दखल
#ऐसीअक्षरे #दिवाळी२०२३
दिवाळी अंक पाहिलात का?
दिनवैशिष्ट्य
१३ जून
जन्मदिवस : कवी डब्ल्यू.बी. येट्स (१८६५), क्रांतिकारक बाबाराव सावरकर (१८७९), लेखक फर्नांदो पेसोआ (१८८८),टेनिसपटू डॉन बज (१९१५), अभिनेता माल्कम मॅक्डॉवेल (१९४३), लेखक दत्ता भगत (१९४५), गणितज्ञ ग्रिगोरी पेरेलमॅन (१९६६)
मृत्युदिवस : शिल्पकार विनायक पांडुरंग करमरकर (१९६७), वक्ते, लेखक, संपादक, सिनेदिग्दर्शक व संयुक्त महाराष्ट्र चळवळीचे नेते प्र. के. अत्रे (१९६९), वगसम्राट दादू इंदुरीकर (१९८०), गायक मेहदी हसन (२०१२)
---
१९४० - क्रांतिकारक उधमसिंग यांना फाशी.
१९५६ - फूटबॉल : पहिली युरोपियन चँपियन्स कप स्पर्धा रेआल माद्रिदने जिंकली.
१९७१ - 'न्यू यॉर्क टाइम्स'ने अमेरिकन सरकारच्या व्हिएतनाम युद्धातील कामगिरीबाबतचे गोपनीय पेंटॅगॉन पेपर्स प्रकाशित करायला सुरुवात केली.
१९९७ - दिल्लीतील 'उपहार' चित्रपटगृह आगीच्या भक्ष्यस्थानी; ५९ मृत.
२००० - स्पेनमधील माद्रिद येथे एकाच वेळी १५ स्पर्धकांविरुद्ध खेळताना विश्वनाथन आनंद याने बारा लढतींत विजय मिळवला, तर तीन लढती अनिर्णित राखल्या.
२००२ - अँटिबॅलिस्टिक मिसाइल करारातून अमेरिकेची माघार. रशिया, फ्रान्स, ब्रिटन व चीन अजूनही करार पाळतात.
२००४ - भारत आणि रशियाची संयुक्त निर्मिती असलेल्या, जमिनीवरून जमिनीवर मारा करणाऱ्या ब्राह्मोस क्षेपणास्त्राची यशस्वी चाचणी.
दिवाळी अंक २०२३
आवागमन (navigation)
सध्या कोण कोण आलेले आहे?
There is currently 1 user online.
- बॅटमॅन
अजुन एकही प्रतिसाद नाही ?
अजुन एकही प्रतिसाद नाही ? कमाल आहे बुवा !
नको!
नको हो हा छ्ळ!
-Nile
आपली?
पुणे वॉरियर टीम 'आपली' कशी?
पु ल देशपांडे
पु ल देशपांडे यांच्या भाषेत "तेव्हढ्यात मी सरोज खरेला आपलीशी केली" या धर्तीवर हे असावे असा एक अंदाज आहे.
नो आयडियाज् बट इन थिंग्ज.
'आयपील' म्हणायचं असावं
'आयपील'
म्हणायचं असावं त्यांना. बघा वाक्य जुळतयं.
काही जुन्या आठवणी जाग्या
काही जुन्या आठवणी जाग्या झाल्या.
---
सांगोवांगीच्या गोष्टी म्हणजे विदा नव्हे.
या धाग्यावरची अनुप्रासयुक्त
या धाग्यावरची अनुप्रासयुक्त नावे वाचून या टीमला "पुणे वॉरियर्स" ऐवजी "पुणे पानिपत" हे नाव सर्वथा योग्य झाले असते असे वाटले.
किंवा "पुणेरी खवचट्स"
किंवा "पुणेरी खवचट्स"![Wink](https://aisiakshare.com/sites/all/modules/smiley/packs/kolobok/wink.gif)
माहिष्मती साम्राज्यं अस्माकं अजेयं
"पुणे पानिपत" आवडल्या गेल्या
"पुणे पानिपत" आवडल्या गेल्या आहे. आणखीन काही...
"पुणे पंडित्स"
"पुणे पॉझिटिव्ह्ज" (पुणे तिथे काय उणे?)
"पुणे बामणहरीज" (घाशीराम फेम)
"पुणे मावळाज"
"पुणे माहेरियन्स" (पुणे हे सगळ्याच चांगल्या गोष्टीचं माहेरघर आहे म्हणून... अर्थात त्या सगळ्या सासरी कुठे जातात हे विचारू नये)
"पुणे बोळाइट्स" (गल्ल्या आणि बोळांशिवाय पुण्याची कल्पना तरी करता येते का?)
