ही बातमी समजली का? - २१
भाग १ - १० चे दुवे इथे | ११ - २० चे दुवे इथे
अनेक बातम्यांबद्दल आपल्याला चर्चा करावीशी वाटते. खरं तर, ऐसी अक्षरेवर बातम्यांवर चर्चा करण्यासाठी बातमी नावाचा लेखनप्रकारही अस्तित्त्वात आहे. "ताज्या घडामोडी, अर्थकारण, राजकारण इत्यादी प्रकारच्या संस्थळाबाहेरील लिखाणाची चर्चा करण्यासाठी हा विभाग वापरावा. इथे मूळ लेखावरच्या शब्दसंख्येचे बंधन नाही; एखादी बातमी पसरवणे किंवा चर्चा घडवणे यासाठी हा विभाग वापरावा." असं तिथे स्पष्ट म्हटलेलंही आहे. पण, त्याबद्दल विस्तारानं लिहिण्याइतका किंवा एखादा व्यवस्थित चर्चाप्रस्ताव मांडण्याइतका वेळ किंवा माहिती किंवा उत्साह किंवा हे सारंच नसणं वगैरे कारणांमुळे आपण चर्चाप्रस्ताव लिहीत नाही. शिवाय बऱ्याचदा "एकोळी" / नुसत्याच लिंका देऊन धागा काढायचंही जीवावर येतं.
तेव्हा अशा बातम्यांवर चर्चा करण्यासाठी, एकमेकांना अशा बातम्या लक्षात आणून देण्यासाठी, त्यांचे दुवे देण्यासाठी हा धागा काढत आहे. एखाद्या बातमीवर विस्तारानं चर्चा सुरू झाल्यास त्या संवादाचं वेगळ्या 'बातमी' धाग्यात रुपांतर केलं जाईल.
आधीच्या धाग्यात १००+ प्रतिसाद झाल्यामुळे नवा धागा.
---------
Freedom of the Press 2014 हा अहवाल प्रकाशित झाला आहे. वृत्तस्वातंत्र्याच्या बाबतीत दशकातल्या सर्वात वाईट स्थितीत आज जग आहे असा त्यात दावा केला आहे. स्नोडेन प्रकरणात 'गार्डियन' वृत्तपत्रावर ब्रिटिश सरकारनं जी कारवाई केली त्यामुळे ब्रिटन ३१व्या स्थानावरून ३६व्या स्थानावर घसरला आहे हे सांगणारी ही बातमी.
जाता जाता : मोदींविषयीचा एक लेख 'डीएनए' वृत्तपत्रानं प्रकाशित केला आणि एका दिवसात काढून घेतला त्याविषयीची ही बातमीदेखील आजच दिसली.
Taxonomy upgrade extras
एक अवांतर प्रश्न : मोदींचा
एक अवांतर प्रश्न :
मोदींचा दंगलीतील प्रत्यक्ष /अप्रत्यक्ष हात आहे का नाही हा मुद्दा घेतला तर
अ) जर त्यांचा प्रत्यक्ष हात असेल तर ते एक प्रशासक म्हणून सपशेल अपयशी ठरतात.
ब) जर त्यांचा प्रत्यक्ष हात नसेल तरीही ते दंगल एवढ्या मोठ्या स्तराला पोचू दिली म्हणून अयशस्वी प्रशासक ठरतात.
मग मोदींची "एक कुशल प्रशासक" ही भलावण होते ती कशाकरिता?
सगळी माहिती चाऊन चोथा झालेली
सगळी माहिती चाऊन चोथा झालेली आहे. त्यांचे बंधू तहसीन पूनावाला एकदम अविश्वसनीय (खोटारडा म्हणा) माणूस आहे. कोलगेट प्रकरणात कायदामंत्र्यानी सी बी आय ची मिटींग घेतलीच नाही, हे मला माहित आहे असे तो कंठशोष करून सांगत होता. नंतर काही दिवसानी अशी मिटींग झाली हे सिद्ध झाले नि अश्वमीकुमार घरी बसले. हे दोघे भाऊ वाहिलेले मोदी द्वेष्टे आहेत.
तरीही डी एन ए ने इतक्यात बातमी आर्काइव मधे नाही टाकायला पाहिजे होती. कदाचित आता मोदीविरोधी काहीही लिहिणे फॅशन राहीली नाही आणि साईट विश्वासार्ह ठेवण्यासाठी ते करणे आवश्यक झाले असावे.
मोदींच्या मुलाखतीच्या बर्याच क्लिपा दूरदर्शनने काटल्या. त्यात मनिष तिवारींनी लूड्बूड केली असे संकेत गेल्या २-३ दिवसांत डीडी प्रमुखांनी दिले आहेत.
इथे तुम्हाला मार्मिक श्रेण्या कुणि दिल्यात हो नक्की?
काही चावून चोथा वगैरे झालेली माहिती नाहिये.
जे झालं ते लिहिलंय.
पण काये ना, की गोबेल्सी प्रचारनीतीनुसार माहिती देणार्याची क्रेडिबिलिटी अशा प्रकारे खच्ची केल्यासारखे दाखवले, की झाले; अशी तुमच्यासारख्यांची समजूत असते.
लेखात प्रत्येक मिथबस्टिंगचे पुरावे अन सोर्सेस दिलेले आहेत. त्यापैकी कोणते खोटे वा पूनावाला वा मोदीद्वेष्टे यांनी खिशातून लिहिलेले आहेत?
ते मोदीद्वेष्टे असतील, तर तुम्ही मोदीभक्त आहात, सबब तुम्ही पूनावाला यांना दिलेल्या शिव्या बायस्ड आहेत, हे सिद्ध होत नाही का?
कधी मधी चूकून माकून पेपर
कधी मधी चूकून माकून पेपर उचलायची सवय असली तर प्रत्येक माहिती नविन वाटते. त्यात तुमचा दोष नाही. मी मोदीभक्त आहे असे म्हणताना मी मोदीबद्दल इथे ऐसीवरच काय काय म्हणतो आहे हे देखिल आपण वाचले नाही यावरूनच ते स्पष्ट होते.
कोणीही मोदीभक्त "२०१४ मधे पी चिदंबरम पंतप्रधान व्हावेत. २०१९ पर्यंत मोदी विपक्षनेता असावेत" अशी इच्छा करत नाही, "मोदी भारताचे पहिले रांगडे, अशिक्षित, अडाणी पंतप्रधान असतील", "काँग्रसने आपली सारी प्रॉमिसेस डेलिवर केली आहेत", "मनमोहनसिंगांनी १५ कोटी लोक दारिद्य रेषेच्या बाहेर आणले तेव्हा हत्तीवरून साखर वाटली पाहिजे" इ इ बरेच काही बोलत नाही.
या माहिती देणारास टीवीवर कधी पाहिले तरी आहे का? त्याचे लेख, त्याची भाषा, इ इ चा संदर्भ असावा का नसावा?
मोदीच्या बाजूने बोलणे चूकच असे मानणे एक न शमणारी खाज, न शमणारा कंड आहे. कोणती सत्ये पाहायचीच नाहीत ही निदान करायची भंकस पद्धत आहे.
प्रश्नाला सोयीस्कर
प्रश्नाला सोयीस्कर बगल.
मिथबस्टिंगचे पुरावे तिथे दिले आहेत त्यातले खोटे वा चुकीचे कोणते आहेत, हां प्रश्न होता.
विरोधी विचार लिहिणारा अमुक. तमुक माणुस सुमार. इ. प्रकार फार बोकाळलेत आजकाल.
टाळ्या वाजवल्या गेल्याने काय सिद्ध झाले नक्की?
तुम्ही चोथा म्हटल्याने ते पुरावे खोटे ठरलेत का?
चिडू नका
चिडू नका.
तुमच्या साइडनं टाळ्या,शिट्ट्या ,घोषणा,समर्थन ह्यासाठी मी आहे.
"मोदी" ह्या विषयावर बिनमारामरिचा एकही दिवस जालावर जायला नकोय.
अरुणरावांशी लढण्यातली एक महत्वाची आशा तुम्हीच आहात आमच्यासाठी.
टाळ्या वाजवल्या गेल्याने काय सिद्ध झाले नक्की?
तुम्ही चोथा म्हटल्याने ते पुरावे खोटे ठरलेत का?
हा शिरेसली विचार करण्यासारखा मुद्दा आहे.
हा धागा व प्रतिसाद यांची
हा धागा व प्रतिसाद यांची पार्श्वभूमी अशी आहे:
१. चिंज - प्रेसचे २०१४ मधील स्वातंत्र्य. जाता जाता - मोदींवरचा एक लै भारी लेख डीएनए ने उडवला /बीजेपीने त्यांच्याकडून उडवोन घेतला, इ इ जे काही त्यांना म्हणायचे होते.
२. घासकडवी - तो लेख आर्काइव मधे आहे.
३. अरुणजोशी - बीजेपीने तो लेख काढला नसावा. मोदींविरुद्ध काहीही गरळ ओकल्याने विश्वासार्हता कमी होईल म्हणून आर्काइव केले असेल. (तेही चूकच आहे). ही सर्व माहिती प्रचंड जूनी आहे.
४. आडकित्ती - हे माहिती नवी नि खरी आहे.
खरी आहे कि नाही याबद्दल मी माझे मत त्या काँसेंट्रेशन कँपवाल्या धाग्यात दिले आहे. (मी मोदी अप्रिपक्व राजकारणी होते, त्यांनी शांततेचे आवाहान करण्याऐवजी "गोध्रा होगा तो अहमदाबाद होगा" म्हटले. पण त्यांना दंगे करायचे नसावेत. पण ज्यांना हे 'माहितच आहे' कि त्यांनीच दंगे घडवून आणले त्यांनी न्यायिक सुधारांच्या मागे लागावे. कारण असे लोक सर्वोच्च न्यायालयाकडून सुटणे इष्ट नाही.) मी त्याबद्दल इथे अवाक्षरही बोललो नाही.
कोलगेट प्रकरणात पूनावाला अपक्ष म्हणून बोलत होता. त्याचा असेट? गुजराती मुसलमान असणे. सीबीआय च्या स्वायत्ततेच्या चर्चेत तो बोंबलून सांगत होता कि कायदामंत्र्यांनी सीबीआय प्रमुखाला समन केलेच नव्हते. नंतर ते खोटे हे आहे सिद्ध झाले नि मनमोहनसिंगासारखा सांड मागे उभा असूनही अश्वनीकुमारांना राजीनामा द्यावा लागला. पण पूनावालांच्या कर्तृत्वाने त्यांना काँग्रेसचे नेतेपद मिळाले.
