Finding Fanny आणि मी

वि.सू - ही समीक्षा नाही. चित्रपटातील सौंदर्यस्थळे आणि कलाकारांचा अभिनय इ.इ. बद्दल काही विशेष समजणार नाही. आणि चित्रपट पाहिला नसेल तर वाचू नका.
पण चित्रपट बघितल्यावर माझ्या डोक्यातला चित्रपट आणि बघितलेला चित्रपट खूप वेगळा निघाला. त्याबद्दल हे उगाच.

कालच Finding Fanny पाहिला. बर्याच लोकांनी खूपच नावाजलेला, आणखी काही लोकांनी सो सो आहे म्हणून सांगितलेला आणि फार थोड्या लोकांनी डिट्टेलवारी माहिती देण्याचा प्रयत्न केला होता. पण शेल्डन कूपर हे आमचे ह्याबाबतीतले आदर्श असल्यामुळे आम्ही कोणाचंही काहीही ऐकलं नाही. दुर्दैवाने एका गाफिल क्षणी एका मित्रातर्फे "गोव्यातला चित्रपट आहे.. तेव्हा नक्की बघ" असा सल्ला मिळाला. त्यामुळे शेवटी रहावेना.
चित्रपट पाहिल्यावर मनात आलेले काही वेडे वाकडे विचार- त्यांना मांडतो आहे.
---------------------------------------------------------------------------------------------
सुरवात झाली आणि छान वाटलं. गोव्यातलं एक अगदी टिपिकल म्हणता येईल असं गाव - पोकोलीम् (हे "म्" शेवटी येतंच. खरं तर त्याचा उच्चार गोंयकार पोकळीं/पोकळ्यें असं म्हणाले असते. अ‍ॅ:[१], असू.)
छान अगदी आळसावलेलं किरिस्ताव गाव- त्यातले अगदी नेहेमीचेच आणि थोडके लोक. मी अगदी सुशेगाद खुर्चीत मांडी घालून वगैरे बसलो.
मग फर्डी-रोसी-डॉन पेड्रो-सॅवियो- वगैरे मंडळी हळू हळू ओळखीची होत गेली. त्या हळूहळू मधे मजा आहे. तुम्ही कधी गोव्यात गेला असाल तर तुम्हाला नक्की कळेल! दिवस ९ नंतर सुरू झालाय. उकड्या तांदळाची पेज आणि तोंडी लावायला एक कैरी, खोबरेल तेल लावलेला भाजका पापड असा मस्त नाश्ता करून तुम्ही आता दिवसाच्या स्वागताला तयार! दुपारची उन्हं कुळागारातून हळूहळू खुर्चीपर्यंत सरकली तरी तुम्ही बाहेर आरामखुर्चीवर बसून पेपर वाचताय, उगाच येणार्या जाणार्याबरोबर एकदोन "बरो मरे?" वगैरे.
तर अशा गावात अचानक बाँब पडलाय- फर्डीला आलेलं पत्र- कुणाचं आहे- काय करायचं - असं सगळं होऊन गोंयकाराला न शोभणार्या तत्परतेने अँजी सगळी मेंढरं जमवतेय.
मग उचपती करून शेवटी फॅनीच्या शोधात फर्डी आणि इतर लोक तय्य्यार.
------------------------------------------------------------------------------------------
पुढची पंधरा मिनिटं स्वर्ग.
बसायला ऐसपैस पण जेमतेम चालणारी गाडी आणि त्यात बसून गोव्यात एक छोटी रोड ट्रिप- अजून काय पाहिजे राव आयुष्यात? म्हणजे खरंच, हे खूप उच्च आहे. त्यात मग मांडवीच्या काठाकाठाने जाणारा रस्ता- वाटेत फेरी घेउन मग नदीच्या पलीकडे- त्यात मधेच एक रेल्वे क्रॉसिंग- आणि मग गाडी थांबवून शांतपणे खबरी मारत माडाखाली काढलेला वेळ.
वेळ ही एक ऐच्छिक गोष्ट आहे, हे गोंयकारांना मंजूर असलेलं सत्य अजून जगाने पचवलं नाहीये. पण चित्रपटातल्या त्या १५ मिनिटांत ते खूप जमून आलंय.
आणि मांजरीचा भाग तर निव्वळ कहर ! तेवढ्यासाठी(च) पुन्हा फॅनी.. बघायला तयार आहे मी.
मला वाटत राहिलं की ह्याच अंगाने जर पुढे हा चित्रपट गेला तर?