"पुणे पेठाइत्स"
अहो , मागील 3 वर्षाँपासुन
अहो , मागील 3 वर्षाँपासुन पुणे पहिले 2 सामने सलग जिँकते व नंतर सलग हार खाते. यावेळी मात्र ती सलग 2 वेळा हारली आहे , मग हा उलट शुभ संकेत आहे ! आणि आपल्या पुणे शहराचे ज्याने जगात नाव रोशन केले त्या पुणे वॉरियरला लोक का नाव ठेवतात ते समजत नाही! बाकी आज काही असो आयपीएल 15 चा विजेता मात्र पुणे असणार ! बाकी प्रतिसादा बद्दल धन्यवाद .!
मुम्बई इण्डियन्स
मला तरी सचिन तेण्डुलकरमुळे मुम्बई इण्डियन्स ही टीम 'आपली' वाटते बॉ. पुण्याच्या टीममध्ये पुणे किंवा महाराष्ट्राचे म्हणावे असे विशेष कोणी नाही.
आपल्या पुणे शहराचे ज्याने
याचा नक्की अर्थ कोणी सांगणार का?
---
सांगोवांगीच्या गोष्टी म्हणजे विदा नव्हे.
वर्ल्डफेमस!
अहो ते पुण्यात "वर्ल्डफेमस" असं म्हणताहेत!
-Nile
:)
नो आयडियाज् बट इन थिंग्ज.
हाहाहा!
काय 'प्रहार' केलाय IPL वर
मित्रांनो पुणे वॉरियर मध्ये
मित्रांनो पुणे वॉरियर मध्ये पुण्याचे श्रीकांत वाघ , अभिषेक नायर , अभिषेक झुनझूनवाला असे महाराष्ट्रीयन खेळाडू आहेत. पुढच्या वर्षी सर्व खेळाडुंचा लिलाव होणार आहे तेव्हा बरेच मराठी खेळाडू घेण्याचा सहाराश्रीँचा मानस आहे . अचानक टीम तयार झाल्यामुळे बरेच खेळाडू अगोदरच इतर संघात होते. त्यामुळे अशी टीम तयार झाली आहे . एनी वे उद्या तुमच्या सपोर्टची पुण्याला गरज आहे .
उद्या तुमच्या सपोर्टची
हा काय प्रकार आहे? पुणेरी लोक असे नाक घासतात, ते ही मुंबई, नाशिक, धुळे, कोल्हापूर, टेक्सस, युरोपच्या मराठी लोकांसमोर? काय लाज राहिली पुण्याची आणि महाराष्ट्राचीही!
---
सांगोवांगीच्या गोष्टी म्हणजे विदा नव्हे.
धनंजय वैद्य पुण्याचे
धनंजय वैद्य पुण्याचे असण्याबद्दल पुरेसा पुरावा उपलब्ध नाही, सबब वरील विधान लोडेड आहे असं वाटतं, बाकी भावनेशी सहमत.
ठीक आहे. मग विधान थोडं बदलते.
अरेरे! काय ही वेळ आली पुण्याची टीमवर. पुण्याबाहेरची वाटावी अशी व्यक्ती पुण्याच्या टीमसाठी 'सपोर्ट'चा जोगवा मागत्ये! काय लाज राहिली पेशव्यांच्या पुण्याची?
लोडामि लोडावः लोडामः
---
सांगोवांगीच्या गोष्टी म्हणजे विदा नव्हे.
आता पुणं पेशव्यांचं राहिलं
आता पुणं पेशव्यांचं राहिलं नाही(इतिहास कच्चा), इतरांचे धुणे धुणार्यांना/खराब करणार्यांना पुणेकरांनी जेवढा सल्ला द्यावा तेवढं कमीच आहे.
पूर्वीचं पुणं राहिलं नाही
पुण्याचा जाज्ज्ज्ज्ज्वल्य अभिमान राहिला नाही कोणाला.
झुनझुनवाला आणि नायर यांना पुणेकर म्हणण्याची वेळ आली.