मोदींच्या विरोधात इथे खूप लिंका येतात. मी त्यांचा प्रतिवाद करत नाही. उदा. अतिशहाणा यांनी एन डी ए आणि यु पी ए चे ग्रोथचे आकडे दिले होते. अजून बरेच कि 'गुजरात हे भारतातले सर्वात चांगले मॉडेल नाही.' मी असल्या गोष्टींचा विरोध करत नाही. त्या १९-२० मधे लोकांनी आपापलं मत बनवलं तर काही हरकत नाही. पण अतिरेक होतो तेव्हा लिहावे लागते. उदाहरणार्थ - मोदीद्वेष्टी जयती घोष. तुम्ही विचारवंत आहात, उजव्या लोकांचे सरकार देशाला घातक आहे म्हणून जनतेला आव्हानात्मक पत्रे लिहिता याचा मला आदर आहे, एक मतांतर म्हणून. पण गाढवासारखे तिने जर "गुजरातमधे गरीब देशातले सर्वात गरीब लोक आहेत. सगळा विकास जो देशाच्या सरासरीपेक्षा कितीतरी जास्त होता तो केवळ चंद उद्योगपतींच्या खिशात गेला." असा खोटा प्रचार चालू केला तर समाचार घेतला पाहिजे. एकतर अक्कल नाही, वर बायस बाजूला ठेवायचा नाही.
टाळ्या वाजवल्या गेल्याने काय सिद्ध झाले नक्की?
तुम्ही चोथा म्हटल्याने ते पुरावे खोटे ठरलेत का?
च्यायला, इथे पुन्हा मोदी कामाला आले. परवाच मोदींचा नि अर्णव गोस्वामीचा इंटरव्यू झाला. अर्णव मोदी विरोधी नाही पण वाहिलेला पत्रकार आहे. कोण्या एका प्रकरणाच्या क्लिपा दाखवून तो मोदींना वारंवार विचारू लागला - "सांगा ना, हा अपराध का? अपराध का?" मोदी म्हणाले, " बाबा रे, मी काय सांगू, सर्वोच्च न्यायालयाने सांगीतले आहे. तू अजून कोर्टात जा. अजून सांगेल."
तरीही अर्णवचे तेच पालूपद. मग मोदी चिडले. म्हणाले, "कोर्टाने जे सांगायचं ते सांगून झालंय. आता तुला जर वाटत असेल कि न्यायिक व्यवस्थेपेक्षा तूच शहाणा आहेस तर वाटून घे बापडा."
आपणांसही हेच म्हणतो.
शुभेच्छा
>> १. चिंज - प्रेसचे २०१४ मधील स्वातंत्र्य. जाता जाता - मोदींवरचा एक लै भारी लेख डीएनए ने उडवला /बीजेपीने त्यांच्याकडून उडवोन घेतला, इ इ जे काही त्यांना म्हणायचे होते.
माझं नाव घेऊन काही विधान केलं आहे म्हणून हा प्रतिसाद. मोदींवरचा लेख 'लै भारी' असं मी कुठेही सुचवलेलं नाही. भाजपनं उडवला की इतर कुणी ते मला माहीत नाही; तसा कोणताही दावा मी केलेला नाही. लेख उडाला हे खरं आहे आणि तेवढंच मी म्हटलेलं आहे. संदर्भासाठी मूळ वाक्य पुन्हा उद्धृत करतो आहे -
मोदींविषयीचा एक लेख 'डीएनए' वृत्तपत्रानं प्रकाशित केला आणि एका दिवसात काढून घेतला त्याविषयीची ही बातमीदेखील आजच दिसली.
जाता जाता : ह्या निमित्तानं असं सांगावंसं वाटतं की तुमचं स्वप्नरंजन जर वास्तवाशी एवढ्या मोठ्या सवलती घेत असेल तर ही पॅरानोइयाची लक्षणं आहेत का, हे तपासून पाहणं अगत्याचं ठरेल.
शैली
तुमच्या प्रतिसादांच्या शैलीची एक खासियत आहे.
कुठेही गलिच्छ शब्द, शिव्या वगैरे असे त्यात काहीही नसते.
म्हणजे पहायला गेलं तर भाषा अतिशय साधी सरळ वाटावी अशी असेल.
पण त्यातला गर्भितार्थ हा अत्यंत अपमानास्पद, समोरच्याला झोंबेल असा किंवा शेलक्या शब्दांतही हिणवण्याहून वाईट असा असतो.
किंवा तुच्छतादर्शक म्हणता यावं असा असतो. पुन्हा गंमत म्हणजे गैरशब्द वापरलेले नसल्याने , शिवीगाळ नसल्याने ते नेमकं पॉइण्ट आउट करणंही अवघड जातं.
उदा :-
वरती तुम्ही "पॅरानोइया " उल्लेख केलात.
मागे एका प्रतिसादात "बाकी, सगळं क्षेमकुशल असेल अशी आशा" असं कायतरी एका प्रतिसादात लिहिलं होतं.
व्यवहारातल्या भाषेत ह्या दोन्हींचा अर्थ "ठिकाणावर आहे की झिंगून बोलतोयस?" असे विचारण्यासारखा होतो.
सुशेगादच्या पहिल्याच लेखातही (जिथं त्रिशतकी प्रतिसाद धो धो कोसळले होते.) धागाकर्त्याच्या मनातील घडामोडिंचा तर्क लावताना
"ह्यातून केविलवाणेपणा आणि एकटेपणा डोकावताना दिसतो" असं काहिसं लिहिलं होतं.
एखाद्याची कीव करणे किंवा तो करुणा यावी अशा स्थितीत आहे हे दाखवणे हा एक बेक्कार प्रकार आहे.
(अपयशी माणसाला अपयशाहून जास्त काही झोंबत असेल तर अपयशाबद्दल कुणी मुद्दाम "च्च च्च. काय रे तुझी अवस्था" असं खपल्यांचे टवके उडवणं)
गचाळ शब्द न वापरता अपमान करु शकणारी ही शैली विशेष अभ्यास करावा अशी आहे.
नेमकी अशीच स्टाइल कुरुंदकरांच्या एका लेखात होती. "गांधीहत्या आणि मी" ह्या गोपाळ गोडसेंच्या पुस्तकाच्या समीक्षेत त्यांनी त्यातल्या दाव्यांची बेक्कार चिरफाड केली होती. त्यातील समारोपाचे वाक्य अजूनही लक्षात आहे :-
********************कुरुंदकरांचे वाक्य सुरु********************
लेखकाजवळ सत्य मांडण्याचा प्रामाणिकपना फारसा नाही, गांधीहत्या अभियोगातील पुरावा मांडण्यातील नि:पक्षपातीपणा फारसा नाही, हौतात्म्याचा दिलेला रंग समर्थनीय नाही. सरदार, सावरकर ह्यांच्याविषयीचे उल्लेख बेजबाबदार आहेत. गांधींविषयीचे शेरे पूर्वग्रहदूषित आहेत्.आप्ल्यावर सरकारने फार मोठा अन्याय केला ही भूमिका असमर्थनीय आहे. भाषाशैली व मांडणी मात्र फार चांगली आहे!
********************कुरुंदकरांचे वाक्य समाप्त********************
पण त्यातला गर्भितार्थ हा
पण त्यातला गर्भितार्थ हा अत्यंत अपमानास्पद, समोरच्याला झोंबेल असा किंवा शेलक्या शब्दांतही हिणवण्याहून वाईट असा असतो.
किंवा तुच्छतादर्शक म्हणता यावं असा असतो. पुन्हा गंमत म्हणजे गैरशब्द वापरलेले नसल्याने , शिवीगाळ नसल्याने ते नेमकं पॉइण्ट आउट करणंही अवघड जातं.
उदा :-
प्रचंड असहमत. बेसिक रेस्पेक्ट त्यांना नसावा असे मानण्याचे कारण नाही. चिंज जे म्हणत नाहियेत ते ते म्हणताहेत असे म्हणण्यापेक्षा ते जे जे म्हणत आहेत ते ते पकडून त्यांच्यावर टिका केली. काल परवा ते 'वाद नसावा' नि 'समाधान झाले आहे' म्हणाले. हे सगळं फेस व्हॅल्यू वर घेतलं पाहिजे. चिंजच्या प्रतिसाद देण्याच्या शैलीत अनेक तृटी आहेत पण वरील मत अस्थानी आहे.
वरती तुम्ही "पॅरानोइया " उल्लेख केलात.
हा प्रतिसाद छद्मी म्हणता येईल. चिंज जेव्हा केव्हा त्यांची अतिरेकी डावी बाजू मांडतात तेव्हा मी ती पूर्ण उध्वस्त केल्याशिवाय गप्प बसत नाही म्हणून त्यांचे असे मत झाले असावे. Politics has percolated its language on Aisi. चालतं.
आदर
अरुणराव,
आपल्या मताचा आदर आहे.
मला एकूनात जे म्हणायचे आहे, त्याप्रमाणे छद्मी हा शब्दही बर्यापैकी लागू होइल असे वाटते.
विचार करतो आहे.
...तेव्हा मी ती पूर्ण उध्वस्त केल्याशिवाय गप्प बसत नाही
=))
तुम्हाला खरच असं वाटतं?
बाकी वरचा प्रतिसाद आता संपादित करता येत नाही. त्याचा उरवरित भाग, पुरवणी इथे लिहितो.
काही अभिनेत्यांची खुबी फक्त संवादफेकित, आवाजाच्या चढ उतारात नसते. ते वाक्यातील पॉझला सुद्धा अर्थपूर्ण बनवतात.
तसच, असे प्रतिसाद ते देउ शकतात; प्लस योग्य त्या ठिकाणी दुर्लक्ष करु शकतात हे उत्तम वाटते.
त्यांचा इथे मला उपप्रतिसाद येणार नाही; असा माझा अंदाज आहे.
त्यातूनही त्यांनी एक विधान केलेलं असेल.
कमाल आहे
व्यक्तिगत टिप्पणी सोडून देत आहे. पण प्रतिसादातला हा भाग विशेष उल्लेखनीय वाटला -
>> सुशेगादच्या पहिल्याच लेखातही (जिथं त्रिशतकी प्रतिसाद धो धो कोसळले होते.) धागाकर्त्याच्या मनातील घडामोडिंचा तर्क लावताना
"ह्यातून केविलवाणेपणा आणि एकटेपणा डोकावताना दिसतो" असं काहिसं लिहिलं होतं.