[माझ्या मनातला चित्रपट चालू]
वाटेत एका जेमतेमच असणार्या खाणावळीत जेवण- मग सोलकढी आणि माशाचा ढीग- बांगडे कसे सामके फड्फडीत आसुल्ले- ह्यावर डॉन पेड्रो आणि रोस्सीमधे झालेली चर्चा. मग फर्डी तिथे येऊन सांगतोय की उशीर होतोय, चला! पण डॉन पेड्रो "राव रे मातसो, कित्या बोवाळ ..." म्हणून त्याला गप्प करतो आणि सुशेगाद एक छानपैकी सुरावट चालू करतो. २-३ पेग उत्तम दर्जाची पेड्रो व्हिस्की रिचवल्यावर रोसी त्याला मो़कळेपणाने साथ देतेय. सॅवियो आणि अँजीला तर आंदणच मि़ळालेलं- माळावर.. की कुळागारातल्या पाटाबाजूला.. निवांत. काय फरक पडतो? एकमेकांच्या मिठीत हरवून गेलीत ती. उन्हं हळूहळू वर येतायेत.
पण फर्डीच्या डोक्यात फॅनी. दुसरं काही सुचतच नाहीये त्याला. हे उमगल्यावर सॅवियोने आपल्या भडक स्वभावाला विशोभित -"चल रे पात्राव, खंय असा तुगेली फॅनी ते" म्हणून गाडी सुरू केलीये.
आणि मग ह्या चित्रविचित्र कंपूबरोबर साध्या सरळ स्वभावाच्या फर्डीचा शोध चालूच.
[माझ्या मनातला चित्रपट संपला]
असं काहीसं पुढचं रूप माझ्या डोक्यात अंधुक आकार घेतंय तोच-
"राईटान घे" असं म्हणून फॅनीच्या गावी जेव्हा फर्डी सगळ्यांना आणून सोडतो - केवळ तिथपर्यंतच!
------------------------------------------------------------------------------------------
काहीकाही वेळा खूप जाणीवपूर्वक गोव्याची भाषा सगळ्यांचा तोंडून येते. कोंकणी असंच नाही- इंग्रजीसुद्द्धा. पण नंतर लगेच ते पुन्हा पॉलिश्ड इंग्रजी बोलायला लागतात. काय हे पाप?
असो. दिपिकाबद्दल काहीच वाटत नाही. आनंद्,दु:ख्,हेवा,आसूया. फक्त राग येतो. का असं करतात लोक? दुसरं कोणी नव्हतं का? खोटी वाटली ती.
सॅवियो आवडला मला. एक तर तो प्रामाणिकपणे गोंधळलेला आहे. आणि तो फर्डीला समजून घेतोय-त्याची कुवत नसतानाही. आणि गोव्याचा वाटतो तो.
डॉन पेद्रो - भलतंच क्यारेक्टर आहे Smile अगदीच खतरनाक. पंकज कपूरने रंगवलंयही छान- पण "मटरू.." मधून बाहेर आल्यासारखा वाटतो. इलाज नाही. क्यारेक्टरच तसं.
रोसीसुद्धा आवडली. विषेशतः पोर्ट्रेटनंतरच्या भागात.
आता नासीर अ‍ॅज फर्डी- फर्डी एक गावचा साधाभोळा (village idiot ) असावा असं दिसतं, पण त्यात अधूनमधून नासीर डोकावत रहातो. का?!!! त्याचं दु:ख किंवा आनंद क्वचित भिडतो मला, पण सतत मागे एक नासीर उभा असल्यासारखा वाटतो, जो सांगत असतो की असं कर, तसं कर. थोड्क्यात कुछ जमा नही.
शेवट तर उगाच ठिगळं लावल्यासारखा. अँजीचा आवाज जे काही निष्कर्ष सदृश सांगतो ते खूपच थिल्लर वाटलं.
-----------------------------------------------------------------------------------------------------------------------------------

शेवटी काय तर गाडीतले क्षण गोव्यातले आहेत आणि चित्रपटातला सगळा गोवा त्या १५ मिनिटांत आहे.
चित्रपट संपला.

