बाबागाणी..१
झोप आता माझ्या बाळा वाजले रे बारा..
दुधासाठी पिशवी लावून येतो दारा..
पाहू नको शिनचॅन, फार वांड झालाय..
झोपवण्या तुला बघ डोरेमॉन आलाय..
बाबाच्या ढेरीवर टाक तुझे पाय..
बापाचाच माल तुझ्या, पर्वा तुला काय?
गळा माझ्या मिठी मारुन झोप ढाराढूर..
उद्या मला सुट्टी, उद्या जाऊ दोघे भूर..
लपवून ठेवू उद्या आजोबांची सिगरेट
कोणालाच ठावे नाही, तुझं माझं सिक्रेट..
-गवि
प्रतिक्रिया
भारीच गाणं. पण हे गाणं ऐकून
भारीच गाणं.
पण हे गाणं ऐकून पोरं झोपणार नाही, खुदुखुदु हसत बसेल आणि अजून गाणी ऐकवा म्हणून हट्ट धरून बसेल.
------------------------
घणघणतो घंटानाद
+1
रात्रीचे बारा वाजल्यानंतर
रात्रीचे बारा वाजल्यानंतर निरनिराळ्या व्यक्तींचे निरनिराळी कामे निघतात हे जाणवले!
मधुमेहा विरुद्ध लढा
माझी जालवही
मस्तच
मस्तच! वर घांटासूर म्हणतात तसं व्हायची शक्यता अधिक आहे
- ऋ
-------
लव्ह अॅड लेट लव्ह!