अवांतर: परवाच एक जण सांगत होता. पूर्वी लोक लंचटाइम मध्ये कमिन्समधून डहाणूकर कॉलनीतल्या घरी जाऊन जेवून वामकुक्षी घेऊन पुन्हा कामावर येत. हल्ली बर्याच जणांच्या बाहेरगावी बदल्या केल्या गेल्यामुळे तसं करता येत नाही. हा घोर अन्याय आहे. आदिवासींना त्यांच्या जीवनशैलीतून उचकटून नागरी बनवू नये म्हणून मेधा पाटकर आदि लोक भांडतात. पुणेकरांनाही त्यांच्या जीवनशैलीतून उठवणार्यांबद्दल कोणीच काही बोलत नाही.
--------------------------------------------
ऐसीवरील गमभन इतरांपेक्षा वेगळे आहे.
प्रमाणित करण्यात येते की हा आयडी एमसीपी आहे.
>>अवांतर: परवाच एक जण सांगत
जसं ठाणं उपनगरात मोडतं नं, तस्स्सच पुर्वी डहाणूकर कॉलनी उपपुणं होतं त्याला पुणं म्हणणं म्हणजे उदाहरणार्थ थोर आहे.
पुण्याची काळजी एकंदर 'ठाणेकरांना' आहे हे पाहून विशेष वाटलं, असो, पुण्याबद्दलचं आकर्षण बर्याच नगरी...उप्स..उपनगरी लोकांना आहे.
सुधारणा
ठाणं हे उपनगरात मोडत नाही. ते (पूर्वीपासून- गोपाळराव जोशांच्यावेळीसुद्धा) स्वतंत्र शहर(?) होतं.
--------------------------------------------
ऐसीवरील गमभन इतरांपेक्षा वेगळे आहे.
प्रमाणित करण्यात येते की हा आयडी एमसीपी आहे.
पुण्याबद्दलचं आकर्षण बर्याच
पुण्याबद्दलचं आकर्षण सगळ्या नवयुवक नगरी लोकांना असते. आम्हालाही होते. पुण्याशिवाय दुसरे मोठे शहर पाहेपर्यंत ते टिकले.
पुण्याचा जाज्ज्ज्ज्ज्वल्य
निषेध!
एकीकडे पेठेबाहेर पुणं नाही यावरून पुणेकरांना नावं ठेवायची आणि दुसरीकडे थोडा उदारमतवाद दाखवला तरी त्यावरूनही दोष द्यायचा! याला काय अर्थ आहे? एखाद्या दहशतवाद्याने माफी मागितली तर त्याचं पुनर्वसन करण्याजागी त्याला त्याच्या भूतकाळावरून बोलून परत अतिरेकाकडे ढकलायचं. हा पुणेद्वेष आहे फक्त!
---
सांगोवांगीच्या गोष्टी म्हणजे विदा नव्हे.
अहो प्रच्छन्न पुणेकरीण बै,
अहो प्रच्छन्न पुणेकरीण बै, गपा की जरा!
माहिष्मती साम्राज्यं अस्माकं अजेयं
सहाराश्री
सहाराश्री सुब्रतो रायच्या मागे सेबी बऱ्याच महिन्यांपासून आहे. ते लवकरच चतुर्भुजही होऊ शकतात.
सपोर्ट
आमच्या सपोर्टशिवायही पुणे उद्या हरणारच आहे....
एक म्हणजे मी पुण्याचा नसुन
एक म्हणजे मी पुण्याचा नसुन नगरचा आहे. दुसरे की मी पुणे विद्यापीठाचा विद्यार्थी आहे. तसेच पुणे माझ्या आवडत्या शहरापैकी एक आहे . आणि त्यामुळे मी पुण्याला सपोर्ट करतो. यात नाक घासण्याचा प्रश्नच येत नाही ! उद्या तुमच्या कुटूंबाची तुम्ही स्तुती करत असाल , कुटूंबाचा तुम्हाला अभिमान असेल तर तुम्ही नाक घासता हे बोलणे तुम्हाला शोभेल काय?
... हे बोलणे तुम्हाला शोभेल
माझी चूक झाली. सर्वसामर्थ्यवान पुण्याच्या समर्थकांबद्दल मी असं बोलण्याची चूक करायला नको होती. ही माझ्या आयुष्यातली एक मोठी राजकीय चूक आहे. त्याबद्दल मी
नाक घासतेमाफी मागते.---
सांगोवांगीच्या गोष्टी म्हणजे विदा नव्हे.
गुढीपाडव्याच्या शुभ
गुढीपाडव्याच्या शुभ मुहूर्तावर पुणे वॉरियर्सने विजयी गुढी उभारली आहे ! तमाम पुणे प्रेमिँना शुभेच्छा ! माझा अंदाज खरा ठरला . परवाच्या सामन्यासाठी शुभेच्छा !