[१] - गोंयचा प्रांतीक निषेधोद्गार. काही बाकी आलं नाही तरी एवढं जमवा आणि खुशाल गोंयकार म्हणून मिरवा!

समीक्षेचा विषय निवडा: 
field_vote: 
4
Your rating: None Average: 4 (5 votes)

प्रतिक्रिया

सेमीसमीक्षा आवडली Smile

वाटेत एका जेमतेमच असणार्या खाणावळीत जेवण- मग सोलकढी आणि माशाचा ढीग- बांगडे कसे सामके फड्फडीत आसुल्ले- ह्यावर डॉन पेड्रो आणि रोस्सीमधे झालेली चर्चा. मग फर्डी तिथे येऊन सांगतोय की उशीर होतोय, चला! पण डॉन पेड्रो "राव रे मातसो, कित्या बोवाळ ..." म्हणून त्याला गप्प करतो आणि सुशेगाद एक छानपैकी सुरावट चालू करतो.

निदान इतक्या मिनिटांसाठी तरी शिनुमा पाहीन म्हणतो.

अवांतर - बोवाळ हे हिंदी 'बवाल'चे भावंड असावे, मात्र कोकणी/मालवणीत केवळ 'नसता उपद्व्याप' (ज्यात सार्‍या जीवनावश्यकेतर क्रिया येतात) या सदराखाली मोडणारे.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

तो भाग म्हणजे माझ्या मनातला चित्रपट आहे Smile

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

देवा मला गोव्या-बिव्यासारख्या पुढं आयुष्यभर उगंच उमाळे काढायला लावणार्‍या जागेत जन्माला घातलं नाही म्हणून तुझे आभार मानावे तितके कमीच आहेत आणि माझ्या गावी/गावावर पिच्चर-बिच्चर निघत नाहीत हा तर तुझा परमकृपाळूपणाच रे बाबा!

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

उमाळे बिमाळे नाही हो Smile
पण कधीतरी चित्रपटातल्या जागा,शहरं खूप जवळची असतात. आणि त्यातल्या पात्रांपेक्षा जागांशीच जास्त जवळीक होते- असं नाही झालं तुमचं कधी?
२००६ च्या सुमारास मुंबईपासून खूप लांब होतो. खूप आठवण यायची मुंबईची. मग नाना-बोमनचा ब्लफमास्टर बघितला आणि डोळे निवले- त्यातली मुंबई बघून.
तेव्हा असा कधीकधी विचित्र ताळमेळ बसतो चित्रपटाचा आणि आपला- त्यातलाच हा प्रकार!

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

नाना-बोमनचा ब्लफमास्टर बघितला आणि डोळे निवले- त्यातली मुंबई बघून.

अगदी अगदी! हा एका नव्या धाग्याचाच विषय आहे. सिनेमे आणि त्यातली स्थळं.

'सत्या'मधली मुंबई, 'ब्लफमास्टर'मधली मुंबई, 'तलाश'मधली मुंबई, 'स्लमडॉग मिलिनेयर'मधली खोटी खोटी मुंबई... या निरनिराळ्या आणि वेधक मुंबया आहेत.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

-मेघना भुस्कुटे
***********
तुन्द हैं शोले, सुर्ख है आहन

वेगळ्या चर्चेचा विषय +१
स्लमडॉगमधील "खोटी" मुंबई? -१

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

- ऋ
-------
लव्ह अ‍ॅड लेट लव्ह!

"ही बघा 'मुंबई'" अशी गणपतीदेखावाछाप मुंबई वाटली मला 'स्लमडॉग'मधली. ही बघा थोडी झोपटपट्टी, थोडे संडास, थोडं चकाचक कॉल सेंटर...

'इथलं दारिद्य्र दाखवू नये' छापाचा आचरट दावा अजिबातच नाही. पण माझ्यामते ती काही 'जमली' नाही.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

-मेघना भुस्कुटे
***********
तुन्द हैं शोले, सुर्ख है आहन

ओके. जमली नाही +१

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

- ऋ
-------
लव्ह अ‍ॅड लेट लव्ह!

