडले तर उर्वरित जवळजवळ सारेच मराठी लोक त्यांच्यावर खार खाऊन असतात. सबब त्यांचं कोणतं म्हणणं लोकांनी स्वीकारलं असलं तर त्यात मेरीट असायला पाहिजे.
४. मुंबई रग्गड श्रीमंत असूनही कोकण आजही भिकार आहे. म्हणजे तिथल्या जाणिवांना अग्रक्रम मिळालेला नाही.
-------------------
सबब, व्यक्तिश मला वाटते कि कोकण (जास्त) सुंदर (मंजे ते पॅस्टोरल ब्यूटी, इ इ ) आहे ही मेरिट बेसड फॅक्ट आहे.
-----------------
याचा अर्थ लातूरच्या गावांचे सौंदर्य साहित्यात येऊच नये असा होत नाही इतकीच खंत मांडायची होती. मी राहिलेले गाव अप्रतिम सुंदर होते (आता वाट लागलेली आहे).
export
export होत राहिली लोकं.
import झाली नाहित फारशी.
त्यामुळं गुदमरल्यासारखं वाटलं नसावं.
मुंबैचं तेवढं उलट आहे. फक्त import-incoming सुरुये म्हणून बोंबललं म्याटर.
(आज मुंबैची उपनगरं वगैरे असणार्या जागा पूर्वी स्वतंत्र गावं होती.
चांगली कोकण स्टाइल सुरेख, निवांत सुशेगाद होती असं ऐकलय.
मुंबैच्या कोलाहलानं सगळ्यांनाच गिळलं.)
आमच्ं नाशिकही फार सुंदर हो...
आमच्ं नाशिकही फार सुंदर हो... :)
नाशकाहून त्रबंकेश्वरास जाताना वाटेतला निसर्ग - वा वा, पावसाळ्यात असे होते की कूठे कूठे थांबावे... (आर्थात बर्याच ठिकाणी शहर अतिक्रमण करतय ह्या निसर्गात). आणि हवमान ही खासच हो... अजून तरी नाशकात आय.टी. ची लागण पसरली नाहीये... नाहीतर त्याचंही पुणं होण्यास वेळ लागायचा नाही...
कोकण शत्प्रतिशत भारी आहे
कोकण शत्प्रतिशत भारी आहे मराठवाडा, खानदेश, विदर्भ यासगळ्यांपेक्षा. अगदी पुण्यापेक्षा भारी म्हटलं तरी चालेल.
एकदम मनातलं बोल्लात हो. रत्नागिरिस, चिपळूणात, खेड मधे, कुडाळ मधे काही दिवस आजोळी मजेत गेलेले आहेत. त्याच्या सुमधुर आठवणी आहेत. त्यामुळे कोकणाबद्दल खास जागा आहे. पावसला, पुळ्याला, लांज्याच्या देवीला (कालभैरव योगेश्वरी) सुद्धा गेलेलो आहे अनेकदा. लई मंजे लई मजा.
रविंद्र पिंगे उत्कट पणे लिहायचे कोकणाबद्दल.
+१
कोकण अतिशय सुंदर आहे.
कोकणातून देशावर येताना हिरव्याकंच बनातून नी डोकावणार्या लाल कौलारू घरांतून अचानक रखरखीत भुभाग, भरपूर प्लास्टिकचा कचरा, खोपटी नी त्यावर चक्क पत्रे, बटबटीत जाहिराती, सांडपाणी वगैरे (झाडीअभावी लख्खपणे) दिसू लागतं - डोळ्यांना चांगलंच खुपू लागतं. आणि समुद्र!! त्याची सर बाकी महाराष्ट्रातील कशालाच येऊ शकत नाही
महाराष्ट्रात मी जितका फिरलोय त्यात तरी कोकणाच्या सौदर्याला तोडीस तोड काहि मिळालं नाही
अन्यत्र मी बघितलेल्यापैकी हिरवाईत उत्तर बंगाल, कोस्टल कर्नाटक, कोस्टल दक्षिण तमिळनाडू व अर्थात गोवा भाग कोकणास तोडीस तोड वाटला. केरळच्या सौंदर्याची प्रत नी प्रकार वेगळा आहे म्हणून तुलना टाळतोय
माघार आणि माफी
विशुद्ध चेष्टा म्हणून "खुंदल खुंदल के " दंगा घालित होतो.