हाबिणंदण
हाबिणंदण!
आदिती ताई राग मानु नका शेवटी
आदिती ताई राग मानु नका शेवटी आपण महाराष्ट्रीयन!
आज पुण्याला जिँकण्यासाठी
आज पुण्याला जिँकण्यासाठी शुभेच्छा !
पुणे 40 रन्सने हारले !
पुणे 40 रन्सने हारले ! पुण्याचा जाहिर निषेध ...!
+
पुण्याला हरवल्याब्द्दल मुंबईचा छुपा निषेध !!!!
--------------------------------------------
ऐसीवरील गमभन इतरांपेक्षा वेगळे आहे.
प्रमाणित करण्यात येते की हा आयडी एमसीपी आहे.
तुमचा पुणेद्वेष फळला हो
तुमचा पुणेद्वेष फळला हो ठाणेकर. आता दादोजीला जाऊन फटाके फोडा.![Tongue](https://aisiakshare.com/sites/all/modules/smiley/packs/kolobok/tongue.gif)
---
सांगोवांगीच्या गोष्टी म्हणजे विदा नव्हे.
ठाणे ठाकूर्स अशी टीम
ठाणे ठाकूर्स अशी टीम निघेपर्यंत आपुन सबकाइच द्वेष करेंगा.
--------------------------------------------
ऐसीवरील गमभन इतरांपेक्षा वेगळे आहे.
प्रमाणित करण्यात येते की हा आयडी एमसीपी आहे.
आमचे "घंटाळी घटोत्कच"
आमचे "घंटाळी घटोत्कच" येईपर्यंत आम्ही बाकी सगळ्यांचा द्वेष करणार.
---
सांगोवांगीच्या गोष्टी म्हणजे विदा नव्हे.
हे पहा प्यार्टी करा.
हे पहा प्यार्टी करा.
---
सांगोवांगीच्या गोष्टी म्हणजे विदा नव्हे.
शेवटच्या 16 ओवरपर्यँत सामना
शेवटच्या 16 ओवरपर्यँत सामना हातात होता, 117/3 अशी अवस्था होती मुंबईची पण त्या आत्मघातकी डिँडाला ओवर देऊन पुण्याने आपल्या पायावर धोँडा मारून घेतला!
Pune crush chennai by 24
Pune crush chennai by 24 runs. जय पुणे वॉरियर्स !
आयला
चेन्नैला हरवलं म्हणजे पुणे स्पर्धेत आहेत असे दिसते
आता प्रत्येक सामन्यात स्मिथला
आता प्रत्येक सामन्यात स्मिथला खेळवण्याची सुबुद्धी निवडसमितीला द्यावी हिच इच्छा !
आता प्रत्येक सामन्यात स्मिथला
आता प्रत्येक सामन्यात स्मिथला खेळवण्याची सुबुद्धी निवडसमितीला द्यावी हिच इच्छा !
आज कोण जिँकणार ? पुणे की
आज कोण जिँकणार ? पुणे की हैदराबाद ?
मुर्ख वॉरियर हारले !
मुर्ख वॉरियर हारले !
मूर्ख
वैद्य, तुम्ही संगमनेरचे का?
वॉरियर असं आडनाव भारतातल्या
वॉरियर असं आडनाव भारतातल्या दक्षिण किनार्यालगतच्या लोकांमधे असतं ना?
भाषा सांभाळा वैद्य.
---
सांगोवांगीच्या गोष्टी म्हणजे विदा नव्हे.
>>वॉरियर असं आडनाव भारतातल्या
>>वॉरियर असं आडनाव भारतातल्या दक्षिण किनार्यालगतच्या लोकांमधे असतं ना? <<<
वारियर. केरळ. चूभूदेघे.
नो आयडियाज् बट इन थिंग्ज.
भावणा दुखावळ्या का हो
भावणा दुखावळ्या का हो पुण्यावरूण![ROFL](https://aisiakshare.com/sites/all/modules/smiley/packs/kolobok/ROFL.gif)
माहिष्मती साम्राज्यं अस्माकं अजेयं
इथेच कमी पडतात मराठी माणसे !
इथेच कमी पडतात मराठी माणसे ! तुम्हाला त्या केरळी लोकांचा अपमान केला असे वाटते पण आपल्या एक मराठी बांधवाला सहानुभूती देण्याऐवजी मलाच तोँडावर पाडले ! काय म्हणावे याला?