चकाचक कॉल सेंटर...

हे काय असतं? कॉल सेंटर मंजे कापायचे चिकन घेऊन ज्यायच्या गाडीत ते जसे दिसतात तशी जागा असते. क्वचित्त्त अपवाद.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

सही: पुरोगाम्यांना लॉजिक माफ असतं.

कॉल सेंटर मंजे कापायचे चिकन घेऊन ज्यायच्या गाडीत ते जसे दिसतात तशी जागा असते.

अशी तद्दन भूतक्रौर्यवादी उपमा दिल्याबद्दल अजोंना स्युडोभूतदयावादी का म्हणू नये Wink

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

माहिष्मती साम्राज्यं अस्माकं अजेयं

हो हो, एकदम बराबर बोला.
छोटीसी बात मधली मुंबई!!
"सावन बरसे तरसे दिल" ही दहक ह्या चित्रपटातल्या गाण्यात दिसलेली ऑसम पावसाळी मुंबई.. हाय!

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

मला 'वेक अप सिड' मधली मुंबईसुद्धा आवडते.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

- ऋ
-------
लव्ह अ‍ॅड लेट लव्ह!

मला "बातों बातों मै" किंवा " छोटी सी बात" अश्या जुन्या चित्रपटांमधली मुंबई जाम आवडते Smile

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

देवा, हेच लिहायला आलो होतो. छोटी सी बात बद्दल.

त्यातला एक्सप्रेस टावरचा परिसर मी पाहिला तेव्हाही तस्साच.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

********
It is better to have questions which don't have answers, than having answers which cannot be questioned.

बाकी कुठल्या सिनेमांतून अशी गावं दिसत राहतात?

'शेरलॉक'मधलं लंडन असतं, ते मला आवडतं.

'सदमा'मधलं ते शांत हिलस्टेशन आवडतं.

दिवाकर बॅनर्जीच्या सिनेमांतून - 'खोसला का घोसला' आणि 'ओये लक्की' दोन्हीतही - दिसणारी दिल्ली आवडते. . 'देल्ही ६'मधली दिल्ली मस्त आहे. तशीच 'रंग दे बसंती'मधली दिल्ली युनिवर्सिटी आणि दिल्लीही.

'युवा'मध्ये कोलकाता दिसतं.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

-मेघना भुस्कुटे
***********
तुन्द हैं शोले, सुर्ख है आहन

कोलकाता - विद्द्या बालन -- कहानी
.
.
मालगुडी डेज् च्या विविध एपिसोड्स मधील निवांत गाव
.
.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

--मनोबा
.
संगति जयाच्या खेळलो मी सदाहि | हाकेस तो आता ओ देत नाही
.
memories....often the marks people leave are scars

कृपया मुंबई, दिल्ली आणि कोलकाता यांना गाव म्हणू नकात. त्यांना निवांत दाखवलं म्हणून ते गाव होत नाहीत.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

सही: पुरोगाम्यांना लॉजिक माफ असतं.

इथे थोडा भाषिक भेद आहे. हिंदीत शहर-गांव हा भेद एकदम बायनरी छाप असतो. मराठीत बोलताना दोन्ही संज्ञा जरा लूजलि वापरतात.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

माहिष्मती साम्राज्यं अस्माकं अजेयं

प्रति नगरीनिरंजनः सहमत. हे बाकी खरं. 'माझ्या गोव्याच्या भूमीत' सारख्या कविताबिविता सुद्धा लिहितात राव. वैताग येतो. (एका जॉन डेनवर नामक प्राण्यानेही 'टेक मी होम' गाण्यात वेस्ट वर्जिनियाचा बराच गूळ काढला आहे. आधी आवडायचं ते गाणं. आता डोक्यात जातं.)

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

अगायाया....गूळ काढणे हा वाक्प्रचार बाकी काळजाला भिडला.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

माहिष्मती साम्राज्यं अस्माकं अजेयं

चित्रप्ट बघितला
तु म्हणतोयस ते वातावरण झक्क उतरलंय! आणि चित्रपट बघताना जाणवावे त्यापेक्षा तुझं वरचं वर्णनच अधिक ताकदीचं झालंय.