"खूप वर्ष झाली ; मॉल्स पाहिले; भौतिक सुखं मिळाली पण पुन्हा उकडीचे मोदक मिळाले नैत "
ह्या वाक्यानं सुरु होणारा प्रतिसाद काही अमेरिकेत स्थिरस्थावर झालेल्या व कोकणची नॉस्टॅल्जिया स्टाइल आठवण काढणार्या ब्लॉगर्सची चेष्टा म्हणून लिहिला.
म्याटर थट्टेत अहए, मस्करीत आहे; तोवर थांबतोय.
चर्चेत भाग घेतलेल्यांचे मनःपूर्वक आभार.
तुमची चर्चा सुरु राहू द्यात हवी तर, मी फारसा मधे पडणार नै.
.
.
शुद्ध चेष्टा करण्याचा प्रयत्न होता. (हिंदित सांगायचे तर "मैने चेश्टा करने की चेश्टा की है ")
कोकणप्रेमींना सॉरी म्हणतो.
@परदेशी
नक्की काय प्रॉब्लेम आहे? हॉ?
- हेच की हे लोक बालपणीचा काळ सुखाचा म्हणून रडतात आणि पोराबाळांना इंडियात आणायला मात्र कांकूं करतात?
- प्रत्यक्ष भेटणं, लोकांना वेळ देणं हेच सोशल मिडियापेक्षा कसं खूप महत्त्वाचं आहे हा संदेश फेसबुक,व्हॉट्सॅप्वर टाकतात?
- भारतातल्या गटाराच्या कडेला असलेल्या भजीच्या गाडीचं नाव घेऊन उसासे टाकतात आणि जमिनीला हात लागला तर लगेच हात मात्र हँड सॅनिटायझरने धुवडतात?
- 'सिंगल स्क्रीन थेटर बाकी सब खेटर' हे घोषवाक्य धा धा डालराचं तिकिट काढून सिनेमे बघताना आरडून ओरडून सांगतात?
काय आहे, की - आम्ही पूर्वी निवडुंगावरसुधा कसे आनंदाने बसायचो हे सांगायचं असेल तर सध्या ढुंगणाखाली मऊसूत लेदर काऊच पाहिजेच!
त्याशिवाय मजा नाही बाबा! चालायचंच!
शेवटी माँटी म्हणालेच आहेत -
तुमचं म्हणणं अगदी खरय अस्वल,
तुमचं म्हणणं अगदी खरय अस्वल, परदेशस्थांनी त्यांच्या सुधारलेल्या रहाणीमानाबद्दल एक तर अपोलोजेटिक तरी रहायला हवं नाहीतर देशावरच्या भूतकाळाबद्दल उदासिन. साले दोन्ही करत नाहीत. frailty of human nature न काय! पण ही frailty of human nature अन्य कोणी दाखवली तर एकवेळ चालेल पण परदेशस्थांनी अज्जिबात दाखवू नये.
पटतय आपलं मह्णणा.
एखादे गाव सुंदर वाटावे यासाठी
एखादे गाव सुंदर वाटावे यासाठी ते फक्त निसर्गरम्य असुन चालत नाही ,क्लायमेटचाही परसेप्शनवर प्रभाव पडतो.
कोकण निसर्गरम्य आहे परंतु तेथील क्लायमेट दमट व रोगट आहे ,हवेतला सततचा कोंदट साचलेपणा, त्यामुळे आलेले डास चिलटे माश्या, पाण्याची मातकट चव, उंच झाडांच्या पडलेल्या शेवाळी सावल्या... यामुळे कोकण भकास वाटू शकते,
याऊलट पश्चिम महाराष्ट्राचा सह्याद्रीच्या पायथ्याकडचा व घाटमाथ्यावरचा भाग कोकणाइतका थ्रुआऊट निसर्गरम्य नसला तरीही, आल्हाददायक हवा, मॉडरेट ह्युमिडीटी ,मोजका पाऊस, उंचावर असल्याने(AVG 600 M )हवेचा हलकेपणा, कोरडी हवा असल्याने संसर्गजन्य रोगांचे कमी असलेले प्रमाण हे फायदे पश्चिम महाराष्ट्राला मिळतात.