आज मात्र तुम्हा सगळ्यांच्या
आज मात्र तुम्हा सगळ्यांच्या सपोर्टची पुण्याला गरज आहे राव ! द्या सपोर्ट ! जिँकवा पुण्याला !
आज मात्र तुम्हा सगळ्यांच्या
आज मात्र तुम्हा सगळ्यांच्या सपोर्टची पुण्याला गरज आहे राव ! द्या सपोर्ट ! जिँकवा पुण्याला ! हर हर महादेव
एशेमेश पाठवून?
च्यामारी, आयपीएल म्याच एशेमेश पाठवून जिंकता येऊ लागली की काय?
किंबहुना सर्वसुखी| आंतरजाली फेसबूकी||
संस्थळी कीपॅड ठोकी| अखंडित||
छ्या: ! टी ट्वेण्टी हा काय
छ्या: ! टी ट्वेण्टी हा काय खेळ आहे?
--------------------------------------------
ऐसीवरील गमभन इतरांपेक्षा वेगळे आहे.
प्रमाणित करण्यात येते की हा आयडी एमसीपी आहे.
+१. ट्वेंटी-ट्वेंटी म्हणजे
+१.
ट्वेंटी-ट्वेंटी म्हणजे क्रिकेटची शवपेटिका!!!
माहिष्मती साम्राज्यं अस्माकं अजेयं
क्षुण्ण कोटीबद्दल क्षमस्व
टीमधे ट्यानिन असते ना, मग ट्वेंटी झाले तरी कॉफिनचा उल्लेख इथे का?
---
सांगोवांगीच्या गोष्टी म्हणजे विदा नव्हे.
आयपीएल म्हंजे उत्तम नजाकतदार
आयपीएल म्हंजे उत्तम नजाकतदार क्रिकेटची शवपेटिकाच असल्याने तसे म्हणालो. ट्यानिन अन क्याफीनमुळे नव्हे.
बाकी क्षुण्ण या शब्दाचा नेमका अर्थ काय म्हणे?
माहिष्मती साम्राज्यं अस्माकं अजेयं
अवान्तर
१. टी-२० चा असो वा नसो; टिक्-२० चा कॉफिनशी सम्बन्ध आहे.![Wink](https://aisiakshare.com/sites/all/modules/smiley/packs/kolobok/wink.gif)
२. 'क्षुद' चे कभूधावि. - क्षुण्ण
रैट्ट!! धन्यवाद
रैट्ट!! धन्यवाद![Smile](https://aisiakshare.com/sites/all/modules/smiley/packs/kolobok/smile.gif)
माहिष्मती साम्राज्यं अस्माकं अजेयं
मोल्सवर्थ काका म्हणे:
मोल्सवर्थ काका म्हणे:
क्षुण्ण (p. 913) [ kṣuṇṇa ] p S Bruised or trodden; crushed or injured through bruising, pounding, trampling &c.
---
सांगोवांगीच्या गोष्टी म्हणजे विदा नव्हे.
धन्यवाद
धन्यवाद![Smile](https://aisiakshare.com/sites/all/modules/smiley/packs/kolobok/smile.gif)
माहिष्मती साम्राज्यं अस्माकं अजेयं
पुणं
जिंक्लं वाट्टं?
-Nile
हो ना. १३३ रना करून चांगला
हो ना. १३३ रना करून चांगला पुरीषोत्सर्ग करून ठेवलाय साल्यांनी![Wink](https://aisiakshare.com/sites/all/modules/smiley/packs/kolobok/wink.gif)
माहिष्मती साम्राज्यं अस्माकं अजेयं
आय थिँक पुण्याने बँगलोर
आय थिँक पुण्याने बँगलोर विरुद्धच्या सामन्यातुन काही तरी बोध नक्कीच घेतला असेल पाहुया रविवारी काय काशी करतायत ! ( अवांतर - सहाराने शहर बदलून देण्याची विनंती बीसीसीआयला केली आहे. प्रेक्षकांचा प्रतिसाद अजिबात नाही हे कारण )
मी तर ऐकलय
मी ऐकलं की सहाराने टीम ओएलएक्स.इन वर विकायला ठेवलीये
पुणे वॉरियर्स फँन्स क्लब
सिंग नावाचा माणूस कर्णधार आणि सुब्रतो राय नावच माणूस मालक असून पुणे म्हणविणार्या (???) टीमचा फ्यान क्लब असू शकतो यावरच माझा विश्वास नाहीये
:-B
':ब
मी ताजमहाल पाहिला, अन हिमालयही पाहिला...सरतेशेवटी जाताना "मी" माझाच फोटो काढीला.