तुम्ही कधी गोव्यात गेला असाल तर तुम्हाला नक्की कळेल! दिवस ९ नंतर सुरू झालाय. उकड्या तांदळाची पेज आणि तोंडी लावायला एक कैरी, खोबरेल तेल लावलेला भाजका पापड असा मस्त नाश्ता करून तुम्ही आता दिवसाच्या स्वागताला तयार! दुपारची उन्हं कुळागारातून हळूहळू खुर्चीपर्यंत सरकली तरी तुम्ही बाहेर आरामखुर्चीवर बसून पेपर वाचताय, उगाच येणार्या जाणार्याबरोबर एकदोन "बरो मरे?" वगैरे.

चित्रपटापेक्षा चित्रमय लेखन झालंय Smile

लिहित रहा! आम्ही वाचतो आहोतच!
====
<कथावस्तु अंशतः उघड>
चित्रपटाबद्द्लः ही पात्रे आणि कित्येक घटना या कशाचे तरी प्रतिक असाव्यात असे सारखे वाटते. मात्र कसले ते नाही पकडता येत आहे किंवा माहितीच नाहिये. विशेषतः पंकज कपूरचे पात्र आणि त्याचा मृत्यू नुसते विनोद म्हणून टाकले आहे वगैरे पचायला जड जातेय. कैतरी आहे.
असे काहि प्रतिकात्मक अर्थ असतील तर ते जाणकारांपैकी कुणीही इथे उलगडून सांगितले तर अनंतोपकार होतील!
<कथावस्तु बंद>

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

- ऋ
-------
लव्ह अ‍ॅड लेट लव्ह!

विशेषतः पंकज कपूरचे पात्र आणि त्याचा मृत्यू नुसते विनोद म्हणून टाकले आहे वगैरे पचायला जड जातेय. कैतरी आहे.
+१

त्या सिनमधे अ‍ॅन्कर(anchor) का वापरण्यात आला हे पण कळलं नाही.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

चित्रपटाबद्द्लः ही पात्रे आणि कित्येक घटना या कशाचे तरी प्रतिक असाव्यात असे सारखे वाटते. मात्र कसले ते नाही पकडता येत आहे किंवा माहितीच नाहिये. विशेषतः पंकज कपूरचे पात्र आणि त्याचा मृत्यू नुसते विनोद म्हणून टाकले आहे वगैरे पचायला जड जातेय. कैतरी आहे.
असे काहि प्रतिकात्मक अर्थ असतील तर ते जाणकारांपैकी कुणीही इथे उलगडून सांगितले तर अनंतोपकार होतील!

तंतोतंत.
काहीतरी आहे असे वाट्टे; पण काय ते समजत नै.
*
मधल्या ओळी यशस्वीरित्या काढून टाकलेल्या आहेत.
*

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

--मनोबा
.
संगति जयाच्या खेळलो मी सदाहि | हाकेस तो आता ओ देत नाही
.
memories....often the marks people leave are scars

बुच

छ्या बुच हुकलं. पण काढलेल्या ओळी पाठ झाल्या आहेत Wink टाकु का?

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

- ऋ
-------
लव्ह अ‍ॅड लेट लव्ह!

मी आधीच्या प्रतिक्रियेला मार्मिक श्रेणी दिली होती. ती बदलली आहे, तरी माझ्याकडून श्रेणी कॅन्सल.

पंकज कपूरचं पात्र पेंटिंगवर थापथाप करून ब्रश आपटतं आणि 'आयम डन विथ यू' असं म्हणतं, त्याची तुलना काही पुरुष संभोगक्रियेनंतर स्त्रीच्या गालावर लिंग आपटतात त्यातल्या तुच्छतेशी केली होती.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

-मेघना भुस्कुटे
***********
तुन्द हैं शोले, सुर्ख है आहन

+१ माझीही याच वाक्याला दिलेली रोचक श्रेणी रद्द
तसेच मेघनाच्या मौलिक प्रतिसादाला बुच

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

- ऋ
-------
लव्ह अ‍ॅड लेट लव्ह!