एखाद्याची कीव करणे किंवा तो करुणा यावी अशा स्थितीत आहे हे दाखवणे हा एक बेक्कार प्रकार आहे.
(अपयशी माणसाला अपयशाहून जास्त काही झोंबत असेल तर अपयशाबद्दल कुणी मुद्दाम "च्च च्च. काय रे तुझी अवस्था" असं खपल्यांचे टवके उडवणं)
गचाळ शब्द न वापरता अपमान करु शकणारी ही शैली विशेष अभ्यास करावा अशी आहे.
- सुशेगाद ह्यांचा मूळ धागा 'ललित' म्हणून वर्गीकृत होता. त्यात आत्मचरित्रात्मक तपशील असतील कदाचित आणि निवेदन प्रथमपुरुषी होतंही, पण मी ते ललित लेखन म्हणूनच घेतलं.
- सुमार, भिकार, फालतू वगैरे पुष्कळ प्रतिसाद त्याला मिळाले होते.
- ह्या पार्श्वभूमीवर माझा प्रतिसाद हा लिखाणाला ललित समजून त्यातल्या पात्रांविषयी आणि एकूण कथनात्मक गुणावगुणांबद्दल होता.
- शिवाय, समारोपात मी चक्क असं लिहिलं होतं -
व्यर्थतेच्या त्या जाणीवेत कारुण्य आहे आणि कथनाची ताकद जी काय असेल ती त्यातच आहे.
म्हणजे इतरांनी दोष दाखवले किंवा शेरेबाजी केली असता मी त्या लिखाणातले मला दिसलेले दोष दाखवताना चक्क त्यात हे गुण आहेत असंही म्हटलं होतं. तरीही, ज्यांना ह्यात व्यक्तिगत टिप्पणी आणि तीही अपमानास्पद वगैरेच दिसते त्यांना मग शुभेच्छांशिवाय मी इतर काही देऊ शकत नाही.
कळकळ
>> पण पॅरानोइया आणि "सगळं आलबेल असेल अशी आशा" हे खरोखर चिंता/काळजी ह्यातून आलेले प्रतिसाद होते काय ह्याचा विचार करत आहे.
तुम्हाला पटो न पटो; हा माझा सल्ला छद्मी नसून अत्यंत गांभीर्यानं आणि कळकळीनं दिलेला सल्ला होता. प्रचंड प्रमाणात सरसकटीकरण, मेगाबाईटी प्रतिसाद, सतत इतरांच्या हेतूंविषयी शंका घेत राहणं किंवा त्यात नाही नाही ते बीटवीन द लाइन्स वाचत राहणं ही मला गंभीर लक्षणं वाटतात. मी त्यांची चेष्टा करू धजत नाही.
मोदींवरचा लेख 'लै भारी' असं
मोदींवरचा लेख 'लै भारी' असं मी कुठेही सुचवलेलं नाही.
याबद्दल क्षमस्व. ज्या दिवशी प्रसारभारतीच्या स्वातंत्र्याला मनिष तिवारींनी कसे दडपले या बातमीचा गदारोळ उडाला होता त्यादिवशी आपल्याला ते उल्लेखनीय वाटलं नाही म्हणून मी असं लिहायचं स्वातंत्र्य घेतलं. दोन्ही मुद्द्यांवर आपलं म्हणणं काय आहे हे माहित नसताना अशी विशेषणं लावणं चुकलं हे मान्य.
भाजपनं उडवला की इतर कुणी ते मला माहीत नाही; तसा कोणताही दावा मी केलेला नाही.
मी असं काही म्हटलं नाही हो. आपले एकंदर मोदीप्रेम पाहून "ते जाता जाता आपण का लिहिलं असावं" याबद्दलचा माझा गेस, गेस आहे असे सांगून, लिहिलं आहे. आपणांस काही माहिती नाही या माहितीसाठी धन्यवाद.
लेख उडाला हे खरं आहे
नाही हो. तो आर्काइव झाला आहे.
आणि तेवढंच मी म्हटलेलं आहे.
म्हणजे शब्दश: घ्यायचं झालं तर हे खरं आहे. पण आपली ऐसीवरची जालीय पार्श्वभूमी पूर्णतः विसरून आपला नविन प्रतिसाद वाचायचा अशी अपेक्षा आहे का?
आर्काइव्ह?
जंतू : >> लेख उडाला हे खरं आहे
जोशी : >> नाही हो. तो आर्काइव झाला आहे.
कशावरून लेख आर्काइव्ह झाला? निवडणुकींविषयीचे एप्रिलमधले लेख मला आजही त्यांच्या वेबसाईटवर दिसताहेत. मग हा २९ एप्रिलचा लेख ३० एप्रिलला गायब झाला तो कसा? गंमत म्हणजे खुद्द पूनावालांचा २५ एप्रिलचा हा लेख दिसतो आहे.
अहो, तुमच्या मूळ लेखातली लिंक
अहो, तुमच्या मूळ लेखातली लिंक वाचा. तिथे जे काही उडवलं म्हणून तुम्ही लिहिलं आहे ते घासकडवींनी पहिल्याच प्रतिसाद कुठे आहे ते दिलं आहे. ती लिंक पहा. तो डी एन ए चा आर्काइव आहे. काय राव, मला किती टायपायला लावता?
शिवाय आडकित्ता यांनी तो चोथा नाही हे कंक्ल्यूजन कुठून काढलं?
आर्काइव्ह सांगा कुणाचं?
>> अहो, तुमच्या मूळ लेखातली लिंक वाचा. तिथे जे काही उडवलं म्हणून तुम्ही लिहिलं आहे ते घासकडवींनी पहिल्याच प्रतिसाद कुठे आहे ते दिलं आहे. ती लिंक पहा. तो डी एन ए चा आर्काइव आहे. काय राव, मला किती टायपायला लावता?
घासकडवींचा दुवा वेब आर्काइव्हमधनं लेख शोधून देतो; ते डीएनएचं आर्काइव्ह नाही.
जाता जाता : मला किती टायपायला लावता? इत्यलम्.
-१
>>पण ज्यांना हे 'माहितच आहे' कि त्यांनीच दंगे घडवून आणले त्यांनी न्यायिक सुधारांच्या मागे लागावे. कारण असे लोक सर्वोच्च न्यायालयाकडून सुटणे इष्ट नाही.)
ज्यांना हे 'माहितच आहे' या कॅटेगरीत काही फक्त मोदी अडकावेत असे वाटणारेच लोक येत नाहीत. मोदींनी पुन्हा हे करावे, ते करू शकतील त्यासाठी त्यांचे हात बळकट करायला हवे (म्हणून मागच्या वेळसारखे एनडीएचे बहुमत नको; भाजपचेच पूर्ण बहुमत हवे) असे वाटणारे लोकही आहेत. आणि ते मोदी अडकावे असे वाटणार्यांपेक्षा* संख्येने जास्त आहेत असा अंदाज आहे. ते कशाला न्यायिक सुधारांच्या मागे लागतील?
*मोदींना खडी फोडायला पाठवावे असे मनापासून वाटणारे फार तर दहा पंधरा हजार लोक असतील. दुसर्या प्रकारचे लोक एखादा कोटी तरी असतील.
ज्यांना हे 'माहितच आहे' या
ज्यांना हे 'माहितच आहे' या कॅटेगरीत काही फक्त मोदी अडकावेत असे वाटणारेच लोक येत नाहीत. मोदींनी पुन्हा हे करावे, ते करू शकतील त्यासाठी त्यांचे हात बळकट करायला हवे (म्हणून मागच्या वेळसारखे एनडीएचे बहुमत नको; भाजपचेच पूर्ण बहुमत हवे) असे वाटणारे लोकही आहेत. आणि ते मोदी अडकावे असे वाटणार्यांपेक्षा* संख्येने जास्त आहेत असा अंदाज आहे. ते कशाला न्यायिक सुधारांच्या मागे लागतील?
अर्थातच. अर्थातच. "माहित असणारे शिवाय शिक्षा करू इच्चिणारे" असं म्हणणं जास्त सयुक्तिक झालं असतं.
पण तो शब्द मी वेगळ्या अर्थाने वापरतो - "काही संबंध नसताना, माहिती नसताना, एकिकडे कोर्टावर विश्वास असताना, दुसरीकडे त्याच्या निकाल पाहिला असताना, इ इ मोदी पापी आहे याबद्दल किंचितही शंका नसलेले मूर्ख लोक" - या अर्थाने. म्हणून तो शब्द अवतरण चिन्हांत आहे.
*मोदींना खडी फोडायला पाठवावे असे मनापासून वाटणारे फार तर दहा पंधरा हजार लोक असतील. दुसर्या प्रकारचे लोक एखादा कोटी तरी असतील.
तुम्ही १५ हजार : १ कोटी म्हणत आहात.
कोणी हाच रेशो ५० कोटी : १५ हजार मानत असतील.
?
>>५० कोटी : १५ हजार
५० कोटी लोकांना मोदींना शिक्षा व्हावी असं वाटतं आहे असा तुमचा गेस आहे? तसं खरंच असतं तर एव्हाना मोदी खरोखरच खडी फोडत असते.
मोदींनी पुन्हा पोस्ट गोध्रा घडवावं असं वाटणारे लोक ५० कोटी नसणार असा निर्वाळा आम्हाला 'मोदी आल्यावर तसलं काही होणार नाही' याचं जस्टिफिकेशन म्हणून मिळाला होता.
फाटे फोडण्यात पटाईत आहात,
म्हणून तिरक्या प्रतिसादओळींच्या शेवटी लिहितो.
४. आडकित्ती - हे माहिती नवी नि खरी आहे.
ही माहीती नवी आहे असे मी कुठे म्हटले आहे?
चिंजंबद्द्लही तेच केलेत.
लोकांच्या तोंडी शब्द घालून हातभर प्रतिसाद लिहायचे, अन अमुक असावे अन तमुक नसावे, तमुक वेळी मोदी अपरिपक्व होते म्हणून तमुक बोलले "असावेत" तसे त्यांच्या मनात "नसावे" असले भंपक मनकवडेपणा दाखविणारे लिहायचे, असे उद्योग आपण का करता?
पुन्हा एकदा,
लेखातील माहिती नवी आहे, असे मी कुठे म्हटले?
रच्याकने : आडकित्ता असे ते नामाभिधान आहे. अडकित्ती नव्हे. तुम्ही अरुण जोशी आहात. जोशा नव्हे ;)
मी 'ही माहिती चावून चोथा झाली
मी 'ही माहिती चावून चोथा झाली आहे' असे म्हटले तेव्हा आपण
काही चावून चोथा वगैरे झालेली माहिती नाहिये.