http://sagarshivade07.blogspot.in
सिँग नावाचा कर्णधार व सहारा
सिँग नावाचा कर्णधार व सहारा मालक असणारा पुणे वॉरियर संघ आपल्या पुण्यासाठी खेळतो. वॉरियर जिँकले तर सहारा जिँकले वा युवराज जिँकला असे न म्हणता आपण पुणे जिँकले असे म्हणतो . आपला कर्णधार कोण मालक कोण याच्याशी संबंध नाही . संबंध पुण्याशी आहे. ते आपल्या पुण्यासाठी खेळतात म्हणून हा फँन्स क्लब स्थापन झाला आहे . इथे फॅन एकच असुन इतर टिका करण्यासाठी आहेत.(नगरकर)
>>ते आपल्या पुण्यासाठी
>>ते आपल्या पुण्यासाठी खेळतात
याबद्दल शंका आहे. ते पैशासाठी खेळतात असा संशय आहे.
--------------------------------------------
ऐसीवरील गमभन इतरांपेक्षा वेगळे आहे.
प्रमाणित करण्यात येते की हा आयडी एमसीपी आहे.
-१.
ते आपल्या पुण्ण्यासाठी खेळतात. अर्थात पैशामुळे पुण्य मिळते हा भाग काही उल्लेखनीय नाहीच म्हणा![Wink](https://aisiakshare.com/sites/all/modules/smiley/packs/kolobok/wink.gif)
माहिष्मती साम्राज्यं अस्माकं अजेयं
मोठी शंका आहे.
वॉरियर जिँकले तर >>>
मला याबद्दल मोठी शंका आहे. हि कन्डिशन कधीही satisfy होईल असे वाटत नाही.
उलट कोलकत्ता जिंकले तर शाहरुख जिंकला असे म्हणतो आम्ही
मी ताजमहाल पाहिला, अन हिमालयही पाहिला...सरतेशेवटी जाताना "मी" माझाच फोटो काढीला.
http://sagarshivade07.blogspot.in
आज दिल्ली पुणे लढत आहे !
आज दिल्ली पुणे लढत आहे ! तुम्हाला काय वाटते , कोण जिँकेल ? पुणे आज जिँकलेच पाहिजे !
जिंकणे, जिंकले, जिंकलेच ...
जिंकणे, जिंकले, जिंकलेच ... दहा वेळा लिहून काढा पाहू.
---
सांगोवांगीच्या गोष्टी म्हणजे विदा नव्हे.
या प्रतिसादाला माहितीपूर्ण
या प्रतिसादाला माहितीपूर्ण श्रेणी देण्यामागचे कारण श्रेणीडोनराने स्पष्ट करावे. अन्यथा मोकलाया दाही दिश्या दाहीवेळेस ल्याहावे लागेल तीन पॅराडाइम मधून. एक शुद्ध पद्धत, दुसरी मोकलाया वाली, अन तिस्री चुचुवलि.
माहिष्मती साम्राज्यं अस्माकं अजेयं
"तुम्ही स्वतःच्या
"तुम्ही स्वतःच्या प्रतिक्रियेस श्रेणी देऊ शकत नाही." त्यामुळे मी आरोपी नाही.
---
सांगोवांगीच्या गोष्टी म्हणजे विदा नव्हे.
पुणे आणि दिल्ली
सारणीतील शेवटच्या स्थानासाठी पुणे आणि दिल्लीमध्ये चुरस आहे. आता तरी मराठी माणूस दिल्ली सर करणार की नाही? पुण्याचे चीअरलीडर धनंजय यांचे काय मत आहे?