चित्रपटाबद्द्लः ही पात्रे आणि कित्येक घटना या कशाचे तरी प्रतिक असाव्यात असे सारखे वाटते. मात्र कसले ते नाही पकडता येत आहे किंवा माहितीच नाहिये. विशेषतः पंकज कपूरचे पात्र आणि त्याचा मृत्यू नुसते विनोद म्हणून टाकले आहे वगैरे पचायला जड जातेय. कैतरी आहे.
असे काहि प्रतिकात्मक अर्थ असतील तर ते जाणकारांपैकी कुणीही इथे उलगडून सांगितले तर अनंतोपकार होतील!

तंतोतंत.
काहीतरी आहे असे वाट्टे; पण काय ते समजत नै.
.
.
*
एक प्रसंग :-
रोझी(डिम्पलचं )चित्र काढून होतं. आणि जरा मग्रूरितच अंगावर ब्रश थापत तो तिला झिडकारतो.
"i am done with you"
टिपिकल पॉर्न क्लिपांमधले दांडगे पुरुष कसं स्वतःचं सगळं करुन झाल्यावर लिंग त्या स्त्रीवर थप्प थप्प करुन गालावर थापडतात,
तसच वाटलं. तो ब्रश थापटत नाहिये. लिंग थापटतोय आणि "सगळं करुन झालय; साली रांड तू. अजून कशाला थांबलिस. जा फुट"
असं म्हणतोय; असं वाटलं.

*

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

--मनोबा
.
संगति जयाच्या खेळलो मी सदाहि | हाकेस तो आता ओ देत नाही
.
memories....often the marks people leave are scars

. बुच!
आता यावर माहितगारांनी काहितरी लिहा ब! (इथे माहितगार लिहिताना डोळ्यापुढे चिंज, ररा, उस वगैरे व्यक्ती आहेत)

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

- ऋ
-------
लव्ह अ‍ॅड लेट लव्ह!

अगायायो...काय उपमा तरी...धन्य _/\_

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

माहिष्मती साम्राज्यं अस्माकं अजेयं

ऋषिकेश, ते जे लिहीले आहे त्याने कथावस्तु अंशतः का होईना उघड होते हा आपला विनय आहे Smile

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

मस्तच!

फक्त मला दीपिका पडुकोण आवडली. आणि नसीरही 'नसीर' नाही वाटला. पण तुझा लेख मात्र फारच आवडला. त्यात जे काही वातावरण तू शब्दांत पकडलं आहेस, त्याला तोड नाही. मस्तच.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

-मेघना भुस्कुटे
***********
तुन्द हैं शोले, सुर्ख है आहन

थ्यांकू!
@नसीर- मला कदाचित नसीरकडून खूपच जास्त अपेक्षा असाव्यात, म्हणून होतंय असं बहुतेक. आणि दिपिका का आवडली तुला? मला तिच्या अँजीबद्दल काही वाटलंच नाही.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

माझ्या तिच्याकडून फार म्हणजे फारच कमी अपेक्षा होत्या, म्हणून कदाचित! वेगळीच सुंदर दिसलीय ती.

आणि नसीर हल्ली कधीकधी मला अगदी अपेक्षितपणे 'जाणता लव्हेबल म्हातारा' असा छाप घेतलेला वाटतो, तसा यात अजिबात वाटला नाही. म्हणून...

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

-मेघना भुस्कुटे
***********
तुन्द हैं शोले, सुर्ख है आहन

माझ्या तिच्याकडून फार म्हणजे फारच कमी अपेक्षा होत्या, म्हणून कदाचित! वेगळीच सुंदर दिसलीय ती.
+१
पंकज कपूरपेक्षाही मला नासीर आवडला. डायरेक्ट दील आलं त्याच्यावर, हे मात्र माझं माझ्यापुरतचं मला रोचक वाटलं (- तुझा आवडता शब्द तोही उगाच Wink )

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

'दील आलं त्याच्यावर.'

वा, काय दिलखेचक शब्दयोजना आहे! असं 'गँग्स ऑफ वासेपुर' पाहिल्यावर माझं नवाजुद्दिनवर 'दिल आलं' होतं, ते अजुनी 'गेलं' नाहीये!

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

-मेघना भुस्कुटे
***********
तुन्द हैं शोले, सुर्ख है आहन

नसीरचा "the coffin maker" हा चित्रपट कुणी पाहिला आहे का इथे? त्यात दाखवलेला गोवा कसा आहे? तो चित्रपट कसा वाटला?