असे म्हटले. अर्थातच 'चावून चोथा झालेली नसणे' आणि 'नवी नसणे' यातही आपल्याला प्रचंड फरक अभिप्रेत होता हे कळले नाही. पब्लिक डोमेनमधली, कितीतरी जागी उपलब्ध असलेली, एक अक्षरही नविन नसलेली, पूनावालाने स्वतः गोळा केलेला डाटा एक बिटही नसलेली अशी ती बातमी आहे. त्यातला शब्दाशब्दावर कितीतरी चर्चा २००२ पासून होत आहे.
इथून पुढे मला काय म्हणायचे आहे ते संपवतो. हे मी जनरली लिहित आहे, कारण व्यक्तिशः आपल्याला निश्चित काय अभिप्रेत असते याचा किस पाडण्यात काही अर्थ नाही.
१. डी एन ए मधला 'लेख' कसा नष्ट झाला ही 'बातमी' आहे.
२. बातमीत बीजेपीचा, मोदी पब्लिक रिलेशन्स सेट अप किती खतरनाक आहे ते लिहिले आहे.
३. बर्याच जणांना वाटते कि मोदी म्हणजे व्यक्तिस्वातंत्र्याचे मारेकरी. ही/अशा घटना त्याची नांदी आहे.
४. असा लेख नष्ट होण्यात पी आर हात आहे म्हणावे तर हे पी आर वाले महामूर्ख आहेत असे ठरते. 'जालावर पोस्ट केलेली गोष्ट' नि 'भात्यातून सुटलेला बाण' हे एकच आहेत. असे नसावे.
५. दुसरे डी एन ए ने स्वत: केले. का? तर लेख भडकाऊ, स्फोटक, इ होता म्हणून. त्याचे तोटे नंतर त्यांना झाले असते म्हणून , इ इ. पण तसेही नाही. जन्मपूर्व - नवी - अलिकडची - चोथा - डायजेस्टेड - असिमिलेट असे माहितीचे वर्गीकरण केले तर ही माहिती 'should be now excreted' सदरात येते. मग आठवणी ताज्या करण्याकरिता? ते ही नाही. हे सगळं इतकं मोघम आहे कि सर्वाना (डी एन ए चे वाचक, इ )माहितच आहे. मग?
६. मला असे म्हणायचे आहे कि
१. Allegations on BJP do not 'make sense'.
2. Allegation on DNA do not 'make sense'.
3. If they make sense, I don't see any problem with allegations. I will not even defend BJP/DNA.
4. This issue cannot be related to press freedom in India looking at the entire history (of allowing, not hindering) of Modi hate.
अमुक असावे अन तमुक नसावे, तमुक वेळी मोदी अपरिपक्व होते म्हणून तमुक बोलले "असावेत" तसे त्यांच्या मनात "नसावे" असले भंपक मनकवडेपणा दाखविणारे लिहायचे, असे उद्योग आपण का करता?
भगवंताने आम्हाला निश्चित निर्णय काढण्याइतकी बुद्धि दिली नाही. नाईलाज आहे.
चिंजंबद्द्लही तेच केलेत.
लोकांच्या तोंडी शब्द घालून हातभर प्रतिसाद लिहायचे
हे मात्र झाले. It was only at the fag end of a very prolonged discussion that I could make out what Chinja wanted to do was basically report a technical snag on DNA at Aisi. अर्थातच हा ही निष्कर्ष चूक असू शकतो.
---------------------------
तुमचं स्पेलिंग करेक्ट लिहिन यापुढे. मुद्दाम म्हणून मी असं लिहित नाही.
+१,
२.
भगवंताने आम्हाला निश्चित निर्णय काढण्याइतकी बुद्धि दिली नाही. नाईलाज आहे.
तुमच्या नाईलाजाबद्दल सहमत, पण, "निश्चित निर्णय काढण्याइतकी" हे शब्द अनावश्यक वाटावेत अशी परिस्थिती,
It was only at the fag end of a very prolonged discussion that I could make out what Chinja wanted to do was basically report a technical snag on DNA at Aisi.
या वाक्यावरून आपणच निर्माण केली आहेत, महोदय.
सिन्स लिट्टील इन्ग्लिश कम्स टू मी टू, लेट मी ट्राय ईन्ग्लीश :
Chinja, was pointing out the fact, that it is NOT archives of the newspaper called DNA. It, is web archives. a site, that archives anything that happens on web. Making any stupid mistakes one commits on net - Immortal. ;) With your level of technical know-how, (looking at threads you have created on MiPa, about the IT trainings,) please DO NOT pretend, that you don't understand the difference :)
To quote myself, and as I say it often,
"कुनाले येडी घालून र्हायले भो? सोताले?"
*
१.
काही चावून चोथा वगैरे झालेली माहिती नाहिये.
अर्थात, अर्धवट कोट करून मुद्दा उडवून लावू नका. "काही चोथा वगैरे नाही, (तुम्हाला प्रतिवाद करता येत नाही म्हणून फक्त तुम्ही असे म्हणताहात)", असेच म्हला म्हणायचे होते; अभिप्रेत होते. तुमच्या अमुक समजून घ्यावे तमूक झाले असावे इ. प्रगल्भ विचारप्रक्रियेत ही माझ्या कंसातली शक्यता आलीच नाही का हो?
परत बगल मारून र्हायले बा तुम्ही. त्या बातमीतला एक बी मुद्दा, त्याचा सोर्स खोडून न काढता हात-हात टंकून र्हायले. काम्हून? काय बिण्डोक बस्लो हाओ का आम्ही इथे वाचायाले?
विषयांतर करू नका हो. मुद्द्याचं बोलता येत नसेल तर टंकू नका. आधीच सांगेल हाये मीनी, का भो लांब आन निरर्थक पर्तिसाद वाचायाचे सत्तर रुपये पडतेत.
*
ता.क.:
पूनावालाने स्वतः गोळा केलेला डाटा एक बिटही नसलेली अशी ती बातमी आहे.
त्यांनी गोळा न केलेला डाटा आहे, त्यात खोटे काय?, की जे 'चावून चोथा झालेय' म्हणून चर्चेबाहेर थुंकून टाकावे, तसेच पूनावालांच्या क्रेडीबिलिटीला हास्यास्पद ठरवून नमोनमो करत बुवांनी भजन करायला लागावे अन आयाबायांनी वाती वळायला घ्याव्यात?
पुन्हा सेल्फ कोट : कुनाले? सोताले?
हे बघा:
हायलाईट केले त्यात मी एक्झॅक्टली तेच म्हणतो आहे, की पूनावाला यांनी (हो, "पूनावाला यांनी". "पूनावालाने" नव्हे. सभ्यता सर्वत्र असावी. सिलेक्टिव्ह नव्हे.) स्वतःच्या खिशातून काहीच लिहिलेले नाही.
एक बिट पण स्वतःच्या खिशातला नाहिये; मग तुमचा प्रॉब्लेम कुठेय?
तुमच्या नाईलाजाबद्दल सहमत,
तुमच्या नाईलाजाबद्दल सहमत, पण, "निश्चित निर्णय काढण्याइतकी" हे शब्द अनावश्यक वाटावेत अशी परिस्थिती,
ते अनावश्यक वाटायच्या वेळेस भगवंताच्या रांगेमधे तुमचा नंबर 'होता'. पण असो, बुद्धिहिनाला तो बुद्धीहीन आहे हे कसे सांगणार? कारण ते तसे आहे हे उमजून घ्यायला पुन्हा त्याच्याकडे बुद्धी लागते. इथे काय करावे हे ठरवण्यासाठी पुन्हा 'निश्चित निर्णय काढण्याइतकी' बुद्धी माझ्याकडे नाही. जाऊ द्या.
Chinja, was pointing out the fact, that it is NOT archives of the newspaper called DNA. It, is web archives. a site, that archives anything that happens on web.
मग पुढे काय? हे मोदीने, त्याच्या पी आर ने, केले? का? लॉजिक काय आहे का त्यात?
मग हे त्या साईटने केले? का? लोजिक काय?
हे मी कितींदा विचारतोय.
With your level of technical know-how, (looking at threads you have created on MiPa, about the IT trainings,) please DO NOT pretend, that you don't understand the difference
काय संबंध? अहो, माणूस डॉक्टर असणे ही उत्क्रांती झाली आहे कि नाही हे सांगण्यासाठी नेसेसरी आणि सफिशियंट कंडीशन आहे इतकं सोपं शास्त्र नाही ते. लै व्हास्ट आहे. आणि ढोंग करायचा काय प्रश्न? का करू? माझा सर्वात पहिला प्रतिसाद पाहा. त्यात लिहिलं आहे -"डी एन ए ने इतक्यात आर्काइव नाही करायला पाहिजे होतं'. म्हणजे पहिला प्रतिसाद टाकताना माझा जो गैरसमज होता तो चिंजंनी स्पष्ट तसं सांगेपर्यंत राहिला.
To quote myself, and as I say it often,
"कुनाले येडी घालून र्हायले भो? सोताले?"
वरचे 'ढोंग करू नका' नि हे व्यक्तित्वावरचे आरोप आहेत. यात वर्तनाच्याच चांगुलपणावर शंका आहे. हे विषयापासून फारच दूर आहे. Let me know if you don't trust what I write. If you don't, this is my last reply.
परत बगल मारून र्हायले बा तुम्ही. त्या बातमीतला एक बी मुद्दा, त्याचा सोर्स खोडून न काढता हात-हात टंकून र्हायले. काम्हून? काय बिण्डोक बस्लो हाओ का आम्ही इथे वाचायाले?
त्या लेखातल्या ९ मुद्द्यांची प्रचंड चीरफाड सर्वत्र झालेली आहे. ती करण्यात मला रस नाही. केवळ याच कारणाकरिता ते मुद्दे खरे आहेत, इ इ मानायचे असेल तर माना, माझे म्हणणे नाही. धाग्याचा किंवा माझ्या आस्थेचा तो विषय नाही. मी फक्त "लै भारी न्यूज मोदीने दाबली" असा सूर असेल तर समाचार घ्यायला इथे आहे. येऊ देत. त्या पूनावाल्याने (मी सुशिल कुमार शिंदे नाही. ओसामाजी वै माझ्याकडे चालत नाही.) जे ८-९ मुद्दे मांडले त्यातला कोणता एक मुद्दा नवा, खळबळजनक, इ इ होता असे म्हणा, पाहू.