अवांतरः चीअरलीडर चे भाषांतर
अवांतरः चीअरलीडर चे भाषांतर काय होईल बरे? आनंदनेता, उत्तेजक की अजून काही![Wink](https://aisiakshare.com/sites/all/modules/smiley/packs/kolobok/wink.gif)
माहिष्मती साम्राज्यं अस्माकं अजेयं
<मौजमजा>
उत्साहवर्धना, जोशोत्तेजकाग्रणी, वगैरे, वगैरे शब्द पाडता येतील की..<मौजमजा>
जोशोत्तेजकाग्रणी हा शब्द
जोशोत्तेजकाग्रणी हा शब्द आवडल्या गेला आहे![Smile](https://aisiakshare.com/sites/all/modules/smiley/packs/kolobok/smile.gif)
आंबट अवांतरः ओडालिस्क म्हटले तर वो
![ROFL](https://aisiakshare.com/sites/all/modules/smiley/packs/kolobok/ROFL.gif)
माहिष्मती साम्राज्यं अस्माकं अजेयं
जोशोत्तेजकाग्रणी हा शब्द
जोशोत्तेजकाग्रणी हा शब्द मलाही आवडलं. उगाचच स्वतःचं आडनाव जोडलं गेल्यासारखं वाटतंय.
---
सांगोवांगीच्या गोष्टी म्हणजे विदा नव्हे.
<मौजमजा २>
अमुक एक कोणी म्हटलेच आहे, "जोजो वाञ्छिल ते ती लाहो !"
('जोशिले' हा चित्रपटदेखील आवडता का ?)
<मौजमजा २>
जोशी
जोशीला पण आवडता असेल. (देव आनंदचा*)
*माझ्या लहानपणी याचा उच्चार देवानंद (संध्यानंद सारखा) करत असत.
--------------------------------------------
ऐसीवरील गमभन इतरांपेक्षा वेगळे आहे.
प्रमाणित करण्यात येते की हा आयडी एमसीपी आहे.
अहिराणी बोली फारशी (इथे कोटी
अहिराणी बोली फारशी (इथे कोटी नाही) समजत नाही त्यामुळे जोशिले किती समजेल याबद्दल शंका होती. म्हणून पाहिला नाही. पण आवडायला काय लागत नाही, तेव्हा होय. तो ही आवडतो.
---
सांगोवांगीच्या गोष्टी म्हणजे विदा नव्हे.
जोशिले, त्याले, मले, तुले, इ.
जोशिले, त्याले, मले, तुले, इ. प्रत्यय अहिराणीत असतात की वर्हाडी बोलीत? अहिराणीचा अण्भव णाही, वर्हाडीचा आहे त्यात असे प्रत्यय पाहिलेत.
माहिष्मती साम्राज्यं अस्माकं अजेयं
म्हणजे मला वर्हाडीही येत
म्हणजे मला वर्हाडीही येत नाही. एवढं खरं नको रे बोलायला लावूस चारचौघांत.
---
सांगोवांगीच्या गोष्टी म्हणजे विदा नव्हे.
हा हा हा तर तर
हा हा हा तर तर![Biggrin](https://aisiakshare.com/sites/all/modules/smiley/packs/kolobok/biggrin.gif)
माहिष्मती साम्राज्यं अस्माकं अजेयं
पुणे वारियर्स
पुणे वारियर्स फक्त ब्याटीने बॉलला वारा घालताना दिसत आहेत. सलग सात-आठ पराभवांमुळे त्यांनी गुणतालिकेत (खालून) पहिले स्थान कमावले आहे.
पुणे वारियर्स फक्त ब्याटीने
जबरी उपमा!!!!! पार सुपरमार्केट उठवल्या गेले आहे
![ROFL](https://aisiakshare.com/sites/all/modules/smiley/packs/kolobok/ROFL.gif)
माहिष्मती साम्राज्यं अस्माकं अजेयं
अरे वा पुणे वॉरीयर्सचे
अरे वा पुणे वॉरीयर्सचे मनापासुन अभिनंदन![Biggrin](https://aisiakshare.com/sites/all/modules/smiley/packs/kolobok/biggrin.gif)
हलकट अशी श्रेणी देण्यात येत
हलकट अशी श्रेणी देण्यात येत आहे.
---
सांगोवांगीच्या गोष्टी म्हणजे विदा नव्हे.
व्हॉट अबौट अच्रत बव्लत?
व्हॉट अबौट अच्रत बव्लत?
माहिष्मती साम्राज्यं अस्माकं अजेयं
पुणे संघ संपुष्टात आला का?
पुणे संघ संपुष्टात आला का? सहाराने आयपीएलमधून बाहेर पडायचा निर्णय घेतला आहे.
--------------------------------------------
ऐसीवरील गमभन इतरांपेक्षा वेगळे आहे.
प्रमाणित करण्यात येते की हा आयडी एमसीपी आहे.
भोगा आपल्या..