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

आता चार दिवसाची जी जोडून सुटी येते आहे ना, त्यासाठी कोकणात जायची तिकिटच मिळत नैय्येत.
चिडचिड होतिये नुसती.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

--मनोबा
.
संगति जयाच्या खेळलो मी सदाहि | हाकेस तो आता ओ देत नाही
.
memories....often the marks people leave are scars

चिडचिडच करत बसा नुस्ती!

कर्नाटकी कोकणात जावा की. कोकण हा भाग दक्षिण गुजरात ते उत्तर केरळ इतका मोठा आहे.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

माहिष्मती साम्राज्यं अस्माकं अजेयं

This comment has been moved here.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

--मनोबा
.
संगति जयाच्या खेळलो मी सदाहि | हाकेस तो आता ओ देत नाही
.
memories....often the marks people leave are scars

बास करा की राव! काय इथे पण तेच तिरके प्रतिसाद. Sad

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

आवडल परिक्शण. आता गोव्याला जाय्चे डोहाळे लागले

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

दिलों में तुम अपनी बेताबियाँ लेके चल रहे हो, तो जिंदा हो तुम नज़र में ख़्वाबों की बिजलियाँ लेके चल रहे हो, तो जिंदा हो तुम

छान लिहीलय.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

वाटेत एका जेमतेमच असणार्या खाणावळीत जेवण- मग सोलकढी आणि माशाचा ढीग- बांगडे कसे सामके फड्फडीत आसुल्ले- ह्यावर डॉन पेड्रो आणि रोस्सीमधे झालेली चर्चा. मग फर्डी तिथे येऊन सांगतोय की उशीर होतोय, चला! पण डॉन पेड्रो "राव रे मातसो, कित्या बोवाळ ..." म्हणून त्याला गप्प करतो आणि सुशेगाद एक छानपैकी सुरावट चालू करतो

हे वाचून कित्ती वेळ विचार करत होते की नक्की मी सिनेमा पाहिला की नाही. मधेच एक डुलकी खाल्ली की काय. हे नव्ह्तं ना हो सिनेमात? :~

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

नाही, ते जरा डोक्यातलं. लेखात मिक्स झालं वाट्टं. लेखात स्पष्ट अपडेटलंय मी ते, उगाच गोंधळ नको!.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

अर्र ते डोक्यातलं होतं होय .... मी तिथेच अडकलेय गाडीच माशांच्या पुढे जाईना राव Wink

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

मग काय!
गोव्यातला चित्रपट आणि मासे नाहीत.. रहावलं नाही हो!
अगदी घाईगडबडीतच दाखवायचं तर एक सुका बांगडा तरी भाजलेला दाखवायचा, काय? साग्रसंगीत असेल तर मग मुड्दुशा,पेडवे वगैरे आणायचे!
पण सांगण्याचा मुद्दा असा की त्यांची अशी मस्त रोड ट्रीप चालू असताना खाण्यापिण्याची आबाळ झालेली पहावेना मला, म्हणून मग जरा.. कळ्ळे मगे? Smile

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

धन्यवाद! (माझे पैसे वाचवल्या बद्दल , नाहितर परत पाहावा लागला असतां...)

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

एका म्हातार्‍याचा प्रातिनिधिक प्रतिसाद हवा असेल तर,
मला तरी आवडला. त्यातला खोल अर्थ शोधायच्या मागे न लागता देखील.
उलट, नेहमीच्या धांगडधिंग्यात हिरवीणीला न्याहाळणे कठीण होते. सारखी नाचत राहिल्यामुळे आम्हा म्हातार्‍यांना नजर स्थिरावता येत नाही. इथे कसं, अगदी स्लो मोशनमधे, त्यामुळे दीपिकाला चांगली फिगर आहे हे तरी कळले. नासिर आणि पंकज कपूरचे तर आम्ही पहिल्यापासून फॅन आहोत. डिम्पलचा अभिनय पार्टस पार्टस मधे चांगला आहे. तो कपूरही चांगलाच वाटला. जुन्या काळातही आम्ही काही वेगळेपण शोधायचो. आत्ताही तेच चालू आहे.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

आवडले! आता चित्रपट पाहावासा वाटतोय.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0