विषयांतर करू नका हो. मुद्द्याचं बोलता येत नसेल तर टंकू नका. आधीच सांगेल हाये मीनी, का भो लांब आन निरर्थक पर्तिसाद वाचायाचे सत्तर रुपये पडतेत.
किती झाले आत्ता पर्यंतचे?
पूनावालाने स्वतः गोळा केलेला डाटा एक बिटही नसलेली अशी ती बातमी आहे.
त्यांनी गोळा न केलेला डाटा आहे, त्यात खोटे काय?, की जे 'चावून चोथा झालेय' म्हणून चर्चेबाहेर थुंकून टाकावे, तसेच पूनावालांच्या क्रेडीबिलिटीला हास्यास्पद ठरवून नमोनमो करत बुवांनी भजन करायला लागावे अन आयाबायांनी वाती वळायला घ्याव्यात?हायलाईट केले त्यात मी एक्झॅक्टली तेच म्हणतो आहे, की पूनावाला यांनी (हो, "पूनावाला यांनी". "पूनावालाने" नव्हे. सभ्यता सर्वत्र असावी. सिलेक्टिव्ह नव्हे.) स्वतःच्या खिशातून काहीच लिहिलेले नाही.
एक बिट पण स्वतःच्या खिशातला नाहिये; मग तुमचा प्रॉब्लेम कुठेय?
डी एन ए अनालिसिस चे वाचक असला असतात तर विधान केले नसते. तिथे "अनालिसिस" असतात. चारोळ्या नव्हे.
बाय द वे - आपल्याकडे भल्याभल्या सुपार्या कातरून मिळतात. आमच्या उदगीरला भले भले आडकित्ते तासण्याची भारतातली सगळ्यात मोठी फॅक्टरी आहे.
बुलडाण्यात गावकऱ्यांनी टाकला दलितांवर बहिष्कार
बुलडाण्यात गावकऱ्यांनी टाकला दलितांवर बहिष्कार
दलितांना अगदी दुकानातलं सामानही विकत देण्यात येत नाही. दुकानात जीवनावश्यक वस्तूही विकत दिल्या जात नाहीत. मजुरीचं कोणतंही काम दिलं जात नाही. त्यामुळे या लोकांवर उपासमारीची वेळ आलीय. विद्यार्थ्यांना क्लासला जाण्यासाठी रिक्षांमध्येही घेतलं जात नाही. त्यामुळे विद्यार्थ्यांचं शैक्षणिक नुकसान होतंय. त्यामुळे या समाजाने मतदानावरच बहिष्कार घातला
हत्येच्या निषेधार्थ मूक मोर्चा
नितीन आगे, खर्डा, ता. जामखेड या दलित तरुणाच्या हत्येच्या निषेधार्थ मूक मोर्चा
दि. ६ मे सकाळी १०.३० वाजता
अण्णाभाऊ साठे पुतळ्यापासून (सारसबाग) शनिवारवाड्यापर्यंत (बाजीराव रोड मार्गे)
- मानवी हत्याविरोधी कृती समिती, पुणे
हत्येचे वृत्त :
'भय महाराष्ट्र' - सौजन्य : लोकसत्ता
http://www.dnaindia.com/mumba
http://www.dnaindia.com/mumbai/report-poonam-pandey-booked-for-indecent…
भाजप सत्तेत आली तर स्त्रीया १५ व्या शतकात जातील असे म्हणणारांसाठी.
महाराष्ट्रात काँग्रेसचे सरकार आहे.
अशा तुरळक घटनेचा नि सरकारच्या नितीच्या संबंध नसतो. नव्हे का?
स्वच्छ आकाश
रात्रीचे स्वच्छ आकाश शोधणे आता झाले सोपे, गुगल अर्थ मधे प्रकाशप्रदूषणाचा मॅपही आता उपलब्ध, त्यामुळे तुमच्या जवळचे प्रकाश-प्रदूषण कमी असणारे ठिकाण शोधणे सोपे झाले आहे.
तुम्ही नक्की कोणते स्वच्छ आकाश पहाता हे खाली पहा. -
निषेध सभा
नगर जिल्ह्यात झालेल्या नितीन आगे या तरुणाच्या खुनाच्या निषेधार्थ सभा :
फुले, आंबेडकर ,शाहू ,शिवाजी महाराजांची परंपरा सांगणाऱ्या महाराष्ट्रात अशी घटना घडावी ही बाब सर्वांनाच उद्विग्नता, निराशा आणणारी आणि आत्मपरीक्षण करायला लावणारी आहे. जातीयता आणि स्त्री-पुरुष भेदाचे हे अत्यंत निंदनीय रूप आहे. या घटनेचा निषेध करण्यासाठी विविध संघटना आणि मान्यवरांनी सभा आयोजित केली आहेठिकाण : टिळक पुतळा,मंडई, पुणे
दिनांक : बुधवार, ७ मे २०१४
वेळ: सा. ६ ते ८. ३०
सहभागी: पुरुष उवाच, नारी समता मंच, मिळून साऱ्याजणी, लोकायत, सम्यक, मासूम, सेहत इ. संघटना
भाऊ दाजी लाड संग्रहालयात व्हिडिओ आर्ट
मुंबईच्या भाऊ दाजी लाड संग्रहालयात व्हिडिओ आर्ट
स्थळ - संग्रहालयातील एज्युकेशन सेंटर
वेळ - ४:३० - ५:३०
The Dr. Bhau Daji Lad Museum is pleased to present the May edition of Video Art at the Dr. Bhau Daji Lad Museum, curated by Gayatri Sinha/Critical Collective.
The series of video compilations features works of various artists, whose practices involve video and inter-media, with a wide range of ideas and concerns. The viewing will run over a 12 month period in monthly editions.
The third edition presents women artists who draw from a feminist rhetoric to explore the politics of gender – from scenes of domesticity to pregnancy, childhood and the broader concerns of control and domination. The artists’ works problematise attitudes of beauty and behaviour through the tropes of Bollywood, theatre, text books and comics.
Artists featured:
Shaheen Ahmed, Sharmila Samant, Lu Yang, Pushpamala N., Surekha, Anita Dube, Sonia Khurana, Sutapa Biswas, Zhou Yi
पुण्यात फ्रेंच सिनेक्लब
पुण्याच्या 'आलिआँस फ्राँसेज' संस्थेतर्फे दर महिन्याच्या दुसऱ्या गुरुवारी एक फ्रेंच चित्रपट दाखवला जातो. त्या मालिकेतला पुढचा चित्रपट -
चित्रपट - जाँ द ला फोंतेन - ल देफी (२००७)
दिग्दर्शक - दानिएल व्हिन्य
स्थळ - फिल्म इन्स्टिट्यूट, प्रिव्ह्यू थिएटर
वेळ - गुरुवार ८ मे, सा. ६ वा.
प्रवेशमूल्य नाही.
फ्रान्सचा राजा चौदाव्या लुईच्या काळात युरोपातलं एक महत्त्वाचं सांस्कृतिक केंद्र म्हणून फ्रान्स प्रसिद्ध पावला. त्या काळात होऊन गेलेल्या फोंतेनच्या अनेक कथा आज सुपरिचित आहेत. फोंतेनच्या जीवनावर हा चित्रपट आधारित आहे.
रा.स्व. संघाबाबत
रा.स्व. संघाचा इतिहास व रचना, विविध सरसंघचालकांच्या कारकीर्दीत झालेले भूमिकांमधील बदल व मोहन भागवतांच्या कार्यपद्धतीबाबत खालील सुंदर लेख वाचनात आला. शाखांमधील हिंदू-मुस्लिम संबंधांबाबतच्या चर्चांचे उल्लेख माझ्या अनुभवांशी सुसंगत आहेत.
सकाळ
'सकाळ' च्या ऑनलाईन पहिल्या पानावर आजकाल बरीच गंमत पाहायला मिळते. उदा. एका फॅशन शो दरम्यान सेलिना गोमेझ सहभागी झाली होती किंवा मिस बेलारूसचा किताब व्हिक्टोरिया मिगॅनोविचला मिळाला किंवा टेक्सासमधील गोल्फस्पर्धेदरम्यान खेळताना जोरिना मिलर किंवा चित्रपटाच्या प्रीमियरच्यावेळी टिपलेली ख्रिस्तिना हेंड्रिक्स हिची प्रसन्न मुद्रा किंवा अॅरिझोनामधील बटरफ्लाय स्पर्धेत क्लॅरे दोनहाऊ सामील झाली.
मराठी वर्तमानपत्रांमधील ह्या बातम्या वाचून जगातील विविध महत्त्वपूर्ण घडामोडी कळतात हे फारच छान.
भाषासक्ती
भाषेसंबंधित ह्या बातमीची मराठी संस्थळावर फारशी दखल घेतल्याचे जाणवले नाही.
एक pro-Namo फॉरवर्ड
नुकताच एक pro-Namo फॉरवर्ड आलाय.
इथे पेश्टवण्याचा मोह आवरत नाहिये.
*********************फॉरवर्ड सुरु**************************
सुखाचे दिवस
दि. 18 मे 2034 (हो ! 2034)
स्थळः- माझंच घर !
‘‘बाबा ! बाबा !, ऐका ना !’’,
अबोली अक्षरशः किंचाळत आली.
‘’काय गं ! काय झालंय एवढं आंनंदीत व्हायला?’’
‘’बाबा, मला एक मेल आलाय!’’
‘’कसला मेल?’’
‘’भारतीय निवडणुक
आयोगाकडुन आलाय’’
‘’अरे हो, आज तु 18 वर्षांची झालीस’’
‘’त्याचा आणि मेलचा काय संबंध हो बाबा?’’
‘’अगं जे कुणी वयाची 18 वर्ष पुर्ण करतात ना, त्यांचं
नाव आपोआप मतदारयादीत नोंदवलं जातं आणि मग त्याचे Credentials मेलद्वारे संबंधित व्यक्तीला पाठवले जातात’’
‘’अय्या खरंच का हो बाबा? म्हणजे आता मीही मतदान करणार?’’
अबोलीच्या आनंदाला पारावार नव्हता,
जगातली खुपच मोल्यवान गोष्ट गिफ्ट म्हणुन मिळाल्याचं सुख होतं तिच्या चेहर्या वर...
‘’ ओ बाबा सांगा ना..!’’
‘’ अ !.. हो, खरंय.. आता तु जबाबदार नागरीक झालीस
भारताची, पुढच्या महीन्यातच निवडणुका आहेत..त्यात मतदान करशील तु !’’
‘’ पण किती छान आहे की नै’’
‘’हो गं ! तुमच्यासाठी छानच आहे म्हणा,आमच्यावेळी तर असलेली नाव अचानक गायब
व्हायची!’’