इथे ऐसीवर कुण्णी कुण्णी बिच्चार्या संघाला सपोर्ट न केल्याची ही फळं आहेत.![Wink](https://aisiakshare.com/sites/all/modules/smiley/packs/kolobok/wink.gif)
आता या पुण्याला संघच नै? का फक्त मालक बदलणार ते पहायचं
- ऋ
-------
लव्ह अॅड लेट लव्ह!
पुण्याचा संघ पुढच्या
पुण्याचा संघ पुढच्या आयपीएलमध्ये नसल्यावर पुणे तिथे काय उणे या आजपर्यंत र्हेटॉरिकल असणार्या सवालाचा एक तरी व्यवस्थित जबाब मिळेल![Wink](https://aisiakshare.com/sites/all/modules/smiley/packs/kolobok/wink.gif)
माहिष्मती साम्राज्यं अस्माकं अजेयं
हॅ हॅ
ह्या IPL च्या तोंडात मारील अशी दुसरी समांतर IPL (Inter Peth League) सुरू करण्यात येईल![Wink](https://aisiakshare.com/sites/all/modules/smiley/packs/kolobok/wink.gif)
आल्रेडी एम्पीएल पाहिलीये.
आल्रेडी एम्पीएल पाहिलीये. महाराष्ट्र प्रीमियर लीग. देवगिरी एम्परर्स, रायगड रॉयल्स, पन्हाळा पॅन्थर्स, सिंधुदुर्ग सेलर्स इ. नावे पाहून मस्त मजा वाटली. तसेच या आयपीएलमध्येही व्हायला हर्कत नसावी. ऑल द खत्रूड्स कॅन प्ले देअर पार्ट![Wink](https://aisiakshare.com/sites/all/modules/smiley/packs/kolobok/wink.gif)
माहिष्मती साम्राज्यं अस्माकं अजेयं
आमच्या इकडे एन.ए.एल. मध्ये
आमच्या इकडे एन.ए.एल. मध्ये एनपीएल होती.
संघांची नावे, स्ट्रक्चर्स सुपर ११, सी.एफ.डी सुपर किंग्स, नॅनो वॉरियर्स कोडीहल्ली वगैरे असावीत.
ऐला भारीएत नावं एकदम
ऐला भारीएत नावं एकदम![Smile](https://aisiakshare.com/sites/all/modules/smiley/packs/kolobok/smile.gif)
माहिष्मती साम्राज्यं अस्माकं अजेयं
पृथ्वीची उलथापालथ नाय न
पृथ्वीची उलथापालथ नाय न झालंनीत?
मुंग्यांनी मेरू पर्वत तर नाय नं गिळलानीत्..?
वडवानलान् समुद्रास आग नाय नं लावलंनीत्..?
मग रांडेचे हे पुणे वॉरियर्सचं कमनशिबी कसे....?![Wink](https://aisiakshare.com/sites/all/modules/smiley/packs/kolobok/wink.gif)
किंबहुना सर्वसुखी| आंतरजाली फेसबूकी||
संस्थळी कीपॅड ठोकी| अखंडित||
पुणेद्वेष्ट्यांचा शाप भोवला
पुणेद्वेष्ट्यांचा शाप भोवला असणार.
---
सांगोवांगीच्या गोष्टी म्हणजे विदा नव्हे.
काय रे देवा तु ज्या आशेवर
काय रे देवा तु ज्या आशेवर आम्ही इतरांशी हुज्जत घालत होतो ती आशाच तु मिटवून टाकली ! पुणे वॉरियर आता आयपीएल मधुन बाहेर .....! काही मंडळीँचे शिव्याशाप लागले वाटत . मित्रांनो , काय हैदराबादप्रमाणे आपले पुणे पुन्हा नवा लुक घेऊन आयपीएलमध्ये परत येईल ...?
पुण्याच काय होईल कुणी सांगेल
पुण्याच काय होईल कुणी सांगेल काय ?
पुणे आहे तिथेच राहिल बहुतेक.
पुणे आहे तिथेच राहिल बहुतेक. पुणं आहे तिथून उचलून लखनौशेजारी ठेवण्याचं तंत्रज्ञान सध्या कोणाकडे आहे?
---
सांगोवांगीच्या गोष्टी म्हणजे विदा नव्हे.
छे:! पूर्वीचं पुणं राहिलं
छे:! पूर्वीचं पुणं राहिलं नाही.
(निव्वळ पुण्यात राहत असल्यामुळे पुणेकरनामक बिरुदाचा झालेला धनी) बॅटमॅन.
माहिष्मती साम्राज्यं अस्माकं अजेयं