मराठी विकिपीडियासाठी व्हिडिओ क्लिप बनवण्यात साहाय्य हवे
नमस्कार,
मराठी विकिपीडियावर मराठी टायपींगच्या उपलब्ध पद्धती बद्दल अजूनही नवीन लोक मोठ्या प्रमाणावर गोंधळतात. खाली तेलगू भाषेतील व्हिडीओ क्लिपचे उदाहरण देत आहे अशा प्रकारची व्हिडीओ क्लिप मराठी विकिपीडियाकरिता मराठीतून बनवून हवी आहे.
*मला या साठी लागणारे तांत्रीक ज्ञान नाही पण अशी मराठी व्हिडिओ क्लिप बनवून मिळाल्यास मराठी विकिपीडियावर लिहू इच्छिणार्या बर्याच नवागतांना याचा उपयोग होऊ शकेल असा विश्वास आहे.
** व्हिडिओ क्लिप या आणि अशाच इतर साहाय्य पानातून जोडावयाची आहे. तसेच ऐसी सारखीच इतर मराठी संकेतस्थळे, फेसबुक इत्यादी वरूनही शेअर करता येईल असा मानस आहे.
*हि व्हिडिओ क्लिप सध्या विकिमिडीया कॉमन्स प्रकल्पात File:Type in Telugu on Telugu Wikimedia projects.webm
येथे उपलब्ध आहे. यूट्यूबवरील फाईल्स विकिपीडियावर सहजपणे दाखवता येत नाहीत त्यामुळे शक्यतोवर विकिमिडीया कॉमन्सच्या या सुविधेतून चढवल्यास अधिक बरे पडेल, कारण अपडेट्स देणे आणि अनेक विकिपीडिया साहाय्य पानात जोडणे सोपे जाते. पण शक्यच नसेल तर यूट्ञूब वरही चालेल.
** तेलगू व्हिडिओ क्लिपची सध्याची मराठी सबटाटल्स या दुव्यावर आहेत.
** सध्याची तेलगू व्हिडीयो क्लिप जूनी असल्यामुळे साहाय्य पानावर कुठून जावयाचे ते दाखवलेले नाही, मराठी टायपींग साठी मराठी अक्षरांतरण अथवा मराठी लिपी (म्हणजे इन्स्क्रिप्ट) निवडल्या नंतर त्यावर पुन्हा टिचकी मारल्यास प्रश्न चिन्हाची खूण दिसते त्या प्रश्न चिन्हाच्या खूणे वरून साहाय्य पानावर जाता येते. हे सुद्धा व्हिडिओ क्लिप मध्ये आंतर्भूत करता आल्यास बरे पडेल.
साहाय्य आणि मार्गदर्शनासाठी धन्यवाद.
लॅपटॉपवरून तुम्ही तुमच्या
लॅपटॉपवरून तुम्ही तुमच्या स्क्रीनवर केलेल्या हालचाली तुम्हाला रेकॉर्ड करता येतील.
धन्यवाद, दुवा बघून अभ्यासण्याचा प्रयत्न केला पण नेमक काय आणि कुठून डाऊनलोड केलतर यूट्ञूब कॅपच्यर वापरता येईल ते समजल नाही. अॅप स्टोअर मधून पर्चेस वगैरे करावे लागते का ? अॅप स्टोअर प्रकारांबद्दल मी जरासा अनभिज्ञ आहे.
!youtube capture
ह्म्म, मला वाटलं की लॅपटॉपसाठी हे वापरता येईल पण हे फक्त फोन आणि iPad साठीच दिसतंय.
अजून एक म्ह्णजे स्क्रीन capture करणारं काही software आहे का ते बघायला लागेल.
ही काही प्राथमिक उदाहरणे मिळाली ती वापरून पहा -
http://www.wikihow.com/Record-Screen-in-Microsoft-Windows-7
किंवा
हा व्हिडियो -
screen cast o
screen cast o matic
http://www.screencast-o-matic.com/
मी हे वापरलं आहे, प्रॉब्लेम हा आहे की मायक्रोफोनवर येणारे आवाज रेकॉर्ड करतं. म्युट करता येतंच. त्या वेळी मला असं सॉफ्ट्वेअर पाहीजे होतं की जे साउंड कार्ड मधून जाणारे आवाज रेकॉर्ड करेल.