‘’गायब..??’’
‘’ हो .. गायब !...’’
‘’ म्हणजे तुम्हाला असे मेल्स येत नव्हते?’’
‘’कसले बोडक्याचे मेल? मतदारयादीत नाव शोधण्यातच
मतदानाचा निम्मा दिवस निघुन जायचा काहींचा..नाव सापडलंच तर नशीब.. नाहीतर हात हलवत घरी जावं लागायचं’’
‘’Horrible !!! बर झालं मी त्या वेळी नव्हते..’’
‘’ हो ग माझी शोनुली.. मी म्हटलं ना, की तुमचं छान हे
बुवा !’’
‘’ पण बाबा हे असं अचानक मेल्स वगैरे कधीपासुन सुरु
झालं..?’’
‘’नरेंद्र मोदी 18 मे 2014 रोजी म्हणजे आजपासुन बरोबर 20 वर्षांपुर्वी भारताचे पंतप्रधान झाले आणि त्यांनी अचानक चक्रे हलवली, निवडणुक प्रक्रियेतला हा कच्चा दुवा ओळखला व मतदार नोंदणी प्रक्रीया खुपच सुलभ केली.’’
‘’बाबा, नरेंद्र मोदी म्हणजे तेच ना जे आज आपले राष्ट्रपती आहेत ?’’
‘’हो हो तेच ते ! सलग तीन वेळा भारताचे पंतप्रधान झाले चौथ्यांदा ही तेच पंतप्रधान व्हावेत, अशी जनतेची इच्छा होती पण वयोमानानुसार
आजकाल त्यांना जास्त दगदग जमत नाही म्हणुन त्यांनी राष्ट्रपतीपद सोपवण्यात आलं त्यांचं म्हणणं आहे की मी शेवटपर्यंत देशसेवा करत राहीन‘’
‘’Amazing !! खरंच खुप आदरणीय आहेत ते...’’
‘’ हो गं नक्कीच!’’
‘’बर मला सांगा ना, मतदारनोंदणीत सुधारणा करण्यासाठी म्हणजे नक्की काय केलं त्यांनी?’’
‘’ अगं म्हणजे बघ.. त्यांनी एक वटहुकुमच काढला की,
आजपासुन जे कुणी बालक भारतात जन्माला येईल
त्याचं भविष्यातलं 18 वर्ष पुर्ण झाल्यानंतर
मतदारयादीत आपोआप नाव नोंदवलं जावं म्हणुन
प्रत्येक बालकाचा जन्माचा दाखला निवडणुक
आयोगाकडेही पाठवला जावा,
तो पाठवण्याची जबाबदारी संबंधित स्वराज्य संस्थेवर सोपविण्यात आली. नंतर बाळाचं नाव वगैरे ठेवल्यावर
पालक जेव्हा रेशन कार्डात नाव नोंदवतील तेव्हा आपोआप निवडणुक आयोगाकडे असलेली माहीतीही अपग्रेड केली जाते. सदर बालक जेव्हा वयाची 18 वर्ष पुर्ण करते तेव्हा आपोआप त्याच्या सरकारी इ-मेल खात्यावर त्याची Credentials पाठवली जातात’’
‘’पण त्यांना कसं कळतं की हा माझाच मेल आहे किंवा ही मीच व्यक्ती आहे?’’
‘’ अगं वेडे, तुझा जन्म झाल्यावर
तुझ्या जन्माच्या दाखल्यासोबत तुझा रेटीना तुझा डिएनए तसेच तुझा रक्तगट वगैरे सर्व डिटेल्स पाठवले होते.. म्हणजे ते कम्पल्सरीच होतं !’’
‘’ माय् गॉड !! खरंच किती विचार केला होता ना...म्हणजे बघा ना, कुणाचंच फेक नाव ऍड व्हायचा संबंधच नाही ! सगळं कसं अगदी नीटनेटकं आणि विशेष म्हणजे सुटसुटीत !’’
‘’हो ना !’’
‘’ बाबा हे मात्र खरंच खुप मस्त झालं, मला ते तुमच्यासारखं जमलंच नसतं नाव वगैरे तपासायला..
मी मतदान करायचाच कंटाळा केला असता’’
‘’ हो गं ! तसंच व्हायचं म्हणुनच तर आमच्यावेळी 40-50टक्केच मतदान व्हायचं !’’
‘’ आई ग्गं !! अहो बाबा सध्या 95-97 टक्के मतदान होत असतं तरी आम्ही फ्रेंड्स् गप्पा मारताना त्या 3-5 टक्क्यांना शिव्या घालत असतो,, आळशी म्हणत असतो त्यांना’’
‘’ 3-5 टक्के म्हणजे नगण्य आहे गं !,, आमच्यावेळी निम्मी जनता झोपलेली असे आणि उरलेली निम्मी ठरवायची या झोपलेल्यांचा नेता कोण होईल!’’
‘’ खरंय बाबा !!’’
_____________________________________________
__________________
‘’ बाय द वे, तुझ्या सिंधुप्रदेश ट्रिपचं काय झालं गं? सर्व
मित्र मैत्रीणी जाणार होतात ना सिंधु नदी पहायला?’’
‘’अहो बाबा ते खुपच लांब आहे मागे वंगप्रदेशात गेलो होतो तेव्हा खुप थकलोआम्ही’’
‘’अगं वेडे, आपल्या प्राणांची बाजी लावुन आपल्या शूरवीर सैनिकांनी ते दोन प्रदेश..’’
.. माझं बोलणं मध्येच थांबवत अबोली पुढे बोलु लागली,
‘’ हो बाबा ठाऊकाय मला, ‘सिंधुप्रदेश’ आधी पाकीस्तान नावाने ओळखला जायचा आणि बांग्लादेश भारतात सामील करुन घेतल्यावर अखंड बंगालचं नाव ‘वंगप्रदेश’ ठेवण्यात आलं.’’
‘’ अगदी बरोबर,, नॉस्ट्रॅडॅमस ने 400 वर्षापुर्वीच सांगुन ठेवलेलं की पाकीस्तान भारतात विलीन होणार 2018साली.. काय भन्नाट माणुस होता गं तो अगदी तंतोतंत घडलं बघ..!’’
‘’हो ना बाबा, कित्ती कित्ती छान वाटतं आपल्या भारताचा खरा नकाशापाहुन !’’
‘’18 मे 2014 नंतर फक्त एकदाच पाकीस्तानी सैनिकांनी युद्धबंदीचं उल्लंघन केलं आणि मग काय, मोदींनी आदेश सोडायचा बाकी होता फक्त आपले गृहमंत्री व्ही.के.सिंग यांनी पाकीस्तान पुन्हा मिळवला अवघ्या 48 तासांत..!! विशेष म्हणजे झिरो लॉस मध्ये !! ..
पाकीस्तानची हालत पाहुन बांग्ला ने स्वतःच नांगी टाकली!!’’
‘’ हो बाबा, तिथे देखील आपला स्वातंत्र्य दिन साजरा होताना पाहुन खुपच मस्त वाटतं!!’’
_____________________________________________
________________
‘’बाबा, अहो हा आपल्या चलनी नोटेवर सुभाषचंद्र बोस, शहीद भगसिंग, शिवाजी महाराज,स्वातंत्रयवीर सावरकर यांच्याप्रमाणेच हा जो फोटो आहे ‘एम.के.गांधी’ यांच्याविषयी मला जरा सांगा ना जे मला माहीत नाहीये..!’’
‘’अगं, ते थोर देशभक्त होते.. देशासाठी खुप काही केलंय
त्यांनी.. काही निर्णय चुकले म्हणा त्यांचे.. पण देशाला एकत्र आणायचं काम त्यांनी केलं होत देश पारतंत्र्यात असताना..!’’
‘’ बाबा, ते सुद्धा 'भाजप’चेच होते का हो?’’
‘’नाही गं वेडे, ते‘काॅंग्रेसी’ होते!!’’
.
.
.
‘’ कॉंग्रेसी?? .... ‘कॉंग्रेस’ म्हणजे काय..????’’
‘’....’’
‘’सांगा ना बाबा,, ‘कॉंग्रेस’ म्हणजे काय? मी नेटवर पण खुप शोधलं पण सापडत नाहीये कुठंच !!’’
‘’ ........ ’’
.
.
.
मी आपलं मनातल्या मनात सुखावलो...चष्मा पुसला माझा... आनंदाश्रु ओघळलेले.. जुने भयानn दिवस आठवले..पण आता सुखंच सुख आहे !!
..काय सांगु पोरी तुला,,
भारत कॉंग्रेसमुक्त झालाय !!!
आनंदाश्रु आले राव वाचून
*********************फॉरवर्ड समाप्त**************************
शिवाय खाली एक ट्याग लाइन होतीच :-
if you are true patriot, you will vote for BJP.
if you are true patriot, you will support not only Ram mandir at Ayodhya.
You should also fight for Modi mandir at ayodhyaa!
खवचट
खवचट मोड ऑन>
१८ वर्षांची होऊन मेल येईपर्यंत ह्या मुलीला मतदानाचा हक्क कसा काय प्राप्त होतो अशा गोष्टी ठाऊक नव्हत्या. शिवाय, मेलमधलं मराठी लिखाण वाईट आहे. म्हणजे मोदींच्या काळात शालेय शिक्षणाचा दर्जा पुरेसा सुधारला नाही, किंवा ताज्या दमाच्या पिढीची मराठी आणि इतिहासाविषयीची अनास्था कायम राहिली असं म्हणावं का? ;-)
जहॉ डाल डाल पर सोने की चिडिया करती है बसेरा...
खवचट मोड ऑफ>
सांभाळून हो
>> आवडता विषय मिळूनही खवचटपणा कमी पडावा हे अतिशय रोचक वाटलं.
उद्या ऐसीवर जेव्हा खालची सगळी माहिती कम्पल्सरी होईल तेव्हा आपली काही धडगत नाही ह्या जाणिवेनं स्वतःला आवर घातला. म्हटलं आतापासूनच सांभाळून असावं -
’ अगं वेडे, तुझा जन्म झाल्यावर
तुझ्या जन्माच्या दाखल्यासोबत तुझा रेटीना तुझा डिएनए तसेच तुझा रक्तगट वगैरे सर्व डिटेल्स पाठवले होते.. म्हणजे ते कम्पल्सरीच होतं !’’
