भोजनकुतूहल : दृक-श्राव्य माध्यमं

या धाग्याची प्रेरणा भोजनकुतूहल-१.
विविध पाकविधा, एखादा विविक्षित पदार्थ आणि त्यापाठचा सांस्कृतिक-ऐतिहासिक पसारा दाखवणार्‍या, एकंदर खाद्यसंस्कृतीमधल्या कुठल्याही घटकावर आधारित, त्या घटकाला वाहिलेल्या किंवा त्या घटकाचा वापर करणार्‍या दृक-श्राव्य माध्यमाविषयीचा हा धागा.

वानगीदाखल :
१) जपानमधल्या Jiro Ono या सुशीशेफवर (सुशीमास्टर Smile ) बनवलेला हा Jiro Dreams of Sushi माहितीपट. सुशी ह्या जापनिज पदार्थाला आयुष्य वाहिलेल्या जिरोच्या चित्तरकहाणीत, ट्युना माशाच्या लिलावापासून सुशीच्या विविध रुपांचे लज्जतदार दर्शन घडते. २०११ मधल्या उत्तम माहितीपटांत या पटाची गणना होते.
२) पॅस्ट्रीज बनवणारे हे फ्रेंच अवलिये : Kings of Pastry
३) रातातुई (उच्चारांबद्दल क्षमस्व!) बद्दल सांगायलाच नको! : Ratatouille

तर अशाच खाण्याभोवती भिरभिरणार्‍या चित्रपटांविषयी ऐकायला आवडेल.
केवळ चित्रपट-माहितीपटच नव्हेत; सर्वभाषिक, आवडीच्या, आवर्जून उल्लेखाव्या वाटणार्‍या, माहिती-पदार्थांनी सजलेल्या, आडवाटेने जाणार्‍या टीवी कार्यक्रमांविषयी, यु-ट्यूबादि विडीओंविषयी ऐकायला, चघळायला आवडेल.

Taxonomy upgrade extras: 
field_vote: 
4
Your rating: None Average: 4 (2 votes)

Anthony Bourdain अँथनी बोर्डेन (अमेरिकन उच्चार) ह्याची 'पार्ट्स अननोन'नावाची सीरियल सध्या बरेच दिवस सीएनएन वर चालू आहे. वेगवेगळ्या देशांतील आणि गावांतील खाद्यपदार्थ अणि खाद्यसंस्कृति ह्यांची ओळख करून देणारा हा कार्यक्रम बराच पॉप्युलर असावा असे वाटते.

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

Anthony Bourdain चि 'Anthony Bourdain: No Reservations' ही मालिका पुर्वि ट्रॅवल चॅनलवर होती. ति मला नविन 'parts unknown'पेक्षा जास्त आवडत असे. नो रिझर्वेशन्समध्ये तो कमी सावध, जास्त वात्रट आणि भयंकर प्रसिद्ध नसल्याने नैसर्गिकपणा जास्त होता. आजकाल तो William Burroughs चे नाव घेउन मोराक्कोला जातो पण कुठलाच अंमलि पदार्थ न घेतल्याचा दावा करतो. सिएनएनने त्याला बि घडवले.

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

__________
श्रेणिव्यवस्था जिंदाबाद - मालकशाहि जिंदाबाद

La Grande Bouffe. मरेपर्यंत खाण्याच्या इच्छेने एकत्र जमलेल्या चार मित्रांची कथा. बीभत्स डुक्करमहोत्सव. जरूर पहा.

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

कोकोसाठी उकळते पाणी (Like Water for Chocolate, विकी दुवा)

या पुस्तकावर आधारित चित्रपट (विकी दुवा)

पुस्तकात बारा पाककृती आहेत. चित्रपटातही स्वयंपाक आणि पक्वान्नांचे भावनांवर जादूसारखे परिणाम मध्यवर्ती आहेत.

Eat Drink Man Woman

या चित्रपटात एक चिनी बावर्ची आपल्या तीन मुलींना पक्वान्नांची जेवणे घालतो, त्या कुटुंबाची कथा आहे.

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

दुसरा चित्रपट पाहिला आहे, सुरेख आहे.

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

image

टोनी शलूबची मुख्य भूमिका असलेल्या या सिनेमात अमेरिकेत इटालियन रेस्तराँ चालविणार्या दोन भावांची गोष्ट आहे. उत्तम इटालिअन शेफ असलेल्या आणि आपल्या व्यवसायावर निष्ठा असलेल्या भावांची अमेरिकन ग्राहकांना त्यांना अपेक्षित असलेले इटालियन पदार्थ आपल्या तत्वांशी तडजोड न करताना होणारी कुचंबणा, त्यांचा संघर्ष हे सारे फार सुरेखपणे व्यक्त झाले आहे. सिनेमात एकंदरच इटालियन समाजात आसाणारे खाद्यसंस्कृतीचे महत्व आणि त्यातून व्यक्त होणारे नातेसंबंध फार छान फुलवले आहेत, आवर्जून पहावा असा सिनेमा.

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

Delicatessen ही अन्नाचे दुर्भिक्ष्य असलेल्या फ्रान्समध्ये घडत असलेली एक ब्लॅक कॉमेडी. पहिला अर्धा तास कदाचित प्रेक्षकाची परीक्षा पाहणारा हा सिनेमा नंतर मात्र विलक्षण पकड घेतो. याचा पाकसंस्कृतीशी कितपत संबंध जोडता येईल माहीत नाही. आणखे एक लांबून लांबून म्हणजे मालगुडी डेजमधली मिठाईवाला ही कथा. फार म्हणजे फारच आवडलेली.

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

__________
श्रेणिव्यवस्था जिंदाबाद - मालकशाहि जिंदाबाद

डेलीकटेसन (आमिलीची लिंक Smile ) पाहिला होता. विषयाला टॅन्जन्शियल असला तरी उल्लेखनीय नक्कीच आहे. वरील इतर प्रतिसाद पाहता अशा चित्रपटां-बाबतीत फ्रेंचांनीच मजल मारलेली आहे असे दिसले.
तुमच्या पोतडीतून अजुन अशा फिल्म्स/ कार्यक्रम निघतील अशी आशा!
आणि चिंजंना आणि चिजंना (चित्रपट जंतूंना) आवतण.

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

Estomago: A Gastronomic Story (2007)

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

The frequency of Rejection is measured in Hurtz.

आपले मत आपल्या पार्श्वभागात (गांडीत) घालावे स्पेशली जर व्याकरण विषयी असेल तर!