सध्याच्या कामात तरी साउंडची
सध्याच्या कामात तरी साउंडची आवश्यकता नाही. विंडोजवर चालेल म्हणून लिहिल आहे. मी फायरफॉक्स वापरतो. फायरफॉक्स सोबत वापरता येते का का इंटरनेट एक्सप्लोरर वापरावे लागते. इंटरनेट एक्सप्लोररची सवय सुटून बरीच वर्ष झालीत अर्थात पर्याय नसेल तर तेही वापरेन नाही असे नाही.
माहिती साठी धन्यवाद
मराठी क्लिप
@ अस्वल आणि मन्दार, विकिपीडियावरील मराठी टायपींग करता सुभाशिष पाणिग्रही म्हणून ओडीया विकिपीडियाचे सदस्य ज्यांनी तेलगू क्लिप बनवली त्यांनीच आपल्या विनंतीस अनुसरून नुकतीच मराठी क्लिपही पाठवली. आपण वर दिलेल्या दुव्यांच्या मार्गदर्शनाने ह्या क्लिप मध्ये सुधारणा करणे आणि मराठी विकिपीडियाच्या साहाय्या बद्दल इतर क्लिप बनवणे सोपे होणार आहेच. सुभाशिष पाणिग्रहींच्या खालील क्लिप मध्ये काही सुधारणा सुचवता आल्यास कळवावे हि विनंती.
*(मला इथे मजकुर परिच्छेद आणि छायाचित्राच्या मध्ये दोन तीन ओळी ब्लँक सोडावयाच्या आहेत सध्या तसे होत नाही काय करावे लागेल.)
...
...
...
...
...
...
आपणास चर्चा आणि मार्गदर्शनासाठी पुन्हा एकदा धन्यवाद.
प्रयोग
*(मला इथे मजकुर परिच्छेद आणि छायाचित्राच्या मध्ये दोन तीन ओळी ब्लँक सोडावयाच्या आहेत सध्या तसे होत नाही काय करावे लागेल.)
.
.
.
एचटीएमेलमध्ये प्रयोग करण्याऐवजी मी फक्त तीन पूर्णविराम वापरले, एका ओळीत एक असे आणि ते पांढरे केले आहेत. वर्कअराऊंडच आहे, पण चालेल का?
Making visual assets for Wikipedia clips without a design
For the volunteer asking about making clips for Marathi Wikipedia — the video editing part usually isn't the hard bit; it's the visual assets that stall people. A short explainer clip needs a title card, a few background stills, maybe a thumbnail, and none of that requires a design degree if you break it into small, separate pieces instead of one polished video.
Practical approach: first decide on a simple layout you'll reuse (same corner for logos, same font size for titles) so every asset looks like it belongs to the same series. Then generate or source each piece individually — background texture, subject image, title plate — rather than trying to build the whole frame at once. Keep file sizes and aspect ratios consistent (16:9 is safest for most video tools) so editing later is just drag-and-drop.
This is where an AI image tool can genuinely save time for non-designers: something like Muse Image lets you describe a scene or upload a reference and get a usable still or background without opening Photoshop. It's useful for quick draft visuals and iterating on a look fast.
Two real limitations worth flagging: Marathi (Devanagari) text rendered inside AI-generated images is often unreliable, so title text is safer added separately in your video editor. And keeping a character or object visually consistent across multiple images in a series still needs manual checking, not just repeated prompts.
यूट्यूब
https://support.google.com/youtube/answer/2858404?hl=en
सुरुवात म्हणून हे उपयोगी पडेल का? लॅपटॉपवरून तुम्ही तुमच्या स्क्रीनवर केलेल्या हालचाली तुम्हाला रेकॉर्ड करता येतील.