उद्या ऐसीवर जेव्हा खालची सगळी
उद्या ऐसीवर जेव्हा खालची सगळी माहिती कम्पल्सरी होईल तेव्हा आपली काही धडगत नाही ह्या जाणिवेनं स्वतःला आवर घातला. म्हटलं आतापासूनच सांभाळून असावं -
मोदीला सुपरहीरो बनवण्यात त्याच्या अंधभक्तांप्रमाणेच वरील प्रकारे भॉक् करण्याचाही लै मोठा वाटा आहे असे फुल विनम्र के साथ णमूद करतो ;)
रोचक
’सांगा ना बाबा,, ‘कॉंग्रेस’ म्हणजे काय? मी नेटवर पण खुप शोधलं पण सापडत नाहीये कुठंच !!’
हे रोचक आहे. इतिहास पुनर्लेखनाचा सुद्धा सांगोपांग विचार या कल्पनाविलासात केला आहे असे दिसते. आणि तीन देशांच्या एकत्रीकरणानंतर बांग्लादेश-पाकिस्तानाच्या भारतात आलेल्या लोकसंख्येचे काय झालं म्हणे? २०१४ मध्ये तर भारतातील बांग्लादेशींना देशाबाहेर हाकलायचे ठरवले गेले आहे असे बातम्यांमधून कळले होते.
हापूस आंबा दीर्घकाळ
हापूस आंबा पर्यावरणीय बदल आणि रासायनिक खतांच्या अत्याधिक वापरामुळे धोक्यात
Weather conditions in coastal Maharashtra have undergone a remarkable change in the last decade or so. Temperature, which used to be equitable, is moving towards extremes. Farmers say the difference between the highest and the lowest temperatures is growing. Anand Desai, farmer in Pawas village and leading exporter of Alphonso in Ratnagiri, has analysed the temperature fluctuations wreaking havoc with mango production in the district (see ‘Temperatures then and now’). “Alphonso is a delicate mango crop. Too hot or too cold weather disrupts flowering and impacts production,” he says. “Earlier, temperature fluctuations were occasional, but since 2008 they have become an annual feature. This year has been particularly disastrous.”
....
“Climate change is only one of the many problems Ratnagiri’s Alphonso is riddled with,” says Ashok Ranade, farmer in village Nate in the district. “Bigger damage has been done by unsustainable use of chemicals. It has weakened the trees and made them susceptible to slightest change in weather,” he says.
छत्तीसगड़ डेव्हलपमेंट मॉडेल
'प्रशासनयोग' ह्या सदरांतर्गत अजित जोशी ह्यांनी आजच्या लोकसत्तात दिलेली छत्तीसगड़मधल्या सार्वजनिक वितरण व्यवस्थेतल्या सुधारणांविषयीची माहिती रोचक आहे.
http://indianexpress.com/arti
http://indianexpress.com/article/opinion/columns/singh-and-congress-com…
सुरजीत भल्ला यांनी संजय बारुआ यांच्या पुस्तकाचे परिक्षण (शिफारस) केलेले आहे. संजय बारुआ हे ममोसिं यांचे मिडिया सल्लागार होते ४ वर्षे व त्या ४ वर्षांतील अनुभवांवर त्यांनी पुस्तक लिहिलेय.
आसामची नृत्यपरंपरा
शत्रीय (Sattriya) हा आसामचा पारंपरिक नृत्यप्रकार आहे. आठ महत्त्वाच्या भारतीय नृत्यपरंपरांमध्ये त्याचा समावेश केला जातो. सुनील कोठारी ह्यांनी संपादित केलेल्या Sattriya: Classical Dance of Assam ह्या पुस्तकाचं मुंबईत प्रकाशन आहे. ह्या नृत्यप्रकाराचे जनक शंकरदेव ह्यांच्या आधुनिक भारतातल्या स्थानाविषयी ह्या प्रसंगी चर्चा होईल. आसामचे राज्यपाल जानकी वल्लभ पटनाईक ह्यांच्या हस्ते प्रकाशन होईल. विशेष उपस्थिती : उस्ताद अमजद अली खान, व्हिक्टर बॅनर्जी
पुस्तकाविषयी :
When penance pays off - 'हिंदू'मधून
Dance as a daily offering - 'हिंदू'मधून
नृत्यप्रकाराविषयीचं विकी पान
प्रकाशनाविषयी तपशील :
स्थळ : लिटल थिएटर, NCPA, मुंबई
वेळ : रविवार १८ मे, स. ११ वा.
गरम हवेपासून उर्जानिर्मिती शक्य.
कसे घडेल -
The simplicity of the Company's hybrid solar/wind technology solution is found in its ability to harness the natural power of a downdraft created within the confines of its Tower structure, a hollow cylinder reaching skyward into the hot, dry atmosphere heated by the solar rays of the sun. The water introduced by the injection system near the top of the Tower evaporates and is absorbed by the hot, dry air. The air becomes cooler, denser and heavier than the outside warmer air and falls through the cylinder at speeds up to and in excess of 50 mph. The air is then diverted into wind tunnels surrounding the base of the Tower where turbines inside the tunnels power generators to produce electricity
मराठी - एका मोठ्या दंडगोलाकार मनोर्यासारख्या रचनेमधे सर्वात वरच्या बाजूस (जिथे हवा गरम आहे) पाणी फवारले जाते, तिथली हवा थंड होउन मनोर्याच्या खालच्या भागात खेचली जाते आणि हवेच्या टर्बाईन्समधे सोडून उर्जानिर्मिती केली जाते, रचनाकारांच्या मते गरम ह्वा असल्यास एक संयंत्र साधारणपणे ताशी 1,250 megawatt एवढी उर्जानिर्मिती करु शकते.
व्हिडिओ -
७०५ जणांची मंगळावर जाणार्या
७०५ जणांची मंगळावर जाणार्या (जाऊन येणार्या नव्हे) इच्छुकांमधून निवड झाली आहे त्यात ४४ भारतीय आहेत.
मला हा एक छानसा स्कॅम दिसतो आहे.
इच्छुकांकडून पैसे गोळा करायचे. नंतर त्यांना एका यानात बसवून सोडून द्यायचे. हे यान मंगळापर्यंत वगैरे जाण्याची काही गरज नाही. साधारण पृथ्वीपासून १००० किमी गेले तरी पुरे आहे. त्या तिथे यान ब्लो-अप करून टाकायचे. झाले काम. नाहीतरी हे जाणारे लोक परत न येण्यासाठी जात आहेत. "दुर्दैवाने यानाचा स्फोट झाला" असे जाहीर करून टाकायचे. किंवा मंगळावर पोचवले असे सांगायचे.
पुन्हा नवीन इच्छुकांची नावे गोळा करायची................................
नाटकबाजी
भारताचे ऑलमोष्ट पंतप्रधान नमो यांनी गंगामैयाची ट्विटरवरुन माफी मागितली आहे. ट्विटरवरुन माफी मागता येते तर पूजाही ट्विटरवरुनच का केली नाही बॉ?
http://www.dnaindia.com/india/report-narendra-modi-apologises-to-maa-ga…
अडानी
अडानी समुहाला ऑस्ट्रेलियाचा कोळसा-रेल्वे संबंधी १५ बिलिअन डॉलर्सचा प्रोजेक्ट मिळाला, आता मोदिंना अडानीची गरज जास्त असणार आहे.
डिड वि मिस धिस?
मोदी खरेच आयर्न मॅन(रॉबर्ट डाऊनीची क्षमा मागुन) आहेत, मोदींनी प्रचारासाठी होलोग्राफीक तंत्राचा वापर केला अशी बातमी मी नुकतीच वाचली, हे म्हणजे उदाहरणार्थ थोरच आहे.
अमेठीत पॅरडाइम शिफ्ट?
अमेठीत ह्या वेळेला सत्ताबदल होणार नाहीही, पण ह्या निवडणुकीनं अमेठीत एक पॅराडाइम शिफ्ट आणला आहे का?
तसा दावा करणारे पुष्कळ लेख
तसा दावा करणारे पुष्कळ लेख वाचले, पण ते उघड उघड आपचं किंवा मोदीचं समर्थन करणारे होते. उदा How AAP has gone beyond Modi vs Muslims in Varanasi पाहा
विश्वाचे ज्ञान आता आयफोनवर
स्टिफन हॉकिंगचे 'Snapshots of the Universe' नावाचे अॅप आता आयफोनवर उपलब्ध, स्पेस/टाईमचे मुलभुत ज्ञान सोप्या पद्धतीने शिकवण्याचा प्रयत्न अॅपद्वारे स्टिफनने केला आहे. अॅप सध्यातरी पेड(५ डॉलर्स) आहे.
आयफोनधारकांच्या प्रथमहस्त प्रतिक्रीयेच्य प्रतिक्षेत.
अॅपची झलक -
गुंडे, आयएमडीबी आणि श्रेणीहळवेपणा
आयएमडीबी या संकेतस्थळावर शेकडो बांगलादेशी सदस्यांनी ठरवून 'गुंडे' या चित्रपटाला १० पैकी १ गुण दिला, त्याची कहाणी आणि त्यानिमित्ताने उघड झालेल्या त्रुटी हे अलीकडील चर्चेच्या संदर्भात रोचक वाटले - http://fivethirtyeight.com/features/the-story-behind-the-worst-movie-on…
हा हा हा
(By using a quarter of their character allotment on the hashtag alone, though, there wasn’t much room for the activists to elaborate.)
हे आवडलं.
(A sample call to action: “If you’re a Bangladeshi and care enough to not let some Indian crappy movie distort our history of independence, let’s unite and boycott this movie!!!”)
भारताची ही तौहीन! एकदा मोदी आले की सगळ्या बांगलादेशींना बघून घेतील आणि 'गुंडे'ची यथायोग्य जागी प्रतिष्ठापना करतील अशा आशेत आता मी आहे.
भारताची ही तौहीन! एकदा मोदी
भारताची ही तौहीन! एकदा मोदी आले की सगळ्या बांगलादेशींना बघून घेतील आणि 'गुंडे'ची यथायोग्य जागी प्रतिष्ठापना करतील अशा आशेत आता मी आहे.
पाहिलंत, पाहिलंत, पुन्हा छद्मीपणा. समोरच्याकडे पाहताना आपल्या नजरा इतक्या तुच्छतेने, इतक्या खाली झुकवायच्या की त्याची उंची एखाद्या झुरळाएवढी आहे असं लोकांना वाटावं. शिव्या देण्यापेक्षा असा अपमान लोकांना जास्त लागतो हे तुम्हाला पक्कं ठाऊक आहे.