तुलनेने मराठवाड्यात व विदर्भात अत्यंत कोरडे विषम हवामान ,निसर्गारम्यतेची वानवा यामुळे तेथील गावे तितकिशी रम्य कुणालाच वाटत नाहीत, अगदी तिथल्या लोकांनाही. ऑन एव्हरेज पश्चीम पश्चीम महाराष्ट्रात रम्य ग्रामिण जग आहे.
तुलनेने मराठवाड्यात व
तुलनेने मराठवाड्यात व विदर्भात अत्यंत कोरडे विषम हवामान ,निसर्गारम्यतेची वानवा यामुळे तेथील गावे तितकिशी रम्य कुणालाच वाटत नाहीत, अगदी तिथल्या लोकांनाही.
हे काहीही अगदी. मराठवाड्यात खूप रम्य गावे आहेत. पुण्याच्या पत्रकारांनी दुष्काळात येऊन फटू काढले मंजे तुम्ही म्हणता तसं होत नाही. आणि मराठवाड्याच्या तुलनेत कोकणचं "हवामान" निव्वळ फालतू आहे.
-----------------
बाय द वे , हे घाट आणि कोकणी लोकांचं भांडण पाहून कळत नै कि सह्याद्रि कोकणात आहे कि नाही. नक्की सीमा काय आहे? नाशिक, अहमदनगर, पुणे, सातारा, सांगली, कोल्हापूर या जिल्ह्यांत सह्याद्री आहे कि पलिकडे?
तीन चित्रपट
मला ज्यात गावाचे चित्रण बर्यापैकी अस्सल वाटले होते असे काही चित्रपट
एक कप च्या: यातील कथा कणकवली च्या जवळच्या गावातील दाखवली आहे. बाहेरच्या लोकांना "साधारण कोकणा" तले वातावरण वाटते. तळकोकण वगैरे आणखी डीटेल लेव्हलला किती अॅक्युरेट आहे माहीत नाही.
देऊळः पुण्याजवळ हायवेवर असणारी खेडी आहेत त्यातील भाषा, कपडे व एकूण वातावरण यात एकदम अचूक वाटले. मी बहुतांश नाशिक रोड वरच्या गावांमधे फिरलेलो आहे व तेथे असेच सगळे बघितले आहे. मंचर, कळंब, नारायणगाव, जुन्नर ई.
टिंग्या - यातील खेडे व भाषा सगळेच बरोबर वाटल्याचे आठवते.
गाभ्रीचा पाऊस - हे मराठवाड्यातील असावे. तेथील लोकांना सांगता येइल किती अचूक होते, पण बाहेरच्या लोकांना तिथले वातावरण आहे असे सहज वाटेल.
हे चित्रपट पाहिलेल्या कोणाचे मत यापेक्षा वेगळे असेल तर जरूर सांगा. बाय द वे हे चारही चित्रपट आवर्जून पाहण्यासारखे आहेत.
अगदी तसे नसणार
>>गाभ्रीचा पाऊस - हे मराठवाड्यातील असावे. तेथील लोकांना सांगता येइल किती अचूक होते,
मराठवाड्यातील एका वर्गातल्या लोकांना दुसर्या वर्गाच्या वर्णनाच्या अचूकतेविषयी सांगता येईलच असे नाही. मी ठाण्यामुंबईत जन्मापासून राहिलो असलो तरी कोळ्यांच्या किंवा आगर्यांच्या वर्णनाची/त्यांच्या भाषेची अचूक माहिती मला नाही.
रम्य गाव हे को़कणात नि
रम्य गाव हे को़कणात नि गोव्यात असतं असं म्हणताना अनेकांना पाहिलं आहे. म्हणजे ते विदर्भात तसं नसतं असं म्हणत नाहीत, पण त्याचा उल्लेखच न आल्याने प्रतिमा बनून जाते.