बरं, तुम्हाला शब्दांत पकडता येत नाही. कारण तुम्ही तुमचे शब्द उद्धृत करून सांगता की मी ''गुंडे'ची यथायोग्य जागी प्रतिष्ठापना करतील' असं म्हटलं होतं, उच्चासनी नेऊन ठेवतील असं कुठे म्हटलं? पण तुमचा गर्भित अर्थ काय असतो हे लोकांना चांगलं कळलेलं असतं कारण तुम्ही मोदीद्वेष्टे आहात. आता तुम्ही म्हणाल कशावरून? - तर अर्थातच अशा गर्भितार्थ असलेल्या कॉमेंटांवरून. यात सर्क्युलर लॉजिक वगैरे बिलकुल नाहीये, आधीच सांगून ठेवतो.
चिंतातुर जंतवाचा भयगंड
१. जाता जाता : ह्या निमित्तानं असं सांगावंसं वाटतं की तुमचं स्वप्नरंजन जर वास्तवाशी एवढ्या मोठ्या सवलती घेत असेल तर ही पॅरानोइयाची लक्षणं आहेत का, हे तपासून पाहणं अगत्याचं ठरेल.
नंतर -
२. तुम्हाला पटो न पटो; हा माझा सल्ला छद्मी नसून अत्यंत गांभीर्यानं आणि कळकळीनं दिलेला सल्ला होता. प्रचंड प्रमाणात सरसकटीकरण, मेगाबाईटी प्रतिसाद, सतत इतरांच्या हेतूंविषयी शंका घेत राहणं किंवा त्यात नाही नाही ते बीटवीन द लाइन्स वाचत राहणं ही मला गंभीर लक्षणं वाटतात. मी त्यांची चेष्टा करू धजत नाही.
म्हटलं कोणी आपली इतकी काळजी करत असेल तर आपणही आपली काळजी अवश्य घ्यावी. अगोदर पॅरानोईयाची, म्हणजे भयगंडाची लक्षणे पाहिली.
१. These individuals typically have a biased perception of the world often exhibiting more hostile beliefs.- आम्ही सगळे लोक छान आहेत असे मानतो. किंबहुना एखाद्या गोष्टीला वाईट म्हणण्याच्या मी विरुद्ध असतो.
२. A paranoid person may view someone else's accidental behavior as though it is with intent or threatening. तुम्ही काहीही म्हटलात तर मी चांगलाच अर्थ काढायला बघतो.
३. An investigation of a non-clinical paranoid population found that feeling powerless and depressed, isolating oneself, and relinquishing activities are characteristics that could be associated with those exhibiting more frequent paranoia. संबंध नाही
४. Some scientists have created different subtypes for the various symptoms of paranoia including erotic, persecutory, litigious, and exalted. इरॉटिक सोडले तर बाकी संबंध नाही.
५. [11] In addition, Sigmund Freud's anal-erotic character triad is a salient symptom of the paranoid person. संबंधच नाही.
६. Some traits of ths character can make group activities challenging which may lead to other social dilemmas. [12] -आमचा आम्ही जिथे जिथे आहोत तिथे तिथे 'अक्ष' असतो.
७. Due to the suspicious and troublesome personality traits of paranoia, it is unlikely that someone with paranoia will thrive in interpersonal relationships. मला तर नेहमी बॉस कोऑर्डीनेशनचे काम देणे पसंद करतो.
८. Most commonly paranoid individuals tend to be of a single status. बायका लेकराशिवाय मी मूवीला जाणे देखिल अवघड वाटते.
९. According to some research there is a hierarchy for paranoia. The least common types of paranoia at the very top of the hierarchy would be those involving more serious threats. Social anxiety is at the bottom of this hierarchy as the most frequently exhibited level of paranoia. मला भय कशाचे आहे याचा कितीतरी विचार करून काहीच आठवेना. सोमवार सकाळचे भय असते. बाकी नाही.
असो, तरी मनोरुग्णांनी स्वतःचे निदान करू नये म्हणतात. पुढच्या खेपेला अवश्य डोक्टरकडे जाईन.
आता विचार केला हा संवाद, इतका का लांबला? (दिल्लीच्या उन्हाळ्यात शनिवार कसा घालवणार हा प्रश्न बाजूला ठेउ.)
मग चिंजंचा शेवटचा प्रतिसाद वाचला-
घासकडवींचा दुवा वेब आर्काइव्हमधनं लेख शोधून देतो; ते डीएनएचं आर्काइव्ह नाही.
मी पुन्हा पाहिलं. हे खरंच आहे. यूआरएल मधे डीएनए, आर्काइव असं लिहिलं आहे, बातमी डिट्टो डीएनएवर दिसते तशी दिसते. पण ती साईट डी एन ए ची नाही.
मग विचार केला कि संवाद नक्की कशासाठी चालला आहे.
१. चिंज - प्रेसचे २०१४ मधील स्वातंत्र्य. जाता जाता - मोदींवरचा एक लै भारी लेख डीएनए ने उडवला /बीजेपीने त्यांच्याकडून उडवोन घेतला, इ इ जे काही त्यांना म्हणायचे होते.
२. घासकडवी - तो लेख आर्काइव मधे आहे.
३. अरुणजोशी - बीजेपीने तो लेख काढला नसावा. मोदींविरुद्ध काहीही गरळ ओकल्याने विश्वासार्हता कमी होईल म्हणून आर्काइव केले असेल. (तेही चूकच आहे). ही सर्व माहिती प्रचंड जूनी आहे.
४. आडकित्ता - हे माहिती नवी नि खरी आहे.
चिंजनी 'डीएनएवरचा "लेख" कसा उडवला' ही "बातमी" मूळ धाग्यात दिली. त्या "बातमीत" मोदीच्या पी आर ला बदनाम केले होते. चिंजंना त्या "बातमीत" जे म्हटले आहे ते म्हणायचे असावे, सहानुभूती असावी, इ इ वाटून मी त्या "बातमीत" काही तथ्य नाही असे लिहिले. तरी चिंजना स्वतःला काय म्हणायचे होते ते मला काय माहित? पण त्यांना हा लेख इथे द्यावासा वाटला तेव्हा तो त्यांच्या दॄष्टीने महत्त्वाचा असणार. म्हणून मी "लै भारी" असे म्हणालो. चिंज म्हणाले कि त्यांना ते ही म्हणायचे नव्हते. (दरम्यान इतरांना यांना "लेख" रोचक वाटला, जेव्हा कि मला डीएनएच्या दर्जाचा वाटला नाही.)
डीएनए झी समूहाचे आहे (रीड -प्रो-बीजेपी), तेव्हा पूनावालाचा तो (माझ्यामते तद्दन फालतू, रटाळ)लेख पहिल्यांदा छापणे नि नंतर मिटवणे यामागे काय कारण असावे असे चिंजंना वाटते? २९-०४-१४ ला भाजपचे सरकार आहे का मोदीने दडपण आणले म्हणायला? जर त्याच्या शिवाय ही आणले म्हणायचे तर ११ वर्षे ६ महिने सतत माध्यमांच्या शिव्या का खाल्ल्या? त्याही इतक्या तिखट?
आता डी एन ए ने तो "लेख" मिटवला म्हटले तर का? त्यात लेखात काहीच नविन नव्हते. अँटी-मोदी बारुद असतो तसाच होता. उलट भाषा प्रचंड सभ्य होती. काही गोष्टी (अर्ध्या? पाव?) तर उघडच मान्य कराव्यात इतक्या सरळ होत्या (जसे ताण, मृत्यू १-२ महिने चालले). मग तो मिटवण्यात डीएनएला काय मिळाले? भाजपचे पैसेही नाही.
त्या लेखावर भाजपची वा डीएनए ची (जसे "बातमी" सविस्तरपणे त्याबद्दल बोलते) नक्की काय भूमिका होती, कृती होती असे चिंजंना म्हणायचे होते म्हणून त्यांनी स्नोडेन सोबत तो ही दाखला दिला.
मग मी प्रतिसाद पुन्हा वाचले. (खूप रिकामा वेळ हो). खालिल निष्कर्षाला आलो -
"जाता जाता अवांतर - डी एन ए पेपरातली कोणती एक लिंक तांत्रिक कारणांनी खराब झाली आहे." असे म्हणायचे असावे. बाकी काही म्हणायचे आहे असे दिसेना. त्यांना इतर काहीतरी म्हणायचे आहे असे समजून लिहिल्याने चूकाच चूका होऊ लागल्या होत्या. असो.
गाव आणि गावकुसाबाहेरची वस्ती
'गाव आणि गावकुसाबाहेरची वस्ती. या दरम्यान एक अदृश्य तणाव असतो. एकीकडे असतो उन्माद, तर दुसरीकडे असतं भय. या भयाची अनेक रूपं असतात आणि त्यांचं ओझं वागवत वस्तीतली माणसं जगत असतात. खर्डा गावातल्या अमानुष घटनेनंतर दलित वस्त्यांमध्ये फिरुन टिपलेले अनुभव...'
युरोव्हिजन साँग काँटेस्ट २०१४
ह्या वर्षीची युरोव्हिजन साँग काँटेस्ट ऑस्ट्रियाच्या कोंचिता वुर्सटनं जिंकली आहे. गाण्याचा व्हिडिओ -
(वैधानिक इशारा - ड्रॅग क्वीन्समुळे ज्यांना शिसारी वगैरे येते त्यांनी व्हिडिओ आपापल्या जबाबदारीवर पाहावा.)
https://www.youtube.com/watch?v=ToqNa0rqUtY
कोंचिताविषयी अधिक माहिती.
ऑस्ट्रियानं देशाचं प्रातिनिधित्व एका ड्रॅग क्वीनला देण्याविरोधात बेलारूसमधून केल्या गेलेल्या तक्रारीच्या एका याचिकेतून -
‘Thanks to European liberals, the popular international contest, which is to be watched by our children, has turned into a hotbed of sodomy.'
...
वेब्स्टरकाकांकडे चौकशी केली असता पुढील व्याख्या मिळाली:
drag queen (noun)
: a homosexual man who dresses as a woman especially to entertain people
Full Definition of DRAG QUEEN
: a male homosexual who dresses as a woman especially for comic or theatrical effect
(अतिअवांतर: 'आपण' ज्यांना तृतीयपंथीय म्हणतो, ते (१) दरवेळेस समलिंगी असावेत, आणि/किंवा (२) लोकांच्या करमणुकीसाठी तसा पेहराव परिधान करीत असावेत, याबद्दल प्रचंड साशंक आहे.)
काढून टाकलेला लेख इथे वाचायला
काढून टाकलेला लेख इथे वाचायला मिळेल.